#पाकिस्तानमध्ये कोविड
Explore tagged Tumblr posts
Text
WHO च्या कोविड मृत्यूच्या संख्येवर प्रश्नचिन्ह लावण्यात पाकिस्तान भारतात सामील झाला
WHO च्या कोविड मृत्यूच्या संख्येवर प्रश्नचिन्ह लावण्यात पाकिस्तान भारतात सामील झाला
पाकिस्तानमध्ये कोविड मृत्यू: अधिकृत नोंदीनुसार पाकिस्तानमध्ये 30,369 कोविड मृत्यू झाले. (फाइल) इस्लामाबाद: पाकिस्तान सरकारने जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO) देशातील COVID-19 मृत्यूंच्या संख्येवरचा अहवाल नाकारला आहे, डेटा गोळा करण्याच्या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि संख्या एकत्र करण्यासाठी वापरल्या जाणार्या सॉफ्टवेअरमध्ये त्रुटी असल्याचे समजले…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 May 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ मे २०२२ सकाळी ७.१० मि. ****
· स्फोटकांचा साठा घेऊन नांदेडकडे येणाऱ्या चार दहशतवाद्यांना हरियाणात अटक
· कोरेगाव भीमा हिंसाचाराला तत्कालीन सरकार जबाबदार-खासदार शरद पवार
· राज्यात कोविड संसर्गाचे नवे २३३ रुग्ण
· राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाच्या चित्रपट पुनरुज्जीवन प्रकल्पाला प्रारंभ
· स्मार्ट सिटी मिशन क्रमवारीत औरंगाबाद जिल्हा राज्यात दुसऱ्या तर देशात चौदाव्या स्थानी
आणि
· राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन
****
हरियाणा पोलिसांनी कर्नाल जिल्ह्यात चार दहशतवाद्यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर स्फोटकं, शस्रास्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. हे दहशतवादी पंजाबहून एका वाहनातून दिल्ली निघाले होते. पाकिस्तानातून ड्रोन द्वारे फिरोजपूरला पाठवलेली ही स्फोटकं नांदेड तसंच तेलंगणात पोहोचवली जाणार असल्याचं, या चौघांच्या चौकशीतून स्पष्ट झालं आहे. या दहशतवाद्यांचा संबंध बब्बर खालसा गटाशी असून ते हरविंदर रिंडा या दहशतवाद्याच्या सूचनांनुसार काम करत होते. रिंडा सध्या पाकिस्तानमध्ये असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.
****
कोरेगाव भीमा हिंसाचाराला तत्कालीन सरकार जबाबदार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. पवार यांनी काल मुंबईत भीमा कोरेगाव आयोगापुढे जबाब नोंदवला. हिंसाचार थांबावा, अशी त्यावेळच्या सरकारची इच्छाशक्ती नव्हती, हिंसाचारावर नियंत्रण मिळवता आलं असतं, पण तसं केलं गेलं नाही, असं पवार यांनी या जबाबात म्हटलं आहे.
****
राज्यात सर्वांनी आवाजाची मर्यादा पाळून भोंगे लावावे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. याबाबतचे नियम सर्व धार्मिक स्थळांसाठी सारखेच असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. राज्यात कोणाचीही हुकुमशाही चालणार नाही, कोणीही निर्वाणीचे इशारे देऊ नयेत, असंही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं.
****
राज्यात स्थानिक संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाने दोन आठवड्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे निर्देश दिल्यानंतर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक घेण्यात आली. प्रभाग रचना, मतदार याद्या, आणि इतर प्रक्रियेसाठी पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लागणार आहे. इतर मागास प्रवर्ग - ओबीसी आरक्षणासंदर्भात कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला जाणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राज्यसरकार, इतर मागासवर्ग - ओबीसींना २७ टक्के आरक्षण देण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते काल वा��्ताहरांशी बोलत होते.
मध्यप्रदेशात १५ दिवसात माहिती संकलन करण्यात आली. त्यांची मदत आणि माहिती घेऊन त्याप्रमाणे न्यायालयात टिकेल अशा रीतीनं काम पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.
****
भारतीय जनता पक्षानं आगामी निवडणुकांमध्ये इतर मागास वर्ग - ओबीसीला २७ टक्के उमेदवारी देण्याचं जाहीर केलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेनेही ओबीसींना २७ टक्के उमेदवारी द्यावी असं आव्हान भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार अतुल सावे यांनी दिलं आहे. आमदार सावे यांनी काल याबाबतचं एक पत्रक जाहीर केलं.
दरम्यान, राज्यातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या राजकीय मागासलेपणाच्या स्वरुपाची तसंच परिणामांची समकालीन अनुभवधिष्ठीत सखोल चौकशी करण्यासाठी स्थापन आयोगासमोर प्रमुख राजकीय पक्षांनी काल आपली भूमिका मांडली. पक्षांच्या प्रतिनिधींनी काल आयोगासमोर लेखी निवेदन सादर केलं.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे २३३ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ७८ हजार ५९६ झाली आहे. काल या संसर्गाने कोणाचाही मृत्यू झाला नाही. राज्यभरात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या एक लाख ४७ हजार ८४५ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल १७३ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७७ लाख २९ हजार ६४२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या एक हजार १०९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियान एनएफएचएम च्या ३६३ कोटी रुपये खर्चाच्या जगातील सर्वात मोठ्या चित्रपट पुनरुज्जीवन प्रकल्पाचं का�� सुरू केल्याची घोषणा केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग सि��ह ठाकूर यांनी केली आहे. ते काल पुण्यात बोलत होते. राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियाना अंतर्गत, अंदाजे २ हजार २०० चित्रपट या प्रकल्पाच्या माध्यमातून पुनरुज्जीवित केले जाणार आहेत.
भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था- `एफटीआयआय`ला जागतिक पातळीवर नेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न सुरू असल्याची माहिती अनुराग ठाकूर यांनी दिली. ठाकूर यांनी काल या संस्थेला तसंच राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला भेट देऊन पाहणी केली आणि अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन कामकाजाचा आढावा घेतला.
****
अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर बनला असून याकडे राज्यसरकारचं लक्ष वेधण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चानं कालपासून पुण्यात साखर आयुक्तांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केलं आहे. मराठवाड्यातल्या अतिरिक्त उसाचा प्रश्न १५ एप्रिलपर्यंत निकाली लावण्याची विनंती किसान मोर्चाने केली होती. मात्र राज्यसरकारने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यानं, बेमुदत धरणे आंदोलन सुरु केल्याचं भाजपा किसान मोर्चाच्या वतीनं सांगण्यात आलं. उस्मानाबाद जिल्ह्यातील भाजपा किसान मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या धरणे आंदोलनात सहभागी झाले आहेत.
****
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी मिशनच्या क्रमवारीत औरंगाबाद जिल्ह्याने राज्यात दुसरा तर देशात चौदावा क्रमांक पटकावला आहे. काल इंडीया स्मार्ट सिटी अवॉर्ड कॉन्टेस्ट मिशनच्या पहिल्या टप्प्यात ७५ शहरांची क्रमवारी जाहीर करण्यात आली. स्मार्ट सिटी मिशन मधील हे यश संपूर्ण टीमचे यश असल्याचं स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनचे सीईओ आस्तिक कुमार पांडेय यांनी म्हंटलं आहे. या स्पर्धेत पुणे शहर राज्यात पहिल्या तर देशात आठव्या क्रमांकावर आहे.
****
राजर्षी शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिनानिमित्त आज औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या राजर्षी शाहू महाराज अध्यासन केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमानं १०० पेक्षा अधिक व्याख्यानांचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातल्या विविध महाविद्यालयांमध्ये या व्याख्यानांचं आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. आनंद देशमुख आणि अध्यासन केंद्राचे संचालक डॉ.कैलास अंभुरे यांनी दिली आहे. विद्यापीठातही प्र - कुलगुरू श्याम शिरसाठ यांच्या अध्येक्षतेखाली ज्येष्ठ विचारवंत तथा समाज प्रबोधन पत्रिकेचे संपादक अशोक चौसाळकर यांचं 'राजर्षी शाहूंची धर्म जिज्ञासा' या विषयावर ऑनलाईन व्याख्यान होणार आहे. शिवाय 'कृतज्ञता पर्व: वंदन लोकराजाला' या उपक्रमा अंतर्गत उद्या सकाळी १० वाजता मराठी विभागात १०० सेकंद स्तब्धता ��ाळून अभिवादन केलं जाणार आहे.
****
शिक्षकाला वरिष्ठ वेतनश्रेणी लागू करण्यासाठी ५० हजार रुपये लाच घेणाऱ्या जालना इथल्या शिक्षण संस्थेच्या अध्यक्षाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे. भास्कर गाडेकर असं संस्था अध्यक्षाचं नाव असून, तो सध्या फरार आहे. पाच हजार रुपये मोबाईलवर तसंच ४५ हजार रुपये रक्कम प्रत्यक्ष घेणारा खासगी शिपाई रणजीत राठोड याला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. जालना जिल्ह्यात बदनापूर इथं सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
****
स्पर्धा परीक्षांची तयारी करताना शासनाच्या विविध योजनांचा अभ्यास तसंच पडताळणी करत चिकित्सक दृष्टीकोन वृद्धींगत करण्यावर भर द्यावा, असं आवाहन प्राध्यापक जयदेव डोळे यांनी केलं आहे. औरंगाबाद इथं, माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या “दोन वर्ष जनसेवेची, महाविकास आघाडीची” या चित्रप्रदर्शनाच्या समारोप प्रसंगी प्राध्यापक डोळे बोलत होते. शासनाच्या योजनांची माहिती शासन देत असतंच, परंतु वाचक, पत्रकार, नागरिक, लाभार्थ्यांनीही याकडे डोळसपणे पाहणे आवश्यक असल्याचंही जयदेव डोळे यावेळी म्हणाले.
****
शासनाच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत ग्रामीण भागातील सर्वाधिक नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा पोहोचविण्याच्या सूचना परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी दिल्या आहेत. ते काल याबाबतच्या आढावा बैठकीत बोलत होते. आपत्कालीन परिस्थितीत तळागाळातल्या नागरिकांसाठी काम करणाऱ्या आशा कर्मचाऱ्यांचं मानधन थकित राहणार नाही याची काळजी घेण्याची सूचनाही टाकसाळे यांनी केली.
****
लोकशाहीर वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नांदेड इथं आयोजित महाकवी वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पुण्याच्या यशदा संस्थेतले अधिकारी, आंबेडकरी विचारवंत साहित्यिक डॉक्टर बबन जोगदंड यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष बालाजी इबितदार, यांनी काल नांदेड इथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. डॉ. बबन जोगदंड यांचा डॉक्टर जोगदंड यांची अनेक पुस्तकं प्रकाशित झालेली असून, सर्वाधिक पदव्यांचे मानकरी म्हणून त्यांची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.
****
उस्मानाबाद-तुळजापुर-सोलापुर रेल्वे मार्गाच्या, एकूण निधीपैकी राज्याने पन्नास टक्के वाटा उचलण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवण्याच्या सूचना परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिल्या आहेत. यासंदर्भात झालेल्या ��ैठकीत काल ते बोलत होते. रेल्वे विभागाकडून सविस्तर प्रस्ताव घेऊन राज्य परिवहन विभागानं वि���्त विभागाची मान्यता घेऊन हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर ठेवण्याची सूचना कालच्या बैठकीत मंत्री अनिल परब यांनी दिल्यानं या प्रकल्पाला आता गती मिळेल असं आमदार कैलास घाडगे पाटील यांनी सांगितलं.
****
औरंगाबाद इथं महात्मा गांधी मिशनमध्ये आजपासून तीन दिवस अकरावं राज्यस्तरीय खगोल अभ्यासकांचं संमेलन होणार आहे. केंद्र सरकारची विज्ञान प्रसार संस्था आणि महात्मा गांधी मिशनच्या डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राच्या या संमेलनाचं उद्घाटन खगोलशास्त्र आणि खगोल भौतिक शास्त्र आंतरविद्यापीठ- आयुकाचे डॉ. अजित केंभावी करणार आहेत.
****
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र १८ नोव्हेंबर २०२१ सकाळी ११.०० वाजता ****
संसदेचं हिवाळी अधिवेशन या महिन्याच्या २९ तारखेला सुरु होत आहे. सतराव्या लोकसभेचं हे सातवं अधिवेशन तातडीच्या सरकारी कामकाजाच्या अनुसार २३ डिसेंबरपर्यंत राहील, असं लोकसभा सचिवालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
पाकिस्तानमध्ये अटकेत असलेले भारताचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना मृत्युदंडाच्या शिक्षेविरोधात, तिथल्या लष्करी न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार देणारं विधेयक, पाकिस्तानी संसदेनं मंजूर केलं आहे. कुलभूषण जाधव यांना भारतीय राजदूतांना भेटण्याची परवानगी मिळावी या मागणीसाठी आणि त्यांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात, भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती.
****
भारतीय सैन्य दलातल्या भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार प्रकरणी, लष्कराचा दक्षिण विभाग आणि केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागानं केलेल्या संयुक्त कारवाईत, पुण्यातून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, भ्रष्टाचाराच्या अन्य एका प्रकरणात हवाई दलाच्या लोहगाव इथल्या नागरी अधिकाऱ्यालाही सीबीआयनं ताब्यात घेतल्यानंतर दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
****
केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी नवी दिल्ली इथं काल १४६ खेळाडू आणि प्रशिक्षकांना भारतीय क्रीडा प्राधिकरणाचे पहिले संस्थात्मक पुरस्कार प्रदान केले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं २०२२ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता १० वीच्या परीक्षेची आवेदनपत्रं आजपासून स्वीकारली जात आहेत. विद्यार्थ्यांनी मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं आवेदनपत्र भरावीत, असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केलं आहे.
****
अहमदनगर इथल्या जिल्हा शासकीय रुग्णालयातील कोविड कक्षात लागलेल्या आगीत जखमी रुग्णाचा काल मृत्यू झाला. त्यामुळे आता मृतांची संख्या १२ झाली आहे. सहा नोव्हेंबर रोजी ही दुर्घटना घडली होती.
****
0 notes