Tumgik
#एकदिवसीय विश्वचषक
airnews-arngbad · 8 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 12 February 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १२ फेब्रुवारी २०२४ सकाळी ७.१० मि.
****
नारीशक्तीच्या बळावर विकसित भारताची अधिक सक्षमतेनं वाटचाल-उपराष्ट्रपतींचं प्रतिपादन
एक लाखावर उमेदवारांना आज पंतप्रधानांच्या हस्ते रोजगार मेळाव्यात नियुक्तीपत्रांचं वाटप
लातूर इथं येत्या २४ तारखेला ‘विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन
नांदेड जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पाऊस-अंगावर वीज कोसळून एकाचा मृत्यू
आणि
१९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेपद
****
देशाच्या अमृत काळात नारीशक्तीच्या बळावर विकसित भारताची वाटचाल अधिक सक्षमतेनं होईल, असं प्रतिपादन, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. काल गोंदिया इथं मनोहरभाई पटेल यांच्या ११८ व्या जयंती समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. उपराष्ट्रपती यांच्या सुविद्य पत्नी डॉ. सुदेश धनखड, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. गोंदिया नगर परिषद भवनासाठी ३० कोटी रूपये निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातल्या प्रगतीशील शेतकरी, गुणवंत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडापटू आणि पत्रकारांचा यावेळी उपराष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रोजगार मेळाव्याअंतर्गत केंद्र सरकारच्या विविध आस्थापनांमध्ये नव्याने भरती झालेल्या एक लाखाहून अधिक उमेदवारांना दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वाटप करणार आहेत. देशभरात ४७ ठिकाणी हा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे.
****
संतांचं सान्निध्य असणारी महाराष्ट्र ही शौर्य आणि पराक्रमाची भूमी आहे, भक्तीतून मिळणारी शक्तीच शत्रूंचा सामना करण्यासाठी शक्ती देते, असं प्रतिपादन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. आळंदी इथं सुरू असलेल्या गीता- भक्ती अमृत महोत्सवात ते काल बोलत होते. त्यापूर्वी त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीचं दर्शन घेतलं. माऊलींच्या पावन भूमीत लहानपणापासून येण्याची इच्छा आज पूर्ण झाल्याची भावना आदित्यनाथ यांनी यावेळी व्यक्त केली.
****
भारतीय संस्कृती आणि विचार जनसामान्यांपर्यंत पेाहोचवण्याचं कार्य वारकरी शिक्षण संस्थेतल्या विद्यार्थ्यांमार्फत होत असल्याची भावना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. काल आळंदी इथं वारकरी शिक्षण संस्थेच्या ‘बंकटस्वामी सदन’ विद्यार्थी वसतिगृहाचं लोकार्पण केल्यानंतर ते बोलत होते. संस्थेतल्या ५०० विद्यार्थ्यांच्या निवास व्यवस्थेसाठी पाच कोटी रुपये निधी दिला जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी यावेळी केली.
****
सरकारने कापूस पणन महासंघाची खरेदी केंद्रं तातडीनं सुरू करावीत, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. काल मुंबईत झालेल्या काँग्रेस पक्षाच्या जिल्हा समितीच्या बैठकीनंतर ते बोलत होते. कापसाला सात हजार २०० रुपयांचा हमीभाव निश्चित करण्यात आला असताना, खुल्या बाजारात मात्र सहा हजार ३०० रुपये दरानं कापूस विक्री होत आहे. यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याकडे वडेट्टीवार यांनी लक्ष वेधलं. खरेदी केलेल्या कापसाचे धनादेश शेतकऱ्यांना तातडीनं देण्यात यावे, सीसीआयच्या अटी रद्द कराव्यात, अशा मागण्या वडेट्टीवार यांनी सरकारकडे केल्या आहेत.
****
राज्यात यंदा २०७ साखर कारखान्यांमध्ये साडेसात कोटी मेट्रिक टन इतकं ऊस गाळप झालं असल्याचं, साखर आयुक्त कार्यालयानं सांगितलं आहे. राज्यातले चार साखर कारखाने बंद झाले असून, अवेळी पावसामुळे उसाच्या वजनात वाढ झाल्याने १० टक्के गाळप वाढेल असा अंदाज कार्यालयानं व्यक्त केला आहे.
****
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाअंतर्गतच्या शिपाई पदासाठी घेण्यात येणारी परीक्षा हिंदी आणि इंग्रजीसोबतच इतर १३ प्रादेशिक भाषांमध्ये घेण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयानं घेतला आहे. यात मराठीसह गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, उर्दू, आणि कोंकणी आदी भाषांचा समावेश आहे. येत्या २० फेब्रुवारी ते सात मार्च दरम्यान देशभरातल्या १२८ शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ४८ लाख उमेदवारांनी अर्ज भरले असल्याची माहिती मंत्रालयानं दिली आहे.
****
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येत्या गुरूवारी छत्रपती संभाजीनगर इथं जाहीर सभा घेणार आहेत. शहरातल्या मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर दुपारी साडे चार वाजता ही सभा होणार आहे. भाजपचे शहराध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
दरम्यान, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज छत्रपती संभाजीनगर इथं जनसंवाद दौऱ्यावर येत आहेत. याअंतर्गत ते गंगापूर, वैजापूर, कन्नड आणि संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर इथं जनतेशी संवाद साधणार आहेत.
****
भारतीय जनता पक्षातर्फे सुरू असलेल्या ‘गाव चलो अभियाना’ अंतर्गत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी काल धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर गावातल्या नागरिकांशी संवाद साधला. शिक्षक, चर्मकार समाज आणि बॅडमिंटन गटाच्या सदस्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी, मागण्या आणि संकल्पना जाणून घेतल्या.
****
लातूर इथं येत्या २४ तारखेला मराठवाड्यातल्या युवकांसाठी ‘विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात येणार आहे. हा मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी समन्वयानं काम करण्याच्या सुचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिले आहे. छत्रपती संभाजीनगर इथं विभागीय आयुक्त कार्यालयात यासंदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. या  मेळाव्यासाठी जास्तीत जास्त उमेदवारांनी आणि औद्योगिक संस्थांनी नावनोंदणी करावी यादृष्टीने प्रयत्न करावेत, असे निर्देश विखे पाटील यांनी यावेळी दिले.
छत्रपती संभाजीनगर इथं राज्य तलाठी संघाच्या राज्यस्तरीय अधिवेशनालाही विखे पाटील यांनी काल संबोधित केलं. ग्रेड पे बाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्याचं त्यांनी यावेळी आश्वासन दिलं.
****
नांदेड जिल्ह्यात काल संध्याकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. तसंच अनेक ठिकाणी गारपीटही झाली. मुदखेड तालुक्यातल्या पिंपळकौठा इथं वीज पडल्यानं दत्ता वाघमारे या २२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातल्या उमरी, हिमायतनगर, भोकर, मुदखेड आणि किनवट तालुक्यात रबी पिकांचं मोठ नुकसान झालं. दरम्यान, अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आणि मदतकार्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली.
****
धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी येत्या २२ फेब्रुवारीपासून मुंबईत आझाद मैदानात उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे. काल बीड इथं झालेल्या धनगर समाजाच्या इशारा सभेत ही माहिती देण्यात आली. येत्या १७ तारखेला अहमदनगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या चौंडी या अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मगावी अभिवादन करुन मुंबईकडे जाणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.
****
मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या तिसऱ्या टप्प्यातल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारनं काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी होणार नाही, तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही आणि उपचारही घेणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी घेतली आहे.
****
बीड जिल्ह्यात आष्टी इथल्या पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयातल्या १२५ विद्यार्थ्यांपैकी १०९ विद्यार्थ्यांनी नॅशनल मीन्स कम मेरीट स्कॉलरशीप - एन एम एम एस परीक्षेत यश मिळवलं. या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा शाळेच्या वतीनं विशेष समारंभात सत्कार करण्यात आला. याबाबत अधिक माहिती देत आहेत, आमचे वार्ताहर..
‘‘या सर्व विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रत्येकी १२ हजार रुपये प्रमाणे चार वर्षात एकूण ४८ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या निकालामुळे यंदा हे विद्यालय राज्यात नंबर वन ठरलं आहे. विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशामुळे या विद्यालयाचं राज्यभरात कौतुक होत आहे. सराव मेहनत नियमितपणे केल्यास हमखास यश मिळाल्याशिवाय राहत नाही, हेच यावरून सिद्ध होतं.’’
आकाशवाणी बातम्यांसाठी रवी उबाळे -बीड
****
क्रिकेट
१९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. ऑस्ट्रेलियन संघानं दिलेल्या दोनशे त्रेपन्न धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतांना, भारतीय संघ ४४ व्या षटकांत १७४ धावांवर सर्वबाद झाला.
****
स्वयंसहायता समूहातल्या महिलांना सशक्त-स्वावलंबी करणं हे केंद्र शासनाचं ध्येय असल्याचं, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ भागवत कराड यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं महिला बचत गटाच्या प्रदर्शनाचा काल कराड यांच्या उपस्थितीत समारोप झाला, त्यावेळी ते बोलत होते. प्रदर्शनात सहभागी झालेल्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
****
नांदेड शहरात सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसऱ्या टप्प्याचा आज समारोप होत आहे. शहरातल्या नंदीग्राम सोसायटी भागात या यात्रेचा समारोप होईल, अशी माहिती, आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी दिली. दरम्यान काल वामननगर चौक आणि गोकुळनगर चौक इथं विकसित भारत संकल्प यात्रेनं जनजागृती केली.
****
बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यात चांदापूर इथं काल दहावी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद घेण्यात आली. निवृत्त न्यायमूर्ती बाबुराव तिडके यांच्या हस्ते धम्म ध्वजारोहण करुन या परिषदेला सुरुवात झाली.
****
0 notes
cinenama · 11 months
Text
टीम इंडियाने दिली देशाला भाऊबीजेची भेट; वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक
indvsnz World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषक 2023 चा पहिला उपांत्य सामना भारत आणि न्यूझीलंड (ind vs nz) यांच्यात खेळला गेला. भारतीय संघाने विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला आहे. या विजयासह भारतीय संघाने तब्बल 12 वर्षांनंतर अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली आणि श्रेयस अय्यरच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Team India Schedule: वर्ल्डकपला १० महिने बाकी, त्याआधी भारत १८ वनडे खेळणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Team India Schedule: वर्ल्डकपला १० महिने बाकी, त्याआधी भारत १८ वनडे खेळणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Team India Schedule: वर्ल्डकपला १० महिने बाकी, त्याआधी भारत १८ वनडे खेळणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक India Cricket Team Schedule For Year 2023: २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक राऊंड रॉबिन स्वरूपात खेळवला जाईल. म्हणजेच २०१९ च्या विश्वचषकाप्रमाणे सर्व १० संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळतील. एक संघ एकूण ९ सामने खेळणार आहे. India Cricket Team Schedule For Year 2023: २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक राऊंड रॉबिन…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
भारत एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा सफाया करेल, T20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल; इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनचा दावा - टीम इंडिया एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल! असा दावा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने केला आहे
भारत एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा सफाया करेल, T20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल; इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनचा दावा – टीम इंडिया एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकेल! असा दावा इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने केला आहे
इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन म्हणतो की, सध्याच्या भारतीय संघाने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये सर्व पांढऱ्या चेंडूच्या आयसीसी स्पर्धा (टी२० विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकल्या पाहिजेत. ओव्हल येथे झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडविरुद्ध 10 विकेट्सने मिळवलेल्या विजयानंतर मायकेल वॉनने हे वक्तव्य केले आहे. भारतीय संघ ३ सामन्यांच्या वनडे मालिकेत १-० ने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years
Text
हरभजन सिंगला या भारतीय गोलंदाजाला T20 विश्वचषक संघात पाहायचे आहे
हरभजन सिंगला या भारतीय गोलंदाजाला T20 विश्वचषक संघात पाहायचे आहे
भारत विरुद्ध वेस्टइंडीज हरभजन सिंग प्रसीद कृष्णा: भारतीय संघाचा युवा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत चमकदार कामगिरी केली. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 9 षटकात 12 धावा देत 4 बळी घेतले. यासोबतच प्रसिद्ध कृष्णाने तीन मेडन षटकेही टाकली. याआधीही त्याने अनेक देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंगने प्रसिद्ध कृष्णाचे कौतुक…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
वेस्ट इंडीजला स्लो ओव्हर-रेटसाठी दंड, २०२३ च्या भारताला मोठा धक्का | क्रिकेट बातम्या
वेस्ट इंडीजला स्लो ओव्हर-रेटसाठी दंड, २०२३ च्या भारताला मोठा धक्का | क्रिकेट बातम्या
निकोलस पूरनचा फाइल फोटो.© एएफपी न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्लो ओव्हर-रेटमुळे दोन सुपर लीग पॉइंट्स वजा झाल्यानंतर वेस्ट इंडिज क्रिकेट संघासाठी ICC क्रिकेट विश्वचषक 2023 साठी थेट पात्रता मार्ग आता अधिक दूरचा वाटतो. पूरनच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडिज संघ निर्धारित वेळेत त्यांची षटके पूर्ण न केल्याबद्दल दोषी आढळला आणि म्हणून दोन सुपर लीग पॉइंट डॉक करून दंड आकारण्यात आला. स्लो…
Tumblr media
View On WordPress
0 notes
swetamarathinews · 2 years
Text
0 notes
digimakacademy · 5 years
Text
u 19 world cup 2020 india bowled out japan on measurable total of 41 runs no batsman scored double digit score | U-19 WC 2020 : भारताविरूद्ध जपानचं स्कोअरकार्ड; १,७,०,०,०,०,०,७,५,१ …
[ad_1]
१९ वर्षाखालील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाने अवघ्या २९ चेंडूत विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना जपानचा संघ अवघ्या ४१ धावांत गारद झाला होता. त्यानंतर ४२ धावांचे अतिशय सोपे आव्हान भारताच्या सलामीवीरांनीच पार केले. जपानच्या फलंदाजांचा भारतीय गोलंदाजांनी अक्षरश: धुव्वा उडवला.
U-19 World Cup 2020 : भारत अवघ्या २९ चेंडूत ‘यशस्वी’; उडवला जपानचा धुव्वा
भारतीय संघाने नाणेफेक जिंकून…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 8 months
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
संक्षिप्त बातमीपत्र
११ फेब्रुवारी २०२४ सकाळी ११.०० वाजता
****
नवीन शैक्षणिक धोरण राबविण्यात महाराष्ट्र हे देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य असून या धोरणाच्या प्रोत्साहनासाठी शासन सर्वतोपरी आणि सतत प्रयत्नशील राहील, असं प्रतिपादन राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
नाशिक इथं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात आयोजित शिक्षणतज्ञांची संघटना - आय.ए.टी.ई. च्या ५६ व्या तीन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत पाटील काल बोलत होते.
****
राज्यातल्या सर्व आदिवासी शासकीय आश्रमशाळांमध्ये शास्त्र आणि गणित विषयांच्या स्वतंत्र प्रयोगशाळा उभारल्या जाणार असून, प्रत्येक आदिवासी विकास प्रकल्प क्षेत्रात मुलामुलींसाठी स्वतंत्र क्रीडा आश्रमशाळा निर्माण केल्या जाणार असल्याचं राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांनी सांगितलं आहे.
नंदुरबार जिल्ह्यात लोभाणी इथं काल मुलींच्या आश्रम शाळेच्या इमारत उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शिक्षकांसाठी परीक्षा आणि प्रशिक्षण अनिवार्य करण्यात येणार असून त्यानंतर ज्या शिक्षकांचे विद्यार्थी नापास होतील त्यांची वेतनवाढ रोखण्यात येईल, असही गावीत यांनी नमूद केलं.
****
मुंबई-नागपूर समृध्दी महामार्गावर काल रात्री एक कार अज्ञात वाहनावर धडकून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अब्दीमंडीनजीक हा अपघात झाला. तिघेही प्रवासी छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी होते. नाशिकच्या दिशेनं जात असतांना, त्यांची चारचाकी एका वाहनाला पाठीमागून धडकल्यामुळे हा अपघात झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी इथं ५१व्या राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनाला प्रारंभ झाला असून येत्या १४ फेब्रुवारीपर्यंत ते सुरू असणार आहे. या प्रदर्शनात राज्यभरातून चारशे विज्ञान प्रतिकृतींसह आठशे विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले आहेत.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या १९ वर्षांखालील एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना आज  भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. आज दुपारी दीड वाजता हा सामना सुरू होईल.
****
विदर्भात तुरळक ठिकाणी आज आणि उद्या विजांसह जोराच्या पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान ढगाळ राहून तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
संक्षिप्त बातमीपत्र संपलं, यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र, AIR छत्रपती संभाजीनगर या यू- ट्यूब चॅनेलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.
****
0 notes
inshortsmarathi · 5 years
Text
अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णाधारपदी रशीद खान याची निवड
अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णाधारपदी रशीद खान याची निवड
अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णाधारपदी अष्टपैलू खेळाडू रशीद खान याची निवड झाली आहे. कसोटी, एकदिवसीय तसेच टी-२० सामन्यांमध्ये तो अफगाणिस्तानचे नेतृत्व करेल. असगर अफगान हा संघाचा उप-कर्णधार असेल, अशी माहिती अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने दिली आहे.
इंग्लंड येथे सुरू असलेल्या एकदिवसीय विश्वचषक २०१९ स्पर्धेत अफगानिस्तान संघाचे खराब प्रदर्शन झाले. संघाला एकही सामना जिंकता आला नाही. गुणतालिकेत…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
Team India Schedule: वर्ल्डकपला १० महिने बाकी, त्याआधी भारत १८ वनडे खेळणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Team India Schedule: वर्ल्डकपला १० महिने बाकी, त्याआधी भारत १८ वनडे खेळणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Team India Schedule: वर्ल्डकपला १० महिने बाकी, त्याआधी भारत १८ वनडे खेळणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक India Cricket Team Schedule For Year 2023: २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक राऊंड रॉबिन स्वरूपात खेळवला जाईल. म्हणजेच २०१९ च्या विश्वचषकाप्रमाणे सर्व १० संघ एकमेकांविरुद्ध सामने खेळतील. एक संघ एकूण ९ सामने खेळणार आहे. India Cricket Team Schedule For Year 2023: २०२३ चा एकदिवसीय विश्वचषक राऊंड रॉबिन…
View On WordPress
0 notes
loksutra · 2 years
Text
कपिल देव नाही, मोहिंदर अमरनाथ विश्वचषक SF आणि फायनलमध्ये MOM मध्ये आहे, शेन वॉर्ननंतर, 23 वर्षांपासून कोणीही अशा ठिकाणाला स्पर्श केला नाही 23 वर्षानंतर अशा बिंदूला कोणी स्पर्श केला नाही.
कपिल देव नाही, मोहिंदर अमरनाथ विश्वचषक SF आणि फायनलमध्ये MOM मध्ये आहे, शेन वॉर्ननंतर, 23 वर्षांपासून कोणीही अशा ठिकाणाला स्पर्श केला नाही 23 वर्षानंतर अशा बिंदूला कोणी स्पर्श केला नाही.
क्रिकेटमध्ये अनेकवेळा क्रीडा समीक्षकांचे म्हणणे ऐकायला हवे की, विक्रम बनवल्याबरोबर तोडायचे असतात. मात्र, असे काही विक्रम आहेत जे दीर्घकाळ मोडत नाहीत. येथे आपण अशाच एका एकदिवसीय विश्वचषकाच्या विक्रमाबद्दल बोलू. हा विक्रम 1983 च्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय अष्टपैलू खेळाडूच्या नावावर होता. मात्र, त्याचे नाव अष्टपैलू कपिल देव नसून विश्वचषक विजेत्या संघाचा उपकर्णधार मोहिंदर अमरनाथ आहे. विश्वचषकाच्या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 2 years
Text
वर्ल्ड कप सुपर लीग: नेदरलँड्सचा पराभव करून इंग्लंड अव्वल स्थानावर, हे आहे गुणतालिकेत
वर्ल्ड कप सुपर लीग: नेदरलँड्सचा पराभव करून इंग्लंड अव्वल स्थानावर, हे आहे गुणतालिकेत
आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक सुपर लीग गुण सारणी: नेदरलँड्सविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात विजयाची नोंद करत इंग्लंडने मालिका 3-0 ने जिंकली. इंग्लंडने मालिकेतील पहिला सामना 232 धावांनी, दुसरा सामना 6 गडी राखून आणि शेवटचा सामना 8 विकेटने जिंकला. आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक सुपर लीगच्या गुणतालिकेत या विजयाचा फायदा इंग्लंडलाही झाला आहे. आता इंग्लंड 125 गुणांसह गुणतालिकेत अव्वल…
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years
Text
ICC पुरुषांची एकदिवसीय क्रमवारी: भारत तिसऱ्या स्थानावर, पाकिस्तान चौथ्या स्थानावर | क्रिकेट बातम्या
ICC पुरुषांची एकदिवसीय क्रमवारी: भारत तिसऱ्या स्थानावर, पाकिस्तान चौथ्या स्थानावर | क्रिकेट बातम्या
टीम इंडियाचा फाइल फोटो© एएफपी झिम्बाब्वेच्या क्लीन स्वीपमुळे भारताला मंगळवारी येथे जाहीर झालेल्या ताज्या आयसीसी वनडे संघ क्रमवारीत तिसरे स्थान राखण्यास मदत झाली. हरारे येथील मालिका ३-० ने जिंकल्याने भारताचे आता १११ रेटिंग गुण झाले आहेत. नेदरलँड्सविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिका स्विप केल्याबद्दल पाकिस्तानलाही बक्षीस मिळाले. द बाबर आझम-नेतृत्वाखाली��� संघाने त्यांच्या क्रिकेट विश्वचषक सुपर लीग…
Tumblr media
View On WordPress
0 notes
swetamarathinews · 2 years
Text
0 notes
bharatiyamedia-blog · 5 years
Text
11 June 2019 Present Affairs In Marathi (Chalu Ghadamodi)
http://tinyurl.com/yywg3j4u चालू घडामोडी (11 जून 2019) चांद्रयान-2 मोहिमेची तारीख ठरली : भारतीय अंतराळ संसोधन संस्था अर्थात इस्रोची महत्वाकांक्षी चांद्रयान-2 मोहिमेची चाचणी अखेरच्या टप्प्यात आली असून तामिळनाडूच्या महेंद्रगिरी आणि बंगळूरूच्या ब्यालालू येथे ही चाचणी सुरु आहे. तसेच येत्या 9 जुलैपासून या मोहिमेचे लॉन्चिंग करण्याचा इस्रोचा मानस आहे. तर इस्रोच्या वेळापत्रकानुसार, या मोहिमेवर जाणारे अंतराळयान 19 जून रोजी बंगळूरू येथून रवाना होईल त्यानंतर ते 20 किंवा 21 जूनला श्रीहरिकोटा येथील प्रक्षेपण केंद्रावर पोहोचेल. त्यानंतर येथून त्याचे चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण होईल. चंद्रावर गेल्यानंतर थ्रीडी मॅपिंगच्या माध्यमातून तिथल्या पाण्याच्या रेणूंची तपासणी, खनिजांची तपासणी त्याचबरोबर ज्या ठिकाणी आजवर कोणीही पोहोचलेले नाही अशा चंद्राच्या बाजूवर यान उतरवणे यासाठी इस्रोने मोठी तयारी केली आहे. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर 3,844 लाख किमी आहे. यामध्ये यानाचे प्रक्षेपण अचूकता अंतर ही महत्वाची गोष्ट आहे. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा यावर परिणाम होतो. त्याचबरोबर चंद्रावर इतर खगोलीय संस्थांचा वावर असून सुर्याच्या अतिनील किरणांचाही परिणाम यावर होणार आहे. त्याचबरोबर संवाद साधताना होणारा उशीर ही देखील या मोहिमेतील एक मोठी समस्या आहे. पृथ्वीवरुन कोणताही संदेश पाठवला तर तो यानापर्यंत पोहोचताना काही मिनिटं लागू शकतात. त्याठिकाणी संदेशासाठीचे रेडिओ सिग्नल्स कमजोर असू शकतात. त्याचबरोबर या संवादादरम्यान होणारा वातावरणाचा आवाजही यावर परिणाम करु शकतो. 12 आयकर अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती : मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मची सुरुवात होऊन 10 दिवस होत असतानाच अर्थ मंत्रालयाने आयकर विभागात ‘सफाई’ अभियान सुरु केले आहे. भ्रष्टाचार आणि बेहिशेबी मालमत्ता असे आरोप असलेल्या 12 अधिकाऱ्यांना सरकारने निवृत्ती घ्यायला लावली.अर्थ मंत्रालयाने डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड एडमिनिस्ट्रेटिव रिफॉर्म्समधील 56व्या कलमाअंतर्गत 12 अधिकाऱ्यांना निवृत्ती घ्यायला लावली.आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि सहाय्यक आयुक्तपदावरील अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. 1985 च्या बॅचमधील आयकर विभागातील सहआयुक्त अशोक अग्रवाल यांचा या यादीत समावेश आहे. अग्रवाल यांनी सक्तवसुली संचालनालयातही काम केले होते. याशिवाय नोएडातील आयकर आयुक्त एस के श्रीवास्तव यांना देखीलसक्तीची निवृत्ती घ्यायला लावली आहे. श्वेताभ सुमन, होमी राजवंश (आयकर आयुक्त, तामिळनाडू), बी बी राजेंद्र प्रसाद (आयुक्त, गुजरात), अलोक कुमार मित्रा (आयुक्त कोच्ची), अजय कुमार सिंह (आयुक्त, कोलकाता), बी अरुलप्पा(आयुक्त, कोच्ची), विवेक बत्रा (अतिरिक्त आयुक्त, भुवनेश्वर), चंद्रसेन भारती (अतिरिक्त आयुक्त अलाहाबाद), राम कुमार भार्गव (सहाय्यक आयुक्त, लखनौ) हे भ्रष्टाचाराप्रकरणी दोषी ठरले असून त्यांना देखील निवृत्ती घ्यायलालावण्यात आली आहे. या अध��काऱ्यांना निवृत्ती वेतनाचा लाभ मिळणार नाही. ज्येष्ठ अभिनेते गिरीश कर्नाड यांचे निधन : नाटककार, अभिनेते, चित्रपट दिग्दर्शक आणि लेखक गिरीश कर्नाड यांचे बंगळुरूत निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. जागतिक स्तरावरील साहित्य आणि कला यामधील योगदानाबद्दल त्यांना 1999 मध्ये ज्ञानपीठ पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तसेच पद्मश्री आणि पद्मभूषण या पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तसेच त्यांनी ‘कानुरू हेगाडीथी’ (1999) या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते, तर ‘इक्बाल’ (2005) आणि ‘लाइफ गोज ऑन’ (2009), एक था टायगर अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. त्यांना चार फिल्मफेअर पुरस्कार मिळाले असून त्यापैकी तीन पुरस्कार कन्नड चित्रपट वंश वृक्ष (1972), काडू (1974), ओन्दानुंडू कालाडल्ली (1978) या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी आणि ‘गोधुली’ (1980) या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी मिळाला आहे. याशिवाय उंबरठा या मराठी चित्रपटामध्येही त्यांनी काम केले होते. 1994 साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. संस्कार चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. युवराज सिंगची निवृत्तीची घोषणा : भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग याने मुंबईमधील पत्रकार परिषदेमध्ये निवृत्तीची घोषणा केली. तर या घोषणेबरोबर युवराजच्या 18 वर्षांच्या कारकिर्दीला पूर्णविराम लागला आहे. तसेच कोणत्याही भारतीय खेळाडूला करता आला नाही असा पराक्रम आपल्या नावावर करणारा युवराज हा एकमेव खेळाडू ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तीन विश्वचषक जिंकणाऱ्या संघांमध्ये युवराजचा समावेश होता. यामध्ये 19 वर्षांखालील विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि एकदिवसीय क्रिकेटमधील विश्वचषकाचा समावेश आहे. दिनविशेष : मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजी महाराज यांच्यात सन 1665 मध्ये 11 जून रोजी पुरंदरचा तह झाला. 11 जून 1895 मध्ये पॅरिस-बॉर्डोक्स-पॅरिस ही इतिहासातील पहिली ऑटोमोबाईल रेस किंवा पहिली मोटर रेस झाली. एडविन आर्मस्ट्राँग यांनी 11 जून 1935 रोजी पहिल्यांदा एफ.एम. लहरींचे प्रसारण केले. चालू घडामोडी PDF स्वरुपात मिळविण्यासाठी येथे क्लिक करा Source link
0 notes