#ठरल
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 year ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
१५ डिसेंबर २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
भाजप नेते भजनलाल शर्मा आज राजस्थानचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. तर दिया कुमारी आणि प्रेमचंद बैरवा हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह पक्षाचे इतर नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत.
****
लोकसभा सुरक्षेचा भंग प्रकरणी मुख्य सूत्रधार मानला जाणाऱ्या ललित झा याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे.
दरम्यान, संसदेच्या सुरक्षेत झालेली चूक ही सुरक्षेच्या दृष्टीने गंभीर बाब असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. ते काल दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. आगामी काळात सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात येतील, असं ते म्हणाले.
****
नवी दिल्लीत विज्ञानभवनात काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वच्छ ऊर्जा क्षेत्रात भारत जबाबदारीनं आगेकुच करत असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग ऊर्जा बचतीला प्रोत्साहन देईल असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला.
****
एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत १० लाख ६४ हजार कोटी रुपये प्रत्यक्ष कर संकलन झालं आहे. प्रत्यक्ष कराची संकलित रक्कम सरकारने अर्थसंकल्पात गृहीत धरलेल्या अपेक्षित रकमेच्या ५८ पूर्णांक ३४ शतांश टक्के इतकी असल्याचं याबाबत जारी आकडेवारीत म्हटलं आहे.
****
डीप फेक आणि इतर डिजिटल माध्यमाद्वारे सुरू असलेल्या सायबर गुन्हे तसंच जुगारसाठीच्या ॲप वर कठोर निर्बंध घालण्यासाठी केंद्र सरकार लवकर�� कायदा करत असून, गरज पडल्यास राज्य सरकार ही तसा कायदा करेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ऑनलाईन गेमिंग, सायबर क्राईम कृत्रिम बुद्धिमत्ता, डीप फेक याचं मोठं आव्हान असून, यासाठी राज्य सरकार एक प्रणाली विकसित करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
परदेशी गुंतवणूक आणण्यात महाराष्ट्र हे देशात पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकाचं राज्य ठरल आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. गेल्या तीन महिन्यात राज्यात २८ हजार ८६८ कोटींची विदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याचं त्यांनी सांगितलं.
****
0 notes
goodenwsmarathi · 1 year ago
Text
0 notes
gop-al · 2 years ago
Text
जीवन प्रवास
काल आम्ही एका मोहीमेवर जाण्याचे ठरविले मोहीम होती सायकल चालवत अकोला वरून येळवन 18 कीलो मीटर.घरी आमच्या बाळासाहेबांनी नविन सायकल घेतली आणि टेस्ट घ्यायची होती.तशा पहील्याच दोन सायकल होत्या त्यातील एक मुलीला आणि एक मी आणि आमच्या घरच्या मंडळीसाठी गाडी अस ठरल सकाळी निघालो मलकापुर विझोरा, कातखेड, येळवण असा प्रवास सुरू झाला मलकापुर पर्यंन्त पोहचलो आणि धकलो. दम भरून आला म्हटल आपल्याला हे काहि जमणार नाही,कारण10 वीत असतांना सायकल चालवीली होती तेव्हापासुन कधीच सायकल चालविण्याचा विचार सुदधा केला नाही. आणी आज वयाच्या 42 व्या वर्षी तो योग आला होता. आणि बालपण अनुभवत होतो.थोडा वेळ थकवा घालवल्या नंतर पुन्हा सायकल सुरू केली,थकलो तर कधी आमच्या घरच्या मंडळीनीही मदत केली. मुलांच्या आनंदात आपला आनंद असतो असे म्हणत मुलांचा उत्साह भरपूर होता थकन्याचे नाव घेतंच नव्हते मुलं,सुरवातीला रस्त्याच्या बाजूला असलेल्या वाडीत आम्ही गेलो तिथं नास्ता केला,सोबतच घेतला होता,तिथं असणारी विहीर मधून खिराडी ने पाणी काढण्याचा अनुभव नवीनच होत��,कारण आजकाल हे असं बंद झाला आहे,दुध कोण देते तर भैय्या देतो असा आजचा काळ आधुनिक चालला आहे.अशा काळात मुलांना जुन्या पध्दती माहिती झाली पाहिजे असे वाटते. सायकल चालवत असतांना निसर्गाच्या सानिध्यात ती हिरवळ थकवा दूर करणारी होती,सोबतच थंड हवा सोबतीला होती,आणि 18 किमी चा प्रवास सहज पूर्ण केला येळवन हे तीर्थक्षेत्र आहे महानुभाव पंथी चक्रधर स्वामी यांचे मंदिर आहे,या जागेवर चक्रधर स्वामी 12 व्या शतकात येऊन गेले आहेत अशी त्याची महती आहे.भावपुर्ण पूजा पाठ करून निरोप घेतला व परतीचा मार्ग सुरू केला,चढाई तर कुठी उतार असा रस्ता होता,आणि जणू काही तो आपला जीवन प्रवास आहे असे वाटत होते.जीवनात चढाई(दुःख) आली तर त्रास होतो आणि उतार(आनंद) आला तर तो काही वेळे पुरता असतो.असे आमचे सायकल नी स���रू होते त्या दरम्यान आमचा लहान गडी सांगत होता बाबा उतार आहे म्हणून पायडल मारणे बंद करू नका कारण उतारावरून जर पायडल बंद केले तर समोरील चढाई भारी जाते, म्हणून पायडल मारणे बंद करू नका असे तो सांगत होता जणू काही त्याने जीवनाचा मूलमंत्र सांगून गेला.
जीवनात उतार असो की चढाई आपले जीवन जगण्याचे सातत्य कायम राहिले पाहिजे म्हणजे सुख आले तर सुखावून जाऊ नये दुःख आले तर घाबरून जाऊं नये आपले सातत्यपूर्ण जीवन आपण जगले पाहिजे म्हणजे जीवन जगणे सुकर होईल.
-गोपाल मुकुंदे
Tumblr media
1 note · View note
goldwingsartsinstitute · 5 years ago
Text
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरेंचं ठरलं, कणकवलीत प्रचार सभा
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरेंचं ठरलं, कणकवलीत प्रचार सभा
[ad_1]
 कणकवलीत उद्धव ठाकरे प्रचाराला जाणार आहेत.
Updated: Oct 12, 2019, 06:07 PM IST
संग्रहित छाया
[ad_2] Source link
View On WordPress
0 notes
ambajogaimirror · 4 years ago
Text
अंबाजोगाई शहरात गेल्या दोन-तीन महिन्यांत कोरोनाची आकडेवारी चिंतेचा विषय ठरली आहे. दिवसागणिक वाढतच जाणाऱ्या आकडेवारीने आरोग्य आणि ‌अबाजोगाई तालुका प्रशासनासमोर आव्हान उभे केले आहे. परंतु गेल्या काही दिवसांपासून अंबाजोगाईत दिलासादायक कोरोनाची आकडेवारी येत आहे. त्यामुळे अंबाजोगाईत कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होताना दिसत असून कोरोनाच्या आकडेवारीत घट होत आहे, ही निश्चितच समाधानाची बाब आहे. दरम्यान कोरोनाची आकडेवारी जरी कमी होत असली तरी अजून कोरोनाचा प्रार्दुभाव संपला नाही. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या सूचनांचे पालन करावे.
0 notes
goldwingsartsinstitute · 5 years ago
Text
काँग्रेसचं ठरलं ! राहुल गांधी 'या' दिवशी करणार प्रचाराचा शुभारंभ
काँग्रेसचं ठरलं ! राहुल गांधी ‘या’ दिवशी करणार प्रचाराचा शुभारंभ
[ad_1]
 काँग्रेसने राहुल यांच्या प्रचाराचा नारळ फोडण्याची तारीख जाहीर केली आहे. 
Updated: Oct 10, 2019, 08:14 PM IST
[ad_2] Source link
View On WordPress
0 notes
goldwingsartsinstitute · 5 years ago
Text
तारीख ठरली ! नारायण राणेंचा 'स्वाभिमान' भाजपात विलीन
तारीख ठरली ! नारायण राणेंचा ‘स्वाभिमान’ भाजपात विलीन
[ad_1]
 स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन करण्याची तारीख नारायण राणे यांनी जाहीर केली आहे.
Updated: Oct 10, 2019, 09:11 PM IST
[ad_2] Source link
View On WordPress
0 notes
goldwingsartsinstitute · 5 years ago
Text
RSS wants whole society should be unite says Mohan Bhagwat | प्रत्येक गोष्ट संघालाच करावी लागली तर तो पराजय ठरेल
RSS wants whole society should be unite says Mohan Bhagwat | प्रत्येक गोष्ट संघालाच करावी लागली तर तो पराजय ठरेल
[ad_1]
संघात हिंदूराष्ट्र आणि हिंदुत्व या दोनच गोष्टी शाश्वत आहेत.
Updated: Oct 1, 2019, 09:04 PM IST
[ad_2] Source link
View On WordPress
0 notes
goldwingsartsinstitute · 5 years ago
Text
कल्याण पश्चिममधला शिवसेनेचा उमेदवार अखेर ठरला
कल्याण पश्चिममधला शिवसेनेचा उमेदवार अखेर ठरला
[ad_1]
कल्याण पश्चिम मतदारसंघात शिवसेनेने विश्वनाथ भोईर यांना उमदेवारी दिली आहे.
Updated: Oct 2, 2019, 07:10 PM IST
[ad_2] Source link
View On WordPress
0 notes