#दमछाक
Explore tagged Tumblr posts
seo-3024 · 14 days ago
Text
आईपण भारी देवा... नवीन_आईपण_पेलताना...
Tumblr media
इंस्टाग्राम आणि फेसबुक च्या आजच्या काळात गरोदरपण आणि त्यातले सारे सोहळे साजरे करताना जोडपी किती सुंदर आणि छान दिसतात नाही आणि बाळाच्या आगमनाने तर फेसबुक आणि इंस्टाग्राम , प्रत्येकाचे व्हॉटसअप चे स्टेटस अपडेट्स सार काही आनंदाने ओसंडून वाहत असते...नवजात बाळाचे वेगवेगळे पोझ मधले फोटो, बाळाच्या पहिल्या पावलांचे ठसे फ्रेम करणे, नवजात बाळाला दागिने, प्रॉप्स, पानाफुलांनी सजवून फोटो काढणे , नव्या आईची खोली डेकोरेट करणे,सगळ्यांचे फोन,व्हिडिओ कॉल सगळच अगदी मनभावन छान आणि आनंदी..
या सगळ्या ऑनलाइन आभासी दुनियेमध्ये स्वतःला बाळंतपणा नंतर अप टू डेट ठेवताना नवीन आईची नकळत दमछाक होत असते परंतु तिला या सगळ्याची इतकी आवड किंवा सवय झालेली असते की ते केल्याशिवाय करमत नाही... घरातील मोठे लोक कधी कधी या नवीन 'आई बाबांना' सूचना ही देत असतात परंतु त्याच्याकडेही बरेच वेळा कानाडोळा केला जातो. हे सगळं करत असणाऱ्या नविन आईबाबांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज मिळाल्यावर आणि नव्याचे नऊ दिवस संपल्यावर जेव्हा वास्तवाची जाणीव होते त्या वेळेला लक्षात येते की हे नवीन आईपण आणि बाबापण निभावण इतकं सोपं नाही आणि या साठी लागणाऱ्या कष्टांबद्दल आणि द्याव्या लागणाऱ्या वेळेबद्दल आपल्याला कोणीही जागं केलेलं नाही आतापर्यंत डिलिव्हरी होऊन बाळ येणार म्हटल्यावर त्यांनी फक्त आणि फक्त आनंदी बाजूच एकलेली असते
प्रत्यक्षात मात्र बाळाच्या रुटिन बरोबर ताळमेळ साधताना या नवीन आई बाबांची तारांबळ उडायला लागते मग सुरु होते चिडचिड वैताग आणि एक संघर्ष....कधी कधी तर डिप्रेशन आणि त्यामुळे होणारी आई आणि बाळा ची ओढाताण ! आजकाल याच प्रमाण जरा जास्तच वाढलय म्हणून हा लेखन प्रपंच...
नवीन होणारे आई-बाबांसाठी काही महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे याची जाणीव घरातील मोठ्यांनी त्यांना करून द्यायला हवी कधी कधी मोठे जाणीव करून देतही असतात परंतु हे नवीन होणारे आई-बाबा या गोष्टी इतक्या मनावर घेत नाहीत. आज यातील काही वास्तववादी गोष्टी इथे मांडते
1. नॉर्मल डिलिव्हरी ही एक नैसर्गिक गोष्ट आहे यामध्ये होणारा त्रास हा प्रत्येकीला कमी जास्त प्रमाणात होत असतो त्याची ठराविक अशी मोजपट्टी नसते काही जणींना डिलिव्हरीच्या कळा सहन होतात तर काहीजणांना याचा खूप त्रास होतो आज-काल वेदना रहित प्रसूती ची सोय आहे तरीही काही ठराविक वेळ तरी या कळा सहन कराव्या लागतात. प्रत्येक मुलीने आपली क्षमता ओळखून डिलिव्हरीच्या कळा काही काळ तरी आपल्याला सहन कराव्या लागणार आहेत याची मानसिक तयारी करायला हवी आणि या सगळ्या गोष्टीची जर मानसिक तयारी नसेल तर तुमच्या डॉक्टरांना तसे स्पष्ट सांगायला हवे.
2. डिलिव्हरी नॉर्मल असो किंवा सिझेरियन त्यावेळी पडणाऱ्या टाके दुखतात आणि त्यावर वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात. डिलिव्हरी नॉर्मल असो किंवा सिझेरियन त्यावेळी पडणाऱ्या टाके दुखतात आणि त्यावर वेदनाशामक गोळ्या घ्याव्या लागतात.
3. नवीन बाळाचे काहीही रुटीन नसते सहसा बाळ दिवस भर झोपतात आणि पूर्ण रात्र जागी असतात त्यामुळे सहाजिकच नवीन आई-बाबांचे जवळपास रोजच जागरण होते या जागरणाची नवीन आईला सवय नसल्यामुळे तिची चिडचिड ओढाताण होते तसेच झोप नीट न झाल्यामुळे डोकेदुखी आणि पित्ताचा त्रास होणे या गोष्टीही नवीन आईच्या बाबतीत अगदी कॉमन असतात.
4. नवीन आईने आपला सारावेळा फक्त बाळासाठी आणि स्वतःसाठी राखून ठेवायला हवा आणि बाळ ज्यावेळी झोपेल त्यावेळी स्वतः विश्रांती घ्यायला हवी
5. नवीन आई आणि बाळ यांचे एकमेकांशी जुळून येण्यासाठी वेळ लागतो साधारण सव्वा महिना हळूहळू बाळाचे रुटीन आईला समजायला लागते आणि मग इतर गोष्टी त्याप्रमाणे ऍडजेस्ट करणे सोपे जाते परंतु पहिले सहा महिने अवघडच असतात आणि जागरणाची तयारी या वेळेला ठेवावी लागते.
6. बाळ जर पूर्ण 'ब्रेस्ट फीडिंग' वर असेल तर पहिले सहा महिने आईला बाळापासून अजिबात वेगळे राहणे शक्य होत नाही कारण बाळ भुकेसाठी पूर्णपणे आईवर अवलंबून असते. सतत बाळाचे बरोबर राहणे आणि स्वतःसाठी काहीही करायला न मिळणे यामुळे नवीन आईची चिडचिड होते.
7. कित्येक वेळा आई जेवायला बसले की बाळाचे रडणे आणि शू शी करणे इत्यादीमुळे अर्ध्या जेवणातून आईला उठावे लागते याचीही पहिल्यांदाच आई झालेल्या मुलींना कल्पना नसते
8. डिलिव्हरी नंतर वाढलेले वजन आणि स्वतःच्या दिसण्यात झालेला बदल पूर्ववत होण्यासाठी वेळ लागतो.डिलिव्हरी नंतर करायचे व्यायाम अनेक ठिकाणी शिकवतात पण खर सांगू का पहिले काही दिवस आईची नीट विश्रांती च होत नाही तर ती व्यायाम करायला शक्ती आणि वेळ कुठून आणणार?
सगळ्यात महत्वाचे आहे तुमचे मानसिक आरोग्य, नीट खाणे आणि विश्रांती ...काही वेळानंतर तुम्ही व्यायाम चालू केला तरी चालेल..
9. वरील सर्व तर रूटीन मध्ये होणारे बदल झाले...या खेरीज बाळ आजारी पडले तर होणारा मानसिक आणि शाररिक त्रास वेगळाच असतो.
10. या सगळ्यातून तरून जाण्यासाठी महत्त्वाची ठरते ती 'सपोर्ट सिस्टीम '..तुम्हाला मदतीसाठी घरातील सदस्य किंवा जर घरातील सदस्यांना शक्य नसेल तर बाहेरुन योग्य मोबदला देऊन अश्या सपोर्ट सिस्टीम' ची सोय करणे गरजेचे आहे.हल्ली डिलिव्हरी नंतर येणाऱ्या डिप्रेशन चे प्रमाण वाढत आहे ते नवीन आईला नसणाऱ्या पूर्वी सारख्या सपोर्ट मुळे..
11. पूर्वीच्या काही पद्धती ���ा सायन्स ला अनुसरून च होत्या...सव्वा महिना बाळंपणानंतर घरा बाहेर न पडणे हे या साठी च पाळत असत की आई आणि बाळाला एकमेकांशी ऍडजस्ट व्हायला पुरेसा वेळ मिळावा...
गार पाण्यात हात घालू न देणे हे देखील या साठी च की नवीन आई घरकाम करण्यात अडकून पडू नये तिने बाळाला आणि स्वतः ला वेळ ��्यावा.
आईपण पेलण आणि निभावणं ही तारेवरची कसरत आहे जशी योग्य आहार आणि वेळोवेळी तपासण्या करून तुम्ही सुदृढ बाळाची तयारी करता तशीच डिलिव्हरी नंतरच्या सहा महिन्या साठी कणखर मानसिक तयारीची ही गरज असते. जागरण आणि अपुरी झोप हे पक्के मनात ठसवून पुढे चालत राहावे लागते म्हणजे मग नवीन आईची ओढाताण आणि चिडचिड होत नाही.
तुम्ही हे नवीन आईपण कस पेलल हे आठवतंय का?नक्की तुमचे अनुभव लिहा .इतरांना ही त्याचा उपयोग होईल.
©डॉ. अर्चना बेळवी.
स्त्री रोग तज्ञ नंदिनी क्लिनिक
नंदिनी क्लिनिक हडपसर
नंदिनी क्लिनिक वानवडी
फोन 8421119264
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : २३
दादासाहेबांच्या त्या उद्गारांवर तिथे उपस्थित अनेकजणांनी संमतीदर्शक मान डोलावली तेव्हां आपल्याला अधिक खुलासेवार सांगावं लागणार याची जाणीव होऊन मालती कांहीशी गांगरलीच! तिची ती अवस्था लक्षांत येऊन तिच्या मदतीला धांवून येत कुमुद नाडकर्णी म्हणाल्या, "मालतीला काय म्हणायचं आहे ते मला समजलंय्;- तरी मी त्याबद्दल बोलूं का? कांही कमी-अधिक वाटलं तर ती मागाहून खुलासा करीलच!" दादासाहेब हंसून म्हणाले, "तुम्हीच काय, तर या अनुषंगाने ज्यांना कांही बोलायचं आहे, त्या सर्वांनी आपलं म्हणणं मोकळेपणाने मांडा! जेवढी अधिक चर्चा होईल, तेवढे अधिक मुद्दे पुढे येतील!" त्यांच्या प्रोत्साहनाने अधिकच हुरूप येऊन कुमुद म्हणाल्या, "दादासाहेब, झालंय् काय की माझ्या समवयस्क मंडळींनी वाचनाच्या वेडापायी घरामधे कळत नकळत भरपूर पुस्तकं विकत घेऊन ठेवली आहेत! कारण आमच्या तरुण वयांत आजच्यासारखे टी.व्ही. वा मोबाईल नसल्याने वेळ सत्कारणी लावायला वाचन हा एकच पर्याय होता! मासिकांचे दिवाळी विशेषांक सोडले तर त्यांत दर्जेदार साहित्याचा अभावच असल्याने पुस्तकंच आमच्या 'जिवाचे मैतर' होती! पण आतां उतारवयात आपणच जमा केलेला हा पुस्तकांचा भला-मोठा संग्रह बघून मनांत खंत दाटते, की आपल्यामागे यांचा वाली कोण? कारण, तुम्ही बघतच असाल की आजकाल सुखवस्तु घरांमधे मनोरंजनासाठी वाचनाऐवजी टी.व्ही. वा मोबाईलकडेच लोकांचा कल जास्त असतो!----"
"कसं माझ्या मनातलं बोललांत तुम्ही, ताई!" सुरेशदादा उस्फूर्तपणे उद्गारले;- पण आपण मधेच बोलण्याची आगळीक केल्याचं लक्षांत येतांच जीभ चावून, कान पकडीत म्हणाले, "साॅरी हं;- मी तुमच्या बोलण्यांत व्यत्यय आणला!" त्यावर त्यांना पुढे बोलायची खुण करीत कुमुद म्हणाल्या, " नाहीं,नाहीं कामतसाहेब;- माझ्या म्हणण्याचा आशय आतां तुम्हीच पुढे मांडा! एका दमात एवढं बोलण्याची सवय नसल्याने माझीही दमछाक झाली आहे!" आणि त्यांनी बाजूला ठेवलेली पाण्याची बाटली हातीं घेतली. दादासाहेबांना नमस्कार करून सुरेशदादा सांगू लागले, "दादासाहेब, मला आवडलेल्या अनेक पुस्तकांची मी खुप पारायणं केली आहेत;- परंतु तसं प्रत्येक पुस्तकाच्या बाबतीत नाहीं होत हो! त्यांतून वाढत्या वयाबरोबर डोळे थकले की मनांत असूनही वाचतां येत नाहीं!- आणि मग मगाशी कुमुदताई म्हणाल्या तसं कोडं पडतं की आपण आवडीने गोळा केलेल्या एवढ्या सगळ्या पुस्तकांचं करायचं तरी काय? माझ्या एकुलत्या एका मुलीलाही खुप आवड आहे वाचनाची! पण लग्नानंतर ती तिच्या संसाराच्या व्यापात गुंतली आहे! तिचा नवरा नौदलांत असल्याने दर ३-४ वर्षांनी त्याची बदली होते! गेली २ वर्षें तो विशाखापट्टणमला आहे! बरं, आमची दोन्ही नातवंडं इंग्रजी मिडियमवाली! मराठी पुस्तकांची त्यांना काय मातब्बरी? अशा परिस्थितीत, कोण आमच्या पुस्तकांची काळजी घेणार?"
" आमची कथा तर आणखीनच वेगळी!" सुरेशदादांच्या हताश स्वराची री ओढीत पमाताई बोलूं लागली, "आम्हांला मुल-बाळ नसल्याने आपल्या हयातीतच पुस्तकांची योग्य व्यवस्था करावी म्हणून मी आमच्या घराजवळ असलेल्या एका लायब्ररीच्या मालकाला हवी ती पुस्तकं निम्म्या किंमतीत घेण्याबद्दल विचारलं, तर तो म्हणतो कसा;- 'बाई, दरमहा सभासद घटत चालल्याने मी आज ना उद्यां लायब्ररी बंद करायच्याच विचारांत आहे! अशा परिस्थितीत तुम्ही पुस्तकं फुकट दिलीत, तरी ती घेऊन मी काय करूं?' दादासाहेब, अशा वेळीं किलोच्या भावाने तोलणा-या रद्दीवाल्याचा पर्यायच डोळ्यांसमोर येतो आणि त्या कल्पनेनेच जिवाचा थरकांप होतो!" एव्हांना पुरेशी उसंत मिळालेली मालती नव्या उत्साहाने म्हणाली, " कुठल्याही रद्दीवाल्याला कसलं आलंय वाचनाचं प्रेम! त्याला पुस्तकं म्हणजे कसायाला जशी गुरं-ढोरं! दु:खं पुस्तकं मातीमोलानं विकावी लागतात याचं नाही, तर ज्यांनी कधीकाळी आपल्याला आनंद आणि सुख दिलं त्यांची अशी अवस्था असहायपणे बघण्याचं आहे! म्हणून मी सुचवलं होतं की तुमचं एवढं मोठं अद्ययावत् वाचनालय आहे, तुमचा परिवार कुटुंबियांची काळजी घ्यावी तशा प्रेमाने पुस्तकांना सांभाळतो आहे;-- अशा वेळी माझ्या घरी असलेली पुस्तकं तुम्ही नाममात्र मोलाने खरेदी केलीत, तरी केवढं मोठं समाधान तुम्ही माझ्या पदरांत टाकाल याची तुम्हांला कल्पना नाही, दादासाहेब!" भावनावेगाने गळा भरून आल्याने मालतीला पुढे बोलवेना तशी शुभदा म्हणाली, " याबाबतीत व्यावहारिक अडचणींची आम्हांला थोडीफार कल्पना आहे;-- कारण आमची आपापसांत तशी चर्चा झाली आहे! उदाहरणार्थ एखाद्या पुस्तकाच्या पुरेेशा प्रती तुमच्याकडे असणं वा एखाद्या पुस्तकाला तुमच्या दृष्टीने वाचकांकडून अत्यल्प मागणी असणं! पण अशा सर्व अडचणींवर आपण अधिक विस्ताराने बोलून मार्ग काढूं शकतो ना?"
१५ डिसेंबर २०२२
0 notes
news-34 · 5 months ago
Text
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
परभणी: 'ज्ञानराधा'च्या ठेवीदारांची कोंडी ? व्यवस्थापनाची ठेवी देताना दमछाक
https://bharatlive.news/?p=166810 परभणी: 'ज्ञानराधा'च्या ठेवीदारांची कोंडी ? व्यवस्थापनाची ठेवी देताना ...
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
एक वेगळंच अपहरण कांड ? नववीतील मुलाने पोलिसांची केली दमछाक
एक वेगळंच अपहरण कांड ? नववीतील मुलाने पोलिसांची केली दमछाक
महाराष्ट्रात एक वेगळी घटना समोर आलेली असून अभ्यासाचा कंटाळा आल्यानंतर शाळेत न जाता इयत्ता नववीमधील एका विद्यार्थ्याने स्वतःचेच अपहरण झाल्याचा बनाव घडवून आणला मात्र या प्रकरणात पोलिसांची देखील चांगलीच दमछाक झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथे ही घटना उघडकीला आलेली आहे. बल्लारपूर येथील एक इयत्ता नववीमधील शिकलेला विद्यार्थी गायब झाल्यानंतर आपल्या मुलाचे कोणीतरी अपहरण केले अशी तक्रार दीनदयाळ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago

harishmarathiblog · 2 years ago

chimnayjoshiblogs · 2 years ago

rajendrasomani · 2 years ago

shaharvarta11 · 2 years ago

varshachaskar · 4 years ago
Video
येईन मी रायगड किल्यावर गो रायगड किल्यावर माऊली कशी मी चढू गो कशी मी चढू माऊली तुझ्या दाराशी लंगडा नाचे गो दाराशी लंगडा नाचे दिड एक तासाचा तो प्रवास होता पण फारच सुखाचा होता. गड चढताना दमछाक होत होती या माऊलींची पण जेव्हा गडाच्या महाद्वाराजवळ पोहचलो त्यांच्या डोळ्यातलं सुख काही वेगळंच होतं. रायगडाच्या रंगात अश्या काही रंगल्या होत्या की त्यांच्या नजरेतला एक वेगळाच रायदुर्ग पहायला मिळाला. आजही तो क्षण आठवला की मन कधी रायगडी पोहचतं कळतही नाही. - वर्षा चासकर . . #nanapatekar #beingmarathi #ekmaharashtrian #shivajiraje #marathitv #__lovers__world #zeeyuva #shivajipark #sri_srimantyogi_ #chatrapatishivajimaharaj #shivaji_maharaj #zeemarathi #amolkolhe #shivajimaharaj #prajaktagaikwad #chatrapati #ekmaharashtriyan #chalahawayeudya #coloursmarathi #shivajimaharajhistory #hebaghbhau #instasaveapp #repost #bhaukadam #marathi #ritesh . . . #marathi #hebaghbhau #repost #shivaji_maharaj#chatrapati #chalahawayeudya #zeemarathi#ekmaharashtriyan #__lovers__world #zeeyuva #shivajimaharajhistory#beingmarathi #chatrapatishivajimaharaj#shivajipark #amolkolhe #ritesh #instasaveapp#sri_srimantyogi_ #marathitv #bhaukadam#shivajimaharaj #coloursmarathi #ekmaharashtrian#shivajiraje #prajaktagaikwad #nanapatekar (at राजधानी रायगड) https://www.instagram.com/p/CDLbXq1A40q/?igshid=1iq0hir5oepgt
1 note · View note
webmaharashtra-blog · 7 years ago
Text
"दमछाक...."बॉक्सरच्या घडण्याचं दमदार गीत !!
"दमछाक...."बॉक्सरच्या घडण्याचं दमदार गीत!!
मुंबई / प्रतिनिधी :  कोणताही खेळ खेळण्यासाठी खेळाडूला अफाट कष्ट करावे लागतात, जीवतोड मेहनत ही करावीच लागते. एका बॉक्सरच्या घडण्याचं दर्शन घडवणारं “दमछाक….” हे “बेधडक” या चित्रपटातलं गाणं सोशल मीडियात चांगलंच लोकप्रिय ठरलं आहे. दमदार शब्द, उत्तम संगीत आणि अप्रतिम छायांकन ही या गाण्याची वैशिष्ट्य आहेत. “बेधडक” हा चित्रपट १ जून रोजी प्रदर्शित होत आहे. 
राही प्रॉडक्शन्सच्या मंदार गोविंद टावरे यांनी …
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
मुंबईतील "त्या" बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह कणकवलीच्या लॉजिंग मध्ये
मुंबईतील “त्या” बेपत्ता व्यक्तीचा मृतदेह कणकवलीच्या लॉजिंग मध्ये
“त्या” व्यक्तीच्या शोधासाठी पोलिसांची दमछाक लॉजिंग प्रशासनाचा हलगर्जीपणासमोर कणकवली : मुंबईहून बेपत्ता झालेल्या एका होलसेल दुकानातील सेल्समनचा मृतदेह कणकवलीतील एका लॉजिंगच्या बाथरूम मध्ये आढळून आला. मात्र या लॉजिंग कर्मचाऱ्या कडून याबाबत दिलेल्या चुकीच्या माहितीमुळे मुंबईपासून ते कणकवली पर्यंत पोलीस व अन्य सामाजिक कार्यकर्ते देखील या बेपत्ता झालेल्या सेल्समन राजेंद्र प्रभाकर सावंत यांच्या शोधात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
हरहुन्नरी, निखळ कलावंत गमावला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली
हरहुन्नरी, निखळ कलावंत गमावला – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची हास्य कलाकार राजू श्रीवास्तव यांना श्रद्धांजली
मुंबई, दि. २१:- ‘रोजच्या जगण्यातील छोट्या प्रसंगांतून कुशलतेने हास्य फुलवणारा आणि आपल्या निखळ शैलीने देशभरातील घराघरात पोहोचलेला कलावंत गमावला आहे,’अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ हास्य कलाकार, अभिनेता राजू श्रीवास्तव यांना निधनाबद्दल श्रद्धांजली अर्पण केली आहे. ‘आपल्या रोजच्या जगण्यातील दमछाक करणाऱ्या प्रसंगांतूनही हास्य फुलवण्याची किमया राजू श्रीवास्तव यांनी साध्य केली.…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
देहू-तळवडे मार्गावरील कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक
https://bharatlive.news/?p=115855 देहू-तळवडे मार्गावरील कोंडी सोडवताना पोलिसांची दमछाक
देहूगाव : ...
0 notes
mhlivenews · 2 years ago