#घसरण
Explore tagged Tumblr posts
Text
FIFA WC 2022: फिफा वर्ल्डकप भारतात फ्लॉप? टीव्ही रेटिंगमध्ये मोठी घसरण
FIFA WC 2022: फिफा वर्ल्डकप भारतात फ्लॉप? टीव्ही रेटिंगमध्ये मोठी घसरण
FIFA WC 2022: फिफा वर्ल्डकप भारतात फ्लॉप? टीव्ही रेटिंगमध्ये मोठी घसरण FIFA WC 2022, TV Ratings in india Down: फिफा विश्वचषकात आता उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरू होणार आहेत. मात्र भारतात फिफा वर्ल्डकप फ्लॉप ठरल्याचे समोर आले आहे.यावेळचा विश्वचषक भारतात फारच कमी प्रमाणात पाहिला गेल्याचे एका रिपोर्टमधून समोर आले आहे. FIFA WC 2022, TV Ratings in india Down: फिफा विश्वचषकात आता उपांत्यपूर्व…
View On WordPress
#2022#fifa#क्रीडा#क्रीडा बातम्या#खेळ बातम्या#खेळ समाचार#घसरण#टीव्ही#फिफा#फ्लॉप#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#भारतात;#मराठी खेळ बातमी#मोठी#रेटिंगमध्ये#वर्ल्डकप#विश्व#स्पोर्ट्स बातम्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 12 November 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारताला दहशतवाद, सायबर हल्ले आणि हायब्रीड वारफेर यासारख्या सुरक्षा आव्हांना सामोरं जावं लागत असल्याचं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी केलं आहे. राजनाथसिंह यांनी आज दिल्ली इथं सुरक्षा परिसंवादाला संबोधित केलं. प��तप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं मजबूत आणि स्वदेशी अशी संरक्षण प्रणाली विकसित केल्याचं राजनाथसिंह म्हणाले. राष्ट्रीय सुरक्षेवरील माहिती युद्धाच्या धोक्याचा सामना करण्यासाठी भारत सरकार कालानुरुप संरक्षण रणनीती वापरण्यास कटिबद्ध असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
अंमलबजावणी संचालनालयानं आज झारखंड आणि पश्चिम बंगाल इथं धाडी टाकल्या. बांग्लादेशी घुसखोरीसंदर्भात मनी लॉँड्रींग प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ४३ मतदारसंघांसाठी उद्या मतदान होणार आहे. राज्यभरात १५ हजार ३४४ मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीतपणे व्हावी यासाठी सुरक्षा दलाच्या दोनशेहून अधिक तुकड्या मतदान केंद्रांवर तैनात करण्यात आल्या आहेत.
****
केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघ आणि चेलाक्करा राखीव विधानसभा मतदार संघात उद्या पोटनिवडणूक होणार आहे. दोन्ही मतदारसंघात आज मतदान साहित्य वाटप करण्यात येत आहे. जुलै महिन्यात भूस्खलनामुळे बाधित झालेल्या मतदारांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत दोन्ही जागा जिंकून रायबरेलीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राहुल गांधींनी राजीनामा दिल्यानंतर ही पोटनिवडणूक होत आहे.
बिहारमध्येही उद्या विधानसभेच्या चार जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. आसाममध्येही उद्या होणाऱ्या विधानसभेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे.
****
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा आठवडा आहे. भाजप नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात चिमूर इथा सभा घेणार आहेत, त्यानंतर सोलापूर इथं साडेचार वाजता आणि पुण्यात सायंकाळी साडेसहा वाजता नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे.
भाजपनेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज मुंबईत घाटकोपर आणि कांदिवली पश्चिम इथं सभांना संबोधित करणार आहेत.
भाजपनेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची डहाणू इथं सभा सुरु आहे, त्यानंतर पालघर आणि रायगड जिल्ह्यात पेण इथं फडणवीस यांच्या जाहीरसभा होणार आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज सोलापूर इथं सभा आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या नाशिक जिल्ह्यात पाच सभा होणार आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी हे गो���दिया मतदारसंघातल्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा घेणार आहेत. चिखली इथं होणारी राहुल गांधी यांची सभा रद्द करण्यात आली आहे.
शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर इथं नुकतीच प्रचारसभा झाली. अमरावती जिल्ह्यात सिट्रस इस्टेट उभं करण्यासाठी राज्य सरकारनं प्रोत्साहन दिल्याचं शिंदे म्हणाले.
****
विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरीत आज टपाली मतदानाला सुरुवात झाली आहे. पोलीस, तसंच मतदान केंद्रावर कर्तव्य बजावणारे अधिकारी आणि कर्मचारी यांनी रत्नागिरी शहरातल्या दामले हायस्कूल मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
****
आज लोकसेवा प्रसारण दिन साजरा करण्यात येत आहे. १९४७ मध्ये महात्मा गांधी यांनी यादिवशी आकाशवाणी स्टुडिओला भेट दिली होती. त्यांनी फाळणीनंतर हरियाणातील कुरुक्षेत्र इथं तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये थांबलेल्या नागरिकांना आकाशवाणीच्या माध्यमातून संबोधित केलं होतं. आज दिल्ली इथं आकाशवाणी मुख्यालयात यानिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
****
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या एका प्रवाशाकडून २ कोटी २७ लाख रुपये किमतीचं तीन किलो सोनं काल जप्त करण्यात आलं. सीमाशुल्क कायद्यानुसार या प्रवाशाला अटक करण्यात आली.
****
संत शिरोमणी नामदेव यांच्या ७५४ व्या जन्म सोहळ्यानिमित्त त्यांचे जन्मस्थान असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या नर्सी नामदेव इथं आज ५००१ पणत्या लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. नर्सी नामदेव इथं पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावल्या. भाविकांमधून अशोक घोंगडे आणि वंदना घोंगडे या दांपत्यास नामदेवाच्या वस्त्र समाधीची महापूजा करण्याचा मान मिळाला.
****
गेल्या आठवड्यापासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमसाठी दर ७५ हजारांच्या आसपास आहे. तर चांदीचा दर ९४ हजारांवरुन आता ८९ हजारांवर येऊन स्थिरावला आहे. दरम्यान, शेअर बाजाराची आज चांगली सुरुवात झाली. सेन्सेक्समध्ये १४८ अंकांची वाढ होऊन ७९ हजार ६४४ अंकांवर स्थिरावला, तर निफ्टी ८४ अंकांनी वाढून २४ हजार २२५ अंकांवर स्थिरावला.
****
बुद्धिबळात ग्रँड मास्टर अरविंद चिथंबरमनं अमेरिकन ग्रँड मास्टर लेव्हॉन अरोनियनचा एका अत्यंत चुरशीच्या लढतीत पराभव करून चेन्नई ग्रँड मास्टर्सचं विजेतेपद पटकावलं. तर, स्पर्धेत एकही लढत गमावली नसलेल्या ग्रँडमास्टर वी प्रणवला चॅले��जर्स पुरस्कार मिळाला आहे.
****
0 notes
Text
Gold Silver Rate Today : सोन्याची लगीनघाई, चांदी माघारी फिरली, किंमती काय
0 notes
Text
Share Market update: अरे बापरे हे काय ! Adani Group च्या Shareholder चे वाढले टेन्शन पहा अदानी ग्रुप चे पूर्ण 10 शेअर घसरले.
Share Market update : अदानी एंटरप्रायझेस, अदानी पॉवर, अदानी ग्रीन आणि इतर अदानी समभागांमध्ये यूएसमधील नियामक छाननी दरम्यान घसरण दिसून आली अदानी समूहाचे शेअर्स शुक्रवारी नकारात्मक क्षेत्रात संपले , Adani Enterprises सुमारे 7 टक्क्��ांनी घसरले, व्यापक बाजारपेठेतील कमकुवत प्रवृत्तीच्या अनुषंगाने, युनायटेड स्टेट्सचे अधिकारी आपल्या समुहाच्या अमेरिकन समभागाकडे केलेल्या निवेदनांचा शोध घेत…
View On WordPress
0 notes
Text
२०२३-२४ चा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच सादर केला. हा अर्थसंकल्प २०२४ च्या लोकसभा आणि २०२३ मधील विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा ठरणारा आहे. कारण, मोदी सरकारचं भवितव्यचं हा अर्थसंकल्प ठरवणार आहे. एकीकडे देश आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर उभा असताना तसंच डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण होत असताना, देशाच्या अर्थव्यवस्थेला उभारी देण्याचं काम हा अर्थसंकल्प करत असतो, त्यामुळेच हा अर्थसंकल्प मोदी सरकारचं भवितव्य ठरवणारा आहे,असं बोललं जातंय.पण हा अर्थसंकल्प का खास आहे यावर आज आपण चर्चा करणार आहोत.
0 notes
Text
कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत
कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत
कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत आहेत. 10 हजारांपेक्षा अधिकचा दर मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. कारण कापसाच्या दरात घसरण झाली आहे.जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील शेतकरी विक्रीसाठी कापूस बाजारात आणत आहेत. मात्र, अचानक कापसाचे दर गडगडल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. सध्या कापसाला सरासरी आठ ते साडेआठ हजार…
View On WordPress
0 notes
Video
youtube
लासलगाव कांद्याच्या भावात घसरण झाल्याने कांदा लिलाव पाडला बंद..
1 note
·
View note
Text
झोमॅटो स्टॉकची किंमत विक्रमी घसरल्याने, ट्विटरवर मीम्स वाढले
झोमॅटो स्टॉकची किंमत विक्रमी घसरल्याने, ट्विटरवर मीम्स वाढले
झोमॅटोच्या शेअरने लिस्ट झाल्यापासून 60% पेक्षा जास्त मूल्य गमावले आहे. नवी दिल्ली: प्रवर्तक, कर्मचारी आणि इतर गुंतवणूकदारांसाठी एक वर्षाचा शेअर लॉक-इ�� कालावधी संपल्याने झोमॅटो, भारतीय खाद्य वितरण क्षेत्रातील दिग्गज कंपनीचे शेअर्स सोमवारी 14% पेक्षा जास्त विक्रमी नीचांकी पातळीवर आले. गेल्या वर्षी 23 जुलै रोजी तारकीय शेअर बाजारात पदार्पण करणाऱ्या Zomato ने तेव्हापासून 60% पेक्षा जास्त मूल्य गमावले…
View On WordPress
#Zomato#zomato memes#Zomato क्रॅश#Zomato शेअर बाजार#zomato शेअर्सच्या किमती#Zomato साठा#Zomato स्टॉक बातम्या#Zomato स्टॉकच्या किमतीत घसरण#झोमॅटोचे शेअर घसरले#शेअर बाजार
0 notes
Text
कांदा दरात ७२५ रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना ३६ कोटींचा तोटा
https://bharatlive.news/?p=185110 कांदा दरात ७२५ रुपयांची घसरण, शेतकऱ्यांना ३६ कोटींचा तोटा
गेल्या दोन ...
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 05 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०५ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
जग आज अनेक आघाड्यांवर अस्तित्वाची लढाई लढत आहे, अशावेळी बुद्धांची शिकवण मानवजातीला उपयोगी पडते, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. राष्ट्रपती आज दिल्ली इथं आयोजित पहिल्या आशिया बुद्धीस्ट परिषदेला संबोधित करत होत्या. बौद्ध धर्माचा शांतता आणि अहिंसेचा संदेश आज जगभर जाण्याची आवश्यकता असल्याचं राष्ट्रपती म्हणाल्या.
राजकीय नेत्यांच्या प्रचारसभांना आजपासून राज्यात सुरुवात होत आहे. भाजप नेते, उपमुख्यमंत्री आणि दक्षिण पश्चिम नागपूरचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथून जनसंपर्क रॅली काढून प्रचाराचा प्रारंभ केला. पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघ���चे महाविकास आघाडीचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार विकास ठाकरे हे देखील नागपूर इथे जनआशीर्वाद यात्रा काढून प्रचाराची सुरुवात करत आहेत. सायंकाळी साडे चार वाजता ही यात्रा सुरु होईल. दरम्यान उत्तर नागपूरचे आमदार डॉ नितीन राऊत देखील आज शहराच्या विविध भागात प्रचार करणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज विदर्भात प्रचार दौऱ्यावर आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि राळेगाव मतदारसंघातील उमेदवारांसाठी त्यांच्या जाहीर सभा होणार आहेत. राळेगाव इथं चार वाजता मनसेचे उमेदवार अशोक मेश्राम यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला राज ठाकरे संबोधित करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी सहा वाजता मनसेचे वणी इथले उमेदवार राजू उंबरकर यांच्या प्रचारार्थ राज ठाकरे यांची शासकीय मैदानावर जाहीर सभा होणार आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या नागपूर दौऱ्यावर येणार आहेत.
भंडारा विधानसभा मतदार संघातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार नरेंद्र पहाडे तसंच काँग्रेसच्या उमेदवार पूजा ठवकर यांनी देखील शहरात रॅली काढून प्रचार सुरु केला आहे. शहरात अनेक ठिकाणी पहाडे यांच्या प्रचारार्थ पथनाट्य सादर करण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातल्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार संजय पुराम यांनी ही प्रचाराला सुरवात केली आहे. संजय पुराम यांना भारतीय जनता पक्षाने सलग तिसऱ्यांदा निवडणूक लढण्याची संधी दिली आहे.
निवडणूक निरीक्षक गिरीशा पी. एस. यांनी अकोला जिल्हा निवडणूक कार्यालयातील, तसंच निवडणूक निर्णय कार्यालयांतील विविध कक्षांची पाहणी करून कामकाजाचा आज आढावा घेतला. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रत्येक तरतुदीचे काटेकोर पालन करावं, असे निर्दे�� त्यांनी यावेळी दिले.
रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग-मुरुड मतदारसंघाचे भाजपचे पदाधिकारी दिलीप भोईर यांचं पक्षातून ६ वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. महायुतीचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्याविरुद्ध दिलीप भोईर मैदानात उतरले होते. पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनंतर देखील भोईर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला नाही, त्यामुळं त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती भाजप खासदार धैर्यशील पाटील यांनी दिली.
प्राप्तीकर कायद्याच्या समीक्षेसंदर्भात आयकर विभागाला गेल्या एक महिन्याच्या कालावधीत साडे सहा हजारांहून अधिक सूचना पाप्त झाल्या आहेत. आयकर अधिनियम १९६१ संदर्भात या सूचना मागवण्यात आल्या होत्या. या अधिनियमासंदर्भात विचारविनिमयासाठी आयोजित बैठकीत काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची अध्यक्ष म्हणून उपस्थिती होती. राजस्व सचिव संजय मलहोत्रा, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष रवि अग्रवाल यांच्यासह अनेक उच्चपदस्थ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आयकर अधिनियमाच्या विविध गटांच्या समीक्षेसाठी यावेळी तज्ञांच्या २२ विशेष उपसमित्या यावेळी गठीत करण्यात आल्या.
शेअर बाजारातील व्यवहाराला आजही घसरणीनं सुरुवात झाली. एनएसई-निफ्टी ७९ अंकांच्या घसरणीसह २३१९७ वर उघडला, तर सेन्सेक्स २४० अंकांनी घसरुन ७८५४२ पर्यंत आला. दरम्यान, सोने आणि चांदीच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण झालेली पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमसाठी ७८, ६१० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दहा ग्रॅमसाठी ७८, ४४० रुपये एवढा दर आहे. तर, चांदीचा दर ९४, ४९० रुपये किलो आहे.
छठ महापर्वाला आज नहाय खायनं प्रारंभ होत आहे. सूर्य उपासनेच्या चार दिवसांच्या या अनुष्ठानात उद्या संध्याकाळी शाम खरना हा विधी संपन्न होईल. या उत्सवात तिसऱ्या दिवशी संध्याकाळी असताचलगामी सूर्य आणि चौथ्या दिवशी सकाळी सूर्योदयसमयी पवित्र नद्यांच्या किनारी सूर्याला अर्घ्य अर्पण करुन पूजा करण्यात येते आणि महोत्सवाची सांगता होते.
0 notes
Text
इलेक्ट्रिक सायकलची किंमत: दिल्ली सरकारच्या निर्णयानंतर आता स्वस्तात ई-सायकल खरेदी, किंमत 15000 रुपयांनी कमी होणार
इलेक्ट्रिक सायकलची किंमत: दिल्ली सरकारच्या निर्णयानंतर आता स्वस्तात ई-सायकल खरेदी, किंमत 15000 रुपयांनी कमी होणार
नवी दिल्ली. दिल्लीत नवीन ईव्ही पॉलिसी लागू झाल्यानंतर आता इलेक्ट्रिक सायकलच्या किमतीत मोठी घट होणार आहे. जर तुम्ही इलेक्ट्रिक सायकल घेण्याचा विचार करत असाल तर आणखी काही दिवस वाट पहा. कारण, जी ई-सायकल तुम्हाला आता 31 हजार रुपयांमध्ये मिळत आहे, काही दिवसांनी तीच ई-सायकल तुम्हाला 16 हजार रुपयांमध्ये मिळू लागेल. ई-सायकल बनवणाऱ्या Hero Lectro ने पुढील काही दिवसात त्यांच्या पाच उत्पादनांच्या किमती…
View On WordPress
#इलेक्ट्रिक वाहन#इलेक्ट्रिक सायकल#इलेक्ट्रिक सायकलची किंमत#इलेक्ट्रिक सायकलच्या किमतीत मोठी घसरण#ई-सायकलची किंमत#ईव्ही#किंमत 15000 रुपयांपर्यंत कमी होईल#दिल्ली सरकार#दिल्लीतील ईव्ही पॉलिसी#नवीन EV धोरण#विद्युत गतिशीलता#हिरो लेक्ट्रो
0 notes
Text
पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण | Petrol and Diesel Price down today |
पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण | Petrol and Diesel Price down today |
[ad_1]
मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत एक दिवस स्थिरता आल्यानंतर गुरूवारी सकाळी घसरण पाहायला मिळाली. या अगोदर सतत सहा दिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात बदल पाहायला मिळाले. गेल्या महिन्यात दरांमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली.
सप्टेंबर महिन्यात रेकॉर्ड ब्रेक वाढ झाली होती. पण ऑक्टोबर महिन्याच्या अगदी सुरूवातीपासूनच दरात घसरण पाहायला मिळाली. 3 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर पर्यंत पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात…
View On WordPress
0 notes
Text
जीडीपीच्या जागतिक क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण
जीडीपीच्या जागतिक क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण
जागतिक बँकेनं जाहीर केलेल्या आर्थिक वर्ष २०१८ मधील आकडेवारीनुसार जीडीपीच्या जागतिक क्रमवारीत भारतीय अर्थव्यवस्थेची घसरण होऊन ती सातव्या क्रमांकावर आली आहे. याआधी भारत पाचव्या क्रमांकावर होता. आता भारतीय अर्थव्यस्थेची दोन स्थानांनी घसरण झाली आहे.
२०१७ मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा जीडीपी २.६५ इतका होता. जगातील सर्वात मोठी पाचवी अर्थव्यवस्था होण्याचा मान भारतानं मिळवला होता. त्यावेळी ब्रिटनचा जीडीपी…
View On WordPress
0 notes
Video
youtube
लासलगाव कांद्याच्या भावात घसरण झाल्याने कांदा लिलाव पाडला बंद..
0 notes
Text
तेजीला विराम ; सेन्सेक्स-निफ्टी विक्रमी स्तरावरुन माघारी
तेजीला विराम ; सेन्सेक्स-निफ्टी विक्रमी स्तरावरुन माघारी
[ad_1]
मुंबई : तेजीच्या लाटेवर स्वार झालेल्या सेन्सेक्स आणि निफ्टीतील घोडदौडीला आज ब्रेक लागला आहे. सकाळच्या सत्रात २०० अंकांची झेप घेऊन नव्या विक्रमी स्तरावर गेलेल्या सेन्सेक्समध्ये सध्या १७० अंकांची घसरण झाली आहे. तो ४४३६० अंकांवर ट्रेड करत आहे. ४० अंकांच्या घसरणीसह १३०१४ अंकांवर ट्रेड करत आहे.
आज बाजार सुरु होताच दोन्ही निर्देशांकांनी तेजीने सुरुवात केली. सेन्सेक्स २७८ अंकांनी वधारला होता.…
View On WordPress
0 notes
Text
कोल्हापूर : चांदी दरात आठ दिवसात 7 हजारांची घसरण
https://bharatlive.news/?p=160068 कोल्हापूर : चांदी दरात आठ दिवसात 7 हजारांची घसरण
हुपरी : अमजद नदाफ ...
0 notes