#गावातील
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
माश्यांमुळे या गावातील लोकांची लग्नं होत नाहीत, झालेले लग्न मोडतात
माश्यांमुळे या गावातील लोकांची लग्नं होत नाहीत, झालेले लग्न मोडतात
माश्यांमुळे या गावातील लोकांची लग्नं होत नाहीत, झालेले लग्न मोडतात उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील काही गावातील लोक माशांच्या त्रासाने हैराण झाले आहेत. त्यामुळे येथे राहणाऱ्या अनेकांच्या वैवाहिक जीवनात खोल दरी निर्माण झाली आहे. या गावांमध्ये तरुणांची लग्नं होत नसल्याच्या बातम्याही येत आहेत.पाच हजारांहून अधिक लोकसंख्या माशांमुळे हैराण झाली आहे. त्याची काळजी घेणारे कोणी नाही.    येथे राहणाऱ्या…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 11 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर – दिनांक 17.11.2024 रोजीचे सकाळी 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत,   नायजेरियाची राजधानी अबुजा इथं काल ते पोहोचले असून सतरा वर्षांमध्ये भारतीय पंतप्रधानांचा हा पहिल���च नायजेरिया दौरा आहे तर गयानाला १९६८ नंतर भेट देणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान  आहे. ब्राझीलमध्ये रियो दे जानेरो इथं उद्या १८ तारखेला जी-२० शिखर बैठकीत पंतप्रधान उपस्थित राहतील. या दौऱ्यामुळं या देशांसोबत लोकशाही आणि वचनबद्धतेवर आधारित सामरीक भागीदारीचं नवं द्वार उघडेल, असा विश्वास त्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी व्यक्त केला. या दौऱ्यादरम्यान या देशांसोबत विविध क्षेत्रातील अनेक करार देखील अपेक्षित आहेत.
दरम्यान, नायजेरियामध्ये स्थित मराठी भाषिक आपली संस्कृती आणि भारताशी संलग्न राहत असल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी त्यांचं अभिनंदन आणि कौतुक केलं आहे. नायजेरियातील मराठी भाषिकांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त केल्याचंही पंतप्रधानांनी आपल्या सामाजिक प्रसार माध्यमावरील या संदर्भातल्या संदेशात म्हटलं आहे.
****
पुण्यातून जळगावला जाणाऱ्या वाहनातून पाच कोटी ५९ लाख ६१ हजार रुपयांचं सोनं आणि चांदी जप्त करण्यात आली आहे. परवा रात्री उशिरा जळगाव शहरातल्या रेमंड चौकात स्थानिक गुन्हे शाखा आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई केली. जवळपास चार किलो सोनं आणि ३४ किलो चांदी जळगाव शहरातील सराफा व्यावसायिकांची असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, परवा दिवसभरात जळगाव शहरात २३ लाखांहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली आहे.
****
अमरावती जिल्ह्यातल्या दर्यापूर मतदारसंघातील खल्लार इथं भाजपच्या नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांची काल प्रचार सभा सुरू असताना गोंधळ झाला, त्यामुळं एक गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हमरी-तुमरी झाली. दर्यापूर मतदार संघात शिवसेनेकडून कॅप्टन अभिजीत अडसूळ हे उमेदवार असून त्यांच्याविरोधात आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाचे माजी आमदार रमेश बुंदेले यांच्यात लढत होत आहे, या ठिकाणी महायुतीमध्ये दोन गट आहेत. काल नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदेले यांच्या प्रचारासाठी सभा घेतली, त्यावेळी गोंधळ झाला, यानंतर नवनीत राणा आणि भाजप कार्यकर्त्यांनी खल्लार पोलिस ठाण्यात आपला जबाब नोंदवला.
****
सांगली जिल्ह्यातल्या मिरज विधानसभा ��तदारसंघातील भाजपचे उमेदवार सुरेश खाडे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची मिरजेतील किसान चौकातकाल प्रचार सभा झाली.
आजच्या दोन वर्षानंतर इथलं पहिलं विमान शेतकऱ्यांनी तयार केलेल्या हवाई इंधनावर उडेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तर विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रात महायुतीने राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून जलसंवर्धनामध्ये अनेक कामं केली असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं.
****
बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील भालेगाव इथं सोनाजी महाराज संस्थानमध्ये अकरा दिवसांपासून सुरु असलेल्या श्री विठ्ठलाच्या उत्सवाची काल मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. भालेगाव इथं संत श्री नरहरी महाराजांनी सुरु केलेल्या या उत्सवाला शंभर वर्षांची परंपरा  असून प्रती पंढरपूर म्हणून भालेगावच्या या विठ्ठलाची ओळख जिल्हाभरात आहे.
दिवाळीनंतर सुरु होणाऱ्या या उत्सवात प्रत्येक घरातील लग्न झालेली मुलगी हजेरी लावते तसंच खामगाव तालुक्यातल्या आजूबाजूच्या गावातील सर्व नागरिक या उत्सवात मोठ्या आनंदानं सहभागी होतात.
****
धाराशिव जिल्ह्यात १५ ऑक्टोबर ते १६ न���व्हेंबर या कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं हातभट्टी दारू निर्मिती करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये ४६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून २४० गुन्ह्याची नोंद करून २२६ संशयीतांना अटक करण्यात आली. तर १४ ते १६ नोव्हेंबर या तीन दिवसांच्या कालावधीत धाराशिव जिल्ह्यात ४७ गुन्हे नोंदवून ३९ संशयीत आरोपींना अटक करण्यात आली आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या आष्टी विधानसभा मतदारसंघामधील टपाली मतपत्रिका क्रमांक सामाजिक प्रसार माध्यामावर प्रसारित झाली आहे. याबद्दीलची तक्रारी काही उमेदवारांनी केल्या आहेत. मुंबईतल्या गणेश शिंदे या पोलिस कर्मचाऱ्याने त्याला निर्गमित करण्यात आलेल्या या टपाली मतपत्रिकेचं छायाचित्र मत नोंदवल्यानंतर आपल्या भ्रमणध्वनीमधून प्रसार माध्यमांवर टाकलं.  त्यामुळे या कर्मचाऱ्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्याचं आष्टीच्या निवडणूक निर्णय अधिकारी वसिमा शेख यांनी सांगितलं आहे.
****
कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज हवामान अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज आहे. राज्यात अन्य ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश असेल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
****
0 notes
news-34 · 1 month ago
Text
0 notes
dakshadev · 2 months ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
४कोटी २७ लक्ष्याच्या विकास कामाचा भूमिपूजन शुभारंभ आज टाकळीभान मध्ये झाला यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
जनतेच्या सेवेसाठी आणि विकासाच्या वचनपूर्तीसाठी आमदार साहेब सदैव तत्पर.
0 notes
kvksagroli · 2 months ago
Text
Tumblr media
उद्यमिता येथे स्वच्छता पंधरवड्यानिमित्त महिलांसाठी दुग्धव्यवस्थापन, स्वच्छ दूध उत्पादन आणि दुग्धजन्य उत्पादन या विषयांवर प्रशिक्षण का��्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश महिलांना आधुनिक दुग्धव्यवस्थापन तंत्रज्ञान, स्वच्छ दूध उत्पादनातील स्वच्छतेचे महत्त्व आणि मूल्यवर्धित दुग्धजन्य उत्पादनांबाबत मार्गदर्शन करणे हा होता. सहभागी महिलांना योग्य दुध काढण्याचे तंत्र, स्वच्छतेचे उपाय आणि दुधाळ जनावरांचे प्रभावी व्यवस्थापन या विषयांवर सखोल प्रशिक्षण देण्यात आले. स्वच्छ दूध उत्पादनामुळे आरोग्यवर्धक फायदे आणि बाजारमूल्यातील वाढ यावर विशेष भर देण्यात आला. कार्यक्रमाने महिलांना स्वच्छता आणि स्वच्छ दुग्धव्यवस्थापनाच्या तंत्रांचा अवलंब करून घरच्या स्तरापासून दुग्धजन्य पदार्थ निर्मिती व्यवसाय सुरु करून त्याचे व्यावसायिक रूपांतर करण्याचे महत्त्व पटवून दिले. दुग्ध व्यवसाय शाश्वत आणि फायदेशीर करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा संदेश देण्यात आला. देगलुर तालुक्यातील वझरगा गावातील दुधाळ जनावरे सांभाळणाऱ्या महिलांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. #agriculture #कृषक_स्वर्ण_समृद्धी_सप्ताह #कृषिविज्ञानकेंद्र #सगरोळी #ICAR #स्वच्छता #पंधरवडा #महिलांसाठी #दुग्धव्यवसायप्रशिक्षण #दूध
0 notes
mhlivenews · 3 months ago
Text
Maharashtra Live News Today: सगळ्यात आधी पेशवाईचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस आहेत, संजय राऊतांचा घणाघात
Jalna Rain: जालना जिल्ह्यातील काही भागांत ढगफुटीसदृश्य पाऊस, अनेक गावांना पुराचा फटका जालना जिल्ह्यातील काही गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. मंठा तालुक्यातील पाटोदा, मंठा, सावंगी, पेवा, तळतोंडी माळतोंडी, देवठाणा या गावांना पुराचा फटका बसला आहे. तर पांगरी खुर्द गावातील पाझर तलाव पूर्ण क्षमत���नं भरल्यानं रात्रीच गावातील 200 ते 250 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. काही मंडळांत ढगफुटी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 3 months ago
Text
Bhosari : कुंडकर पुणेरी यांचा स्नेहसंमेलन मेळावा संपन्न
एमपीसी न्यूज – कुंड, तालुका -मलकापूर,जिल्हा-बुलढाणा या गावातील पुण्यात राहणाऱ्या नागरिकांचा श्री आदीशक्ती मुक्ताबाई मंदिर गणेश नगर भोसरी येथे ( Bhosari ) स्नेहसंमेलन मेळावा  संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन करून झाली.  त्यानंतर राष्ट्रगीत झाले. श्री आदिशक्ती मुक्ताबाई मंदिराचे अध्यक्ष अमोल पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनतर गावातील मुलींचा व जावाई लोकांचा सन्मान करण्यात…
0 notes
imranjalna · 6 months ago
Text
शिंगाडे पोखरी शिवारात गळफास घेऊन आत्महत्या केलेले "ते" प्रेमीयुगलच..दोघेही विवाहित
त्या प्रेमीयुगलाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश.. दोघेही विवाहित असून, ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजी गावातील.. जालना तालुक्यातील शिंगाडे पोखरी शिवारातील एका लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक महिला आणि पुरुष असे दोघे आज सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मौजपुरी पोलिसांनी ���ातडीने घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह खाली घेतले. त्यानंतर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mdhulap · 8 months ago
Link
(अवर्षणग्रस्त खेड्यातील) दुष्काळग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी होणार माफ ! - शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय.
0 notes
karmadlive · 11 months ago
Text
कुंभेफळ गावातील घटना: चालक मद्यधुंद असल्याचा आरोप
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 24 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 04 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशव��णी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०४ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यातल्या २८८ मतदारसंघांमध्ये सात हजार ६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. मात्र यापैकी किती उमेदवार माघार घेतात आणि किती उमेदवारी निवडणूक रिंगणात कायम राहतात, हे आज सायंकाळनंतरच स्पष्ट होईल. राज्यात मराठवाड्यातल्या ४६ मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत, यामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे १४० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्या खालोखाल बीड जिल्ह्यात माज���गाव मतदारसंघात ९८, तर बीड विधानसभा मतदार संघात ९० उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. राज्यात महाड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे फक्त पाच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मुंबईत चेंबूर, माहिम आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी मतदारसंघात प्रत्येकी सहा, तर शिवडी आणि कुडाळमध्ये प्रत्येकी सात उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत.
माळी समाजाचे नेते किशोर कन्हेरे यांची आज काँग्रेसने प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. येणाऱ्या निवडणुकीत महाविकास आघाडीला पूर्ण पाठिंबा देणार असल्याचं कन्हेरे यांनी जाहीर केलं.
मराठा आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. ��पल्या सर्व उमेदवारांना त्यांनी अर्ज मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. कोणताही उमेदवार उभा राहणार नसल्याचं ते म्हणाले. कालपासून झालेल्या बैठकीनंतर मनोज जरांगें पाटील यांनी आज सकाळी वार्ताहरांशी बोलताना हा निर्णय जाहीर केला.
नागपूर इथं आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भाजपच्या तीन निवडणूक कार्यालयांचे उद्घाटन होणार आहे. यात दक्षिण नागपूर इथं मोहन मते यांच्या, पूर्व नागपूर इथं कृष्णा खोपडे यांच्या आणि मध्य नागपूर मतदारसंघातील प्रवीण दटके यांच्या कार्यालयांचा समावेश आहे. त्यानंतर उमेदवारांसाठी गडकरी यांच्या जाहीर सभा होणार आहेत.
महायुतीच्या प्रचाराला कालपासून प्रारंभ झाला. शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, मुंबईत कुर्ला इथं शिवसेना - महायुतीचे उमेदवार मंगेश कुडाळकर यांच्या निवडणूक प्रचारार्थ काल पहिली प्रचार सभा घेतली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रचारसभांनाही आजपासून प्रारंभ होत आहे. पहिली जाहीर सभा डोंबिवलीत तर दुसरी ठाण्यात होणार आहे.
शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊन केंद्र सरकारने कापसाच्या आयातीवर तत्काळ बंदी घालून भारतीय कापूस हमीभावाने खरेदी करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केली आहे. कापूस उत्पादनात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकाचं राज्य असून, ४० लाखांपेक्षा जास्त शेतकरी कापसाचं उत्पादन घेतात. राज्यात भरपूर कापूस उत्पादन होत असताना, २२ लाख गाठी कापसाची आयात करण्यात आल्याच्या बातम्यांमुळे देशात कापसाच्या भावात मोठी घसरण होण्याची भीती आहे. भारतीय कापूस महामंडळाकडेही विक्री न झालेल्या ११ लाख कापूस गाठी पडून आहेत ही बाब शा��नानं लक्षात घ्यावी असं पटोले यांनी या पत्रात म्हटलं आहे.
जळगाव इथं रूशील मल्टिपर्पज फाऊंडेशन संचलित उडान दिव्यांग प्रशिक्षण केंद्रातील दिव्यांग विद्यार्थ्यांनी शहरातल्या चिमुकले श्रीराम मंदिरात १ हजार १५१ दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा केला. अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, उडानच्या अध्यक्षा हर्षाली चौधरी, यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर आजपासून १४व्या हॉकी इंडिया ज्येष्ठ पुरूष राष्ट्रीय स्पर्धेला सुरुवात होत आहे. १६ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत ३१ संघ आठ गटांमध्ये सहभागी होणार आहेत. सुरूवातीला उत्तर प्रदेशचा सामना केरळ तर कर्नाटकचा सामना उत्तराखंडशी होणार आहे. हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांनी ही माहिती दिली.
परभणी जिल्ह्यातल्या पालम तालुक्यात चाटोरी परिसरातील नागरिकांनी भारतीय सैन्यात कार्यरत असलेले सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसहित 'कृतज्ञता सोहळा' आयोजित करून दिवाळी साजरी केली. गावातील २५ सैनिकांचा यावेळी त्यांच्या कुटुंबीयांसह सन्मान करण्यात आला.
दिवाळी सुट्टीसाठी रेल्वेनं प्रवाशांच्या सुविधेसाठी 7435 विशेष रेल्वेगाड्या सुरु केल्या आहेत. राज्यात मुंबई, पुणे, नांदेड येथून प्रवाशांसाठी या विशेष रेल्वेगाड्यांची सुविधा उपलब्ध आहे. रेल्वेच्या या सुविधेबद्दल प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.
हवामान कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्यापासून सर्वत्र हवामान सूर्यप्रकाशयुक्त कोरडं राहील.
0 notes
news-34 · 2 months ago
Text
0 notes
gajananjogdand45 · 11 months ago
Link
https://marmikmaharashtra.com/hingoli-districts-irrigation-backlog-high-level-dam-solution/
0 notes
kvksagroli · 3 months ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
परसबागेतील कुक्कुट पक्षांची घ्यावयाची काळजी या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम.. कृषि विज्ञान केंद्र सगरोळी येथे "परसबागेतील कुक्कुट पक्षांची घ्यावयाची काळजी" या विषयावर एकदिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रम काटकळंब ता. कंधार या गावातील १७ महिला शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणात सहभाग घेतला. कार्यक्रमात तज्ञांनी कुक्कुटपक्ष्यांचे पोषण, योग्य आहाराचे व्यवस्थापन, आणि आहारातील पोषक तत्त्वांची महत्त्व सांगितले. तसेच, कुक्कुट पक्ष्या��च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लसीकरणाचे महत्त्व, रोगनियंत्रण, आणि स्वच्छतेचे नियम यावरही विशेष भर दिला. यासोबत अंडी उबावणी करताना चांगले जिवंत अंडे आणि फलित नसलेले अंडे ओळखण्याची सोपी पद्धत बाबत माहिती दिली. प्रशिक्षणात पक्ष्यांची निवासव्यवस्था कशी असावी, त्यांची सुरक्षितता आणि वातावरणाचे नियोजन कसे करावे, यासह विविध तांत्रिक माहिती देण्यात आली. महिला शेतकऱ्यांना त्यांच्या परसबागेतील कुक्कुट पालन व्यवसायात अधिक उत्पादनक्षम आणि आरोग्यदायी व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान व साधने यांचा उपयोग कसा करावा, याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले. #कुक्कुटपालन🐓 #महिलाशेतकरी #कंधार #प्रशिक्षणकार्यक्रम #आत्मनिर्भरभारत #महिलासशक्तीकरण #ग्रामीणविकास #स्वयंपूर्णभारत
0 notes
mhlivenews · 1 year ago
Text
पांडेबुवांची ट्रंक उघडली, नोंदीचा खजिना सापडला अन् अख्ख्या गावाच्या भावी पिढीचा प्रश्न सुटला
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये गाजत असताना शासनाच्या वतीने कुणबी नोंदी असणाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र प्रमाणपत्र घेण्यासाठी नोंदणीचे पुरावे आणायची कुठून? असा प्रश्न असताना, सिल्लोड तालुक्यातील कन्नड रस्त्यावर असलेल्या धानोरा गावातील एकाने अडगळीत पडलेल्या ट्रंकेत उघडली. या ट्रंकेत जीर्ण झालेली कागदपत्रे आढळली. त्यावरील धूळ झटकली असता, त्यामध्ये निजाम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
नाशिक रोडला आज दहा गावातील नागरिक उपोषणाला बसणार 
https://bharatlive.news/?p=183007 नाशिक रोडला आज दहा गावातील नागरिक उपोषणाला बसणार 
नाशिक; पुढारी ...
0 notes