#छगन भुजबळ
Explore tagged Tumblr posts
indianfasttrack · 13 days ago
Text
Maharashtra cabinet expansion : मंत्रिमंडल विस्तार के बाद फूट के मिले संकेत
महाराष्ट्र में रविवार को मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के कैबिनेट का पहला विस्तार हो गया है। महायुति गठबंधन के कुल 39 विधायकों को मंत्री पद की शपथ दिलाई गई है। इसके बाद से गठबंधन के विधायको द्वारा नाराजगी व्यक्त की जा रही है। ऐसे में सरकार की मुश्किलें बढ सकती है। (Maharashtra Signs of disunity after cabinet expansion) नितिन तोरस्कर (मंत्रालय प्रतिनिधि)मुंबई– महाराष्ट्र के नए मंत्रिमंडल में शामिल…
0 notes
airnews-arngbad · 12 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 17 December 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १७ डिसेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी विधानसभेत बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगच्या संरपंचाचं हत्या प्रकरण आणि परभणी इथल्या हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. यासंदर्भातला स्थगन प्रस्ताव काँग्रेसच्या नितीन राऊत यांनी मांडला त्याला नाना पटोले यांनी अनुमोदन दिलं. हा विषय गंभीर असून, त्यावर उद्या नियम १०१ अन्वये चर्चा घेण्याचं अध्यक्षांनी जाहीर केलं. बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनीही मस्साजोगच्या संरपंचाच्या हत्येचा मुद्दा उपस्थित केला. आरोपीला अजुनही अटक झाली नसल्यावरुन त्यांनी टीका केली. आरोपीचं नाव सांगून त्यांनी, बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारीला आळा घालण्याची सरकारला विनंती केली. या प्रकरणातल्या मुख्य आरोपीला अटक झाली नाही तर आंदोलनाचा इशारा क्षीरसागर यांनी दिला. या विषयावर सरकार गंभीर नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभात्याग केला. केजच्या आमदार नमिता मुंदडा यांनी यासंदर्भात बोलताना, सगळ्या सात आरोपींना पकडून फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.
दरम्यान, विधानसभेत तालिका अध्यक्ष म्हणून विजय रहांगडाले, रमेश बोरनारे, शेखर निकम आणि दिलीप सोपल यांची नियुक्ती केल्याचं अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जाहीर केलं. सभागृहाचे माजी सदस्य आणि मंत्री दत्तात्रय राणे यांच्या निधनाबद्दल सभागृहात त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.
मुंबई मध्ये झालेल्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनात राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केलेल्या अभिभाषणाबद्दल त्यांचे आभार मानणारा प्रस्ताव भाजपाचे पराग आळवणी यांनी विधानसभेत मांडला. राज्याची प्रगती साधणारं सरकार जनतेनं यावेळी निवडलं, असं ते म्हणाले. राज्यात आधी २०१४ ते २०१९ दरम्यान फडणवीस आणि नंतर शिंदे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात उद्योग वाढीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले, या सरकारने महिलांसाठी देखील अनेक चांगल्या योजना सुरू केल्याचं आळवणी यांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे चेतन तुपे यांनी या प्रस्तावला अनुमोदन दिलं.
विधान परिषदेच्या सभापती पदाची निवडणूक परवा १९ डिसेंबरला होणार आहे. उपसभापती निलम गोर्हे यांनी आज ही घोषणा केली. उद्या १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेप���्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
दरम्यान, परभणी आणि बीड प्रकरणात सरकारची भूमिका गुन्हेगारांना वाचवण्याची असल्याचा आरोप करत, महाविकास आघाडीतर्फे अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधिमंडळ परिसरात निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी विरोधकांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात महायुती सरकार विरोधी घोषणाबाजी केली.
राज्यसभेत संविधानावरची चर्चा आज पुन्हा सुरु झाली. सभागृह नेते, केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनी यावर बोलताना, भारत ही केवळ सर्वात मोठी लोकशाही नसून लोकशाहीची जननी असल्याचं नमूद केलं. भारतीय आचार विचारानुसार लोकशाहीमध्ये स्वातंत्र्य, समता आणि सर्वसमावेशकता यांचा समावेश होतो, ज्यामुळे नागरिकांना सन्मानपूर्वक जीवन जगता येतं, असं सांगून नड्डा यांनी, सरकार या दृष्टीकोनासाठी समर्पित असून, भारतीय संविधानाला आकार देणाऱ्या संविधान सभा सदस्यांचे देश ऋणी असल्याचं सांगितलं. दरम्यान, या चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत.
एक राष्ट्र एक निवडणूक विधेयक लोकसभेत सादर झालं. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी हे विधेयक मांडलं. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, तसंच समाजवादी पक्षाने या विधेयकाला विरोध दर्शवला. तर शिवसेना, तेलगु देसम पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा द��ला.
राज्यातल्या राष्ट्रीय महामार्ग ६३ वरील जावळे-बोरगाव काळे विभागापासून ३७ किलोमीटर मार्गाच्या पेव्ह्ड शोल्डरसह फोर-लेन पुनर्वसन आणि अद्ययावतीकरणासाठी ५७४ कोटी १८ लाख रुपयांसह मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सामाजिक माध्यमावर ही माहिती दिली. मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, उदगीर आणि लातूर या प्रमुख शहरांना जोडण्यासाठी, तसंच कृषी मालाची वाहतूक आणि व्यावसायिकांसाठी देखील हा मार्ग महत्त्वपूर्ण असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
आपल्याला मंत्रिपदाचा प्रश्न नसून, आपली अवहेलना करण्यात आल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. भुजबळ यांना मंत्रिपद मिळालं नसल्याबद्दल त्यांच्या नाराज कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. आपल्या मतदारसंघात जाऊन, नागरीक, कार्यकर्त्यांशी चर्चा करुन पुढील भुमिका जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मराठा ��रक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येत्या २५ जानेवारी पासून पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथं ते आज वार्ताहरांशी बोलत होते.
0 notes
nagarchaufer · 13 days ago
Text
‘ फळ मिळालं ‘ , मंत्रिमंडळातून डावललं गेल्यानंतर छगन भुजबळ यांनी मौन सोडलं 
महाराष्ट्र मंत्रिमंडळात डावलले गेल्यानंतर छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर येत आपली प्रतिक्रिया दिलेली असून मनोज जरांगे पाटील यांना अंगावर घेतल्याचं फळ आपल्याला मिळाल आहे असं म्हटलेलं आहे.  काय म्हणाले छगन भुजबळ ?  मी सामान्य कार्यकर्ता. मला डावललं काय, फेकलं काय फरक काय पडतोय. मंत्रिपद कितीवेळा आले आणि गेले. छगन भुजबळ संपला नाही ना..ज्या��नी डावललं त्यांना विचारायला हवं. अजित पवारांशी बोलण्याची गरज…
0 notes
automaticthinghoagiezine · 4 months ago
Video
youtube
छगन भुजबळ यांनी तात्काळ राजीनामा द्या..
0 notes
news-34 · 4 months ago
Text
0 notes
darshanpolicetime1 · 4 months ago
Text
समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी विकास कामांना सर्वोच्च प्राधान्य देणार - मंत्री छगन भुजबळ
निफाड तालुक्यातील विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण संपन्न                                                                               नाशिक, दिनांक : 18 ऑगस्ट 2024 (जिमाका वृत्तसेवा): समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या सर्व विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे  प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.आज निफाड…
Tumblr media
View On WordPress
0 notes
imranjalna · 6 months ago
Text
मंत्री छगन भुजबळ व सरकारच्या शिष्टमंडळाच्या विनंतीवरून अखेर उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांनी सोडले उपोषण..
At the request of minister Chhagan Bhujbal and the government delegation, hunger striker Laxman Hake ended his hunger strike. सरकारच्या शिष्टमंडळाला लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांचे उपोषण मागे घ्यायला अखेर यश… सरकारच्या वतीने लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सुटले.. आज जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 9 months ago
Text
डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन!
नाशिक (प्रतिनिधी): भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी रोड वरील डॉ. आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना ना. छगन भुजबळ, दादा भुसे, प्रा. देवयानी फरांदे, अजय बोरस्ते, डॉ. शोभा बच्छाव, अर्जुन पगारे, आनंद सोनवणे, गजानन शेलार, सुधाकर बडगुजर, दीपक डोके, भदंत सुगत, प्रशांत दिवे,राजू रायमाळे, डॉ.हेमलता पाटील, ऍड.आकाश छाजेड आदी उपस्थित होते.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sattakaran · 1 year ago
Text
भुजबळ-जरांगे यांची जुंपली, सुप्रिया सुळे यांचा छगन भुजबळ यांना सल्ला काय?
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
महाबोधी वृक्षाला फुटली नव पालवी…मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून बोधी वृक्षाची पाहणी…
https://bharatlive.news/?p=187830 महाबोधी वृक्षाला फुटली नव पालवी…मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून बोधी ...
0 notes
nandedlive · 1 year ago
Text
Maharashtra Cabinet Portfolio | ब्रेकिंग! अखेर खातेवाटप जाहीर; पाहा उपमुख्यमंत्री अजित पवारांसह कोणत्या मंत्र्याला मिळालं कोणतं खातं…
Tumblr media
Maharashtra Cabinet Portfolio | राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप (Maharashtra Cabinet Portfolio) जाहीर करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.
उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन हे खाते राहील.
इतर 26 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे:
- छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण - दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार •राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास - सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय - हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य - चंद्रकांतदादा बच्चू पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य - विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास - गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन - गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता - दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) - संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण - धनंजय पंडितराव मुंडे – कृषि - सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन - उदय रविंद्र सामंत- उद्योग - प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण - रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) - अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन - दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व मराठी भाषा - धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन - अतुल मोरेश्वर सावे – गृहनि��्माण, इतर मागास व बहुजन कल्याण - शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क - कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास - संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे - मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता - अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन. Read the full article
0 notes
airnews-arngbad · 12 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 17 December 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १७ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
राज्यसभेत संविधानावरच्या विशेष चर्चेला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देणार आहेत. सभागृहात काल अर्थमंत्री निर्मला सीतारामन, विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर सदस्यांनी या चर्चेत सहभाग घेतला.
एक राष्ट्र एक निवडणूक या विषयी दोन विधेयकं आज लोकसभेत सादर करण्यात येणार आहेत. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल संविधान विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश कायदा विधेयक सादर करतील.
****
लोकसभेत काल २०२४-२५ साठीच्या अनुदानाच्या पुरवणी मागण्यांवर चर्चा झाली. ८७ हजार ७६२ कोटी रुपयांहून अधिक अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यासाठी सरकारनं संसदेची मंजुरी मागितली आहे. यापैकी, प्रस्तावांमध्ये कर्जे, दायित्वे आणि व्याजदरांच्या पुर्ततेसाठी एकंदर ४४ हजार १४२ कोटी रुपयांच्या रोख रकमेचा समावेश आहे. माहिती तंत्रज्ञान, दळणवळण, किरकोळ विक्री क्षेत्र आणि बँकींग यांसारख्या क्षेत्रात गेल्या काही वर्षात वेतनवाढ झालेली नसल्याचा आरोप चर्चेला सुरुवात करताना काँग्रेसचे के सी वेणुगोपाल यांनी केला.
****
गेल्या १० वर्षांत देशभरात ९७ नव्या इएसआय रूग्णालयांना मान्यता दिल्याची माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांनी काल लोकसभेत दिली. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या सहकार्यातून इएसआयसी वैद्यकीय सेवा पुरवणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राजस्थान राज्य सरकार स्थापनेला एक वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जयपूरमधल्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ४६ हजार ३०० कोटी रुपये खर्चाच्या उर्जा, रस्ते, रेल्वे आणि पाणी या क्षेत्रातील २४ प्रकल्प पायाभरणी आणि उद्घटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ते एका जाहीर सभेलाही संबोधित करणार आहेत.
****
गेल्या महिन्यात, घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर घसरुन एक पूर्णांक ८९ शतांश टक्क्यावर आला. ऑक्टोबरमधे हा दर दोन पूर्णांक ३६ शतांश टक्के होता. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं काल ही आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार खाद्यपदार्थाच्या बाबतीत हा दर ११ पूर्णांक ६९ टक्के दरावरुन आठ पूर्णांक ९२ शतांश टक्के, भाज्यांचा दर ६३ पूर्णांक चार शतांश टक्क्यावरुन २८ पूर्णांक ५७ शतांश टक्के, तर कांद्याच्या दरात ६३ टक्क्यावरुन २ पूर्णांक ८५ शतांश टक्के इतकी घसरण झाली.
****
दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणामुळे सर्व प्राथमिक शाळांमध्ये हायब्रिड पद्धतीनं म्हणजे ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीनं शाळा चालवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. इयत्ता पाचवीपर्यंतचे वर्ग ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीनं ज्याप्रमाणं शाळांना सोयीचे असेल, त्याप्रमाणे घ्यावेत, असा आदेश शिक्षण संचालनालयानं दिला आहे. दिल्ली एनसीआर प्रदेशात हवेची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट झाली असून, वायू गुणवत्ता व्यवस्थापन आयोगानं चौथ्या टप्प्यातील ग्रॅप लागू केला आहे.
****
जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर स्वयंशिस्त हा यशाचा मूलमंत्र असल्याचा सल्ला, राज्यपाल आणि कुलपती सी.पी. राधाकृष्णन यांनी विद्यार्थ्यांना दिला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ११२ व्या दीक्षांत समारंभात ते काल बोलत होते. या समारंभात एक लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना पदवी, पदविका प्रदान करण्यात आल्या, तर २२१ संशोधकांना आचार्य पदवी देऊन सन्मानित करण्यात आलं.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश नसल्याच्या निषेधार्थ काल नाशिकमध्ये आंदोलनं करण्यात आली. कार्यकर्त्यांनी, भुजबळ यांचा मतदारसंघ असलेल्या येवला तालुक्यात विंचुर इथं रास्ता रस्ता रोको केला, तर नाशिकमध्ये राष्ट्रवादी भवनासमोर घोषणाबाजी केली.
दरम्यान, आपल्याला पक्षानं राज्यसभेवर जाण्याबाबत विचारणा केली होती. मात्र तसं करणं हा आपल्या मतदारसंघातल्या मतदारांचा विश्वासघात ठरेल, असं सांगून त्याला नकार दिल्याचं भुजबळ यांनी सांगितलं.
****
एसटीनं तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, तसा प्रस्ताव शासनाला पाठवला आहे, असं एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी सांगितलं. उत्पन्न आणि खर्चात ताळमेळ राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले. नियमित खर्चाबरोबर कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिल्यामुळे सुमारे ५२ कोटी रूपयांचा अतिरिक्त बोजा पडल्यामुळे विक्रमी उत्पन्न झालं तरी इंधनाचे वाढते दर, कर्मचाऱ्यांची वेतन वाढ, टायर आणि सुट्या भागांच्या दरामध्ये झालेली वाढ यामुळे खर्च वाढला असल्यामुळे नाईलाजानं हे पाऊल उचलल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यातल्या आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने सुधारित मानक कार्यप्रणाली जारी केली आहे. त्यानुसार, पोलीस आ��ुक्त किंवा अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली विशेष कक्षाची स्थापना करण्यात येणार असून, त्याचे तपशील पोलीस महासंचालक, तसंच संबंधित जिल्ह्यांचे पोलीस आयुक्त किंवा अधीक्षकांच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावेत, असं सांगण्यात आलं आहे.
****
0 notes
nagarchaufer · 2 months ago
Text
मनोज जरांगे पाटील यांचा विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय , छगन भुजबळ म्हणाले की.. 
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी काल रात्री उशिरा विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. एका जातीच्या आधारावर निवडणूक लढणे आणि जिंकणे शक्य नाही त्यामुळे समाज बांधवांनी आपापले अर्ज काढून घ्यावेत. आपण उमेदवार देणार नाही कोणाला पाडायचे ते पाडा आणि कुणालाच आणायचे ते आणा ,’ असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेले आहे.  गेल्या अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या…
0 notes
automaticthinghoagiezine · 4 months ago
Video
youtube
जडीबुटी वाला छगन भुजबळ.. #marathinews #indianpolitician #devendrafadnavi...
0 notes
nbi22news · 2 years ago
Video
youtube
#nbinewsmarathi: बाजार समितीच्या निकालांवर छगन भुजबळ यांची सूचक प्रतिक्रिया
0 notes
rebel-bulletin · 2 years ago
Text
राज्य उत्पादन शुल्क विभागातील वर्ग ३ आणि ४ ची ६६७ पदे लवकरच भरणार – मंत्री शंभूराज देसाई
मुंबई, दि. 20 : राज्य उत्पादन शुल्क विभागात येत्या 5 महिन्यांत वर्ग 3 आणि 4 च्या पदांची भरती केली जाणार असून एकूण 667 पदे भरण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि विधानसभा सदस्य विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव, छगन भुजबळ, जयकुमार रावल यांनी याबाबतचा प्रश्न प्रश्नोत्तराच्या तासात उपस्थित केला होता. श्री. देसाई म्हणाले की, राज्य…
Tumblr media
View On WordPress
0 notes