#गुणगौरव
Explore tagged Tumblr posts
Text
सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यातर्फे आदर्श शिक्षक वैशाली खाडे यांना विशेष गुणगौरव पुरस्काराने सन्मानित.
सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यातर्फे आदर्श शिक्षक वैशाली खाडे यांना विशेष गुणगौरव पुरस्काराने सन्मानित.
सैनिक कल्याण विभाग पुणे यांच्यातर्फे आदर्श शिक्षक वैशाली खाडे यांना विशेष गुणगौरव पुरस्काराने सन्मानित. Go to Source
View On WordPress
#आदर्श#आहे#कल्याण#खाडे#गंभीर#गुणगौरव#पुणे#पुरस्काराने#मुद्दा#यांच्यातर्फे#यांना#विभाग#विशेष#वैशाली#शिक्षक#सन्मानित.#सैनिक
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 06 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
शिक्षकी पेशा हे मानव निर्माणाचं पवित्र अभियान-राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपतींचं प्रतिपादन-राज्यशासनाचे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान
मराठवाडा आणि विदर्भासह राज्यात एक लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या चार प्रकल्पांना ��ान्यता
राज्यात नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या काला��धीत झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी ३०७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर
कोकणातलं अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता
आणि
लातूर मधला मराठवाडा रेल्वे डबे निर्मिती कारखाना कार्यान्वित
****
शिक्षकी पेशा ही फक्त नोकरी नाही, तर मानव निर्माणाचं पवित्र अभियान असल्याचं प्रतिपादन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. काल शिक्षक दिनी, नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमात देशभरातल्या ८२ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले कलाशिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्यातले मंतय्या बेडके यांचा समावेश आहे. ५० हजार रुपये, रौप्य पदक आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मंतय्या बेडके यांनी, या पुरस्काराबाबतच्या आपल्या भावना या शब्दांत व्यक्त केल्या..
‘‘आमच्या शाळेमध्ये शाळा डिजीटल करणे, विद्यार्थ्यांना मातृभाषेकडून प्रमाण भाषेकडे नेणे, आणि शाळेमध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे, हा जो आमचा निविण्यपूर्ण उपक्रमाचा उद्देश होता आणि तो उद्देश सफल झाला.’’
****
मुंबई इथं क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार काल प्रदान करण्यात आले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलतांना, शिक्षकांच्या योगदानाशिवाय देश प्रगतीपथावर जाऊ शकत नसल्याची भावना व्यक्त केली. या कार्यक्रमात १०९ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १२८ शाळांना काल शिक्षक दिनी नवोपक्रमशील तसंच गुणवत्तापूर्ण शाळा पुरस्कार प्रदान करण्यात आले.
****
राज्यात एक लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या, उच्च तंत्रज्ञानावर आधारित चार विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे सुमारे २९ हजार रोजगार निर्माण होणार आहेत. छत्रपती संभाजीनगर इथं २१ हजार २७३ कोटी रुपये गुंतवणुकीच्या वाहन प्रकल्पातून १२ हजार रोजगार निर्माण होतील. सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प पनवेलमध्ये होणार असून, यात एकूण ८३ हजार ९४७ कोटी रुपये गुंतवणुक आणि १५ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.
पुण्यातल्या इलेक्ट्रीक वाहन निर्मिती प्रकल्पात एकूण १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून, एक हजार रोजगार निर्माण होतील, तर अमरावती जिल्ह्यात नांदगाव इथं वस्त्रोद्योगात १८८ कोटी एवढी गुंतवणूक आणि ५५० रोजगार निर्मिती होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण आणि गंगापूर इथं जिल्हा अतिरिक्त न्यायालयाची स्थापना, तर हिंगोली इथं स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. काल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. पुणे-छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा, अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच वाटप, थकबाकी अदा करणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याज माफी, विहिरी-शेततळे-वीज जोडणीसाठी भरीव अनुदान, तसंच बीड जिल्ह्यात धारुर तालुक्यातल्या सुकळी या गावाचं विशेष भाग म्हणून पुनर्वसन करण्याच्या निर्णयाला काल राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
यंदा राज्यात १२१ टक्के पाऊस झाला, तसंच १०२ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उजनी, कोयना आणि जायकवाडीसह मोठी धरणे २०१८ नंतर प्रथमच १०० टक्के भरत असल्याची माहिती जलसंपदा विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत दिली. गेल्या वर्षी याच सुमारास या धरणांमध्ये सुमारे ६५ टक्के पाणी साठा होता.
****
राज्यात नोव्हेंबर २०२३ ते जुलै २०२४ या कालावधीत अवकाळी पाऊस तसंच अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी ३०७ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला. हा निधी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याचं, या निर्णयात म्हटलं आहे.
****
राज्यातल्या विविध देवस्थानांच्या २७५ कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांना मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीचं औचित्य साधून महानुभाव पंथाच्या रिद्धपूर, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, पांचाळेश्वर या देवस्थानांसह ग्रामीण भागातल्या आठ देवस्थानांच्या विकास आराखड्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
****
कोकणातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कोकण खोऱ्यातून एकूण ५४ पूर्णांक ७० टीएमसी अतिरिक्त पाणी मराठवाड्यासाठी वळवणं शक्य असून, याकरता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ६१ कोटी ५२ लाख रुपये किमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पा��ुळे मराठवाड्यात सुमारे दोन लाख ४० हजार हेक्टर क्षेत्रास सिंचन, पेयजल तसंच औद्योगिक वापरासाठी पाणी उपलब्ध होणार आहे.
****
दिव्यांग प्रवाशांना राज्य परिवहन महामंडळ - एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यानंतर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबधित वाहकाची असणार आहे. दिव्यांगांना बसमध्ये चढता-उतरतांना चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी असे निर्देशही देण्यात आले आहेत.
****
चालू शैक्षणिक वर्षामधल्या विविध शैक्षणिक संस्थांमधल्या प्रवेशासाठी इतर मागास प्रवर्गाचं जात प्रमाणपत्र प्राप्त झालेल्या उमेदवारांना सद्य:स्थितीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटनांकडून प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला.
****
लातूर इथला मराठवाडा रेल्वे डबे निर्मिती कारखाना आता कार्यान्वित झाला आहे. या कारखान्याला वंदे भारत रेल्वे गाड्यांचे शयनयान व्यवस्था असलेले १ हजार ९२० डबे बनवण्याचं आणि पुढील ३५ वर्ष त्यांच्या देखभालीचं काम सोपवण्यात आलं आहे.
****
जातीव्यवस्था कायम राखण्याचा भारतीय जनता पक्षाचा उद्देश असल्याचा आरोप, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यात कडेगाव इथं माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांच्या स्मारकाचं तसंच पुतळ्याचं अनावरण काल गांधी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान, राहुल गांधी यांनी काल नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन, सांत्वन केलं.
****
आगामी गौरी-गणपती सणानिमित्त पात्र शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा उपलब्ध करून देण्यात आला आहे. सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटूंब, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातले सर्व जिल्हे तसंच नागपूर विभागातल्या वर्धा, अशा १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतल्या केशरी शेतकरी शिधा पत्रिकाधारकांसाठी आनंदाचा शिधा देण्यात येतो. पात्र शिधापत्रिका धारकांनी हे शिधासंच हस्तगत करावेत, असं आवाहन परभणीच्या जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयानं केलं आहे.
****
आगामी गणेश उत्सव आणि ईद- ए -मिलाद हे दोन्ही सण साज���े करतांना सर्व धर्मीयांनी परस्पर सौहार्द कायम ठेवत एकोप्याने, आनंदाने सण साजरे करावेत, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. शांतता समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते.
****
पुणे महानगर परिवहन मर्यादितच्या व्यवस्थापकीय संचालक तसंच बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांना स्कॉच या नामंकित संस्थेचा "स्कॉच २०२४ राष्ट्रीय पुरस्कार" जाहीर झाला आहे. बीड जिल्ह्यात बाल विवाह निर्मुलन कार्यक्रम उत्कृष्टपणे राबवल्याबद्दल मुंडे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. येत्या २२ सप्टेंबरला नवी दिल्लीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या मंगरूळ इथल्या अंगणवाड्यांच्या परिसरात अंगणवाडी सेविका आणि गावकऱ्यांच्या मदतीने परसबाग उभारण्यात आली आहे. या परसबागेतल्या विविध भाज्या आणि फळे अंगणवाडीत शिकणाऱ्या लहानग्यांना पोषण आहारात दिले जातात. यामुळे बालकांमधल्या कुपोषणाचं प्रमाण कमी होण्यास मदत होत असल्याचं, पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंदणी तातडीने करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. जे शेतकरी ई-पीक पाहणी अॅप प्रणालीवर त्यांचा पीक पेरा नोंदणी करतील, त्यांनाच पीक कर्ज, पीक विमा, नुकसान भरपाईसह इतर शासकीय योजनाचा लाभ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे अर्ज ग्रामपंचायतीत जमा करुन समाजकल्याण विभागाकडे देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दहा हजार अर्ज प्राप्त झाले असून, यापैकी दीड हजारावर अर्ज छाननीअंती पात्र ठरले आहेत.
****
0 notes
Text
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर
मुंबई, दि. २ : सन २०२३-२४ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी १०९ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. येत्या ५ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित होणाऱ्या कार्यक्रमात या शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी अभिनंदन केले आहे. समाजाची निःस्वार्थ भावनेने आणि…
0 notes
Video
youtube
मन्सूरी पिंजारी समाजाकडून विद्यार्थी गुणगौरव व मार्गदर्शन सोहळा..
0 notes
Text
टिळक रोडवरील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात श्री. मिलिंद सबनीस लिखित ‘वंदे मास्तरम्’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा आणि ‘मास्टर कृष्णराव गुणगौरव पुरस्कार’ प्रदान करण्याच्या समारंभात उपस्थित होतो. यावेळी उपस्थितांशी संवाद साधला!
���वंदे मातरम्’ हे गीत स्वतंत्र भारताचे राष्ट्रगीत व्हावे, याकरिता मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांनी सांगीतिक लढा दिला होता.
0 notes
Text
News: Students were gifted for their performance in Shirur, Maharashtra, India.
शिरूर तालुक्यातील गुनाट येथे गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षक यांचा सन्मान व गुणगौरव ! https://www.shirurvarta.in/?p=10736
#think about it#think for yourselves#tumblr milestone#stranger things#1 year tumblrversary#male thinspi#writer things#desi things#thinking#girly things
0 notes
Photo
गिर्ये-बांदेवाडी येथे विद्यार्थी गुणगौरव संपन्न मसुरे : सरस्वती साईश्वरी विवाह संस्थे तर्फे देवगड तालुक्यातील गिर्ये बांदेवाडी येथील १० वी, १२ वी, व पदवीधर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले.
0 notes
Photo
#अभिनव युवा प्रतिष्ठाण संचलित अभिनव इंटरनॅशनल स्कुलचा माध्यमातुन शाळेतील बालकांचा त्यांचा विशेष कलागुणांना प्रोत्साहन मिळावे तसेच त्यांचे गुणगौरव करण्यासाठी वार्षीक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. #याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कल्याण पोकळे अध्यक्ष -नेताजी सुभाषचंद्र भोस शिक्षण संस्था हे लाभले होते. यानिमीत्ताने अभिनव इंटरनॅशनल स्कुलचे #विश्वस्त मोहनराव लाढाणे साहेब, #प्रमुख कार्यवाह तथा मुख्याध्यापिका अमृता भगत-शिंदे मॅडम मंचावर उपस्थित होते. यावेळी पत्रकार भाऊसाहेब तोरडमल, #नगरसेविका हर्षदा अमृत काळदाते, पालक तांदळे साहेब यांचावतीने उपस्थितांचा सन्मान करण्यात आला. तसेच या कार्यक्रमाचे #सुत्रसंचालन श्रीमती सोनिया रणसिंग व सारा सय्यद यांनी केले असून सहकारी शिक्षिका श्रीमती पूजा गूंजाळ व ज्योती थोरात यांच्या सहकार्याने कार्यक्रम अतिशय उत्कृष्ट पद्धतीने पार पडला . (at Abhinav International School) https://www.instagram.com/p/B7RHyU9J42y1Wr3EUN2wqQOI1gpcnSzeZIJdg00/?igshid=1ju79vspha8wb
1 note
·
View note
Text
विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे न लादता मुक्तपणे वावरू द्या : जेष्ठ शास्त्रज्ञ ओमप्रकाश कुलकर्णी
विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे न लादता मुक्तपणे वावरू द्या : जेष्ठ शास्त्रज्ञ ओमप्रकाश कुलकर्णी
`सीएचएमई` चा गुणगौरव सोहळा उत्साहात नाशिकः विद्यार्थ्यांवर कुटूंबातील सदस्यांनी आपल्या अपेक्षांचे ओझे कधीही लादता कामा नये, उलट त्यांच्या सुप्तकलागुणांना वाव कसा मिळेल यादृष्टीने प्रयत्न करावे, त्यांना मुक्तपणे वावरू द्यावे. त्यातूनच हवी असलेली संकल्पपुर्ती होण्यास निश्चित मदत होईल, अशी सूचना जेष्ठ शास्त्रज्ञ व तंत्रज्ञान सल्लागार डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांनी केली. सेंट्रल हिंदु मिलीटरी…
View On WordPress
0 notes
Text
विद्यार्थ्यांनी आवडत्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करावे - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
विद्यार्थ्यांनी आवडत्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करावे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
ठाणे दि. 15 (जिमाका) : प्रत्येक विद्यार्थ्यांची आवड निवड ही वेगवेगळी असते.त्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. आर्य समाज ,वाशी यांच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी राजस्थानमधील खासदार स्वामी सुमेधानंद सरस्वती, विवेकानंदजी परिव्रजक, राजकुमार…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 05 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
शिक्षकी पेशा हे मानव निर्माणाचं पवित्र अभियान-राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपतींचं प्रतिपादन-राज्यशासनाचे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार प्रदान
कोकणातलं अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता
मराठवाडा आणि विदर्भासह राज्यात १ लाख कोटी रुपये गुंतवणुकीच्या चार प्रकल्पांना मान्यता
आणि
आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
****
शिक्षकी पेशा ही फक्त नोकरी नाही, तर मानव निर्माणाचं पवित्र अभियान असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज शिक्षक दिनी, नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्त्रियांचा सन्मान राखण्याची शिकवण देण्याची आवश्यक��ा राष्ट्रपतींनी नमूद केली.
विद्यार्थ्यांची कामगिरी खालावत असेल, तर शिक्षण व्यवस्था आणि शिक्षकांची जबाबदारी वाढत असल्याचं मत, राष्ट्रपतींनी व्यक्त केलं. त्या म्हणाल्या –
कोई बच्चा यदी अच्छा प्रदर्शन नही कर पाता है तो, इसमे शिक्षण व्यवस्था और शिक्षकों की ज्यादा जिम्मेदारी बनती है। किसी भी शिक्षा प्रणाली की सफलता में सबसे महत्वपूर्ण भूमिका शिक्षकों की होती है। शिक्षक की केवल एक नौकरी नही है, ये मानव निर्माण का पवित्र अभियान है। शिक्षकों को प्रत्येक बच्चे की नैसर्गिक प्रतिभा को पहचानकर उसे उसी तरह की मदत देना चाहीये और आगे बढाना चाहिये।
या कार्यक्रमात देशभरातल्या ८२ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातले कलाशिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्यातले मंतैय्या बेडके यांचा समावेश आहे. ५० हजार रुपये, रौप्य पदक आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांना अभिवादन करत, शिक्षक दिनानिमित्त सर्व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. कोवळ्या मनाला घडवणाऱ्या सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस, असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हट���ं आहे.
****
मुंबई इथं क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार आज प्रदान करण्यात आले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष विधीज्ञ राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलतांना, शिक्षकांच्या योगदानाशिवाय देश प्रगतीपथावर जाऊ शकत नाही. शिक्षक दिन हा शिक्षकांचं समर्पण, योगदान आणि मार्गदर्शनाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याची भावना व्यक्त केली.
तर केसरकर यांनी यावेळी बोलतांना, राज्यातल्या शिक्षणाचा दर्जा वाढून गुणवंत महाराष्ट्र घडवण्यात शिक्षकांचे योगदान मोलाचे असेल, यासाठी शासनामार्फत विद्यार्थी, शिक्षक आणि शाळांना सर्व सोयी सुविधा पुरविण्यात येत असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमात १०९ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
दिव्यांग प्रवाशांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ एसटी मध्ये सर्व प्रकारच्या बसमध्ये आरक्षित आसन कायमस्वरूपी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिव्यांग प्रवासी कोणत्याही थांब्यावर बसमध्ये चढल्यानंतर त्यांना ते आसन तातडीने उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी संबंधित वाहकाची असणार आहे. दिव्यांगांना बसमध्ये चढणे तसंच उतरतांना चालक वाहकांनी सर्वतोपरी मदत करावी असे निर्देश संबंधित विभागाकडून देण्यात आले आहेत.
****
कोकणातील अतिरिक्त पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. जलसंपदा विभागाकडून आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही माहिती देण्यात आली. कोकण खोऱ्यातून एकूण ५४ पूर्णांक ७० टीएमसी अतिरिक्त पाणी वळवणे शक्य असून, याकरिता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ६१ कोटी ५२ लाख रुपये किमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्यात सुमारे दोन लाख ४० हजार हेक्टर आणि कोकणातील सुमारे ३५ हजार हेक्टर क्षेत्रास सिंचन, पेयजल तसंच औद्योगिक वापरासाठी पाणी उपलब्ध होणार आहे
****
राज्यातील मराठवाडा आणि विदर्भासह पुणे तसंच पनवेल इथं १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित ४ विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या प्रकल्पांमुळे राज्यात सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रीक वाहन निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक, तसंच सुमारे २९ हजार रोजगार निर्मिती होणार आहे, यामुळे महाराष्ट्राची ओळख ही इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रामध्ये अग्रेसर राज्य अशी होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, विधी आणि न्याय विभागा अंतर्गत, पैठण आणि गंगापूर इथं जिल्हा अतिरिक्त न्यायालयाची स्थापना तर हिंगोली इथं स्वतंत्र न्यायिक जिल्हा न्यायालय स्थापन करण्यात येणार आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासोबतच पुणे-छत्रपती संभाजीनगर सध्याच्या राष्ट्रीय महामार्गाची सुधारणा करण्यात येईल, अंगणवाडी केंद्रांना सौर ऊर्जा संच देण्यात येतील, थकबाकी देणाऱ्या कुक्कुटपालन संस्थांना दंडनीय व्याजाची रक्कम माफ करण्यात येईल, विहिरी, शेततळे, वीज जोडणीसाठी भरीव अनुदान देण्यात येईल, अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव तालुक्यातल्या सोनेसांगवी पिंगला सहकारी सूतगिरणीस शासकीय अर्थसहाय्य, तसंच बीड जिल्ह्यात धारुर तालुक्यातल्या सुकळी या गावाचं विशेष भाग म्हणून पुनर्वसन करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
राज्यात उजनी, कोयना आणि जायकवाडीसह मोठी धरणे २०१८ नंतर प्रथमच १०० टक्के भरत असल्याची माहिती जलसंपदा विभागानं मंत्रिमंडळ बैठकीत दिली. गेल्या वर्षी याच सुमारास या धरणांमध्ये सुमारे ६५ टक्के पाणी साठा होता.
****
श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून महानुभाव पंथाच्या रिद्धपूर, भिष्णूर, जाळीचा देव, पोहीचा देव, पांचाळेश्वर या देवस्थानांसह राज्याच्या ग्रामीण भागातील ८ देवस्थानांच्या सुमारे २७५ कोटींच्या विकास आराखड्यांना आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
****
महाराष्ट्र इमारत तसंच इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या नोंदणी आणि नूतनीकरणासह सर्व सुविधा एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यासाठी राज्यात तालुका कामगार सुविधा केंद्रांचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. याप्र��ंगी बांधकाम कामगारांच्या सुविधेक���िता तयार करण्यात आलेल्या माहिती पुस्तिकेचं प्रकाशनही करण्यात आले.
****
महानुभाव पंथाचे संस्थापक, चक्रधर स्वामी यांची आज जयंती. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात चक्रधर स्वामींना आदरांजली अर्पण केली आहे.
****
जातीव्यवस्था कायम राखण्याचा भारतीय जनता पक्षाचा उद्देश असल्याचा आरोप लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला आहे. सांगली जिल्ह्यात कडेगाव इथं माजी मंत्री दिवंगत पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर ते आज बोलत होते.
दरम्यान, राहुल गांधी यांनी आज नांदेड जिल्ह्यात नायगाव इथं काँग्रेसचे दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन, सांत्वन केलं. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्ष नेते विजय वड्डेट्टीवार आदी नेते उपस्थित होते.
****
मुंबईत मालाड इथं आज एका २३ मजली निर्माणाधीन इमारतीचा २० साव्या मजल्यावरील छताच्या काही भाग कोसळला. यात घटनेत तीन जणांचा मृत्यू ��ाला तर तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
****
हिंगोली इथं आदिवासी समाजाच्या वतीनं विविध मागण्यांसाठी आज मोर्चा काढण्यात आला. राज्यात विविध शासकीय कार्यालयांमधील अनुशेषाची ५५ हजारांवर असलेली रिक्त पदे तातडीने भरावीत, १२ हजार ५०० अधिसंख्य पदं विशेष मोहिमेद्वारे भरावी, यासह अन्य मागण्या यावेळी करण्यात आल्या. माजी आमदार डॉ. संतोष टार्फे, आदिवासी युवक कल्याण संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सतीश पाचपुते यांच्या नेतृत्वात, शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला तसंच मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. हिंगोली तालुक्यासह, कळमनुरी, सेनगाव, औंढा नागनाथ, वसमत तालुक्यातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.
****
जालना जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणीची नोंदणी तातडीने करावी, असं आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केलं आहे. जे शेतकरी ई-पीक पाहणी अॅप प्रणालीवर त्यांचा पीक पेरा नोंदणी करतील, त्यांनाच पीक कर्ज, पीक विमा, नुकसान भरपाईसह इतर शासकीय योजनाचा लाभ असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
****
सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे. धरणातून ५२ हजार ५४२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणात पाण्याची आवक मंदावली आहे.
****
0 notes
Text
विद्यार्थ्यांनी आवडत्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करावे - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
विद्यार्थ्यांनी आवडत्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करावे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
ठाणे दि. 15 (जिमाका) : प्रत्येक विद्यार्थ्यांची आवड निवड ही वेगवेगळी असते.त्यांनी त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उत्कृष्ट काम करावे, असे प्रतिपादन राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. आर्य समाज ,वाशी यांच्या वतीने आयोजित विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्यामध्ये श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी राजस्थानमधील खासदार स्वामी सुमेधानंद सरस्वती, विवेकानंदजी परिव्रजक, राजकुमार…
View On WordPress
0 notes
Video
youtube
लोकगीत शैक्षणिक प्रसारक संस्था नाशिक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
0 notes
Text
आमदार राजाभाऊ राऊत यांच्या हस्ते बार्शी शहर व तालुक्यातील शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न
0 notes
Text
6 रोजीच्या कणकवलीतील स्नेह मेळाव्यास युवा उद्योजक सुनील नारकर यांची उपस्थिती
6 रोजीच्या कणकवलीतील स्नेह मेळाव्यास युवा उद्योजक सुनील नारकर यांची उपस्थिती
कणकवली : रविवार, ६ नोव्हेंबर रोजी कणकवलीमध्ये मराठा मंडळ हॉल सभागृहात होणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ शाखा कणकवलीच्या विद्यार्थी गुणगौरव व स्नेहमेळाव्यासाठी मुंबईतील प्रसिद्ध युवा उद्योजक वैभववाडी गावचे सुपुत्र सुनील नारकर हे उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत. शून्यातून विश्व निर्मिती करणारे वैभववाडीतील भुईबावडा सारख्या दुर्गम भागातून जाऊन मुंबई डोंबिवलीत आपले खास स्थान…
View On WordPress
0 notes
Text
माळी समाजाचा जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणगौरव २० ऑगस्टला
माळी समाजाचा जिल्हास्तरीय विद्यार्थी गुणगौरव २० ऑगस्टला
नाशिक : माळी समाज सेवा समितीच्या वतीने संत सावता माळी यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेला माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत व माजी नगरसेवक बाळासाहेब जानमाळी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत,माजी नगरसेवक बाळासाहेब जानमाळी,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष उत्तमराव तांबे,ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष पी.एम.सैनी,माळी…
View On WordPress
0 notes