#पाकिस्तानमध्ये
Explore tagged Tumblr posts
nagarchaufer · 10 days ago
Text
पत्नीला घेऊन पाकिस्तानलाच जातो , सीमा हैदरचा उल्लेख करत बडतर्फ भारतीय जवानाचा मंत्रालयाबाहेर आक्रोश
पत्नीला घेऊन पाकिस्तानलाच जातो , सीमा हैदरचा उल्लेख करत बडतर्फ भारतीय जवानाचा मंत्रालयाबाहेर आक्रोश
भारतीय सैन्यातून बडतर्फ करण्यात आलेले जवान चंदू चव्हाण यांनी आज कुटुंबासोबत मंत्रालयासमोर आंदोलन केलं. आम्ही देशसेवा करायला लष्करात जातो. दहशतवादी व्हायला जात नाही. अधिकारी शिस्तीच्या नावाखाली जवानांचं निलंबन करतात. आता माझ्या कुटुंबावर भीक मागण्याची वेळ आली आहे, अशा शब्दांत त्यांनी व्यथा मांडली आहे.  चंदू चव्हाण हे धुळे जिल्ह्यातील बोरविहीर गावचे रहिवासी असून भारतीय सीमा ओलांडून पाकिस्तानमध्ये…
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०८ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाला प्रारंभ, ठिकठिकाणी गणरायाची उत्साहात प्रतिष्ठापना
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर पदमुक्त
पंजाबातल्या तिहेरी हत्याकांड प्रकारणी सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं अटक
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात
आणि  
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नवदीप सिंहला सुवर्ण, स्पर्धेचा आज समारोप  
गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाला कालपासून प्रारंभ झाला. राज्यात ठिकठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सव काळात राज्यात सुमारे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गणेशोत्सवानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
****
मुंबईत राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते, तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना झाली. गणरायांचं कृपाछत्र सर्व जनतेवर राहावं आणि सर्वांचं जीवन सुखी, समृद्ध व्हावं अशी प्रार्थना गणरायांकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
मुंबईत लालबागचा राजा, गणेश गल्लीतला मुंबईचा राजा यासह सर्वच मोठ्या गणेश मंडळांच्या मंडपात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पुण्यात पाच मानाच्या गणपतींसह, श्रीमंत दगडूशेट गणपतीचं ढोलताशाच्या गजरात आगमन झालं.
****
परदेशातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. पाकिस्तानात कराची इथं गणेशोत्सव साजरा करणारे विशाल राजपूत यांनी या उत्सवाचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा...
“पाकिस्तानमध्ये पार्टीशनपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. आजपण आम्ही गणपतीची पूजा केली. माझे ब्रदल इन लॉ मूर्ती बनवतात. त्यांनी आम्हाला मूर्ती दिली. आम्ही दीड दिवसाचा गणपती बसवतो. गणपतीची तयारी आम्ही महिनाभरापासून आधीपासून सुरू करतो. मोदक प्रसाद आम्ही घरी बनवतो. आणि गणपतीचे भजन, सत्संग सगळं साजरा करत असतो.”
****
छत्रपती संभाजीनगर इथं घरोघरी तसंच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. जिल्ह्यात एक हजार ६६�� गणेश मंडळाची नोंदणी झाली असून, ५४४ गावांमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला जात आहे.
दरम्यान, शहरातल्या विसर्जन मिरवणूक मार्गाची मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी काल पाहणी केली, या मार्गांवर लोंबकळणाऱ्या तारा १५ सप्टेंबरपूर्वी काढून घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, उमेद स्वयं सहाय्यता समूहातल्या महिलांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने गणेश मूर्तीं विक्री उपक्रम राबवण्यात आला, या माध्यमातून सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं वृत्त आहे.
****
जालना शहरासह जिल्ह्यात काल दिवसभर गणेशाच्या आगमनाचा उत्साह दिसून आला. यावर्षी जालना गणेश फेस्टिवल मध्ये आठ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
भाद्रपद महिन्यातला हा गणेशोत्सव, पार्थिव गणेश पूज��� म्हणजे मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीच्या पुजेचा उत्सव असतो. पण प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडू मातीसह विविध साहित्यापासून साकारलेल्या आकर्षक रंगसंगतीच्या गणेश मूर्तींमुळे मूळ संकल्पना असलेली पार्थिव गणेशाची मूर्ती काही अंशी दुर्लक्षित होत आहे. मात्र नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं काळ्या मातीच्या गणपतीची स्थापना करण्याची परंपरा आजही कायम आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर....
“काल घरोघरी गणेश स्थापनेची लगबग सुरू असतांना, देगलूर इथलं कोरलेपवार कुटुंब मात्र गणेशमूर्ती घडवण्यात मग्न होतं. कुंभाराने पारंपरिक पद्धतीने साकारलेल्या काळ्या मातीच्या गणेशमूर्ती बसवण्याची परंपरा या गावातल्या अनेक कुटुंबांनी आजही पाळली आहे. हे कुटुंबीय आपापल्या घरून मूर्तीकाराकडे लाकडी पाट आणून देतात, थेट त्याच पाटावर कोरलेपवार कुटुंबीय काळ्या मातीची मूर्ती घडवून देतात. प्लास्टर ऑफ पॅरीस आणि शाडू मातीच्या वादात काळ्या मातीच्या या शंभरटक्के पर्यावरणपूरक असलेल्या काळ्या मातीच्या गणेश मूर्ती अधिक उठून दिसतात.”
अनुराग पोवळे, आकाशवाणी बातम्यांसाठी नांदेड
****
नांदेड इथं माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी तर छत्रपती संभाजीनगर इथं गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या घरी मोठ्या उत्साहात 'श्रीं'ची प्रतिष्ठापना करण्यात आली.
बीड शहरात सिद्धिविनायक व्यापारी संकुल परिसरात असंख्य भाविकांनी गणेश मूर्ती घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. परभणी इथं बाजारपेठांमध्ये मूर्ती, तसंच साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यात अनेक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणपती आणि देखावे साकारले आहेत.
****
उत्सवाच्या कालावधीत नागरिकांनी मिठाई तसंच प्र��ाद खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हिंगोली जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे. प्रसाद स्वतः तयार करून वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत नोंदणी करावी, तसंच जनतेनं अन्न पदार्थाची खरेदी करताना खबरदारी घ्यावी असंही या विभागानं म्हटलं आहे.
****
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना तत्काळ प्रभावाने पदमुक्त करण्यात आलं आहे. खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे प्रशासकीय सेवेत नियुक्ती मिळवल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यावर केंद्र सरकारने त्यांना प्रशासकीय कायदा १९५४ नुसार कारवाई करत प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पदावरून पदमुक्त केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 
****
पंजाबात फिरोजपूर इथं एकाच कुटुंबातल्या तीन सदस्यांची हत्या करणाऱ्या सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं पोलिसांनी अटक केली. नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर पोलिसांनी काल सकाळी सापळा रचून या सर्वांना अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. या सर्वांना फिरोजपूर पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
नांदेड शहरातल्या वजीराबाद पोलीस ठाणे हद्दीत अफिम बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. त्याच्याकडून २७ ग्रॅम अफिम जप्त करण्यात आलं. सुखविंदरसिंग कालो असं या युवकाचं नाव आहे.
****
गुंगीकारक गोळ्यांची विक्री करणाऱ्या चार संशयितांना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल अटक केली. त्यांच्याकडून नशा करण्यासाठी, गर्भपातासाठी तसंच उत्तेजना वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे आठ लाख १८ हजार रुपयांच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातले तिघेजण मेडीकल चालक असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली.
****
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामास कालपासून प्रत्यक्ष सुरूवात झाली. उपळा शिवारात वाहनं आणि यंत्राचं पूजन करून या कामास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यातलं हे काम ३० महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित आहे. मात्र दोन वर्षांच्या आत काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितलं.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत काल भालाफेकमध्ये भारताच्या नवदीप सिंह यानं सुवर्ण पदकाची कमाई केली. तर दोनशे मीटर ट्रॅक स्पर्धेत सिमरन शर्मा हिनं कांस्य पदक जिंकलं.
दरम्यान, या स्पर्धेचा आज समारोप होत आहे. स्पर्धेच्या पदकतालिकेत भारतानं सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह एकूण २९ पदकांची कमाई करुन सोळावं स्थान पटकावलं आहे. भारताच्या पॅरालिम्पिकच्या इतिहासातली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. सुवर्ण पदक विजेते तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांनी या एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकली आहेत. आज समारोप समारोहात हे दोघे भारतीय पथकातले ध्वजवाहक असणार आहेत.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत लातूर जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक याप्रमाणे ७८६ आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे एका योजनादूताची निवड होणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर येत्या १३ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
शिवसेना वैद्यकीय कक्ष तसंच रामहरि राऊत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई इथं काल जयपूर फूट वाटप करण्यात आलं. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, रामहरि राऊत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत पाच हजार मोफत तसंच सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, सव्वा दोन वर्षात ३२१ कोटींची मदत वाटप केल्याची माहिती, चिवटे यांनी दिली.
****
हिंगोली जिल्ह्यातलं ईसापूर धरण ९७ टक्के भरलं आहे. धरणाचे तीन दरवाजे सुमारे अर्ध्या फुटाने उघडून, सध्या एक हजार २१ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातली आवक वाढल्यास, कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात काल काही काळ पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे बाजारातले विक्रेते तसंच ग्राहकांची तारांबळ उडाली. जालना शहर परिसरातही काल पावसानं हजेरी लावल्याचं वृत्त आहे.
****
दरम्यान, येत्या ७२ तासांत राज्यभरात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
Big terrorist attack in Pak airbase पाक एअरबेसवर मोठा दहशतवादी हल्ला
https://bharatlive.news/?p=187188 Big terrorist attack in Pak airbase पाक एअरबेसवर मोठा दहशतवादी हल्ला
पाकिस्तानमध्ये मोठा ...
0 notes
mahayojanaa · 1 year ago
Text
राष्ट्रीय एकता दिवस 2023 मराठी | National Unity Day: सरदार पटेल यांच्या अखंड भारताच्या संकल्पनेचे स्मरण
National Unity Day 2023: Commemorating Sardar Patel's Vision of a Unified India | National Unity Day Theme and History: 31st October | National Unity Day Significance | राष्ट्रीय एकता दिवस 2023 संपूर्ण माहिती मराठी | National Unity Day 2023 in Marathi | Essay on National Unity Day 
दरवर्षी 31 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय एकता दिवस हा भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा प्रसंग आहे. हे देशाचे संस्थापक आणि पहिले उपपंतप्रधान आणि गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीचे स्मरण करते. ब्रिटीश वसाहतवादी राजवटीपासून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या एकीकरणात सरदार पटेल यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. राष्ट्रीय एकता दिवस हा जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीमध्ये एकता आणि एकात्मतेचे महत्त्व अधोरेखित करणारा, त्यांच्या उल्लेखनीय योगदानाला श्रद्धांजली आहे. हा लेख, राष्ट्रीय एकता दिवसाचा इतिहास, महत्त्व आणि समकालीन प्रासंगिकतेचा अभ्यास करतो.
Tumblr media
राष्ट्रीय एकता दिवसाचे महत्त्व समजून घेण्यासाठी, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यानच्या ऐतिहासिक संदर्भाचा शोध घेणे आवश्यक आहे. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी, भारत हा संस्थानिक राज्ये आणि ब्रिटीश-शासित प्रांतांचा एक मोज़ेक होता. या संस्थानांना काही प्रमाणात स्वायत्तता होती आणि ते थेट ब्रिटिशांच्या नियंत्रणाखाली नव्हते. स्वातंत्र्याच्या वेळी, 560 हून अधिक संस्थानं होती आणि त्यांच्या शासकांना भारत किंवा पाकिस्तानमध्ये सामील होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा पर्याय देण्यात आला होता. Read More
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
१८ महिला मुलीचं ५५ वर्षांच्या व्यक्तीशी विवाह; लव्ह मॅजनंतर म्हणाले, "बॉबी देओलच्या 'या' गाण्या मूळ पडलोच्या प्रेमाच्या" | 18 वर्षाच्या मुलीने पाकिस्तानात 55 वर्षाच्या माणसाशी लग्न केले म्हणते बॉबी देओलच्या गाण्याने त्यांना जवळ आणले scsg 91
१८ महिला मुलीचं ५५ वर्षांच्या व्यक्तीशी विवाह; लव्ह मॅजनंतर म्हणाले, “बॉबी देओलच्या ‘या’ गाण्या मूळ पडलोच्या प्रेमाच्या” | 18 वर्षाच्या मुलीने पाकिस्तानात 55 वर्षाच्या माणसाशी लग्न केले म्हणते बॉबी देओलच्या गाण्याने त्यांना जवळ आणले scsg 91
प्रेमाला कसं बंधन नसतं असं म्हणतात. याचाच प्रत्यय पाकिस्तानमधील एका अनोख्या प्रेमप्रकरणातून पुन्हा एकदा आला आहे. येथील मुस्कान नावाच्या १८ तरुणांनी फारसे अहमद नावाच्या ५५ ​​व्यक्ती महिला महिला आहेत. गाण्यां मधुर समान आवडतात या एका गोष्टी दोनघांच्या प्रेमात आणि त्यांनी जोडलेल्या आहेत. पाकिस्तान युट्यूब आणि सोशल मीडिया इन्फ्ल्यूएन्सर साइद अलीने या पक्षाची उभी आहे. नक्की पाहा>> भारत विरुद्ध…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
पाकिस्तानमध्ये आणखी एक क्रिकेट लीग सुरू, 10-10 षटकांचे सामने होणार, हे खेळाडू घेणार सहभागी
पाकिस्तानमध्ये आणखी एक क्रिकेट लीग सुरू, 10-10 षटकांचे सामने होणार, हे खेळाडू घेणार सहभागी
माजी पाकिस्तानी खेळाडू शाहिद आफ्रिदीने नवीन क्रिकेट लीग सुरू केली आहे. या लीगला ‘मेगा स्टार्स लीग’ असे नाव देण्यात आले आहे. या लीगचा पहिला हंगाम या वर्षी सप्टेंबरमध्ये खेळवला जाणार आहे. या लीगच्या शुभारंभाच्या निमित्ताने माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की ही लीग अशा खेळाडूंसाठी असेल जे त्यांच्या वयामुळे पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) खेळू शकत नाहीत. पत्रकार परिषदेत शाहिद आफ्रिदी म्हणाला,…
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
सानिया-शोएब यांचा संसार मोडला; मित्राने केला मोठा खुलासा
Tumblr media
कराची : भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांचे लवकरच काडीमोड होणार आहे. पाकिस्तानी मीडिया रिपोर्ट्समध्ये सातत्याने हा दावा केला जात आहे. पण या अफवांना बळ मिळाले आहे. सानिया-शोएब घटस्फोट घेतला असून ते वेगवेगळे राहात असल्याची माहिती या जोडप्याच्या जवळच्या मित्राने दिली आहे. मीडिया रिपोर्ट्स मध्ये सानिया-शोएबच्या जवळच्या मित्राकडून बातमी आली आहे की आता दोघेही वेगळे राहात आहेत. त्यांच्यामध्ये सर्व काही फायनल झाले आहे. सध्या शोएब मलिक पाकिस्तानमध्ये आहे. तो एका स्पोर्ट्स चॅनलसाठी टी-२० वर्ल्ड कपमध्ये काम करत आहे. तर सानिया मिर्झा दुबईत असल्याचे सांगण्यात आले आहे. सानियाने नुकतीच एक इंस्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. यामुळे या अटकळांना आणखी हवा मिळाली आहे. शुक्रवारी सानिया मिर्झाने मुलगासोबतचा एक गोंडस फोटो शेअर केला आणि लिहिले, मला सर्वात कठीण दिवसांतून घेऊन जाणारे क्षण हे आहेत. त्याचवेळी दुस-या मीडिया रिपोर्टमध्ये शोएब मलिकच्या मॅनेजमेंट डिपार्टमेंटच्या एका व्यक्तीचा हवाला देत घटस्फोट झाल्याचे सांगण्यात आले आहे. या व्यक्तीने सांगितले की, सानिया आणि शोएबचा अधिकृतपणे घटस्फोट झाला आहे. दोघेही आता वेगळे झाले आहेत. घटस्फोटाचे कारण ‘ दोघांत तिसरी’ पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, शोएब मलिक सध्या दुस-या एका तरुणीला डे�� करत आहे. काही दिवसांपूर्वी सानिया मिर्झाने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चर्चेत आली होती. सानियाच्या या पोस्टवरून शोएबसोबतच्या तिच्या नात्यामध्ये दुरावा आल्याची चर्चा सुरु झाली होती.   Read the full article
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
पाकिस्तानच्या हिंदू बांधवांनी घडवले माणुसकीचे ' असेही ' दर्शन
पाकिस्तानच्या हिंदू बांधवांनी घडवले माणुसकीचे ‘ असेही ‘ दर्शन
एकीकडे भारतामध्ये सामाजिक एकोपा राखण्याचे मोठे आव्हान ना��रिकांसमोर असताना दुसरीकडे पाकिस्तानमध्ये असलेल्या हिंदू समुदायाने माणुसकीचे दर्शन घडवलं असून पाकिस्तानात पुरामुळे लाखो लोक बेघर झालेले असताना बलुचिस्तान येथील एका मंदिरात दोनशे ते तीनशे पूरग्रस्तांना आसरा देण्यात आलेला आहे. पाकिस्तानच्या कच्छी जिल्ह्यातील जलालखान गाव येथील माधोदास मंदिर हे उंच भागात असल्याने पुराच्या पाण्यापासून सुरक्षित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
पाकिस्तानच्या हिंदू बांधवांनी घडवले माणुसकीचे ' असेही ' दर्शन
पाकिस्तानच्या हिंदू बांधवांनी घडवले माणुसकीचे ‘ असेही ‘ दर्शन
एकीकडे भारतामध्ये सामाजिक एकोपा राखण्याचे मोठे आव्हान नागरि��ांसमोर असताना दुसरीकडे पाकिस्तानमध्ये असलेल्या हिंदू समुदायाने माणुसकीचे दर्शन घडवलं असून पाकिस्तानात पुरामुळे लाखो लोक बेघर झालेले असताना बलुचिस्तान येथील एका मंदिरात दोनशे ते तीनशे पूरग्रस्तांना आसरा देण्यात आलेला आहे. पाकिस्तानच्या कच्छी जिल्ह्यातील जलालखान गाव येथील माधोदास मंदिर हे उंच भागात असल्याने पुराच्या पाण्यापासून सुरक्षित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 3 months ago
Text
दोन हिंदू व्यापाऱ्यांचे गुंडाकडून अपहरण , व्हिडीओ रिलीज करून म्हटलंय की.. 
पाकिस्तान मधील अल्पसंख्यांक समुदाय असलेले हिंदू बांधव हे प्रचंड अडचणींचा सामना करत पाकिस्तानमध्ये राहत आहेत. अल्पवयीन मुलींचे अपहरण , व्यावसायिकांना दमदाटी ,धर्मांतर अशा घटना नेहमीच्या झालेल्या असून पाकिस्तानातील पंजाब प्रांतात रहीम यार खान या भागातून दोन हिंदू व्यापाऱ्यांचे अपहरण करण्यात आलेले आहे.  उपलब्ध माहितीनुसार , शमीर जी आणि धीमा जी अशी अपहरण करण्यात आलेल्या दोन्ही व्यापाऱ्यांची नावे…
0 notes
airnews-arngbad · 4 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 08 September 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०८ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाला प्रारंभ, ठिकठिकाणी गणरायाची उत्साहात प्रतिष्ठापना
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर पदमुक्त
पंजाबातल्या तिहेरी हत्याकांड प्रकारणी सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं अटक
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामास प्रत्यक्ष सुरूवात
आणि  
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भालाफेकपटू नवदीप सिंहला सुवर्ण, स्पर्धेचा आज समारोप  
गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाला कालपासून प्रारंभ झाला. राज्यात ठिकठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सव काळात राज्यात सुमारे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गणेशोत्सवानिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या.
****
मुंबईत राजभवनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते, तर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना झाली. गणरायांचं कृपाछत्र सर्व जनतेवर राहावं आणि सर्वांचं जीवन सुखी, समृद्ध व्हावं अशी प्रार्थना गणरायांकडे केल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
****
मुंबईत लालबागचा राजा, गणेश गल्लीतला मुंबईचा राजा यासह सर्वच मोठ्या गणेश मंडळांच्या मंडपात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. पुण्यात पाच मानाच्या गणपतींसह, श्रीमंत दगडूशेट गणपतीचं ढोलताशाच्या गजरात आगमन झालं.
****
परदेशातही गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. पाकिस्तानात कराची इथं गणेशोत्सव साजरा करणारे विशाल राजपूत यांनी या उत्सवाचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा...
“पाकिस्तानमध्ये पार्टीशनपासून गणेशोत्सव साजरा केला जातो. आजपण आम्ही गणपतीची पूजा केली. माझे ब्रदल इन लॉ मूर्ती बनवतात. त्यांनी आम्हाला मूर्ती दिली. आम्ही दीड दिवसाचा गणपती बसवतो. गणपतीची तयारी आम्ही महिनाभरापासून आधीपासून सुरू करतो. मोदक प्रसाद आम्ही घरी बनवतो. आणि गणपतीचे भजन, सत्संग सगळं साजरा करत असतो.”
****
छत्रपती संभाजीनगर इथं घरोघरी तसंच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. जिल्ह्यात एक हजार ६६० गणेश मंडळाची नोंदणी झाली असून, ५४४ गावांमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला जात आहे.
दरम्यान, शहरातल्या विसर्जन मिरवणूक मार्गाची मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी काल पाहणी केली, या मार्गांवर लोंबकळणाऱ्या तारा १५ सप्टेंबरपूर्वी काढून घेण्याचे निर्देश त्यांनी दिले.
दरम्यान, उमेद स्वयं सहाय्यता समूहातल्या महिलांसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने गणेश मूर्तीं विक्री उपक्रम राबवण्यात आला, या माध्यमातून सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं वृत्त आहे.
****
जालना शहरासह जिल्ह्यात काल दिवसभर गणेशाच्या आगमनाचा उत्साह दिसून आला. यावर्षी जालना गणेश फेस्टिवल मध्ये आठ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
भाद्रपद महिन्यातला हा गणेशोत्सव, पार्थिव गणेश पूजन म्हणजे मातीपासून तयार केलेल्या गणेश मूर्तीच्या पुजेचा उत्सव असतो. पण प्लास्टर ऑफ पॅरिस आणि शाडू मातीसह विविध साहित्यापासून साकारलेल्या आकर्षक रंगसंगतीच्या गणेश मूर्तींमुळे मूळ संकल्पना असलेली पार्थिव गणेशाची मूर्ती काही अंशी दुर्लक्षित होत आहे. मात्र नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं काळ्या मातीच्या गणपतीची स्थापना करण्याची परंपरा आजही कायम आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर....
“काल घरोघरी गणेश स्थापनेची लगबग सुरू असतांना, देगलूर इथलं कोरलेपवार कुटुंब मात्र गणेशमूर्ती घडवण्यात मग्न होतं. कुंभाराने पारंपरिक पद्धतीने साकारलेल्या काळ्या मातीच्या गणेशमूर्ती बसवण्याची परंपरा या गावातल्या अनेक कुटुंबांनी आजही पाळली आहे. हे कुटुंबीय आपापल्या घरून मूर्तीकाराकडे लाकडी पाट आणून देतात, थेट त्याच पाटावर कोरलेपवार कुटुंबीय काळ्या मातीची मूर्ती घडवून देतात. प्लास्टर ऑफ पॅरीस आणि शाडू मातीच्या वादात काळ्या मातीच्या या शंभरटक्के पर्यावरणपूरक असलेल्या काळ्या मातीच्या गणेश मूर्ती अधिक उठून दिसतात.”
अनुराग पोवळे, आकाशवाणी बातम्यांसाठी नांदेड
****
नांदेड इथं माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी तर छत्रपती संभाजीनगर इथं गृहनिर्माणमंत्री अतुल सावे यांच्या घरी मोठ्या उत्साहात 'श्रीं'ची प्रतिष्ठापना करण्यात आली.
बीड शहरात सिद्धिविनायक व्यापारी संकुल परिसरात असंख्य भाविकांनी गणेश मूर्ती घेण्यासाठी मोठी गर्दी केली होती. परभणी इथं बाजारपेठांमध्ये मूर्ती, तसंच साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जिल्ह्यात अनेक गणेश मंडळांनी पर्यावरणपूरक गणपती आणि देखावे साकारले आहेत.
****
उत्सवाच्या कालावधीत नागरिकांनी मिठाई तसंच प्रसाद खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हिंगोली जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे. प्रसाद स्वतः तयार करून वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत नोंदणी करावी, तसंच जनतेनं अन्न पदार्थाची खरेदी करताना खबरदारी घ्यावी असंही या विभागानं म्हटलं आहे.
****
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना तत्काळ प्रभावाने पदमुक्त करण्यात आलं आहे. खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे प्रशासकीय सेवेत नियुक्ती मिळवल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यावर केंद्र सरकारने त्यांना प्रशासकीय कायदा १९५४ नुसार कारवाई करत प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पदावरून पदमुक्त केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. 
****
पंजाबात फिरोजपूर इथं एकाच कुटुंबातल्या तीन सदस्यांची हत्या करणाऱ्या सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं पोलिसांनी अटक केली. नागपूर - मुंबई समृद्धी महामार्गावर पोलिसांनी काल सकाळी सापळा रचून या सर्वांना अटक केल्याची माहिती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. या सर्वांना फिरोजपूर पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
नांदेड शहरातल्या वजीराबाद पोलीस ठाणे हद्दीत अफिम बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी काल ताब्यात घेतलं. त्याच्याकडून २७ ग्रॅम अफिम जप्त करण्यात आलं. सुखविंदरसिंग कालो असं या युवकाचं नाव आहे.
****
गुंगीकारक गोळ्यांची विक्री करणाऱ्या चार संशयितांना जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल अटक केली. त्यांच्याकडून नशा करण्यासाठी, गर्भपातासाठी तसंच उत्तेजना वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सुमारे आठ लाख १८ हजार रुपयांच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातले तिघेजण मेडीकल चालक असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांनी दिली.
****
धाराशिव-तुळजापूर-सोलापूर रेल्वेमार्गाच्या कामास कालपासून प्रत्यक्ष सुरूवात झाली. उपळा शिवारात वाहनं आणि यंत्राचं पूजन करून या कामास प्रारंभ करण्यात आला. पहिल्या टप्प्यातलं हे काम ३० महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित आहे. मात्र दोन वर्षांच्या आत काम पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असल्याचं आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांगितलं.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत काल भालाफेकमध्ये भारताच्या नवदीप सिंह यानं सुवर्ण पदकाची कमाई केली. तर दोनशे मीटर ट्रॅक स्पर्धेत सिमरन शर्मा हिनं कांस्य पदक जिंकलं.
दरम्यान, या स्पर्धेचा आज समारोप होत आहे. स्पर्धेच्या पदकतालिकेत भारतानं सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्य पदकांसह एकूण २९ पदकांची कमाई करुन सोळावं स्थान पटकावलं आहे. भारताच्या पॅरालिम्पिकच्या इतिहासातली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. सुवर्ण पदक विजेते तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांनी या एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकली आहेत. आज समारोप समारोहात हे दोघे भारतीय पथकातले ध्वजवाहक असणार आहेत.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी मुख्यमंत्��ी योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत लातूर जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एक याप्रमाणे ७८६ आणि शहरी भागात पाच हजार लोकसंख्येमागे एका योजनादूताची निवड होणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर येत्या १३ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
शिवसेना वैद्यकीय कक्ष तसंच रामहरि राऊत प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अंबाजोगाई इथं काल जयपूर फूट वाटप करण्यात आलं. मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख मंगेश चिवटे, रामहरि राऊत यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत पाच हजार मोफत तसंच सवलतीच्या दरात शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, सव्वा दोन वर्षात ३२१ कोटींची मदत वाटप केल्याची माहिती, चिवटे यांनी दिली.
****
हिंगोली जिल्ह्यातलं ईसापूर धरण ९७ टक्के भरलं आहे. धरणाचे तीन दरवाजे सुमारे अर्ध्या फुटाने उघडून, सध्या एक हजार २१ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९५ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणातली आवक वाढल्यास, कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात काल काही काळ पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे बाजारातले विक्रेते तसंच ग्राहकांची तारांबळ उडाली. जालना शहर परिसरातही काल पावसानं हजेरी लावल्याचं वृत्त आहे.
****
दरम्यान, येत्या ७२ तासांत राज्यभरात बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफची पाकिस्तानमध्ये हत्या
https://bharatlive.news/?p=163685 पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफची पाकिस्तानमध्ये ...
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
पाकिस्तानच्या हिंदू बांधवांनी घडवले माणुसकीचे ' असेही ' दर्शन
पाकिस्तानच्या हिंदू बांधवांनी घडवले माणुसकीचे ‘ असेही ‘ दर्शन
एकीकडे भारतामध्ये सामाजिक एकोपा राखण्याचे मोठे आव्हान नागरिकांसमोर असताना दुसरीकडे पाकिस्तानमध्ये असलेल्या हिंदू समुदायाने माणुसकीचे दर्शन घडवलं असून पाकिस्तानात पुरामुळे लाखो लोक बेघर झालेले असताना बलुचिस्तान येथील एका मंदिरात दोनशे ते तीनशे पूरग्रस्तांना आसरा देण्यात आलेला आहे. पाकिस्तानच्या कच्छी जिल्ह्यातील जलालखान गाव येथील माधोदास मंदिर हे उंच भागात असल्याने पुराच्या पाण्यापासून सुरक्षित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
WHO च्या कोविड मृत्यूच्या संख्येवर प्रश्नचिन्ह लावण्यात पाकिस्तान भारतात सामील झाला
WHO च्या कोविड मृत्यूच्या संख्येवर प्रश्नचिन्ह लावण्यात पाकिस्तान भारतात सामील झाला
पाकिस्तानमध्ये कोविड मृत्यू: अधिकृत नोंदीनुसार पाकिस्तानमध्ये 30,369 कोविड मृत्यू झाले. (फाइल) इस्लामाबाद: पाकिस्तान सरकारने जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) देशातील COVID-19 मृत्यूंच्या संख्येवरचा अहवाल नाकारला आहे, डेटा गोळा करण्याच्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि संख्या एकत्र करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या सॉफ्��वेअरमध्ये त्रुटी असल्याचे समजले…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
पाकिस्तान सुपर लीगमध्ये विराट कोहलीचे पोस्टर वाजले, चाहत्यांनी केली खास मागणी
पाकिस्तान सुपर लीगमध्ये विराट कोहलीचे पोस्टर वाजले, चाहत्यांनी केली खास मागणी
पाकिस्तानमध्ये विराट कोहलीचे पोस्टर: विराट कोहलीला आता पाकिस्तान सुपर लीग (PSL) मध्ये मागणी आहे. शुक्रवारी लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमवर त्याचे पोस्टर फडकवण्यात आले. एका चाहत्याने विराटच्या फोटोसह या पोस्टरमध्ये लिहिले आहे की, ‘आम्हाला तुझे शतक पाकिस्तानमध्ये पहायचे आहे.’ हे पोस्टर सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. शुक्रवारी क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि मुलतान सुलतान यांच्यात गद्दाफी स्टेडियमवर…
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years ago