#कामाचा
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 4 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 22 December 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ डिसेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
पंतप्रधान मोदी यांना कुवेतचा ‘ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर’ हा सर्वोच्च सन्मान प्रदान
संपूर्ण समाजात सलोखा निर्माण होण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार -  सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट
चांगलं आणि उत्तम शिक्षण देणं हे ध्येय : शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
आणि
१९ वर्षांखालील मुलींच्या आशिया चषक क्रिकेट टी-ट्वेंटी स्पर्धेचं भारताला विजेतेपद
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. कुवेतचे अमीर, हिज हायनेस शेख मशाल अल-अहमद अल-जाबेर अल-सबा यांनी आज पंतप्रधानांना कुवेतचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार “ऑर्डर ऑफ मुबारक अल-कबीर” प्रदान केला. कुवेतचे पंतप्रधान हिज हायनेस शेख अहमद अल-अब्दुल्ला अल-अहमद अल-सबा देखील उपस्थित होते. पंतप्रधानांनी हा पुरस्कार भारत आणि कुवेत यांच्यातील दीर्घकालीन मैत्रीला, कुवेतमधील भारतीय समुदायाला आणि एक अब्ज चाळीस लाख भारतीय नागरिकांना अर्��ण केला. ४३ वर्षांनंतर भारताच्या पंतप्रधानांच्या कुवेतच्या ऐतिहासिक भेटीवेळी प्रदान करण्यात आलेल्या या पुरस्काराला विशेष महत्त्व आहे. हा पुरस्कार १९७४ पासून प्रदान करण्यात येत असून तो निवडक जागतिक नेत्यांना देण्यात येतो. पंतप्रधान मोदी यांना प्राप्त झालेला हा विसावा आंतरराष्ट्रीय सन्मान असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
दरम्यान, आपल्या दोन दिवसांच्या कुवेत दौऱ्यात काल मोदी यांनी एका विशेष कार्यक्रमात कुवेतमधील भारतीय जनसमुदायाला संबोधित केलं. कुवैतच्या विकासात आणि भारत-कुवैत संबंधांच्या मजबूतीकरणात भारतीयांची मोठी भूमिका राहिली असल्याचं त्यांनी म्हटलं. भारतीय समुदायाला प्रवासी भारतीय दिवस आणि पुढील महिन्यात आयोजित होणाऱ्या महाकुंभ मेळ्यात सहभागी होण्याचं आमंत्रणही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी दिलं. पंतप्रधानांनी आपल्या या दौऱ्यात १०१ वर्षीय भारतीय परराष्ट्र सेवेतले माजी अधिकारी मंगल सैन हांडा यांची भेट घेतली. २६व्या अरेबियन गल्फ चषक फुटबॉल स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यालाही पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी त्यांनी कुवैतच्या नेत्यांसोबत अनौपचारिक चर्चा केली.
****
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज अहिल्यानगर दौऱ्यावर आहेत. त्यांच्या आगमनाप्रसंगी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. हिवरे बाजार इथं एका खासगी कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली असता, हिवरे बाजार ग्रामस्थांच्या वतीनं मानपत्र देऊन मुख्यमत्र्यांचा सन्मान करण्यात आला.
****
संपूर्ण समाजात सलोखा निर्माण होण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहणार असल्याचं, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. उद्या बीड आणि परभणी इथं आपण असून, तिथं घडलेल्या दोन्ही घटनांचा बारकाईनं अभ्यास करुन, सत्य परिस्थितीचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार असल्याचं शिरसाट यांनी सांगितलं.
दरम्यान, बहुजन विकास, नवीकरणीय ऊर्जा आणि दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांचं आज मंत्रीपद मिळाल्यानंतर प्रथमच छत्रपती संभाजीनगर शहरात आगमन झालं. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने त्यांचं जल्लोषात स्वागत करुन फेरी काढण्यात आली. शहरातल्या क्रांती चौक इथं फेरीची सांगता होऊन, सावे यांची मिठाईनं तुला करण्यात आली.
****
शिक्षण खात्यातील कामाचा सकारात्मक निकाल दिसेल, असं प्रतिपादन राज्याचे नुतन शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केलं आहे. मालेगाव बाह्यचे आमदार असलेल्या भुसे यांचं आज मालेगांव इथं आगमनानंतर भव्य स्वागत करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. राज्याचे शालेय शिक्षणमंत्रीपद अत्यंत आव्हानात्मक आहे मात्र, इथंही आपण प्रभावीपणे काम करताना दिसू, असे ते म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी शिक्षण खातं जिव्हाळ्याचं आहे. शालेय शिक्षण मंत्री तसंच अधिकारी ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित करून काम करतील, असं त्यांनी नमूद केलं. गरिबातील गरीब मुलांना चांगलं आणि उत्तम शिक्षण देणं हे ध्येय असल्याचं भुसे म्हणाले. नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आपल्या दृष्टीनं सकारात्मक निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
****
नाशिक जिल्ह्यासह अनेक भागात कांद्याचा प्रश्न चर्चेत असून कांद्यासंदर्भात निश्चीत धोरण ठरवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असं कृषी खात्याचे मंत्री विधिज्ञ माणिक कोकाटे यांनी म्हटलं आहे. मंत्रीपद स्वीकारल्यानंतर ते आज नाशिक इथं आले असता त्यांचं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. कृषी खातं अत्यंत आव्हानात्मक असून कृषी मंत्री ही फार मोठी जबाबदारी आहे. वातावरणात होणारे बदल तसंच शेतीमालाच्या भावावर होणारा परिणाम, वीज आणि अन्य प्रश्नांवर आपण काम करणार असल्याचंही मंत्री कोकाटे यावेळी म्हणाले.
****
बीड जिल्ह्यातले कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न सोडवण्याला आपण प्राधान्य देणार आहोत, असं जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले पोलिस अधिक्षक नवनीत कॉवत यांनी नमूद केलं आहे. माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना त्यांनी आज ही माहित दिली. मस्साजोग इथल्या खुनाच्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेला असून या संदर्भातला तपास तसंच उर्वरित शिल्लक कामं आपण पूर्ण करणार आहोत. लवकरच या संदर्भातले निकाल आपल्याला दिसतील. पोलिसांना सर्व तपासांमध्ये पूर्ण यश मिळावं तसंच जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधित रहावी, यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं, असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. त्यांनी काल रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास पदभार स्वीकारला. शासनानं आपल्यावर खूप मोठी जबाबदारी दिली असून जिल्ह्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हे आपल्यासमोर आव्हान असल्याचं ते म्हणाले. बीड जिल्ह्यातल्या अडचणींसंदर्भात नागरिक आपल्याला केंव्हाही भेटू शकतात, असंही पोलिस अधिक्षक कॉवत यावेळी म्हणाले.
****
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून रविचंद्रन अश्विन यानं निवृत्ती जाहीर केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला भावनिक पत्र लिहून त्याच्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. क्रिकेट आणि देशासाठी अश्विननं दिलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल पंतप्रधानांनी त्याचे आभार मानले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घेतलेले ७६५ बळी आणि कसोटीत सर्वाधिक मालिकावीर पुरस्कार या अश्विनच्या विक्रमाचा विशेष उल्लेख करताना मोदी यांनी त्याच्या गोलंदाजीतली विविधता आणि प्रतिस्��र्ध्यांवर वर्चस्व गाजवण्याच्या क्षमतेची प्रशंसा केली आहे. ��ंतप्रधान मोदी यांनी आपल्या या पत्रात अश्विनच्या १४ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतल्या महत्त्वाच्या क्षणांचा उल्लेख केला असून त्याची ही कारकिर्द भविष्यातल्या पिढ्यांना प्रेरणा देईल अशी आशा व्यक्त केली आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यातल्या खानिवली ग्रामपंचायतीनं आपलं गाव प्लास्टिक मुक्त व्हावं, गावातलं पर्यावरण अबाधित रहावं त्यासोबतच गावातल्या महिलांना रोजगाराच एक नवीन साधन उपलब्ध व्हावं या उद्देशानं आदर्श उपक्रम राबवला आहे. या गावात प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापनासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. यामुळे गाव प्लास्टिक मुक्त तर होतंच आहे त्यासोबतच गावातल्या महिलांना रोजगाराची एक नवी संधी देखील उपलब्ध झाली आहे.
खानिवली ग्रामपंचायतीनं मुंबईच्या रोटरी क्लबच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून गावात उभारलेल्या यंत्रणेतून प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे परिसर प्रदूषण मुक्त होत आहे तसंच महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे.
****
राज्यात सरत्या वर्षाच्या शेवटापर्यंतच्या आठ दिवसांच्या कालावधीत बहुतांश भागात वातावरण काही अंशी ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी तुरळक पावसाचीही अंशत: शक्यता आहे. मात्र, देशाच्या उत्तरेकडील बहुतांश पर्वतीय भागात थंडीची तीव्र लाट येण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
भारतानं १९ वर्षांखालील मुलींच्या आशिया चषक क्रिकेट टी-ट्वेंटी स्पर्धेत बांग्लादेशला पराभूत करत अजिंक्यपद पटकवलं आहे. मलेशियाच्या क्वालालंपूर इथं आज सकाळी झालेल्या अंतिम सामन्यात, बांग्लादेश संघानं नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी केली. भारतानं वीस षटकांत सात बाद ११७ धावा केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेशचा डाव एकोणीसाव्या षटकाचे तीन चेंडू शिल्लक असतांना ७६ धावांवर आटोपला. सामनावीरचा पुरस्कार भारताची सलामीवीर फलंदाज गोंगादी तृषा हिला देण्यात आला. अशिया खंडातील आघाडीच्या सहा संघांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत भारतानं आपले सर्व सामने जिंकण्याची किमया साधली.
****
स्वच्छ नवी मुंबई अर्ध मॅरेथॉन स्पर्धेत आज सहा हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेत स्वच्छतेचा संदेश दिला. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे तसंच राज्य पोलीस दलाच्या फोर्स वनचे प्रमुख कृष्णप्रकाश यांनीही या स्पर्धेत सहभाग घेऊन नागरिकांना प्रोत्साहन दिलं. दिडशेहून अधिक तृतीयपंथी नागरिक, पन्नासहून अधिक दिव्यांग, तसंच अंध व्यक्ती यांनीही विविध ग��ांत सहभाग नोंदवला. शाळकरी विद्यार्थी, युवक यात मोठ्या संख्येनं सहभागी झाले. अक्षय पडवळ, ओंकार बी. यांनी पुरुष गटातली तर सुजाता माने, कोमल खांडेकर यांनी महिला गटांतली विजेतेपदे पटकावली.
****
भारतीय महिला क्रिकेट संघानं वेस्टइंडीजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ३१५ धावांचं मोठं आव्हान ठेवलं आहे.
****
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : ३४
एखाद्या प्रखर दिव्याच्या झोताने डोळे दिपून जावेत तसे केदार व एकनाथ अनंतच्या त्या प्रश्नाने थिजल्यागत स्तब्ध झाले! पण लौकरच त्यांतून स्वत:ला सावरीत, भानावर येऊन केदार म्हणाला, "हे असं कांही करतां येईल असं आमच्या मनांत कधी आलंच नाहीं, काका!" एव्हांना एकनाथलाही वस्तुस्थितीची जाणीव झाली होती. केदारला दुजोरा देत तो म्हणाला, "खरंच काका, असा कांही पर्याय आम्हांला सुचलाच नाही!" "अरे, रोजच्या रामरगाड्यांत असं घडणं अगदी स्वाभाविक आहे!", अनंत त्यांची अस्वस्थता दूर करण्यासाठी समजावीत म्हणाला, "तुमचा दिवसभराचा सगळा वेळ एवढा कामांत जातो की वेगळा विचार करण्यासाठी हवी ती स्वस्थता तुम्हांला मिळतच नाही! बरं मालकीचा स्टाॅल असल्याने हक्काच्या साप्ताहिक सुट्टीलाही वाव नाही!" "एवढंच नाहींये, अनंतराव!" सबनीस कौतुकाने म्हणाले, "गेल्या कांही महिन्यांत एकत्र काम करण्याची या दोघांना एवढी संवय झाली आहे, की आपण स्वतंत्रपणे, एकेकट्याने काम करूं शकतो हे ते पार विसरून गेले आहेत!" "नाही दिनकरराव;-स्टाॅलच्या कामाचा भार एवढा जास्त आहे की दोघांपैकी कुणालाही एकट्याने स्टाॅल पूर्ण वेळ सांभाळणे शक्य होणार नाही!" अनंत हंसून म्हणाला,"पण एखादा मदतनीस जोडीला घेऊन कामाची विभागणी केली तर दोघेही आळीपाळीने थोडी विश्रांती घेऊन, स्टाॅल सुरु ठेवण्याची वेळ पाहिजे तेवढी वाढवूं शकतील!"
त्या दोघांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत असलेल्या केदार-एकनाथनी संमतीदर्शक मान हलवली! तथापि कांही क्षणांनी किंचित घुटमळत केदारने विचारलं, "काका, तुम्ही म्हणतां तसा मदतनीस घरांतूनच मिळाला तर?--" "तर मग सोन्याहून पिवळं! एक तर घरचं माणूस विश्वासाचं असेल आणि मदतनीसाला द्यावा लागणारा मोबदला तुमच्या घरांतच राहील! पण घरांतून मदत करण्यासारखं कुणी आहे कां?" "मी आणि एकनाथने मिळून चहा-नाश्ता ��्टाॅल सुरु केल्यावर सुरवातीला माझी आईच म्हणाली होती की 'मी घरांत नुसती बसून असते, त्याऐवजी तुम्हां पोरांना निदान निदान भांडी-कुंडी धुवायला मदत करीन मी! एरवी एका बाजुला बसून सर्वांवर नुुसतं लक्ष ठेवीन!' केदार सांगू लागला, "पण चहा-नाश्त्याच्या स्टाॅलवर बायका कुठेच आढळत नाहीत म्हणून मीच मना केलं!" "तुझ्या आईचं खरंच कौतुक केलं पाहिजे, केदार! तुम्हां पोरांचे कष्ट व्हावेत यासाठी तिची केवढी धडपड होती!" अनंत मनापासून म्हणाला, "केदार, चहा-नाश्त्याच्या स्टाॅलवर काम करणाऱ्या बायका सहसा दिसत नाहींत हे तुझं निरीक्षण खरं असलं तरी समजा उद्यां तुझी आई खरोखरच तुमच्या स्टाॅलवर बसूं लागली तर ते 'केदारनाथ स्टाॅल'चं वैशिष्ट्य नाहीं कां ठरणार?" " म्हणजे?" अनंतचा पवित्रा बघून गोंधळलेल्या केदारने साशंक मनाने विचारलं "तुमच���या मतें आईने आमच्या स्टाॅलवर काम करावं?" "मी विचारतो, कां नाहीं?" अनंत ठाम स्वरांत म्हणाला "केदार, आज नोकरी वा व्यवसायात स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने वावरतात!मग पुरुषांप्रमाणे कामावर जातां-येतांना त्यांनाही निवांतपणे एखाद्या जागी बसून चहाचे चार घोट घ्यावे वा चटकन कांही खावं असं वाटत नसेल कां? पण तरीही गल्लोगल्ली असलेल्या चहा-नाश्ता स्टाॅल्सवर स्त्रिया अभावानेच कां आढळतात?"
यावर कांही उत्तर न सुचल्यामुळे केदार आणि एकनाथ गप्पच राहिले! कांही क्षणांनी अनंत पुन्हा बोलूं लागला, " कुठल्याही बऱ्यापैकी हाॅटेलमधे स्त्रियांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी असेल, पण त्या असतात! -- आणि केवळ पुरुषांसोबत नव्हे तर स्वतंत्रपणे एकट्या वा कधी ग्रुपमधेही आढळतात! पण मग चहा-नाश्ता स्टाॅल्सवर हवं ते सगळं माफक दरांत आणि झटपट उपलब्ध असूनही स्त्रिया फारशा कांं आढळत नाहींत?" अनंतचा रोख लक्षांत येऊन सबनीस उत्तरले, " अनंतरावांच्या प्रश्नाचं उत्तर सोपं आहे, केदार आणि एकनाथ! चहा आणि नाश्त्याच्या स्टाॅल्सवर सर्वत्र केवळ पुरुषांचीच सतत वर्दळ असतांना तरुण मुली वा स्त्रियांना तिथे यावंसं कसं वाटेल? बरं, त्यांच्यासाठी ना कुठेही स्वतंत्र व्यवस्था वा आडोसा असतो! अशा परिस्थिती केदार, तुमच्या स्टाॅलवर तुझ्या आईसारखी मध्यमवयीन बाई येऊन नुसती बसूं लागली तरी तेथील एकुण वातावरणांत किती फरक पडेल याचा विचार करा!" " सबनीसकाकांनी माझ्या बोलण्याचा आशय किती अचूक ओळखला आहे बघा!" अनंत सस्मित म्हणाला, "जोडीला आहे त्याच जागेत एका बाजूला छोटं बांकडं वा दोन खुर्च्या टाकून ��्यांवर 'फक्त स्त्रियांसाठी राखीव' असे स्टिकर्स लावलेत तर काय घडूं शकेल याचीही कल्पना करा!" अनंत आणि सबनीसांच्या एकुण बोलण्याने केदार आणि एकनाथ थक्क झाले होते! केदार अक्षरश: हात जोडून म्हणाला, " स्त्री ग्राहकांना स्टाॅलकडे खेचून घेण्याची कल्पना खरंंच गंभीरपणे विचार करण्यासारखी आहे!" " मलासुद्धा ती खुप आवडली आहे!" एकनाथ उत्साहाने म्हणाला, "मीही याबाबत घरुन काही कुमक मिळेल का बघतो!" मनगटावरील घड्याळाकडे लक्ष गेल्यावर पटकन् उठत अनंत म्हणाला, " दिनकरराव, अहो किती वाजले बघितलंत कां? केदार आणि एकनाथ, तुम्हांला दोघांनाही तुमच्या घरून हवी तेवढी कुमक नक्की मिळेल;-- पण अधिक उशीर केला तर आम्हां दोघांना घरी काय भोगावं लागेल याचाही विचार करा!"
२३ मार्च २०२३
0 notes
bandya-mama · 18 days ago
Text
Bandya : काका लग्न करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन पाहिजे.
लग्न करू का नको?
काका : लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे.
जीवनात नुसता आनंद काय कामाचा.
😇😇😇😅😅😅🤣🤣🤣😃😃😃
0 notes
pradip-madgaonkar · 18 days ago
Text
Pradip : काका लग्न करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन पाहिजे.
लग्न करू का नको?
काका : लग्न सगळ्यांनी केलं पाहिजे.
जीवनात नुसता आनंद काय कामाचा.
😇😇😇😅😅😅🤣🤣🤣😃😃😃
0 notes
digiyogi · 1 month ago
Text
Hand Core Cutter✨कामाचा दर्जा वाढवा! जबरदस्त हँड कोअर कटरसह तुमचं काम सोपं करा. ...... 1️⃣ सुशितो मॉल: आपल्या सर्व टूल्सचे एकच ठिकाण! 🛠️🔧🔨 हँड टूल्स 🔨, पॉवर टूल्स ⚡, सेफ्टी टूल्स 🦺 आणि कृषी उपकरणे 🚜 आम्ही सर्व काही एकाच छताखाली आणले आहे. चेन सॉ ⛓️, ड्रिल मशीन,Core cutter, चेन पुली 🏗️, गार्डनिंग टूल्स 🌱, मंकी क्रेन 🐒🏗️ आणि बरेच काही! कमी बजेटमध्ये उत्तम गुणवत्तेची साधने शोधत आहात? 💰✨ चिंता ��रू नका, सुशितो मॉलमध्ये या आणि आपल्या गरजा पूर्ण करा. 😊👍
सुशितो मॉल 😊👍 📱9423258000 📱8484963040
#handcorecutter#corecutter#SushitoMall#ToolsForAll#QualityTools#AffordableTools#powertools#handtools#Maharashtra
Tumblr media
instagram
0 notes
yntstore · 1 month ago
Text
Best Custom T-Shirt Service for Personal and Business
Tumblr media
आजकालच्या व्यावसायिक जगात, प्रत्येक व्यवसायाला त्यांची ओळख आणि ब्रँड मूल्य वाढवण्याची आवश्यकता असते.त्या व्यवसायासाठी सानुकूल टी-शर्ट्स ( customise T-shirts ) हे एक उत्तम साधन ठरू शकतात. ठाणे आणि मुंबईतील विविध व्यवसायांसाठी कस्टम टी-शर्ट्स कसे उपयुक्त ठरू शकतात, हे  आपण या लेखात पाहूया.
1. व्यवसायांसाठी सानुकूल टी-शर्ट्सची गरज : 
संस्थेची ओळख:
टी-शर्ट्स तुमच्या व्यवसायाचा प्रचार करण्याचे एक प्रभावी साधन ठरतात. तुमच्या ब्रँडचा लोगो, अथवा संदेश असलेले टी-शर्ट्स सहजपणे डोळ्यात भरतात किंवा एखाद्याचे लक्ष वेधून घेतात . त्यामुळे ग्राहकांच्या मनात तुमची तुमच्या कंपनीची वेगळी ओळख निर्माण होऊ शकते.
ब्रँडिंग:
टी-शर्ट्सद्वारे तुम्ही तुमच्या टीमची एकसंधता दर्शवू शकता. एकाच डिझाइनमध्ये टीम सदस्य एकत्र दिसल्याने, ते एक सकारात्मक आणि व्यावसायिक संदेश प्रसारित करतात. हे एक प्रकारे तुमच्या ब्रँडची विश्वासार्हता आणि व्यावसायिक मूल्य (Brand value) देखील वाढवते.
बजेट-फ्रेंडली मार्केटिंग:
कस्टम टी-शर्ट्स हे बजेट-फ्रेंडली मार्केटिंग साधन आहेत. पारंपारिक विज्ञापन आणि प्रमोशनच्या तुलनेत, एकदाच टी-शर्ट बनवून तुम्ही दीर्घकाळचा प्रचार करू शकता. टी-शर्ट्स एक सोपे , किफायतशीर, आणि दीर्घकालीन प्रचाराचे साधन आहेत.
2. आमच्या टी-शर्ट्सचे प्रकार आणि वैशिष्ट्ये
कॉटन टी-शर्ट्स: 
Tumblr media
210 GSM आणि 260 GSM पोलो टी-शर्ट्स उच्च दर्जाचे आणि टिकाऊ. तुमच्या व्यवसायासाठी सुसंगत, आरामदायक आणि प्रीमियम टी-शर्ट्स.
ड्रायफिट टी-शर्ट्स: 
हलके आणि घाम शोषून घेणारे.
Tumblr media
राऊंड नेक टी-शर्ट्स:
Tumblr media
3. रंगांमधील निवड
ब्रँडच्या रंगाला प्राधान्य: 
तुमच्या ब्रँडच्या रंगाशी जुळणारे टी-शर्ट्स निवडणे अत्यंत महत्त्वाचे आहे. रंग तुमच्या ब्रँडच्या थीमला प्रकट करतात आणि तुम्हाला ग्राहकांच्या मनावर चांगली छाप सोडण्यास मदत करतात.
रंग उपलब्धता:
टी-शर्ट्स विविध रंगांमध्ये उपलब्ध आहेत: लाल, निळा, पांढरा, काळा आणि इतर विविध शेड्स. तुम्ही तुमच्या ब्रँडच्या अनुरूप योग्य रंग निवडू शकता. या मध्ये २० पेक्षा जास्त रंगसंगती उपलब्ध आहेत. 
Tumblr media
4. प्रिंटिंग व एम्ब्रॉयडरी सेवा
प्रिंटिंगचे प्रकार:
स्क्रीन प्रिंटिंग:
मोठ्या ऑर्डरसाठी उत्तम, स्वस्त आणि टिकाऊ. मोठ्या प्रमाणात ब्रँडेड टी-शर्ट्स तयार करणे शक्य आहे.
2. डिटीफ प्रिंटिंग : 
विविध रंगसंगती तसेच मोठया व छोट्या कमी संख्येच्या ऑर्डरसाठी उपयुक्त आहे . स्वस्त आणि टिकाऊ असल्याने ह्या पद्धतीचा वापर सर्वत्र मोठ्या प्रमाणात केला जातो. 
Tumblr media
3. व्हिनाइल प्रिंटिंग:
Tumblr media
4. एम्ब्रॉयडरी:
कॉर्पोरेट टी-शर्ट्ससाठी आकर्षक आणि टिकाऊ लोगो डिझाइन. या तंत्रा मध्ये ( Technology ) एम्ब्रॉयडरी  (भरतकाम किंवा धाग्यांची डिझाईन) वापर केल्याने लोगो (Subject) खुप मोठ्या कालावधी पर्यंत टिकुन राहतो .
Tumblr media
5. ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणि फायदे
मोठ्या ऑर्डरवर सवलत:
मोठ्या ऑर्डर्ससाठी खास ऑफर्स आणि सवलती. व्यवसायांच्या मोठ्या प्रमाणावर ऑर्डर घेण्यास आम्ही उत्सुक आह��त.
वेळेवर डिलिव्हरी:
ठाणे आणि मुंबईतील व्यवसायांसाठी जलद आणि विश्वासार्ह डिलिव्हरी सेवा. आम्ही वेळेवर तुमची ऑर्डर डिलिव्हर करू.
6. टी-शर्ट्स कसे वापरता येतील?
कर्मचाऱ्यांसाठी युनिफॉर्म:
टी-शर्ट्स आपल्या कर्मचार्‍यांसाठी एक आदर्श युनिफॉर्म ठरू शकतात. यामुळे व्यावसायिक ओळख निर्माण होईल.
इव्हेंट आणि प्रमोशन्स:
प्रदर्शन, रोड शो, किंवा फेस्टिव्हल्ससाठी कस्टम टी-शर्ट्स उत्तम पर्याय आहेत. हे तुमच्या ब्रँडला लोकांच्या नजरेत आणण्यास मदत करतात.
कस्टम गिफ्ट्स:
कर्मचारी किंवा ग्राहकांसाठी ब्रँडेड गिफ्ट्स म्हणून तुम्ही कस्टम टी-शर्ट्स देऊ शकता. यामुळे तुमचा व्यवसाय त्यांना लक्षात राहील आणि व्यवसाय वृद्धी मध्ये मदत होईल.
7. आमची विश्वासार्हता आणि अनुभव
कामाचा दांडगा अनुभव : 
आम्हाला कस्टम टी-शर्ट्सच्या क्षेत्रात चार वर्षांचा अनुभव आहे. हे आम्ही अनेक व्यवसायांना उत्कृष्ट सेवा देऊन सिद्ध केले आहे.
समाधानी ग्राहक:
आमच्याकडे अनेक समाधानी ग्राहक आहेत आणि ते पुन्हा आमच्याकडे येत  (Repeat orders) आहेत. आम्ही त्यांना उच्च दर्जाचे फॅब्रिक्स आणि तंत्रज्ञान प्रदान केले आहे.
8. थेट संपर्क करा
ठिकाण:
तुम्ही आमच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी ठाणे आणि मुंबईतील कोणत्याही ठिकाणाहून आपण आम्हाला संपर्क करू शकता. 
गुगल मॅप पुढील प्रमाणे: https://maps.app.goo.gl/BrM1k6SLkX87GTsV9
ऑनलाइन सेवा:
तुम्ही आमच्या वेबसाइटवरून किंवा फोनद्वारे ऑर्डर देण्यासाठी पुढील नावावर क्लिक करु शकता YNT STORE
फोन नंबर: 7738180909
इमेल आयडी: [email protected]
कस्टम टी-शर्ट्स वापरून तुमच्या व्यवसायाची ओळख निर्माण करा आणि तुमच्या ब्रँडला एक नवा आयाम द्या. आजच आमच्याशी स��पर्क साधा! YNT STORE 
0 notes
dakshadev · 3 months ago
Text
Tumblr media Tumblr media Tumblr media
४कोटी २७ लक्ष्याच्या विकास कामाचा भूमिपूजन शुभारंभ आज टाकळीभान मध्ये झाला यावेळी गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
जनतेच्या सेवेसाठी आणि विकासाच्या वचनपूर्तीसाठी आमदार साहेब सदैव तत्पर.
0 notes
imranjalna · 7 months ago
Text
सदृढ आरोग्य पुन्हा मिळवायचे असेल तर योग हा एकमेव मार्ग - डॉ.काळवणे
जालन्यातील चार ठिकाणी निःशुल्क योग केंद्र सुरू  मधुमेह रोग निवारण योग शिबिरही घेणार Yoga is the only way to regain good health – Dr. Kalwane जालना(प्रतिनीधी)कामाचा प्रचंड व्याप आणि गतिमान जीवन शैलीमुळे माणूस आपले माणूस आपले सदृढ आरोग्य हरवत चालला आहे.त्याला परत मिळवण्याचा मार्ग हा फक्त योग असल्याचे प्रतिपादन भारतीय योग संस्थानचे महाराष्ट्र उपप्रांतप्रधान डॉ.उत्तम काळवणे यांनी येथे बोलतांना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 7 months ago
Text
0 notes
shrikrishna-jug · 8 months ago
Text
मानवी शरीर ही एक कलाकृती आहे.
काल मला अनपेक्षित, कामाचा बोजा खांद्यावरून खाली उतरा��ा लागला होता.त्यात मेहनत होती, कल्पकता होती आणि जबाबदारी ही होती.थकून भागून घरी आल्यावरप्रथम जर कां काय मनात आलं असेल तर ते थंड-गरम पाण्याची आंघोळ करण्यासाठी शॉवर घेणं.घामाने भिजलेले कपडे पटकन उतरून मी आंघोळीच्या खोलीत धावत गेलो.तुमच्यापैकी किमान एकाने हे वाचवं असं माझ्या मनात येऊन, शॉवर घेत असताना जे विचार माझ्या मनात आले ते मी माझ्या वहित…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date – 06 November 2024 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०६ नोव्हेंबर २०२४ सकाळ��� ७.१० मि.
• विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सर्वत्र प्रचाराला सुरुवात • शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची दहा वचनांची घोषणा, तर वंचित बहुजन आघाडीचा 'जोशाबा समतापत्र' जाहीरनामा प्रकाशित • राज्याच्या पोलीस महासंचालकपदी संजय वर्मा यांची नियुक्ती • संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला २५ नोव्हेंबर पासून सुरूवात • राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात, एकूण एक लाख १८६ मतदान केंद्रांची उभारणी आणि • केंद्रीय निवडणूक आयोगाचे वरिष्ठ अधिकारी आज छत्रपती संभाजीनगर इथं निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेणार
राज्य विधानसभा निवडणुकीत उमेदवारांचं चित्र स्पष्ट झाल्यानं आता प्रचार सुरु झाला आहे. विविध राजकीय नेत्यांच्या प्रचारसभांना कालपासून सुरुवात झाली. प्रचाराला केवळ १४ दिवसांचा कालावधी असल्यानं प्रभावी प्रचारावर उमेदवारांचा भर दिसून येत आहे. शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत काल कोल्हापूर इथं महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी शिंदे यांनी दहा वचनांची घोषणा केली. यामध्ये लाडक्या बहिणींना २१०० रुपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिलात ३० टक्के कपात आणि १०० दिवसांत व्हिजन महाराष्ट्र २०२९ सादर करणार, आदी वचनांचा समावेश आहे. भारतीय रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले, यावेळी उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल कोल्हापूर इथून प्रचाराला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी रत्नागिरी इथं देखील सभा घेतली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बारामतीत शिर्सुफळ गावात पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांच्या समर्थनार्थ प्रचार सभा घेतली. राज्यसभेचा आपला दीड वर्षांचा कार्यकाळ बाकी असून, यानंतर पुन्हा राज्यसभेवर जायचं की नाही, याचा विचार करावा लागेल, असं सांगून त्यांनी, सक्रीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. राजकारण फक्त निवडणूक आणि सत्तेसाठी नाही, तर लोकांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी करायचं असतं, असं सांगून या भागात विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या कामाचा लेखाजोखा त्यांनी मांडला.
औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातले महाविकास आघाडीचे उमेदवार राजू शिंदे यांनी सात��रा इथल्या खंडोबारायाचं दर्शन घेऊन प्रचाराचा प्रारंभ केला, तर शहरात एमआयएम पक्षाचे आमदार अकबरूद्दीन ओवेसी यांनी जाहिर सभा घेऊन पक्ष प्रचाराला सुरूवात केली. औरंगाबाद मध्यचे महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी मित्र पक्षासह पद यात्रेद्वारे नागरिकांशी संवाद साधला.
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी काल पुण्यामध्ये, जोतिबा, शाहू, बाबासाहेब यांच्या विचारांनी प्रेरित, 'जोशाबा समतापत्र' हा पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित केला. जोशाबा समतापत्र हे आरक्षण बचाव यात्रा, बौद्ध समाज संवाद दौरा आणि आदिवासी सत्ता संपादन परिषदेत मिळालेल्या जनहितोपदेशातून आणि सूचनांवरून तयार करण्यात आलं आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार आहे. लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांच्या हस्ते मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलात त्याचं प्रकाशन होईल. त्यानंतर महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र स्वाभिमान सभेलाही ते संबोधित करतील. या सभेला ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतले प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तत्पूर्वी राहुल गांधी आज दुपारी नागपुरात ‘संविधान सन्मान संमेलनाला’ उपस्थित राहणार आहेत.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात येत्या आठ ते १४ नोव्हेंबर दरम्यान ११ सभा घेणार आहेत. आठ नोव्हेंबरला धुळे आणि नाशिक, नऊ तारखेला अकोला आणि नांदेड, १२ तारखेला चंद्रपूर, चिमूर, सोलापूर आणि पुणे आणि १४ नोव्हेंबरला छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई आणि मुंबईत पंतप्रधानांच्या सभा होणार आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज लातूर जिल्ह्यात रेणापूर इथं लातूर ग्रामीण विधानसभेतले मनसेचे उमेदवार संतोष नागरगोजे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे.
महायुतीतमध्ये जे - जे मतदारसंघ सोडण्याचं निर्धारित झालं होतं, त्याठिकाणी एकत्रित काम कसं करता येईल यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. बंडखोर उमेदवारांची एक-दोन दिवसात समजूत घालून त्या - त्या मतदारसंघातलं वातावरण योग्य पद्धतीने पूरक होईल असा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. २८८ जागांवर महायुती पूर्ण ताकदीने एकत्रित निवडणूक लढत असल्याचं तटकरे यांनी स्पष्ट केलं.
राज्याच्या पोलीस महासंचालक पदावर काल संजय वर्मा यांची नियुक्ती झाली. ते १९९० च्या तुकडीचे भारतीय पोलीस सेवे��े अधिकारी आहेत. सध्या ते कायदा आणि तंत्रज्ञान विषयक पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. एप्रिल २०२८ मध्ये ते निवृत्त होणार आहेत.
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला २५ नोव्हेंबर पासून सुरूवात होणार आहे. हे अधिवेशन २० डिसेंबरपर्यंत चालेल. या काळात २६ नोव्हेंबरला संविधान स्वीकृतीचा पंच्याहत्तरावा वर्धापन दिन संविधान सभेच्या मध्यवर्ती कार्यालयात साजरा केला जाईल अशी माहिती, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सामाजिक माध्यमांवर दिली.
राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी काल मुंबईत निवडणुकीच्या तयारीविषयी माहिती दिली. याबाबतचा हा वृत्तांत: ‘‘राज्यात मतदारांच्या संख्येच्या प्रमाणात मतदान केंद्राच्या संख्येत वाढ केली असून, एकूण एक लाख १८६ मतदान केंद्र असल्याचं चोक्कलिंगम यांनी सांगितलं. यामध्ये शहरी मतदान केंद्र ४२ हजार ६०४, तर ग्रामीण मतदान केंद्र ५७ हजार ५८२ इतकी आहेत. शहरी भागातल्या मतदारांची अनास्था विचारात घेऊन शहरी भागातल्या मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं, यासाठी राज्यामध्ये पुणे, मुंबई, ठाणे, आदी शहरांमध्ये अतिउंच इमारती, सहकारी गृहनिर्माण संस्थांची संकुलं यामध्ये एकूण एक हजार १८१ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत एकंदर ४६ हजार ६३० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहितीही चोक्कलिंगम यांनी दिली. या कालावधीत राज्यात २५२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. २८८ पैकी १८५ मतदारसंघांमध्ये एक, १०० मतदारसंघांमध्ये दोन, तर ३ मतदारसंघांमध्ये तीन बॅलेट युनिट्स लावण्यात येणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मतदानाच्या सुरुवातीला आणि मतदान संपल्यानंतर मतदान यंत्रांमध्ये किती चार्ज आहे, याची नोंद ठेवण्याच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निर्णय घेऊ, असंही चोक्कलिंगम यांनी सांगितलं. येत्या २० तारखेला मतदान करण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं.’’
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज यवतमाळ जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे पाच वरिष्ठ अधिकारी आज छत्रपती संभाजीनगर इथं जिल्ह्याच्या निवडणूक प्रक्रियेचा आढावा घेणार आहेत. छत्रपती संभाजीनगरसह नागपूर, अमरावती विभागाचाही आढावा यावेळी घेतला जाईल. उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके यांनी ही माहिती दिली.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आतापर्यंत विविध कारवायांमध्ये एक कोटी ८५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आचारसंहिता ��क्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी मतदानासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा तसंच नियोजनाचा आढावा घेतला. जिल्ह्यात १८३ उमेदवारांसाठी एकूण ७ हजार ४३० मतदान यंत्रांची आवश्यकता असल्याचं मीना यांनी सांगितलं.
मतदान जनजागृती करण्यासाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालय आ��ि उपविभागीय कार्यालयाच्यावतीनं, निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वाहनांवर, मी मतदान करणार, असे स्टिकर्स लावण्यात आले आहेत. तसंच कलापथकांच्या वाहनांवर आवाजाचे भोंगे लावून मतदान करण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
धाराशिव-तुळजापूर रेल्वेमार्गाचं सात किलोमीटरचं पायाभूत काम पूर्ण झालं आहे. कामाचा वेग असाच कायम राहिल्यास, आपण ठरवलेल्या उद्दिष्टानुसार पुढील २४ महिन्यांच्या आत कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्रापर्यंत रेल्वेमार्गाचं काम नक्की पूर्ण होईल, असा विश्वास, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला.
जालना जिल्ह्यात २०२३-२४ या वर्षाच्या खरीप हंगामाची पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यातल्या ९७१ गावांपैकी ४६२ गावांमध्ये ५० पैशापेक्षा कमी, ५०९ गावांमध्ये ५० पैशांपेक्षा जास्त पैसेवारी जाहीर करण्यात आली आहे. परतूर तालुक्यातलं राणीवाहेगाव हे गाव पूर्णत: निम्न दुधना प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये गेल्यामुळे त्या गावाची पैसेवारी जाहीर करण्यात आलेली नाही, असे जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.
0 notes
ashokjagharkar · 2 years ago
Text
ll वानप्रस्थ ll : २७
" नाहीं हं, शुभदा! तूं आतां जेवढा आव आणते आहेस, तेवढ्या सहजपणे काही तूं सुरवातीला हे सगळं स्वीकारलं नव्हतंस!" शुभदाच्या लटक्या आविर्भावाचा निषेध करीत, अनंत सबनीसांकडे वळून म्हणाला, "अहो, तिची तक्रार होती की 'इतकी वर्षं पहांटे ५ ३० वाजतां उठून स्वत: चहा करण्याची तुमची हौस अजून भागली नाहीं कां?' एवढंच नाहीं;-- तर तिने मला सरळ धमकीही दिली होती की 'नसेल भागली तर तुम्ही खुशाल चहा करून पीत जा! पण मी कांही आतां रोज इतक्या लौकर उठणार नाही! माझा चहा करून ठेवलात, तर मी उठल्यावर गरम करून घेईन;-- नाहीं केलात तर मी माझ्यापुरता करून घेईन'!" "तुम्हीच सांगा रजनीवहिनी, नवरा रिटायर झाल्यावर इतक्या वर्षांचा कामाचा ससेमिरा जरा कमी होऊन थोडा आराम मिळेल असं बायकोला वाटणं चूक आहे कां? त्यामुळे मी तसं म्हटलं आणि यांनी ते निमूटपणे मान्य केलं! उगीच वितंडवाद न घालतां यांनी आपला रोजचा दिनक्रम चालूं ठेवला! माझ्यासाठी कोरा चहा काढून ठेवून, चहा प्यायल्यावर पूर्वीप्रमाणे फिरायलाही जाऊं लागले! पण १५-२० दिवस गेल्यावर असं एकटीने चहा प्यायचा मलाच कंटाळा येऊं लागला! पूर्वी रोज सकाळी ना, चहा पितांना आमचा दिवसभराचा आराखडा ठरायचा! अगदी नाश्त्याला काय करायचं वा भाजी काय करायची इथपासून ते कांही वेगळा विचार सुचला तर त्याविषयी एकमेकांना सांगण्यापर्यंत! हा रोज सकाळी होणारा संवाद थांबल्याने कांहीतरी हरवल्याची हुरहूर मला लागली आणि एक दिवस मी चक्क शरणागती पत्करली! गुपचूप यांच्या मागोमाग उठून मुखमार्जन केलं आणि कीचनमधे जाऊन सरळ सांगून टाकलं की 'आजपासून तुमच��याबरोबर मीही चहा घेईन!' "
"व्वा, अनंतराव! तुम्ही संयम राखून, कुठलाही वाद न घालतां मोठीच बाजी मारली की!" सबनीस कौतुकाने उद्गारले. "बाजी वगैरे कांही नाही हो! मी हे सगळं माझ्या आई-वडीलांकडून शिकलो! त्या दोघांना मी कधीही वाद घालतांना पाहिलं नाही! माझे वडील शीघ्रकोपी, तर आई अतिशय चोखंदळ! अशी दोन माणसं एकत्र आल्यावर त्यांच्यात मतभिन्नता असणारच;-- पण आई नेहमी म्हणायची की 'ही चाळीची वस्ती! इथे भिंतींनाही कान आहेत! आपण भांडून वा वाद घालून लोकांना कशाला तमाशा ��ाखवायचा?' त्यापेक्षा स्वत:ला योग्य वाटतं ते दोघंही निमुटपणे करीत रहायची! अशा प्रकारे वागल्यास थोडा वेळ जास्त लागतो, पण ज्याचं चुकतं, ते त्याला आपोआप कळून येतंच! आणि उगीच शब्दाला शब्द वाढून मनं दुखावली न गेल्याने आपली चूक कबुल करण्याचा समजुतदारपणाही अंगी येतो!" "माझ्या स्वत:च्या अनुभवावरून सांगतो, की अनेकदां आपली चूक कळून आल्यावरही ती कबूल करणं खुप कठीण होतं!" सबनीस मोकळेपणाने म्हणाले, "टोकाचे वाद घालतांना अकारण इतकी कटुता निर्माण झालेली असते, की आपण चुक कबूल केल्यावर, बायको मोठ्या मनाने माफ करील आणि पुन: पूर्ववत् हंसत-खेळत बोलूं लागेल याची मला खात्री नसते!" " पूर्वी मुलं लहान होती तेव्हा कसं, निदान त्यांच्या आडून वा त्यांच्या मार्फत माफी मागण्याची सोय होती!" रजनीवहिनी चिडवीत म्हणाल्या, "पण आतां मुलं मोठी होऊन दूर गेल्याने तीही संधी मिळत नाहीं!"
" वहिनी, तुम्ही अशा प्रकारे बोलताय् की नेहमी जणूं दिनकररावांवरच ही पाळी येते!" अनंतने मिस्कीलपणे संधी साधली. " नाही, नाही;-- अगदी तसंच नाहीं!", रजनीवहिनींनी घाईघाईने खुलासा केला, " पण एवढं मात्र खरं की मी निष्कारण वितंडवाद घालीत नाही! आपलं चुकतंय् असं जाणवलं की लगेच माघार घेते!" "खरं सांगते आहे, रजनी!", सबनीस म्हणाले," ती चटकन् यशस्वी माघार घेत असल्याने माझ्यासारखी कोंडी होण्याची पाळी तिच्यावर सहसा येत नाहीं! पण अनंतराव आणि शुभदावहिनी, सहज गप्पांच्या ओघांत तुमच्याकडून, वादविवाद टाळून मतभेद दूर करायचा सोप्पा मार्ग समजला त्याबद्दल तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच!!" पत्नीला निघण्याची खुण करीत ते पुढे म्हणाले, "घरीं आम्ही दोघेच असल्याने नवीन फ्लॅट नि��डतांना, जसा शेजार मिळावा अशी अपेक्षा होती, ती पूर्ण झाल्याची खात्रीही तुमच्याबरोबर आज पहिल्या फटक्यातच रंगलेल्या मनमोकळ्या गप्पांमुळे झाली आहे! तुम्हांला पत्ते खेळायची आवड असेल तर पुढची बैठक, तुम्हांला वेळ असेल तेव्हां आमच्या घरी पत्ते खेळत रंगवूंया असं सुचवीत आहे!" "अरे वा! तुम्हांलाही पत्ते खेळायची आवड आहे तर!" अनंत उत्साहाने म्हणाला,"आमचा १०-१२ जणांचा ग्रुप आहे! सवडीनुसार आम्ही दुपारी एकत्र जमून रमी खेळतो. तुमची इच्छा असेल तर, पुढचा खेळ ठरेल तेव्हां तुम्हींही सोबत या! तुमच्या तेवढ्याच अधिक ओळखी होतील आणि आमच्या ग्रुपलाही २ नवीन मेंबर्स मिळतील!"
१२ जानेवारी २०२३
0 notes
automaticthinghoagiezine · 10 months ago
Video
youtube
सोमाणी गार्डन सुशोभीकरण आणि संगित कारंजे बसवण्याच्या कामाचा शुभारंभ..
0 notes
sanjay-ronghe-things · 10 months ago
Text
जीव रंगला तुझ्यात
व्याप किती कामाचा कसा रंगेल जीव ।बघूनच माझ्याकडेयेईल कुणासही कीव । खोटे कशास बोलूजीव रंगला तुझ्यात ।वेळ पडतो अपुरादिसेल तुज माझ्यात । तुझ्या आणि माझ्यातभाव भावनांचा खेळ ।सांगेल तुज मी सारेमिळू दे थोडा वेळ ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 1 year ago
Text
पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याहस्ते चार हुतात्मा पुतळा परिसरातील सुशोभिकरणाचे लोकार्पण
सोलापूर, दिनांक 14 – सोलापूर शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा व चार हुतात्मा पुतळा या सुशोभीकरणाचे  कामाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, हुतात्मा श्रीकिसन सारडा,हुतात्मा जगन्नाथ शिंदे, हुतात्मा अ.कुर्बान हुसेन यांच्या पुतळ्यास व पुण्यश्लोक आहिल्या देवी होळकर यांच्या पुतळ्यास पालकमंत्री चंद्रकांत (दादा)पाटील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marmikmaharashtra · 1 year ago
Link
https://marmikmaharashtra.com/gramsevak-chaturbhuj-taking-a-bribe-of-1-lakh-bribe-taken-in-connection-with-jaljivan-work/
0 notes