Tumgik
#पदकांची
airnews-arngbad · 12 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 08 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०८ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
राज्यात ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास केंद्र सरकारची मान्यता
समाज घडवण्याचं काम वारकरी संप्रदाय करतो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर
गणेशोत्सवाचा आज दुसरा दिवस, दीड दिवसाच्या गणपतींच विसर्जन
आणि
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा आज समारोप, स्पर्धेत २९ पदकांची कमाई करत भारताच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद
****
केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. सरकारने या दोन राज्यांमध्ये सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित केली आहे. या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार असून, याचा मनापासून आनंद होत असल्याची भावना कृषिमंत्री मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
मागील वर्षी सोयाबीनचे भाव पडल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावं लागलं होतं. मात्र त्याही परिस्थितीत राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पाच हजार रुपये आर्थिक मदत देण्यासाठी, चार हजार २०० कोटी रुपये अनुदान उपलब्ध करून दिलं आहे. येत्या दोन-तीन दिवसात या अनुदानाचं थेट वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावर करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
समाज घडवण्याचं काम वारकरी संप्रदाय करतो, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. देवाची आळंदी इथं झालेल्या वारकरी संतपूजन सोहळ्यात ते आज बोलत होते. महाराष्ट्र ही संतांची भूमी असून, मोठी संत परंपरा आपल्याला लाभल्याचं सांगून मुख्यमंत्र्यांनी, राजकीय अधिष्ठानापेक्षा वारकरी पंथाचं अध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान मोठं असल्याचं नमूद केलं.
आपल्या सरकारनं गेल्या दोन वर्षांत घेतलेले ६०० निर्णय सर्व समाजघटकांसाठी होते, मात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे त्यापैकी अनेक निर्णय काहीसे झाकोळले गेले, असं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. घरचं अर्थकारण सांभाळणारी लाडकी बहीण सगळ्यात हुशार असते, असं सांगून या योजनेला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. सरकारनं ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, महिला, युवांसाठी आणलेल्या योजनांचा पुनरुच्चार करून आपल्या सरकारचे हात अधिक बळकट करण्याचं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मारुती महाराज कुरेकर यांना शांतिब्रह्म पुरस्कार, तर रामराव महाराज ढोक यांना तुलसीदास पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
****
राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन कऱण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामधून एकंदर पाचशे स्टार्टस्अपना एक लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. योजनेची अधिक माहिती एम एस आय एन एस डॉट इन या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई समाचारच्या द्विशताब्दी निमित्त तयार केलेल्या लघुपटाचं ते अनावरण करतील. १८२२ मधे मुंबईत सुरु झालेलं हे गुजराती वर्तमानपत्र आशियातल्या सर्वात जुन्या वर्तमानपत्रांपैकी एक आहे.
गृहमंत्री शाह उद्या दिवसभर मुंबईतल्या विविध भागातल्या गणेश मंडळांना भेट देणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी तसंच त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी जाऊन ते गणपती दर्शन घेतील. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला आणि त्यानंतर वांद्रे पश्चिमेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला शाह भेट देणार आहेत.
****
केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं मुंबईतल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक आणि त्याच्या साथीदारांसह तीन जणांना २० लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडलं. मुंबईतल्या सांताक्रूझ इथल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयातले अधिकारी आणि अन्य आठ जणांनी अटक टाळण्यासाठी ६० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती. त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. मागणी केलेल्या लाचेपैकी ३० लाख रुपये हवाल्यानं स्वीकारले असल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे.
****
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस आज साजरा केला जात आहे. व्यक्ती, समुदाय तसंच समाजाच्या दृष्टीनं साक्षरतेच्या महत्त्वाचं स्मरण करून देण्यासाठी दरवर्षी ८ सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो. “बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन आणि परस्पर सामंजस्य तसंच शांततेसाठी साक्षरता” ही यंदाच्या साक्षरता दिनाची संकल्पना आहे.
****
देशात मंकिपॉक्सचा एक संशयित रुग्ण आढळला आहे. हा रुग्ण या आजाराचा प्रसार झालेल्या देशातून नुकताच परत भारतात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. या रुग्णाला एका विशेष रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. या रुग्णाची प्रकृति ठीक असून, अशा प्रकारच्या आजारांचा सामना करण्यासाठी देश पूर्ण तयार असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
गणेशोत्सवाचा आज दुसरा दिवस असून, सर्वत्र भाविकांचा उत्साह दिसून येत आहे. ठिकठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतींचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. विविध मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आणि सामाजिक संदेश देणारे देखावे बघण्यासाठी नागरिकांची झुंबड उडत आहे.
दरम्यान, दीड दिवसाच्या गणपतींच विसर्जन आज होत आहे. ठिकठिकाणी गणेश विर्सजनासाठी महानगरपालिका आणि इतर स्थानिक प्रशासनानं चोख व्यवस्था केली आहे.
नांदेड जिल्ह्यात दीड दिवसांच्या गणपतीचं आज सकाळपासून विसर्जन सुरु आहे. देगलूर इथं लेंडी नदीच्या क��ठी देगलूर नगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलाव उभारण्यात आला आहे. या तलावामध्ये भाविक आपल्या मूर्तींचे भक्तिभावाने विसर्जन करत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
दरम्यान, नांदेड जिल्ह्यात तीन हजार ५२० सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रींची स्थापना केली आहे. त्यामध्ये नांदेड शहरात एक हजार ३९८ तर ग्रामीण भागात दोन हजार १२२ सार्वजनिक मंडळांनी श्री गणेशाची स्थापना केल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांनी दिली. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसंच जिल्ह्यात गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बी वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी यासंदर्भातले आदेश जारी केले.
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा आज समारोप होणार आहे. सुवर्ण पदक विजेते तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल हे या समारोप समारोहात भारतीय पथकातले ध्वजवाहक असणार आहेत. या स्पर्धेत एकूण २९ पदकांची कमाई करुन भारतानं पदकतालिकेत सोळावं स्थान पटकावलं आहे. भारतीय खेळाडूंनी सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्य पदकं मिळवून स्पर्धेच्या इतिहासात भारताच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.
****
राज्य शासनाचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, एक्वाडाम, सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन, व्हाय वेस्ट आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने युवा सहभाग जलप्रबंधन कार्यक्रम राज्यात राबवला जात आहे. या अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग इथल्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या ग्रीन क्लबला राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय महाराष्ट्र शासनाचं पुरस्कार नामांकन घोषित झालं आहे. यामध्ये सर्व बाबींमध्ये नळदुर्ग महाविद्यालयाने १०० पैकी ९९ गुण प्राप्त केले आहेत. या मोहिमेत वेगवेगळ्या जल संरक्षण पद्धतीच्या अवलंबनाने अंदाजे ४० दशलक्ष घन लिटर पाणी वाचण्याची संकल्पना आहे.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या योजनादूत उपक्रमासाठी परभणी जिल्ह्यातून एकूण ९७२ योजनादूतांची निवड होणार आहे. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर १३ सप्टेंबर पर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे.
****
अंबाजोगाई इथल्या नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यंदाचा नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार प्राध्यापक डॉ. तसनीम पटेल यांना जाहीर झाला आहे. शैक्षणिक किंवा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांना हा पुरस्कार दिला जातो. उद्या अंबाजोगाई इथं सामाजिक कार्यकर्त्या अंजली आंबेडकर यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९६ टक्क्याच्या वर गेला आहे. धरणात सध्या १५ हजार १४४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरू असून, उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी ५०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणातली आवक वाढल्यास, कोणत्याही क्षणी धरणातून विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी! १११ पदकांची कमाई
https://bharatlive.news/?p=180822 आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताची ऐतिहासिक कामगिरी! १११ पदकांची ...
0 notes
rashtrasanchar · 1 year
Text
Asian Games 2023 : 19 व्या आशिया क्रीडा स्पर्धेत पहिल्या दिवशी भारताच्या खात्यात पाच पदकं आली, पण त्यात एकही सुवर्णपदक नव्हतं. त्यामुळे पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंच्या पदरी निराशा पाहायला मिळाली. माञ, आजच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. आशिया गेम्समधील भारताची दुसऱ्या दिवसाची सुरुवात सुवर्णकामगिरीनं झाल्यामुळे हि 'सुवर्ण, बातमी भारतीयांसाठी अभिमानाची आहे. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात ऐश्वर्या प्रताप सिंह तोमर, रुद्रांक्ष पाटील आणि दिव्यांश पनवार या त्रिकुटानं सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. रोइंगमध्येही भारतानं कांस्यपदक जिंकलं आहे. त्यामुळे आशिया गेम्समधील एकुण पदकांची संख्या आता सातवर पोहोचली आहे.
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
राष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठास प्रथम क्रमांक
मुंबई, दि. २२ : आंतरविद्यापीठीय राष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने नेत्रदिपक कामगिरी करत सर्वसाधारण सुवर्ण पदक पटकावले असून या स्पर्धेत विद्यापीठास प्रथम क्रमांक मिळाला आहे. मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण आणि एक रौप्य पदकांची कमाई करत विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. भारतीय विद्यापीठ संघातर्फे (एआययु) १६ आणि १७ मार्च २०२३ रोजी गणपत विद्यापीठ,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
कझाकस्थान येथे जिम्नॅस्टिक्स स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
कझाकस्थान येथे जिम्नॅस्टिक्स स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
मुंबई, दि 01 : कझाकस्तान येथे सप्टेंबर महिन्यात झालेल्या 12 व्या एशियन ऍक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतील पदक विजेत्या महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक खेळाडूंचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी 5 सुवर्ण, 4 रौप्य व 11 कांस्य पदकांची कमाई केली. बृहन्मुंबई जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या वतीने आयोजित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
कझाकस्थान येथे जिम्नॅस्टिक्स स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
कझाकस्थान येथे जिम्नॅस्टिक्स स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार
मुंबई, दि 01 : कझाकस्तान येथे सप्टेंबर महिन्यात झालेल्या 12 व्या एशियन ऍक्रोबॅटिक्स जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेतील पदक विजेत्या महाराष्ट्राच्या जिम्नॅस्टिक खेळाडूंचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या स्पर्धेत राज्यातील खेळाडूंनी 5 सुवर्ण, 4 रौप्य व 11 कांस्य पदकांची कमाई केली. बृहन्मुंबई जिल्हा जिम्नॅस्टिक्स संघटनेच्या वतीने आयोजित…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
कॉमनवेल्थ गेम्स 2022 दिवस 9 लाइव्ह अपडेट्स: बॉक्सर नितू अंतिम फेरीत, TT Duos QF मध्ये प्रवेश | राष्ट्रकुल खेळ बातम्या
कॉमनवेल्थ गेम्स 2022 दिवस 9 लाइव्ह अपडेट्स: बॉक्सर नितू अंतिम फेरीत, TT Duos QF मध्ये प्रवेश | राष्ट्रकुल खेळ बातम्या
CWG 2022: बॉक्सर नितू कृतीत आहे.© Instagram कॉमनवेल्थ गेम्स 2022, दिवस 9 लाइव्ह अपडेट्स: भारताच्या नितू घंगासने बॉक्सिंगमधील किमान वजन गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अमित पंघल आणि निखत जरीनसह अन्य पाच भारतीय उपांत्य फेरीत सहभागी होतील. कुस्तीपटूंनी 8 व्या दिवशी तीन सुवर्ण पदकांसह प्रसिद्धी मिळवल्यानंतर, भारतीय दल कॅमला 9व्या दिवशी आणखी पदकांची अपेक्षा आहे. कुस्तीमध्ये, विनेश फोगट आणि रवी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years
Text
ज्युदोमध्ये डबल धमाका
Tumblr media
एक रौप्य, एक कांस्य पदक पटकावले बर्मिंगहम : भारताने आज ज्युदोमध्ये डबल धमाका केल्याचे पाहायला मिळाले. कारण भारताच्या सुशिलादेवी लिकमाबाने ४८ किलो वजन गटात रौप्यपदकाची कमाई केली. त्याचबरोबर भारताच्या विजयकुमार यादव याने ६० किलो वजन गटात कांस्यपदकाची कमाई केली. भारताला आज ज्युदोमध्ये एक तरी सुवर्णपदक मिळावे, अशी चाहत्यांची अपेक्षा होती. पण भारताला आज ज्युदोमध्ये सुवर्णपदक पटकावता आले नसले तरी त्यांनी दोन पदकांची कमाई केली आहे. सुशिलादेवीने ४८ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई केली. यापूर्वी २०१४ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुशिलादेवीने रौप्यपदक पटकावले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा सुशिलादेवीने भारतासाठी राष्ट्रकुल स्पर्धेत पदक पटकावले आहे. यावेळी सुशिलादेवीने स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला होता. त्यामुळे अंतिम फेरीत पुन्हा एकदा सुशिलादेवी दमदार कामगिरी करेल, असे वाटले होते. त्यामुळेच तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा केली जात होती. सुशिलादेवीचा अंतिम फेरीतील सामना हा दक्षिण आफ्रिकेच्या मिचेलाबरोबर होणार आहे. सुशिलादेवी आणि मिचेला यांच्यातील सामना चांगलाच रंगतदार झाला. पण या सामन्यात सुशिलादेवीवर मिचेला भारी पडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच सुशिलादेवीच्या हातून सुवर्णपदक निसटले आणि तिला रौप्यपदक मिळवता आले. मिचेलाने या सामन्यात अनुभव पणाला लावला आणि सुशिलादेवीवर मात करत सुवर्णपदकाची कमाई केली. सामन्याच्या सुरुवातीलाच विजय कुमार हा आक्रमक खेळ करत असल्याचे पाहायला मिळाले. कारण पहिल्या पाच सेकंदांमध्येच त्याने जोरदार चाल खेळली आणि तिथेच आता विजय कुमार पदक पटकावणार हे जळपास निश्चित झाले होते. एकामागोमाग एक भारतासाठी ज्युदोमध्ये हे दुसरे पदक आले. विजय कुमारने कांस्यपदकाच्या सामन्याच्या सुरुवातीच्याच मिनिटाला पेट्रोस क्रिस्टोडॉलिड्सची झटपट कामगिरी करून भारताला पदक मिळवून दिले. विजय कुमारने बेल वाजवण्याच्या अवघ्या ५ सेकंदांनंतर वाजा-अरी जिंकली आणि पुरुषांच्या ६० किलो ज्युडो स्पर्धेत इप्पोनला कांस्यपदक मिळवून देण्यासाठी दावेदारी स्पष्ट केली. Read the full article
0 notes
kokannow · 2 years
Text
थाई बॉक्सिंग मध्ये सिंधदुर्गनगरीतील मुलांची दमदार कामगिरी.
थाई बॉक्सिंग मध्ये सिंधदुर्गनगरीतील मुलांची दमदार कामगिरी.
प्रतिनिधी । सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गनगरी मधील मुलांनी दमदार कामगिरी केली आहे. यात या मुलांनी दोन सुवर्ण पदक एक रौप्य आणि दोन कास्य पदकांची कमाई केली आहे.१८ वी महाराष्ट्र राज्य थाई बॉक्सिंग स्पर्धा लातूर येथे पार पडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून निवडक खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. सिंधुदुर्ग जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशन सिंधुदुर्ग च्या खेळाडूंनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
तिरंदाजी विश्वचषक: भारतीय महिला रिकर्व्ह संघाने कांस्यपदक जिंकले, भारतीय पुरुष स्वत:पेक्षा खालच्या क्रमांकाच्या संघाकडून पराभूत
तिरंदाजी विश्वचषक: भारतीय महिला रिकर्व्ह संघाने कांस्यपदक जिंकले, भारतीय पुरुष स्वत:पेक्षा खालच्या क्रमांकाच्या संघाकडून पराभूत
भारत तिरंदाजी विश्वचषक स्टेज 2 मध्ये: भारतीय महिला तिरंदाजी संघाने गुरुवारी, 19 मे 2022 रोजी दक्षिण कोरियाच्या ग्वांगझोऊ येथे विश्वचषक स्टेज दोनच्या रिकर्व्ह स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. यासह त्याच्या या विश्वचषकातील पदकांची संख्या तीन झाली आहे. रिद्धी फोरे, कोमोलिका बारी आणि अंकिता भगत यांचा समावेश असलेल्या भारतीय महिला संघाने एकतर्फी लढतीत चायनीज तैपेईचा 6-2 (56-52, 54-51, 54-55, 55-54) असा पराभव…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 13 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 07 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०७ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
राज्यात आज श्रीगणरायाचं आगमन होत आहे. सर्वत्र धुमधडाक्यात बप्पांचं स्वागत करण्यात येत असून सार्वजनिक मंडळासह घरोघरी गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येत आहे. मुंबईत गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात जवळबपास सव्वा दोन लाख घरगुती आणि १२ हजार सार्वजनिक मूर्तींची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लालबागच्या राजाचे आज दर्शन घेणार आहेत. लालबागच्या राजासह मोठ्या सार्वजनिक मूर्तींच्या दर्शनासाठी आजपासूनच दर्शन रांगा लागणार आहेत. 
दरम्यान, छत्रपती संभाजीनगर इथंही गणरायाचं आगमन होत असून ढोल, ताशा आणि वाद्यांच्या गजरात बप्पांचं स्वागत केलं जात आहे. तर सांगली आणि मिरज शहरात काही सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेश मुर्त्यांचं जल्लोषात आगमन झालं.  सांगलीतील गणेश मंदिरावर गणेश चतुर्थी निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
****
गणेशोत्सवानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. सामाजिक एकता, समता आणि बांधिलकीचा संदेश देणारा हा सण सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वांनी एकोप्यानं आनंदानं साजरा करावा, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे.
****
भारताचं परकीय चलन भांडार ३० ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात दोन अब्ज डाँलरनं वाढून जवळपास ६८४ अब्ज डाँलर इतक्या उच्च पातळीवर पोचलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं काल जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, परकीय चलन भांडारात मागील तीन आठवड्यात १३ कोटी ९० लाख डाँलरची वाढ नोंदवण्यात आली. या दरम्यान, सोने भांडार ८६ कोटी २० लाख डाँलरने वाढून ६१ अब्ज ८६ कोटी डाँलर इतका झाला आहे.
****
सारथी संस्थेमार्फत लक्षित गटातील विद्यार्थ्यांसाठी मोडीलिपी प्रशिक्षण प्रकल्प राबवण्याच्या हेतूनं कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठामध्ये एक सामंजस्य करार केला आहे. छत्रपती शाहू महाराज मराठा इतिहास अध्ययन केंद्र, शिवाजी विद्यापीठ आणि सारथी उपकेंद्र यांच्यादरम्यान हा करार झाला आहे.
****
सन १९८८-८९ पासून सातत्यानं नफा मिळवणाऱ्या वन विकास महामंडळानं सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक ५ कोटी ८२ लाख रुपयांचा लाभांश राज्य शासनाला दिला आहे. या रकमेचा धनादेश राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नुकताच सुपूर्द केला.
****
परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सन २०२१ मधला सोयाबीन पिकाचा थकीत विमा मिळण्यास सुरुवात झाली आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान मराठवाड्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी २२५ कोटी रुपये आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचं आश्वासन दिलं होतं. या आश्र्वासानाची पूर्ती आठ दिवसात होत असल्यानं शेतकऱ्यांनी चौहाण यांचे आभार मानले आहेत. सणासुदीच्या काळात आणि शेतकामासाठी विम्याची रक्कम मिळत असल्यानं शेतकरी वर्गात आनंद व्यक्त होत आहे.
****
नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील लांबोळा गावातल्या दोन कुटुंबातील जवळपास दहा जणांना अतिसारसदृश्य आजाराची लागण झाली आहे. यामुळं गावातील एकाचा मृत्यू झाला असून चौघांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात तर दोन महिलांवर शहादा इथल्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. दरम्यान अन्य रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचं आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात आलं आहे.
****
येत्या कांही दिवसात कोकण तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी विजा आणि सोसाट्याच्या वाऱ्यांसह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
पॅरिसमधील पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताची पदकांची घोडदौड काल नवव्या दिवशीही कायम राहिली. प्रवीण कुमारनं पुरुषांच्या उंच उडीत सुवर्णपदक पटकावलं, तर  होकुटो होतेज सेमा यानं पुरुषांच्या शॉटपुट स्पर्धेत कांस्यपदक जिंकून देशाला पदकतालिकेत १७ व्या स्थानावर नेलं. भारताच्या नावावर आता सहा सुवर्ण, नऊ रौप्य आणि १२ कांस्य अशी एकूण २७ पदके आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्पती जगदीप धनखर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
आज, दहाव्या दिवशी, भारतीय खेळाडूंचं लक्ष्य पोहणे, सायकलिंग, कॅनो आणि ऍथलेटिक्स आदी प्रकारातील स्पर्धांवर असेल.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
BWF World Championships 2022 : लक्ष्य, श्रीकांतकडून पदकांची अपेक्षा
BWF World Championships 2022 : लक्ष्य, श्रीकांतकडून पदकांची अपेक्षा
BWF World Championships 2022 : लक्ष्य, श्रीकांतकडून पदकांची अपेक्षा टोकियो : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेला जपानमधील टोकियो येथे उद्यापासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारतातर्फे सर्वाधिक पाच पदके जिंकणारी पी. व्ही. सिंधू दुखापतीमुळे यंदाच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेली नाही. भारतासाठी हा धक्काच आहे. आता भारताला पदकासाठी लक्ष्य सेन, एच. एस. प्रणॉय व किदांबी श्रीकांत या पुरुष एकेरीतील खेळाडूंसह…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
‘Police Medal’ : महाराष्ट्राला ५१ ‘पोलीस पदक’, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून घोषणा ; अहमदनगरला दोन पदके
#‘Police Medal’ : महाराष्ट्राला ५१ ‘पोलीस पदक’, केंद्रीय गृह मंत्रालयाकडून घोषणा ; अहमदनगरला दोन पदके #Maharashtra
‘Police Medal’ : नवी दिल्ली, (दि २५ जानेवारी २०२२) :  पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 51 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ ,7 ‘पोलीस शौर्य पदक’ तर प्रशंसनीय सेवेकरिता 40 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी ‘पोलीस…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला तीन ‘राष्ट्रपती पोलीस पदक’; राज्याला एकूण ८४ पोलीस पदक
उत्कृष्ट सेवेकरिता महाराष्ट्राला तीन ‘राष्ट्रपती पोलीस पदक’; राज्याला एकूण ८४ पोलीस पदक
नवी दिल्ली : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 84 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील 3 पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, 42 पोलीस शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेकरिता 39 ‘पोलीस पदक’ जाहीर झाली आहेत. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून केंद्रीय गृह मंत्रालय दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर करते. यावर्षी  एकूण 1082  पोलीस पदक जाहीर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून अभिनंदन
महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून अभिनंदन
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्राच्या क्रीडा संघातील खेळाडूंनी तब्बल १४० पदकांची कमाई करुन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवत पदक तालिकेत दुसरे स्थान मिळवून महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी अभिनंदन केले. मंत्री श्री. महाजन म्हणाले, या घ‌वघवीत यशात खेळाडूंच्या अपार मेहनतीबरोबरच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचाही मोलाचा वाटा आहे. केरळ…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून अभिनंदन
महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांच्याकडून अभिनंदन
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्राच्या क्रीडा संघातील खेळाडूंनी तब्बल १४० पदकांची कमाई करुन राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा गाजवत पदक तालिकेत दुसरे स्थान मिळवून महाराष्ट्राची क्रीडा परंपरा कायम राखणाऱ्या राज्याच्या चमूचे क्रीडा मंत्री गिरीष महाजन यांनी अभिनंदन केले. मंत्री श्री. महाजन म्हणाले, या घ‌वघवीत यशात खेळाडूंच्या अपार मेहनतीबरोबरच महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचाही मोलाचा वाटा आहे. केरळ…
View On WordPress
0 notes