Tumgik
#पंतप्रधान किसान सन्मान योजना
mazhibatmi · 2 months
Text
Pm Kisan Yojna
Pm Kisan Yojna: पीएम किसानसाठी पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे दर चार महिन्यांनी प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. अशा परिस्थितीत, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल आणि पुढील हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमचा मोबाईल नंबर त्वरित अपडेट करा.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना ही भारतीय शेतकऱ्यांसाठी फायदेशीर योजना आहे. ही योजना चालवण्याचा उद्देश प्रत्येक गरजू आणि गरीब शेतकऱ्याला आर्थिक मदत करणे हा आहे, जेणेकरून त्यांना शेतीशी संबंधित कामात कोणतीही अडचण येऊ नये. यासाठी पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. हे पैसे दर चार महिन्यांनी प्रत्येकी 2,000 रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये दिले जातात. आतापर्यंत एकूण 17 हप्ते जारी करण्यात आले आहेत आणि आता पुढचे 18 व्या हप्त्याचे पैशे शेतकऱ्यांना मिळणार आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही पात्र शेतकरी असाल आणि पुढील हप्त्याचा लाभ घ्यायचा असेल, तर तुमचा मोबाईल नंबर त्वरित अपडेट करणे गरजेचे आहे.
0 notes
airnews-arngbad · 9 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date : 17 December 2023
Time : 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १७ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत पंतप्रधानांच्या लाभार्थी संवाद कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
लोकसभा घुसखोरी प्रकरणी उच्चस्तरीय समिती स्थापन
राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण-केंद्रीय पाहणी पथकाचं निरीक्षण
      आणि
मराठा आरक्षणासाठी मुदतवाढ देण्याचं राज्य सरकारचं मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
****
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून देशातल्या शेकडो छोट्या शहरांचं सक्षमीकरण केलं जात असून, ही शहरं देशाच्या विकासात योगदान देतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते काल विकसित भारत संकल्प यात्रेत लाभार्थी संवाद कार्यक्रमात बोलत होते. गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी चंद्रपुरातून या संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबईत केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी या संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी मेघना गुजर या कांदिवली इथल्या लाभार्थी महिलेने आपल्याला मिळालेले विविध योजनांचे लाभ आणि त्यातून साधलेला विकास याबाबत माहिती दिली..
छत्रपती संभाजीनगर इथल्या बजाजनगर इथं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत नागरिकांनी पंतप्रधान संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या. शेत फवारणीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ड्रोनचं प्रात्यक्षिक उपस्थित महिलांना दाखवण्यात आलं. महिला बचत गटांसाठी महत्त्वाची असलेली नमो दीदी ड्रोन योजना लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती कराड यांनी यावेळी दिली. ही यात्रा २६ जानेवारीपर्यंत प्रत्येक गावात जाणार असल्याचं कराड यांनी सांगितलं...
बाईट केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत
मेरी कहानी मेरी जुबानी या सदरात केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी आपले अनुभव कथन केले. छत्रपती संभाजीनगर इथं राहणाऱ्या पंतप्रधान घरकुल योजनेच्या लाभार्थी महिलेने आपल्या भावना या शब्दांत कथन केल्या...
****
जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यात चिखली इथं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात आयुष्यमान भारत कार्डचं वाटप करण्यात आलं. दानवे यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, उज्ज्वला योजना, मुद्रा योजना, आवास योजना, पीएम जनधन योजना, आयुष्यमान भारत योजना आदी योजनांबाबत ग्रामस्थांना माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं.
****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कोपरवाडी इथं पंतप्रधान संवाद कार्यक्रमात सहभागी होत, विविध योजनांची माहिती घेतली. मौजे खरबी इथंही सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. लाभार्थ्यांनी आपला अनुभव या शब्दांत कथन केला...
****
धाराशिव जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यात हंगरगा नळ इथं पंतप्रधान संवाद कार्यक्रमानंतर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते आयुष्यमान कार्ड वितरीत करण्यात आले. तसंच उपस्थितांना विकसित भारत संकल्पनेसाठी कटिबद्ध होण्याची शपथही देण्यात आली.
****
लातूर जिल्ह्यात आज रविवारी अहमदपूर तालुक्यात नरवटवाडी, येलदरवाडी, औसा तालुक्या वडजी, हसलगण, भादा, नांदुर्गा, चाकूर तालुक्यात कडमुळी, जडाळा, देवणी तालुक्यात विळेगाव, नागतीर्थवाडी, जळकोट तालुक्यात वांजरवाडा, लातूर तालुक्यात बिंदगीहाळ तर मुरुड तालुक्यात अकोला, रामेगाव इथं विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे.
****
लोकसभा घुसखोरी प्रकरणी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदनाच्या सदस्यांना सर्व पत्र लिहून ही माहिती दिली. ही समिती संसद परिसराच्या सुरक्षेसंबंधी सर्व बाबींची पाहणी करेल, आणि अशा घटनेची पुनरावृत्ती रोखण्यासाठी ठोस उपाययोजना तयार करेल, असं बिर्ला यांनी म्हटलं आहे. काही राजकीय पक्ष या घटनेचा खासदार निलंबनाशी संबंध जोडण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र या घटनांचा परस्पर संबंध नसल्याचं, लोकसभाध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे.
****
कुवेतचे राजे अमीर शेख नवाफ अल-अहमद अल-जबर अल-सबाह यांचं काल निधन झालं, ते ८६ वर्षांचे होते. केंद्र सरकारनं त्यांना श्रद्धांजली अर्पण करत, आज एक दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
****
राज्यात दुष्काळाची परिस्थिती भीषण असल्याचं निरीक्षण केंद्रीय पथकाने नोंदवलं आहे. या दुष्काळ पाहणी पथकाची, आढावा बैठक काल पुण्यात विधानभवनात झाली. याबाबत येत्या दोन-तीन दिवसांत अहवाल तयार करून तो केंद्राला पाठवला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे २६०० कोटींची मदत मिळण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी केंद्राकडून राज्याला मदत मिळावी अशी अपेक्षा राज्यातल्या अधिकाऱ्यांनी पथकाकडे व्यक्त केली आहे.
****
इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध केंद्र सरकारनं उठवले असून, राज्यातल्या साखर उद्योगाकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. इथेनॉल निर्मितीसोबत कारखान्यांना किमान १७ लाख टन साखरेचं बंधन असणार आहे.
****
मराठा आरक्षणाच्या निर्णयासाठी २४ डिसेंबरचा आग्रह न धरता काही मुदत देण्याचं आवाहन राज्य सरकारने मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याकडे केली आहे. राज्यशासनाच्या एका शिष्टमंडळानं काल छत्रपती संभाजीनगर इथं जरांगे पाटील यांची भेट घेतली. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे यावेळी उपस्थित होते. आरक्षणाची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आली असून, समाजाचं हित पाहणं आवश्यक असल्याचं महाजन यांनी नमूद केलं. ते म्हणाले...
‘‘या वेळेला कमी पडता कामा नये आम्ही अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून हे टीकणारं आरक्षण याच्यामध्ये कुठेही मग कमी जास्त झालं आणि मग ते फेटाळलं गेलं, नाकारलं गेलं असं होता कामा नये. ही आमची शासनाची प्रामाणिक भूमिका यामध्ये आहे. आम्ही त्यांना विनंती केली की थोडं अजून वेळ लागला तरी चालेल पण आम्हाला कायम स्वरूपी टीकणारं आरक्षण द्यायचंय. आणि असं असताना अल्टीमेटल वगैरे ठीक आहे, पण आपल्याला शेवटी समाजाचं हीत बघायचंय.’’
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं राज्यव्यापी बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सर्व समाजबांधवांना कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन केलं आहे.
****
महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं काल इंग्लंडवर ३४७ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
****
0 notes
nandedlive · 1 year
Text
पंतप्रधान मोदीजीं च्या योजनांचा लाभ सर्व जाती धर्माच्या लोकांसाठी–भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले
Tumblr media
नांदेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळास 9 वर्ष पूर्ण झाल्या निमित्त मोदी @ 9 अभियानातर्गत भाजपा उत्तर नांदेड विधानसभा तर्फे आयोजित संयुक्त संमेलनात बोलताना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व योजना प्रत्येक जाती धर्मातील नागरिकांसाठी असून त्याचा ते लाभ घेत आहेत असे प्रतिपादन केले.
Tumblr media
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या योजनांची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टी तर्फे सुरु असलेल्या जनसंपर्क अभियानातर्गत नांदेड उत्तर विधानसभा भाजपा महिला मोर्चा ,अनु.जाती मोर्चा.ओबीसी मोर्चा,अनु.जमाती मोर्चा,अल्पसंख्यांक मोर्चा,किसान मोर्चा,युवा मोर्चा यांच्या तर्फे आयोजित संयुक्त मेळाव्यास उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपा जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व योजना प्रत्येक जाती धर्मातील नागरिकांसाठी असून प्रधानमंत्री आवास योजना,उज्वला गॅस योजना,पंतप्रधान किसान सन्मान योजना या सारख्या असंख्य योजनांचा जनता लाभ घेत आहे असे अनेक उदाहरण देऊन सांगितले. या प्रसंगी मंचावरील प्रमुख पाहुण्यांचा सत्कार घटनेच्या संविधानाची प्रत देऊन स्वागत साहेबराव गायकवाड यांनी केले.
Tumblr media
सदरील सयुंक्त मोर्चा संमेलन हॉटेल विसावा येथे पार पडले यावेळी प्रवीण साले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी प्रवीण साले यांनी विविध योजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले तसेच आगामी येणाऱ्या निवडणुकी दरम्यान जास्तीत जास्त मतदारांपर्यंत आपणास कसे पोहचता येईल यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी प्रवीण पाटील चिखलीकर,अरविंद भारतीया,अॅड.चैतन्य (बापू) देशमुख, अजय सिंह बिसेन प्रदेश कार्यकारिणी सदस्य,मिलिंद देशमुख उत्तर विधानसभा प्रभारी तथा प्रदेश कार्यकारिणी सदस्य, विजय गंभीरे संघटन सरचिटणीस, भाजपा नांदेड महानगर, अशोक पाटील धनेगावकर सरचिटणीस भाजपा नांदेड महानगर,अॅड.दिलीप ठाकूर सरचिटणीस भाजपा नांदेड महानगर,व्यंकट मोकले सरचिटणीस भाजपा नांदेड,डॉ.सचिन पाटील उमरेकर वैद्यकीय आघाडी, धीरज स्वामी प्रसिद्धी प्रमुख,सोशल मिडिया चे राज यादव,अक्षय अमिलकंठवार,अमोल कदम यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सर्व मोर्चाचे पदाधिकारी व उत्तर विधानसभा चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची लक्षणीय उपस्थिती होती.संमेलनाचे आयोजन वैशालीताई देशमुख महिला मोर्चा,साहेबराव गायकवाड अनु.जाती मोर्चा,बाबुराव शिंदे कासारखेडकर किसान मोर्चा, सुनील भालेराव युवा मोर्चा यांनी केले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड.दिलीप ठाकूर यांनी केले तर आभार साहेबराव गायकवाड यांनी मानले. छाया : सचिन डोंगळीकर,ज्ञानेश्वर सुनेगावकर,नरेंद्र गडप्पा. Read the full article
0 notes
kokaniudyojak · 1 year
Text
PM Kisan : शेतकऱ्यांसाठी सरकारने सांगितली आनंदाची बातमी, शेतकऱ्यांना मिळणार मोठा फायदा.
PM Kisan : देशात PM Kisan Samman Nidhi अंतर्गत फसवणूक लादली जाईल. यासाठी सरकारने खास ऐप लाँच केले आहे. हे ऐप फेस ऑथेंटिकेशन फीचरने सुसज्ज आहे. या ऐपद्वारे शेतकऱ्यांचा चेहरा पडताळण्यात येणार आहे. या अंतर्गत शेतकरी कोणत्याही OTP किंवा फिंगरप्रिंटशिवाय त्यांचा चेहरा स्कॅन करून ई-केवायसी पूर्ण करू शकतात. PM Kisan : देशातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bhanudas · 2 years
Text
आदरणीय मॅडम/सर आणि प्रिय सहकारी,
आम्हाला कळवताना अत्यंत आनंद होत आहे की, भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 17 आणि 18 ऑक्टोबर 2022 रोजी मेळा ग्राउंड, IARI, पुसा, नवी दिल्ली येथे पंतप्रधान किसान सन्मान संमेलन आयोजित करण्याची योजना आखली आहे.
2. माननीय पंतप्रधानांनी 17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता पीएम किसान सन्मान संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी कृपापूर्वक संमती दिली आहे.
2. उद्घाटन कार्यक्रमाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
1. PM KISAN अंतर्गत 12 व्या हप्त्याचे प्रकाशन
2. दोन दिवसीय ऍग्री स्टार्ट अप कॉन्क्लेव्हचे उद्घाटन.
3600 जिल्हा PMKSK (प्रधानमंत्री किसान समृद्धी केंद्र) आउटलेटचे उद्घाटन
4. भारत युरिया पिशव्यांचा शुभारंभ - ONOF (वन नेशन वन फर्टिलायझर)
5. आंतरराष्ट्रीय खत ई-मासिक “इंडियन एज” लाँच - डिजिटल लाँच
3. श्री नरेंद्र सिंह तोमर, माननीय केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री; आणि डॉ मनसुख मांडविया, माननीय केंद्रीय रसायने आणि खते आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
4. 17 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 11 वाजता पंतप्रधान किसान सन्मान संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात खालील प्रमाणे शेतकरी व संस्था सहभागी होतील
2,00,000 कॉमन सर्व्हिस सेंटर्सवर थेट वन वे वेबकास्टद्वारे एक कोटीहून अधिक शेतकरी सामील होतील; 50,000 प्राथमिक कृषी सेवा सोसायटी; 700 KVK; 75 ICAR संस्था; 75 राज्य कृषी विद्यापीठे आणि 600 पीएमकेएसके. त्यासाठी वेबकास्ट लिंक आहे
https://pmindiawebcast.nic.in
वर नमूद संस्थांमध्ये किंवा कृषी विभागाच्या कार्यालयात व अधिकारी कर्मचारी यांच्या मदतीने किंवा स्वतःच्या मोबाईल वरून सदरील कार्यक्रमात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाइन सहभागी व्हावे ही विनंती.
1 note · View note
digimakacademy · 4 years
Text
पीएम किसान योजनेचा पैसा 'चुकीच्या' हातांत, RTI अंतर्गत माहिती उघड
पीएम किसान योजनेचा पैसा ‘चुकीच्या’ हातांत, RTI अंतर्गत माहिती उघड
‌वृत्तसंस्था, नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सन्मान योजने अंतर्गत २०.४८ लाख अपात्र लाभार्थ्यांना १,३६४ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने माहिती अधिकारात ही माहिती दिली आहे. हरयाणातील हिंसाचारानंतर शेतकरी आंदोलन पेटलं, मुख्यमंत्र्यांची बैठक रद्दपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची सुरुवात केंद्र सरकारने सन २०१९मध्ये केली होती. या अंतर्गत दोन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
पंतप्रधान किसान योजनेत शेतकर्‍यांनी ३१ मार्चपूर्वी करा हे काम, अन्यथा मिळणार नाही पैसे
पंतप्रधान किसान योजनेत शेतकर्‍यांनी ३१ मार्चपूर्वी करा हे काम, अन्यथा मिळणार नाही पैसे
पंतप्रधान किसान योजनेत शेतकर्‍यांनी ३१ मार्चपूर्वी करा हे काम, अन्यथा मिळणार नाही पैसे शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचा संघर्ष पाहता केंद्र सरकार त्यांना सन्मान म्हणून शेतकरी निधी देत ​​आहे. ही योजना केंद्र सरकारने २०१८ मध्ये पंतप्रधान किसान योजना म्हणून सुरू केली होती. सरकार दरवर्षी ६,००० थेट देशातील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करते. हे पैसे सरकार तीन हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांना देते. ही रक्कम…
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years
Text
अनेक शेतकरी पंतप्रधान किसान योजनेची रक्कम घेण्यास चुकले, यासाठी सरकारने हा उपाय सांगितला
अनेक शेतकरी पंतप्रधान किसान योजनेची रक्कम घेण्यास चुकले, यासाठी सरकारने हा उपाय सांगितला
किसन पीएम किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी लागू करण्यात आली आहे. या अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जातात. देशातील बहुतेक शेतकरी पंतप्रधान किसान योजनेचा लाभ घेत आहेत, परंतु आताही अनेक पात्र शेतकरी या योजनेत सामील होऊ शकले नाहीत, त्यामुळे केंद्राने शेतक PM्यांना पीएम किसान योजनेच्या कक्षेत आणले आहे.अनेक महत्त्वपूर्ण सल्ला सरकारने राज्यांना दिले आहे. खरं तर,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years
Text
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे काम ठप्प
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पीएम किसान योजनेचे काम ठप्प
कणकवली पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्री यांनी वेधले जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष कणकवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करून प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जाहीर केली. अशाप्रकारे शेतकऱ्यांना थेट लाभ देणारी ही देशातील पहीलीच योजना आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील हजारो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झालेला आहे. वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये रोखीने जमा होतात. मात्र, असे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mahanews18 · 4 years
Text
*New Updates*
*Pm Kisan Samman Nidhi Yojana*
*Pm किसान सन्मान निधी योजना कोणतीही माहिती चुकीची दिली असेल*
*तर तात्काळ दुरुस्त करा आपल्या मोबाईल वरुन*
*पहा सविस्तर माहिती*
👇👇👇👇👇👇👇
https://www.mahanews18.com/2021/02/pm-kisan-yojana.html
0 notes
airnews-arngbad · 9 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 16 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
विकसित भारत संकल्प यात्रेतून देशातल्या शेकडो छोट्या शहरांचं सक्षमीकरण-पंतप्रधानांचं प्रतिपादन.
शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी पंतप्रधानांचा संवाद;नागरिकांकडून यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद.
इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध मागे; राज्यातल्या साखर उद्योगाकडून केंद्राच्या निर्णयाचं स्वागत.
आणि
महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर ३४७ धावांनी दणदणीत विजय.
****
विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून देशातल्या शेकडो छोट्या शहरांचं सक्षमीकरण केलं जात असून, ही शहरं देशाच्या विकासात योगदान देतील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते आज विकसित भारत संकल्प यात्रेत लाभार्थी संवाद कार्यक्रमात बोलत होते. गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी चंद्रपुरातून या संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुंबईत केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी या संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी मेघना गुजर या कांदिवली इथल्या लाभार्थी महिलेने आपल्याला मिळालेले विविध योजनांचे लाभ आणि त्यातून साधलेला विकास याबाबत माहिती दिली.
छत्रपती संभाजीनगर इथल्या बजाजनगर इथं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांच्या उपस्थितीत नागरिकांनी पंतप्रधान संवाद कार्यक्रमात सहभाग घेतला. विविध केंद्र सरकारच्या विविध योजना जाणून घेतल्या. महिला बचत गटांसाठी महत्त्वाची असलेली नमो दीदी ड्रोन योजना लवकरच सुरू केली जाणार असल्याची माहिती कराड यांनी यावेळी दिली. शेत फवारणीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ड्रोनचं प्रात्यक्षिक उपस्थित महिलांना दाखवण्यात आलं. मेरी कहानी मेरी जुबानी या सदरात केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेतलेल्या लाभार्थी यांनी आपले अनुभव या प्रसंगी उपस्थितांच्या समोर कथन केले.
****
जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यात चिखली इथं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थिती झालेल्या या कार्यक्रमात अनेक नागरिक सहभागी झाले. दानवे यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री उज्वला योजना, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, पीएम जनधन योजना, आयुष्यमान भारत योजना आदी योजनांबाबत ग्रामस्थांना माहिती देऊन या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. काही लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात आयुष्यमान भारत कार्डच वाटप करण्यात आलं
****
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील कोपरवाडी इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा थेट संवाद ग्रामस्थांनी ऐकला. विविध योजना आपल्यासाठी कशा निर्माण केल्या आहेत याबाबतची त्यांना माहिती मिळाली. मौजे खरबी इथं नागरिकांशी संवाद साधून केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती यावेळी देण्यात आली. लाभार्थ्यांनी आपला अनुभव कथन केला.
लातूर जिल्ह्यात उद्या रविवारी अहमदपूर तालुक्यात नरवटवाडी, येलदरवाडी, औसा तालुक्यात वडजी, हसलगण, भादा, नांदुर्गा, चाकूर तालुक्यात कडमुळी, जडाळा, देवणी तालुक्यात विळेगाव, नागतीर्थवाडी, जळकोट तालुक्यात वांजरवाडा, लातूर तालुक्यात बिंदगीहाळ तर मुरुड तालुक्यात अकोला, रामेगाव इथं विकसित भारत संकल्प यात्रा जाणार आहे.
****
विकसित भारत संकल्प भारत यात्रा आज धुळे तालुक्यातील कुंडाणे वरखेडे गावात पोहोचली. गावातील महिलांनी जनजागृती वाहनाचं पूजन करुन यात्रेचं स्वागत केलं. यात्रेनिमित्त गावात आधार कार्ड नोंदणी, आयुष्यमान भारत आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांची नोंदणी, आरोग्य तपासणी शिबीरं घेण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही यात्रा मार्गक्रमण करत आहे, आज सकाळी ही यात्रा कुडाळ तालुक्यातील माणगाव इथं पोहचली. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा हे या यात्रेमध्ये सहभागी झाले. त्यानंतर त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना आणि लाभार्थीना मार्गदर्शन केलं.
****
विजय दिवस आज साजरा केला जात आहे. १९७१ च्या युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयामुळे हा दिवस साजरा केला. पाकिस्तानच्या सैन्यानं आजच्याच दिवशी भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली होती. यानंतर पूर्व पाकिस्तान स्वतंत्र होऊन बांग्लादेशची निर्मिती झाली. भारतीय सैन्याच्या शौर्याचा गौरव करणाऱ्या विजय दिवसानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय दिवसानिमित्त कर्तव्यभावनेने भारताची सेवा करणाऱ्या सर्व शूरवीरांना आदरांजली वाहिली आहे. या सैनिकांच्या साहस आणि समर्पणाचा देशाला अभिमान असल्याचं, पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे.
****
इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध केंद्र सरकारनं उठवले असून, राज्यातल्या साखर उद्योगाकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीच्या बंदीच्या निर्णयाचा साखर उद्योगाला मोठा फटका बसणार असल्यामुळे राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरच्या साखर संघांनी आवाज उठवला होता. अखेरीस सर्व बाजू लक्षात घेतल्यानंतर इथेनॉल निर्मितीवर निर्बंधांबाबतचा निर्णय केंद्रानं मागे घेतला आहे. उद्या म्हणजे रविवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. राज्यात किमान १७ लाख टन साखरेपासून इथेनॉलची निर्मिती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
****
नवी मुंबईत डी वाय पाटील स्टेडीयमवर झालेल्या महिला कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडवर ३४७ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पहिल्या डावात भारताने इंग्लंदसमोर ४२८ धावांचं आव्हान ठेवलं, प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ केवळ १३६ धावा करु शकला होता. दुसरा डाव ६ गडी बाद १८६ धावसंख्येवर भारताने घोषित केल्यावर आज इंग्लंडने खेळायला सुरुवात केली. मात्र १३१ धावांवर त्यांचा डाव आटोपला. दीप्ती शर्मानं पहिल्या डावात अवघ्या ७ धावा देत ५ खेळाडू बाद केले तर दुसऱ्या डावातही ४ बळी घेतले.
****
राज्यातील स्टार्टअप्सना आवश्यक सर्व सहकार्य केले जाईल अशी ग्वाही कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली आहे. मुंबई इथं राज्य कौशल्य विभागातर्फे स्थापित प्री इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन लोढा यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. राज्यात २० महाविद्यालयं आणि संस्थांसोबत कौशल्य विभागानं अशी सेंटर्स स्थापन केली आहेत. राज्याला स्टार्टअप मध्ये देशात प्रथम क्रमांकावर कायम ठेवण्यास सर्वतोपरी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही लोढा यांनी यावेळी दिली.
****
नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं ०३ ते ०७ जानेवारी २०२४ या दरम्यान हा महोत्सव प्रोझोन मॉल मधल्या आयनॉक्स थिएटर, प्रोझोन इथं होणार आहे. या महोत्सवात आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताचा सहभाग असणार आहे.
****
हिंगोली इथं परवा सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी दालनात सकाळी अकरा वाजता हा कार्यक्रम होईल, यासाठी समस्याग्रस्त तसंच पीडित महिलांनी आपले विहित नमुन्यातले अर्ज हिंगोलीच्या जिल्हा महिला आणि बालविकास अधिकाऱ्यांकडे सादर करावेत, असं आवाहन महिला बालविकास अधिकारी माया सूर्यवंशी यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात आजपासून ३१ डिसेंबरपर्यंत शस्त्रबंदी तसंच जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था तसंच सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी विजयकुमार ढगे यांनी हे आदेश जारी केले आहेत.
****
0 notes
nandedlive · 1 year
Text
PM Kisan | शेतकरी खुश ! मे महिन्यात खात्यात जमा होणार ४ हजार रुपये; 'या'
Tumblr media
PM Kisan |शेती व शेतकऱ्यांच्या विकासासाठी सरकारकडून नवनवीन योजना राबविल्या जातात. पंतप्रधान किसान योजना (PM Kisan Scheme) ही यातीलच एक योजना आहे. देशभरातील बहुतांश शेतकरी या योजनेचा लाभ घेतात. दरम्यान प्रधानमंत्री किसान योजनेप्रमाणेच राज्य सरकारने (State Government) देखील नवीन योजना आणली आहे. दोन्ही योजनांचे हप्ते मे मध्ये जमा होणार ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ असे या योजनेचे नाव आहे. या योजनेचा पहिला हप्ता चालू मे महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे मे महिन्यात पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १४ वा हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजारऐवजी आता चार हजार जमा होणार आहे. ( Two installments in one month) शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपये मिळणार केंद्रसरकारच्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळतात. तीन हप्त्यात हे पैसे दिले जातात. दरम्यान आता राज्य सरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ मधून सुद्धा शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये मिळणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना सरकार कडून वार्षिक १२ हजार रुपये मिळणार आहेत. ( Namo Shetkari Mahasanman Nidhi) नमो शेतकरी महासन्मान निधी योजना केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आधारावर राज्यातील शेतकऱ्यांसाठी ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजना’ सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ही योजना सुरू केली आहे. यंदाच्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनात फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली होती. शेतकरी खुश ! ही योजना फक्त महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठीच सुरू करण्यात आलेली आहे. यामुळे फक्त महाराष्ट्रातीलच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. राज्यातील जवळपास ९६ लाख शेतकऱ्यांना शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. डबल रक्कम मिळणार असल्याने राज्यातील शेतकरी सुद्धा सध्या खुशीत आहेत. Read the full article
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 14 November 2023
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
दिवाळीनिमित्त भारतीय बाजारपेठेत तब्बल पावणे चार लाख कोटी रुपयांची उलाढाल
राज्यशासनाकडून धान आणि भरडधान्याच्या किमान आधारभूत किंमती जाहीर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून विविध महाविद्यालयांना, चर्चासत्रं, परिषदा तसंच कार्यशाळा घेण्यासाठी अनुदान मंजूर
      आणि
कार्तिकी यात्रेसाठी मध्य रेल्वेची लातूर ते पंढरपूर दरम्यान आठवडाभर विशेष गाडी
****
यंदा दिवाळीनिमित्त भारतीय बाजारपेठेत तब्बल पावणे चार लाख कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं निदर्शनास आलं आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स-सी ए आय टी चे अध्यक्ष बाळकृष्ण भरतिया आणि सचिव प्रवीण खंडेलवाल यांनी संयुक्त निवेदनात ही माहिती दिली. यामध्ये फक्त लक्ष्मीपूजनापर्यंतच्या उलाढालीच्या नोंदी असून, पाडवा तसंच भाऊबीजेनिमित्त होणाऱ्या उलाढालीच्या नोंदींचा यात समावेश नाही. चिनी बाजारपेठेतून वस्तू आयात करण्याचं प्रमाण यंदा शून्य असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यां���्या व्होकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेचा हा स्पष्ट परिणाम असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. ‘सीएआयटी’ने या दिवाळीत देशभरात राबवलेल्या “भारतीय उत्पाद-सबका उस्ताद” या मोहिमेला ग्राहकांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेला उद्या १५ नोव्हेंबरपासून सुरवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या यात्रेला प्रारंभ होईल. राज्यात या यात्रेचा शुभारंभ नंदूरबार इथं राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी राज्यपाल राज्यस्तरीय आदिवासी गौरव दिन सोहळ्यातही उपस्थित राहणार आहेत. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उद्या देशभरात आदिवासी गौरव दिवस म्हणूण साजरी करण्यात येणार आहे. आदिवासी समाजाची कला, संस्कृति, राष्ट्र निर्माणात त्यांनी दिलेलं योगदान यांचं स्मरण ठेऊन हा दिवस आदर, सन्मान आणि उत्साहात साजरा करण्याचं आवाहन केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा यांनी केलं आहे.
****
राज्यशासनानं धान आणि भरडधान्याच्या किमान आधारभूत किंमती जाहीर केल्या आहेत. राज्यात खरेदी केंद्र सुरू करून किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान्याची खरेदी करण्यात येणार आहे. यात धान दोन हजार १८३ रुपये प्रतिक्विंटल, अ दर्जाचं धान दोन हजार २०३ रुपये, संकरित ज्वारी तीन हजार १८० रुपये, मालदंडी ज्वारी तीन हजार २२५ रुपये, बाजरी दोन हजार ५०० रुपये, मका दोन हजार ९० रुपये, तर नाचणी तीन हजार ८४६ रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे. नऊ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत धान, तर एक डिसेंबर ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत भरडधान्य खरेदी करण्यात येणार आहे.
****
पीएम कुसुम योजनेत महाराष्ट्राने देशात पहिलं स्थान पटकावून शेतकरी हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीत आपल्या बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पारेषण विरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना राबवली जात आहे. केंद्र शासनाच्या ‘किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान’ आणि ‘कुसुम’ योजनेअंतर्गत, राज्यांना नऊ लाख ४६ हजार ४७१ सौरपंप बसवण्यासाठी मान्यता दिली आहे. महाराष्ट्राने ७१ हजार ९५८ सौर पंप स्थापित करून देशात पहिलं स्थान पटकावलं आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीट संदेशात ऊर्जा विभागाचं कौतुक केलं आहे.
****
येत्या २० ते ३० नोव्हेंबर दरम्यान राज्य कला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत आहे, प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी ही माहिती दिली. रेषा, रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण आणि दिव्यांग या विभागासाठी, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी ओ ए डॉट महाराष्ट्र, या संकेतस्थळावर, ऑनलाईन स्वरूपात कलाकृती मागवण्यात येत आहे. प्रदर्शनातल्या उत्कृष्ट कलाकृतींना प्रत्येकी पन्नास हजार रूपयांची पंधरा पारितोषिकं प्रदान करण्यात येणार आहे.
****
शालेय शिक्षण विभागाच्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर्षी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या परीक्षा एकाचवेळी  १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. अर्ज भरण्याची अखेरची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत तर विलंब शुल्कासह १५ डिसेंबरपर्यंत मुदत आहे.
****
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती आज देशभरात बालदिन म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पंडित नेहरुंना अभिवादन करण्यात येत आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ नोव्हेंबर ला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. नागरिकांना आपल्या कल्पना आणि सूचना, माय जीओव्ही ओपन फोरम किंवा नमो या भ्रमणध्वनी ॲपद्वारे, अथवा एक-आठ-शून्य-शून्य एक-एक-सात-आठ  शू्न्य-शून्य या नि:शुल्क क्रमांकावरही पाठवता येणार आहेत.
****
बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा आज तर भाऊबीज उद्या साजरी होत आहे. या निमित्त परगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीने बस तसंच रेल्वे स्थानकांचा परिसर फुलून गेला आहे. या सणांसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमधून नागरिकांची गर्दी झाल्याचं काल दिसून आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथंल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या संशोधन आणि विकास कक्षेच्या वतीनं, विविध महाविद्यालयांना, चर्चासत्र, परिषद आणि कार्यशाळा घेण्यासाठी अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. एकूण ३३ महाविद्यालयांना प्रत्येकी पाच लाख रूपये आणि विद्यापीठाच्या मुख्य परिसर आणि धाराशिव उपपरिसरातल्या सात विभागांना, दोन लाख ४० हजार रुपयांच्या अनुदानाला, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा माहिती कक्षाचे संचालक डॉ. भालचंद्र वायकर यांनी काल मंजुरी दिली.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी येत्या २९ नोव्हेंबरला मुलाखती घेण्यात येणार आहेत.
****
कार्तिकी यात्रेसाठी मध्य रेल्वने लातूर ते पंढरपूर दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. २० ते २७ नोव्हेंबर दरम्यान आठवडाभर चालणारी ही गाडी लातूर इथून सकाळी साडे सात वाजता सुटेल आणि पंढरपूर इथं त्याच दिवशी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी पंढरपूर इथून दुपारी अडीच वाजता सुटेल आणि लातूर इथं त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी हरंगुळ, औसा रोड, कळंब, धाराशिव, बार्शी मार्गे धावणार आहे.
****
संत नामदेव महाराजांच्या ७५३ व्या जयंती महोत्सवाला येत्या १७ तारखेपासून हिंगोली जिल्ह्यात नरसी इथं प्रारंभ होत आहे. या निमित्तानं गाथा पारायण सोहळ्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन संत नामदेव मंदिर संस्थानच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
पाणी वाटपासंदर्भात न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही मराठवाड्यावर पाणी वाटपात अन्याय होत असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याला विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ते काल नांदेड इथं एका कार्यक्रमात बोलत होते. याबाबत सरकारला विचारणा करायला हवी, मात्र सरकार हा प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या इतर राज्यातल्या शिधापत्रिकाधारक नागरिकांनी, एक देश एक शिधापत्रिका या योजनेअंतर्गत आपल्या परिसरातल्या रास्त भाव दुकानातून बायोमेट्रिक प्रणालीद्वारे धान्य प्राप्त करुन घ्यावं, असं जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी म्हटलं आहे. संबंधितांनी आधार प्रमाणीकरण करून धान्य वितरण योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
नांदेड इथल्या श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव तसंच कामठा बुद्रुकचे माजी सरपंच सरदार रणजितसिंघ कामठेकर यांचं काल हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते. कामठेकर यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी १० वाजता नांदेड ���थं नगीनाघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
बीड इथं काल अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर कीर्तन आंदोलन केलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक कर्ज माफ करावं, पीक विमा देण्यात यावा, यासारख्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
परभणी इथं काल राष्ट्रीय आरोग्य अभियानातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. वयाची अट शिथील करून नियमित सेवेत समावेश करून घेण्याच्या मागणीसाठी गेल्या २५ तारखेपासून या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे.
****
बीड जिल्हा क्रिकेट संघटनेच्या बीड प्रीमियर लीगला कालपासून प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. या स्पर्धेत जिल्ह्यातले १२ संघ सहभागी झाले आहेत, येत्या २८ नोव्हेंबरपर्यंत या स्पर्धेतले साखळी सामने खेळवण्यात येणार आहेत, त्यानंतर उपांत्य तसंच अंतिम सामने होणार आहेत. या स्पर्धेचं यंदा हे सहावं वर्ष आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 13 November 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १३ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
विकसित भारत संकल्प यात्रेला परवापासून सुरुवात;राज्यात नंदूरबार इथं राज्यपालांच्या उपस्थितीत यात्रेस प्रारंभ.
पीएम कुसुम योजनेत राज्याचं पहिलं स्थान हे शेतकरी हिताच्या बांधिलकीचं प्रमाण- मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन.
सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव सरदार रणजितसिंघ कामठेकर यांचं निधन.
आणि
पाचवी तसंच आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू;गेल्या वर्षीच्या पात्र विद्यार्थ्यांना नव्या दराने शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत.
****
विकसित भारत संकल्प यात्रेला परवा १५ नोव्हेंबरपासून सुरवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य संवाद पद्धतीने या यात्रेला प्रारंभ होणार आहे. राज्यात या यात्रेचा शुभारंभ नंदूरबार इथं राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होईल. यावेळी राज्यपाल राज्यस्तरीय आदिवासी गौरव दिन सोहळ्यातही उपस्थित राहणार आहेत. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती १५ नोव्हेंबर हा दिवस देशभरात आदिवासी गौरव दिवस म्हणूण साजरा करण्यात येणार आहे. आदिवासी समाजाची कला, संस्कृति, राष्ट्र निर्माणात त्यांनी दिलेलं योगदान यांचं स्मरण ठेऊन हा दिवस आदर, सन्मान आणि उत्साहात साजरा करण्याचं आवाहन केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा यांनी केलं आहे.
****
पीएम कुसुम योजनेत महाराष्ट्राने देशात पहिलं स्थान पटकावून शेतकरी हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीतील आपल्या बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पारेषण विरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना राबवली जात आहे. केंद्र शासनाच्या ‘किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान’ आणि ‘कुसुम’ योजनेअंतर्गत राज्यांना ९ लाख ४६ हजार ४७१ सौरपंप बसवण्यासाठी मान्यता दिली आहे. महाराष्ट्राने ७१ हजार ९५८ सौर पंप स्थापित करून देशात पहिलं स्थान पटकावलं आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीट संदेशात ऊर्जा विभागाचं कौतुक केलं आहे. महावितरणकडे कृषिपंप जोडणीसाठी अर्ज केलेल्या मात्र अनामत रक्कम न भरलेल्या शेतकऱ्यांनाही या योजनेअंतर्गत सौर कृषिपंप देण्यात येणार आहे. राज्यशासनानं पुढील पाच वर्षांसाठी पाच लाख कृषिपंपाना मान्यता दिली आहे.
****
येत्या २० ते ३० नोव्हेंबर दरम्यान राज्य कला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी दिली आहे.  रेखा, रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण आणि दिव्यांग या विभागासाठी डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट डीओए डॉट महाराष्ट्र या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात कलाकृती मागवण्यात येत आहे. प्रदर्शनातील उत्कृष्ट कलाकृतींना प्रत्येकी पन्नास हजार रूपयांची पंधरा पारितोषिके प्रदान करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात जास्तीत जास्त कलाकारांनी सहभागी होण्याचं आवाहन संचालकांनी केलं आहे. दर वर्षी मुंबई इथं जहांगीर आर्ट गॅलरी इथं होणाऱ्या या प्रदर्शनाचं हे त्रेसष्टावं वर्ष आहे.
****
माजी मुख्यमंत्री आणि सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवन परिसरातल्या त्यांच्या पुतळ्याला विधानमंडळ सचिवालयाचे अवर सचिव विजय कोमटवार यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी विधानमंडळ सचिवालयाच्या अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
****
सार्वजनिक धर्मादाय न्यासांतर्गत नोंद असलेल्या रुग्णालयांनी गरीब रुग्णांना सवलतीच्या दरात आणि निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करणे बंधनकारक आहे. पुणे इथल्या धर्मादाय आयुक्त कार्यालयातील सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी ही माहिती दिली. धर्मादाय रुग्णालयांनी दहा टक्के खाटा निर्धन रुग्णांसाठी मोफत उपचाराकरिता आणि दहा टक्के खाटा दुर्बल घटकातील रुग्णांसाठी सवलतीच्या दराने उपचारासाठी आरक्षित ठेवाव्यात, असंही बुक्के यांनी सांगितलं. या नियमांचं उल्लंघन केल्यास धर्मादाय रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही बुक्के यांनी दिला आहे.
****
नवी दिल्लीत आजपासून आशिया-प्रशांत क्षेत्रातल्या जागतिक पशु आरोग्य संघटनेच्या प्रादेशिक आयोगाच्या ३३ व्या परिषदेला सुरुवात झाली. माणसांमध्ये एकोणसत्तर टक्के संसर्गजन्य आजार हे जनावरांमुळे पसरतात, त्यामुळे जनावरांना रोगमुक्त करण्यासाठी सामूहिक आणि नाविन्यपूर्ण प्रयत्नांची गरज असल्याचं मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री संजीव बल्यान यांनी यावेळी सांगितलं. १६ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या परिषदेत जनावरांच्या आजारांना प्रतिबंध करण्याबाबत चर्चा करण्यात येणार असून, यात भारतासह ३६ सदस्य देशांची शिष्टमंडळं उपस्थित राहणार आहेत.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ नोव्हेंबर ला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. नागरिकांना आपल्या सकारात्मक, प्रेरणादायी गोष्टी, विविध कल्पना आणि सूचना, माय जीओव्ही ओपन फोरम किंवा नमो या भ्रमणध्वनी ॲपद्वारे, अथवा एक-आठ-शून्य-शून्य एक-एक-सात-आठ  शू्न्य-शून्य या नि:शुल्क क्रमांकावरही पाठवता येणार आहेत.
****
नांदेड इथल्या श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव तसंच कामठा बुद्रुकचे माजी सरपंच सरदार रणजितसिंघ कामठेकर यांचं आज हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं. ते ६५ वर्षांचे होते. गुरुद्वारा बोर्डाच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले होते. सरपंच संघटनेच्या माध्यमातून त्यांनी जिल्ह्यातल्या सरपंचाचे प्रश्न राज्यस्तरावर मांडले होते. त्यांच्या निधनानं समाजाच्या सर्वच स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे. कामठेकर यांच्या पार्थिव देहावर उद्या मंगळवारी सकाळी १० वाजता नांदेड इथं नगीनाघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
राज्यात अंशतः विनाअनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव पुढील टप्पा देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने माहिती मागवली आहे. ही माहिती देऊन हा विषय मार्गी लावण्यासाठी ३१ डिसेंबरही ही अंतिम मुदत आहे. राज्यातल्या शाळांना २०, ४० आणि ६० टक्के अनुदान देण्याचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला असून, त्यासाठी अकराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
****
शालेय शिक्षण विभागाच्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर्षी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या परीक्षा एकाचवेळी १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. आतापर्यंत राज्यातील ३४ हजार ४३२ शाळांमधील इयत्ता पाचवीच्या तीन लाख ७७ हजार ८०६ आणि आठवीच्या दोन लाख ८२ हजार ४५७ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची अखेरची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत तर विलंब शुल्कासह १५ डिसेंबरपर्यंत मुदत आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या पाचवी आणि आठवी परिक्षेच्या शिष्यवृत्ती परिक्षेतल्या, ३२ हजार ६६७ शिष्यवृत्ती धारकांना, नवीन दरानं शिष्यवृत्तीची रक्कम वितरीत करण्यात आली आहे. उर्वरित विद्यार्थ्यांना पुढील निधी प्राप्त होताच शिष्यवृत्ती वितरीत केली जाणार असल्याचं, योजना संचालनालयाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी सांगितलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वास्तव्यास असलेले इतर राज्यातल्या शिधापत्रिकाधारक नागरिकांना वास्तव्याजवळील रास्त भाव दुकानात बायोमेट्रिक प्रणालीद्वारे धान्य प्राप्त करुन घ्यावं, असं आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी केलं आहे. एक देश एक शिधापत्रिका या योजनेअंतर्गत स्थलांतरित कामगार, ऊसतोड मजूर यासारख्या स्थलांतरण करणाऱ्या शिधापत्रिका धारकांना कोणत्याही रास्तभाव भाव दुकानात धान्य घेण्याची सुविधा ई-पॉस उपकरणांवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. संबंधितांनी आधार प्रमाणीकरण करून धान्य वितरण योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे.
****
बीड इथं आज अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर कीर्तन आंदोलन केलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक कर्ज माफ करावे, पीक विमा देण्यात यावा यासारख्या मागण्या यावेळी करण्यात आल्या. श्यामसुंदर महाराज सोन्नर यांनी यावेळी कीर्तन सादर केलं. या आंदोलनात जिल्ह्याच्या सर्व तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 October 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केल्याबद्दल पंतप्रधानांकडून सर्व खेळाडूंचं अभिनंदन
लेक लाडकी योजना राबवून गरीब कुटुंबातल्या मुलींना लखपती करण्याचा राज्य मंत्रिमंडळळाचा निर्णय
हरंगुळ - पुणे - हरंगुळ इंटरसिटी एक्स्प्रेस आजपासून जनसेवेत रुजू
आणि
यंदाचा अनंत भालेराव पुरस्कार प्रसिद्ध लेखक डॉक्टर मिलिंद बोकील यांना जाहीर
****
आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये पदकांची लयलूट केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. आज नवी दिल्लीत पंतप्रधानांनी या सर्व खेळाडूंची भेट घेऊन मनमोकळा संवाद साधला, केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री अनुरागसिंह ठाकूर यावेळी उपस्थित होते. आशियाई क्रीडा स्पर्धेत ही भारताची सर्वोत्तम कामगिरी असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. सर्व खेळाडूंचा, त्यांच्या पालकांचा आणि प्रामुख्याने प्रशिक्षकांचा गौरव करताना पंतप्रधान म्हणाले -
आप सभी इतिहास रचकर आये है। इस एशियन गेम्स मे ये जो आकडे है, वो भारत के सफलता की साक्ष बन रहे है। और व्यक्तिगत रूप से मुझे इस बात से संतोष है, की हम सही दिशा मे जा रहे है। आप लोगों ने गोल्ड मेडल की झडी लगा दी। पुरा देश गौरव की अनुभूती कर रहा है। आज मै पुरे देश की तरफ से अपने ॲथलीटस्‌ के प्रशिक्षकों को ट्रेनर और कोच का भी हृदय से अ���िनंदन करता हूं।
आशियाई क्रीडा स्पर्धात सहभागी सर्व खेळाडूंनी आपापल्या भागातल्या खेळाडूंना खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी होण्यास प्रोत्साहित करावं, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. क्रीडापटूंचं प्रशिक्षण आणि खेळांच्या अत्याधुनिक सुविधांसाठी तीन हजार कोटी रुपये निधी खर्च केला जाणार असून, क्रीडा जगतासाठी कधीही निधीची कमतरता भासू देणार नाही, असं पंतप्रधानांनी सांगितलं.
****
राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी योजना' राबवून गरीब कुटुंबातल्या मुलींना लखपती करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर पाच हजार रुपये, इयत्ता पहिलीत गेल्यावर सहा हजार रुपये, सहावीत गेल्यावर सात हजार रुपये, ११ वीत गेल्यावर आठ हजार रुपये आणि १८ वर्षं पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, याप्रमाणे मुलीला १ लाख १ हजार रुपये मिळणार आहेत. एक लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांसाठी ही योजना असून १ एप्रिल २०२३ पासून पुढे जन्मणाऱ्या मुलींसाठी ही योजना राबवण्यात येईल.
डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर, असा बदल करण्याला आज मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यामुळे या विद्यापीठाचं नाव आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर, असं होईल.
जलविद्युत प्रकल्पात खासगी गुंतवणूक वाढावी, या हेतूनं, सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्प, या धोरणाला मान्यता देण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमडळ बैठकीत घेण्यात आला.
याशिवाय, सांगली जिल्ह्यात विटा इथे आणि अहमदनगर जिल्ह्यात राहता इथे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयं स्थापन करण्याला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर भूखंड देण्यालाही आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.
पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना देय जमीन १ एकरपेक्षा कमी असली तरी ती वाटप करण्याचा निर्णयही आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना देय असलेली जमीन एक एकरहून कमी असल्यास ती न देण्याचा नियम याआधी लागू होता.
****
नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पहिल्या हप्त्यापोटी एक हजार सातशे वीस कोटी रुपये निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय आज जारी झाल्याचं, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं. चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी देण्यात येणाऱ्या सहा हजार रुपये अनुदानाप्रमाणे राज्य शासनाकडून सहा हजार रुपये अनुदान दिलं जाणार आहे. यासंदर्भात तांत्रिक कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितले.
****
राज्यातल्या तृतीयपंथी समुदायासाठी वसतिगृह उभारण्याचा विचार सुरू असून इतर राज्यांच्या याबाबतच्या धोरणांचा अभ्यास करून या समुदायासाठी राज्याचं सर्वंकष धोरण तयार करण्याचं काम सुरू आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. तृतीयपंथी व्यक्तींच्या कल्याणकारी योजनांबाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे आज मुंबईत एका कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. तृतीयपंथीयांसाठी रोजगार निर्मिती करून त्यांना सक्षम करण्यावर शासन भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
हरंगुळ - पुणे - हरंगुळ इंटरसिटी एक्स्प्रेस आजपासून जनसेवेत रुजू झाली. लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांनी हिरवा झेंडा दाखवून या रेल्वे सेवेचा शुभारंभ केला. या गाडीचे लोकोपायलट बी.के.घाडगे, सहाय्यक लोको पायलट दत्ता गोरे आणि प्रशांत जानराव यांचं स्वागत करण्यात आलं. ही नवीन रेल्वे सुरू झाल्याबद्दल, पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह मध्य रेल्वे विभागाचे सर्व अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचे शृंगारे यांनी मानले.
लातूर इथं ही जी रेल्वे आहे, हा त्यांनी मधला मुद्दा काढून कालपरवा मी दानवे साहेबांना भेटलो होतो. त्यांनी मला खुशखबर सांगितली होती, कालच्या आदेशामध्ये की खासदार साहेब असं काम करून देऊ की लातूर यांच्यासाठी रेल्वे लवकरात लवकर चालू करून त्यांनी वचन पाळलं. आज दानवे साहेब आणि वैष्णव साहेबांनी त्यांचं मी खून अभिनंदन करतो. मोदी साहेबांचं अभिनंदन.
ही रेल्वे लातूर पर्यंत सुरू करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं शृंगारे यांनी सांगितलं.
ही गाडी पुण्याहून सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी सुटेल आणि दुपारी बारा वाजून पन्नास मिनिटांनी हरंगुळला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी हरंगुळ इथून तीन वाजता सुटेल आणि रात्री नऊ वाजता पुण्याला पोहोचेल.
या गाडीला वातानुकूलित प्रथम तसंच द्वितीय श्रेणीचा प्रत्येकी एक डबा, वातानुकूलित तृतीय श्रेणीचे चार डबे, पाच शयनयान, तर तीन सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असणार आहेत.
दरम्यान, आगामी सणांमध्ये होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात दक्षिण मध्य रेल्वेनं काही गाड्यांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात डबे वाढवण्याची घोषणा केली आहे. प्रवाशांनी याची दखल घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
यंदाचा अनंत भालेराव पुरस्कार प्रसिद्ध लेखक डॉक्टर मिलिंद बोकील यांना जाहीर झाला आहे. अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या सचिव डॉक्टर सविता पानट यांनी आज ही घोषणा केली. मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि पन्नास हजार रुपये, असं या पुरसकाराचं स्वरूप असून, येत्या एकोणतीस तारखेला छत्रपती संभाजीनगर इथे एका विशेष कार्यक्रमात या पुरस्काराचं वितरण होणार आहे. मिलिंद बोकील यांची, 'शाळा' ही कादंबरी प्रख्यात असून, या कादंबरीवर आधारलेल्या मराठी चित्रपटाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांची 'गवत्या' ही कादंबरीही वाचकप्रिय ठरली आहे.
****
मतदार याद्यांच्या संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत लातूर जिल्ह्यात या महिन्यात विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात येत आहे. मतदार यादीत नव्या मतदारांची आणि महिला, तृतीयपंथी तसंच दिव्यांग मतदारांची नोंदणी अद्ययावत करण्याच्या उद्देशानं ही शिबिरं घेण्याचे आदेश लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जारी केले आहेत.
****
'मेरी माती मेरा देश' अभियानांतर्गच्या अमृत कलश यात्रेत आज गोंदिया जिल्ह्यातून दोनशेहून जास्त गावांमधली माती गोळा करून मुंबईला पाठवण्यात आली. देवरी आमगाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय पुराम यांनी या यात्रेचं नेतृत्व केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 August 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ ऑगस्ट २०२३ सकाळी ७.१० मि.****
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज देशवासियांना संबोधित करणार  
 ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाला कालपासून देशभरात सुरुवात
पीएफआय संघटनेच्या १४ ठिकाणांवर एनआयएची छापेमारी;मालेगावमधून एक जण ताब्यात
तळागाळातल्या माणसांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी शासन कटीबद्ध-औरंगाबाद इथल्या महाआरोग्य शिबीरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
मराठवाडा साहित्य परिषदेचे विविध वाङमय पुरस्कार काल समारंभपूर्वक प्रदान
आणि
पाचव्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यासह वेस्ट इंडीजविरुद्धची मालिका भारतानं गमावली
****
देशाचा ७७ वा स्वातंत्र्य दिन सोहळा उद्या १५ ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर आज स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशवासियांना संबोधित करणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपतींचं भाषण आधी हिंदीतून आणि नंतर इंग्रजीतून प्रसारित होईल. राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद लगेचच दूरदर्शनच्या सर्व प्रादेशिक केंद्रांवरून प्रसारित होणार आहे, तर आकाशवाणीच्या प्रादेशिक केंद्रांवरून रात्री साडेनऊ वाजता हा अनुवाद प्रसारित होईल.
दरम्यान, काल नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्याची पूर्ण रंगीत तालिम झाली. यंदाचा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी अनेक नवीन उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. देशभरातून विविध क्षेत्रातल्या सुमारे एक हजार ८०० विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. शासनाच्या जनभागीदारीच्या संकल्पनेनुसार हा उपक्रम हाती घेण्यात आला असून, या विशेष पाहुण्यांमध्ये ६६० हून अधिक गावांचे सरपंच, शेतकरी उत्पादक योजनेचे प्रतिनिधी, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी, प्रधानमंत्री कौशल विकास योजना आणि सेंट्रल व्हिस्टा या नव्या संसद भवन प्रकल्पातले श्रमयोगी यांचा समावेश आहे.
दरम्यान, मुंबईत मंत्रालयातही काल स्वातंत्र्यदिन सोहळ्याची रंगीत तालीम झाली.
****
‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाला कालपासून देशभरात सुरुवात झाली. या उपक्रमात सर्व देशवासियांनी सहभागी व्हावं, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशवासियांनी आपली तिरंग्यासह छायाचित्रं ‘हर घर तिरंगा डॉट कॉम’ या संकेतस्थळावर अपलोड करावीत, असं आवाहन पंतप्रधानांनी ट्विटरवरून केलं आहे. आतापर्यंत ६६ लाख नागरिकांनी तिरंग्यासोबतचे त्यांचे सेल्फी अपलोड केल्याची माहिती त्यांनी दिली. याबरोबरच, सामाजिक माध्यमांवर ‘डीपी’ च्या जागी आपल्या तिरंग्याचं छायाचित्र ठेवावं, असं आवाहनही पंतप्रधानांनी केलं आहे.
वर्धा इथल्या श्रुती मुरतकर यांनी आपल्या घरावर तिरंगा फडकावला आहे. आपला याबाबतचा अनुभव त्यांनी या शब्दांत कथन केला...
****
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये व्यवसाय शिक्षण तसंच प्रशिक्षण संचालनालयामार्फत, ७५ आभासी वर्ग अर्थात व्हर्चुअल क्लासरूमचं उद्धघाटन, उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. स्कील इंडिया; डिजिटल इंडिया या उपक्रमातंर्गत, राज्यातल्या सर्व ४१९ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
धार्मिक विद्वेष पसरवून देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या, पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया-पी एफ आय या बंदी घातलेल्या संघटनेच्या विविध ठिकाणांवर, राष्ट्रीय तपास संस्था - एन आय ए नं काल छापे घातले. पाच राज्यांमधल्या १४ ठिकाणी एनआयएनं ही कारवाई केली असून, यात राज्यातल्या कोल्हापूर आणि नाशिक जिल्ह्यांचा समावेश आहे. या कारवाईत काही संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यात नाशिक जिल्ह्यातल्या मालेगावमधून एकाला ताब्यात घेण्यात आल्याचं वृत्त आहे. एनआयएनं या कारवाईत डिजीटल साहित्य तसंच अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत.
****
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. जवळपास अडीच तास चाललेल्या या बैठकीत राज्यातली राजकीय परिस्थिती आणि इंडिया आघाडीच्या बैठकीबाबत चर्चा झाल्याची माहिती पटोले यांनी दिली. ते या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते.
****
तळागाळातल्या गोरगरीब माणसांपर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी शासन कटीबद्ध  असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन काल फडणवीस यांच्या हस्ते झालं, त्यावेळी बोलत होते. राज्यशासन हे गरिबांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून, राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येणार असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले...
‘‘महाआरोग्य शिबीर हे लाखो लोकांना जर आरोग्य सेवा देत असेल तर मी निश्चितपणे त्याला येईल म्हणून सांगितलं. आणि आज साडेतीन लाख पेशंटस्‍चं या ठिकाणी स्क्रिनिंग करण्याचा विक्रम हा या महाआरोग्य शिबीराने केलाय. आणि यापैकी ज्यांना ज्यांना इंटरव्हेंशनची आवश्यकता आहे, त्यांच्याकरता कितीही महाग उपचार असले तरीदेखील ते सगळे उपचार शेवटपर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांना निरोगी करेपर्यंत सगळ्या प्रकारचे उपचार या महाआरोग्य शिबीराच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत.’’
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यावेळी उपस्थित ���ोते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून, त्यासाठी अर्थसंकल्पात सहा पटीने वाढ करण्यात आली असल्याचं, कराड यांनी सांगितलं. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय, महानगर पालिका आयुक्त जी. श्रीकांत आणि मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक इथून खास महाशिबिरासाठी आलेले नामांकीत डॉक्टर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला इथं गणपतराव देशमुख यांच्या स्मारकाचं अनावरण आणि महाविद्यालयाचं नामांतर, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते काल झालं. यावेळी बोलताना त्यांनी, विधिमंडळाच्या परिसरात लवकरच गणपतराव देशमुख यांचं स्मारक उभारलं जाईल, अशी ग्वाही दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी उपस्थित होते. दुष्काळी भागात सन्मानानं जगण्याची कार्यपद्धती गणपतरावांनी लोकांच्या अंगी रुजवली, शेतकरी, कामगार आणि वंचित घटकाचे प्रश्न त्यांनी सातत्यानं सरकारकडे मांडल्याचं पवार यांनी सांगितलं.
****
आपण भारतीय जनता पार्टीसोबत जाणार नसल्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. परवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीच्या पार्श्वभूमीवर वार्ताहराने विचारलेल्या प्रश्नावर काल ते सांगोला इथं बोलत होते. या भेटीत गुप्त काहीही नव्हतं असं पवार म्हणाले. इंडिया आघाडीच्या महिनाअखेर मुंबईत होणाऱ्या बैठकीत ३०-४० नेते येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
****
आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या सर्व रुग्णालयांत १५ ऑगस्टपासून मोफत उपचार करण्यात येणार असून, रुग्णांना वा त्यांच्या नातेवाइकांना बाहेरून औषधं आणण्याची चिठ्ठी न देण्याचे निर्देश, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिले आहेत. आरोग्य संस्थेमध्ये शुल्क आकारण्यात आल्याचं आढळून आल्यास, संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारी, जिल्हा शल्यचिकित्सक किंवा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याची असेल, सर्व चाचण्या मोफत कराव्यात, यामध्ये सीटी स्कॅन, एक्स रे, प्रयोग शाळा चाचण्यायांचा समावेश आहे, आंतररुग्ण विभागामध्ये दाखल झालेल्या रुग्णास सुटी देतांना कोणतंही शुल्क आकारू नये, असंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, ठाण्यातल्या छत्रपती शिवाजी महापालिका रुग्णालयात घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी असून, अशाप्रकारे रुग्णाच्या जीवाशी झालेली हेळसांड आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. येत्या दोन दिवसात या प्रकरणाचा अहवाल येईल, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, अशी माहितीही आरोग्यमंत्री सावंत यांनी दिली आहे. ते पुणे इथं वार्ताहरांशी बोलत होते. नेमकं काय घडलं याची माहिती आम्ही घेत आहोत, रुग्णांकडे दुर्लक्ष झालं आहे का ही बाब अहवाल आल्यावरच स्पष्ट होईल, असं ते म्हणाले.
****
राज्य सरकारनं महाराष्ट्र भवन उभारून त्याला आचार्य अत्रे यांचं नाव द्यावं अशी मागणी, ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांनी केली आहे. आचार्य अत्रे यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीदिनी, आत्रेय संस्थेतर्फे दिला जाणारा साहित्य सम्राट आचार्य अत्रे जीवन गौरव पुरस्कार, काल माजी राज्यपाल राम नाईक यांच्या हस्ते, कर्णिक यांना मुंबईत प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. अत्रे यांनी लिहिलेल्या चांगुणा आणि आत्रेय विनोद या पुस्तकांच्या नव्या आवृत्तीचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं. अत्रे यांचं डिजिटल स्मारक करण्याची घोषणा त्यांचे वारस राजेंद्र पै यांनी केली.
दरम्यान, काकासाहेब पुरंदरे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा आचार्य अत्रे पुरस्कार, यावर्षी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना जाहीर झाला आहे. यंदा पुरस्काराचं हे १३वं वर्ष आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचे विविध वाङमय पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. डॉ भवान महाजन यांच्या रस्ता शोधताना या आत्मचरित्राला नरहर कुरूंदकर वाङमय पुरस्कार, विश्वास वसेकर यांच्या काव्यस्व या समीक्षा ग्रंथाला म भि चिटणीस वाङमय पुरस्कार, अजीम नवाज राही यांच्या तळमळीचा तळ या कवितासंग्रहाला कुसुमताई देशमुख काव्यपुरस्कार, सीताराम सावंत यांच्या हरवेल्या कथेच्या शोधात या कथा संग्रहासाठी बी रघुनाथ वाङमय पुरस्कार, डॉ विजय देशमुख यांच्या चल ऐश कर ले या नाटकासाठी कुमार देशमुख नाट्य पुरस्कार तर इसाप प्रकाशनचे दत्ता डांगे यांना रा ज देशमुख स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
फ्लोरिडा इथं काल झालेल्या पाचव्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताला वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागला. यामुळे वेस्ट इडिजनं पाच सामन्यांची मालिका तीन - दोन अशी जिंकली आहे. कालच्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात १६६ धावा केल्या. प्रत्यूत्तरात वेस्ट इंडिजच्या संघानं १८ षटकात दोन गडी गमावत १७१ धावा केल्या.
****
मेरी माटी मेरा देश अभियांनातर्गत जालना महानगरपालिकेत काल केंद्रीय रेल्‍वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्‍या हस्‍ते ध्‍वजवंदन करत अमृत कलशाच अनावरण करण्यात आलं. चमन परिसरात बचत गटातर्फे ध्‍वज विक्री स्‍टॉलचं उद्घाटन, त्यानतंर आरोग्‍य विभागातर्फे सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्‍य तपासणी कक्षाचंही उद्घाटन दानवे यांनी केलं. आमदार कैलास गोरंट्याल, महापालिका आयुक्‍त तथा प्रशासक संतोष खांडेकर यावेळी उपस्थित होते.
****
हिंगोली जिल्ह्यात काल हर घर तिरंगा अभियानास उत्साहात सुरुवात झाली. जिल्ह्यातल्या पाचही पंचायत समिती मुख्यालयात हर घर तिरंगा अभियान राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात ५६३ ग्रामपंचायती, सर्व जिल्हा परिषद शाळामध्ये हर घर तिरंगा अभियान राबवण्यात आल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे.
****
बुलडाणा जिल्ह्यातही काल हर घर तिरंगा अभियानास उत्साहात सुरुवात झाली. जिल्ह्यातील मुख्यालयात शासकीय कार्यलय तसंच जिल्हा परिषदेची उपविभागीय कार्यालयं, तालुका कार्यालयं,  ग्रामपंचायतींची कार्यालयं तसंच जिल्हा परिषदांच्या सर्व शाळामध्ये हे अभियान राबवण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यात बालविवाह थांबवण्याचा एक भाग म्हणून आज विद्यार्थ्यांची जनजागृती फेरी काढण्यात येणार आहे. सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे तसंच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक या फेरीला हिरवा झेंडा दाखवतील. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून ही फेरी मार्गक्रमण करणार आहे.
****
लातूर जिल्ह्यातलं हत्तीबेट हे पर्यटन स्थळ राष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर आणण्यासाठी विकास केला जाईल, असं आश्वासन राज्याचे क्रीडा, युवक कल्याण आणि बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी दिलं आहे. हत्ती बेट इथल्या तीन कोटी २९ लाख रुपयांच्या विविध विकास प्रकल्पाचं भूमिपूजन बनसोडे यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने तज्ज्ञांशी चर्चा करून स्थळाचा विकास आराखडा तयार करावा, अशी सूचना त्यांनी केली.
****
राज्यातला सर्वात कमी हरीत पट्टा लातूर जिल्ह्यात असून, हे अत्यंत चिंताजनक अ��ल्यामुळे येत्या काळात जागृतपणे वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाची गरज, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी व्यक्त केली आहे. उद्या स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातल्या प्रत्येक शासकीय अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांनी एक झाड लावावं, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
माजी केंद्रीय मंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या स्मृती दिनानिमित्तानं लातूरच्या बाभळगाव चौक ते पोलीस मुख्यालय रस्त्यावर दुतर्फा ९०० विलास वृक्षांचे रोपण ग्रीन लातूर वृक्ष टीमकडून करण्यात आलं. जिल्ह्यात सव्वा लाख लहानमोठी झाडे लावून त्यांचं संगोपन करण्याचं काम ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या माध्यमातून सुरू आहे.
दरम्यान, देशमुख यांच्या ११ व्या स्मृतिदिनानिमीत्त लातूर शहरासह जिल्हाभरातल्या नागरिकांसाठी आज महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबीरात २०० पेक्षा अधिक रुग्णालयांचा सहभाग असल्याची माहिती लातूर आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल राठी यांनी दिली.
****
औरंगाबाद शहरात कृषी विज्ञान केंद्रात रानभाजी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. कृषी विभाग, आत्मा आणि कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित या महोत्सवाचं उद्घाटन आज सकाळी नऊ वाजता पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या हस्ते होणार आहे.
****
0 notes