#काँग्रेसवर
Explore tagged Tumblr posts
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
अमित शाहांकडून काँग्रेसवर चीनकडून अनुदान घेतल्याचा गंभीर आरोप ; म्हणाले,”त्यामुळेच तुमचे…”
अमित शाहांकडून काँग्रेसवर चीनकडून अनुदान घेतल्याचा गंभीर आरोप ; म्हणाले,”त्यामुळेच तुमचे…” नवी दिली :  अरुणाचल प्रदेशातील तवांगच्या यांगत्से सीमाभागात भारतीय आणि चिनी सैनिकांदरम्यान झालेल्या संघर्षावरून देशभरात रान उठले आहे. याच मुद्दयावरून आता विरोधकांनी सत्ताधारी भाजपला घेरण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, विरोधी पक्ष काँग्रेसने याच मुद्द्यावरून आज संसदेत चर्चा करण्याची मागणी केली होती. यावरूनच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 12 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 16.11.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
 Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 16 November 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १६ नोव्हेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या 
·      विधानसभा निवडणूक प्रचाराचे अखेरचे तीन दिवस शिल्लक-प्रचारसभांसोबत प्रचार फेऱ्या आणि कॉर्नर बैठकांवर उमेदवारांचा भर
·      केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची हिंगोलीतल्या सभेत काँग्रेसवर कडाडून टीका;तर काँग्रेसकडून भाजपला जातनिहाय जनगणनेची भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान 
·      छत्रपती संभाजीनगर इथल्या मद्यनिर्मिती कारखान्यात चार कामगारांचा अपघाती मृत्यू
आणि
·      दक्षिण आफ्रिकेचा चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात १३५ धावांनी दणदणीत पराभव करत भारताचा मालिकाविजय
सविस्तर बातम्या
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे अखेरचे तीन दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचारसभा, प्रचार फेऱ्या, कॉर्नर बैठका आणि घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह स्थानिक छोट्या पक्षाचे उमेदवार तसंच अपक्ष उमेदवारांचा भर दिसून येत आहे. पारंपर��क पद्धतीने रिक्षांवर भोंगे लावून प्रचार करण्याला जवळपास सर्वच उमेदवारांनी पसंती दिल्याचं पहायला मिळत आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी काल हिंगोली इथं रामलीला मैदानावर महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली. महायुती सरकारने राबवलेल्या योजनांचा आढावा घेतांनाच, शहा यांनी काश्मीरमधून हटवलेल्या कलम ३७० च्या मुद्यावरून काँग्रेस पक्षावर तर हिंदुत्वाच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कडाडून टीका केली.
दरम्यान, शहा यांचं हिंगोलीत आगमन होताच, निवडणूक आयोगाच्या पथकाकडून त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
सोयाबीन खरेदी करताना किमान आधारभूत किंमतीतली तफावत दूर करण्यासाठी भावांतर योजना लागू करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे. काल नांदेड इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते. दरम्यान, कांद्याची बेकायदा साठवणूक करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांवर संबंधित अधिनियमांनुसार कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी अन्न आणि नागरी पुरवठा तसंच पणन विभागाला दिले आहेत.
दरम्यान, परभणी मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार आनंद भरोसे यांच्या प्रचारासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी काल सभा घेतली.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड इथं महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश बनकर यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर राहतील, तसंच सोयाबीनला सात हजार रूपये भाव मिळेल अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी बोलताना दिली.
****
जातनिहाय जनगणनेबाबत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असं आव्हान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहर परिषदेत बालत होते. काँग्रेस अनुसूचित जाती- जमातींचं आरक्षण  संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. काँग्रेसनेच आरक्षण देऊन मागास जातींना हक्क आणि अधिकार दिले, असं चेन्निथला यांनी नमूद केलं.
दरम्यान काँग्रेस नेते ��ाहुल गांधी तसंच प्रियंका गांधी आज राज्यात प्रचार सभा घेणार आहेत. राहुल गांधी यांच्या आज चिमूर आणि धामणगाव रेल्वे इथं प्रचार सभा होणार असून, प्रियंका गांधी आज शिर्डी आणि कोल्हापुरात, तसंच उद्या गडचिरोली आणि नागपूरमध्ये प्रचारसभा घेतील, असं चेन्नीथला यांनी सांगितलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी  पक्षाचे नेते विधिज्ञ प्रकाश आंबेडकर आज छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. आज सायंकाळी आंबेडकर यांची आमखास मैदानावर प्रचार सभा होणार आहे.
****
विधानसभा निवडणुकीचं प्रत्यक्ष मतदान अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलं आहे. या पार्श्वभूमीवर मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी ‘मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम’-स्वीप उपक्रमांतर्गत पारंपरिक माध्यमांसोबतच अनेक अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती सुरू आहे.
छत्रपती संभाजीनगर इथं हॉट एअर बलून राईडच्या माध्यमातून मतदार जनजागृती केली जाणार आहे. महापालिकेचे उपायुक्त तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अंकुश पांढरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली...
Byte...
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात मतदान दिवसाच्या एक दिवस आधी तसंच मतदानाच्या दिवशी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून होणार आहे.
****
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याचं आवाहन सर्व मतदारांना करण्यात येत आहे. जालना इथला अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असलेला कैवल्य जोशी या नवमतदारानेही सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे...
Byte...
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या शेंद्रा औद्योगिक वसाहतीत काल दुपारी एका मद्यनिर्मिती कारखान्यात मका साठवण टाकी फुटल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. रॅडिको डिस्टलरी नावाच्या कारखान्यात ही दुर्घटना झाली. मका साठवण्याची टाकी खालून फुटल्याने या टाकीला वेल्डिंग करत असतांना, टाकी कोसळल्याने कैक क्वींटल मका तसंच टाकीचे पत्रे, काम करत अस मजुरांच्या अंगावर पडल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान काल जोहान्सबर्ग इथं झालेल्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेत चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघानं यजमान संघाचा १३५ धावांनी दणदणीत पराभव करत, चार सामन्यांची मालिका ३-१ अशी जिंकली. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकांत एक बाद २८३ धावा केल्या. तिलक वर्माने ४७ चेंडूत १२० धावा केल्या, तर संजू सॅमसनने ५६ चेंडूत १०५ धावा केल्या. अर्शदीप सिंगने तीन बळी घेतले. विजयासाठी २८४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा डाव १८ षटक दोन चेंडूत १४८ धावांवर संपुष्टात आला. नाबाद १२० धावा करणारा तिलक वर्मा सामनावीर तसंच मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.
****
गोव्यातील पणजी इथं होणाऱ्या ५५ व्या 'इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया' अर्थात 'इफ्फी'मध्ये झळकण्याचा मान 'हजारवेळा शोले पाहिलेला माणूस' या बहुचर्चित मराठी चित्रपटाला मिळाला आहे. या चित्रपटाला गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान जाहीर झाला असून २४ नोव्हेंबरला हा सोहळा होणार आहे. या चित्रपटाच्या नावातूनच शोले या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा संबंध असल्याचं जाणवतं, या नावामुळेच त्याच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. चित्रपटात दिलीप प्रभावळवकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, आदी कलावंत प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.
****
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची ५५५ वी जयंती काल सर्वत्र भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी झाली. गुरु नानक जयंतीनिमित्त नांदेडच्या सचखंड गुरुद्वाऱ्यासह विविध गुरुद्वाऱ्यांमध्ये शबद, भजन, कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रमांमध्ये शीख बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले.
****
कार्तिकी पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमाही काल साजरी झाली. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी दीपोत्सव साजरा झाला. कार्तिक पौर्णिमेनिमित्त बीड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र कपिलधार इथं दोन दिवसांच्या यात्रोत्सवाला सुरूवात झाली. संत मन्मथस्वामी यांच्या समाधी स्थळी दर्शनासाठी विविध ठिकाणांहून दिंड्यांचे आगमन झालं असून भाविकांनी मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आचारसंहिता अंमलबजावणीसाठी नियुक्त स्थिर सर्व्हेक्षण पथकानं गुरुवारी रात्री सिल्लोड मतदार संघात निल्लोड फाटा इथं १९ किलो सोने आणि ३७ किलो चांदी जप्त केली. याची किंमत अंदाजे १९ कोटी रुपयांची आहे,असं आचारसंहिता कक्षाचे सहायक नोडल अधिकारी राजेंद्र देसले यांनी कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून भरारी पथकं आणि स्थिर निगराणी पथकांनी जवळपास ४२ लाख ३३ हजार ४०० रुपयांची रोकड जप्त केली. या बाबत पुढची सुनावणी १८ नोव्हेंबरला होणार आहे.
दरम्यान, लातूर जिल्ह्यात ११ नोव्हेंबरपासून गृह मतदान सुरु आहे. लातूर शहर मतदारसंघात ३६८ मतदारांपैकी ३४९ जणांनी काल गृहमतदान केलं. यामध्ये १०० वर्षांवरील १० मतदारांचा समावेश आहे. उदगीर मतदारसंघात जवळपास ६२६ मतदारांनी या सुविधेअंतर्गत आपला मतदानाचा अधिकार बजावला. यामध्ये करडखेल इथल्या वयाची १०५ वर्षे पूर्ण केलेल्या मतदार जिजाबाई किसन कसबे यांचाही समावेश आहे.
****
0 notes
nagarchaufer · 2 months ago
Text
हरियाणात प्रचारापासून मोदी गायब पण बलात्कारी गुरमीत राम रहीम म्हणाला ‘ वोट फॉर बीजेपी ‘ 
हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल ८ ऑक्टोबर रोजी येणार असून दोन्ही ठिकाणच्या निवडणुकांपासून पंतप्रधान मोदी यांनी अक्षरशः पलायन करत महाराष्ट्रात प्रचाराला सुरुवात केलेली आहे. नेहमीप्रमाणे मोदी यांच्या प्रचाराची दिशा ही काँग्रेस विरोधीच असून तब्बल दहा वर्षांपासून अधिक काळ झाला तरी देखील काँग्रेसवर टीका  सोडून पंतप्रधान मोदी यांच्या भाषणात विशेष काही आढळून येत नाही.  वाशिम इथे…
0 notes
automaticthinghoagiezine · 1 year ago
Video
youtube
मराठा आरक्षणाबाबत बागडेंचा काँग्रेसवर हल्ला.. #marathareservation
0 notes
punerichalval · 1 year ago
Text
“देवेंद्र फडणवीसांचे सर्वोच्च बॉस…”, संजय राऊतांचा खोचक टोला; मोदींच्या ‘त्या’ वाक्याचा केला उल्लेख!
“देवेंद्र फडणवीसांचे सर्वोच्च बॉस…”, संजय राऊतांचा खोचक .....
देशभरात सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत केलेल्या भाषणाची चर्चा पाहायला मिळत आहे. मोदींनी आपल्या सव्वा दोन तासांच्या भाषणात फक्त ५ मिनिटं मणिपूरवर भाष्य करताना उरलेला पूर्ण वेळ फक्त काँग्रेसवर टीका करण्यात घालवला, अशा शब्दांत विरोधकांकडून या भाषणावर आक्षेप घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर देश पातळीवर भाजपा विरुद्ध काँग्रेस या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर ठाकरे गटा��े…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
“काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती…”, गजानन किर्तीकरांनी दिला सल्ला; म्हणाले, “शिवसेनेने स्वतंत्र बाण्याने लढावे”
“काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती…”, गजानन किर्तीकरांनी दिला सल्ला; म्हणाले, “शिवसेनेने स्वतंत्र बाण्याने लढावे”
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी केल्याने राज्यात सत्तापालट झालं. एकनाथ शिंदे यांना शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी समर्थन दिलं. शिवसेनेचे खासदार गजानन किर्तीकर सुद्धा शिंदे गटात सामील होण्याची शक्यता होती. मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर तसे संकेत मिळतं होते. मात्र, यावरती आता गजानन किर्तीकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शिवसेना गटप्रमुखांचा मेळावा गोरेगावमध्ये पार पडला. या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
“पंतप्रधान नरेंद्र मोदींची अवस्था दारुड्या सारखी झालीये”
Tumblr media
  Photo Credit- Facebook/ @narendramodi मुंबई | वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. दारुड्याला दारू पिण्यास पैसे मिळाले नाही, तर तो घरातील भांडी विकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्या दारुड्या सारखी अवस्था झाली आहे, अशी बोचरी टीका प्रकाश आंबेडकर यांनी मोदींवर केलीेये. देशाची वाटचाल राजेशाही आणि हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. नेहरूंनी कबुतरं सोडली ��ोती, मात्र ती वाढदिवशी सोडली नव्हती. मात्र मोदींनी वाढदिवशी चित्ते सोडले असून एक प्रकारे दहशत पसरवली जात आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत. प्रकाश आंबेडकरांनी राहुल गांधीच्या यात्रेवर देखील टीका केली आहे. भारत तुटला कुठं आहे की, त्याला जोडायला, देश कुठ चालला आहे आणि राहुल गांधी यांचं आंदोलन दुसरीकडेच चाललं आहे, असं ते म्हणालेत. दरम्यान, महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) सरकार पाडण्याचा विडा राष्ट्रवादीनं उचलला होता, असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट आरोप केला आहे. Read the full article
0 notes
loksutra · 3 years ago
Text
'निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने शिवसेनेशी लग्न केले, तिन्ही पक्षांची वधू कोण हे मला माहीत नाही', AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी भिवंडीत
‘निवडणुकीनंतर राष्ट्रवादीने शिवसेनेशी लग्न केले, तिन्ही पक्षांची वधू कोण हे मला माहीत नाही’, AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी भिवंडीत
ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांची महाराष्ट्रातील भिवंडी येथे जाहीर सभा झाली. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी शनिवारी भिवंडीत पोहोचले. येथे त्यांनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (असदुद्दीन ओवेसी) यांनी शनिवारी भाजप, शिवसेना…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 3 years ago
Text
मोदींच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही : देवंद्र फडणवीस
मोदींच्या केसालाही कुणी धक्का लावू शकत नाही : देवंद्र फडणवीस
पंतप्रधानांसोबत पंजाबमध्ये जे घडलं त्यावरुन महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. काँग्रेस नेत्यांची वक्तव्ये म्हणजे निर्लज्जपणाचा कळस असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पंजाबमधील आंदोलक हे काँग्रेसचे कार्यकर्ते होते. असा आरोप फडणवीसांनी केला. त्यांना पोलिसांनी परवानगी दिली होती, असाही दावा त्यांनी केलाय. त्यामुळे पंतप्रधानांचा ताफा २०…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Gujarat Election 2022 : मोदींचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले “काँग्रेसला दोनच कामे येतात, एक म्हणजे मला शिव्या देणे आणि दुसरे…”
Gujarat Election 2022 : मोदींचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले “काँग्रेसला दोनच कामे येतात, एक म्हणजे मला शिव्या देणे आणि दुसरे…”
Gujarat Election 2022 : मोदींचा काँग्रेसवर निशाणा, म्हणाले “काँग्रेसला दोनच कामे येतात, एक म्हणजे मला शिव्या देणे आणि दुसरे…” पाटण – गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचारासाठी राज्यात तळ ठोकून बसलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाटण येथील प्रचारसभेत कॉंग्रेस पक्षावर पुन्हा एकदा निशाणा साधला. कॉंग्रेसकडे आता दोनच कामे शिल्लक राहिली आहेत. एक म्हणजे इलेक्‍ट्रॉनिक मतदान यंत्रातील…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 13 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 15 November 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १५ नोव्हेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
विधानसभा निवडणूक प्रचाराचे अखेरचे तीन दिवस शिल्लक-प्रचारसभांसोबत प्रचार फेऱ्या आणि कॉर्नर बैठकांवर उमेदवारांचा भर
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची हिंगोलीतल्या सभेत काँग्रेसवर कडाडून टीका;तर काँग्रेसकडून भाजपला जातनिहाय जनगणनेची भूमिका स्पष्ट करण्याचं आव्हान 
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आचारसंहिता पथकाकडून १९ किलो सोन्यासह ३७ किलो चांदी जप्त
आणि
भारत-दक्षिण आफ्रिका संघादरम्यान टी - ट्वेंटी क्रिकेट मालिकेत आज चौथा आणि शेवटचा सामना
****
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे अखेरचे तीन दिवस शिल्लक आहेत. या पार्श्वभूमीवर प्रचारसभा, प्रचार फेऱ्या, कॉर्नर बैठका आणि घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर सर्वच प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह स्थानिक छोट्या पक्षाचे उमेदवार तसंच अपक्ष उमेदवारांचा भर दिसून येत आहे. पारंपरिक पद्धतीने रिक्षांवर भोंगे लावून प्रचार करण्याला जवळपास सर्वच उमेदवारांनी पसंती दिल्याचं पहायला मिळत आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी आज हिंगोली इथं रामलीला मैदानावर महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा घेतली. महायुती सरकारने राबवलेल्या योजनांचा आढावा घेतांनाच, शहा यांनी काँग्रेस पक्षावर कडाडून टीका केली. काश्मीरमधून हटवलेलं कलम ३७० पुन्हा एकदा लागू करण्याचं आश्वासन काँग्रेस देत आहे, परंतु गांधी घराण्याची चौथी पिढीही हे काम करू शकणार नाही, असा दावा त्यांनी केला. हिंदुत्वाच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही शहा यांनी टीका केली.
दरम्यान, शहा यांचं हिंगोलीत आगमन होताच, निवडणूक आयोगाच्या पथकाकडून त्यांच्या बॅगांची तपासणी करण्यात आल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मतदारांचं समर्थन मिळत नसल्याने, काँग्रेस पक्ष मतदारांची दिशाभूल करत असल्याचा आरोप, केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नितीन गडकरी यांनी केला आहे. ते आज गडचिरोली जिल्ह्यात अहेरीचे महायुतीचे उमेदवार धर्मरावबाबा आत्राम आणि गडचिरोलीचे उमेदवार डॉ.मिलिंद नरोटे यांच्या प्रचार सभेत बोलत होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली राज्यघटना भाजप बदलणार आहे, असा खोटा प्रचार कॉग्रेस करत आहे, परंतु काँग्रेसनेच अनेकदा घटनेची मोडतोड केल्याचं गडकरी म्हणाले.
****
जातनिहाय जनगणनेबाबत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी आपली भूमिका जाहीर करावी, असं आव्हान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बालत होते. काँग्रेस अनुसूचित जाती- जमातींचं आरक्षण  संपवणार असल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. काँग्रेसनेच आरक्षण देऊन मागास जातींना हक्क आणि अधिकार दिले, असं चेन्निथला यांनी नमूद केलं.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वांद्रे इथं पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. गेल्या १९ वर्षात आम्ही काय केलं यावर ही पुस्तिका असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. १७ नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदानावर मनसेच्या सभेसाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही, त्यामुळे वेळेअभावी ही सभा न घेता मतदार संघांना प्रत्यक्ष भेटी देणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्राच्या विकासाबाबतच्या ब्लू प्रिंटवरून आपल्याला हिणवलं गेलं, त्या ब्लू प्रिंट मधील प्रश्नांचाच या जाहीरनाम्यात समावेश केल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या ��मेदवारांच्या प्रचारासाठी  पक्षाचे नेते विधिज्ञ प्रकाश आंबेडकर उद्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. उद्या सायंकाळी आंबेडकर यांची आमखास मैदानावर प्रचार सभा होणार आहे.
****
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठीचं प्रत्यक्ष मतदान अवघ्या पाच दिवसांवर येऊन ठेपलं आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई उपनगर जिल्हा आणि मुंबई शहर जिल्हा प्रशासनाकडून नियोजन, अंमलबजावणी, सोयीसुविधांच्या पूर्ततेसोबतच जनजागृतीसाठीही जोरदार प्रयत्न केले जात आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी ‘मतदार शिक्षण आणि निवडणूक सहभागासाठी सुनियोजित कार्यक्रम’-स्वीप उपक्रमांतर्गत पारंपरिक माध्यमांसोबतच अनेक अभिनव उपक्रमांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती सुरू आहे. आतापर्यंत सुमारे ४० लाख वीजदेयकांवर मतदानाचे संदेश प्रकाशित करण्यात आले आहेत. तर, २७ लाख बँक ग्राहकांना मतदानाचं आवाहन करणारे लघूसंदेश -एसएमएस पाठवण्यात आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेतर्फे मतदारांच्या सोयीसाठी १९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीसाठी मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण या मार्गासह हार्बर रेल्वे मार्गावरून विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत. मतदानाच्या दिवशी मुंबईत दिव्यांग मतदारांसाठी विशेष मोफत बस सेवाही दिली जाणार आहे.
****
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देशातील दूरचित्रवाणी वाहिन्यांवर निवडणुकांसंबंधित प्रसारित होणाऱ्या बातम्यांवर लक्ष ठेवण्यासाठी इलेक्ट्रॉनिक मीडिया मॉनिटरिंग केंद्र स्थापन करण्यात आलं आहे. महाराष्ट्रात मतदान दिवसाच्या एक दिवस आधी तसंच मतदानाच्या दिवशी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर प्रसारित होत असलेल्या प्रत्येक बातमीवर लक्ष ठेवण्याचं काम केंद्रीय निवडणूक आयोगाकडून होणार आहे.
****
येत्या निवडणुकीत मतदान करण्याचं आवाहन सर्व मतदारांना करण्यात येत आहे. जालना इथला अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी असलेला कैवल्य जोशी या नवमतदारानेही सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे –
बाईट – कैवल्य जोशी, नवमतदार
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज सातारा जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची ५५५ वी जयंती आज सर्वत्र भक्तिभावानं आणि उत्साहात साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु नानक जयंतीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
भगवान बिरसा मुंडा यांची जयंतीही आज साजरी होत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संसद भवन परिसरात बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली, तसंच आकाशवाणीवरून नागरिकांना संबोधित करत, जनजातीय अर्थात आदिवासी गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
गुरु नानक जयंतीनिमित्त नांदेडच्या सचखंड गुरुद्वाऱ्यासह विविध गुरुद्वाऱ्यांमध्ये शबद, भजन, कीर्तन इत्यादी धार्मिक कार्यक्रमांमध्ये शीख बांधव मोठ्या संख्येनं सहभागी झाले आहेत.
कार्तिकी पौर्णिमा अर्थात त्रिपुरारी पौर्णिमाही आज साजरी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात ठिकठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. तुलसी विवाह सोहळ्याची आज सांगता होत आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आचारसंहिता अंमलबजावणीसाठी नियुक्त स्थिर सर्व्हेक्षण पथकानं काल रात्री सिल्लोड मतदार संघात निल्लोड फाटा इथं १९ किलो सोने आणि ३७ किलो चांदी जप्त केली. याची किंमत अंदाजे १९ कोटी रुपयांची आहे, असं आचारसंहिता कक्षाचे सहायक नोडल अधिकारी राजेंद्र देसले यांनी कळवलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून भरारी पथकं आणि स्थिर निगराणी पथकांनी जवळपास ४२ लाख ३३ हजार ४०० रुपयांची रोकड जप्त केली. या बाबत पुढची सुनावणी १८ नोव्हेंबरला होणार आहे.
****
धुळे जिल्हात आचारसंहिता लागू झाल्यापासून गेल्या एक महिन्यात ‘सी-व्हिजिल ॲप’ वर एकूण ५४ तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी ३० तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून २४ तक्रारी चुकीच्या असल्याचं समोर आलं, यापैकी ६ तक्रारी जिल्हा स्तरावर तर १८ तक्रारी नि��डणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर फेटाळण्यात आल्या आहेत.
****
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीचे मतदान शांततेत आणि प्रलोभनमुक्त होण्यासाठी राज्य सीमेवरील तपासणी नाक्यावर कडक तपासणी करावी असे निर्देश केंद्रीय निवडणूक पोलीस निरिक्षक अभिषेक मिना यांनी दिले आहेत. मिना यांच्या अध्यक्षतेखाली आज धुळ्यात संबंधित अधिकाऱ्यांची बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
****
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान सुरु असलेल्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला चौथा आणि शेवटचा सामना आज जोहान्सबर्ग इथं खेळला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारत दोन-एकनं आघाडीवर आहे.
****
गोव्यातील पणजी इथं होणाऱ्या ५५ व्या ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’ अर्थात ‘इफ्फी’मध्ये झळकण्याचा मान ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या बहुचर्चित मराठी चित्रपटाला मिळाला आहे. या चित्रपटाला गाला प्रीमियर आणि रेड कार्पेटचा सन्मान जाहीर झाला असून २४ नोव्हेंबरला हा सोहळा होणार आहे.
****
0 notes
automaticthinghoagiezine · 1 year ago
Video
youtube
मराठा आरक्षणाबाबत बागडेंचा काँग्रेसवर हल्ला.. #marathareservation
0 notes
indialegal · 4 years ago
Text
rename controversy: नामांतरावरुन आघाडीत कुरबुरी; काँग्रेसच्या मंत्���्यानं शिवसेनेला ठणकावले - women & child development minister yashomati thakur warns shivsena over rename controversy
rename controversy: नामांतरावरुन आघाडीत कुरबुरी; काँग्रेसच्या मंत्र्यानं शिवसेनेला ठणकावले – women & child development minister yashomati thakur warns shivsena over rename controversy
मुंबईः औरंगाबादचे संभाजीनगर करण्याच्या मुद्द्यावर शिवसेना व काँग्रेस नेत्यांमध्ये कलगीतुरा रंगला आहे. खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसवर केलेल्या टीकेला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी एक खरमरीत पत्र लिहीत प्रत्युत्तर दिलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ��ाकूर यांनीही एक ट्विट करत शिवसेनेला आव्हान दिलं आहे. सामनातील एका लेखात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years ago
Text
​अजित पवार साहेब भाषा नीट करा तुमची, नाहीतर ...
​अजित पवार साहेब भाषा नीट करा तुमची, नाहीतर …
 निलेश राणेंचा उपमुख्यमंत्र्यांना थेट इशारा मालवण : नवाब मलिक यांच्या जावयावरील ईडी कारवाई, धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप आणि त्यानंतर मुंडेंनी स्वतः आपल्या विवाहबाह्य संबंधांची दिलेली कबुली यावरून राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करणाऱ्या भाजप नेते निलेश राणेंवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे. या टीकेचा निलेश राणे यांनी समाचार घेतला आहे. “अजित पवार साहेब भाषा नीट करा तुमची, नाहीतर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
गुजरात निवडणूक 2022: गुजरात काँग्रेसला मोठा धक्का, कैलाश गढवी यांचा 'आप'मध्ये प्रवेश, माजी आमदार मणिलाल वाघेला यांचा भाजपमध्ये प्रवेश
गुजरात निवडणूक 2022: गुजरात काँग्रेसला मोठा धक्का, कैलाश गढवी यांचा ‘आप’मध्ये प्रवेश, माजी आमदार मणिलाल वाघेला यांचा भाजपमध्ये प्रवेश
कैलास गढवी ‘आप’ आणि माजी आमदार मणिलाल वाघेला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कैलास गढवी म्हणाले की, गुजरातमधील भाजप सरकार लोकांना आरोग्य आणि शिक्षण सुविधा तसेच सुरक्षा आणि रोजगार देण्यात अपयशी ठरले आहे. त्याचवेळी, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेचच वाघेला यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल करत त्याला दिशाहीन पक्ष म्हटले. गुजरात (गुजरात) काँग्रेस नेते कैलास गढवी (कैलास गढवी) रविवारी आम आदमी पक्षात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
'इंडिया' आघाडीत बिघाडी? आता अखिलेश काँग्रेसवर भडकले
https://bharatlive.news/?p=174048&wpwautoposter=1697900637 'इंडिया' आघाडीत बिघाडी? आता अखिलेश काँग्रेसवर भडकले
पुढारी ऑनलाईन ...
0 notes