#ठरेल
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 17 December 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
राज्यसभेत संविधानावरच्या विशेष चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत. सभागृहात काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला.
एक राष्ट्र एक निवडणूक या विषयी दोन विधेयकं आज लोकसभेत सादर करण्यात येणार आहेत. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल संविधान विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयक सादर करतील.
****
लोकसभेत काल २०२४-२५ साठीच्या अनुदानाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. ८७ हजार ७६२ कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यासाठी सरकारनं संसदेची मंजुरी मागितली आहे. यापैकी, प्रस्तावांमध्ये कर्जे, दायित्वे आणि व्याजदरांच्या पुर्ततेसाठी एकंदर ४४ हजार १४२ कोटी रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान, दळणवळण, किरकोळ विक्री क्षेत्र आणि बँकींग यांसारख्या क्षेत्रात गेल्या काही वर्षात वेतनवाढ झालेली नसल्याचा आरोप चर्चेला सुरुवात करताना काँग्रेसचे के सी वेणुगोपाल यांनी केला.
****
गेल्या १० वर्षांत देशभरात ९७ नव्या इएसआय रूग्णालयांना मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी काल लोकसभेत दिली. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या सहकार्यातून इएसआयसी वैद्यकीय सेवा पुरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राजस्थान राज्य सरकार स्थापनेला एक वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जयपूरमधल्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ४६ हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या उर्जा, रस्ते, रेल्वे आणि पाणी या क्षेत्रातील २४ प्रकल्प पायाभरणी आणि उद्घटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ते एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत.
****
गेल्या महिन्यात, घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर घसरुन एक पूर्णांक ८९ शतांश टक्क्यावर आला. ऑक्टोबरमधे हा दर दोन पूर्णांक ३६ शतांश टक्के होता. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं काल ही आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार खाद्यपदार्थाच्या बाबतीत हा दर ११ पूर्णांक ६९ टक्के दरावरुन आठ पूर्णांक ९२ शतांश टक्के, भाज्यांचा दर ६३ पूर्णांक चार शतांश टक्क्यावरुन २८ पूर्णांक ५७ शतांश टक्के, तर कांद्याच्या दरात ६३ टक्क्यावरुन २ पूर्णांक ८५ शतांश टक्के इतकी घसरण झाली.
****
दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणामुळे सर्व प्राथमिक शाळांमध्ये हायब्रिड पद्धतीनं म्हणजे ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीनं शाळा चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इयत्ता पाचवीपर्यंतचे वर्ग ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीनं ज्याप्रमाणं शाळांना सोयीचे असेल, त्याप्रमाणे घ्यावेत, असा आदेश शिक्षण संचालनालयानं दिला आहे. दिल्ली एनसीआर प्रदेशात हवेची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट झाली असून, वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं चौथ्या टप्प्यातील ग्रॅप लागू केला आहे.
****
जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर स्वयंशिस्त हा यशाचा मूलमंत्र असल्याचा सल्ला, राज्यपाल आणि कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ११२ व्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. या समारंभात एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रदान करण्यात आल्या, तर २२१ संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश नसल्याच्या निषेधार्थ काल नाशिकमध्ये आंदोलनं क��ण्यात आली. कार्यकर्त्यांनी, भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला तालुक्यात विंचुर इथं रास्ता रस्ता रोको केला, तर नाशिकमध्ये राष्ट्रवादी भवनासमोर घोषणाबाजी केली.
दरम्यान, आपल्याला पक्षानं राज्यसभेवर जाण्याबाबत विचारणा केली होती. मात्र तसं करणं हा आपल्या मतदारसंघातल्या मतदारांचा विश्वासघात ठरेल, असं सांगून त्याला नकार दिल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.
****
एसटीनं तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, तसा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे, असं एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सांगितलं. उत्पन्न आणि खर्चात ताळमेळ राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. नियमित खर्चाबरोबर कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिल्यामुळे सुमारे ५२ कोटी रूपयांचा अतिरिक्त बोजा पडल्यामुळे विक्रमी उत्पन्न झालं तरी इंधनाचे वाढते दर, कर्मचाऱ्यांची वेतन वाढ, टायर आणि सुट्या भागांच्या दरामध्ये झालेली वाढ यामुळे खर्च वाढला असल्यामुळे नाईलाजानं हे पाऊल उचलल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने सुधारित मानक कार्यप्रणाली जारी केली आहे. त्यानुसार, पोलीस आयुक्त किंवा अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार असून, त्याचे तपशील पोलीस महासंचालक, तसंच संबंधित जिल्ह्यांचे पोलीस आयुक्त किंवा अधीक्षकांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावेत, असं सांगण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ३५
रविवारची आळसावलेली सकाळ! चहामागोमाग भरपेट नाश्ताही झाल्याने सुस्ती जरा अधिकच वाढली होती! 'रविवार असल्यामुळे आज अनंतची आंघोळ करण्याची घाई असणार नाहीं' हे ओळखून शुभदा आपली आंघोळ आटपून घेण्यासाठी अनंतला तसं सांगून बाथरूममधे गेली होती आणि अनंत सोफ्यावर निवांत आडवरून 'आज दिवसभरात काय-काय करायचं?' याचा विचार करीत होता, तेवढ्यांत डोअरबेल वाजली. विचारांच्या तंद्रीतच अनंतने दार उघडलं आणि दाराबाहेर पुष्पगुच्छ घेऊन उभ्या असलेल्या केदार आणि एकनाथना बघून चकीतच झाला! "रविवारी भल्या सकाळी तुम्हांला डिस्टर्ब केल्याबद्दल माफ करा, काका!" नजरानजर होतांच मान किंचित झुकवून अभिवादन करीत केदार म्हणाला, "पण आम्ही तुमचा फार वेळ घेणार नाही!" "आधी आंत तर या!" दिलखुलास हंसून अनंतने त्यांचं स्वागत केलं आणि भिंतीवरील घड्याळाकडे कटाक्ष टाकीत म्हणाला,"आतां दहा वाजायला आलेत;-- म्हणजे सकाळ संपली रे बाबांनो! तरी कसलाही संकोच नको!" आंत आल्यावर दार लोटून घेत एकनाथ म्हणाला "सबनीसकाका घरी असल्यास त्यांना इथेच बोलावता येईल कां? म्हणजे तुम्हां दोघांशी एकत्रच बोलतां येईल!" संभाषणाचे आवाज ऐकून कोण आलं आहे ते बघण्यासाठी शुभदा बाहेर आली तशी चटकन उठून तिला अभिवादन करीत केदार म्हणाला, " गुड मॉर्निंग, काकु! खरं तर काम तुम्हां दोन्ही काकुंकडेच आहे!" "वा रे वा! म्हणजे हे पुष्पगुच्छ खास दोन्ही काकुंसाठी आहेत तर!" शुभदा कांही बोलण्याआधीच अनंत मिस्किलपणे म्हणाला! "नाही, नाहीं!" केदारने घाईघाईने खुलासा केला, "पुष्पगुच्छ तुम्ही आणि सबनीसकाकांसाठी आहेत;-- पण काम मात्र काकुंकडे आहे!" ते ऐकून "मी रजनीला फोन करून दोघांनाही इथे बोलावून घेते" म्हणत शुभदाने लगेच मोबाईलवरून रजनीशी संपर्क साधला!
दहा-बारा मिनिटांत रजनी आणि दिनकर सबनीस हजर झाले! केदार आणि एकनाथना पाहून थोडे चकरावलेले सबनीस म्हणाले, " तुम्ही दोघं आल्याचं वहिनी बोलल्या नाहीत! 'महत्वाचं काम आहे, ताबडतोब या' एवढंच म्हणाल्या!!" "दिनकरराव, या दोघांचं खरं काम दोन्ही काकुंकडेच आहे! 'देखल्या देवा दंडवत' म्हणून त्यांनी आपल्यासाठी पुष्पगुच्छ मात्र आणले आहेत!" अतिशय गंभीर चेहर्याने अनंत करीत असलेली थट्टा ऐकून चहाचा ट्रे घेऊन बाहेर येणारी शुभदा म्हणाली, "अहो, किती चेष्टा कराल त्या बिचाऱ्यांची!" केदार आणि एकनाथच्या हातांत चहाचे कप देत तिने पुस्ती जोडली, " तुम्ही लक्ष देऊं नका रे यांच्याकडे;-- दोन्ही काकुंकडे काम काढलंत ना याचा मत्सर वाटतोय बरं तुुमच्या काकाला!" चहा पिऊन झाल्यावर केदार अनंत आणि सबनीसांना उद्देशून म्हणाला, " काका, मागच्या आठवड्यात तुम्ही आमच्या स्टाॅलचा धंदा वाढावा यासाठी ज्या काही नव्या कल्पना सुचवल्या, त्यावर विचार करून आम्ही 'केदारनाथ स्टाॅल'वर स्त्री ग्राहकांसाठी विशेष सोयी देण्याचं ठरवलं आहे!" त्याचं बोलणं ऐकून एकाच वेळी खुष आणि चकीत झालेले सबनीस म्हणाले , "भले शाब्बास! अवघ्या ८-१० दिवसांत एवढा मोठा निर्णय घेतलांत याचं कौतुक करावं तेवढं थोडंच!" "वा,वा! एवढ्या झटपट असा धाडसी निर्णय घेण्याची तुमची धडाडी नक्कीच कौतुकास्पद आहे" चक्क टाळ्या वाजवीत अनंतने आपला आनंद व्यक्त केला, "कधीपासून स्त्री ग्राहकांना खास सोयी देणार आहांत?" "तेच तर सांगायला आलोत, काका!" एकनाथ उत्साहाने म्हणाला,"पण त्याआधी तुमचे आभार मानण्यासाठी आम्ही आणलेले पुष्पगुच्छ स्वीकारा आणि आशिर्वाद द्या!" पुष्पगुच्छ देऊन पायां पडायला वाकलेल्या केदार-एकनाथला अर्ध्यावर थांबवीत अनंत म्हणाला, "खरं तर याची गरज नव्हती,- पण तुमच्या भावनांचा प्रामाणिकपणा आम्हांला कळतो आहे!" दोघांचे हात प्रेमभराने दाबीत सबनीस म्हणाले, "आम्हां सर्वांच्या शुभेच्छा तुमच्यासोबत हमेशा असतील याची खात्री बाळगा!"
"काका, येत्या गुरुवारी रामनवमीच्या शुभमुहूर्तावर स्त्री ग्राहकांसाठी विशेष सोयींचा उपक्रम सुरु करायची आमची इच्छा आहे!" केदार सांगू लागला, "---त्यासाठी आमच्या पहिल्या दोन सन्माननीय ग्राहक या दोन्ही काकु असतील असं आम्हीं ठरवलं आहे!" "काकु, तुम्ही प्लीज नाहीं म्हणूं नका!" एकनाथने विनम्रपणे दोन्ही हात जोडून शुभदा आणि रजनीला विनंती केली. त्यांचा हा अनपेक्षित प्रस्ताव ऐकून आश्चर्यचकित झालेल्या दोघींनाही काय बोलावं ते सुचेना! पण कांही क्षणांनी त्या धक्क्यातून स्वत:ला सावरीत शुभदा म्हणाली, " केदार आणि एकनाथ, तुम्ही दिलेला हा बहुमान कुणालाही आवडेल! पण तरीही हा बहुमान तुम्ही तुमच्या कुटुंबातील वडीलधा-या महिलेला देणं अधिक योग्य ठरेल असं मला मनापासून वाटतं!"
३० मार्च २०२३
0 notes
Text
विश्वविजेता गुकेशची कामगिरी युवकांसाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १२ : जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या डी. गुकेशचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन केले आहे. गुकेशची कामगिरी ऐतिहासिक आहे आणि ती युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल,असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. मुख्यमंत्री शुभेच्छा संदेशात म्हणतात, ‘डी. गुकेशने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे भारताची मान जगात उंचावली आहेच. त्याचबरोबर आपल्या देशाचा…
View On WordPress
0 notes
Text
PCMC : स्वयंसेवी संस्थांच्या सहाकार्याने शहरात अभ्यासिका
एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरातील (PCMC) झोपडपट्ट्यांमधील विद्यार्थ्यांच्या विकासासाठी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने सर्वांगीण विकास केंद्र उभारण्यात येतील. त्यासाठी संजय गांधीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका आदर्श ठरेल, असे मत आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी व्यक्त केले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाच्या वतीने ‘योजक’ स्वयंसेवी संस्थेच्या…
0 notes
Text
जया किशोरीजी यांच्या श्रीमद्द भागवत कथा सभा मंडपाचे थाटात भूमिपूजन
प्रबोधन पर कथा ऐतिहासिक ठरेल: घनश्यामदास गोयल Grand Bhumi Pujan of Jaya Kishoriji’s Shrimad Bhagwat Katha Sabha Mandap जालना (प्रतिनिधी): हरे कृष्णा सत्संग समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय आध्यात्मिक कथाकार परमपूज्य जया किशोरी जी यांच्या अमृतमय वाणीतून दिनांक 24 ते 30 मे या कालावधीत छत्रपती संभाजी नगर लगत असलेल्या गायत्री माता मंदिर परिसरात श्रीमद् भागवत कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या…
View On WordPress
0 notes
Text
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 'माझी आत्मकथा'
‘घटना राबविणारे वाईट वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही उत्कृष्ट असली तरी ती बद्द रुपयाप्रमाणे ठरणार. त्याचप्रमाणे घटना राबविणारे चांगल्या वृत्तीचे असतील तर एखादी घटना कितीही टाकाऊ असली तरी ती उपकारच ठरेल’ भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे हे मत आज इतक्या वर्षांनंतरही अगदी तंतोतंत खरे आहे. अस्पृश्य समाजाला समानतेचे अधिकार मिळावेत, त्यांची आर्थिक व सामाजिक प्रगती व्हावी…
View On WordPress
0 notes
Text
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या शिरूर नगरपरिषद हद्दीतील लाटेआळी येथील शाळा क्रमांक 1 च्या इमारत बांधकामाच्या भूमिपूजन समारंभात सहभागी झालो. ही तीच शाळा आहे जिची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी केली होती. या शाळेचे नूतनीकरण विद्यार्थ्यांसाठी निश्चितच फायदेशीर ठरेल! यावेळी माजी खासदार आढळराव पाटील, सभागृह नेते प्रकाशशेठ धारिवाल, सीओ स्मिता काळे, भाजप तालुकाध्यक्ष आबा सोनवणे, दत्तात्रेय कृष्णाजी केळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ-विरोधकांच्या गदारोळाने दोन्ही सदनांचं कामकाज स्थगित
महात्मा गांधींच्या ग्रामस्वराज्य अभियानामुळे सहकार क्षेत्राला नवी ऊर्जा-आंतराष्ट्रीय सहकार परिषदेत पंतप्रधानांचं प्रतिपादन
मुख्यमंत्रिपदाचा निर्णय एकमताने घेत, महायुती स्थिर सरकार देणार-अजित पवार यांना विश्वास
आणि
बॉर्डर-गावसकर क्रिकेट कसोटी मालिकेत यजमानांचा २९५ धावांनी दणदणीत पराभव करत भारताची विजयी सलामी
****
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच माजी खासदार वसंतराव चव्हाण, हरिश्चंद्र चव्हाण यांच्यासह सदनाच्या दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. राज्यसभेतही कामकाज सुरु झाल्यावर दिवंगत सदस्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
अदानी उद्योग समूहाविरोधातल्या कथित लाचखोरी प्रकरणा��रून विरोधकांनी गदारोळ केल्यानंतर आज संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. दरम्यान, संविधानदिनानिमित्त उद्या दोन्ही सभागृहांची बैठक होणार नाही.
****
उद्याच्या संविधानदिनानिमित्त आज नवी दिल्लीत हमारा संविधान हमारा स्वाभिमान पदयात्रा काढण्यात आली. डॉ. मनसुख मांडवीय, पीयुष गोयल, अर्जुन राम मेघवाल, किरेन रिजिजू, गजेंद्रसिंग शेखावत, रक्षा खडसे या केंद्रीय मंत्र्यांसह अनेक खासदार आणि ऑलिम्पिक मधे खेळलेले क्रीडापटू त्यात सहभागी झाले होते. तसेच राष्ट्रीय छात्रसेनेचे, राष्ट्रीय सेवायोजनेचे विद्यार्थी आणि इतर स्वयंसेवी संघटनांचे सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
****
महात्मा गांधींच्या ग्रामस्वराज्य अभियानामुळे सहकार क्षेत्राला नवी ऊर्जा मिळाल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित आंतराष्ट्रीय सहकार परिषदेचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. खादी आणि ग्रामोद्योग क्षेत्रात सहकारातून साधलेल्या यशाकडे लक्ष वेधतांना पंतप्रधान म्हणाले –
महात्मा गांधीजी के ग्राम स्वराज ने सामुदायिक भागीदारी को .फिर से नई उर्जा दी। उन्होंने खादी और ग्रामोद्योग जैसे क्षेत्र मे सहकारीता के माध्यम से एक नया आंदोलन खडा किया और आज खादी और ग्रामोद्योग को हमारी को ऑपरेटीव्हज् ने बडे बडे ब्रांच से भी आगे पहोंचा दिया है।
ही परिषद सर्वांसाठी एकसंध, शांततापूर्ण आणि समृद्ध भविष्य घडवण्यासाठी सहकारी संस्थांची भूमिका जाणून घेणार आहे. या सहा दिवसीय परिषदेत भूतानचे पंतप्रधान दाशो शेरिंग तोबगे आणि फिजीचे उपपंतप्रधान मनोआ कामिकामिका यांच्यासह जवळपास तीन हजार विदेशी आणि भारतीय प्रतिनिधी सहभागी होत आहेत.
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी या परिषदेत केलेल्या भाषणात, यंदा साजरं होत असलेलं सहकार वर्ष हे महिला, शेतकरी आणि गरीबांच्या सक्षमीकरणासाठी सहायक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले –
यू एन का धन्यवाद करना चाहतां हूं, की इन्होंने 2025 के वर्ष को सहकारीता वर्ष के रूप में मनाने का एक फैसला लिया। और मै ऐसा मानता हूं की ये फैसला समायोचित है। पुरी दुनिया के अंदर करोडो करोडो महिलायें, किसान और गरीब के एम्पावरमेंट के लिये ये फैसला आशीर्वाद रूप होगा इसका मुझे पुरा भरोसा है।
****
वक्फ सुधार��ा विधेयक २०२४ च्या संयुक्त संसदीय समितीमधल्या विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. संयुक्त संसदीय समितीचे प्रमुख, विरोधी पक्षातल्या सदस्यांचं मत विचारात घेत नसून अहवाल तयार करण्याची घाई करू नये असं आपण सभापतींना सांगितल्याची माहिती तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी या बैठकीनंतर माध्यमांना दिली. अध्यक्षांनी विरोधी पक्षांच्या खासदारांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि अहवाल सादर करण्याची मुदत वाढवण्याचं आश्वासन दिलं.
****
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर विरोधक हतबल झाले ��सल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी केली आहे. संसदेबाहेर माध्यमांशी बोलतांना विरोधकांचे वर्तन अयोग्य असल्याचे ते म्हणाले.
काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी आज माध्यमांशी बोलतांना, एका विशिष्ट गटावर कथित लाचखोरीचे आरोप हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यावर संसदेत चर्चा व्हायला हवी अशी अपेक्षा व्यक्त केली.
****
मुख्यमंत्रिपदासंदर्भात महायुतीतले तिनही पक्ष मिळून निर्णय घेऊ आणि राज्याला स्थिर सरकार देऊ, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कराड इथं प्रितीसंगम या त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केल्यानंतर अजित पवार बोलत होते. ज्यांच्या विचारधारा आणि आदर्शांवर आम्ही लोकसेवेचा वारसा पुढे नेत आहोत, चव्हाण यांच्या दूरदृष्टीतील समृद्ध महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी लोकसेवेच्या माध्यमातून योगदान देण्याचा दृढ संकल्प आपण केला असल्याचं, पवार यांनी म्हटलं आहे.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी आमदार आदित्य ठाकरे यांची एकमताने निवड करण्यात आली. विधानसभेच्या गटनेतेपदी आमदार भास्कर जाधव यांची तर प्रतोदपदी आमदार सुनील प्रभू यांची निवड झाल्याची माहिती विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकारांना दिली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे दानवे यांनी सांगितलं.
****
विधानसभा निवडणुकीत अमरावती जिल्ह्यात बहुमताने भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आले असून आम्ही पूर्ण ताकदीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत असल्याचं स्वाभिमानी पक्षाचे नेते रवी राणा यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूरममध्ये वार्ताहरांशी बोलत होते. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी खोटी ��श्वासनं दिल्यामुळे जनतेने विधानसभा निवडणुकीत भाजपाला कौल दिल्याचं ते म्हणाले. रवि राणा बडनेरा मतदार संघातून सलग चौथ्यांदा निवडून आले आहेत.
****
येत्या १५ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या लष्कर दिनाचं यजमानपद यंदा पुण्याकडे आहे. पुण्याच्या इतिहासातील हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ म्हणून फील्ड मार्शल के.एम. करिअप्पा यांची १९४९ मध्ये नियुक्ती झाली. त्या घटनेच्या स्मरणार्थ लष्कर दिन संचलन आयोजित केलं जातं. गेली अनेक वर्ष दिल्लीमध्ये होणारं हे संचलन आता २०२३ पासून वेगवेगळ्या शहरांमध्ये आयोजित केलं जातं. या वर्षीचं संचलन पुण्याच्या बॉम्बे इंजिनीअरिंग ग्रुप आणि सेंटर इथं होणार आहे.
****
क्रिकेट
बॉर्डर गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना भारतानं २९५ धावांनी जिंकला आहे. भारतानं विजयासाठी दिलेलं ५३४ धावांचं लक्ष्य गाठतांना यजमान संघ दुसऱ्या डावात अवघ्या २३८ धावांवर सर्वबाद झाला. दुसऱ्या डावात कर्णधार जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने तीन-तीन, वॉशिंग्टन सुंदरने दोन तर हर्षित राणा आणि निशित रेड्डीने एक एक बळी घेतला. दोन्ही डावात मिळून आठ बळी घेणारा बुमराह, सामनावीर ठरला.
मालिकेत पुढचा सामना सहा डिसेंबरपासून ॲडलेड इथं खेळवला जाणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर विभागात जल प्रकल्पातील पाण्याचं सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी केली आहे. आज विभागीय आयुक्त कार्यालयात कालवा सल्लागार समितीची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. विभागातल्या नऊ मोठ्या सिंचन प्रकल्पांचे अधिकारी उपस्थित होते. यंदा पाऊस चांगला झाल्याने बहुतांश प्रकल्पात चांगला पाणीसाठा आहे. या पाण्याचं पिण्यासाठी, शेतीसाठी तसेच उद्योगासाठी सूक्ष्म नियोजन करण्याची सूचना त्यांनी दिली.
दरम्यान, जायकवाडी प्रकल्पाच्या डाव्या कालव्यातून आज रब्बी हंगामासाठी पहिलं आवर्तन ��ोडण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड तसंच परभणी या जिल्ह्यातील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
दरम्यान, या आवर्तनाच्या पार्श्वभूमीवर कोणीही कालव्यात उतरू नये, आपापली लहान मुले तसंच पशुधनाची काळजी घेण्याचं आवाहन जलसंपदा विभागानं केलं आहे.
****
सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे घेतल्या जाणाऱ्या ६३ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी आजपासून राज्यातील जिल्हास्तरावरील विविध २४ केंद्रांवर आयोजित करण्यात आली आहे. नांदेड केंद्रावर १३ संघ सहभागी होणार आहेत. नांदेड शहरासह परभणी जिल्ह्यातील विविध संघांचे प्रयोग या केंद्रावर सादर होतील. ही स्पर्धा ६ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
****
अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीच्या तीन दिवसीय यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहाला आजपासून सुरुवात होत आहे. या महोत्सवात कवी संमेलन, शालेय चित्रकला स्पर्धा, बाल आनंद मेळावा, गझल गायन मैफल, शेतकरी परिषद आदी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून, विविध मान्यवरांना यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. महोत्सवाचं हे ४० वं वर्ष आहे.
****
धुळे पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका तरुणाला जेरबंद करत त्याच्याकडून एक गावठी कट्ट्यासह जिवंत काडतुसं जप्त केली. हा तरुण परभणी जिल्ह्यातला रहिवासी असल्याचं तपासात समोर आलं असून, पोलिसांनी या तरुणाकडून जवळपास २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
****
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : २७
" नाहीं हं, शुभदा! तूं आतां जेवढा आव आणते आहेस, तेवढ्या सहजपणे काही तूं सुरवातीला हे सगळं स्वीकारलं नव्हतंस!" शुभदाच्या लटक्या आविर्भावाचा निषेध करीत, अनंत सबनीसांकडे वळून म्हणाला, "अहो, तिची तक्रार होती की 'इतकी वर्षं पहांटे ५ ३० वाजतां उठून स्वत: चहा करण्याची तुमची हौस अजून भागली नाहीं कां?' एवढंच नाहीं;-- तर तिने मला सरळ धमकीही दिली होती की 'नसेल भागली तर तुम्ही खुशाल चहा करून पीत जा! पण मी कांही आतां रोज इतक्या लौकर उठणार नाही! माझा चहा करून ठेवलात, तर मी उठल्यावर गरम करून घेईन;-- नाहीं केलात तर मी माझ्यापुरता करून घेईन'!" "तुम्हीच सांगा रजनीवहिनी, नवरा रिटायर झाल्यावर इतक्या वर्षांचा कामाचा ससेमिरा जरा कमी होऊन थोडा आराम मिळेल असं बायकोला वाटणं चूक आहे कां? त्यामुळे मी तसं म्हटलं आणि यांनी ते निमूटपणे मान्य केलं! उगीच वितंडवाद न घालतां यांनी आपला रोजचा दिनक्रम चालूं ठेवला! माझ्यासाठी कोरा चहा काढून ठेवून, चहा प्यायल्यावर पूर्वीप्रमाणे फिरायलाही जाऊं लागले! पण १५-२० दिवस गेल्यावर असं एकटीने चहा प्यायचा मलाच कंटाळा येऊं लागला! पूर्वी रोज सकाळी ना, चहा पितांना आमचा दिवसभराचा आराखडा ठरायचा! अगदी नाश्त्याला काय करायचं वा भाजी काय करायची इथपासून ते कांही वेगळा विचार सुचला तर त्याविषयी एकमेकांना सांगण्यापर्यंत! हा रोज सकाळी होणारा संवाद थांबल्याने कांहीतरी हरवल्याची हुरहूर मला लागली आणि एक दिवस मी चक्क शरणागती पत्करली! गुपचूप यांच्या मागोमाग उठून मुखमार्जन केलं आणि कीचनमधे जाऊन सरळ सांगून टाकलं की 'आजपासून तुमच्याबरोबर मीही चहा घेईन!' "
"व्वा, अनंतराव! तुम्ही संयम राखून, कुठलाही वाद न घालतां मोठीच बाजी मारली की!" सबनीस कौतुकाने उद्गारले. "बाजी वगैरे कांही नाही हो! मी हे सगळं माझ्या आई-वडीलांकडून शिकलो! त्या दोघांना मी कधीही वाद घालतांना पाहिलं नाही! माझे वडील शीघ्रकोपी, तर आई अतिशय चोखंदळ! अशी दोन माणसं एकत्र आल्यावर त्यांच्यात मतभिन्नता असणारच;-- पण आई नेहमी म्हणायची की 'ही चाळीची वस्ती! इथे भिंतींनाही कान आहेत! आपण भांडून वा वाद घालून लोकांना कशाला तमाशा दाखवायचा?' त्यापेक्षा स्वत:ला योग्य वाटतं ते दोघंही निमुटपणे करीत रहायची! अशा प्रकारे वागल्यास थोडा वेळ जास्त लागतो, पण ज्याचं चुकतं, ते त्याला आपोआप कळून येतंच! आणि उगीच शब्दाला शब्द वाढून मनं दुखावली न गेल्याने आपली चूक कबुल करण्याचा समजुतदारपणाही अंगी येतो!" "माझ्या स्वत:च्या अनुभवावरून सांगतो, की अनेकदां आपली चूक कळून आल्यावरही ती कबूल करणं खुप कठीण होतं!" सबनीस मोकळेपणाने म्हणाले, "टोकाचे वाद घालतांना अकारण इतकी कटुता निर्माण झालेली असते, की आपण चुक कबूल केल्यावर, बायको मोठ्या मनाने माफ करील आणि पुन: पूर्ववत् हंसत-खेळत बोलूं लागेल याची मला खात्री नसते!" " पूर्वी मुलं लहान होती तेव्हा कसं, निदान त्यांच्या आडून वा त्यांच्या मार्फत माफी मागण्याची सोय होती!" रजनीवहिनी चिडवीत म्हणाल्या, "पण आतां मुलं मोठी होऊन दूर गेल्याने तीही संधी मिळत नाहीं!"
" वहिनी, तुम्ही अशा प्रकारे बोलताय् की नेहमी जणूं दिनकररावांवरच ही पाळी येते!" अनंतने मिस्कीलपणे संधी साधली. " नाही, नाही;-- अगदी तसंच नाहीं!", रजनीवहिनींनी घाईघाईने खुलासा केला, " पण एवढं मात्र खरं की मी निष्कारण वितंडवाद घालीत नाही! आपलं चुकतंय् असं जाणवलं की लगेच माघार घेते!" "खरं सांगते आहे, रजनी!", सबनीस म्हणाले," ती चटकन् यशस्वी माघार घेत असल्याने माझ्यासारखी कोंडी होण्याची पाळी तिच्यावर सहसा येत नाहीं! पण अनंतराव आणि शुभदावहिनी, सहज गप्पांच्या ओघांत तुमच्याकडून, वादविवाद टाळून मतभेद दूर करायचा सोप्पा मार्ग समजला त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच!!" पत्नीला निघण्याची खुण करीत ते पुढे म्हणाले, "घरीं आम्ही दोघेच असल्याने नवीन फ्लॅट निवडतांना, जसा शेजार मिळावा अशी अपेक्षा होती, ती पूर्ण झाल्याची खात्रीही तुमच्याबरोबर आज पहिल्या फटक्यातच रंगलेल्या मनमोकळ्या गप्पांमुळे झाली आहे! तुम्हांला पत्ते खेळायची आवड असेल तर पुढची बैठक, तुम्हांला वेळ असेल तेव्हां आमच्या घरी पत्ते खेळत रंगवूंया असं सुचवीत आहे!" "अरे वा! तुम्हांलाही पत्ते खेळायची आवड आहे तर!" अनंत उत्साहाने म्हणाला,"आमचा १०-१२ जणांचा ग्रुप आहे! सवडीनुसार आम्ही दुपारी एकत्र जमून रमी खेळतो. तुमची इच्छा असेल तर, पुढचा खेळ ठरेल तेव्हां तुम्हींही सोबत या! तुमच्या तेवढ्याच अधिक ओळखी होतील आणि आमच्या ग्रुपलाही २ नवीन ��ेंबर्स मिळतील!"
१२ जानेवारी २०२३
0 notes
Text
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला समतेचा विचार पुढे नेण्याचा निर्धार करुया – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन - महासंवाद
मुंबई, दि. ६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटना आपल्याला दिली. या घटनेने सर्वांना समान अधिकार आणि देशाला एकता, समता, बंधुतेचा विचार दिला. अस्पृश्यता निवारण, जातीमुक्त समाजनिर्मितीत डॉ. बाबासाहेबांनी सर्वाधिक योगदान दिले. डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या भारतीय संविधानाचा आदर ठेवून डॉ. बाबासाहेबांचे विचार आणि कार्य पुढे घेऊन जाणे, हेच त्यांना खरे अभिवादन ठरेल, अशा…
View On WordPress
0 notes
Text
महिलांच्या सबलीकरणासाठी उपयुक्त ठरेल मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान - महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे
नागपूर, दि. 12 :- मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून महिलांना शासन योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांना अधिक सक्षम बनवू. हे अभियान महिला सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरेल. त्यामुळे अभियान व्यापकपणे राबविण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने कालबध्द नियोजन करावे व त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना महिला व बाल विकास मंत्री कु. आदिती तटकरे यांनी दिल्या. मुख्यमंत्री…
View On WordPress
0 notes
Text
0 notes
Text
'ती मोठी चूक ठरेल', 'गाझा'बाबत अमेरिकेने इस्रायलाला केले सावध
https://bharatlive.news/?p=168147 'ती मोठी चूक ठरेल', 'गाझा'बाबत अमेरिकेने इस्रायलाला केले सावध
पुढारी ...
0 notes
Text
https://wa.link/pntukd
मुलांचे आरोग्य हि प्रत्येक आई वडिलांची काळजी असते.त्यात आजकाल मुलांचं शेड्युल फार बिझी झालाय. शाळा, अभ्यास, वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज यात मुलांचा दिवस कसा जातो हेच कळत नाही. मुलांची शारीरिक हालचाल, व्यायाम पाहिजे तेवढा होत नाही. आजकाल मुलांचा बौद्धिक विकास जरी चांगला असला तरी फिजिकली कमकुवत होत चालला आहे. वातावरण बदलल कि मुलांच आजारी पडणं, वायरल इन्फेक्शन .... या गोष्टी तर आजकाल कॉमन झाल्या आहेत.
मनसोक्तपणे खेळण नाही, बागडन नाही, स्पर्धांच्या मागे धावणं.फक्त अभ्यास, मार्क्स आणि त्यांच्या मागे टॉपर होण्यासाठी असलेला तगादा ..... तेच जर त्यांच्या तब्येतीकडे लक्ष दिल तर नक्कीच उत्तम ठरेल. आजकाल बऱ्याच लहान मुलांमध्ये शारीरिक आणि मानसिक ताण जाणवून येतो. काही मुलांचे कॅल्शियम कमी तर कोणाला व्हिटॅमिन ची कमतरता......
मुलांच्या आरोग्यासाठी, त्यांच्या आयुष्यासाठी आणि भावी पिढीसाठी उत्तमोत्तम आरोग्य लाभावे म्हणून एक पालक म्हणून आपण नक्की प्रयत्न करत राहायला हव. पौष्टिक आहाराचा समावेश करणे. होताहोईल तेवढ जंक फूड टाळणे. मुलांसाठी डाएट चार्ट बनवणे.एकदम नाही पण हळू हळू या गोष्टींची सुरवात तर करता येईल.
एकंदरीतच सगळ्याच बाजूने पाहिलं तर मुलांच्या आरोग्यावर होणार परिणाम हा विचारात घ्यायलाच हवा. एक पालक म्हणून आपल्या आणि मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी नक्कीच प्रयत्न करायला हवेत. यात प्रत्येकाची मत वेगवेगळी असू शकतात. पण यामागे "मुलांचे उत्तम आरोग्य" हेच ध्येय प्रत्येक पालकाचे असते.
''आरोग्यम् धनसंपदा.....!
तर मग चला जाणून घेऊया 20 ऑगस्टला दुपारी 3:00pm
Happy To Help सत्रात
Ask for zoom link : 9011050390
#kidshealth #momlife #kids #health #healthykids #healthylifestyle #kidsgym #toddlerlife #dadlife #momentsthatmatter #childrensfitness #parentwin #kidsgymnastics #mommyandme #kidsclasses #mygymclasses #cutekids #minime #nutrition #kidsgymnasticsclasses #littleathlete #parenting #mommyandmeclasses #clockinandplay #mommyandmeclass #mygymsmiles #mygymparty #kidsbirthday #childrenshealth #pediatrics
0 notes
Text
'म्हादईची केस कमकुवत करण्याचा सरकारचा प्रयत्न'
पणजी : ‘व्याघ्र क्षेत्र’ बाबत उच्च न्यायालयाने दिलेला निकाल अनुसूचित जमाती किंवा इतर वनवासींच्या हक्कांचे रक्षण करतो,असे काँग्रेसने म्हटले आहे आणि या निकाला विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे भाजप सरकारचे पाऊल म्हणजे कर्नाटकच्या फायद्यासाठी म्हादईची याचिका कमकुवत करण्याची ठरेल असा आरोप केला आहे. गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन वनमंत्री विश्वजित…
View On WordPress
0 notes