#अतुल भोसले
Explore tagged Tumblr posts
6nikhilum6 · 2 months ago
Text
Pune : शिवाजीनगर येथे कामगार भवनाची पायाभरणी
एमपीसी न्यूज – शिवाजीनगर येथे (Pune) उभारण्यात येणाऱ्या कामगार भवनाची उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पायाभरणी करण्यात आली.  यावेळी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, कामगार आयुक्त डॉ. एच. पी. तुम्मोड, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अपर…
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 September 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०६ सप्टेंबर २०२३सकाळी ७.१० मि.
****
भारतातले शिक्षक आणि विद्यार्थी देशाला विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठेवतील-राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात राष्ट्रपतींचं प्रतिपादन
राज्यशासनाचे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान
मराठा आरक्षणाचा अध्यादेश चार दिवसांत काढा-उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची मागणी
आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवण्याची गरज शरद पवार यांच्याकडून व्यक्त
औरंगाबाद जिल्ह्यात २० महसूल मंडळातली ३२१ गावं २५ टक्के अग्रीम विमा नुकसान भरपाईसाठी पात्र
उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामाच्या नुकसानभरपाईची उर्वरित रक्कम देण्याचे विमा कंपनीला निर्देश
आणि
आगामी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा
****
भारतातले शिक्षक आणि विद्यार्थी देशाला विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठेवतील, असा विश्वास राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्यक्त केला आहे. काल नवी दिल्लीत राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराचं वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. बालकांना ज्ञान देण्याइतकंच त्यांच्यावर प्रेम करणं आवश्यक असल्याचं, त्यांनी नमूद केलं. यावेळी ५० शालेय शिक्षकांसह एकूण ७५ शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. रौप्यपदक, ५० हजार रुपये, आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरुप आहे. राज्यातल्या पाच शिक्षकांना यावेळी राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यामध्ये पुण्याच्या मृणाल गांजाळे, मुंबईचे डॉ. राघवन बी. सुनोज, स्वाती देशमुख तसंच केशव सांगळे, आणि धुळयाचे डॉ.चंद्रगौडा पाटील या शिक्षकांचा समावेश आहे.
****
शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांची जबाबदारी कमी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून, या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबत निर्णय घेणार असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. काल मुंबईत राज्यशासनाचे क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक गुणगौरव पुरस्कार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. काळाच्या ओघानुसार शिक्षण पद्धतीत बदल करणं, तसंच शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी काम करण्याची आवश्यकता मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. शिक्षण क्षेत्र अधिक विस्तारीत होण्याची, अद्ययावत होण्याच्या गरजेव��ही त्यांनी भर दिला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मराठवाड्यातल्या २१ शिक्षकांना यावेळी गौरवण्यात आलं, यामध्ये औरंगाबाद इथले डॉ विनोद सिनकर, डॉ सविता मुळे, डॉ संतोष भोसले, नांदेड जिल्ह्यातल्या दीप्ती बिश्त, सुरेंद्र कुडे, शेख इरफान, आणि दीपक भांगे, जालन्याचे कल्याण सोळुंके, आणि निलेश जोशी, बीडचे महेश चंद्रकांत गाडे आणि अण्णासाहेब घोडके, परभणीच्या छाया गायकवाड, आणि योगेश ढवारे, हिंगोलीचे अशोक सुरवसे, आणि शंकर लेकुळे, लातूरचे महादेव खळुरे, डॉ. संदीपान जगदाळे, आणि डॉ. सतीश सातपुते, तर उस्मानाबादचे बालासाहेब चिवडे, भैरवनाथ कानडे, आणि विक्रम पाचंगे या शिक्षकांचा काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सतकार करण्यात आला.
****
आयुष्मान भारत मोहीम प्रभावीपणे राबवून २०२५ पर्यंत देशाला क्षयरोग मुक्त करण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे निर्देश, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिले आहेत. काल मुंबईत या संदर्भात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. राज्यात येत्या १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या काळात, 'आयुष्मान भव' मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत विविध उपक्रम राबवले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यशासनाने चार दिवसांत मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढावा, अशी मागणी उ���ोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. राज्यशासनाच्या शिष्टमंडळानं काल जालना जिल्ह्यात आंतरवाली सराटी इथं पाटील यांची भेट घेतली, त्यानंतर ते बोलत होते. या शिष्टमंडळात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, माजीमंत्री अर्जुन खोतकर यांचा समावेश होता. महाजन यांनी यावेळी बोलताना, मराठा आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असल्याचा पुनरुच्चार करत, हा प्रश्न निकाली काढण्यासाठी एका महिन्याचा कालावधी मागितला. मात्र, जरांगे पाटील यांनी हा प्रस्ताव अमान्य करत, आरक्षणाबाबतचा निर्णय चार दिवसात घेण्याची मागणी केली.
महाजन यांनी या चार दिवसांच्या मुदतीत मुख्यमंत्र्यांशी तांत्रिक बाबींवर चर्चा करण्याचं आश्वासन देत, जरांगे पाटील यांना उपोषण सोडून मुंबईत येऊन चर्चा करण्यास सांगितलं, मात्र चार दिवसांच्या मुदतीनंतर निर्जळी उपोषण करणार असल्याचा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते विधिज्ञ प्रकाश आंबेडकर यांनीही काल जरांगे पाटील यांची भेट घेतली. येत्या अधिवेशनात मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
****
केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवली, तरच आरक्षणाचे सर्व प्र��्न सुटतील, असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते काल जळगाव इथं वार्ताहरांशी बोलत होते. इतर मागास प्रवर्ग - ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देणं योग्य नाही, आरक्षणाची मर्यादा १५ ते १६ टक्क्यांनी वाढवावी, असं ते म्हणाले. आंतरवाली सराटी इथं लाठीमारीचे आदेश कोणी दिले हे सरकारनेच सांगावं, असं पवार म्हणाले. विशेष अधिवेशन, एक देश एक निवडणुकीच्या मुद्यावरुन त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
****
मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण द्यायचं असेल तर ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्या, अशी भूमिका, विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे. ते काल नागपूर इथं प्रसार माध्यमांशी बोलत होते.
****
दरम्यान राज्यात कालही मराठा समाजाच्या वतीनं विविध ठिकाणी मोर्चे काढून आंदोलनं करण्यात आली. वाशिम जिल्ह्यात काल बंद पाळण्यात आला. अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या कोपर्डी इथल्या ग्रामस्थांनी, या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कालपासून आंदोलन सुरू केलं आहे. मुंबईच्या आझाद मैदानातही मराठा संघटनेनं आंदोलन सुरू केलं आहे.
****
जालना इथं आंदोलन आणि निदर्शनांमध्ये सहभागी सुमारे तीन हजार जणांवर पोलिसांनी विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले होते. यातल्या ३३ जणांना पोलिसांनी अटक केली होती. आंदोलन करणाऱ्या या सर्वांना काल जिल्हा आणि सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला. मराठा आरक्षण आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या सर्व आंदोलकांचा खटला मोफत लढवणार असल्याचं, वकील संघाचे अध्यक्ष विधिज्ञ राहुल चव्हाण यांनी जाहीर केलं आहे.
दरम्यान, जालना जिल्ह्यातली गेल्या चार दिवसापासून बंद असलेली बससेवा कालपासून सुरू झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
देशाचं नाव इंडिया, दॅट इज भारत, असं न म्हटलं जाता ते फक्त भारत, असं करण्यासाठी घटनादुरुस्ती करावी, अशी मागणी, भारतीय जनता पक्षाचे खासदार नरेश बन्सल यांनी सरकारकडे केली आहे. इंडिया हे नाव इंग्रजांनी दिलेलं असून, ते गुलामीचं प्रतिक आहे, असं मत बन्सल यांनी व्यक्त केलं.
यावर विविध राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. इंडिया हे नाव बदलण्याचा कोणालाही अधिकार नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे, तर, विरोधकांच्या आघाडीच्या नावामुळे देशाचं नाव बदलण्याचा घाट सरकार घालत आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र हा विचार स्वागतार्ह असल्याचं म्हटलं आहे. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. 
****
प्रधान��ंत्री पीक विमा योजनेत औरंगाबाद जिल्ह्यात २० महसूल मंडळातली ३२१ गावं २५ टक्के अग्रीम विमा नुकसान भरपाईसाठी पात्र ठरली आहेत. जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय यांनी या महसूल मंडळांसाठी याबाबतची अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या १०, औरंगाबाद तालुक्यातल्या चार, गंगापूर तालुक्यातल्या पाच तर फुलंब्री तालुक्यातल्या एका महसूल मंडळात, पेरणीपासून २१ दिवसांपेक्षा अधिक पावसाचा खंड झाला आहे. त्यामुळे कापूस, सोयाबीन आणि मका पिकाच्या उत्पादकेत ५० टक्के किंवा अधिक घट येण्याची शक्यता आहे. पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या बैठकीत जिल्हा कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी ही माहिती दिली. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित महसूल मंडळासाठी २५ टक्के अग्रीम विमा नुकसान भरपाईसंदर्भात अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची २०२२ च्या खरीप हंगामाच्या नुकसानभरपाईची उर्वरित रक्कम पीकविमा कंपनीनं द्यावी, असे आदेश राज्य तक्रार निवारण समितीनं विमा कंपनीला दिले आहेत. आमदार कैलास पाटील यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यात २०२२ च्या खरीप हंगामात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊनही विमा कंपनीनं केंद्रीय परिपत्रकाचा आधार घेत शेतकऱ्यांना फक्त पन्नास टक्के भरपाई दिली होती, त्याबाबत आमदार पाटील यांनी विधानसभेत लक्ष्यवेधी सूचना मांडली होती. त्यावर कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी राज्य समितीची बैठक घेण्याचं मान्य केलं होतं, त्यानुसार झालेल्या बैठकीत समितीनं शेतकऱ्यांच्या बाजूनं निकाल दिला आहे.
****
२०२३ च्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं पंधरा खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. काल मुंबईत अजित आगरकर यांच्या नेतृत्वातल्या निवड समितीनं संघातल्या खेळाडूंची नावं जाहीर केली. या संघाच्या कर्णधारपदी रोहित शर्मा आणि उप कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली आहे. के.एल.राहुल, श्रेयस अय्यर, विराट कोहली, शुभमन गिल, जसप्रीत बुमराह, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मोहम्‍मद शमी, अक्षर पटेल, ईशान किशन, सूर्यकुमार यादव तसंच कुलदीप यादव यांचाही संघात समावेश आहे. आशिया चषक स्पर्धेत खेळलेल्या संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि प्रसिद्ध कृष्णाचा विश्व चषक संघात समावेश करण्यात आलेला नाही. 
****
यूएस ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपन्ना आणि त्याचा ऑस्ट्रेलियाचा जोडीदार मॅथ्यू एब्डेन या जोडीने उपान्त्य फेरीत प्रवेश केला आहे. काल झालेल्या उपान्त्यपूर्व फेरीच्या सामन्यात बोपन्ना - एब्डेन जोडीने नाथानिएल लॅमन्स आओण जॅक्सन विथ्रो या अमेरिकी जोडीचा सात - सहा, सहा - एक असा पराभव केला.
****
आशिया चषक क्रिकट स्पर्धेत श्रीलंकेनं अफगा��िस्तानचा दोन धावांनी पराभव करत अंतिम चार मध्ये प्रवेश मिळवला आहे. काल लाहौर इथं झालेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेच्या संघानं ५० षटकात आठ बाद २९१ धावा केल्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा संघ ३८व्या षटकात २८९ धावांवर सर्��बाद झाला. भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांग्लादेश हे चार देश आता सुपर फोर मध्ये खेळणार आहेत.
****
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त परभणी जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयानं, ‘बालविवाहमुक्त परभणी’ या विषयावर, राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचं आयोजन केलं आहे. बालविवाह :एक सामाजिक कलंक, बालविवाह-बालकांच्या विकासातील अडथळा आणि मराठवाड्यातील बालविवाह- कारणे आणि उपाययोजना, हे निबंध स्पर्धेचे विषय असून, ही स्पर्धा सहा ते अठरा आणि खुल्या अशा दोन गटात होणार आहे. इच्छुकांनी आपले निबंध १७ सप्टेंबर पूर्वी पीडीएफ स्वरूपात डी डब्ल्यू सी डी ओ पी बी एन 2023 ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेल वर पाठवण्याचं आवाहन जिल्हा महिला आणि बालविकास विभागाने केलं आहे.
****
मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त काल हिंगोलीत तृतीयपंथी व्यक्ती आणि ऊसतोड कामगारांना ओळखपत्र वाटप, यासह अन्य कार्यक्रम घेण्यात आले. हिंगोलीच्या सामाजिक न्याय भवनात समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त राजू एडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी आणि जात वैधता प्रमाणपत्रं वाटप करण्यात आलं.
****
नागरिकांना प्रशासकीय अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधता यावा तसंच तक्रारींचा वेळीच आणि तालुकास्तरावरच निपटारा व्हावा यासाठी आता नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात येणार आहे. नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी ही माहिती दिली. यानुसार येत्या तेरा तारखेला भोकर पंचायत समितीमध्ये पहिला तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला आहे. भोकर तालुक्यातल्या नागरिकांना काही तक्रारी किंवा निवेदनं द्यायची असल्यास त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
****
राज्यशासनाने गौरी गणपती सणासाठी आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला आहे. परभणी जिल्ह्यात तीन लाख सात हजार १४५ लाभार्थ्यांना शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा मिळणार असल्याचं, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितलं.
****
उस्मानाबाद मध्ये एकवीस ते अठ्ठावीस ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातल्या अंगणवाडी सेविका, मि��ीअंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकर्ता आरोग्य तपासणी शिबीराचं विनामूल्य आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हा महिला बालविकास विभाग आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसंच जिल्हा रुग्णालय यांनी संयुक्तपणे हा उपक्रम राबवला. उमरगा, मुरुम, कळंब, तेर, वाशी, लोहारा आणि तुळजापूर तालुक्यांसह शासकीय रुग्णालयात झालेल्या या तपासणी शिबिरांमध्ये एकूण एक हजार दोनशे चोपन्न अंगणवाडी सेविका, मिनीअंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची संपूर्ण तपासणी करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
श्रीकृष्ण जन्माष्टमी आज साजरी होत आहे. औरंगाबाद शहरात नक्षत्रवाडी इथल्या योगेश्र्वर श्री कृष्ण मंदीराच्या वतीने यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
औरंगाबाद - जालना रस्त्यावर वरुड इथल्या आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ-इस्कॉन मंदिरातही आजपासून तीन दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
बीड जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून तात्काळ पीक विमा लागू करा यासह विविध मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने काल अंबाजोगाई इथं जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
****
0 notes
theinvisibleindian · 5 years ago
Text
तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा...
तर उदयनराजेंच्या पाठींब्याने हा उमेदवार लढणार कराड दक्षिण मधून विधानसभा…
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक, कराडचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केल्याने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि भाजपचे डाॅ. अतुल भोसले यांची डोकेदुखी वाढवली आहे.
यादव यांनी आज कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा व कराड नगरपालिकेतील यशवंत विकास आघाडीच्या नगरसेवकांचा मेळावा आयोजित करुन…
View On WordPress
0 notes
kokannow · 4 years ago
Text
मत्स्य महोत्सवा’च्या तारखेत बदल ; १२ – १४ फेब्रुवारीला होणार महोत्सव
मत्स्य महोत्सवा’च्या तारखेत बदल ; १२ – १४ फेब्रुवारीला होणार महोत्सव
सावंतवाडी​:​ सावंतवाडी तालुक्यात पहिलाच भव्य ‘मत्स्य महोत्सव’ होत आहे. सावंतवाडी शहरात जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान, सावंतवाडी इथं १२ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान सायंकाळी ५ ते रात्रौ १० या वेळेत हा फिश महोत्सव होणार आहे. अशी माहिती सिंधू आत्मनिर्भर अभियानचे संयोजक अतुल काळसेकर यांनी दिली‌. हा बदल करण्यात आला आहे, पूर्वीच्या तारीख मध्ये हा बदल केला आहे, यावेळी नगराध्यक्ष संजू परब,…
Tumblr media
View On WordPress
0 notes
toldnews-blog · 6 years ago
Photo
Tumblr media
New Post has been published on https://toldnews.com/hindi/film-wrap-%e0%a4%b8%e0%a5%8c%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%9f%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%82-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%82-%e0%a4%b8%e0%a4%b2%e0%a4%ae/
Film Wrap: सौम्या टंडन बनीं मां, सलमान की भारत का ट्रेलर 26 को - Bollywood news entertainment salman khan bharat trailer soumya tondon deepika tmov
Tumblr media
बॉलीवुड और टीवी की दिनभर की बड़ी खबरें पढ़ें एक साथ.
वीडियो में दि‍खी सलमान की ‘भारत’ की झलक, इस दिन आएगा ट्रेलर
सलमान खान की मोस्ट अवेटेड फिल्म भारत का ट्रेलर जल्द रिलीज़ होने जा रहा है. सलमान के फैंस ट्रेलर का बेसब्री से इंतज़ार कर रहे हैं. इसी बीच फिल्म के प्रोड्यूसर अतुल अग्निहोत्री ने एक वीडियो शेयर किया है. ये फिल्म सेट का है. वीडियो में कार चेस सीक्वेंस देखे जा सकते हैं. इससे पहले भी सलमान खान और अली अब्बास जफर दो फिल्मों में साथ काम कर चुके हैं. इन दोनों ही फिल्मों में हाई वोल्टेज एक्शन देखने को मिला था.
मुंबई में पीएम मोदी ने म्यूजियम का किया उद्घाटन, Uri फिल्म का ये डायलॉग बोल भरा जोश
प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ने शनिवार को दक्षिणी मुंबई स्थित ‘नेशनल म्यूज़ियम ऑफ इंडियन सिनेमा’ (NMIC) देश को समर्पित किया. इस दौरान उन्होंने म्यूजियम का बारीकी से निरीक्षण किया. उद्घाटन समारोह के दौरान सूचना एवं प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंह राठौर, सीबीएफसी प्रमुख प्रसून जोशी, आशा भोसले, एआर रहमान, जीतेंद्र, रणधीर कपूर, आमिर खान व अन्य सितारे मौजूद रहे. इस दौरान पीएम मोदी ने हाल ही में आई फिल्म Uri के एक डायलॉग से अपनी बात की शुरुआत की. उन्होंने अपनी बात शुरू करने से पहले हॉल में मौजूद लोगों से पूछा- हाऊ इज द जोश?
10YearChallenge: मलाइका अरोड़ा ने शेयर कर दीं 20 साल पुरानी फोटो, हुईं ट्रोल
Malaika Arora trolled for #10YearChallenge मलाइका अरोड़ा अपनी एक गलती के कारण सोशल मीडिया पर ट्रोल हो रही हैं. दरअसल, उन्होंने 10 की जगह अपनी 20 साल पुरानी तस्वीरें शेयर कर दी हैं.
कंगना की धमकी का असर? करणी सेना बोली- नहीं किया फिल्म का विरोध
Karni sena denies their involvement in the protests against kangana ranaut film manikarnika करणी सेना के राष्ट्रीय प्रवक्ता ने कहा कि  ‘मुझे लगता है कि कंगना की फिल्म का विरोध करने वाले लोग अपने निजी स्वार्थ के लिए करणी सेना के नाम का इस्तेमाल कर रहे हैं और ऐतिहासिक पात्रों के लिए अपमानजनक व्यवहार कर रहे हैं.’
Bhabhiji Ghar Par Hain: सौम्या टंडन बनीं मां, बेटे को दिया जन्म   
Bhabhiji Ghar Par Hain टीवी शो भाबीजी घर पर हैं कि अनीता भाभी यानी सौम्या टंडन मां बन गई हैं. उन्हें बेटे को जन्म दिया है. बता दें कि प्रेग्नेंसी के चलते उन्होंने शो से ब्रेक लिया हुआ था.
पाएं आजतक की ताज़ा खबरें! news लिखकर 52424 पर SMS करें. एयरटेल, वोडाफ़ोन और आइडिया यूज़र्स. शर्तें लागू
आजतक के नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट और सभी खबरें. डाउनलोड करें
Tumblr media Tumblr media
awesome)
0 notes
inshortsmarathi · 6 years ago
Text
पवार कुटुंबिय अमित आणि मिताली यांच्या लग्न सोहळ्याला उपस्थित
पवार कुटुंबिय अमित आणि मिताली यांच्या लग्न सोहळ्याला उपस्थित
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे आज म्हणजेच २७ जानेवारी  रोजी विवाहबंधनात अडकले. या विवाह सोहळ्याला राजकीय नेत्यांसह, उद्योग, चित्रपट तसेच इतर क्षेत्रातील मान्यवर हजर राहणार आहेत. लोअर परळ येथील येथील सेंट रेजिस या हॉटेलमध्ये हा विवाहसोहळा पार पडणार आहे.
दोन दिवसांपासून कृष्णकुंज इमारतीला आणि इतर परिसराला रोषणाई करण्यात आली आहे. काल म्हणजेच २६ जानेवारी रोजी संध्याकाळी…
View On WordPress
0 notes
punerichalval · 4 years ago
Text
पुणे जिल्हा पोलीस सहकारी पतपेढी शिष्टमंडळाने घेतली गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट
पुणे जिल्हा पोलीस सहकारी पतपेढी शिष्टमंडळाने घेतली .....
पुणे, दिनांक २५-  पुणे जिल्हा पोलीस सहकारी पतपेढी शिष्टमंडळाने गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. यावेळी स्वभांडवलावर पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता वैद्यकीय उपचारासाठी सहकार तत्वावर २२६ बेडचे रुग्णालय उभारण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी, तसेच इतर विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली. यावेळी  मार्गदर्शक विजय कोलते, अध्यक्ष प्रशांत शिंदे, अतुल भोसले, माजी अध्यक्ष कैलास गावडे यांच्यासह…
View On WordPress
0 notes
webmaharashtra-blog · 8 years ago
Photo
Tumblr media
‘कंडीशन्स अप्लाय – अटी लागू’ संगीत अनावरण सोहळा संपन्न पुणे / प्रतिनिधी :  सतत नव्या ट्रेंड आणि फॅशनच्या शोधात असणारी आजची युवा पिढी लिव्ह इन रिलेशनचा ट्रेंड स्वखुशीने स्वीकारताना दिसत आहे. तरुणांच्या याच मानसिकतेवर भाष्य करणारा ‘संस्कृती सिनेव्हिजन प्रोडक्शन’ प्रस्तुत डॉ. संदेश म्हात्रे निर्मित आणि गिरीश मोहिते दिग्दर्शित ‘कंडीशन्स अप्लाय - अटी लागू’ या आगामी मराठी सिनेमाचा संगीत अनावरण सोहळा रेडिओसिटी-पुणे इथे नुकताच पार पडला. यावेळी चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे सुबोध भावे, दीप्ती देवी, संगीतकार अविनाश-विश्वजीत यांच्यासह चित्रपटाच्या संगीत विभागाची संपूर्ण टीम उपस्थित होती. ‘कंडीशन्स अप्लाय - अटी लागू’ हा सिनेमा ७ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘अविनाश-विश्वजीत यांचे संगीत नेहमीप्रमाणेच श्रवणीय आहे, अविस्मरणीय गीते त्यांनी चित्रपटाला दिली आहेत, असे सांगत सुबोध भावे यांनी संगीतकार अविनाश-विश्वजीत यांचे कौतुक केले. तर चित्रपटात नायिकेची भूमिका साकारणाऱ्या दिप्ती देवी ने ‘चित्रपटाची प्रोसेस एन्जॉय करत असतांना मी अविनाश-विश्वजीत यांच्यासोबतचे कामही एन्जॉय केले’ अशा भावना व्यक्त केल्या. चित्रपटाचे संगीतकार अविनाश-विश्वजीत यांनी प्रेमाचे रंग उलगडून दाखवणारी गोष्ट आणि त्याला अनुसरून असलेली गाणी कंपोज करण्याची संधी मिळाल्याबद्दल चित्रपटाच्या टीमचे आभार मानले.  कॉर्पोरेट जगात वावरणाऱ्या अभय आणि स्वरा यांची फुलत जाणारी प्रेमकहाणी आणि त्याला साजेशी गीते या चित्रपटात आहेत. या चित्रपटात चार वेगवेगळ्या जॉनरची गाणी आहेत. विश्वजीत जोशी यांनी शब्दबद्ध केलेले ‘काही कळेना’ हे गीत तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊत याने गायले आहे. ‘तुझेच भास’ हे संगीता बर्वे लिखित हृदयस्पर्शी गीत फराद भिवंडीवाला आणि प्रियंका बर्वे यांनी गायले आहे. जय अत्रे लिखित ‘��ै तो हारी’ हे विरह गीत फराद भिवंडीवाला, आनंदी जोशी आणि विश्वजीत जोशी यांनी गायले आहे. तरुणीला ज्या रॅप संगीताने वेड लावले आहे असे एक रॅप गीत ‘मार फाट्यावर’ ओमकार कुलकर्णी याने लिहिले असून आनंद शिंदे आणि गंधार कदम यांनी ते गायले आहे.लिव्ह इन च्या ट्रेंड वर भाष्य करणाऱ्या या चित्रपटात सुबोध भावे, दीप्ती देवी, अतुल परचुरे, राधिका विद्यासागर, विनीत शर्मा, मिलिंद फाटक, राजन ताम्हाणे, डॉ. उत्कर्षा नाईक, अतिशा नाईक या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘संस्कृती सिनेव्हिजन प्रोडक्शन’ प्रस्तुत डॉ. संदेश म्हात्रे निर्मित आणि गिरीश मोहिते दिग्दर्शित या चित्रपटाची कथा, पटकथा, आणि संवाद संजय पवार यांचे असून सचिन भोसले आणि अमोल साखरकर यांनी सहनिर्मिती केली आहे. चित्रपटाच्या कथेला आणि पार्श्वभूमीला साजेसे संगीत अविनाश-विश्वजीत यांनी दिले आहे. चित्रपटाचे छायाचित्रण कृष्णा सोरेन तर संकलन निलेश गावंड यांचे आहे. प्रसाद पांचाळ हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: ०३ सप्टेंबर  २०२३ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 03 September 2023
Time: 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बात���्या
दिनांक: ०३ सप्टेंबर  २०२३ सकाळी ७.१० मि.
****
मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी राज्यसरकार खंबीर असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही;संयम राखण्याचं आवाहन 
या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची खासदार शरद पवार यांची मागणी
जालन्यात आंदोलनाला पुन्हा हिंसक वळण;मराठवाड्यात सर्वत्र आंदोलनाचे पडसाद
भारताच्या सौर मोहिमेतल्या आदित्य एल वन या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
यंदाच्या पावसाळ्यात राज्यात सर्वच महसूल विभागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस
      आणि
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत कालचा भारत पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द
मराठा समाजाच्या न्याय्य हक्कासाठी राज्यसरकार खंबीरपणे उभं असल्याची ग्वाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी इथं आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी काल एका ध्वनिचित्रफितीच्या माध्यमातून संवाद साधला. लाठीमाराची ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, त्याची उच्चस्तरीय चौकशी करण्यात आली असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.  मराठा समाजानं संयम राखण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले...
''या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच मी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेशही मी दिले. तसंच या घटनेतील सर्व जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याच्या सूचनाही मी दिल्या. आजवर अत्यंत समंजसपणे, शांतपणे, आपल्या भावना व्यक्त केलेल्या मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती आहे, की त्यांनी संयम राखावा. कायदा हाती घेऊ नये. आंदोलनाच्या आगीवर स्वतःच्या राजकीय स्वार्थाची पोळी भाजू पाहणाऱ्यांपासून सावध रहावं. मराठा समाजला मी आवाहन कर��ो, की त्यांनी वस्तूस्थिती ��ाणून घ्यावी. व कोणतीही टोकाची भूमिका घेऊ नये. हे शासन त्यांच्या न्याय हक्कासाठी खंबीरपणे उभं आहे.''
मराठा आरक्षणाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असून, राज्यशासन पूर्ण तयारीने हा खटला लढवत असल्याचं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, ते म्हणाले...
"मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या न्यायालयात आहे. न्यायालयामध्ये राज्य शासन पूर्ण तयारीने हा खटला लढवते. त्यासाठी नामवंत वकील आणि घटना तज्ञांची फौज शासनाने उभी केली आहे. हा मुद्दा घटनात्मक असल्याने काही अडचणी जरूर आहेत. त्या दूर करण्यासाठी राज्य शासन पूर्णपणे प्रयत्नशील आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंत्रीमंडळाची एक उपसमिती गठीत केली आहे. ज्येष्ठ व तज्ञ वकिलांचं टास्कफोर्स स्थापन करून त्यांच्या सल्ल्यानुसार पुढील कायदेशीर उपाययोजना करण्याची प्रक्रियाही सुरू आहे.''
****
मराठा आरक्षण प्रकरणी समाजाच्या नेत्यांसोबत चर्चा करुन तोडगा काढण्याची राज्य सरकारची भूमिका असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. राज्यातील जाळपोळीच्या, हिंसाचाराच्या घटनांबद्दल उपमुख्यमंत्री पवार यांनी चिंता व्यक्त केली असून ह्या घटना थांबवण्यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन मराठा आंदोलक नेत्यांना तसंच कार्यकर्त्यांना केलं आहे. पोलिसांकडून झालेला लाठीमार, हवेतील गोळीबार, तसंच बळाच्या गैरवापरासंबंधी उच्चस्तरीय चौकशीचे आणि दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले असल्याचं पवार यांनी म्हटलं आहे.
***
दरम्यान या प्रकरणी फक्त उच्चस्तरीय चौकशी नव्हे तर न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. जालना इथल्या घटनेत जखमी झालेल्यांची तसंच आंदोलकांची पवार यांनी काल भेट घेतली, त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. लाठीहल्ल्याचे आदेश पोलीसांना नेमके कुणी दिले याची देखील सखोल चौकशी करण्यात यावी असं पवार यांनी म्हटलं आहे.
"मी पोलिसांना दोष देणार नाही. त्यांची नोकरी आहे. त्यांना कुणी आदेश दिला आहे त्यासंबंधीची चौकशी झाली पाहिजे. ही चौकशी कशी असेल, तर उच्चस्तरीय चौकशी होऊन चालणार नाही. याला न्यायालयीन चौकशीची आवश्यकता आहे असं प्राईमाफेसी दिसतंय."
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जालन्याचे पालकमंत्री अतुल सावे, आमदार नारायण कुचे, आदींनी देखील काल आंदोलकांची तसंच जखमींची विचारपूस केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन वास्तूत मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मागणी ठाकरे यांनी यावेळी केली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या घटनेचा निषेध केला आहे.
****
जालना जिल्ह्यात पुढच्या शुक्रवारी 'शासन आपल्या दारी' कार्यक्रम करायचा आहे. या  कार्यक्रमावर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी हे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. संसदेच्या येत्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकारने आरक्षणाची ५० टक्के मर्यादा शिथिल करण्याबाबत विधेयक आणावं, अशी मागणी त्यांनी केली.
****
मराठा आरक्षणाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. यावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी भारतीय जनता पक्ष मराठा समाजाच्या आणि आरक्षणाच्या मागणीच्या पाठीशी असल्याचं, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. ते काल औरंगाबाद तसंच बुलडाणा जिल्ह्यात चिखली इथं पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडीचं सरकार असताना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हा प्रश्न योग्य प्रकारे हाताळता आला नाही, आता त्यांना या प्रश्नावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही, अशी टीकाही बावनकुळे यांनी केली.
****
जालना जिल्हा बंदला काल उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान, जालना शहरातल्या अंबड चौफुलीवर सुरु असलेल्या आंदोलनाला काल पुन्हा हिंसक वळण लागलं. मराठा आंदोलकांनी आक्रमक होत वाहनांवर दगडफेक केली. एक खाजगी ट्रक जाळण्यात आला. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्यां फोडत प्लास्टिकच्या गोळ्यांचाही वापर केला. जालना शहरात सर्वत्र बंदोबस्त वाढवण्यात आला असून, तणावपूर्ण शांतता आहे. दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. काही आंदोलक तरुणांना पोलीसांनी ताब्यात घेतलं आहे.
दरम्यान आंदोलकांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करावं, कायदा हातात घेऊ नये असं आवाहन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी केलं आहे.
****
मराठवाड्यात इतरत्रही या घटनेचे पडसाद उमटले. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथं, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकारी आणि मराठा समाज बाधवांच्या वतीनं घोषणाबाजी करत घेराव घालण्यात आला. आंदोलकांवर लाठीमाराचा आपण निषेध ��ोंदवत असल्याचं मंत्री मुनगंटीवार म्हणाले. या घटनेची सखोल चौकशी करून कारवाई केली जाईल, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं.
****
औरंगाबाद इथं मराठा समाजाच्या वतीनं शहरात कालही अनेक ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. शहरात काही भागात बंदही पाळण्यात आला. औरंगाबाद बसस्थानकात कोल्हापूर आगाराची बस अज्ञात जमावाने पेटवून दिली. त्यानंतर औरंगाबाद इथून एस टीची वाहतुक पूर्ण बंद ठेवण्यात आली. आंदोलकांनी उद्या सोमवारी औरंगाबाद बंदचा इशारा दिला आहे. दरम्यान, नागरिकांनी अफवांवर किंवा सामाजिक माध्यमांवरच्या चुकीच्या पोस्ट वर विश्वास ठेऊ नये, असं आवाहन औरंगाबादचे पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी केलं आहे.
उस्मानाबाद इथं काही दुकानांवर दगडफेक झाल्याचं वृत्त आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांनी आंदोलकांना कोणतीही हानी होऊ नये, अशी काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. आंदोलकांनी शांतता राखण्याचं आवाहन पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांनी केलं आहे. राज्य परिवहन महामंडळानं उस्मानाबाद जिल्ह्यात संपूर्ण बस सेवा काल बंद ठेवली होती.
बीड, नांदेड, लातूर, तसंच परभणी जिल्ह्यातही आंदोलकांनी विविध ठिकाणी निदर्शनं, मोर्चे तसंच दुचाकी  फेऱ्या काढून प्रशासनाला आपल्या मागण्यांचं निवेदन सादर केलं.
राज्यात बुलडाणा, वाशिम, धुळे, नाशिक, वाशी, आदी ठिकाणीही मराठा समाजाच्या वतीनं काल निदर्शनं करण्यात आली.
****
भारताच्या सौर मोहिमेतल्या आदित्य एल वन या उपग्रहाचं काल यशस्वी प्रक्षेपण झालं. आंध्रप्रदेशच्या श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून पीएसएलव्ही सी सत्तावन या प्रक्षेपकाद्वारे, आदित्य एल वन हा उपग्रह अवकाशात झेपावला.
पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटर अंतरावर, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये लँग्रेंज बिंदूवर हा उपग्रह स्थिर केला जाणार असून, या बिंदूपर्यंत पोहोचायला या उपग्रहाला सुमारे चार महिन्यांचा कालावधी लागणार आहे. या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो चे शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचं अभिनंदन केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांना शुभेच्छा देताना, भारताने अवकाश संशोधनाच्या इतिहासात सुवर्णअक्षरांत नोंद करून ठेवावी, अशी कामगिरी केली असल्याचं म्हटलं आहे. या मोहिमेमध्ये पुण्यातील 'आयुका' संस्थेचा उपग्रहावरील संशोधन उपकरण निर्मितीत सक्रिय सहभाग असणं, अभिमानास्पद असल्याचा उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी केला आहे .
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही इस्रोच्या शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे.
****
बुलडाणा इथं आज शासन आपल्या दारी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी साडे अकरा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
****
राज्यात यंदाच्या पावसाळ्यात आता��र्यंत सरासरीच्या तुलनेत साडे ८१ टक्के पाऊस झाला. सर्वच महसूल विभागामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याची माहिती राज्य सरकारनं दिली आहे. गेल्यावर्षी हे प्रमाण १०९ टक्क्यांपेक्षा अधिक होतं. नाशिक आणि पुणे महसूल विभागात यंदा सरासरीच्या तुलनेत ६० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडला. पालघरमध्ये सर्वाधिक तर नाशिकमध्ये सर्वात कमी पावसाची नोंद झाल्याचं राज्य सरकारनं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारी म्हटलं आहे. ठाणे, पालघर, नांदेड, यवतमाळ आणि गडचिरोली वगळता इतर कुठल्याही जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली नसल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेत पल्लेकेले इथला कालचा भारत पाकिस्तान सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यापूर्वी भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली मात्र, ईशान किशनच्या ८२ आणि हार्दिक पांड्याच्या ८७ धावा वगळता, अन्य एकही फलंदाज समाधानकारक कामगिरी करू शकले नाहीत. भारतीय संघ ४८ व्या षटकांत २६६ धावांवर सर्वबाद झाला. यानंतर पावसाला सुरुवात झाल्यामुळे पाकिस्तानचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकला नाही. पाऊस न थांबल्याने पंचांनी हा सामना रद्द झाल्याचं घोषित केलं.
****
आशिया फाईव्ह एस हॉकी विश्वचषक स्पर्धेत भारतानं पाकिस्तानला नमवत अजिंक्यपद पटकावलं. काल मस्कत इथे झालेल्या अंतिम सामन्यात, ४ -४ अशी बरोबरी झाल्यानं पेनल्टी शूट आऊटमध्ये भारतानं पाकिस्तानवर २ गोल करत विजय मिळवला.
****
मराठवाडा मुक्ती संग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षात मराठवाड्यातील विविध विकास कामांना  गती मिळावी यासाठी राज्यशासनानं जिल्हानिहाय कार्यक्रमांची आखणी केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ते काल नांदेड इथं आढावा बैठकीत बोलत होते. सर्वसामान्यांसह भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं.
****
मराठवाडा मुक्तिसंग्रामात अठरा पगड जातीच्या लोकांसह स्त्रियांचं प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष लक्षणीय योगदान होतं, असं डॉक्टर प्रभाकर देव यांनी म्हटलं आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नांदेड जिल्ह्यातल्या उमरी इथं देव यांचं काल विशेष व्याख्यान झालं, त्यावेळी ते बोलत होते. इतिहासाचा हा अनमोल ठेवा इतरांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने नांदेड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात कार्यक्रम आयोजित करत असल्याचं जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी सांगितलं.
****
उस्मानाबाद इथं मराठवाडा मुक्ती संग्रामात अतुलनीय योगदान देणारे स्वातंत्र्य सेनानी आणि त्यांच्या वारस कुटुंबियांचा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात येत आहे. स्वातंत्र्य सेनानींचे नाव तसंच अमृत महोत्सव बोधचिन्ह असलेली पाटी, टोपी, खादी ��ाल आणि पुष्पगुच्छ देऊन या सेनानींचा गौरव करण्यात येत आहे. जिल्ह्यातल्या १६०० स्वातंत्र्य सेनानींच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
****
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त हिंगोली इथे जिल्हा पोलीस दलातर्फे काल रोजगार मेळावा घेण्यात आला. यात महाराष्ट्र तसंच इतर राज्यातल्या २२ कंपन्यांनी सहभाग नोंदवला. या मेळाव्यात ६४३ उमेदवारांना नियुक्तपत्र देण्यात आली.
****
शिवराज्यभिषेकाबाबत चर्चा होण्याची गरज कोल्हापूर इथल्या शिवाजी विद्यापीठातले राज्यशास्त्र विषयाचे प्रमुख डॉ. प्रकाश पवार यांनी व्यक्त केली आहे. ते काल औरंगाबाद इथं मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ ना गो नांदापूरकर व्याख्यानमालेत बोलत होते. शिवराज्याभिषेकाचा अन्वयार्थ या विषयावर पवार यांनी प्रकाश टाकला. छत्रपती संभाजी महाराज यांनी केलेलं शिवराज्यभिषेकाचं लिखाण अधिक ग्राह्य धरलं पाहिजे असं मत, पवार यांनी कालच्या भाषणात व्यक्त केलं. या व्याख्यानमालेत आज पवार यांचं शिवकाळातील भाषा आणि वाङमयीन संस्कृती या विषयावर व्याख्यान होणार आहे.
****
हिंगोली जिल्ह्यात सेनगाव इथं काल तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उभं असलेलं प्रशासकीय वाहन आग लागून खाक झालं. सेनगाव अग्निशामक दल आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही आग विझवण्यात आली.
****
0 notes
theinvisibleindian · 5 years ago
Text
पृथ्वीराज चव्हाणां विरोधात भाजप कडून काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या 'जावयाला' उमेदवारी जाहीर
पृथ्वीराज चव्हाणां विरोधात भाजप कडून काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या ‘जावयाला’ उमेदवारी जाहीर
कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड दक्षिण मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचे विरोधात भाजपाचा उमेदवार ठरला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे जावई डॉ अतुल भोसले यांना कराड दक्षिणची उमेदवारि जाहिर केलीय.
तुम्ही अतुलबाबांना आमदार करा आम्ही मंत्री करतो असा शब्द यावेळी पाटील यांनी मतदारांना दिलाय. काही दिवस थांबा पहिली घोषणा बदलुन 288 पार अशी नवी…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 15 August 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १५ ऑगस्ट २०२३सकाळी ७.१० मि.
****
७७ व्या स्वातंत्र्यदिनाचा देशभर उत्साह;ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन 
शिक्षण हे सामाजिक सशक्तीकरणाचं सर्वात प्रभावी माध्यम-स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींचं प्रतिपादन 
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलिस पदकं जाहीर;हिंगोलीचे उमर शेख, नांदेडचे द्वारकादास चिखलीकर, आणि औरंगाबादचे भानुदास पवार यांचा समावेश    
हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत आतापर्यंत आठ कोटींहून अधिक छायाचित्रं प्राप्त 
एनआयएनकडून कोल्हापुरात कारवाई;तीन संशयित तरुणांना ताब्यात
आणि
बालेवाडीच्या धर्तीवर उदगीर इथं क्रीडा संकुल उभारण्याची क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची घोषणा
****
देशाचा ७७ व्या स्वातंत्र्य दिन आज साजरा होत आहे. यानिमित आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतल्या ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवर ध्वजारोहण करून, देशवासियांना संबोधित करतील. दिल्लीतल्या या मुख्य सोहळ्यासाठी देशभरातून विविध व्यवसायातल्या, सुमारे अठराशे विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यामध्ये, मच्छिमार बांधवांना केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांविषयी मार्गदर्शन आणि मदत करणारे, औरंगाबाद जिल्ह्यातले तुकाराम वानखेडे, परभणी इथल्या सुभाशिष कंपनीचे युवा शेतकरी कृष्णा भोसले, आणि शिव कृषक शेतकरी उत्पादक कंपनीच्या शोभा केंदळे यांचा समावेश आहे.
मुंबईत मंत्रालयात स्वातंत्र्य दिनाचं राज्याचं मुख्य शासकीय ध्वजारोहण मुख��यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर, पुण्यात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.
औरंगाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते होणार आहे. परभणी इथं पालकमंत्री अतुल सावे, उस्मानाबाद इथं पालकमंत्री तानाजी सावंत, जालना इथं मंत्री अब्दुल सत्तार, बीड इथं मंत्री धनंजय मुंडे, लातूर इथं मंत्री संजय बनसोडे, तर हिंगोली आणि नांदेड इथं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
****
शिक्षण हे सामाजिक सशक्तीकरणाचं सर्वात प्रभावी माध्यम असल्याचं, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे. त्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशवासियांना संबोधित करत होत्या. नव्या शैक्षणिक धोरणामुळे आगामी वर्षात शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्या म्हणाल्या…
‘‘शिक्षा समाजिक सशक्तिकरण का सबसे प्रभावी माध्यम है, वर्ष २०२० की राष्ट्रय शिक्षा नीती से बदलाव आना शुरु हो गया है. विभिन्न स्तरों पर विद्यार्थियों और शिक्षकों के साथ मेरी बातचीत से मुझे ज्ञात हुआ है की अध्ययन की प्रकिर्या अधिक फ्लेक्सबल हो ग्या है, इससे आनेवाले वर्षों मे शिक्षा के क्षेत्र मे अभूतपूर्व परिवर्तन होंगे.’’
देशात विकासाच्या नव्या अनंत संधी देशवासियांची प्रतीक्षा करत असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. शिक्षण, क्रीडा, उद्योग तसंच अंतराळ क्षेत्रात देशाच्या कामगिरीबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केलं. त्या म्हणाल्या…
‘‘विकास की अनंत संभावनाऐं देशवासियों की प्रतीक्षा कर रही हैं. स्टार्टअप से लेकर खेल कूद तक हमारे युवाओं ने उत्कृष्टता की नये आसमानों की उडान भरी है. आज के नये भारत की महत्त्वकांक्षाओं के नये क्षितीज अचिव्ह किये. भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन नई उंचाई को छू रहा है. और उत्कृष्टता के नये आयाम स्थापित कर रहा है. अंतरिक्ष अभियान में ही नहीं, बल्कि धरती पर भी हमारे वैज्ञानिक और टेक्नॉलॉजिस्ट देश का नाम रौशन कर रहे हैं.’’
महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्यास त्याचा कुटुंब आणि पर्यायाने देशाला देखील लाभ होतो, असं सांगून राष्ट्रपतींनी, महिला सक्षमीकरणाच्या मुद्यावर विशेष लक्ष देण्याची गरजही व्यक्त केली.
****
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयानं पोलिस पदकं काल जाहीर केली. एकूण ९५४ पोलिसांना ही पदकं प्रदान करण्यात येणार आहेत. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे लोकरपाम इबोमचा सिंग यांना राष्ट्रपती पोलिस पदक मरणोत्तर जाहीर झालं आहे. एकूण २२९ जणांना शौर्यासाठी पोलिस पदक जाहीर झालं असून, यामध्ये राज्यातल्या ३३ जणांचा समावेश आहे. ८२ जणांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झालं असून, यात राज्यातले अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रवीण साळुं��े, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे, आणि अमरावतीचे पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकवारे यांचा समावेश आहे. ६४२ जणांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलिस पदक जाहीर झालं असून, यात राज्यातल्या ४० जणांचा समावेश आहे. हिंगोलीचे पोलिस उपनिरीक्षक उमर मनन शेख, नांदेडचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, आणि औरंगाबाद इथले सहायक कमांडंट भानुदास पवार यांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलिस पदक जाहीर झालं आहे.
****
विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त काल देशभरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्देशानुसार, मुंबईत फाळणीच्या आठवणी सांगणाऱ्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. फाळणीचा इतिहास आपल्या नव्या पिढीला कळावा यासाठी संपूर्ण देशात अशा प्रदर्शन आयोजनास प्रोत्साहन दिलं जात असल्याचं लोढा यावेळी म्हणाले.
****
हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सुमारे आठ कोटींहून अधिक लोकांनी राष्ट्रध्वजाबरोबरची स्वत:ची छायाचित्रं अपलोड केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात सर्वत्र देशभक्तीपर कार्यक्रम होत आहेत. या अभियानाच्या जनजागृतीसाठी काल नवी मुंबईत तिरंगा दुचाकी फेरी काढण्यात आली. धुळे शहरातून एक हजार अकरा फूट लांब तिरंगा ध्वजयात्रा काढण्यात आली. जालना शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सरस्वती भुवन प्रशालेच्या वतीने ३७५ फूट लांबीची भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली.
लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीनं काल शिलाफलक अनावरण, कलश पूजन, वृक्षारोपण तसंच स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार, आदी कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी उपस्थितांनी पंचप्रण शपथ घेतली.
औरंगाबाद इथं मिट्टी को नमन विरो को वंदन उपक्रमा अंतर्गत महापालिकेच्या सेवेत कार्यरत माजी सैनिकांसाठी काल विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. प्रशासक जी श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धांमध्ये विजेत्यांना बक्षीसं देऊन गौरवण्यात आलं.
उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकावला आहे. चिलवडी इथले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बुवासाहेब जाधव यांनीही आपल्या घरावर तिरंगा फडकावला. ते म्हणाले,
मी बुवासाहेब जाधव. चिलवडीचा रहिवासी आहे. आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहोत त्यानिमित्ताने आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवावा असं हर घर तिरंगा असं त्यांचं आवाहन आहे. त्याप्रमाणे मी माझ्या घरावर तिरंगा फडकावून दुसऱ्यांना, सर्वांना सांगितलं की मोदी साहेबांचं आवाहन आहे, पंतप्रधानांचं, तुम्ही सर्व आपापल्या घरावर तिरंगा फडकावावा. त्याप्रमाणे आमच्या गावामध्ये प्रत्येक घरावर तिरंगा फडकलेला दिसेल.
उस्मानाबाद इथले युवरा�� मुळे यांनीही या अभियानात सहभागी होत आपल्या घरावर राष्ट्रध्वज फडकावला, इतरांनाही त्यांनी या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
मानणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेबांनी भारताचा अमृत महोत्सवानिमित्त जो आव्हान केलेला आहे, प्रत्येक भारत्यांनी आपल्या सवत:च्या घरावर जिथे आपण राहतो त्या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवावा, त्यानुसार आपण सर्वांनी तिरंगा ध्वज फडकावं, मी सवत: फडकवला आहे, आपण देखील हा तिरंगा ध्वज आपल्या घरावर फडकावा ही नम्र विनंती.’’
अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीनं 'मेरी माटी, मेरा देश' या उपक्रमाअंतर्गत अंबाजोगाई तालुक्यातले स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक यांचा सन्मान तसंच ध्वजारोहण, शिलाफलक, आणि इतर कार्यकम मोठ्या उत्साहात काल योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडले. आमदार नमिता मुंदडा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना पंचप्रण शपथ देण्यात आली.
****
जगातले अनेक देश कुशल मनुष्यबळाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी भारताकडे पाहत आहेत, स्नातकांनी या संधीचा फायदा घेत, जगाच्या कोणत्याही भागात काम करण्यास तयार असलं पाहिजे, असं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात डॉ. डी. वाय. पाटील विद्यापी��ाच्या पदवीदान समारंभात बोलत होते. नागरिकांनी आज साक्षर असणं पुरेसं नाही, तर कृत्रीम बुद्धिमत्ता-एआय साक्षर असणं आवश्यक असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं.
****
राष्ट्रीय तपास संस्था - एनआयएननं कोल्हापुरात इचलकरंजी हुपरी परिसरात छापेमारी करून तीन संशयित तरुणांना ताब्यात घेतलं आहे. या तरुणांचा दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचा एनआयएला संशय आहे. संबंधित तरुणाकडून काही कागदपत्रं तसंच इलेक्ट्रॉनिक वस्तू तपास यंत्रणेकडून जप्त करण्यात आल्या आहेत.
****
औरंगाबाद इथं कृषी विज्ञान केंद्रात काल रानभाजी महोत्सव भरवण्यात आला. राज्याचे रोजगार हमी योजना तसंच फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. या महोत्सवात रानभाज्यांसह त्यांच्या पाककृतीचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं. विविध शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी तसंच महिलांची या महोत्सवात लक्षणीय उपस्थिती होती.
****
नाशिक इथल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वतीनं देण्यात येणारा बाबुराव बागूल कथा पुरस्कार काल प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ साहित्यिक जी. के. ऐनापुरे आणि कुलगुरू संजीव सोनवणे यांच्या हस्ते २०१९ चा पुरस्कार, किरण येले यांना ‘मोराची बायको’ या कथासंग्रहासाठी, तर २०२० चा पुरस्कार, बाला��ी सुतार यांना, ‘दोन शतकांच्या सांध्यावरची नोंद’, या कथासंग्रहासाठी प्रदान करण्यात आला. २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
राज्य शासनाने विविध तीनशे क्षेत्रातल्या असंघटित कामगारांची नोंदणी हाती घेतली आहे. हिंगोली जिल्ह्यात आजवर तब्बल एक लाख ९० हजार २३० असंघटित कामगारांनी नोंदणी केली असून, निर्धारित उद्दीष्टाच्या ३८ पूर्णांक ४८ टक्के उद्दीष्ट पूर्ण करत हिंगोली जिल्हा मराठवाड्यात आघाडीवर आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर..
‘‘हिंगोली जिल्ह्यात ऑगस्ट २०२३ पर्यंत तब्बल एक लाख ९० हजार २३० असंघटित कामगारांनी आपली नोंदणी पूर्ण केली आहे. जिल्ह्याला चार लाख ९४ हजार ३०३ असंघटित कामगारांच्या नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये ३८.४८% उद्दिष्ट पूर्ण करत हिंगोली जिल्हा मराठवाड्यात आघाडीवर आहे. असंघटित कामगारांनी नोंदणी करून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक गजानन काळे यांनी केली आहे.’’
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं बालेवाडीच्या धर्तीवर क्रीडा संकुल उभारणार असल्याचं, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितलं आहे. लातूर इथं महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामाचं भूमिपूजन बनसोडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण भागात व्हॉलीबॉल, फुटबॉल, कबड्डी, क्रिकेट या खेळासह अनेक खेळांमध्ये राज्य ते देशपातळीपर्यंत आपले खेळाडू सहभागी होतात, या क्रीडा संकुलामुळे त्यांना पाठबळ मिळेल, असा विश्वास बनसोडे यांनी व्यक्त केला.
****
भारतीय जनता पक्षाच्या वतीनं काल उस्मानाबाद इथं विभीषीका दिनानिमित्त पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. फाळणीची शोकांतिका देशवासियांसमोर मांडण्यासाठी, तसंच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चित्र प्रदर्शन भरवण्यात आलं होतं. ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बुवासाहेब जाधव यांचं व्याख्यानही यावेळी झालं. 
दरम्यान, बुवा साहेब जाधव यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवनसाधना पुरस्कार जाहीर झाला आहे. उद्या उस्मानाबाद इथं विद्यापीठाच्या उपकेंद्रात जाधव यांना हा पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केला जाणार आहे.
****
माजी केंद्रीय मंत्री दिवंगत विलासराव देशमु�� यांच्या अकराव्या स्मृतीदिनानिमित्त, काल लातूर जिल्ह्यातल्या बाभळगाव इथल्या विलासबाग इथं, भावदर्पण कार्यक्��मातून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी देशमुख कुटुंबियासह अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यभरातही काल यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले.
****
रस्ते हे विकास वाहिन्या असल्यानं ते दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण बनवणार असल्याचं, उस्मानाबादचे पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी म्हटलं आहे. भूम तालुक्यात अंबी-जयवंत नगर - जांब- विजयनगर, या राज्य महामार्गाच्या भूमिपूजन प्रसंगी ते काल आंबी इथं बोलत होते. नऊ किलोमीटर लांबीच्या या मार्गामुळे ग्रामीण भागातल्या लोकांना तसंच विद्यार्थ्यांना शहरात जाणं - येणं सोयीचं होईल असं ते म्हणाले. परंडा तालुक्यातल्या पांढरेवाडी इथं विविध विकास कामांचं लोकार्पण आणि  भूमिपूजनही काल पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं.
दरम्यान, सावंत यांनी काल भूम तालुक्यातल्या पाथरूड इथं नव्याने श्रेणीवर्धन झालेल्या प्रस्तावित ग्रामीण रुग्णालयाच्या जागेची पाहणी केली. आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्यासाठी तसंच रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी आरोग्य विभागातली सर्व रिक्त पदं लवकरच भरण्यात येतील, असं त्यांनी यावेळी सांगितलं.
****
‘क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत’ मोहिमेअंतर्गत लातूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ५० ग्रामपंचायती क्षयरोगमुक्त होणार असल्याचं,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. एन. तांबारे यांनी सांगितलं आहे. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत, जिल्ह्यात तीन हजार २५० क्षयरुग्ण नोंदणीचं उद्दीष्ट देण्यात आलं आहे. त्यापैकी आतापर्यंत एक हजार ७२८ क्षयरुग्णांची नोंदणी झाल्याचं, त्यांनी सांगितलं. या मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतीचा येत्या २४ मार्चला विशेष सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती तांबारे यांनी दिली.
****
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 August 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ ऑगस्ट २०२३ सायंकाळी ६.१०
****
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशवासियांशी संवाद साधणार.
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून पोलिस पदकं जाहीर;हिंगोलीचे उमर शेख, नांदेडचे द्वारकादास चिखलीकर, आणि औरंगाबादचे भानुदास पवार यांचा समावेश.
हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ६६ लाखांहून अधिक छायाचित्रं प्राप्त.
आणि
बालेवाडीच्या धर्तीवर उदगीर इथं क्रीडा संकुल उभारण्याची क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची घोषणा.
****
स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू देशवासियांशी संवाद साधणार आहेत. आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व केंद्रांवरून संध्याकाळी सात वाजता राष्ट्रपतींचं भाषण आधी हिंदीतून आणि नंतर इंग्रजीतून प्रसारित होईल. राष्ट्रपतींच्या भाषणाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद लगेचच दूरदर्शनच्या सर्व प्रादेशिक केंद्रांवरून प्रसारित होणार आहे, तर आकाशवाणीच्या प्रादेशिक केंद्रांवरून रात्री साडेनऊ वाजता हा अनुवाद प्रसारित होईल.
****
देशाच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित उद्या सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतल्या ऐतिहासिक लाल किल्ल्याच्या तटबंदीवर ध्वजारोहण करून देशवासियांना संबोधित करतील. दिल्लीतल्या या मुख्य सोहळ्यासाठी देशभरातून विविध व्यवसायातील सुमारे अठराशे विशेष पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं आहे. यामध्ये मच्छिमार बांधवांना केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांविषयी मार्गदर्शन आणि मदत करणारे औरंगाबाद जिल्ह्यातले तुकाराम वानखेडे, परभणी इथल्या सुभाशिष कंपनीचे युवा शेतकरी कृष्णा भोसले, आणि शिव कृषक शेतकरी उत्पादक कंपनीच्या शोभा केंदळे यांचा समावेश आहे.
मुंबईत मंत्रालयात स्वातंत्र्य दिनाचं राज्याचं मुख्य शासकीय ध्वजारोहण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तर, पुण्यात राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल.
औरंगाबाद इथं मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते होणार आहे. परभणी इथं पालकमंत्री अतुल सावे, उस्मानाबाद इथं पालकमंत्री तानाजी सावंत, जालना इथं मंत्री अब्दुल सत्तार, बीड इथं मंत्री धनंजय मुंडे, लातूर इथं मंत्री संजय बनसोडे, तर हिंगोली आणि नांदेड इथं जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.
****
स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयानं पोलिस पदकं आज जाहीर केली. एकूण ९५४ पोलिसांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे. राष्ट्रपती पोलिस पदक केंद्रीय राखीव पोलिस दलाचे लोकरपाम इबोमचा सिंग यांना मरणोत्तर जाहीर झालं आहे. शौर्यासाठी पोलिस पदक एकूण २२९ जणांना जाहीर झालं असून, यामध्ये राज्यातल्या ३३ जणांचा समावेश आहे. विशेष सेवेसाठी राष्ट्रपती पदक एकूण ८२ जणांना जाहीर झालं असून, यात राज्यातले अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रवीण साळुंके, पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे आणि अमरावतीचे पोलिस महानिरीक्षक जयंत नाईकवारे यांचा समावेश आहे. उत्कृष्ट सेवेसाठी पोलिस पदक एकूण ६४२ जणांना जाहीर झालं असून, यात राज्यातल्या ४० जणांचा समावेश आहे. हिंगोलीचे पोलिस उपनिरीक्षक उमर मनन शेख, नांदेडचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर, आणि औरंगाबाद इथले सहायक कमांडंट भानुदास पवार यांना उत्कृष्ट सेवेसाठी पोलिस पदक जाहीर झालं आहे.
****
विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या निर्देशानुसार मुंबईत फाळणीच्या आठवणी सांगणाऱ्या छायाचित्रांचं प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. कौशल्य विकास आणि रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं. फाळणीचा इतिहास आपल्या नव्या पिढीला कळावा यासाठी संपूर्ण देशात अशा प्रदर्शन आयोजनास प्रोत्साहन दिलं जात असल्याचं लोढा यावेळी म्हणाले.
****
हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत आतापर्यंत ६६ लाखांहून अधिक लोकांनी राष्ट्रध्वजाबरोबरची स्वत:ची छायाचित्रं अपलोड केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात सर्वत्र देशभक्तीपर कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी आज नवी मुंबईत तिरंगा दुचाकी फेरी काढण्यात आली. धुळे शहरातून एक हजार अकरा फूट लांब तिरंगा ध्वजयात्रा काढण्यात आली. जालना शहरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सरस्वती भुवन प्रशालेच्या वतीने आज ३७५ फूट लांबीची भव्य तिरंगा पदयात्रा रॅली काढण्यात आली.
उस्मानाबाद जिल्ह्यात अनेक नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकावला आहे. चिलवडी इथले बुवासाहेब जाधव यांनीही आपल्या घरावर तिरंगा फडकावला. ते म्हणाले -
मी बुवासाहेब जाधव. चिलवडीचा रहिवासी आहे. आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण साजरा करतो आहोत त्यानिमित्ताने आपले आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी प्रत्येक घरावर तिरंगा फडकवावा असं हर घर तिरंगा असं त्यांचं आवाहन आहे. त्याप्रमाणे मी माझ्या घरावर तिरंगा फडकावून दुसऱ्यांना, सर्वांना सांगितलं की मोदी साहेबांचं आवाहन आहे, पंतप्रधानांचं, तुम्ही सर्व आपापल्या घरावर तिरंगा फडकावावा. त्याप्रमाणे आमच्या गावामध्ये प्रत्येक घरावर तिरंगा फडकलेला दिसेल.
****
जगातील अनेक देश कुशल मनुष्यबळाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी भारताकडे पाहत आहेत. स्नातकांनी या संधीचा फायदा घेत जगाच्या कोणत्याही भागात काम करण्यास तयार असले पाहिजे, असं राज्यपाल रमेश बैस यांनी म्हटलं आहे. ते आज पुण्यात डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बोलत होते. आज साक्षर असणं पुरेसं नाही तर कृत्रीम बुद्धिमत्ता-एआय साक्षर असणं आवश्यक असल्याचं राज्यपालांनी नमूद केलं.
****
औरंगाबाद इथं कृषी विज्ञान केंद्रात आज रानभाजी महोत्सव भरवण्यात आला. राज्याचे रोजगार हमी योजना तसंच फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. या महोत्सवात रानभाज्यांसह त्यांच्या पाककृतीचं प्रात्यक्षिकही दाखवण्यात आलं. विविध शेतकरी आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी तसंच महिलांची या महोत्सवात लक्षणीय उपस्थिती होती.
****
लातूर जिल्ह्यातल्या उदगीर इथं बालेवाडीच्या धर्तीवर क्रीडा संकुल उभारणार असल्याचं, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितलं आहे. लातूर इथं काल महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामाचं भूमीपूजन बनसोडे यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. ग्रामीण भागात व्हॉलीबॉल, फुटबॉल, कबड्डी, क्रिकेट या खेळासह अनेक खेळांमध्ये राज्य ते देशपातळीपर्यंत आपले खेळाडू सहभागी होतात, या क्रीडा संकुलामुळे त्यांना पाठबळ मिळेल, असा विश्वास बनसोडे यांनी व्यक्त केला.
****
राज्य शासनाने विविध तीनशे क्षेत्रातील असंघटित कामगारांची नोंदणी हाती घेतली आहे. हिंगोली जिल्ह्यात आजवर तब्बल एक लाख ९० हजार २३० असंघटित कामगारांनी नोंदणी केली असून, उद्दीष्टाच्या ३८ पूर्णांक ४८ टक्के उद्दीष्ट पूर्ण करत हिंगोली जिल्हा मराठवाड्यात आघाडीवर आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर -
हिंगोली जिल्ह्यात ऑगस्ट २०२३ पर्यंत तब्बल एक लाख ९० हजार २३० असंघटित कामगारांनी आपली नोंदणी पूर्ण केली आहे. जिल्ह्याला चार लाख ९४ हजार ३०३ असंघटित कामगारांच्या नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामध्ये ३८.४८% उद्दिष्ट पूर्ण करत हिंगोली जिल्हा मराठवाड्यात आघाडीवर आहे. असंघटित कामगारांनी नोंदणी करून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक गजानन काळे यांनी केली आहे.
आकाशवाणी बातम्यांसाठी रमेश कदम हिंगोली.
****
अंबाजोगाई नगर परिषदेच्या वतीने 'मेरी माटी, मेरा देश' या उपक्रमाअंतर्गत अंबाजोगाई तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक यांचा सन्मान तसंच ध्वजारोहण, शिलाफलक, आणि इतर कार्यकम मोठ्या उत्साहात आज योगेश्वरी महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडले. आमदार नमिता मुंदडा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना पंचप्रण शपथ देण्यात आली.
****
माजी केंद्रीय मंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या अकराव्या स्मृतीदिनानिमित्त आज लातूर जिल्ह्यातल्या बाभळगाव इथल्या विलासबाग इथं भावदर्पण कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. यावेळी देशमुख कुटुंबियासह अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यभरातही आज यानिमित्ताने विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले.
****
श्रोत्यांसाठी सूचना - उद्या स्वातंत्र्यदिनी आमच्या केंद्रावरून सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी दिलं जाणारं मराठी बातमीपत्र सकाळी सहा वाजून ४० मिनिटांनी दिलं जाणार आहे. तर सकाळी नऊ वाजता दिलं जाणारं उर्दू बातमीपत्र सकाळी साडे नऊ वाजेनंतर दिलं जाणार आहे.
****
0 notes
theinvisibleindian · 5 years ago
Text
कराड दक्षिणमध्ये भाजपचे तिकीट उदयसिंह पाटीलांना मिळाले तर 'असं' करणार - अतुल भोसले
कराड दक्षिणमध्ये भाजपचे तिकीट उदयसिंह पाटीलांना मिळाले तर ‘असं’ करणार – अतुल भोसले
सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
कराड दक्षिणमधून सात वेळा आमदार झालेले माजी मंत्री विलासराव पाटील उंडाळकर यांचे पुत्र व रयत कारखान्याचे चेअरमन उदयसिंह पाटील यांच्या शिवसेना प्रवेशबाबत भाजपा प्रदेश चिटणीस ना. डॉ. अतुल भोसले काय म्हणाले….राज्यात भाजपा-सेना युती ही कायम राहणार आहे. उदयसिंह पाटील यांनी शिवसेनेत येण्यापेक्षा भाजपामध्ये यावे. युतीच्या विचारात येणार्‍याचे स्वागतच आहे.
जर कराड दक्षिणमध्ये…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 August 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २० ऑगस्ट २०२२ सायंकाळी ६.१० ****
·      हमरस्त्यावरचं पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्यासंदर्भात लातूर जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर केलेलं काम राज्य तसंच देशाला पथदर्शक - राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यां���ं प्रतिपादन.
·      गोविंदांना सरकारी नोकरीत आरक्षणाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रश्न उपस्थित.
·      औरंगाबाद स्मार्ट सिटी साठी उर्वरित २०६ कोटींचा निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार - केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचं आश्वासन.
आणि
·      ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोरडे यांच्या पाचोळा कादंबरीचा सुवर्ण महोत्सवी सन्मान सोहळा.
****
लातूर जिल्ह्यात हमरस्त्यावरचं पावसाचं पाणी जमिनीत मुरवण्याचं प्रायोगिक तत्वावर केलेलं काम राज्याला आणि देशाला पथदर्शक होईल, असं प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केलं आहे. ते आज लातूर इथं शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रायोगिक तत्वावर शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेलं हे काम अधिक मोठ्या प्रमाणावर करण्याची सूचना राज्यपालांनी केली.
लातूर जिल्ह्यात सोयाबीनचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन होतं, शिवाय इथेच त्यावर प्रक्रिया पण होते हे कौतुकास्पद असून, काळ्या सोयाबीनचाही प्रयोग या जिल्ह्यात करावा, असं राज्यपाल कोश्यारी यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यासह अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. लातूर इथल्या उमंग इन्सिटट्यूट ऑफ ऑटीझम अँड मल्टीडिसॅबिलिटी रिसर्च सेंटरलाही राज्यपाल कोश्यारी यांनी भेट दिली. नावीन्यपूर्ण उमंग केंद्र उभं केल्याबद्दल कौतुक करून हे केंद्र जास्तीत जास्त प्रभावीपणे चालवण्यासाठी तसंच दिव्यांगाच्या कल्याणासाठी प्रशासनामार्फत प्रयत्न करावेत, असंही राज्यपालांनी सांगितलं.
लातूर दौऱ्यापूर्वी आज सकाळी राज्यपालांनी परळीजवळ गोपीनाथ गडावर जाऊन, दिवंगत केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केलं.
****
गोविंदांना सरकारी नोकरीत पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प���रशासनिक बाबी लक्षात न घेता भावनिक होऊन घेतला आहे, मात्र असे निर्णय भावनिक होऊन घ्यायचे नसतात, असं विधानसभेतले विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. या निर्णयामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या राज्यातल्या इतर उमेदवारांवर अन्याय होणार नाही का, याचा सारासार विचार राज्य सरकारनं केला नाही, असा आरोप त्यांनी केला. गोविंदांना नाउमेद करण्याचा आपला विचार नाही, मात्र अन्य क्रीडा प्रकारांप्रमाणे राज्यातल्या गोविंदांचे रेकॉर्ड कसं ठेवणार, गोविंदा पथकातल्या कमी शिकलेल्या मुलांना आपण कोणती नोकरी देणार, असे प्रश्न पवार यांनी उपस्थित केले.  
****
दरम्यान, माजी मंत्री छगन भुजबळ यांनीही या मुद्यावर बोलताना, एखाद्या विशिष्ट वर्गाला खुश करण्यासाठी भावनेच्या भरात निर्णय घेणं अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचं नाव उज्ज्वल केलेले खेळाडू अद्यापही शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, शासनाने प्रथम या खेळाडूंना न्याय द्यावा, असं मत भुजबळ यांनी व्यक्त केलं. गोविंदांना नोकरीमध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णयाला आपला विरोध नाही, मात्र याबाबत कोणते निकष लावणार हा संभ्रम असल्याचंही भुजबळ म्हणाले.
****
औरंगाबाद स्मार्ट सिटी साठी केंद्र शासनाकडून उर्वरित २०६ कोटींचा निधी मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं आश्वासन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी दिलं आहे. डॉ कराड आणि राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी आज औरंगाबाद इथं स्मार्ट सिटी कार्यालयात संयुक्त आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. कलाग्राम इथं ग्लो गार्डन उभारण्यासाठी १० कोटी रुपये निधी तसंच स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र “लाईट हाऊस” इथून प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांना मुद्रा योजना अंतर्गत ५० हजार ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळवून देण्याची घोषणाही डॉ.कराड यांनी यावेळी केली. सहकार मंत्री सावे यांनी नागरिकांची तक्रार घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी सक्षम कॉल सेंटर उभारण्याची सूचना केली.
औरंगाबाद महानगरपालिकेच्या शाळांचं डिजिटल शाळांमध्ये रुपांतर करण्यासाठी किमान १० डिजिटल वर्गांचं अंदाजपत्रक तयार करून सादर करण्यात यावं, असंही डॉ कराड यांनी सूचित केलं.
****
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्‌भावना दिवस म्हणून साजरी केली जाते. यानिमित्त्त आज सर्वत्र त्यांना अभिवादन केलं जात आहे. औरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालयासमोर असलेल्या राजीव गांधी यांच्या पुतळयास औरंगाबाद ��हर जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
****
विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यात चापानेर, रामनगर इथं अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतांची पाहणी केली. खरडून गेलेल्या शेतजमिनींना आगामी काळाचा विचार करून भरीव मदतीची तरतूद करण्याची गरज अंबादास दानवे यांनी व्यक्त केली. पुरामुळे दगावलेली जनावरं, तसंच ढासळलेल्या विहिरींसाठीही मदत करण्याबाबत त्यांनी सूचना केली.
****
शपथपत्र किंवा करार करून संघटना मोठी होत नसते, असं शिवसेनेच्या शिंदे गटाचे औरंगाबाद इथले नेते राजेंद्र जंजाळ यांनी म्हटलं आहे, ते आज औरंगाबाद इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. बाळासाहेबांचे विचार ज्यांच्या मनात आहेत, ते शिंदे गटासोबत जोडले जात आहेत. आगामी निवडणुकीत सर्व सामान्य जनतेच्या सुखदुखात सहभागी होणाऱ्या नवीन चेहऱ्यांना आपल्या गटाकडून संधी दिली जाणार असल्याचं जंजाळ यांनी सांगितलं.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरणाने २०९ कोटींहून अधिक लसमात्रांचा टप्पा पार केला आहे. दोन कोटी ७८ लाख ३४ हजारावर लसीकरण सत्रांतून हे सुमारे २०९ कोटी, ४० लाख, ४८ हजार १४० लसमात्रा देण्यात आल्या आहेत. १२ ते १४ वर्षे वयोगटातील किशोरांपैकी तीन कोटी ९९ लाख मुलांना कोविड प्रतिबंधात्मक लसीची पहिली मात्रा देण्यात आली आहे.
****
सागरी मार्गाने येऊन मुंबईत हल्ला करण्याची धमकी देणारा संदेश आज मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला आला. या संदेशामुळे सर्व यंत्रणा सावध झाल्या आहेत. हा संदेश नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्सअप क्रमांकावर पाकिस्तानी दूरध्वनी क्रमांकावरून आल्याचं निष्पन्न झालं आहे. २६/११ सारखा हल्ला करणार असल्याचं या धमकीमधे म्हटलं आहे. या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथक, गुप्तचर यंत्रणा, मुंबई पोलिसांसह अन्य यंत्रणांकडून कसून तपास तपास सुरू करण्यात आला आहे.
****
ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य रा. रं. बोरडे यांच्या बहुचर्चित पाचोळा कादंबरीचा सुवर्ण महोत्सवी सन्मान सोहळा आज औरंगाबाद इथं साजरा करण्यात आला. एमजीएम अभिमत विद्यापीठाच्या रुख्मिणी सभागृहात झालेल्या या सोहळ्याचं उद्घाटन ९५ वा व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलानाचे अध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते झालं. सभोवतीच्या घटनांमुळे लेखक करुणा प्रेरित होतो. तेव्हा त्या करुणेतून विशेष कलाकृती जन्माला येत असते. यामुळेच पाचोळा ही कांदबरी आपल्याला पन्नास वर्षानंतरही चर्चा करण्यासाठी भाग पाडत असल्याचं सासणे यावेळी म्हणाले.
यावेळी परिसंवाद, अभिवाचनासह अनेक कार्यक्रम घेण्यात आले. बोराडे यांच्या या कादंबरीवर अनेक मान्यवरांनी आपापली मतं व्यक्त केली. युवा कादंबरीकार सुनिता बोरडे, मेधा पाटील, प्रसाद कुमठेकर, सुशील धसकटे, संतोष जग��ाप यांचा यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.
****
अंबाजोगाई साहित्य संमेलनात आज दुसऱ्या दिवशी विविध विषयांवर परिसंवाद आणि चर्चासत्रात अनेक मान्यवर सहभागी झाले. अंबाजोगाईचे अनिवासी पत्रकार, अंबाजोगाई परिसरातील शेती आणि शेतकरी, मान्यवरांच्या मुलाखती यासह माहेरवाशिणींचा परिसंवादही आज पार पडला. संमेलनाध्यक्ष दासू वैद्य यांच्या साहित्यावरील परिसंवादात विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. अनिवासी अंबाजोगाईकर या संकल्पनेवर आधारित या संमेलनाचा उद्या समारोप होणार आहे.
****
कृषी संस्कृतीशी महिलांचं असणारं नातं सांगणारा बंजारा बांधवांचा तीज उत्सव राज्यात उत्साहाने साजरा होत आहे. श्रावण महिन्यातील राखी पौर्णिमेपासून या दहा दिवसीय तीज उत्सवाला सुरुवात होते, बांबूपासून बनवलेल्या परडीमध्ये वारुळाची माती आणून त्यात गहू पेरले जातात. त्यानंतर पारंपरिक गाणे आणि नृत्य करत हा उत्सव नऊ दिवस साजरा केला जातो. सध्या ठिकठिकाणच्या तांड्यांवर बंजारा लोकगीतांचे स्वर घुमत असल्याचं आमच्या वाशिमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Text - Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 09 August 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०9 ऑगस्ट २०२२ सायंकाळी ६.१०
****
·      राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार; भाजप तसंच शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रत्येकी नऊ आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ.
·      ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज पहाटे मुंबईत ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन.
·      ऑगस्ट क्रांती दिनी औरंगाबाद इथं १६ हजार विद्यार्थ्यांचं सामुहिक राष्ट्रगीत गायन.
आणि
·      ईसापूर धरणातून पाणी विसर्गामुळे पैनगंगा नदीला पूर; विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा पूल पाण्याखाली;वाहतुक ठप्प.
****
राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार झाला. मुंबईत राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या शिंदे गटातल्या प्रत्येकी नऊ सदस्यांना कॅबिनेट मंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
शिंदे गटातून उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, शंभुराज देसाई, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड, संदीपान भुमरे, दीपक केसरकर यांनी, तर भारतीय जनता पक्षाकडून, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, अतुल सावे, सुरेश खाडे, मंगलप्रभाग लोढा, रविंद्र चव्हाण, विजयकुमार गावित यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातल्या या सर्व नव्या मंत्र्यांचं ट्विटरवरून अभिनंदन केलं आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही नव्या मंत्र्यांचं अभिनंदन केलं. मंत्रिमंडळात महिलांना प्रतिनिधीत्व दिलं नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
नव्या मंत्रिमंडळात संजय राठोड यांच्या समावेशावर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला आहे. पूजा चव्हाण या मुलीच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद देणं दुर्देवी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. राठोड यांच्या विरुद्ध न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार असल्याचं चित्रा वाघ यांनी सांगितलं.
या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याबद्दल शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर, राज्यातल्या स्त्री शक्तीवर हा अन्याय असल्याचं ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे.
****
नव्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नसल्याचा आक्षेप ��वकरच दूर होईल, असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, ज्यांना क्लीन चिट मिळाली आहे त्यांनाच मंत्रिमंडळात स्थान दिलं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे.
****
राज्य विधी मंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या १७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी याबाबतचं पत्र जारी केलं आहे.
****
संयुक्त जनता दलाचे प्रमुख नीतीशकुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. आज दुपारी राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेऊन नीतीशकुमार यांनी राजीनामा सादर केला. त्यासोबतच १६० आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र देत, नवीन सरकार स्थापनेचा दावाही नीतीशकुमार यांनी केला आहे. राजीनाम्यानंतर नीतीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दलाच्या नेत्या बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांची भेट घेतल्याचं वृत्त आहे.
****
ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचं आज पहाटे मुंबईत ह्रदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते. मोरूची मावशी हे त्यांचं नाटक अतिशय गाजलं. दिली सुपारी बायकोची, बुवा तेथे बाया, यांसारख्या नाटकांमध्ये देखील त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. दूरचित्रवाणीवरच्या अनेक मालिका, चित्रपट, नाटकात त्यांनी काम केलं. एक फुल चार हाफ, डान्स पार्टी, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, गोळाबेरीज, बॉम्बे वेल्वेट, नवरा माझा नवसाचा आदी चित्रपटांमधल्या त्यांनी साकारलेल्या भूमिका रसिकांच्या स्मरणात आहेत.  
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. रंगभूमी तसंच चित्रपट सृष्टीत आपल्या निखळ, निगर्वी स्वभावाने ओळख निर्माण करणारा गुणी अभिनेता आपण गमावला, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
रंगभूमीवरचा हसरा आणि सदाबहार चेहरा यापुढे दिसणार न���ही, याचं अतिशय वाईट वाटतं, या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं २०६ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. देशात आतापर्यंत या लसीच्या २०६ कोटी ८८ लाख ४९ हजार ७७५ मात्रा देण्यात आल्या आहेत. देशभरात तीन कोटी ९५ लाख मुलांना कोविड लस मात्रा देण्यात आली आहे.
****
आज ९ ऑगस्ट. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात, भारताच्या स्वातंत्र्य चळवळीचा भाग असलेल्या १९४२ च्या भारत छोडो आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांना आज अभिवादन करण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यसैनिकांचं स्मरण केलं, महात्मा गांधी यांच्यापासून प्रेरणा घेऊन छोडो भारत आंदोलनात ज्येष्ठ नेते लोकनायक जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया यांच्यासह समाजाच्या सर्व स्तरातले लोक सहभागी झाले होते, असं पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
****
काँग्रेस पक्षाच्या आझादी गौरव पदयात्रांना आजपासून प्रारंभ झाला. औरंगाबाद जिल्ह्यात सकाळी नऊ वाजता लाडसावंगी इथून या पदयात्रेला सुरुवात झाली, माजी आमदार कल्याण काळे यांच्या नेतृत्वात पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी झाले.
****
धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं शिंदखेडा तालुक्यातील चिमठाणे इथलं क्रांती स्मारक ते दोंडाईचा अशी पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत कॉंग्रेस कार्यकर्ते हातात तिरंगा ध्वज घेवून सहभागी झाले.
****
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त आज औरंगाबादच्या विभागीय क्रीडा संकुलावर सामुहिक राष्ट्रगान करण्यात आलं. शहरातल्या विविध शाळांचे आणि महाविद्यालयाचे सुमारे १६ हजार विद्यार्थी यात सहभागी झाले. खासदार इम्तियाज जलील, आमदार हरिभाऊ बागडे आणि जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. विद्यार्थ्यांनी यावेळी राष्ट्रभक्तीपर गाण्यांवर नृत्य करत सगळ्याचं लक्ष वेधलं.
****
आझादी का अमृत महोत्सवानिमित्त बीड जिल्ह्यात महसूल प्रशासनाकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. याचाच एक भाग म्हणून गेवराई इथं तहसीलदार सचिन खाडे यांनी शहरातल्या विविध शाळेच्या विद्यार्थांचा सहभाग घेऊन शहरातून ७५ मीटर लांब तिरंगा झेंड्याची शोभायात्रा काढली.
****
हिंगोली जिल्ह्यात आज जिल्हा परिषद शाळांच्या वतीनं  हर घर तिरंगा उपक्रमाच्या जनजागृतीसाठी प्रभात फेरी काढण्यात आली. अनेक ठिकाणी पावसाळी वातावरण असतानाही विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे रॅलीत सहभाग घेऊन ग्रामस्थांना हर घर तिरंगा उपक्रमाची माहिती सांगितली
****
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त उस्मानाबाद पोलीस दलाच्या वतीनं आज तिरंगा मोटर सायकल रॅली काढण्यात आली. जिल्ह्यातील सर्व गावात ग्रामपंचायतींच्या वतीने रांगोळ्या काढून हर घर तिरंगाबाबत जनजागृती करण्यात आली.
****
औरंगाबादच्या पैठण इथल्या नाथसागर धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाचे १८ दरवाजे एक फूट उचलून सध्या सुमारे साडे तीस हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणात सध्या ५२ हजार ७३७ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी दाखल होत असून धरणातला पाणी साठा साडे ९५ टक्क्यांवर गेला असल्याची माहिती गोदावरी पाटबंधारे विभागानं दिली आहे.
****
ईसापूर धरणाचे १३ दरवाजे उघडून पैनगंगा नदी पात्रात पाणी सोडण्यात आलं आहे. यामुळे पैनगंगा नदीवरील हिंगोली जिल्ह्यातल्या शिऊर पुलावरून पाणी वाहत आहे. विदर्भ आणि मराठवाड्याला जोडणारा शेंबाळपिंपरी ते कळमनुरी हा मार्ग आज सकाळपासून बंद झाला आहे. या मार्गावरची बस वाहतुकही ठप्प झाली आहे.
****
गेल्या दीड महिन्यापासून लातूर जिल्ह्यात संततधार पाऊस होत असून काही मंडळात अतिवृष्टीही झाली आहे. जिल्हा प्रशासनानं पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करावा आणि शेतकऱ्यांना तातडीनं मदत मिळवून द्यावी अशी मागणी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केली आहे. निवासी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन सादर करण्यात आलं आहे.
****
राज्यात पुढचे तीन दिवस ११ ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. या काळात मराठवाड्यात नांदेड, हिंगोली, परभणी, जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट तर जालना, बीड, आणि लातूर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
****
मुस्लीम बांधवांकडून आज मोहर्रम पाळण्यात आला. औरंगाबाद इथं शिया बांधवांकडून आज यौमे आशुरानिमित्त मातमी जुलूस काढण्यात आला. शिया बांधवांनी हजरत हुसैन यांच्या स्मृती जागवल्या. यावेळी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
****
0 notes
airnews-arngbad · 3 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 December 2021 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २९ डिसेंबर २०२१ दुपारी १.०० वा. ****
राज्यात कोरोना विषाणू बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याबद्दल आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी चिंता व्यक्त केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज्यातल्या निर्बंधांबाबत चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले. कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी लसीकरण हा महत्वाचा उपाय असून, त्यावर अधिक भर दिला पाहिजे, असं सांगून टोपे यांनी, लसीकरणासाठी स्थानिक नेत्यांनी पुढाकार घेऊन काम करावं, असं आवाहन केलं. १५ ते १८ वर्षे वयाच्या मुलांचं लसीकरण शाळेत जाऊन करण्याबाबत शक्यतेची तपासणी करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
****
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पथकानं महाराष्ट्र सरकारला कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. ओमायक्रॉन विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पथकानं राज्यात अनेक ठिकाणी पाहणी केली, त्यानंतर काढलेल्या निष्कर्षावरुन लसीकरणाबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. लसीकरणामुळे ओमायक्रॉनचा संसर्ग कमी करता येऊ शकतो, यावर या पथकानं भर दिला आहे.  
****
देशात को���िड प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेनं १४३ कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात ६४ लाख ६१ हजार ३२१ नागरिकांचं लसीकरण झालं. देशात आतापर्यंत या लसीच्या १४३ कोटी १५ लाख ३५ हजार ६४१ मात्रा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात काल नव्या नऊ हजार १९५ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर ३०२ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल सात हजार ३४७ रुग्ण बरे झाले. देशात आतापर्यंत तीन कोटी ४२ लाख ५१ हजार २९२ रुग्ण कोरोना विषाणू मुक्त झाले असून, सध्या ७७ हजार दोन रुग्णांवर उपचार सुरु आहेत.    
****
भारताचं सकल देशांतर्गत उत्पादन वित्त वर्ष २०२२ ते २०२३ दरम्यान नऊ टक्के वाढीचा दर राखेल, असा अंदाज, आय सी आर ए या पत मानांकन संस्थेनं व्यक्त केला आहे. कोविड-19 च्या ओमायक्रॉन या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेबाबत साशंकता निर्माण झाली आहे, अशा स्थितीत हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढील वित्त वर्षातील आर्थिक विस्तार अधिक अर्थपूर्ण आणि टिकाऊ राहील, अशी अपेक्षा, संस्थेच्या मुख्य अर्थ तज्ञ अदिती नायर यांनी व्यक्त केली आहे.
****
गेल्या २७ डिसेंबरपर्यंत नवीन ई-फायलिंग पोर्टलवर आतापर्यंत चार कोटी ६७ लाखांच्या वर नागरिकांनी आयकर विवरणपत्र भरलं असल्याची माहिती आयकर विभागानं दिली आहे. गेल्या सोमवारी १५ लाख ४९ हजार नागरिकांनी आपलं विवरणपत्र भरलं आहे. ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत असल्यानं ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.  
****
प्राप्तिकर विभागाने राज्यात नंदुरबार आणि धुळे जिल्ह्यातल्या दोन व्यावसायिक गटांवर गेल्या आठवड्यात शोध आणि जप्तीची कारवाई केली. हे गट नागरी बांधकाम आणि जमीन विकासाच्या व्यवसायात गुंतलेले आहेत. नंदुरबार, धुळे आणि नाशिकमध्ये पसरलेल्या २५ हून अधिक ठिकाणी ही शोधमोहीम राबवण्यात आली. या मोह���मेदरम्यान अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, सुटी कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे सापडले आहेत. करचोरी, जमिनीचे गैरव्यहार, बेहिशेबी मालमत्ता, या संशयामुळे ही कारवाई करण्यात आली. या शोध मोहिमेत आतापर्यंत पाच कोटी रुपयांहून अधिक रुपयांची बेहिशेबी रोकड आणि पाच कोटी रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
****
औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयालगतच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाशेजारी असलेल्या जुन्या टॉवरवर चढत, संभाजी भोसले या व्यक्तीने काल आंदोलन केलं. औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांनी कोट्यावधीचा घोटाळा केला आहे, यासंदर्भात गेल्या ४२ दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भोसले हे उपोषण करत होते. प्रशासनानं दखल न घेतल्यानं हे आंदोलन केल्याचं त्यांनी सांगितलं. पोलिस आयुक्त निखील गुप्ता यांनी भोसले यांची समजूत काढली, त्यानंतर त्यांनी हे आंदोलन मागे घेतलं.
****
औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या काही गावात वादळी वाऱ्याचा आणि गारपिटीचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. लाखो रुपयांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झाले आहेत. यासंदर्भात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी जिल्हाधिकारी आणि कृषी खात्यातल्या अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्क साधून तत्काळ नुकसान पाहणीचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, मराठवाड्यासह विदर्भात काल सर्वत्र अवकाळी पाऊस झाला. अनेक ठिकाणी गारपीट झाली. या गारपीटीने रब्बी पिकांचं आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
****
येत्या २ दिवसांत मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात ऑरेंज अॅलर्ट दिला असून, तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसच गारा पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे.
****
0 notes