#जितेंद्र आव्हाड देवेंद्र फडणवीस
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 28 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 18 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १८ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीत वैयक्तिक कायद्यांच्या माध्यमातून अडथळे आणता येणार नाहीत-सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची राज्य सरकारविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार
ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ कालवश-पुण्यात अंत्यसंस्कार
आणि
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात भारत १२५ धावांनी पिछाडीवर
****
बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या अंमलबजावणीत वैयक्तिक कायद्यांच्या माध्यमातून अडथळे आणता येणार नाहीत, असं सर्वोच्च न्यायालयानं आज स्पष्ट केलं. सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या पीठाने आज बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शक तत्वंही जारी केली.
****
नागरिकांनी मानवाधिकाराच्या उल्लंघनाविरोधात ठामपणे उभं राहायला हवं, असं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. नवी दिल्ली इथं भारतीय राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या स्थापना दिन उपराष्ट्रपती धनखड यांच्या अध्यक्षतेखाली साजरा झाला त्यावेळी ते बोलत होते. मानवाधिकार हा देशाच्या नैतिक मूल्यांचाच एक भाग असल्याचं ते म्हणाले.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ��ज मुंबईत भारतीय जनता युवा मोर्चातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘आयडियाज फॉर विकसित महाराष्ट्र’ या अभियानाचा शुभारंभ केला. तरुणांच्या कल्पना, आकांक्षा जाणून घेण्यासाठी हे अभियान सुरू केलं असल्याचं भाजपा प्रदेश सरचिटणीस आणि युवा मोर्चाचे प्रभारी आमदार विक्रांत पाटील यांनी मुंबईत पत्रकारांशी बोलताना सांगितलं. या मोहिमेद्वारे दीड कोटी सूचना गोळा करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून, यासाठी जिल्हा स्तरावर येत्या २५ दिवसात ५० हजारांहून अधिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं. या अभियानात सूचना पाठवण्यासाठी तसंच अधिक माहितीसाठी संबंधित संकेत स्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि मित्रपक्षांकडून मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. या आणि इतर विषयांमध्ये निवडणूक आयोगानं लक्ष घालून कारवाई करावी, या मागणीसाठी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना आघाडीने पत्र दिलं आहे. या पत्रावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभा तसंच विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि अंबादास दानवे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार अनिल देसाई, तसंच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जितेंद्र आव्हाड यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
****
विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्य सरकारविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार केली आहे. विधानसभा निवडणुकीची घोषणा होऊन आचारसंहिता लागल्यानंतरही सरकारने आपल्या शासकीय संकेतस्थळावर एका दिवसात २५९ शासन निर्णय प्रसिद्ध केले. तसंच २७ महामंडळांवर अध्यक्ष आणि उपाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या. यामुळे आचारसंहितेचा भंग होत असल्याचा आरोप दानवे यांनी केला आहे. आचारसंहिता भंग करणाऱ्या या प्रकरणांची चौकशी करण्यात यावी, असं पत्र दानवे यांनी केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त तसंच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर केलं आहे.
****
युवकांनी स्वतः मतदानाचे महत्त्व ओळखून इतरांनाही मतदानाचं महत्त्व सांगावं असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलं. देवगिरी महाविद्यालयात युवासंवाद कार्यक्रमात ते आज बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, स्वीप नोडल अधिकारी दीपाली थावरे, प्राचार्य डॉ. अशोक तेजनकर यांच्यासह प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. युवकांनी स्वयंस्फूर्तीने मतदानासाठी पुढे यावे आणि आपल��� लोकशाहीचा हक्क बजवावा असं आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केलं. यावेळी विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृतीसाठी पोवाडा आणि गीते सादर केली.
****
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्ह्यातील ५० टक्के मतदान केंद्रावर वेब कास्टिंग केली जाणार असून मतदारांनी शंभर टक्के मतदान करावं असं आवाहन पाठक यांनी यावेळी केलं. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे. गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी येथील ९६ मतदान केंद्र संवेदनशील असून या मतदान केंद्रावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनातर्फे लक्ष ठेवले जाणार असल्याचं पाठक यांनी सांगितलं.
****
नांदेड इथं आज नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ आणि नायब तहसीलदार नितेशकुमार बोलेलू यांनी युवकांशी संवाद साधला. निवडणुकीत उत्साहाने मतदान करुन लोकशाहीचा उत्सव साजरा करावा, असं आवाहन तहसीलदार प्रविण पांडे यांनी यावेळी केलं.
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी ७ वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरून प्रसारित केला जात आहे. या कार्यक्रमात आज नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
ज्येष्ठ संस्कृततज्ज्ञ पंडित वसंतराव गाडगीळ यांचे आज पुण्यात निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून संस्कृत विषयात पदवीपर्यंतचं अध्ययन केलेले गाडगीळ यांनी, संस्कृत वाङ्गमय आणि भारतीय संस्कृतीवर मोठं संशोधन केलं. संस्कृत भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी देशभर आणि परदेशातही अनेकदा प्रवास केला. याच उद्देशाने शारदा ज्ञानपीठाची स्थापना केलेल्या गाडगीळ यांनी संस्कृतशी संबंधित विषयांवर विपुल लेखन केलं. त्यांच्या पार्थिव देहावर आज पुण्यात अंत्यसंस्कार कर���्यात आले.
****
बंगळुरु इथं भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट कसोटीत भारत १२५ धावांनी पिछाडीवर आहे. आज न्यूझीलंड संघानं सर्वबाद ४०२ धावा केल्या. आजचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात तीन बाद २३१ धावा झाल्या होत्या. यशस्वी जैस्वाल ३५, विराट कोहली ७० आणि रोहित शर्मा ५२ धावा केल्या तर सरफराज खान ७० धावांवर खेळत आहे.
****
डेन्मार्क खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत एकेरीत उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या पी व्ही सिंधूचा सामना इंडोनेशियाच्या ग्रगोरिया मारिस���का तुनजुंग हिच्याशी होत आहे. सिंधुनं काल चीनच्या हान यू हिचा १८-२१, २१-१२, २१-१६ असा पराभव केला. इतर सर्व भारतीय खेळाडूंना पहिल्या फेरीतच पराभवाचा सामना करावा लागला.
****
परभणी जिल्ह्यात उद्यापासून ते २१ ऑक्टोबर दरम्यान १४ वर्षे वयोगटातील शालेय विद्यार्थ्यांच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. २७ ते २९ ऑक्टोबर दरम्यान १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील मुलींच्या राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे. क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंनी या स्पर्धेस उपस्थित राहून खेळाडूं‌ना प्रोत्साहन द्यावं असं आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केलं आहे.
****
मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आलं आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबतचं पत्र आज जारी केलं.
****
एमआयएमचे नेते तथा छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील यांनी नांदेड लोकसभा पोटनिवडणूक लढवण्याचा मानस व्यक्त केला आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथे प्रसार माध्यमांशी बोलत होते. पक्षश्रेष्ठींनी आदेश दिला तर नांदेड इथून निवडणूक लढवणार असल्याचं, सय्यद इम्तियाज यांनी सांगितलं.
****
आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते माजी नगरसेवक नाना बागुल तसेच सिंधी समाजाचे ज्येष्ठ नेते नंदलाल वाधवा यांनी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षात प्रवेश केला. आज मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी ही घोषणा केली.
****
माजी आमदार राजन तेली यांनी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि सावंतवाडी विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातले भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी सुरेश बनकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती अरुण काळे यांच्यासह सिल्लोड - सोयगांव विधानसभा मतदारसंघातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. आज मुंबईत झालेल्या या प्रवेश सोहळ्यात पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवबंधन बांधून या सर्वांचं स्वागत केलं.
****
नांदेड जिल्ह्यात शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पाच्या धरणातील उपलब्ध पाणीसाठ्यातून चालू रब्बी हंगामात नियम आणि अटीनुसार पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठी इच्छुक लाभधारकांनी आपले नमुना क्रमांक ७ चे पाणी ��र्ज जवळच्या शाखा कार्यालयात १५ नोव्हेंबर पर्यंत आवश्यक त्या कागदपत्रासह भरून द्यावेत, असं आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता यांनी केलं आहे.
****
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
NCP नेते जितेंद्र आव्हाड यांनी वेदांत फॉक्सकॉन पिक्स गुजरात ssa 97 वरून शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली.
NCP नेते जितेंद्र आव्हाड यांनी वेदांत फॉक्सकॉन पिक्स गुजरात ssa 97 वरून शिंदे फडणवीस सरकारवर टीका केली.
वेदांत समूह आणि फॉक्सकॉन यांच्या भागीदारीतून उभारण्यात येणारा प्रकल्प गुजरातला गेला आहे. या प्रकल्पामुळे उभे राहणारे पूरक छोटे व्यवसाय, लाखोंचा रोजगार आणि करोडो रुपयांच्या महसुलाला महाराष्ट्राला मुकावे लागणार आहे. यावरून आता राज्यात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हटलं की, “छत्रपती शिवाजी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
lok-shakti · 3 years ago
Text
देवेंद्र फडणवीस से मिले जितेंद्र आव्हाड, बीजेपी ने कहा पुलिस के लिए हाउसिंग प्रोजेक्ट पर चर्चा
देवेंद्र फडणवीस से मिले जितेंद्र आव्हाड, बीजेपी ने कहा पुलिस के लिए हाउसिंग प्रोजेक्ट पर चर्चा
आवास मंत्री और राकांपा नेता जितेंद्र आव्हाड ने गुरुवार को विधानसभा में विपक्ष के नेता देवेंद्र फडणवीस से मुंबई में उनके आवास पर मुलाकात की। जबकि राकांपा और भाजपा दोनों ने इस बात से इनकार किया कि बैठक का कोई राजनीतिक एजेंडा था, इसने राजनीतिक गलियारों में अटकलों को जन्म दिया है। भाजपा ने कहा कि दोनों पुलिस कर्मियों के लिए आवास परियोजना पर चर्चा करने के लिए मिले थे। “फडणवीस ने आवास मंत्री को पुलिस…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years ago
Text
संक्रमणावस्थेतून जाणाऱ्या माध्यमांनी जनतेपर्यंत सत्य पोहोचवावे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संक्रमणावस्थेतून जाणाऱ्या माध्यमांनी जनतेपर्यंत सत्य पोहोचवावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे, दि. १० (जिमाका): सध्या मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल अशा विविध प्रकारची माध्यमे संक्रमणावस्थेतून जात असून त्यांनी तत्त्व आणि ध्येय न बदलता जनतेपर्यंत सत्य पोहोचवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. दैनिक लोकमतच्या ठाणे येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years ago
Text
संक्रमणावस्थेतून जाणाऱ्या माध्यमांनी जनतेपर्यंत सत्य पोहोचवावे - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
संक्रमणावस्थेतून जाणाऱ्या माध्यमांनी जनतेपर्यंत सत्य पोहोचवावे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ठाणे, दि. १० (जिमाका): सध्या मुद्रित, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल अशा विविध प्रकारची माध्यमे संक्रमणावस्थेतून जात असून त्यांनी तत्त्व आणि ध्येय न बदलता जनतेपर्यंत सत्य पोहोचवावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. दैनिक लोकमतच्या ठाणे येथील नूतन कार्यालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years ago
Text
महाराष्ट्र राज्यसभा निवडणूक: महाराष्ट्रात भाजपने तीन जागा जिंकल्या, देवेंद्र फडणवीस म्हणाले - हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे.
महाराष्ट्र राज्यसभा निवडणूक: महाराष्ट्रात भाजपने तीन जागा जिंकल्या, देवेंद्र फडणवीस म्हणाले – हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे.
देवेंद्र फडणवीस. प्रतिमा क्रेडिट स्रोत: (फाइल फोटो) विरोधी भाजपने सत्ताधारी महाविकास आघाडी (MVA) च्या तीन आमदारांवर – कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे – यांच्यावर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केल्यानंतर महाराष्ट्रातील मतमोजणी थांबवण्यात आली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी राज्या��…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years ago
Text
३०० आमदारांच्या घरांचं प्रकरण: “तत्वज्ञान देणारे देवेंद्र फडणवीस आता तोंडात…”; BJP भूमिकेबद्दल उपस्थित केली शंका
३०० आमदारांच्या घरांचं प्रकरण: “तत्वज्ञान देणारे देवेंद्र फडणवीस आता तोंडात…”; BJP भूमिकेबद्दल उपस्थित केली शंका
३०० आमदारांच्या घरांचं प्रकरण: “तत्वज्ञान देणारे देवेंद्र फडणवीस आता तोंडात…”; BJP भूमिकेबद्दल उपस्थित केली शंका आमदारांसाठी मुंबईत घरे देण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घोषणेवरून टीका झाल्याने ही घरे मोफत दिली जाणार नाहीत तर ७० लाख रुपये मोजावे लागतील, अशी सारवासारव गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील आमदारांना तसेच मुंबईत मालकीचे घर असणाऱ्यांना…
View On WordPress
0 notes
chaitanyabharatnews · 5 years ago
Text
महाराष्ट्र : फ्लोर टेस्ट से पहले सीएम देवेंद्र फडणवीस ने राज्यपाल को सौंपा इस्तीफा
Tumblr media
चैतन्य भारत न्यूज मुंबई. महाराष्ट्र के सीएम देवेंद्र फडणवीस ने शपथ लेने के महज तीन दिन बाद ही सीएम पद से इस्तीफा दे दिया है। सुप्रीम कोर्ट ने आज ही बुधवार को फ्लोर टेस्ट का आदेश दिया था, लेकिन उन्होंने उसका इंतजार किए बगैर ही इस्तीफा दे दिया है। (adsbygoogle = window.adsbygoogle || ).push({}); फडणवीस ने मुंबई में एक प्रेस कॉन्फ्रेंस में कहा कि, 'कुछ देर पहले मेरे पास अजित पवार आए और उन्होंने कहा कि कुछ कारणों से मैं आपके गठबंधन का हिस्सा नहीं बन सकता। अजित पवार ने मुझे इस्तीफा दिया। अजित पवार के इस्तीफे के बाद मेरे पास बहुमत नहीं है। इसलिए मैं अभी राज्यपाल को अपना इस्तीफा सौंपने जा रहा हूं।' इसके अलावा फडणवीस ने कहा कि, 'हमें उम्मीद है कि नई सरकार अच्छा काम करेगी। हम विपक्ष के रूप में अपना काम करेंगे।' उन्होंने कहा कि, 'शिवसेना नेता लाचारी में सोनिया गांधी के सामने नतमस्तक हो रहे हैं। तीन पहियों वाली सरकार चलना काफी मुश्किल है। शिवसेना उन वादों को लेकर अड़ गई थी, जिन्हें हमने कभी किया नही��� था।' खबरों के मुताबिक, कांग्रेस के बालासाहेब थोराट डिप्टी सीएम हो सकते हैं। वहीं, एनसीपी के जितेंद्र आव्हाड भी डिप्टी सीएम की रेस में हैं। बताया जा रहा है कि तीनों दलों के दो-दो नेता शपथ लेंगे। कहा जा रहा है कि एनसीपी, शिवसेना और कांग्रेस के नेता आज शाम 7 बजे राज्यपाल से मिलेंगे। ये भी पढ़े... अजित पवार ने दिया डिप्टी सीएम पद से इस्तीफा, फडणवीस की 3:30 बजे प्रेस कॉन्फ्रेंस एक रात में महाराष्ट्र में ऐसे बनी फडणवीस सरकार, पर्दे के पीछे यूं तैयार किया सरकार बनाने का प्लान Read the full article
0 notes
kokannow · 5 years ago
Text
जितेंद्र आव्हाडांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा - देवेंद्र फडणवीस
जितेंद्र आव्हाडांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा – देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यात कोरोनाच्या चिंतेबरोबरच राजकीय वातावरण ही तापल्याचे दिसत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना मंत्रिमंडळातून तात्काळ बडतर्फ करावं, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
सोशल मिडियावर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात पोस्ट लिहिणाऱ्या तरुणाला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण…
View On WordPress
0 notes
navprabhattimes · 5 years ago
Text
महाराष्ट्र में बदली सियासत, राज्यपाल ने कल सुबह 8 बजे बुलाया विधानसभा सत्र
महाराष्ट्र में बदली सियासत, राज्यपाल ने कल सुबह 8 बजे बुलाया विधानसभा सत्र
मुंबई: महाराष्ट्र में फडणवीस सरकार चार दिन बाद ही गिर गई. मंगलवार को देवेंद्र फडणवीस ने सीएम पद से इस्तीफा दे दिया. वहीं, आज शिवसेना-कांग्रेस-एनसीपी के नेता राज्यपाल से मिलने जा रहे है. तीनों दल के नेता कल ही शपथ ग्रहण का दावा पेश करेंगे. सूत्रों का कहना है कि कांग्रेस के बालासाहेब थोरात डिप्टी सीएम बनाए जा सकते हैं. वहीं, एनसीपी के जितेंद्र आव्हाड भी डिप्टी सीएम की रेस में हैं. वहीं, बीजेपी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 5 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 June 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेसासाठीच्या नीट परिक्षेतल्या गैरव्यवहाराच्या मुद्यावरुन विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज बाधित झालं. लोकसभेत कामकाज सुरु होताच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट परिक्षेप्रकरणी चर्चेची मागणी केली. ��ात्र अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुढील कामकाज पुकारल्यानं विरोधकांनी गदारोळ केला. त्यामुळे सदनाचं कामकाज आधी दुपारी १२ वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित झालं.
राज्यसभेतही विरोधकांनी नीट प्रकरणी चर्चेची मागणी लाऊन धरली. काही सदस्यांनी सभापतींच्या आसनासमोर येऊन घोषणाबाजी केल्यानं सभापती जगदीप धनखड यांनी सदनाचं कामकाज १२ वाजेपर्यंत स्थगित केलं होतं. त्यानंतर कामकाज सुरु झाल्यावर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरु झाली.  
****
अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १५ जुलै पर्यंत मदत देऊ असं आश्वासन राज्य सरकारने आज विधानसभेत दिलं. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. अवकाळीमुळे राज्यातल्या दोन लाख ९१ हजाराहून अधिक शेतीचं नुकसान झाल्याची माहिती, मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी दिली. शेतकऱ्यांना नेमकी किती मदत देणार याचा आकडा जाहीर करण्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. त्यावर उपग्रहाद्वारे पाहणी करण्याऱ्या एन डी व्ही आय प्रणालीद्वारे नुकसानीचं मोजमाप होतं, त्यानुसार जिल्हाधिकारी मागणी करतील तेवढा निधी मंजूर केला जाईल, असं आश्वासन पाटील यांनी दिलं.
पुणे पोर्शे काल अपघात प्रकरणी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात निवेदन दिलं. याप्रकरणी दाखल गुन्ह्यांची आणि पुण्यात इतर पब्जवर केलेल्या कारवाईची त्यांनी माहिती दिली. अंमली पदार्थांच्या सुळसुळाटामुळे पुण्याचं नाव खराब होत असून, याप्रकरणी पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. याप्रकरणाल्या दोषी पोलिसांना निलंबित केलं असून, पोलिस आयुक्तांनी अतिशय कार्यक्षमतेने कारवाई केल्याचं सांगत ही मागणी गृहमंत्र्यांनी फेटाळली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आज राज्याचा चालू आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
****
राज्य विधिमंडळ अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी अतिरिक्त अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या भरत गोगावले, संजय गायकवाड यांच्यासह इतर आमदारांनी विधान भवनाच्या पायऱ्यांवर सरकारच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. याला उत्तर म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार रवींद्र धंगेकर, जितेंद्र आव्हाड यांनीही घोषणा देत सरकारचा निषेध केला.
****
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमिन घोटाळ्याप्रकरणी झारखंड उच्च न्यायालयानं जामिन मं��ूर केला आहे. सोरेन यांना सक्तवसुली संचालना��यानं गेल्या ३१ जानेवारीला अटक केली होती.
****
मुसळधार पावसामुळे दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल-एक वर छत कोसळल्यानं एकाचा मृत्यू झाला, तर आठ जण जखमी झाले. आज सकाळी ही घटना घडली. नागरी उड्डयन मंत्री राम मोहन नायडू, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी विमानतळावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेनंतर दिल्ली विमानतळाच्या टर्मिनल एक वर आगमन सेवा सुरु असून, तिथून होणारी उड्डाणे आज दुपारी दोन वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.
****
नीट परीक्षेतल्या गैरव्यवहार प्रकरणी लातूर पोलिस दोन फरार आरोपींच्या शोधात आहेत. इरन्ना कोनगुलवार आणि दिल्लीतून सूत्र हलवणारा गंगाधर यांच्या माध्यमातूनच गुणवाढी संदर्भात आर्थिक व्यवहार केले जात होते अशी माहिती, याप्रकरणी अटकेत असलेला आरोपी संजय जाधव याने चौकशीदरम्यान दिली. त्याचबरोबर प्रवेशपत्र सापडलेल्या विद्यार्थ्यांनी देखील आर्थिक व्यवहार झाल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रं आरोपींच्या मोबाईलमध्ये आढळून आलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांच्या पालकांचीही आता कसून चौकशी केली जात आहे.
****
आषाढी वारीसाठी संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज दुपारी देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. पारंपरिक पद्धतीनं मान्यवरांच्या हस्ते विठ्ठल रखुमाई मंदिरात काकड आरती आणि पूजा पार पडली. काल्याचं कीर्तन झाल्यानंतर प्रस्थान सोहळा सुरू होईल.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहोळा उद्या अलंकापुरीतून पंढरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवणार आहे. त्यासाठी हजारो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत.
****
नांदेड महापालिकेने प्लास्टिक बंदी मोहीमेअंतर्गत काल दोन क्विंटल प्लास्टिक जप्त केलं, तर ६० हजार रुपये दंड वसूल केला. महापालिकेच्या विशेष पथकाने जुना मोंढा परिसरात ही कारवाई केली.
****
टी -ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना उद्या भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान होणार आहे. बर्बाडोस इथं होणारा हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सुरु होईल. 
****
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
अजित पवारांसह नेत्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
राज्य सरकारच्या विविध योजनांचा राज्यात बोजवारा उडाला आहे, असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सादर केलं आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या निवेदनामध्ये…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 11 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 20 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
कोविडच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यांनी खबरदारी घेण्याचे केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे निर्देश
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप;विविध मुद्यांवरून विरोधकांची सरकारवर टीका
कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर
आणि
तुळजाभवानी दागिने गहाळ प्रकरणी चार महंतासह ७ जणांविरोधात गुन्हा दाखल
****
देशात कोविड-19 चे रुग्ण आढळून आल्याने सर्व राज्यांनी खबरदारी घेण्याचे निर्देश केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिले आहेत. विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत मांडवीय यांनी आज उच्चस्तरीय आढावा बैठक घेतली, दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत मांडवीय यांनी आरोग्य सुविधा आणि सेवांविषयीचा आढावा घेतला.
****
दरम्यान, ठाण्यात एका १९ वर्षीय व्यक्तीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. या रुग्णावर ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं आहे.
****
कोविडच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर महापालिकेनं आपल्या सर्व यंत्रणांचा आढावा घेतला असून, आरोग्य विभागाला आवश्यक सूचना केल्या आहेत. मनपा आरोग्य अधिकारी डॉ पारस मंडलेचा यांनी नागरिकांनाही खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं आहे.
मला नागरिकांना सुद्‌धा आवाहन करायचं आहे, की सध्या आपल्याला सर्दी, ताप, खोकला वगैरे हे जर असेल, तर त्यावेळेस तुम्ही ताबडतोब डॉक्टरांना दाखवून घ्या. आपली टेस्टींग करून घ्या. आणि मॉब मध्ये जास्त जाण्याचं जे आहे ते आपण टाळायला पाहिजे. मास्क युज करायला पाहिजे. आणि ज्या काही प्रिकॉशन आपण कोविडमध्ये घेत आलेलो आहोत, त्या प्रिकॉशन घेणं हे गरजेचं आहे.
****
विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज समारोप होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर दिले. गेल्या सरकारच्या कार्यकाळात खालावलेला शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न आपलं सरकार करत असून, त्यासाठी महावाचन अभियान, माझी शाळा सुंदर शाळा अभियान, शिक्षक भरती, आदी प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबवले जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
राज्यात गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर घट झाली असून सायबर क्राईम रोखण्यासाठी आकृतिबंध तयार करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. आतापर्यंत २४ हजार जणांविरोधात अंमली पदार्थ प्रकरणी कारवाई करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, हिवाळी अधिवेशनातला अंतिम आठवडा प्रस्ताव विदर्भाच्या प्रश्नावर करण्याची सदनाची परंपरा आहे, मात्र विरोधी पक्षनेते तसंच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही विदर्भाचे असताना, विरोधकांनी या अधिवेशनात विदर्भाशी संबंधित एकही प्रश्न मांडला नाही, याबद्दल फडणवीस यांनी खेद व्यक्त केला.
****
दरम्यान, अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा करतांना विरोधी पक्षनेते ��िजय वडेट्टीवार, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी सरकारवर टीका केली. राज्यात वाढते गुन्हे रोखण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरली असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. तर जयंत पाटील यांनी ड्रग माफियांचा मुद्दा उपस्थित केला. जितेंद्र आव्हाड आपल्या भाषणातून राज्यात फोडाफोडीचं राजकारण करून परिस्थिती अस्थिर केली जात असल्याचा आरोप केला.
दरम्यान, विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हाताला काळी फीत बांधून निषेध आंदोलन केलं. जनतेच्या कोणत्याही प्रश्नावर सरकारने समाधानकारक उत्तर न दिल्याबद्दल तसंच संसदेत खासदारांचं निलंबन प्रकरणी विरोधी पक्षाच्या आमदारांनी निषेध व्यक्त केला.
****
राज्यातील जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांमध्ये सौर यंत्रणा बसवण्याबाबत गांभीर्याने विचार करण्यात येईल. अशी माहिती ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन दिली. विधानसभेत आज सदस्य संजय सावकारे यांनी यासंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना महाजन बोलत होते.
****
बनावट पदवी प्रमाणपत्रावर वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना शोधून कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचा इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला. आज विधानसभेत सदस्य बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. परदेशात बनावट पदवी प्रमाणपत्र घेतलेले देशातील १२३ विद्यार्थी २०२२-२३ मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाने शोधले, यामध्ये राज्यातील ३ विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं.
****
राजपूत समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम क��ण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली २५ जुलै २०२३ रोजी झालेल्या बैठकीत महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. याअनुषंगाने १५ जानेवारीपूर्वी याबाबत निर्णय घेऊन मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव सादर केला जाईल, असं इतर मागास, बहुजन कल्याण विभागाचे मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितलं.
****
शेगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर जालना आणि बीड जिल्ह्यात पुलांची प्रलंबित कामं एका महिन्यात सुरू करण्याचे निर्देश संबंधित कंत्राटदारांना दिले जाणार असल्याचं राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी सांगितलं. ते विधानसभेत बबनराव लोणीकर यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देत होते. भूसंपादनाअभावी या पुलांची कामे थांबली आहेत. तातडीने भूसंपादन केलं जाईल, त्यानंतर काम सुरू न केल्यास कंत्राटदारांना कारणे दाखवा नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असं देसाई यांनी सांगितलं.
****
साहित्य अकादमीचे वर्ष २०२३ साठीचे पुरस्कार आज जाहीर करण्यात आले. कृष्णात खोत यांच्या रिंगाण कादंबरीला मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार ��िळाला आहे. 'रिंगाण' या कादंबरीत खोत यांनी विस्थापितांच्या जगण्याचं चित्रण केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील दागिने गहाळ प्रकरणी चार महंतासह ७ आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुळजाभवानी मंदिरातील देवीच्या पुरातन दागिन्यांची अनेक वर्षापासून मोजणी झाली नव्हती, ती मोजदाद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते, या मोजदादीमध्ये देवीचे अनेक मौल्यवान अलंकार, तसंच सोने-चांदीच्या वस्तू गहाळ झाल्याचं समोर आलं होतं. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले होते.
****
विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. मेरी कहानी मेरी जुबानी या अंतर्गत अनेक नागरिक आपल्याला मिळालेल्या विविध योजनांच्या लाभांची माहिती दिली. हिंगोलीच्या अनिता डुकरे तसंच अर्चना डुकरे आणि लातूर इथले राजेंद्र गारदी यांनी आपलं मनोगत या शब्दांत व्यक्त केलं.
बाईट - अनिता डुकरे, अर्चना डुकरे, जि.हिंगोली आणि राजेंद्र गारदी, लातूर
****
छत्रपती संभाजीनगर इथं येत्या दोन जानेवारीपासून आयजेएफ महोत्सवाला प्रारंभ होणार आहे. या महोत्सवाचे आयोजक बिलाल जलील यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या महोत्सवात क्रिकेट स्पर्धा, फुटबॉल स्पर्धा, मुशायरा, तसंच फूड फेस्टीवलचं आयोजन करण्यात येणार आहे. मेरा शहर मेरा गुरूर अर्थात माझं शहर माझा अभिमान हे या आयोजनाचं घोषवाक्य आहे. महोत्सवाचं हे दुसरं वर्ष आहे. आमखास मैदानावर होणारा हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे.
****
धाराशिव इथं येत्या २४ ते २६ डिसेंबर दरम्यान सब ज्युनियर गटातील राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून ७५० धनुर्धर सहभागी होणार असल्याची माहिती जिल्हा धनुर्विद्या संघटनेचे अध्यक्ष खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दिली आहे.
धाराशिव इथं पोलिस मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेतून ४ ते १२ जानेवारी दरम्यान छत्तीसगढ़मध्ये रायपूर इथं होणाऱ्या सब ज्यूनियर गटातील राष्ट्रीय धनुर्विधा स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ निवडण्यात येणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 27 July 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ जुलै २०२३ सायंकाळी ६.१०
****
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठरल्यानुसार ४ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार - विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची माहिती.
मैत्री विधेयकाअंतर्गत उद्योगांसाठी एक खिडकी योजना पारदर्शक हवी -  विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांची विधान परिषदेत मागणी.
आयएसआयएसच्या राज्यातल्या कारवायांप्रकरणी आणखी एकाला अटक.
आणि
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची मालिका आजपासून.
****
राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं कामकाज ठरल्यानुसार ४ ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार असल्याचं विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं आहे. आज मुंबईत विधानभवनात कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी उपसभापती गोऱ्हे बोलत होत्या. दरम्यान, मुंबईत आझाद मैदानात गिरणी कामगारांचं आंदोलन सुरू आहे. त्याबाबत विधिमंडळात बैठक आयोजित करण्यात यावी अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी या बैठकीत केली.
****
राज्यात उद्योगधं��्यांच्या वाढीस चालना मिळावी यासाठी मैत्री विधेयकाअंतर्गत उद्योगांसाठी एक खिडकी योजना पारदर्शक असावी, अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केली. ते परिषद सभागृहात उद्योग विभागानं मांडलेल्या मैत्री विधेयकावर बोलत होते. इतर राज्यांप्रमाणे आपल्या राज्यात उद्योगांना जास्तीतजास्त सवलती देण्यात याव्यात, असं दानवे म्हणाले. अन्य राज्यांत उद्योगांना लागणाऱ्या परवानग्या २४ तासांत दिल्या जातात. आपल्या राज्यात उद्योजकांना यासाठी आठ महिन्यांपर्यंत थांबावं लागतं, अशी टीका त्यांनी केली. उद्योजकांना परवानग्या काढण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, अधिकारी त्यांना फेऱ्या मारायला लावतात, असा आरोप त्यांनी केला. तेलंगणा, गुजरात, राजस्थान आदी राज्यांत कशाप्रकारे उद्योगांना पोषक वातावरण दिलं जातं, त्याचा आदर्श आपल्या राज्यानं घेण्याची आवश्यकता असल्याचं दानवे यांनी नमुद केलं. राज्यात उद्योगांना वीज अतिशय महागड्या दरानं दिली जाते. आपल्या राज्यातल्या मराठी उद्योजकांवर राज्यात अन्याय होत असल्यानं उद्योग अन्य राज्यात नेले जात असल्याची टीकाही दानवे यांनी केली.
****
राज्यात सर्पदंशावरच्या औषधांचा काळाबाजार होत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केला आहे. रायगडच्या पेण इथल्या उपजिल्हा रुग्णालयात सर्पदंशावरचं औषध उपलब्ध नसल्यामुळं बारा वर्षीय सारा ठाकूर या मुलीचा मृत्यू झाला, हा सरकारी अनास्थेचा बळी असल्याची टीका त्यांनी केली. सर्पदंशावरचं औषध उपजिल्हा रुग्णालयात ठेवणं सक्तीचं असतानाही, पेनच्या रूग्णालयात ते का उपलब्ध नव्हतं याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी यावेळी केली. तसंच यात बेजबाबदार आणि बेफिकीर आरोग्य अधिकाऱ्यांवर तातडीनं कारवाई झाल्याशिवाय सभागृहाचं कामकाज पुढं चालवू नये, अशी मागणी थोरात यांनी यावेळी केली.
****
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्या विरुद्ध कडक कारवाई करणार असून या प्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. ज्या ट्विटर हॅंडलवरुन हा बदनामीकारक मजकूर प्रसारित झाला, त्याच्या चालकाची माहिती मिळण्यासंदर्भात ट्विटर इंडियाशी तीन वेळा पत्रव्यवहार करण्यात आला असून संबंधिताची माहिती मिळताच त्याला अटक करण्यात येईल, असं फडणवीस म्हणाले.
****
राष्ट्रीय अन्वेषण संस्था- एनआयएनं दहशतवादी संघटना आयएसआयएसच्या राज्यातल्या कारवायांप्रकरणी आज आणखी एकाला अटक केली आहे. या प्रकरणी राज्यातून अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता पाच झाली आहे. प्रतिबंधित दहशतवादी संघटनेच्या हिंसक कारवायांना प्रोत्साहन दिल्या प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. पुण्यातल्या कोंढवा इथं छापा टाकून डॉ. अदनान अली सरकार या ४३ वर्षीय आरोपीला त्याच्या निवासस्थानी अटक करण्यात आली आहे. त्याच्या घराच्या झडतीदरम्यान इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आणि आयएसआयएसशी संबंधित अनेक दस्तऐवज यांसारखी अनेक अपराधी सामग्री जप्त करण्यात आली आहे. त्यावरुन त्याचे या दहशतवादी संघटनेशी असलेले संबंध आणि तरुणांना फसवून भरती करत दहशतवादी संघटनेच्या हिंसक कार्यक्रमाला चालना देण्यातली त्याची भूमिका स्पष्ट झाल्याचं संस्थेनं म्हटलं आहे. हा आरोपी आयएसआयएसच्या कटाचा भाग म्हणून देशाच्या सरकारच्या विरोधात युद्ध पुकारात होता, असंही एनआयएतर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी नदी, तलावांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. हवामान विभागानं पुढचे दोन दिवस नांदेड तसंच ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांसाठी नारंगी बावटा फडकवला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या जिल्ह्यांसाठी हवामान विभागानं लाल बावटा फडकवला आहे. त्यामुळं या भागात अती मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. गडचिरोली जिल्हृयाच्या सर्व भागात आज दुपारीही मुसळधार पाऊस कोसळला. सिरोंचा तालुक्यातल्या प्राणहिता आणि गोदावरी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळं जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी सिरोंचा तालुक्यातल्या सर्व शैक्षणिक संस्थांना उद्या आणि परवा सुटी जाहीर केली आहे.
****
भारतीय डाळिंबाच्या दाण्यामध्ये फळ माशीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं २०१८ पासून अमेरिकेनं इथल्या डाळिंबाच्या निर्यातीवर बंदी आणली होती. त्यानंतर केंद्र सरकार आणि प्लांट कॉरंटाईन इंडिया यांनी अमेरिकेच्या कृषी विभागाशी चर्चा करून २०२२ पासून ही निर्यात बंदी उठली आहे. ती उठल्यानंतर आज प्रथमच प्रायोगिक तत्त्वावर डाळिंबाची ४५० खोकी म्हणजे १५० किलो डाळिंब विमानानं अमेरिकेतल्या न्यूयॉर्क इथं पाठवण्यात आलं. कृषी आणि प्रक्रिया केलेले अन्न उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या सरव्यवस्थापक विनिता सुधांशू यांनी या गाडीला हिरवा झेंडा दाखवला. या निर्यातीनंतर अमेरिकेतली डाळिंबाची मोठी बाजारपेठ भारतासाठी खुली होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
****
राज्यात १४ हजार कृषी समृद्धी केंद्रांतून शेतकऱ्यांना सर्व सुविधा मिळणार असल्याचं भारताय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजस्थानातील सीकर इथं झालेल्या कृषी केंद्रांच्या लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्��ेपण आज नाशिक कांदा-बटाटा भवनमध्ये करण्यात आलं. यानिमित्तानं नाशिकमध्ये बावनकुळे यांच्या उपस्थितीत कृषी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांची विविध कारणांनी होणारी फसवणूक टाळण्यासाठी हे केंद्र सर्वोत्तम पर्याय ठरणार असल्याचंही ते यावेळी म्हणाले.
****
अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातल्या वडगावच्या आदिवासी एकलव्य मॉडेल रेसिडेन्सी शाळेत आज सकाळी २६ विद्यार्थ्यांना अल्पोपहारातून विषबाधा झाली. या शाळेत ४०० विद्यार्थी शिक्षण घेतात. सकाळी अल्पोपहार झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि अतिसाराचा त्रास होऊ लागला. त्यामुळं त्यांना तात्काळ अचलपूर इथल्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.
****
भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना आज बार्बाडोस इथं खेळला जाणार असून, भारतीय वेळेनुसार संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेतला दुसरा सामना याच मैदानावर शनिवारी होणार आहे. मालिकेतला तिसरा आणि शेवटचा सामना येत्या एक ऑगस्ट रोजी त्रिनीदाद इथं होईल.
****
उस्मानाबाद इथं आज ‘बेटी बचाव बेटी पढाव’ या कार्यक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातर्फे गर्भधारणापूर्व आणि प्रसुतीपूर्व लिंगनिदान कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तसंच वरिष्ठस्तर न्यायाधीश वसंत यादव यांनी यावेळी गर्भलिंग निदान किंवा स्त्री भ्रूणाचे गर्भपात होत असेल तर याबाबत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण इथं संपर्क करुन माहिती देण्याचं आवाहन केलं. जिल्हा डाँक्टर संघटना आणि औषध प्रशासन अधिकाऱ्यांनी या संदर्भात कठोर पावलं उचलून कायद्याची कडक अंमलबजावणी करावी असंही ते म्हणाले.
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी औरंगाबाद इथल्या केंद्रीय विद्यालयात विविध शैक्षणिक उपक्रम राबवले जात असल्याचं विद्यालयाचे प्राचार्य अनिल यादव यांनी आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत सांगितलं. केंद्रीय विद्यालयात पी एम श्री, विद्या प्रवेश, बालवाटिका, निपूण भारत, परख, कौशल्य विकास, पी एम इ विद्या आणि विद्यांजली पोर्टल या शैक्षणिक उपक्रमांचा समावेश आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ मे २०२३ सायंकाळी ६.१०
****
खासदार शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीची घोषणा; पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा या निर्णयाला तीव्र विरोध; तर हा पक्षांतर्गत निर्णय असल्याची अन्य पक्षांची भूमिका.
राज्यात निवडणुका झाल्या तर विरोधकांना सपशेल पराभूत करू - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा.
खारघरसह विविध मुद्यांवर विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची काँग्रेस पक्षाची मागणी.
आणि
प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालयासोबत परिचर्या महाविद्यालय देण्याचा राज्य सरकारचा विचार.
****
खासदार शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. लोक माझे सांगाती, या पवार यांच्या राजकीय आत्मचरित्राच्या नव्या आवृत्तीचं आज मुंबईत प्रकाशन झालं, या समा��ंभात शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय अचानक जाहीर केला –
एक मे एकोणीसशे साठ ते एक मे दोन हजार ते��ीस इतक्या प्रदीर्घ काळाच्या नंतर कुठतंरी थांबायचा  विचार सुद्‌धा केला पाहिजे. माणसाला अधिक मोह असू नये. आणि त्यामुळे तुम्हाला अस्वस्थता कदाचित वाटेल पण मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त व्हायचा निर्णय आज घेतलेला आहे.
पवार यांच्या या निर्णयामुळे उपस्थितांसह पक्षाचे पदाधिकारी, नेते तसंच कार्यकर्त्यांना धक्का बसला. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी हा निर्णय परत घेण्याचा आग्रह केला. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेकांना यावेळी भावना अनावर झाल्या. पवार यांच्याशिवाय राजकीय जीवन व्यर्थ असल्याची भावना सुनील तटकरे यांनी व्यक्त केली. ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपल्या भावना व्यक्त करताना, पक्षाची फेररचना करायची असल्यास आम्ही सगळे जण तयार आहोत, पण शरद पवार यांनी अध्यक्षपदी रहावं, असा आग्रह केला.
अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना पवार यांच्या निर्णयामागची भूमिका समजावण्याचा प्रयत्न केला. वाढत्या वयामुळे त्यांनी हा निर्णय घेतला असून, ते फक्त अध्यक्षपदावरून दूर होत आहेत, असं सांगताना, अजित पवार यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांचा दाखला दिला. पवार यांचं मार्गदर्शन आपल्याला कायम मिळत राहील, त्यांच्या मार्गदर्शनात नवीन अध्यक्ष तयार झाला, तर हरकत काय, असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला. ते म्हणाले –
काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात. आणि साहेबांच्या डोळ्यादेखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको रे? मला काही कळत नाही तुमचं. उद्याच्याला नवीन अध्यक्ष झाल्यानंतर साहेब त्या अध्यक्षाला जे काही बारकावे असतात राजकारणातले ते त्या ठिकाणी सांगतील ना. साहेब महाराष्ट्रामध्ये फिरणारच आहेत. साहेब देशामध्ये फिरणारच आहेत. ते वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातनं पवार साहेबांचं मार्गदर्शन आपल्याला सगळ्यांना होणारच आहे. नवीन होणारा अध्यक्ष, नवीन होणारी कार्यकारीणी, बाकीचे सगळे सहकारी, साहेबांशी चर्चा करूनच पुढचा निर्णय घेणार आहेत. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात भावनिक होण्याचं काही कारण नाही.
मात्र, अजित पवार यांच्या या सांगण्याला जवळपास सगळ्याच नेत्यांनी तसंच पदाधिकाऱ्यांनी विरोध करत शरद पवार यांनी तहहयात पक्षाच्या अध्यक्षपदी रहावं, असा आग्रह सुरूच ठेवला. शरद पवार यांनी निर्णय मागे घेईपर्यंत सभागृहातच उपोषणाला बसण्याची घोषणा कार्यकर्त्यांनी केली. यावर अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यासोबत पुन्हा चर्चा करण्याचं आश्वासन दिलं, त्यानंतर शरद पवार यांनी आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानाकडे प्रस्थान केलं.
दरम्यान, सध्या सिल्व्हर ओकवर पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक सुरू आहे. पवार यांनी कार्याध्यक्ष नियुक्त करून, पक्षाच्या कामकाजाची जबाबदारी त्यांच��याकडे सोपवावी, मात्र अध्यक्षपदी शरद पवार यांनीच कायम राहावं, असा प्रस्ताव अनेक नेत्यांनी या बैठकीत दिल्याचं वृत्त आहे. पवार यांनी आपल्या निर्णयावर विचार करण्यासाठी काही दिवसांची मुदत मागितल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे. धाराशिव, बुलडाणा इथल्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिल्याचं वृत्त आहे, हे राजीनामा सत्र तत्काळ थांबवण्याची सूचना शरद पवार यांनी केल्याचं, अजित पवार यांनी सांगितलं.
****
दरम्यान, पवारांचा अध्यक्षपदावरून दूर होण्याचा निर्णय हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत निर्णय असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीसह अनेक पक्षांच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याबाबत बोलताना शरद पवार हे फक्त अध्यक्षपदावरून दूर होत आहेत, त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतलेली नाही, याकडे लक्ष वेधलं.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी यासंदर्भात बोलताना, देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पवार यांनी अध्यक्षपदावरून बाजूला होणं योग्य नसल्याचं मत व्यक्त केलं.
दरम्यान, शरद पवार यांचा हा वैयक्तिक निर्णय असून, ही त्यांच्या पक्षाची अंतर्गत बाब आहे. या क्षणाला त्यावर बोलणं योग्य नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि योग्यवेळी त्यावर बोलू, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, राज्यात निवडणुका झाल्या तर विरोधकांना सपशेल पराभूत करू, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. ते आज गडचिरोली इथे माध्यमांशी बोलत होते. हिंमत असेल तर निवडणुका घेऊन दाखवा, असं आव्हान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतंच दिलं आहे, त्यासंदर्भातल्या प्रश्नाला फडणवीस यांनी हे उत्तर दिलं. बारसू शुद्धीकरण प्रकल्पाबाबत विरोधक दुटप्पीपणानं वागत असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन सरकारला कोंडीत पकडण्याचा विरोधकांचा डाव आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.
****
महाराष्ट्र भूषण पुरस्कार कार्यक्रमाच्यावेळी खारघर इथे झालेली दुर्घटना, अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची गरज, स्थानिकांचा विरोध असलेला बारसू प्रकल्प, या सगळ्या मुद्यांवर विधीमंडळाचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी काँग्रेस पक्षाने राज्यपालांकडे केली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या शिष्टमंडळानं राज्यपाल रमेश बैस यांची आज राजभवनात भेट घेतली, त्यानंतर पटोले माध्यमांशी बोलत होते. सरकारच्या महसूल आणि कृषी विभागाकडे असलेल्या पीकपेऱ्याच्या माहितीच्या आधारे सरकारनं नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, पंचनाम्यांसाठी थांबू नये, असं पटोले यावेळी म्हणाले.
****
प्रत्येक जिल्ह्याला वैद्यकीय महाविद्यालयासोबत परिचर्या महाविद्यालय देण्याबाबत गांभीर्यानं विचार करत असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तसंच नांदेडचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालया��ल्या दोन अद्ययावत हृदयरोग अतिदक्षता कक्षांच्या उद्घाटन समारंभात ते आज बोलत होते. वैद्यकीय क्षेत्राच्या मनुष्यबळाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी शासनानं धोरणात्मक निर्णय घेतला असून येत्या दीड महिन्यात सुमारे पाच हजार कर्मचारी नियुक्त केले जातील, असंही महाजन यांनी यावेळी सांगितलं.
****
लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी आवश्यक असलेली जमीन कृषी विभागाकडून दिली जाईल, असं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितलं आहे. लातूर इथं कृषी महाविद्यालयाच्या, अनुसूचित जातींच्या मुलींसाठी बांधण्यात आलेल्या वसतीगृहाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते. या रुग्णालयासाठीच्या दहा एकर जमिनीची मागणी कृषी विद्यापीठाकडे प्रलंबित असल्याची माहिती जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांनी सत्तार यांना दिली, त्यानंतर कृषीमंत्र्यांनी ही घोषणा केली. कोविड साथीमुळे दोन वर्षं रद्द झालेली सोयाबिन परिषद येत्या चौदा ऑगस्टला लातूरमध्ये होणार असल्याचं कृषीमंत्र्यांनी सांगितलं. लातूरच्या कृषी महाविद्यालयासाठी यावर्षी पन्नास कोटी रुपयांचा निधी दिल्याची, तसंच मुलींच्या आणि मुलांच्या अजून प्रत्येकी एका वसतीगृहाला मंजुरी दिल्याची माहितीही सत्तार यांनी यावेळी दिली.
****
छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिका आयुक्तपदी जी.श्रीकांत यांची नेमणूक झाली आहे. जी.श्रीकांत हे २००९ च्या आयएएस तुकडीचे अधिकारी असून या नियुक्तीपूर्वी ते छत्रपती संभाजीनगर इथं राज्य कर विभागाच्या सह आयुक्त पदावर कार्यरत होते.
****
आजपासून येत्या पाच तारखेपर्यंत मराठवाड्याच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्रानं वर्तवला आहे. यातच, आज म्हणजे दोन मे आणि परवा, म्हणजे चार मे ला, नांदेड आणि लातूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यताही हवामान केंद्रानं वर्तवली आहे
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 23 April 2023
Time : 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २३ एप्रिल  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या
वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारची महाराष्ट्रासह आठ राज्यांना कोविड सज्जता वाढवण्याची सूचना,  राज्य सरकारनं निवृत्त आरोग्य महासंचालक डॉक्टर सुभाष साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलं नवीन कृती दल
नेत्यांनी संवेदनशीलपणे विधानं करण्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन
येत्या खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध - कृषी आयुक्त सुनील चव्हाण
अक्षय्य तृतीया, भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर जयंती तसंच रमजान ईदचा सण देशभरात उत्साहात साजरा
वीज यंत्रणेजवळ कचरा न जाळण्याचं महावितरणचं आवाहन
जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारताला दोन सुवर्ण पदकं
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्जचा प्र��िस्पर्ध्यांवर विजय
सविस्तर बातम्या
देशात वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं महाराष्ट्रासह आठ राज्यांना कोविड सज्जता वाढवण्याची सूचना केली आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रासह दिल्ली, तामिळनाडू, उत्तरप्रदेश, हरियाणा, कर्नाटक, केरळ आणि राजस्थान या राज्यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. कोविड विषयक देखरेखीबद्दल सावध राहून व्यवस्था अधिक बळकट करावी, चाचणी, उपचार, बाधितांच्या संपर्कातल्या व्यक्तींचा शोध, लसीकरण आणि मास्कचा वापर याकडे लक्ष देण्याची सूचना भूषण यांनी या पत्��ातून केली आहे.
****
सार्वजनिक आरोग्य विभागानं कोरोना विषाणु संसर्गावर काम करण्यासाठी नव्या कृती दलाची स्थापना केली असून निवृत्त आरोग्य महासंचालक डॉक्टर सुभाष साळुंके यांची या कृती दलाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी प्रमुख डॉक्टर रमण गंगाखेडकर, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर,  डॉक्टर बिशन स्वरुप गर्ग, यांच्यासह ८ जणांची या कृती दलाचे सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
****
राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचे संकेत रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे यांनी दिले आहेत. ते काल नंदूरबार इथं पत्रकारांशी बोलत होते. राज्यात कुठल्याही खात्याचं काम अडून राहिलेलं नाही असंही भुमरे यांनी म्हटलं आहे. दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर भुमरे यांनी टीका केली. राऊत यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन पुन्हा निवडून यावं, असं आव्हान भुमरे यांनी दिलं. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची पक्षात घुसमट होत असून, एक दिवस त्याचा विस्फोट होईल, असंही मंत्री भुमरे यांनी म्हटलं आहे.
****
मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय मुख्यमंत्र्यांना यंदा आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलाची महापूजा करू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चानं दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र त्यांनी निराशा केल्याचं मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विरोधकांनी कितीही टीका केली तरी आपण अविचलपणे जनतेसाठी काम करीत राहू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ठाणे इथल्या जिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचं उद्घाटन काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ठाणे जिल्हा रुग्णालयात सुपरस्पेशॅलिटी सुविधा उपलब्ध झाल्या आहेत, मात्र रुग्णांना तातडीने इतरत्र नेण्याची गरज पडल्यास हवाई रुग्णवाहिकेची सोयही उपलब्ध होणार असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नेत्यांनी संवेदनशीलपणे विधानं करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री तसंच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र ��व्हाड यांच्या विधानावर बोलत होते. धर्माचं राजकारण केल्यानं भविष्यात राज्यात दंगली होतील, असं आव्हाड यांनी म्हटलं होतं. त्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले…
Byte…
महाराष्ट्रामध्ये भविष्यात दंगली होतील असं वक्तव्य करणं याचा अर्थ नेमका काय घ्यायचा? म्हणजे तुम्ही असं ठरवलंय का की दंगली घडवायच्या?  असा त्याचा अर्थ आहे का? असाही प्रश्न आमच्यासमोर याठिकाणी उपस्थित होतो. मला असं वाटतंय की किमान नेत्यांनी अशा प्रकरणांमध्ये सेन्सिटीव्हली वागलं पाहिजे आणि सेन्सिटीव्हली बोललं पाहिजे. सनसनाटी प्रत्येक ठिकाणी निर्माण करणं योग्य नाही.
****
येत्या खरीप हंगामासाठी राज्यात खतांचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचं, कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी सांगितलं आहे. ते काल पुणे इथं बोलत होते. मृगाचा पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मागणी वाढत असते, त्या पार्श्वभूमीवर खतांचं नियोजन एप्रिलपासून सुरु करण्यात आल्याचं चव्हाण यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना आपल्या जिल्ह्यासाठी माती तपासणी अहवालाप्रमाणे पिकनिहाय खतांचं प्रमाण, त्यांची उपलब्धता आणि त्यासाठीचा खर्च याबाबत माहिती देणारं ‘कृषिक ॲप’ कृषी विभागानं तयार केल्याची माहिती कृषि आयुक्त चव्हाण यांनी दिली. शेतकऱ्यांनी माती तपासणी अहवालानुसार खतांचा समतोल वापर करावा, अतिरिक्त खत वापरामुळे होणारा अतिरिक्त खर्च, घटणारं पिक उत्पादन अशा समस्यांवर मात करावी असं आवाहन चव्हाण यांनी केलं.
****
राज्यात ज्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सात-बारा उताऱ्यावर ई-पीक पेऱ्यांची नोंद झालेली नाही अशा ठिकाणी कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्राची शहानिशा करण्यासाठी संबंधित  जिल्हाधिकाऱ्यांनी गावपातळीवर संबंधीत गावचे तलाठी, कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवक यांची समिती गठित करावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
या समितीनं कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्राची पाहणी करून, याबाबत शंका असल्यास आजूबाजूच्या लोकांशी चर्चा करून सत्यता पडताळून शहानिशा करावी आणि  सात - बारा उताऱ्यावर  त्याची नोंद करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. प्रमाणित केलेले सात - बारा उतारे कांदा अनुदानासाठी ग्राह्य धरण्यात येतील. समितीनं आपला अहवाल सात दिवसांत सादर करायचा आहे.
****
‘उडान अर्थात उडे देश का आम नागरिक' या योजनेच्या पाचव्या टप्प्याला काल सुरुवात झाली. विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उडानच्या माध्यमातून देशातील दुर्गम आणि प्रादेशिक भागांशी हवाई संपर्क सुविधा अधिक वा��वणं आणि अगदी अखेरच्या टोकापर्यंत हवाई संपर्क सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. नजीकच्या भविष्यात एक हजार नवे मार्ग, पन्नास अतिरिक्त विमानतळं, हे��ीकॉप्टर स्थानकं आणि पाण्यावरील विमान उड्डाण व्यवस्था कार्यान्वित करण्याचं लक्ष्य साध्य होईल असं शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
****
राज्य तुरुंग विभागानं नवीन धोरण जाहीर केलं आहे. त्यानुसार महिला आणि पुरुष कच्चे कैदी तसंच शिक्षा झालेल्या महिला कैदी, त्यांच्या मुलांना, तसच नातवंडं, भाऊ, बहिण यांना भेटू शकणार आहेत. कैद्यांना त्यांच्या कुटुंबीयांनी स्वीकारावं आणि समान वागणूक द्यावी, या उद्दशानं हे धोरण तयार करण्यात आलं असल्याची माहिती, तुरुंग अतिरिक्त महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिली.
****
देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी एक चार पाच सहा सात या क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या या नि:शुल्क मदतवाहिनीच्या माध्यमातून निवृत्तीवेतन, ज्येष्ठ नागरिक योजना, कायदेशीर समस्या, बेघर आणि वृद्धांवरील अत्याचार आदी बाबींची माहिती तसंच मदत देण्यात येते
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आकाशवाणीवरच्या ‘मन की बात या कार्यक्रमाचा शंभरावा भाग येत्या रविवारी, ३० एप्रिलला प्रसारित होणार आहे. सकाळी ११ वाजता आकाशवाणी तसंच दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून हा भाग प्रसारित केला जाईल. दरम्यान, या शंभराव्या भागानिमित्त केंद्र सरकारने शंभर रुपयांचं विशेष नाणं जारी करण्याचा निर्णय घेतला आहे.
****
विविध क्षेत्रातल्या नवीन दृष्टीकोन आणि तंत्रज्ञानाची आवड असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ पाठ्यवृत्ती अर्थात फेलोशिप उपक्रम राबवणार आहे. राज्याचा पर्यटन विकास साधणं हा याचा मुख्य उद्देश आहे. या फेलोशिपसाठी तरुणांनी १५ मे पर्यंत अर्ज करावेत असं आवाहन महामंडळानं केलं आहे. २१ ते २६ वर्ष वय असलेल्या आणि कोणत्याही शाखेतली प्रथम श्रेणी प्राप्त पदवीधारक तरुणांना अर्ज करता येणार आहेत. gm@maharashtra tourism.gov.in आणि dgm@maharashtra tourism.gov.in या संकेतस्थळावर हे अर्ज करता येतील.
****
साडेतीन शुभ मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेचा सण , भगवान परशुराम आणि महात्मा बसवेश्वर यांची जयंती तसंच ईद-उल-फित्र अर्थात रमजान ईदचा सण काल देशभरात साजरा झाला. उत्तराखंडातल्या प्रसिद्ध चार धाम तीर्थक्षेत्र यात्रेला कालपासून प्रारंभ झाला. उत्तराखंडमधील, गंगोत्री आणि यमुनोत्री धाम इथल्या मंदिरांचे दरवाजे काल दुपारच्या सुमारास दर्शनासाठी विधीवत उघडण्यात ��ले. केदारनाथ धाम इथलं मंदिर २५ एप्रिलला आणि बद्रीनाथ धाम इथलं मंदिर २७ एप्रिल रोजी दर्शनासाठी खुलं करण्यात येईल. पुढच्या सहा महिन्यांपर्यंत नेहमीप्रमाणे या चारही ठिकाणी भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगरमध्ये भगवान परशुराम जन्मोत्सवानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आलं, ब्राम्हण समाज समन्वय समितीच्या वतीनं भव्य शोभायात्रा आणि मिरवणुक काढण्यात आली तर  महात्मा बसवेश्वर जिल्हा महोत्सव समिती आणि अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेतर्फे शहरात मोटारसायकल रॅली काढण्यात आली. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. लातूर इथं शहरातून शोभायात्रा काढण्यात आली.
****
ईद-उल-फित्रच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर इथं छावणी परिसरातील ईदगाह मैदानावर हजारो नागरिकांनी मुख्य नमाज पठण केली. खासदार इम्तियाज जलील, यांच्यासह अनेक मान्यवरांनी यावेळी मुस्लीम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. सणा सुदीच्या पार्श्वभुमीवर शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांनी दिली आहे.
****
जालना शहरासह जिल्ह्यात रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली. जालना शहरात मुस्लीम समाजबांधवांनी सकाळी कदीम जालना आणि सदर बाजार ईदगाह मैदानावर सामुहिक नमाज अदा केल्यानंतर एकमेकांना ईद ऊल फित्रच्या शुभेच्छा दिल्या.
****
वीज यंत्रणेजवळ कचरा न जाळण्याचं आवाहन महावितरणनं केलं आहे. वीज वाहिन्या, रोहित्र, वीज वितरण पेट्या किंवा फीडर फिल्डरच्या जवळ कचरा जाळल्यामुळे किंवा वाढत्या तापमानामुळे कचऱ्याला आग लागल्यामुळे विजेच्या भूमिगत तारा आणि इतर वीज यंत्रणा नादुरुस्त झाल्याच्या घटना समोर येत आहेत. या आगींमुळे महावितरणच्या नुकसानीसोबतच ग्राहकांना वीज पुरवठा अनियमित होतो आहे.  अशा घटनातून वीज यंत्रणेला आग लागल्याचं आढळल्यास एक नऊ एक दोन किंवा १८००-२१२-३४३५ या नि:शुल्क क्रमांकावर किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयाला माहिती द्यावी असं आवाहन महावितरणनं केलं आहे.
****
बीड जिल्ह्यात ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी १२ वसतीगृहं सुरू करण्यात आली आहेत. बीडचे अप्पर जिल्हाधिकारी उत्तम पाटील यांनी ही माहिती दिली, ते काल मानकुरवाडी इथं ऊस तोडणी कामगारांना ओळख पत्र वाटप कार्यक्रमात बोलत होते. मानकुरवाडी परिसरातील ऊसतोड कामगारांची लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळांतर्गत शंभर टक्के नोंद करण्यात आली आहे. या महामंडळांतर्गत असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती यावेळी अप्पर जिल्हाधिकारी पाटील यांनी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं गेले तीन दिवस सुरू असलेल्या शेक्सपिअर महोत्सवाचा आज समारोप होत आहे. काल या महोत्सवात शेक्सपियर यांच्या साह��त्यकृतींवर आधारित शेक्सपियर दर्शन हा कार्यक्रम झाला. आज प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांच्या कवितांवर आधारित आम्ही काबाडाचे धनी या काव्यगायनानं या महोत्सवाचा समारोप होणार आहे.
****
जागतिक ग्रंथ दिन आज साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं मराठी प्रकाशक पुणे यांच्या वतीनं मराठवाडा साहित्य परिषदेच्या ना. गो नांदापूरकर सभागृहात संध्याकाळी सहा वाजता कार्यक्रम होणार आहे. यावेळी मराठी साहित्याची विद्यमान अवस्था या विषयावर विचारवंत डॉ.ऋषिकेश कांबळे , भाष्य करणार आहेत. प्रकाशन परिषदेचे कार्यवाह अरविंद पाटकर हे ग्रंथव्यवहारासंबंधी विचार मांडणार आहेत.
****
तुर्की इथं झालेल्या प्रथम स्तर जागतिक धनुर्विद्या स्पर्धेत भारतानं दोन सुवर्ण पदकं पटकावली आहेत. ज्योती वेन्नम आणि ओजस देवतळे या जोडीनं मिश्र दुहेरीत चिनी तैपेई जोडीचा १५९ विरुद्ध १५४ गुणांनी पराभव करत सुवर्ण पदक जिंकलं. ज्योतीने महिलांच्या कंपाउंड प्रकारात कोलंबियाच्या प्रतिस्पर्धीवर १४९ विरुद्ध १४६ अशी मात करत सुवर्ण पदक पटकावलं.
****
इंडियन प्रीमिअर लीग- आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल गुजरात टायटन्सनं लखनऊ सुपर जायन्टसवर ७ धावांनी विजय मिळवला. गुजरात टायटन्सनं २० षटकात ६ गडी गमावत १३५ धावा केल्या, प्रत्युत्तरादाखल लखनऊ सुपर जायन्टस संघ मात्र २० षटकांत सात गड्याच्या बदल्यात केवळ १२८ धावा करू शकला.
या स्पर्धेतल्या अन्य सामन्यात पंजाब किंग्जनं मुंबई इंडियन्स संघावर १३ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत पंजाब किंग्जनं २१५ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करणारा मुंबई इंडियन्सचा संघ निर्धारित २० षटकात ६ गडी गमावत २०१ धावाच करु शकला.
****
0 notes