#जिंकणारी
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अंतिम लढतीस अपात्र ठरवल्याबद्दल भारतीय ऑलिम्पिक संघाकडून तीव्र निषेध;सर्व शक्यतांची पडताळणी करण्याचे पंतप्रधानांचे निर्देश
कृषीपूरक व्यवसायांसाठी कमी व्याजदरात कमी मुदतीची कर्ज उपलब्ध करून देण्याची रिझर्व्ह बँकेची इतर बँकांना सूचना
राज्यातल्या जलप्रकल्पांची क्षमतावाढ करण्याची गरज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून व्यक्त
आणि
तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेचं भारतासमोर विजयासाठी २४९ धावांचं आव्हान
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट हिला अपात्र ठरवल्याबद्दल भारतीय ऑलिम्पिक संघाने आंतरराष्ट्रीय कुस्तीसंघाकडे तीव्र निषेध नोंदवला आहे. केंद्रीय क्रीडामंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत याबाबत केलेल्या निवेदनात ही माहिती दिली. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक संघाच्या अध्यक्ष पी टी उषा यांना योग्य कार्यवाही करण्याचे तसंच सर्व शक्यता पडताळून पाहण्याचे निर्देश दिले असल्याचं, मांडवीय यांनी सांगितलं. विनेश फोगाट यांना या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कुस्ती प्रशिक्षण तसंच इतर व्यवस्थापनाकरता केंद्र सरकारकडून आतापर्यंत करण्यात आलेल्या आर्थिक मदतीचं विवरणही क्रीडामंत्र्यांनी सदनासमोर सादर केलं.
या मुद्यावरुन आज लोकसभेत विरोधकांनी गदारोळ केला. यासंदर्भात क्रीडामंत्र्यांनी जबाब देण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती.
दरम्यान, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनेश प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रपतींनी या स्पर्धेत विनेशच्या आतापर्यंतच्या कामगिरीचं कौतु�� करत, भावी विश्वविजेत्यांसाठी ती प्रेरणा ठरेल, सध्याच्या प्रसंगात सगळा देश तिच्यासोबत असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधानांनी ट्वीटरवरच्या संदेशातून विनेशला धीर देत, ती विजेत्यांमधली विजेती असल्याचं म्हटलं आहे. या परिस्थितीवर मात करून विनेश दमदार पुनरागमन करेल, असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे.
ऑलिम्पिकच्या कुस्ती प्रकारात ५० किलो वजनी गटात विनेश फोगाट आज रात्री सुवर्णपदकासाठीची कुस्ती खेळणार होती. मात्र आज सकाळी तिचं वजन काही ग्रॅम जास्त भरल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आलं.
दरम्यान कुस्तीच्या ५३ किलो वजन गटात आज भारताच्या अंतिम पंगालचं आव्हान संपुष्टात आलं. महिलांच्या सांघिक टेबल टेनिस स्पर्धेत आज मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत यांच्या संघाचा उपांत्यपूर्व फेरीत जर्मनीच्या संघाने पराभव केला.
****
ॲथलेटिक्स मध्ये उंच उडी, ट्रिपल जंप या प्रकारातल्या पहिल्या फेरीत भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. तर तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीच्या अंतिम फेरीत अविनाश साबळे सहभागी होणार आहे. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री दीड वाजेनंतर ही शर्यत होईल. भारोत्तोलनात महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाई चानू सहभागी होणार आहे.
****
दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत नेमबाजीत दोन कांस्य पदकं जिंकणारी नेमबाज मनु भाकर आणि एक कांस्यपदक पटकावणारा महाराष्ट्राचा स्वप्नील कुसाळे आज स्वदेशी परतले. आज सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर युवा आणि क्रीडा मंत्रालयाचे अधिकारी आणि क्रीडा चाहत्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं.
****
गेल्या दशकभरात कर संरचनेत मोठे बदल करण्यात आल्याचं, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज लोकसभेत वित्त विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देत होत्या. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे मध्यमवर्गीयांना दिलासा मिळाला तसंच, छोट्या व्यावसायिकांनाही मोठा फायदा झाल्याचं अर्थमंत्र्यांनी नमूद केलं. विरोधकांनी केलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले.
****
वायनाड भूस्खलन दुर्घटनेतल्या पीडितांसाठी केंद्र सरकारनं पुनर्वसन निधी द्यावा, अशी मागणी लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी आज सदनात केली. या दुर्घटनेला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावं, अशी मागणीही त्यांनी केली. या दुर्घटनेच्या बचाव आणि मदत कार्यात उत्तम काम केल्याबद्दल राहुल गांधी यांनी केंद्र आणि राज्य सरकार, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, लष्कर, नौदल, तटरक्षक दल, अग्निशमन विभाग तसंच केरळलगतच्या राज्यांची प्रशंसा केली.
****
भारतीय रिझर्व्ह बँक -आरबीआयनं, विविध कृषी पूरक व्यवसायांसाठी कमी व्याजदरात अल्पावधीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याच्या सूचना बँकांना दिल्या आहेत. यानुसार, शेतकऱ्यांना ७ टक्के व्याजदरानं ३ लाख रुपयांपर्यंतचं कर्ज दिलं जाईल. विहित मुदतीत कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजात अतिरिक्त ३ टक्क्यांची सूट दिली जाणार आहे. हे अल्प मुदतीचं कर्ज मिळवण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक असल्याचं आरबीआयनं म्हटलं आहे.
****
राज्यातल्या जनतेला पिण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध होण्यासाठी सध्याच्या जलप्रकल्पांची क्षमतावाढ करणं गरजेचं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. हिंगोली, बीड, सोलापूर आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतल्या जलसंपदा विभागाशी संबंधित प्रलंबित योजनांच्या संदर्भात आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. नैसर्गिक स्त्रोतांचा वापर करून एका प्रकल्पातलं अतिरिक्त पाणी दुसऱ्या प्रकल्पात नेण्याचं नियोजन करावं, असे निर्देश त्यांनी दिले. या जिल्ह्यांत आवश्यक त्या ठिकाणी कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचं रूपांतर बॅरेजेसमध्ये करून पाणी साठवण क्षमतेत वाढ करण्याची कार्यवाही गतीनं करण्याची सूचनाही पवार यांनी केली आहे.
****
राज्य सरकार येत्या ९ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबवणार असून, अडीच कोटी घरांवर तिरंगा फडकवण्यासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करणार आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन योजना राबवून पावणे चार लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासह वैनगंगा - नळगंगा नदीजोड प्रकल्पालाही मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली.
आदिवासी विभागातल्या प्राथमिक शिक्षकांना शिक्षण पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्षे मुदतवाढ, विना परवानगी झाड तोडण्यासाठीच्या दंडाची रक्कम पन्नास हजार रुपये, लहान शहरांतल्या पायाभूत सुविधांना वेग देणं, इत्यादी निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान कोलंबो इथं सुरू असलेल्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात श्रीलंकेनं भारताला २४९ धावांचं लक्ष्य दिलं आहे. श्रीलंकेनं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत सात बाद २४८ धावा केल्या आहेत. भारताच्या रियान परागनं सर्वाधिक तीन बळी घेतले. श्रीलंका या मालिकेत शून्य एकने आघाडीवर आहे.
****
बीड जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसायिक आढळल्यास ��डक कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बोगस डॉक्टर पुनर्विलोकन समितीची जिल्हास्तरीय बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आला. नागरिकांना बोगस डॉक्टर आढळल्यास त्यांनी ती माहिती प्रशासनाला द्यावी, असं आवाहनही या बैठकीतून करण्यात आलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यातल्या, क्षयरोगमुक्त असलेल्या शहाऐंशी ग्रामपंचायतींचा आज गौरव करण्यात आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी यावेळी, संपूर्ण जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याच्या दृष्टीनं जिल्ह्यातल्या आरोग्य संस्थांना मार्गदर्शन केलं.
****
जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त परभणी इथे स्तनपान जागरूकता सप्ताह राबवण्यात आला. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातलं सामुदायिक विज्ञान महाविद्यालय आणि परभणीचं जिल्हा रुग्णालय यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबवला. यावेळी महाविद्यालयातल्या विद्यार्थिनींनी विविध कार्यक्रमांमधून स्तन्यदा मातांना स्तनपानाचं महत्व सांगितलं.
****
सुधारित फौजदारी कायद्यांविषयी माहिती देणाऱ्या मल्टीमिडिया चित्र प्रदर्शनाचं आज नांदेड जिल्हा आणि सत्र न्यायालयात उद्घाटन झालं. नांदेड इथला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा केंद्रीय संचार ब्यूरो, जिल्हा विधि सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय आणि नांदेडचं जिल्हा माहिती कार्यालय, यांनी संयुक्तपणे हे प्रदर्शन आयोजित केलं आहे. सोप्या भाषेत साकारण्यात आलेलं हे प्रदर्शन उद्यासुद्धा सकाळी १० पासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं असणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज कोविडचे तीन नवे रुग्ण आढळले, सध्या शहरात कोविडचे १३ सक्रीय रुग्ण असल्याचं, महानगरपालिकेनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या आठ तालुक्यातल्या सातशे वीस गावात घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापनासह स्वच्छतेची विविध कामं पूर्ण झाली आहेत.
****
0 notes
Text
प्राजक्ता माळीला साडीत पाहून चाहते झाले घायाळ, म्हणाले- अशीच बायको हवी
प्राजक्ता माळीला साडीत पाहून चाहते झाले घायाळ, म्हणाले- अशीच बायको हवी
प्राजक्ता माळीला साडीत पाहून चाहते झाले घायाळ, म्हणाले- अशीच बायको हवी Prajakta Mali आपल्या अभिनयाने आणि गोड हास्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी चाहत्यांची अत्यंत लाडकी आहे. पुन्हा एकदा चाहते तिच्या फोटोंवर फिदा झाले आहेत. आम्हालाही अशीच बायको हवी असं म्हणत चाहत्यांनी तिच्या फोटोवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. Prajakta Mali आपल्या अभिनयाने आणि गोड हास्याने प्रेक्षकांची मनं…
View On WordPress
0 notes
Text
महिंद्राने सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला पॅरालिम्पियनला सानुकूल XUV700 गोल्ड वितरित क��ले, आनंद महिंद्रा mbh
महिंद्राने सुवर्ण पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला पॅरालिम्पियनला सानुकूल XUV700 गोल्ड वितरित केले, आनंद महिंद्रा mbh
नवी दिल्ली. 2021 टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण आणि कांस्यपदक जिंकणारी पॅरा अॅथलीट अवनी लेखरा हिला Mahindra & Mahindra ने XUV700 भेट दिली आहे. महिंद्राने अवनीसाठी या एसयूव्हीमध्ये खास बदल केले आहेत. कंपनीने एक्सटीरियर आणि इंटीरियरमध्ये विशेष बदल केले असून त्यात खास सीट देण्यात आली आहे. अवनी लेखरा हिने सोशल मीडियावर XUV700 चे फोटो शेअर केले आहेत. यासाठी त्यांनी महिंद्रा अँड महिंद्राचे प्रमुख आनंद…
View On WordPress
0 notes
Text
भारत-पाकिस्तान आशिया कप सामन्यादरम्यान हार्दिक पांड्या मोहम्मद रिझवानला मिठी मारतो. Pic व्हायरल झाला | क्रिकेट बातम्या
भारत-पाकिस्तान आशिया कप सामन्यादरम्यान हार्दिक पांड्या मोहम्मद रिझवानला मिठी मारतो. Pic व्हायरल झाला | क्रिकेट बातम्या
हार्दिक पांड्या आणि मोहम्मद रिझवान© ट्विटर हार्दिक पांड्याच्या अष्टपैलू कामगिरीमुळे टीम इंडियाला दुबईत रविवारी झालेल्या आशिया कप लढतीत पाकिस्तानवर विजय मिळवण्यात मदत झाली. तीन गडी बाद करण्यापासून सुरुवात करत 17 चेंडूत 33 धावा करत हार्दिकने विजयी षटकार खेचून भारताचा डाव ओलांडला. त्याच्या धडाकेबाज कामगिरीव्यतिरिक्त, प्रत्येकाची मने जिंकणारी आणखी एक गोष्ट म्हणजे हार्दिकने खेळादरम्यान पाकिस्तानचा…
View On WordPress
0 notes
Text
सिंगापूर ओपन: सायना नेहवालला चीनच्या ज्युनियर खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला, पीव्ही सिंधूला ७ आठवड्यांनंतर उपांत्य फेरी गाठण्यासाठी घाम गाळावा लागला.
सिंगापूर ओपन: सायना नेहवालला चीनच्या ज्युनियर खेळाडूकडून पराभव पत्करावा लागला, पीव्ही सिंधूला ७ आठवड्यांनंतर उपांत्य फेरी गाठण्यासाठी घाम गाळावा लागला.
15 जुलै 2022 हा शुक्रवार, सिंगापूर ओपन सुपर 500 स्पर्धेत भारतासाठी खास नव्हता. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय शटलर सायना नेहवाल ज्युनियर खेळाडूकडून पराभूत झाल्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडली. पुरुष एकेरीत भारताचा एकमेव आव्हानवीर एचएस प्रणॉयलाही उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती पीव्ही सिंधूला जागतिक क्रमवारीत १९व्या क्रमांकावर असलेल्या चीनच्या हान…
View On WordPress
0 notes
Text
0 notes
Text
बॉलिवूडमधील एकेकाळची आघाडीची अभिनेत्री मिनाक्षी शेषाद्री. मिनाक्षी शेषाद्रींचा जन्म 16 नोव्हेंबर 1963 ला झारखंड येथे झाला. शशिकला शेषाद्री ऊर्फ मीनाक्षी शेषाद्री यांनी हिंदी व तमिळ चित्रपटांमधून अभिनय केला आहे. मीनाक्षी शेषाद्री यांनी वयाच्या 17 व्या वर्षी 1981 सालचा 'मिस इंडिया किताब' जिंकला होता. मिस इंडिया किताब जिंकणारी ही सर्वांत तरूण होती. मीनाक्षी शेषाद्री यांनी 1982 साली 'पेंटर बाबू' या हिंदी चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.
0 notes
Text
Sonali Kulkarni Birthday : अभिनयाने चाहत्यांनी मन जिंकणारी सोनाली कुलकर्णी
0 notes
Text
नेमबाज अवनी लेखरा पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली
नेमबाज अवनी लेखरा पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय महिला ठरली
टोकियो- वृत्तसंस्था Avani Lekhara अवनी लेखरा हिने भारतासाठी सुवर्ण क्षण मिळवून दिला. तिने अवघ्या १९ व्या वर्षी सुवर्णपदक जिंकून सुवर्ण कन्या होण्याच्या बहुमान मिळविला आहे. सध्या ऑलिम्पिक स्पर्धाचे वारे आहेत. नुकत्याच ऑलिम्पिक स्पर्धेत खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केल्यानंतर पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिले सुवर्ण पदक मिळाले आहे. 30 ऑगस्ट रोजी नेमबाज अवनी लेखारा हिने इतिहास रचला कारण…
View On WordPress
0 notes
Text
लेखन, अभिनयानंतर शर्वाणी पिल्लई आता निर्मिती क्षेत्रात उतरणार
लेखन, अभिनयानंतर शर्वाणी पिल्लई आता निर्मिती क्षेत्रात उतरणार
मुंबई : अवंतिका मालिकेतील सानिका असो, आंबट गोड मधली इंदू असो, स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेतील आदरणीय सकवारबाई असो, अगदी सध्या चालू असलेल्या मुलगी झाली हो मालिकेतील उमा असो अशा विविध मालिका तसेच विविध नाटक, चित्रपट अशा तीनही माध्यमातून रसिक प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री लेखिका शर्वाणी पिल्लई आता निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. पॅलेट मोशन पिक्चर्स असे तिच्या निर्मिती संस्थेचे नाव असून…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 07 August 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ ऑगस्ट २०२४ दुपारी १.०० वा.
****
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताची कुस्तीपटू विनेश फोगाट ५० किलो वजनी गटात अपात्र ठरली आहे. आज ती सुवर्ण पदकासाठी खेळणार होती. या गटाच्या ठरलेल्या वजन मर्यादेपेक्षा विनेशचं वजन काही ग्रॅम जास्त भरल्यानं तीला अपात्र घोषित करण्यात आलं. त्यामुळे ती आता स्पर्धेतून बाहेर गेल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
दरम्यान, या मुद्यावरुन आज लोकसभेत विरोधकांनी गदारोळ केला. यासंदर्भात क्रीडामंत्र्यांनी जबाब देण्याची मागणी विरोधकांनी लाऊन धरली.
ऑलिंपिक स्पर्धेत आज महिलांच्या टेबल टेनिस स्पर्धेत आज मनिका बत्रा, श्रीजा अकुला आणि अर्चना कामत या खेळाडूंच्या चमूची जर्मनीविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीची लढत होणार आहे. दुपारी दीड वाजता या सामन्याला सुरुवात होईल.
ॲथलेटिक्स मध्ये उंच उडी, ट्रिपल जंप या प्रकारातल्या पहिल्या फेरीत भारतीय खेळाडू सहभागी होणार आहेत. तर तीन हजार मीटर अडथळ्यांच्या शर्यतीच्या अंतिम फेरीत अविनाश साबळे सहभागी होणार आहे. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री दीड वाजेनंतर ही शर्यत होईल. भारोत्तोलनात महिलांच्या ४९ किलो वजनी गटात मीराबाई चानू सहभागी होणार आहे.
दरम्यान, ऑलिम्पिक स्पर्धेत दोन कांस्य पदकं जिंकणारी नेमबाज मनु भाकर आज स्वदेशी परतली. आज सकाळी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी आणि क्रीडा चाहत्यांनी तिचं जल्लोषात स्वागत केलं.
****
भारत आणि श्रीलंकेदरम्यान तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा सामना आज कोलंबो इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल. मालिकेत श्रीलंका एक - शून्यनं आघाडीवर आहे.
****
दहावा राष्ट्रीय हातमाग दिवस आज साजरा करण्यात येत आहे. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिल्लीतल्या विज्ञान भवनात या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते संत कबीर पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं.
****
माहिती तंत्रज्ञान अर्थात आयटी इंडस्ट्री देशातल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांपर्यंत पोहचवून, या क्षेत्रातल्या क्रांतीचा लाभ देशाचा प्रत्येक नागरिकाला मिळवून देण्याची सरकारची योजना आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी आज लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली आहे. सरकारनं देशभरात पासष्ट सॉफ्टवेअर पार्क्स उभारली असून त्यातली सत्तावन्न दुसऱ्या आणि तिसऱ्या श्रेणीच्या शहरांमध्ये असल्याची माहिती त्यांनी दिली.
****
प्रस्तावित वक्फ सुधारणा विधेयकाद्वारे सध्याच्या वक्फसंबंधित कायद्यांमध्ये लक्षणीय सुधारणा करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. या कायद्याचं सध्याचं वक्फ कायदा १९९५, हे नाव बदलून त्याजागी, एकत्रित वक्फ व्यवस्थापन, सशक्तिकरण, कार्यक्षमता आणि विकास कायदा १९९५, अर्थात, Unified Waqf Management, Empowerment, Efficiency and Development Act, 1995, असं केलं जाणार आहे. तसंच, वक्फ बोर्डाच्या कार्यकारिणींमध्ये मुस्लिम महिला आणि बिगर मुस्लिमांना योग्य प्रतिनिधीत्व मिळावं, हे सुनिश्चित केलं जाणार आहे. याशिवाय बोहरा आणि आगाखानी समाजांसाठी स्वतंत्र औकाफ मंडळ स्थापन करण्याची स��चनाही या विधेयकात समाविष्ट आहे. वक्फ बोर्डाचं काळानुरूप आधुनिकीकरण करणं आणि या मध्ये सर्वसमावेशक प्रतिनिधीत्व आणणं, हा या विधेयकाचा उद्देश आहे.
****
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आणि खासदार पियूष गोयल लोकसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या दोन जागांच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या तीन सप्टेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगानं आज या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला.
****
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानात भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे गुन्हे दाखल केले नाहीत; म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती रविंद्र घुगे आणि न्यायमूर्ती वाय.जी. खोब्रागडे यांनी महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाचा अतिरिक्त कार्यभार पाहणाऱ्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांना अवमाननेची नोटीस पाठवली आहे. त्याचप्रमाणे धाराशिव जिल्हाचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे आणि पोलीस अधीक्षक यांना प्रत्यक्ष उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
****
नांदेड जिल्ह्यातल्या किनवट, हदगाव, भोकर, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, लोहा, नायगाव, देगलूर आणि मुखेड या विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या तयार झाल्या आहेत. राजकीय पक्षापासून सामान्य नागरिकांपर्यंत प्रारूप यादी सर्वांसाठी खुल्या असून, नागरिकांनी आपआपल्या नावाची तपासणी करून घ्यावी, असं आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे.
****
पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे जायकवाडी धरणातला पाणीसाठा आता सुमारे चोवीस टक्क्यांवर पोहचला आहे. आज सकाळी सहा वाजता या धरणाची पाणीपातळी एक हजार पाचशे चार फूट, तर एकूण पाणीसाठा एक हजार दोनशे सत्तावन्न पूर्णांक पाच दशलक्ष घनमी���र इतका होता.
****
0 notes
Text
“माझं नाव त्याच्यासोबत जोडलं…’; ऋतुराजसोबत असलेल्या नात्यावर अखेर सायली संजीव झाली व्यक्त
“माझं नाव त्याच्यासोबत जोडलं…’; ऋतुराजसोबत असलेल्या नात्यावर अखेर सायली संजीव झाली व्यक्त
“माझं नाव त्याच्यासोबत जोडलं…’; ऋतुराजसोबत असलेल्या नात्यावर अखेर सायली संजीव झाली व्यक्त मुंबई – झी मराठी वाहिनीवरील ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकणारी गौरी म्हणजेच, अभिनेत्री ‘सायली संजीव’ आज महाराष्ट्रातील घराघरात पोहचली आहे. सायली संजीवने या मालिकेत झळकण्याआधी काही चित्रपटांमध्ये काम केले होते. तसेच, ‘काहे दिया परदेस’ ही मालिका संपल्यानंतर तिने गुलमोहर या मालिकेत काम…
View On WordPress
#अखेर#असलेल्या#आहे#ऋतुराजसोबत#गंभीर#जोडलं…’;#झाली#त्याच्यासोबत#नात्यावर#नाव#माझं#मुद्दा#व्यक्त#संजीव#सायली
0 notes
Text
भारताला मोठा धक्का, सायना-कश्यपने इंडोनेशिया ओपनमधून माघार घेतली
भारताला मोठा धक्का, सायना-कश्यपने इंडोनेशिया ओपनमधून माघार घेतली
सायना नेहवाल पारुपल्ली कश्यप प्रणॉय एचएस इंडोनेशिया ओपन २०२२: भारतीय बॅडमिंटन स्टार जोडी सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप आणि नुकत्याच झालेल्या थॉमस चषक स्पर्धेत ऐतिहासिक विजयाचा नायक असलेल्या एचएस प्रणॉय यांनी मंगळवारपासून सुरू होणाऱ्या इंडोनेशिया ओपन सुपर सीरिज 500 मधून माघार घेतली. ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी भारताची पहिली बॅडमिंटनपटू सायनाने वर्कलोड मॅनेजमेंटचा हवाला देत माघार घेतली तर…
View On WordPress
#इंडोनेशिया ओपन २०२२#इंडोनेशिया बॅडमिंटन ओपन २०२२#एचएस प्रणॉय#पारुपल्ली कश्यप#प्रणय एच.एस#सायना नेहवाल#सायना नेहवाल इंडोनेशिया ओपन २०२२
0 notes
Text
पहा: आशिया चषकात पाकिस्तान विरुद्ध 6 असा विजय मिळवण्यापूर्वी हार्दिक पंड्याचा उबेर-आत्मविश्वासाने होकार | क्रिकेट बातम्या
पहा: आशिया चषकात पाकिस्तान विरुद्ध 6 असा विजय मिळवण्यापूर्वी हार्दिक पंड्याचा उबेर-आत्मविश्वासाने होकार | क्रिकेट बातम्या
हार्दिक पांड्याने भारत विरुद्ध पाकिस्तानसाठी सामना जिंकणारी खेळी खेळली© एएफपी अष्टपैलू हार्दिक पांड्या दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर रविवारी आशिया चषक गट अ गटातील लढतीत टीम इंडियाला पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव करण्यात मदत करण्यासाठी त्याने आपला ए-गेम आणला होता. पांड्याने अवघ्या 17 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 33 धावा केल्या. शेवटच्या षटकात चौथ्या चेंडूवर पंड्याने षटकार खेचून भारताच्या…
View On WordPress
#आशिया कप 2022#क्रिकेट एनडीटीव्ही स्पोर्ट्स#पाकिस्तान#भारत#रवींद्रसिंह अनिरुद्धसिंह जडेजा#हार्दिक हिमांशू पंड्या
0 notes
Text
गुजरात विधानसभा निवडणूक: गुजरातची ही विधानसभा जागा भाग्यवान, इथून जो जिंकतो तो मुख्यमंत्री आणि राज्यपाल
गुजरात विधानसभा निवडणूक: गुजरातची ही विधानसभा जागा भाग्यवान, इथून जो जिंकतो तो मुख्यमंत्री आणि राज्यपाल
राजकोट पश्चिम सीट खूप भाग्यवान मानली जाते. राजकोट पश्चिम विधानसभेची जागा ही भाजपसाठी भाग्यवान जागांमध्ये गणली जाते, जिथून निवडणूक जिंकणारी व्यक्ती मुख्यमंत्री आणि अगदी राज्यपाल बनते. 2002 च्या पोटनिवडणुकीत नरेंद्र मोदी पहिल्यांदा या जागेवरून विजयी झाले आणि त्यानंतर ते राज्याचे मुख्यमंत्री झाले. यानंतर 2014 मध्ये या जागेवरून विजयी झाल्यानंतर वजुभाईंना कर्नाटकचे राज्यपाल बनवण्यात आले. गुजरातमधील…
View On WordPress
#2022 गुजरात निवडणूक#2022 गुजरात विधानसभेची निवडणूक#गुजरात#गुजरात निवडणूक#गुजरात विधानसभा निवडणूक 2022
0 notes
Text
दंगल गर्ल बबिता फोगाटला राज्य सरकारने दिली मोठी जबाबदारी
दंगल गर्ल बबिता फोगाटला राज्य सरकारने दिली मोठी जबाबदारी
[ad_1]
नवी दिल्ली: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी कुस्तीपटू बबिता फोगाटकडे एक मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हरियाणा राज्य सरकारने बबिताची नियुक्ती क्रीडा विभागाच्या उप संचालकपदावर केली आहे. राज्य सरकारने बबीता सोबत WWEमधील कुस्तीपटू कवीता दलालला देखील या पदावर नियुक्त केले आहे.
हरियाणा सरकारने या दोघींना क्रीडा विभागाच्या उप संचालक पदावर नियुक्त केल्याचे पत्र दिले आहे. बबीताने…
View On WordPress
#babita phogat#babita phogat deputy director#Haryana#Sports and Youth Affairs#Wrestler Babita Phogat#दंगल गर्ल#बबीता फोगाट#भाजप
0 notes