#नाहीस
Explore tagged Tumblr posts
pradip-madgaonkar · 12 hours ago
Text
जन्या : का रे तू सकाळी फिरायला का जात नाहीस?
Pradip : जे दररोज सकाळी फिरायला जातात त्याला ‘मॉर्निंग वॉक’ म्हणतात.
जे बायकोबरोबर फिरायला जातात, पण वळून दुसऱ्या महिलेकडे बघतात, त्याला…
‘टर्निंग वॉक’ म्हणतात.
Pradip चं उत्तर ऐकून जन्याला चक्कर येते.
😀😀😀🥹🥹🥹😅😅😅🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 16 hours ago
Text
जन्या : का रे तू सकाळी फिरायला का जात नाहीस?
Bandya : जे दररोज सकाळी फिरायला जातात त्याला ‘मॉर्निंग वॉक’ म्हणतात.
जे बायकोबरोबर फिरायला जातात, पण वळून दुसऱ्या महिलेकडे बघतात, त्याला…
‘टर्निंग वॉक’ म्हणतात.
Bandya चं उत्तर ऐकून जन्याला चक्कर येते.
😀😀😀🥹🥹🥹😅😅😅🤣🤣🤣
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ४
जेवणं झाल्यावर प्रमिलानं दिलेला मुखवास तोंडात टाकतांना अनंत म्हणाला, "खुप दिवसांनी इतकं आकंठ जेवलोय् पमाताई, की ��तां पायीं घरी गेलो तरच झोपायची वेळ होईपर्यंत पोटाला लागलेली तडस थोडी तरी कमी होईल!" "काय रे हे तुझं बोलणं अनंता", प्रमिला लटक्या रागानं म्हणाली "कुणी ऐकलं तर त्याला वाटायचं की जशी काही शुभदा रोज तुला उपाशीच ठेवते!" "तसं नाहीं पमाताई, पण गेला महिनाभर ह्यांचं जेवणा-खाण्यांत लक्षच नव्हतं! मीही खरंच ह्यांना आज खुप दिवसांनी चवीनं, पोटभर जेवतांना बघितलं!" शुभदा अनंताची बाजू घेत म्हणाली." नाहींतर बळेबळे मी वाढायची, म्हणून चार घांस पोटांत ढकलायचे एवढंच! नशीब म्हणायचं की भरवायची वेळ नाही आणली!!"
"कां रे बाबा खाण्या-पिण्याकडे एवढंच दुर्लक्ष?" प्रमिलानं काळजीनं विचारलं, "खरं तर रिटायर होणार म्हणून तुझा कामाचा ताण सगळा नाहींसा व्हायला हवा होता!" "छे,हो! उलट कामाचा चार्ज देतांना आपलं कुठलंही काम अर्धवट राहून नये म्हणून गेला महिनाभर स्वारी रोज तास-दीड तास उशीरापर्यंत थांबत होती ऑफिसात!" शुभदाच्या स्वरातली नाराजी लपण्यासारखी नव्हती! "कशाला एवढी उरफोड, अनंता?" इतका वेळ शांतपणे सगळं ऐकणारे प्रभाकरराव म्हणाले,"अरे तूं कितीही जिवापाड काम केलंस तरी शेवटी लोक खुसपटं काढायचे थांबत नाहीतच!" "मी इतर कोण काय म्हणेल याची पर्वा करीत नाहीं प्रभाकरराव;- पण माझ्या मनानं तरी मला ग्वाही द्यायला हवी ना की आपण कुठलंही काम जाणून-बुजून अर्धवट सोडलं नाहीं! इतकी वर्षं इमाने-इतबारे केलेल्या नोकरीचा शेवट माझ्या मनाला समाधानकारक व्हावा एवढीच माझी धडपड होती!"
"म्हणजे यापुढे तूं शुभदाला जेवणाबाबत तक्रारीला जागा ठेवणार नाहीस, असं समजायचं कां?" प्रमिलानं खेळीमेळीनं विचारलं. " तिचं काही सांगून नकोस हां, पमाताई! अग, मी कितीही खाल्लं तरी तिचं पोट काही भरत नाहीं!" अनंत चेष्टा करीत म्हणाला," जेवतांना आमटी छान् झाली आहे असं म्हटलं की लगेच आमटीचं सगळं पातेलं मी एका दमात रिकामं करावं अशी तिची अपेक्षा असते! वाढत्या वयाबरोबर माणसाची भूक मंदावते हे तिला पटतच नाहीं!" "आपलं माणूस केलेल्याला चांगलं म्हणत चवीनं, मनापासून जेवलं की ��सं धन्य वाटतं हे कळण्यासाठी पुरुषाला बाईचा जन्मच घ्यायला हवा!" असं ठसक्यांत म्हणत शुभदानं समारोप केला, "एवढं मात्र खरं, आज ह्यांना मनापासून जेवतांना बघितल्यावर हे पुन: माणसांत आल्याची खात्री पटली!"
४ ऑगस्ट २०२२
0 notes
shrikrishna-jug · 2 months ago
Text
माझ्या हृदयावर हात ठेव, माझी तू वाट का पहावी
कुणी स्वीकार करावे या अस्वीकार करावेमाझ्याशी एकदा नजर तरी भिडवावी तू रूपसुंदरी असता,तुला लोकांनी मनात जागा द्यावीमाझ्यात असे काय असावे की माझ्यावर तू प्रेम करावे मी तुलाच विचारते माझी तुझ्याशी प्रीती का जडावीकधी तू धोका देणार नाहीस,ही संभावना मी का करावी ह्या तरुण मोसमाने मला संदेश का द्यावाहे सुंदर सुंदर नखरे मला कुठून दिसावे माझ्या जीवनावर या नवीन आनंदाने का पसरावेजे पाऊल उचलते त्या पावलाने…
0 notes
dhanu-j-92 · 5 months ago
Text
. 🌹 *ज्ञान गंगा* 🌹
. ➖ *द्वापारयुगात इन्द्रमतीला शरण मध्ये घेणे* ➖
*(भाग-1)*
द्वापारयुगामध्ये चंद्रविजय नावाचा एक राजा होऊन गेला. त्याची पत्नी इन्द्रमती अत्यंत धार्मिक प्रवृत्तीची होती. ती संत-महात्म्यांचा अत्यंत आदर करत असे. तिने एक गुरुदेवही केले होते. तिच्या गुरुदेवांनी तिला सांगितले होते की मुली, साधुसंतांची सेवा करणे आवश्यक आहे. संतांना भोजन दिल्याने फार फायदा होतो. एकादशीचे व्रत, मंत्रजप आदी साधना ज्या गुरुदेवांनी सांगितल्या होत्या, त्यामध्ये, भगवत भक्तीमध्ये ती अत्यंत दृढ झाली होती. गुरुदेवांनी सांगितले होते की संतांना भोजन करवशील तर तू पुढेही राणी बनशील आणि तुला स्वर्गप्राप्ती होईल. राणी इंद्रमतीने ठरविले की दररोज एका संतास भोजन अवश्य करवायचे. तिने मनामध्ये ही प्रतिज्ञा बिंबवली की आधी संतांना भोजन करवायचे आणि मग आपण आहार घ्यायचा. त्यामुळे आपली प्रतिज्ञा नेहमी आठवणीत राहील, कधीही विसरणार नाही. राणी दररोज आधी एका संतास भोजन द्यायची आणि नंतरच आपण घ्यायची. अनेक वर्षे हा उपक्रम चालू होता.
पुढे एकदा हरिद्वारला कुंभमेळा भरला होता. जितके त्रिगुणी मायेचे उपासक संत होते, ते सर्व गंगा नदीमध्ये स्नानासाठी गेले होते. त्यामुळे कित्येक दिवस राणीला भोजन करवण्यासाठी कोणी संतच मिळाला नाही. राणी इंद्रमतीने स्वतःही भोजन केले नाही. चौथ्या दिवशी ती आपल्या दासीला म्हणाली की कोणी संत भेटतो का, बघ तरी. नाही तर आज तुझी ही राणी जिवंत राहणार नाही. आज माझी प्राणज्योत मालवली तरी चालेल. पण मी भोजन करणार नाही. ते दीनदयाळ कबीर परमेश्वर आपल्या पूर्वीच्या भक्ताला शरण घेण्यासाठी कोणते कारण बनवतील, काहीच सांगता येत नाही. दासीने महालाच्या गच्चीवर जाऊन पाहिले तर समोरून एक संत येत होते. त्यांनी श्वेत वस्त्र परिधान केलेले. *द्वापारयुगामध्ये परमेश्वर कबीर ‘करुणामय’* नावाने प्रकट झाले होते. दासीने खाली ये��न राणीस सांगितले की साधूसारखी एक व्यक्ती दृष्टीस पडत आहेत. राणी म्हणाली की लवकर जाऊन त्यांना बोलावून आण. दासी महालाबाहेर गेली आणि तिने प्रार्थना केली की ‘साहेब, आपणास आमच्या राणीने स्मरण केलेले आहे.’ करुणामय साहेब म्हणाले की ‘राणी माझे का स्मरण करत आहे? माझा आणि राणीचा काय संबंध?’ दासीने त्यांना सर्व हकीकत सांगितली. करुणामयसाहेब (कबीर) म्हणाले की राणीला जर आवश्यकता असेल, तर तिने येथे यावे. मी येथेच उभा आहे. मी तिथे गेलो आणि तुला कोणी बोलवलंय, असे ती म्हणाली किंवा तिचा पती राजाने काही अपशब्द काढले तर? बेटी, संतांचा अनादर अत्यंत पापदायक ठरतो. यावर दासी परत आली आणि तिने राणीला सर्व वार्ता ऐकवली. राणी दासीला म्हणाली की माझा हात पकड आणि चल तिकडे. तेथे जाताच राणीने दंडवत घातला आणि प्रार्थना केली, ‘हे परवरदिगार, मला वाटते की आपणाला खांद्यावर बसवून घेऊन जावं.’ करुणामयसाहेब जी म्हणाले, “हे मुली, तुझ्यामध्ये कोणता श्रद्धा भाव आहे की अशीच उपाशी मरत आहेस, हे मी पाहत होतो.” राणीने आपल्या हाताने स्वयंपाक बनविला. करुणामय रूपामध्ये आलेले कविर्देव म्हणाले की मी भोजन करत नाही. माझे हे शरीर आहार करण्याचे नाही. यावर राणी म्हणाली की मग मी देखिल भोजन करणार नाही. शेवटी करुणामयसाहेब जी म्हणाले, “ठीक आहे मुली, आण मी भोजन करतो.” समर्थ त्यांनाच म्हटले जाते, जे इच्छा असेल तेच करतात. करुणामयसाहेबांनी भोजन केले. त्यांनी राणीला विचारले की ही जी साधना तू करतेस, ती तुला कोणी सांगितली आहे? राणी म्हणाली, की माझ्या गुरुदेवांनी हा आदेश दिलेला आहे. कबीर साहेब जी म्हणाले, “काय आदेश दिलेला आहे तुझ्या गुरुदेवांनी?” इंद्रमती म्हणाली, “ब्रह्मा-विष्णु-महेश यांची पूजा, एकादशीचे व्रत, तीर्थभ्रमण, देवपूजा, श्राद्ध घालणे, मंदिरामध्ये जाणे, संतांची सेवा करणे आदी गुरुदेवांनी सांगितले आहे.” करुणामय कबीर साहेब म्हणाले, “जी साधना तुला तुझ्या गुरुदेवांनी सांगितलेली आाहे, त्याद्वारे तू जन्म-मृत्यू, स्वर्ग-नरक व 84 लक्ष योनींमधील कष्टातून मुक्त होऊ शकत नाहीस.” राणी म्हणाली की महाराज, जेवढे संत आहेत, ते आपापली प्रभुता स्वत:च बनवून येतात. मी मुक्त होऊ अथवा न होऊ, आपण माझ्या गुरुदेवांविषयी काहीही बोलू नका.
Tumblr media
1 note · View note
gitaacharaninmarathi · 11 months ago
Text
7. निमित्तमात्र
श्रीमद्भगवद्गीतेचा जन्म रणांगणात झाला आणि महामारीचा काळ (COVID-19) कुरुक्षेत्र युद्धासारखाच होता. गीतेतील एक शब्द हे सगळेच अचूकपणे मांडतो आणि तो शब्द म्हणजे निमित्तमात्र- परमात्याच्या हातातील केवळ एक साधन असणे.
अर्जुनाला श्रीकृष्ण जसा होता तसाच पाहायचा होता आणि त्याला समजून घेण्यासाठी एका अतिरिक्त शक्तीची गरज होती, जसे एखाद्या आंधळ्याला पूर्ण हत्ती पाहण्यासाठी डोळ्यांची गरज असते. भगवान श्रीकृष्णाने त्याला त्यांचे वैश्विक रूप पाहण्यासाठी दिव्य डोळे दिले होते. विश्वरूप दाखवण्याव्यतिरिक्त, श्रीकृष्ण त्याला भविष्यात पाहण्याची दृष्टी देतात आणि अर्जुनाला अनेक योद्धे मृत्यूच्या जबड्यात प्रवेश करताना दिसतात.
नंतर भगवंत त्याला म्हणतात, हे योद्धे लवकरच मरणार आहेत आणि या प्रक्रियेतील तू केवळ एक  साधन आहेस. श्रीकृष्ण त्याला हे स्पष्टपणे सांगतात की तू कर्ता नाहीस आणि दुसरे म्हणजे तो हे निश्चित करतो की जेव्हा अर्जुन युद्धात विजयी होईल तेव्हा तो अहंकारमुक्त असला पाहिजे कारण अहंकार हा विजयामुळेच सर्वाधिक प्रज्वलित होतो.
त्याच वेळी, श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धभूमीही सोडू देत नाही. निमित्तमात्र असणे ही आपल्याला आतल्या आत होणारी जाणिव आहे आणि त्यातून अत्यंत शुद्ध भाव निर्माण होतो आणि आपण अहंकारापासून मुक्त होतो.
कोरोना महामारीच्या काळात रस्त्यावरील किंवा नियंत्रण कक्षात लोकांना होणारा त्रास अर्जुनच्या दुःखासारखा आहे. यावर कोणताही इलाज नसल्यामुळे, आपण आतून फक्त निमित्तमात्र आहोत आणि बाहेरच्या जगात आपल्याला सोपवलेल्या जबाबदाऱ्या शक्य तितक्या चांगल्या पद्धतीने पार पाडल्या पाहिजेत. ही छोटीशी जाणीव खरोखरच एक वरदान ठरू शकते कारण गीतेच्या अनेक संकल्पना जीवनात, विशेषतः कठीण परिस्थितीत अनुभवल्याशिवाय स्पष्ट होत नाहीत. कोळशाचा तुकडा अत्यंत दाबाने हिऱ्यात बदलतो आणि आगीत गरम केल्याने सोने शुद्ध होते.
अशा प्रकारच्या आव्हानात्मक परिस्थितीमुळेच आपण निमित्तमात्र असल्याची जाणिव जन्माला येते आणि त्यातून आपण शरणागततेच्या मार्गाने अंतरात्म्याच्या अधिक जवळ जातो.
0 notes
mhlivenews · 1 year ago
Text
दोन लाख रुपये घेऊन सासरी आली नाहीस तर तुला...; सासरच्यांकडून विवाहितेचा छळ
धनाजी चव्हाण, परभणी : विवाहितेला लग्नानंतर मुलगी झाली. पण सासरकडच्यांना मुलगा पाहिजे होता. त्यामुळे ”तुला मुलगीच का झाली?”, म्हणत विवाहितेची शारीरिक मानसिक प्रताडणा करण्यात आली. विवाहितेला लहान मुलीसह माहेरहून दोन लाख रुपये घेऊन ये म्हणत घराबाहेर काढण्यात आले. विवाहितेचा छळ येथेच थांबला नाही. तर विवाहितेच्या सासूने माहेरी येऊन सांगितले ”दोन लाख रुपये जमा झाले नाहीत का? म्हणत जर दोन लाख रुपये घेऊन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
‘आव्हाड नाहीस, हाड हाड आहेस तू, तीच तुझी लायकी’; चित्रा वाघ यांची आव्हाडांवर टीका
https://bharatlive.news/?p=104031&wpwautoposter=1686337534 ‘आव्हाड नाहीस, हाड हाड आहेस तू, तीच तुझी लायकी’; चित्रा वाघ यांची ...
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years ago
Text
आपण हिला काय सांगायला आलो आणि ही कुठल्या विषयात हरवली आहे..... अनयच्या मनात विचार आला. त्याने स्वप्नात हरवलेल्या राधेकडे बघितले आणि तसाच मागे वळून निघून गेला. दोन दिवसांनी राधेचे तात अनयच्या घरी आले. त्यांचा चेहेरा उतरला होता.... हातातील विडा-सुपारीचे ताट जमिनीवर ठेवून भरल्या डोळ्यांनी त्यांनी अनयचा हात हातात घेतला; मात्र त्यांना काही बोलायला न देता अनयच म्हणाला;"तात, माझा आणि राधेचा विवाह नक्की होणार. तुम्ही सगळे विचार बाजूला ठेऊन तयारीला लागा." अनयचे बोलणे ऐकून राधेचे तात अजूनच अवघडले. मात्र एकवार अनयकडे बघून ते परत गेले. अनयने त्याच संध्याकाळी परत एकदा राधेची वाट अडवली.
"अनय, असं का करतो आहेस तू? किती कष्टाने मी तातांना पटवले होते की मला लग्नच करायचे नाही. मात्र तू त्यांना सांगितलेस की आपला विवाह नक्की होणार. ते हरखून गेले आहेत आता. का माझं आयुष्य अजून अवघड करतो आहेस?" कधीही आवाजाची मध्य लय न सोडणारी राधा काहीशा रागाने बोलली. एक पाऊल पुढे होऊन अनयने तिच्या डोळ्यात बघितले आणि म्हणाला;"राधे, नको करुस माझ्याशी लग्न. पण किती दिवस हा विषय टाळशील तू? एकदिवस तुझं न ऐकता तुझे तात तुझं लग्न कोणाशीतरी नक्की लावून देतील. कुणा अनोळखी व्यक्तीपेक्षा मग माझ्याशी कर न लग्न."
आता मात्र राधेचा आवाज कातर झाला. तिने देखील त्याच्या नजरेला नजर भिडवली आणि म्हणाली;"अनय मी त्याला कधीच विसरू शकणार नाही. तो फक्त माझ्या तना-मनात नाही तर माझ्या संपूर्ण अवकाशात व्यापून राहिला आहे. लग्नानंतर देखील जेव्हा तुला त्याचेच प्रतिबिंब माझ्या डोळ्यात दिसेल तेव्हा तू खूप दुखावला जाशील."
तिच्याकडे हसत बघत अनय म्हणाला,"मी दुखावला जाईन याचं तुला वाईट वाटतंय राधे यातच माझं सुख दडलं आहे अस मी म्हंटल तर?"
त्याच्याकडे एकदा बघून राधेने नजर वळवली आणि निघण्यासाठी पाऊल उचललं. मात्र परत त्याच्याकडे वळून ती म्हणाली;"अनय, तू म्हणशील त्या मुहूर्तावर तुझ्याशी विवाह करायला मी तयार आहे." तिच्या त्या एका वाक्याने तो हरखून गेला.
.... आणि राधा अनयचा विवाह झाला. नंद महाराज आणि यशोदा माई देखील त्यांच्या लग्नाला आले होते. लग्न लागले आणि यशोदा माई इडा-पीडा घेण्यासाठी नववधू जवळ आली. तिने राधेचा झुकलेला चेहेरा हनुवटीला धरून वर उचलला. राधेच्या डोळ्यात बघत ती हलकेच म्हणाली;"अजूनही माझा मोहन आहे ग तुझ्या डोळ्यात..." पण मग स्वतःला सावरत तिने राधेची इडा-पीडा घेतली आणि म्हणाली;"उत्तम संसार कर राधे. सर्वांना सुखी कर."
अनय राधेचा संसार सुरू झाला. राधा एक उत्तम गृहिणी होती. घर काम उरकून यमुनेवर जावं; स्नान उरकून कपडे धुवून पाणी भरून आणावं... खिल्लारांची काळजी घ्यावी. दुधाची धार काढून त्याचं दही, ताक, लोणी, तूप करून अनयकडे सुपूर्द करावं.... ती कुठेही कमी पडत नव्हती. अनयचा विवाह राधेशी ठरवल्यामुळे अनयच्या माईला गोकुलवासीयांनी अगोदर खूप दोष दिले होते; तेच आज राधेचे कौतुक करताना थकत नव्हते.
हाताला प्रचंड उरका असणारी राधा संध्याकाळ होताच मात्र मलूल होऊन जायची. माडीवर जाताना तिची पाऊलं जड होऊन जायची. रोज वर येणाऱ्या राधेची आतुरतेने वाट बघणारा अनय तिच्या जड पायातील पैंजणांच्या आवाजावरून काय ते समजून जायचा आणि भिंतीकडे तोंड करून झोप लागल्याची बतावणी करायचा. राधा देखील काहीएक न बोलता दुसऱ्या बाजूला तोंड करून झोपून जायची. अशीच वर्ष सरली.... अनयची माई नातवंड खेळवायची इच्छा मनात ठेऊन जगाचा निरोप घेऊन गेली.
माई गेल्यानंतर राधेने माडीवर जाणे सोडून दिले होते. अनयने देखील आता वाट बघणे सोडून दिले होते. अलीकडे राधेच्या केसांमधली रुपेरी छटा अनयला जाणवायला लागली होती. तिच्या कामातली चपळता कमी झाली होती. एकदिवस गाई चरून आणून अनय घराच्या ओसरीशी बसला आणि त्याने राधेला हाक मारली. एरवी लगेच उत्तर देणाऱ्या राधेची कोणतीही हालचाल त्याला जाणवली नाही. तो तसाच घरात धावला. राधा जमिनीवर पडली होती. अनयने संपूर्ण आयुष्यात पाहिल्यादाच राधेला उचलून हृदयाशी कवटाळले. पण तिला जवळ घेताक्षणी त्याच्या छातीला काहीतरी टोचले. त्याने तिच्या हृदयाजवळ धरलेल्या हाताची मूठ सोडवली.... त्यात शामवर्णी किसनाची मूर्ती होती. अनय राधेच्या कलेवराला बिलगून मूकपणे रडत होता आणि मनातच त्या मृदू मनाच्या किसनाला म्हणत होता....
"किसना, तिच्या अवकाशात फक्त तूच राहिलास रे आयुष्यभर. पण एक सांगू? मी कधीच ते अवकाश मिळवायचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे आता यापुढील आयुष्य किमान एका विचारावर जगू शकेन की कदाचित प्रयत्न केला असता तर ती खरंच कायमची माझी झाली असती आणि तू आला असतास तर तुला तिच्या चेहेऱ्यावर आमच्या सुखी जीवनाचा कवडसा नक्की दिसला असता.... पण...... तू आला नाहीस... आणि हेच खूप मोठे उपकार आहेत तुझे माझ्यावर!"
-वैभव वैद्य....
0 notes
gop-al · 2 years ago
Text
                       मैत्री सुख
       ग्रामीण भागातील राहणीमानाचा गोडवा काही वेगळाच असतो आणि ते सुख आत्मसात करायला भेटलं स्वतःला भाग्यवान समजतो पाचवी सहावी ची गोष्ट आहे  आम्ही बालमित्र दिवसभर सोबत असायचो सकाळची शाळा त्यानंतर दिवसभर खेळणे असा दिनक्रम असायचा आमचे मित्र म्हणजे सर्व नमुने कोणी अभ्यासात हुशार तर कोणी भांडणात हुशार कोणी खेळात हुशार तर कोणी मस्ती करण्यात हुशार अशी आमची खेळीमेडीची सर्कस बाल वयातील मित्र जीवाला जीव देणारे होते हे मात्र नक्कीच आणि ते आताही आहेत कोणी मित्रांमध्ये गरीब होतं तर कोणी श्रीमंत कोणी नोकरी वाल्याची मुलं तर कोणी शिक्षकाची यामध्ये सर्वात वेगळा मित्र होता तो श्रीमंत घरचा आणि मारवाडी मुलगा तो नेहमी पहायचा आपल्या मित्रांकडे कोणतीही वस्तू घ्यायला पैसे नसतात आणी आपल्या मित्रा ची हौस  पुर्ण होत नाही म्हणून यावर आपण काय करू शकतो म्हणून त्यांनी एक शक्कल लढवली घरातून पैशांची पुटली घेऊन आला त्यावेळी आमची आमचे शिक्षक यांचे कडे शिकवणी असायची त्यादिवशी शिकवणी सुरू होण्याअगोदर तो मारवाडी मित्र आम्हाला सांगू लागला माझ्याकडे पैसे आहेत ते आपण सर्व मिळून वाटून घ्या आपल्याला जे जे पाहिजे ते सर्व त्या पैशातून तुम्ही खरेदी  करा म्हणजे आपले सर्व काम होईल पुस्तक, पाटी, दप्तर, पेन, पेन्सिल,सिनेमा जे वाटेल ते खरेदी करा आमचे मित्रांनी सांगितल्यावर आम्ही त्याला म्हटले की तू एवढे पैसे कुठून आणले घरून चोरून तर आणले नाहीस ना हे पैसे तर तो म्हणाला माझे बचत  केलेले आहेत परंतु आम्हाला ती गोष्ट खोटी वाटली आणि सर्व मित्र मिळून ते पैसे घेण्यास आम्ही सर्व मित्रांनी नकार दिला पावसाळ्याचा तो वेळ होता गांजर गवत मोठ्या प्रमाणात असायचं आमच्या मित्राने आम्हाला म्हटलं तुम्ही जर हे पैसे घेत नसाल तर मी हे पैसे फेकून देईल तुम्ही हे पैसे मुकाट्याने घ्या परंतु आम्ही त्याला नकार दिला आणि त्याने म्हटल्याप्रमाणे केले पैशाचं चुंबड त्याने खोललं 50 पैसे 1चे चे कलदार होते त्याने सर्व पैसे गांजर गवतामध्ये फेकले आम्हाला विश्वास सुद्धा बसला नाही तो असे करेल परंतु  घनदाट असलेल्या त्या गांजर गवतामध्ये  त्याने पैसे  फेकल्या बरोबर आम्ही सर्व मित्र ते शोधण्यासाठी तुटून पडलो, कारण आम्हला  माहित होते ते पैसे त्यानी आमच्या साठी आणले होते आणि  ते चोरीचे तर नसतील  ना ही शंका  घेणे ही चुकीचे होते म्हणून आम्ही सर्व मित्र मिळून ते गांजर गवतातील  पैसे  शोधून काढले  ज्यांना जेवढे मिळाले तेवढे  त्याचे, ही गोष्ट आमच्या सरांच्या  कडे पोहचली सरांचा स्वभाव कडक होता काय झाले कोणीच सांगण्यास तयार  नाही, परंतु आमच्या मित्राने झालेला प्रकार सांगितला मारवाडी मित्राच्या घरी चौकशी  झाली की चोरी वगैरे काहीही केली नव्हती  परंतु माझ्या सर्व मित्रांना सर्व सुख सुविधा भेटाव्या म्हणून त्याने स्वतःला भेटलेल्या खर्चाच्या पैशातून मित्रां चे सुख शोधले  होते हाच प्रामाणिक उद्देश त्याचा होता अशा  मैत्रीला सलाम.
-गोपाल मुकुंदे 
1 note · View note
rahulmarathiblog · 2 years ago
Text
' आता तू चांगली दिसत नाहीस ', लग्नानंतर तीन वर्षांनी साक्षात्कार झाला म्हणून चक्क..
‘ आता तू चांगली दिसत नाहीस ‘, लग्नानंतर तीन वर्षांनी साक्षात्कार झाला म्हणून चक्क..
महाराष्ट्रात लग्न जमण्यापूर्वी मुलाला मुलगी दाखविण्याची प्रथा काही शतकांपासून सुरू आहे हे मात्र अनेकदा लग्न झाल्यावर देखील ‘ अवघ्या काही मिनिटात तुला पाहून निर्णय घेतला होता मात्र आता माझा निर्णय बदलला आहे ‘ असेदेखील म्हणणारे अनेक महाभाग समाजात आहेत. असाच एक प्रकार औरंगाबाद येथे समोर आलेला असून तीन वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न झाले मात्र त्यानंतर आता तू चांगली दिसत नाहीस असे म्हणत एका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 11 months ago
Text
Pradip (जेवताना) : तुझं नेट बंद आहे का?
बायको : आहे की चालू…! पण का?
Pradip : मला भाजी वाढ म्हणून मेसेज टाकलाय.
अजून दिली नाहीस म्हणून विचारलं.
😀😀😀😅😅😅😂😂😂🤣🤣🤣
0 notes
bandya-mama · 1 year ago
Text
एकदा Bandya नं बायको झोपली असताना तिच्या तोंडावर मगभर पाणी ओतलं...
बायको (संतापून)- अहो, काय करताय..?
Bandya - तू उठत नाहीस ना..
म्हणून पाणी ओतून उठवतोय..
बायको- हे असं...? कोणी सांगितलं तुम्हाला..?
Bandya - तुझेच बाबा म्हणाले होते.. माझी मुलगी अगदी फुलासारखी आहे..
तिला कोमेजू देऊ नका... म्हणून पाणी ओतलं...
😛😛😛😉😉😉🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤣🤣🤣
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago
Text
' आता तू चांगली दिसत नाहीस ', लग्नानंतर तीन वर्षांनी साक्षात्कार झाला म्हणून चक्क..
‘ आता तू चांगली दिसत नाहीस ‘, लग्नानंतर तीन वर्षांनी साक्षात्कार झाला म्हणून चक्क..
महाराष्ट्रात लग्न जमण्यापूर्वी मुलाला मुलगी दाखविण्याची प्रथा काही शतकांपासून सुरू आहे हे मात्र अनेकदा लग्न झाल्यावर देखील ‘ अवघ्या काही मिनिटात तुला पाहून निर्णय घेतला होता मात्र आता माझा निर्णय बदलला आहे ‘ असेदेखील म्हणणारे अनेक महाभाग समाजात आहेत. असाच एक प्रकार औरंगाबाद येथे समोर आलेला असून तीन वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न झाले मात्र त्यानंतर आता तू चांगली दिसत नाहीस असे म्हणत एका…
Tumblr media
View On WordPress
0 notes
shrikrishna-jug · 6 months ago
Text
तू मला न्याहाळीलेस त्याने मी सुखावलो
माझ्या साधेपणा वर काही इलाज नाहीमी काय जाणले आणि काय ऐकलेतू तर असे काही बोललीस नाहीस माझी कल्पना झाली ,की माझीअधूरी इच्छा दूर झाली तू मला न्याहाळीलेस त्याने मी सुखावलोखरं तर तुझी शपथ, मी छळ करणारानाही. सन्मान ठेवणारा मी साधा असतांकशामुळे तू नाराजलीस स्पर्श का केला तुला,अरे देवा, कायचूक मी केली साऱ्या दुनियेत, माझ्यासम सजेसपात्र नाही.माझ्या साधेपणा वर काही इलाज नाही चांदण्या रात्री सुकोमल…
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years ago
Text
' आता तू चांगली दिसत नाहीस ', लग्नानंतर तीन वर्षांनी साक्षात्कार झाला म्हणून चक्क..
‘ आता तू चांगली दिसत नाहीस ‘, लग्नानंतर तीन वर्षांनी साक्षात्कार झाला म्हणून चक्क..
महाराष्ट्रात लग्न जमण्यापूर्वी मुलाला मुलगी दाखविण्याची प्रथा काही शतकांपासून सुरू आहे हे मात्र अनेकदा लग्न झाल्यावर देखील ‘ अवघ्या काही मिनिटात तुला पाहून निर्णय घेतला होता मात्र आता माझा निर्णय बदलला आहे ‘ असेदेखील म्हणणारे अनेक महाभाग समाजात आहेत. असाच एक प्रकार औरंगाबाद येथे समोर आलेला असून तीन वर्षांपूर्वी मोठ्या थाटामाटात लग्न झाले मात्र त्यानंतर आता तू चांगली दिसत नाहीस असे म्हणत एका…
Tumblr media
View On WordPress
0 notes