Tumgik
#उपराष्ट्रपतिपदासाठी
bharatlivenewsmedia · 2 years
Text
जगदीप धनकड यांना भाजपकडून उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी
जगदीप धनकड यांना भाजपकडून उपराष्ट्रपतिपदासाठी उमेदवारी उपराष्ट्रपतिपद निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे विद्यमान राज्यपाल जगदीप धनकड यांना भाजपप्रणित NDA कडून उमेदवारी देण्यात आली. उपराष्ट्रपतिपद निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे विद्यमान राज्यपाल जगदीप धनकड यांना भाजपप्रणित NDA कडून उमेदवारी देण्यात आली.   भाजप अध्यक्ष जे. पी.…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 05 August 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०५ ऑगस्ट २०२२ सायंकाळी ६.१० ****
·      खासदारांना संसद सत्रादरम्यानही ईडीचं समन्स टाळता येणार नाही-उपराष्ट्रपतींची स्पष्टोक्ती.
·      उपराष्ट्रपतिपदासाठी उद्या संसद भवनात मतदान; सायंकाळी मतमोजणी.
·      खाद्य तेलाच्या कमाल किरकोळ किंमतीत १५ रुपये प्रति लीटर कपातीचे खाद्यतेल संघटनांना निर्देश.
आणि
·      महागाई तसंच बेरोजगारीसह विविध मुद्यांवर काँग्रेसची निदर्शनं.
****
संसद सत्रादरम्यान किंवा इतरही सामान्य दिवसांत सक्तवसुली संचालनालयाचं समन्स खासदारांना टाळता येणार नाही, असं उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांना काल ईडीने चौकशीसाठी बोलावल्याच्या पार्श्वभूमीवर आज राज्यसभेचं कामकाज सकाळच्या सत्रात स्थगित होऊन पुन्हा सुरू झाल्यावर नायडू यांनी ही बाब स्पष्ट केली. सर्वोच्च न्यायालय आणि राज्यसभेच्या विविध निर्णयांचा दाखला देत, आपराधिक प्रकरणांच्या चौकशीसाठी खासदार आणि सामान्य नागरिक यांच्यात भेदभाव करता येत नसल्याचं नमूद केलं. खासदार असल्याचं कारण देत, अशी चौकशी टाळता येणार नसल्याचं नायडू यांनी सांगितलं.
****
उपराष्ट्रपती पदासाठी उद्या संसद भवनात सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार जगदीप धनकर आणि विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांच्यात उपराष्ट्रपती पदासाठी थेट लढत होणार आहे.
संसदेच्या दोन्ही सदनातल्या सदस्यांच्या मतदानातून उपराष्ट्रपतींची निवड केली जाते. संसदेच्या सदस्यांची एकूण संख्या ७८८ असून या पैकी ५४३ लोकसभा सदस्य, २३३ राजसभा सदस्य आणि १२ राष्ट्रपती नियुक्त सदस्य आहेत. उद्या मतदानाची वेळ संपताच संसदेतच मतमोजणी होईल. सध्याचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ येत्या बुधवारी १० तारखेला पूर्ण होत आहे.
****
ऊर्जा संरक्षण संशोधन विधेयक आज लोकसभेत सादर झालं. या विधेयकावरच्या चर्चेत बोलताना ऊर्जामंत्री आर के सिंह यांनी, २०३० चं निर्धारित ऊर्जा उद्दीष्ट साध्य करण्यासाठी आयात कमी करण्याची गरज व्यक्त केली. जीवाश्म इंधनाचा वापर कमी करण्यासाठी धोरणात बदल केले जात असल्याची माहिती सिंह यांनी दिली. देशाच्या ग्रामीण भागात सध्या दिवसातून सुमारे वीस तास वीज पुरवठा केला जात असल्याचं सिंह यांनी सांगितलं.
****
खाद्य तेलाच्या कमाल किरकोळ किंमतीत १५ रुपये प्रति लीटर कपात केली जावी असे निर्देश सर्व खाद्यतेल संघटनांना देण्यात आल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. खाद्यतेल उत्पादक आणि रिफायनर्सने वितरकांना दिलेली किंमत देखील ताबडतोब कमी करण्याचेही निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. खाद्य तेल संघटनांसोबत झालेल्या बैठकीत केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं हे निर्देश दिले. आयात केलेल्या खाद्यतेलाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या किमती घसरत चालल्या आहेत, हे खाद्यतेलाच्या परिस्थितीत अतिशय सकारात्मक चित्र आहे आणि म्हणूनच, देशांतर्गत खाद्यतेल उद्योगाला देशांतर्गत बाजारातील किंमती निश्चित करणं आवश्यक आहे, अशी चर्चा या बैठकीत झाल्याचं मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे.
****
केंद्र सरकार पोषण-आधारित अनुदान धोरणानुसार अनुदान देऊन सिंगल सुपर फॉस्फेट खत आणि संयुक्त खतांसोबत फाँस्फेट आणि पोटॅश खतांच्या वापरला प्रोत्साहन देत आहे. रसायन आणि खत मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली. शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत ही खतं मिळावीत यासाठी २०१९ पासून या खतांच्या अनुदानात वाढ करण्यात आली ���सल्याचं ते म्हणाले.
****
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत, खबरादारीची मात्रा घेतलेल्यांची संख्या १० कोटींच्या वर गेली आहे. आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २०५ कोटी ७९ लाखांच्या वर गेली आहे.
राज्यात आज सकाळपासून १ लाखापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ३९ लाखांच्या वर गेली आहे.
****
वाढती महागाई, बेरोजगारी, जीवनावश्यक वस्तूंवरील जी.एस.टी आदी विषयावरून काँग्रेस पक्षानं आज ठिकठिकाणी निदर्शनं केली. औरंगाबाद इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ कल्याण काळे आणि शहराध्यक्ष शेख युसूफ लीडर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी यांनी या आंदोलनात सहभागी होत जोरदार घोषणाबाजी केली.
****
हिंगोली इथं काँग्रेसच्या आमदार डॉ.प्रज्ञा सातव यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात आलं. इंधन दरवाढीच्या निषेधार्थ बैलगाडीमध्ये दुचाकी वाहनं उभी करून बैलगाडी हाताने ओढण्यात आली तसंच गॅस सिलेंडर डोक्यावर घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जात या आंदोलकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली.
****
औरंगाबाद जिल्ह्यातील सहा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी काल मतदान झालं. या मतदानाची आज मतमोजणी झाली. पैठण तालुक्यातील सात पैकी सहा ग्रामपंचायतीत शिंदे गटाच्या संदिपान भुमरे यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारांनी विजय मिळवला आहे.
                                   ****
आझादी का अमृत महोत्सवातंर्गत ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमातंर्गत राष्ट्रध्वजाप्रती आदर बाळगत असतांनाच प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी आपल्या कामामध्ये गुणात्मक वाढ करणे ही देशाप्रती खरी आदरांजली ठरणार असल्याचं मत औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते औरंगाबाद जिल्हा परिषदेत आज ग्रामपंचायतींना ध्वज वितरण, ध्वज कक्षाचं उद्धाटन करून, हर घर तिरंगा उपक्रमाविषयी आणि ध्वजसंहिते विषयी प्रचार प्रसार करणाऱ्या वाहनाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. लसीकरणाचा अमृत महोत्सव, ई-पीक पाहणी, जनावरांची आरोग्य तपासणी, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम, कर्मचाऱ्यांनी आपली रोजची कामं वेळेत करणे आदी माध्यमाद्वारे राष्ट्र प्रगल्भ करणं, म्हणजे आझादी का अमृत महोत्सव साजरा करणं असल्याचं जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यावेळी म्हणाले.
****
सोलापूर जिल्ह्यात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा अंतर्गत ‘हर घर झेंडा’ उपक्रमाच्या तिरंगा झेंडा विक्री आणि वितरणाचा शुभारंभ आज दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, हर घर तिरंगा उपक्रमाच्या नोडल अधिकारी चारुशीला देशमुख यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
****
सोलापूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या परीक्षेच्या कामकाजात हलगर्जीपणा तसंच चुका करणाऱ्या प्राध्यापकांवर कडक कारवाई करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी ही माहिती दिली. दोषी आढळलेल्या प्राध्यापकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून परीक्षेच्या कामकाजातून त्यांना काढून टाकण्यात आल्याचं, कुलगुरू फडणवीस यांनी सांगितलं.
****
बर्मिंगहॅम इथं सुरु असलेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत कुस्तीमध्ये आज बजरंग पुनिया, दीपक पुनिया, मोहित ग्रेवाल, साक्षी मलिक, अंशु मलिक आणि दिव्या काकरन आपापले सामने खेळत आहेत.
ॲथलेटिक्समध्ये महिलांच्या २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत हिमा दास उपान्त्य फेरीत सहभागी होणार आहे. तर महिला हॉकीमध्ये उपान्त्य फेरीत आज भारताचा सामना ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे.
****
धुळे मार्गे इंदौरहून गोव्याकडे जाणाऱ्या एका खासगी टॅ्व्हल्स बसमधून गांजाची तस्करी करणाऱ्या एकाला धुळे पोलिसांनी रंगेहाथ पकडत त्याच्याकडून ४ किलो ८५५ ग्रॅम ओला गांजा जप्त करण्यात आला. याबाबत आज धुळे पोलिसांनी ही माहिती दिली. यावेळी धुळे पोलिसांच्या पथकानं नायब तहसीलदार यांच्या उपस्थितीत मुंबई-आग्रा महामार्गावर नगाव गावाजवळ ही कारवाई केली.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 06 July 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०६ जुलै २०२२ सायंकाळी ६.१०
·      राज्यात पुढचे तीन दिवस हवामान खात्याकडून अतिवृष्टीचा इशारा;आपत्ती प्रतिसाद दलाच्या पंधरा तुकड्या तैनात.
·      घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ;आजपासूनच दरवाढ लागू.
·      आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर इथल्या सोयीसुविधांबाबत मुख्यमंत्र्यांकडून आढावा.
आणि
·      औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर करण्याच्या विरोधात पक्षसंघटनांचं आंदोलन.
****
राज्यात पुढचे तीन दिवस म्हणजे येत्या आठ तारखेपर्यंत हवामान खात्यानं अतिवृष्टीचा विशेषत: कोकण विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पंधरा तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असल्यानं जिल्हा प्रशासन दक्ष असून, इथे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. ठाणे जिल्ह्यात पूरपरिस्थिती नाही, पण खबरदारी म्हणून तिथे दोन तुकड्या तैनात आहेत.
मुंबईत गेल्या चोवीस तासात मुंबईत कुलाबा इथे ८४ मिलीमीटर तर सांताक्रूझ इथे सुमारे १९४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. अंधेरी सब वे, टिळक नगर टर्मिनस, टेम्बी पूल परिसर तसंच कुर्ला, दादर टीटी याठिकाणी पाणी साचलं आहे. सततच्या पावसामुळे जनजीवन काही प्रमाणात विस्कळीत झाल्याचं वृत्त आहे. माटुंगा, हिंदमाता, आणि माहीम सह उपनगरी भागातल्या सुमारे पंचवीस ठिकाणी पाणी साचलं ��हे. मात्र अद्याप सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत असल्याचं महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षानं कळवलं आहे. मध्य रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरु असून पश्चिम रेल्वे मार्ग सुरळीत आहे. मुंबईमध्ये आपत्ती प्रतिसाद दलाच्या पाच तुकड्या तैनात आहेत.
रायगड जिल्ह्यात पाऊस सुरू असला तरी मुख्य नद्या इशारा पातळीहून खाली वाहत आहेत, कशेडी घाटातली वाहतूक धीम्या गतीनं सुरू आहे आहे. पूर प्रवण ठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यात आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुकड्या तैनात आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस सुरू असून, खेड इथली जगबुडी नदी वगळता इतर नद्यांमध्ये पूरस्थिती नाही. मुंबई गोवा महामार्गावरचा परशुराम घाट वाहतुकीकरता बंद करण्यात आला असून वाहतूक पर्यायी मार्गानं वळवण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आपत्ती प्रतिसाद दलाच्या पाच तुकड्या तैनात आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात नद्यांची वाढती पातळी लक्षात घेत राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या दोन तुक्ड्या तैनात आहेत.
****
शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे हेच आमचे नेते असून मातोश्रीचे दरवाजे उघडतील, तेव्हा उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाण्याची भूमिका ठेवूनच उठाव केला असल्याचं, शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांनी म्हटलं आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राठोड आज प्रथमच त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले, त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली, आम्ही अचानक उठाव केल्यामुळे जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनी आपल्या विरोधात भूमिका घेतली होती, मात्र आता गावागावात जाऊन शिवसैनिकांना भूमिका समजावून सांगू आणि पुढे एकत्र काम करू, असा विश्वास राठोड यांनी यावेळी व्यक्त केला.
****
घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांनी वाढ झाली आहे. आजपासूनच ही दरवाढ लागू झाली असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलिंडरची किंमत एक हजार ५३ रुपयांवर पोहचली आहे. मुंबईत आता घरगुती वापरासाठीच्या एलपीजी गॅस सिलिंडरसाठी एक हजार ५२ रुपये ५० पैसे मोजावे लागणार आहेत. पाच किलो वजनाच्या गॅस सिलिंडरची किंमत १८ रुपयांनी वाढली आहे, तर व्यावसायिक वापरासाठीच्या १९ किलोच्या गॅस सिलिंडरची किंमत साडेआठ रुपयांनी वाढवण्यात आली आहे. मुंबईत १९ किलोचा व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर दर एक हजार ९७५ रुपये पन्नास पैसे इतका झाला आहे.
****
भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीच्या औचित्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. भारताच्या विकासातल्या, विशेषत: वाणिज्य आणि उद्योगक्षेत्रातल्या त्यांच्या योगदानाची व्यापक प्रशंसा होत असते, अशा शब्दात पंतप्रधानांनी मुखर्जी यांना श्रद्धांजली वाहिली. उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनीही डॉक्टर मुखर्जी यांना आज आदरांजली वाहिली. संसद भवनातही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह केंद्रीय मंत्री आणि खासदार तसंच माजी खासदारांनी डॉक्टर मुखर्जी यांना आदरांजली वाहिली.
****
केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नक्वी यांच्या नावाची उपराष्ट्रपतिपदासाठी चर्चा सुरू आहे, या पदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मुदत १९ जुलैपर्यंत आहे. येत्या ६ ऑगस्टला या पदासाठी मतदान होणार आहे.
****
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने १९८ कोटींचा टप्पा पार केला आहे. सध्या १९८ कोटी २० लाख, ८६ हजारावर नागरिकांना कोविडची लस देण्यात आली आहे. दोन कोटी ५९ लाख १६ हजारावर सत्रातून हे लसीकरण करण्यात आलं. आतापर्यंत तीन कोटी ७० लाखापेक्षा अधिक किशोरवयीनांना कोविड लसीची मात्रा देण्यात आली आहे.
****
काल एका दिवसाच्या खंडानंतर अमरनाथ यात्रा आजपासून पुन्हा सुरू झाली आहे. आज सकाळी पहलगाम मार्गे तीन हजार ३६३ तर बालटाल मार्गे दोन हजार ६१९ यात्रेकरूंचे जत्थे सकाळी रवाना झाले. आतापर्यंत सुमारे ७४ हजारावर भाविकांनी अमरनाथ शिवलिंगाचं दर्शन घेतलं आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पंढरपूर येथील वारकऱ्यांच्या सोयीसुविधांबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभकर, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, विठ्ठल रुख्मणी मंदिर समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, यांच्यासह संबंधित अधिकारी या बैठकीत सहभागी झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वारीच्या सोयीसुविधांसंदर्भात जाणून घेत, आवश्यक सूचना केल्या. स्वच्छता, पिण्याचं शुद्ध पाणी, आरोग्य सेवा, यासंदर्भात खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. आषाढी साठी वारीला जाणाऱ्या वाहनांना पथकर मुक्तीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
****
योग्य नियोजन करून आषाढी वारी सुरक्षित आणि आनंददायी होण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी आज दिल्या. आषाढी वारीच्या तयारीच्या आढावा बैठकीत त्या दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून बोलत होत्या. वारीला येणाऱ्यांमध्ये महिला भाविकांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांच्या सुरक्षितता आणि सुरक्षेला प्राधान्य देण्याच्या, तसंच हरवलेल्या व्यक्ती, लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींसाठी वेगळी व्यवस्था करण्याच्या सूचनाही गोऱ्हे यांनी केल्या.
****
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने सोलापूर इथं चार बस स्थानकं उभारून विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पंढरपूर आगाराचे व्यवस्थापक सुधीर सुतार यांनी ही माहिती दिली. आजपासून १४ जुलैपर्यंत यात्रा स्पेशल बसगाड्या या चार बस स्थानकातून सुटतील. पंढरपूर नवीन तसंच जुनं बस स्थानक ९ ते ११ जुलै हे तीन दिवस वाहतुकीसाठी पूर्णतः बंद राहील. यंदा वारीत सुमारे १८ लाख भाविक येण्याची शक्यता आहे.
****
औरंगाबादचं संभाजीनगर नामांतराचा विरोध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस, अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काळ्या फिती बांधून आंदोलन करण्यात आलं. औरंगाबादचं नामांतर करुन संभाजीनगर करण्याच्या ठरावाला आमचा पूर्णपणे विरोध असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे शहरअध्यक्ष सलीम पटेल वाहेगावकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितलं. याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना देण्यात आलं.
****
विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज मिश्र दुहेरी प्रकारात भारताची सानिया मिर्जा आणि क्रोएशियाचा मेट पॉविक यांच्या जोडीची उपात्यंफेरीत ब्रिटेनच्या जोडीशी लढत होणार आहे. रात्री पावणे आठ वाजता या सामन्याला सुरवात होईल.
****
अंबाजोगाई इथले कबड्डीचे राष्ट्रीय खेळाडू दिनेश हजारी यांना "राज्यस्तरीय ज्येष्ठ खेळाडू पुरस्कार" तर राष्ट्रीय खेळाडू आणि ज्येष्ठ मार्गदर्शक दगडू चव्हाण यांना महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या वतीने "राज्यस्तरीय ज्येष्ठ कार्यकर्ता पुरस्कार "जाहीर करण्यात आला आहे. राज्य कबड्डी संघटनेचे महासचिव अॅड आस्वाद पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. या पुरस्काराचे वितरण येत्या १५ जुलै रोजी पुणे इथं बालेवाडी क्रीडा संकुलात होणार आहे
****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 18 July 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १८ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.
** उपराष्ट्रपती पदासाठी भारतीय जनता पक्षाची व्यंकय्या नायडू यांना उमेदवारी जाहीर ** राष्ट्रपतिपदासाठी देशभरात ९९ टक्के मतदान ** संसदेच्या पावसाळी अधिवेशनास प्रारंभ, दिवंगत सदस्यांना श्रद्घांजली वाहून पहिल्या दिवसाचं कामकाज स्थगित ** लष्कर ए तय्यबाच्या संशयित हस्तक सलीम खान उर्फ अबू अमर याला मुंबई विमानतळावर अटक आणि ** दहीहंडी उत्सवात लहान मुलांच्या सहभागाबाबत येत्या चार ऑगस्टपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश ** **** भारतीय जनता पक्षाकडून उपराष्ट्रपतिपदासाठी पक्षाचे जेष्ठ नेते एम व्यंकय्या नायडू यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाची बैठक झाली, या बैठकीनंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काल सायंकाळी नायडू यांच्या नावाची घोषणा केली. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांनी नायडू यांच्या उमेदवारीचं स्वागत केल्याची माहिती त्यांनी यावेळी वार्ताहरांशी बोलतांना दिली. नायडू यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परीषदेचा कार्यकर्ता म्हणून आपल्या राजकीय कारकिर्दीस प्रारंभ केला, त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाचे ते अध्यक्ष झाले, चारवेळा राज्य सभेचे सदस्य राहीलेले नायडू आंध्र प्रदेश विधानसभेत ही निवडून गेले होते. केंद्रातल्या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी ग्रामीण विकास मंत्री म्हणून काम केलं. याशिवाय भारतीय जनता पक्षाचं दोन वेळा राष्ट्रीय अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारीची घोषणा झाल्यानंतर नायडू यांनी रात्री केंद्रीय माहिती प्रसारण आणि नगर विकास मंत्रिपदाचा राजीनामा दिला. नायडू हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेससह १८ विरोधी पक्षांनी महात्मा गांधी यांचे नातू गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी दिली असून ते देखील आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलं असून त्यापूर्वी सनदी अधिकारी म्हणून ते कार्यरत होते. येत्या पाच ऑगस्टला ही निवडणूक होईल. **** राष्ट्रपतिपदासाठी काल संसदेत तसंच सर्व राज्य विधिमंडळात मतदान झालं. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्ष आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात थेट लढत झाली. सातशे शहात्तर खासदार तसंच चार हजारावर आमदारांनी या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. देशभरात या निवडणुकीसाठी ९९ टक्के मतदान झालं. मुंबईत विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोनशे सत्त्याऐंशी आमदार आणि राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी मतदान केलं. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर परदेशात असल्यामुळे मतदानाला उपस्थित नव्हते. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ तसंच अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या आर्थिक गैरव्यवहारा प्रकरणी अटकेत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांना न्यायालयानं मतदानाची परवानगी दिल्यामुळे त्यांनी तुरुंगातून विधानभभवनात येऊन मतदान केलं. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची मतं फुटल्याचा आरोप फेटाळून लावत, सर्व आमदार आणि खासदार यांनी मीरा कुमार यांनाच मतदान केलं असल्याचं स्पष्ट केलं. **** संसदेचं पावसाळी अधिवेशन कालपासून सुरु झालं. काश्मीरमधल्या श्रीनगर इथले नॅशनल कॉन्फ्रेन्सचे खासदार फारुख अब्दुल्ला आणि केरळच्या मल्लपुरम् इथले मुस्लीम लीगचे खासदार पी के कुन्हालिकुट्टी यांनी काल सदस्यत्वाची शपथ घेतली. त्यानंतर खासदार विनोद खन्ना, पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांच्यासह लोकसभेच्या सहा आजी माजी सदस्यांना, तसंच जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या यात्रेकरूंना श्रद्घांजली अर्पण करून सदनाचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. राज्यसभेत सभापती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी आठ दिवंगत सदस्यांना श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ल्यात आणि परवा झालेल्या अपघातात ठार झालेल्या अमरनाथ यात्रेकरुंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अनेक राज्यात आलेल्या पुरात मरण पावलेल्या नागरिकांप्रती राज्यसभेनं शोक व्यक्त करून, कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. दरम्यान, विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ येत्या २४ जुलैला संपत असून, त्यांना येत्या रविवारी २३ जुलैला दुपारनंतर एका विशेष समारंभात संसदेकडून निरोप दिला जाणार आहे. यावेळी सर्व संसद सदस्यांच्या स्वाक्षरींची पुस्तिका राष्ट्रपतींना भेट देणार असल्याचं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितलं. **** लष्कर ए तय्यबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा संशयित हस्तक सलीम खान उर्फ अबू अमर याला काल मुंबई विमानतळावर अटक करण्यात आली. सलीम खान याच्याविरोधात लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली होती. तो संयुक्त अरब अमिरातीमधल्या अबूधाबी इथं अवैधपणे राहत होता, आवश्यक कागदपत्रांच्या अभावी त्याला परवा रात्री ताब्यात घेऊन मुंबईत पाठवण्यात आलं, उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथक आणि मुंबई पोलिसांनी त्याला विमानतळावर अटक क���ली. २००८ साली उत्तरप्रदेशात रामपूर इथल्या केंद्रीय राखीव पोलिस दल सीआरपीएफच्या छावणीवर हल्ल्याचा त्याच्यावर आरोप आहे. या हल्ल्यात सीआरपीएफच्या जवानांसह आठ जणांचा मृत्यू झाला होता. **** दहावीच्या पुरवणी परीक्षेला आजपासून सुरवात होत आहे. येत्या दोन ऑगस्ट चालणाऱ्या या परीक्षेला राज्यभरातून एक लाख १७ हजार ६८० विद्यार्थी बसणार आहेत. दहावीच्या नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं वर्ष वाया जावू नये यासाठी ऑक्टोबर ऐवजी, जुलै-ऑगस्ट महिन्यात परीक्षा घेण्याचं हे तिसरं वर्ष आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** दहीहंडी उत्सवात लहान मुलांच्या सहभागाबाबत राज्य सरकारनं येत्या चार ऑगस्टपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी, दहीहंडी उत्सवात लहान मुलांचा समावेश करू नये, याबाबत याचिका दाखल केली आहे, या याचिकेवर काल झालेल्या सुनावणी दरम्यान, न्यायालयानं, साहसी खेळाचा नेमका अर्थ काय, तसंच पाच वर्षांचा मुलगा २० फुटांपेक्षा जास्त उंचीवर चढू शकतो का, असे प्रश्न सरकारला विचारले. दहीहंडी उत्सवाला साहसी क्रीडा प्रकार जाहीर करण्याबाबत राज्य सरकार आग्रही असून तशी मागणी न्यायालयात करण्यात आली आहे. **** राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणीची शिफारस करण्यासाठी जानेवारी महिन्यात स्थापन करण्यात आलेल्या, के पी बक्षी समितीच्या कार्यकक्षेत राज्य शासनानं काल वाढ केली. सहाव्या वेतन आयोगात त्रुटी राहिलेल्या वेतनश्रेणीचा अभ्यास करून या संबंधीची शिफारस करण्यासही समितीला सांगण्यात आलं आहे. याबाबतचा शासन आदेश काल जारी करण्यात आला. **** लातूर शहर अतिक्रमणमुक्त करुन वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्याला प्राधान्य दिलं जात असून, त्यासाठी थोडा वेळ द्यावा अशी विनंती लातूरचे महापौर सुरेश पवार, उपमहापौर देवीदास काळे केली आहे. ते काल लातूर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. पाणी वितरण व्यवस्था सुरळीत करण्यासाठीही प्रयत्न सुरु असल्याचं महापौर पवार यांनी सांगितलं. **** परभणी जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतला गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी नेणाऱ्या एकाला काल अटक करण्यात आली. पालम पोलिसांनी लोहा रस्त्यावर ही कारवाई करून, सुमारे शंभर क्विंटल गहू आणि एक टॅम्पो जप्त केला. **** आषाढी एकादशीनंतर पंढरपूर इथून शेगावकडे परतणारी संत श्री गजानन महाराजांच्या पालखीचं काल बीड शहरात भक्तीभावानं स्वागत करण्यात आलं. त्यानंतर पालखी काल जालन्याकडे मार्गस्थ झाली. **** येत्या २४ जुलै पासून सुरु होत असलेल्या श्रावण महिन्यात वेरुळच्या श्री घृष्णेश्वर मंदिरात गावकऱ्यांसाठी सकाळी चार ते सात वाजेपर्यंत आधार कार्ड दाखवून थेट दर्शन घेण्याची सुविधा मंदिर प्रशासनानं उपलब्ध करुन दिली आहे. देवस्थान मंडळ आणि तहसीलदार अरुण जऱ्हाड यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. **** राज्यभरात काल अनेक ठिकाणी दिवसभर पाऊस झाला. कोल्हापूर, जिल्ह्यात पंचगंगा नदीला पूर आला असून, सातारा जिल्ह्यात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्यानं, धरणाचा पाणीसाठा वाढला आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या उजनी धरणात सुमारे २७ हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरु आहे. नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे गंगापूर आणि दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणात बारा हजार घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. मराठवाड्यातही काल परभणी, बीड, नांदेडसह अनेक भागात पाऊस झाला. ****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 July 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १७ जुलै २०१७ दुपारी १.००वा.
**** संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. लोकसभेत दिवंगत सदस्यांना श्रद्घांजली अर्पण करण्यात आली. यात लोकसभेचे दिवंगत खासदार विनोद खन्ना, पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांच्यासह सहा आजी माजी सदस्यांना, तसंच जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना यावेळी श्रद्घांजली अर्पण करण्यात आली. लोकसभेत फारुख अब्दुल्ला आणि पी के कुन्हालिकुट्टी या नवीन सदस्यांना शपथ देण्यात आली. राज्यसभेत सभापती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी आठ दिवंगत सदस्यांना श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. दिवंगत सदस्यांना, तसंच दहशतवादी हल्ल्यात आणि काल झालेल्या अपघातात ठार झालेल्या अमरनाथ यात्रेकरुंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अनेक राज्यात आलेल्या पुरात मरण पावलेल्या नागरिकांप्रती राज्यसभेनं शोक व्यक्त केला. यानंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. दरम्यान, विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ येत्या २४ जुलैला संपत असून, त्यांना येत्या २३ जुलैला एका विशेष समारंभात संसदेकडून निरोप दिला जाणार आहे. यावेळी सर्व संसद सदस्यांची स्वाक्षरी असलेली पुस्तिका राष्ट्रपतींना भेट दिली जाणार असल्याचं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितलं. **** राष्ट्रपती पदाच्या निवडीसाठी आज संसदेत आणि सर्व राज्य विधिमंडळात मतदान सुरु आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्ष आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात ही निवडणूक होत आहे. सातशे शहॅत्तर खासदार तसंच चार हजार १२० आमदारांसह एकूण चार हजार ८९६ मतदार या निवडणूकीत मतदान करत आहेत. संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी, तर मुंबईत विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व आमदार आणि काही खासदारांनी मतदान केलं. मतमोजणी २० जुलैला होणार आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्ष आज संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर उपराष्ट्रपतिपदासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा करणार आहे. विरोधी आघाडीकडून उपराष्ट्रपतिपदासाठी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे. येत्या पाच ऑगस्टला ही निवडणूक होणार आहे. **** जम्मू काश्मीर मधल्या बालाकोट इथं पाकिस्तान कडून आज गोळीबार करण्यात आला. यात एका लहान मुलीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. **** वस्तू आणि सेवा कर - जीएसटी प्रणाली लागू झाल्यानंतर आज पहिल्यांदाच जीएसटी परिषदेची बैठक नवी दिल्ली इथं होणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखा��ी होणाऱ्या या बैठकीत जीएसटीच्या अंमलबजावणीविषयी देशभरातून मिळालेली माहिती, अडचणी आणि परिस्थिती याचा आढावा घेतला जाणार आहे. **** येत्या काही वर्षात भारत कडधान्य आणि तेलबियांच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनेल असा विश्वास केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी व्यक्त केला आहे. ते नवी दिल्ली इथं भारतीय कृषी संशोधन संस्थेतर्फे दिल्या जाणार्या राष्ट्रीय स्तरावरच्या कृषी पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते. देशभरातल्या ११ संस्थांना यावेळी गौरवण्यात आलं. **** पाणी आणि उर्जेची बचत करुन रेल्वेला पर्यावरणपुरक बनवण्याचे प्रयत्न सुरु असून, पुढच्या दहा वर्षात सौर ऊर्जेचा वापर वाढवून सुमारे ४१ हजार कोटी रुपयांच्या उर्जेची बचत करण्यात येईल, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. पुणे इथं महाराष्ट्र विकास केंद्र संस्थेच्या वतीनं सरदार सरोवर निर्मला निगमचे माजी अध्यक्ष डॉ. जयनारायण व्यास यांना प्रभू यांच्या हस्ते जलमित्र पुरस्कार देण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. प्रसिद्ध गायिका बकुल पंडित यांनाही यावेळी बालगंधर्व गुणगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. **** राज्यात आज काही भागात पाऊस सुरु आहे. मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. मराठवाड्यातही आज काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. परभणी, लातूर, उस्मानबाद, औरंगाबाद याठिकाणी काल तुरळक पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३० पूर्णांक ७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज आणि उद्या कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात उद्या पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात मात्र तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. **** येत्या २४ जुलै पासून सुरु होणाऱ्या श्रावण महिन्यात वेरुळच्या श्री घृष्णेश्वर मंदिरात गावकऱ्यांसाठी सकाळी चार ते सात वाजेपर्यंत आधार कार्ड दाखवून थेट दर्शन घेण्याची सुविधा मंदिर प्रशासनानं उपलब्ध करुन दिली आहे. देवस्थान मंडळ आणि तहसिलदार अरुण जऱ्हाड यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी श्रावण महिन्यातल्या यात्रा महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. ****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 July 2017 Time 6.50 AM to 7.00 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १७ जुलै २०१७ सकाळी ६.५० मि.
ठळक बातम्या **** ** अमरनाथ यात्रेकरुंची बस दरीत कोसळून १७ भाविकांचा मृत्यू, २९ जण जखमी ** राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीचं आज मतदान ** संसदेच्या अधिवेशनास आजपासून प्रारंभ ** शेतकऱ्यांना अधिक सवलतीच्या दरानं कर्ज देण्याचा राज्य सरकारचा विचार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ** राज्यात कालही अनेक भागात पाऊस आता सविस्तर बातम्या **** जम्मू- श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रामबन इथं अमरनाथ यात्रेकरुंची बस दरीत कोसळून १७ भाविकांचा मृत्यू झाला, तर २९ जण जखमी झाले. मृतांमध्ये उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, बिहार, आसाम आणि हरियाणातल्या भाविकांचा समावेश आहे. जम्मू काश्मीर राज्य मार्ग परिवहन मंडळाची बस काल दुपारच्या सुमारास जम्मूहून पहलगामकडे जात असताना हा अपघात झाला. अमरनाथ देवस्थाननं मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी तीन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये, तर पंतप्रधानांनी मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये मदत जाहीर केली आहे. **** वैष्णोदेवी मार्गावरही काल भुस्खलन होऊन नऊ भाविक जखमी झाले, यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातल्या एका भाविकाचा समावेश आहे. दरम्यान, अमरनाथ यात्रेकरूंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या एका महिलेचा काल मृत्यू झाला. त्यामुळे या हल्ल्यात मारल्या गेलेल्या भाविकांची संख्या आठवर पोहोचली आहे. **** राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार असून, मतमोजणी २० जुलैला होणार आहे.. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बिहारचे माजी राज्यपाल रामनाथ कोविंद यांना, तर काँग्रेस प्रणित विरोधी पक्षांच्या आघाडीनं लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २४ जुलैला संपत आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्ष आज संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर उपराष्ट्रपतिपदासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता आहे. विरोधी आघाडीकडून उपराष्ट्रपतिपदासाठी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. **** संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होत आहे. या अधिवेशनात राज्यसभा आणि लोकसभेत १८ विधेयकं मांडण्यात येणार आहेत. यात राष्ट्रीय मागासवर्ग आयोग रद्द करण्यासंबधीचं विधेयक, तसंच भारतीय व्यवस्थापन संस्था विधेयक २०१७, भ्रष्टाचार प्रतिबंध विधेयक २०१३ आदी विधेयकांचा समावेश आहे. हे अधिवेशन १८ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल सर्वपक्षीय बैठक घेतली. वस्तू आणि सेवा कर प्रणाली देशभरात लागू झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानत, पंतप्रधानांनी या कायद्याची योग्य अंमलबजावणी ही सर्वांची जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली. गो रक्षेच्या नावाखाली हिंसाचार करणाऱ्या समाजकंटकांवर राज्यसरकारांनी कठोर कारवाई करावी, असे निर्देशही पंतप्रधानांनी या बैठकीत दिले. गायींचं संरक्षण करण्यासाठी कायदे आहेत, मात्र कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणी करु नये, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. **** शेतकऱ्यांना अधिक सवलतीच्या दरानं कर्ज देता यावं यासाठी नवीन योजना विचाराधीन असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या 'मी मुख्यमंत्री बोलतोय', या कार्यक्रमात ते काल बोलत होते. सध्या शेतकऱ्यांना एक लाखांपर्यंत शून्य टक्के दरानं तर एक लाखापासून तीन लाखांपर्यंत दोन टक्के दरानं शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं. शेतमालाला भाव मिळण्याकरता बाजारपेठेशी जोडणी करण्यासाठी बृहद योजना, शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी १५ जिल्ह्यांत चार हजार कोटी रुपयांचा प्रकल्प, शेतकर��� उत्पादक कंपन्यांचं क्लस्टर, आदी बाबतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली. **** शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी शेतकऱ्यांची यादी तयार करण्याकरता, राज्य सरकार एक सॉफ्टवेअर विकसित करत आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. कर्जमाफीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी या सॉफ्टवेअरचा उपयोग होणार आहे. **** भारतीय कृषी संशोधन परिषदेचे राष्ट्रीय पुरस्कार काल नवी दिल्लीत प्रदान करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्राला दोन पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. वैयक्तिक गटात परभणी जिल्ह्याच्या मानवत तालुक्यातल्या प्रगतीशील शेतकरी सुनंदाबाई शिंदे यांना ‘जगजीवनराम अभिनव किसान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सोयाबीन, कपाशी आणि ज्वारीचं विक्रमी उत्पादन तसंच जलसंधारण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामासाठी शिंदे यांना हा पुरस्कार देण्यात आला. सन्मानपत्र आणि ५० हजार रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. देशभरातल्या अकरा कृषी विज्ञान संस्थांना यावेळी उल्लेखनीय योगदानासाठी सन्मानित करण्यात आलं, यामध्ये पालघर जिल्ह्यातल्या डहाणू इथल्या गोखले शिक्षण संस्थेला ‘पंडित दीनदयाल उपाध्याय राष्ट्रीय कृषी विज्ञान पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. सन्मान पत्र आणि सव्वा दोन लाख रूपये असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणी औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** राज्यात कालही अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. नाशिक तसंच सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. नांदेड इथं काल सायंकाळनंतर सुमारे दोन तास जोरदार पाऊस झाला. परभणी शहर परिसरातही काल सायंकाळनंतर जोरदार पाऊस झाला, पहाटेपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. हिंगोली इथं काल सलग चौथ्या दिवशी पावसानं हजेरी लावली. लातूर जिल्ह्यात उदगीर, देवणी भागातही पावसानं हजेरी लावली, मात्र लातूरसह उस्मानाबाद आणि औरंगाबाद इथं मात्र पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. औरंगाबाद शहर परिसरात पहाटेपर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. नाशिक जिल्ह्यात परवा रात्री सुरू झालेला पाऊस काल सकाळपर्यंत सुरू होता, त्यामुळे गोदावरीला नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जायकवाडी धरणात सध्या १८ हजार ९९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणात ४३० दशलक्ष घनमीटर जिवंत पाणी साठा असून, पाण्याचं प्रमाण एकूण साठवण क्षमतेच्या सुमारे २१ टक्के झालं आहे. **** शासनाची वृक्ष लागवड मोहीम, जलयुक्त शिवार अभियान आणि स्वच्छता अभियानाम���्ये नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवावा, असं आवाहन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे. काल औरंगाबाद इथं, माहेश्वरी मंडळातर्फे नगर नाका ते गोलवाडी-वाळूज रस्त्याच्या दुतर्फा दोन हजार वृक्षांचं रोपण करण्यात आलं, त्यावेळी बागडे बोलत होते. पाणी संवर्धन आणि स्वच्छता अभियानाबाबत त्यांनी यावेळी मार्गदर्शन केलं. **** परभणी जिल्ह्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेतलं धान्य, काळ्या बाजारात नेऊन विक्री करणाऱ्या दोघांना महसूल विभागानं अटक करून, धान्याचा मोठा साठा जप्त केला. जिंतूर तालुक्यातल्या भांबरी इथं ही कारवाई करण्यात आली. जप्त केलेल्या साहित्यात दोन लाख २४ हजार रुपयांचं धान्य, बारदाना, टेम्पो असा सुमारे तीन लाख ८५ हजार रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. **** परभणी शहरात उघड्यावर शौचास जाणाऱ्या १४ जणांविरुद्ध काल गुन्हा दाखल करण्यात आला. स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत महानगरपालिकेच्या पथकानं पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केली. **** नांदेड इथून सुटणारी नांदेड - संबलपूर एक्सप्रेस आज रद्द करण्यात आली आहे. ओडिशामध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे संबलपूर विभागात रेल्वे मार्गाचा काही भाग वाहून गेल्यानं, संबलपूर इथून सुटणारी संबलपूर ते नांदेड एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती, परिणामी ही गाडी आज नांदेड इथून सुटणार नसल्याचं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड कार्यालयानं कळवलं आहे. **** विम्बल्डन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं विजेतेपद स्विस टेनिसपटू रॉजर फेडररनं जिंकलं आहे. काल झालेल्या अंतिम सामन्यात फेडररनं क्रोएशियाच्या मरिन सिलिचचा ६-३, ६-१, ६-४ असा सरळ तीन सेट्समध्ये पराभव केला. फेडररचं हे विम्बल्डन स्पर्धेतलं आठवं तर कारकिर्दीतलं एकोणिसावं ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद आहे. **** औरंगाबाद जिल्ह्यात फुलंब्री इथं एका वनरक्षकाला ५० हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक पथकानं काल रंगेहाथ अटक केली. रामेश्वर डुकरे असं या वनरक्षकाचं नाव असून, वन अधिनियमांतर्गत कारवाई न करण्यासाठी त्यानं ही लाच मागितली होती. **** येत्या २२ ऑगस्टला बॅंक उद्योगातल्या नऊ संघटना कामकाज बंद आंदोलन पुकारणार आहेत. महाराष्ट्र स्टेट बॅंक कर्मचारी महासंघाचे महासचिव देवीदास तुळजापूरकर यांनी काल लातूर इथं पत्रकार परिषेदत ही माहिती दिली. एक कोटी पेक्षा अधिक थकबाकीदारांची सरकारनं यादी घोषीत करावी, थकबाकीदाराला निवडणुक लढविण्यास अपात्र ठरविण्याची तरतूद करावी, बॅंकेच्या कारभाराचं लोकशाहीकरण करावं आदी मागण्यांसाठी आपला लढा असून, त्या पूर्ण न झाल्यास, संघर्ष तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, कर्जवसुली साठी बॅंक प्रशासनाला सहकार्यासाठी, एक कोटी रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या थकबाकीदारांच्या घरासमोर बॅंक कर्मचारी निदर्शनं करणार असल्याचं तुळजापूरकर यांनी सांगितलं. हा महिना बॅंक राष्ट्रीयकरण महिना म्हणून साजरा केला जाणार आहे. मोठ्या उद्योजकांच्या थकबाकीमुळे निर्माण होणारं आर्थिक संकट, सामान्य ठेवीदाराच्या पैशांची लूट, याबाबत गाव पातळी पर्यंत परिसंवाद घेऊन नागरिकांचं प्रबोधन करणार असल्याचं तुळजापूरकर यांनी सांगितलं. ****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date - 16 July 2017 Time 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १६ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि. ****
जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर रामबन इथं आज अमरनाथ यात्रेकरुंची बस दरीत कोसळून १६ भाविकांचा मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले आहेत. आज दुपारच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातानंतर वैद्यकीय पथकानं तातडीनं घटनास्थळावर धाव घेत, जखमींना रुग्णालयात दाखल केलं. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. **** राष्ट्रपती पदासाठी उद्या मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं बिहारचे माजी राज्यपाल रामनाथ कोविंद यांना, तर काँग्रेस प्रणित विरोधी पक्षांच्या आघाडीनं लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमार यांना उमेदवारी दिली आहे. उद्या मतदानानंतर, मतमोजणी २० जुलैला होणार आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ २४ जुलैला संपत आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्ष उद्या संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर उपराष्ट्रपतिपदासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा करण्याची शक्यता आहे. विरोधी आघाडीकडून उपराष्ट्रपतिपदासाठी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. **** संसदेचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत आहे. या अधिवेशनात राज्यसभा आणि लोकसभेत १८ विधेयकं मांडण्यात येणार आहेत. यात राष्ट्रीय मागासवर्ग आयोग रद्द करण्यासंबधी, तसंच भारतीय व्यवस्थापन संस्था विधेयक २०१७, भ्रष्टाचार प्रतिबंध विधेयक २०१३ आदी विधेयकांचा समावेश आहे. हे अधिवेशन १८ ऑगस्ट पर्यंत चालणार आहे. दरम्यान, पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वपक्षीय बैठक घेतली. वस्तू आणि सेवा कर प्रणाली देशभरात लागू झाल्याबद्दल सर्वांचे आभार मानत, पंतप्रधानांनी या कायद्याची योग्य अंमलबजावणी ही सर्वांची जबाबदारी असल्याचं म्हटलं आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांनी या बैठकीनंतर पत्रकारांना ही माहिती दिली. राष्ट्रपती पदासाठी उद्या मतदान होत आहे, या निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचार प्रक्रियेनं, या पदाच्या प्रतिष्ठेचं यथायोग्य पालन केल्याचं पंतप्रधान म्हणाले. राजकारणातल्या भ्रष्ट नेत्यांवर कारवाईचे संकेतही पंतप्रधानांनी या बैठकीत दिल्याचं, अनंतकुमार यांनी सांगितलं. गोरक्षेच्या नावाखाली हिंसाचार करणाऱ्या समाजकंटकांवर राज्यसरकारांनी कठोर कारवाई करावी, असे निर्देशही पंतप्रधानांनी या बैठकीत दिले आहेत. गायींचं संरक्षण करण्यासठी कायदे आहेत, मात्र कायदा हातात घेण्याचा प्रयत्न कोणी करु नये, असंही पंतप्रधान यावेळी म्हणाले. **** शेतकऱ्यांना अधिक सवलतीच्या दरानं कर्ज देता यावं यासाठी नवीन योजना विचाराधीन असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या 'मी मुख्यमंत्री बोलतोय', या कार्यक्रमात ते आज बोलत होते. सध्या शेतकऱ्यांना एक लाखांपर्यंत शून्य टक्के दरानं तर एक लाखापासून तीन लाखांपर्यंत दोन टक्के दरानं शेतीसाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येतं. शेतमालाला भाव मिळण्याकरता बाजारपेठेशी जोडणी करण्यासाठी बृहद योजना, शेतीची उत्पादकता वाढवण्यासाठी १५ जिल्ह्यांत चार हजार कोटी रुपयांचा प्रकल्प, शेतकरी उत्पादक कंपन्यांचं क्लस्टर, आदी बाबतही मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती दिली. **** शेतकरी कर्जमाफी योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना मिळावा, यासाठी शेतकऱ्यांची यादी तयार करण्याकरता, राज्य सरकार एक सॉफ्टवेअर विकसित करत आहे. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली. कर्जमाफीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी या सॉफ्टवेअरचा उपयोग होणार आहे. **** परभणी जिल्ह्यात स्वस्त धान्य दुकानातलं धान्य काळ्या बाजारात नेऊन विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. महसूल विभागानं जिंतूर तालुक्यातल्या भांबरी शिवारातून हा साठा जप्त केला. यात दोन लाख २४ हजार रुपयांचं धान्य, बारदाना, टेम्पो आदी साहित्य जप्त करण्यात आलं. **** राज्यात आजही अनेक भागात पावसानं जोरदार हजेरी लावली. नाशिक तसंच सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याचं, आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. औरंगाबाद तसंच उस्मानाबाद इथं मात्र पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. नाशिक जिल्ह्यात काल रात्री सुरू झालेला पाऊस आज सकाळपर्यंत सुरू होता, त्यामुळे गोदावरीला नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. जायकवाडी धरणात सध्या १८ हजार ९९ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे. सध्या धरणात ४३० दशलक्ष घनमीटर जिवंत पाणी साठा असून, पाण्याचं प्रमाण एकूण साठवण क्षमतेच्या २० टक्क्यांवर पोहोचलं आहे. **** परभणी महानगरपालिकेच्या वतीनं आज स्वच्छ महाराष्ट्र मिशन अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर शौचास जाणाऱ्या १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महानगरपालिकेच्या पथकानं पोलिसांच्या मदतीनं ही कारवाई केली. ****
0 notes
airnews-arngbad · 7 years
Text
Text Air Bulletin, Aurangabad 11-07-2017 05.25
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date - 11 July 2017 Time 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ११ जुलै २०१७ सायंकाळी ५.२५ मि. **** काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीकडून उपराष्ट्रपती पदासाठी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं झालेल्या बैठकीत १८ विरोधी पक्षांकडून उपराष्ट्रपतिपदासाठी गांधी यांना उमेदवारी देण्यात आली. येत्या पाच ऑगस्टला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे. **** अमरनाथ यात्रेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं जम्मू काश्मीरमधल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. अमरनाथ यात्रेकरुंना कडक सुरक्षा पुरवण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी यावेळी दिले. जम्मू काश्मीर सरकारनं या हल्ल्यात मारल्या गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी सहा लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. दरम्यान, दहशतवादी हल्ल्यानंतरही अमरनाथ यात्रेकरुंचा नवा जत्था आज पहलगाम आणि बालटाल मार्गावरुन पुढच्या यात्रेसाठी रवाना झाला. **** अमरनाथ यात्रेवर झालेला हल्ला हा देशावरचा, दिल्लीतल्या केंद्र सरकारवरचा हल्ला आहे, त्यामुळे निंदा करण्याची नाही, तर चोख प्रत्यूत्तर देण्याची वेळ आली असल्याचं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबई इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. दरम्यान, हल्ल्याच्या निषेधार्थ आज नाशिक इथं भारतीय विद्यार्थी सेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी पाकिस्तानच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या, तसंच केंद्र सरकारनं दहशतवाद्यांविरुद्ध ठोस कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. **** भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली आहे. क्रिकेट सल्लागार समितीनं आज ही घोषणा केली. आगामी श्रीलंका दौऱ्यापासून ते प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्वीकरणार आहेत. **** राज्यातल्या नदी, तलाव, कालवे या जलस्त्रोतांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी अभियान हाती घेण्याचं आवाहन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केलं आहे. ते आज मुंबई इथं शेती पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. लहरी हवामान हे शेतीपुढे मोठं आव्हान असून, त्याला सामोरं जाण्यासाठी हवामान बदलावर आधारित कृषी कार्यक्रम राबवले पाहिजे, असं राज्यपाल म्हणाले. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना विविध पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. या पुरस्कारांमध्ये पुढच्या वर्षापासून भाजीपाला उत्पादन वाढीसाठी सावता माळी पुरस्कार देण्यात येईल, अशी घोषणा कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी यावेळी केली. **** नमामि चंद्रभागा अभियानात लोकांचा सहभाग वाढावा, तसंच लोकांमध्ये नदी शुद्धीकरणाची व्यापक जनजागृती व्हावी या उद्देशानं जलतज्ञ राजेंद्र सिंह यांची संस्था येत्या २४ जुलै ते १७ ऑगस्ट या कालावधीत जलयात्रा काढणार आहे. भीमाशंकर इथून सुरु होणाऱ्या या यात्रेचा समारोप कर्नाटकातल्या विजापूर इथं होणार असून, त्याठिकाणी नदी पुनर्जीवन या विषयावर एक राष्ट्रीय संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. सिंह यांनी आज वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन ही माहिती दिली.   **** राज्यात आज पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला असून, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातही काल रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या पावसामुळे पिकांना थोडं जीवदान मिळेल, तसंच आणखी मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, अशी अपेक्षा शेतकरी करत आहेत. जिल्ह्य़ातल्या मुखेड आणि नायगांव तालुक्यात अद्यापही खरिपाची पेरणी झाली नसल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** नांदेड जिल्ह्यात नायगाव तालुक्यातल्या मुस्तापूर इकळीमोर सज्जाचे तलाठी एसीकर यांना आज एक हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं सापळा रचून ही कारवाई केली. **** राज्य शासनानं जाहीर केलेली शेतकऱ्यांची कर्जमाफी फसवी असल्याचं सांगून त्याविरोधात काँग्रेस पक्षातर्फे राज्यभर एल्गार पुकारण्यात येणार आहे. उद्या बुलडाणा इथून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे या यात्रेची सुरुवात करणार आहेत. बुलडाण्याचे काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे यांनी ही माहिती दिली. **** सेंद्रीय शेतीतल्या समस्या सोडवून ही शेती सोपी व्हावी यादृष्टीनं राहुरीचं महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि नाशिकची कृषी सूक्ष्मजीव उत्पादन आणि शेतकरी संस्था यांच्यात एक सामंजस्य करार करण्यात आला. जैव उत्पादनांविषयी सर्वसामान्य शेतकऱ्यांना माहिती देऊन, शेतीत त्याचा उपयोग करण्याचं तंत्रशुद्ध शिक्षण देण्यासाठी हा करार महत्वाचा ठरेल, असं मत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के पी विश्वकर्मा यांनी व्यक्त केलं. ****
0 notes