Tumgik
#नूतन चित्रपट
darshaknews · 3 years
Text
शम्मी कपूरला नूतनशी लग्न करायचे होते, पण गीता बालीची लिपस्टिकची मागणी पूर्ण करायची होती.
शम्मी कपूरला नूतनशी लग्न करायचे होते, पण गीता बालीची लिपस्टिकची मागणी पूर्ण करायची होती.
शम्मी कपूरला नूतनशी लग्न करायचे होते: बॉलीवूड अभिनेता शम्मी कपूरने त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांच्या स्टुडिओमध्ये कनिष्ठ कलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली. त्यांनी 1953 मध्ये ‘जीवन ज्योती’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. यानंतर शम्मी कपूरने ‘तुमसा नहीं देखा’, ‘ब्रह्मचारी’, ‘काश्मीर की कली’, ‘प्रेम रोग’ आणि ‘विधाता’ सारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. चित्रपटांव्यतिरिक्त शम्मी कपूर…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 07 February 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०७ फेब्रुवारी २०२२ सकाळी ७.१० मि. ****
देशातल्या अनेक भागात कोरोना विषाणूचा प्रसार वेगानं वाढत आहे. या विषाणूचं ओमायक्रॉन हे नव रूप आढळल्यानं चिंता वाढली आहे. आम्ही आमच्या सर्व श्रोत्यांना खबरदारीचं, आणि १५ ते १८ वयोगटातल्या सर्व मुलांसह इतरांना, कोविड प्रतिबंधक लस घेण्यात मदत करण्याचं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहण्यासाठी कृपया तीन साध्या उपायांचं पालन करा. मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्य स्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर, शासकीय इतमामात साश्रूनयनपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार
·      राष्ट्रपती, पंतप्रधानांसह राजकीय, सामाजिक, चित्रपट, तसंच सांस्कृतिक क्षेत्राच्या सर्व स्तरातून शोक व्यक्त
·      लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारचा दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा
·      राज्यात कोविडचे ९ हजार ६६६ नवे रुग्ण, मराठवाड्यात दहा रुग्णांचा मृत्यू तर ८९८ बाधित
·      केंद्र सरकारची सर्व कार्यालय आजपासून पूर्ण क्षमतेनं सुरू होणार
·      प्रसिद्ध चित्रकार दिलीप बडे यांचं निधन
आणि
·      एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताचा वेस्ट इंडीजवर सहा गडी आणि २२ षटकं राखून विजय
****
गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर, काल मुंबईत शिवाजी पार्कवर शासकीय इतमामात साश्रूनयनपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. लता दिदींचे धाकटे बंधू हृदयनाथ यांनी त्यांच्या पार्थिव देहाला मुखाग्नी दिला. यावेळी त्यांच्या भगिनी मीना खडीकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, आणि अन्य कुटुंबीय उपस्थित  होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्य मंत्रिमंडळातले अनेक मान्यवर मंत्री, खासदार शरद पवार, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, गायिका अनुराधा पौडवाल, अभिनेता शाहरुख खान यांच्यासह संगीत, चित्रपटासह सर्वच क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी, लतादिदींचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यावतीनं लता दिदींना पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. लतादिदींना २१ तोफांची अखेरची मानवंदना देण्यात आली.
त्यापूर्वी काल सकाळी त्यांचा पार्थिव देह मुंबईतल्या प्रभुकुंज या त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. हजारोंच्या संख्येनं चाहत्यांनी आपल्या लाडक्या लतादिदींचं अंत्यदर्शन घेतलं.
२८ सप्टेंबर १९२९ रोजी मध्यप्रदेशात इंदूर इथं जन्मलेल्या लतादिदींनी १९४२ साली गायनाला प्रारंभ केला. जवळपास सात दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ३० हून अधिक भारतीय तसंच विदेशी भाषांमधून हजारो गाणी गायली. जगभरात गायनाचे शेकडो कार्यक्रम सादर केले.
भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानासह देशोदेशींच्या अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. त्यांच्या हयातीतच मध्यप्रदेश तसंच महाराष्ट्र राज्य सरकारनं लता मंगेशकर पुरस्कार देण्यास प्रारंभ केला.
लता मंगेशकर यांच्या प्र��ीर्घ कारकिर्दीचा संक्षिप्त आढावा घेणारा हा वृत्तांत:
१९४२ साली मास्टर विनायक यांच्या किती हसाल... या चित्रपटात सदाशिव नेवरेकर यांनी संगीतबद्ध केलेलं नाचू या गडे हे लताबाईंचं चित्रपटासाठी ध्वनिमुद्रीत पहिलं गाणं. पण हे गाणं चित्रपटातून वगळण्यात आलं.
 त्यामुळे त्याच वर्षी आलेल्या पहिली मंगळागौर या चित्रपटांतलं दादा चांदेकर यांचं संगीत असलेलं ‘नटली चैत्राची नवलाई’ हे लताबाईंचं पहिलं मराठी चित्रपट गीत ठरलं.
 १९४२ साली सुरू झालेली ही गायनाची कारकीर्द २०१९ साली मयुरेश पै यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘सौगंध मुझे इस मिट्टी की..’ या गाण्याशी येऊन पोहोचली. लताबाईंनी ध्वनिमुद्रीत केलेलं हे अखेरचं गाणं.
 संगीतकार, गीतकार आणि अभिनेत्रींच्या अनेक पिढ्यांसाठी लताबाई गायल्या. चित्रगुप्त आणि आनंदमिलिंद किंवा रोशन आणि राजेशरोशन हे संगीतकार पितापुत्र, अंजान आणि समीर किंवा जांनिसार अख्तर आणि जावेद अख्तर हे गीतकार पितापुत्र तर, शोभना समर्थ-नूतन तनुजा - काजोल या एकाच घरातल्या तीन पिढ्यांच्या अभिनेत्री.. ही त्यातली काही ठळक उदाहरणं.
 लताबाईंनी आपल्या भावंडासोबतही अनेक उत्तमोत्तम गाणी केली. पंडित हृदयनाथांनी चालीत बांधलेल्या ज्ञानेश्वरांच्या विराण्या लताबाईंनी घराघरात पोहोचवल्या..
 आनंदघन नावानं लताबाईंनी संगीत दिलेली आणि आशाबाईंच्या आवाजातली ही ठसकेबाज लावणी....
 राजा शिवछत्रपती या गीतसंग्रहातली सावरकरांची ही रचना.. हृदयनाथांचं संगीत आणि लताबाईंचा आवाज यामुळे हे शिवस्तोत्र अजरामर झालंय...
 लताबाईंचं संगीत आणि आवाज असलेल्या या गाण्याने त्यांच्या या भव्य कारकिर्दीला सलाम करूया. या गाण्यात त्यांनी कोरसचा अप्रतिम वापर केलाय. कोरसमध्ये ऐकू येणारा प्रतिध्वनी आहे, लताबाईंच्याच दोन भगिनी मीनाताई आणि उषाताई यांचा...
 पार्श्वगायन क्षेत्रात मापदंड असलेल्या लतादिदी, गाण्याइतक्याच क्रिकेट आणि फोटोग्राफीच्या चाहत्या लतादिदी, हयातीतच दंतकथा झालेल्या लतादिदी,.. सदैव मनामनात रुंजी घालत असतात...
****
आकाशवाणीचे निवृत्त अधिकारी ज्येष्ठ संगीतकार पंडित विश्वनाथ ओक यांनी या शब्दांत लतादिदींना श्रद्धांजली अर्पण केली:
संगीतातले जे सात स्वर आहेत, ते सात स्वरही ज्यांच्या नावात सामावलेले आहेत, अशी सात अक्षरं म्हणजे लता मंगेशकर. अखिल संगीत विश्वाला या आवाजाने साधारण १९४२-४३ पासून उमेदी गाठवलेली आहे. भारतातल्या असंख्य भाषांमधून त्यांनी रसिकांचे कान तृप्त केले. या प्रत्येक गाण्यात त्यांनी जीव ओतला. आणि प्रत्येक गाणं त्यांनी अमर केलं.
****
प्रसिद्ध गायक संगीतकार कौशल इनामदार यांनी लतादिदींना या शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली:
लताबाईंनी इतक्या असंख्य गाण्यांमधे त्यांनी आपला श्वासच तर सोडून गेल्यात. आणि तो श्वाससुद्धा त्यांच्या स्वराच्या रूपाने सोडून गेल्यात. इतका निखालस, दैवी स्वर्गाच्या सुराने लताबाई आपल्याला त्यांचा श्वास या पृथ्वीतलावर ठेवून गेलेल्या आहेत. त्यामुळे अशा माणसाला, अशा व्यक्तीला ती गेली असं कसं म्हणता येईल आपल्याला. मला असं वाटतं की, एका अर्थाने लताबाईंचं अमरत्व सिद्ध झालं.
****
लातूर जिल्ह्याच्या निलंगा तालुक्यातल्या औराद शाहजनी इथं शारदोपासक शिक्षण संस्थेचं मास्टर दीनानाथ मंगेशकर महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाच्या पायाभरणीसाठी लता मंगेशकर आल्या होत्या. या महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष विश्वनाथ वलांडे गुरुजी यांनी लतादिदींच्या या भेटीला उजाळा दिला...
२८ फेब्रुवारी १९७३ ला आमचा या ठिकाणी इमरतीच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. पहिल्यांदा त्या या ठिकाणी आल्या. आणि मग त्या कार्यक्रमात त्यांनी डिक्लियर केलं तुमच्या कॉलेजच्या मदतीसाठी मी कार्यक्रम देते आहे, तो कार्यक्रम २८ फेब्रुवारी १९८१ ला झाला. त्यानंतर ज्या ज्या वेळी आम्ही लताजींना शुभेच्छा देण्यासाठी एखादी चिठ्ठी पाठवायची. ताबडतोब माणूस खाली यायचा आणि आम्हला वर बोलावयचा. असे हे ऋणानुबंध होते आमचे.
****
लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल केंद्र सरकारनं दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, राज्य सरकारने आज राज्यात दुखवट्याची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण - म्हाडाची सरळसेवा भरतीअंतर्गत  अतांत्रिक पदासाठी आजची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होईल, अशी माहिती 'म्हाडा'चे सचिव राजकुमार सागर यांनी दिली आहे.
****
राज्यात काल ओमायक्रॉन संसर्ग झालेला एकही नवा रुग्ण आढळला नाही. राज्यातल्या ओमायक्रॉन बाधित रुग्णांची संख्या तीन हजार ३३४ एवढी झालेली असून, यापैकी दोन हजार १३ रुग्ण संसर्गातून मुक्त झाले आहेत.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ९ हजार ६६६ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ७८ लाख ३ हजार ७०० झाली आहे. काल ६६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४३ हजार ७४ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८३ शतांश टक्के आहे. काल २५ हजार १७५ रुग्ण बरे झाले, राज्यात आतापर्यंत ७५ लाख ३८ हजार ६११ रुग्ण कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९६ पूर्णांक ४० शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या एक लाख १८ हजार ७६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ८९८ कोरोना विषाणू संसर्ग बाधित रुग्ण आढळले, तर दहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये नांदेड, लातूर आणि हिंग��ली जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर औरंगाबाद, बीड, परभणी आणि जालना जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल १९८ नवे रुग्ण आढळले. लातूर जिल्ह्यात १३४, हिंगोली १२९, उस्मानाबाद १२८, नांदेड १२७, जालना ८८, बीड ४८ तर परभणी जिल्ह्यात ४६ नव्या रुग्णांची नोंद झाली.
****
कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत घट होत असल्यामुळे केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयांमधली उपस्थिती आजपासून पूर्ण क्षमतेनं राहणार आहे. केंद्रीय आस्थापना राज्यमंत्री डॉ जितेंद्र प्रसाद यांनी काल ही माहिती दिली. कर्मचारी कोविड प्रतिबंधक नियम काटेकोरपणे पाळतील, याची खबरदारी विभागप्रमुखांनी घेणं आवश्यक असल्याचं प्रसाद यांनी सांगितलं.
****
प्रसिद्ध चित्रकार दिलीप बडे यांचं काल औरंगाबाद इथं निधन झालं, ते ६८ वर्षांचे होते. पोट्रेट मास्टर अशी ख्याती असलेले बडे यांनी ३५हून अधिक वर्ष अध्यापनाचं कार्य केलं. औरंगाबाद इथल्या शासकीय चित्रकला महाविद्यालयाचे डीन या पदावरुन ते निवृत्त झाले होते. राज्य शासनानं त्यांना राज्य शिक्षक पुरस्कारानं सन्मानित केलं होतं. त्यांच्या पार्थिवावर काल औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
शिक्षण आणि सहकार चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते आणि नाशिक मधील के के वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचं काल निधन झालं. बाळासाहेब वाघ यांनी १९७० मध्ये के के वाघ शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्याचबरोबर कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचं २२ वषज्ञ त्यांनी अध्यक्षपद सांभाळलं. त्यांच्या पार्थिवावर आज नाशिक इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
अहमदाबाद इथं एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या काल झालेल्या पहिल्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजवर सहा गडी आणि २२ षटकं राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना, वेस्ट इंडीजनं भारतासमोर १७७ धावांचं लक्ष्य ठेवलं, भारतीय संघानं चार गडी गमावत, अठ्ठाविसाव्या षटकांतच हे लक्ष्य पार करून विजय मिळवला. चार बळी घेणारा यजुवेंद्र चहल सामनावीर ठरला. दरम्यान, हा सामना खेळून भारतानं हजारावा एकदिवसीय सामना खेळण्याचा विक्रमही रचला आहे. कालच्या सामन्यात भारतीय संघानं काळी फीत बांधून खेळत लतादिदींना श्रद्धांजली अर्पण केली.
****
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 July 2021 Time 7.10AM to 7.20AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १७ जुलै २०२१ सकाळी ७.१० मि. ****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
·      दहावीच्या परीक्षेत राज्याचा निकाल साडे ९९ टक्के; औरंगाबाद तसंच लातूर विभागात ९९ पूर्णांक ९६ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण.
·      महाराष्ट्र आणि केरळमध्ये कोविड बाधितांच्या संख्येत वाढीबद्दल पंतप्रधानांकडून चिंता व्यक्त.
·      गर्दी थांबवण्यासाठी केंद्राने व्यापक धोरण आणावं - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मागणी.
·      राज्यात काल सात हजार ७६१ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात सात जणांचा मृत्यू तर ३४८ नव्या बाधितांची नोंद.
·      माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सुमारे सव्वा चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त.
·      वैद्यकीय शिक्षणाचं केंद्र म्हणून महाराष्ट्र नावारुपाला यावं, अशी राज्य सरकारची भूमिका - वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख.
आणि
·      अपघाताला आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षेवर अधिक भर देण्याची परिवहन मंत्री अनिल परब यांची सूचना.
****
राज्यात यंदा दहावीच्या परीक्षेत ९९ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं काल दुपारी दहावीचा निकाल जाहीर केला. राज्याचा एकूण निकाल ९९ पूर्णांक पाच दशांश टक्के लागला असून, कोकण विभाग १०० टक्के निकालासह पहिल्या स्थानी, अमरावती विभाग ९९ पूर्णांक ९८ शतांश टक्के निकालासह दुसऱ्या तर पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद तसंच लातूर विभाग, ९९ पूर्णांक ९६ शतांश टक्के निकालासह, तिसऱ्या क्रमांकावर आहेत. औरंगाबाद विभागात औरंगाबाद जिल्ह्याचा निकाल ९९ पूर्णांक ९७ शतांश टक्के लागला आहे. बीड ९९ पूर्णांक ९६, परभणी ९९ पूर्णांक ९०, जालना ९९ पूर्णांक ९७, तर हिंगोली जिल्ह्याचा निकाल, ९९ पूर्णांक ९६ शतांश टक्के लागला आहे.
लातूर विभागात लातूर जिल्ह्यातून ९९ पूर्णांक ६१ शतांश टक्के, नांदेड ९९ पूर्णांक ५४ शतांश टक्के तर उस्मानाबाद जिल्ह्यातून, ९९ पूर्णांक ४२ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यभरातून ८२ हजार ८०२ पुनर्परीक्षार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती, त्यांच्यापैकी ७४ हजार ६१८ म्हणजेच ९० पूर्णांक २५ शतांश टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यंदा दहावीची परीक्षा कोविड प्रादुर्भावामुळे घेता आली नव्हती. विद्यार्थ्यांची नवव्या इयत्तेतली कामगिरी तसंच दहाव्या इयत्तेत अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे, हा निकाल लावण्यात आला आहे.
दरम्यान, शिक्षण मंडळाचं संकेतस्थळ बंद पडल्याने, अनेक विद्यार्थ्यांना काल सायंकाळपर्यंत आपला निकाल समजू शकला नव्हता.
****
महाराष्ट्र आणि केरळ राज्यात कोरोना विषाणू बाधितांच्या संख्येत होणारी वाढ, चिंतेची बाब असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. कोविड रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी, पंतप्रधानांनी काल दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आणि ओडिसा या राज्यांचे मुख्यमंत्री, या बैठकीत सहभागी झाले होते. चाचणी, योग्य उपचार आणि बाधितांच्या संपर्कातल्या लोकांचा शोध, यावर भर देणं, तसंच अधिक रुग्ण असलेल्या जिल्ह्यांवर लक्ष केंद्रीत करणं आवश्यक असल्याचं पंतप्रधान म्हणाले. त्यामुळे कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना आवश्यक असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं.
दरम्यान, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करताना, वाढती गर्दी हे एक मोठं आव्हान असल्याचं, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बैठकीत नमूद केलं. धार्मिक, सामाजिक तसंच राजकीय कार्यक्रम, आंदोलनं यामुळे होणारी गर्दी थांबवण्यासाठी, केंद्र सरकारनेच आता देशपातळीवर एक व्यापक धो��ण आणावं, अशी मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांनी केली. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर सर्वच ठिकाणी लोक घराबाहेर पडून पर्यटन स्थळी, बाजारात गर्दी करत आहेत. हे थांबवण्यासाठी राज्य प्रयत्न करत आहेतच, पण केंद्रीय पातळीवरून देखील व्यापक स्वरूपाचं धोरण आखावं लागेल, असं ठाकरे म्हणाले.
****
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेतही उद्योग सुरु राहतील यादृष्टीने काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधिकारी, तसंच उद्योग क्षेत्रातल्या काही प्रतिनिधींशी, मुख्यमंत्र्यांनी काल दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या सुवर्णमहोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रमालाही, मुख्यमंत्र्यांनी काल संबोधित केलं. भूजल संपत्तीचं संवर्धन आणि जतनाचं कार्य अधिक जोमाने करण्यासाठी, लोकांचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असल्याचं, मुख्यमंत्री म्हणाले.
****
राज्यात काल सात हजार ७६१ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६१ लाख ९७ हजार १८ झाली आहे. काल १६७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख २६ हजार ७२७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक चार दशांश टक्के झाला आहे. काल १३ हजार ४५२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५९ लाख ६५ हजार ६४४ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक २७ शतांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख सात हजार २०५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ३४८ कोविड बाधितांची नोंद झाली, तर सात जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर जालना जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले मराठवाड्यात सर्वाधिक १८१ रुग्ण आढळले. उस्मानाबाद ५४, औरंगाबाद ४६, लातूर २८, नांदेड १६, परभणी १४, जालना आठ, तर हिंगोली जिल्ह्यात एक नवा रुग्ण आढळला.  
****
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचं काल मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, त्या ७५ वर्षांच्या होत्या. १९७८ सालच्या ‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या सुरेखा यांनी नाटकं, दूरचित्रवाणी मालिका, आणि चित्रपट या सर्वच क्षेत्रात काम केलं. ‘तमस’, ‘मम्मो’ आणि ‘बधाई हो’ या चित्रपटांमधल्या भूमिकांसाठी, त्यांना तीन वेळा सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. १९८९ साली त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही मिळाला होता. ‘बालिका वधू’ या मालिकेतली दादीसा ही त्यांची भूमिका विशेष गाजली.
****
अंमलबजावणी संचालनालय - ईडीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची, सुमारे चार कोटी वीस लाख रुपयांची अचल संपत्ती जप्त केली आहे. यामध्ये मुंबईत वरळी इथली एक कोटी ५४ लाख रुपयांची सदनिका आणि दोन कोटी ६७ लाख रुपये किंमतीची रायगड जिल्ह्यात उरण इथल्या जमिनीचा समावेश आहे. डिसेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान, बार मालकांकडून वसूल केलेले चार कोटी रुपये, दिल्लीतल्या बनावट कंपन्यांच्या मार्फत देशमुख यांच्या श्री साई शिक्षण संस्थेकडे आल्याचं भासवण्यात आलं, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली.
 दरम्यान, पुण्यातल्या भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांच्या कोठडीत १९ जुलै पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
****
राज्यात वैद्यकीय शिक्षणाचं जाळ तयार करुन, देशातलं वैद्यकीय शिक्षणाचं केंद्र म्हणून महाराष्ट्र नावारुपाला यावं, अशी राज्य सरकारची भूमिका असल्याचं, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, साथरोगावर असलेल्या अभ्यासक्रमांची व्याप्ती वाढवण्यात येणार, तसंच वैद्यकीय तंत्रज्ञान आणि उपकरणांसंबंधीचे नवे अभ्यासक्रम सुरु करण्यात येत असल्याचं, देशमुख यांनी सांगितलं. ते म्हणाले –
डॉक्टरांची संख्या वाढवली पाहिजे, नर्सची संख्या वाढवली पाहिजे. पॅरॉमेडिकल स्टाफची संख्या वाढवली पाहिजे. म्हणून त्याचे अभ्यासक्रम सुद्धा मोठ्या प्रमाणामधे हे आपल्याला विद्यापीठाकडनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापमधे या व्यवस्था येणाऱ्या काळामधे उभ्या राहिल्या पाहिजेत. जवळपास सहा नव्या वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयाला आम्ही मंजुरी दिली आहे. आणि इतर जिल्ह्यांचे प्रस्ताव हे विचाराधीन आहेत. भारतातलं वैद्यकीय शिक्षणाचं केंद्र म्हणून महाराष्ट्र नावारूपाला आला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आयुषचं सुध्दा जाळं हे महाराष्ट्रामधे त्याची व्याप्ती वाढली पाहिजे हे देखील आमचं धोरण आहे.
 औरंगाबाद जिल्ह्यात कोविड रुग्णसंख्या दोन अंकी झाली असली, तरी कोविड प्रतिबंधात्मक नियमांचं पालन करण्याचं आवाहन देशमुख यांनी केलं.
दरम्यान, अमित देशमुख यांच्या नेतृत्वात काल औरंगाबाद इथं इंधन दरवाढीविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर सायकल मोर्चा काढण्यात आला. केंद्र सरकारनं, पेट्रोल आणि डिझेल, वस्तू आणि सेवा कर जीएसटी अंतर्गत आणण्याची मागणीही देशमुख यांनी केली.
****
पेट्रोल, डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राज्यभरात राबवण्यात येत असलेल्या स्वाक्षरी मोहीमेचं, परभणी जिल्ह्यात जिंतूर इथं काल उद्घाटन करण्यात आलं. युवानेते सुरेश नागरे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर तालुकाध्यक्ष गणेश काजळे आणि रामेश्वर घुगे यांनी या मोहिमेचं उद्घाटन केलं. शहरात पेट्रोल पंप आणि रहदारीच्या ठिकाणी ही मोहीम राबवण्यात आली. तसंच सायकल फेरी काढून इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला.
****
नांदेड जिल्ह्यातल्या भोकर इथल्या जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमि‍क नूतन शाळेची काल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी अनुपस्थित असलेल्या ५ शिक्षकांना त्यांनी तडकाफडकी निलंबित केलं.
****
औरंगाबाद शहरात व्यावसायिक मालमत्तांना पाण्याचं मीटर बसवण्याच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. स्मार्ट सिटी विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक काल उद्योग विभागाचे अतिरिक्त सचिव बलदेवसिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. शहर विकासाच्या अनेक कामांसाठी निविदा प्रक्रियेला या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
****
अपघाताला आळा घालण्यासाठी रस्ता सुरक्षेवर अधिक भर देण्याची सूचना परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली आहे. काल औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात परब यांनी औरंगाबाद, नांदेड तसंच लातूर विभागाच्या कामाकाजाचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. वाहनचालकांना शिस्त लावणं महत्त्वाचं असल्याचं परब यांनी नमूद केलं. ऑटोरिक्षा परवाना धारकांना जाहीर केलेल्या सानुग्रह अनुदान वाटपाबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याची सूचना यावेळी त्यांनी केली.
****
सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गाचे काम थांबू नये यासाठी राज्य आकस्मिक निधीमधून तातडीने २२ कोटी रुपये उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये सोलापूर - उस्मानाबाद रेल्वे मार्गाचा साधा उल्लेख देखील करण्यात आला नाही, याकडे पाटील यांनी लक्ष वेधलं. हा निधी देण्यासाठी सर्व संबंधितांची बैठक घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
****
परभणी इथं जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी काल, कोविड कृती दलाची बैठक घेतली. कोविड-19 मुळे पालक गमावलेल्या बालकांच्या काळजी तसंच संरक्षणासाठी स्थापन कृती दलातल्या संबंधित अधिकाऱ्यांनी, जिल्ह्यातल्या अशा बालकांची माहिती घेऊन, कागदपत्रांची पूर्तता करावी, आणि प्रकरणं तत्काळ निकाली काढावीत, असे निर्देश मुगळीकर यांनी दिले.
****
भविष्यात शेती सक्षम करायची असेल तर जास्तीत जास्त महिलांनी शेतीत सक्रिय सहभाग घेणं गरजेचं असल्याचं मत, राज्याचे कृषी सचिव एकनाथ डवले यांनी व्यक्त केलं आहे. जालना जिल्ह्यातल्या बदनापूर इथं काल क्षेत्र भेट कार्यक्रमात ते बोलत होते. डवले यांनी बदनापूर, राजेवाडी, खादगाव इथल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली. खादगावच्या कृषी सहायक व्ही. एम. गुम्मलवार यांनी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा डवले यांनी प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.
****
औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांमध्ये काल समाधानकारक पाऊस झाला.
दरम्यान, मराठवाड्यात आज अनेक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवस मराठवाड्यात काही भागात मुसळधार पाऊस पडेल, असं हवामान विभागानं सांगितलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 3 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 27 March 2021 Time 7.10am to 7.25am Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ मार्च २०२१ सकाळी ७.१० मि.
****
कोरोना विषाणू रुग्णांच्या संख्येत पुन्हा एकदा वाढ होत आहे, त्यामुळे संपूर्ण काळजी घेण्याचं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. प्रत्येक नागरिकानं सर्व सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांनी, न घाबरता, लसीकरण करुन घ्यावं. सुरक्षित रहा आणि या सहज सुलभ उपायांचा अवलंब करा. नाक आणि तोंडाला मास्क लावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखा, वेळोवेळी साबणाने हात धुवा. हात आणि तोंड स्वच्छ ठेवा.
****
** आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रणासह मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश  
** राज्यभरात उद्यापासून रात्रीची जमावबंदी लावण्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सूचना
** राज्यात नवे ३६ हजार ९०२ कोविडग्रस्त; मराठवाड्यात ५७ रुग्णांचा मृत्यू तर नव्या चार हजार ५९७ रुग्णांची नोंद
** हिंगोली जिल्ह्याच्या प्रतिबंधित क्षेत्रात पूर्ण निर्बंध; लातूर तसंच बीड जिल्ह्यात चार एप्रिल पर्यंत टाळेबंदी लागू
** कृषी कायद्यांच्या विरोधात पुकारलेल्या बंदला मराठवाड्यात संमिश्र प्रतिसाद
** लग्नाचा बनाव करून पैसे लुटणाऱ्या चौकडीला औरंगाबाद ग्रामीण पोलिसांकडून अटक
आणि
** जागतिक नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंतला सुवर्णपदक
****
आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर राज्य तसंच केंद्रशासित प्रदेशांनी गर्दीवर नियंत्रण ठेवावं तसंच कोविड संदर्भात मार्गदर्शक सूचनांचं पालन करण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी, राज्यांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात होळी-धुलिवंदन, शब-ए-बारात, तसंच ईस्टर संडे या सणांच्या अनुषंगानं सर्व जिल्हा प्रशासनांनी तसंच पोलिस विभागानं खबरदारी घ्यावी, तसंच नागरिकांच्या जागरुकतेसाठी अभियान राबवण्यास सांगितलं आहे. नागरिकांनी मास्कचा योग्य वापर करावा, तसंच शारीरिक अंतराचा नियम पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
संपूर्ण राज्यभरात उद्यापासून रात्रीची जमावबंदी लावण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल सर्व विभागीय आयुक्त, आणि प्रशासकीय यंत्रणेशी संवाद साधून कोविड स्थितीसंदर्भात आढावा घेतल्यानंतर हे निर्देश दिले. जनतेने कोविडचे नियम पाळले नाहीत, तर नाईलाजाने येत्या काही कालावधीत अधिक कडक निर्बंध लावावे लागतील, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. दरम्यान, राज्यात ५२ लाख लोकांना आतापर्यंत कोविड लस देण्यात आली असून, सध्या देशभरात लसीकरणामध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
****
राज्यात काल ३६ हजार ९०२ कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या २६ लाख ३७ हजार ७३५ झाली आहे. काल ११२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, ५३ हजार ९०७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक चार दशांश टक्के झाला आहे. काल १७ हजार १९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत २३ लाख ५६ रुग्ण, कोरोना विषाणू मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ८७ पूर्णांक दोन दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात दोन लाख ८२ हजार ४५१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल नव्या चार हजार ५९७ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ५७ रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला. मृतांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातल्या २६, नांदेड जिल्ह्यातल्या १४, परभणी सहा, जालना पाच, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन, तर हिंगोली आणि लातूर जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काल एक हजार ७८७ रुग्ण आढळले. नांदेड जिल्ह्यात ९७०, लातूर ५३८, जालना ४१५, बीड ३८३, परभणी २६���, उस्मानाबाद १५५, तर हिंगोली जिल्ह्यात १८६ नवे रुग्ण आढळून आले.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या प्रतिबंधित क्षेत्रातली सर्व दुकानं तसंच नागरिकांच्या व्यवहारांवर पूर्ण निर्बंध घालण्यात आले आहेत. कळमनुरी तालुक्यातल्या आखाडा बाळापूर, वारंगा या बाजारपेठेच्या ठिकाणी कडकडीत बंद ठेवण्यात आला. नागरिकांनी कोविड प्रतिबंधासाठी नियमांचं पालन करण्याचं तसंच लसीकरण करून घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केलं आहे.
शासनानी जे ६० वर्षाच्या वरचे आणि ४५ च्या वरचे जे लोकं ज्यांना काहीतरी पुर्वीपासून काही आजार असेल अशा लोकांना जे व्हॅक्सीनेशनची जे सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. त्या सुविधाचा जास्तीत जास्त वापर करायचा आहे.कारण आतापर्यंतचा आमचा जो अनुभव आहे की जरी व्हॅक्सीनेशन केल्यानंतर जरी कोविड झाला की कोणाला पण मृत्यू होत नाही. म्हणजे व्हॅक्सीनेशन जर केला आणि त्याचे दोन्ही डोस घेतले.आणि व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये गॅप ठेवला तर कोविडमुळे स्वत:च्या जीवाला जो धोका असतो तो जवळपास १०० टक्के खत्म होवून जातो.
****
औरंगाबाद जिल्ह्यात नागरिकांनी आगामी सण उत्सवांच्या काळात एकत्र न येता, शारीरिक अंतराच्या नियमाचं पालन करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केलं आहे. चव्हाण यांनी काल सामाजिक संपर्क माध्यमातून जनतेशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले...
हा लढा आपला रोगाशी आहे. मग या रोगाशी लढा देत असतांना चांगल्या प्रकारचे प्रोटोकॉल म्हणजे लोकांनी नाही एकत्र येणे हे पाळणे गरजेचं आहे. म्हणून आम्ही कुठलेही फेस्टीवल या काळात होवू नये अशी जिल्हा प्रशासनाची आणि राज्यशासनाची भुमिका राहील.याच्यामुळे आपण ज्या उपाय योजना करतो आहे. तुम्ही जे आम्हाला साथ देत आहेत. आपल्याला लोकं या कोविडमधून बाहेर आणयचे आहेत आणि असे फेस्टीवल जर केले आपण तर पुन्हा लोकं एकत्र येतील, संसर्ग होण्याचं प्रमाण वाढेल आणि म्हणून रिक्वेस्ट करतो आपल्याला की आपण मला टेस्टींगसाठी मदत करा, माझे माणसं आयएल आणि सारीच्या सर्वेक्षणासाठी आल्यानंतर त्यांना मदत करा, आणि आपल्या घरात ४५ प्लस कोणी असेल  किंवा ६० प्लस कोणी असेल तर त्यांना व्हॅक्सीनेशन सेंटर पर्यंत घेवून जा
****
लातूर जिल्ह्यात कोविड प्रतिबंधासाठी आजपासून ४ एप्रिलपर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी याबाबतचे आदेश जारी केले. जिल्ह्यातले सर्व जिम, व्यायामशाळा, क्रीडांगणं, जलतरण तलाव, उद्यानं, पानटपरी, चहाटपरी, मंगल कार्यालये, चित्रपट तसंच नाट्यगृहं, सभागृहं बंद राहतील. उपाहारगृहांना फक्त पार्सल सुविधा देता येणार आहे. होळी, धुलीवंदन, रंगपंचमी, हे सण आपल्या कुटुंबात साजरे करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
****
बीड जिल्ह्यात कालपासून चार एप्रिल पर्यंत टाळेबंदी लागू झाली. काल पहिल्या दिवशी नागरिकांनी टाळेबंदीचं काटेकोरपणे पालन केल्याचं दिसून आलं.
****
नांदेड जिल्ह्यात कोविड-19 च्या रुग्णांसाठी पुरेशा रुग्णखाटा उपलब्ध असल्याचं, जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांनी स्पष्ट केलं आहे. काल रुग्णालयांची पाहणी केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांनी गृहविलगीकरणात राहून उपचार घ्यावेत, सौम्य लक्षणं आढळून आली तरी कोविड तपासणी करून घेण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं.
दरम्यान, डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात “कोविड-19 चौकशी कक्ष” सुरु करण्यात आला आहे. २४ तास कार्यरत राहणाऱ्या या कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02462-22 92 21 असा आहे. रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी खाटा उपलब्ध आहेत किंवा नाही याची माहिती, या कक्षातून दिली जाईल.
****
जालना जिल्ह्यात सध्या लॉकडाऊन लावण्याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही, असं जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी स्पष्ट केलं आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता नागरिकांनी सुरक्षित अंतराचे नियम पाळावेत, मास्कचा वापर करावा, असं आवाहन बिनवडे यांनी केलं आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता, जिल्ह्यातल्या ११ खासगी रुग्णालयांचं अधिग्रहण करुन २२३ रुग्णखाटा कोविड रुग्णांसाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले.
****
परभणी शहरात स्टेशन रोडवर जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीमध्ये कोविड सुश्रुषा केंद्र सुरू करण्यात आलं आहे. काल या केंद्रात पाच कोविडग्रस्तांवर उपचार सुरू करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ.बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. सर्व सोयींनीयुक्त २०० रुग्ण खाटांच्या या केंद्रात ५०० रुग्णखाटापर्यंत नियोजन करता येईल, असं डॉ नागरगोजे यांनी सांगितलं.
****
मुंबईतल्या भांडूप इथं कोविड रुग्णालयाला लागलेल्या आगीत दगावलेल्यांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांनी काल घटनास्थळी जाऊन पाहणी केली. राज्यभरात ज्या मॉल्स किंवा इतर वास्तूंमध्ये कोविड रुग्णांवर उपचारासाठी रुग्णालयं सुरु आहेत, त्या ठिकाणच्या अग्निसुरक्षेची तत्काळ तपासणी करण्याचे निर्देश दिले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. काल पहाटे झालेल्या या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला.
****
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला मराठवाड्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. लातूर इथं काँग्रेस भवनासमोर पक्षातर्फे एकदिवसीय उपोषण करत केंद्र सरकारच्या निर्णयांचा विरोध करण्यात आला. प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष रमेश बागवे आणि आमदार धीरज देशमुख यांच्या उपस्थितीत उपोषण करण्यात आलं, तर उस्मानाबाद इथं काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री रमेश बागडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं.
****
लग्नाचा बनाव करून पैसे लुटणाऱ्या चौकडीला औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या टोळीची मुख्य सूत्रधार आशा खडसे हिच्या चौकशीतून एकाच महिलेचा अनेकांशी बनावट विवाह केल्याचं समोर आलं. सदर महिलेच्या सात बनावट आधारकार्डसह आरोपींकडून ७ मोबाईल, एक इंडिका कार असा सुमारे साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या टोळीने नाशिक, जळगाव, औरंगाबादसह गुजरात राज्यातही अशी फसवणूक केल्याचं समोर आलं आहे.
****
जागतिक नेमबाजी क्रीडा महासंघ -आयएसएसएफच्या नवी दिल्लीत सुरू असलेल्या वर्ल्डकप-२०२१ च्या विश्वचषक स्पर्धेत महाराष्ट्राच्या तेजस्विनी सावंत हिने सुवर्णपदक पटकावलं आहे. ५० मीटर रायफल थ्री पोझिशन मिक्स्ड टीम इव्हेंट प्रकारात तेजस्विनी सावंत आणि संजीव राजपूत या दोघांनी सुवर्णपदकाची कमाई केली. पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स टीम इव्हेंटमध्येही भारतानं सुवर्णपदक पटकावलं. स्पर्धेत १२ सुवर्ण पदकांसह २५ पदकं पटकावत भारत पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.
****
क्रिकेट
पुणे इथं झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात इंग्लंड संघानं भारतीय संघावर सहा ग��ी राखून विजय मिळवला. भारतानं प्रथम फलंदाजी करत, पाहुण्या संघासमोर ३३७ धावांचं लक्ष्य ठेवलं होतं, इंग्लंड संघानं ४४ व्या षटकांत चार गड्यांच्या बदल्यात हे लक्ष्य साध्य केलं. मालिकेत दोन्ही संघ आता १-१ ने बरोबरीत असून, तिसरा आणि अखेरचा सामना उद्या होणार आहे.
****
उस्मानाबाद जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातल्या हिप्परगा इथल्या राष्ट्रीय शाळेला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण झाली आहेत. हैद्राबाद मुक्तीसंग्रामाचे नेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या आठवणी जागवणाऱ्या या शाळेला जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी काल भेट देऊन, शाळेच्या परिसरात स्मारक कशा स्वरूपात उभारता येईल, याबाबत संबंधितांशी चर्चा केली. या स्मारकाबाबत नागरिकांनी सूचना कराव्यात, असं आवाहन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी केलं आहे.
****
लातूर शहरात प्रमुख रस्ते तसंच चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी ही माहिती दिली. यासाठी ८२ लाख रुपये खर्च येणार असून जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांनी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत या खर्चाला मान्यता दिली आहे.
****
नांदेड इथले लोककलावंत गणेश वनसागर यांचं काल पहाटे कोविड संसर्गानं निधन झालं. ते ५० वर्षांचे होते.
****
लातूर जिल्ह्यात निलंगा तालुक्यातल्या कासारशिरसी इथले डॉ. मनोहरराव पाटील यांचं काल दुर्धर आजाराने निधन झालं, ते ८८ वर्षांचे होते.
//**********//
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 31 December 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ३१ डिसेंबर २०१७ सकाळी ६.५० मि. ****
• ‘पद्मावती’ चित्रपटाचं नाव बदलून, ‘पद्मावत’ करण्याच्या सूचनेसह चित्रपट प्रदर्शनास केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची मंजुरी. • मुंबईतल्या कमला मिल अग्निकांड प्रकरणी तीन जणांविरुद्ध नोटीस. • वाल्मीच्या लाचखोर महासंचालक आणि सहसंचालकाला चार जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी. आणि • प्रसिद्ध गायिका आशालता करलगीकर यांचं दीर्घ आजारानं निधन. **** केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ, अर्थात सेंसॉर बोर्डानं ‘पद्मावती’ चित्रपटाला, काही बदलांसह मान्यता दिली असून 'युए' प्रमाणपत्रं जारी केलं आहे. चित्रपटाचं ‘पद्मावती’ हे नाव बदलून, ते ‘पद्मावत’ करण्याचा एक बदल मंडळानं सुचवला आहे. मलिक मुहम्मद जयसी यानं सोळाव्या शतकात लिहिलेल्या, ‘पद्मावत’ या महाकाव्यावर हा चित्रपट आधारलेला असल्याचा दावा, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी केला होता. त्या अनुषंगानं हा बदल, मंडळानं सुचवला आहे. हा चित्रपट सती प्रथेचं उदात्तीकरण करत नाही, अशी टीप चित्रपटाच्या श्रेयनामावलीत दाखवावी, घुमर या गाण्यात आवश्यक ते बदल करावेत, असंही मंडळानं सूचवलं आहे. या चित्रपटामुळे निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सेंसॉर बोर्डानं एका विशेष समितीची स्थापना केली होती. त्या समितीनं पाच बदल सूचवले आहेत. **** मुंबईतल्या लोअर परळ भागात कमला मिल अग्निकांड प्रकरणी मुंबई पोलिसांनी तीन जणांविरुद्ध नोटीस जारी केली आहे. आग लागलेल्या पबचे मालक हृतेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मनका अशी या तिघांची नावं असून, यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेमध्ये ११ महिलांसह १४ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण होरपळून जखमी झाले आहेत. दरम्यान, या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकानं धडक कारवाई सुरु केली आहे. अंधेरी, जुहू भागातल्या हॉटेलांवर अतिक्रमण विरोधी पथकाची कारवाई सुरू असल्याचं वृत्त आहे. **** पाण्याची उत्पादकता आणि व्यवस्थापन अमूल्य असल्याचं प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.बी.व्यंकटेश्वरलू यांनी केलं आहे. परभणी इथं आयोजित १८ व्या राज्य सिंचन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते काल बोलत होते. पाण्याची उत्पादकता ही नवीन संकल्पना जगभर रूढ झाली असल्याचं ते म्हणाले. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही.एम.भाले यावेळी उपस्थित होते. कृषी, सिंचन, उद्योग आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा यावेळी सत्कार करण्यात आला. या परिषदेचा आज समारोप होत आहे. **** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांचं नांदेड इथं आगमन होईल. कंधार तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार असून, गुरु गोविंदसिंह यांच्या जयंतीनिमित्त नांदेड इथल्या सचखंड गुरुद्वारा परिसरात आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ३९ वा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या जल आणि भूमी व्यवस्थापन संस्था-वाल्मीचे महासंचालक, हरीभाऊ गोसावी आणि सहसंचालक राजेंद्र क्षीरसागर या दोघांना जिल्हा सत्र न्यायाधीशांनी चार जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वाल्मीच्या एका प्राध्यापकाकडून दहा लाख रुपयांची लाच घेतल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली आहे. **** प्रसिद्ध गायिका आशालता करलगीकर यांचं काल काल पहाटे औरंगाबाद इथं दीर्घ आजारानं निधन झालं, त्या ७५ वर्षांच्या होत्या. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. मुळच्या विजापूरच्या असलेल्या आशाताई विवाहानंतर औरंगाबाद इथं स्थायिक झाल्या होत्या. त्यांनी पंडित भीमसेन जोशी, पंडित सामता प्रसाद यांच्यासह संगीत क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांसह देशविदेशात अनेक कार्यक्रमातून गायन सादर केलं. पंडित नाथराव नेरळकर यांच्यासोबत त्यांनी केलेल्या गझलांच्या मैफली गानरसिकांमध्ये विशेष लोकप्रिय होत्या. तेलगू चित्रपटांसाठी त्यांनी उमेदीच्या काळात पार्श्वगायनही केलं आहे. देशाचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद यांनी आशालता यांच्या गायकीनं प्रभावित होऊन, त्यांना ‘आंध्रलता’ ही पदवी दिली होती. यासह इतरही विविध पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. त्यांच्या पार्थिव ���ेहावर काल औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. **** उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवात काल जलयात्रा साजरी झाली. डोक्यावर तीर्थातल्या पाण्याने भरलेले जलकुंभ घेऊन शेकडो महिला शिवाजीपुतळा, डॉ.बाबासाहेब आंबेडकरपुतळा यामार्गावरून भवानीरोडवरून देवीच्या मंदिराकडे वाजत गाजत ही जलयात्रा गेली. जलकुंभातल्या पाण्यानं गाभाऱ्यासह मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. **** अमृत अभियानाअंतर्गत लातूर शहरांतल्या हरित पट्ट्यांचा विकास केला जाणार असून, त्यासाठी मागवण्यात आलेल्या निविदांना स्थायी समितीच्या विशेष सभेत मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती अशोक गोविंदपूरकर यांनी दिली. ते काल लातूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. हरित पट्ट्यांच्या विकासासाठी असलेला निधी खर्च करण्याची अंतिम तारीख ३० डिसेंबर असल्यानं, मनपा प्रशासनानं अत्यंत घाईने स्थायी समिती सभेत हा विषय मांडला. प्रशासनानं घाई गडबडीत असे ठराव मांडणं योग्य नसल्याचं गोविंदपूरकर यांनी सांगितलं. **** नांदेड - वाघाळा महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी काँग्रेसचे शम्मीम अब्दुल्ला यांची बिनविरोध निवड झाली आहे. महिला बालकल्याण समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या संगीता तुपेकर तर उपसभापतीपदी अलका शहाणे यांची निवड झाली आहे. स्थायी समितीत १६ पैकी १५ काँग्रेसचे तर एक भाजपचा सदस्य यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. **** औरंगाबाद इथं सनदी लेखापाल संस्थेच्या वतीनं आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचं काल आमदार अतुल सावे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. येणारा काळ हा आर्थिक साधनांचा असल्याचं मत उद्योजक डी.बी.सोनी यांनी यावेळी व्यक्त केलं. विमुद्रीकरण, आणि कारखान्यांची जागतिक स्तरावरील गुंतवणूक, यामुळे सनदी लेखापालांच्या व्यवसायाला उभारी येत असून, या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. सिल्लोड तालुक्यातले हुतात्मा जवान संदीप जाधव यांच्या कुटुंबीयांना ५१ हजार रूपयांचा धनादेश यावेळी देण्यात आला. **** नववर्षाचं स्वागत व्यसनमुक्त वातावरणात व्हावं, यासाठी काल बीड इथं व्यसनमुक्ती संदेश फेरी काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातून निघालेल्या या संदेश फेरीत शालेय विद्यार्थी तसंच इतर सामाजिक संघटनांनी या फेरीत सहभाग घेतला. सामाजिक न्याय भवन परिसरात विसर्जित झालेल्या या संदेश फेरीला आमदार विनायक मेटे यांनी संबोधित केलं. **** औरंगाबाद इथं येत्या ५ ते ८ जानेवारी दरम्यान राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन आणि कृषी परिषद ‘महाॲग्रो २०१८’चं आयोजन करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात मराठवाड्यासह राज्यभरातल्या शेती आणि शेतीपूरक उद्योगांमध्ये गतिशीलता निर्माण करण्यासाठी, शेतकऱ्यांना नव तंत्रज्ञान, नवं वाण, नव्या योजना समजावून सांगण्यात येणार असल्याची माहिती, मुख्य समन्वयक विधीज्ञ वसंत देशमुख यांनी वार्ताहर परिषदेत दिली. औरंगाबाद इथल्या स्टेशन रोडवरील अयोध्या नगरीत हे प्रदर्शन भरणार आहे. **** औरंगाबाद शहराला स्मार्ट शहराच्या दृष्टीकोनातून शहरातल्या जीर्ण झालेल्या विद्युत तारा आणि विद्युत वाहिन्या बदलण्यासाठी केंद्र सरकारकडे एक हजार कोटी रुपयांची मागणी करणार असल्याचं, खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं. ते काल जिल्हास्तरीय विद्युतीकरण समितीच्या बैठकीत बोलत होते. **** पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना ठिबक संचाचा जास्तीत जास्त वापर करावा, असं आवाहन, विधान सभेचे अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी केलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या फुलंब्री इथं बंद नलिका कालवा वितरण प्रणालीचं भूमीपूजन करताना ते काल बोलत होते. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या करमाड पोलिस ठाण्याचा सहाय्यक पोलिस निरीक्षक गोरखनाथ शेळके आणि हेड कॉन्सटेबल शेख रहीम या दोघांना काल २५ हजार रूपये लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहात पकडलं. गुन्ह्यात जप्त केलेली वाळूची गाडी सोडवण्यासाठी आणि गाडी पुढे नियमित चालू देण्यासाठी या दोघांनी लाचेची मागणी केली होती. ****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 March 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ मार्च २०१७ सकाळी ६.५० मि. **** • राज्यात गाव पुनर्वसनासाठी माळीण गाव आदर्श मानणार - मुख्यमंत्री • विनाअनुदानित गॅस सिलिंडर साडे चौदा रुपयांनी स्वस्त तर अनुदानित सिलिंडर साडे पाच रूपयांनी महागले • वाळू माफियांसोबत आर्थिक संबंध असल्याच्या आरोपावरून भोकरदनच्या तहसीलदार चित्रा रूपक निलंबित • हिंगोली- नांदेड राष्ट्रीय महामार्गावर बस आणि ट्रक अपघातात सहा प्रवासी ठार आणि • भारतीय खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधुला विजेतेपद **** राज्यात कोणत्याही गावाचं पुनर्वसन करताना यापुढे माळीण या गावाचा आदर्श घेतला जाईल असं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुणे जिल्ह्यात डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या माळीण गावावर जुलै २०१४ मध्ये मुसळधार पावसामुळे कडा कोसळल्यानं हे गाव गाडलं गेलं होतं. त्याचं, शेजारच्या आमडे गावात पुनर्वसन करण्यात आलं. काल या प्रकल्पाचं लोकार्पण करताना मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी प्रकल्पाच्या कोनशिलेचं अनावरण करून घरांची पाहणी केली. दोन ग्रामस्थांना घराच्या चाव्या तसंच संसारोपयोगी वस्तू मुख्यमंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आल्या. शासन आणि प्रशासन या दोन्ही यंत्रणांनी संवेदनशीलपणे एकत्रित काम केल्यास, माळीणसारखं सुंदर पुनर्वसन होतं, असं मुख्यमंत्री म्हणाले. माळीण पाणी योजनेसाठी १४ कोटी ७७ लाख रुपये निधीला प्रशासकीय मान्यता दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान, काल पुण्यात यशदा महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन फाऊंडेशनच्या ग्रामीण विकास फेलोशिपचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. देश महासत्ता बनवण्यासाठी खऱ्या अर्थानं परिवर्तन दूत बना, असा संदेश मुख्यमंत्र्यांनी युवकांना दिला. **** विनाअनुदानित गॅस सिलिंडर साडे चौदा रुपयांनी स्वस्त झालं आहे तर घरगुती वापराच्या अनुदानित गॅस सिलिंडरच्या दरात पाच रुपये ५७ पैशांनी वाढ झाली आहे. मध्यरात्रीपासून हे नवे दर लागू झाले आहेत. **** शेतकरी कर्जमाफीसाठी समाजात जागृती होत असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं बोलत होते. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरु असलेल्या संघर्ष यात्रेच्या समारोपाला आपण उपस्थित राहणार असल्याचं, पवार म्हणाले. आगामी सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेना आपल्यासोबत आल्यास स्वागत असेल, असंही त्यांनी सांगितलं. **** शेतकरी कर्ज माफीसाठी काढण्यात आलेली विरोधी पक्षांची संघर्षयात्रा काल लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल झाली. लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यात उजनी इथं झालेल्या सभेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजप प्रणीत सरकार संवेदनशील नसल्याची टीका केली. तर विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारच्या धोरणावर टीका करत, विरोधकांच्या ठाम भूमिकेमुळेच सरकारनं विम्याच्या रकमेतून कर्ज कपातीचा निर्णय मागे घेतल्याचं नमूद केलं. त्यापूर्वी संघर्ष यात्रेनं लातूर जिल्ह्यात औसा तालुक्यात येलोरी इथं गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या, द्राक्ष उत्पादक शेतकरी गुंडप्पा निटुरे यांच्या नुकसानाची माहिती घेत, त्यांना तात्काळ एक लाख रुपये मदत दिल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. उस्मानाबाद इथं झालेल्या जाहीर सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राणा जगजीतसिंह पाटील यांच्यासह मान्यवरांची भाषणं झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, पतंगराव कदम, समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आजमी, यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते यावेळी उपस्थित होते. **** राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम काल देशभर राबवण्यात आली. यामध्ये देशभरातल्या पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांना पोलिओ लस देण्यात आली. उस्मानाबाद इथं पोलिओ लसीकरण मोहीमेचा प्रारंभ जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, तर नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यात मालेगाव इथं जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई पवार यांच्या हस्ते लसीकरणाला प्रारंभ झाला. आरोग्य विभागानं योग्य नियोजन करून, अभियान यशस्वी करावं, असं आवाहन त्यांनी केलं. औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि बीड जिल्ह्यातही या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरुन प्रसारित केलं जात आहे, आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए आय आर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** जालना जिल्ह्यात भोकरदनच्या तहसीलदार रुपा चित्रक यांना विभागीय आयुक्त डॉ पुरुषोत्तम भापकर यांनी निलंबित केलं आहे. चित्रक यांचे वाळु माफियांसोबत आर्थिक हितसंबंध असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारीवरून जालना जिल्हाधिकारी कार्यालयानं विभागीय आयुक्तांकडे अहवाल दाखल केला होता. त्यानुसार काल ही कारवाई करण्यात आली. **** पावसाचं पाणी साठवणं काळाची गरज असल्याचं प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. औरंगाबाद जिल्ह्याच्या फुलंब्री तालुक्यात शिरोडी इथं नाला खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामाला काल बागडे यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांनी पावसाच्या पाण्याची बचत करण्याचे प्रयत्न केले तर पाणीटंचाई भासणार नाही,  त्यादृष्टीनं योग्य नियोजन करण्याचं आवाहन बागडे यांनी यावेळी केलं.   **** परभणी महापालिका निवडणुकीसाठी काल १२४ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. महापालिकेच्या ६५ जागांसाठी आतापर्यंत १६२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. मात्र अद्याप एकाही पक्षानं उमेदवारांची यादी जाहीर केलेली नाही. दरम्यान, लातूर महापालिकेसाठी काल १२२ अर्ज दाखल झाले. आतापर्यंत एकूण दोनशे सात अर्ज दाखल झाले असून, या दोन्ही महापालिकांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. **** लातूर जिल्ह्यात उदगीर कृषी उत्पन्न बाजारसमितीच्या संचालक मंडळासाठी काल मतदान झालं. आज मतमोजणी होऊन दुपारपर्यंत निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. **** हिंगोली- नांदेड राष्ट्रीय महामार्गावर माळेगाव फाट्याजवळ खाजगी बस आणि ट्रकची समोरा समोर धडक होऊन झालेल्या अपघातात सहा प्रवासी ठार झाले. काल सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. यामध्ये पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर एका प्रवाशाचं रुग्णालयात नेत असताना निधन झालं. या अपघातात १४ जण जखमी झाले असून त्यापैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात आलं आहे. या सर्वांवर कळमनुरी इथल्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. **** औरंगाबाद शहरातल्या बीड बायपास इथंही संग्रामनगरमध्ये एका ट्रकनं दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या अपघातात तीन वर्षाची मुलगी जागीच ठार झाली. तर तिचे आई-वडील जखमी झाले. दरम्यान, पैठण ��ालुक्यात वडवाळी इथं काल एका मुलीचा गोदावरी नदी पात्रात बुडून मृत्यू झाला. **** न्यायालयानं शेतकऱ्यांना संरक्षण देणं आवश्यक असल्याचं मत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातले न्यायाधीश न्यायमूर्ती टी व्ही नलावडे यांनी व्यक्त केलं आहे. काल परभणी जिल्ह्यात सोनपेठ दिवाणी न्यायालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेतकरी वर्गांची जास्तीत जास्त प्रकरणे सामोपचारानं सोडवण्यावर भर द्यावा. ग्रामस्थांना विविध क्षेत्राशी संबंधित कायदे तसंच हक्कांबाबत माहिती देण्यात यावी, असं आवाहनही न्यायमूर्ती नलावडे यांनी यावेळी केलं. **** भारतीय खुल्या बॅटमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधुनं महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात सिंधूनं स्पेनच्या कॅरोलिना मरीनचा २१-१९, २१-१६ असा सरळ दोन सेट्समध्ये पराभव केला. **** औरंगाबाद ��िल्हा परीषदेतल्या विषय समित्यांच्या सभापती पदांची आज निवडणूक होणार आहे. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदांसाठी काँग्रेस आणि शिवसेना या दोन पक्षांनी युती करून जिल्हा परीषदेत सत्ता स्थापन केली आहे. दुपारी तीन वाजता होणाऱ्या या निवडणुकीत समाजकल्याण आणि महिला तसंच बालकल्याण समितीच्या सभापतींबरोबर अन्य दोन विषय समित्यांच्या सभापतींची निवड केली जाणार आहे. लातूर जिल्हा परिषदेतही विषय समित्यांच्या सभापदी पदांची निवडणूक आज होत आहे. **** जालना जिल्ह्यात अंकुशनगर इथं समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या प्रांगणात  माजी खासदार अंकुशराव टोपे यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री खासदार शरद पवार यांच्या हस्ते आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास या पुतळ्याचं अनावरण होणार आहे. **** प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक अजेय झणकर यांचं काल पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं, ते ५७ वर्षांचे होते. झणकर यांच्या सरकारनामा आणि द्रोहपर्व या कादंबऱ्या तसंच त्यावर निघालेले चित्रपट प्रसिद्ध आहेत. या चित्रपट तसंच कादंबऱ्यांसाठी झणकर यांना राज्य शासनासह विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. **** परभणी जिल्हा महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्यावतीनं आत्महत्याग्रस्त ४७ शेतकरी कुटुंबीयांना काल आर्थिक मदत देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. प्रभारी जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांच्यासह महसूल अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते. //****//****//
0 notes