#टीममध्ये
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
उद्धव ठाकरेंचे आता ‘अंडरकवर मिशन’; टीममध्ये असलेल्यांची माहिती त्यांनाच असणार
https://bharatlive.news/?p=102020 उद्धव ठाकरेंचे आता ‘अंडरकवर मिशन’; टीममध्ये असलेल्यांची माहिती त्यांनाच ...
0 notes
nitinkandharkar · 3 years ago
Text
१९८३...
आमच्या लहानपणी मैदानी खेळ खेळणे, अन त्यात प्रामुख्याने क्रिकेट खेळणे हा आमचा आवडीचा छंद. अगदी कळायला लागले तसे आम्ही भावंडे क्रिकेट खेळायचो. अर्थात खेळ कमी अन भांडणे जास्त व्हायची, पण तरीही खेळणे कमी झाले नाही. मोठा प्रवीण अन धाकटा बाळू छान खेळायचे, मी मात्र लिंबूटिंबू असायचो. बॉलर पळत आला की मला भीतीच वाटायची, त्यामुळे फिल्डींग आणि क्वचित बॉलिंग करून समाधान मानून घ्यायचो.
तो काळ असा होता की नुकतेच वन डे मॅचेस सुरू झाले होते. एक दिवसात संपणार्‍या मॅचेसची एवढी क्रेझ वाटायची नाही. टेस्ट मॅचेसची सवय झाली होती. पाच दिवस खेळ अन एक दिवस सुट्टी अशी सहा दिवस मॅच चालायची. दोन किंवा तीन दिवसानंतर एक दिवस सुट्टी असायची. त्या सुट्टीच्या दिवशी खूप राग यायचा. गावस्कर, विश्वनाथ, अमरनाथ, वेंगसरकर आदी चांगले खेळत असतांना नेमकी सुट्टी यायची. तो दिवस कधी एकदा संपतो असे होवून जायचे. भारतात मॅच असली तर दिवसभर कुठे न कुठे रेडिओवर कॉमेंट्री ऐकायला मिळायची. इंग्लंड, वेस्ट इंडीज अशा ठिकाणी रात्री अकरा साडे आकरापर्यंत मॅच चालायची. शॉर्ट वेव्हवर वेगवेगळ्या ठिकाणी ट्रांझिस्टर नेऊन खर...खुर...करणार्‍या ट्रांझिस्टरला रेंज मिळवून देण्याची धडपड चालायची. फिलिप्सच्या मोठ्या रेडिओवर मात्र चांगला आवाज यायचा. पण मध्येच रेंज गेली की खूप राग यायचा. त्याला थापट्या मारून हा�� दुखायचे.
उन्हाळ्यात ट्रांझिस्टर घेवून तिसर्‍या मजल्यावर (गच्चीवर) अंथरलेल्या गार गार गादीवर, स्वच्छ चंद्रप्रकाशात पहुडत कॉमेंट्री ऐकायची जी मजा यायची ती आज टिव्हीवर मॅच पाहण्यातही नाही! दिसत काहीच नसले तरी डोळ्यासमोर सर्व स्वच्छ दिसायचे. कॉमेंट्री सांगणारे इतके छान सांगत की संपूर्ण मैदान डोळ्यासमोर उभे रहायचे.
टिव्हीचा प्रसार व्हायच्या पूर्वीचा तो काळ होता. पेपरमध्ये येणार्‍या क्रिकेटच्या फोटोंची कात्रणे करून जुन्या वहीत चिटकावणे हा उन्हाळ्यातला आमचा छंद होता. त्या काळी कलर फोटो नसायचे. ब्लॅक अँड व्हाईट फोटो मध्ये गावस्करला ड्राईव्ह करतांना, किरमानीला डाय मारून कॅच पकडतांना, असे नुसते फोटो पाहूनच अंगावर शहारे यायचे.
‘एक कपील देव नावाचा फास्ट बॉलर आलाय. खूप जोरात बॉलिंग टाकतो तो’. १९७८ साली शाळेतून आल्यावर गल्लीतल्या मित्रांसोबत गप्पा मारतांना नवीन बातमी मिळाली होती. कल्पनेनेच तो एक उंचापुरा, धष्टपुष्ट असावा असा अंदाज बांधला होता. तोवर फास्ट बॉलर म्हणजे काय हे माहितच नव्हते. बेदी, प्रसन्ना, चंद्रशेखर, वेंकट राघवन, दिलिप दोशी असे स्पिनर्सच माहित होते.
‘अरे कपील देव काहीच नाही, योगराज सिंग म्हणून एक त्याच्यापेक्षाही फास्ट बॉलर आहे. पण त्याला टीममध्ये घेतले नाही.’ आमच्यापेक्षा वयाने मोठा असलेल्या एका मित्राने माहीती पुरवली. यावर बर्‍याच गप्पा रंगल्या. वेस्ट इंडीजमध्ये कसे धिप्पाड आक्राळ विक्राळ बॉलर आहेत, आपल्याकडे मात्र फक्त स्पिनर्स आहेत. नाही म्हणायला अबिदअली, करसन घावरी असे बॉलर होते, पण फास्ट बॉलर म्हणण्यासारखा हा कपील देव टीममध्ये आला आहे हे ऐकून हरखून गेलो होतो.
याच गप्पात १९७५ साली पहिली वनडे वर्ल्ड कप झाली अन वेस्ट इंडीजने जिंकली हे कळले. ‘त्या वर्ल्डकप मध्ये ओपनिंगला येवून गावस्कर संपूर्ण ६० ओव्हर्स खेळून नॉट आऊट राहिला, पण फक्त ३६ रन केले’ अजून एकाने माहिती दिली. या गप्पात अशी माहिती फक्त तोंडीच दिली जायची असे नाही. अगदी अ‍ॅक्शन करून कोण कसे शॉट मारतो, कोण कशी बॉलिंग करतो, मनगटाचे जॉईंट नसलेला चंद्रशेखर कसे बॉल टाकतो, हे कुठेही कधीही मॅच न पाहणारे अगदी रंगवून सांगायचे. त्यामुळे कल्पनाविश्वात रमायला खूप मजा यायची.
१९७९ चा वर्ल्डकपही वेस्ट इंडीजने जिंकला हे पेपरमध्ये वाचून कळले होते. डेस्मंड हेंस, गार्डन ग्रीनिज, क्लाईव्ह लॉईड, मायकल होल्डींग, माल्कम मार्शल, जोएल गार्नर, जेफ्री दुजां अशा धिप्पाड खेळाडूंचे फोटो पाहून त्यावेळी धडकीच भरायची. एकेकाळी बॉडीलाईन बॉलिंग करून त्यांनी अंशुमन गायकवाड, गावस्कर, वेंगसरकर, फारुख इंजिनिअर अशा खेळाडूंना मैदानावरच जायबंदी केले होते हे पेपरमध्ये वाचले होते. अशा या टीमला तेव्हा काहीच चॅलेंज नव्हते.
हे सर्व आज परत आठवायचे कारण म्हणजे ‘१९८३’ हा सिनेमा नुकताच दुसर्‍यांदा पाहिला आणि तो पहात असतांना डोळ्यासमोर त्यावेळचं सगळं चित्र अगदी हुबेहुब तरळलं.
१९८३ च्या वर्ल्डकपपर्यंत वनडे मॅचेसचे बरेचसे आकर्षण वाढले होते. पेपरमध्ये रोज त्याबद्दल वाचायला मिळत होते. भारत एकेक मॅच जिंकत फायनलला पोहोचला होता. न भुतो न भविष्यती असा तो क्षण होता. असे असले तरी आकाशवाणीच्या मेडियम वेव्हवर भारतीय स्टेशनवर कॉमेंट्री नव्हती. तिथे बातम्या आणि इतर कार्यक्रमच चालले होते. कदाचित भारतीय टीम असे काही शौर्य करेल हे आकाशवाणीच्या मनालाही शिवले नसावे. त्यामुळे शॉर्टवेव्हवर लागणार्‍या परदेशी स्टेशनवर अवलंबून असावे लागायचे.
फायनल मॅचच्या दिवशी आमच्या रेडिओच्या माडीत फिलिप्सच्या मोठ्या रेडिओवर कॉमेंट्री लावलेली होती. मॅचसाठी दादा (वडील) कोर्टातून लवकर घरी आले होते. मी वरती जाऊन कॉमेंट्री ऐकत बसलो होतो. बैठकीतले काम आटोपून दादाही वरती आले. शॉर्टवेव्ह मुळे खुपदा व्यत्यय येत होता. त्यात इंग्रजी कॉमेंट्री सुरू झाली की मला फार राग यायचा! अशावेळी काय झाले ते दादांकडून कळायचे.
श्रीकांत आऊट होवून परतला आणि नंतर गळती सुरू झ���ली. कसेबसे १८३ रन झाले! आम्ही उदास झालो होतो. त्यांच्या लंच टाईममध्ये आम्ही डिनर आटोपून परत वरती येवून बसलो. लंचनंतर वेस्टइंडिज खेळायला उतरला आणि लाईट गेले! अंधारात ट्रांझिस्टर शोधून काढला. बाहेर सज्जात (गॅलरीत) बबर्‍याने गाद्या टाकून ठेवल्या होत्या. त्यावर बसून ट्रांझिस्टर सुरू केला. तोवर त्यांचे दोन आऊट झाले होते, पण विव्ह रिचर्डस मात्र ठोकत होता.
‘रिचर्ड्स आऊट होतो का नाही रे..’ दादांनी मला विचारले.
‘अ‍ॅ हॅ, तो खूप तगडा आहे. काय करतो कुणास ठाऊक!’ मनातून तो लवकर आऊट व्हावा असे वाटत असले तरी मी मोघम उत्तर दिले. आऊट होतो म्हणावं अन नाही झाला तर काय घ्या! असं प्रत्येकवेळी दादा विचारायचे आणि मी असेच मोघम उत्तर द्यायचो. मोघम उत्तर दिले तरच मनातले घडते अशी माझी (अंध)श्रद्धा होती!
...आणि तो क्षण आला! ‘गेंद ��समान छूती हुयी बाँड्री लाईन की तरफ जा रही है, उ��के पिछे कपीलदेव दौड रहे है, अब देखना है वो ये कॅच पकड पाते है या नही..... और... और...’ असे कॉमेंट्रेटर म्हणाला अन नुसता प्रेक्षकांच्या ओरडण्याचा गोंधळाचा आवाज येवू लागला. माझी छाती धडधड करू लागली. नेमके काय झाले काहीच कळेना. जवळजवळ दोन तीन मिनिटानंतर ‘ये गजब हो गया! मेरी जिंदगी मे पहली बार मैंने ये देखा है. कोई खिलाडी बीस तीस गज पिछे दौडते हुये इतनी महत्वपूर्ण कॅच पकड लेता है ये दृश्य विलोभनिय है.....’ हे वाक्य ऐकून मी तर उड्याच मारायला लागलो. दादाही तक्क्याला टेकून सरसावून बसले. खुशीत त्यांनी पानपुडा उघडला. तंबाखू हातावर चोळून मस्तपैकी फक्की मारली. मला लक्षात आले की जवळपास तास दिड तासापासून त्यांनी पानपुड्याला हात लावला नव्हता!
एकदाचा रिचर्डस आउट झाला अन त्यांचे एकेक विकेट पडायला लागले. मोहिंदर अमरनाथने तर कमालच केली होती. अन पाहता पाहता भारत जिंकला! वेस्टइंडीजची हॅटट्रिक चुकली आणि त्यांची मिजासही उतरली. मैदानावरचा गोंधळ, प्रेक्षकांचा आवाज, लॉर्डसच्या गॅलरीत कपीलदेवने वर्ल्डकप हातात घेवून उंचावला...हे सारे कॉमेंट्रेटर सांगत होते. कल्पनेनेच सारे दृश्य आमच्या डोळ्यात साठत होते.
आनंदाने मी तर नाचतच सुटलो होतो. क्रिकेटमध्ये काहीतरी झाले आहे अन भारत जिंकला आहे हे आईला लक्षात आले होते. रात्रीचे साडेआकरा वाजून गेले होते तरी खाली जाऊन ती गरम गरम मसाला दूध घेऊन वरती आली. ते वाफाळलेले दुध पित पित डोळ्यासमोर लॉर्डसचे मैदान आणत रात्री खूप उशीरा केंव्हातरी डोळा लागला...
तो आनंदाचा क्षण, ते रोमांच, वाडा, गल्ली, रेडिओची माडी, सज्जा, फिलिप्सचा रेडिओ, छोटा ट्रांझिस्टर, दूर कुठेतरी वाजलेले फटाके, गरम मसाला दुध...हे सारे चित्र आज या सिनेमामुळे ३९ वर्षानंतर डोळ्यासमोर जसेच्या तसे अगदी लख्ख उभे राहिले, अन अंगात उगाच एक नवीन ऊर्जा निर्माण झाल्यासारखे वाटले...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
hometips-marathi · 3 years ago
Text
माझा आवडता खेळाडू निबंध मराठी Essay On My Favourite Player in Marathi Language
माझा आवडता खेळाडू निबंध मराठी Essay On My Favourite Player in Marathi Language
Essay On My Favourite Player in Marathi Language माझा आवडता खेळाडू महेंद्रसिंग धोनी आज आपण या लेखामध्ये माझा आवडता खेळाडू निबंध लिहिणार आहोत आणि मला माझ्या आवडत्या ��ेळाडू बद्दल काही माहिती आणि त्याच्यावर निबंध लिहायला खूप आनंद होईल. क्रिकेट हा खेळ कोणाला माहित नाही हा खेळ सर्वांना माहित आहे आणि भारतामध्ये तर लोक या खेळाचे वेढे आहात. भारतीय क्रिकेट टीममध्ये अनेक खेळाडूंनी आपले नाव कमावले आहे तसेच…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
महाराष्ट्र: फोन टॅपिंग प्रकरणात माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलीस आज करणार चौकशी
महाराष्ट्र: फोन टॅपिंग प्रकरणात माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलीस आज करणार चौकशी
फोन टॅपिंग प्रकरणाबाबत त्यांना यापूर्वी सीलब��द कव्हरमध्ये प्रश्नावली पाठवण्यात आली होती, परंतु त्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही, असे मुंबई पोलिसांनी म्हटले आहे. याशिवाय उत्तर दाखल करण्यासाठी त्यांना दोन वेळा नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. देवेंद्र फडणवीस इमेज क्रेडिट स्रोत: ANI महाराष्ट्र (महाराष्ट्र) मुंबईची आर्थिक राजधानी (मुंबई) मुंबई पोलिसांच्या सायबर टीममध्ये (मुंबई सायबर पोलीस)…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years ago
Text
आमदार नितेश राणे यांच्या निवडणूक रणनीतीची भाजपाकडून दखल
आमदार नितेश राणे यांच्या निवडणूक रणनीतीची भाजपाकडून दखल
गोवा विधानसभा निवडणुक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये आमदार नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक निवडणुकीत किंगमेकर ठरलेले युवा नेते आणि भाजपा आमदार नितेश राणे यांची निवड गोवा राज्याच्या निवडणूक प्रचारात भाजपाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या टीम मध्ये करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्र विरोधी पक्षनेते व गोवा भाजपा प्रभारी देवेंद्र फडणवीस या दोन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
samarthnews · 3 years ago
Text
काँग्रेसकडून पुन्हा रजनीताई पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर
काँग्रेसकडून पुन्हा रजनीताई पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर
सोनिया गांधी सह राहुल गांधींच्या टीम मध्येही रजनी पाटील केज दि.२० (प्रतिनिधी) काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार स्व.राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्या रजनीताई पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून रजनीताई पाटील यांनी आता राहुल गांधींच्या टीममध्ये देखील आपले स्थान मजबूत केले असून बीड जिल्ह्यातील काँग्रेसला आता अच्छे दिन येतील अशी अपेक्षा व्यक्त होत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
गुजरात टायटन्सला IPL चॅम्पियन केल्यानंतर शुभमन गिलवर 'या' टीममध्ये मोठी जबाबदारी
गुजरात टायटन्सला IPL चॅम्पियन केल्यानंतर शुभमन गिलवर ‘या’ टीममध्ये मोठी जबाबदारी
गुजरात टायटन्सला IPL चॅम्पियन केल्यानंतर शुभमन गिलवर ‘या’ टीममध्ये मोठी जबाबदारी गुजरात टायटन्सच्या (Gujarat Tirans) आयपीएल विजेतेपदामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेल्या शुभमन गिलवर (Shubman Gill) आता नवी जबाबदारी आली आहे. गुजरात टायटन्सच्या (Gujarat Tirans) आयपीएल विजेतेपदामध्ये महत्त्वाचं योगदान दिलेल्या शुभमन गिलवर (Shubman Gill) आता नवी जबाबदारी आली आहे. Go to Source
Tumblr media
View On WordPress
0 notes
nitinkandharkar · 3 years ago
Text
सोशल अँझायटी...
पब्लिकसमोर स्टेजवरून बोलतांना किंवा काही परफॉर्म करतांना घाबरं होणे, हातपाय गळणे, तत-पप होणे, कापरं भरणे असा अनुभव बहुतेकांना येतो. अशावेळी भल्याभल्यांची बोलती बंद होते. डोके गरगरायला लागते, घशाला कोरड पडते, काय बोलावे सुचतच नाही. टिव्हीवरील इंडियन आयडॉल पाहतांना याला ‘सोशल अँझायटी’ या गोड नावाने संबोधतात असे समजले. हा शब्द वापरला की सहानुभूती मिळते, लोक हसत नाहीत. पण दुर्दैवाने आमच्या काळात हा शब्द अस्तित्वात नव्हता!
भारत विद्यालयात मी सातवीत असतांना पहिल्यांदा शाळेत स्नेहसम्मेलन भरवण्यात आले होते. छ. शिवाजी कॉलेजचे स्नेहसम्मेलन पहायचो त्यामुळे शाळेतल्या स्नेहसम्मेलनाची खूपच उत्सुकता होती. वेगवेगळे कार्यक्रम ठरवण्यात आले होते. वर्गात गुरूजींनी नोटीस वाचून दाखवली व कुणा कुणाला भाग घ्यायचे त्यांनी नावे द्यावीत असे सुचवले. अंगात नवा हुरूप संचारला होता. एकही इव्हेंट सोडायचा नाही हे ठरवले आणि गुरूजींकडे नाव दिले.
एक दिवस गुरूजींनी अचानक गायनात भाग घेणार्‍यांची चाचणी घेतली. हा क्षण येईपर्यंत रोज वर्गात गॅप मिळाला की गाणी गाने, एखाद्या पिक्चरचे डायलॉग म्हणणे, नाच करणे, अ‍ॅक्टींग करणे असे अनेक प्रकार चालू होते. कधी एकदा स���नेहसम्मेलन येईल अन आपण स्टेजवर जाऊन परफॉर्म करू असे झाले होते. पण चाचणी सुरू झाली तसे अंगातले अवसान गळून पडले. वर्गातील मुले उभे राहुन ऑडिशन देवू लागली. जसे जसे एकेक नंबर पुढे सरकू लागले तसा अजूनच गर्भगळीत होवून गेलो. थंडीचे दिवस असूनही घाम फुटला. माझा नंबर यायच्या आत टोल वाजावा अशी प्रार्थना करत बसलो. पण देवाने ऐकले नाही. माझा नंबर आला अन गुरूजींनी मला उठवले. तोंडातून शब्दच फुटेना. एरवी गाणी, वादन, ऑर्केस्ट्रा याचे लहानपणापासून फारच आकर्षण होते. पण प्रत्यक्ष वेळ आली तेव्हा वाचाच बसली. खिडकीजवळ बसलो होतो. उठून वेड्यासारखा बाहेर बघत ‘सुहाना सफर और ये मौसम हंसी...’ ही ओळ कशीबशी म्हटली. माझे शब्द मलाच ऐकू येत नव्हते. कानठळ्याच बसल्या होत्या. काय गुणगुणलो तेच कळेना. संपूर्ण रामायण चित्रपटाप्रमाणे धरती फाटावी अन आपण आत जावे असेच वाटत होते त्या क्षणी. पुढची ओळ म्हणायच्या आधीच ‘बस खाली’ असा आवाज आला अन पटकन खाली बसलो. छाती धडधड करत होती. डोळ्याच्या कोपर्‍यातून आजूबाजूला पाहिले तेव्हा काही मुले खाली मान घालून हसत होती.
असेच एकदा गुरूजींनी वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायला लावले. मी हादरूनच गेलो. ‘तुझा लहान भाऊ बघ, किती छान भाषण करतो. तुला न करायला काय झाले?’ असे म्हणून गुरूजींनी बळेच मला हरभर्‍याच्या झाडावर चढवले. स्पर्धेच्या दिवशी माझ्या आधी जो मुलगा होता तो सुरूवातीला म्हणाला ‘आज आपण इथे का जमलो आहोत हे आपणा सर्वांना महितच आहे. तरी मी सांगतो की आज लोकमान्य टिळक जयंती आहे’. त्याचे हावभाव पाहुन अख्खा सभागृह (व्हरांडा) हसायला लागला. ते बघून माझेही अवसान गळाले. मागच्या मागे पळून जावे वाटत होते, पण गुरूजींच्या नजरेच्या पट्ट्यात बसलो होतो. सुटका नव्हती!
माझा नंबर आला अन माईकसमोर उभा राहिलो. भाषण पाठ करून आलो होतो. खूपदा रिहर्सल केली होती. पण समोर बसलेल्या विद्यार्थी व शिक्षकांना पाहुन सर्व विसरून गेलो. काय बोललो देवालाच माहित. दोन तीन वाक्यानंतर ब्लँक झालो अन ‘एवढे बोलून मी माझे भाषण थांबवतो’ म्हणून जागेवर जाऊन बसलो. स्टेजवरचे पाहुणे अन सर्व मुले खदाखदा हसत टाळ्या वाजवत होती. लाजल्याहुन लाजल्यासारखे झाले होते. कानाच्या पाळ्या गरम झाल्या होत्या. रडवेला चेहरा करून घरी आलो.
ही ‘सोशल अँझायटी’ अंगात भिनलेल�� असल्यामुळे स्टेजवरच नाही तर खेळातही फजिती ठरलेलीच. एकदा पंचायत समितीच्या मैदानावर उंच सिंगलबारवर दोन हाताने लटकून झोके घेणार्‍या मोठ्या लोकांना पाहिले होते. आपणही तसे करू शकतो असा फाजील आत्मविश्वास निर्माण झाला आणि खांबावर चढून वरच्या आडव्या बारला लटकून झोके घेणे सुरू केले. पण नको त्या उचापत्या केल्यामुळे हाताची ग्रीप सुटली अन समोर घेतलेल्या झोक्याबरोबर हात सुटून उंचावरून धप्पकन पाठीवर आपटलो. असा पडलो की माझे मला कळत होते माझा श्वास बंद झाला आहे. डोळ्यासमोर अंधारी आली होती. त्या धुसर अंधारात आजूबाजूची मुले हसत होती हे तशा अवस्थेतही जाणवले. नाटक करतोय समजून कुणीच उठवायलाही आले नाही. तसाच डोळे मिटून पडून राहिलो. साधारण एक दोन मिनिटानंतर शुद्धीवर आलो, अन परत कधी सिंगलबारच्या वाटेला गेलो नाही!
आठवीत असतांना औरंगाबादला एक रणजी ट्रॉफी क्रिकेट मॅच पाहिली होती. लहान व मोठा भाऊ चांगले खेळायचे. त्यांना टीममध्ये घेत असत. मी मात्र कपडे सांभाळायला असायचो. त्यामुळे खूप कमीपणा वाटायचा. रणजी मॅच पाहिल्यामुळे सर्वांसमोर फुशारक्या मारू लागलो. शाळेच्या ग्राऊंडवर अंशुमन गायकवाड स्टाईल बॅटींग करायला ऐटीत उतरलो. दोन तीन बॉलनंतर एक जोरात बाऊंसर आला अन कानशीलाच्या बाजूला बसला! काहीच झाले नाही असे दाखवायचा केविलवाणा प्रयत्न केला. पण घेरी आली अन बॅट सोडली ती कायमचीच. पुढे क्रिकेटचा अन माझा संबंध फक्त कॉमेंट्री ऐकण्यापुरताच उरला!
अगदी लहानपणी आम्ही तीन भाऊ लहानपणी एकत्र खेळायचो, मस्ती करायचो. दादा (वडील) घरी असले तर मात्र आम्ही चिडीचुप असायचो. एक दिवस आमची मस्ती, दंगा, भांडणे चालू होती. दादा घरी आलेले लक्षातच आले नाही. आरडाओरडा, गोंधळ, धाडधाड पळणे यात आम्ही मग्न होतो. अचानक ‘काय गोंधळ लावलाय...’ असा दादांचा घोगरा आवाज कानात शिरला. मी घाबरून कोठीघरात लपून बसलो. ते दोघे त्यांच्या तावडीत सापडले. ‘फट फ़ट’ असा दोनदा आवाज आला. नंतर ‘कुठाय ते तिसरं...’ असा धडकी भरवणारा आवाज आला अन घाबरून मी खाली मान घालत बाहेर आलो. काही कळायच्या आत कानाखाली जाळ निघाला. डोळ्यासमोर काजवेच चमकले. त्या दोघांनीही मार खाल्ला होता, पण गरज नसतांना स्वत:हुन बाहेर आल्यामुळे मी खाल्लेला मार मात्र चेष्टेचा विषय बनला! आता याला सोशल अँझायटी म्हणावी का बावळटपणा हा संशोधनाचा विषय आहे.
एकदा गुरूजींनी नंदकुमार या मित्राला ‘हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे...’ या गाण्याला काही वेगळी चाल लावण्यासाठी बोलावले. संगीताची थोडीफार आवड असल्यामुळे त्याने मला सोबत घेतले. मी नववीत होतो त्यावेळी. शिक्षकांच्या खोलीत पेटी घेऊन तो चाल बसवू लागला. पटकन मला एक चाल सुचली अन मी ती गुणगुणून दाखवली. इतक्या झटपट चाल सुचली म्हणून तो आणि गुरूजी दोघेही खूप खूश झाले. पण जसे तो ती चाल पेटीवर वाजवू लागला तसे त्याच्या काहीतरी लक्षात आले अन तो हळूच म्हणाला "अरे ही चाल तर 'ए दिल मुझे बता दे तू किसपे आ रहा है...’ या गाण्याची आहे." सगळे हसायला लागले. मी हळूच उठून बाहेर निघून गेलो.
भावाचे पाहुन थोडीफार पेटी वाजवता येत होती. त्यामुळे मित्रांमध्ये वासरात लंगडी गाय शहाणी होतो. अकरावीत असतांना एक किर्तनाचा कार्यक्रम कॉलेजच्या स्टेजवर होता. काही कारणाने त्यांचा पेटीवादक आला नव्हता. कुणीतरी सरांना मी पेटी वाजवतो हे सांगितले. मग काय! सरांनी सरळ मला पकडले अन साथ करायला सांगितले. एखाद दुसरे मोडके तोडके गाणे वाजवणे वेगळे अन साथ करणे वेगळे हे सरांना कोण सांगणार! खरेच तिथे गेलो तर आपलं हसं होईल हे माहित होतं. घामेघुम होवून ‘आलोच’ असे म्हणून मागच्या दाराने जे पळून गेलो ते दोन दिवस कॉलेजला गेलोच नाही!
असे भरपूर फजितीचे किस्से आहेत. लहानपणीचेच नाही तर मोठेपणीचेही आहेत. यापूर्वी यातले बरेच लिहिले आहेत, अजूनही पुढे लिहीन आठवण म्हणून. अशा किश्श्यांमुळे आपली फजिती होत असली तरी लोकांना हसू येते ही पण एक मजाच आहे. अन ही मजा सढळ हस्ते वाटण्यातही मजा आहे...
नितीन म. कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
loksutra · 3 years ago
Text
आयपीएल 2022 डीआरएस नियम बदलले संघ दोन पुनरावलोकने घेऊ शकतात कॅच डिसमिसल सुपर ओव्हर नियम देखील बदलले आहेत
आयपीएल 2022 डीआरएस नियम बदलले संघ दोन पुनरावलोकने घेऊ शकतात कॅच डिसमिसल सुपर ओव्हर नियम देखील बदलले आहेत
आयपीएल 2022 नियम; IPL 2022 चे अनेक महत्त्वाचे नियम बदलण्यात आले आहेत. यावेळी प्रत्येक डावात संघांना एक नाही तर दोन पुनरावलोकने होतील. यासोबतच कॅच आऊट आणि सुपर ओव्हरचे नियमही बदलले आहेत. एका टीममध्ये कोरोनाचे रुग्ण आल्याची सविस्तर माहितीही देण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) IPL 2022 साठी काही महत्त्वाचे बदल केले आहेत. आता संघ एक नव्हे तर दोन डीआरएस वापरू शकतील. तसेच, कोविड…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 5 years ago
Photo
Tumblr media
निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ टीम चिपळूणात दाखल रत्नागिरी : ​उद्या 3 जून रोजी कोकण किनारपट्टीवर धडकणाऱ्या निसर्ग या चक्रीवादळामुळे नैसर्गिक आपत्ती होऊ शकते याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने एनडीआरएफ ची टीम चिपळूणमध्ये पाठवली आहे​.​या टीममध्ये 18 ​जवान आणि 2 अधिकारी आहेत​.
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
GT vs RR Dream 11 : आयपीएल फायनलमध्ये 'या' खेळाडूंचा करा टीममध्ये समावेश
GT vs RR Dream 11 : आयपीएल फायनलमध्ये ‘या’ खेळाडूंचा करा टीममध्ये समावेश
GT vs RR Dream 11 : आयपीएल फायनलमध्ये ‘या’ खेळाडूंचा करा टीममध्ये समावेश या सिझनमध्ये 10 टीम सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी राजस्थान रॉयल्स विरूद्ध गुजरात टायटन्स (RR vs GT) या टीममध्ये फायनल होणार आहे. या सिझनमध्ये 10 टीम सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी राजस्थान रॉयल्स विरूद्ध गुजरात टायटन्स (RR vs GT) या टीममध्ये फायनल होणार आहे. Go to Source
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 3 years ago
Text
IISc संशोधकांनी दाखवले की हायड्रोजन सल्फाइड वायू एचआयव्ही संसर्ग दडपतो | इंडिया न्यूज - टाइम्स ऑफ इंडिया
IISc संशोधकांनी दाखवले की हायड्रोजन सल्फाइड वायू एचआयव्ही संसर्ग दडपतो | इंडिया न्यूज – टाइम्स ऑफ इंडिया
बेंगळुरू: येथील संशोधक IISc आणि सहयोगींना ते आढळले आहे हायड्रोजन सल्फाइड (H2S) दाबण्यात महत्त्वाची भूमिका बजावते एचआयव्ही वाढलेल्या H2S वायूचा थेट परिणाम एचआयव्ही-संक्रमित मानवी रोगप्रतिकारक पेशींमध्ये विषाणूच्या वाढीचा दर कमी करण्यावर होतो. संशोधकांचे म्हणणे आहे की, निष्कर्ष एचआयव्ही विरूद्ध अधिक व्यापक अँटीरेट्रोव्हायरल थेरपी विकसित करण्याचा मार्ग मोकळा करतात. या टीममध्ये मायक्रोबायोलॉजी आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
asantoshwebportal-blog · 6 years ago
Photo
Tumblr media
वंचित बहुजन आघाडी बी टीम कशी – दीनानाथ मनोहर गेल्या काही दिवसांपासून, वंचित बहुजन आघाडीला महाराष्ट्रातून मिळणारा प्रतिसाद वाढतोय, असं दिसायला लागल्याबरोबर एका बाजूला वंचित बहुजन आघाडी ही भाजपा-शिवसेनेची बी टीम आहे,अशी टीका सुरू झालीय आणि दुसऱ्या बाजूला मोदी भाजपा परत सत्तेत येऊ नये ह्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं कॉंग्रेस -राष्ट्रवादी बरोबर (गरज असल्यास थोडं फार नमतं घेऊन) आघाडी करावी,असा महाराष्ट्रातील राजकीय ( की निवडणूक) तद्न्य कधी एकेकटे तर कधी चारचौघांची टोळी करून सल्ला देऊ लागलेत, किंवा आवाहनं करू लागलेत. आता हे वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणताहेत, तर कुठेतरी ए टीम असायला हवी, ही ए टीम कोणती असावी? असा प्रश्न पडणं अटळचं होतं. पण ह्या ए टीमबद्दल कुणी काही बोलतचं नाहीयेत असं लक्षात आलं. तेव्हा मुळात हे बी टीम प्रकरण काय आहे, ह्याचा शोध घेण्याची गरज वाटल्यान जरा शोध घेतला. खेळाच्या प्रांतात ए टीम हीच खरी मैदानात लढणारी असते. बी टीमचं अस्तित्व दोन हेतूंकरता असतं. एक तर बी टीममधून ए ग्रेडचे खेळाडू तयार करून ते ए टीममध्ये पाठवून, ए टीम मजबूत राखणे, दुसरा हेतू म्हणजे अगदी अशी आणिबाणीची स्थिती निर्माण झाली की, ए टीम मैदानात उतरूच शकत नाही, तेव्हा बी टीमने ए टीमची जागा घ्यायला सज्ज असणे. आता लष्कराच्या प्रांतात ए टीम म्हणजे अशी सैनिकांची टोळी जी प्रथम शत्रूला दुबळं करण्यासाठी, हरविण्यासाठी मैदानात पुढे होते. अर्थातच ही ए टीम अत्यंत कार्यक्षम असायला हवी हे अभि��्रेतचं आहे. परंतु त्याचबरोबर बी टीमदेखील आणिबाणीच्या परिस्थितीत ए टीमचं काम आपल्या खांद्यावर घेऊन पुरं पाडण्यापुरती सक्षम असावी लागते. थोडक्यात खेळाचं मैदान असो, वा लढण्याचं रणांगण असो, ए टीम आणि बी टीम ह्यांच्यात आपलेपणाचं नातं असतं, त्यांच्यात संवाद असतो, देवघेव असते. पण येथे जर वंचित बहुजन आघाडी, भाजपाची बी टीम असेल तर ए टीम कोणती असणार? ए टीम म्हणजे शीवसेना असायला हवी. शिवसेना व वंचित बहुजन आघाडी ह्याचं नातं ए व बी टीमसारखं असल्याचं पूर्वी दिसलेले नाही, आताही दिसत नाहीये. दुसरी शक्यता आहे ..ही ए टीम म्हणजे ज्यांनी महाराष्ट्रात भाजपा, शिवसेना सत्तेवर विराजमान होण्याआधीच भाजपाला आपला राजकीय पाठींबा व्यक्त केला तो राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष.. पण इथं पाहिलं तर ही ए टीम, राष्ट्रवादी पक्ष , बी टीमला बिलकूल प्रतिसाद न देता, हातावर हात ठेवून थंड नजरेने भलतीकडेच बघत दुर्लक्ष करताना दिसतोय. थोडक्यात हे बी टीम प्रकरण काही लक्षात आलं नाही राव. सौ.सोशल मीडिया
0 notes
sohamlifeconsultancy-blog · 6 years ago
Photo
Tumblr media
अवॉर्ड च्या निमित्ताने... काल आम्हाला ( RC_PM TeamSoham ला ) नाविन्यपूर्ण व्यावसायिक संकल्पनेला उत्तमपणे वास्तवात आणल्याबद्दल अवॉर्ड मिळाला, खूप छान वाटलं Consultation क्षेत्रात व्यवसाय करायचा ठरवलं तेव्हा अनेकांनी नको असंच सुचवलं, तरीही मनात कुठेतरी जिद्द होती की आम्ही ह्या क्षेत्रात चांगलं योगदान देऊ शकतो तसेच व्यावसायिक यश सुद्धा मिळवू शकतो. यात मोलाचा वाटा आमच्या शिक्षकांचा आहे ज्यांनी आम्हाला या क्षेत्राची ओळख करून दिली व पुढे काम करण्याची प्रेरणा दिली मी विशेष आभारी आहे Vishal Ghule सर, Roshan More सर, शीला वैद्य मॅडम, सुजाता शेट्टी मॅडम, रश्मी पटवर्धन मॅडम, Aloke Hurra सर, Manish Sharma सर, रॉबर्ट रिओपेल, Blair Singer, T. Harv Eker व Ravi Prakash सर आणि आमच्या इतर असंख्य मार्गदर्शकांचा व टीमचा आहे. चाचपडत सुरुवात केल्यावर संघर्ष वाढायला लागला पण काळाच्या ओघात आम्हाला हे लक्षात आले की करीअर, पालकत्व व अभ्यास कौशल्य हे विषय मला ज्यास्त अनुकूल आहेत. याद्वारे मी व आमची टीम अधिकाधिक विद्यार्थी व पालकांची मदत करू शकतो, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतो. प्रत्येक वेळी मोफत सेमिनार घेतांना अनेकांनी कसं परवडतं हा प्रश्न केला, आणि खरंच आहे, मोफत प्रवेश, येणारी प्रत्येक व्यक्ती ( विद्यार्थी असो वा पालक ) आपल्या ��ेळेचा सदुपयोग झाला व खूप काही चांगलं ऐकायला / शिकायला मिळालं अशी प्रतिक्रिया देऊन जातांना त्यापैकी काही जणांनी आमच्या व्यावसायिक सेवा देखील घेतल्या व 80% सामाजिक व 20% व्यावसायिक अश्या तत्वावर हा सोहम लाइफ कन्सल्टन्सी चा उपक्रम चालू आहे. आज स्वामी कृपेने 50,000 विद्यार्थी व पालकांच्या आयुष्यात बदल घडवलेली 24 शाखा व 51 consultant असलेली आमची टीम ( #टीमसोहम ) आहे आपल्या वाणीच्या प्रभावाने समाजिक योगदान देऊन व्यवसाय करू इच्छित असलेल्या व्यक्तींना आम्ही विनाजोखिम व्यावसायिक संधी कशी शोधायची, ही संधी माझ्यासाठी योग्य आहे की नाही हे जाणून, थंक्यू कमवत व्यवसायात पुढे कसे जायचे हे तंत्र आम्ही टीमला व टीममध्ये येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींना देत आहोत, त्यामुळे 24 शाखा व 51 consultant ही केवळ सुरुवात ठरेल हा मला विश्वास आहे पुनश्च सर्वांचे आभार सोहम लाइफ कन्सल्टन्सी टीमच्या वतीने RC_PM Committed To Be The Change https://www.instagram.com/p/BseTyD7ntFO/?utm_source=ig_tumblr_share&igshid=1qnbmc4omelwa
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
'धोनीने देश बदलला तर त्याला न्यूझीलंडच्या टीममध्ये घेऊ'
‘धोनीने देश बदलला तर त्याला न्यूझीलंडच्या टीममध्ये घेऊ’
न्यूझीलंड विरुद्धच्या पराभवामुळे भारत वर्ल्डकपच्या बाहेर फेकला गेला. या सामन्यामध्ये संथ खेळ केल्याची टीका धोनीवर होत आहे. न्यूझीलंडचा कॅप्टन केन विल्यमसननं मात्र धोनीची पाठराखण केली आहे. भारताचा कर्णधार विराट कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन या दोघांनाही मॅचनंतरच्या पत्रकार परिषदेत धोनीविषयी प्रश्न विचारण्यात आले.
केन विल्यमसनला एका पत्रकारानं विचारलं, की तो जर भारताचा कर्णधार असता, तर…
View On WordPress
0 notes
big--news · 7 years ago
Text
नवउद्योजकांचा आधारस्तंभ – देआसरा
Tumblr media
जीवनात यश त्यानांच मिळते जे चिकाटीने कार्यरत असतात. आपल्यात असलेले कौशल्य जाणून सातत्याने जो वाटचाल करतो त्यालाच यश मिळते. दत्तात्रय व स्नेहल बागडे हे याचे एक उत्तम उदाहरण. या जोडप्याला जेव्हा त��यांच्या पहिला बाळाची गोड बातमी कळली तेव्हा एक आर्थिक संकट त्यांच्यावर कोसळले. आपल्यात असलेले कौशल्य जाणून गृहिणी असलेल्या स्नेहल यांनी पतीला हातभार लावण्यास सुरवात केली. व त्यातूनच एक नवीन उद्योजिका जन्माला आली. पती पत्नी दोघांनी मित्राच्या पेंटिंग व्यवसायात सामील होऊन सुशोभित वस्तू तयार करण्यास सुरवात केली. काही काळानंतर त्यांना अधिक भांडवलाची गरज भासू लागली. त्यावेळी त्यांनी देआसराकडे धाव घेतली. आज ते एक यशस्वीरित्या आपला व्यवसाय करत आहेत.
मार्केटिंग व कस्टम रिलेशन्स मध्ये शिक्षण घेतलेल्या आदित्य काळेने स्वतःचे स्नॅक्स सेंटर सुरु करायचे ठरवले. व्यवसाय चालवण्यासाठी लागणाऱ्या कर्जाचे योग्य नियोजन न केल्याने आदित्य कर्जाची वेळेवर फेड करू शकत नव्हता. आदित्यची ही परिस्थिती समजून घेऊन देआसराने त्याचा योग्य रित्या व्यवसायाचा आराखडा व बँकेचे कागदपत्रे बनवले. आता आदित्य यशस्वीपणे वायसाय करत आहे व कर्जाची परतफेड योग्य वेळेस चालू आहे.
वाणिज्य शाखेत शिक्षान घेतलेल्या चैत्राली यांनी लग्नानंतर घरूनच ब्युटी पार्लरचा व्यवसाय सुरु केला व त्याच बरोबर घरून डबे देण्याचे कामही सुरु केलेलं. थोड्यच दिवसात त्यांनी स्वतःची फूड व्हॅन सुरु केली. त्यासाठी लागणाऱ्या सर्व योजनेसाठी देआसराने त्यांना मार्गदर्शन दिले.              
अशा अनेक नव उद्योजकांना व्यवसाय ��भा करण्यासाठी व तो वाढवण्यासाठी देआसरा फाउंडेशन मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. देशातील वाढत्या बेरोजगारीची समस्या लक्षात घेऊन रोजगार वाढवण्याच्या हेतूने डॉ. आनंद देशपांडे यांनी देआसरा फाउंडेशनची स्थापना केली आहे. नव्याने उद्योग चालू करणाऱ्या उद्योजकांसाठी देआसरा ही खऱ्या अर्थाने आसरा देणारी संस्था झाली आहे. या फाउंडेशनचे ध्येय २०२० पर्यंत कमीतकमी एक लाख रोजगार उपलब्ध करण्याच्या उद्देशाने  25,000  उद्योगांना त्यांचे व्यवसाय सुरू करणे, त्यांचे व्यवस्थापन करणे आणि वाढविण्यासाठी सक्षम करणे, असे ध्येय समोर ठेवले आहे. प्रज्ञा गोडबोले या फाउंडेशनच्या मुख्यकार्यकारी अधिकारी असून देआसराच्या कार्यकारी टीममध्ये पूर्वी नामांकित बँकिंग आणि सरकारी वित्तीय संस्थांमध्ये काम करून समृद्ध अनुभव असलेले लोक कार्यरत आहेत.
ना नफा ना तोटा या तत्वावर या संस्थेचे कामकाज चालू असून उद्योजकांना एक समर्पित व्यवसाय सुविधा उपलब्ध करून देते ज्याला उद्योगमित्र म्हणले जाते. जो व्यवसायासाठी उद्योजकांना मार्गदर्शन करतो आणि निरंतर यशस्वीतेची खात्री देतो. देआसरा व्यवसाय व मालकांसाठी एक सक्षम व्यासपीठ तयार करून देते यातून ते व्यवसायाची ओळख, त्यातील चढ उतार, व्यवसायाला असलेली बाजारपेठ याची सर्व माहिती नव उद्योजकाला देण्यात येते. व्यवसाय सुरु झाल्यावर देखील उद्योगमित्र हा नवउद्योजकाबरोबर असतो. व्यवसायात येणाऱ्या प्रत्येक अडीअडचणीला देअसरा कायम उद्योजकाच्या पाठीशी ठाम पणे उभे असते. नव्याने व्यवसाय करणे हे अगदी ध्येर्याचे काम आहे. व्यवसायात आपण यशस्वी होऊ का? हा व्यवसाय आपल्याला योग्यरीत्या चालवता येईल का? असे अनेक प्रश्न नवीन व्यवसाय चालू करताना प्रत्येकाच्या मनात येतात. त्यामुळे प्रत्यक्ष व्यवसाय सुरु करण्याआधी उद्योजकांना व्यवसायासंबंधी विविध प्रकारची मदत व माहिती दिली जाते.
उद्योजकता वाढवणे, उद्योजकांना व्यवसाय चालवणे सोपे करणे हे ध्येय ठेऊनच देअसरा कार्यरत आहे. बेरोजगारीची मोठी समस्या सोडवण्यासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करणे गरजेचे आहे. त्यासाठी नोकरीच्या संधी निर्माण करणारे उद्योजक घडवायला हवेत, या उद्येशाने फाउंडेशनची निर्मिती झाली. सहजपणे ग्राहकांशी जोडण्यासाठी, त्यांचे उत्पादन / सेवा बाजारात आणणे, व्यवहार करणे आणि दैनंदिन व्यवसाय कार्यप्रणाली व्यवस्थापित करण्यासाठी सक्षम करते.
0 notes