#नवी नियमावली
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
मंकी पॉक्सचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी
विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या राजकीय तसंच प्रशासकीय आढावा बैठका
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा छत्रपती संभाजीनगर इथं अभिष्टचिंतन सोहळा
जागतिक पर्यटन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा-रत्नागिरी जिल्ह्यातल्या कर्दे गावाला कृषी पर्यटनासाठी सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर
आणि
मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीचा उपांत्य फेरीत प्रवेश
****
मंकी पॉक्स या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्याच्या दृष्टीनं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. विषाणूच्या प्रादुर्भाव-प्रसारावर लक्ष ठेवणे, उपचारांसाठी वैद्यकीय सुविधा तसंच विलगीकरणाच्या सोयी उपलब्ध करुन देणे, या बाबींकडे स्थानिक प्रशासनाने लक्ष देण्याचे निर्देश मंत्रालयानं दिले आहेत.
****
शासनानं आज यकृताच्या नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज-एनएएफएलडी या आजारावरील सुधारित मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रशिक्षण पुस्तिका जारी केली. हा आजार झालेला रुग्ण ओळखण्यासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रशिक्षण नियमावली उपयुक्त असल्याचं आरोग्य आणि कुटुंब कल्याण सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितल���.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते परवा रविवारी २९ सप्टेंबरला पुण्यातल्या शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गाचं दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण होणार आहे. स्वारगेट ते कात्रज या भुयारी मार्गाचं भुमिपूजनही यावेळी होणार आहे. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली.
दरम्यान, पंतप्रधान परवा रविवारी आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा चौथा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरुन सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
महाराष्ट्रातल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पथकानं आज विविध राजकीय पक्षांसोबत चर्चा केली. कोकण तसंच पुणे विभागीय आयुक्त, ठाणे, पुणे, पालघर आणि मुंबई तसंच मुंबई उपनगरचे पोलिस आयुक्त तसंच अधीक्षक, तसंच ठाणे, नवी मुंबई, पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महापालिका प्रशासनाशी या पथकानं चर्चा करून आढावा घेतला. उर्वरित विभागांचा आढावा उद्या घेतला जाणार आहे.
हे पथक दोन दिवसांच्या दौऱ्यात निवडणूक आयोगाचे अधिकारी, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, मुख्य निवडणूक अधिकारी, मुख्य सचिव यांच्यासह राज्यातल्या विविध अधिकाऱ्यांची विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आढावा बैठक घेणार आहेत.
भाजपा आमदार विधिज्ञ आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगाकडे सूचना मांडल्या आहेत. मतदानाचा दिवस सलग सुट्ट्यांच्या दिवशीचा असू नये, प्रत्यक्षात बदली झालेल्या सर्व मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा अशा सूचनांचं पत्र शेलार यांनी आयोगाकडे सादर केलं आहे.
****
शासनाच्या विविध योजनांची माहिती सर्वसामान्यांना देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमात सहभागी होण्यासाठीची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी या तारखेपर्यंत www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असं आवाहन शासनानं केलं आहे.
****
देशात एक पेड माँ के नाम या मोहिमेअंतर्गत ऐंशी कोटीं रोपांची लागवड करण्याचं उद्दीष्ट पूर्ण केलं असल्याचं पर्यावरण मंत्रालयानं सांगितलं आहे. ३० सप्टेंबर या अंतिम मुदतीच्या आधी हे लक्ष्य गाठले असल्याचं मंत्रालयानं नमूद केलं. यात उत्तर प्रदेश सरकारने सर्वाधिक २६ कोटी रोपांची लागवड केली आहे.
****
माजी मंत्री तथा काँग्रेचे ज्येष्�� नेते रोहिदास चुडामण पाटील यांचं आज धुळे इथं निधन झालं, ते ८४ वर्षांचे होते. पाटबंधारे आणि अन्य खात्याचं मंत्रिपद भूषवलेल्या रोहिदास पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत अक्कलपाडा आणि अन्य प्रकल्प पूर्णत्वास नेले. काँग्रेस पक्षातही अनेक पदं त्यांनी भूषवली. त्यांच्या पार्थिव देहावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रोहिदास पाटील यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा अभिष्टचिंतन सोहळा छत्रपती संभाजीनगर इथं आज पार पडला. बागडे यांनी नुकतेच ऐंशीव्या वर्षात पदार्पण केलं, त्यानिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी गृहनिर्माण, इतर मागास आणि बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड, आमदार विक्रम काळे, यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. बागडे यांनी समर्पित भावनेनं राष्ट्र निर्मितीसाठी केलेलं कार्य सर्वांसाठी दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार गडकरी यांनी काढले. बागडे यांच्या जीवन प्रवासावर आधारित 'माझा प्रवास' या पुस्तकाचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं.
****
जागतिक पर्यटन दिन आज साजरा होत आहे. ‘पर्यटन आणि शांतता’ ही यंदाच्या पर्यटन दिनाची संकल्पना आहे. यानिमित्त नवी दिल्ली पर्यटन मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमाचं उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते करण्यात आलं.
पर्यटन मंत्रालयाच्या महासंचालक मुग्धा सिन्हा यांनी या निमित्तानं आकाशवाणीला विशेष मुलाखत दिली, जागतिक पातळीवर शांती आणि समृद्धीसाठी ग्रामीण पर्यटन तसंच महिला आणि युवा सक्षमीकरणावर भर देणाऱ्या पर्यटनाची आवश्यकता, मुग्धा सिन्हा यांनी व्यक्त केली.
****
केंद्रीय पर्यटन मंत्रालयानं सर्वोत्कृष्ट पर्यटन गाव स्पर्धेचे निकाल आज जाहीर केले. विविध आठ श्रेणींमध्ये ३६ गावांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये कृषी पर्यटनासाठीचा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातल्या कर्दे गावाला जाहीर झाला आहे. तर आध्यात्मिक आणि आरोग्य क्षेत्राचा पुरस्कार गोव्यात फोंडा तालुक्यातल्या बांदोरा गावानं पटकावला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वेरूळ इथं पर्यटन विकास महामंडळाच्या राष्ट्रकूट पर्यटक निवासाचं लोकार्पण पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आज दूरदृश्यप्रणालीव्दारे झाले. हेलीपॅड तसंच जागतिक दर्जाचे अभ्यागत केंद्र याठिकाणी उभारण्यात आलं आहे.
****
जागतिक पर्यटन दिना निमित्त छत्रपती संभाजीनगर इथं ‘शाश्वत पर्यटन - एक सहयोग पूर्ण वाटचाल’ या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यामध्ये भारतीय पुरातत्व विभागाचे अधीक्षक डॉ.शिवकुमार भगत, पत्र सूचना कार्यालयाच्या उपसंचालिका जयदेवी पुजारी स्वामी, जिल्हा माहिती अधिकारी डॉ.मिलिंद दुसाने, पर्यटन मंत्रालयाच्या सहाय्यक संचालिका मालती दत्त यांनी ग्रामीण पत्रकारांशी संवाद साधत पर्यटन वाढीसाठी सहायक बाबींवर चर्चा केली.
दरम्यान, जागतिक पर्यटन दिनानिमित्त वेरूळ लेणी इथं दोन दिवसीय मल्टीमीडिया चित्रप्रदर्शन भरवण्यात आलं आहे. डॉ. भगत यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. या प्रदर्शनात देशभरातील प्रमुख पर्यटन स्थळांच्या छायाचित्रांबरोबरच संक्षिप्त स्वरुपातील माहिती चित्रफितींद्वारे देण्यात येत आहे. हे प्रदर्शन उद्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत, सर्वांसाठी खुलं आहे.
****
कानपूर इथं सुरू असलेल्या भारत आणि बांगलादेशदरम्यान दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज पहिला दिवसाचा खेळ पाऊस आणि पुरेशा प्रकाशाअभावी लवकर थांबवण्यात आला. बांगलादेशनं दिवसअखेर तीन बाद १०७ धावा केल्या आहेत.
****
मकाऊ खुल्या बॅडमिंटन महिला दुहेरीत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीने उपांत्य फेरीत प्रवेश केला. आज झालेल्या सामन्यात त्रिशा आणि गायत्री जोडीने तैवानच्या जोडीचा २१-१२, २१-१७ असा पराभव केला. उद्या उपांत्य फेरीत यांचा सामना तैवानच्या अन्य एका जोडीशी होईल. दरम्यान, पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत किदाम्बी श्रीकांतचा पराभव झाला.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने पुढील ३० वर्षांसाठी शहराची स्वतंत्र जलनिती तयार केली आहे. या जलनीतीचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतंच प्रकाशन करण्यात आलं आहे. या जलनितीचा मसुदा छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या छत्रपती संभाजीनगर एम सी डॉट ओआरजी या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आलेला आहे. या जलनिती बाबत आपले आक्षेप आणि सूचना लेखी स्वरुपात महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात ६० दिवसांच्या आत दाखल करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात परंडा तालुक्यातला सीना कोळेगाव सिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेनं भरला आहे. कालपासून धरणाचे १७ दरवाजे उघडून तीस हजार घनफूट प्रति सेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
****
हिंगोली नगरपरिषदेच्या वतीनं सफाई मित्र सुरक्षा आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं. मुख्य अधिकारी अरविंद मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या शिबिरात १६० सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.
****
स्वच्��ता ही सेवा अभियानांतर्गत आज परभणी महानगरपालिकेच्या वतीनं शहरात जनजागृतीपर पथनाट्य सादर करण्यात आलं. या पथनाट्यातून कचरा वर्गीकरण, आपला कचरा आपली जबाबदारी याबाबत जनजागृती करण्यात आली.
****
0 notes
Text
राज्यातील 14 जिल्ह्यांचे निर्बंध शिथिल | नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि हॉटेल्स 100 टक्के क्षमतेने सुरू, नवी नियमावली जारी
राज्यातील 14 जिल्ह्यांचे निर्बंध शिथिल | नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि हॉटेल्स 100 टक्के क्षमतेने सुरू, नवी नियमावली जारी
इतर जिल्ह्यांसाठी नियम काय? मुंबई : कोरोना संसर्गाचा प्रभाव ओसरल्याने राज्य सरकारने नवी नियमावली जारी केली आहे. या नुसार राज्यातील नाट्यगृहे, सिनेमागृहे आणि हॉटेल्स 100 टक्के क्षमतेने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे, भंडारा, सिंधुदुर्ग, नागपूर, रायगड, वर्धा, रत्नागिरी, सातारा, सांगली, गोंदिया, चंद्रपूर, कोल्हापूर आदी जिल्ह्यांचा यात समावेश असून या जिल्ह्यात…
View On WordPress
0 notes
Text
नवा करोना विषाणू : केंद्रानं जाहीर केली नवी नियमावली
नवा करोना विषाणू : केंद्रानं जाहीर केली नवी नियमावली
ब्रिटनम��्ये आढळलेल्या नव्या करोना विषाणूच्या रुपानंतर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नवी नियमावली (Mutant Coronavirus Strain SOPs) जाहीर करण्यात आलीय. नव्या नियमानुसार, यूकेहून येणाऱ्या प्रवाशांपैंकी नव्या करोना स्ट्रेनसहीत संक्रमित आढळलेल्या रुग्णांना वेगळ्या आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात येणार आहे. याशिवाय करोना संक्रमित आढळलेल्या सह-प्रवाशांना इन्स्टिट्युशनल क्वारंटीनमध्ये ठेवण्यात येईल. सरकारनं…
View On WordPress
#mutant coronavirus strain sops#new mutant coronavirus strain sops released#separate isolation#आरटी-पीसीआर चाचणी#आरटी-पीसीआर टेस्ट#करोना पॉझिटिव्ह#करोना विषाणूचा नवा प्रकार#केंद्रीय आरोग्य मंत्रालय#नवा करोना विषाणू#नवी नियमावली
0 notes
Text
वाढदिवसाच्या आनंदावर नियमांची फुंकर!, बर्थडे केक आता ‘Happily’ कापता येणार नाही, वाचा नवी नियमावली…
वाढदिवसाच्या आनंदावर नियमांची फुंकर!, बर्थडे केक आता ‘Happily’ कापता येणार नाही, वाचा नवी नियमावली…
वाढदिवसाच्या आनंदावर नियमांची फुंकर!, बर्थडे केक आता ‘Happily’ कापता येणार नाही, वाचा नवी नियमावली… सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी मुंबई : आपला वाढदिवस आनंदात साजरा व्हावा, अशी सगळ्यांचीच इच्छा असते. पण या तुमच्या आनंदावर नियमांचं विरझण पडणार आहे. कारण सरकारने कालपासून 1 जुलैपासून देशभरात एकेरी वापराच्या (सिंगल यूज) प्लास्टिकवर (Plastic) बंदी घातली आहे. त्यामुळे अनेक रोजच्या वापराच्या वस्तूंवर बंदी…
View On WordPress
#‘happily’#आजची बातमी#आता#आताची बातमी#आनंदावर#कापता#केक#ठळक बातमी#ताजी बातमी#नवी#नाही#नियमांची#नियमावली#फुंकर#बर्थडे;#बातम्या#भारत बातम्या#भारत बातम्या मराठी#भारत लाईव्ह मीडिया#मराठी न्यूज#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र न्यूज#महाराष्ट्र बातम्या#महाराष्ट्र समाचार#येणार#राजकारण#वाचा#वाढदिवसाच्या
0 notes
Text
ठाकरे सरकारकडून होळी, धुळवडीवरील निर्बंध मागे; नवी नियमावली जाहीर
ठाकरे सरकारकडून होळी, धुळवडीवरील निर्बंध मागे; नवी नियमावली जाहीर....
करोनाच्या पार्श्वभूमीवर होळी आणि धुळवडीवर घालण्यात आलेले निर्बंध राज्य सरकारने मागे घेतले आहेत. राज्य सरकारने होळी रात्री १० च्या आत पेटवण्याचं बंधन घातलं होतं. तसंच परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी डिजेबरोबरच मोठ्या आवाजात ध्वनिक्षेपक लावण्यासही बंदी घालण्यात आली होती. यानंतर विरोधकांसह सर्वसामान्यांकडून नाराजी जाहीर करण्यात आली होती. यानंतर राज्य सरकारने अखेर हे…
View On WordPress
0 notes
Text
आजपासून नवी नियमावली ; महाराष्ट्रात निर्बंध शिथिल
आजपासून नवी नियमावली ; महाराष्ट्रात निर्बंध शिथिल
कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आल्याने महाराष्ट्र सरकारने कोरोनाची नवीन नियमावली जाहीर केली आहे. १ फेब्रुवारीपासून नवीन नियमावली लागू होणार आहे. अपेक्षेनुसार, निर्बंधामध्ये सूट देण्यात आली आहे. पण सूट देण्यात आलेल्या ठिकाणी जायचे असेल तर लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. ओमायक्रॉनची ला�� नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने…
View On WordPress
0 notes
Text
राज्यात उद्या पासून नवी नियमावली लागू - काय आहेत नवे नियम, मराठ��� pdf डाऊनलोड
0 notes
Text
कोरोना उद्रेक... केंद्राकडून नवीन गाईडलाईन्स जाहीर; पहा काय आहे नवी नियमावली. https://beed24.in/corona-eruption-center-announces-new-guidelines-see-what-the-new-rules-are/
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 August 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेपाला मुंबई उच्च न्यायालयाचा नका��
शेतपिकांसाठी नुकसान भरपाई देण्याच्या प्रक्रियेचं डिजिटायझेशन, केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती
पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्याकरता नवीन धोरण आणण्यात येईल - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
तांत्रिक अडचणींमुळे छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानदारांचा ई-पॉस मशीनला विरोध
आणि
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बीडचा अविनाश साबळे तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात अंतिम फेरीत, पुरुष हॉकी संघाची उपान्त्य फेरीत आज जर्मनीविरुद्ध लढत
****
राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने'च्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करता येणार नाही, असं मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. ही योजना सर्वसामान्य करदात्यांच्या पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप करत, नवी मुंबईतले चार्टर्ड अकाऊंटंट नावेद मुल्ला यांनी या योजनेविरोधात जनहित याचिका दाखल केली होती. मात्र ही योजना म्हणजे सरकारनं अर्थसंकल्पाच्या अंतर्गत घेतलेला निर्णय आहे, त्याला आव्हान कसं देता येईल, असं म्हणत न्यायालयानं कालच्या सुनावणीत ही याचिका फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे या योजनेअंतर्गत १४ ऑगस्टला मिळणाऱ्या पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळल्याबद्दल महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी न्यायालयाचे ट्विटरवरून आभार मानले आहेत. केवळ विरोध म्हणून या योजनेला देण्यात आलेलं आव्हान न्यायालयाने फेटाळल्यानं या योजनेची विश्वासार्हता अधिकच वाढली असल्याचं तटकरे यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, महिला बचतगटांसाठीच्या यशस्विनी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचं काल तटकरे यांच्या हस्ते ऑनलाइन उद्घाटन झालं. महिला बचतगटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा पथदर्शी उपक्रम सुरू करण्यात आला आहे, यामुळे महिला बचत गटांना आर्थिक उन्नतीचा नवा मार्ग उपलब्ध होईल, असं त्या म्हणाल्या.
****
शेतपिकांसाठी नुकसान भरपाई देण्याच्या प्रक्रियेचं डिजिटायझेशन केलं जाणार असल्याचं, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल राज्यसभेत सांगितलं. यासाठी शेतकऱ्यांना आधारच्या धर्तीवर डिजिटल ओळखपत्र दिलं जाणार असून, दरवर्षी पेरणीनंतर धान्याची उगवण झाल्यावर त्याची चित्रफीत संरक्षित केली जाईल. आणि नुकसान झाल्यास, प��त्रतेनुसार भरपाई दिली जाईल, असं त्यांनी सांगितलं. शेतीचे लाभ वाढवण्यासाठी विविध विभागांच्या एकीकृत सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न केले जात असल्याचंही चौहान म्हणाले.
****
पुराचा धोका कायमस्वरुपी दूर करण्याकरता नवीन धोरण आणण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पुण्यातल्या पूरग्रस्त भागाची काल पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. पूरबाधित घरांचा प्रश्न मार्गी लावण्याकरता नवीन विकास नियंत्रण आणि प्रोत्साहन नियमावली तयार करण्यात येईल, घरांच्या पुर्नविकासासाठी कायद्यात तसंच नियमातही बदल करण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. यावेळी त्यांच्या हस्ते पूरबाधित नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथसागर धरणाची पाणी पातळी १५०० फुटांवर पोहोचली आहे. धरणातला जिवंत पाणीसाठा ३२३ पूर्णांक १८८ दशलक्ष घनफूट इतका झाला आहे. धरणामध्ये सध्या ६६ हजार ३६७ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक होत असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल विधानसभेसाठी मुंबईतल्या शिवडीतून बाळा नांदगावकर आणि पंढरपूरमधून दिलीप धोत्रे या उमेदवारांची घोषणा केली आहे. महाराष्ट्र दौरा नवनिर्माण यात्रेदरम्यान काल सोलापूर इथं त्यांनी ही घोषणा केली.
****
स्वस्त धान्य दुकानदारांनी काल ई पॉस मशीनच्या वापराविरोधात ठिकठिकाणी आंदोलन करत या मशीन प्रशासनाकडे जमा केल्या.
जालना शहरातल्या स्वस्त धान्य दुकानदारांनी तहसील कार्यालयात या मशीन जमा केल्या. इंटरनेट सेवा वारंवार खंडीत होत असल्याने दुकानदार आणि लाभार्थ्यांमध्ये वाद होतात, त्यामुळे ऑफलाईन पद्धतीने धान्य वाटपाची परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मंठा, बदनापूर, परतूर या ठिकाणीही स्वस्त धान्य दुकानदारांनी ई-पॉस मशीन प्रशासनाला परत केल्या.
छत्रपती संभाजीनगर इथं स्वस्त धान्य दुकानदारांनी ई पॉस मशीनची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली. इंटरनेट सेवा खंडीत होत असल्याने, धान्य असूनही त्याचं वितरण करता येत नाही, त्यामुळे ऑफलाईन पद्धत धान्य वितरणासाठी योग्य असल्याचं दुकानदारांनी सांगितलं.
परभणी शहरातल्या स्वस्त धान्य दुकानदार संघटनांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं.
****
पूजा खेडकर प्रकरणानंतर राज्यातून दीडशे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस असल्याची यादी आपल्याकडे प्राप्त झाली आहे, ही यादी आपण शासनाकडे पाठवली असून, त्यांच्याविरोधात कडक कारवाईची गरज, दिव्यांग कल्याण विभागाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केली आहे. काल हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी इथं शेतकरी आणि कार्यकर्ता मेळाव्यासाठी आले असता ते पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभेच्या आगामी निवडणुका शेतकरी आणि शेतमजुरांच्या प्रश्नावर लढवणार असल्याचं कडू यांनी यावेळी सांगितलं.
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये बीडच्या अविनाश साबळेनं ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकाराच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारा अविनाश, हा पहिला भारतीय क्रीडापटू ठरला आहे. आठ ऑगस्ट रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी खेळवण्यात येणार आहे. त्यापूर्वी, टेबल टेनिसमध्ये मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत या खेळाडूंच्या चमूनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ आज उपांत्य फेरीत जर्मनी विरुद्ध खेळणार आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा पहिल्या फेरीसाठी मैदानात उतरेल. तर महिला कुस्तीपटू विनेश फोगट आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. पुरुष टेबल टेनिसमध्येही आज उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. दरम्यान, काल बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा कांस्यपदकासाठीच्या लढतीत पराभव झाला.
****
राष्ट्रवादी काँग्रेसची 'जनसन्मान' यात्रा येत्या आठ ऑगस्टपासून नाशिकच्या दिंडोरी इथून सुरू होणार आहे. प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यात्रेचा पहिला टप्पा उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा असून, हा टप्पा ३१ ऑगस्टला संपणार आहे.
****
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी प्राप्त अर्जांची ऑनलाईन छाननी प्रक्रिया लातूर जिल्ह्यात सुरळीतपणे सुरू आहे. प्रत्येक तालुकास्तरावर छाननी शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे. लातूर पंचायत समिती इथं आयोजित शिबिराला जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भेट देऊन प्रक्रिया गतिमान करण्याच्या सूचना दिल्या.
दरम्यान, 'माझं लातूर, हरित लातूर' अभियानाअंतर्गत काल लातूर तालुक्यातल्या नागझरी ग्रामपंचायतीच्यावतीनं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ५१ बेल वृक्षांची लागवड करण्यात आली.
****
दूध भेसळखोरांविरोधात विरोधात मकोका कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी माजी मंत्री सुरेश धस यांनी केली आहे. ते काल बीड जिल्ह्यातल्या आष्टी इथं वार्ताहरांशी बोलत होते. गेल्या रविवारी कडा परिसरात झालेल्या भेसळखोरांवर कडक कारवाई व्हावी, असंही ते यावेळी म्हणाले. सरकारने राज्यातल्या दूध देणार्या जनावरांचा, किती लिटर दूध दररोज जमा होतं याचं सर्वेक्षण करावं, जेणेकरुन भेसळखोरांवर आळा बसेल, अशी मागणीही धस यांनी यावेळी केली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं मनपा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून एक तास शहरासाठी हे स्व���्छता अभियान राबवलं जात आहे. या अभियानात काल पैठण गेट ते गुलमंडी परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. फेरीवाले, रिक्षाचालक तसंच विविध संघटना तसंच स्वयंसेवकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजनेचे पंधरा हजार विद्यार्थी या मोहिमेत श्रमदान करणार आहेत.
****
भगवंत देशमुख विशेष वाङ्गमय पुरस्कार दैवतांची सत्यकथा या ग्रंथासाठी यवतमाळ इथले डॉ. अशोक राणा यांना प्रदान करण्यात आला. कुमार देशमुख नाट्य पुरस्कार ऋग्वेदातील नाट्यसंहिता या ग्रंथासाठी लक्ष्मीकांत धोंड यांना, तर कुसुतमाई देशमुख काव्य पुरस्कार हंबरवाटा या काव्यसंग्रहासाठी गंगापूर इथले संतोष आळंजकर यांना प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर इथं काल झालेल्या या कार्यक्रमात मसापचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे यावेळी उपस्थित होते.
****
धाराशिव जिल्ह्यात सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीत २१ वा पशुगणना कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यात १११ प्रगणक आणि २६ पर्यवेक्षकांची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरु आहे. जिल्ह्यातले शेतकरी-पशुपालकांनी पशुधनाची माहिती देऊन सहकार्य करावं, असं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
ओमिक्रॉनचा धोका | राज्यात नवी नियमावली जाहीर, काय आहेत नवे निर्बंध?
ओमिक्रॉनचा धोका | राज्यात नवी नियमावली जाहीर, काय आहेत नवे निर्बंध?
मुंबई : राज्यात ओमिक्रॉनचा धोका वाढला आहे. दिवसेंदिवस ओमिक्रॉनचा (Omicron) फैलाव वाढताना दिसत आहे. अशावेळी राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. संसदीय कार्यमंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी नव्या नियमावलीची (Corona Guidelines) घोषणा केली आहे. त्यानुसार आज रात्रीपासून राज्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत ही जमावबंदी असणार आहे. विशेषत: युरोप…
View On WordPress
0 notes
Text
कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भवावर मुंबई पालिकेतर्फे विविध तरतुदी
कोरोनाच्या वाढत्या प्रदुर्भवावर मुंबई पालिकेतर्फे विविध तरतुदी
मुंबईतील रहिवासी इमारतींसाठी नवी नियमावली जारी मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. मुंबईतही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे मुंबई पालिकेने कोरोना निर्बंध कडक करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर मुंबईतील शाळा बंद ठेण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला आहे. त्यापाठोपाठ आता कोरोना रुग्ण आढळून आलेली इमारत सील करण्याबाबतही महापालिकेने नवी नियमावली जाहीर केली…
View On WordPress
0 notes
Text
guidelines for holi: होळीनिमित्त राज्य सरकारचा मोठा निर्णय; सणासाठी नवी नियमावली जाहीर
guidelines for holi: होळीनिमित्त राज्य सरकारचा मोठा निर्णय; सणासाठी नवी नियमावली जाहीर
guidelines for holi: होळीनिमित्त राज्य सरकारचा मोठा निर्णय; सणासाठी नवी नियमावली जाहीर राज्य सरकारने होळी आणि धुलिवंदनासाठी (रंगपंचमी) नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार करोना संसर्गाची स्थिती नियंत्रणात असली तरी करोना पूर्ण गेलेला न��ल्याने हा सण शक्यतो गर्दी न करता कोविड अनुरूप वर्तणूक नियमांचे पालन करून साजरा करण्यात यावा, असे आवाहन राज्याच्या गृह विभागाने जारी केलेल्या नव्या…
View On WordPress
0 notes
Text
राज्यात पुन्हा निर्बंध; रात्री जमावबंदी, नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवरही बंधने; आज नवी नियमावली
रात्री जमावबंदी, नववर्ष स्वागताच्या कार्यक्रमांवरही बंधने; आज नवी नियमावली मुंबई : महाराष्ट्रासह देशात करोनाच्या उत्परिवर्तित ओमायक्रॉन विषाणूचे सावट गडद झाले असून, राज्यात पुन्हा निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. त्यानुसार आज, शुक्रवारपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात येणार असून, याबाबत आज नियमावली जाहीर करण्यात येई��. गेल्या २४ तासांत मुंबईतील ६०२ जणांसह राज्यभरात ११७९ करोनाबाधित आढळले. या…
View On WordPress
0 notes
Text
वाढत्या कोविड संसर्ग रोखण्यासाठी उद्या नवी नियमावली जाहीर होणार
वाढत्या कोविड संसर्ग रोखण्यासाठी उद्या नवी नियमावली जाहीर होणार
मुंबई, दि. २३ :- राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर आज टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने…
View On WordPress
0 notes
Text
कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका, मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन
कोरोनाचे दूत बनून इतरांचे आरोग्य धोक्यात आणू नका, मुख्यमंत्री ठाकरेंचे आवाहन
राज्यात नवी नियमावली जाहीर… मुंबई : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या निर्बंधांची १० जानेवारीपासून अंमलबजावणी होणार आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेला कळकळीचं आवाहन केलं आहे. रोजीरोटी बंद करायची नाही पण आरोग्याचे नियम पाळण्यात हलगर्जी करू नका, कोरोनाचे दूत बनून इतरांचे…
View On WordPress
0 notes
Text
नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोविडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आज नवी नियमावली जाहीर होणार
नाताळ व नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोविडचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आज नवी नियमावली जाहीर होणार
मुंबई, दि. २३ :- राज्यातल्या कोविड रुग्ण संख्येत होणारी वाढ लक्षात घेता संसर्ग रोखण्यासाठी कशाप्रकारे निर्बंध लावता येतील यावर आज टास्क फोर्स सदस्यांची बैठक झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आगामी नाताळ, नववर्ष स्वागत असे प्रसंग लक्षात घेऊन कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने…
View On WordPress
0 notes