#महिन्यात
Explore tagged Tumblr posts
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
कबीर साहिब हे अल्लाह आहे!
जगातील सर्व मुस्लिम कुरानच्या पृथ्वीवर आगमन झाले म्हणून पूर्ण महिन्याच्या सर्व दिवशी रोजा ठेतले जातात. त्या रमज़ान महिन्यात जाणून घ्या पवित्र कुरान शरीफ मध्ये प्रमाण आहे, "अल्लाह कबीर आहे ज्यांनी ही संपूर्ण सृष्टी आपल्या वचनांनी रचली."
21 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान मोदी यांना कुवेतचा ‘ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान
संपूर्ण समाजात सलोखा निर्माण होण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार - सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
चांगलं आणि उत्तम शिक्षण देणं हे ध्येय : शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
आणि
१९ वर्षांखालील मुलींच्या आशिया चषक क्रिकेट टी-ट्वेंटी स्पर्धेचं भारताला विजेतेपद
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. कुवेतचे अमीर, हिज हायनेस शेख मशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबा यांनी आज पंतप्रधानांना कुवेतचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार “ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर” प्रदान केला. कुवेतचे पंतप्रधान हिज हायनेस शेख अहमद अल-अब्दुल्ला अल-अहमद अल-सबा देखील उपस्थित होते. पंतप्रधानांनी हा पुरस्कार भारत आणि कुवेत यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीला, कुवेतमधील भारतीय समुदायाला आणि एक अब्ज चाळीस लाख भारतीय नागरिकांना अर्पण केला. ४३ वर्षांनंतर भारताच्या पंतप्रधानांच्या कुवेतच्या ऐतिहासिक भेटीवेळी प्रदान करण्यात आलेल्या या पुरस्काराला विशेष महत्त्व आहे. हा पुरस्कार १९७४ पासून प्रदान करण्यात येत असून तो निवडक जागतिक नेत्यांना देण्यात येतो. पंतप्रधान मोदी यांना प्राप्त झालेला हा विसावा आंतरराष्ट्रीय सन्मान असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
दरम्यान, आपल्या दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यात काल मोदी यांनी एका विशेष कार्यक्रमात कुवेतमधील भारतीय जनसमुदायाला संबोधित केलं. कुवैतच्या विकासात आणि भारत-कुवैत संबंधांच्या मजबूतीकरणात भारतीयांची मोठी भूमिका राहिली असल्याचं त्यांनी म्हटलं. भारतीय समुदायाला प्रवासी भारतीय दिवस आणि पुढील महिन्यात आयोजित होणाऱ्या महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्याचं आमंत्रणही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिलं. पंतप्रधानांनी आपल्या या दौऱ्यात १०१ वर्षीय भारतीय परराष्ट्र सेवेतले माजी अधिकारी मंगल सैन हांडा यांची भेट घेतली. २६व्या अरेबियन गल्फ चषक फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यालाही पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी कुवैतच्या नेत्यांसोबत अनौपचारिक चर्चा केली.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या आगमनाप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. हिवरे बाजार इथं एका खासगी कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली असता, हिवरे बाजार ग्रामस्थांच्या वतीनं मानपत्र देऊन मुख्यमत्र्यांचा सन्मान करण्यात आला.
****
संपूर्ण समाजात सलोखा निर्माण होण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचं, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ता��रांशी बोलत होते. उद्या बीड आणि परभणी इथं आपण असून, तिथं घडलेल्या दोन्ही घटनांचा बारकाईनं अभ्यास करुन, सत्य परिस्थितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं.
दरम्यान, बहुजन विकास, नवीकरणीय ऊर्जा आणि दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांचं आज मंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच छत्रपती संभाजीनगर शहरात आगमन झालं. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचं जल्लोष���त स्वागत करुन फेरी काढण्यात आली. शहरातल्या क्रांती चौक इथं फेरीची सांगता होऊन, सावे यांची मिठाईनं तुला करण्यात आली.
****
शिक्षण खात्यातील कामाचा सकारात्मक निकाल दिसेल, असं प्रतिपादन राज्याचे नुतन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. मालेगाव बाह्यचे आमदार असलेल्या भुसे यांचं आज मालेगांव इथं आगमनानंतर भव्य स्वागत करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे शालेय शिक्षणमंत्रीपद अत्यंत आव्हानात्मक आहे मात्र, इथंही आपण प्रभावीपणे काम करताना दिसू, असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी शिक्षण खातं जिव्हाळ्याचं आहे. शालेय शिक्षण मंत्री तसंच अधिकारी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून काम करतील, असं त्यांनी नमूद केलं. गरिबातील गरीब मुलांना चांगलं आणि उत्तम शिक्षण देणं हे ध्येय असल्याचं भुसे म्हणाले. नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्या दृष्टीनं सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
****
नाशिक जिल्ह्यासह अनेक भागात कांद्याचा प्रश्न चर्चेत असून कांद्यासंदर्भात निश्चीत धोरण ठरवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असं कृषी खात्याचे मंत्री विधिज्ञ माणिक कोकाटे यांनी म्हटलं आहे. मंत्रीपद स्वीकारल्यानंतर ते आज नाशिक इथं आले असता त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. कृषी खातं अत्यंत आव्हानात्मक असून कृषी मंत्री ही फार मोठी जबाबदारी आहे. वातावरणात होणारे बदल तसंच शेतीमालाच्या भावावर होणारा परिणाम, वीज आणि अन्य प्रश्नांवर आपण काम करणार असल्याचंही मंत्री कोकाटे यावेळी म्हणाले.
****
बीड जिल्ह्यातले कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवण्याला आपण प्राधान्य देणार आहोत, असं जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी नमूद केलं आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी आज ही माहित दिली. मस्साजोग इथल्या खुनाच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला असून या संदर्भातला तपास तसंच उर्वरित शिल्लक कामं आपण पूर्ण करणार आहोत. लवकरच या संदर्भातले निकाल आपल्याला दिसतील. पोलिसांना सर्व तपासांमध्ये पूर्ण ��श मिळावं तसंच जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित रहावी, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. त्यांनी काल रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास पदभार स्वीकारला. शासनानं आपल्यावर खूप मोठी जबाबदारी दिली असून जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हे आपल्यासमोर आव्हान असल्याचं ते म्हणाले. बीड जिल्ह्यातल्या अडचणींसंदर्भात नागरिक आपल्याला केंव्हाही भेटू शकतात, असंही पोलिस अधिक्षक कॉवत यावेळी म्हणाले.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रविचंद्रन अश्विन यानं निवृत्ती जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला भावनिक पत्र लिहून त्याच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. क्रिकेट आणि देशासाठी अश्विननं दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल पंतप्रधानांनी त्याचे आभार मानले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतलेले ७६५ बळी आणि कसोटीत सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार या अश्विनच्या विक्रमाचा विशेष उल्लेख करताना मोदी यांनी त्याच्या गोलंदाजीतली विविधता आणि प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवण्याच्या क्षमतेची प्रशंसा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या या पत्रात अश्विनच्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या क्षणांचा उल्लेख केला असून त्याची ही कारकिर्द भविष्यातल्या पिढ्यांना प्रेरणा देईल अशी आशा व्यक्त केली आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातल्या खानिवली ग्रामपंचायतीनं आपलं गाव प्लास्टिक मुक्त व्हावं, गावातलं पर्यावरण अबाधित रहावं त्यासोबतच गावातल्या महिलांना रोजगाराच एक नवीन साधन उपलब्ध व्हावं या उद्देशानं आदर्श उपक्रम राबवला आहे. या गावात प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापनासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. यामुळे गाव प्लास्टिक मुक्त तर होतंच आहे त्यासोबतच गावातल्या महिलांना रोजगाराची एक नवी संधी देखील उपलब्ध झाली आहे.
खानिवली ग्रामपंचायतीनं मुंबईच्या रोटरी क्लबच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून गावात उभारलेल्या यंत्रणेतून प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे परिसर प्रदूषण मुक्त होत आहे तसंच महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
****
राज्यात सरत्या वर्षाच्या शेवटापर्यंतच्या आठ दिवसांच्या कालावधीत बहुतांश भागात वातावरण काही अंशी ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी तुरळक पावसाचीही अंशत: शक्यता आहे. मात्र, देशाच्या उत्तरेकडील बहुतांश पर्वतीय भागात थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
भारतानं १९ वर्षांखालील मुलींच्या आशिया चषक क्रिकेट टी-ट्वेंटी स्पर्धेत बांग्लादेशला पराभूत करत अजिंक्यपद पटकवलं आहे. मलेशियाच्या क्वालालंपूर इथं आज सकाळी झालेल्या अंतिम सामन्यात, बांग्लादेश संघानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली. भारतानं वीस षटकांत सात बाद ११७ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशचा डाव एकोणीसाव्या षटकाचे तीन चेंडू शिल्लक असतांना ७६ धावांवर आटोपला. सामनावीरचा पुरस्कार भारताची सलामीवीर फलंदाज गोंगादी तृषा हिला देण्यात आला. अशिया खंडातील आघाडीच्या सहा संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारतानं आपले सर्व सामने जिंकण्याची किमया साधली.
****
स्वच्छ नवी मुंबई अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत आज सहा हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेत स्वच्छतेचा संदेश दिला. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे तसंच राज्य पोलीस दलाच्या फोर्स वनचे प्रमुख कृष्णप्रकाश यांनीही या स्पर्धेत सहभाग घेऊन नागरिकांना प्रोत्साहन दिलं. दिडशेहून अधिक तृतीयपंथी नागरिक, पन्नासहून अधिक दिव्यांग, तसंच अंध व्यक्ती यांनीही विविध गटांत सहभाग नोंदवला. शाळकरी विद्यार्थी, युवक यात मोठ्या संख्येनं सहभागी झाले. अक्षय पडवळ, ओंकार बी. यांनी पुरुष गटातली तर सुजाता माने, कोमल खांडेकर यांनी महिला गटांतली विजेतेपदे पटकावली.
****
भारतीय महिला क्रिकेट संघानं वेस्टइंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ३१५ धावांचं मोठं आव्हान ठेवलं आहे.
****
0 notes
Text
महाराष्ट्र राज्य लॉटरी नोव्हेंबर २०२४ चा भव्य सोडतीचा निकाल जाहीर
मुंबई, दि. १२ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात पाच मासिक तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात.नोव्हेंबर २०२४ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून २८,९९२ तिकिटांना ३ कोटी २६ लाख ७० हजार ८५० रुपये व साप्ताहिक सोडतीतून ५६,७४१ तिकीटांना रू. दोन कोटी ३१ लाख ६३ हजार ९०० ची बक्षिसे जाहीर झाली आहेत, असे महाराष्ट्र राज्य लॉटरी वाशी येथील वित्त व लेखा विभागाचे उपसंचालक यांनी कळविले आहे. १…
View On WordPress
0 notes
Text
0 notes
Text
खासदार झाल्यानंतर देखील निलेश लंके यांचे गरजूंना मदतीचे रेकॉर्ड , अवघ्या सहा महिन्यात
खासदार झाल्यानंतर देखील निलेश लंके यांचे गरजूंना मदतीचे रेकॉर्ड , अवघ्या सहा महिन्यात
खासदार निलेश लंके आमदार असताना त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून राज्यातील 288 आमदारांपैकी गरजू रुग्णांसाठी सर्वाधिक मदत मिळवून देण्याचा बहुमान मिळवलेला होता. खासदार झाल्यानंतर देखील लंके यांच्या कायशैलीत कुठलीही कमतरता आलेली नसून अवघ्या सहा महिन्यात 26 रुग्णांसाठी त्यांनी 61 लाख 22 हजार पाचशे रुपयांची मदत मिळवून दिलेली आहे. पंतप्रधान सहाय्यता निधीतून खासदार निलेश लंके यांच्या शिफारशीतून ही मदत…
0 notes
Text
आपल्या ई-कॉमर्स गेमला वाढवा Shiprocket Engage 360 सह! 🚀✨
नमस्कार Tumblr कुटुंब! 👋
आपण एक ऑनलाइन विक्रेता आहात जो आपल्या ग्राहकांच्या सहभागाला पुढील स्तरावर नेऊ इच्छित आहे? भेटा Shiprocket Engage 360ला—आपल्या ग्राहकांशी अर्थपूर्ण संबंध निर्माण करण्यासाठी आपले अंतिम साधन!
🌟 Shiprocket Engage 360 का?
मल्टी-चॅनेलमॅजिक: ईमेल, एसएमएस, आणिपुशनोटिफिकेशन्स च्या माध्यमातून आपल्या ग्राहकांशी सहजपणे पोहोचा.
स्वयंचलितअवेसमनेस: ऑर्डर अपडेट्स आणि वैयक्तिकृत संदेश सेट करा ज्यामुळे आपले ग्राहक लूपमध्ये राहतात, कोणत्याही मेहनतीशिवाय.
फीडबॅकफ्रेंडली: आपल्या उत्पादने आणि सेवा आणखी चांगली करण्यासाठी मौल्यवान फीडबॅक गोळा करा.
प्रोमोपॉवर: लक्षित प्रमोशनल कॅम्पेन लॉन्च करा ज्यामुळे विक्री वाढेल आणि वफादारी मजबूत होईल.
स्मार्टएनालिटिक्स: काय कार्यरत आहे आणि काय नाही हे समजून घेण्यासाठी विस्तृत अंतर्दृष्टी मिळवा.
📈 आपल्यालाआवडतीलअसेफायदे:
+२५% ग्राहकवफादारी
+२०% विक्रीवाढ
-३०% ग्राहकसहाय्यचौकशी
+३५% ग्राहकसंतुष्टी
💸 परवडणाऱ्यायोजना:
स्टार्टर: फक्त ₹९९९/माह – लहान व्यवसायांसाठी परफेक्ट!
प्रोफेशनल: ₹२,४९९/माह – उन्नत वैशिष्ट्यांसह पॅक्ड.
एंटरप्राइज: कस्टम प्राइसिंग – आपल्यासाठी विशेषरीत्या तयार केलेले!
🎁 विशेषऑफर: आता साइन अप करा आणि आपल्या पहिल्या महिन्यात ५०% सूट मिळवा! याची चूक करू नका!
👉 www.shiprocket.in/engage360 येथे भेट द्या आणि आपल्या व्यवसायाला उड्डाण करा! 🚀
0 notes
Text
��ागरा प्राण तळमळतो.
कोकणात आता मे महिना चालू झाला आहे. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून वेळ आहे. भर पावसात मी एकदा समुद्रकिनाऱ्यावर गेलो होतो. भर पावसात कोकणातल्या समुद्रावर छत्री किंवा रेनकोट पुरा पडत नाही. एवढा वारा असतो. पण मे महिन्यात मात्र जेव्हा शहरात खूप उकाडा असतो अशावेळी समुद्रावर साधे कपडे घालून वाऱ्याची मजा घ्यायला खूप उत्साह येतो. काल मी चौपाटीवर वाळूत बसलो होतो. आणि माझ्या मनात विचार आला, माझा समुद्राच्या,…
0 notes
Video
youtube
दोन महिन्यात सरकार साडी चोळी सुद्धा देईल..
0 notes
Text
Maval : घोरावडेश्वरावर वृक्षप्रेमींचा सन्मान
एमपीसी न्यूज – ऋषिपंचमीचे औचित्य साधून रविवार (दि.8) नवसंकल्प फाउंडेशनच्या वतीने घोरावडेश्वर डोंगरावर (Maval)नियमित वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन करणार्या वृक्षप्रेमींचा प्रातिनिधिक सन्मान करण्यात आला. घोरावडेश्वर डोंगरावर नवसंकल्प फाउंडेशनच्या वतीने जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. सदर वृक्षारोपणात वड, पिंपळ, कडूलिंब, आंबा, चिंच, फणस, जांभूळ, अर्जुन…
0 notes
Text
उन्हाळ्यात लिंबूची झाडे फुलवणे: शक्य आहे! कागदी लिंबू पिकला एप्रिल – मे महिन्यात जास्त मागणी व बाजार दर असतात व त्या करीत लिंबू पिकला सप्टेबर महिन्यात तान देणे गरजेचे असते परंतु या काळात पाऊस जास्त असल्यामुळे ताण शक्य होत नाही अश्या परस्थित पिकला संजीवके (लिहोसीन ) वापरून ताण दिल्यामुळे फलधारणा जास्त होते व उत्पन्न वाढते. निमटेक येथे कागदी लिंबू या फळ पिकाचे अंदाजे ५० एकर क्षेत्र असल्यामुळे या गावामध्ये संस्कृति संवर्धन मंडळ, कृषी विज्ञान केंद्र सगरोळी अंतर्गत डॉ संतोष चव्हाण यांनी लिंबू पिकातील हस्त बहार व्यवस्थापन या विषयावर प्रथम रेषीय प्रय्त्याक्षिक घेण्यात आले. तसेच सदरील शेतकर्यांना लिहोसीन वाटप करण्यात आले आणि बहार व्यवस्थापन करण्याकरीत झाडांना ताण देणे, खत व्यवस्थापन या बद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच डॉ. प्रवीण चव्हाण, विषय विशेषज्ञ (कृषी विस्तार), यांनी शेतकऱ्यांना केव्हीकेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली ज्यामुळे त्यांना फायदा होऊ शकतो. #लिंबू #लिंबूचीझाडे #हस्तबहार #उन्हाळा #शेतकरी #कृषी #मराठशेतकरी #महाराष्ट्र #lemon #lemoontree #flowering #summer #agriculture #farming #gardening #farmer
1 note
·
View note
Text
#AlKabir_Islamic
#SaintRampalJi
कबीर साहिब हे अल्लाह आहे!
जगातील सर्व मुस्लिम कुरानच्या पृथ्वीवर आगमन झाले म्हणून पूर्ण महिन्याच्या सर्व दिवशी रोजा ठेतले जातात. त्या रमज़ान महिन्यात जाणून घ्या पवित्र कुरान शरीफ मध्ये प्रमाण आहे, "अल्लाह कबीर आहे ज्यांनी ही संपूर्ण सृष्टी आपल्या वचनांनी रचली."
17 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 21 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक २१ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यावर रवाना झाले. ४३ वर्षांतील भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच कुवेत भेट आहे. दोन्ही देश केवळ मजबूत व्यापार आणि ऊर्जेबाबतच भागीदार नाहीत तर पश्चिम आशिया क्षेत्रातील शांतता, सुरक्षा, स्थैर्य आणि समृद्धी तसंच समान हितसंबंधातही भागीदार आहेत असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
संसद भवनात झालेल्या निदर्शनादरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर कथित हल्ला आणि भारतीय जनता पक्षा���्या दोन खासदारांना दुखापत झाल्याच्या प्रकरणाचा तपास दिल्ली पोलिसांनी गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. भाजपच्या तक्रारीवरून राहुल गांधींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजप खासदार अनुराग सिंह ठाकूर यांच्यासह खासदार बन्सुरी स्वराज आणि हेमांग जोशी यांनी गुरुवारी संसद मार्ग पोलिस ठाण्यात राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, राष्ट्रीय महिला आयोगानेही नागालँडच्या महिला खासदार फांगनॉन कोन्याक यांच्यास���बत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या कथित ��ैरवर्तनाची स्वत:हून दखल घेतली आहे.
जयपूर गॅस टँकर दुर्घटनेतील मृतांची संख्या १४ वर पोहोचली आहे. या दुर्घटनेतील २७ जखमींवर एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असून सहा जण सध्या कृत्रिम जीवरक्षक प्रणाली- व्हेंटीलेटरवर आहेत. जयपूरचे जिल्हाधिकारी जितेंद्र कुमार सोनी यांनी या घटनेच्या चौकशीसाठी संयुक्त तपास समिती स्थापन केली आहे. काल सकाळी जयपूर-अजमेर महामार्गावर हा अपघात झाला होता.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूरच्या दीक्षाभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं दर्शन घेतलं. दीक्षाभूमी आणि मुंबईची चैत्यभूमी आमच्यासाठी महत्वाचं स्थान आहे, इथं आल्यानंतर ऊर्जा आणि प्रेरणा मिळते असं त्यांनी यावेळी म्हटलं. बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही देशाचा कारभार चालवत आहोत, राज्य शासनाच्या वतीनं तालुकानिहाय संविधान भवन बांधण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
परभणी इथल्या अप्रिय घटनेच्या निषेधार्थ आज आंबेडकरी संघटनांच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या जालना बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. शहराल्या मुख्य बाजारातली बहुतांश व्यापारी प्रतिष्ठानं बंद असून सर्वत्र पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मस्साजोग गावात देशमुख कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केलं. यावेळी पक्षाचे नेते राजेश टोपे उपस्थित होते.
दरम्यान, बीडच्या पोलिस अधिक्षकपदी नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॉवत सध्या छत्रपती संभाजीनगर इथं उपायुक्त असुन त्यांची पोलिस अधिक्षक म्हणून ही पहिलीच नियुक्ती आहे. ते २०१७ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. अधिक्षक अविनाश बारगळ यांच्या बदलीची घोषणा काल सभागृहात करण्यात आली होती. त्यानंतर बीडला पोलिस अधिक्षक म्हणून शासनाने नवनीत कावत यांची या पदावर नियुक्ती केली आहे.
राज्यात ४२ मंत्री आहेत, पण त्यातील मुख्यमंत्री वगळता उर्वरित मंत्री अजूनही बिनखात्याचेच आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गटनेते भास्कर जाधव यांनी केली आहे. कालपासून सुरू ��सलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेत आज ते बोलत होते. विदर्भात गेल्या अकरा महिन्यात २ हजार ३३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, गेल्या तीन वर्षांत सात हजार आत्महत्या झाल्या. शेतमालाला योग्य आणि हमी भाव सरकार देत नाही, कृषी विमा योजनेत हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याची तक्रार सत्ताधारी सदस्यच करीत आहे, ही गंभीर परिस्थिती असून याची उत्तरं सरकारनं द्यावीत अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ११ कोटी ३२ लाख रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी काल रात्री उशिरा ही कारवाई केली. या प्रकरणी बँकॉकहून येणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं आहे.
शिक्षकांना शैक्षणिक कामांतून मुक्त करा, अशी आग्रही मागणी नागपूर हिवाळी अधिवेशनात नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी विशेष उल्लेखाद्वारे केली आहे. सतत चालणाऱ्या मतदार नोंदणी आणि इतर सर्वेक्षण प्रक्रियेत शिक्षकांना गुंतवून अशैक्षणिक कामे दिली जात असल्यानं राज्यातील शिक्षकांत तीव्र असंतोष असल्याचं त्यांनी यावेळी नमुद केलं.
आज पहिला जागतिक ध्यान दिवस सर्वत्र साजरा केला जात आहे. लोकांना शांती आणि कल्याणाच्या भावनेनं जीवन जगण्याची प्रेरणा देण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा करण्याचं ठरवण्यात आलं आहे. संयुक्त महासभेनं या संदर्भात भारतानं सहप्रायोजित केलेला ठराव नुकताच एकमतानं मंजूर केला होता. आज या निमित्तानं न्यूयॉर्क इथल्या संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात भारताच्या स्थायी मिशनचे प्रतिनिधी पार्वतनेनी हरीश यांनी एका कार्यक्रमाचं आयोजन केलं. लक्षावधी लोक उपस्थित असलेल्या या कार्यक्रमात, प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी ध्यान अभ्यासाचं नेतृत्व केलं.
0 notes
Text
https://youtube.com/playlist?list=PL1C0jk9lbJO265dhLnF_5E8yNquaiAfHo&si=w1OuqpsuvFyDS0eX
जय विज्ञान च्या संपूर्ण कविता पाहण्यासाठी वरील लिंक👆 वर क्लिक करा👍
नमस्कार मंडळी🙏🏻
*जय विज्ञान!*🔥🚀💥
हा विज्ञान कवितांचा सचित्र, ज्ञानरंजक, अभिनव असा संग्रह मी शालेय जीवनात असतांना व विषेश म्हणजे विद्यार्थ्यांसाठी लिहीलेला आहे...यांतील जवळपास सर्वच कविता महाराष्ट्रातील नामवंत वर्तमान पत्रे, मुलांचे मासिके तसेच दिवाळी अंकातून पूर्व प्रकाशित झालेल्या आहेत...हा संग्रह मी *भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम* साहेब यांना ही (२००५) मधे ज्या काळी ते राष्ट्रपति होते व त्यांच्या वाढदिवसा निमित्त लिहीलेली कविता जी दै लोकमत च्या संपादकीय पानावर प्रकाशित झाली होती ते काव्य फ्रेम करुन व जय विज्ञान हा संग्रह मी त्यांना संसद भवन येथे सप्रेम भेट म्हणून पाठवीला होता...तब्बल दोन दशके लोटली आहेत...झपाटल्याप्रमाणे मी लिखाण करायचो व तड��क औरंगाबाद मधल्या तमाम वर्तमान पत्रांच्या कार्यालयांत धडकायचो... मुलांसाठी मी त्याकाळीच भरमसाठ लिखाण करुन ठेवले आहे...माझे दोन कथासंग्रह *कथासागर* व *कथासंस्कार* तसेच तीन कादंबर्या *मनातिल भूते*, *भित्यापाठी ब्रम्हराक्षस*, *उडत्या तबकड्या व मंगळावरील मित्र* त्याचप्रमाणे दोनकविता संग्रह *च्युईंगम*, व *जय विज्ञान* असे एकुण सात पुस्तके प्रकाशित आहेत हे सर्व साहित्य मी सर���्वती भुवन महाविद्यालय बारावित होतो त्यापूर्वीचे आहे, आता लिखाण करण्यासाठी तसा वेळ मिळत नाही सदरील पुस्तके सध्या गुगल प्ले स्टोअर व अमॅझान किंडलवर हि वाचण्यासाठी उपलब्ध आहेत. दोन पुस्तकांना महाराष्ट्र शासनाचे अनुदान मिळालेले आहे.
आजकाल मुले पुस्तकांपासून दूरावत चालली आहेत किंवा कळत नकळत आपण त्यांना करत आहोत, आपणही मुलांच्या हातात छान छान संस्कारक्षम पुस्तके देण्याऐवजी त्यांच्या हाती फोन देऊन मोकळे होतो, असो.
मित्रांनो, म्हणून बर्याच वर्षापासून मुलांसाठी जय विज्ञान मधील कविता मोबाइल वरच व्हिडिओ स्वरूपात आणावे असे सल्ले माझ्या अनेक मित्रांनी मला दिले...व शेवटि मी हि ते मनावर घेतले आणी मागील दोन महिन्यांपासून जय विज्ञान मधील विज्ञान कवितांची मालिका मी माझ्या यु ट्यूब चॅनलवर पब्लिश करत आहे... माझ्यापुढे सर्वात मोठा यक्ष प्रश्न होता व्हिडिओ एडिटिंग चा ! परंतु कुठलाही कोर्स न करता मला जसं जमेल तसं मुलांना समजेल अशा साध्या सोप्या भाषेत लिहिलेल्या या कविता मी एडिटिंग करुन अपलोड़ करत आहे...यांत जवळपास दीडशे कविता आहेत व जवळपास अर्ध्या कविता सध्या अपलोड झालेल्या आहेत... मित्रांनो, कसलाहि कोर्स न करता मोबाइल वरच माहिती घेउन व्हिडिओ एडिटिंग, एनीमेशन करणे काही कविता मुलांना आवडतील अशा कार्टून स्वरूपात डिजाइन करणे खुपच किचकट आहे व यांत तास न तास द्यावे लागतात...आपण दोन पाच मिनिटांची व्हिडिओ बघतो परंतु त्यासाठी किती मेहनत घ्यावि लागते व वेळ द्यावा लागतो हे मला आता कळत आहे, असो...तर अशाच प्रकारे आपले प्रेम व सहकार्य मिळत राहिले तर...नक्कीच पुढील काही महिन्यात जय विज्ञान पूर्ण पणे अपलोड होईल... त्याचप्रमाणे आजचे ॲडव्हान्स विज्ञान ही म्हणजे जय विज्ञान भाग दोन व विद्यार्थ्यांसाठी कथा गोष्टीही व्हिडिओ स्वरूपात आणण्याचे विचार आहे त्यासाठी नक्कीच मला उर्जा मिळेल...सोबत चॅनलवरील *जय विज्ञान* ची संप���र्ण प्लेलिस्ट लिंक पाठवत आहे ती आपल्या संपर्कातील तमाम छोट्या सवंगड्यांना, विद्यार्थ्यांना आवर्जून पाठवा, आपला दोन शब्दात अभिप्राय हि नक्कीच नमूद करा आपल्या प्रतिक्रिया, सुचनांचे स्वागतच आहे त्या मला मार्गदर्शक व प्रेरकच ठरतील, धन्यवाद मंडळी जय हिंद! जय विज्ञान!!
- आपलाच
*-मास्टर सुल्तान उर्फ कवी : सावनसागर*
औरंगाबाद, महाराष्ट्र 📲9326007786, 9545007786
e mail : [email protected]
1 note
·
View note
Text
‘ इस्कॉन ‘ वर बंदीची मागणी बांगलादेशात फेटाळली , न्यायालय म्हणाले की..
बांगलादेशातील राजकीय परिस्थितीचा फायदा घेत भारतात वातावरण बिघडवण्याचे प्रकार सुरू असतानाच बांगलादेश येथील न्यायालयाने इस्कॉन या धार्मि�� संघटनेवर बंदी घालण्याची मागणी फेटाळून लावलेली आहे. इस्कॉन ही कट्टरतावादी संघटना आहे त्यामुळे तिच्यावर बांगलादेशात बंदी घालावी यासाठी प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचलेले होते. बांगलादेशमध्ये ऑगस्ट महिन्यात सत्तांतर झाल्यानंतर अल्पसंख्यांक समुदाय प्रचंड भीतीमध्ये…
0 notes
Text
नदीत अवैधरित्या भराव टाकणा-यां विरोधात जन आंदोलन
विकसकांना मदत कर��ा-या अधिका-यांना धरले धारेवर पुणे – पुणे येथील शांतीनगर भागात जुलै महिन्यात 2 वेळेस पूरपरिस्थिती निर्माण झलक होती. नागरिकांच्या घरातील अत्यावश्यक गरजू: वस्तु पाण्यामुळे खराब झाल्या. नाल्याची सीमा भिंत, जायका प्रकल्प यांनी फोडली व नाल्यां मध्ये प्रकल्पांचा राडारोडा मोठ्या प्रमाणात टाकला जातो आणी नाल्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होऊन पाणी घरात ,दुकानात शिरले , या घटनेला जवाबदार…
0 notes