#देवीनं
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०९ मे २०२३ सकाळी ११.०० वाजता****
जी २० देशांच्या विकास कार्यसमितीची तिसरी बैठक आज गोव्यात सुरु होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काल महिला केंद्रीत विकास या विषयावर घेण्यात आलेल्या चर्चासत्रात, महिलांच्या अर्थकारण, सामाजिक, सांस्कृतीक आणि राजकीय निर्णयातल्या सहभागाबाबत उहापोह करण्यात आला.
****
मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर याचं आज मुंबईत हृद्यविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ६३ वर्षांचे होते. महाडेश्वर पहिल्यांदा २००२ मध्ये नगरसेवक म्हणून मुंबई महानगरपालिकेत निवडून गेले होते. मार्च २०१७ ते नोव्हेंबर २०१९ या काळात ते मुंबईचे महापौर होते. ४० वर्षाहून अधिक काळ ते शिवसेनेत कार्यरत होते. त्यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत. शिवसेना नेते माजी मंत्री अनिल परब यांनी महाडेश्वर यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
****
नवी दिल्लीत काल आर्थिक स्थैर्य आणि विकास परिषदेची बैठक केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झाली. असुरक्षितता कमी करुन आर्थिक स्थैर्य प्राप्त करण्यासाठी नियामकांनी योग्य ती पावलं उचलावीत, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. आर्थिक माहितीचं संरक्षण करण्याच्या आणि सायबर हल्ले टाळण्याच्या दृष्टीनं माहिती तंत्रज्ञानाबाबत नियामकांनी अधिक सजग राहायला हवं, असं त्यांनी सांगितलं.
****
भारतीय रेल्वेनं गेल्या महिन्यात १२६ मेट्रिक टनापेक्षा जास्त मालवाहतूक केली. एप्रिल महिन्यातली वाढीव माल वाहतूक सव्वा चार टन असून, गेल्या वर्षातल्या एप्रिल महिन्यातल्या वाहतुकीच्या तुलनेत ही वाढ तीन पूर्णांक पाच दशांश टक्के इतकी आहे. या माल वाहतुकीच्या माध्य��ातून भारतीय रेल्वेनं १३ हजार ८९३ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.
****
राज्यात काल कोविड १९ च्या ७६ नव्या रुग्णांची नोंद झाली, १७६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर एका रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात १ हजार ५२७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
दक्षिण कोरियात जिंजू इथं झालेल्या आशियाई भारत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तीन रौप्य पदकांची कमाई केली. महिला श्रेणीत, बिंद्याराणी देवीनं दोन, तर पुरुषांच्या ६७ किलो स्नॅच प्रकारात जेरेमी लालरिनुंगानं एक रौप्य पदक जिंकलं.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
Eknath Shinde: कामाख्या देवीनं कुणाचा बळी घेतला? संजय राऊतांच्या शिवराळ टिकेला एकनाथ शिंदेंचं सडेतोड उत्तर
Eknath Shinde: कामाख्या देवीनं कुणाचा बळी घेतला? संजय राऊतांच्या शिवराळ टिकेला एकनाथ शिंदेंचं सडेतोड उत्तर
Eknath Shinde: कामाख्या देवीनं कुणाचा बळी घेतला? संजय राऊतांच्या शिवराळ टिकेला एकनाथ शिंदेंचं सडेतोड उत्तर गुवाहाटीत असताना शिंदे आणि बंडखोर आमदारांनी आसाममधील प्रसिद्ध कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिंदे आणि बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली होती. राऊत यांच्या टीकेलाही आज एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलंय. मुंबई : विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 October 2019 Time 7.10 AM to 7.20 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ ऑक्टोबर २०१९ सकाळी ७.१० मि. ****  विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात चार हजार सातशे ऐकोणचाळीस उमेदवारांचे अर्ज वैध  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राधाकृष्ण विखे पाटील आणि अर्जुन खोतकर, यांच्याविरूद्धचे आक्षेप फेटाळले  टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा धावपटू अविनाश साबळे पात्र आणि  विशाखापट्टणम कसोटी क्रिके�� सामन्यात दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३९५ धावांचं लक्ष्य **** विधानसभा निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची काल छाननी झाली. त्यामध्ये राज्यातल्या सर्व २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये एकूण दाखल पाच हजार ५४३ उमेदवारांपैकी चार हजार सातशे ऐकोणचाळीस उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्रुटी आढळल्यानं ७९८ उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले असल्याची माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी श्री. दिलीप शिंदे यांनी दिली. मराठवाड्यात एक हजार २०७ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व नऊ मतदार संघातून २०८ उमेदवारांचे २७० अर्ज वैध ठरले. औरंगाबाद पश्चिम मतदार संघातले काँग्रेस आघाडीचे उमेदवार रमेश गायकवाड यांचा अर्ज अवैध ठऱला आहे. औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघात चार उमेदवारांचे अर्ज प्रस्तावकांची संख्या अपुरी असल्याने बाद झाले, या मतदारसंघातून आता २७ पैकी २३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. बीड जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदारसंघांत २०२ उमेदवारांचे २७० अर्ज वैध ठरले, तर परभणी जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघातून एकूण ८१ उमेदवारांचे १०९ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. लातूर जिल्ह्यातल्या सहा विधानसभा मतदार संघातून १२० उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. नांदेड जिल्ह्यातल्या नऊ मतदारसंघात ३२७ उमेदवारी अर्ज, हिंगोली जिल्ह्यातल्या तीन मतदारसंघात ५४ उमेदवारी अर्ज, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या चार मतदारसंघात ८२ उमेदवारी अर्ज, तर जालना जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघात १३३ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. **** मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अर्जासोबतच्या शपथपत्रावर नोटरीची मुदत संपली असल्याचं सांगत इतर उमेदवारांनी अर्ज रद्द करण्याची मागणी केली होती. मात्र निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नोटरीचं प्रमाणपत्र तपासल्यानंतर ही मागणी फेटाळून लावली. अहमदनगर जिल्ह्यातले शिर्डी मतदारसंघातले उमेदवार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरूद्धही अशाच प्रकारचा घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्याने फेटाळला. जालना विधानसभा मतदार संघातले शिवसेनेचे उमेदवार अर्जुन खोतकर, काँग्रेसचे उमेदवार कैलास गोरंट्याल आणि बहुजन समाज पार्टीचे उमेदवार अब्दुल रशीद यांच्या उमेदवारी अर्जातल्या प्रतिज्ञा पत्रावरील आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळले. तर घनसावंगी मतदार संघातले शिवसेनेचे उमेदवार हिकमत उढाण यांच्या उमेदवारी अर्जासोबच्या शपथपत्रात अपूर्ण माहिती आणि दाखल गुन्ह्यांचा उल्लेख नसणं या आक्षेपांवर पाच तास झालेल्या सुनावणीअंती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उढाण यांचा अर्ज वैध ठरवला आहे. **** परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड विधानसभा मतदार संघातून विशाल कदम हेच महायुतीचे उमेदवार असल्याचं, खासदार संजय जाधव यांनी सांगितलं आहे. ते काल गंगाखेड इथं वार्ताहरांशी बोलत होते. या मतदार संघातून शिवसेनेचे विशाल कदम आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे यांनी अर्ज दाखल केला आहे, हे दोन्ही पक्ष महायुतीचे घटकपक्ष असल्याने, महायुतीचा नेमका उमेदवार कोण, याबद्दल संभ्रम होता, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ही बाब स्पष्ट करतील, असं ��ासदार जाधव यांनी सांगितलं. **** शिवसेनेचा विरोध असतानाही कणकवली मतदार संघातून भाजपने निलेश राणे यांना उमेदवारी दिली, हे चुकीचं असून, येत्या दसऱ्याच्या मेळाव्यात याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भूमिका स्पष्ट करतील, असं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं आहे. त्या काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. **** विविध समाजाच्या सोबतीनं विधानसभा निवडणुकीत शिवसेना इतिहास घडवेल, असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ओबीसी, धनगर, आगरी, भटके विमुक्त यासह विविध समाजाच्या नेत्यांबरोबर त्यांनी काल मुंबईत चर्चा केली. त्यानंतर ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. यावेळी ओबीसी नेते हरिभाऊ राठोड आणि धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांच्यासह विविध समाजाच्या नेत्यांनी शिवसेनेला पाठींबा जाहीर केला. आरक्षणासारखे प्रश्नं वैधानिक मार्गानं सोडवता येतील, असं त्यांनी सांगितलं. शिवसेना, मुंबईत आरे परिसरातधला वृक्षतोडीचा ‘मुद्दा सोडणार नाही, लवकरच यावर रोखठोक भूमिका मांडणार असल्याचं ठाकरे यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, आरे कॉलनीतली सुमारे अडीच हजार झाडं कापण्यास विरोध करणाऱ्या ३८ आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्यात असून, आंदोलकांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी रात्रीपासून काल सायंकाळपर्यंत पाचशेहून अधिक झाडं तोडण्यात आली आहेत. **** भारतीय जनता पक्ष - शिवसेनेच्या युतीत मित्रपक्षांना अल्प जागा मिळाल्यामुळे ही निवडणूक युतीला अवघड असल्याची टीका, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. या निवडणुकीत रिपाईला दहा जागा तरी हव्या असताना प्रत्यक्षात सहाच जागा देण्यात आल्या, मात्र असं असलं तरी, युतीत कायम राहू, असंही आठवले यावेळी म्हणाले. **** पात्र मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी राज्य शासनानं येत्या २१ ऑक्टोबरला मतदानाच्या दिवशी सर्व विधानसभा मतदार संघात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. राज्य आणि केंद्र शासनाची कार्यालयं, निमशासकीय कार्यालयं, महामंडळे, मंडळे, सार्वजनिक उपक्रम, बँका आदींनाही ही सार्वजनिक सुट्टी लागू राहील, असं शासनाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. **** राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आपल्या स्टार प्रचारकांची यादी काल मुंबईत जाहीर केली. यात पक्षाध्यक्ष शरद पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, अजित पवार, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांच्यासह चाळीस जणांचा ��मावेश आहे. दरम्यान, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, ज्योतिरादित्य शिंदे, मल्लिकार्जुन खरगे, हे काँग्रेसचे प्रमुख प्रचारक असतील. **** शासकीय संकेतस्थळांवरच्या मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती तात्काळ बंद करा, अशी मागणी काँग्रेसनं मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे पत्र लिहून केली आहे. आचारसंहिता लागू असताना, अशा जाहिराती झळकणं हा आचारसंहिता भंगाचा गुन्हा आहे, मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी केली आहे. **** विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव तालुक्यातल्या रि���ोड रस्त्यावर वाढोणा पाटी इथं काल दुचाकीवरून येणारी २० लाख रूपयांची रोकड पोलिसांनी पकडली. तपासणीत सदर रोकड ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची असल्याचं निष्पन्न झालं असून, बँक कोषागारमध्ये ही रक्कम जमा करण्यात आली आहे. **** उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं काल शारदीय नवरात्रोत्सवात तुळजाभवानी मातेची भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांना देवीनं आशीर्वादरुपी तलवार भेट दिल्याच्या आख्यायिकेच्या पार्श्वभूमीवर ही भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात येते. आज अष्टमीनिमीत वैदिक होमहवन होत असून, धार्मिक अनुष्ठानाची सांगता होत आहे. **** आगामी टोकियो ऑलिंपिकमधे तीन हजार मीटर धावण्याच्या शर्यतीसाठी महाराष्ट्राचा अविनाश साबळे पात्र ठरला आहे. काल दोहा इथं जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत, अविनाशने ८ मिनिटं आणि २१ पूर्णांक ३७ शतांश सेकंद वेळेत हे अंतर पार स्वतःचाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला. गेल्या गुरुवारी पहिल्या फेरीत त्यानं ८ मिनिटं आणि २५ पूर्णांक २३ शतांश सेकंदांत हे अंतर पार केलं होतं. दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये वीस किलो मीटर चालण्याच्या स्पर्धेत के. टी. इरफान पात्र ठरला आहे. **** विशाखापट्टणम इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी ३९५ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. कालच्या चौथ्या दिवस अखेर दक्षिण आफ्रिकेच्या एक बाद ११ धावा झाल्या होत्या. तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ४३१ धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर भारतानं आपला दुसरा डाव चार बाद ३२३ धावांवर घोषित केला. दुसऱ्या डावातही सलामीवीर रोहीत शर्मानं शतक झळकावलं, पहिल्या डावात भारताला ७१ धावांची आघाडी मिळाली होती. **** मुंबईनजिक कर्जत जवळ रेल्वे मार्गाच्या कामामुळे नांदेड ते पनवेल ही रेल्वे गाडी येत्या १२ ऑक्टोबरला रद्द करण्यात आली आहे. परिणामी १३ ऑक्टोबरला पनवेलहून नांदेडला जाणारी गाडीही रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, सहा ते १५ ऑक्टोबर दरम्यान नांदेड – पनवेल ही गाडी पुण्यापर्यंतच धावेल, आणि पनवेल ते नांदेड ही गाडी सात ते १६ ऑक्टोबर दरम्यान पुणे ते नांदेड अशी धावणार असल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं कळवलं आहे. **** पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस यांना सतरा ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. बँकेत सुमारे चार हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपयांचा घोटाळा केल्या प्रकरणी थॉमस यांना अटक करण्यात आली आहे. बँकेच्या आर्थिक व्यवहारांवर यापूर्वीच सहा महिन्यांसाठी निर्बंध घालण्यात आलेले आहेत. ***** ***
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 September 2018 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १४ सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि. ****
·      राज्यात हर्षोल्हास आणि ढोल ताशांच्या गजरात गणेशोत्सवाला प्रारंभ.
·      विजय मल्ल्या प्रकरण���वरून राजकीय पक्षांमध्ये आरोप – प्रत्यारोप.
·      न्यायमूर्ती रंजन गोगोई भारताचे ४६वे सरन्यायाधीश.
·      जगमित्र सूत गिरणीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह आठ संचालकांच्या मालमत्तेवर न्यायालयाचे निर्बंध.
आणि
·      जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत किदम्बी श्रीकांत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत तर भारतीय महिला क्रिकेट संघानं श्रीलंकेचा सात धावांनी पराभव करत दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकला.
****
राज्यात गणेशोत्सवाला कालपासून हर्षोल्हासात आणि ढोल ताशांच्या गजरात प्रारंभ झाला. घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठ्या भक्तीभावानं गणेशाची स्थापना केल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. बळीराजा सुखी व्हावा, राज्यातील दुष्काळी भागात पाऊस पडावा आणि नागरिकांना सुखसमाधान, चांगलं आरोग्य मिळावं, अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याचं, त्यांनी सांगितलं. या उत्सवातून समाज अधिक एकसंघ होऊ दे, अशी प्रार्थना करून मुख्यमंत्र्यांनी जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, काल दिवसभर सर्वत्र बाजारपेठा गणेशमूर्ती आणि सजावटीच्या साहित्यानं फुलल्या होत्या. यंदा पर्यावरण पूरक गणेशमूर्तींची बहुतांश प्रमाणात खरेदी करण्यात आली. तसंच नागरिकांनी बाजारपेठेतून मूर्ती खरेदी करण्यापेक्षा घरी बनवलेल्या मूर्तींची स्थापना अधिक प्रमाणात केल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
****
विविध बँकाचे सुमारे नऊ हजार कोटी रुपये कर्ज बुडवलेल्या विजय मल्ल्या प्रकरणावरून राजकीय पक्षांमध्ये आरोप - प्रत्यारोप सुरू झाले आहेत. काल काँग्रेसचे अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी मल्ल्याला, देशाबाहेर पळून जाण्यास अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मदत केल्याचा आरोप वार्ताहरांशी बोलतांना केला. संसदेच्या केंद्रीय सभागृहात जेटली आणि मल्ल्या यांना, काँग्रेस नेते खासदार पी एल पुनिया यांनी एकत्र पाहिल्याचं, राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. एक मार्च २०१६ रोजी ही भेट झाली आणि दुसऱ्याच दिवशी दोन मार्चला मल्ल्या पसार झाल्याचं, वृत्तवाहिन्यांकडून समजल्याचं, गांधी म्हणाले. या संदर्भात अर्थमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणीही गांधी यांनी केली.
दरम्यान, गांधी कुटुंबाच्या सूचनेवरून तत्कालीन पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी विजय मल्ल्या याला सहकार्य केल्याचं, भारतीय जनता पक्षानं म्हटलं आहे. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी यासंदर्भात पत्रकार परिषद घे��न, काँग्रेस सरकारनं मल्ल्याला मोठ्या प्रमाणात कर्ज घेण्यासाठी बेलआऊट पॅकेज मिळवून दिलं, मल्ल्या याला गांधी कुटुंबियांनी मोठी सूट मिळवून दिल्यानेच २०१० पासून त्यानं सर्व नियम धाब्यावर बसवून आर्थिक गैरव्यवहार केल्याचं, गोयल म्हणाले.
****
न्यायमूर्ती रंजन गोगोई भारताचे ४६वे सरन्यायाधीश असतील. विधी मंत्रालयानं काल याबाबत अधिसूचना जारी केली. सरन्यायाधीश दीपक मिश्रा पुढच्या महिन्याच्या दोन तारखेला निवृत्त होत आहेत. मिश्रा यांच्यानंतर गोगोई हेच सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश आहेत. ते येत्या तीन ऑक्टोबरला पदग्रहण करतील आणि तेरा महिन्यांचा त्यांचा कार्यकाळ असेल.
****
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून जगमित्र सूत गिरणीसाठी घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्यासह सूत गिरणीच्या इतर आठ संचालकांच्या मालमत्तेवर अंबाजोगाईच्या अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायालयानं निर्बंध घातले आहेत. याशिवाय सूत गिरणीचे कार्यालय तसंच विविध ठिकाणच्या मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करण्यावर बंदी घातली आहे. विरोधी पक्षनेते मुंडे यांच्या मालकीचं परळी इथलं घर, देशमुख टाकळी, कौडगाव आणि जलालपूर इथली शेतजमिनीची खरेदी - विक्री तसंच हस्तांतरण करण्यावर न्यायालयानं बंदी घातली आहे. त्याचबरोबर या मालमत्तेपासून कोणताही लाभ त्यांना घेता येणार नसल्याचं न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे.
मुंडे यांनी २००३ ते २०११ या काळात बँकेकडून सूतगिरणीसाठी कोट्यावधी रूपयांचं कर्ज घेतलं होतं. या कर्जाची परतफेड करण्यात अपयश आल्यामुळे २०१३ मध्ये त्यांच्यासह संचालकांविरूद्ध परळीच्या पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.
दरम्यान, या प्रकरणी न्यायालयानं दिलेल्या निकालाचा चुकीचा अर्थ लावून विरोधकांकडून आपल्या बदनामीचा प्रयत्न होत आहे, अशी प्रतिक्रिया मुंडे यांनी दिली आहे.
****
९४ कोटी रूपयांच्या कॉसमॉस बँक सायबर घोटाळाप्रकरणी पोलिसांनी आणखी दोन जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयानं सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या चार झाली आहे. या प्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातला सिल्लोडचा रहिवाशी शेख मोहम्मद अब्दुल जब्बार आणि नांदेड जिल्ह्यातला भोकरचा रहिवाशी महेश साहेबराव राठोड या दोघांना नव्यानं अटक करण्यात आली आहे. त्यांनी एटीएममधून पैसे काढून हा घोटाळा केल्याचं पोलिसांनी सांगितलं. हे दोघेही ऑनलाईन मार्केटींगच्या व्यवहारात असून त्यांचे इतर आरोपींसोबत संबंध असल्याचं आढळून आलं आहे. बँक ग्राहकांच्या विसा आणि रूपै कार्डची माहिती चोरून २८ देशामधून हे ९४ कोटी रूपये त्यांच्या खात्यातून काढून घेण्यात आले आहेत.
****
शाश्वत स्वच्छता ठेवण्यासाठी उद्यापासून केंद्र शासनाच्या पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाच्या वतीनं देशभर ‘स्वच्छता ही सेवा’ हे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. दोन ऑक्टोबरपर्यंत हे अभियान ��ालणार आहे. नांदेड जिल्ह्यात आज सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषदेत या अभियानाचा शुभारंभ होणार असून यानिमित्त स्वच्छतेची शपथ घेतली जाणार असल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी जी.एल.रामोड यांनी दिली आहे.
****
देशातल्या असंघटित लघुउद्योगांच्या विकासासाठी आणि वित्तीय गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकारनं तयार केलेल्या ‘पंतप्रधान मुद्रा योजने’ला अहमदनगर जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. पाथर्डी तालुक्यातल्या तिसगाव इथले लक्ष्मण नांगरे यांनी मुद्रा योजनेतून आपल्या इलेक्ट्रिकल्स दुकानासाठी दोन लाख रुपयांचं कर्ज घेतलं आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात भरभराट झाल्याचा अनुभव त्यांनी आकाशवाणीला सांगितला.
मी लक्ष्मण नागरे तिसगाव येथील रहिवासी असून मातोश्री इलेक्ट्रीकल या नावाने माझे दुकान आहे. या दुकानासाठी मला भांडवलाची कमतरता होती. म्हणून मी सेंट्रल बँकेकडे ॲप्लीकेशन केले व ॲप्लीकेशन केल्यानंतर केंद्राची मुद्रा लोनची स्कीम चालू होती. त्या स्कीममध्ये मला दोन लाख रुपयांचे लोन मिळाले. व ते लोन मिळाल्यानंतर मी माझ्या दुकानासाठी लागणारे साहित्य खरेदी केले. त्या साहित्यामधून मला माझ्या दुकानासाठी खूप काही भरभराट करता आली. त्या लोनच्या जोरावर मी माझ्या दुकानाला खूप चांगले स्वरुप देऊ शकलो. यामुळे मी सेंट्रल बँकेचा, केंद्र शासनाच्या मुद्रा लोन स्कीमचा खूप खूप ऋणी आहे.
****
टोकियो इथं सुरु असलेल्या जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत किदम्बी श्रीकांतनं पुरुष एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. एच एस प्रणोय आणि पी व्ही सिंधूचं आव्हान मात्र उपउपांत्यपूर्व फेरीतच संपुष्टात आलं. पुरुष दुहेरी आणि मिश्र दुहेरीतही भारताचं आव्हान उपउपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं आहे.
****
भारतीय महिला क्रिकेट संघानं काल यजमान श्रीलंकेचा सात धावांनी पराभव करत दुसरा एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकला आहे. याबरोबरच तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघानं दोन - एक अशी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांनी निर्धारीत ५० षटकांत सर्वबाद २१९ धावा केल्या. यष्टीरक्षक तान्या भाटीयानं ६६ चेंडुत ६८ धावा केल्या. उत्तरादाखल श्रीलंकेचा महिला संघ ४९ व्या षटकांत २१२ धावा काढून सर्वबाद झाला. वेगवान गोलंदाज मानसी जोशीनं तीन तर फिरकीपटु राजेश्वरी गायकवाडनं दोन बळी घेतले.
****
पोलंड इथं सुरु असलेल्या महिलांच्या तेराव्या आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या एल. सरीता देवीनं ६० किलोग्रॅम वजन गटात, एम. सी. मेरी कोमनं ४८ किलोग्रॅम वजनी गटात, रितू ग्रेवालनं ५१ किलोग्रॅम वजनी गटात तर लव्हलिना बोरगोहेननं ६९ किलोग्रॅम वजनी गटात पदकं निश्चित केली आहेत. या चारही जणींनी त्यांच्या गटात उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
****
��स्मानाबाद जिल्हा युवक कॉंग्रेस अध्यक्षपदी जिल्हा परिषद सदस्य श��ण पाटील यांची निवड झाली आहे. काल झालेल्या निवडणुकीत तीन उपाध्यक्ष आणि सहा जिल्हा सरचिटणीस यांचीही निवड झाली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात काल काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. वसमत, कळमनुरी आणि औंढा नागनाथ तालुक्यातल्या काही गावात सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास हे धक्के बसले. भूकंप मापक यंत्रावर या धक्क्याची तीव्रता २ रिश्टर स्केल इतकी नोंद झाली आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 14 August 2018 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १४ ऑगस्ट २०१८ दुपारी १.०० वा. **** राष्ट्रीय सुरक्षा ही सरकारसाठी सर्वोच्च प्राधान्याची बाब असल्य��चं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. लोकशाहीत नागरिकांचे हक्क आणि त्यांच्या आकांक्षांना सर्वात जास्त महत्त्व असून त्यांची पूर्तता करणं हा मु��्य हेतू असायला हवा, असं सरकारचं मत असल्याचं त्यांनी म्हटलं. आपलं सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करत असून, भ्रष्टाचार थांबून सार्वजनिक संपत्ती विकासाच्या कामांसाठी खर्च होत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. आपल्याला हा देश आणि समाज नीट समजला आहे का, हा विचार विरोधकांना करावाच लागेल, असंही पंतप्रधानांनी यावेळी म्हटलं. **** जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना आयुष्मान भारतची लवकरच घोषणा होणार असल्याची माहिती परराष्ट्र राज्यमंत्री वी.के.सिंह यांनी काल दुबई इथे भारतीय समुदायाशी संवाद साधताना दिली. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागास वर्गातल्या सुमारे पन्नास कोटी लोकांना आरोग्य सुविधा पुरवण्यात येणार असल्याचं तसंच प्रत्येक परिवाराला दर वर्षी पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं. या योजनेच्या लाभार्थ्यांना देशभरातल्या कुठल्याही रुग्णालयात कॅशलेस सुविधा मिळेल, असंही सिंह यांनी यावेळी सांगितलं. **** जम्मू काश्मीरच्या तंगधार सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्यानं दोन पाकिस्तानी सैनिकांना ठार केलं असल्याची माहिती संरक्षणखात्याच्या प्रवक्त्यांनी आज दिली आहे. काल रात्री पाक सैन्यानं अचानक गोळीबार सुरू करून अतिरेक्यांच्या घुसखोरीला मदत करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय सैन्यानं तात्काळ ही कारवाई केली. **** अमेरिकन डॉलरच्या तुलनेत आज रुपयाच्या किमतीमध्ये ऐतिहासिक घसरण होऊन, ती सत्तर रुपये नऊ पैसे प्रति डॉलर, इतकी नोंदली गेली. तुर्कस्थानची आर्थिक समस्या जागतिक पातळीवरच्या मंदीकडे निर्देश करत असल्याच्या पार्श्वभूमीवर रुपयाची ही घसरण झाल्याचं पीटीआयच्या याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.दरम्यान, रुपयाची ही घसरण जागतिक कारणांमुळे झाली असून,त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही, असं सरकारनं म्हटलं आहे. जागतिक कारणं काही काळानंतर निवळतील, अशी अपेक्षा आर्थिक कार्य सचीव सुभाषचंद्र गर्ग यांनी व्यक्त केली. **** राज्यातले घाटांमधले वाढते अपघात रोखण्यासंदर्भात उपाययोजना सुचवण्यासाठी एका तज्ञ समितीची स्थापना करण्याचा निर्णय राज्य रस्ते सुरक्षा परिषदेनं काल घेतला. आंबेनळी घाटात नुकत्याच झालेल्या गंभीर अपघाता बाबत काळजी व्यक्त करत, समितीनं सहा महिन्यात शासनाला अहवाल सादर करावा, अशा सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी यावेळी दिल्या. अपघाती मृत्युंच्या संख्येत देशात महाराष्ट्र ��िसऱ्या क्रमांकावर असून, महामार्गांवरील रस्ते अपघातामध्ये वाहनांचा अतीवेग हे एक प्रमुख कारण असल्याचं या बैठकीत स्पष्ट झालं.केवळ अपघातांचं प्रमाण कमी करणं, हे ध्येय नसून ते शून्यावर आणणं हे आपलं ध्येय असल्याचं प्रतिपादन यावेळी परिवहनमंत्र्यांनी केलं. **** बीड जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती नसूनही पिण्याच्या पाण्याचं नियोजन केलं जात असल्याची माहिती बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली. कपाशीवरच्या बोंड अळीबाबत लवकरात लवकर पाहणी करून अहवाल देण्यास कृषी विभागाला सांगितलं असल्याचंही मुंडे यांनी यावेळी सांगितलं. **** भूतानमध्ये थिम्पू इथे सुरू असलेल्या दक्षिण आशियाई फूटबॉल स्पर्धेच्या पंधरा वर्षांखालील मुलींच्या गटात भारतीय संघानं, भूतानचा एक-शून्य असा पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. शिलकी देवीनं सामन्यातील ५८व्या मिनिटाला भारताचा विजयी गोल नोंदवला आहे. या स्पर्धेतले आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकून भारत अ गटात पहिल्या क्रमांकावर आहे. भारतीय संघाची उपांत्य फेरीतील लढत येत्या गुरुवारी होणार आहे. **** जकार्ता आशियायी क्रीडा स्पर्धांमध्ये आज भारतीय महिला हँडबॉल संघाचा सामना कजाकिस्तानशी होणार आहे. भारतीय पुरुष हँडबॉल संघ काल आपल्या पहिल्या सामन्यात चिनी तैपै संघाकडून पराभूत झाला. या स्पर्धांची सुरुवात गेल्या शनिवारी झाली आहे. *****
0 notes
airnews-arngbad · 7 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 6 February 2018 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ६ फेब्रुवारी २०१८ दुपारी १.०० वा. **** अण्वस्त्र वहनासाठी सक्षम असलेल्या अग्नी - एक या क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली. ओडीशा तल्या बालासोर इथल्या अब्दुल कलाम बेटावरुन या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली. जमिनीवरुन जमिनीवर मारा करणाऱ्या या क्षेपणास्त्रामुळे लष्कराच्या बळात वाढ होणार असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. या क्षेपणास्त्राचा सशस्त्र दलात आधीपासूनच समावेश असून, या चाचणीमुळे त्याची अण्वस्त्र वहन क्षमता सिद्ध झाली असल्याचं संरक्षण सूत्रांनी सांगितलं. **** शेतकऱ्यांचा उत्पादित माल संपूर्णपणे खरेदी करण्यासंदर्भात, सरकार विचार करत असून, लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं कृषीमंत्री राधामोहनसिंह यांनी लोकसभेत सांगितलं. शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते. एकीकडे उत्पादन वाढवण्याचं आवाहन केलं जात असताना, हमीभाव खरेदी केंद्रांवर तूर खरेदीला मर्यादा घातल्या आहेत, याकडे राऊत यांनी लक्ष वेधल. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव कोणत्या सूत्राधारे दिला जाणार, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. त्यावर उत्तर देताना, केंद्र आणि राज्य सरकार एकत्रितपणे हमीभाव देणार असल्याचं राधामोहनसिंह यांनी सांगितलं. स्वामीनाथन आयोगाच्या अहवालानुसार, आतापर्यंत ज्या आधारे हमीभाव ठरत असे, तो ही पूर्ण मिळत नसल्याचं कृषी मंत्र्यांनी सांगितलं. शून्यकाळानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू झाली. दरम्यान, आज सकाळी सदनाचं कामकाज सुरू होताच, अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी, १९ वर्षाखालील क्रिकेट संघानं, युवा विश्वचषक चौथ्या वेळेस जिंकल्याबद्दल अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. आंध्रप्रदेश राज्यासाठी विशेष सुविधांच्या मागणीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सदस्य असलेल्या तेलगू देशम पक्ष तसंच वायएसआर काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या आसनासमोर हौद्यात उतरुन युतीधर्म पालन करण्याच्या मागणीसह घोषणाबाजी केली. या गदारोळामुळे अध्यक्षां��ी सदनाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केलं, त्यानंतर मात्र अध्यक्षांनी गदारोळातच प्रश्नकाळ आणि शून्यकाळाचं कामकाज सुरू ठेवलं. राज्यसभेतही तृणमूल काँग्रेस पक्षानं, आपल्या मागण्यांसाठी घोषणाबाजी केल्यानं, सभापतींनी सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित केलं. **** विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅप केले जात असल्याचा, काँग्रेसचे नेते खासदार गुलाम नबी आझाद यांनी केलेला आरोप, संसदीय कार्य मंत्री अनंत कुमार यांनी फेटाळून लावला आहे. निराशेमुळे कॉंग्रेस अशा प्रकारचे आरोप करत असल्याचं त्यांनी आज संसद परिसरात वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. काँग्रेस नेते राजीव शुक्ला यांनी, हे आरोप आझाद यांनी पुराव्याच्या आधारे केल्याचा दावा केला आहे. दरम्यान, पाकिस्तानकडून सतत होत असलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनावर चोख प्रत्यूत्तर देण्याची वेळ आली असल्याचं शुक्ला यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी, भारत आणि पाकिस्ताननं आपापसात चर्चा करुन तणाव कमी करावा, असं म्हटलं आहे. युद्ध कोणत्याही समस्येचा उपाय असू शकत नाही, असं त्यांनी सांगितलं. पाकिस्तानाकडून सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन होत असल्यासंबंधात केंद्राचे विशेष प्रतिनिधी दिनेश्वर शर्मा आणि जम्मू काश्मीरचे राज्यपाल एन एस वोहरा यांच्यामध्ये आज चर्चा झाल्याचं वृत्त आहे. **** चारा घोटाळाप्रकरणी राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांच्यासह दोषी ठरलेले बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा काल रांची इथल्या विशेष सीबीआय न्यायालयापुढे शरण आले. बिहारचं मुख्यमंत्रिपद तीन वेळा भुषवलेले मिश्रा, २४ जानेवारीला न्यायालयानं त्यांना चारा घोटाळाप्रकरणी दोषी ठरवून शिक्षा सुनावली तेव्हा व्यक्तीगत कारणामुळे न्यायालयात हजर नव्हते. सीबीआयचे विशेष न्यायाधीश एस.एस.प्रसाद यांनी मिश्रा, यादव यांच्यासह इतर सहा जणांना याप्रकरणी दोषी ठरवलं होतं. दरम्यान, काल मिश्रा यांची रांची इथल्या बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली. **** नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या खेलो इंडिया शालेय क्रीडा स्पर्धेत १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत महाराष्ट्राच्या अवंतिका नराळेनं सुवर्ण पदक पटकावलं आहे. भारोत्तोलन प्रकारात मुलींच्या ४४ किलो वजनी गटात मनमाडच्या खुशाली गांगुर्डे हिनं रौप्य पदक पटकावलं. या गटात मणीपूरच्या कोनसाम देवीनं सुवर्ण पदक पटकावलं. मुलींच्या कुस्ती मध्ये ६५ किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या विश्रांती पाटील हिनं पंजाबच्या सुखप्रित कौरचा पराभव करून कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत कालच्या पाचव्या दिवस अखेर महाराष्ट्रानं १६ सुवर्ण, १५ रौप्य आणि १९ कांस्य पदकांसह एकूण ५० पदक पटकावून पदक तालिकेत तिसरा क्रमांक मिळवला आहे. २० सुवर्ण पदकांसह एकूण ५४ पदक मिळवून हरियाणा पहिल्या, तर १८ सुवर्ण पदकांसह एकूण ६१ पदक मिळवून दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे. ***** ***
0 notes