#कराड दक्षिण
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 7 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date - 08 November 2024 Time 01.00 to 01.05 PM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक ०८ नोव्हेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
भ्रष्टाचार हा एक आजार असून तो मुळापासून उखडून टाकला पाहिजे, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. आज नवी दिल्ली इथं केंद्रीय दक्षता आयोगाच्या दक्षता जागरूकता सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती मुर्मू बोलत होत्या. विश्वास हा समाजाचा पाया असून भ्रष्टाचारामुळे समाजातील विश्वास कमी होतो, असंही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या. भ्रष्टाचाराचा सामना करण्यासाठी थेट लाभ हस्तांतरण योजनेसारखे उपक्रम शासनातर्फे राबवले जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
नवी दिल्लीत आज पासून दुसऱ्या सैन्य परंपरा उत्सवाला सुरुवात होत आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा धोरण, परराष्ट्र नीती, लष्कराचा इतिहास आणि वारसा यांचा अभ्यास करणारे शिक्षणतज्ज्ञ आणि संशोधक या महोत्सवात सहभागी होणार आहेत. याचबरोबर लष्कराच्या शौर्य गाथा प्रकल्पाचा शुभारंभही यावेळी होणार आहे. शिक्षण आणि पर्यटनाच्या माध्यमातून देशाच्या लष्करी परंपरांचं संवर्धन आणि प्रसार करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यातल्या प्रचारसंभांना आजपासून सुरुवात झाली. आज पहिली सभा धुळ्यात मालेगाव रोड, महात्मा गांधी तत्वज्ञान केंद्राजवळ पांजरापोळ गोशाळा इथं सुरू झाली आहे. त्यानंतर दुपारी नाशिक इथं तपोवन परिसरात मोदी यांची सभा होणार आहे. या सभेच्या निमित्ताने प्रशासनाने जय्यत तयारी केली असून, सुरक्षा व्यवस्था चोख आहे. तपोवनासह सुमारे ११ मार्गां��रील वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. महायुतीततल्या घटक पक्षांचे वरिष्ठ नेते या सभांना उपस्थित राहणार आहेत.
दरम्यान, भाजपनेते, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सांगली इथं सभा सुरू आहे. त्यानंतर ते सातारा जिल्ह्यात कराड इथं जाहीरसभा घेणार आहेत. शिवसेना नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज धाराशिव जिल्ह्यात तीन प्रचारसभा होणार आहेत. यात परंडा, धाराशिव आणि उमरगा इथले महायुतीचे उमेदवार अनुक्रमे डॉक्टर तानाजी सावंत, अजित पिंगळे आणि ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारासाठी या सभा होत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची आज परभणी जिल्ह्यात सेलू इथं आणि हिंगोली जिल्ह्यात वसमत इथं प्रचार सभा होणार आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आज लातूर इथं तीन सभा होणार आहेत. लातूर शहर मतदारसंघाचे उमेदवार आमदार अमित देशमुख आणि लातूर ग्रामीण मतदारसंघाचे उमेदवार धीरज देशमुख यांच्या प्रचारार्थ लातूर शहर तसंच निलंगा आणि गंजगोलाई इथं या सभा होणार आहेत.
आचारसंहिता काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर कालपर्यंत एकूण तीन हजार एकशे अठ्ठावीस तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी तीन हजार एकशे बारा तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू या स्वरूपात एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेनं आजपासून १६४ विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यादृष्टीनं रेल्वेनं ४७६ गाड्यांचं नियोजन केलं आहे. रेल्वे विभागातर्फे आतापर्यंत चार हजार ५२१ रेल्वे गाड्या चालवण्यात आल्या असून ६५ लाख प्रवाशांनी याचा लाभ घेतल्याची माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. या महिन्याच्या चार तारखेला एकाच दिवसात तीन कोटींपेक्षा जास्त प्रवाशांनी रेल्वे प्रवास केल्याचंही मंत्रालयानं सांगितलं.
नांदेड बिदर महामार्गावर एकुर्का रोडवर टेम्पो आणि कारच्या भिषण अपघातात एकाच कुटुंबातील चार जण ठार झाल्याची घटना काल दुपारी घडली. कारमधील सर्वजण कपड्यांच्या खरेदीसाठी उदगीर इथं जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव टेम्पोने कारला धडक दिली. यात आई, दोन विवाहीत मुली आणि नातीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.
भारताचा उदयोन्मुख बुद्धिबळपटू अर्जून इरिगाईसी यानं फिडे जागतिक बुद्धिबळ क्रमवारीत दुसरे स्थान पटकावलं आहे. काल चेन्नई ग्रांड मास्टर्स स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीअखेर त्यानंतर अॅलेक्सी सरानावर विजय मिळवला.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान चार टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज डरबन इथं खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात ही मालिका होत आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
कोरिया बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत भारताच्या किरण जॉर्जने आपलं स्थान निश्चित केलं आहे. आज सकाळी उपांत्यपूर्व फेरीत त्याने जपानच्या खेळाडूचा २१-१४, २१-१६ असा पराभव केला. तत्पूर्वी, काल झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीत जॉर्जने तैवानच्या खेळाडूचा पराभव केला.
0 notes
rightnewshindi · 22 days ago
Text
कांग्रेस ने महाराष्ट्र चुनावों के लिए जारी की 48 उम्मीदवारों की पहली लिस्ट, जानें किसको कहां से मिला टिकट
Congress Candidates List Maharashtra: महाराष्ट्र विधानसभा चुनाव के लिए कांग्रेस पार्टी ने अपने उम्मीदवारों की लिस्ट जारी कर दी है। 48 सीटों के लिए उम्मीदवार फाइनल हो गए हैं। पार्टी के प्रदेश अध्यक्ष नाना पटोले साकोली से, विधायक दल के नेता बालासाहेब थोरात संगमनेर से, विपक्ष के नेता विजय वडेट्टिवार ब्रम्हपुरी से, पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कराड दक्षिण से और सीडब्ल्यूसी सदस्य एवं क्षेत्रीय…
0 notes
theinvisibleindian · 5 years ago
Text
पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपाच्या वाटववर?
पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आनंदराव पाटील भाजपाच्या वाटववर?
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
सातारा जिल्हात काँग्रेसला आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि विधानपरिषद आमदार आनंदराव पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. आनंदराव पाटील यांनी मुंबई येथे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली असल्याचं बोललं जातंय.
माण खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या भाजप प्रवेशानंतर आता आमदार आनंदराव पाटील भाजपात जाणार असल्याची…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
आदित्य ठाकरेंच्या सभेच्या ५० पट जास्त गर्दी जमवून दाखवेन, शिंदे गटाच्या आमदाराचं ओपन चॅलेंज
आदित्य ठाकरेंच्या सभेच्या ५० पट जास्त गर्दी जमवून दाखवेन, शिंदे गटाच्या आमदाराचं ओपन चॅलेंज
आदित्य ठाकरेंच्या सभेच्या ५० पट जास्त गर्दी जमवून दाखवेन, शिंदे गटाच्या आमदाराचं ओपन चॅलेंज Aditya Thackeray Shiv samvad Yatra | आदित्य ठाकरे यांच्या या सभेला ५ ते ७ हजारांची गर्दी जमली होती, हे मला मान्य आहे. पण त्या सभेतील बहुतेक माणसं ही उत्तर कराड, दक्षिण कराड आणि साताऱ्यातून आली होती. या प्रत्येक भागातून माणसं आणून माझ्या पाटण मतदारसंघात मोठी गर्दी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मी…
View On WordPress
0 notes
psdigi-blog · 4 years ago
Photo
Tumblr media
डोळ्यात आले अश्रू, बाप्पा आम्हाला नका विसरू.. आनंदमय करून चालले तुम्ही, पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही.. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! (at कराड दक्षिण) https://www.instagram.com/p/CEk4vQLlnZk/?igshid=1q3rmolzupy79
0 notes
khabaruttarakhandki · 4 years ago
Text
महाराष्‍ट्र: उद्धव ठाकरे ने विधान परिषद सदस्‍य के रूप में शपथ ली, सीएम बने रहने को लेकर रास्‍ता साफ
उद्धव ठाकरे महाराष्‍ट्र के उच्‍च सदन विधान परिषद के सदस्‍य चुने गए हैं
मुंंबई:
महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) को आज विधान परिषद (Legislative Council) के सदस्य के रूप में शपथ दिलाई गई है, इससे उन्‍होंने 28 मई के बाद भी राज्‍य के सीएम पद (Chief Minister’s Job) पर बने रहने की ‘बाधा’ पार कर ली है. गौरतलब है कि उद्धव ने 28 नवंबर 2019 को मुंबई के सीएम पद की शपथ ली थी, सीएम पद संभालते समय वे महाराष्‍ट्र के किसी भी सदन (विधानसभा और विधान परिषद) के सदस्‍य नहीं थे, ऐसे में उन्‍हें सीएम पद पर बने रहने के लिए छह माह के अंदर इनमें से किसी भी सदन का सदस्‍य बनना जरूरी था. महाराष्‍ट्र सहित पूरे देश में कोरोना वायरस की महामारी के चलते उच्‍च सदन (विधान परिषद) के चुनावों को लेकर काफी समय तक अनिश्चितता की स्थिति रही थी और इसे राज्‍य के गवर्नर भगत सिंह कोश्‍यारी और राज्‍य में सत्‍तारूढ़ शिवसेना-एनसीपी और कांग्रेस के गठबंधन के बीच सियासी खींचतान के रूप में देखा जा गया था. हालांकि बाद में इस बारे में रास्‍ता साफ हुआ था. विधान परिषद में नौ सीटों के लिए कोई चुनाव नहीं हुए थे और 59 वर्षीय ठाकरे निर्विरोध चुने गए थे.
यह भी पढ़ें
दक्षिण मुम्बई स्थित विधान भवन में महाराष्ट्र विधान परिषद के अध्यक्ष रामराजे निम्बाल्कर ने सोमवार क��� ठाकरे और 14 मई को निर्विरोध चुने गए अन्य आठ लोगों को शपथ दिलाई. उद्धव ठाकरे के अलावा विधान परिषद की उपसभापति नीलम गोरे (शिवसेना), भाजपा के रणजीत सिंह मोहिते पाटिल, गोपीचंद पाडलकर, प्रवीण दटके और रमेश कराड, राकांपा के शशिकांत शिंदे और अमोल मितकरी तथा कांग्रेस के राजेश राठौड़ ने शपथ ग्रहण की.
Tumblr media
 उद्धव ने विधान परिषद सदस्‍य के रूप में शपथ ग्रहण की
ये नौ सीटें 24 अप्रैल को खाली हुई थीं. शिवसेना अध्यक्ष उद्धव इस चुनाव के साथ पहली बार विधायक बने हैं. उन्होंने पिछले साल 28 नवंबर को मुख्यमंत्री पद की शपथ ली थी और उनके लिए 27 मई से पहले विधानमंडल के दोनों सदनों में से किसी एक का सदस्य बनना जरूरी था. ठाकरे के बेटे आदित्य भी विधानसभा के सदस्य हैं और तीन पार्टी की गठबंधन सरकार में मंत्री भी हैं. (भाषा से भी इनपुट)
from WordPress https://hindi.khabaruttarakhandki.in/%e0%a4%ae%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e2%80%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%89%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a4%b5-%e0%a4%a0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%87/
0 notes
airnews-arngbad · 7 days ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 08 November 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: ०८ नोव्हेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय प्रचाराला वेग आला आहे. भाजपनेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आज धुळे आणि नाशिक इथं प्रचारसभा घेणार आहेत. दुपारी १२ वाजता धुळे आणि दोन वाजता नाशिक येथील सभांमधून जनतेचा आशीर्वाद घेणार असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान, भाजपनेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सातारा जिल्ह्यातील कराड येथे जाहीरसभेला संबोधित करणार आहेत. शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज धाराशिव इथं जाहीरसभा आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज परभणी आणि वर्ध्यात सभा घेणार आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड इथं सभा सुरु आहे.
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूम���वर स्वीप अंतर्गत, मतदान जनजागृतीसाठी 'उत्सव निवडणुकीचा, अभिमान महाराष्ट्राचा' हे विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथून संध्याकाळी पाच वाजता या राज्यस्तरीय अभियानाला सुरूवात होणार आहे. निवडणूक आयोग तसंच राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे वरीष्ठ अधिकारी, चित्रपट, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय संचार ब्यूरो, मुंबई महापालिका आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीनं एक फिरतं प्रदर्शन आयोजित केलं असून प्रदर्शन लावलेल्या या गाड्या १५ निवडक जिल्ह्यांमध्ये मतदानविषयक जनजागृतीचा संदेश घेऊन जाणार आहेत.
आचारसंहिता काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर कालपर्यंत एकूण तीन हजार एकशे अठ्ठावीस तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी तीन हजार एकशे बारा तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं ही माहिती दिली. राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांद्वारे करण्यात आलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू या स्वरूपात एकूण ३०४ कोटी ९४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
परभणी विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीची आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातल्या चारही मतदार संघात निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासन तसेच संबधित नोडल अधिकारी, आणि कर्मचाऱ्यांनी दक्षता घ्यावी. तसंच मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, अशा सुचना केल्या. सर्व उपस्थितांना यावेळी मतदानाची शपथ देण्यात आली.
लातूर ग्रामीण, लातूर शहर आणि औसा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची पहिली तपासणी उद्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात होणार आहे. यावेळी उमेदवारांनी आवश्यक सर्व अभिलेख्यासह कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना कार्यालयाच्यावतीनं करण्यात आलं आहे.
जळगाव जिल्ह्यात मतदान जनजागृतीसाठी राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाअंतर्गत महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेतर्फे मतदान जनजागृती रील्स तयार करण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्वोत्कृष्ट रील्स बनवणाऱ्या स्पर्धकाला प्रशासनाकडून पारितोषिक दिलं जाणार आहे. अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी दिली.
धुळे शहरात १० नोव्हेंबरला गृहमतदान होणार आहे. याअंतर्गत २६८ वृद्ध आणि दिव्यांग मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. अशी माहिती धुळे शहर विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी महेश शेलार यांनी दिली.
नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथल्या नाशिक मर्चंट बँकेतील कर्मचाऱ्यांविरोधात काल पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बँकेच्या शाखेत गेल्या काही दिवसांमध्ये नव्व्द कोटी रुपयांचा संशयास्पद व्यवहार झाल्याचा आरोप शिवसेना पक्षाच्यावतीनं करण्यात आला होता. याप्रकरणी जयेश मिसाळ याच्या तक्रारीवरून मा��ेगाव पोलिसांनी काल सिराज नावाच्या एका व्यक्तीसह बँकेच्या स्थानिक आधिकऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
श्री क्षेत्र पंढरपूर इथली कार्तिकी एकादशी निमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेनं आदिलाबाद-पंढरपूर, नांदेड-पंढरपूर, बिदर-पंढरपूर या अनारक्षित विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान चार टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना आज डरबन इथं खेळला जाणार आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात ही मालिका होत आहे. भारतीय वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल.
चेन्नई इथं सुरू असलेल्या चौदाव्या हॉकी इंडिया वरिष्ठ पुरुष राष्ट्रीय स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी उत्तर प्रदेश, कर्नाटक, चंदीगड, मिझोराम, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू संघांनी विविध गटात विजय मिळवला. उत्तर प्रदेशने दिल्लीचा ४-१ असा पराभव केला. तर कर्नाटकने त्रिपुरा संघाचा ५-० असा पराभव केला. चंदीगडने उत्तराखंडविरुद्ध ९-० असा विजय मिळवला.
0 notes
chaitanyabharatnews · 5 years ago
Text
महाराष्ट्र चुनाव : कांग्रेस ने जारी की दूसरी लिस्ट, पृथ्वीराज चव्हाण समेत कई बड़े नेताओं के नाम शामिल
Tumblr media
चैतन्य भारत न्यूज मुंबई. महाराष्ट्र के विधानसभा चुनाव 2019 के लिए कांग्रेस ने मंगलवार रात 52 उम्मीदवारों की दूसरी लिस्ट जारी की है। इस लिस्ट में महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण का भी नाम है। बता दें पृथ्वीराज कराड दक्षिण सीट से चुनावी मैदान में उतरेंगे। (adsbygoogle = window.adsbygoogle || ).push({}); दूसरी लिस्ट में पूर्व मुख्यमंत्री अशोक चव्हाण, प्रदेशाध्यक्ष बालासाहेब थोराट, प्रतिपक्ष के नेता विजय नामदेवराव वादेत्तिवर और कांग्रेस विधायक दल के नेता केसी पदवी का नाम शामिल है। बता दें अशोक चव्हाण बोकर सीट से चुनाव लड़ेंगे, नितिन राउत नागपुर उत्तर से और पूर्व गृह मंत्री सुशील कुमार शिंदे की बेटी प्रणीति सोलापुर सेंट्रल सीट से मैदान में उतरने वाली हैं। कांग्रेस ने विश��वजीत पतंगराव कदम को पलूस-कडगांव सीट से उम्मीदवार घोषित किया है और पूर्व मुख्यमंत्री विलासराव देशमुख के बेटे अमित को लातूर शहर से टिकट दिया है।
Tumblr media Tumblr media
कांग्रेस ने इससे पहले 51 उम्मीदवारों की पहली लिस्ट जारी की थी। सूत्रों के मुताबिक, कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (राकांपा) गठबंधन के तहत 125-125 सीटों पर चुनाव लड़ रही है। अब तक कांग्रेस 103 सीटों पर अपने उम्मीदवार तय कर चुकी है। बता दें महाराष्ट्र में 21 अक्टूबर को चुनाव होंगे और इसके नतीजे 24 अक्टूबर को आएंगे। उसी दिन हरियाणा में भी चुनाव होंगे। ये भी पढ़े... महाराष्ट्र विधानसभा चुनाव : बीजेपी ने जारी की 125 उम्मीदवारों की लिस्ट, 12 विधायकों का टिकट कटा महाराष्ट्र-हरियाणा में 21 अक्‍टूबर को होंगे चुनाव, 24 को आएंगे नतीजे, यहां देखिए पूरा शेड्यूल हरियाणा चुनाव : जेजेपी ने जारी की 15 उम्मीदवारों की सूची, इन लोगों के नाम हैं शामिल Read the full article
0 notes
aakashhiwale2 · 5 years ago
Photo
Tumblr media
आगामी विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडीचे २२ उमेदवार उमेदवारांची नावे आणि मतदारसंघ - 1. सुरेश जाधव, शिराळा - रामोशी 2. डॉ. आनंद गुरव, करवीर - गुरव 3. दिलीप पांडुरंग कावडे, दक्षिण कोल्हापूर - गोंधळी 4. बाळकृष्ण शंकर देसाई, कराड-दक्षिण - लोहार 5. बाळासाहेब चव्हाण, कोरेगाव - नंदिवाले 6. दीपक शामदिरे, कोथरुड - कैकाडी 7. अनिल कुऱ्हाडे, शिवाजीनगर - वडार 8. मिलिंद काची, कसबा पे�� - काची - राजपूत 9. शहानवाला जब्बार शेख, भोसरी - छप्परबंद, मुस्लीम 10. शाकीर इसालाल तांबोळी, इस्लामपूर - तांबोळी 11. किसन चव्हाण, पाथर्डी-शेवगाव - पारधी 12. अरुण जाधव, कर्जत-जामखेड , कोल्हाटी 13. सुधीर शंकरराव पोतदार, औसा - सोनार 14. चंद्रलाल वकटुजी मेश्राम – ब्रह्मपुरी - ढीवर 15. अरविंद सा��डेकर – चिमूर, माना आदिवासी 16. माधव कोहळे – राळेगाव, गोवारी 17. शेख शफी अब्दुल नबी शेख – जळगाव, - पटवे-मुस्लिम 18. लालसू नागोटी – अहेरी, माडीया आदिवासी 19. मणियार राजासाब – लातूर शहर, मणियार 20. नंदकिशोर कुयटे – मोर्शी, भोई 21. अड आमोद बावने – वरोरा, ढीवर 22. अशोक विजय गायकवाड – कोपरगाव, भिल्ल (at Mumbai, Maharashtra) https://www.instagram.com/p/B2y28fIpVmf/?igshid=xinlzqbq8azo
0 notes
theinvisibleindian · 5 years ago
Text
तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा...
तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा…
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक, कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे डाॅ. अतुल भोसले यांची डोकेदुखी वाढवली आहे.
यादव यांनी आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा व कराड नगरपालिकेतील यशवंत विकास आघाडीच्या नगरसेवकांचा मेळावा आयोजित करुन…
View On WordPress
0 notes
24x7politics · 5 years ago
Link
RT IYCMaha: कराड दक्षिण (जि.सातारा) मतदारसंघाचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष महाआघाडीचे अधिकृत उमेदवार मा. #पृथ्वीराज_चव्हाण यांना प्रचंड मतांनी विजयी करा. #VijayiBhav #विजयी_भव pic.twitter.com/zCmoVuNqoD
— 24x7politics (@24x7Politics) October 10, 2019
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
रयतक्रांती संघटनेची विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात १२ जागांची मागणी
रयतक्रांती संघटनेची विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात १२ जागांची मागणी
महायुतीमध्ये सामिल असलेल्या रयतक्रांती संघटनेने विधानसभा निवडणूकीसाठी राज्यात १२ जागांची मागणी केली आहे, अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी बुलडाणा येथे पत्रकारांशी बोलतांना दिली. तर बुलडाणा जिल्ह्यात मेहकर व चिखली मतदारसंघात रयतक्रांती संघटना निवडणूक लढणार असल्याचे खोत म्हणाले. रयतक्रांती संघटनेने वाळवा (सांगली), फलटण, दक्षिण कराड,  मान (सातारा), नायगाव…
View On WordPress
0 notes
aajkarashifal · 7 years ago
Text
ये हैं मुंबई और आस-पास के महिमावान हनुमान मंदिर
हनुमान जयंती की तरह ही महानगर के हनुमान मंदिरों में बुधवार को पांच दिन के दिवाली पर्व के दूसरे दिन नरक चतुर्दशी के भी विशेष अनुष्ठान होंगे। विमल मिश्र बता रहे हैं मुंबई और आस-पास के महिमावान हनुमान मंदिरों के बारे में। लबादेवी के पास पिकेट रोड का 156 वर्ष से अधिक प्राचीन श्री हनुमान मंदिर दक्षिण मुंबई का सबसे प्रसिद्ध मंदिर है। पर, वर्ष-दर-वर्ष यहां आ रहे लाखों दर्शनार्थियों को भी मंदिर प्रमुख के अद्भुत शौक के बारे में नहीं मालूम। वह निजी शौक जो उनके परिवेश और बजरंगबली के प्रति बालपन से कायम अनन्य श्रद्धा से जन्मा है। रानी महंत के पास पिछले 29 वर्षों में देश भर के लगभग हर राज्य से एकत्र की गईं हनुमान प्रतिमाओं का अमूल्य और दुर्लभ व्यक्तिगत संग्रह है। हर आकार-प्रकार और चांदी, कांसे, पीतल, शीशे, लकड़ी, पत्थर और अन्य पदार्थों से बनी ये प्रतिमाएं 950 की संख्या पार कर गई हैं। हनुमान प्रतिमाओं के इस व्यक्तिगत संग्रह में से हर की अलग ही कहानी है। प्रतिमाओं के रखरखाव और सुरक्षा की समस्या से जूझती रानी महंत की योजना इनके लिए एक अलग मंदिर या संग्रहालय के निर्माण की है। दो वर्ष पहले अरुण दामोदर दास महंत के असामयिक निधन के बाद मंदिर की आमदनी और उसके नियंत्रण को लेकर भाइयों के बीच ��ल रहा पारिवारिक विवाद अदालत में है। बहरहाल, मंदिर का नियंत्रण अरुण की पत्नी रानी महंत और बेटे करण महंत के हाथों में है, जो अमेरिका में रहते हैं। मंदिर के महंतों की यह छठी पीढ़ी है। मूलतः जोधपुर की रानी पति की स्मृति में 'अरुणोदय' कार्यक्रम के संचालन के अलावा कैंसरग्रस्तों, नेत्रहीनों और स्वास्थ्य शिविरों का आयोजन करती हैं, साथ में आध्यात्मिक कार्यक्रम भी। हनुमान बिल्डिंग के 36 किराएदारों में ज्यादातर वकील हैं। मथुराजी से आए पिकेट रोड के हुनमानजी दक्षिणाभिमुख हैं और सामान्य धारणा के विपरीत स्वयंभू नहीं हैं। प्रतिमा की उम्र 287 वर्ष बताई जाती है। हर हनुमान मंदिर की तरह पिकेट रोड के हनमान मंदिर में भी भक्तों की लाइन मंगलवार और शनिवार को सबसे लंबी होती है। इन विशेष दिनों और पूर्णिमा पर यहां सिंदूर, चांदी के वर्क और हिना के इत्र, आदि का विशेष श्रृंगार होता है। आम और खास-दोनों ही यहां के भक्त हैं। इनमें द्वारिका पीठ के शंकराचार्य स्वरूपानंद, टाडा कोर्ट के जाने-माने न्यायाधीश पी.डी. कोडे, उज्ज्वल निकम और रामनाथ गोयनका का नाम विशेष रूप से लिया जाता है। हनुमान जयंती के बाद हनुमान मंदिरों में नरक चतुर्दशी (काली चौदस) विषद् पूजा के साथ विशेष दिन है। भक्तजन तिल्ली का तेल, उड़द की दाल और सिंदूर चढ़ाएंगे, साथ में बेसन के लड्डू। हनुमान जयंती पर पालने पर हनुमानजी का प्रकटोत्सव होता है और हनुमान भक्त तुतारी बजाते हुए परंपरागत भूषा में पालकी यात्रा निकालते हैं। भक्तों की लंबी पंक्तियां देखते हुए इन अवसरों पर मंदिरों को दर्शनार्थियों से चढ़ावे के तेल के सैशे लेकर रख लिए जाते हैं- इस अनुरोध के साथ कि तेल लेपन की विषद प्रक्रिया बाद में की जाएगी। महिमावान हनुमान मंदिर महाराष्ट्र में 11 मारुति मदिरों का एक पूरा सर्किट हैं। सातारा, कराड और कोल्हापुर स्थित इन मंदिरों की स्थापना 17वीं शताब्दी में छत्रपति शिवाजी के गुरु संत समर्थ रामदास ने की थी। वस्तुतः हनुमान इतने महिमावान देवता हैं कि अलग न सही, पर ज्यादातर मंदिरों में उनकी उपस्थिति मिल जाएगी। पिकेट रोड के हनुमान मंदिर की तरह तकरीबन सभी हनुमान मंदिरों में श्री राम-सीता और लक्ष्मण भी विराजमान मिलेंगे। मुंबई के सबसे प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर क�� ह��� लें, यहां मौजूद हनुमान मंदिर की प्रतिमा 1952 में एलफिंस्टन रोड के निकट सयानी रोड के विस्तार के दौरान खुदाई में पाई गई थी। सड़क बनाने में लगे मुंबई महानगरपालिका के कर्मचारियों ने उसे पास ही रख दिया और काम में लग गए। जब यह बात सिद्धिविनायक मंदिर के मुख्य पुजारी गोविंद पाठक को पता चली, तो वे प्रतिमा को मंदिर में ले आए, अलग से एक मंदिर बनवाया और उसे वहां प्रति��्ठापित कर दिया। मुंबादेवी के मुख्य परिसर में भी हनुमान विराजमान हैं। श्री स्वयंभू पाताली हनुमानजी मंदिर छोटा सही, पर महिमावान है। महालक्ष्मी मंदिर जाते समय उन्हें सिर नवाकर ही जाना पड़ता है। जुहू के हरे राम-हरे कृष्ण मंदिर में श्री श्री गौरा-निताई और श्री श्री राधा रासबिहारी के साथ श्री श्री सीता राम लक्ष्मण हनुमान की प्रतिमाएं भी शोभायमान हैं। स्वयंभू हनुमानजी की मूर्ति वाले मंदिरों में वडाला के श्री राम मंदिर के सामने वाले अलबेला हनुमान मंदिर का विशिष्ट स्थान है। सदियों पहले जब सारा इलाका जंगल था, यहां के गुजरते एक राजा को हनुमानजी की यह मूर्ति प्राप्त हुई। इसे लाते हुए एक स्थान पर हनुमानजी अड़ गए। अब पवनसुत बहुत कोशिशों के बावजूद एक सूत भी आगे बढ़ने को तैयार नहीं। लाचार, राजा ने इसे ही प्रभु की इच्छा मान वहीं उनका मंदिर बना दिया। इस मंदिर का इतिहास 15वीं शताब्दी जितना या उससे भी प्राचीन माना जाता है। आपाद मस्तक सिंदूर से लदी, मूंछधारी भगवान का मुख भाग श्याम है। मंदिर में गणेश सहित अन्य देवताओं की भी प्रतिमाएं हैं और दीवारों पर भगवान की विभिन्न लीलाओं के चित्र सुशोभित हैं। इसी नाम का एक मंदिर परेल शिवड़ी में भी है। जाने कैसे पुरातत्व विभाग की नजर सांताक्रुज (पूर्व) महामार्ग स्थित हनमान टेकड़ी मंदिर से फिसल गई है। सिद्ध मठ माना जाने वाला यह मंदिर कभी 12 एकड़ क्षेत्र में फैला हुआ था। 1965 में इस बड़ा हिस्सा पश्चिमी महामार्ग की भेंट चढ़ गया। अत्यंत प्राचीन इस मंदिर के बारे में मान्यता है कि इसमें बर्बरीक सहित महाभारत युग के कई योद्धाओं ने उपासना की थी। कबूतरखाना स्थित हनुमान मंदिर दादर ही नहीं, मुंबई के सबसे प्रसिद्ध मंदिरों में से एक है जिसके परिसर में स्थित मस्जिद और चर्च मुंबई के सर्वधर्म सद्भभाव की अनुपम मिसाल हैं। इसी तरह भायखला में स्वयंभू श्री हनुमान मंदिर, मोती मस्जिद और ग्लोरिया चर्च एक-��ूसरे के बिल्कुल पास और सामने हैं। 'रामायण' के सुरसा प्रकरण की याद दिलाता नेरूल के एसआईईएस परिसर में (नवी मुंबई) में 33 फुट ऊंचा 'विश्वरूप आंजनेय' भारत के इस इलाके में अपनी तरह का अपना मंदिर है। छह फुट ऊंचे कमल आसन पर विराजमान इस प्रतिमा की प्राण प्रतिष्ठा कांची मठ के शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती ने 9 फरवरी, 2000 को की थी। एक ही प्रस्तर खंड से बनी यह देश में सबसे ऊंची हनुमानजी की प्रतिमा है। नेरूल का दंड मारुति जागृत हनुमान मंदिर, तुर्भे का श्री दक्षिण मुखी हनुमान मंदिर और पनवेल का पंचमुखी हनुमान मंदिर भी नवी मुंबई के प्रसिद्ध हनुमान मंदिरों में से है। मुंबई का प्रवेशद्वार माने जाने वाले इगतपुरी में स्टेशन के बिल्कुल बाहर दक्षिणमुखी हनुमान मंदिर (अन्य नाम संकटमोचन हनुमान) को लेकर भी कई किंवदंतियां हैं। दक्षिणमुखी हनुमान-जो विशेष महिमावान माने गए हैं चेंबूर, बांद्रा, खेरवाड़ी, घाटकोपर, आदि स्थानों पर विराजे हैं। कांदिवली के 'काला हनुमान' भी दक्षिणाभिमुख हैं। शहर में ऐसे बहुत से महिमावान हनुमान मंदिर हैं। मसलन, दादर के बाल हनुमान, पवई का हनुमान मंदिर जो 1925 के जमाने का है। खार (पश्चिम) में स्टेशन से मुश्किल से दस मिनट की दूरी पर मधु पार्क के पास श्री घंटेश्वर हनुमान मंदिर जिसकी विशेषता है भक्तों द्वारा मन की मुराद पूरी होने पर चारों ओर लगाई घंटियां। लिंक रोड, मालाड (पश्चिम) में गोरेगांव स्पोर्ट्स क्लब और इनआर्बिट मॉल के पास श्री इच्छापूर्ति हनुमान मंदिर की भी अच्छी प्रतिष्ठा है। अन्य मंदिरों में मुलुंड (पश्चिम) स्टेशन के बाहर का हनुमान मंदिर, सीप्झ, अंधेरी स्थित पंच देव इच्छापूर्ति हनुमान मंदिर, कांदिवली का जय बजरंगबली मंदिर और साने गुरूजी रोड, सात रास्ता (भायखला) का संकट मोचन हनुमान मंदिर प्रमुख हैं। विलेपार्ले (पूर्व) और वीरा देसाई इंडस्ट्रियल इस्टेट की तो सड़कों के नाम ही यहां के हनुमान मंदिर के नाम पर हैं। मोबाइल ऐप डाउनलोड करें और रहें हर खबर से अपडेट। http://dlvr.it/Pvq1Wg
0 notes
khabaruttarakhandki · 4 years ago
Text
महाराष्‍ट्र: उद्धव ठाकरे ने विधान परिषद सदस्‍य के रूप में शपथ ली, सीएम बने रहने को लेकर रास्‍ता साफ
उद्धव ठाकरे महाराष्‍ट्र के उच्‍च सदन विधान परिषद के सदस्‍य चुने गए हैं
मुंंबई:
महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) को आज विधान परिषद (Legislative Council) के सदस्य के रूप में शपथ दिलाई गई है, इससे उन्‍होंने 28 मई के बाद भी राज्‍य के सीएम पद (Chief Minister’s Job) पर बने रहने की ‘बाधा’ पार कर ली है. गौरतलब है कि उद्धव ने 28 नवंबर 2019 को मुंबई के सीएम पद की शपथ ली थी, सीएम पद संभालते समय वे महाराष्‍ट्र के किसी भी सदन (विधानसभा और विधान परिषद) के सदस्‍य नहीं थे, ऐसे में उन्‍हें सीएम पद पर बने रहने के लिए छह माह के अंदर इनमें से किसी भी सदन का सदस्‍य बनना जरूरी था. महाराष्‍ट्र सहित पूरे देश में कोरोना वायरस की महामारी के चलते उच्‍च सदन (विधान परिषद) के चुनावों को लेकर काफी समय तक अनिश्चितता की स्थिति रही थी और इसे राज्‍य के गवर्नर भगत सिंह कोश्‍यारी और राज्‍य में सत्‍तारूढ़ शिवसेना-एनसीपी और कांग्रेस के गठबंधन के बीच सियासी खींचतान के रूप में देखा जा गया था. हालांकि बाद में इस बारे में रास्‍ता साफ हुआ था. विधान परिषद में नौ सीटों के लिए कोई चुनाव नहीं हुए थे और 59 वर्षीय ठाकरे निर्विरोध चुने गए थे.
यह भी पढ़ें
दक्षिण मुम्बई स्थित विधान भवन में महाराष्ट्र विधान परिषद के अध्यक्ष रामराजे निम्बाल्कर ने सोमवार को ठाकरे और 14 मई को निर्विरोध चुने गए अन्य आठ लोगों को शपथ दिलाई. उद्धव ठाकरे के अलावा विधान परिषद की उपसभापति नीलम गोरे (शिवसेना), भाजपा के रणजीत सिंह मोहिते पाटिल, गोपीचंद पाडलकर, प्रवीण दटके और रमेश कराड, राकांपा के शशिकांत शिंदे और अमोल मितकरी तथा कांग्रेस के राजेश राठौड़ ने शपथ ग्रहण की.
Tumblr media
 उद्धव ने विधान परिषद सदस्‍य के रूप में शपथ ग्रहण की
ये नौ सीटें 24 अप्रैल को खाली हुई थीं. शिवसेना अध्यक्ष उद्धव इस चुनाव के साथ पहली बार विधायक बने हैं. उन्होंने पिछले साल 28 नवंबर को मुख्यमंत्री पद की शपथ ली थी और उनके लिए 27 मई से पहले विधानमंडल के दोनों सदनों में से किसी एक का सदस्य बनना जरूरी था. ठाकरे के बेटे आदित्य भी विधानसभा के सदस्य हैं और तीन पार्टी की गठबंधन सरकार में मंत्री भी हैं. (भाषा से भी इनपुट)
from WordPress https://ift.tt/3dXcq6k
0 notes
airnews-arngbad · 19 days ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक:27.10.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
ठळक बातम्या
महाविकास आघाडीच्या तीनही प्रमुख घटक पक्षांसह भाजपकडूनही दुसरी उमेदवार यादी जाहीर
राज्यात २४ जिल्ह्यांमध्ये ९१५ शॅडो मतदान केंद्र उभारण्याचा निवडणूक विभागाचा निर्णय
मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनामार्फत विविध उपक्रम
नांदेडच्या ५२ महाराष्ट्र बटालियन अंतर्गत परभणी इथं राष्ट्रीय छात्र सेना प्रशिक्षण शिबीर
आणि
पुणे क्रिकेट कसोटीत भारताचा ११३ धावांनी पराभव करत न्यूझीलंडची मालिकेत विजयी आघाडी
सविस्तर बातम्या
महाविकास आघाडीतल्या तीनही प्रमुख घटक पक्षांनी काल उमेदवारांची पुढची यादी जाहीर केली. काँग्रेसनं २३ उमेदवारांची दुसरी, तर १६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. यामध्ये जालना मतदारसंघातून कैलास गोरंट्याल, औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून मधुकर देशमुख, निलंगा - अभयकुमार पाटील, नांदेड दक्षिण - मोहनराव हंबर्डे, देगलूर  - निवृत्ती कांबळे, मुखेड - हणमंतराव बेटमोगरेकर तर तुळजापूर मतदारसंघातून कुलदीप पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या १५ उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत हिंगोली मतदारसंघातून रुपाली पाटील तर परतूर मतदारसंघातून आसाराम बोराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं काल जाहीर केलेल्या यादीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर इथून सतीश चव्हाण, बीड मधून संदीप क्षीरसागर धाराशिव जिल्ह्यात परांडा इथून राहुल मोटे, येवला - माणिकराव शिंदे, तर अहिल्यानगर शहर मतदार संघातून-अभिषेक कळमकर यांचा समावेश आहे.
****
भाजपनेही काल २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये नाशिक मध्य मतदार संघातून देवयानी फरांदे, जत मतदारसंघातून गोपीचंद पडळकर, वरोरा इथून करण संजय देवतळे, धुळे ग्रामीण - राम भदाणे, लातूर ग्रामीण - रमेश कराड तर पंढरपूर मतदार संघातून समाधान औताडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
महाराष्ट्र नवनिर्माण सनेनं काल पाचवी यादी जाहीर केली. यामध्ये गंगाखेड मतदारसंघातून रुपेश देशमुख, फुलंब्री  - बाळासाहेब पाथ्रीकर, उस्मानाबाद - देवदत्त मोरे, परांडा - राजेंद्र गपाट तर बीड मतदारसंघातून सोमेश्वर कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 
****
अखिल भारतीय मजलिस ए इत्तेहादूल मुसलिमिन - ए आय एम आय एम नं विधानसभा निवडणुकीसाठी दोन उमेदवार काल जाहीर केले. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून माजी खासदार इम्तियाज जलिल, तर औरंगाबाद मध्य मतदारसंघातून नासेर सिद्दीकी निवडणूक लढवणार आहेत.
****
प्रहार जनशक्तीचे प्रदेशाध्यक्ष अनिल गावंडे यांनी काल मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं स्वागत करत, त्यांची भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. गावंडे यांचे सहकारी आमदार प्रकाश डहाके आणि यांच्या पत्नी सई डहाके यांनीही यावेळी भाजपत प्रवेश केला.
****
विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवार देण्याऐवजी महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या नोंदणीकृत प���्षाच्या चिन्हावर उमेदवार उभे करावेत, असा प्रस्ताव स्वराज्य पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्याकडे मांडला आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी काल जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं जरांगे यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केली.
दरम्यान, शिवसेना नेते उदय सामंत यांनीही काल मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाररथाला काल पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी हिरवा झेंडा दाखवला. राष्ट्रवादीने आपल्या प्रचारासाठी तयार केलेल्या या विशेष एलईडी व्हॅनच्या माध्यमातून, महायुतीच्या काळात राबवलेल्या विविध योजना मतदारांना दाखवण्यात येणार आहेत.
****
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मुख्य निवडणूक विभागामार्फत राज्यात एकूण २४ जिल्ह्यांमध्ये ९१५ शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक २३२ शॅडो मतदान केंद्र, तर सांगलीत एक शॅडो मतदान केंद्र असणार आहेत. मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात नऊ, बीड इथं बावीस आणि नांदेड इथं बारा शॅडो मतदान केंद्र उभारण्यात येणार असल्याचं विभागामार्फत सांगण्यात आलं. मतदानाच्या दिवशी विशेष मेसेंजर, वॉकी-टॉकी, व्ही एच एफ, वायरलेस सेंटर, वायरलेस कम्युनिकेशन सेवा, सॅटेलाईट फोन, वने आणि पोलीस विभागाचा रनर या विशेष सेवा शॅडो मतदान केंद्रात कार्यरत असतील. याशिवाय बी एस एन एल मार्फत पर्यायी संदेश वहनाची यंत्रणाही कार्यरत असेल.
****
विधानसभेसाठी येत्या २० नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सर्व मतदारांनी या दिवशी मतदान करण्याचं आवाहन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी केलं आहे.
बाईट
****
श्रोते हो, विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं ‘आढावा विधानसभा मतदारसंघांचा’ हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी सात वाजून १० मिनिटांनी आकाशवाणीवरुन प्रसारित होत आहे. या कार्यक्रमात आज रायगड जिल्ह्यातल्या विधानसभा मतदारसंघांचा आढावा आपल्याला ऐकता येईल.
****
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या तिसऱ्या आवृत्तीचा हा पाचवा भाग असेल. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांव��ुन सकाळी ११ वाजता या कार्यक्रमाचं थेट प्रसारण होईल.
****
मतदानाचं प्रमाण वाढवण्यासाठी प्रशासनामार्फत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून, हिंगोली इथं स्वीप समितीमार्फत शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून संकल्प पत्र भरून घेण्यात येत आहेत. या संकल्प पत्रातून विद्यार्थी आपल्या पालकांना मतदान करण्याबाबत आग्रह करत आहेत. या पत्रातला मजकूर विद्यार्थ्यांनी वाचून दाखवला... 
बाईट
****
धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर नगर परिषदेच्या प्राथमिक शाळा क्रमांक दोन मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना एस एम एस तसंच व्हाट्सअप वर संदेश पाठवून मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. गटशिक्षणाधिकारी मेहरुबा इनामदार आणि मुख्याध्यापक गणेश रोचकरी यांच्या मार्गदर्शनात शिक्षकांच्या मोबाईलवरून विद्यार्थ्यांनी हे संदेश पाठवले आहेत.
****
अहिल्यानगर जिल्ह्यात पाथर्डी इथल्या श्री सच्चिदानंद बंडोबा महाराज माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मानवी साखळीद्वारे ‘से येस टू वोट’ हा संदेश तयार केला. ३०० विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले होते. यावेळी शाळेत रांगोळी, निबंध, चित्रकला अशा विविध स्पर्धांही घेण्यात आल्या.
****
मतदान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं राष्ट्रीय कर्तव्य उत्साहाने पूर्ण करावं, असं आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केलं आहे. नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाच्या कौठा इथं झालेल्या पहिल्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते काल बोलत होते. या प्रशिक्षणात ८८४ मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं. या मतदार संघातल्या हैदरबाग परिसरात काल मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला.
****
धाराशिव जिल्ह्यात, ५७ पैकी ३३ महसूल मंडळात सततच्या पावसानं झालेल्या शेतीच्या नुकसानीचा अहवाल शासनास सादर झालाआहे. मात्र, यासोबतच उर्वरित २४ महसूल मंडळातल्या नुकसानग्रस्त शेतकर्‍यांनाही नैसर्गिक आपत्तीअंतर्गत मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी राज्याच्या मदत, पुनर्वसन आणिव आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रधान सचिवांना पत्र लिहून, सध्याच्या आचारसंहिता काळात राज्य निवडणूक आयुक्तांच्या अनुमतीने भरपाई देण्याची मागणी केली आहे.
****
परभणी, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या ५२ महाराष्ट्र बटालियन नांदेड अंतर्गत परभणी इथं राष्ट्रीय छात्र सेनेचं प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आलं आहे. या शिबीरात ड्रिल, फायरि��ग, शस्त्र ओळख तसंच प्रशिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, गस्त घालणं, घात लावणं आदींचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. या शिबीरात ४६९ एन.सी.सी. कॅडेट्स सहभागी झाले असल्याची माहिती कर्नल एम. रंगा राव यांनी दिली.
****
भारत आणि न्यूझीलंड दरम्यान सुरू असलेल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना न्यूझीलंड संघानं ११३ धावांनी जिंकला. काल तिसऱ्या दिवशी न्यूझीलंडचा दुसरा डाव २५५ धावांवर आटोपला. न्यूझीलंडनं पहिल्या डावातल्या १०३ धावांच्या आघाडीसह भारताला विजयासाठी ३५९ धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र भारताचा दुसरा डाव २४५ धावांवर संपुष्टात आला. तीन सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडच्या संघानं २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. मालिकेतला अखेरचा तिसरा सामना मुंबईत येत्या एक नोव्हेंबरपासून खेळला जाणार आहे.
****
लातूर इथं कालपासून तीन दिवसीय राज्यस्तरीय शालेय योगासन स्पर्धेला सुरूवात झाली. या स्पर्धेत राज्यभरातून ३३६ खेळाडू सहभागी झाले.
****
0 notes
airnews-arngbad · 7 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 29 April 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २९ एप्रिल २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राजकीय नेत्यांचे झंझावाती प्रचार दौरे.
शांतिगिरी महाराज यांचा नाशिकमधून शिवसेना उमेदवार म्हणून दुसरा अर्ज;ए बी फॉर्म जोडण्यासाठी तीन मे पर्यंत मुदत.
चौथ्या टप्प्यातल्या निवडणुकीचं चित्र स्पष्ट-जालन्यात २७, बीड ४१ तर औरंगाबाद लोकसभा मतदार संघात ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.
आणि
आयपीएल क्रिकेटवर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या १० जणांना गडचिरोली इथं अटक.
****
लोकसभा निवडणूकीच्या चौथ्या टप्प्याचा प्रचार शिगेला पोहचला आहे. सर्वच पक्षांचे महत्त्वाचे नेते आपापल्या उमेदवारांसाठी झंझावाती प्रचार दौरे करत आहेत. सातारा इथले महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कराड इथं प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मरण करत, कलम ३७०, आरोग्य सुविधा, महिला सक्षमीकरण, आदी मुद्यांवर भाष्य केलं.
विरोधकांकडून बनावट चित्रफिती पसरवल्या जात असल्याचा आरोप करत, नागरिकांनी त्यापासून सावध राहावं, तसंच अशा प्रकारांवर निवडणूक आयोगानं कठोर कारवाई करावी, असं आवाहन मोदी यांनी केलं.
सोलापूरचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी मोदी यांनी आज सोलापुरात सभा घेतली. संविधान आणि आरक्षण काढून घेण्याचा अपप्रचार जरी विरोधकांकडून चालू असेल तरी त्यास धक्का लागू देणार नसल्याचा पुनरुच्चार मोदी यांनी केला.
पुण्यातले महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ मोदी यांची आज सभा होत आहे.
तर उद्या माळशिरस, उस्मानाबाद आणि लातूर इथं मोदी यांच्या प्रचारसभा होणार आहेत.
लातूर इथं सारोळा रस्त्यावर ४० एकर मैदानावर ही सभा होणार असून, उन्हापासून बचावासाठी अडीच लाख चौरस फूट मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. या सभेची तयारी पूर्ण झाली असून पोलिस अधिकाऱ्यांसह भाजप नेत्यांनीही या पूर्वतयारीचा आज आढावा घेतला.
****
ठाणे लोकसभा मतदारसंघाचा युतीचा उमेदवार गुजरातमधून ठरणार असल्याची टीका युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते आज ठाणे इथं महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचार फेरीत बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह अनेक मान्यवर या फेरीत सहभागी झाले होते. 
****
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात अनेक उमेदवारांनी आज नामनिर्देशनपत्रं दाखल केली. या टप्प्यात राज्यातल्या धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतल्या सहा मतदारसंघांचा समावेश असून, तीन मे पर्यंत उमेदवारी अर्ज भरता येणार आहेत.
महाविकास आघाडीचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विद्यमान खासदार अरविंद सावंत, दक्षिण - मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई तसंच ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांनी आज अर्ज दाखल केला.
****
दक्षिण मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला.
इतर मागास वर्ग जनमोर्चाचे मल्लिकार्जुन सायबन्ना पुजारे यांनी ठाणे लोकसभा मतदार संघातून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.
धुळे लोकसभा मतदार संघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे तसंच अपक्ष उमेदवार लहानू महादू साबळे यांनीही आज नामनिर्देशन पत्र दाखल केलं.
****
नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीचे अनुक्रमे राजभाऊ वाजे तसंच भास्कर भगरे यांनी अर्ज दाखल केले. नाशिक इथून गेल्या शुक्रवारी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणारे शांतिगिरी महाराज यांनी आज शिवसेना उमेदवार नावाने उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांना पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचा ए बी फॉर्म जोडण्यासाठी तीन मे पर्यंतची मुदत जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात अर्ज मागे घेण्याची मुदत आज संपली. मराठवाड्यात जालना, बीड आणि औरंगाबाद लोकसभा मतदार संघात या टप्प्यात मतदान होणार आहे.
जालना लोकसभा मतदार संघातून आज नऊ उमेदवारांनी माघार घेतली, आता या मतदार संघातून २७ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
बीड लोकसभा मतदार संघातून आज १४ उमेदवारांनी माघार घेतली, आता ४१ उमेदवार निवडणूक रिंगणात असल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे.
औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून आज सात उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे आता या मतदार संघातून ३७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या उमेदवारांना चिन्हांचं वाटपही आज करण्यात आलं.
****
इंदूर इथले काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार अक्षय कांती बम यांनी धक्कातंत्राचा अवलंब करत, आज आपला उमेदवारी अर���ज मागे घेतला. भाजपचे स्थानिक नेते यावेळी उपस्थित होते. बम यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याचं वृत्त आहे.
****
लोकसभा निवडणुकीचा आढावा घेणारा ‘लोकनिर्णय महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम, आकाशवाणीनं सुरू केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण औरंगाबाद लोकसभा मतदार संघाचा आढावा घेणार आहोत. संध्याकाळी सव्वा सात वाजता आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल.
****
हंगामी फ्लूच्या प्रार्दुभावावर लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासनांबरोबर आज आढावा बैठक घेतली. कोणत्याही राज्यात फ्ल्य���च्या साथीची परिस्थिती आढळून आलेली नाही. मात्र अमेरिकेत विविध राज्यांमधून दुधाळ पशू आणि दुधामध्ये एविअन फ्ल्यूचे विषाणू आढळल्याच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. आरोग्याच्या दृष्टीकोनातून नागरिकांनी दूध व्यवस्थित उकळावं आणि मांसाहारी पदार्थ व्यवस्थित शिजवावेत असा सल्ला आरोग्य तज्ज्ञांनी दिला आहे.
****
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मतदार संघासाठी नियुक्त खर्च निरीक्षक सागर श्रीवास्तव यांनी नाशिकमधील सहाही विधानसभा मतदार संघातल्या वाहतूक तपासणी नाक्यांना अचानक भेट देऊन पाहणी केली. एखाद्या वाहनात ५० हजार रूपयांपेक्षा अधिक रक्कम आढळल्यास सहायक खर्च निरीक्षकांना तातडीनं माहिती द्यावी अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.
****
लोकसभा निवडणुकीसाठी धुळे मतदासंघांकरीता नियुक्त निवडणूक खर्च निरीक्षक व्यंकटेश जाधव यांनी आज मालेगाव शहर, मालेगाव बाह्य आणि बागलाण मतदारसंघाचा खर्च विषयक आढावा घेतला. धुळे लोकसभा मतदार संघात येत्या २० मे ला निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर जाधव यांनी ही पाहणी केली. बैठे आणि फिरत्या पथकांनी आयोगाच्या निर्देशानुसार प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, खर्च विषयक नोंदणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सतर्क रहावं तसंच येणाऱ्या वाहनांची दक्षतेनं तपासणी करावी असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
****
पालघर लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप कार्यक्रमाअंतर्गत विविध जनजागृती कार्यक्रम राबवण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय जलतरण पटू शुभम वनमाळी यांनी पालघरकरांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान इथं निवडणूक भरारी पथकानं १ लाख १९ हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे. शिर्डी लोकसभा निवडणुकीसाठी कार्यकारी दंडाधिकारी दिनकर सचिन सुरेश यांच्या नेतृत्वात पथकानं ही कारवाई केली. नियमित तपासणी दरम्यान नेवासा - श्रीरामपूर रोडवर येणाऱ्या गाड्यांची तपासणी करत असतांना एका चारचाकीतून ही रक्कम हस्तगत करण्यात आली. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार ५० हजार रुपयांच्या वरील रकमेचा हिशोब संबंधितास व्यवस्थित न देता आल्यास सदर रक्कम जमा करण्यात येत असते. 
****
यवतमाळ शहरालगतच्या जामवाडी घाटात डिझेल वाहतूक करणारा टँकर उलटल्यानं लागलेल्या भीषण आगीत सहचालक गोपाल पवार यांचा होरपळून मृत्यू झाला. तर चालकानं वेळेप्रसंगी उडी मारल्यानं तो बचावला. पुलगाव इथून हरसूलकडं जाणारा डीझल चा टँकर वळणावर पलटला, त्यानंतर त्यातील डीझल ��े पेट घेतला. त्यामुळं दारव्हा मार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे
****
गडचिरोलीमध्ये आयपीएल क्रिकेट स्पर्धांवर ऑनलाईन सट्टा लावणाऱ्या अड्ड्यांवर अहेरी पोलिसांनी आज छापा टाकला. याप्रकरणी १० जणांना अटक केली असून त्यांच्या जवळून ४ मोबाईल फोन आणि सुमारे साडे नऊ हजार रुपयांची रोकड जप्त केली.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स चा सामना दिल्ली कॅप्टिल्स बरोबर कोलकाता ईडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. हा सामना संध्याकाळी साडे सात वाजता वाजता सुरु होईल.
****
ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. दा.धों.काचोळे लिखित 'मराठा समाज शास्त्रीय वास्तव या पुस्तकाचं आज प्रसिद्ध विचारवंत डॉ.ऋषिकेश कांबळे यांच्या हस्ते प्रकाशन झालं. छत्रपती संभाजीनगर इथल्या एमजीएम विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमात, डॉ कांबळे यांनी बोलतांना, हे पुस्तक म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक परिवर्तनाच्या मार्गावर टाकलेलं पहिलं यशस्वी पाऊल असल्याचं नमूद केलं. काचोळे यांचं हे प्रकाशित झालेलं सत्तरावं पुस्तक आहे.
****
राज्यात उन्हाचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन महिन्यात उष्माघाताच्या १८४ रुग्णांची नोंद झाली. राज्यात सर्वाधिक २० रुग्ण धुळे जिल्ह्यातले आहेत. त्या खालोखाल ठाणे १९, नाशिक १७, वर्धा १६, बुलडाणा १५, सातारा १४, सोलापूर १३ आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० उष्माघाताचे रुग्ण आहेत.
****
0 notes