Tumgik
#ठाणे महानगरपालिका
mhlivenews · 17 days
Text
कृत्रिम तलावांतील विसर्जित मूर्ती पुन्हा समुद्रातच? 'या' महापालिकेच्या कबुलीनंतर मुंबईसंदर्भातही प्रश्नचिन्ह
Mumbai News: माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नाला, कृत्रिम तलावांमधील मूर्तींचे विसर्जन दुसऱ्या दिवशी समुद्रात किंवा खाडीत करण्यात येते, असे उत्तर मिरा-भाईंदर महापालिकेने दिले आहे. हायलाइट्स: मुंबई महापालिकेकडून सुस्पष्ट माहिती मिळणे आवश्यक आधीच पीओपीच्या मूर्तींबाबत निर्देशांनंतरही अंमलबजावणी नाही त्यात कृत्रिम तलावांमध्ये विसर्जित मूर्तींबाबत संभ्रम महाराष्ट्र टाइम्सganesh…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 28 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २८ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
चालू आर्थिक वर्षासाठीचा सुमारे २० हजार कोटी रुपये तुटीचा अतिरिक्त अर्थसंकल्प राज्यविधीमंडळात सादर
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ‘अन्नपूर्णा योजना’ बळीराजा सवलत योजना तसंच युवा कार्यप्रशिक्षण योजनेची घोषणा
सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत श्वेतपत्रिका जाहीर करण्याची महाविकास आघाडीची मागणी
धाराशिव नगरपालिका घोटाळ्याप्रकरणी एस आय टी चौकशीचे राज्यशासनाचे आदेश
आणि
जगद्‌गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान
****
चालू आर्थिक वर्षासाठीचा सुमारे २० हजार कोटी रुपये तुटीचा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा राज्याचे वित्त आणि नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. या अतिरिक्त अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी सहा लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, महसूली जमा ४ लाख ९९ हजार ४६३ कोटी रुपये तर महसुली खर्च ५ लाख १९ हजार ५१४ कोटी रुपये अंदाजित करण्यात आला आहे. महसुली तूट २० हजार ५१ कोटी रुपये तर, राजकोषीय तूट १ लाख १० हजार ३५५ कोटी रुपये इतकी आहे.
वय वर्षे २१ ते ६० वयोगटातल्या पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये देणारी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’, महिलांना रिक्षा व्यवसायासाठी आर्थिक मदत देणारी ‘पिंक ई-रिक्षा’ योजना, ५२ लाख कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी ‘मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना’, महिला लघुउद्योजकांसाठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना’, लघुउद्योजक महिलांना पंधरा लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या व्याजाचा परतावा देण्याची योजना सरकारनं घोषित केली आहे.
पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर राज्यभरात समान करण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई, नवी मुंबई तसंच ठाणे महानगरपालिका क्षेत्रातले सर्वसामान्य नागरिक तसंच उद्योग आणि व्यापार क्षेत्राला दिलासा मिळणार आहे.
वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळा’ची घोषणा यात करण्यात आली. तसंच, जागतिक नामांकनासाठी पंढरपूरच्या वारीचा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवण्याची घोषणाही यात करण्यात आली आहे.
राज्यातल्या दहा लाख युवकांना प्रत्यक्ष कामावर प्रशिक्षण आणि दरमहा दहा हजार रुपयांपर्यंत विद्यावेतन देणाऱ्या ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने’ची घोषणा करण्यात आली आहे.
‘मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनें�� अंतर्गत राज्यातल्या ४४ लाख शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा आणि दूधउत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची तरतूद केल्याचं पवार यांनीं सांगितलं.
नागपूर विभागात प्रायोगिक तत्वावर घेतलेली पंचनामा प्रणाली संपूर्ण राज्यभरात लागू करत असल्याचं अजित पवार यांनी जाहीर केलं –
राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्‍काळ तर १,०२१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्यात आली असून, तिथे विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. नुकसानीचे पंचनामे जलद व पारदर्शक होण्याकरता नागपूर विभागामध्ये घेतली गेलेली पंचनामा प्रणालीची चाचणी यशस्वी झाल्याने ती प्रणाली आता संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे.
अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात पाच केंद्रीय सशस्त्र दलातल्या जवानांना व्यवसाय करातून सूट दिली आहे. अंदाजे बारा हजार जवानांना या निर्णयाचा लाभ होईल.
दिव्यांग व्यक्तींसाठीच्या ‘धर्मवीर आनंद दिघे घरकुल योजने’च्या पहिल्या टप्प्यात ३४ हजार ४०० घरकुल बांधण्याची तसंच दिव्यांग व्यक्तींना इलेक्ट्रीक वाहनांचं वाटप करण्याची घोषणा यात करण्यात आली आहे.
बारी समाजासाठी ‘संत श्री रूपलाल महाराज आर्थिक विकास महामंडळा’ची स्थापना करण्याची तसंच स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर दरवर्षी शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन करण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
दरम्यान, या योजनांसाठी पुढच्या महिन्यात पुरवणी मागण्यांमध्येही तरतुदी केल्या जातील, असं अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. राज्याच्या वस्तु आणि सेवा कर वसुलीत यंदा सुमारे सोळा टक्के वाढ झाली, त्यामुळे केंद्राकडून मिळणाऱ्या राज्याच्या कर हिश्श्यातही वाढ होण्याची अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत करत, अजित पवार यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले –
अतिशय प्रगतीशील, सर्वसमावेशक, सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा त्यांनी सादर केला आहे. आणि विशेषतः शेतकरी, महिला, युवा, मागासवर्गीय अशा सगळ्या घटकांना समर्पित अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
या अर्थसंकल्पातल्या घोषणा फसव्या असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा महापूर असल्याची टीका केली. सरकारने गेल्या दोन वर्षांत जाहीर केलेल्या योजनांची चौकशी करून श्वेतपत्रिका जाहीर करावी, अशी महाविकास आघाडीची मागणी असल्याचं त्यांनी सांगितलं –
अर्थसंकल्पामध्ये आर्थिक तरतूद कशी करणार याचा कुठेही तसा उल्लेख नाहीये. माझी तर मागणी आहे किंवा आमच्या महाविकास आघाडीची मागणी अशी आहे, की आजपर्यंत त्यांनी ज्या काही घोषणा केल्या, गेल्या दोन वर्षात, त्यापैकी खरोखर किती अंमलात आल्या, याच्याबद्दल एक तज्ज्ञांची कमिटी नेमून निवडणुकीपूर्वी श्वेतपत्रिका जाहीर करावी.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावत, आर्थिक तरतूद करूनच सर्व योजना राबवल्याचं, तसंच आजवर राबवलेल्या योजनांची पडताळणी करून घेण्याचं आवाहन विरोधकांना केलं –
हे सरकार दिलेला शब्द पाळणारं आहे. आतापर्यंत हे सरकार जे जे बोललं, ते ते पूर्ण केलेलं आहे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे अर्थसंकल्पात पैशाची तरतूद करून या सर्व योजना केलेल्या आहेत. या योजना पूर्णपणे राबवल्या जातील. आणि शेतकऱ्यांना काय दिलं काय दिलं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो पंचेचाळीस हजार कोटी रूपये शेतकऱ्यांना देणारं हे आमचं सरकार आहे. हिशोब पाहिजे तर त्यांनी घ्यावा आणि टॅली करावा.
****
मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर - मसिआ संघटनेचे अध्यक्ष चेतन राऊत यांनी या अर्थसंकल्पाचं स्वागत केलं. यामध्ये जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजने’मुळे उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला –
स्कील डेव्हलपमेंटसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जी आहे, चांगली योजना आहे. दरवर्षी दहा लाख लोकांना ते प्रशिक्षण देणार आणि महिन्याला दहा हजार रूपये पर पर्सन ते मानधन देणार आहेत. ती एक योजना चांगली आहे. त्यामुळे स्कील फुल वर्कफोर्स थोडाफार इंडस्ट्रीला ॲव्हेलेबल होईल. तो एक फायदा आहे.
****
कुठल्याही पब मध्ये वय न तपासता प्रवेश दिला तर पबचा परवाना रद्द करण्यासोबत फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आज विधान परिषदेत आमदार सुनील प्रभू यांनी उपस्थित केलेल्या लक्ष्यवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. पुण्यातल्या, अशा अटींचं उल्लंघन केलेल्या पबचा परवाना रद्द केल्याचं त्यांनी सांगितलं.
****
धाराशिव नगरपालिकेतल्या विविध विकासकामांच्या अंमलबजावणीत झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी विशेष तपास पथक - एस आय टी स्थापन करून प्रकरणांचा तपास करण्याची कार्यवाही करण्यात यावी, असे आदेश महाराष्ट्र शासनानं पोलीस महासंचालकांना दिले आहेत. या संदर्भात विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळात तारांकित प्रश्न विचारला होता. त्याच्या उत्तरात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी दिलेल्या आश्वासनानुसार हे आदेश शासनानं दिले आहेत.
****
देहू इथल्या संत तुकाराम महाराजांच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान केलं. पालखीचा मुक्काम आज देहूतल्या इनामदार वाड्यात राहणार आहे. या पालखीसाठी हजारोंच्या संख्येनं दाखल झालेल्या भाविकांच्या ग्यानबा तुकाराम गजरानं अवघी देहू नगरी भक्तीरसात न्हाऊन निघाली आहे. तुकोबांच्या वारीचं यंदाचं हे तीनशे एकोणचाळीसावं वर्ष आहे. दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी उद्या आळंदीहून पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहे.
****
श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पायी दिंडी आणि पालखीचं आज नाशिक जिल्ह्यातून अहमदनगर जिल्ह्यात आगमन झालं.
****
0 notes
darshanpolicetime1 · 7 months
Text
जनता हीच माझी ऊर्जा.. जनतेची सेवा हेच माझे ध्येय  -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे,दि. १४ (जिमाका): जनतेला भेटल्यानंतर मला काम करण्याची ऊर्जा मिळते. जनतेची सेवा या ध्येयानेच मी काम करीत आहे. यासाठीच शासनाच्या माध्यमातून जनतेला उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील ‘मूलभूत सोईसुविधांचा विकास’ या योजनेंतर्गत मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील स. क्र. १३…
Tumblr media
View On WordPress
0 notes
dainiksamachar · 2 years
Text
एकनाथ शिंदे के चलते फूट के रास्ते पर एनसीपी? पार्टी बचाने के लिए अजित पवार की दौड़भाग शुरू
मुंबई: महाराष्ट्र एनसीपी के वरिष्ठ नेता और पूर्व कैबिनेट मंत्री ने आज दोपहर आनन-फानन में एक बैठक का आयोजन किया था। अजित पवार ने यह बैठक ठाणे जिले में एनसीपी पार्षदों के एकनाथ शिंदे गुट में जाने की अटकलों को लेकर की थी। दरअसल अजीत पवार को इस बात की टेंशन है कि कहीं उनकी पार्टी के पार्षद एकनाथ शिंदे गुट में शामिल न हो जाएं। एनसीपी के नेता और पूर्व मंत्री जितेंद्र आव्हाड ने यह दावा किया था कि ठाणे जिले में मुख्यमंत्री खेमे की तरफ से एनसीपी के नेताओं को शिंदे गुट ज्वाइन करने के लिए एक से दो करोड रुपए का ऑफर दिया गया है। ऐसे में इन पार्षदों की निष्ठा को परखने के लिए अजित पवार ने इस महत्वपूर्ण बैठक का आयोजन किया था। बैठक के जरिए अजीत पवार यह जानना चाहते थे कि कौन-कौन उनकी पार्टी में अभी भी मौजूद हैं और कौन बाहर जाने का मन बना रहे हैं? दरअसल गैर मौजूद रहने वाले पार्षदों पर पवार की नजर रखना चाह रहे थे। जितेंद्र आव्हाड के दावे के बाद अजित पवार ने तत्काल इस अर्जेंट मीटिंग को बुलाया। ताकि पार्षदों के मन को परख सकें और अगर उन्हें वाकई में कोई ऑफर दिया गया है तो उन्हें दूसरा दल ज्वाइन करने से रोका जा सके। जयंत पाटिल बोले...इस मुद्दे पर एनसीपी के प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल ने कहा कि ठाणे जिले के सभी पार्षद, विधायक और अन्य नेता जितेंद्र आव्हाड के साथ पूरी ताकत और शिद्दत के साथ खड़े हैं। जयंत पाटिल ने कहा कि मैं भी इस बैठक में शामिल हुआ और तमाम मुद्दों को समझा है। फिलहाल ठाणे जिले में पार्टी में फूट के आसार नजर नहीं आ रहे हैं। हालांकि, चौकन्ना रहने की जरूरत तो हमेशा रहती है। उन्होंने यह भी कहा कि जितेंद्र आव्हाड ने बताया कि उनको गिरफ्तार करने की साजिश रची जा रही है। यह सब कुछ चुनाव के मद्देनजर किया जा रहा है।जयंत पाटिल ने कहा है कि मीटिंग में यह भी डिस्कस हुआ है कि अगर आव्हाड को गिरफ्तार किया जाता है तो उनकी गैरमौजूदगी में पार्टी किस तरह से चुनाव लड़े और उस चुनाव को जीते। आव्हाड का यह कहना है कि ठाणे महानगरपालिका चुनाव के मद्देनजर मुझे जेल में डालने की साजिश रची जा रही है। ताकि ठाणे शहर से एनसीपी के प्रभाव को कम किया जा सके। कोई गुनाह नहीं फिर गिरफ्तारी की साजिशजितेंद्र आव्हाड ने कहा कि मेरे खिलाफ में कोई भी गुनाह दर्ज नहीं है। बावजूद इसके मुझे षड्यंत्र कर जेल भेजने की तैयारियां शुरू है। आव्हाड ने यह भी कहा कि हाल में दादर के शिवाजी पार्क में हिंदुओं द्वारा जन आक्रोश मोर्चा निकाला गया। मेरा उनसे यह सवाल है कि आखिर महाराष्ट्र की सरकार को इस संबंध में कानून बनाने से किसने रोका है, आखिर इस मोर्चे का औचित्य क्या है? http://dlvr.it/ShpQDJ
0 notes
hindimaster · 2 years
Text
Maharashtra Shiv Sena Will It Be Able To Save BMC Thane And Navi Mumbai Captured By Eknath Shinde Ann
Maharashtra Shiv Sena Will It Be Able To Save BMC Thane And Navi Mumbai Captured By Eknath Shinde Ann
Maharashtra Politics: महाराष्ट्र की सत्ता गंवाने के बात से उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) को एक के बाद एक बड़े झटके लग रहे हैं. ठाणे (Thane),नवी मुंबई (Navi Mumbai) महानगरपालिका के बाद अब कल्याण डोंबिवली महापालिका (Kalyan‑Dombivli Municipal Corporation) के कई पार्षदों ने सीएम एकनाथ शिंदे को समर्थन दिया है. शिवसेना की महाराष्ट्र के चार महानगर पालिका पर सत्ता है. लेकिन शिंदे को लगातार शिवसेना के…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
TMC Malaria : ठामपा हद्दीत जून महिन्यात डेंग्यूचे शून्य तर मलेरियाचे 27 रुग्ण
TMC Malaria : ठामपा हद्दीत जून महिन्यात डेंग्यूचे शून्य तर मलेरियाचे 27 रुग्ण
TMC Malaria : ठामपा हद्दीत जून महिन्यात डेंग्यूचे शून्य तर मलेरियाचे 27 रुग्ण प्रभावी उपाययोजना करण्यासाठी गृहभेटी देऊन एकूण 31427 घरांची तपासणी करण्यात आली. या तपासणीत 307 घरे दूषित आढळून आली. तसेच एकूण 41004 कंटेनरची तपासणी केली असता 359 कंटेनर दूषित आढळून आली. ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये जून 2022 मध्ये डेंग्यू (Dengue)ची संशयित रुग्णसंख्या 40 आणि निश्चित निदान झालेला एकही रुग्ण…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
ठाणे शहर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - महासंवाद
ठाणे शहर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
ठाणे, दि. १३ (जिमाका) : ठाणेकरांना अंतर्गत वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत. त्यात, बायपास, ईस्टर्न फ्री वेचा विस्तार यांचा समावेश आहे. एमएमआरडीए आणि ठाणे महानगरपालिका त्यासाठी काम करते आहे. त्यामुळे सगळे रस्ते वाहतूक कोंडी मुक्त होतीलच, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या मार्गिकेच्या लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केला. कळवा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 23 May 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ मे २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातला प्रचार आज संपला. शनिवारी आठ राज्यांतील ५८ मतदारसंघात मतदान.
डोंबिवली एमआयडीसीत अमुदान रसायन कंपनीत भीषण स्फोट, तीन कामगारांचा मृत्यू, २४ जण जखमी.
राज्यात दोन दुर्घटनेत आठ जणांचा बुडून मृत्यू, तर उजनी जलाशयातल्या नौका दुर्घटनेतील सहा मृतदेह सापडले.
आणि
मराठवाड्यात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पावसाची शक्यता.
****
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातला प्रचार आज संपला. या टप्प्यात ८ राज्यांतील ५८ मतदारसंघात येत्या शनिवारी २५ तारखेला मतदान होणार आहे. यात बिहारच्या ८, हरियाणा १०, जम्मू काश्मिर १, झारखंड ४, दिल्लीतल्या ७, ओडिशा ६, उत्तर प्रदेश १४ आणि पश्चिम बंगालमधल्या ८ जागांचा समावेश आहे. या ५८ मतदारसंघांमध्ये एकोणनव्वद उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. याखेरीज जम्मू काश्मीरमध्येही अनंतनाग-राजौरी मतदारसंघात शिल्लक राहिलेलं मतदान शनिवारी होणार आहे.
****
मराठवाड्याच्या दुष्काळासंदर्भात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजीनगर इथं बैठक घेतली. पाणी पातळी वाढवण्यासाठी विविध स्वयंसेवी संस्थांची मदत घेऊन गाळमुक्त धरण आणि गाळमुक्त शिवार करण्याचे प्रयत्न करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. पाण्याचं नियोजन व्यवस्थित व्हावं, यासाठी सूचना दिल्या असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यात सध्या एक हजार २५० गावांमध्ये एक हजार ८३७ टँकर सुरु असून, टँकर्सची आवश्यकता भासली तर ग्रामसेवकांपर्यंत, तलाठ्यांपर्यंत सूचना दिलेल्या असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. विभागातल्या सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री या बैठकीला उपस्थित होते.
****
ठाणे जिल्ह्यात डोंबिवलीतल्या एमआयडीसीत अमुदान या रसायन कंपनीत भीषण स्फोट होऊन आग लागली. आज दुपारी पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत चार कामगारांचा मृत्यू झाला. तर पाच महिलांसह २४ कामगार जखमी झाल्याची माहिती कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनानं दिली आहे.
या स्फोटामुळं एक ते दीड किलोमीटर परिसरातील घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या असून अग्निशमन दलाच्या बंबांद्वारे आग आटोक्यात आणली जात आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, कंपनीतील स्फोट झाल्याची घटना दु:खद असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे.   
****
अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीत बचाव कार्य सुरु असताना राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील तीन जवान, दोन तरुण, आणि एक स्थानिक नागरीकांसह सहा जणांचा मृत्यू झाला. काल प्रवरा नदीत दोन मुलं बुडाल्यानंतर त्यांचा शोध आणि बचाव कार्याची मोहीम सुरु असताना ही घटना घडली. जवान कर्तव्यावर असताना पाण्याच्या भोवऱ्यात बोट अडकून उलटल्यानं हा अपघात झाला. यात धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील पोलिस उपनिरीक्षक प्रकाश नाना शिंदे, राहुल गोपिंचंद पावरा आणि वैभव सुनिल वाघ यांचा समावेश आहे. मृत जवानांना राज्य आपत्ती प्रतिसाद दलातर्फे धुळे इथं श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे.
****
उजनी जलाशयात नाव उलटून झालेल्या दुर्घटनेतील सर्व सहा मृतदेह आज राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या हाती लागले आहेत. तीन पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा मृतात समावेश आहे. गेल्या २१ तारखेला ही दुर्घटना घडली होती. दोन दिवसांपासून राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाच्या पथकांची या जलाशयात शोधमोहीम सुरु होती. दुर्घटनेनंतर ४६ तासांनी हे मृतदेह सापडले.
****
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातल्या बोरपाडा धरणात बेडकी इथल्या दोन सोळा वर्षीय मुलींचा बुडून मृत्यू झाला आहे. उज्वला जयंत्या गावित आणि मिखा सानू गावित अशी दोघींची नावं आहेत. गावालगतच्या बोरपाडा धरणाच्या किनारी त्या आज सकाळी आंघोळीला गेल्या, त्यावेळी ही घटना घडली.    
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या राहुरी तालुक्यातील वरवंडी इथं बिबट्यानं हल्ला केल्यानं एका चार वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी पावणे आठच्या सुमारास घडली. वेदिका श्रीकांत ढगे असं या मृत मुलीचं नाव आहे. मुलगी अंगणात खेळताना बिबट्यानं तिच्यावर हल्ला केला होता.
****
मुंबईत घाटकोपर इथं महाकाय फलक कोसळून घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, नवी मुंबईत अनधिकृत फलकाविरोधात महानगरपालिकेकडून धडक मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत ३६ मोठे अनाधिकृत फलक काढण्यात आले असून कोल्हापूर, सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातही सर्वेक्षणानंतर ३१ अवैध फलक अतिक्रमण विभागाकडून काढण्याचं काम सुरू आहे.
****
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते आणि करवीरचे आमदार पी. एन. पाटील यांचं आज पहाटे कोल्हापूर इथं निधन झालं. ते ७१ वर्षांचे होते. आमदार  पाटील यांच्या पार्थिवावर करवीर तालुक्यातील सडोली खालसा या त्यांच्या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पाटील यांनी २० वर्ष कोल्हापूर काँग्रेसचं जिल्हाध्यक्षपद भूषवलं होतं. आमदार पाटील यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुखः व्यक्त केलं. पाटील यांच्या निधनानं राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पाटील यांच्या निधनानं सामाजिक, राजकीय क्षेत्रातील एक जाणतं नेतृत्व आपल्यातून निघून गेलं, अशा भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केल्या. तर आमदार पाटील यांच्या निधनानं जनतेशी घट्ट नाळ जुळलेलं नेतृत्व आपण गमावलं, अशा भावना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केल्या.
****
वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा आज ठिकठिकाणी साजरी होत आहे. भगवान बुद्धांचा जन्मदिवस आणि त्यांच्या ज्ञान प्राप्तीचा हा दिवस त्यांच्या शिकवणीचं स्मरण करुन साजरा करण्यात येत आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातील जागजई इथं बुद्धपोर्णिमेनिमित्त गोंडवाना समाजातील बांधवांची जत्रा फुलली आहे. बुद्धपोर्णिमे निमित्त 'देव आंघोळ' आणि देवदर्शन करण्यासाठी आदिवासी समाज बांधव इथं एकत्र जमतात. पुर्वापार वर्धा नदी पात्रात ही देव आंघोळ घातली जाते. याठिकाणी काळाचौरव, पांढराचौरव, राव, माणकोबाई ह्या देवांना भक्तगण आंघोळीसाठी आणतात. वाजतगाजत हजारो आदिवासी समुदाय इथं आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवितात.
****
हिंगोली शहरात बुद्ध पोर्णिमेच्या निमित्तानं डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा इथून आज सकाळी फेरी काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं. नांदेड शहरात पौर्णिमानगर इथं वैशाख पौर्णिमेच्या व बुद्ध जयंतीच्या निमित्तानं तथागत बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं. 
****
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या ‘बफर झोन’मध्ये आज ८९ मचाणावरून प्राणी गणना केली जाणार आहे. ‘निसर्ग अनुभव’या नावाने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशाच्या लख्ख प्रकाशात हा उपक्रम राबवला जातो. यावर्षी प्रथमच ‘कोअर झोन’ वगळता ‘बफर’ सहा परिक्षेत्रातील मचाणांवर प्राणीगणना होणार आहे
****
निवृत्तीवेतनधारकांना कोषागार कार्यालयाच्या नावानं येणारे बनावट दुरध्वनी उचलू नये, असं आवाहन जिल्हा कोषागार विभागानं केलं आहे. गेल्या काही दिवसांमध्ये निवृत्तीवेतनधारकांना फोन करुन ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर, कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचं खोटं सांगितलं जात आहे. याबाबतच्या तक्रारी कोषागार कार्यालयास प्राप्त झाल्या आहेत. पण, कोषागारामार्फत निवृत्ती विषयक, लाभ प्रदान करताना किंवा वसुलीबाबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधला जात नसुन, ऑनलाईन व्यवहाराविषयी देखील सूचित करण्यात येत नाही. त्यामुळे अशा कोणत्याही दुरध्वनी, संदेशांना प्रतिसाद देऊ नये तसंच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथम कोषागार कार्यालयाशी संपर्क साधावा, असं आवाहन अप्पर कोषागार अधिकारी सतीश गोसावी यांनी केले आहे.
****
लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातील उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन प्रशासनाकडून नियोजन करण्यात येत आहे. शहरी भागासोबतच जिल्ह्यातील कोणत्याही गाव, वाडी-वस्त्यांवर पाणी टंचाई जाणवल्यास, तातडीनं उपाययोजना करून नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी काल दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात पाणी टंचाईविषयक आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले. 
****
��राठवाडा, उत्तर कोकण आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी तर दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळ, सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली.  
****
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानात कमालीची वाढ झाली असून काल अकोला इथं सर्वाधिक ४४ पूर्णांक आठ अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं. त्याखालोखाल मालेगाव, नाशिक, सोलापूर, अहमदनगरसह विदर्भ आणि मराठवाड्यात पारा चाळीशीच्यावर होता. मराठवाड्यात परभणी इथं ४३ पूर्णांक चार, बीड इथं ४३ पूर्णांक एक, छत्रपती संभाजीनगर इथं ४१ पूर्णांक चार तर नांदेड इथं ४१ पूर्णांक दोन अंश सेल्सियस इतकं तापमान नोंदवलं गेलं.
****
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
ठाणे शहर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - महासंवाद
ठाणे शहर वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सरकार कटिबद्ध- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – महासंवाद
ठाणे, दि. १३ (जिमाका) : ठाणेकरांना अंतर्गत वाहतूक कोंडीतून दिलासा मिळावा यासाठी वेगवेगळे प्रकल्प राबवले जात आहेत. त्यात, बायपास, ईस्टर्न फ्री वेचा विस्तार यांचा समावेश आहे. एमएमआरडीए आणि ठाणे महानगरपालिका त्यासाठी काम करते आहे. त्यामुळे सगळे रस्ते वाहतूक कोंडी मुक्त होतीलच, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिसऱ्या कळवा खाडी पुलाच्या मार्गिकेच्या लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केला. कळवा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
happyharmonypuppy · 2 years
Link
0 notes
rebel-bulletin · 2 years
Text
महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची २३ जूनला प्रसिद्धी
महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रारूप मतदार याद्यांची २३ जूनला प्रसिद्धी
मुंबई, दि. 16 : बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई- विरार, पुणे, पिंपरी- चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अकोला, अमरावती आणि नागपूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारित कार्यक्रमानुसार प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या 23 जून 2022 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 1 जुलै 2022 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिकांच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mdhulap · 3 years
Link
TMC Recruitment - ठाणे महानगरपालिका - NHM अंतर्गत 124 जागांसाठी भरती -प्रसाविका (ANM), परिचारीका (GNM). जाहिरात व अर्ज.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
मुंबईत सोमवारपासून 10 टक्के पाणी कपात
मुंबईत सोमवारपासून 10 टक्के पाणी कपात
मुंबईत सोमवारपासून 10 टक्के पाणी कपात मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात पाऊस नसल्यानं पाणीसाठ्याची पातळी खालावली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने पाणी पुरवठ्यात 10 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिकेच्यावतीने ठाणे, भिवंडी महापालिका आणि इतर गावांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यातही ही 10 टक्के पाणी कपात लागू होणार आहे.  मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये सोमवारपासून दहा…
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
मेट्रोच्या कामामुळे दि. १० ऑगस्टपर्यंत ठाणेकडील घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल
मेट्रोच्या कामामुळे दि. १० ऑगस्टपर्यंत ठाणेकडील घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल
ठाणे, दि. 28 (जिमाका) :- ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीत मुंबई मेट्रो लाईन-४ चे काम चालू आहे. या मेट्रो ४ च्या पिलरवर ओवळा सिग्नल ते सी.एन.जी. पंप पर्यंत घोडबंदर रोड या ठिकाणी गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. हे गर्डर टाकतांना ठाणेकडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याने, या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 4 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 10 May 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १० मे २०२४ दुपारी १.०० वा.
****
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणी पुण्यातल्या विशेष न्यायालयानं आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना आजीवन जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. अन्य एक आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे याच्यावर हत्या आणि कट रचल्याचा आरोप होता, मात्र पुराव्याअभावी, त्याच्यासह संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात डॉ दाभोलकर यांची महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार उद्या संपत आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या प्रचारानं जोर धरला आहे. या टप्प्यात राज्यातल्या औरंगाबाद, जालना, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर आणि शिर्डी या मतदारसंघांमध्ये, येत्या १३ मे रोजी मतदान होणार आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नंदुरबार इथं महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्राचारार्थ सभा घेतली.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगर इथं महायुतीच्या घटक पक्षा���्या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज जालना आणि छत्रपती संभाजीनगर इथं सभा घेणार आहेत. दुपारी जालना इथं महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांच्या प्राचारार्थ ठाकरे यांची सभा होईल. त्यानंतर संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर इथं महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्या प्रचारासाठी, मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे.
****
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा यासाठी स्वीप अंतर्गत अनोखे उपक्रम राबवण्यात येत आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात मतदान यंत्राचे मुखवटे अर्थात शुभंकर तयार करण्यात आले आहेत. हे चार शुभंकर संपूर्ण महापालिका क्षेत्रात फिरुन मतदानाविषयी जनजागृती करत आहेत. नाशिक महानगरपालिका आणि क्रेडाई संस्थेने मतदार जागृतीसाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं.
****
शिर्डी लोकसभा मतदारसंघात ६५० नागरीकांनी गृह मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ५५४ ज्येष्ठ नागरीक, तर ९६ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे.
****
वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय्य तृतीयेचा सण आज साजरा होत आहे. भगवान परशूराम आणि महात्मा बसवेश्वर जयंतीही आज साजरी होत असून, यानिमित्तानं शोभायात्रा, वाहनफेऱ्यांसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
नांदेड इथल्या शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात आज महात्मा बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर इथं स्वामी विवेकानंद उद्यानात महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त जिल्हा महोत्सव समितीच्या वतीने मुख्य कार्यक्रम घेण्यात आला. तर भगवान परशुराम जयंतीनिमित्त औरंगपुरा इथं भगवान परशुराम यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं.
****
नांदेड शहरातल्या शिवाजीनगर परिसरात आयकर विभागाने आज पहाटे छापे मारले. खाजगी फायनान्स कंपनी, गोल्ड लोन देणाऱ्या कंपन्या आयकर विभागाच्या रडारवर आहेत. शहरातल्या कोकाटे कॉम्प्लेक्स, अलिभाई टॉवर इथल्या कंपन्यांची कार्यालयं आणि शिवाजीनगर इथल्या निवासस्थानांवरही आयकर विभागाकडून कारवाई केली जात आहे. नाशिक आयकर विभागातील जवळपास १०० अधिकारी या कारवाईत समाविष्ट असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
परभणी जिल्ह्यात आगामी पावसाळ्यात प्रशासनानं आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. ते काल मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आढावा बैठकीत बोलत होते. जिल्ह्यात नदी काठावर ११८ गावं आहेत. या गावांना संभाव्य महापुराबाबत सतर्क करणं तसंच क्षेत्रीय अधिकाऱ्यांना वेळोवेळी संदेश देण्याची जबाबदारी संबंधित गावातील समितीवर सोपवण्यात यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
हिंगोली जिल्ह्याच्या औंढा तालुक्यातल्या हिवरा जाटू इथला मंडळ अधिकारी उत्तम डाखुरे २० हजार रुपयांची लाच घेताना काल पकडण्यात आलं. सातबारा उताऱ्यावरील फेरफार नोंद कायम ठेवण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
महावितरणने राज्यातल्या तीन कोटी वीजग्राहकांसाठी घरबसल्या एका क्लिकवर सर्व सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून वीजग्राहकांच्या संवादपर मदतीसाठी, ऊर्जा चॅट बॉट, महावितरणच्या संकेतस्थळ आणि मोबाईल ऍपवर उपलब्ध करून देण्यात आलं आहे. नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून या सेवेचा ग्राहकांना लाभ घेता येईल.
****
राज्यात एक मार्चपासून उष्माघाताच्या २०२ रूग्णांची नोंद झाली असून, एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. सर्व जिल्ह्यांमध्ये उष्माघाताच्या रूग्णांवर उपचार करण्याची सुविधा पुरवण्यात आली असल्याचं, आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर राधाकिशन पवार यांनी सांगितलं. उष्माघाताचे सर्वाधिक २३ रूग्ण नाशिक जिल्ह्यात आढळले आहेत.
****
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
मेट्रोच्या कामामुळे दि. १० ऑगस्टपर्यंत ठाणेकडील घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल
मेट्रोच्या कामामुळे दि. १० ऑगस्टपर्यंत ठाणेकडील घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल
ठाणे, दि. 28 (जिमाका) :- ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कासारवडवली वाहतूक उपविभागाच्या हद्दीत मुंबई मेट्रो लाईन-४ चे काम चालू आहे. या मेट्रो ४ च्या पिलरवर ओवळा सिग्नल ते सी.एन.जी. पंप पर्यंत घोडबंदर रोड या ठिकाणी गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. हे गर्डर टाकतांना ठाणेकडून घोडबंदर रोड वाहिनी वाहतुकीस बंद करण्यात येणार असल्याने, या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये व परिसरातील वाहतूक सुरळीत…
View On WordPress
0 notes