#क्रिकेट बातम्या हिंदी क्रिकेट बातम्या
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 22 November 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २२ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
मानवता प्रथम, लोकशाही प्रथम, हा आजच्या संकटग्रस्त जगात पुढे जाण्याचा मंत्र असल्याचं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गयाना संसदेच्या विशेष सत्राला संबोधित करताना ते काल बोलत होते. लोकशाही आपल्या अंत:करणात, आपल्या दृष्टीकोनात आणि आपल्या आचरणात असल्याचं त्यांनी सांगितलं. भारताने कधीच विस्तारवादी विचार केला नाही, भारत नेहमीच जागतिक विकास आणि शांततेच्या बाजुने असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं. दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी, सायबर गुन्हे यासह अनेक जागतिक आव्हानांवर त्यांनी यावेळी भाष्य केलं. जगात कोणत्याही देशातल्या कोणत्याही संकटात, प्रथम प्रतिसाद देणारा आणि मदतीसाठी पोहोचण्याचा भारताचा प्रामाणिक प्रयत्न असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांना गयाना देशातला सर्वोच्च सन्मान ‘द ऑर्डर ऑफ एक्सलन्स’ काल प्रदान करण्यात आला. गयानाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली यांच्या हस्ते मोदी यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं. हा सन्मान दोन्ही देशातल्या नागरिकांमध्ये रुजलेल्या ऐतिहासिक संबंधांना समर्पित करत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले.
****
शाश्वत आर्थिक विकास, वाढती क्रयशक्ती आणि गुंतवणुकीस अनुकूल वातावरण निर्माण करणाच्या उद्देशानं स्थिर चलनवाढ आवश्यक असल्याचं, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी म्हटलं आहे. ग्लोबल साऊथच्या उच्चस्तरीय बैठकीत ते काल बोलत होते. किंमत स्थिरतेमुळे बचत आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळते आणि अर्थव्यवस्था आणि जनता दोघांनाही लाभ होतो, असं दास म्हणाले. विकास आणि चलनवाढ यांच्यातला समतोल साधण्यासाठी वित्तीय आणि आर्थिक समन्वय महत्त्वाचा असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
भारतीय सायबर गुन्हेगारी समन्वय केंद्र अर्थात आय फोर सी नं दूरसंवाद विभागाच्या सहकार्यानं १७ हजार व्हॉटसऍप खाती प्रतिबंधित केली आहेत. ही सर्व खाती अग्नेय आशियात कार्यरत असणाऱ्या सायबर गुन्हेगारीशी संबंधित आहेत. परकीय भूमीवरुन काम करणारं गुन्हेगारी विश्व नष्ट करणं आणि भारताची डिजिटल सुरक्षा मजबूत करणं हा या मोहीमेचा उद्देश असल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
क्रीडा क्षेत्रात उच्च दर्जाच्या कामगिरीसाठी केंद्र सरकार लवकरच संसदेत क्रीडा विधेयक आणणार असल्याची माहिती, युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी दिली. ते काल पाटण्यात आयोजित एका कार्यक्रमात खेळाडू आणि क्रीडा क्षेत्रातल्या व्यक्तींना संबोधित करत होते. देशाला क्रीडा क्षेत्रात सर्वोत्कृष्ट करण्यासाठी हे धोरण आखण्यात येणार असल्याचंही मांडवीय यांनी सांगितलं.
****
इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातल्या चौथ्या क्रिएटिव्ह माइंड्स टुमारो कार्यक्रमाचं काल उद्घाटन झालं. या कार्यक्रमाच्या माध्यमातून १३ प्रकारच्या चित्रपट निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या १०० तरुण चित्रकर्मींची निवड करण्यात आल्याचं, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजु यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, इफ्फीमध्ये दाखवण्यात येणार्या विविध विषयांवरच्या ४० चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम हिंदी आणि प्रादेशिक चित्रपटांचा समावेश आहे. इफ्फीमधल्या इंडियन पॅनोरमा दालनातही २५ फिचर फिल्म आणि २० नॉन फिचर फिल्म दाखवण्यात येत आहेत. जगभरातले मान्यवर चित्रपटकर्मी त्यांच्या मास्टरक्लासच्या माध्यमातून, तरुणांना विविध विषयांवर मार्गदर्शन करत आहेत. इफ्फीमधल्या फिल्म बाजारचं हे १८ वं वर्ष असून, चित्रपट निर्मितीत येणाऱ्या तरुणांना नामांकित व्यावसायिकांबरोबर संपर्क साधण्याची संधीही मिळाली आहे.
****
नवी मुंबईतल्या ऐरोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असलेले स्वराज्य पक्षाचे उमेदवार अंकुश कदम यांच्यावर काल कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. भाजपचे माजी नगरसेवक शंकर मोरे यांचा मुलगा जयेश मोरे याला मारहाण केल्याची तक्रार मोरे यांनी केली होती, त्यावरून कदम यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
****
धुळे शहरात मतदान यंत्र घेऊन जाणारे वाहन अडवून निवडणूक अधिकाऱ्याला धमकी देणाऱ्या तरुणासह ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धुळ्यातल्या अभय कॉलेजजवळ काल ही घटना घडली होती.
****
भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पाच सामन्यांच्या बॉर्डर - गावस्कर चषक कसोटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना पर्थ इथं सुरु आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या पाच बाद ६६ धावा झाल्या होत्या.
****
चीन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताच्या लक्ष्य सेनचा सामना आज डेन्मार्कच्या अँडर्स अँन्टोसेन याच्याशी होणार आहे. पुरुष दुहेरीत भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकीरेड्डी या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीतला सामना देखील आज होणार आहे.
****
रेल्वे विभागातल्या कर्मचारी भरतीच्या परीक्षेसाठी येत्या २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी नांदेड - तिरुपती नांदेड ही विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली.
****
0 notes
Text
शुभमन गिल रणजी ट्रॉफी खेळणार नाही भारतासाठी खेळण्यासाठी सराव आवश्यक आहे सुनील गावस्कर यांनी मयंक अग्रवाल बॉसला सांगितले
शुभमन गिल रणजी ट्रॉफी खेळणार नाही भारतासाठी खेळण्यासाठी सराव आवश्यक आहे सुनील गावस्कर यांनी मयंक अग्रवाल बॉसला सांगितले
भारत विरुद्ध Srl लंका 2रा कसोटी सामना: सुनील गावस्कर यांनी तिसऱ्या क्रमांकासाठी हनुमा विहारीची निवड केली. गावस्कर असेही म्हणाले की त्यांनी काय चूक केली आहे? दक्षिण आफ्रिकेत संधी मिळताच त्याने स्वत:ला सिद्ध केले. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील शेवटची कसोटी १२ मार्चपासून बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. मोहालीत खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी…
View On WordPress
#IND Vs SL कसोटी सामना#क्रिकेट बातम्या हिंदी क्रिकेट बातम्या#भारत विरुद्ध एसएल कसोटी सामना#भारत विरुद्ध श्रीलंका#भारत श्रीलंका दुसरी कसोटी#भारतात क्रिकेट#भारतीय क्रिकेट संघ#मयंक अग्रवाल#शुभमन गिल#श्रेयस अय्यर#सुनील गावस्कर#हनुमा विहारी
0 notes
Text
IND vs ENG: अँडरसनने जडेजाच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले, भारतीय अष्टपैलू खेळाडूने दिले चोख उत्तर
IND vs ENG: अँडरसनने जडेजाच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले, भारतीय अष्टपैलू खेळाडूने दिले चोख उत्तर
भारत विरुद्ध इंग्लंड: भारत आणि इंग्लंड यांच्यात एजबॅस्टन येथे शेवटचा कसोटी सामना खेळला जात आहे. कसोटी सामन्यात नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारताने 10 गडी गमावून 416 धावा केल्या. भारताकडून ऋषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी शतके झळकावली. पंतने 111 चेंडूत 146 धावा केल्या तर जडेजाने 194 चेंडूत 104 धावा केल्या. पंत आणि जडेजा यांच्यात सहाव्या विकेटसाठी २२२ धावांची भागीदारी झाली. त्याच्या…
View On WordPress
#IND vs ENG 5वी कसोटी#IND वि ENG#इंग्लंड#इंग्लंड क्रिकेट संघ#क्रिकेट बातम्या#क्रीडा बातम्या#चाचणी मालिका#जसप्रीत बुमराह#जेम्स अँडरसन#ताजी बातमी#ताज्या क्रिकेट बातम्या#भारत#भारत विरुद्ध इंग्लंड#भारतीय क्रिकेट संघ#रवींद्र जडेज#रवींद्र जडेजा#हिंदी बातम्या
0 notes
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 28.08.2024 रोजीचे सकाळी: 11.00 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 28 August 2024
Time: 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २८ ऑगस्ट २०२४ सकाळी ११.०० वा.
****
प्रधानमंत्री जनधन योजनेला आज एक दशक पूर्ण झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २८ ऑगस्ट २०१४ रोजी ही योजना सुरु केली होती. हा जगातला सर्वात मोठा वित्तीय समावेशन उपक्रम असून, अर्थ मंत्रालय यामाध्यमातून उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आधार देण्याचा प्रयत्न सातत्याने करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत ५३ कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत.
****
देशात खरीप पिकांच्या पेरणीमध्ये या वर्षी लक्षणीय प्रगती झाली आहे. एकूण लागवडीखालील क्षेत्र एक हजार ६५ लाख हेक्टरपेक्षा जास्त असून, तुलनेनं गेल्या वर्षी याच कालावधीत अंदाजे एक हजार ४४ लाख हेक्टर क्षेत्रात पिकांची पेरणी झाली होती. कृषी विभागानं प्रसिद्ध केलेल्या खरीप पिकांच्या पेरणीच्या अहवालात ही माहिती देण्यात आली.
****
भारत लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला आहे. ते काल आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं जारी केलेल्या जागतिक अहवालात नमूद करण्यात आलेल्या, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा सात टक्के दराच्या आधारे बोलत होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं गेल्या महिन्यात जारी केलेल्या अहवालात २०२४-२५ साठी भारताचा सकल देशांतर्गत उत्पन्नवाढीचा अंदाज सहा पूर्णांक आठ टक्क्यांवरून सात टक्क्यांपर्यंत जाईल असं म्हटलं आहे.
****
वस्त्रोद्योग मंत्रालयानं प्रत्येकी पन्नास लाख रुपयांच्या अनुदानासह चार स्टार्ट-अपना मंजुरी दिली आहे. नवी दिल्लीत काल राष्ट्रीय तांत्रिक वस्त्रोद्योग अभियानाच्या कार्यक्रम समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या पाच शिक्षण संस्थांना शैक्षणिक संस्था सक्षम करण्यासाठी सुमारे वीस कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्यात आलं आहे.
****
राज्याचे माजी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्यासह सहा जणांविरुद्ध जबरदस्ती आणि बेकायदेशीर कृत्यांच्या आरोपांवरून काल ठाणे इथल्या ठाणेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. व्यावसायिक संजय पुनामिया यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. मे २०२१ ते ३० जून २०२४ या कालावधित पांडे यांनी खोट्या गुन्ह्याच्या धमक्या देणं, पैसे वसुल करणं आणि खोटे दस्तऐवज तयार करून न्यायालयाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पुनामिया यांनी केला आहे.
****
केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे दिले जाणारे राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार काल जाहीर झाले. यामध्ये राज्यातल्या दोन शिक्षकांचा समावेश आहे. कोल्हापूर इथल्या सौ. स. म. लोहिया हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमधले कलाशिक्षक सागर बगाडे आणि गडचिरोली जिल्ह्याच्या एटापल्ली तालुक्यातल्या आदिवासीबहुल जाजावंडी इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेचे शिक्षक मंतय्या बेडके यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
****
ज्येष्ठ अभिनेत्री सुहासिनी देशपांडे यांचं काल पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं; त्या ८१ वर्षांच्या होत्या. गेली अनेक दशकं मराठी आणि हिंदी कलाविश्वात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. माहेरचा आहेर, मानाचं कुंकू, आज झाले मुक्त मी; अशा मराठी चित्रपटात, तसंच ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘राजकारण गेलं चुलीत’, ‘लग्नाची बेडी’ या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या.
****
पेरूमधील लीमा इथं सुरु असलेल्या २० वर्षांखालील जागतिक अथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारताचे जय कुमार, नीरु पाठक, रिहान चौधरी आणि संद्रामोल साबू यांनी काल ४ बाय 400 मीटर मिश्र रिले प्रकारांत पात्रता फेरी पार केली आहे. यासह भारतीय संघ २० प्रतिस्पर्धी संघांमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे.
****
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मानद सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद - आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. एक डिसेंबरपासून ते पदभार स्वीकारतील. ३५ वर्षीय जय शाह, हे पद भूषवणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत.
****
राज्याच्या विविध भागात कालही जोरदार पाऊस झाला. नाशिक शहरासह उपगरात रात्रभर पावसाचा जोर कायम होता, तर पहाटे मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे गोदावरीची पाण्याची पातळी आणखी वाढली आहे. जिल्ह्यातल्या सर्वच धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाची पाणी पातळी साडे ६४ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणात सध्या ६६ हजार ६६६ घनफूट प���रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे.
****
धाराशिव जिल्ह्यातलं तेरणा धरण पूर्ण भरलं आहे. यामुळे परिसरातल्या विहिरी आणि कुपनलिकेच्या पाणी पातळीत वाढ होऊन शेतकऱ्यांना बागायती शेती करण्यास मदत होणार आहे.
****
गुजरात मध्ये देखील मुसळधार पाऊस होत असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. वडोदरा भागात होत असलेल्या पावसामुळे पश्चिम रेल्वेच्या मुंबई हून गुजरात कडे जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 June 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ जून २०२४ सकाळी ७.१० मि.
****
केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज सायंकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात शपथविधी
लोकसभा विरोधी पक्षनेतेपदी राहुल गांधी यांच्या निवडीला काँग्रेस खासदारांची मंजुरी
वैद्यकीय अभ्यासक्रमासाठीची नीट परीक्षा पारदर्शकरित्या पूर्ण-परीक्षा परिषदेचा निर्वाळा
ईनाडू समुहाचे प्रमुख पद्मविभूषण रामोजी राव यांचं हैदराबाद इथं निधन
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू
आणि
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत पाकिस्तान सामना
****
केंद्रीय मंत्रिमंडळाचा आज नवी दिल्लीत शपथविधी होत आहे. राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात आज सायंकाळी होणाऱ्या या समारोहात भाजपचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पंतप्रधानपदाची शपथ देतील. सलग तिसऱ्या कार्यकाळासाठी शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे देशाचे आतापर्यंतचे दुसरेच पंतप्रधान आहेत. या समारंभासाठी भारताच्या शेजारी राष्ट्रांचे प्रमुख नेते राजधानी दिल्लीत दाखल होत असून, सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या कार्यक्रमाचं थेट वार्तांकन आकाशवाणीवरून संध्याकाळी पावणे ७ वाजल्यापासून केलं जाणार आहे, त्यामुळे संध्याकाळी ७ वाजता प्रसारित होणारं प्रादेशिक बातमीपत्र आज संध्याकाळी साडे ६ वाजता प्रसारित केलं जाईल
****
काँग्रेस पक्षाच्या नवनिर्वाचित खासदारांनी लोकसभेत विरोधी पक्ष नेता म्हणून खासदार राहुल गांधी यांची निवड केली आहे. काल दिल्लीत पक्षाच्या कार्यकारी मंडळाची बैठकीत ही निवड प्रक्रिया पार पडली. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आदी नेते या बैठकीला उपस्थित होते. काँग्रेस पक्षाच्या संसदीय पक्षाच्या नेतेपदी सोनिया गांधी यांची निवड यावेळी करण्यात आली. या निवडणुकीत कॉँग्रेस पक्षाला मिळालेला जनतेचा कौल मान्य असून इंडिया आघाडी म्हणून आम्ही संसदेत आणि संसदेच्या बाहेरही कार्यरत राहणार असल्याचं खरगे यांनी सांगितलं.
****
भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गटाची काल मुंबईत बैठक झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यांच्यासह पक्षाचे आमदार उपस्थित होते. दरम्यान, आपण उपमुख्यमंत्री म्हणून कार्यरत राहणार असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याची जबाबदारी घेत, त्यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली होत��, त्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी तुर्तास प्रतीक्षेचा सल्ला दिला असल्याचं, फडणवीस यांनी सांगितलं.
****
इंडिया आघाडीला केवळ बहुजनांची मते हवी होती, संसदेमध्ये बहुजनांचं नेतृत्वच नको होतं अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. या पक्षांना सामाजिकदृष्ट्या वंचित आणि शोषितांसाठी लढायचं असतं, तर वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याची गरजच पडली नसती, असं परखड मत आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे.
****
राज्यात दुष्काळग्रस्त भागातील जनतेला तातडीनं मदत पुरवण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. यामागणीचे निवेदन त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे सादर केलं. कोरडवाहू शेतीला एकरी २५ हजार रुपये, बागायती शेतीला ५० हजार रुपये आणि फळबागांना एकरी १ लाख रुपये मदतीची मागणी त्यांनी या निवेदनातून केली आहे.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेतलेली राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा-नीट ही संपूर्ण देशभरात पूर्णपणे पारदर्शकरित्या पार पडली असल्याचा निर्वाळा राष्ट्रीय परीक्षा परिषद -एनटीएने दिला आहे. एनटीएचे महासंचालक सुबोध कुमार सिंग यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या परीक्षेची कोणतीही प्रश्नपत्रिका फुटली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ज्या सहा परीक्षा केंद्रातील एक हजार सहाशे विद्यार्थ्यांचा चुकीच्या प्रश्नपत्रिकेच्या वितरणामुळे वेळ वाया गेल्याच्या तक्रारी आल्या होत्या, त्यांचं निवारण करण्यासाठी एनटीएने उच्चस्तरीय समिती स्थापन केली असल्याचं सिंग यांनी सांगितलं.
****
ईनाडू समूहाचे प्रमुख पद्मविभूषण रामोजी राव यांचं तेलंगणातल्या हैदराबाद इथं काल निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. रामोजी राव यांनी तेलगु, कन्नड, तमिळ, मल्ल्याळम तसंच हिंदी भाषेत सुमारे ६० चित्रपटांची निर्मिती केली होती. प्रतिघात आणि नाचे मयूरी हे त्यांचे चित्रपट विशेष गाजले. नाचे मयूरी चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारनेही गौरवण्यात आलं होतं. २०१६ मधे त्यांना पद्मविभूषण या नागरी सन्मानाने सन्मानित करण्यात आलं होतं. चित्रिकरण सुविधांसाठी देशोदेशी नावाजली गेलेली हैदराबाद इथली रामोजी फिल्म सिटी त्यांनी उभारली. ई-टीव्ही हा १३ भाषांमधला दूरचित्रवाहिन्यांचा समूह त्यांनी स्थापन केला. रामोजी राव यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीत कालपासून आमरण उपोषण पुन्हा सुरू केलं आहे. या उपोषणासंदर्भात आंतरवाली सराटी इथल्या ग्रामपंचायत कार्यालयात काल ठराव घेण्यात आला, त्यात जरांगे पाटील यांच्या बाजूने पाच तर विरोधात पाच सदस्यांनी मतदान केलं. त्यानंतर सरपंचांनी आपलं निर्णायक मत मनोज जरांगे पाटील यांच्या बाजूने दिल्यावर उपोषणाला सुरुवात करण्यात आली. या पार्श्वभूमीवर आंतरवाली सराटी गावात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कायदा सुव्यवस्था बिघडू नये, याची जबाबदारी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस प्रशासनाची असल्याचं मत जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केलं. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाही, तर विधानसभा निवडणुकीत २८८ उमेदवार उभे करण्याचा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
****
टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान या ���ारंपरिक प्रतिस्पर्धी संघात सामना होणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार न्यूयॉर्क इथं रात्री आठ वाजता प्रारंभ होईल. या स्पर्धेत सध्या वेस्ट इंडिज आणि युगांडा या संघात सामना सुरू असून आजच्या दिवसातला तिसरा सामना ओमान आणि स्कॉटलंड यांच्यात होणार आहे.
दरम्यान, काल या स्पर्धेत ऑस्ट्रेलियानं इंग्लंडचा ३६ धावांनी तर दक्षिण आफ्रिकेनं नेदरलँड्सचा च���र गडी राखून पराभव केला. काल सकाळी झालेल्या सामन्यात अफगाणिस्तानने न्यूझीलंडवर ८४ धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्ताननं दिलेलं १५९ धावांचं लक्ष्य गाठतांना, न्यूझीलंडचा संघ अवघ्या ७५ धावांतच सर्वबाद झाला.
****
नांदेड इथं हिंगोली भागात वजीराबाद पोलिसांनी काल तीन गावठी पिस्तूलं आणि पाच जिवंत काडतूसं जप्त केली. याप्रकरणी गोपाल चव्हाण, मनोज मोरे आणि शुभम सूर्यवंशी या तिघांना अटक करण्यात आली आहे. या तिघांनी जालन्यात घनसांगवी इथल्या रणवीर सिंग याच्याकडून सदर पिस्तुलं विक्रीसाठी आणण्याल्याची माहिती पोलिसांनी दिली.
****
हिंगोली शहर पोलिसांनी दुचाकींची कर्णकर्कश आवाज करणारी सायलेन्सर्स मोठ्या प्रमाणावर जप्त केली होती, अशी जवळपास शंभरावर सायलन्सर्स काल नष्ट करण्यात आली. दुचाकीधारकांनी आक्षेपार्ह सायलेन्सर काढून टाकण्याचं तसंच आपलं वाहन अल्पवयीन मुलांच्या हाती न देण्याचं आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात, शिवसेना शाखेच्या स्थापनेला काल ३९ वर्ष पूर्ण झाली. या निमित्तानं गुलमंडी इथं शिवसेनेच्या वतीने विशेष कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. सुरगाणा तालुक्यातील तोरंगण इथं काल वीज कोसळून यादव नामदेव बो��से याचा मृत्यू झाला. निफाड, कुंभारी, सावरगाव, रानवड, नांदुर्डी या भागात पावसामुळे बऱ्याच घरांचं नुकसान झालं.
त्र्यंबकेश्वर इथं बिल्वतीर्थ तलावात दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. कपडे धुण्यासाठी गेलेल्या या दोन्ही तेरा वर्षीय मुलींचा पाय घसरून त्या तलावात पडल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
नाशिक-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येवला तालुक्यातल्या देशमाने इथं आराम बस आणि ट्रक यांच्यात झालेल्या अपघातात बसचालक जगदीश जाट हा ठार झाला असून, बसमधील सहा प्रवासी जखमी झाले. ही बस जालना आणि संभाजीनगर जिल्ह्यातल्या भाविकांची दोन धाम यात्रा पूर्ण करून परतत असतांना हा अपघात झाला.
****
नेरळ ते माथेरान मिनी ट्रेन येत्या १५ ऑक्टोबर पर्यत बंद राहणार आहे. मध्य रेल्वेकडून जारी पत्रकात ही माहिती दिली आहे. माथेरानमध्ये दरवर्षी मोठा पाऊस पडतो, त्यातून दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेऊन, दरवर्षी पावसाळ्यात ही ट्रेन बंद ठेवली जाते.
दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावर महाड तालुक्यात नडगाव गावाजवळ काल संध्याकाळी दरड कोसळली. या घटनेत जिवीत हानी झाली नसली तरी मुंबई गोवा महामार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
****
नैर्ऋत्य मोसमी पावसानं राज्यात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर तसंच धाराशिव या जिल्ह्यांचा काही भाग व्यापला आहे. पुढच्या पाच दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह उत्साहात सुरू
गरीब, शेतकरी, युवा आणि महिला भाजपच्या निवडणूक जाहीरनाम्याच्या केंद्रस्थानी
काँग्रेसची भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत कोलकाता संघासमोर लखनऊ संघाचं १६२ धावांचं आव्हान
****
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज मुंबईत चैत्यभूमी इथं बाबासाहेबांच्या स्मारकाला अभिवादन केलं. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं नवीन मतदारांची नोंदणी वाढवणं आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या दृष्टीनं भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आज चैत्यभूमी परिसरात मतदार जनजागृतीसाठी विशेष स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या उपक्रमाला राज्यपाल बैस यांनी भेट देऊन स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करून सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं.
****
बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केलं आणि राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या. शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा असा संदेश बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना दिला आहे. बाबासाहेबांनी तयार केलेल्या घटनेला अनुसरून राज्याचा कारभार सुरू असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्य शासनानं इंदू मिलच्या जागी भव्य स्मारक उभं करायला सुरुवात केली असून, नागपूरमधील दीक्षा भूमीचं जतन, संवर्धन यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधील घर खरेदी करून त्याचं संग्रहालयात रूपांतर करून शासनानं बाबासाहेबाना खरी मानवंदना दिली असल्याचं मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथं दीक्षाभूमीला भेट देऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं. बाबासाहेबांनी कायमच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांचा पुरस्कार केला, ��े समाजसुधारणेचे अग्रणी होते अशा शब्दांत त्यांनी बाबासाहेबांना अभिवादन केलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शेजारी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. बाबासाहेबांनी समाजानं दूर सारलेल्या घटकांना सन्मानाची वागणूक देत त्यांच्यात स्वाभिमान जागृत केला असं पवार यांनी या निमित्त आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
राज्यभरात ठिकठिकाणी जयंतीनिमित्त विविध उपक्रम, फेऱ्या, मिरवणुका सुरू आहेत. शासकीय आस्थापनांत जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नागपूरमध्येही डॉ. आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त उत्साहाचं वातावरण आहे. संविधान चौक इथं काल रात्री बारा वाजता बाबासाहेबांचा जयघोष करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नागपूर आकाशवाणीत अभिवादन कार्यक्रम झाला. वर्धा इथं महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयात आज बाबासाहेबांच्या विचारांच्या अऩुषंगानं राष्ट्रीय चर्चासत्र घेण्यात आलं. नागपूरच्या दीक्षाभूमीत अभिवादनासाठी जनसागर लोटला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातील एनडीए आघाडीचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दीक्षाभूमीवर जाऊन अभिवादन केलं. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यातून प्रत्येकानं प्रेरणा घेण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी रचलेले संविधान हे आज घडीला वाचवणं, लोकतंत्राला वाचवणं ही खरी गरज आहे. या संविधानामुळं सामान्य नागरिकाला आर्थिक आणि सामाजिक न्याय मिळेल असं प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज नागपूर इथं केलं. दीक्षाभूमी इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाला भेट दिल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर सर्व चालतील अशी आशा त्यांनी व्यक्त केली तसंच संविधान असेल तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव अमर राहील असंही खर्गे यावेळी म्हणाले.
****
गरीब, शेतकरी, युवा आणि महिला या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवून `सब का साथ सब का विकास` या तत्त्वाच्या आधारे विविध योजनांची आश्वासनं देणारा भारतीय जनता पक्षाचा निवडणूक जाहीरनामा भाजपचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत जाहीर केला. गरिबांना शिधापत्रिकेवर मोफत अन्नधान्य देण्याची ��ोजना पुढची पाच वर्षं चालू ठेवण्याचा, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत तीन कोटी घरं बांधण्याचा, तसंच ७० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक नागरिकापर्यंत आय़ुष्मान भारत योजना पोहोचवण्याचा संकल्प या जाहीरनाम्यात व्यक्त केला आहे. एक देश एक निवडणूक, एकसामायिक मतदारसंघ, आणि पेपरफुटीविरोधी कायदा करण्याचं आश्वासनही भाजपनं याद्वारे दिलं आहे.
****
निवडणुका आल्यानं भारतीय जनता पक्षाला शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांची आठवण झाली असल्याची टीका काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्यांनी आज नागपूर इथं पत्रकारांशी बोलताना भाजपनं सत्तेत असताना दहा वर्ष शेतकरी, छोटे व्यापारी, तरुणांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप केला. समान नागरी कायद्याचं आश्वासन तर मागील निवडणुकीतही दिलं होतं मग आतापर्यंत भाजपनं त्याची अंमलबजावणी का केली नाही, त्यांना कोणी रोखले होते का, असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला. वर्ष २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपनं जे सांगितलं तेच मुद्दे आजच्या जाहीरनाम्यात आहेत. जनता आता या फसव्या आश्वासनांना बळी पडणार नाही, असं त्यांनी नमूद केलं.
****
मराठा समाजाला लवकरात लवकर इतर मागास वर्ग- ओबीसीमधून आरक्षण नाही दिलं तर येत्या पाच जूनपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू करायचा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. त्यांनी आज चैत्यभूमी इथं वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली. मराठा समाजही विधानसभा निवडणुकीची तयारी करेल, असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं.
****
जालना शहर तसंच जिल्ह्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती विविध उपक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात येत आहे. जालना शहरातल्या मस्तगड इथल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी सकाळपासूनच रांग लागली होती. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. या ठिकाणी रक्तदान शिबिरासह आरोग्य तपासणी, फराळ वाटप आदी उपक्रम घेण्यात आले. जयंतीनिमित्त आज शहरात भव्य मिरवणूक काढण्यात येत आहे.
****
लोकशाही समृद्ध आणि बळकट करण्यासाठी बाबासाहेबांनी सामान्य नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला, असं प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत जयदेव डोळे यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं. त्यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि प्रबळ लोकशाही करीता मतदानाचं महत्त्व', या विषयावर व्याख्यान झालं, त्यावेळी डोळे बोलत होते. मतदान निर्भयपणे करता यावं, अशी सुद्धा तरतूद बाबासाहेबांनी केली असल्याचं ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी होते.
****
छत्रपती संभाजीनगरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जयंतीनिमित्त डॉ. अरविंद गायकवाड यांचं 'राष्ट्रनिर्माते : डॉ.बाबासाहेब आंबेडकर' या विषयावर व्याख्यान झालं. बाबासाहेबांनी घटना निर्मीतीबरोबरच ऊर्जा, विद्युत, जल धोरण देखील ठरवल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. कुलगुरू डॉ. विजय फुलारी यावेळी अध्यक्षस्थानी होते.
****
महसूल गुप्तचर संचालनालयानं शिताफीनं केलेल्या एका कारवाईमध्ये वन्यजीवांच्या अवशेषांची तस्करी करणाऱ्याला ताब्यात घेतलं असून त्याच्याकडचा मोठा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये घोरपडीच्या ७८१ `हात जोडी` तसंच साडे १९ किलोहूऩ अधिक वजनाचे प्रवाळ याचा समावेश आहे. मुंबईच्या अधिकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून नाशिक जिल्ह्यामध्ये नंदगाव रेल्वेस्थान परिसरात तीन तासांपेक्षा अधिक काळ चाललेल्या कारवाईत ही अटक केली. महसूल गुप्तचर संचालनालयाला स्थानिक संबंधित अधिकाऱ्यांचं यात सहकार्य मिळालं. तस्करांनी आदिवासी वस्तीवर बोलावून या पथकावर दगडफेक केली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर सुमारे अर्धा किलोमीटर पाठलाग करून तस्कराला अटक करण्यात आल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
****
आज १४ एप्रिल, हा दिन 'राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन' म्हणूनही पाळला जातो. १४ एप्रिल १९४४ ला मुंबई बंदरात 'एस. एस. फोर्ट स्टिकीन' या बोटीमधील दारूगोळ्याच्या साठ्यानं पेट घेतला होता. त्यानंतर उसळलेल्या भीषण आगीवर नियंत्रण मिळविताना मुंबई अग्निशमन दलातील ६६ अधिकारी आणि सैनिकांना वीरगती प्राप्त झाली होती. अग्निशमन विभागातर्फे आज मुंबईमध्ये सेवा बजावताना आजवर वीरगती प्राप्त झालेल्या अधिकारी आणि सैनिकांना श्रद़धांजली अर्पण करण्यात आली.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता इथं लखनऊ सुपर जायंटस संघानं कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर विजयासाठी १६२ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. आतापासून थोड्यावेळापुर्वी कोलकाता संघानं चौथ्या षटकात दोन बाद ४२ धावा केल्या आहेत. आज संध्याकाळी साडेसात वाजता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातला सामना वानखेडे मैदानावर होणार आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथले सेवानिवृत्त शिक्षक सुधाकर तुळशी यांचं आज सकाळी वृद्धापकाळानं निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. महावितरणचे दक्षता अधिकारी प्रशांत तुळशी आणि दैनिक सामनाचे सहाय्यक संपादक गणेश तुळशी यांचे ते वडील होत. आज संध्याकाळी सात वाजता त्यांच्या पार्थिव देहावर प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 12 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
नारीशक्तीच्या बळावर विकसित भारताची अधिक सक्षमतेनं वाटचाल-उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन
एक लाखावर उमेदवारांना आज पंतप्रधानांच्या हस्ते रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्रांचं वाटप
लातूर इथं येत्या २४ तारखेला ‘विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन
नांदेड जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस-अंगावर वीज कोसळून एकाचा मृत्यू
आ��ि
१९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेपद
****
देशाच्या अमृत काळात नारीशक्तीच्या बळावर विकसित भारताची वाटचाल अधिक सक्षमतेनं होईल, असं प्रतिपादन, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. काल गोंदिया इथं मनोहरभाई पटेल यांच्या ११८ व्या जयंती समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उपराष्ट्रपती यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सुदेश धनखड, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गोंदिया नगर परिषद भवनासाठी ३० कोटी रूपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातल्या प्रगतीशील शेतकरी, गुणवंत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडापटू आणि पत्रकारांचा यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रोजगार मेळाव्याअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये नव्याने भरती झालेल्या एक लाखाहून अधिक उमेदवारांना दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वाटप करणार आहेत. देशभरात ४७ ठिकाणी हा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.
****
संतांचं सान्निध्य असणारी महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे, भक्तीतून मिळणारी शक्तीच शत्रूंचा सामना करण्यासाठी शक्ती देते, असं प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. आळंदी इथं सुरू असलेल्या गीता- भक्ती अमृत महोत्सवात ते काल बोलत होते. त्यापूर्वी त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. माऊलींच्या पावन भूमीत लहानपणापासून येण्याची इच्छा आज पूर्ण झाल्याची भावना आदित्यनाथ यांनी यावेळी व्यक्त केली.
****
भारतीय संस्कृती आणि विचार जनसामान्यांपर्यंत पेाहोचवण्याचं कार्य वारकरी शिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्यांमार्फत होत असल्याची भावना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. काल आळंदी इथं वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ विद्यार्थी वसतिगृहाचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. संस्थेतल्या ५०० विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेसाठी पाच कोटी रुपये निधी दिला जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली.
****
सरकारने कापूस पणन महासंघाची खरेदी केंद्रं तातडीनं सुरू करावीत, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. काल मुंबईत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या जिल्हा समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. कापसाला सात हजार २०० रुपयांचा हमीभाव निश्चित करण्यात आला असताना, खुल्या बाजारात मात्र सहा हजार ��०० रुपये दरानं कापूस विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधलं. खरेदी केलेल्या कापसाचे धनादेश शेतकऱ्यांना तातडीनं देण्यात यावे, सीसीआयच्या अटी रद्द कराव्यात, अशा मागण्या वडेट्टीवार यांनी सरकारकडे केल्या आहेत.
****
राज्यात यंदा २०७ साखर कारखान्यांमध्ये साडेसात कोटी मेट्रिक टन इतकं ऊस गाळप झालं असल्याचं, साखर आयुक्त कार्यालयानं सांगितलं आहे. राज्यातले चार साखर कारखाने बंद झाले असून, अवेळी पावसामुळे उसाच्या वजनात वाढ झाल्याने १० टक्के गाळप वाढेल असा अंदाज कार्यालयानं व्यक्त केला आहे.
****
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाअंतर्गतच्या शिपाई पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसोबतच इतर १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला आहे. यात मराठीसह गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, उर्दू, आणि कोंकणी आदी भाषांचा समावेश आहे. येत्या २० फेब्रुवारी ते सात मार्च दरम्यान देशभरातल्या १२८ शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ४८ लाख उमेदवारांनी अर्ज भरले असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या गुरूवारी छत्रपती संभाजीनगर इथं जाहीर सभा घेणार आहेत. शहरातल्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर दुपारी साडे चार वाजता ही सभा होणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगर इथं जनसंवाद दौऱ्यावर येत आहेत. याअंतर्गत ते गंगापूर, वैजापूर, कन्नड आणि संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर इथं जनतेशी संवाद साधणार आहेत.
****
भारतीय जनता पक्षातर्फे सुरू असलेल्या ‘गाव चलो अभियाना’ अंतर्गत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर गावातल्या नागरिकांशी संवाद साधला. शिक्षक, चर्मकार समाज आणि बॅडमिंटन गटाच्या सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, मागण्या आणि संकल्पना जाणून घेतल्या.
****
लातूर इथं येत्या २४ तारखेला मराठवाड्यातल्या युवकांसाठी ‘विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. हा मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समन्वयानं काम करण्याच्या सुचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी आणि औद्योगिक संस्थांनी नावनोंदणी करावी यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश विखे पाटील यांनी यावेळी दिले.
छत्रपती संभाजीनगर इथं राज्य तलाठी संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनालाही विखे पाटील यांनी ��ाल संबोधित केलं. ग्रेड पे बाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याचं त्यांनी यावेळी आश्वासन दिलं.
****
नांदेड जिल्ह्यात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तसंच अनेक ठिकाणी गारपीटही झाली. मुदखेड तालुक्यातल्या पिंपळकौठा इथं वीज पडल्यानं दत्ता वाघमारे या २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातल्या उमरी, हिमायतनगर, भोकर, मुदखेड आणि किनवट तालुक्यात रबी पिकांचं मोठ नुकसान झालं. दरम्यान, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आणि मदतकार्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
****
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २२ फेब्रुवारीपासून मुंबईत आझाद मैदानात उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. काल बीड इथं झालेल्या धनगर समाजाच्या इशारा सभेत ही माहिती देण्यात आली. येत्या १७ तारखेला अहमदनगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या चौंडी या अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी अभिवादन करुन मुंबईकडे जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारनं काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही आणि उपचारही घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.
****
बीड जिल्ह्यात आष्टी इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयातल्या १२५ विद्यार्थ्यांपैकी १०९ विद्यार्थ्यांनी नॅशनल मीन्स कम मेरीट स्कॉलरशीप - एन एम एम एस परीक्षेत यश मिळवलं. या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा शाळेच्या वतीनं विशेष समारंभात सत्कार करण्यात आला. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर..
‘‘या सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रत्येकी १२ हजार रुपये प्रमाणे चार वर्षात एकूण ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या निकालामुळे यंदा हे विद्यालय राज्यात नंबर वन ठरलं आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे या विद्यालयाचं राज्यभरात कौतुक होत आहे. सराव मेहनत नियमितपणे केल्यास हमखास यश मिळाल्याशिवाय राहत नाही, हेच यावरून सिद्ध होतं.’’
आकाशवाणी बातम्यांसाठी रवी उबाळे -बीड
****
क्रिकेट
१९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. ऑस्ट्रेलियन संघानं दिलेल्या दोनशे त्रेपन्न धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतांना, भारतीय संघ ४४ व्या षटकांत १७४ ��ावांवर सर्वबाद झाला.
****
स्वयंसहायता समूहातल्या महिलांना सशक्त-स्वावलंबी करणं हे केंद्र शासनाचं ध्येय असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महिला बचत गटाच्या प्रदर्शनाचा काल कराड यांच्या उपस्थितीत समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
****
नांदेड शहरात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसऱ्या टप्प्याचा आज समारोप होत आहे. शहरातल्या नंदीग्राम सोसायटी भागात या यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती, आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. दरम्यान काल वामननगर चौक आणि गोकुळनगर चौक इथं विकसित भारत संकल्प यात्रेनं जनजागृती केली.
****
बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात चांदापूर इथं काल दहावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली. निवृत्त न्यायमूर्ती बाबुराव तिडके यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करुन या परिषदेला सुरुवात झाली.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 11 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
नारीशक्तीच्या बळावर विकसित भारताची वाटचाल अधिक सक्षमतेनं होईल-उपराष्ट्रपतींकडून विश्वास व्यक्त
कापूस खरेदी केंद्रं तातडीनं सुरू करावीत-विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
राज्यात यंदा २०७ साखर कारखान्यांमध्ये साडेसात कोटी मेट्रिक ऊस गाळप
आणि
१९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर २५४ धावांचं आव्हान
****
देशाच्या अमृत काळात नारीशक्तीच्या बळावर विकसित भारताची वाटचाल अधिक सक्षमतेनं होईल, असा विश्वास उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी व्यक्त केला आहे. गोंदिया जिल्ह्यात धोटे बंधू विज्ञान महाविद्यालयाच्या परिसरात मनोहरभाई पटेल यांच्या ११८ व्या जयंती समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उपराष्ट्रपती यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री तथा पालक मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गोंदिया नगर परिषद भवनासाठी ३० कोटी रूपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातल्या प्रगतीशील शेतकरी, गुणवंत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडापटू आणि पत्रकारांचा यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. धनखड यांच्या हस्ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचं भूमिपूजन करण्यात आलं. धनखड यांनी यावेळी गोंदियातील नॅशनल फ्लाइंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांशीही संवाद साधला.
****
संतांचं सान्निध्य असणारी महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे. भक्तीतून मिळणारी शक्तीच शत्रूंचा सामना करण्यासाठी शक्ती देते, असं प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. आळंदी इथं सुरू असलेल्या गीता- भक्ती अमृत महोत्सवात ते आज बोलत होते. त्यापूर्वी त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. माऊलींच्या पावन भूमीत लहानपणापासून येण्याची इच्छा आज पूर्ण झाल्याची भावना आदित्यनाथ यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाला गोविंददेव गिरी महाराज, बाबा रामदेव, उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
****
समाजाला प्रेरणा देणाऱ्या भागवत धर्माची पताका फडकत ठेवण्याचं काम वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होत असून भारतीय संस्कृती आणि विचार जनसामान्यांपर्यंत पेाहोचवण्याचं कार्य संस्थेतल्या विद्यार्थ्यांमार्फत होत असल्याची भावना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. फडणवीस यांच्या हस्ते आज आळंदी इथं वारकरी शिक्षण संस्थेच्या 'बंकटस्वामी सदन' विद्यार्थी वसतिगृहाचं लोकार्पण करण्यात आलं. संस्थेतल्या ५०० विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेसाठी पाच कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली.
****
सरकारने कापूस पणन महासंघाची खरेदी केंद्रं तातडीनं सुरू करावीत, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. मुंबईत आज झालेल्या काँग्रेस पक्षाच्या जिल्हा समितीच्या बैठकीत ते आज बोलत होते. कापसाला सात हजार २०० रुपयांचा हमीभाव निश्चित करण्यात आला असताना खुल्या बाजारात मात्र सहा हजार ३०० रुपये दरानं कापूस विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधलं. खरेदी केलेल्या कापसाचे धनादेश शेतकऱ्यांना तातडीनं देण्यात यावे, सीसीआयच्या अटी रद्द कराव्यात, अशा मागण्या वडेट्टीवार यांनी सरकारकडे केल्या आहे.
****
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाअंतर्गतच्या शिपाई पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसोबतच इतर १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला आहे. यात मराठीसह आसामी, बंगाली, गुजराती, मल्याळम, कन्नड, तमिळ, तेलगू, ओडिया, उर्दू, पंजाबी, मणिपुरी आणि कोंकणी या भाषांचा समावेश असल्याचं मंत्रालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. येत्या २० फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान देशभरातल्या १२८ शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ४८ लाख उमेदवारांनी अर्ज भरले असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरूवारी छत्रपती संभाजीनगर इथं जाहीर सभा घेणार आहेत. दुपारी साडे चार वाजता शहरातल्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर ही सभा होणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
*****
दरम्यान, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उद्या १२ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर इथं जनसंवाद दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्याच्या विविध भागातल्या जनतेशी ते संवाद साधणार आहेत.
****
राज्यात यंदा २०७ साखर कारखान्यांमध्ये साडेसात कोटी मेट्रिक टन इतके ऊस गाळप झालं असल्याचं साखर आयुक्त कार्यालयानं सांगितलं आहे. यात ४२ साखर कारखान्यांचे पाच लाखांपेक्षा अधिक आणि एकूण तीन कोटी मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळप झाले आहे. राज्यातले चार साखर कारखाने बंद झाले असून अवेळी पावसामुळे उसाच्या वजनात वाढ झाल्याने १० टक्के गाळप वाढेल असा अंदाज कार्यालयानं व्यक्त केला आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं भरलेल्या राज्य तलाठी संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचं महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आलं. विखे पाटील यांनी यावेळी केलेल्या भाषणात ग्रेड पे बाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलं. संघटनेच्या स्मरणिकचे प्रकाशन याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्यासह महसूल विभागाचे वरीष्ठ अधिकारी आणि संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
****
बीड जिल्ह्यात आष्टी इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयातल्या १२५ विद्यार्थ्यांपैकी १०९ विद्यार्थ्यांनी नॅशनल मीन्स कम मेरीट स्कॉलरशीप - एन एम एम एस परीक्षेत यश मिळवलं आहे. या सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रत्येकी १२ हजार रुपये प्रमाणे चार वर्षात एकूण ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा शाळेच्या वतीनं विशेष समारंभात सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे या विद्यालयाचं राज्यभरात कौतुक होत आहे.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज दुसरा दिवस असून, मराठा आरक्षणाबाबत सरकारनं काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही आणि उपचारही घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.
****
नाशिक शहरात विकसित भारत संकल्प यात्रा दुसऱ्या टप्प्यात अंबड गावाजवळ असलेल्या चुंचाळे या कामगार वसाहतीत पाहोचली. भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सर��िटणीस आणि शेतकरी मित्र बिंदू शेठ शर्मा यांच्या हस्ते या यात्रेचा शुभारंभ झाला. यावेळी केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थित नागरिकांना देण्यात आली. यावेळी पंतप्रधान स्वनिधी योजनेचा लाभ घेणाऱ्या उज्वला फुंडकर या भाजीपाला विक्री करणाऱ्या महिलेनं आपलं मनोगत व्यक्त केलं.
बाईट - उज्ज्वला फुंडकर, जि.नाशिक
****
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दक्षिण आफ्रिका इथं सुरु असलेल्या १९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियन संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन संघानं पन्नास षटकात सात गडी बाद दोनशे त्रेपन्न धावा केल्या. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतीय संघाच्या सहाव्या षटकात एक बाद १५ धावा झाल्या होत्या.
****
नांदेड जिल्ह्यातल्या २७ बालकांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत मुंबईत हृदय शस्त्रक्रिया होणार आहे. नांदेडच्या जिल्हा रुग्णालयात झालेल्या १२८ बालकांच्या तपासणीतून निवडलेल्या या २७ बालकांवर मुंबईच्या बालाजी रुग्णालयात उपचार केले जाणार आहेत.
राज्यात शालेय आरोग्य तपासणी कार्यक्रम यशस्वी ठरल्यानं कुपोषणासह बालमृत्यू कमी होण्यासाठी राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम राबविण्यात येतो. या आधारे नांदेड जिल्ह्यात ४५ आरोग्य पथकांद्वारे वर्षातून दोनवेळा अंगणवाडीतल्या आणि एक वेळा शाळेतल्या बालकांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.
****
यवतमाळ जिल्ह्याच्या बाभुळगाव तालुक्यात अचानक गारपीट, सोसाट्याचा वारा, विजेच्या कडकडाटासह झालेल्या अवकाळी पावसाने गहू, हरभरा, आंबा मोहोर, फळे, भाजीपाला पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. आमदार अशोक उईके यांच्यासह तहसीलदार मीरा पागोरे तसंच ��हसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानाची पाहणी केली. सुमारे तीन हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. नागपूर, भंडारा आणि अमरावती जिल्ह्यातही अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याचं वृत्त आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 06 January 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारताची महात्काकांक्षी सौर मोहिम आदित्य एल - वन हे उपग्रह आ�� पृथ्वीपासून सुमारे १५ लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या एल-वन पॉईंटवर अर्थात त्याच्या नियुक्त कक्षेत पोहोचणार आहे. आदित्य-एल वन एकदा या "पार्किंग स्पॉट" वर पोहोचलं, की ते पृथ्वीप्रमाणेच सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्यास सक्षम असेल. या सोयीच्या बिंदूपासून ते ग्रहण आणि भूतकाळातही सूर्याला सतत पाहण्यास सक्षम असेल आणि वैज्ञानिक अभ्यास करू शकेल, असं भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितलं. हे यान दोन सप्टेंबर २०२३ रोजी श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करण्यात आलं होतं.
****
१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं उद्धघाटन आज पुण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. संमेलनाचे स्वागताध्यक्ष खासदार शरद पवार, मुख्य निमंत्रक उद्योगमंत्री उदय सामंत, नाट्य संमेलनाचे मावळते अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, संमेलन अध्यक्ष डॉ.जब्बार पटेल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले, यावेळी उपस्थित आहेत.
तत्पूर्वी सकाळी पुणे शहरातून नाट्यदिंडी काढण्यात आली. यामध्ये नाट्यकर्मींसह मान्यवर उपस्थित होते.
****
दर्पण दिन आज साजरा होत आहे. पहिल्या मराठी वृत्तपत्राचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना यानिमित्त विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन केलं असून, राज्यातल्या पत्रकारांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.
पत्रकार दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्हा माहिती कार्यालयात जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केलं.
छत्रपती संभाजीनगर शहरातल्या महाराष्ट्र हिंदी विद्यालयात झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार स सो खंडाळकर सहभागी झाले होते. यावेळी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.
****
राज्यातल्या जे एन - वन विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ११० वर पोहोचली आहे. यामध्ये पुण्यातले ९१, ठाण्यात पाच, बीडमध्ये तीन, छत्रपती संभाजीनगर आणि नांदेडमध्ये प्रत्येकी दोन, तर कोल्हापूर, अकोला, सिंधुदुर्ग, नाशिक, सातारा, सोलापूर आणि नागपूरमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. पुणे आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉक्टर आर. बी. पवार यांनी ही माहिती दिली.
****
राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. याबाबत अधिक स्पष्टता यावी, यासाठी महाराष्ट्राच्या उच्च शिक्षण विभागामार्फत राष्ट्रीय पातळीवरील कार्यशाळा नवी दिल्लीत ��संच मुंबई विद्यापीठात घेण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याचं उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. नवीन शैक्षणिक धोरणासंदर्भात नवी दिल्लीत होणार्या राष्ट्रीय परिषदेच्या पुर्वतयारी आढावा बैठकीत ते काल बोलत होते. विभागानं यासंदर्भात घेतलेले महत्वपूर्ण निर्णय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करण्याची सूचना पाटील यांनी केली.
****
ब्रेल लिपीचे जनक लुईस ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर इथं आज अनामप्रेम मराठवाडा दिव्यांग शिक्षण प्रकल्प संस्थेच्या वतीनं अंध, दिव्यांग, मुकबधीर महिलांना साडी आणि किराणा वाटप करण्यात आलं. ५९ दिव्यांग महिला या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या.
****
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडून लातूरच्या दयानंद सभागृहात काल नशामुक्त भारत अभियान आणि संविधान जागृती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. लातूर जिल्ह्यातल्या शिक्षकांनी दर गुरुवारी विद्यार्थ्यांना स्वच्छता, व्यसनमुक्ति आणि व्यक्तिमत्वाचे धडे द्यायचे आहेत, तसंच माझी शाळा - सुंदर शाळा हा उपक्रमही राबवायचा असल्याची माहिती जिल्हाधिकारी वर���षा ठाकूर - घुगे यांनी यावेळी दिली.
****
छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक काल अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ग्राहकांमध्ये आपले अधिकार आणि हक्कांबद्दल सजग करण्यासाठी जनजागृती करावी, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.
****
बीड जिल्ह्यात नऊ महिन्यात १३ हजार ८०६ जात प्रमाणपत्र पडताळणी प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहेत. जिल्हातल्या सर्व संबंधित महाविद्यालयांनी आणि विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावे, असं आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं केलं आहे.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेच्या कसोटी संघाच्या क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानी घसरला आहे. पाकिस्तान विरुद्धच्या मालिकेत ऑस्ट्रेलियानं २-० अशी आघाडी घेतल्यानं ऑस्ट्रेलियाला पुन्हा पहिलं स्थान मिळालं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 14 September 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ सप्टेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, यासाठी जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून सुरू केलेलं उपोषण मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज मागे घेतलं. उपोषणस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांनी शिष्टमंडळासह मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा केली. शासनाची भुमिका स्पष्ट असून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं.
सरकारनं यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं परंतु, सर्वोच्च न्यायालयात ते टिकलं नाही. रद्द झालेलं मराठा आरक्षण पुन्हा मिळावं आणि ते टिकावं हीच सरकारची भुमिका आहे. सर्वोच्च न्यायालयानं आरक्षण रद्द करताना ज्या त्रुटी दाखवल्या, त्यावर सरकार काम करीत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, मराठा समाजाला मुख्यमंत्री न्याय देतील, ही अपेक्षा असून उपोषण सुटलं तरीही मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी म्हटलं आहे.
****
हिंदी भाषा दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. हिंदी भाषा, राष्ट्रीय एकता आणि सदभावनेचा धागा नेहमीच मजबूत करत राहणार असल्याचं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.
दरम्यान, हिंदी भाषेचं महत्त्व लक्षात घेऊन, भारतीय घटनेनं हिंदीचा राजभाषा म्हणून स्वीकार केला आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. आकाशवाणीवरुन आज सकाळी हिंदी दिनानिमित्त केलेल्या भाषणात ते बोलत होते. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात लोकांना एकत्र आणण्याचं काम हिंदी भाषेनं केलं. आपल्या भाषा हा आपला सांस्कृतिक ठेवा असून भाषाप्रगत झाल्यास देशाचीही प्रगती होते. हिंदी अधिक सशक्त करण्यसाठी प्रयत्न केले पाहिजेत तसंच सरकारी कार्यालयांनी हिंदी भाषेचा वापर वाढवावा असं आवाहन शहा यांनी यावेळी केलं.
****
संसदेचं पाच दिवसांचं विशेष अधिवेशन येत्या सोमवार पासून सुरू होणार आहे. पहिल्या दिवशी लोकसभेत ७५ वर्षांच्या संसदीय प्रवासावर चर्चा होईल, त्यामध्ये आजवरची कामगिरी, अनुभव, आठवणी आणि शिकवण याविषयी सदस्य आपले विचार मांडतील. मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबतचं विधेयक सरकारनं सूचीबद्ध केलं असून त्यावर या अधिवेशनात चर्चा होणार आहे. तसंच विधीज्ञ सुधारणा विधेयक, नियतकालिकांचे प्रेस आणि नोंदणी विधेयक आणि टपाल कार्यालय विधेयकांवर या अधिवेशनात चर्चा होणार आहे, राज्यसभेनं त्यांना यापूर्वी मंजुरी दिली असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
वाराणसी इथं कालपासून शाश्वत वित्त कार्यगटाची चौथी जी- ट्वेन्टी बैठक सुरू आहे. या बैठकीत २०२३ च्या अहवालाला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. आज बैठकीच्या दुसऱ्या आणि अंतिम दिवशी जी - ट्वेन्टी शाश्वत वित्त आलेखावर चर्चा सुरू राहणार आहे. या बैठकीत जी ट्वेन्टी सदस्य देश, विशेष निमंत्रित देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या ८० हून अधिक प्रतिनिधींनी सहभाग घेतला आहे.
दरम्यान, मुंबईत आज आर्थिक समावेशन संबंधित जागतिक भागीदारीसाठीची चौथी जी २० बैठक सुरू होत आहे. तीन दिवस चालणाऱ्या या बैठकीत जी २० देशांचे, विशेष आमंत्रित देशांचे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांचे ५० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहे.
****
मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळ म्हाडा मार्फत बृहन्मुंबईतील ५८ बंद-आजारी गिरण्यांमधील यापूर्वीच्या सोडतीमध्ये अयशस्वी दीड लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती आजपासून वांद्रे इथल्या म्हाडा मुख्यालयात करण्यात येत आहे. राज्यातील गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना पात्रता निश्चित करण्यासाठी कागदपत्रे प्रत्यक्ष तसंच म्हाडाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करता येणार असल्याचं म्हाडाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज श्रीलंका आणि पाकिस्तान संघात सामना होणार आहे. श्रीलंक���तील कोलंबोमधल्या आर प्रेमदासा मैदानावर हा सामना होणार आहे. या सामन्यातल्या विजेत्या संघाची रविवारी अंतिम सामन्यात भारतीय संघासोबत लढत होईल.
****
आय एस एस एफ नेमबाजी आणि रायफल विश्वचषक स्पर्धेला आजपासून ब्राझीलमधील रिओ दि जनेरो इथं सुरूवात होत आहे. या स्पर्धेत सोळा सदस्य असलेल्या भारतीय पथकाचं नेतृत्व ऑलिंपिकपटू सौरभ चौधरी आणि अंजुम मौदगील करणार आहेत. १८ ते २७ नोव्हेंबर दरम्यान या स्पर्धेची अंतिम फेरी दोहा इथं हो��ार आहे. भारतीय नेमबाजांनी या वर्षात आतापर्यंत झालेल्या आय एस एस एफ विश्वचषक स्पर्धेत सात सुवर्ण, चार रौप्य आणि बारा कांस्य अशी एकूण २३ पदकं जिंकली असून भारत सध्या पदक तालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 20 May 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २० मे २०२३ दुपारी १.०० वा.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी जपानमध्ये हिरोशिमा इथं जी - 7 परिषदेत सहभागी होत आहेत. परिषदेच्या ठिकाणी ते पोहोचले असून, जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांनी त्यांचं स्वागत केलं. जी 7 शिखर परिषदेत आण्विक निःशस्त्रीकरण, आर्थिक लवचिकता आणि सुरक्षा, प्रादेशिक समस्या, हवामान आणि ऊर्जा, अन्न आणि आरोग्य आणि विकास या मुद्यांवर भर देण्यात येणार आहे.
तत्पूर्वी, पंतप्रधानांनी आज हिरोशिमा इथं पद्म पुरस्कार विजेते आणि हिंदी आणि पंजाबी भाषातज्ज्ञ प्राध्यापक टोमियो मिझोकामी यांची भेट घेतली. मिझोकामी यांनी जपानमध्ये भारतीय संस्कृती आणि साहित्य लोकप्रिय करण्यात मोठं योगदान दिल्याचं पंतप्रधानांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. त्याचबरोबर पंतप्रधानांनी आज प्रसिद्ध जपानी कलाकार हिरोको ताकायामा यांचीही भेट घेतली. ताकायामा यांनी भारत आणि जपानमधले सांस्कृतिक संबंध दृढ करण्यासाठी व्यापक कार्य केल्याचं त्यांनी नमूद केलं.
***
काँग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. सिद्धरामय्या दुसऱ्यांदा कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत. डी के शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, खासदार राहुल गांधी, प्रियंका वाड्रा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यावेळी उपस्थित होते.
***
भारताच्या जी - 20 अध्यक्षपदाअंतर्गत पर्यावरण आणि हवामान विषयक कार्यगटाची तिसरी बैठक उद्या मुंबईत सुरु होणार आहे. उद्या सकाळी जुहू बीचवर स्वच्छता अभियानानं या बैठकीला सुरुवात होईल. हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करण्यासाठी जागरूकता पसरवणं आणि जनसमुदायाच्या सहभागाच्या महत्त्वाकडे लक्ष वेधणं हा यामागचा उद्देश आहे. यावेळी अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, त्यात आंतरशालेय चित्रकला स्पर्धा, सागरी पर्यावरण संवर्धन आणि कचऱ्याचा पुर्नवापर करण्याची प्रतिज्ञा घेणं आदींचा समावेश आहे.
***
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काल अकोला इथं दंगलग्रस्त भागाची पाहणी केली. सामाजिक तेढ निर्माण ��रून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. पोलिसांची त्यांची जबाबदारी नीट पार पाडली नाही तर त्यांच्यावर गृह विभागाने कारवाई करावी, अशी मागणी दानवे यांनी यावेळी केली.
***
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत लातूर विभागाला ११ कोटी ७८ लाख ९७ हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे. समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अ.र.देवसटवार यांनी ही माहिती दिली. २०२१ ते २०२३ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना नूतनीकरण आणि दुसऱ्या हप्त्याची रक्कम भरण्यासाठी हा निधी मिळाला आहे.
***
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत औरंगाबाद महानगरपालिकेसाठी १२ शहरी आरोग्य वर्धिनी केंद्र मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी पडेगाव, सातारा, सिडको एन टू, व्यंकटेश नगर, सुरेवाडी, छत्रपतीनगर हर्सुल या ठिकाणी आरेाग्य वर्धिनी केंद्र सुरु झाली असून, याठिकाणच्या मोफत आरोग्य सेवांचा लाभ घेण्याचं आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं केलं आहे. औरंगाबाद शहरातल्या इतर भागातले आरोग्य वर्धिनी केंद्र येत्या आठ दिवसात कार्यान्वीत होतील अशी माहितीही आरोग्य विभागानं दिली आहे.
***
जागतिक रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त काल नांदेड इथं सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी यांच्या वतीनं ही रॅली काढण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. आवश्यक तेव्हा सायकलचा वापर केल्यास प्रदूषण रोखण्यास आपली मदत होईल, असं मत त्यांनी यावेळी व्यक्त केलं. शहरातल्या जुनामोंढा इथून सुरु झालेल्या या रॅलीचा विसावा उद्यान इथं समारोप झाला.
***
औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड इथं येत्या २६ मे रोजी शासन आपल्या दारी हा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमांचं सुक्ष्म नियोजन करण्याचं आवाहन कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. यासंबंधीच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. मराठवाड्यासह राज्यात या कार्यकमाच्या यशस्वी आयोजनाचा पॅटर्न निर्माण करायचा आहे, यासाठी प्रत्येक विभागानं थेट लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी गाव, योजना आणि लाभार्थीनिहाय नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
***
इंडियन प्रिमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज दिल्ली इथं दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नइ सुपर किंग्ज यांच्यात सामना होणार आहे. दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर दुसरा सामना संध्याकाळी साडे सात वाजता कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे.
//***********//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 April 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०२ एप्रिल २०२३ दुपारी १.०० वा.
****
भाजप शिवसेनेच्या सावरकर गौरव यात्रेला आजपासून प्रारंभ झाला. ठाणे इथं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या यात्रेत सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते विनय सहस्रबुद्धे, आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. भाजप तसंच शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या यात्रेत सहभागी झाले आहेत. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या समर्थनगर भागातून आज सावरकर गौरव यात्रेला सुरुवात होत आहे. ही यात्रा मराठवाड्यातल्या सर्व ल���कसभा आणि विधानसभा मतदारसंघामधून प्रवास करणार आहे.
***
छत्रपती संभाजीनगर इथल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर आज महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांनी काल या सभेच्या तयारीचा आढावा घेतला. सभा यशस्वी होण्यासाठी ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली असून, या सभेल मोठा जनसमुदाय येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
***
केंद्रीय अन्वेषण विभाग सीबीआयच्या स्थापनेला उद्या ६० वर्ष पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या विभागाच्या हीरक महोत्सवाचं उद्घाटन करणार आहेत. सीबीआय मध्ये उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पोलीस पदक आणि सर्वोत्तम तपास अधिकारी पदक देऊन पुरस्कारार्थी कर्मचाऱ्यांना पंतप्रधानांच्या हस्ते याप्रसंगी गौरवण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्या पुणे आणि नागपूर इथं उभारण्यात आलेल्या सीबीआय कार्यालय परिसरांचं उद्घाटनही करण्यात येईल. पंतप्रधान मोदी, केंद्रीय अन्वेषण विभागाच्या हीरक महोत्सवाच्या अनुषंगानं डाक तिकीट आणि स्मारक नाण्याचं अनावरण देखील करणार असून सीबीआयच्या ट्वीटर खात्याचा प्रारंभ ही ते करतील.
***
जी २० अंतर्गत उर्जा रुपांतरण कार्य समुहाची दुसरी बैठक आजपासून गुजरातच्या गांधीनगर इथे सुरु होत आहे. या बैठकीत जी २० देशातले, विशेष आमंत्रित देशांचे तसंच आंतरराष्ट्रीय संघटनांचे १०० हून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत. या बैठकीत उर्जेच्या प्राथमिक क्षेत्रांवर सखोल चर्चा होणार आहे. या कार्यसमुहाची पहिली बैठक या वर्षी फेब्रुवारी महिन्यात झाली. जी २० च्या सदस्य देशांनी या बैठकीत उर्जा क्षेत्रातल्या तांत्रिक त्रुटींवर समाधान, उर्जा हस्तांतरणासाठी कमी संसाधनात आर्थिक उपलब्धतता, उर्जा सुरक्षा आणि वैविध्यपूर्ण आपूर्ती, उर्जा रुपांतरणाला प्रोत्साहन आदी ६ प्राथमिक क्षेत्र निश्चित केले. पहिल्या बैठकीतल्या या प्रमुख निष्कर्षांवर आजपासून सुरु होत असलेल्या बैठकीत पुढील चर्चा होण्याची शक्यता आहे.
***
गेल्या २४ तासात देशभरात २ हजार ९९४ नवे कोरोना विषाणुबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात नवी दिल्लीतल्या ४१६ रुग्णांचा समावेश आहे. देशात सध्या १६ हजार ३५४ कोरोना विषाणू बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या आजारातून बरे होण्याचा राष्ट्रीय दर सध्या ९८ पूर्णांक ७७ टक्के आहे.
***
नंदुरबार जिल्ह्यातील धडगावात गांजाची शेती करणाऱ्यावर पोलिसांनी काल धडक कारवाई केली. धडगाव तालुक्यातील निगदीचा कुंड्यापाडा शिवारात एका आमराईजवळ रुपजा सिंग पाडवी गांजाची बेकायदेशीर ४ हजार ७९० झाडं वापरत असल्याचं आढळलं. या कारवाईत ४५ लाख ३९ हजार रुपये किमतीचा ६५० किलो ��ांजा पोलीसांनी जप्त केला. पाडवी याच्यावर नंदुरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
***
माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचं आज गुजरातमध्ये जामनगर इथं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. दुर्राणी यांनी भारतासाठी २९ कसोटी सामने खेळले होते. १९६९ साली प्रदर्शित झालेला एक मासूम तसंच १९७३ साली प्रदर्शित झालेल्या चरित्र या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केलं होतं. दुर्राणी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.
***
इंडियन प्रीमियर लीग - आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज २ सामने होणार आहेत. पहिला सामना दुपारी साडे ३ वाजता हैद्राबाद इथे सनरायजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात होईल तर दुसरा सामना सायंकाळी बेंगळुरु इथं रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स या संघांमध्ये होणार आहे. या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सनं दिल्ली कॅपिटल्सचा तर पंजाब किंग्सनं कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करत विजयी सुरुवात केली आहे.
//**********//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 10 January 2023
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १० जानेवारी २०२३ दुपारी १.०० वा.****
राज्यातल्या सत्तासंघर्षावर १४ फेब्रुवारीपासून सलग सुनावणी होणार आहे. यासंदर्भात आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी ही माहिती दिली. शिवसेनेच्या ठाकरे गटाने हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या पीठाकडे सोपवण्याची मागणी केली आहे. शिवसेनेत बंड, विधानसभा अध्यक्ष निवड, राज्य सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव, १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्यावरून ठाकरे आणि शिंदे गटाकडून याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज इंदोरमध्ये सुरू असलेल्या सतराव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाच्या समारोप सत्राला उपस्थित राहणार असून, त्यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात येतील. २७ पुरस्कारार्थीना हे पुरस्कार दिले जाणार असून, त्यात सुरीनामचे राष्ट्रपती चंद्रीकाप्रसाद संतोखी, गुयाना चे राष्ट्रपती डॉक्टर मोहम्मद इरफान अली यांचा समावेश आहे. अनिवासी भारतीय, भारतीय वंशाच्या व्यक्ति किंवा अनिवासी भारतीयांनी भारतात आणि परदेशात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो.
****
जागतिक हिंदी दिवस आज साजरा होत आहे. परदेशात हिंदी भाषा वापरला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो. २००६ साली आजच्याच दिवशी नागपुरात पहिलं विश्व हिंदी संमेलन आयोजित करण्यात आलं होतं, तेव्हापासून हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा करतात.
माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर यांनी हिंदी दिवसाच्या शुभेच्छा दिल्या असून, या भाषेच्या वापराला चालना देण्याचं आवाहन केलं आहे.
****
पुण्यात होणाऱ्या जी-२० परिषद बैठकीच्या पार्श्वभूमीवर, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल शहरातल्या तयारीचा आढावा घेतला. पुढच्या आठवड्यात होणाऱ्या या बैठकीसाठी विविध ३८ देशांचे अंदाजे २०० प्रतिनिधी पुण्यात येणार आहेत. लोहगाव विमानतळावर हे प्रतिनिधी उतरल्यापासून ते सेनापती बापट मार्गावरीच्या बैठकीच्या ठिकाणापर्यंतचा मार्ग, तसंच विमानतळावरच्या सुरक्षा व्यवस्थेची पाटील यांनी पाहणी करुन, सर्व शासकीय यंत्रणांनी परस्पर समन्वय ठेऊन या बैठकांचं आयोजन यशस्वी करावं, अशा सूचना दिल्या आहेत.
****
राज्य परिवहन ��हामंडळ - एसटीतर्फे उद्यापासून २५ तारखेपर्यंत सुरक्षा मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेदरम्यान चालकांचं प्रबोधन, प्रशिक्षण, आरोग्य तपासणी, वाहन परवाना तपासणी, गाड्यांची तांत्रिक तंदुरुस्ती अशा अनेक बाबींवर भर दिला जातो. प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी, वाहतुक नियमांचं पालन, उत्तम शरीर प्रकृती आणि मन:स्वास्थ्य, या चतु:सुत्रीचं पालन करत चालकांनी अपघात विरहित सेवा देण्याचं आवाहन, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी केलं आहे.
****
प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन नांदेड रेल्वे विभागातून धावणाऱ्या ब्रह्मपूर, येशवंतपूर, तिरुपती आणि विजयवाडा विशेष गाड्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. तिरुपती -अकोला आणि विजयवाडा - नगरसोल या गाड्यांना २४ फेब्रुवारीपर्यंत, नांदेड - ब्रह्मपूर २८ जानेवारीपर्यंत, तर नांदेड - यशवंतपूर या गाडीला ३० जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
****
महाराष्ट्र केसरी स्पर्धेला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. कोथरूडची कुस्तीमहर्षी दिवंगत मामासाहेब मोहोळ क्रीडानगरी या स्पर्धेतील पैलवान, आणि कुस्तीप्रेमींच्या मेळ्यासाठी सज्ज झाली आहे. ३२ एकर भव्य जागेत ही क्रीडानगरी साकारली असून, त्यात दोन माती आणि तीन गादीचे आखाडे आहेत. ८० हजार आसन क्षमता असलेली बैठक व्यवस्था आहे, तर २० एकर जागेत वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य, अग्निशमन, सुरक्षा व्यवस्थेचंही चोख नियोजन करण्यात आलं आहे. ४७ तालीम संघातल्या नामांकित ४० मल्लांसह ९०० मल्ल या स्पर्धेत सहभागी झाले असून, विविध १८ वजनी गटात स्पर्धा होणार आहे.
****
भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज गुवाहाटी इथं खेळला जाणार आहे. दुपारी दीड वाजता सामन्याला सुरुवात होईल.
****
राज्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड आणि ओझर इथं आज पाच अंश सेल्सिअस, तर नाशिक शहरात सात पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
धुळे शहरात या हंगामातलं निचांकी पाच अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.
मराठवाड्यातही तापमानात घट झाली असून, काही ठिकाणी थंडीची लाट आली आहे. औरंगाबाद इथं आज सात पूर्णांक सात अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नांदेड दहा पूर्णांक सहा, उदगीर दहा पूर्णांक आठ, तर परभणी आणि जालना इथं दहा अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं.
पुढचे दोन दिवस उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्र लाट, तर मराठवाडा आणि विदर्भात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
//**********//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 02 January 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ जानेवारी २०२३ सकाळी ७.१० मि.****
नव्या वर्षाच्या स्वागताबरोबर आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाला कालपासून प्रारंभ
शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील;सिल्लोड कृषी महोत्सवात मुख्यमंत्र्यांची ग्वाही
पुणे तसंच मुंबईत परदेशांतून आलेले दोन प्रवासी कोरोना बाधित
औरंगाबाद इथं येत्या पाच ते आठ जानेवारीदरम्यान ॲ���व्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचं आयोजन
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं काल औरंगाबाद इथं निधन
आणि
परभणी जिल्हा पोलिस दलातल्या ७५ रिक्त जागांकरता आज भरती प्रक्रिया
****
नव्या वर्षाच्या स्वागताबरोबर आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाला कालपासून प्रारंभ झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारातून भारत सरकारनं सुचवल्यानुसार संयुक्त राष्ट्रानं २०२३ हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष म्हणून जाहीर केलं आहे. जी -२० बैठका आणि विविध देशांच्या प्रतिनिधींना भरड धान्यांचा अनुभव घेता यावा, यादृष्टीनं या धान्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ, भरड धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांशी आणि संघटनांशी चर्चा असे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या दृष्टीनं केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालय आणि काही राज्य सरकारांनी जानेवारी महिन्यात १५ कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे.
****
शेतकरी समृद्ध व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोडमध्ये कृषी, क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचं तसंच आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचं राज्यस्तरीय ��द्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी बोलताना ते म्हणाले:
‘‘शेतकरी जो आहे, हा समृद्ध झाला पाहिजे. त्याचं उत्पादन वाढलं पाहिजे. आणि आमचा उद्देश एवढाच आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी झाल्या पाहिजे. आणि म्हणून आमचं सरकार सातत्याने यामध्ये काम करतंय. आपल्याला माहिती आहे, आम्ही गेल्या चार-पाच महिन्यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर आम्ही निर्णय घेतलेले आहेत. शेतकऱ्यांना जे अतीवृष्टी, अवकाळी पाऊस या सगळ्याच बाबतीमध्ये त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सरकारने केलेलं आहे.’’
कृषी मंत्री अब्दूल सत्तार यांच्या संकल्पनेतून होत असलेला हा कृषी, क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव दहा दिवस चालणार आहे. यातून शेतकऱ्यांना उद्योजक बनण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
उद्घाटनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी प्रदर्शनातल्या विविध कृषी दालनांना भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतीतील नवतंत्रज्ञान, नवे प्रयोग याविषयी माहिती जाणून घेतली, तसंच शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या नव्या प्रयोगांचं कौतुकही केलं. वैदेही या रंगीत कापसाच्या प्रकाराचं मुख्यमंत्र्यांनी कौतुक केलं. ते म्हणाले...
‘‘जलयुक्त शिवार योजना आहे, त्याची माहिती आहे. अवजारांची माहिती आहे. नवीन व्हरायटी ज्या आहेत, तेवढ्याच खर्चामध्ये जास्तीचं उत्पन्न. आम्ही कापूस आहे तिथे स्टॉलवर गेलो होतो. एक वैदेही व्हरायटी म्हणून आहे. आम्हाला त्यांनी जॅकेट दिलंय. जॅकेट म्हणजे त्याला डायिंग केलेलं नाही. कलर केलेलं नाही. हे नॅचरल कापूस आहे त्याच कलरचा. आणि अतिशय उत्कृष्ट जॅकेट बनवलंय. म्हणजे आपला शेतकरी अशा प्रकारचा मोठा उद्योजक बनू शकतो.’’
या प्रदर्शनात राज्यातल्या सर्व कृषी विद्यापीठांनी सहभाग नोंदवला असून, सहाशे पेक्षा अधिक विविध कक्ष उभारण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनांचं सादरीकरण केलं जात असून, यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथांचं सादरीकरणही केलं जात आहे. विविध विषयांवर ३२ चर्चासत्रंही होणार आहेत.
दहा दिवस चालणाऱ्या या कृषी महोत्सवात सिल्लोड नगर परिषद आणि उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीनं सर्वरोग निदान, उपचार आणि महारक्तदान शिबीर तसंच मोफत कृत्रीम भिंगारोपण शस्त्रक्रिया शिबीर घेण्यात येणार आहे. तसंच संगीत रजनी, लावणी, कीर्तन, कव्वाली, मुशायरा, तसंच अनेक सांस्कृतिक कार्यक्रम या महोत्सवात होणार असून, मराठी आणि हिंदी कलाकार, यात सहभागी होणार आहेत. या महोत्सवात क्रिकेट स्पर्धांसह फुटबॉल, कुस्ती, शुटींग बॉल, कबड्डी तसंच राज्यस्तरीत शंकरपट स्पर्धा देखील आयोजित करण्यात आल्या आहेत.
****
नाशिक जिल्ह्यात जिंदाल कंपनी स्फोट प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेची माहिती मिळताच, मुख्यमंत्र्यांनी तातडीनं सिल्लोडहून इगतपुरीला पोहोचत, जखमींची भेट घेऊन चौकशी केली तसंच या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत केली जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. काल या कंपनीत स्फोट होऊन भीषण आग लागली. यात दोन महिलांचा मृत्यू झाला असून सतरा जखमींना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यापैकी चार जणांची प्रकृती गंभीर आहे. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार तसंच नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनीही दुर्घटनास्थळाला भेट दिली.
****
सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यातल्या पांगरी इथं फटाक्याच्या कारखान्यात काल दुपारी स्फोट होऊन आग लागली. यात सात कामगारांचा होरपळून मृत्यू झाला तर दहा कामगार जखमी झाले आहेत. कारखान्यात महिला कामगारांचा जास्तीत जास्त समावेश असल्याचं सांगण्यात आलं. या स्फोटात कारखाना पूर्णपणे जळाला असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
व्यावसायिक वापराच्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत २५ रुपये वाढ करण्यात आली आहे. मात्र, घरगुती वापरासाठीच्या एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झाला नसल्याचं इंधन कंपनीनं सांगितलं आहे. व्यायावसायिक वापरासाठी असलेल्या १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरचा दर आता मुंबईत १ हजार ७२१ रुपये प्रति सिलेंडर इतका असेल.
****
परदेशांतून आलेल्या पुणे आणि मुंबईतल्या आणखी दोन प्रवाशांना कोरोना विषाणू संसर्ग झाल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे ही संख्या आता सहा झाली आहे. राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी ही माहिती दिली. राज्यात सध्या १६४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
****
केंद्र सरकारने २०१६ मध्ये घेतलेल्या विमुद्रीकरण निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय आज निकाल सुनावण्याची शक्यता आहे. सरकार स्वतःहून कायदेशीर निविदांशी संबंधित कोणताही ठराव करू शकत नाही, हा निर्णय फक्त रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय मंडळाच्या मान्यतेच्या अधीन असून त्यांच्याच शिफारसीनुसार केला जाऊ शकतो असं, याचिकाकर्त्यांचे वकील पी चिदंबरम यांनी, आपल्या युक्तीवादात म्हटलं होतं.
****
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे पी नड्डा आज औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत. पुढच्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ नड्डा यांच्या हस्ते होणार आहे. आज सायंकाळी पाच वाजता शहरातल्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या सभेला नड्डा मार्गदर्शन करणार आहेत.
****
रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी काल भीमा कोरेगाव इथं जाऊन ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन केलं. भीमा कोरेगाव इथल्या ऐतिहासिक विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी दरवर्षी एक जानेवारीला शौर्यदिनी देशभरातून लाखो आंबेडकरी अनुयायी भेट देत असतात, त्यामुळे विजयस्तंभ परिसराची १०० एकर जमीन संपादित करून भव्य स्मारक उभारण्याची मागणी आठवले यांनी यावेळी केली. वंचित बहुजन आघाडीचे नेते विधीज्ञ प्रकाश आंबेडकर, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही काल विजयस्तंभाला अभिवादन केलं.
****
औरंगाबाद इथं येत्या पाच ते आठ जानेवारीदरम्यान ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पोचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्य शासनाचा उद्योग विभाग आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर - मासिआ यांच्या वतीनं, हे प्रदर्शन भरवण्यात येत असल्याचं, मासिआचे अध्यक्ष किरण जगताप यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. मराठवाडा आणि औरंगाबादसह ऑरिकचा औद्योगिकदृष्ट्या जागतिक पातळीवर प्रचार करण्यासाठी, ऑरिक सिटीत होणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे. या एक्स्पो मध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय उद्योग सहभागी होणार असून, विविध परिसंवादाचं आयोजन करण्यात आल्याचं जगताप यांनी सांगितलं.
****
२०२२-२३ या शैक्षणिक वर्षातल्या इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठीची महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा, २६ एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. २१ जानेवारी ही या परीक्षेसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. या परीक्षेचे अर्ज संस्थेच्या कार्यालयात किंवा संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
****
विविध प्रलंबित मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेनं आजपासून संपाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे.
****
शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे यांचं काल औरंगाबाद इथल्या खासगी रूग्णालयात निधन झालं, ते १०२ वर्षांचे होते. नांदेड जिल्ह्यातल्या कंधार तालु्क्यात गऊळ इथं त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी पाच वेळा आमदार तर एक वेळा खासदार म्हणून जनतेचं प्रतिनिधित्व केलं. धोंडगे यांनी मराठवाड्यातल्या जनतेचे प्रश्न आक्रमकपणे मांडले, त्यामुळे त्यांना मराठवाड्याची मुलुख मैदान तोफ, असंही म्हटलं जातं. शिवाजी मोफत एज्यूकेशन सोसायटीची स्थापना करून धोंडगे यांनी शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिलं. भटक्या समाजातल्या साहित्यिकांची मोट बांधून त्यांनी नांदेड जिल्ह्यात गुराखी गडावर साहित्य संमेलन भरवण्यास प्रारंभ केला. या साहित्य संमेलनामागची भूमिका धोंडगे यांनी एका मुलाखतीत या शब्दांत विशद केली होती...
धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त गेल्या वर्षी २४ ऑगस्टला मुंबईत विधानभवनात त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. त्यांच्या शतकपूर्तीनिमित्त विधानसभेतही अर्ध्या तासाची चर्चा झाली होती. या चर्चेत सर्वपक्षीय नेत्यांनी धोंगडे यांच्या कार्याचा गौरव करणारी भाषणं केली होती.
धोंडगे यांच्या निधनाबद्दल समाजाच्या सर्वच स्तरातून शोक व्यक्त होत आहे. शेतकरी, कष्टकरी, वंचितांसाठी रस्त्यावरील लढा आणि विधीमंडळात त्याची समर्पक मांडणी यामुळे धोंडगे यांची भाषणं आजही मार्गदर्शक असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत दरारा असलेला 'मन्याडचा वाघ' हरपला, अशा शब्दात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासाचे साक्षीदार असलेले संघर्षमय, प्रेरणादायी नेतृत्व हरवला अशा शब्दात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
****
साहित्य क्षेत्रात साहित्य बाह्य घटकांचा हस्तक्षेप दूर होण्याची गरज वर्धा इथं नियोजित ९६ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगांवकर यांनी व्यक्त केली आहे. अखिल भारतीय साहित्य परिषदेच्या देवगिरी प्रांताच्या वतीनं, काल चपळगांवकर यांचा औरंगाबाद इथं त्यांच्या निवासस्थानी सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. वाङ्गमयीन प्रांतात उदारता असली पाहिजे असंही चपळगांवकर यांनी यावेळी आग्रहाने सांगितलं.
****
परभणी जिल्हा पोलिस दलातल्या ७५ रिक्त जागांकरता आज पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पोलिस भरती प्रक्रिया होणार आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक रागसुधा आर. यांनी ही माहिती दिली. या जागांसाठी ��ार हजार ९०० अर्ज प्राप्त झाले आहेत. भरतीसाठी येणाऱ्या सर्व उमेदवारांच्या सोयीसाठी विविध ठिकाणाहून पोलिस मुख्यालयापर्यंत बसची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, परभणी इथं स्वतंत्र सायबर पोलिस स्टेशन आजपासून कार्यान्वित होणार असल्याची माहिती रागसुधा यांनी दिली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथल्या श्री तुळजाभवानी देवी मंदीरात शाकंभरी नवरात्रोत्सवाच्या काल तिसऱ्या दिवशी देवीची रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अर्पण केलेले दागिने यावेळी देवीला घालण्यात आले होते.
****
नांदेड इथं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या औषध निर्माणशास्त्र संकुलातर्फे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. या परिषदेस एकूण ३०५ संशोधकांनी सहभाग नोंदवला असून, १८० संशोधनावर मौखिक तसंच भीतीपत्रिकाच्या माध्यमातून संशोधक सादरीकरण करणार आहेत.
****
0 notes
Text
IND vs ENG: सुनील गावस्कर विराट कोहलीला त्याच्या फॉर्मसाठी 20 मिनिटांचा सल्ला - सुनील गावस्कर विराट कोहलीवर: सुनील गावस्कर विराट कोहलीला फक्त 20 मिनिटांत फॉर्ममध्ये आणू शकतात? अनुभवी भारतीयाने सांगितली 'रन मशीन'ची समस्या
IND vs ENG: सुनील गावस्कर विराट कोहलीला त्याच्या फॉर्मसाठी 20 मिनिटांचा सल्ला – सुनील गावस्कर विराट कोहलीवर: सुनील गावस्कर विराट कोहलीला फक्त 20 मिनिटांत फॉर्ममध्ये आणू शकतात? अनुभवी भारतीयाने सांगितली ‘रन मशीन’ची समस्या
भारत विरुद्ध इंग्लंड: भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी फॉर्मात नसलेल्या विराट कोहलीच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहे. तो म्हणतो की विराट कोहलीला त्याच्या कारकिर्दीच्या वाईट टप्प्यातून बाहेर पडण्यासाठी मदत करण्यास तयार आहे. तो म्हणाला की खेळाच्या सर्व फॉरमॅटमध्ये स्टार फलंदाजाच्या फॉर्ममध्ये काय अडथळा आणत आहे याची मला जाणीव आहे. गावस्कर म्हणाले की, त्यांचा सल्ला कोहलीला फॉर्ममध्ये परतण्यास…
View On WordPress
#इंड विरुद्ध इंजी#क्रिकेट बातम्या#टीम इंडिया#भारत विरुद्ध इंग्लंड#भारत विरुद्ध वेस्ट इंडिज लाइव्ह स्कोर आज#विराट कोहली#विराट कोहली क्रिकेट बातम्या#विराट कोहली फॉर्म#विराट कोहली ब्रेक#विराट कोहली भारतीय क्रिकेट#विराट कोहली सुनील गावस्कर यांची मुलाखत#विराट कोहलीचा फॉर्म#विराट कोहलीची कारकीर्द#सुनील गावस्कर#हिंदी मध्ये क्रिकेट बातम्या#हिंदीमध्ये क्रिकेट बातम्या
0 notes
Text
ENG vs NZ: ब्रिटीश पंतप्रधानांच्या गेटअपमध्ये स्टेडियममध्ये घुसला माणूस, पोलिसांना करावा लागला संघर्ष
ENG vs NZ: ब्रिटीश पंतप्रधानांच्या गेटअपमध्ये स्टेडियममध्ये घुसला माणूस, पोलिसांना करावा लागला संघर्ष
न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड: इंग्लंडने कसोटी मालिकेत न्यूझीलंडचा 3-0 असा पराभव केला. बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील संघाने लीड्स येथे खेळल्या गेलेल्या तिसर्या कसोटीत न्यूझीलंडचा 7 गडी राखून पराभव केला. तिसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने पहिल्या डावात ३२९ धावा आणि दुसऱ्या डावात ३२६ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने पहिल्या डावात 360 धावा आणि दुसऱ्या डावात 296 धावा करत सामना जिंकला. तिसऱ्या चाचणीदरम्यान…
View On WordPress
#ENG वि NZ 3री कसोटी#इंग्लंड#इंग्लंड वि न्यूझीलंड#इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दुसरी कसोटी#क्रिकेट#क्रिकेट बातम्या#क्रीडा बातम्या#खेळ#घड्याळ#ताज्या हिंदी बातम्या#नवीनतम क्रिकेट बातम्या अद्यतने#न्युझीलँड#पोलिस धावतात#बोरिस जॉन्सन#बोरिस जॉन्सन इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड कसोटीत#ब्रिटिश पंतप्रधान#मजेदार व्हिडिओ#माणूस स्टेडियममध्ये शिरला#व्हायरल व्हिडिओ#व्हिडिओ#व्हिडिओ पहा#हिंदी बातम्या#हिंदीमध्ये क्रिकेट बातम्या
0 notes