Tumgik
#मराठा कुणबी प्रमाणपत्र
mhlivenews · 11 months
Text
पांडेबुवांची ट्रंक उघडली, नोंदीचा खजिना सापडला अन् अख्ख्या गावाच्या भावी पिढीचा प्रश्न सुटला
छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यामध्ये गाजत असताना शासनाच्या वतीने कुणबी नोंदी असणाऱ्यांना प्रमाणपत्र वाटप सुरू करण्यात आले आहे. मात्र प्रमाणपत्र घेण्यासाठी नोंदणीचे पुरावे आणायची कुठून? असा प्रश्न असताना, सिल्लोड तालुक्यातील कन्नड रस्त्यावर असलेल्या धानोरा गावातील एकाने अडगळीत पडलेल्या ट्रंकेत उघडली. या ट्रंकेत जीर्ण झालेली कागदपत्रे आढळली. त्यावरील धूळ झटकली असता, त्यामध्ये निजाम…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 23 June 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २३ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
नीट प्रकरणी सीबीआय चौकशीचा केंद्र सरकारचा निर्णय-आतापर्यंत सहा जणांना अटक
एनटीएचे महासंचालक पदमुक्त-आजची नियोजित नीट पीजी रद्द
शिक्षकांना शिक्षणबाह्य कामं न देण्याचा निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन
सरकारी शिष्टमंडळासोबत चर्चेनंतर ओबीसी नेत्यांचं उपोषण तुर्तास स्थगित
अल्पसंख्याक आयुक्तालयाची स्थापना-छत्रपती संभाजीनगरात हज हाऊसमध्ये कार्यालय
आणि
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर पन्नास धावांनी विजय
****
वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा नीट संदर्भातल्या गैरप्रकारांची सखोल चौकशी करण्यासाठी या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग-सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. या प्रकरणी बिहार पोलिसांनी काल झारखंडमधून सहा जणांना अटक केली. लातूर इथूनही दोन शिक्षकांना या प्रकरणात ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.
या गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा परिषद-एनटीएचे महासंचालक सुबोधकुमार सिंह यांना पदमुक्त करण्यात आलं असून, या पदाचा कार्यभार, भारतीय व्यापार संवर्धन संघटनेचे व्यवस्थापकीय संचालक प्रदीपसिंह खरोला यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर नीट पीजीची आज होणारी परीक्षा रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, एनटीएच्या कार्यान्वयनासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. परीक्षा प्रक्रियेतल्या सुधारणा, माहिती सुरक्षा नियमन प्रणाली, तसंच परीक्षा परिषदेची एकूण संरचना आणि कार्यान्वयन, याचा ही समिती आढावा घेईल, तसंच दोन महिन्यात मंत्रालयाला अहवाल सादर करेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
स्पर्धा परीक्षांमधले गैरप्रकार आणि अनियमिततेला आळा घालण्यासाठीचा, सार्वजनिक परीक्षांमधील अयोग्य माध्यमांना प्रतिबंध कायदा २०२४ कालपासून लागू झाला. या कायद्यात गुन्हेगारांना दहा वर्ष तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.
****
ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि व्याख्याते म्हणून निवड करण्यासाठी संयुक्तपणे घेतली जात असलेली सी एस आय आर यूजीसी नेट परीक्षा राष्ट्रीय परीक्षा परिषदेनं पुढे ढकलली आहे. नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा २५ जून ते २७ जून दरम्यान घेण्यात येणार होती.
****
व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेतलेल्या सामायिक प्रवेश प्रक्रिया-सीईटीबाबतचे नागरिकांचे आक्षेप वस्तुस्थितीला धरून नसल्याचं, सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. संगणकाधारित असलेली ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेपरहीत आहे. त्यामुळे विद्यार्थी तसंच पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन आयुक्त सरदेसाई यांनी केलं आहे.
****
बनावट बिलांच्या आधारे इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करणारे प्रकार रोखण्यासाठी वस्तू आणि सेवा करात आधारसंलग्न बायोमेट्रीक यंत्रणा राबवली जाणार आहे. वस्तू आणि सेवा कर परिषदेच्या ५३ व्या बैठकीत हा निर्णय झाला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ही माहिती दिली. गुजरात, पुद्दुचेरीमध्ये याची चाचणी झाली असून टप्प्याटप्प्याने देशभरात याची अंमलबजावणी होईल, रेल्वेचं प्लॅटफॉर्म तिकीट, प्रतीक्षा कक्ष यासारख्या सुविधांना जीएसटीतून वगळल्याचं त्यांनी सांगितलं
****
शिक्षकांना शिक्षणबाह्य कामं न देण्याबाबत राज्य सरकार विचार करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल अहमदनगर इथं मुख्याध्यापक-शिक्षक मेळाव्यात बोलत होते. शिक्षकांनी फक्त शिकवण्याचं काम केलं पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले. २००५ पूर्वी सेवेत आलेल्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.
****
जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री इथं आंदोलन करणारे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं आहे. राज्य सरकारच्या एका शिष्टमंडळाने काल वडीगोद्री इथं उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेत, मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं आश्वासन दिलं. त्यानंतर हाके यांनी उपोषण तात्पुरतं स्थगित केलं. बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटणाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन सरकारनं दिल्यामुळे आंदोलन स्थगित केल्याचं, हाके यांनी सांगितलं आहे.
राज्य मंत्रिमंडळातले मान्यवर सदस्य छगन भुजबळ, धनंजय मुंडे, यांच्यासह आमदार गोपीचंद पडळकर  आणि माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
दरम्यान, पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात उपोषण करत असलेले विधीज्ञ मंगेश ससाणे यांचीही काल भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेअंती  ससाणे यांनी आपलं उपोषण स्थगित केलं.
****
मराठा आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी या दोन मागण्यांबाबत राज्य शासनावर आमचा विश्वास असून, १३ जुलै पर्यंत आम्ही वाट पाहणार, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं माध्यमांशी बोलत होते. मराठा सामाजाला दिलेल्या कुणबी नोंदी रद्द होऊ देणार नाही, असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
****
लोकशाही मार्गाने प्रत्येकाने आंदोलन करावं मात्र आंदोलनात हिंसा नसावी अशी अपेक्षा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
खासगी उपसा सिंचनासाठीच्या वाढीव दरांना स्थगिती देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच ती पूर्ण होणार असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. २९ मार्च २०२२ रोजी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने काढलेल्या आदेशामुळे खासगी उपसा सिंचनाला प्रवाही उपसा सिंचनाचे दर लागू झाल्याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधलं.
****
राज्य शासनाने अल्पसंख्याक आयुक्तालयांची स्थापना केली असून अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मोईन ताशीलदार यांच्याकडे आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या हज हाऊसमध्ये हे आयुक्त कार्यालय असणार आहे. या वर्षी २ फेब्रुवारीला हज हाऊसच्या लोकार्पण सोहळ्यात अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी हे आयुक्तालय स्थापनेची घोषणा केली होती  
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीज - सी आय आय या संघटनेच्या मराठवाडा विभागाच्या कार्यालयाचं उद्घाटन टाटा केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक तथा सी आय आयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आर मुंकुदन यांच्या हस्ते झालं. मराठवाड्यातली पाणी समस्या, रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासासह पर्यावरण संवर्धनासाठी काम करण्याचा मानस, मुकुंदन यांनी यावेळी व्यक्त केला.
****
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतानं काल बांगलादेशवर पन्नास धावांनी विजय मिळवला. सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करणाऱ्या बांग्लादेश समोर भारतानं पाच बाद १९६ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशचा डाव वीस षटकांत आठ बाद १४६ धावांवर संपला. २७ चेंडूत अर्धशतक झळकावत, एक बळी घेणारा हार्दिक पांड्या सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. भारतानं सुपर एट फेरीत झालेले गट एक मधले दोन्ही सामने जिंकले आहेत. उर्वरीत एक सामना उद्या ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे.
दरम्यान, या स्पर्धेत सध्या ऑस्ट्रेलिया-अफगाणिस्तान लढत सुरु आहे.
****
भारताच्या ज्योती सुरेखा वेण्णम, प्रनीत कौर आणि अदिती स्वामी यांनी तुर्कीतल्या अंताल्या इथल्या झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत कंपाऊंड सांघिक प्रकारात सुवर्णपदकं जिंकली आहेत. भारतीय महिला संघाने या मोसमातल्या तीनही विश्वचषक स्पर्धेत कंपाउंड सांघिक प्रकारात सुवर्णपदकं जिंकण्याचा विक्रम केला आहे.
****
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आणि महाराष्ट्र क्रीडा संचालनालयाच्या वतीनं आज २३ जून रोजी जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा केला जात आहे. खेळाडूंचा सन्मान तसंच ऑलिम्पिक दौडसह विविध कार्यक्रम आज होणार आहेत. सर्व जिल्ह्यांना ऑलिम्पिक दिन साजरा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
****
माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी काल भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षात दहा वर्षे काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल पक्ष नेतृत्वाचे त्यांनी आभार मानले.
****
बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ इथले प्रख्यात वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर प्रकाश रामचंद्रराव डुबे यांचं काल निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं देवगिरी महाविद्यालयात बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील JEE, NEET, CET या परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलं, या गुणवंत विद्यार्थ्यांचा काल महाविद्यालयात सत्कार करण्यात आला.
****
लातूर जिल्ह्यात अहमदपूर तालुक्यातल्या देवकरा ग्रामपंचायतीमध्ये 'माझं लातूर, हरित लातूर' या पाच हजार झाडं लावण्याच्या मोहिमेला कालपासून सुरुवात झाली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल उपस्थित होते.
****
श्री संत गजानन महाराज यांच्या पंढरपूर आषाढी वारीच्या पालखीचं आज हिंगोली जिल्ह्याच्या सेनगाव इथं आगमन होत आहे.आज संध्याकाळी ही पालखी सेनगावला येणार असून इथंच मुक्कामी असणार आहे. १३ जूनला पालखी शेगावहून मार्गस्थ झालेली आहे.
****
हवामान
येत्या दोन दिवसात मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे. दरम्यान, काल छत्रपती संभाजीनगर, हिंगोली, परभणी, नांदेड आणि जालना जिल्ह्यात दमदार पाऊस झाल्याचं वृत्त आहे.
****
0 notes
nashikfast · 11 months
Text
नऊ दिवसांनंतर जरांगेंचे उपोषण मागे; राज्य शासनाला आता दोन महिन्यांचा कालावधी
जालना : राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी मोठी कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागणार असून यासाठी दोन महिन्यांचा वेळ राज्य शासनाला देण्याच्या अटीवर उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी (दि. २) बेमुदत उपोषण मागे घेतले. निवृत्त न्या. मारुती गायकवाड, सुनील सुक्रे यांनी कायदेशीर बाबींची अडचण निदर्शनास आणून दिल्यानंतर जरांगे यांनी हे उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 11 months
Text
मी मराठा; कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही : नारायण राणे
https://bharatlive.news/?p=172380 मी मराठा; कुणबी प्रमाणपत्र घेणार नाही : नारायण राणे
मुंबई; पुढारी ...
0 notes
airnews-arngbad · 3 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २३ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
राष्ट्रीय परीक्षा परिषदेच्या कार्यान्वयासंदर्भात उच्चस्तरीय समितीची स्थापना
सरकारच्या आश्वासनानंतर ओबीसी नेत्यांचं उपोषण तात्पुरतं स्थगित
अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन-छत्रपती संभाजीनगरात हज हाऊसमध्ये कार्यालय
आणि
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर एट फेरीत आज भारत-बांगलादेश सामना
****
राष्ट्रीय परीक्षा परिषदेच्या कार्यान्वयासंदर्भात केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं एका उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. परीक्षा प्रक्रियेतल्या सुधारणा, माहिती सुरक्षा नियमन प्रणाली, तसंच परीक्षा परिषदेची एकूण संरचना आणि कार्यान्वयन, याचा ही समिती आढावा घेईल, तसंच दोन महिन्यात मंत्रालयाला अहवाल सादर करेल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. परिषदेकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीनं घेण्यासंदर्भात ही समिती एक प्रणाली सुनिश्चित करेल.
****
स्पर्धा परीक्षांमधले गैरप्रकार आणि अनियमिततेला आळा घालण्यासाठीचा, सार्वजनिक परीक्षांमधील अयोग्य माध्यमांना प्रतिबंध कायदा २०२४ आजपासून लागू झाला. कार्मिक मंत्रालयानं राजपत्रात प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे ही माहिती दिली. या कायद्यात गुन्हेगारांना जास्तीत जास्त दहा वर्ष तुरुंगवास आणि एक कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.
दरम्यान, नेट परीक्षेतल्या गैरप्रकारासंदर्भात उत्तरप्रदेशातल्या कुशीनगर इथून एकाला ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे.
****
ज्युनिअर रिसर्च फेलोशिप आणि व्याख्याते म्हणून निवड करण्यासाठी संयुक्तपणे घेतली जात असलेली सी एस आय आर युजीसी नेट परीक्षा राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेनं पुढे ढकलली आहे. २५ जून ते २७ जू��� दरम्यान ही परीक्षा नियोजित होती. मात्र परीक्षा आयोजित करण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याचं सांगत अपरिहार्य कारणानं ही परीक्षा पुढे ढकलली असल्याचं एनटीएनं म्हटलं आहे.
****
व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेतलेल्या सामायिक प्रवेश प्रक्रिया-सीईटीबाबतचे नागरिकांचे आक्षेप वस्तुस्थितीला धरून नसल्याचं, सीईटी कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी म्हटलं आहे. सदर परीक्षा वेगवेगळ्या दिवशी प्रत्येकी दोन सत्रात घेण्यात आलेली आहे. त्यामुळे विविध सत्रांमधील समान गुण मिळालेल्या उमेदवारांना वेगवेगळे पर्सेंटाईल मिळाल्याचं सरदेसाई यांनी सांगितलं. ही प्रक्रिया संगणकाधारित असल्याने, पूर्णपणे पारदर्शक आणि मानवी हस्तक्षेपरहीत आहे. त्यामुळे विद्यार्थी तसंच पालकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन आयुक्त सरदेसाई यांनी केलं आहे.
****
जालना जिल्ह्यातल्या वडीगोद्री इथं आंदोलन करणारे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आज आपलं उपोषण स्थगित केलं. तत्पूर्वी राज्य सरकारच्या एका शिष्टमंडळाने आज वडीगोद्री इथं ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात मंत्री छगन भुजबळ, धनंजय मुंडे, गिरीश महाजन, अतुल सावे, गुलाबराव पाटील, उदय सामंत, प्रकाश शेंडगे आणि गोपीचंद पडळकर यांच्यासह १२ जणांचा समावेश होता. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही, असं आश्वासन या शिष्टमंडळाने दिलं. त्यानंतर हाके यांनी उपोषण तात्पुरतं स्थगित केलं.
दरम्यान, बोगस कुणबी प्रमाणपत्र वाटणाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन सरकारनं दिल्यामुळे आंदोलन स्थगित केल्याचं, हाके यांनी सांगितलं आहे.
छगन भुजबळ यांनी यावेळी बोलतांना, आमच्या ताटातले आम्हाला राहू द्या. मराठा समाजाला वेगळे आरक्षण द्या, या मागणीचा पुनरुच्चार केला.
सरकार कोणावरही अन्याय करणार नाही, असं मंत्री धनंजय मुंडे यावेळी म्हणाले. तर ओबीसी आरक्षणाचं संरक्षण झालं पाहिजं, असं मत आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केलं.
****
हाके यांच्या या आंदोलनाला रिपब्लिकन पक्षाचा सुरुवाती पासूनच पाठिंबा असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज जाहीर केलं आहे. ते आज मुंबईत बोलत होते. ओबीसी आणि मराठा समाजातील नेत्यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असं आवाहन आठवले यांनी यावेळी केलं आहे.
दरम्यान, ओबीसी समाजाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरनजिक झाल्टा फाटा परिसरात रास्ता रोको आंदोलन केलं. यामुळे या मार्गावरची वाहतुक काही काळ विस्कळीत झाली होती.
****
मराठा आरक्षण आणि सगेसोयरे कायद्याची अंमलबजावणी या दोन मागण्यांबाबत राज्य शासनावर आमचा विश्वास असून, १३ जुलै पर्यंत आम्ही वाट पाहणार, अशी प्रतिक्रिया मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं माध्यमांशी बोलत होते. मराठा सामाजाला आजवर दिलेल्या कुणबी नोंदी रद्द होऊ देणार नाही, असंही जरांगे म्हणाले.
****
लोकशाही मार्गाने प्रत्येकाने आंदोलन करावे मात्र आंदोलनात हिंसा नसावी अशी अपेक्षा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केली आहे. आज ते छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठा समाजाला पूर्वी ही कुणबी प्रणामपत्र दिलं जात होतं, यात या राज्य सरकारने नवीन काहीही केलं नाही अशी टिप्पणीही दानवे यांनी केली. राजकीय नेत्यांनी भूमिका घेतांना जातीय सलोखा कायम राहिल यांची खबरदारी घ्यावी, असं दानवे यांनी नमूद केलं.
****
खासगी उपसा सिंचनासाठीच्या वाढीव दरांना स्थगिती देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, लवकरच ती पूर्ण होणार असल्याचं, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. २९ मार्च २०२२ रोजी महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने काढलेल्या आदेशामुळे खासगी उपसा सिंचनाला प्रवाही उपसा सिंचनाचे दर लागू झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षानं काल अटल सेतुला भेगा पड��्याच्या अफवा पसरवल्यानंतर या पाणीपट्टीसंदर्भातही संभ्रम पसरवत असल्याची टीका फडणवीस यांनी केली.
****
राज्य शासनाने अल्पसंख्याक आयुक्तालयांची स्थापना केली असून अल्पसंख्याक विभागाचे उपसचिव मोईन ताशिलदार यांच्याकडे आयुक्त पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या हज हाऊसमध्ये हे आयुक्त कार्यालय असणार आहे. कार्यालयाचा कारभार चालवण्यासाठी ६० अधिकारी-कर्मचारी यांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या वर्षी २ फेब्रुवारीला हज हाऊसच्या लोकार्पण सोहळ्यात अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी हे आयुक्तालय स्थापनेची घोषणा केली होती.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री - सी आय आय या संघटनेच्या मराठवाडा विभागाच्या कार्यालयाचं उद्घाटन टाटा केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक तथा सी आय आयचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आर मुकुंदन यांच्या हस्ते झालं. सीआयआयचे उपाध्यक्ष ऋषी कुमार बागला आणि मराठवाड्याचे अध्यक्ष सुनील किर्दक यावेळी उपस्थित होते. मराठवाड्यातली पाणी समस्या, रोजगार निर्मिती आणि कौशल्य विकासासह पर्यावरण संवर्धनासाठी काम करण्याचा मानस, मुकुंदन यांनी यावेळी व्यक्त केला.
****
माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांनी आज भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षात दहा वर्षे काम करण्याची संधी मिळाली, याबाबत पक्ष नेतृत्वाचे त्यांनी आभार मानले आहेत.
****
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटना आणि महाराष्ट्र क्रीडा संचलनालयाच्या वतीनं उद्या २३ जून रोजी जागतिक ऑलिम्पिक दिन साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्राचं नाव उज्वल करणाऱ्या ऑलिम्पियन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा सन्मान, ऑलिम्पिक दौड, हॉकी स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा केला जाणार आहे. शासनाच्या वतीने सर्व जिल्ह्यांना ऑलिम्पिक दिन साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि बांगलादेश यांच्यात सुपर आठ फेरीतील सामना होणार आहे. अँटीग्वा इथं रात्री आठ वाजेपासून हा सामना खेळवला जाणार आहे. भारतानं सुपर आठ फेरीतील अफगाणिस्तानविरूध्दचा आपला पहिला सामना जिंकला असून बांगलादेशला ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.
या स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात वेस्ट इंडीजनं अमेरिकेचा नऊ गडी राखून पराभव केला. उद्या ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात सामना होणार आहे.
****
छत्रपती संभाजनगर महानगरपालिकेच्या वतीनं आज संत कबीर यांची जयंती साजरी करण्यात आली. मनपा मुख्यालयात जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद यांच्या हस्ते संत कबीर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ इथल्या बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेत १९६५ आणि १९७१ च्या युद्धात पराक्रम गाजवलेल्या टी-५५ या रणगाड्याच्या शौर्य स्मारकाचं आज उद्‌घाटन झालं.
****
0 notes
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 16 March 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १६ मार्च २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर;देशभरात सात टप्प्यात मतदान;चार जूनला मतमोजणी
महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे पर्यंत पाच टप्प्यात निवडणूक तर मराठवाड्यात २६ एप्रिल, सात मे आणि १३ मे रोजी मतदान
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंबईत दाखल
आणि
मराठवाडा साहित्य परिषदेचा नटवर्य लोटू पाटील विशेष नाट्यपुरस्कार मुंबईचे नाट्यकर्मी राजीव नाईक यांना जाहीर
****
लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, देशभरात सात टप्प्यात निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयुक्त राजीवकुमार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात १९ एप्रिलला लोकसभेच्या एकशे दोन जागांसाठी मतदान होणार असून, २६ एप्रिल रोजी ८९ जागांसाठी, सात मे रोजी ९४, १३ मे रोजी ९६, २० मे रोजी ४९, २५ मे रोजी ५७ तर एक जून रोजी ५७ जागांसाठी मतदान होणार आहे. मतमोजणी चार जून रोजी होणार आहे.
      महाराष्ट्रात पाच टप्प्यात तर मराठवाड्यात तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्प्यात १९ एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, आणि चंद्रपूर इथं मतदान होणार असून, दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिलला बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, आणि परभणी इथं मतदान होईल. तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, आणि हातकणंगले इथं मतदान होणार असून, चौथा टप्प्यात १३ मे रोजी नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, आणि बीड इथं मतदान होईल. पाचव्या टप्प्यात २० मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघात मतदान होणार आहे.
      दरम्यान, निवडणूक आयुक्तांनी देशभरातल्या मतदारांचा तसंच मतदानासाठीच्या विविध सुविधांचा यावेळी आढावा घेतला. देशभरात एकूण ९७ कोटी मतदार असून, त्यापैकी एक कोटी ८२ लाख नवमतदार आहेत. या मतदारांना देशभरातल्या साडे दहा लाख मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. ८५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे मतदार तसंच दिव्यांग मतदारांना आपल्या घरून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.
राजकीय पक्षांसाठी नियमावली आयोगानं जाहीर केली. निवडणूक प्रचारात आदर्श आचारसंहितेचं पालन सर्वांना करावं लागणार असून, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला पक्षाने उमेदवारी का दिली, याचा खुलासा करावा लागणार आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर प्रलोभनांच्या वाटपावर तपास यंत्रणांना काटेकोर नजर ठेवण्यास सांगण्यात आलं आहे.
      दरम्यान, सिक्कीम, ओडिशा, आंध्रप्रदेश, आणि अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीचीही आयोगानं आज घोषणा केली. महाराष्ट्रातल्या अकोला पश्चिमसह अनेक राज्यातल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकाही आयोगाने जाहीर केल्या. संबंधित मतदार संघात लोकसभेच्या मतदानासोबतच विधानसभेचं तसंच पोटनिवडणुकीसाठीचं मतदान होणार आहे.
****
कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या मराठा नागरिकांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देताना, सगे सोयऱ्यांना या आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी राज्य सरकारनं अधिसूचना काढलेली आहे. यावर आलेल्या हरकतींची छाननी करुन अंदाजे ४ महिन्यात अंतिम निर्णय घेऊ असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केलं. राज्य मंत्रिमंडळाची या आठवड्यातील तिसरी बैठक आज मुख्यंमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली झाली त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आज झालेल्या बैठकीत देखील जनहिताचे अनेक निर्णय घेतले असून त्यामध्ये कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर पद्धतीने लाभ देण्यासाठी ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
दरम्यान, आज झालेल्या बैठकीत विविध विभागांच्या एकूण सतरा प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. सरकारी मालमत्ता विद्रूपीकरणासाठी आता एक वर्षाचा कारावास आणि दंडाची रक्कम वाढवणं, गुन्ह्यांची वेगाने उकल करण्यासाठी संगणकीय न्याय सहाय्यक विज्ञान उत्कृष्टता केंद्र उभारणे तसेच राज्य पोलीस दलात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणे हे निर्णय बैठकीत घेण्यात आले. तसंच विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करणं, वृद्ध साहित्यिक, कलाकारांना ५ हजार रुपयांचं मानधन, संस्कृत, तेलुगू, बंगाली साहित्य अकादमींची स्थापना, शासकीय, निमशासकीय जागांवर मोफत चित्रीकरण आणि हाताने मैला उचलण्याच्या प्रथेच्या उच्चाटनासाठी रोबोटिक स्वच्छता यंत्रे असलेली "मॅनहोलकडून मशीनहोल" कडे योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
****
दिव्यांगाना स्वावलंबी बनविण्यासाठी मोबाईल शॉप ऑन व्हेईकल अंतर्गत पर्यावरणस्नेही वाहनं उपलब्ध करून देण्याच्या योजनेचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मुंबईत शुभारंभ करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य मंत्री उपस्थित होते. चार दिव्यांग व्यक्तिंना हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या दुकानांच्या चाव्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या. प्रत्येक जिल्हयातील दिव्यांगजनांमधून लोकसंख्येच्या प्रमाणात संपूर्ण पारदर्शक प्रक्रिया राबवून लाभार्थ्यांची निवड केली जाणार आहे.
****
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज दुपारी मुंबईत दाखल झाली. मुलुंड इथल्या भांडूप चौकातून राहुल गांधी यांच्या यात्रेच्या मुंबईतील प्रवासाला सुरूवात झाली असून प्रि���ांका गांधी देखील या यात्रेत सहभागी झाल्या आहेत. मुलूंड, धारावी, माटुंगा मार्गे ही यात्रा दादर इथं चैत्यभूमीवर पोहोचणार आहे. चैत्यभूमी इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात या यात्रेचा समारोप होणार आहे. उद्या रविवारी मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान अशी ही न्याय सँकल्प पदयात्रा काढण्यात येणार आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाचे जनसंपर्क प्रभारी जयराम रमेश यांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. निवडणूक रोख्यांच्या मुद्यावरून त्यांनी भारतीय जनता पक्षावर कडाडून टीका केली.
****
प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून नवनीत कुमार सेहगल यांची नियुक्ती करण्यात आली असून, आज त्यांनी पदभार स्वीकारला. सेहगल हे निवृत्त प्रशासकीय अधिकारी आहेत. तीन वर्षांसाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
प्रसिध्द गायिका अनुराधा पौडवाल यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पक्षाचे महासचिव अरुण सिंह यांच्या उपस्थितीत पौडवाल यांनी नवी दिल्ली इथं भारतीय जनता पक्षाचं सदस्यत्व स्वीकारलं.
****
नागपुरातील दिव्यांगांना आज सौरऊर्जाचलित अत्याधुनिक तीन चाकी सायकल वितरित करण्यात आल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आज हा कार्यक्रम पार पडला. सौरऊर्जेवर ५ तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होणाऱ्या या तीन चाकी सायकलचा वेग ताशी २३ किलोमीटरपर्यंत आहे. एका वेळी पूर्ण चार्ज झाल्यावर ती ४० किलोमीटर चालू शकेल. सौरऊर्जेशिवाय ही सायकल वीजेवरही चार्ज करता येणार आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचा नटवर्य लोटू पाटील विशेष नाट्यपुरस्कार मुंबईचे नाट्यकर्मी आणि दिग्दर्शक राजीव नाईक यांना जाहीर झाला आहे. तर यशवंतराव चव्हाण विशेष वाङ्गमय पुरस्कार पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ.माधव गाडगीळ यांना जाहीर झाला आहे. अकरा हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ असं या पुरकाराचं स्वरुप आहे. मसापच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती देण्यात आली.
****
ज्येष्ठ साहित्यिक दिवंगत नरहर कुरुंदकर यांच्या नांदेड इथं उभारल्या जाणाऱ्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याच्या बांधकामासाठी राज्य सरकारनं १४ कोटी ७८ लाख रूपये मंजूर केले आहेत. याबाबतचा शासननिर्णय आज जारी करण्यात आला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी यासाठी पाठपुरावा केला होता.
****
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचा पंचवीसावा दीक्षांत समारंभ कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्या अध्यक्षतेखाली येत्या मंगळवारी १९ मार्चला होणार आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण कार्यालय परिसरातील सुवर्ण जयंती दीक्षांत सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. विविध विद्याशाखेतील एकूण ११ हजार दोन स्नातकांना यावेळी पदवी प्रदान करण्यात येईल.
****
हिंगोली-मुंबई जनशताब्दी एक्सप्रेसचं आरक्षित तिकीट हिंगोली इथं पहाटे सव्वा चार वाजेपर्यंत देण्याचा निर्णय दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने घेतला आहे. सामान्य वेळेत सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेनंतर हिंगोली रेल्वेस्थानकावरच्या फलाट क्रमांक दोन वरील तिकीट खिडकीतून मध्यरात्री १२ वाजेपासून ते पहाटे सव्वा चार वाजेपर्यंत या गाडीचं आरक्षित तिकीट प्रवाशांना घेत येणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 January 2024
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ जानेवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मराठा समाजाला ओबीसींच्या सवलती लागू-मुख्यमंत्र्यांची घोषणा;मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मागे-आंतरवाली सराटीसह मराठवाड्यात जल्लोष
विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योग-व्यवसाय समूहांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा
सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बॅनर पटकावत एनसीसीचं महाराष्ट्र संचालनालय देशात सर्वोत्तम
परभणी इथं आजपासून ��ॉ. गुलाम रसुल संगीत महोत्सवाचं आयोजन
      आणि
ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिसस्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या रोहन बोपण्णाला अजिंक्यपद
****
आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मराठा समाजाला ओबीसींना दिले जाणारे अधिकार आणि सवलती दिल्या जातील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते काल नवी मुंबईत आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर बोलत होते. जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातून फळांचा रस घेऊन आपलं उपोषण सोडलं. जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या असल्याचं सांगत, याबाबतच्या अधिसूचनेची प्रत जरांगे यांना दिली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले...
"कुणबी नोंदी मराठवाड्यामध्ये कधी केल्या जात नव्हत्या. आता सापडू लागल्या. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबीरं आपण लावलेली आहेत. सगेसोयरे याबाबतीमध्ये अधिसूचना आपण काढलेली आहे. त्याचबरोबर वंशावळ जुळवणीसाठी आपण समिती नेमली आहे. मराठा समाजला ओबीसीचे अधिकार ओबीसीच्या सवलती दिल्या जातील."
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसी सवलती देण्याबाबत सरकारनं घेतलेल्या निर्णयाबद्दल ओबीसींचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते काल नाशिक इथं बोलत होते. यासंदर्भात आज मुंबई इथं आपल्या शासकीय निवासस्थानी या संदर्भात ओबीसी दलित आणि आदिवासी नेत्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचं, भुजबळ यांनी सांगितलं.
छगन भुजबळ यांची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका नसल्याचं, पक्षानं स्पष्ट केलं आहे. पक्षाचे ने��े प्रफुल्ल पटेल यांनी काल गोंदिया इथं बोलतांना, भुजबळ हे समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसींचा लढा लढत असल्याचं सांगितलं.
दरम्यान, सरसकट दाखल्यांचा प्रश्न अद्यापही सरकारला मार्गी लावता आला नसल्याची टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते काल नांदेड इथं वार्ताहरांशी बोलत होते. ज्यांच्याकडे नोंदी नाहीत त्यांच्या कुणबी दाखल्यांसंदर्भात शासन कसा मार्ग काढणार, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. १६ फेब्रुवारी नंतरच राज्य शासनाच्या या आदेशाची अंमलबजावणी होणार असून, यावर हरकती, आक्षेप प्राप्त झाल्यानंतर हा विषय आणखी स्पष्ट होईल, असं चव्हाण म्हणाले.
****
दरम्यान, आरक्षणाच्या या निर्णयाबद्दल मराठा समाजाकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. ठिकठिकाणी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी करत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जालना जिल्ह्यात आरक्षण आंदोलनाचं मुख्य केंद्रबिंदू ठरलेल्या आंतरवाली सराटी गावातही काल आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जिल्हा भाजपा कार्यालयासमोरही पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयाचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं.
छत्रपती संभाजीनगर इथं सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे, शहरातल्या क्रांती चौक इथं मराठा समाजाकडून गुलाल उधळत आणि मिठाई वाटत जल्लोष करण्यात आला.
परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं मराठा समाजातर्फे गावातून मिरवणूक काढण्यात आली.
लातूर इथं मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गुलाल उधळून, आतिषबाजी करण्यात आली. उदगीर इथं लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला.
****
अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांची ८४ वी परिषद कालपासून मुंबईत विधानभवनात सुरू झाली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते या परिषदेचं उद्‌घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेला दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या. सर्व लोकप्रतिनिधींनी सभागृहात तसंच सार्वजनिक जीवनात आदर्श आचरण करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
विदर्भ आणि मराठवाड्यात उद्योग- व्यवसाय सुरू करणाऱ्या समूहांना सवलतीच्या दरात वीज पुरवठा करणारी योजना लवकरच राबवली जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटलं आहे. नागपूर इथं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रांगणात खासदार औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटनानंतर ते काल बोलत होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते. औद्योगिक, कृषी आणि अन्य क्षेत्रांचा विकास करायचा असेल तर पायाभूत सुविधा बळकट करणं, आवश्यक आहे, त्यासाठी रस्त्यांचा विकास करण्यात येत असल्याचं गडकरी यांनी सांगितलं.
****
राष्ट्रीय छात्र सेना एनसीसीच्या महाराष्ट्र संचालनालयानं पंतप्रधान बॅनर सलग तिसऱ्यांदा पटकावत, देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकावला आहे. काल नवी दिल्लीत झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा सन्मान महाराष्ट्राला प्रदान करण्यात आला. यापूर्वी १९ वेळा हा सन्मान महाराष्ट्र संचालनालयाला मिळाला आहे. 
****
आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा एकशे नववा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाणार आहे.
दरम्यान, परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून पंतप्रधान उद्या विद्यार्थ्याशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा सातवा भाग आहे
****
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सोलापूर इथं काल नाट्य दिंडी काढण्यात आली. पारंपरिक लोककला असलेल्या वासुदेव, पोतराज, गोंधळी, बहुरूपी तसच मानाचे नंदीध्वज, वारकरी, बहुरंगी वेशभूषेतील कलाकारांमुळे ही दिंडी लक्षणीय ठरली.
****
परभणी इथं आजपासून देवगिरी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. गुलाम रसुल संगीत महोत्सवाला सुरुवात होत आहे. कोलकाता इथले प्रसिद्ध गायक सम्राट पंडित, सारंगी वादक संगीत मिश्रा, महागामीच्या नृत्यगुरू पार्वती दत्ता, अकोला इथले गायक नीरज लांडे, तबला वादक डॉ. प्रशांत जोशी आदी मान्यवर या संगीत महोत्सवात सादरीकरण करणार आहेत. या महोत्सवात नृत्यगुरू पार्वती दत्ता यांची कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे. श्री शिवाजी महाविद्यालयात सायंकाळी साडे सहा वाजता हे कार्यक्रम होणार आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यातलं मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत शंभर टक्के पूर्ण करावं, अशा सूचना राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद काळे यांनी दिल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वेक्षण तसंच विविध कामांची आढावा बैठक काल हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. काल परभणी इथंही डॉ काळे यांनी यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली. मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण करताना येणाऱ्या अडचणी दूर करुन, सर्वेक्षणाचं काम वेळेत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी केली.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत परभणी इथं मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत पांडुरंग गमे यांनी आपल्याला झालेल्या लाभाची माहिती दिली...
बाईट - पांडुरंग गमे, परभणी
****
भारताच्या रोहन बोपण्णाने ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे. आपला ऑस्ट्रेलियायी जोडीदार मॅथ्यू एब्डेन याच्या साथीनं रोहनने इटलीच्या जोडीचा सात - सहा, सात-पाच असा पराभव केला. त्रेचाळिसाव्या वर्षी ग्रॅण्डस्लॅम पटकावणारा रोहन हा पहिलाच टेनिसपटू ठरला आहे.
****
ओमानमधील मस्कत इथं सुरु असलेल्या महिला हॉकी फाईव्ह विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि नेदरलॅण्ड संघात अंतिम सामना होणार आहे. भारतीय महिला संघानं काल दक्षिण आफ्रिकेला ६-३ अशा फरकानं हरवत अंतिम फेरीत धडक मारली.
****
भारत आणि इंग्लंड दरम्यान हैदराबाद इथं सुरु असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात, कालच्या तिसऱ्या दिवसअखेर इंग्लंड संघाने दुसऱ्या डावात ६ बाद ३१६ धावा केल्या, पाहुण्या संघानं दुसऱ्या डावात १२६ धावांची आघाडी घेतली आहे. तत्पूर्वी भारताचा पहिला डाव काल ४३६ धावात संपुष्टात आला.
****
चेन्नईत सुरु असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत ९४ पदकं जिंकून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर कायम आहे. यामध्ये ३२ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३५ कांस्य पदकांचा समावेश आहे. तमिळनाडू संघ दुसऱ्या तर हरियाणा तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं वाहतूक शाखा आणि स्मार्ट सिटी प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने कालपासून शहरामधे वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन करणाऱ्या वाहन धारकांवर ऑनलाईन चलन पध्दतीने दंडात्मक कारवाईला सुरूवात झाली. वाहतुक नियम तोडणाऱ्यांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधे पाहून कारवाई करण्यात येत आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 27 January 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २७ जानेवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत ओबीसींचे अधिकार आणि सवलती मराठा समाजाला लागू-मुख्यमंत्र्यांची घोषणा;मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे
आरक्षण निर्णयावर मंत्री छगन भुजबळ यांची टीका;आंतरवाली सराटीसह मराठवाड्यात जल्लोष
अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांच्या परिषदेला मुंबईत विधानभवनात प्रारंभ
आणि
परभणी इथं आजपासून डॉ. गुलाम रसुल संगीत महोत्सव
****
आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मराठा समाजाला ओबीसींना दिले जाणारे अधिकार आणि सवलती दिल्या जातील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज नवी मुंबईत आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्यानंतर बोलत होते. जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातून फळांचा रस घेऊन आपलं उपोषण सोडलं. मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य केल्या असल्याचं सांगत, याबाबतच्या अधिसूचनेची प्रत जरांगे यांना दिली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले -
कुणबी नोंदी मराठवाड्यामध्ये कधी केल्या जात नव्हत्या. आता सापडू लागल्या. कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबीरं आपण लावलेली आहेत. सगेसोयरे याबाबतीमध्ये अधिसूचना आपण काढलेली आहे. त्याचबरोबर वंशावळ जुळवणीसाठी आपण समिती नेमली आहे. मराठा समाजला ओबीसीचे अधिकार ओबीसीच्या सवलती दिल्या जातील.
दरम्यान, मराठा समाजाला ओबीसी सवलती देण्याबाबत सरकारनं घेतलेल्या निर्णयाबद्दल ओबीसींचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ते आज नाशिक इथं बोलत होते. उद्या मुंबई इथं आपल्या शासकीय निवासस्थानी या संदर्भात ओबीसी दलित आणि आदिवासी नेत्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचं, भुजबळ यांनी सांगितलं.
मराठा आरक्षणाच्या या निर्णयावर काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे. ते आज धुळे इथं काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभाग जिल्हानिहाय आढावा बैठकपूर्वी पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठ्यांना आरक्षण दिलं, पण ते कसं दिलं हे स्पष्ट केलं नाही, याकडे पटोले यांनी लक्ष वेधलं.
****
दरम्यान, आरक्षणाच्या या निर्णयाबद्दल मराठा समाजाकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यासह आरक्षण आंदोलनाचं मुख्य केंद्रबिंदू ठरलेल्या आंतरवाली सराटी गावात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे. मराठा समाजबांधवांनी ठिकठिकाणी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. जिल्हा भाजपा कार्यालयासमोरही पदाधिकाऱ्यांनी मराठा आरक्षणाच्या निर्णयाचं ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं.
छत्रपती संभाजीनगर इथं सर्वत्र आनंद व्यक्त करण्यात येत आहे, शहरातल्या क्रांती चौक इथं मराठा समाजाकडून गुलाल उधळत आणि मिठाई वाटत जल्लोष करण्यात आला.
परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातल्या कातनेश्वर इथं मराठा समाजातर्फे गावातून मिरवणूक काढण्यात आली.
लातूर इथं मराठा क्रांती मोर्चा आणि सकल मराठा समाजाच्या वतीने जल्लोष करण्यात आला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून गुलाल उधळून, आतिषबाजी करण्यात आली. उदगीर इथं लातूरचे खासदार सुधाकर शृंगारे यांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला.
****
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या विविध मागण्यासंदर्भात अनेक दिवसांपासून सुरु असलेला संप काल मागे घेण्यात आला. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे, महिला आणि बालविकास सचिव अनुप कुमार, एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्त रुबल अग्रवाल यांच्यासोबत झालेल्या बैठकीत समाधानकारक आणि आशादायी चर्चा झाल्यामुळे संप मागे घेत असल्याचं सर्व संघटनांनी जाहीर केलं. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना निवृत्तीवेतन लागू करण्याकरता संघटनांकडून अभिप्राय घ्यावेत, असे निर्देश तटकरे यांनी या बैठकीत दिले.
****
अखिल भारतीय पीठासीन अधिकाऱ्यांची ८४वी परिषद आजपासून मुंबईत विधानभवनात सुरू झाली. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते या परिषदेचं उद्‌घाटन झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या परिषदेला दूरदृश्य प्रणालीद्वारे शुभेच्छा दिल्या. सर्व लोकप्रतिनिधींनी सभागृहात तसंच सार्वजनिक जीवनात आदर्श आचरण करण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
तीन दिवस चालणाऱ्या परिषदेला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह देशातल्या सर्व विधानसभांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष तसंच काही राज्यांतल्या विधान परिषदांचे सभापती आणि उपसभापती, आणि सर्व विधिमंडळ सचिव उपस्थित आहेत.
विविध राज्यातल्या विधिमंडळ सचिवांची ६०वी परिषदही इथे होत आहे. या परिषदेत 'विधानमंडळ सेवेमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं' या विषयावर चर्चा होणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीतल्या करीअप्पा परेड मैदानावर राष्ट्रीय छात्र सेनेच्या वार्षिक मेळाव्याला संबोधित करत आहेत. या वर्षीच्या मेळाव्यात दोन हजार २०० हून अधिक, राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्र आणि २४ विविध देशातले तरुण छात्र सहभागी झाले आहेत.
आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रम मालिकेतून पंतप्रधान उद्या देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रम मालिकेचा हा एकशे नववा भाग आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या स���्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमाचं प्रसारण केलं जाणार आहे.
परीक्षांच्या ताणतणावाचा सामना कसा करावा याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी विद्यार्थ्याशी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून संवाद साधतात. येत्या सोमवारी या कार्यक्रमाचा सातवा भाग दिल्लीत होणार असून त्यात ४ हजाराहून जास्त विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
****
शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनानिमित्त सोलापूर इथं आज नाट्य दिंडी काढण्यात आली. पारंपारिक लोककलांनी आणि ढोलताशा, लेझीम तालात निघालेल्या या दिंडीत शेकडो नाट्य कलावंत सहभागी झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, अभिनेते तथा विश्वस्त मोहन जोशी, तसंच रंगभूमीवरील अनेक कलाकार यात सहभागी झाले. पारंपरीक लोककला असलेल्या वासुदेव, पोतराज, गोंधळी, बहुरूपी तसंच मानाचे नंदीध्वज, वारकरी, बहुरंगी वेशभूषेतील कलाकारांनी ही दिंडी लक्षणीय ठरली.
****
परभणी इथं आजपासून देवगिरी संगीत प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. गुलाम रसुल संगीत महोत्सवाची सुरुवात होत आहे. कोलकाताचे प्रसिद्ध गायक सम्राट पंडित, सारंगी वादक संगीत मिश्रा, महागामीच्या नृत्यगुरू पार्वती दत्ता, अकोल्याचे गायक नीरज लांडे, तबला वादक डॉ. प्रशांत जोशी आदी मान्यवर या संगीत महोत्सवात सहभागी होत आहेत. या महोत्सवात नृत्यगुरू पार्वती दत्ता यांची कार्यशाळाही आयोजित करण्यात आली आहे.
****
हिंगोली जिल्ह्यातलं मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील सर्वेक्षण ३१ जानेवारीपर्यंत शंभर टक्के पूर्ण करावं, अशा सूचना राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. गोविंद काळे यांनी दिल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सर्वेक्षण तसंच विविध कामांची आढावा बैठक आज हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी आणि इतर विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत परभणी इथं मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत पांडुरंग गमे यांनी आपल्याला झालेल्या लाभाची माहिती दिली.
बाईट - पांडुरंग गमे, परभणी
****
भारताच्या रोहन बोपण्णाने ऑस्ट्रेलिया खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे. आपला ऑस्ट्रेलियायी जोडीदार मॅथ्यू एब्डेन याच्या साथीनं रोहनने इटलीच्या जोडीचा सात-सहा, सात-पाच असा पराभव केला. अशी कामगिरी करणारा रोहन हा सर्वाधिक वयाचा पहिलाच टेनिसपटू ठरला आहे.
****
वीज ग्राहकांच्या छतावर सौरऊर्जा प्रकल्प उभारणाऱ्या कंत्राटदारांना महावितरण सर्वतोपरी सहकार्य करेल, तथापि, कंत्राटदारांनी दर्जेदार साहित्य वापरून ग्राहकांच्या सुरक्षिततेस प्राधान्य द्यावं, असं आवाहन महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी केलं आहे. ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या बैठकीत ते छत्रपती संभाजीनगर इथं बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील एक कोटी घरांच्या छतावर सौरऊर्जा संच बसवण्यासाठी महत्त्वाकांक्षी 'प्रधानमंत्री सूर्योदय योजना' जाहीर केली असून, छत्रपती संभाजीनगर परिमंडलात मार्चपर्यंत २५ हजार सौरऊर्जा संच बसवण्याचं उद्दिष्ट देण्यात आलं आहे, अशी माहिती केळे यांनी दिली.
****
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
२७ जानेवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
राज्य सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्यानंतर आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आज नवी मुंबईत वाशी इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडलं. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते. सरकारने मागण्या मान्य करणारा जारी केलेला अध्यादेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांना सुपुर्द केला.
सरकारने जारी केलेल्या अध्यादेशात कुणबी नोंदी सापडलेल्यांच्या सगेसोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय राज्यभरात सापडलेल्या ५७ लाख कुणबी नोंदीपैकी जात प्रमाणपत्र मिळालेल्या नागरीकांची माहिती जारी करण्याचा, तसंच शिंदे समितीची मुदत वाढवण्याचा निर्णय देखील घेतल्याचं या अध्यादेशात म्हटलं आहे. 
****
८४ व्या अखिल भारतीय पीठासीन अधिकारी संमेलनाचं उद्घाटन, आज मुंबईत लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते होणार आहे. लोकांचा लोकशाही संस्थांवरचा विश्वास आणखी वृध्दिंगत करण्यासाठीच्या प्रयत्नांवर या संमेलनात चर्चा होईल. या संमेलनात विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातल्या विधीमंडळांचे पीठासीन अधिकारी सहभागी होणार असून, समारोप सत्राला उपराष्ट्रपती जगदीप धनखड मार्गदर्शन करणार आहेत.
****
संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी काल मुंबईत राज्यपाल रमेश बैस तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुंबईत ज्या झपाट्याने पायाभूत सुविधा, गृहनिर्माण यांचा विकास सुरु आहे तो चकित करणारा आहे, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. पर्यावरणपूरक विकास, महिला सक्षमीकरण यासंबंधी राज्यात सुरु असलेल्या प्रयत्नांची मुख्यमंत्र्यांनी त्यांना माहिती दिली.
****
३७ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेची काल सांगता झाली. नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यात झालेल्या या दोन दिवसीय परिषदेत विविध २६ ठराव संमत करण्यात आले.
****
सांगली इथं महाराष्ट्र कामगार कल्य���ण मंडळाच्यावतीने राज्यस्तरीय कामगार केसरी आणि कुमार केसरी कुस्ती स्पर्धांचं उद्घाटन काल पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते झालं. या स्पर्धेत २३७ खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 24 January 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २४ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारतीय प्रजासत्ताकाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचीत्त्याने उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आज ‘आपलं संविधान, आपला सम्मान’ या उपक्रमाचा शुभारंभ झाला. भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या तत्त्वांप्रती सामूहिक बांधिलकीची पुष्टी करणं आणि राष्ट्राला बांधून ठेवणारी समान मुल्यांची जपणूक करणं हा या अभियानाचा उद्देश असल्याचं केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्रालयाने म्हटलं आहे.
****
७५ व्या प्रजासत्ताक दिनाला, कर्तव्यपथावरील संचलन बघण्यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं पंधराशेहून अधिक शेतकऱ्यांना कर्तव्य पथावर आमंत्रित केलं आहे. हे शेतकरी केंद्र सरकारच्या ‘प्रधानमंत्री फसल विमा योजना’ आणि ‘प्रधानमंत्री कृषी मंत्री योजना’ अशा विविध योजनांचे लाभार्थी आहेत. आपल्या दिल्लीतल्या वास्तव्यादरम्यान, हे शेतकरी कृषी पायाभूत सुविधा निधी, राष्ट्रीय बियाणे सहकार्य आणि ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ यासारख्या महत्त्वाच्या सरकारी योजनांचं प्रशिक्षण घेणार आहे.
****
राष्ट्रीय बालिका दिवस आज साजरा होत आहे. देशातल्या मुलींना सक्षम बनवण्यासाठी मदत करणं आणि त्यांना नवीन संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. मुलींच्या हक्कांबाबत आणि त्यांच्या शिक्षणाबाबत जनजागृती यानिमित्त केली जात आहे.
****
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्या आज कोलकाता इथं वार्ताहरांशी बोलत होत्या. इंडिया आघाडीत आपले प्रस्ताव नाकारण्यात आल्यानं हा निर्णय घेतल्याचं त्या म्हणाल्या.
****
राष्ट्रीय रज्जूमार्ग अर्थात ‘रोपवे विकास कार्यक्रम - पर्वतमाला’ अंतर्गत पुढील पाच वर्षांसाठी एक लाख २५ हजार कोटी रुपयांचे दोनशेहून अधिक प्रकल्प निश्चित केले असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिलीआहे. ते काल नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या रोप वे वरील चर्चासत्र आणि प्रदर्शन कार्यक्रमात बोलत होते. रोप वे आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि देशात रोप वे चं जाळं अधिक विकसित करण्यासाठी या क्षेत्रात सार्वजनिक-खासगी भागीदारीला प्रोत्साहन देण्याला सरकारचं प्राधान्य असल्याचं गडकरी म्हणाले.
****
अवयवदानात देशात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. राज्यात १४९ जणांनी केलेल्या अवयदानामुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अवयवदात्यांची कुटुंबं आणि आरोग्य यंत्रणेचं अभिनंदन केलं आहे. मात्र, अवयवांची गरज असलेल्या रुग्णांची संख्या पाहता, अवयवदानाबद्दल अजूनही मोठ्या प्रमाणात जनजागृती होण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
****
बारामती ॲग्रो कंपनीच्या कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार आज मुंबईत सक्तवसुली संचालनालय - ईडीच्या कार्यालयात हजार झाले. ईडीच्या चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.
****
लातूर जिल्ह्यात कालपासून मराठा आणि खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण सुरु झालं असून, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर - घुगे यांनी मुरुड - अकोला या गावात जाऊन प्रगणकांबरोबर सर्वेक्षणाची पाहणी केली. जिल्ह्यात जिथे कुणबी नोंदी सापडल्या आहेत तिथे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात कार्यवाही सुरु आहे. प्रत्येक तालुक्यात गावांमध्ये ग्रामसभा घेऊ, चावडीवर नोंदी प्रसिद्ध केल्या जात आहेत.
****
वेरूळ अजिंठा महोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक शहराचं वैभव जाणून घेण्यासाठी इंटॅक संस्थेच्या सहकार्याने तीन हेरिटेज वॉक होणार आहेत. यातील दुसरा वॉक उद्या सकाळी होत आहे. इतिहास अभ्यासक संकेत कुलकर्णी यात उपस्थितांना शहराच्या विविध भागांची माहिती देणार आहेत.
****
ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एब्डेन यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात बोपन्ना - एब्डेन जोडीनं अर्जेंटिनाच्या जोडीचा पराभव केला. 
****
खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं पदक तालिकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे. महाराष्ट्राच्या संघानं आतापर्यंत १४ सुवर्ण १५ रौप्य आणि १६ कांस्यपदकांसह एकूण ४५ पदकं मिळवली आहेत. या स्पर्धेत १२ सुवर्णांसह तमिळनाडू दुसऱ्या तर सात सुवर्णांसह हरियाणा तिसऱ्या क्रमांकावर आहे.
काल दिवसभरात महाराष्ट्राच���या खात्यात बारा सुवर्ण, सात रौप्य आणि दोन कास्य अशा १९ पदकांची भर पडली. मल्लखांबमध्ये राज्यातल्या खेळाडूंनी चार, जिम्नॅस्टिक्समध्ये तीन सुवर्ण आणि दोन रोप्य पदकांची कमाई केली. ॲथलेटिक्स क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण आणि दोन रौप्य, योगासनामध्ये एक सुवर्ण आणि एक रौप्य, सायकलिंग आणि तलवारबाजीमध्ये प्रत्येकी एक सुवर्ण आणि एक कांस्य तर स्क्वॅश स्पर्धेत महाराष्ट्रानं एक रौप्य पदक पटकावलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 16 January 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १६ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
सरकारने ऊसाच्या मळीवर ५० टक्के निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. मळी हे उसाचं अतिरिक्त उत्पादन असून, अल्कोहोल निर्मितीसाठी त्याचा वापर होतो. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने यासंदर्भात अधिसूचना काढली असून, येत्या गुरुवारपासून हे निर्यात शुल्क लागू होईल.
दरम्यान, सरकारने रिफाइन्ड सोयाबीन तेल आणि शुद्ध सूर्यफूल तेलावरील मूळ आयात शुल्क साडे सतरा टक्क्यांवरून साडे बारा टक्के केलं होतं, हीच सवलत ३१ मार्च २०२५ पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाद्यतेलांवरील आयात शुल्कात कपात केल्याने ग्राहकांना परवडणाऱ्या किमतीत ते उपलब्ध होईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
स्वित्झर्लंडमध्ये दावोस इथं होणार्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राचं एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं ध्येय पूर्ण होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. या परिषदेसाठी मुख्यमंत्री आज रवाना झाले, त्यापूर्वी ते वार्ताहरांशी बोलत होते. महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक आली पाहिजे, महाराष्ट्राचं ब्रॅण्डिंग झालं पाहिजे, यासाठी दावोस इथं चांगली संधी आहे. आज जगभरातले लोक महाराष्ट्राकडे एका वेगळ्या अपेक्षेने पाहत असून, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. या परिषदेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत आणि १० लोकांच्या शिष्टमंडळाचा समावेश आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार मंदिर आणि पुजास्थळांची स्वच्छता अभियानानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत मुंबादेवी मंदिर परिसरात स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. राज्यातल्या वेगवेगळ्या मंदिरांमध्ये स्वच्छता मोहिम सुरु असून, हे केवळ स्वच्छता अभियान नसून यामुळे मन देखील प्रसन्न होतं, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आजपासून सुनावणीला सुरुवात होत आहे. शरद पवार गटाने अजित पवार यांच्या गटातल्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे. अजित पवार गटातले काही आमदार आज आपलं म्हणणं मांडणार आहेत.
****
राज्यस्तरीय रस्ता सुरक्षा अभियानाचं उद्घाटन काल मुंबईत सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झालं. राज्यात होत असलेल्या मृत्यूंमध्ये सर्वात जास्त मृत्यू रस्ते अपघातांमध्ये होत असून, रस्ता सुरक्षा ही काळाची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले. रस्ता सुरक्षा मोहिमेत जनसहभाग वाढवून या मोहिमेला लोकचळवळीचं स्वरूप आणावं,  असं आवाहन भुसे यांनी  केलं.
****
बीड इथंही जिल्हाधिकारी दिपा मुधोळ- मुंडे यांच्या उपस्थितीत काल रस्ता सुरक्षा अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. वाहतूकीचे नियम हे आपल्या सर्वांसाठी असून, ते पाळण्याचं आवाहन त्यांनी केलं. शहरातून वाहतूक नियम जागृतीद्दल विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.
****
बीड इथल्या पंचायत समितीच्या कार्यालयातला ग्रामसेवक हरीभाऊ केदार याला एका खासगी इसमासह तीन हजार रुपयांची लाच घेताना काल अटक करण्यात आली. दुधाळगट योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या दोन गायींची नोंद घेण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती.
****
खामगाव-जालना रेल्वेमार्ग त्वरित सुरू करावा या मागणीसाठी बुलडाणा जिल्ह्यात चिखली इथं रेल्वे आंदोलन समितीच्या वतीनं दोन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी होत आहेत.
****
मराठा आरक्षणाविषयी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ तहसील कार्यालयावर मराठा समाजाच्या वतीने आज बैलगाडी रॅली काढण्यात आली. शासनाने सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं, यासह इतर मागण्यांचं निवेदन तहसिलदारांना देण्यात आलं.
****
निराधारांसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्या मान्य केल्या नाही तर येत्या १९ जानेवारीला लातूर सह बुलडाण्यात रेल रोको आंदोलनाचा इशारा, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यात औसा तहसील कार्यालयावर काल तुपकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
****
नांदेड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात येत्या २४ तारखेपर्यंत ‘न्याय आपल्या दारी’ या संकल्पनेंतर्गत, मोबाईल व्हॅनमधून फिरत्या लोकअदालतीचं आयोजन, करण्यात आलं आहे. ग्रामस्थांनी या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव दलजीत कौर यांनी केलं आहे.
****
राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, अनेक भागात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. नाशिकमध्ये आज तापमान नऊ पूर्णांक आठ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. या हंगामात पहिल्यांदा पारा दहा अंशाच्या खाली आला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 9 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 21 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २१ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
वृत्तपत्र आणि नियतकालीकं नोंदणी विधेयक लोकसभेत संमत
पुणे - छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्ग लवकरच निर्माण करणार- नितीन गडकरी यांची माहिती
मराठा कुणबी नोंदी असलेल्यांच्या नातेवाईकांनाही प्रमाणपत्र मिळावं- जरांगे पाटील यांची मागणी
आणि
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मुर्गाप्पा काशिनाथअप्पा खुमसे यांचं निधन
****
वृत्तपत्र आणि नियतकालीकं नोंदणी विधेयक २०२३ आज लोकसभेत संमत करण्यात आलं. यापूर्वीच राज्यसभेत हे विधेयक संमत झालं आहे. वृत्तपत्र तसंच नियतकालिकांची नोंदणीची प्रक्रिया या विधेयकामुळे सुलभ होणार आहे. दरम्यान, पत्रकारांच्या सुरक्षेसाठी सरकार कटीबद्ध असल्याचं सूचना आणि प्रसारण मंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी म्हटलं आहे. पश्चिम बंगालमध्ये पत्रकारांशी झालेल्या हिंसेबद्दल मंत्री ठाकूर यांनी यासंदर्भातल्या पूरक प्रश्नाचं उत्तर देताना चिंता व्यक्त केली. सर्व राज्य सरकारांनी पत्रकारांच्या सुरक्षेकडे लक्ष द्यावं असं आवाहनही मंत्री ठाकूर यांनी यावेळी केलं.
****
लोकसभेत आज मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त नेमणूक विधेयक मंजूर झालं. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री, लोकसभेतल्या विरोधी पक्ष नेत्यांच्या समितीने शिफारस केल्यावर राष्ट्रपती, निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतील, अशी तरतूद या विधेयकात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे विधेयक आणल्याचं केंद्रीय कायदा मंत्री अर्जून राम मेघवाल यांनी सांगितलं.
****
राज्यसभेत आज इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मांडलेलं दूरसंचार विधेयक २०२३ देखील आज मंजूर झालं. या विधेयकात दूरसंचार सेवा आणि जाळं वाढवण्यासाठी विस्तार आणि कार्यवाही संबंधी कायद्यांमध्ये सुधारणा आणि एकत्रीकरण करण्यात आलं आहे.
****
पुणे-अहमदनगर-छत्रपती संभाजीनगर या मार्गावरची वाढती वाहतूक पाहता, नवा पुणे - छत्रपती संभाजीनगर द्रुतगती महामार्ग लवकरच निर्माण करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत दिली. बांधा-चालवा- हस्तांतरित करा `बीओटी` योजने अंतर्गत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. हा मार्ग पुणे वर्तुळाकार रस्त्याला जोडण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. तळेगाव- चाकण- शिंगणापूर मार्गासाठीचा आराखडाही तयार असून यासाठीचा प्रस्ताव केंद्राकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला असल्याची माहिती मंत्री गडकरी यांनी यावेळी दिली.
****
नागरी विमान वाहतूक कंपन्यांच्या कार्यरत ताफ्याची संख्या पुढच्या वर्षापर्यंत ६८६ पर्यंत पोहचणार असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. २०१४ साली असलेली ताफ्यांची ४०० ही संख्या सध्या ६४४ पर्यंत पोहचली आहे.
****
भारतानं २०१४ ते २०२३ या कालावधीत ३९६ परदेशी आणि ७० देशांतर्गत उपग्रह प्रक्षेपित केले, तर २००३ ते २०१३ या कालावधीत भारताने ३३ परदेशी आणि देशांतर्गत ३१ उपग्रह प्रक्षेपित केले होते, अशी माहिती केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान, अंतराळ राज्यमंत्री डॉ.जितेंद्र सिंह यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. २०१४ ते २०२३ या दशकात उपग्रह प्रक्षेपणातून मिळणारा महसूल १५७ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स आणि २६०दशलक्ष युरो इतका आहे. येत्या काही वर्षांत या क्षेत्राची वाढ सुमारे ८ टक्के दरानं होईल, असं मंत्री जितेंद्र सिंह यांनी यावेळी सांगितलं. लोकसभेचं कामकाज आज संस्थगित करण्यात आलं. अधिवेशन काळात लोकसभेत १८ महत्वपूर्ण विधेयकं पारित झाले असल्याचं अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं.
****
विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज नवी दिल्लीत संसद ते विजय चौक असा निषेध मोर्चा काढला. संसेदतून निलंबित करंण्यात आलेले खासदार मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चाचं नेतृत्व काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्य सभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं. लोकसभेत सुरक्षा भंग केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा तसंच खासदारांचं निलंबन मागं घ्यावं अशी मागणी मोर्चेकरी खासदारांनी केली. या मोर्चात काँग्रेस, द्रवीड मुनेत्र कळघम, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष खासदार सहभागी झाले होते.
****
मराठा कुणबी नोंदी असलेल्यांच्या नातेवाईकांना कुणबी प्रमाणपत्र मिळावं, अशी मागणी मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जालना जिल्ह्यातल्या आंतरवालीसराटी इथं राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं आज त्यांची या मुद्द्यावर भेट घेऊन चर्चा केली, त्यावेळी जरांगे यांनी ही मागणी केली. मंत्री गिरीश महाजन, उदय सामंत आणि संदीपान भुमरे यांचा या शिष्टमंड‍ळात समावेश होता. रक्तातील सगे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळायला हवं. मामाला किंवा मावशी देखील प्रमाणपत्र मिळावं असं जरांगे म्हणाले. मात्र, असं करता येणार नाही आणि तसा निर्णय देखील घेता येणार नसल्याचं मंत्री महाजन यांनी सांगितलं. संध्याकाळी उशिरा पर्यंत ही चर्चा सुरू होती. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, यासाठी स्वतंत्र कायदा करावा लागेल, अशी माहिती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. त्यांनी आज पुण्यामध्ये प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना हे सांगितलं.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जातीनिहाय जनगणनेला विरोध असला तरी जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका असल्याचं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. आरक्षणाचा वाद मिटवायचा असेल तर ज्या जातीची जेवढी टक्केवारी आहे तेवढं आरक्षण त्या जातीला द्यावं अशी मागणीही आठवले यांनी आज यवतमाळमध्ये केली. मराठा आरक्षणाला आपला विरोध नसून मराठा समाजातल्या ज्यांचं उत्पन्न ८ लाखांच्या आत आहे त्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला पाहिजे अशीही भूमिका आठवलेंनी मांडली. प्रकाश आंबेडकर यांनी भारतीय जनता पक्षासोबत यावं, असं आवाहनही आठवले यांनी यावेळी केलं.
****
हैद्राबाद मुक्तीसंग्रामतले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक मुर्गाप्पा काशिनाथअप्पा खुमसे यांचं आज लातूर इथं वृद्धापकाळानं निधन झालं, ते १०३ वर्षांचे होते. मुर्गाप्पा खुमसे हे मूळ लातूर जिल्ह्यातल्या रेणापूरचे रहिवासी होते. त्यांनी हैद्राबाद मुक्ती संग्रामात बीड जिल्ह्याच्या अंबाजोगाई तालुक्यातल्या बर्दापूर इथं झालेल्या पोलीस कारवाईत मोलाची कामगिरी केली होती. स्वातंत्र्यसैनिक मुर्गाप्प्पा खुमसे यांच्या पार्थिव देहावर उद्या सकाळी रेणापूर इथं अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
****
वीरशैव लिंगायत समाजातर्फे लातुरमध्ये लिंगायत आरक्षणाच्या मागणीसाठी आज मोर्चा काढण्यात आला. लिंगायत समाजातल्या वाणी समाजाला सरकारनं आरक्षण दिलं. मात्र हिंदू लिंगायत, लिंगायत आणि वाणी हे एकच असल्यामुळं सरसकट वीरशैव लिंगायत समाजाला वाणी जातीचं प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यात यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली.
****
संसद भवनात तृणमूल काँग्रसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केली तसंच काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी मोबाईलमध्ये चित्रफीत केल्याचा लातूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निषेध केला. धुळे आणि नाशिक इथेही या कारणासाठी भाजप कार्यकर्त्यांनी तीव्र निषेध करत आंदोलन केलं.
****
नांदेड जिल्ह्यातल्या देगलूर तालुक्यातल्या लेंडी प्रकल्पाबाबत आधी पुनर्वसन मग धरण अशी भूमिका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी जाहीर केली आहे. धरणाला विरोध नाही मात्र पुनर्वसना संदर्भातल्या कायद्यांचं पालन झालं पाहिजे अशी शेतकऱ्यांची भूमिका असल्याचं त्यांनी आज नांदेड इथं सांगितलं. पाटकर यांनी आज नांदेड इथं लेंडी प्रकल्पाबाबत जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्यासह जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. १९८६ मध्ये मंजुरी मिळालेला या प्रकल्पात अजुनही पुनर्वसनाचं काम पूर्ण झालेलं नसून १२ गावांच्या गावठाण जमीनी तसंच सात गावांच्या जमिनी या प्रकल्पात बाधित होत असल्याची टीका पाटकर यांनी यावेळी केली.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघादरम्यान मुंबईत सुरु असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात आजच्या पहिल्या दिवस अखेर भारताच्या पहिल्या डावात एक बाद ९८ धावा झाल्या. स्मृती मंधाना ४३, तर स्नेह राणा चार धावांवर खेळत आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१९ धावांवर संपुष्टात आला.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेच्या पुरुष क्रिकेट संघादरम्यान दक्षिण आफ्रिकेतल्या पार्ल इथं सुरु असलेल्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या १९व्या षटकांत तीन बाद १०१ धावा झाल्या होत्या. दक्षिण आफ्रिकेनं या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं.
****
0 notes
airnews-arngbad · 9 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 19 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १९ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
संसदेत आज सलग दुसऱ्या दिवशी ४९ खासदारांवर बेशिस्त वर्तनासाठी निलंबनाची कारवाई
मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार
किल्ले प्रतापगडावर आज शिवप्रताप दिन उत्साहात साजरा
आणि
राज्यस्तरीय युवा महोत्सवाचं येत्या २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान उदगीर इथे आयोजन
****
संसदेत आज सलग दुसऱ्या दिवशी विरोधी पक्षाच्या ४९ खासदारांना बेशिस्त वर्तनासाठी निलंबित करण्यात आलं. लोकसभेत सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, शशी थरूर, डिंपल यादव, कार्ती चिदंबरम यांच्यासह ४१ आणि राज्यसभेतील आठ खासदारांना हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित काळासाठी निलंबित करण्यात आलं.
त्यापूर्वी संसदेचं काम आजही सुरक्षा त्रुटी आणि विरोधी पक्षाच्या खासदारांचं निलंबन या मुद्यांवरुन सातत्यानं बाधित झालं. लोकसभेत दुसऱ्या स्थगितीनंतर साडेबारा वाजता कामकाजाला प्रारंभ झाल्यानंतर काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि द्रविड मुनेत्र कळघम तसंच अन्य पक्षांच्या सदस्यांनी विरोध दर्शवण्यास सुरुवात केली. त्यानंतर केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी लोकसभेत गदारोळ करणाऱ्या ४९ खासदारांना निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला, तो सदनानं मंजूर केला.
****
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या वतीने देशभरात आता पर्यंत प्रसाद योजनेंतर्गत ४६ परियोजना आणि स्वदेश दर्शन अंतर्गत एकूण ७६ परियोजना स्वीकृत करण्यात आल्या आहेत. याशिवाय या दोन योजनांतर्गत विकास करण्यासाठी नवीन स्थळं निश्चित करण्यात आली आहेत.
नवीन धार्मिक स्थळांमध्ये मराठवाड्यातलं घृष्णेश्वर मंदिर, श्रीक्षेत्र राजूर गणपती मंदिर तर त्र्यंबकेश्वर मंदिराचा समावेश करण्यात आला आहे. स्वदेश दर्शन अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे
केंद्रीय पर्यटन मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज एका लेखी प्रश्नाच्या उत्तरादाखल लोकसभेत ही माहिती दिली. या संबधीचा प्रश्न खासदार हेमंत पाटील यांनी विचारला होता.
****
मराठा समाजाला आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज विधानसभेत मराठा आरक्षणावरच्या चर्चेला उत्तर देत होते. आपल्या सरकारने कोणत्याही आंदोलनाबाबत कधीही ताठर भूमिका घेतलेली नसून, सर्वच समाजाच्या आंदोलकांशी चर्चा करून सामोपचाराने मार्ग काढल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण देण्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला. ते म्हणाले -
मराठा समाजाला आरक्षण देतांना ओबीसी समाज किंवा अन्य कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आणि टीकणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भावना आहे. मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन सुर�� आहे, त्याचा काही अपप्रवृत्तींनी फायदा घेऊ नये यासाठी सर्वांनीच दक्ष आणि सावध राहण्याची आवश्यकता आहे.
दरम्यान, मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र यासंदर्भात नियुक्त केलेल्या निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचा दुसरा अहवाल मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेच्या पटलावर ठेवला.
****
राज्यात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांची प्रगती जाणून घेता यावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत लवकरच पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज विधानसभेत ही माहिती दिली. जानेवारी महिन्यात हे पोर्टल सुरू होणार असून या माध्यमातून नागरिकांना पारदर्शकपणे कामांची प्रगती पाहता येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
 रस्त्यांची कामं पूर्ण करण्यात दिरंगाई होत असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असंही मंत्री चव्हाण यांनी यावेळी सांगितलं.
****
मराठवाडयाला हक्काचं पाणी मिळावं अशी शासनाची भूमिका असल्याची ग्वाही सरकारकडून आज विधानसभेत देण्यात आली. मेंढेगिरी समितीच्या शिफारशीनुसार गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाने ऊर्ध्व भागातून मराठवाडयाला हक्काचे समन्यायी पाणी वाटप करावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असतानाही या विभागाला नेहमीच यासाठी संघर्ष का करावा लागतो, असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केला होता.
****
सातारा जिल्ह्यात किल्ले प्रतापगडावर आज जिल्हा प्रशासनाच्या वतीनं तिथीनुसार शिवप्रताप दिन उत्साहात साजरा झाला. सकाळी किल्ले प्रतापगडवरील भवानी मातेची पूजा झाल्यानंतर शिवप्रताप दिन सोहळ्यास प्रारंभ झाला. यानंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेल्या या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह प्रांत, तहसीलदार आणि उपस्थित मान्यवर या मिरवणूकित सहभागी झाले होते.
****
यावर्षीचा राज्यस्तरीय युवा महोत्सव लातूर जिल्ह्यात उद्‌गीर इथे येत्या २९ ते ३१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे. या महोत्सवात जवळपास १३ समूह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक सोलो लोकगीत, कथा लेखन, पोस्टर स्पर्धा, वकृत्व, छायाचित्रण, हस्तकला, वस्त्रोद्योग, कृषी उत्पादनं अशा प्रकारामध्ये स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार असून राज्यातील अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नाशिक तसंच पुणे या आठ विभागातून सुमारे ८०० कलाकार सहभागी होण्याची शक्यता आहे.
या महोत्सवातले विजेते राष्ट्रीय युवा महोत्सवात सहभागी होणार आहेत. येत्या १२ ते १६ जानेवारी दरम्यान पुण्यात राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात येणार आहे.
****
केंद्र शासनातर्फे काढण्यात आलेली विकसित भारत संकल्प यात्रा धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात असलेल्या वर्सुस आणि छडवेल गावात पोहचली. महिला आणि बालकांची आरोग्य तपासणी तसेच आधार कार्ड नोंदणी, आयुष्यमान भारत आरोग्य विमा लाभार्थी नोंदणी, तसंच सिकलसेल तपासणी शिबीर करण्यात आली.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विकसित भारत संकल्प यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत विविध योजनेसाठी नागरिकांनी नोंदणी केली आहे. या यात्रेचे जिल्हा समन्वयक तसंच जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ ओमप्रकाश रामावत यांनी याबाबत अधिक माहिती दिली -
सुरक्षा बीमा योजना जी आहे, ती आतापर्यंत तीन हजार एकशे त्रेपन्न लोकांनी त्याची नोंदणी केलेली आहे. जीवनज्योती बीमा योजना जी आहे, ज्यामध्ये दोन हजार पाचशे सव्वीस लाभार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. दहा हजार लोकांची जवळपास आरोग्य तपासणी केलेली आहे. आणि यासोबतच सहाशे अठ्ठावीस प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेचे जे लाभार्थी आहेत, जे सुटून गेले होते आतापर्यंत किंवा वंचित राहिले होते, त्यांनासुद्धा आपण लाभ दिलेला आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आज नांदेड जिल्ह्यात बिलोली तालुक्यातील रुद्रापूर इथं केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती ग्रामस्थांना देण्यात आली. यावेळी नाबार्ड आणि जिल्हा सहकारी केंद्रीय बँकेच्या वतीने आर्थिक आणि डिजिटल साक्षरता शिबिर राबवण्यात आलं. नाबार्डचे जिल्हा विकास प्रबंधक दिलीप दमय्यावार यांनी बँकेमार्फत राबवण्यात आलेल्या विविध योजनांची ग्रामस्थांना माहिती दिली.
आम्ही इथे नाबार्ड आणि डी सी सी बँकेच्या संयुक्त विद्यमाने आर्थिक आणि डिजीटल साक्षरता अभियानाचा एक कँपे घेतला, ज्या कँपमध्ये आम्ही बँकेमार्फत राबविण्यात आलेल्या केंद्र सरकाच्या विविध योजनांची माहिती लोकांना दिली. विशेषकरून प्रधानमंत्री जीवनज्योती योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजनेची माहिती लोकांना दिली आणि लोकांना आवाहन केलं आहे की, जास्तीत जास्त प्रमाणामध्ये या योजनेचा फायदा घ्यावा.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याला आज साडे चार वाजता सुरुवात झाली. दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या आतापर्यंत दोन बाद ८५ धावा झाल्या आहेत. परवा रविवारी झालेला या मालिकेतला पहिला सामना भारतानं ८ गडी राखून जिंकला आहे. या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना येत्या गुरुवारी जोहान्सबर्ग इथे होणार आहे.
****
साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद मुंबई, प्रदेश यांच्या वतीने देण्यात येणारा पी.सावळाराम राज्यस्तरीय साहित्यरत्न पुरस्कार नांदेड इथले प्रसिद्ध साहित्यिक नारायणराव रामन्ना कंदमवार पाटील यांना मुंबईत प्रदान करण्यात आला आहे.
****
नांदेड जिल्ह्यातील सार्वजनिक ठिकाणी तसंच बाजारातून हरवलेले तब्बल १०२ महाग मोबाईल सायबर पोलिसांनी शोधले आहेत. या सर्व मोबाईलची किंमत १३ लाख ५४ हजार ९०० रुपये इतकी आहे. यापैकी ५६ मोबाईल पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते आज मोबाईल धारकांना परत करण्यात आले.
****
राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आल्यानंतर मराठा आरक्षणासाठी विधीमंडळाचं विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे, मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत यासंदर्भातल्या आपल्या भाषणात नुकतंच हे जाहीर केलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 9 months
Text
 Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date : 18 Dcember 2023
Time : 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १८ डिसेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या 
·      एन सी सी एफ आणि नाफेडचा महाराष्ट्रातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय
·      मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा २३ डिसेंबरला जाहीर केली जाणार
·      नागपूर इथं संरक्षण उपकरण कारखान्यातल्या स्फोटात सहा महिलांसह नऊ जणांचा मृत्यू
आणि
·      दिव्यांगांसाठीच्या पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेत १२ सुवर्णांसह महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर
सविस्तर बातम्या
राष्ट्रीय उपभोक्ता संरक्षण संस्था-एन सी सी एफ आणि राष्ट्रीय कृषी आणि सहकार विपणन महासंघ - नाफेडने महाराष्ट्रातून दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे. ‘एनसीसीएफ’च्या व्यवस्थापकीय संचालक अनिस जोसेफ चंद्रा यांनी काल नाशिक इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. नाशिक लगतच्या छत्रपती संभाजीनगरसह इतर जिल्ह्यांतून बफर स्टॉकसाठी कांदा खरेदी सुरू केल्याचं चंद्रा यांनी सांगितलं.
दरम्यान, एनसीसीएफ कडून नाशिक इथं भारत ब्रॅँड योजनेअंतर्गत रास्त दराने वस्तू विक्रीची सुरुवात काल करण्यात आली. नाशिक शहरात पंधरा मोबाईल व्हॅनद्वारे ही वस्तूविक्री होत असून, दुसऱ्या टप्प्यात ही योजना जिल्हाभर राबवली जाणार आहे. यामध्ये पंचवीस रुपये किलो कांदा, साठ रुपये किलो डाळ तसंच २७ रुपये किलो दराने गव्हाचं पीठ उपलब्ध करून दिलं जात आहे.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरु केलेली संपूर्ण स्वच्छता मोहीम आता राज्यभर विस्तारणात येणार असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल यासंबंधी कामांची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. तीन डिसेंबर पासून सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत पदपथ, रस्‍त्‍यांलगतची गटारे, नाले आणि सार्वजनिक प्रसाधनगृहे एकाच वेळी स्‍वच्‍छ केले जाणार आहेत.
****
विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथांमार्फत देशभरात शासकीय योजनांबाबत जनजागृती केली जात आहे. नागरिकांचा या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ही यात्रा काल हिंगोली तालुक्यात सरकाळी इथं पोहचली. यावेळी आरोग्य विभागाचे उपसचिव कौस्तुभ गिरी यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं. हिंगोलीचे अरुण पिंपरे आणि घन:श्याम मुकडे तर छत्रपती संभाजीनगर इथल्या उषा गायकवाड यांनी आपल्याला झालेल्या लाभाबाबत माहिती दिली.
****
दरम्यान, ही यात्रा काल छत्रपती संभाजीनगर शहरात यादव नगर इथं पोहोचली. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी नागरिकांना मार्गदर्शन करत, केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. 
****
परभणी जिल्ह्यात कोटंबवाडी इथं परभणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी शिवाजी कांबळे यांच्या हस्ते यात्रा रथाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी नागरीकांना शासनाच्या विविध योजनांसह नोंदणी करण्यासंदर्भात माहिती देण्यात आली.
****
जालना जिल्ह्यात जाफराबाद तालुक्यात वरखेडा वीरू, परतूर तालुक्यात आनंदवाडी, मंठा तालुक्यात लिंबखेडा, भोकरदन तालुक्यात नळणी, जालना तालुक्यात हस्तेपिंपळगाव तर अंबड तालुक्यात पानेगाव इथं आज विकसित भारत यात्रा जाणार आहे.
****
धाराशिव जिल्ह्यात नागरिकांनी सरकारी योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष अस्मिता कांबळे यांनी केलंआहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा येत्या २३ डिसेंबर रोजी बीड इथल्या नियोजित सभेत जाहीर केली जाणार आहे. या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी काल जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं राज्यभरातल्या समन्वयकांची बैठक घेतली, त्यावेळी ही माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज विधीमंडळात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहेत. त्यांची भूमिका समजल्यावर बीडच्या सभेत पुढची दिशा जाहीर करण्यात येईल, असं जरांगे यांनी सांगितलं.
****
मराठा समाजाला आपला विरोध नाही, मात्र दादागिरी-झुंडशाही तसंच आमदारांची घर जाळणाऱ्याना आपला विरोध असल्याचं, राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते काल ठाण्यात आगरी महोत्सव मैदानावर ओबीसी निर्धार महामेळाव्यात बोलत होते.
दरम्यान, ओबीसी बचाव परिषदेने ओबीसी कोट्यातून मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. चंद्रपूर इथं काल ओबीसी नेते प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात ही परिषद घेण्यात आली. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करू नये, असं परिषदेने स्पष्ट केलं आहे.
****
नागपूर इथं संरक्षण उपकरण कारखान्यात स्फोट होऊन सहा महिलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. बाजारगाव भागात काल सकाळी ही दुर्घटना घडली. या कंपनीत संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटकं तयार केली जातात. मुख्यमंत्र्यांनी काल रात्री उशीरा दुर्घटनास्थळाची पाहणी केली. दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली, तसंच जखमींना दर्जेदार उपचाराच्या सूचना संबंधितांना दिल्याआहे.
संबंधित कंपनीने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी वीस लाख रुपये मदत जाहीर केली आहे.
****
परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्याच्या वडी पाटीनजीक ट्रॅक्टर आणि क्रूझरमध्ये धडक होऊन झालेल्या अपघतात तीन जण ठार, तर पाच जण जखमी झाले. ही घटना रविवारी मध्यरात्री घडली. सर्व अपघातग्रस्त जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातल्या ब्राह्मणवाडीचे रहिवासी असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात पुणे - नाशिक महामार्गावर चंदनापुरी गावाच्या शिवारात धावत्या कारवर टेम्पो पडून झालेल्या अपघातात दोन वर्षीय बालिकेसह चार जणांचा जागीच मृत्यू झाला. काल रात्री हा अपघात झाला.
****
जालना पोलिसांनी काल गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या सहा संशयितांना जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातून अटक केली. या सहा संशयितांकडून सहा गावठी पिस्तुलं, बारा जिवंत काडतुसं, एक तलवार, पाच मोबाईल, असा एकूण साडेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.  
****
नांदेड इथं गुरुद्वारा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका गुन्हेगाराला पोलिसांनी काल गोळीबार करून जेरबंद केलं. शेरू सिंग नानक सिंग असं त्याचं नाव असून, पोलिसांच्या गोळीबारात तो जखमी झाला, त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
****
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना भारतानं आठ गडी राखून जिंकला. दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दिलेलं ११७ धावांचं आव्हान भारतानं दोन गड्यांच्या मोबदल्यात १६ षटकं ४ चेंडूंत साध्य केलं. भारताच्या साई सुधरसननं सर्वाधिक ५५ धावा केल्या तर पाच गडी बाद करणारा अर्शदीप सिंग सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारतानं एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे.
****
दिव्यांगांसाठीच्या देशातल्या पहिल्या खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्रानं १२ सुवर्ण, सात रौप्य आणि १६ कांस्य पदकांसह पाचवं स्थान पटकावलं. स्पर्धेच्या काल शेवटच्या दिवशीही राज्यातल्या खेळाडूंनी पदकांची लयलूट केली. राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी या स्पर्धेतल्या विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं. या स्पर्धेत हरियाणा पहिलं, उत्तर प्रदेश दुसरं, तामिळनाडू तिसरं आणि गुजरातनं चौथं स्थान पटकावलं.
****
श्रीलंकेच्या संसदीय शिष्टमंडळानं काल अजिंठा लेणीला भेट दिली. या शिष्टमंडळात श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अबेवर्देना, त्यांच्या पत्नी सुविद्य नेलुम ललना यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे. काल हे पथक दिल्लीकडे रवाना झालं.
****
चंपाषष्ठीचा उत्सव आज साजरा होत आहे. छत्रपती संभाजीनगरनजिक सातारा परिसरात आज महाआरतीने खंडोबा यात्रेला सुरुवात झाली. सातारा गावात कालपासूनच भाविकांची गर्दी सुरु झाली. तीन ��िवस चालणाऱ्या या यात्रेत विविध प्रकारची दुकानं सजली आहेत.
****
0 notes
airnews-arngbad · 9 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 17 December 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १७ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज वाराणसीत तमिळ संगम कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन
मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा येत्या २३ डिसेंबर रोजी जाहीर करणार
नागपूर इथं संरक्षण साहित्य निर्मिती कंपनीत भीषण स्फोट; सहा महिलांसह नऊ जणांचा मृत्यू
नांदेड इथं दहशत पसरवणाऱ्या गुन्हेगाराला गोळीबार करून अटक
आणि
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना जिंकत भारताची मालिकेत आघाडी
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीत तमिळ संगम कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन करणार आहेत. वाराणसीत सुमारे वीस हजार कोटी रुपयांच्या विविध विकास योजनांचा शुभारंभही पंतप्रधानांच्या हस्ते होणार असून, कन्याकुमारी वाराणसी तमिल संगमम रेल्वे तसंच वंदेभारत रेल्वेला ते हिरवा झेंडा दाखवून रवाना करणार आहेत. त्यापूर्वी पंतप्रधानांनी आज वाराणसीत विकसित भारत संकल्प यात्रेत सहभाग घेतला. सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी त्यांनी थेट संवाद साधला.
दरम्यान पंतप्रधानांनी आज सकाळी सूरत इथं जगातल्या सगळ्यात मोठ्या हिरे बाजाराचं उद्घाटन केलं. इथल्या व्यापाऱ्यांनी अनुकूल व्यवस्थेचा लाभ घेऊन, भारतीय रत्न आणि आभुषण क्षेत्राला प्रगतीच्या नव्या शिखरांवर नेण्याचं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केलं.
****
विकसित भारत संकल्प यात्रेच्या रथांमार्फत ���ासकीय योजनांबाबत जनजागृती केली जात आहे. नागरिकांचा या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विविध योजनांचे लाभार्थी आपल्याला झालेल्या लाभाची इतरांना माहिती देत आहेत. हिंगोलीचे अरुण पिंपरे आणि घन:श्याम मुकडे तर छत्रपती संभाजीनगर इथल्या उषा गायकवाड यांनी आपल्याला झालेल्या लाभाबाबत माहिती दिली.
बाईट - अरूण पिंपरे, घन:श्याम मुकडे, जि.हिंगोली
आणि उषा गायकवाड, छत्रपती संभाजीनगर
****
दरम्यान, विकसित भारत संकल्प यात्रा आज छत्रपती संभाजीनगर शहरात यादव नगर इथं पोहोचली. यावेळी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी नागरिकांना मार्गदर्शन केलं तसंच जनतेसाठीच्या विविध केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेण्याचं आवाहन नागरिकांना केलं.
****
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरु केलेली संपूर्ण स्वच्छता मोहीम आता महाराष्ट्रभर विस्तारणात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज यासंबंधी कामांची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. तीन डिसेंबर पासून या मोहीमेला सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत पदपथ, रस्‍त्‍यांलगतची गटारे, नाले आणि सार्वजनिक प्रसाधनगृहे हे सगळे एकाच वेळी स्‍वच्‍छ केले जाणार आहेत. मुंबईत वाहनतळांची समस्‍या सोडवण्‍यासाठी लवकरच मार्शलची नेमणूक करण्‍यात येणार असल्‍याचही मुख्‍यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं.
****
मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा येत्या २३ डिसेंबर रोजी बीड इथल्या नियोजित सभेत जाहीर केली जाणार आहे. या आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं राज्यभरातल्या समन्वयकांची बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केला. राज्यात ५४ लाख कुणबी नोंद सापडल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या विधीमंडळात मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार आहेत. त्यांची भूमिका समजल्यावर बीडच्या सभेत पुढची दिशा जाहीर करण्यात येईल, असं जरांगे यांनी सांगितलं.
****
दरम्यान, इतर मागासवर्ग - ओबीसीतून मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या वक्तव्याचा ओबीसी बचाव परिषदेने निषेध केला आहे. चंद्रपूर इथं आज ओबीसी नेते प्राचार्य डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात ही ओबीसी बचाव परिषद घेण्यात आली. जरांगे पाटील हे त्यांची भूमिका वारंवार बदलत असून समाजात तेढ निर्माण करत असल्याचा आरोप परिषदेत करण्यात आला. जरांगे पाटील यांनी ओबीसी नेत्यांविरुद्ध केलेल्या द्वेषपूर्ण आणि धमकीच्या वक्तव्याचा परिषदेने यावेळी जाहीर निषेध केला. मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांचे ओबीसीकरण करू नये, हे देखील परिषदेने यावेळी स्पष्ट केलं.
****
राष्ट्रीय उपभोक्ता संरक्षण संस्था-एनसीसीएफ कडून नाशिक इथं रास्त दराने वस्तू विक्रीची सुरुवात आज करण्यात आली. एनसीसीएफच्या व्यवस्थापकीय संचालक अनिस जोसेफ चंद्रा यांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. नाशिक मध्ये नाफेड आणि एनसीसीएफ कडून कांदा खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवली जाणार असल्याचं चंद्रा यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना सांगितलं. नाशिक शहरात पंधरा मोबाईल व्हॅनद्वारे ही वस्तूविक्रीची सुरुवात करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात ही योजना जिल्हाभर राबवली जाणार आहे. यामध्ये पंचवीस रुपये किलो कांदा, साठ रुपये किलो डाळ तसंच २७ रुपये किलो दराने गव्हाचं पीठ उपलब्ध करून दिलं जात आहे.
दरम्यान, नाफेडनं राज्यात दोन लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे.
****
नागपूरच्या बाजारगाव इथं आज सकाळी एका उपकरण निर्मिती कारखान्यात झालेल्या दुर्घटनेत सहा महिलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. या कंपनीत संरक्षण दलासाठी ड्रोन आणि स्फोटके तयार केली जातात. या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली, तसंच जखमींना दर्जेदार उपचार उपलब्ध करुन देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. या कारखान्यात संरक्षणदृष्ट्या महत्त्वाची उत्पादने निर्माण होत असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांनी त्या अनुषंगानं जिल्हा प्रशासन, पोलीस आणि संबंधित सर्व यंत्रणांना आवश्यक निर्देश दिले आहेत.
दरम्यान, संबंधित कंपनीने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी वीस लाख रुपये मदत जाहीर केली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची राज्य सरकारने दखल घेऊन विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्याची तसंच दोषी असलेल्या कंपनी व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्याची मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे. मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांची तातडीची मदत आणि कुटुंबातील एका सदस्याला या कंपनीत नोकरी द्यावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.
****
परभणी जिल्ह्यात पाथरी तालुक्याच्या वडीपाटीनजीक ट्रॅक्टर आणि क्रूझरमध्ये धडक होऊन झालेल्या अपघतात तीन जण ठार, तर पाच जण जखमी झाले. ही घटना काल मध्यरात्री घडली. सर्व अपघातग्रस्त जालना जिल्ह्याच्या परतूर तालुक्यातील ब्राह्मणवाडीचे रहिवासी असून, परभणीच्या यशवाडी इथल्या मारुतीच्या दर्शनासाठी आले होते. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल केलं आहे.
****
नांदेड इथं गुरुद्वारा परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या एका गुन्हेगाराला पोलिसांनी आज गोळीबार करून जेरबंद केलं. शेरू सिंग नानक सिंग असं त्याचं नाव आहे. त्याने आज रज्जु सिंघ गुलाब सिंघ यांचा तलवार घेऊन पाठलाग केला असता, रज्जू सिंघ यांना हृदयविकाराचा धक्का येऊन त्यांचा मृत्यू झाला. यासंदर्भात कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांना शेरू सिंग याने घरगुती वापराचा गॅस लिकेज करून स्फोटाची धमकी दिली. त्याला पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक घोरबांड आणि सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माने यांनी शेरु सिंग याच्या पायावर गोळ्या झाडल्या. यात तो जखमी झाला, पोलिसांनी त्याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
****
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना भारतानं आठ गडी राखून जिंकला. जोहान्सबर्ग इथं झालेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिका संघानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाच्या भेदक गोलंदाजीमुळं दक्षिण आफ्रिका संघानं २७ षटकं ३ चेंडूंत ११६ धावांवर सर्वबाद झाला. प्रत्यूत्तरादाखल, भारतीय संघानं दोन गड्यांच्या मोबदल्यात १६ षटकं ४ चेंडूंत हे आव्हानं साध्य केलं. भारताच्या साई सुधरसननं सर्वाधिक ५५ धावा केल्या तर पाच गडी बाद करणारा अर्शदीप सिंग सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत भारतानं एक शून्य अशी आघाडी घेतली आहे.
****
श्रीलंका देशाच्या संसदीय शिष्टमंडळानं आज अजिंठा लेणीला भेट दिली. यासाठी हे पथक कालचं छत्रपती संभाजीनगर शहरात दाखल झालं होतं. या शिष्टमंडळात श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अबेवर्देना, त्यांच्या पत्नी सुविद्य नेलुम ललना यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे. आज हे पथक दिल्लीकडे रवाना होईल.
****
छत्रपती संभाजीनगर इथं पेन्शनर्स असोसिएशनसाठी सभागृह उभारलं जाईल असं राज्याचे गृहनिर्माण आणि इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. पेन्शनर्स दिवसाच्या निमित्तानं, आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
****
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 19 November 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : १९ नोव्हेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वकप क्रिकेटचा अंतिम सामना दुपारी दोन वाजता सुरू होईल. हा सामना पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे उपपंतप्रधान रिचर्ड मार्शल, आठ राज्यांचे मुख्यमंत्री आणि मान्यवर अहमदाबादला पोहोचले आहेत. या पार्श्वभूमीवर स्टेडीयमच्या आत आणि बाहेर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. स्टेडियममध्ये सहा हजारांहून अधिक पोलिस, ड्रोनसह राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि जलद कृती दलाची टीम तैनात करण्यात आल्याचं अहमदाबादचे पोलिस आयुक्त जी. एस. मलिक यांनी सांगितलं.
****
गुन्हेगारांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे डीप-फेकसारख्या समस्या समोर येत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अद्यावत राहून गुन्हेगारांवर कारवाई करावी असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. दिल्लीत राष्ट्रपती भवनात काल २०२२ च्या तुकडीच्या भारतीय पोलिस सेवा परिविक्षाधीन अधिकाऱ्यांना संबोधित करताना राष्ट्रपती बोलत होत्या.
सायबर गुन्हे, अंमली पदार्थांची तस्करी, दहशतवाद यासारख्या अनेक आव्हानांना पोलिस दल सामोरे जात असून आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करणं आवश्यक असल्याचंही राष्ट्रपतींनी यावेळी सांगितलं. कोणत्याही क्षेत्राच्या बहुआयामी विकासात पोलीस विभागाची मध्यवर्ती भूमिका असते. अमृतकाळात देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प पूर्ण करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.                                 **** धाराशिव इथं आज महाराष्ट्र केसरीच्या तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्राचं विविध मान्यवरांच्या हस्ते  उद्धघाटन संपन्न झालं. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकणसह राज्यभरातील पैलवानांची मांदियाळी इथं जमली आहे. उत्कृष्ट नियोजन आणि जंगी मैदान पाहायला कुस्ती शौकीन गर्दी करत आहेत. यासोबतच दिग्गज राजकीय नेतेमंडळीही कुस्त्या पाहायला तुळजभवानी मैदानावर येत आहेत.
                                **** उत्तराखंडमधल्या उत्तरकाशी इथं सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४० कामगारांना वाचवण्याचे आज सातव्या दिवशीही प्रयत्न सुरुच आहेत. पंतप्रधान कार्यालय या कामावर सातत्यानं लक्ष ठेवून आहे आणि राज्य सरकारशी संपर्कात आहे. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाचे उपसचिव मंगेश घिल्डियाल यांनी काल घटनास्थळाला भेट दिली आणि मदत आणि बचावकार्याचा आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धमी यांनीही वरिष्ठ अधिकाऱ्यांसह परिस्थितीची माहिती घेतली आहे.                                 **** छत्रपती संभाजीनगर इथं माजी महापौर, तसंच सेवानिवृत्त आयुक्तांकडून शहर विकासाचं व्हीजन जाणून घेतलं जाणार आहे. यातून शहर विकासाच्या विविध बाबींवर मंथन घडवून शहर विकासाचं नवीन व्हीजन ठरवण्याचा प्रशासक जी. श्रीकांत यांचा प्रयत्न आहे. यासाठी पुढील महिन्यात ८ डिसेंबर रोजी महापालिकेच्या वर्धापनदिनी माजी महापौर आणि आयुक्तांचा संवाद कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. मनपाच्या वर्धापन दिनानिमित्त ८ ते १५ डिसेंबरदरम्यान विविध कार्यक्रमही होणार आहेत.
                                    **** लातूर जिल्ह्यात निदान न झालेल्या कुष्ठरूग्‍ण आणि क्षयरूग्‍णांची विशेष शोध मोहीम उद्यापासून राबविण्‍यात येत आहे. ही मोहीम सहा डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
लातूर शहरातील निवडक भागातील २८ हजार घरांना भेटी देऊन सुमारे दीड लाख लोकसंख्‍येच्‍या भागात ही शोध मोहीम राबविण्‍यात येणार आहे. यासाठी एकूण ७२ पथकं स्थापन करण्‍यात आले आहेत. या मोहीमेत घरोघरी जाऊन ताप, सततचा खोकला, वजन कमी होणे आदी लक्षणे असलेल्‍या रुग्‍णांची संशयित क्षयरूग्‍ण म्‍हणून नोंद केली जाणार आहे. संशयित रुग्‍णांची तपासणी करुन त्‍यांच्‍या छातीची क्ष- किरण तपासणीही केली जाणार आहे, तसंच कुष्‍ठरोगाच्‍या बाबतीत लक्षणं जाणून शारिरीक तपासणी करण्‍यात येणार आहे. नागरिकांनी कुष्ठरूग्‍ण आणि सक्रीय क्षयरूग्‍ण शोध मोहीमेअंतर्गत घरी येणाऱ्या आरोग्‍य पथकाला आवश्‍यक माहिती देऊन सहकार्य करावं असं आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्‍या वतीने करण्‍यात आलं आहे.
                                    **** सांगली जिल्ह्यातील मराठा- कुणबी , कुणबी -मराठा जात प्रमाणपत्र नागरिकांना देण्यासाठी त्यांच्याकडील उपलब्ध पुरावे, वंशावळ, शैक्षणिक आणि महसुली पुरावे तसंच जुने अभिलेखे जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापित विशेष कक्षात २१ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर या कालावधीत सादर करावेत असं आवाहन सांगली जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
दरम्यान, यासाठी शासनानं नियुक्त केलेली निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समिती ११ डिसेंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात हि समिती आढावा बैठक घेणार आहे.
                                    ****
0 notes