#किळस
Explore tagged Tumblr posts
Text
“या सगळ्याची किळस वाटते”, महात्मा गांधींबद्दलच्या ‘त्या’ विधानावरून आव्हाडांचा गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा!
“या सगळ्याची किळस वाटते”, महात्मा गांधींबद्दलच्या ‘त्या’ विधानावरून आव्हाडांचा गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा!
“या सगळ्याची किळस वाटते”, महात्मा गांधींबद्दलच्या ‘त्या’ विधानावरून आव्हाडांचा गुणरत्न सदावर्तेंवर निशाणा! “गांधीजींनी श्वास सोडताना हे राम म्हटलंच नव्हतं असं गोडसेजींनी कोर्टात ट्रायल झाली तेव्हा स्पष्ट केलं होतं”, असं विधान अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी केल्यानंतर त्यावरून वाद सुरू झाला आहे. तसेच, गांधीवादाने देशाची आणि महाराष्ट्राची मोठी फसवणूक केल्याचं देखील सदावर्ते म्हणाले होते.…
View On WordPress
#‘त्या’#“महात्मा#&8216;या&8217;#आ��्हाडांचा#किळस#गांधींबद्दलच्या#गुणरत्न#निशाणा!#बातम्या#वाटते#विधानावरून#सगळ्यांची#सदावर्तेंवर
0 notes
Text
कॉलेजचे प्रथम वर्ष...
१९८३ साली मराठवाड्यात अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस सुरू झाले. त्यावेळेस लातूरच्या इंजिनिअरींग कॉलेजमध्ये मी प्रवेश घेतला. कॉलेजचे हे पहिलेच वर्ष असल्यामुळे बर्याच सुविधांचा अभाव होता. ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता पडेल तशा तशा सुधारणा होत होत्या. गेस्ट लेक्चरर्स बोलावून एक्स्ट्रा क्लासेस घेतले जायचे. कॉलेजची स्वतंत्र बिल्डींगही नव्हती. सायन्स कॉलेजच्या इमारतीवर चौथा अन पाचवा असे दोन मजले बांधले होते. तिथेच वर्ग भरायचे. पायर्या चढण्या उतरण्याचा मस्त व्यायाम व्हायचा. केमिस्ट्री, फिजिक्सचे प्रॅक्टीकल्स सायन्स कॉलेजच्या लॅबमध्येच व्हायचे. वर्कशॉप अजून तयार झाले नव्हते. जुन्या बिल्डींगच्या एका भागात कारपेंटरी, ब्लॅकस्मिथी, वेल्डींग, इलेक्ट्रीकल काम असे गटा गटाने शिकवले जायचे. रंधा मारतांना हाताला गोळे यायचे. लेथ मशीनवर हात कपडे काळे व्हायचे. शिकणारेही अन शिकवणारे दोघेही नवीन. सगळीच मजा होती. पण हळुहळू सुधारणा होत होती.
कॉलेजमध्ये वेगवेगळ्या प्रांतातल्या मुलांनी प्रवेश घेतला होता. मुलगी मात्र एकच होती, पण ती फर्स्ट इयर नंतर पुन्हा कधी दिसली नाही. सुरुवातीला जीन्स, टीशर्ट अशा वेशभुषेतील मुलांसमोर बेलबॉटम, ओपन शर्ट अशा अवतारात वावरणार्या मला थोडे बुजल्यासारखे व्हायचे. शर्ट इन करायची कधी सवयच नव्हती. पण जसे जसे मित्र नवीन बनत गेले तसे मी त्या वातावरणात समरसून गेलो. दक्षिण भारतीय व हिंदी भाषिक मुलांबरोबर भाषेची देवणघेवाण करतांना मजा यायची.
त्यावेळी मोठा भाऊ (दिलीप) लातूरलाच एम.एस.ई.बी.त सहाय्यक अभियंता होता. वहिनी, लहान पुतण्या व भावासोबतच मी त्याच्या सरस्वती नगरातल्या घरात रहायचो. पुतण्याला जवळच्याच एका बालवाडीत घातले होते. भावाची फिरायची ड्युटी असल्यामुळे बर्याचदा त्याच्यासोबत आम्ही सगळेच जायचो. काही वेळेस त्याच्या साईट्सवर जायचो. सिव्हिलची कामे कसे चालतात हे तो सांगायचा. अर्थात सगळं डोक्यावरुन जात होतं ही गोष्ट वेगळी म्हणा! पण खूप मजा यायची.
एकदा वहिनी माहेरी गेल्या होत्या. आम्ही दोघेच घरी होतो. दौर्यावरुन भाऊ रात्री उशीरा आला. आत बेडरुममध्ये झोपायला गेला. बेडरुमच्या खिडकीत माझे एक वाद्य ठेवलेले होते. मी सहज म्हणालो ‘खिडकीतले वाद्य हात घालून कुणी रात्री वाजवेल बरं!’ तो हसला आणि कपडे बदलून झोपला. काही वेळाने हळूच बाहेरच्या खोलीत येऊन झोपला. अर्थात एकट्याला झोप येत नव्हती म्हणून तो बाहेर आला, पण त्या वाद्य वाजवण्याशी त्याचा संबंध जोडून दुसर्या दिवशी आम्ही खूप हसलो.
त्याच्याकडे अल्विन पुष्पक स्कुटर होती. पण मला चालवता येत नव्हती. एका मित्राने दयानंद कॉलेजच्या ग्राऊंडवर त्याची स्वतःची स्कुटर मला चालवायला शिकवली. मलाच पेट्रोल भरुन द्यावे लागायचे. दोन चकरा झाल्या की तो म्हणायचा पेट्रोल सं��ले, आता उद्या. असे म्हणून दोन तीन दिवस त्याने मला शिकवायच्या निमित्ता��े मजा करुन घेतली.
स्कुटर शिकल्यामुळे अधुनमधून अल्विन पुष्पक चालवायला मिळायची. एकदा वहिनीला बाजारात काही काम होते. त्यांना स्कुटरवर घेऊन गेलो. भावाची जीप बिघडली होती म्हणून ऑफीसला जायच्या वेळेच्या आत परत यायला त्याने सांगितले. पण परत यायला उशीर झाला. आम्ही येईपर्यंत तो निघून गेला होता. बहुतेक कुणीतरी घ्यायला आले असावे. स्कुटर देण्यासाठी मी त्याच्या ऑफिसला गेलो. पाहिले तर काय! समोरच माझी सायकल! तो म्हणाला ‘जीप नाही, स्कुटर तुम्ही घेऊन गेलात, मग काय करणार! आलो सायकलवरच!’ त्याच्या स्टाफला या प्रकाराची खूप गम्मत आणि आश्चर्य वाटले. या साधेपणामुळेच सर्व स्टाफ त्याला खूप मानायचा. थोडावेळ तिथे बसून सायकल घेऊन घरी आलो.
माझे बरेच मित्र घरी यायचे. भाऊ सिव्हील इंजिनिअर असल्यामुळे आमच्या सोबत गप्पा मारायला, आम्हाला शिकवायला त्याला खूप आवडायचे. अभ्यास कसा करावा हे तो सांगायचा. वाचून समजून घ्यायचे, मग सोप्या भाषेत त्याचे नोट्स काढायचे असे सांगायचा. त्यावेळी मी वेंकट नावाच्या एका मित्राकडे अभ्यासाला जायचो. बहुतेक वेळा तिथे�� झोपायचो. त्याने हे नोट्सचे खूप मनावर घेतले. पुस्तकच्या पुस्तक शब्दश: लिहुन काढले. पान नंबरसहीत! पुस्तक वाचले काय अन नोट्स वाचले काय, दोन्ही सारखेच! कागदाचे गठ्ठेच गठ्ठे तयार झाले होते. पुस्तकांची हस्तलिखित कॉपीच तयार असल्यामुळे एकच पुस्तक असले तरी आमचे दोघांचेही भागायचे!
अभ्यास, कॉलेज, ट्यूशन असा आमचा व्यस्त दिनक्रम सुरु होता. ड्रॉईंग बोर्ड, ड्राफ्टर, कोरे कागद तसेच काही पुस्तके भावाचेच मला मिळाले होते. त्याच्या इंजिनिअरिंगच्या वेळेसचे 1975-76 सालचे त्याने जपून ठेवलेले हे साहित्य कामाला येत होते.
सायकल हेच त्यावेळचे वाहन होते. टु व्हिलर वगैर लाड नव्हते. ड्रॉईंग बोर्ड काखेत पकडुन एका हाताने सायकल चालवत कसरत करत आम्हाला कॉलेजला जावे लागायाचे. असेच एकदा आम्ही मित्र मिळून जात असतांना अशोक हॉटेलच्या चौकात एक मित्र हाताला अवघड झाल्यामुळे रस्त्यातच पाय टेकवून ड्रॉईंग बोर्ड व्यवस्थित करत होता. आम्ही चार पाचजण त्याच्या बाजूला थांबलो. काही वेळाने मागे पाहिले तर ही भली मोठी गाड्यांची रांग! समोरच्या बाजूनेही काही गाड्या, रिक्षा थांबल्या होत्या. एवढ्या गाड्या कशाला थांबल्या हे आधी लक्षातच आले नाही. मग एकदम आमच्या लक्षात आले की आम्ही थांबलोय म्हणजे सिग्नल असेल असे समजून बाकीचेही थांबले आहेत. हळूच सायकली रस्त्याच्या बाजूला घेतल्या. जसे ��म्ही बाजूला झालो तसे एक एक गाडीवाले, आम्ही काही खोडसाळपणा केला आहे अशा नजरेने रागा रागाने आमच्याकडे पहात निघाले. खरं म्हणजे आमच्या ध्यानीमनीही नव्हते की असे काही होईल म्हणून! हा प्रकार पाहुन आजुबाजूचे लोक हसायला लागले. आम्ही खाली मान घालून तिथुन सटकलो.
एके दिवशी कॉलेजहुन परत येतांना टाऊन हॉलसमोर पोलिसांनी सायकली अडवल्या. शेकडो सायकली तिथल्या मैदानात जप्त करुन ठेवत होते. मलाही अडवले. नगरपालिकेचे परमिट असेल तरच सायकल परत मिळणार होती. आता आली का पंचाईत! मी आणि एक दोन मित्र थांबलो होतो. आम्ही पाहिले की फक्त मुलांच्याच सायकली पकडणे चालू होते, मुलींच्या नाही. त्या आरामात जात होत्या. मला रागच आला. मी पोलिसाला म्हणालो ‘तुम्ही असा दुजाभाव का करताय? मुलींना आणि मुलांना वेगळा न्याय कसा काय?’ यावर तो म्हणाला ‘आम्हाला जे सांगितले आहे ते करतोय. तुम्ही साहेबांना बोला.’ मी सरळ तिथे खूर्चीवर बसलेल्या इंस्पेक्टरकडे गेलो आणि तोच प्रश्न विचारला. ते लगेच म्हणाले ‘नाही असं काही सांगितलेलं नाही. सायकली त्या सायकलीच. मग मुलींच्या असो वा मुलांच्या. सर्वांना सारखाच नियम आहे.’ आणि त्यांनी जोरात ओरडून पोलिसांना सर्वांच्या सायकली पकडायचा आदेश दिला. ज्या पोलिसाने आमची सायकल पकडली होती तो तरुण होता. आता मुलींच्या सायकली पकडायला मिळणार म्हणून त्याला आनंद झाला होता. त्या आनंदातच त्याने हळूच आमच्या सायकली बाहेर काढून दिल्या आणि वर आम्हालाच ‘थँक्यू’ म्हणाला. आमचे काम फत्ते झाले. सायकलवर टांग मारून भर्रर्रकन तिथून निघून गेलो.
वेंकटच्या रुमवर आम्ही दिवसरात्र अभ्यास करायचो. एकदा तो गावाला गेला होता. दोन दिवसांनी आला. मला घ्यायला घरी आला. वहिनींनी मस्त चहा नाष्टा दिला. नाष्टा करत सहज पेपरला बातमी वाचली की एका घरात सासूने सुनेला कित्येक महिन्यापासून तळघरात डांबून ठेवले होते. पोलिसांनी तिला सोडवले तेव्हा ती मरणासन्न अवस्थेत होती वगैरे वगैरे. आम्ही त्यावर चर्चा करत, त्या सासूला शिव्या घालत खात खात बोलत होतो. बातमीच्या शेवटी त्या घराचे वर्णन आणि फोटो होता. ते पाहुन आम्ही उडालोच! ते घर म्हणजे तेच, जिथे वेंकटची रुम होती! ताडकन उठून आम्ही सायकलवरुन रुमकडे गेलो. तिथे सगळा सन्नाटा होता. दुसर्या एका भाडेकरुकडून समजले की पोलिसांनी रात्रीच घरातल्या सर्वांना पकडुन नेले आहे. इतर��ी सविस्तर माहिती त्यांनी दिली. एवढ्या दिवसांपासून तिथे राहून आम्हाला कुणालाच माहित नव्हते की त्या घराला तळघर आहे. कधी कसला आवाजही आला नव्हता की शंका येण्यासारखे काही दिसलेही नव्हते. आता त्या घरात रहाणे शक्यच नव्हते. आमची आम्हालाच किळस वाटू लागली. त्याच दिवशी वेंकटने सामान उचलले आणि दुसर्या एका मित्राच्या रुममध्ये तात्पुरता शिफ्ट झाला!
दरम्यान भावाची औरंगाबादला बदली झाली. काही दिवसातच त्याचे सर्व सामान शिफ्ट झाले, आणि पहिल्यांदाच मी स्वतंत्रपणे रुम करुन राहू लागलो. रूम पार्टनर अर्थातच वेंकट...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
1 note
·
View note
Text
हिमाचल: मनीष सिसोदिया यांनी 'आप' सोडणाऱ्या अनूप केसरींना चारित्र्यहीन म्हटले- भाजप ही त्यांच्यासाठी योग्य जागा आहे; आम्ही पक्षातून बाहेर फेकतो
हिमाचल: मनीष सिसोदिया यांनी ‘आप’ सोडणाऱ्या अनूप केसरींना चारित्र्यहीन म्हटले- भाजप ही त्यांच्यासाठी योग्य जागा आहे; आम्ही पक्षातून बाहेर फेकतो
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया. (फाइल फोटो) प्रतिमा क्रेडिट स्रोत: पीटीआय सिसोदिया म्हणाले की, यावरून हिमाचलच्या जनतेचा आवाज भाजपला समजला आहे. हिमाचलमध्ये, भाजपच्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर एका चारित्र्यहीन व्यक्तीला किळस येते. आम आदमी पार्टी (आप) हिमाचल प्रदेश च्या (हिमाचल प्रदेश) प्रदेशाध्यक्ष अनूप केसरी (अनूप केसरी), सतीश ठाकूर आणि उना अध्यक्ष इक्बाल सिंग यांनी शुक्रवारी रात्री…
View On WordPress
#आम आदमी पक्ष#दिल्लीचे डीसी��म मनीष सिसोदिया#��ेमी जयराम ठाकूर#हिमाचल प्रदेश#हिमाचल प्रदेश ताज्या बातम्या
0 notes
Text
पप्पांन्ना माझी लाज वाटते बेबीला माझी किळस येते आईला माझं पटत नाही नानूला मी आवडत नाही प्रेम करून मी काय मिळवलं? ज्या मुलावर प्रेम केलंय तो बदलणार याची शक्यता नाकारता येत नाही ज्यांनी आयुष्य घडवलं ते पुन्हा स्विकारणार नाही प्रेम करून मी काय मिळवलं? लग्नच नाही केलं तर ?? जन्म दात्यांचे उपकार कधीच फेडता येत नाही पण फूल ना फुलाची पाकळी पण प्रेमातून का बाहेर पडता येत नाही? त्या मुलाचं काय हा प्रश्न पडणार मग मी सुद्धा आतूनच रडणार देव मी तितका मानत नाही पण आता विट्ठलाला पहावं वाटतं स्वतःच्या घरात मुद्दाम नोकर बनावंंसं वाटतं गप्प खावं, शांत रहावं प्रश्न काही विचारायचा नाही कोणालाही माझा कोणताच विचार पटायचा नाही फक्त एकच गोष्ट मनाला लागते की कूस माझी उजायची नाही दुसर्यांची मुलं खेळवताना ताकावर तहान बुजायची नाही
0 notes
Text
घरातील झुरळांमुळे हैराण असाल तर करा ‘हे’ सोपे उपाय; कायमची दूर होईल समस्या
घरातील झुरळांमुळे हैराण असाल तर करा ‘हे’ सोपे उपाय; कायमची दूर होईल समस्या
घरातील झुरळांमुळे हैराण असाल तर करा ‘हे’ सोपे उपाय; कायमची दूर होईल समस्या झुरळ पाहिल्यावर किळस तर येतेच, पण हा एक असा जीव आहे जो आपल्यासोबत अनेक आजारही घेऊन येतो. डब्ब्यांच्या खाली, बेसिनच्या आजूबाजूला किंवा स्वयंपाकघरात हे आढळून येतात. इतकंच नाही, तर एखादे झुरळ आपल्या घरात घुसले की बघता बघता त्यांची संख्या वाढते. अ��ातच घरामध्ये झुरळांची संख्या वाढण्यापूर्वी त्यांच्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक…
View On WordPress
0 notes
Text
घरात नकोशी असलेली पाल धर्मशास्त्रानुसार असते शुभ, जाणून घ्या
घरात नकोशी असलेली पाल धर्मशास्त्रानुसार असते शुभ, जाणून घ्या
घरात नकोशी असलेली पाल धर्मशास्त्रानुसार असते शुभ, जाणून घ्या काही प्राणी आपल्याला फार आवडतात, परंतु काही प्राणी बघून आपल्यालाच भीती किंवा किळस वाटतो. असे प्राणी म्हणजे साप, उंदीर, झुरळ, पाल इत्यादी. मात्र, निसर्��ात प्रत्येक जीवाचे स्वतःचे महत्त्व आहे. तसेच धर्म शास्त्र, ज्योतिष इत्यादींमध्ये कित्येक जीवांना शुभ म्हटले गेले आहे. यापैकी काहींची तर पूजा देखील केली जाते. सनातन धर्मात गाईला मातेचा…
View On WordPress
0 notes
Text
म्हसोबा...
आमच्या घरापासून पुर्वेकडे गेलं की आमच्या शेताची वाट. मशीद ओलांडून मुसांडेच्या घरासमोरुन सरळ पुढे जुन्या मठानंतर एक मारुतीचे मंदीर आहे. ते मंदीर तात्यांनी (आजोबा) बांधून दिले होते. त्यामुळे जाता येता आम्ही त्या ��ंदीरात हमखास जाऊन मारुतीचे दर्शन घ्यायचो. तिथुन पुढे एक आडवा रस्ता. उजवीकडे कैकाडी गल्ली व मोठ्या वडाच्या झाडापासून डावीकडे शेताची वाट. पुढे गेलं की दाट गावठाण वस्ती. इस्सु (विश्वनाथ गडी) याच्या घरानंतर गाव संपत आले की फासे पारध्यांची (भुर्बुर्गे) वस्ती. चाबुक मारुन घेत भिक मागणे, शिकार करणे असे या वस्तीतल्या लोकांचे काम. या वस्तीसमोरून जाताना एकदा आम्ही डुक्कर कापताना पाहीले. खरं म्हणजे डुकरीनच. कारण ते तिच्या पोटाच्या आतून छोटे छोटे पिल्ले आणि पोटाचा कोथळा काढून फेकत होते, आणि कुत्रे ते खात होते! आम्हाला एवढी किळस बसली की पुढे दोन तीन दिवस जेवणच जात नव्हते...
मी, बाळू प्रवीण व काही मित्र आम्ही या रस्त्याने चालतच शेताला जायचो. या पारध्यांच्या वस्ती ओलांडली की रस्त्यावर ‘स्वच्छ भारत’ दोन्ही बाजूने लोटा घेऊन बसलेले असायचे. आम्ही जवळ गेलो की ते पटापटा उठायचे. प्रवीण हळूच म्हणायचा ‘बसा बसा! चालू द्या..’ जसं काही याला पाहूनच ते उठले! या त्याच्या इंस्टंट कॉमेंटवर आम्ही खूप हसायचो.
पुढे वाय आकारात एक रस्ता उजवीकडे मुळजला जायचा व डावीकडचा सरळ आमच्या शेताला व पुढे कोरेगावला जायचा. डावीकडच्या रस्त्याने पुढे गेलं की चिंचोळेच्या शेतातून आलेले पाणी वाहून जाण्यासाठी एक नैसर्गिक नाला होता. हेच ते लवण! लवणाच्या आजुबाजूला बरीच झाडी होती. त्यातल्याच एका झाडाखाली शेंदुर फासून ठेवलेला म्हसोबा होता. अगदी लवणाला लागून हे झाड होते. कुणीतरी रोज पुजा करून जात असावे. कारण रोज तिथे फोडलेले नारळ, फुले, उदबत्ती दिसायची. या म्हसोबाची आम्हाला खूप भीती वाटायची. पुजेचे साहित्य पाहून अजून भयानक वाटायचे. मोठे लोक सांगायचे की म्हसोबाला नाराज केलं की तो सर्वनाश करतो! तो नारज होवू नये म्हणून आम्ही त्याच्या थोडे आधीपासून व थोडे पुढेपर्यंत शांतपणे चालायचो. फक्त मनातल्या मनात ‘राम राम राम’ म्हणणे चालू असायचे...
दिवसभर शेतात थांबून संध्याकाळी अंधार होत आला असेल तर आम्ही परत जातांना एकटे जायचोच नाही, गड्याबरोबरच जायचो. अंधारात म्हसोबाने धरले तर काय, ही भीती असायची!
एकदा आमच्याबरोबर एक थोडा बिनधास्त मित्र आला होता. आम्ही गप्पा टप्पा मारत हसत खेळत त्या लवणाजवळ पोहोचलो. जवळ आल्यानंतर नेहमीप्रमा��े आमचा आवाज बंद झाला आणि मनातल्या मनात राम राम म्हणणे सुरु झाले. इतका वेळ बडबड करणारे एकदम गप्प कसे काय म्हणून त्या मित्रालाही अश्चर्य वाटले. मी हळूच त्याच्या कानात सांगितले की ‘पुढे म्हसोबा आहे, तू पण शांतपणे चल’. मी असे म्हटल्यावर तो जोरजोराने हसायला लागला, आणि म्हणाला ‘अरे काय घाबरता, म्हसोबा बिसोबा काही नसते’. आम्हाला वाटले हा पहिल्यांदाच इकडे आलाय त्यामुळे याला म्हसोबाची महती माहित नाही, त्याला म्हसोबा काही करण्याआधीच शांतपणे तेथून घेऊन जावे. पण तो काही गप्प बसेना! आम्ही त्या म्हसोबाजवळ पोहोचलो. तो सरळ त्या म्हसोबाकडे गेला. तो शेंदुर फासलेला म्हसोबा त्याने उचलला आणि दाणकन बाजुच्या लवणात फेकून दिला...
आमची मनातल्या मनात ‘राम राम’ म्हणाण्याची गती आता खूप वाढली. काय पहात आहोत, काय झाले कळेना! या घटनेचे आपण साक्षीदार आहोत म्हणजे म्हसोबा आता आपल्यालाही सोडणार नाही या भीतीने आम्ही गळून गेलो. तो म्हणाला ‘अरे हा एक मामुली दगड आहे. काही लोक असे या दगडांना शेंदुर फासून आपले पोट भरतात. कुणाला आजार झाला की सांगतात रात्री म्हसोबाला कोंबडं कापुन टाक, सगळं बरं होईल. आणि त्याने कोंबडं टाकलं की हळुच येवुन स्वत:च घेऊन जातात आणि शिजवुन मस्त ताव हाणतात!’ तो म्हणाला ‘असे म्हसोबा जागोजागी दिसतात. आमच्या शेताच्या वाटेलाही होता. तिथे एकदा मी स्वत: पाहिले एका मांत्रिकाला, त्याच्या समोरच्या कोंबड्याला घेऊन जाताना. तेव्हा माझ्या खरे काय ते लक्षात आले.’
आम्ही मंत्रमुग्ध होवून ऐकत होतो. त्याचे सगळे पटत होते. पण मोठे लोक म्हणतात त्याप्रमाणे म्हसोबाने काही केले तर काय करायचे, ही भीती मनात घेऊन आम्ही शेतात गेलो. तिथे खेळण्यात, पाडाचे आंबे खाण्यात सगळं विसरुन गेलो. संध्याकाळी बैलगाडीतून गड्याबरोबर घरी निघालो. गाडी लवणाजवळ आली. पण का कुणास ठाऊक, मनातल्या मनात राम राम म्हणणे बंद झाले. लवणात हळुच म्हसोबाकडे पाहिले. तो अजून तिथेच निपचित पडला होता. मग विचार केला की ज्याला उठुन आपल्या जागेवरही जाता येत नाही त्याला काय घाबरायचे!
पुढे परत कुणीतरी त्या शेंदुर फासलेल्या दगडाला पुन्हा त्याच्या पुर्वीच्या जागेवर आणून बसवले. पण त्या दिवसाच्या घटनेनंतर लवणातील त्या म्हसोबाची आमची भीती कायमची निघून गेली ते गेलीच.....
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
0 notes