#निजामाच्या
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 17 September 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ सप्टेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
पीएम विश्वकर्मा योजनेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली इथं उद्घाटन झालं. देशात सत्तर ठिकाणी हा कार्यक्रम होत आहे.
छत्रपती संभाजी नगर इथं केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन झालं. अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. स्थानिक उत्पादनं, कला आणि हस्तकलेच्या माध्यमातून परंपरा, संस्कृती आणि वैविध्यपूर्ण वारसा जिवंत ठेवणं, हा या योजनेचा उद्देश आहे.
****
घटनाकारांनी घालून दिलेल्या चौकटीनुसार, प्रत्येकाला न्याय मिळायला हवा, असं सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. उच्च न्यायालयाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर इथं, न्यायमूर्ती आणि वकीलांसाठी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात सरन्यायधीश बोलत होते.
चांगला न्याय मिळण्यासाठी न्याय व्यवस्थेतल्या प्रत्येक घटकाचं योगदान असतं. न्यायमूर्ती आणि वकिलांनी एकमेकांचा आदर करावा, परस्परांमध्ये समन्वय ठेवावा, असंही सरन्यायधीशांनी नमूद केलं.
यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय, कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रसन्ना वराळे, मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला, महाराष्ट्राचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांच्यासह औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती उपस्थित होते. तत्पूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते ��राठवाडा मुक्तीसंग्राम दिना निमित्त ध्वजारोहण झालं.
****
मराठवाड्याला मागास शब्दापासून मुक्ती मिळाली पाहिजे, अशी प्रतिज्ञा करण्याचं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर इथं सिद्धार्थ उद्यान परिसरात मुख्य शासकीय ध्वजवंदन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. मराठवाड्याच्या विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ भागवत कराड, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार इम्तियाज जलील यांच्यासह अनेक मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.
राष्ट्रगीतासह, राज्यगीतापाठोपाठ, मुक्तिसंग्रामानिमित्त विशेष प्रतिज्ञा घेण्यात आली. मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. पोलिस दलाच्या वतीनं हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. या कार्यक्रमाला उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी मुक्तिसंग्राम दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त लातूर इथं क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. जालन्यात पणन मंत्री अब्दुल सत्तार, धाराशिवमध्ये आरोग्यमंत्री तानाजी सावंत, हिंगोली इथं मंत्री संदीपान भुमरे, परभणीत मंत्री अतूल सावे तर नांदेड इथं पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. बीड इथं राजीव गांधी चौकातील हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र वाहून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मुक्तिसंग्राम दिनी अभिवादन केलं.
****
हैद्राबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज हैदराबाद इथं ध्वजारोहण करण्यात आलं. सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाच्या अत्याचारातून हैद्राबादला मुक्त करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती, असं सांगून शहा यांनी मुक्तिसंग्रामाच्या आठवणींना उजाळा दिला. या संग्रामात बलिदान देणाऱ्यांना शहा यांनी यावेळी आदरांजली अर्पण केली.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त भारतीय जनता पक्ष देशभरात आजपासून सेवा पंधरवाडा साजरा करत आहे. या पंधरवाड्यात रक्तदान, आरोग्य शिबिर, स्वच्छता अभियान आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.
दरम्यान, नागपूर इथं पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त 'पीएम स्कील रन' घेण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य, रोज��ार नावीन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी या दौडला हिरवा झेंडा दाखवला.
अर्थव्यवस्थेत इंग्लंडलाही मागे टाकत भारत पाचव्यास्थानी असून कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळ निर्मितीतून भारत जगातील तिसरी अर्थव्यवस्था ठरेल असा विश्वास फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
****
भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे २२ दरवाजे अडीच मीटरने, तर ११ दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले आहेत. धरणातून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्यानं गडचिरोली जिल्ह्यात छोट्या नद्या नाल्यांना पूर आला आहे तसंच जिल्ह्यातील गडचिरोली-आरमोरी,गडचिरोली-चार्मोशी आणि आष्टी-गोंडपिंपरी या तीन प्रमुख मार्गांसह सात मार्गांवरील वाहतुक आज सकाळपासून ठप्प झाली आहे.
****
0 notes
Text
Rajya Sabha Election : ओवेसींच्या पाठिंब्यावर भडकली मनसे, म्हणाले- घेत आहेत निजामाच्या वंशजांचा पाठिंबा, उघड झाले शिवसेनेचे हिंदुत्व
Rajya Sabha Election : ओवेसींच्या पाठिंब्यावर भडकली मनसे, म्हणाले- घेत आहेत निजामाच्या वंशजांचा पाठिंबा, उघड झाले शिवसेनेचे हिंदुत्व
Rajya Sabha Election : ओवेसींच्या पाठिंब्यावर भडकली मनसे, म्हणाले- घेत आहेत निजामाच्या वंशजांचा पाठिंबा, उघड झाले शिवसेनेचे हिंदुत्व मुंबई – चार राज्यांतील राज्यसभेच्या 16 जागांसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीला पाठिंबा देऊन ओवेसींनी मोठा सट्टा खेळलेल्या महाराष्ट्रात, … Rajya Sabha Election : ओवेसींच्या पाठिंब्यावर भडकली मनसे, म्हणाले- घेत आहेत निजामाच्या वंशजांचा पाठिंबा, उघड झाले…
View On WordPress
#election:#rajya#sabha#आजची खबर#आजच्या घडामोडी#आहेत?#उघड#ओवेसींच्या#घेत#झाले#ठळक बातम्या#निजामाच्या#पाठिंबा#पाठिंब्यावर#ब��तम्या#भडकली!#भारत लाईव्ह#भारत लाईव्ह मीडिया#मनसे#मराठी बातमी#मराठी समाचार#म्हणाले#वंशजांचा#शिवसेनेचे #हिंदुत्व
0 notes
Text
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार - कृषीमंत्री अब्दुल सत्तार - महासंवाद
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार – महासंवाद
जालना, दि. 17 (जिमाका):- निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त होऊन आज 17 सप्टेंबर रोजी आपण 75 व्या अमृत महोत्सवी वर्षात प्रवेश करत आहोत. संपूर्ण वर्षभर विविध उपक्रमांनी हा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथे आज मुख्य शासकीय ध्वजारोहण कृषी मंत्री अब्दुल सत्तार…
View On WordPress
0 notes
Text
जिल्ह्याचा सर्वांगीन विकासासाठी शासन कटिबद्ध - आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत - महासंवाद
जिल्ह्याचा सर्वांगीन विकासासाठी शासन कटिबद्ध – आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत – महासंवाद
उस्मानाबाद,दि.17(जिमाका):- हैदराबाद संस्थान निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्याच्या लढ्याचे नेतृत्व करणारे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जिवितकार्याची पायाभरणी आपल्या जिल्ह्यातील हिपरग्याच्या राष्ट्रीय शाळेत झाली, याची आजच्या दिनानिमित्ताने आपल्याला आठवण येणे स्वाभाविक आहे. स्वामीजींच्या नेतृत्वाखाली निजाम राजवटीच्या गुलामगिरीविरुध्द लढा देण्यात आला. त्यात आदरणीय गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब…
View On WordPress
0 notes
Text
Trek to Talgad, Ghosalgad, Kudachi leni near Roha
Overview ★ तळागड ★ इ.स. १६४८ मध्ये शिवाजी महाराजांनी तळागड आदिलशहाकडून जिंकून घेतला. इ.स. १६५९ मध्ये अफजलखानाच्या स्वारीच्या वेळी सिद्दीने तळागडाला वेढा घातला होता. पण अफजलखानाच्या पराभवाची बातमी मिळाल्यावर सिद्दीने वेढा उठवला. पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी १२ किल्ले स्वत:कडे ठेवले. त्यामध्ये तळागड हा एक होता. यावरूनच या किल्ल्याचे महत्व आपणास समजते. शिवाजी महाराजांच्या नि��नानंतर हा किल्ला सिद्दीकडे गेला. इ.स. १७३५ मध्ये पहील्या बाजीराव पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. पुढे १८१८ मध्ये जनरल प्राथरने हा किल्ला जिंकला. ★ घोसाळगड ★ घोसाळगड हा किल्ला कोणी बांधला हे ज्ञात नाही. १६व्या शतकात हा किल्ला निजामाच्या ताब्यात होता इस १६४८ मध्ये शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. ''रघुनाथ बल्लाळ(कोरडे) सबनीस, सात पाच हजार मावळे खळक पाइचे घेऊन राजापुरीवर चालेलं त्यांनी जाऊन राजापुरी पावेतो तळे, घोसाळे कुल देश मारुन सरद दरियाकिनारा मोकळा केला'' असा उल्लेख सभासद बखरीत आहे. शिवरायांनी घोसाळगडचे नाव 'वीरगड' ठेवले इ.स १६५९ मध्ये सिद्दीने घोसाळगडला वेढा घातला, पण महाराजांनी अफजल खानाचा वध केल्याची बातमी ऐकून सिद्दी वेढा उठवून निघून गेला. त्यानंतर सिद्दी, आंग्रे, मराठे यांच्या ताब्यात हा किल्ला होता. इस १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने हा किल्ला जिंकून घेतला. ★ कुडा लेणी★ माणगावच्या आग्नेयला २१ कि.मी. अंतरावर असणारे कुडा हे रायगड जिल्ह्यातील एक शांत खेडेगाव आहे. येथे समुद्रकिनाऱ्याजवळ असणाऱ्या एका टेकडीमध्ये २६ कोरीव गुंफांचा समूह आहे आणि येथून अरबी समुद्राचे होणारे नितांतरम्य दर्शन लेण्यांची शोभा अधिकच वाढविते. इ.स. तिसऱ्या शतकात निर्माण केलेल्या काही निवडक बौद्ध लेण्यांमध्ये कुड्याचा समावेश केला जातो. या लेण्यांची पहिली नोंद १८४८ सालची सापडते. परंतु त्यानंतरदेखील अनेक वर्षे ही लेणी फारशी प्रसिद्ध नव्हती.ही लेणी मांदाडपासून अगदी जवळ आहेत. मांदाड म्हणजे रोमन लेखकांनी उल्लेखिलेले मॅंडागोरा बंदर होय. या ठिकाणी झालेल्या उत्खननात सुमारे २००० वर्षांपूर्वीची खापरे आणि विटा सापडल्या आहेत. सातवाहन साम्राज्यातील महाभोजांच्या मांदव घराण्याचे हे प्रमुख केंद्र असावे असे मानले जाते. कुडा येथील लेणी दोन टप्प्यात कोरली असून क्रमांक १ ते १५ ही लेणी खालच्या स्तरात तर क्रमांक... Read more
source https://mumbaihikers.com/m/events/view/Trek-to-Talgad-Ghosalgad-Kudachi-leni-near-Roha
0 notes
Text
महाराष्ट्रतील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ .
महाराष्ट्रतील सर्वाधिक लोकप्रिय पर्यटन स्थळ .,
सोन्याची जेजुरी :-
पिवळ्या धमक रंगाने न्हालेली मार्तंडाची जेजुरी सोन्याची भासू लागते. भाविक लोक हळद-बुक्का उधळतात. ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ असा गजर करतात. हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. लाखो भक्तीचे श्रद्धास्थान आहे. हे स्थळ पुरंदर तालुक
‘जेजुरी’ खंडोबा देवस्थानाकडील डोंगर काही वर्षातच सुजलाम सुफलाम् होणार आहे. खंडोबाच्या अस्तित्वाने पुनीत झालेला हा परिसर वृक्षवल्लीनी फुलून येणार आहे. तसा हा डोंगर कित्येक वर्षे उजाड होता, पण आता वनविभागाने यात लक्ष घातले आहे.
जेजुरीत आता हिरवळ दि��ू लागली आहे. या ठिकाणी पर्जन्यमान कमी आहे. हा भाग खडकाळ आहे. उघडा डोंगर-उताराचा भूभाग अशी सर्व परिस्थिती प्रतिकूलच म्हणावी लागेल. आता पुण्यातील सासवड वनक्षेत्रातील प्रादेशिक वनविभागाच्या अधिकार्यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे.
जेजुरीच डोंगरावर हिरवाईची शाल पांघराची, या एकच ध्येयाने हे सेवक कामाला लागले. थोड्याचं दिवसात 7500 वृक्षांची पाळेमुळे या डोंगराच्या कुशीत घट्ट रुतली. प्रत्यक्ष या डोंगरावर 20 हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट या खात्याने आपल्या नजरेसमोर ठेवले आहे. विशेष म्हणजे निसर्गाशी असलेल्या आत्मितेतून काम सुरू झाले. गेल्या एक वर्षापासून या डोंगरात निसर्ग फुलण्यासाठी वनविभागाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तसे हे काम अवघड असल्यामुळे अनेक वनकर्मचार्यांचे हात या कार्यात उपयोगी पडले. जेजुरीच्या डोंगरावर आता हिरवा अंकुर फुलू लागला आहे. आतापर्यंत उद्दिष्टांपैकी साडेसहा हजार वृक्षांची लागवड पूर्ण झाली आहे. त्यामुळे जेजुरीत निसर्गरम्य वातावरण भाविकांना आणि पर्यटकांना अनुभवाला मिळणार आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य डोंगरउतारामुळे वाहून जाणारी माती, डोंगरमाथा असूनही न अडणारे ढग, कमी पाऊस अशी सर्वत्र परिस्थिती प्रतिकूल होती. प्रथम या खात्याने दगड मातीचे भक्कम आणि वळणदार बंधारे बांधले. त्यामुळे वाहून जाणार्या मातीला आधार मिळाला. त्यानंतर वृक्षवल्लींची लागवड करण्यात आली. उंच रोपांची लागवड करण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. शिवाय हे वृक्ष जगविण्यासाठी कातळावर ड्रिल, ब्लास्टिंग करून खड्डे बांधले गेले. पाण्याच्या नियोजनासाठी ठिबक सिंचनावर भर देण्यात आला. डोंगरावर फुलवण्यासाठी वड, पिंपळ, कडुनिंब, चिंच, गुलमोहोर अशा वृक्षांची निवड करण्यात आली.
शनिवार वाडा :-
पुण्यातील शनिवार वाडा खूप प्रसिद्ध आहे परंतू काय आपल्याला माहीत आहे की बाजीरावांच्या या महालात एका राजकुमारची आत्मा भटकतं असते. जवळपासच्या लोकांना त्यांच्या ओरडण्याची आणि रडण्याची आवाज ऐकू येते. शनिवारवाडा आपल्या या भुताटकी प्रकरणामुळे ही प्रसिद्ध आहे.
या महालाचा पाया 1730 साली शनिवारी ठेवण्यात आला असून त्या काळात 16, 110 रुपये लागत आली होती. या महालात एक हजाराहून अधिक लोक राहू शकत होते. 22 जानेवारी 1732 साली गृह प्रवेश करण्यात आले होते. नंतर यात एक काळे पान जुळले.
या महालात 30 ऑगस्ट 1773 ला रात्री 16 वर्षाचे नारायण राव, जे मराठा साम्राज्याचे पाचवे पेशवा बनले होते, त्यांची कट रचून हत्या केली गेली. जेव्हा खाटीक किल्ल्यात शिरले तेव्हा नारायण रावांनी धोक्याची चाहूल लागली आणि ते आपल्या खोलीतून पळाले. नारायण राव पूर्ण महालात “काका मला वाचवा”..... “काका मला वाचवा” असे ओरडत होते. परंतू त्यांना वाचवण्यासाठी कुणीही पुढे आलं नाही. नारायण रावांच्या काकांनी त्यांच्या हत्येचे षडयंत्र रचले होते असे लोकं म्हणायचे.
नारायण राव यांची आत्मा आजही या किल्ल्यात भटकत असते आणि त्यांचे शेवटले शब्द काका मला वाचवा हेही लोकांना ऐकू येतात. अंधारात हे महाल अजूनच भीतिदायक वाटतं. महालाच्या भीतींवर रामायण आणि महाभारत काळातील दृश्य बनलेले आहेत.
या महालाच्या पहिल्या मजलावर 17-18 शताब्दीच्या दरम्यानच्या काही वस्तू आणि मुरत्या ठेवलेल्या आहेत. या महालाचा एक मोठा भाग 1824 मध्ये जळाला होता.
शनिवार वाड्यात पाच दारं आहेत. जे दिल्ली दरवाजा, मस्तानी दरवाजा, खिडकी दरवाजा, नारायण दरवाजा आणि गणेश दरवाजा नावाने ओळखले जातात.
नळदूर्ग किल्ला :-
ऐतिहासिक पार्श्वभूमी : नळदूर्ग किल्ल्याचं संबंध पुराणकाळातील नल-दमयंतीशी जोडला जातो. नळ राजाने हा किल्ला बांधला. त्याच्या नावावरुन या किल्ल्यास नळदुर्ग हे नाव रुढ झाले. नळदुर्ग हा किल्ला राजा नळ याने आपल्या मुलासाठी बांधला याचा उल्लेख तारीख-ए-फरिश्ता या ग्रंथात आहे. त्यावरुन नळदुर्ग हे नाव रुढ झाले. आदिलशाही राजवटीत शहादुर्ग असे नाव ठेवण्यात आले. परंतू हे नाव प्रचलित होऊ शकले नाही.
नळदूर्ग हे ऐतिहासिक पार्श्वभूमीमुळे संस्मरणीय आहे. ऐतिहासिकदृष्ट्या या दुर्गाची नोंद इ.स. ५६७ पासून सापडते. चालुक्य राजा कीर्तीवर्मन याने इ.स. ५६७ मध्ये हा किल्ला नल राजवटीच्या ताब्यातून जिंकला होता. त्यानंतर अनेक राजघराण्यांनी राज्य केले. इ.स. १३५१ मध्ये नळदूर्ग किल्ला बहामनी राज्याच्या ताब्यात गेला. इ.स. १३५१ ते १४८० या काळात मातीच्या भिंतीऐवजी मजबूत दगडी तटबंदीचे बांधकाम करण्यात आले.
बहामनी राज्यांच्या विघटनानंतर इ.स. १४८२ मध्ये नळदुर्ग किल्ल्याचा समावेश विजापुरच्या आदिलशहाने त्याच्या राज्यात केला. इ.स. १६८६ साली औरंगजेबाने विजापुरची आदिलशाही नष्ट केली. त्यानंतर आदिलशाही राज्यातील नळदुर्गसह इतर किल्ले मुघल साम्राज्यात समाविष्ट केले. आसिफजहॉं (निजाम-उल-मुल्क) याने इ.स. १७२४ मध्ये दक्षिणेत सत्ता स्थापन केल्यानंतर नळदुर्ग किल्ल्याचे महत्व वाढले. इ.स. १७५८ मध्ये नानासाहे�� पेशव्यांनी हा किल्ला जिंकला होता. इ.स. १७९९ मध्ये निजामाने इंग्रजांबरोबर तह केला. त्यानुसार फ्रेंच सैनिकांऐवजी इंग्रजांचे सैनिक ठेवण्याचे ठरले. या तहाने इंग्रजांचे वर्चस्व हैद्राबादेत प्रस्थापित झाले आणि निजामाचे स्वातंत्र्य संपले.
निजामाने ईस्ट इंडिया कंपनीबरोबर १२ ऑक्टोबर १८०० रोजी तैनात फौजेचा तह करुन स्वत:च्या स्वातंत्र्याचे बलिदान केले. या तहाने हैद्राबाद संस्थानचे रुपांतर नेहमीसाठी संरक्षित राज्यामध्ये झाले. निजामाच्या वर्चस्वाखाली बसलेला मराठवाड्यातील उस्मानाबादचा प्रदेशही संरक्षित राज्याचा घटक बनला. हैद्राबाद राज्याला सन १८५० मध्ये ईस्ट इंडिया कंपनीच्या कवायती फौजेच्या पोटी ६४ लाख रुपयांचे कर्ज झालेले होते. या कर्जापोटी १८५३ मध्ये निजामाने तहान्वये वर्हाड, नळदुर्ग व रायचूर हे जिल्हे इंग्रजांना तोडून दिले. या सर्व जिल्ह्यांचे एकूण महसूली उत्पन्न ५० लाख रुपये होते. इ.स. १८५७ च्या उठावाच्या वेळी निजामाने इंग्रजांना प्रचंड सहाय्य केले. त्याचे बक्षीस म्हणून इ.स. १८५३ च्या तहात सुधारणा करुन १८६० चा तह करण्यात आला. त्यानुसार नळदुर्ग व रायचूर हे २१ लाख रुपये उत्त्पन्नाचे जिल्हे निजामास परत देण्यात आले. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर १९४८ साली भारत सरकारने निजामाविरुध्द पोलिस कारवाई करुन मराठवाडा भारतात समाविष्ट करुन घेतला.
,,http://www.maharashtracitynews.com/the-most-popular-tourist-destination-in-maharashtra/
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 08 September 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०८ सप्टेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
मराठा समाजातल्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत शासन निर्णय जारी;मात्र निर्णयात सुधारणा करून सरसकट प्रमाणपत्र देण्याची आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची मागणी
सर्वोच्च न्यायालयानं दाखवलेल्या त्रुटी दूर करून मराठा आरक्षणावर काम करत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी हिंगोली आणि बीड जिल्ह्यात कालही निदर्शनं
राज्यभरात काल दहीहंडीचा थरार;शाळांमधूनही बाळगोपाळांकडून दहीहंडी उत्साहात साजरी
सुमारे महिनाभराच्या खंडानंतर काल राज्याच्या अनेक भागात पावसाची हजेरी
आणि
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत रोहन बोपन्ना आणि मॅथ्यू एब्डेन जोडीचा अंतिम फेरीत प्रवेश
****
मराठा समाजातल्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला. मराठा समाजातल्या ज्या व्यक्तींनी मराठा-कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्राची मागणी केली असेल, त्यांना निजामाच्या काळातला महसुली अभिलेख, शैक्षणिक अभिलेख किंवा अन्य ठिकाणी वंशावळी कुणबी उल्लेख असेल, त्यांना हे प्रमाणपत्र द्यायला सरकारनं मंजुरी दिली आहे. अर्जदारानं सादर केलेल्या प्रमाणपत्रांची काटेकोर तपासणी करुन मराठा-कुणबी, किंवा कुणबी-मराठा हे जात प्रमाणपत्र दिलं जाईल.
मराठवाड्यातल्या मराठा समाजाला हे प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करण्याची, तसंच जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी, सरकारनं निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. या समितीला एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत.
****
माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी काल मनोज जरांगे पाटील यांची उपोषणस्थळी भेट घेऊन त्यांना शासन निर्णयाची प्रत दिली, तसंच त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. जरांगे पाटील यांनी मात्र, सरकारने काढलेल्या शासन निर्णयात सुधारणा करावी, अशी मागणी केली आहे. दुरुस्ती होईपर्यंत उपोषण मागे घेण्यास त्यांनी नकार दिला. त्यांच्या उपोषणाचा काल दहावा दिवस होता. वंशावळाच्या नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल, असं शासन आदेशात नमूद आहे, मात्र आमच्याकडे कुणाकडेही वंशावळीचे पुरावे नाहीत, त्यामुळे वंशावळीची अट रद्द करून, सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, असं ते म्हणाले.
मराठा आरक्षणसाठी राज्यभरात समाजबांधवांकडून सुरू असलेली आंदोलनं लोकशाही मार्गानं करावी असं आवाहनही जरांगे यांनी केलं आहे.
****
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं दाखवलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी काम करत असल्याचा पुनरुच्चार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते काल ठाणे इथं आनंद दिघे दहीहंडी सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर वार्ताहरांशी बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबध्द आहे, मात्र हे आरक्षण देत असतांना इतर समाजाच्या आरक्षणाला कुठंही धक्का लावला जाणार नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. देवेंद्र फडवणीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेलं आरक्षण उच्च न्यायालयानं देखील अंतिम केलं होतं. मात्र महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयात ते टिकू शकलं नाही, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
****
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मराठा समाजाच्या आरक्षणावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, तसंच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली. पवारांनी मुख्यमंत्री असताना या आरक्षणासाठी काय केलं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते काल सोलापूरमध्ये बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी मात्र कुणबी मराठा आरक्षणासंदर्भात धोरण स्पष्ट केलं असून, कुणबी मराठ्याचे पुरावे आहेत त्यांना दाखले देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मनोज जरांगे पाटील यांची मुख्य मागणी मुख्य मागणी पूर्ण केली असल्यानं त्यांनी विषय जास्ती ताणू नये, असं आवाहन विखे पाटील यांनी केलं.
****
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी काल हिंगोली आणि बीड जिल्ह्यात निदर्शनं करण्यात आली.
हिंगोली जिल्ह्यातल्या वसमत तालुक्यात कुरुंदा इथं सकल मराठा समाजाच्या स्मशानभूमीत उपोषण आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. यासंदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यासाठी आंदोलकांनी काल दुचाकी फेरी काढली. या उपोषणाला ग्रामस्थांनी पाठिंबा दिला आहे.
हिंगोली- वाशिम राष्ट्रीय महामार्गावर काल भर पावसात रास्तारोको आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्यात यावं, आंतरवाली सराटी इथं झालेल्या लाठीमारच्या घटनेची सखोल चौकशी करून जखमींना तत्काळ आर्थिक मदत करावी यासह इतर मागण्या��चं निवेदन पोलिस प्रशासनाला देण्यात आलं.
बीड शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ परिसरात तसंच धुळे -सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर महालक्ष्मी चौक परिसरात काल आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाच्या वेळी गेवराई दिशेनं बीड शहरात रुग्णवाहिका येत असल्याचं निदर्शनास येताच आंदोलनकर्त्यांनी काहीकाळ आंदोलन थांबवून रुग्णवाहिकेसाठी वाट मोकळी करुन दिली.
****
काँग्रेस पक्षानं रायपूरच्या महा अधिवेशनात जातीनिहाय जनगणनेचा ठराव संमत केला असून, आरक्षणाचा प्रश्न हा जातीनिहाय जनगणनेनं सोडवता येईल, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त काल नागपूरमध्ये जनसंवाद यात्रा काढण्यात आली. महागाई, बेरोजगारी या सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष करेल, असं पटोले यांनी सांगितलं. लातूर इथंही जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं भव्य अशी पदयात्रा काढण्यात आली. आमदार अमित देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले होते.
****
गोरगरीबांपर्यंत केंद्र सरकारच्या सर्व योजना घेऊन जाण्यासाठी वित्तीय क्षेत्रातल्या नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केंद्र सरकार करत असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये आयोजित एका चर्चासत्रात ते बोलत होते. जनधन, आधार आणि मोबाइल या त्रिसुत्रीमुळे लोकांच्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात बदल झाला, वित्तीय क्षेत्रातल्या तंत्रज्ञानामुळे दुर्गम आणि आदिवासी भागातल्या लोकांचं आयुष्य सुकर झाल्याचं ते म्हणाले. देशाला जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यात वित्तीय तंत्रज्ञान महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास कराड यांनी व्यक्त केला.
****
मेरी माटी मेरा देश, या महाअभियानाला राज्यभर मोठा प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाचे प्रदेश संयोजक राजेश पांडे यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. या अभियानात १५ सप्टेंबरपर्यंत बूथ स्तरावर प्रत्येक घरातून माती किंवा धान्य गोळा करण्यात येणार आहे. त्यानंतर ३१ ऑक्टोबरला दिल्लीमध्ये अमृत कलशांतील माती कर्तव्य पथावर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ बांधलेल्या अमृत वाटिकेत अर्पण केली जाणार आहे. याबरोबरच देशभरात गावागावात अमृतवाटिका उभारण्यात आल्या असून, शिलाफलकही लावण्यात आले असल्याचं, मोहोळ यांनी सांगितलं.
****
श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त काल राज्यभरात दहीहंडीचा थरार पहायला मिळाला. अनेक ठिकाणी पाऊस पडल्याने गोविंदांचा उत्साह द्विणुणित झाला होता.
मुंबईत यंदा दहीहंडी फोडताना थर कोसळून एकूण ३५ गोविंदा जखमी झाले. त्यापैकी चार जणांना रुग्णालयात दाखल केलं असून, नऊ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं. २२ गोविंदा बाह्य रुग्ण विभागात उपचार घेत असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं महानगर पालिका रुग्णालय प्रशासनानं सांगितलं आहे.
औरंगाबाद इथं ४८ ठिकाणी सार्वजनिक दहीहंडी उत्सव पार पडला. दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस लागली होती.
प्राथमिक शाळांमधूनही काल दहीहंडीचा सण उत्साहात साजरा झाला. राधा कृष्णांच्या वेशभुषेत आलेले बाळगोपाळ आणि गोपिका मोठ्या उत्साहाने या सोहळ्यात सहभागी झाले होते.
औरंगाबाद इथं जालना रस्त्यावर साकारल्या जात असलेल्या इस्कॉन मंदिरातही काल भजन, कीर्तन, महाप्रसादासह अनेक कार्यक्रम घेण्यात आले. भाविकांनी मोठ्या संख्येनं याचा लाभ घेतला.
****
राज्यातल्या अनेक भागात काल जवळपास महिनाभराच्या खंडानंतर पाऊस पडला.
औरंगाबाद शहर परिसरात काल दिवसभर ढगाळ वातावरण होतं आणि अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत होत्या. जालना शहरासह जिल्ह्यात काल पावसाची संततधार सुरु होती. धुळे जिल्ह्यातही काल सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. नवी मुंबई, नाशिक जिल्ह्यातही पाऊस झाल्यानं, खरीपातल्या पिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
येत्या दोन दिवसात राज्यातल्या सर्व विभागांमध्ये बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार, तर कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार मॅथ्यू एब्डेन यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपान्त्य फेरीच्या सामन्यात बोपन्ना - एब्डेन जोडीनं निकोलस माहुत आणि पियरे ह्यूजयुएस हर्बर्ट या फ्रेंच जोडीचा सात - सहा, सहा - दोन असा पराभव केला. अंतिम सामन्यात बोपन्ना - एब्डेन जोडीचा सामना जो सॅलिसबरी आणि राजीव राम या ब्रिटिश अमेरिकी जोडीसोबत होणार आहे.
****
४३व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी गंगापूर मतदारसंघाचे माजी आमदार, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य, लक्ष्मणराव मनाळ यांची निवड करण्यात आली आहे. आमदार सतीश चव्हाण यांनी काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर इथल्या मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्रीमुक्तानंद महाविद्यालयात दोन आणि तीन डिसे��बर रोजी हे संमेलन होणार आहे. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या पार्श्वभूमीवर हे संमेलन भव्य-व्यापक आणि ऐतिहासिक कसं होईल या दृष्टीनं स्वागतमंडळ प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. गंगापूर शहरात असा सांस्कृतिक-वैचारिक सोहळा पहिल्यांदाच होत असल्यानं तालुक्यातील साहित्यिक-सांस्कृतिक चळवळीला बळ देण्यास तो उपयुक्त ठरेल असंही चव्हाण यांनी नमुद केलं.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गाच्या प्रलंबीत कामांसाठी २२० कोटीहुन अधिकचा निधी मंजुर करण्यात आला आहे. याबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत. त्याचबरोबर उस्मानाबाद शहरात सर्व्हिस रोड, विद्युतीकरण आणि येडशी-सोनेगाव रस्त्यावर भुयारी मार्ग तयार करण्यासाठी जवळपास रुपये ११० कोटी निधी मंजूर केला आहे. या कामांमुळे अनेक गैरसोयी दूर होऊन जिल्हावासीयांसह महामार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असल्याचं आमदार पाटील यांनी म्हटलं आहे.
****
एअर कंडीशनरला पर्याय म्हणून उपयुक्त ठरणार्या उपकरणाची अथक संशोधनातून आणि प्रयोगातून निर्मिती करण्यात तुळजापूर इथले प्राध्यापक प्रदीप हंगरगेकर यांना यश आलं आहे. या संशोधनाला भारत सरकारने मान्यता मिळवून त्याबद्दलचं पेटंट त्यांना प्राप्त झालं आहे. हंगरगेकर यांनी इराण आणि इतर देशांमध्ये पूर्वापार वापरात येत असलेल्या पॅसिव्ह डाऊन ड्राफ्ट इव्हापोरेटिव्ह कुलिंग यंत्रणेचा अभ्यास करून आणि त्यातल्या सर्व त्रुटी अभियांत्रिकीच्या ज्ञानाद्वारे दूर करून अत्यंत उत्कृष्ट मॉडेल तयार केलं आहे. त्यावरती सलग तीन वर्षे कडक उन्हामध्ये प्रयोग करून परीक्षण करण्यात आलं. ही यंत्रणा अत्यंत कमी वीज वापरून शांतपणे आणि डिजिटल कंट्रोलद्वारे कार्यरत राहते.
****
मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव उपक्रमांमध्ये युवकांचा अधिकाधिक सहभाग व्हावा यावर प्राधान्यानं भर देणं आवश्यक असल्याचं, नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी म्हटलं आहे. ते काल यासंदर्भातल्या आढावा बैठकीत बोलत होते. सर्व विभागांनी महोत्सवासंदर्भातली जबाबदारी ओळखून कार्यक्रमाचं सुयोग्य नियोजन करावं, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी विविध शासकीय विभागांचा आढावा घेतला. गणेशोत्सव काळात गणेशोत्सव मंडळांना आवश्यक परवानग्या तातडीने मिळण्यासाठी, तसंच या काळात कायदा आणि सुव्य��स्था कायम राहण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. उदगीर तालुका क्रीडा संकुलामध्ये खेळाडुंना मुंबई, पुण्याच्या धर्तीवर क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी तयार करण्यात येत असलेल्या प्रस्तावाचा बनसोडे यांनी काल आढावा घेतला.
****
औरंगाबाद इथल्या सिध्दार्थ उद्यानामधल्या प्राणीसंग्रहालयातली पांढरी वाघीण अर्पितानं काल तीन बछड्यांना जन्म दिला. प्राणीसंग्रहालयातल्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाघीण आणि बछड्यांची तपासणी केली असून, त्यांची तब्येत उत्तम असल्याचं म्हटलं आहे. काल जन्मलेल्या तीन बछड्यांमुळे आता सिद्धार्थ उद्यानामध्ये पांढऱ्या वाघांची संख्या सहा झाली असल्याची माहिती उद्यान अधिकारी विजय पाटील यांनी दिली.
****
औरंगाबाद विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी डॉ. माधव सावरगावे यांची निवड करण्यात आली आहे. औरंगाबादमध्ये माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या विभागीय कार्यालयात काल अध्यक्ष निवडीची बैठक घेण्यात आली होती, त्यात निवडणूक प्रक्रियेद्वारे ही निवड करण्यात आली.
****
जनावरांमधल्या लंपी त्वचेच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यात गोवर्गीय पशुधनाचे खरेदी विक्रीसाठीचे बाजार पुढील आदेश येईपर्यत बंद ठेवण्याचे आदेश, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत. तसंच या सांसर्गिक रोगाची लागण म्हैसवर्ग, शेळी आणि मेंढयामध्ये होत नसल्याने त्यांचे खरेदी विक्रीचे बाजार नेहमीप्रमाणे सुरू राहतील, असं या आदेशात म्हटलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात कृषि विभागामार्फत उकिरडा मुक्त गाव मोहीम राबवण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत आत्मा अंतर्गत नोंदणीकृत शेतकरी गटामधल्या शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी ७५ टक्के अनुदानावर १९९ गांडूळ कल्चर युनिटचं लक्षांक प्राप्त झालं आहे. या योजनेचा शेतकरी गटांनी लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केलं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 25 September 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २५ सप्टेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
आगामी सणांसाठी स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचं अभियान गतिमान करावं-पंतप्रधानांचं आवाहन.
उद्यापासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवासाठी सर्वत्र जय्यत तयारी.
मराठवाडा रेल्वे विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांचं निधन.
आणि
अतिवृष्टीतून वगळलेल्या सर्व शेतकऱ्यांना १५ दिवसांत नुकसान भरपाई देण्याचं आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचं आश्वासन.
****
आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक उत्पादनांच्या खरेदीचं अभियान गतिमान करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. आकाशवाणीवरच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमात देशवासियांना संबोधित करतांना आज ते बोलत होते. दोन ऑक्टोबरला गांधी जयंती आणि आगामी सणांच्या निमित्ताने खादी, स्थानिक हातमाग, हस्तकलेसह स्थानिक उत्पादनांच्या खरेदीवर जनतेनं भर दिला पाहिजे, असं सांगत, जनतेनं देशी उत्पादनांची विक्रमी खरेदी करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी केलं.
जनतेनं प्लास्टिक वगळता अन्य साहित्यापासून बनवलेल्या पिशव्यांचा वापर करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं. देशात कापडी, सुती, काथ्या आणि केळीच्या तंतूपासून तयार करण्यात येणाऱ्या पारंपारिक पिशव्यांचा वापर वाढत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
दिव्यांगांसाठी विकसित करण्यात आलेल्या ब्रेल लिपी या भारतीय सांकेतिक भाषेबद्दल आणखीन जागरुकता वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. ७५ दिवस चाललेल्या ‘सुरक्षित सागर’ या मोहिमेची सांग़ता गेल्या १७ तारखेला, सागरी किनारा स्वच्छता दिनी झाली. या मोहिमेत लोकसहभागातून दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधानांनी सर्वांचं अभिनंदन केलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व प्रकल्पांना गती मिळणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांच्या मेळाव्यात ते आज मुंबईत बोलत होते. माथाडी कामगार महामंडळाने आपल्या कार्यकाळात ५० हजार उद्योजक तयार केले, असेच उद्योजक यापुढेही तयार व्हावेत यासाठी उद्योजक कर्जात वाढ करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
****
केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे उद्या औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तापडिया नाट्य मंदिरात आयोजित ‘एक लक्ष वृक्ष लागवड उपक्रमाच्या गौरव सोहळ्या’ला ते उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी साडे सहा वाजता विमानाने ते मुंबईकडे प्रयाण करतील.
****
औरंगाबाद मध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी मुंबईच्या धर्तीवर हॉप ऑन हॉप ऑफ बससेवा सुरू करण्याची चाचपणी करण्याची सूचना पर्यटन विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केली आहे. औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनतर्फे आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत ते बोलत होते. औरंगाबादच्या पर्यटन प्रचारासाठी संस्थेची नेमणूक करणं, पर्यटनावर लघुपट महोत्सव आयोजित करणं, नव्या विमान सेवा सुरू करणं, विद्यार्थ्यांना पर्यटनाचे धडे देणं, पर्यटनाशी संबंधित छोटे छोटे अभ्यासक्रम तयार करणे, जायकवाडी इथं बोट क्लब तयार करणं आदी विषयांवर पर्यटन मंत्री लोढा यांच्यासोबत यावेळी चर्चा झाली.
****
हैदराबाद मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त औरंगाबाद इथल्या देवगिरी किल्ल्यावर आज सकाळी सात वाजता हेरिटेज वॉक आणि स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. स्वातंत्र्य सैनिकांनी निजामाच्या सैन्याला चकवा देऊन किल्ल्यावर तिरंगा फडकवला, त्याचा रोमांचक इतिहास जाणून घेण्याची संधी या मोहिमेत सहभागी झालेल्या नागरिकांना मिळाली.
****
शारदीय नवरात्रोत्सवाला उद्यापासून प्रारंभ होत आहे. मराठवाड्यात आदिशक्तीच्या साडे तीन शक्तिपीठांपैकी माहूर इथं रेणुका माता, तुळजापूर इथं तुळजाभवानी तसंच ��ंबाजोगाई इथल्या योगश्वरी देवीसह सर्वच ठिकाणच्या देवी मंदिरांमध्ये शारदीय नवरात्रोत्सवाची जोमानं तयारी सुरु आहे.
तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या मंचकी निद्रेची उद्या सांगता होऊन पहाटे देवी सिंहासनारूढ होईल, दुपारी १२ वाजता घटस्थापना होणार असून, येत्या १० ऑक्टोबरपर्यंत विविध विधी, होमहवनादी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिली.
घटस्थापनेनिमित्त उद्या सोलापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शासकीय सुटी जाहीर केली आहे.
नांदेड जिल्ह्यात माहूर इथं भाविकांच्या सुविधेसाठी देवस्थानच्या वतीनं चोख व्यवस्था करण्यात आली आहे.
अंबाजोगाई इथं उद्या सकाळी ९ वाजता घटस्थापना आणि महापूजा होऊन योगेश्वरी देवीच्या नवरात्रोत्सवास सुरुवात होणार आहे. सकाळी सहा ते रात्री ११ वाजेपर्यंत भाविकांना देवीचं थेट दर्शन घेता येणार आहे. सकाळी ६ ते दुपारी ११ वाजेपर्यंत देवीस अभिषेक करता येणार आहेत. महोत्सवाच्या कालावधीत दररोज संगीत भजन, गायन कीर्तन, जगदंबेचा गोंधळ होणार आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या दौलताबादजवळील शरणापूरच्या भांगसी माता गड तसंच कर्णपुरा देवीच्या नवरात्रोत्सवाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यातही नवरात्रोत्सवाची तयारी सुरु असून उत्सवादरम्यान ठेवल्या जाणाऱ्या बंदोबस्तासंदर्भात आज पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
****
मराठवाडा रेल्वे विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश वर्मा यांचं आज औरंगाबाद इथं निधन झालं, ते ७५ वर्षांचे होते. मराठवाड्यात रेल्वे सेवेच्या विकासासाठी त्यांनी जवळपास चार दशकं अविरत योगदान दिलं. त्यांच्या प्रयत्नामुळे मराठवाड्यातून अनेक रेल्वेगाड्या कायमस्वरुपी तर अनेक रेल्वेगाड्या तात्पुरत्या स्वरुपात विविध मार्गांवर धावत आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा संशोधन संस्थेचा २०२० चा ‘पद्मविभूषण गोविंदभाई श्रॉफ स्मृती पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात आला होता. वर्मा यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी औरंगाबाद इथं अंत्यसंस्कार करण्यात आले.
****
येत्या पंधरा दिवसांच्या आत अतिवृष्टीतून वगळलेल्या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम दिली जाईल, असं आश्वासन आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलं आहे. सोलापूर जिल्ह्यात बार्शी-लातूर मार्गावर आज शेतकरी संघटनेच्या आंदोलकांशी सावंत बोलत होते. अतिवृष्टीतून वगळलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि पिकविम्याची अग्रीम रक्कम मिळण्यासाठी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या मार्गावर आंदोलन करण्यात आलं. सावंत यांनी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तूर्तास मागे घेत असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं.
****
अन्य राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील जनावरांचा लम्पी आजार नियंत्रणात असल्याचं पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज नांदेड इथं बोलत होते. राज्यातील ३० जिल्ह्यात या आजाराचा पशुधनात शिरकाव झाला आहे, मात्र पशुपालकांनी, शेतकऱ्यांनी घाबरून न जाता शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे आपल्या स्तरावर काळजी घ्यावी, असं आवाहन विखे-पाटील यांनी केलं. लम्पी आजारामूळे ज्या पशुपालकांनी आपली जनावरं गमावली आहेत त्यांच्यासाठी शासनातर्फे अर्थसहाय्य केले जात आहे. याव्यतिरिक्त जिल्हा परिषदेलाही सानुग्रह अनुदान देण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत, असं विखे-पाटील यांनी सांगितलं.
****
कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नसल्याच्या निषेधार्थ घरेलू मोलकरीण कामगार संघटना नवरात्रोत्सवात नवदुर्गा जागर आंदोलन करणार आहे. क्रांती असंघटित कामगार संघटनेच्या माध्यमातून हे आंदोलन केलं जाणार आहे. संघटनेच्या अध्यक्षा अनिता कोंडा यांनी अहमदनगर इथं सहाय्यक कामगार आयुक्त नितीन कौले यांना या आंदोलनाची नोटीस तसंच घरेलू मोलकरीण कामगारांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळण्याच्या मागणीचं निवेदन सादर केलं. उद्या घटस्थापनेला सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या स्वच्छतेने या आंदोलनाची सुरुवात होणार आहे. त्यानंतर नवमीपर्यंत दररोज वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन केलं जाणार आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 September 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १७ सप्टेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
हैदराबाद मुक्तिदिन-अमृत महोत्सवी सोहळ्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन; मराठवाड्यात सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी मुक्तिदिन साजरा.
मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्न आणि पायाभूत सुविधांचा नियमित आढावा घेणार-मुख्यमंत्र्यांचं आश्वासन.
औरंगाबाद इथं आयटीआय प्रशिक्षण संस्थेत दोन दिवसीय महारोजगार मेळाव्याला प्रारंभ.
आणि
माजी केंद्रीय गृहमंत्री माणिकराव गावित यांचं वृद्धापकाळानं निधन.
****
हैदराबाद मुक्ति संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाला आजपासून आरंभ झाला. सिकंदराबाद इथल्या संचलन मैदानावर आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हैदराबाद मुक्तिदि���-अमृत महोत्सवी सोहळ्याचं उद्घाटन झालं. मुक्तिलढ्यात योगदान देणाऱ्या विविध वीरांचं स्मरण करून शाह यांनी त्यांना आदरांजली वाहिली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर नेते तसंच स्वातंत्र्यसैनिक यावेळी उपस्थित होते.
मराठवाड्यात ठिकठिकाणी आज ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी मुक्तिदिवस साजरा करण्यात आला. औरंगाबाद इथं सिद्धार्थ उद्यानात मुक्तिसंग्राम स्मारक परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्याला विकासाची गती पकडायची असून, या विभागाच्या विकासाचे प्रश्न आणि पायाभूत सुविधांचा नियमित आढावा घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलं. ते म्हणाले –
मराठवाड्याच्या या पवित्र भूमीचे मला नेहमीच कुतुहल वाटले आहे. मराठवाड्यात संतांचे संस्कार आहेत, मेहनती तरुण वर्ग आहे, वाढणारे उद्योग आहेत, पर्यटनाला भरपूर संधी आहे, तरी आपल्याला विकासाची गती पकडायची आहे. इथले विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच संपूर्ण मराठवाड्यातला पायाभूत सुविधांचा मुख्यमंत्री वॉर रुम मधून नियमित आढावा देखील घेतला जाईल, असे शब्द देखील आपल्याला मी याठिकाणी देऊ इच्छितो.
विविध विकास कामांची मुख्यमंत्र्यांनी यावेळी घोषणा केली. औरंगाबाद ते अहमदनगर रेल्वेमार्गाचं भूसंपादन, मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेत नांदूर मधमेश्वर प्रकल्पातल्या चार धरणांचा समावेश करुन अखंड जलवाहिनीद्वारे पाणी उपलब्धता, जालना जिल्ह्यात अंबड इथं भुयारी गटार योजना तसंच बदनापूर इथं नविन बसस्थानक उभारणं, परभणी शहरासाठी पाणी पुरवठा योजनेला मंजुरी, हिंगोली इथं ��ळद संशोधन केंद्रासाठी जागेची उपलब्धता, नांदेड जिल्हा क्रीडा संकुलासाठी जागेची उपलब्धता, नांदेड महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनासाठी तरतूद, बीड इथं सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारत बांधकाम १४२ कोटी रुपये निधी, लातूर जिल्हा सामान्य रुग्णालयासाठी जागेची उपलब्धता तसंच विमानतळासाठी अतिरिक्त भूसंपादनाची तरतूद, आदी कामांची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक विजेता धावपटू अविनाश साबळे याचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते ३० लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला.
****
जालना इथं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. सत्तार यांनी स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. माजीमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उस्मानाबाद इथं आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. मुक्तिसंग्रामात उस्मानाबाद जिल्ह्याचं योगदान मोठं असल्याचं सावंत यांनी नमूद केलं. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पावसाने नुकसान झाल्यामुळे पूर्वीपेक्षा दुप्पट मदत दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं.
हिंगोली इथं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. निजामाच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्यांच्या कुटुंबीयांची मुनगंटीवार यांनी भेट घेतली.
परभणी इथं सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. भाषा, संस्कृती, धार्मिक स्वातंत्र्य, सामाजिक आणि राजकीय हक्क प्राप्तीसाठी मराठवाड्यातल्या जनतेने जो त्याग केला, तो सुवर्ण अक्षरांनी लिहावा असाच आहे, असे गौरवोद्गार सावे यांनी काढले.
बीड इथं रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. ध्वजारोहणानंतर भुमरे यांनी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे नातेवाईक यांना भेटून शुभेच्छा दिल्या. हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून त्यांनी आदारांजली वाहीली.
नांदेड इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली झालेला हा मुक्ती लढा हा सर्वार्थाने व्यापक लढा आहे, असं फडणवीस म्हणाले. मराठवाड्याच्या विकासाच्यादृष्टीने गेल्या काही वर्षांपासून आपण प्रयत्न करत असून अजून खूप काम करावं लागेल असं फडणवीस यावेळी म्हणाले.
लातूर इथं कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. स्वातंत्र्य सैनिक कालिदास देशपांडे यांच्या दैनंदिनीवर आधारित 'हैद्राबाद मुक्ती संग्राम आणि मी' तसंच प्राध्यापक चंद्रशेखर लोखंडे लिखित मराठवाड्याचा मुक्ती लढा आणि हैद्राबाद संस्थान या पुस्तकांचं प्रकाशनही यावेळी खाडे यांच्या हस्ते करण्यात आलं.
****
उद्योजकता, अॅप्रेंटीस विभागाअंतर्गत औरंगाबाद इथं आयटीआय प्रशिक्षण संस्थेच्या आवारात दोन दिवसीय महारोजगार मेळाव्याला आजपासून प्रारंभ झाला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि कौशल्यविकास आणि पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या ��ेळाव्याचं उद्घाटन झालं. नवीन सरकारनं राज्य बेरोजगार मुक्त करायचा सं��ल्प केला असून, आज औरंगाबादेत याची सुरुवात झाली. या महारोजगार मेळाव्यात किमान ५००० युवकांना नोकरी मिळेल असा विश्वास कौशल्यविकास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी यावेळी बोलताना देशात रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या अधिका अधिक संधी निर्माण व्हाव्यात, यासाठी केंद्र सरकार विविध योजना आखत असल्याचं सांगितलं.
****
माजी केंद्रिय गृहमंत्री माणिकराव गावित यांचं वृद्धापकाळानं आज निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. गावित यांनी संसदेत नऊ वेळा खासदर पद भूषवलं असून ते काहीकाळ देशाचे गृहमंत्री होते. माणिकराव गावित यांच्या पार्थिव देहावर उद्या नवापूर इथं अंतिम संस्कार होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गावित यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आदिवासी, ग्रामीण भागाचा सच्चा लोकप्रतिनिधी म्हणून देशभर लौकीक असलेले प्रगल्भ असं मार्गदर्शक नेत्रृत्व गमावलं असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
****
प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियानात लोकसहभाग वाढवावा आणि क्षयमुक्त भारताचं उद्दिष्ट यशस्वी करावं, असं आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं आहे. प्रधान मंत्री क्षयमुक्त भारत अभियान, निक्षय मित्र सत्कार समारंभ आणि पोषण आहार वितरण सोहळा आज मुंबईतल्या राजभवनात झाला, त्यावेळी कोश्यारी बोलत होते. भारतातून २०२५ पर्यंत क्षय रोग हद्दपार करण्याचं उद्दिष्ट आखण्यात आल्याचं कोशारी म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर परिसरातल्या रस्त्यांच्या कामाचे प्रश्न, कृषी उत्पन्न बाजार समितीतल्या मालाच्या लिलावाची मागणी, पिक विमा या मागण्यासाठी आज सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. आंदोलकांनी यावळी दीड तास नांदेड- हिंगोली महामार्ग रोखून धरला होता. तहसिलदारांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 September 2022 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १७ सप्टेंबर २०२२ दुपारी १.०० वा. ****
मराठवाड्याला विकासाची गती पकडायची असून, या विभागाच्या विकासाचे प्रश्न आणि पायाभूत सुविधांचा नियमित आढावा घेणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त आज औरंगाबाद इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुक्तिसंग्राम स्मारक परिसरात मुख्य शासकीय ध्वजारोहण केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले –
मराठवाड्याच्या या पवित्र भूमीचे मला नेहमीच कुतुहल वाटले आहे. मराठवाड्यात संतांचे संस्कार आहेत, मेहनती तरुण वर्ग आहे, वाढणारे उद्योग आहेत, पर्यटनाला भरपूर संधी आहे, तरी आपल्याला विकासाची गती पकडायची आहे. इथले विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी तसेच संपूर्ण मराठवाड्यातला पायाभूत सुविधांचा मुख्यमंत्री वॉर रुम मधून नियमित आढावा देखील घेतला जाईल, असे शब्द देखील आपल्याला मी याठिकाणी देऊ इच्छितो.
विविध विकास कामांची मुख्यमंत्र्यांनी यावेळी घोषणा केली. औरंगाबाद ते अहमदनगर रेल्वेमार्गाचं भूसंपादन, क्रीडा विद्यापीठ, घृष्णेश्वर मंदिर विकास कामासाठी १५७ कोटी, पैठण इथल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास, जालना जिल्ह्यात अंबड इथं भुयारी गटार योजना, जाफ्राबादसाठी पाणी पुरवठा योजनेला मंजुरी, हिंगोली इथं श्री क्षेत्र औंढा नागनाथ मंदिराचा विकास, नांदेड महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनासाठी तरतूद, लातूर विमानतळासाठी अतिरिक्त भूसंपादनाची तरतूद, रस्ता दुरुस्ती निधी, आदी कामांचा यात समावेश आहे. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत राज्याच्या १२ हजार कोटी रुपये निधीच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
बर्मिंगहम इथं झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला रौप्य पदक मिळवून देणाऱ्या आंतरराष्ट्रीय धावपटू अविनाश साबळे याचा मुख्यमंत्र्याच्या हस्ते ३० लाख रुपायंचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं हैदराबाद मुक्तीसंग्राम लढ्यातील योद्ध्यांची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचं उद्घाटनही यावेळी झालं.
जालना इथं कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजरोहण झालं. यावेळी बोलताना सत्तार यांनी, मराठवाड्यातल्या जनतेला मुक्तिसंग्रामाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यसैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. माजीमंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड, पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यावेळी उपस्थित होते.
उस्मानाबाद इथं आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. मराठवाडा मुक्तिसंग्रामात उस्मानाबाद जिल्ह्याचं योगदान मोठं असल्याचं सावंत यांनी नमूद केलं. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि पावसाने नुकसान झाल्यामुळे पूर्वीपेक्षा दुप्पट मदत दिली जात असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, आमदार राणाजगजितसिंह पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर उपस्थित होते.
हिंगोली इथं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी प्राणाची आहुती दिलेल्या ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून त्यांच्या कुटुंबीयांना त्यांनी मानवंदना दिली.
नांदेड इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, परभणी ��थं सहकार मंत्री अतुल सावे, बीड इथं रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे तर लातूर इथं कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं.
****
प्रकल्प चित्ता अंतर्गत, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेशातल्या ‘कुनो राष्ट्रीय उद्याना’त नामिबियातून आणलेले चित्ते सोडले. जंगली चित्त्यांचं पुनर्वसन करणारा हा प्रकल्प जगातला अशा स्वरूपाचा पहिला आंतरखंडीय प्रकल्प आहे. भारतातील वन्यजीव आणि त्याच्या अधिवासाचं पुनरुज्जीवन आणि त्यात वैविध्य आणण्याच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांचा हा प्रकल्प एक भाग आहे.
****
भारतीय जनता पक्षाच्या सेवा पंधरवड्याला आजपासून प्रारंभ झाला. आज १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीपर्यंत चालणाऱ्या या पंधरवड्यात, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, दिव्यांगांना मदत, मोदी सरकारच्या कामाची माहिती देणारी प्रदर्शने, वैचारिक चर्चा असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.
****
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचं आज नाशिक इथल्या रुग्णालयात अल्पशा आजारानं निधन झालं, ते ८७ वर्षांचे होते. १९६५ साली धुळे जिल्ह्यातल्या नवापूर ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्दिला सुरुवात झाली. १९७१ ते १९७८ पर्यंत ते धुळे जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती होते. १९८० साली ते नवापूरचे आमदार झाले, तर १९८१ साली खासदार झाले. त्यानंतर गावित हे नऊ वेळा खासदार म्हणून निवडून आले. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात गावित यांनी केंद्रीय गृह राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. त्यांच्या पार्थिवावर उद्या नवापूर इथं अंत्यसंस्कार होणार आहेत.
****
जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या प्रणव आनंदनं १६ वर्षाखालील, तर ए आर इलमपार्थी यानं १४ वर्षांखालील गटात अजिंक्यपद पटकावलं आहे. अग्रमानांकित प्रणव आनंद यांनं ११ फेऱ्यांमध्ये नऊ गुण मिळवले. या विजयानंतर तो भारताचा ७६ वा ग्रँडमास्टर ठरला आहे. इलमपार्थी यानं ११ फेऱ्यांमध्ये साडेनऊ गुण मिळवले.
****
0 notes
Text
जिल्ह्याचा सर्वांगीन विकासासाठी शासन कटिबद्ध - आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत - महासंवाद
जिल्ह्याचा सर्वांगीन विकासासाठी शासन कटिबद्ध – आरोग्यमंत्री डॉ.तानाजीराव सावंत – महासंवाद
उस्मानाबाद,दि.17(जिमाका):- हैदराबाद संस्थान निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त करण्याच्या लढ्याचे नेतृत्व करणारे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जिवितकार्याची पायाभरणी आपल्या जिल्ह्यातील हिपरग्याच्या राष्ट्रीय शाळेत झाली, याची आजच्या दिनानिमित्ताने आपल्याला आठवण येणे स्वाभाविक आहे. स्वामीजींच्या नेतृत्वाखाली निजाम राजवटीच्या गुलामगिरीविरुध्द लढा देण्यात आला. त्यात आदरणीय गोविंदभाई श्रॉफ, बाबासाहेब…
View On WordPress
0 notes
Text
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार - कृषीमंत्री अब्दुल सत्तार - महासंवाद
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव विविध उपक्रमांनी साजरा केला जाणार – कृषीमंत्री अब्दुल सत्तार – महासंवाद
जालना, दि. 17 (जिमाका):- निजामाच्या जुलमी राजवटीतून मराठवाडा मुक्त होऊन आज 17 सप्टेंबर रोजी आपण 75 व्या अमृत महोत्सवी वर्षात प्रवेश करत आहोत. संपूर्ण वर्षभर विविध उपक्रमांनी हा अमृत महोत्सव साजरा करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथे आज मुख्य शासकीय ध्वजारोहण कृषी मंत्री अब्दुल सत्तार…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 September 2022 Time 07.10 AM to 07.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १७ सप्टेंबर २०२२ सकाळी ७.१० मि. ****
ठळक बातम्या
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाला प्रारंभ; औरंगाबाद इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण
बँक कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी स्थानिक भाषेत बोलण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांची सूचना
भाजपच्या सेवा पंधरवड्याला आजपासून सुरुवात;दोन ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रमांचं आयोजन
शालेय विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा अतिभार असू नये-शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर
आणि
औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा-वेरुळसह देवगिरी किल्ल्याचा समावेश असलेलं टुरिस्ट सर्किट-पर्यटन मंत्र्यांची घोषणा
सविस्तर बातम्या
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद प्रांत निजामाच्या जोखडातून मुक्त होऊन स्वतंत्र भारतात विलीन झाला. आज ७५ वा मुक्तिसंग्राम दिन साजरा होत आहे. या निमित्तानं, सिकंदराबाद इथल्या परेड मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते ध्वजारोहण होत असून, वर्षभर चालणाऱ्या हैदराबाद मुक्तिदिन समारोहाचं गृहमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.
औरंगाबाद इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुक्तिसंग्राम स्मारक परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आत्ता थोड्यावेळापूर्वी मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केलं. पोलिस दलाच्या वतीनं हवेत बंदुकीच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली. यावेळी केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी मुक्तिसंग्रामातल्या ज्ञातअज्ञात वीरांना आदरांजली वाहिली.
नांदेड इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, जालना इथं कृषी मंत्री अब्दुल सत्तार, परभणी इथं सहकार मंत्री अतुल सावे, बीड इथं, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे तर लातूर इथं कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होत आहे.
दरम्यान, स्वराज्यासाठी संघर्ष करण्याच�� प्रेरणा आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळाली, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. औरंगाबाद इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल अनावरण झालं, त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाच्या विविध विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. राज्यात ७५ हजार रिक्त जागांची भरती करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली.
मंत्रिमंडळातले सदस्य संदिपान भुमरे, उदय सामंत, अतुल सावे, अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, हैदराबाद मुक्तिलढा हे स्वातंत्र्यलढ्यातलं सुवर्णपान असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला आहे . मुक्तिसंग्राम दिन अमृत महोत्सव समितीच्या वतीनं घेण्यात आलेल्या विभागीय परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. मुक्तिलढ्यातल्या स्वातंत्र्यसैनिकांचा मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या आसनापर्यंत पोहोचून सत्कार केला.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात नांदेड इथले प्राध्यापक बालाजी चिरडे यांचं व्याख्यान होणार आहे. लातूर इथं जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांच्या संकल्पनेतून १९ ते २६ सप्टेंबर दरम्यान, व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं आहे. जिल्ह्यातल्या विविध महाविद्यालयांमध्ये ही व्याख्यानं होणार आहेत.
‘हैद्राबाद मुक्ती संग्राम: मराठवाड्याचा रोमहर्षक स्वातंत्र्यलढा!’ या माहितीपटाचं आज माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवरून थेट प्रसारण केलं जाणार आहे. आज सायंकाळी पाच वाजता हे प्रसारण होईल. या माहितीपटाचं दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी, लेखन अजित दळवी यांनी, तर निवेदन विनय आपटे यांनी केलेलं आहे.
****
अंबाजोगाई इथल्या ऐतिहासिक शहा बुरुजावर मराठवाडा जनता विकास परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीनं झेंडावंदन होणार आहे. स्वातंत्र्यसैनिक श्रीनिवास खोत यांनी १९४२ च्या आंदोलनात या बुरुजावरचा निजामाचा रेडिओ उध्वस्त केला होता. ढासळत असलेल्या या बुरुजाची स्थानिक प्रशासनाच्या मदतीने साफसफाई करून, तात्पुरत्या पायऱ्या उभारण्यात आल्या आहेत. सायंकाळनंतर हा बुरूज तिरंगी प्रकाशात न्हाऊन निघतो आहे. सर्वसामान्य नागरिकांना हा इतिहास माहिता व्हावा, आणि या बुरुजासह अशा ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन व्हावं, या हेतूनं या बुरुजावर ध्वजारोहणाचा निर्णय घेतल्याचं, मराठवाडा जनता विकास परिषदेच्या अंबाजोगाई शाखेचे अध्यक्ष डॉ नरेंद्र काळे यांनी सांगितलं. ते म्हणाले...
निजामाचं एक महत्वाचं लष्करी तळ अंबाजोगाईला होतं. आणि निजामाच्या दिमतीला ��्हणून ब्रिटीशांचे ५०० सैनिक अंबाजोगाईला होते. त्याच काळामध्ये सरकारने त्या बुरूजावर एक रेडिओ बसवला. या रेडिओवरून त्या सैनिकांना पण युध्दाच्या बातम्या दिल्या जायच्या. इतर काही आदेश जनतेला द्यायचे असतील तर निजाम त्या माध्यमातून द्यायचे. पण जेव्हा चले जाव आंदोलन चालू झालं १९४२ ला, त्या काळामध्ये श्रीनिवास खोत हे तसं बघितलं तर शाळकरी विद्यार्थीच होते तेव्हा, त्यांच्याबरोबर भालेराव, दडके, पवार अशी काही मित्रमंडळी होती. दोर बांधून वर गेले श्रीनिवास खोत. आणि त्यांनी तो रेडिओची तोडफोड केली आणि खाली फेकून दिला. आणि ते स्टेशन उध्वस्त केलं. म्हणून नवीन पिढीला हा सर्व इतिहास समजला जावा त्याचबरोबर या बुरूजाचं संवर्धन पुढील काळामध्ये व्हावं, हा देखील विषय आम्ही याच्या माध्यमातून पाठपुरावा करणार आहोत.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मुक्ती संग्राम लढ्यात अनेक ज्ञात - अज्ञात लोकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. या सर्व हुतात्म्यांना राज्यपालांनी आदरांजली अर्पण केली.
****
भारतीय जनता पक्षाच्या सेवा पंधरवड्याला आजपासून प्रारंभ होत आहे. आज १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून दोन ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीपर्यंत चालणाऱ्या या पंधरवड्यात, स्वच्छता अभियान, आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, दिव्यांगांना मदत, मोदी सरकारच्या कामाची माहिती देणारी प्रदर्शने, वैचारिक च��्चा असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत काल नागपूर इथं अधिक माहिती दिली. पर्यावरणाच्या रक्षणाची जाणीव होण्यासाठी वृक्षारोपण कार्यक्रम तसंच जलाशय स्वच्छता अभियानही या दरम्यान राबवण्यात येणार असल्याचं बावनकुळे यांनी सांगितलं.
****
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचं प्रतिपादन, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. मुंबईत काल लघु उद्योग भारती 'प्रदेश अधिवेशन २०२२' या परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर त्या बोलत होत्या. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यावेळी उपस्थित होते. केंद्र सरकार हमी घेत असल्यानं बँकेच्या माध्यमातून उद्योगाला मदत मिळत असल्याचं, डॉ कराड यांनी यावेळी सांगितलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात मार्गदर्शन केलं. भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन करण्यासाठी महाराष्ट्राला एक ट्रिलियन व्हावं लागेल, असं ते म्हणाले. पुढच्या दोन वर्षात महाराष्ट्राला गुजरातच्या पुढे नेणार असल्याचा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.
दरम्यान, बँकेच्या शाखांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषांमध्ये बोलावं, ग्राहकांना विशिष्ट भाषेमध्ये बोलण्याचा आग्रह करू नये, अशी सूचना, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. काल मुंबईत भारतीय बँक संघटनेच्या ७५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या बोलत होत्या. ज्या कर्मचाऱ्यांना स्थानिक भाषा येत नसेल, त्यांना बँकेच्या शाखेमध्ये ग्राहकांशी संबंध येणार नाही अशी कामं देण्याच्या सूचना अर्थमंत्र्यांनी यावेळी केल्या.
बँकेच्या तंत्रज्ञानातही सामंजस्य आणावं, बँका तसंच कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक डिजिटल सॅवि व्हावं, महिलांना बिझनेस करस्पॉडन्ट होण्याची संधी द्यावी, व्यवसाय वाढवताना युवकांच्या गरजांकडे अधिक लक्ष द्यावं, आदी सूचनाही सीतारामन यांनी केल्या.
****
चित्ता प्रकल्पाअंतर्गत मध्य प्रदेशातल्या कुनो राष्ट्रीय अभयारण्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत चित्ते सोडले जाणार आहेत. १९५२ पासून भारतात लुप्त झालेला चित्त्यांना भारतात स्थान मिळवून देण्याच्या उद्देशानं हा प्रकल्प राबवला जात आहे. देशातल्या वन्यजीव आणि त्याच्या अधिवासाचं पुनरुज्जीवन आणि वैविध्य आणण्याच्या पंतप्रधानांच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. नामिबियासोबत सामंजस्य करार करून हे चित्ते आणण्यात आले आहेत.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार काँग्रेस पक्षाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू दिले नाहीत, असा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांनी केला आहे. ते काल अमरावती इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस मित्र पक्षांना संपवण्याचा काम करत आहे. काँग्रेसने आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक द्यावी, अन्यथा काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी आम्ही योग्य पर्याय निवडू, असा इशारा डॉ गवई यांनी दिला आहे.
****
शालेय विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा अतिभार असू नये, विद्यार्थ्यांना गृहपाठाची गरज भासणार नाही, अशा एकाग्रतेने शाळेत अध्यापन व्हावं, असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. गृहपाठ बंद करण्यासंदर्भात काल पत्रकारांशी बोलताना केसरकर यांनी, शिक्षक संघटना तसंच संस्था चालकांशी बोलणार असल्याचं सांगितलं. गृहपाठ ही शिक्षकांसाठी पळवाट असू नये, असंही त्यांनी नमूद केलं. ते म्हणाले...
माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की मुलांना ओव्हर बर्डन करू नये. त्यांच्या मेंदूचा विकास व्हायला दिला पाहिजे. आणि दुसरं होमवर्क ही पळवाट सुद्धा असता कामा नये टीचर्ससाठी. आपण अर्धातास जे शिकवतो, तेवढं कॉन्सन्ट्रेशन करून शिकवलं पाहिजे. की मुलांना होमवर्क करण्याची आवश्यकता राहता कामा नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. पण हे मी टीचर्स ज्या असोसिएशन्स आहेत, त्यांच्याशी बोलेन. संस्थाचालकांशी बोलेन. आणि नंतर त्याच्यावर निर्णय घेईन.
****
राज्यात लंपी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल, तसंच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची 'ड्रग्ज बँक' देण्यात येईल, असं आश्वासन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं आहे. ते काल पशुसंवर्धन आय��क्तालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. राज्यासाठी एका आठवड्यात ५० लाख लस मात्रा उपलब्ध होणार आहेत. लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यक आणि पशुवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार असल्याचं विखेपाटील यांनी सांगितलं.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे ६९७ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ८१ लाख १४ हजार ३०९ झाली आहे. काल या संसर्गानं दोन रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४८ हजार ३०४ इतकी झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८२ शतांश टक्के आहे. काल ९८४ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७९ लाख ६१ हजार २८२ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९८ पूर्णांक ११ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या चार हजार ७२३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ४१ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यातल्या १४, लातूर दहा, औरंगाबाद आठ, जालना चार, नांदेड तीन, तर परभणी आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात अजिंठा-वेरुळसह दौलताबादच्या देवगिरी किल्ल्याचा समावेश असलेलं टुरिस्ट सर्किट तयार करणार असल्याचं, पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं आहे. ते काल औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. कोविड काळात बंद झालेली डेक्कन ओडिसी रेल्वे पुन्हा सुरू करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जात आहे, त्याबाबत लवकरच निर्णय होईल, येत्या वर्षभरात औरंगाबादच्या पर्यटनाचा कायापालट होईल, असा विश्वास पर्यटन मंत्र्यांनी व्यक्त केला.
****
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्यानं नांदेड जिल्ह्यातल्या दुर्लक्षित पर्यटन स्थळांविषयी माहिती देणारी कॉफी टेबल बुक, तसंच जिल्हा परिषदेच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांच्या पुस्तकाचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल प्रकाशन झालं. मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या अमृत महोत्सवाच्या औचित्यानं जिल्हाभर विविध उपक्रम राबवण्यात येणार असून, त्याचं कॅलेंडर तयार करण्यात आल्याची माहिती, जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.
****
सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते काल बुलडाणा इथं शिवसेना मेळाव्यात बोलत होते. महाराष्ट्रातला तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगार होत असताना इथले उद्योगधंदे गुजरातच्या निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातून पळवण्यात येत असल्याची टीका दानवे यांनी केली. शिवसेना सत्ता मिळवण्यासाठी नव्हे तर हिंदुत्वासाठी काम करत असल्याचं, त्यांनी सांगितलं.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 September 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १६ सप्टेंबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग’ हा भारताच्या पाठीचा कणा - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री औरंगाबाद दौऱ्यावर; डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण.
शालेय विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा अतिभार असू नये - शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर.
आणि
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार काँग्रेस पक्षाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू दिले नाहीत - डॉक्टर राजेंद्र गवई यांचा आरोप.
****
‘सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग’ हा भारताच्या पाठीचा कणा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केला आहे. सीतारामन यांच्या हस्ते आज मुंबईत लघु उद्योग भारती ‘प्रदेश अधिवेशन २०२२’ या परिषदेचं उद्धघाटन झालं. त्यावेळी बोलताना अर्थमंत्र्यांनी, जागतिक स्तरावर १० वर्षात भारतानं ११ व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर झेप घेतल्याचं सांगितलं. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यावेळी उपस्थित होते केंद्र सरकार हमी घेत असल्यानं बँकेच्या माध्यमातून उद्योगाला मदत मिळत असल्याचं, डॉ कराड यांनी यावेळी सांगितलं.
****
सूर्याच्या हानीकारक किरणांपासून रक्षण करणाऱ्या ओझोनच्या थराला हानी पोहोचू नये यासाठी पर्यावरणपूरक सवयींचा अंगीकार करावा, प्रत्येक व्यक्तीनं पर्यावरण रक्षणासाठी स्वत:पासून सुरूवात करून हातभार लावावा, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. आज ��ागतिक ओझोन दिवसानिमित्त मुंबईत एका कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.
****
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आज आणि उद्या औरंगाबाद दौऱ्यावर आले आहेत. औरंगाबाद इथं डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज अनावरण झालं.
मंत्रिमंडळातले मान्यवर सदस्य सर्वश्री संदिपान भुमरे, उदय सामंत, अतुल सावे, अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, कुलगुरू डॉ प्रमोद येवले यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, उद्या हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनी औरंगाबाद इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुक्तिसंग्राम स्मारक परिसरात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
नांदेड इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, जालना इथं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते, परभणी इथं सहकार मंत्री अतुल सावे, तर लातूर इथं कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उद्या नांदेड इथले प्राध्यापक बालाजी चिरडे यांचं व्याख्यान होणार आहे.
****
अंबाजोगाई इथल्या ऐतिहासिक शहा बुरुजावर मराठवाडा जनता विकास परिषदेच्या अंबाजोगाई शाखेच्या वतीनं उद्या झेंडावंदन होणार आहे. स्वातंत्र्यसैनिक श्रीनिवास खोत यांनी १९४२ च्या आंदोलनात या बुरुजावरचा निजामाचा रेडिओ उध्वस्त केला होता. ढासळत असलेल्या या बुरुजाची स्थानिक प्रशासनाच्या मदतीने साफसफाई करून, तात्पुरत्या पायऱ्या उभारण्यात आल्या आहेत. सायंकाळनंतर हा बुरूज तिरंगी प्रकाशात न्हाऊन निघतो आहे. सर्वसामान्य नागरिकांना हा इतिहास माहिती व्हावा, आणि या बुरुजासह अशा ऐतिहासिक वास्तूंचं संवर्धन व्हावं, या हेतूनं या बुरुजावर ध्वजारोहणाचा निर्णय घेतल्याचं मराठवाडा जनता विकास परिषदेच्या अंबाजोगाई शाखेचे अध्यक्ष डॉ नरेंद्र काळे यांनी सांगितलं. ते म्हणाले –
निजामाचं एक महत्वाचं लष्करी तळ अंबाजोगाईला होतं. आणि निजामाच्या दिमतीला म्हणून ब्रिटीशांचे ५०० सैनिक अंबाजोगाईला होते. त्याच काळामध्ये सरकारने त्या बुरूजावर एक रेडिओ बसवला. या रेडिओवरून त्या सैनिकांना पण युध्दाच्या बातम्या दिल्या जायच्या. इतर काही आदेश जनतेला द्यायचे असतील तर निजाम त्या माध्यमातून द्यायचे. पण जेव्हा चले जाव आंदोलन चालू झालं १९४२ ला, त्या काळामध्ये श्रीनिवास खोत हे तसं बघितलं तर शाळकरी विद्यार्थीच होते तेव्हा, त्यांच्याबरोबर भालेराव, दडके, पवार अशी काही मित्रमंडळी होती. दोर बांधून वर गेले श्रीनिवास खोत. आणि त्यांनी तो रेडिओची तोडफोड केली आणि खाली फेकून दिला. आणि ते स्टेशन उध्वस्त केलं. म्हणून नवीन पिढीला हा सर्व इतिहास समजला जावा त्याचबरोबर या बुरूजाचं संवर्धन पुढील काळामध्ये व्हावं, हा देखील विषय आम्ही याच्या माध्यमातून पाठपुरावा करणार आहोत.
****
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हैदराबाद मुक्ति संग्राम दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. मुक्ती संग्राम लढ्यात अनेक ज्ञात - अज्ञात लोकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं. या सर्व हुतात्म्यांना राज्यपालांनी आदरांजली अर्पण केली.
****
राज्यात लंपी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल, तसंच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची 'ड्रग्ज बँक' देण्यात येईल, असं आश्वासन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं आहे. ते आज पशुसंवर्धन आयुक्तालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय आढावा बैठकीत बोलत होते. राज्यासाठी एका आठवड्यात ५० लाख लस मात्रा उपलब्ध होणार आहेत. लसीकरणासाठी खाजगी पशुवैद्यक आणि पशुवैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार असल्याचं विखेपाटील यांनी सांगितलं.
****
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत, आज सकाळपासून ९ लाखांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळं आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१६ कोटी २६ लाखांच्या वर गेली आहे. त्यात १९ कोटी २ लाखांपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे. राज्यात आज सकाळपासून २१ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं आहे.
****
शालेय विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा अतिभार असू नये, विद्यार्थ्यांना गृहपाठाची गरज भासणार नाही, अशा एकाग्रतेने शाळेत अध्यापन व्हावं, असं आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. गृहपाठ बंद करण्यासंदर्भात आज मुंबईज पत्रकारांशी बोलताना केसरकर यांनी, शिक्षक संघटना तसंच संस्था चालकांशी बोलणार असल्याचं सांगितलं. गृहपाठ ही शिक्षकांसाठी पळवाट असू नये, असंही त्यांनी नमूद केलं. ते म्हणाले –
माझं स्वतःचं असं म्हणणं आहे की मुलांना ओव्हर बर्डन करू नये. त्यांच्या मेंदूचा विकास व्हायला दिला पाहिजे. आणि दुसरं होमवर्क ही पळवाट सुद्धा असता कामा नये टीचर्ससाठी. आपण अर्धातास जे शिकवतो, तेवढं कॉन्सन्ट्रेशन करून शिकवलं पाहिजे. की मुलांना होमवर्क करण्याची आवश्यकता राहता कामा नये असं माझं व्यक्तिगत मत आहे. पण हे मी टीचर्स ज्या असोसिएशन्स आहेत, त्यांच्याशी बोलेन. संस्थाचालकांशी बोलेन. आणि नंतर त्याच्यावर निर्णय घेईन.
****
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार काँग्रेस पक्षाने सर्वसामान्यांपर्यंत पोहोचू दिले नाहीत, असा आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाचे नेते डॉक्टर राजेंद्र गवई यांनी केला आहे. ते आज अमरावती पत्रकार परिषदेत बोलत होते. काँग्रेस मित्र पक्षांना संपवण्याचा काम करत आहे. काँग्रेसने आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक द्यावी, अन्यथा काँग्रेसला धडा शिकवण्यासाठी आम्ही योग्य पर्याय निवडू, असा इशारा डॉ गवई यांनी दिला.
****
सोलापूर जिल्ह्यात फक्त चार तालुक्यातल्या शेतकऱ्यांनाच अतिवृष्टी बाधितांसाठी जाहीर मदत मिळणार आहे. इतर तालुके आणि अतिवृष्टी बाधित मंडळातील शेतकरी या मदतीपासून वंचित राहात असल्यानं शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
****
0 notes
Text
निजामशाही स्थिरावण्याचा काळ..!!
मराठवाडा मुक्ती गाथा ( भाग – ४ ) निजाम उल मुल्कचा कालखंड हा निजामशाहीच्या उदयाचा होता. त्या कालखंडात मराठ्यांशी कधी मैत्री तर कधी तह करून कधी माफी मागून निजामशाही टिकून राहिली. इ.स. 1724 ते 1748 अशी 24 वर्ष ही कारकीर्द राहीली. त्यानंतर निजामाच्या वारसदारांमध्ये इ.स. 1748 ते 1762 पर्यंत वारसायुध्द घडुन आले. निजाम-उल-मुल्क नंतर त्याचा मुलगा निजाम अली हा हैद्राबाद संस्थानचा राजा झाला. त्याने स्वत:ला…
View On WordPress
0 notes
Text
निजामशाही स्थिरावण्याचा काळ..!!
मराठवाडा मुक्ती गाथा ( भाग – ४ ) निजाम उल मुल्कचा कालखंड हा निजामशाहीच्या उदयाचा होता. त्या कालखंडात मराठ्यांशी कधी मैत्री तर कधी तह करून कधी माफी मागून निजामशाही टिकून राहिली. इ.स. 1724 ते 1748 अशी 24 वर्ष ही कारकीर्द राहीली. त्यानंतर निजामाच्या वारसदारांमध्ये इ.स. 1748 ते 1762 पर्यंत वारसायुध्द घडुन आले. निजाम-उल-मुल्क नंतर त्याचा मुलगा निजाम अली हा हैद्राबाद संस्थानचा राजा झाला. त्याने स्वत:ला…
View On WordPress
0 notes