#कारणं
Explore tagged Tumblr posts
Text
"मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः।"
अर्थात्
"मन ही मनुष्य के बंधन और मोक्ष का कारण है।"

2 notes
·
View notes
Text
"मुलं आईचे का ऐकत नाही?"
बालपण गोड असतं, पण जसजसं मूल मोठं होतं, तसं त्याच्या वाग��्या-बोलण्यात बदल दिसू लागतो. काही वेळा मुलं आईच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात, उलट उत्तरं देतात किंवा हट्टी आणि अहंकारी (Arrogant) होतात. ही परिस्थिती अनेक आई-वडिलांसाठी चिंतेची गोष्ट बनते. पण खरं पाहता, हे वर्तन नैसर्गिक आहे आणि यामागे काही मानसशास्त्रीय आणि भावनिक कारणं असतात. मुलांच्या बदलत्या वागण्याची कारणं 1️⃣ स्वतःच्या ओळखीचा शोध…

View On WordPress
#ChildCounseling#ChildDevelopment#ChildPsychology#emotionalwellbeing#KidsBehavior#KidsMentalHealth#MentalHealth#Motherhood#ParentingAdvice#ParentingChallenges#ParentingSupport#ParentingTips#PositiveParenting#TeenageBehavior#UnderstandingChildren
0 notes
Text

नाती मना मनाची
ओळख व्हायला मन जुळावी लागतात . कधी एक क्षण हि पुरेसा असतो . नाहीतर कधी आयुष्यभर नाती जुळता जुळत नाही सोबत असूनही. कधी कधी आवडी, निवडी, विचार, स्वभाव इतके जुळतात कि पहिल्याच भेटीत घट्ट मैत्री होते. तिथे जुळवून घेण्याचा अट्टहास नसतो. समोरच्याला काय वाटेल. आपण कसे वागावे काय बोलावे. असा विचार देखील नसतो.मोकळीक असते आपण आहोत तसं स्वीकारल्याची जाणीव एकमेकांना किती सुखावह असते मग !
सहवास लाभो न लाभो एकदा जुळलेली मन ...एकदा जुळलेलं नातं मनात इतकं घट्ट बांधलं जात कि कितीही दुरावा आला . तरी भावनांचा धागा नेहमी जोडून ठेवतो नाती मना मनाची. पुन्हा भेट होता मग दोघे मनोमन सुखावतात. क्षणभर भेटीत देखील तृप्त होतात. जिथे शब्द निशब्द होतात. भावना अंतरीच्या हळव्या होतात . आठवणी कोवळ्या मनी दाटतात ... अंतरीच सुख लपवण कठीणच होऊन बसतं .. अश्यावेळी ... दुराव्याची कारणं किती हि असो .. सारं काही विसरून एकमेकां मध्ये नाती पुन्हा गुंफतात .. नव्याने गप्पा रंगतात .. दुराव्याचे नियम हि पाळतात .. तरी मनाची जवळीक ... अंतरीची भावना अगदी तशीच ... क्षणभर हि न बदलेली ... मनाच्या कुपीत जपून ठेवलेली ... अगदी काळ गेला किती मागे हि पुर्नभेट होता ह्याचा मनात मागमूसही नसलेली ... असतो फक्त नात्याचा ओलावा मनीचा सोबती. क्षणिक लाभलेला सहवास . मनाचा कोपरा हळवा करून जाणारा .
#विद्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 13 February 2025 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ सकाळी ७.१० मि.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यासाठी वॉशिंग्टनमध्ये दाखल. • आशियातल्या सर्वात मोठ्या मुंबई टेक वीक २०२५ या ‘एआय’ महोत्सवाची मुख्यमंत्र्यांची घोषणा. • स्तनाच्या कर्करोगावरील उपचारासंबंधी टाटा स्मारक केंद्राकडून जनुकीय कारणांचा शोध. • क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा इंग्लंडवर तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दणदणीत विजय. आणि • राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ५० सुवर्णपदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर.
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय अमेरिका दौऱ्यासाठी वॉशिंग्टनमध्ये दाखल झाले. भारतीय समुदायाकडून त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. पंतप्रधानांनी आज अमेरिकेच्या अन्वेषण विभागाच्या प्रमुख तुलसी गाबार्ड यांची भेट घेतली. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी, भारत-अमेरिका द्विपक्षीय संबंधाला चालना देण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकी उद्योजकांच्या भेटी घेणार आहेत.
आशियातल्या सर्वात मोठ्या मुंबई टेक वीक २०२५ या ‘एआय’ महोत्सवाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. टेक आंत्रप्रेन्योअर्स असोसिएशन ऑफ मुंबई, अर्थात टीम सोबत काल झालेल्या विशेष बैठकीत त्यांनी तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देण्यासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल अशी ग��वाही दिली. या महोत्सवाच्या माध्यमातून मुंबईला ‘आशियाचा AI सँडबॉक्स’ म्हणून जागतिक स्तरावर स्थान मिळवून देण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. या महोत्सवातून ‘एआय’ तंत्रज्ञानाचा व्यावसायिक वापर, भारतीय ‘एआय’ संशोधन, आणि उद्योजकांसाठी गुंतवणूक उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
लाडकी बहीण योजना कधीही बंद पडणार नाही, या योजनेत यापेक्षा अधिक मदत करण्याचा विचार सुरू असल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी इथल्या घरकाम करणाऱ्या २० महिलांनी रसिकाश्रय या संस्थेमार्फत "जीवाची मुंबई, श्रमाची आनंदवारी" या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्र्यांची काल भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. गोरगरीब जनतेचं जीवन सुसह्य करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलं.
राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोडणी मजुरांच्या संस्था आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांना अधिक लाभ मिळावा, यासाठी, ऊस तोडणी यंत्रासाठीच्या अनुदान योजनेचा सुधारित प्रस्ताव राज्य शासनानं केंद्र शासनाला सादर करावा, असे नि��्देश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. काल नवी दिल्लीत यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यातल्या २५७ पात्र लाभार्थ्यांनी या योजनेतून ऊस तोडणी यंत्राची खरेदी केली असून, त्यापैकी १४१ लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या हिश्श्याची रक्कम वितरीत करावी, अशी विनंती कृषी मंत्री कोकाटे यांनी यावेळी केली.
टाटा स्मारक केंद्र आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्स यांनी, स्तनाच्या कर्करोगाच्या काही रुग्णांकडून हार्मोन उपचारांना प्रतिसाद न मिळण्यामागची जनुकीय कारणं शोधून काढली आहेत. या शोधामुळे अशा रुग्णांसाठीची उपचार योजना ठरवण्यात मदत मिळणार आहे. या शोधात, रुग्णांच्या ट्यूमरमधल्या तीन प्रमुख जनुकांमध्ये उत्परिवर्तन आढळलं. हा शोध म्हणजे कर्करोगाच्या वैयक्तिकृत उपचारांमधलं एक महत्त्वाचं मार्गदर्शक पाऊल आहे, असं प्रमुख संशोधक डॉ. निधान बिस्वास यांनी सांगितलं.
राज्यात गोड्या पाण्यातलं तसंच समुद्रातलं मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी मच्छिमारांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. मंत्रालयात काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर या प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबवण्याचे, तसंच या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्ह्यांच्या नियोजन समितीच्या निधीमधून तरतूद करण्याचे निर्देश राणे यांनी दिले.
राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी मोफत वस्तू द्यायच्या घोषणा करण्याच्या पद्धतीवर सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. मोफत वस्तूंची सवय लागली तर लोक काम करणार नाहीत, असं न्यायालयाने म्हटलं आहे. नागरी भागात बेघर लोकांच्या निवाऱ्याच्या हक्का संदर्भात न्यायमूर्ती बी आर गवई आणि ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या पीठासमोर सुनावणी सुरू असताना न्यायालयाने ही टिप्पणी केली. निवारा देण्याचा हेतू चांगला आहे, मात्र त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणं जास्त योग्य होणार नाही का, असा प्रश्न न्यायालयाने सरकारला यावेळी विचारला.
जागतिक रेडिओ दिवस आज साजरा केला जात आहे. छत्रपती संभाजीनगर इथले संगीत रसिक संजय पवार यांनी जगभरातल्या रेडिओंसोबतच अनेक ग्रामोफोन आणि संगीताच्या दोन हजाराहून अधिक तबकड्यांचा संग्रह केला आहे. आपल्या या संग्रहाचं आज सर्वसामान्यांसाठी प्रदर्शन भरवल्याचं पवार यांनी सांगितलं…. मी एक रेडिओ प्रेमी आहे. जुन्या काळापासून आजपर्यंतची ज���वढे काही रेडिओ आणि संगीत साधने जेवढी काही आहेत, तो संग्रह माझ्याकडे आहे. माझ्याकडे १९४० पासून ते आजपर्यंतचे रेडिओ आहेत. रेडिओचे जेवढे व्हर्जन्स निघाले, सुरवातीला वॉल रेडिओ निघाले, नंतर ट्रान्झीस्टर्स निघाले, त्यानंतर पॉकेट रेडिओ, टेबल रेडिओ निघाले त्या सगळ्या रेडिओचा मी संग्रह केलेला आहे. म्हणून माझं रेडिओ प्रसार आणि प्रसार व्हावा यासाठी मी खुलं प्रदर्शन ठेवलेलं आहे.
सिडको एन आठमध्ये वेणुताई चव्हाण शाळेजवळ अमर हाऊसिंग सोसायटीत पवार यांच्या राहत्या घरी, दुपारी तीन वाजेपासून हे प्रदर्शन सर्वांना पाहता येणार आहे.
क्रिकेटमध्ये इंग्लंडचा १४२ धावांनी दणदणीत पराभव करत, भारतानं तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतले सर्व सामने जिंकत निर्भेळ विजय मिळवला आहे. काल अहमदाबाद इथं झालेल्या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ३५६ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल खेळण्यास उतरलेला पाहुणा संघ ३५ व्या षटकांत २१४ धावांवर सर्वबाद झाला. १४ चौकार आणि तीन षटकारांच्या बळावर ११२ धावा करणारा शुभमन गील सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र १७५ पदकांसह दुसऱ्या स्थानावर कायम आहे. यामध्ये ५० सुवर्ण, ६२ रौप्य आणि ६३ कांस्य पदकांचा समावेश आहे. सेना दलं ६५ सुवर्ण पदकांसह पहिल्या, तर ३९ सुवर्ण पदकांसह हरियाणा तिसऱ्या स्थानावर आहे. काल या स्पर्धेत ४०० मीटर अडथळा शर्यतीत महाराष्ट्राच्या नेहा धाबळे हिनं कांस्यपदक, तर संजीवनी जाधव हिनं रौप्य पदक जिंकलं. मिश्र रिले स्पर्धेत राज्याच्या संघाने रौप्य पदक पटकावलं.
धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यात शेळका धानोरा इथले महादेव विठ्ठल कांबळे यांच्या शेतात एआय अर्थात कृत्रीम बुद्धिमत्तेच्या वापरातून मिरची पिकाचं संगोपन केलं जात आहे. सयाजी ऍग्रो प्रोड्युसर कंपनीने आयसीआयसीआय फाउंडेशनकडून वापरात आणलेल्या या आधुनिक तंत्रज्ञानाचा आढावा घेणारा हा वृत्तांत.. शेतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे पिकांच्या वाढीसाठी जमिनीमध्ये असलेली आर्द्रता, हवामानाचा परिणाम, औषध फवारण्या तसेच पाण्याचे व्यवस्थापन आणि पीक व्यवस्थापन करण्यास मदत होत आहे. यासाठी जमिनीमध्ये वाफे पद्धतीने लावलेल्या मिरच्यांच्या मुळाशी सेंसर लावून ते सेंसर संदेश टॉवर पर्यंत पोहोचतात, हा टॉवर २४ तास कार्यरत राहून संबंधित शेतकऱ्याला त्याच्या मोबाईल��र संदेशाद्वारे अवगत केलं जातं. त्यामुळे पिकांची जोपासना करण्यास आणि शेती उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा केलेला हा वापर हा धाराशिव जिल्ह्यातील पहिलाच पथदर्शी प्रयोग असून इतर शेतकऱ्यांना हा मार्गदर्शक ठरणार आहे. देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव.
चव्वेचाळीसावं मराठवाडा साहित्य संमेलन येत्या पंधरा आणि सोळा तारखेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूज इथं आयोजित करण्यात आलं आहे. दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात आयोजित संमेलनाचं अध्यक्षपद डॉ. भीमराव वाघचौरे भूषवणार असल्याची माहिती, काल पत्रकार परिषदेत देण्यात आली.
हिंगोली जिल्ह्यात आरोग्य शिबिरं घेऊन सगळ्या सफाई कर्मचाऱ्यांची नि:शुल्क आरोग्य तपासणी पूर्ण करावी, अशी सूचना राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य डॉ. पी. पी. वावा यांनी केली आहे. काल हिंगोली इथं आयोगाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी सफाई कर्मचाऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली, तसंच कर्मचाऱ्यांना आभा कार्डचं वितरण क���ण्यात आलं.
परभणी इथं कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत करावी, तसंच संबंधित पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावं, अशी मागणी, काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केली आहे. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. या मागण्या मान्य न केल्यास येत्या तीन मार्चला मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
हिंगोली जिल्ह्यातल्या आखाडा बाळापूर इथले प्रतिष्ठित व्यापारी तथा युवा सामाजिक कार्यकर्ते सचिन पेंढारकर यांना या वर्षाचा 'राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. येत्या नऊ मार्च रोजी हिंगोली इथं हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
बीड नगरपालिकेनं काल शहरातल्या अनेक भागातली अतिक्रमणं निष्कासित केली. मुख्याधिकारी नीता अंधारे या स्वतः पूर्ण पथकासह या कारवाईत सहभागी झाल्या होत्या.
महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी दक्षिण मध्य रेल्वे विशेष गाड्या चालवणार आहे. नांदेड-पाटणा-नांदेड ही गाडी आज रात्री ११ वाजता नांदेड इथून निघेल तर परतीच्या प्रवासात पाटणा इथून पंधरा तारखेला निघेल.
0 notes
Text

#शराब_से_छुटकार
नशा नाश का कारणं हैं
एक शराबी अनेकों व्यक्तियों की आत्मा दुखाता हैं :- पत्नी की पत्नी के माता-पिता, भाई-बहनों की,अपने माता-पिता, बच्चों की,भाई-बहनों आदि की। केवल एक घंटे नशे से धन का नाश इज्जत का नाश,पूरे परिवार के शांती का नाश हो जाता है Sant Rampal Ji Maharaj
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : ४६
भाऊसाहेबांनी केलेल्या त्या स्पष्ट खुलाशानंतर एक विचित्र शांतता पसरली! त्यावर कुणालाच कांही बोलण्याचा धीर झाला नाहीं. एका बाजूला खुर्चीवर ऐकत बसलेल्या मनोरमावर मात्र भाऊसाहेबांच्या खुलाशाचा वेगळाच परिणाम झाल्याचं शुभदाला जाणवलं. तिची अचानक वाढलेली अस्वस्थता पाहून शुभदाने मनोरमाच्या चाळवाचाळव करणाऱ्या हातांवर शांतपणे आपला हात ठेवीत तिला आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला आणि नजरेच्या खुणांनीच 'तुला जे कांही बोलायचं आहे ते लगेच आणि स्पष्टपणे बोल' असं सुचवलं. "माफ करा भाऊसाहेब," मनोरमा शांततेचा भंग करीत म्हणाली, "तुम्ही मुलांनी जे सुचवलं त्याला सुहासिनीचा ठाम विरोध असल्याचं सांगीतलं, पण त्याची कारणं नाहीं सांगीतली!" "मनोरमा, अग तूं मधेच हे काय --" म्हणत तिला थांंबवायचा प्रयत्न करणाऱ्या भोसलेंना अडवून मनोरमा शांतपणे म्हणाली,"मला बोलूं द्या, मनोहर! खरं तर ही कारणं सुहासिनीने स्वत: सांगणं अधिक योग्य ठरलं असतं, पण आतां ती बोलायच्याही अवस्थेत नाहीये! तिचं म्हणणं या सर्वांसमोर आलं नाहीं तर परिस्थितीचं गांभीर्य कुणालाच समजणार नाहीं!" त्यावर भोसलेंनी भाऊसाहेबांकडे प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं! भाऊसाहेबांनी मूकपणे संमतीदर्शक मान डोलावली तशी मनोरमा सर्वांना उद्देशून पुन: बोलूं लागली, "सुहासिनीकडून तिच्या अलीकडच्या आजारपणांत मला जे समजलं तेच मी थोडक्यात सांगणार आहे! सुहासिनीचं स्पष्ट मत होतं की मुलांना दाखवताहेत तसा आई-बाबांचा कळवळा वगैरे कांही आलेला नसून गेली पांच वर्षं तरी दाबूून ठेवलेली मनीषा त्यांना पूर्ण करायची आहे!" "कुठल्याही कारणास्तव कां होईना, मुलं आई-बाबांची काळजी घेणार असतील तर हरकत काय आहे?" एका ज्येष्ठ स्नेह्याने विचारलं.
"तेच तर मी सांगतेय् की सुहासिनीच्या मते मुलांचा खरा हेतू काळजी घेण्याचा नसून वेगळाच होता! धाकट्या शिरीषने ५ वर्षांपूर्वी वेगळं बिऱ्हाड केलं तेव्हांच दोघां भावांनी 'माॅम आणि डॅडने त्यांच्याबरोबर रहावं' असं सूतोवाच केलं होतं! त्यावेळी नकार देतांना सुहासिनीने स्पष्ट शब्दांत सांगीतलं होतं की 'तुमच्या लग्नांनंतर सर्वांनी एकत्र रहावं म्हणून तर होता तो बंगला विकून त्याच परिसरात आम्ही हा ४ बेडरूमचा फ्लॅट घेतला! तथापि तुम्हां दोघांनाही स्वतंत्र राहायचं असेल तरी आमची हरकत नाही;-- पण हा फ्लॅट सोडून आम्ही कुठेही येणार नाहीं. गेली ३५ वर्षांहून अधिक काळ इथे राहिल्याने या परिसराशी आमची जणूं नाळ जोडली गेली आहे. ��्यामुळे आतां या वयांत दुसरीकडे नव्याने बस्तान बसवणं शक्य नाहीं.' ते ऐकून दोघेही खूप नाराज झाले होते!" "पण मुलांना उतारवयात आई-बाबांनी एकटं राहण्याबाबत काळजी वाटणे साहजिक नाहीं कां?" दुसर्या एका ज्येष्ठ स्नेह्याने विचारलं "सुहासिनीशी याबाबत भाऊसाहेब सहमत नसले, तरी सुहासिनीच्या मते मुलांचा डोळा फक्त हा फ्लॅट विकून येणाऱ्या भल्यामोठ्या रकमेवर होता! कारण त्यांनी कधीही असं म्हटलं नाहीं की 'हा फ्लॅट विकून येणाऱ्या पैशांतून तुमच्यासाठी आमच्या जवळ नवीन फ्लॅट घेऊंया'. गेल्या ५ वर्षांत या फ्लॅटची किंमत अधिकच वाढली आहे हे उघड आहे!!" एवढ्यांत कुणीतरी उतावीळपणे अधिक वेळ बटन दाबून धरावे तशा प्रकारे डोअरबेल कर्कश्श वाजली. भाऊसाहेबांना बसून राहण्याची खुण करीत भोसलेंनी चट्कन पुढे होऊन दार उघडलं तशी गिरीश घाईघाईने आंत आला. पण जमलेल्या लोकांना बघून कांहीसं चकित होत त्याने तीक्ष्ण स्वरांत भाऊसाहेबांना विचारलं, " डॅड, माॅम कुठे आहे? आणि तुम्ही ही कोण लोकं, कशासाठी जमा केली आहेत?" " डॅड, तुम्हांला दिवसभरांत फोन करून दादाशी किंवा माझ्याशी बोलावंसं नाहीं वाटलं?" गिरीशच्या मागोमाग आलेल्या शिरीषने विचारलं. त्याच्या स्वरांतला उपहास लपण्याजोगा नव्हता!
"गिरीश आणि शिरीष, तुम्हांला वाटणारी काळजी आम्ही सगळे समजूं शकतो! तथापि माझी विनंती आहे की तुम्ही शक्य तेवढ्या हळूं आवाजांत बोलावं!" आपल्या आवाजावर ताबा राखीत भोसले अत्यंत शांत स्वरांत म्हणाले, "भाऊसाहेब या घडीला कुठलाही संवाद साधण्याच्या मनस्थितीत नाहींत, हे तुम्ही दोघांनी लक्षांत घ्यायला हवं! त्यामुळेच मी स्वत: तुम्हां दोघांनाही फोन करण्याचा प्रयत्न केला! पण फोन लागला नाहीं;-- तेव्हां तुम्ही महत्वाच्या कामांत बिझी असाल हे ओळखून मी तुमच्या मोबाईलवर मेसेज पाठवले, ते तुम्ही बघितले नाहीं कां?" भोसलेंनी शांत स्वरांत केलेला खुलासा ऐकून गिरीश आणि शिरीष दोघेही वरमले. पुढे केलेल्या खुर्चीवर बसत गिरीश म्हणाला, "काका, तुमचा मेसेज शिरीषने प्रथम बघितला आणि मला लगेच कळवलं! म्हणून तर आम्ही ताबडतोब इथे आलो आहोंत!" दोघांच्या वागण्या-बोलण्याचा एकुण रागरंग पचनी न पडल्याने खुप चिडलेली मनोरमा पुढे येत लागट स्वरांत म्हणाली, "नशीब म्हणायचं की भोसलेकाकांना तरी तुम्ही ओळखलंत! आणि काय रे, तुम्ही आई-बाबांची विचारपूस करायला आला आहांत की त्यांना जाब विचारायला?" "माफ करा काकु!" गिरीश चट्कन हात जोडून म्हणाला, "काळजीपोटी आम्ही कांही कमीजास्त बोललो असूं हे प्लीज समजून घ्या! माॅमला आम्ही भेंटूशकतो कां?प्लीज?" "सुहासिनीची तब्येत ठीक आहे आतां, पण औषधांच्या परिणामाने तिला गाढ झोंप लागली आहे! हवं तर तिला बघून या, पण उठवूं नका!" मनोरमा म्हणाली, "डाॅक्टर म्हणाले आहेत की ती आपणहून उठेल तेव्हां तिची तब्येत ठणठणीत झालेली असेल!" "माॅमला शांत झोप लागली असेल तर आपण तिला आत्ता नको भेंटुया!" गिरीशला उद्देशून शिरीष म्हणाला, "उद्यां सकाळी त्यांना घेऊन जायला येऊं, तेव्हांच एकदम भेंटुया!"
६ जुलै २०२३
0 notes
Text
जीवनाबद्दलचं चागलं भविष्य
आज मला श्री समर्थ सांगत होते की,“ नैसर्गिक शहाणपणावर आधारित विश्वासांचा जन्म,निसर्ग आणि म��नवतेबद्दल जबाबदारीची भावना,पुनर्संचयित करण्याच्या,आवश्यकतेतून झाला आहे. आज आपलं बहुतेक जग भ्रष्टाचाराने ग्रासलेलं आहे आणि धोकादायक नैतिक अधोगतीमध्ये आहे.भौतिकवाद, लोभ, शोषण आणि खोटा अलौकिक विश्वास ही मानवी मूल्यांच्या वाढत्या ऱ्हासाची काही कारणं आहेत.असं मला वाटतं. मला असं वाटतं की,सर्व जीवसृष्टीची जन्मजात…
0 notes
Text
believed to be 72,000
If you could be a character from a book or film, who would you be? Why? Balance energy channel. मनो हि द्विविधं प्रोक्तं शुद्धं चाशुद्धमेव च। अशुद्धं कामसंकल्पं शुद्धं कामविवर्जितम्॥मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः । बन्धाय विषयासक्तं मुक्त्यै निर्विषयं स्मृतम् ॥यतो निर्विषयस्यास्य मनसो मुक्तिरिष्यते । अतो निर्विषयं नित्यं मनः कार्यं मुमुक्षुणा ॥There are two kinds of mind, pure mind and…

View On WordPress
0 notes
Text
मन के नियंत्रण का सबसे वैज्ञानिक तरीका
मन एव मनुष्यामाम् कारणं बंधन मोक्षयो: ... नमस्कार.. मैं हूं उपालि अपराजिता... और आप देख रहे हैं उदय इंडिया डिजिटल...
मन ही मनुष्य के बंधन और मोक्ष का कारण बनता है...और मन रुपी घोड़े को काबू करने वाली लगाम है श्वांस...
चूंकि प्राणों का आधार श्वांस है.. इसलिए श्वांसों के नियमन से सभी चेतनाएं काबू में आ जाती हैं... जिसमें सबसे चंचल और गतिशील होता है हमारा मन..जैसे अति चंचल पारद को तुलसी के पत्ते से नियंत्रित किया जाता है...
वैसे ही मन को नियंत्रित करने के लिए सांसों पर ध्यान देना अति आवश्यक है... यह सांसों का खेल बहुत निराला है..
योगशास्त्रों में सांसों को नियंत्रित करने के लिए तरह तरह के सूत्र दिए गए हैं... इसका एक बहुत ही उपयोगी ग्रंथ है.. विज्ञान भैरव तंत्र...
जिसमें कुल 112 सूत्र हैं... इसमें पार्वती प्रश्न पूछती जाती हैं...और शिव उसका उत्तर देते जाते हैं..…
Youtube :- https://www.youtube.com/watch?v=vEFeti3sIBs
1 note
·
View note
Text
Bondage and Liberation
Swami Bhoomananda Tirtha
“There is a way of generating peace and relief, lightness and freedom. The way is to make the mind interact with the Soul, the Subject or the Self.”
मन एव मनुष्याणां कारणं बन्धमोक्षयोः । बन्धाय विषयासक्तं मुक्तं निर्विषयं स्मृतम् ॥
mana eva manuṣyāṇāṃ kāraṇaṃ bandha-mokṣayoḥ ।bandhāya viṣayāsaktaṃ muktaṃ nir-viṣayaṃ smṛtaṃ ॥
…This shloka from Brahmabindu Upanishad (shloka 2) says that the mind itself is the cause of bondage and liberation. A mind attached to sense-objects leads to bondage while the mind freed of objects leads to liberation.
Bondage and liberation are verily for the mind. The Soul does not have any bondage, nor does it need liberation. Many of you get confused about what in us gets liberated. My reply is, whichever part in you now feels bound, will start feeling the absence of bondage.
Liberation is not something to be gained after the body falls. Right from the birth of our body, the senses start interacting with the external world. Consequently, the mind too gets involved with the object impressions. With the passage of time, it becomes more and more crowded with worldly impressions. The sukha-duḥkhās, the likes and dislikes, the various agitations and afflictions – all relate to the world and its objects. The world thrives on dvandvas. Caught in the quagmire of dvandvas, the mind feels bondage, but never does it look back into its own source, the Subject.
But there is a way of treating the mind. There is a way of generating peace and relief, lightness and freedom. The way is to make the mind interact with the Soul, the Subject or the Self. As the interactions with the plural world give rise to afflictions and tension, so will the contemplation on the one and uniform Soul generate peace, poise and freedom.
The right time to treat the mind with Self-reflection is when the agitation exists. Don’t wait for the afflictions to subside. The external situations we may not be able to win over. But the responses of our mind to any external situation we can certainly control and transform. So, consider every unfavourable situation as an opportunity to treat the mind and transform it.
The mind is a kind of surface expression like the waves of the ocean. The waves appear to be high and mighty. But underneath lie the immense depth and stillness of the ocean. Compared to the vastness below, what is the magnitude of the waves? So are the afflictions and agitations, likes and dislikes, joy and sorrow of the mind. Underneath these waves and ripples, lies the calm infinitude of the Self. Know this vastness. Know this unfathomable depth. Let the waves and ripples of the object impressions play on the surface. But you remain poised in the uniform taintless vastness of the Subject…
For more information click here to visit the official Swami Bhoomananda Tirtha website
0 notes
Text
सेक्स करण्याची इच्छा कमी होण्याची 'ही' आहेत 4 कारणं
https://bharatlive.news/?p=162851 सेक्स करण्याची इच्छा कमी होण्याची 'ही' आहेत 4 कारणं
जोडप्यांमध्ये ...
0 notes
Text
बायको (लाडानं) : आज जेवण कसं झालं आहे ते सांगा ना....
Pradip : तू पण ना…
भांडणासाठी काहीतरी कारणं शोधत असतेस.
😏😏😏😛😛😛🤣🤣🤣😉😉😉
0 notes
Text
नाती मना मनाची
ओळख व्हायला मन जुळावी लागतात . कधी एक क्षण हि पुरेसा असतो . नाहीतर कधी आयुष्यभर नाती जुळता जुळत नाही सोबत असूनही. कधी कधी आवडी, निवडी, विचार, स्वभाव इतके जुळतात कि पहिल्याच भेटीत घट्ट मैत्री होते. तिथे जुळवून घेण्याचा अट्टहास नसतो. समोरच्याला काय वाटेल. आपण कसे वागावे काय बोलावे. असा विचार देखील नसतो.मोकळीक असते आपण आहोत तसं स्वीकारल्याची जाणीव एकमेकांना किती सुखावह असते मग !
सहवास लाभो न लाभो एकदा जुळलेली मन ...एकदा जुळलेलं नातं मनात इतकं घट्ट बांधलं जात कि कितीही दुरावा आला . तरी भावनांचा धागा नेहमी जोडून ठेवतो नाती मना मनाची. पुन्हा भेट होता मग दोघे मनोमन सुखावतात. क्षणभर भेटीत देखील तृप्त होतात. जिथे शब्द निशब्द होतात. भावना अंतरीच्या हळव्या होतात . आठवणी कोवळ्या मनी दाटतात ... अंतरीच सुख लपवण कठीणच होऊन बसतं .. अश्यावेळी ... दुराव्याची कारणं किती हि असो .. सारं काही विसरून एकमेकां मध्ये नाती पुन्हा गुंफतात .. नव्याने गप्पा रंगतात .. दुराव्याचे नियम हि पाळतात .. तरी मनाची जवळीक ... अंतरीची भावना अगदी तशीच ... क्षणभर हि न बदलेली ... मनाच्या कुपीत जपून ठेवलेली ... अगदी काळ गेला किती मागे हि पुर्नभेट होता ह्याचा मनात मागमूसही नसलेली ... असतो फक्त नात्याचा ओलावा मनीचा सोबती. क्षणिक लाभलेला सहवास . मनाचा कोपरा हळवा करून जाणारा .
#विद्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 12 February 2025
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १२ फेब्रुवारी २०२५ सायंकाळी ६.१०
****
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मार्सेलिसच्या जनतेप्रति कृतज्ञता व्यक्त
राज्यात मत्स्योत्पादन वृद्धीसाठी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर प्रशिक्षण कार्यक्रम
शिक्षण आणि जीवन व्यवहारांत समन्वयाची आवश्यकता-राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन
आणि
तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताकडून इंग्लंडसमोर ३५७ धावांचं लक्ष्य
****
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भूमिकेला दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्समध्ये मार्सेलिसच्या जनतेप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. ते आज आपल्या फ्रान्स दौऱ्यात मार्सेलिस इथं पोहोचले. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात या ��िकाणाचं मोठं महत्त्व अस��्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आठ जुलै १९२० रोजी जहाजातून उडी मारुन मार्सेलिस बंदर गाठलं होतं. त्यावेळी त्यांना पाठिंबा देणाऱ्या आणि ब्रिटिशांच्या ताब्यात देण्याला विरोध करणाऱ्या फ्रेंच कार्यकर्ते आणि जनतेप्रति त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशातून कृतज्ञता व्यक्त केली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉ यांच्या हस्ते आज मार्सेलिस इथं भारताच्या नव्या वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर मोदी यांनी मॅक्रॉ यांच्या समवेत मार्सेलिस इथल्या युद्ध हुतात्मा स्मारकाला भेट देऊन, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात वीरमरण प्राप्त झालेल्या भारतीय सैनिकांना अभिवादन केलं. पंतप्रधानांच्या मार्सेलिस भेटीबाबत तिथल्या भारतीय समुदायामध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या आजच्या भागात प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण हिने विद्यार्थ्यांशी संवाद साधला. अपयशाची भीती न बाळगता आपल्या बलस्थानांवर लक्ष केंद्रीत करण्याचं आणि दुबळी बाजू बळकट करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन दीपिकाने विद्यार्थ्यांना केलं.
****
टाटा स्मारक केंद्र आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्स यांनी, स्तनाच्या कर्करोगाच्या काही रुग्णांकडून हार्मोन उपचारांना प्रतिसाद न मिळण्यामागची जनुकीय कारणं शोधून काढली आहेत. या शोधामुळे अशा रुग्णांसाठीची उपचार योजना ठरवण्यात मदत मिळणार आहे. या शोधात, हार्मोन उपचारांना प्रतिसाद देणाऱ्या आणि प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णांच्या जीनोमचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर ट्यूमरमधल्या तीन प्रमुख जनुकांमध्ये उत्परिवर्तन आढळलं. हा शोध म्हणजे कर्करोगाच्या वैयक्तिकृत उपचारांमधलं एक महत्त्वाचं मार्गदर्शक पाऊल आहे, असं प्रमुख संशोधक डॉ. निधान बिस्वास यांनी सांगितलं आहे.
****
राज्यात गोड्या पाण्यातलं तसंच समुद्रातलं मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी मच्छिमारांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. मंत्रालयात आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर या प्रशिक्षणाचा कार्यक्रम सुरू करण्याचे तसंच सागरी किनारपट्टीच्या एका जिल्ह्यातही हा प्रशिक्षण कार्यक्रम प्रायोगिक तत्वावर राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी जिल्ह्यांच्या नियोजन समितीच्या निधीमधून तरतूद करावी, अशा सूचनाही राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. २०२६ पर्यंत कार्यान्वित होणार असलेल्या वाढवण बंदरासाठी कुशल मनुष्यबळ निर्मितीकरता एक प्रशिक्षण कार्यक्रम आखून तो तातडीनं सुरू करण्याचे निर्देशही राणे यांनी यावेळी दिले.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर विधानसभा मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार झालेले नेते राजन साळवी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा शिवसेनेच्या किरण सामंतांकडून पराभव झाला होता. ��ा पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपण उपनेतेपदाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्रात लिहिलं आहे.
****
गडचिरोली जिल्ह्यात भामरागड तालुक्यातल्या दिरंगी आणि फुलनार गावांजवळच्या जंगलात नक्षलवाद्यांशी लढताना वीरमरण आलेले पोलिस अंमलदार महेश नागुलवार यांना आज गडचिरोली इथल्या पोलिस मुख्यालयाच्या पटांगणावर मानवंदना देण्यात आली.
त्यानंतर संध्याकाळी नागुलवार यांच्या पार्थिवदेहावर अनखोडा या त्यांच्या गावी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागुलवार यांना श्रद्धांजली अर्पण केली असून, नागुलवार यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारतर्फे दोन कोटी रुपयांचं आर्थिक सहाय्य आणि विविध लाभ देण्याची घोषणा केली आहे.
****
थोर समाज सुधारक दयानंद सरस्वती यांची आज जयंती आहे. समाजाला जागरूक करण्यासाठी, तसंच भारतीय वारसा आणि संस्कृतीच्या संरक्षणासाठी महर्षी दयानंद आयुष्यभर झटत राहिले, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या याबाबतच्या संदेशात म्हटलं आहे.
संत रविदास यांची जयंतीही आज देशभरात साजरी केली जात आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, तसंच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविदास यांना अभिवादन केलं.
बीडमध्ये संत रविदास यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरात सामाजिक एकतेचा संदेश देणारी फेरी तसंच संत रविदास यांच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. छत्रपती संभाजीनगर इथंही रविदास यांना अभिवादन करण्यात आलं.
****
शिक्षण आणि जीवन व्यवहारांत समन्वयाची आवश्यकता राज्यपाल तथा कुलपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केली आहे. आज सातारा इथं कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचा पहिला दीक्षान्त समारंभ राज्यपालांच्या उपस्थितीत झाला, त्यावेळी ते बोलत होते. शिक्षण आणि व्यवहाराचा हा समन्वय साधण्याच्या दृष्टीने नवीन शैक्षणिक धोरण महत्त्वाचं असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं. या विद्यापीठाच्या पदवी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सहाशे एकोणऐंशी विद्यार्थ्यांपैकी उत्कृष्ट गुण मिळविलेल्या तीन स्नातकांना राज्यपालांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली.
****
शुभमन गीलची शतकी खेळी आणि विराट कोहलीपाठोपाठ श्रेयस अय्यरच्या अर्धशतकांच्या बळावर भारतीय क्रिकेट संघानं पाहुण्या इंग्लड संघासमोर ३५७ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला अखेरचा सामना अहमदाबाद इथं सुरू आहे. मालिकेतले पहिले दोन सामने जिंकून भारतानं विजयी आघाडी घेतली आहे.
****
पुण्यातल्या म्हाळुंगे-बालेवाडी इथल्या शिवछत्रपती क्रीडा संकुलातल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा अद्ययावत कराव्यात, असे निर्देश क्रीडा मंत्री दत्तात्रय भर��े यांनी दिले आहेत. आज मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत भरणे यांनी गणवेशाचा दर्जा, प्रशिक्षकांचं मानधन तसंच भोजन दर याबाबतही सूचना केल्या. कोल्हापूर इथे फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी सुरू करण्यालाही या बैठकीत तत्वत: मान्यता देण्यात आली.
****
धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यात शेळका धानोरा इथले महादेव विठ्ठल कांबळे यांच्या शेतात एआय अर्थात कृत्रीम बुद्धिमत्तेच्या वापरातून मिरची पिकाचं संगोपन केलं जात आहे. सयाजी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीने आयसीआयसीआय फाउंडेशनकडून वापरात आणलेल्या या आधुनिक तंत्रज्ञानाचा आढावा घेणारा हा वृत्तांत –
शेतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केल्यामुळे पिकांच्या वाढीसाठी जमिनीमध्ये असलेली आर्द्रता, हवामानाचा परिणाम, औषध फवारण्या तसेच पाण्याचे व्यवस्थापन आणि पीक व्यवस्थापन करण्यास मदत होत आहे. यासाठी जमिनीमध्ये वाफे पद्धतीने लावलेल्या मिरच्यांच्या मुळाशी सेंसर लावून ते सेंसर संदेश टॉवर पर्यंत पोहोचतात, हा टॉवर २४ तास कार्यरत राहून संबंधित शेतकऱ्याला त्याच्या मोबाईलवर संदेशाद्वारे अवगत केलं जातं. त्यामुळे पिकांची जोपासना करण्यास आणि शेती उत्पादन वाढण्यास मदत होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा केलेला हा वापर धाराशिव जिल्ह्यातील पहिलाच पथदर्शी प्रयोग असून इतर शेतकऱ्यांना हा मार्गदर्शक ठरणार आहे.
देविदास पाठक, आकाशवाणी वार्ताहर, धाराशिव.
****
चव्वेचाळीसावं मराठवाडा साहित्य संमेलन येत्या पंधरा आणि सोळा तारखेला आयोजित करण्यात आलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वाळूज इथं दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात हे संमेलन होणार आहे. या संमेलनाचं अध्यक्षपद डॉ. भीमराव वाघचौरे भूषवणार आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर इथले प्रतिष्ठित व्यापारी तथा युवा सामाजिक कार्यकर्ते सचिन विश्वनाथ पेंढारकर यांना या वर्षाचा ‘राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. येत्या नऊ मार्च रोजी हिंगोली इथं हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
****
परभणी इथं कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत करावी तसंच संबंधित पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावं, अशी मागणी काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
0 notes
Text
बायको (लाडानं) : आज जेवण कसं झालं आहे ते सांगा ना....
Bandya : तू पण ना…
भांडणासाठी काहीतरी कारणं शोधत असतेस.
😏😏😏😛😛😛🤣🤣🤣😉😉😉
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : १४
सकाळी रोजच्यासारखा योगपाठ करीत असतांना अनंतला शुभदाची 'अहो, जरा ऐकतां कां?" अशी हलक्या स्वरांतली हांक ऐकूं आली. तसंच कांही महत्वाचं असल्याशिवाय ती आपल्या नेहमीच्या योगपाठामधे व्यत्यय आणणार नाहीं हे माहीत असल्याने अनंतने चटकन् प्राणायाम थांबवून मागे वळून बघितलं. "अहो, सीमाचा फोन आला आहे. माझं बोलणं झालं;-पण तुमच्याशी बोलायचं म्हणते आहे! मी तिला सांगीतलं की तुमचा योगपाठ चालूं आहे;-- त�� संपला की तुला फोन करतील! अजून किती वेळ लागेल म्हणून सांगू? म्हणजे ती त्यानुसार पुन: फोन करील म्हणतेय्!!" "मला अजून २० मिनिटं तरी लागतील. सीमाला म्हणावं की माझं आटपलं की मीच फोन करीन! तिनं मुद्दाम पुन: फोन करायला नको." ठरवल्याप्रमाणे ४ दिवसांपूर्वी कामत पति-पत्नींसाठी सुयोग्य Medical Insurance Policy घेतल्याचं सीमाला कळलं असणार आणि तिला त्याबद्दलच बोलायचं असणार हा अनंतचा तर्क बरोबर ठरला! तसंच सुरेशदादा बरा होऊन हिंडु-फिरुं लागल्यावर सुलभाने सीमाला सविस्तर वृत्तांत कळवला होता. त्यामुळे ऐनवेळेस केलेल्या मदतीबद्दल 'अन्नूकाका'चे किती आणि कसे आभार मानूं असं सीमाला झालं होतं!
सीमाच्या भावना ओळखून अनंतने तिला मोकळेपणानं बोलूं दिलं. पहिला आवेग ओसरून थोडी शांत झाल्यावर अनंतने तिला "यापुढे आई-बाबांची कसलीही काळजी करायची नाहीं!' असा कानमंत्रही दिला! सीमाशी बोलून झाल्यावर कीचनमधे नाश्त्यासाठी टेबलजवळ बसत अनंत म्हणाला, "सुलभावहिनींना जरा खडसाव की सीमाला एवढं तपशीलवार सांगायची काय गरज होती?" "अहो, सीमाने हजार प्रश्न विचारून तिला भंडावून सोडलं असेल! मग सुलभा तरी काय करील बिचारी! बोलण्याच्या ओघात नकळत सगळं सांंगूून बसली असेल!" हळहळत शुभदा म्हणाली," तुम्ही बघितलंत ना, पहिला आठवडाभर खुद्द सुलभासुद्धां किती बेचैन होती! तरी बरं, मी सतत तिच्यासोबत होते, त्यामुळे तिला मन मोकळं करायला कुणीतरी होतं;-- नाहींतर मग सीमालाच इथे बोलावून घेण्याची पाळी आली असती!" "हो, वहिनींची घालमेल माझ्याही लक्षात आली होती!' अनंत कांहीसा घुटमळत म्हणाला, " पण मला वाटतं शुभदा, त्याची कारणं वेगळी होती! इतक्या वर्षांचा शेजार असला तरी दादाच्या आर्थिक व्यवहारांची मला कांहीच कल्पना नाहीये;-आणि बहुधा वहिनींनाही नाहींये! त्यामुळेच हाॅस्पिटलचं बिल किती होईल वगैरे चिंता त्यांना भेडसावीत असावी!"
"शक्य आहे;- कारण मलाही सुलभाने दोन-तीनदां बोलून दाखवलं की 'या घडीला घरांत किती पैसे आहेत, कुठे आहेत तिला कांssही ठाऊक नाही! हाॅस्पिटलचं बिल देण्यापुुरते तरी पैसे आहेत कां तेही दादांनाच विचारावं लागेल' असंही म्हणाली!" " मला ते जाणवल्यावर मी वहिनींना सांगीतलं होतं की बिलाची तुम्ही अजिबात काळजी करूं नका! च���क चालणार असतील तर दादाने त्याची तिन्ही चेकबुक कुठे आहेत ते मला सांगीतलं आहे! ऐनवेळी हाॅस्पिटलने कॅशच मागितली, तर मी ती देेईन!" "पण हाॅस्पि���लने चेक-पेमेंट स्वीकारलं ना?" "बिल देण्यासाठी पुरेशी शिल्लक तिन्ही अकाऊंटमधे होती, त्यामुळे एक चेक देऊन काम झालं! पण गंमत म्हणजे दादाची तिन्ही अकाऊंट फक्त त्याच्या एकट्याच्या नांवावर आहेत!" "खरंच कां?" शुभदानं चकीत होऊन विचारलं. "मलासुद्धां त्याची तिन्ही चेकबुक बघितली तेव्हांच हे समजलं! त्यामुळे आतां शक्य तेवढ्या लौकर तिन्ही अकाऊंटमधे सुलभावहिनींचंही नांव दाखल करण्याची कामगिरी मी पत्करली आहे! आतां तुलाही त्याचं महत्त्व पटलं ---'' "पुरे;-- प्रत्येक गोष्ट माझ्यापर्यंत चिकटवायला नको!" त्याला अर्ध्यावर थांबवीत शुभदा म्हणाली," रिटायर झाल्यावर कांही दिवसांतच तुम्ही मला आपले सगळे आर्थिक व्यवहार समजावून सांगितले तेव्हां मला त्याचं अप्रूप वाटलं नव्हतं! पण आतां सुलभाची हालत पाहून, मला ते पुरेपूर उमगलं आहे हे कबूल करण्यांत मला कुुठलाही कमीपणा वाटत नाहीं! कारण परिस्थितीनुसार माणसं आणि त्यांची मतं बदलतात!!"
१३ ऑक्टोबर २०२२
0 notes