Tumgik
#उमेदवारी
bharatlivenewsmedia · 2 years
Text
ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यात खोळंबा.. सर्व्हर डाऊन, कुठे काय स्थिती?
ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यात खोळंबा.. सर्व्हर डाऊन, कुठे काय स्थिती?
ग्रामपंचायत निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्यात खोळंबा.. सर्व्हर डाऊन, कुठे काय स्थिती? मुंबईः राज्यभरातील जवळपास 7, 751 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी (Grampanchayat Election) उमेदवारी अर्ज (Candidature form) भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. उद्या 2 डिसेंबर रोजी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. मात्र निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर (Election Commission) अर्ज भरताना मोठा तांत्रिक अडथळा येत आहे.…
View On WordPress
0 notes
news-34 · 2 days
Text
0 notes
airnews-arngbad · 6 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 22 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक २२ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान चेन्नई इंथ सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतानं चौथ्या दिवशीच २८० धावांनी विजय मिळवला आहे. बांगलादेश संघाला मिळालेल्या ५१५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्यांचा दुसरा डाव आवघ्या २३४ धावांवर संपुष्टात आला. बांगलादेशकडून नजमुल शांतोच्या ८२ धावा वगळता कुणालाही मोठी खेळी साकारता आली नाही. भारताकडून दुसऱ्या डावात आर. अश्विननं ६, रविंद्र जडेजानं ३ आणि जसप्रित बुमराह यानं एक गडी बाद केला. तत्पूर्वी भारतानं दुसरा डाव २८७ धावांवर घोषित केला होता. दरम्यान, दोन कसोटी सामन्याच्‍या मालिकेत भारतानं एक शुन्य अशी आघाडी घेतली आहे. दुसरा कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून कानपूर इथं खेळला जाणार आहे.
****
आम आदमी पक्षाचे संयोजक तथा दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील जंतर-मंतर इंथ पक्षातर्फे आज आयोजित केलेल्या ‘जनता की आदालत’ कार्यक्रमात भारतीय जनता पक्षावर टीका केली. देशभरातील विविध राज्यांमधील पक्ष तोडण्याचं काम केंद्र सरकारकडून करण्यात येत असल्याचा आरोप करतानाच दिल्लीतील जनतेला मी निर्दोष वाटत असेल तरच माझ्या पक्षाला मतदान करा, असं आवाहनही केजरीवाल यांनी यावेळी केलं.
****
राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या तिन्ही पक्षांनी आपल्या कोट्यातून प्रत्येकाने ४ जागा अशा एकूण १२ जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाला द्याव्यात, अशी मागणी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. विदर्भात उत्तर नागपूर, उमरेड, उमरखेड, वाश���म अशा ३ ते ४ जागा आपण मागणार असल्याचं, तसंच राज्यात एकूण जागांची यादी २ दिवसांत आपण महायुतीला देऊ, असंही आठवले म्हणाले. दरम्यान, सर्व १२ जागा आमच्याच चिन्हावर लढू असही आठवले यांनी स्पष्ट केलं आहे.
****
धनगर समाजाचा अनुसूचीत जमातीत समाविष्ट करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी लातूर जिल्ह्यातील धनगर समाजही आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. समाजाच्या वतीनं आज लातूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय आमदार-खासदारांच्या घरापुढं हलगी आंदोलन करण्यात येत आहे. अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहारानं कळवलं आहे. लातूरमध्ये आमरण उपोषणास बसलेल्या धनगर समाजाच्या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी उद्या लातूरच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौकात सकल धनगर समाजाच्या वतीनं शेळ्या-मेंढ्यासह रास्ता रोको करण्यात येणार आहे.
****
अकोला जिल्ह्यातल्या डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागातर्फे घेण्यात आलेल्या तीन दिवसीय शिवारफेरी आणि चर्चासत्राचा आज समारोप होत आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी शिवार फेरीत सहभागी होऊन पीक प्रात्यक्षिकांची पाहणी केली. यावेळी कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांच्यास खासदार, आमदार आणि जिल्हा प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
****
मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या निवडणूकीसाठी १४ ते २० सप्टेंबर दरम्यान ४१ जणांनी ५६ अर्ज दाखल केले होते. त्या अर्जांची छाननी केल्यानंतर ४१ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. उद्यापासून बुधवारपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आलेली आहे. त्‍यानंतर गुरुवारी अंतिम उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याचं निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर राम चव्‍हाण यांनी कळवलं आहे. दरम्यान, मराठवाडा साहित्य परिषदेचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यासाठी परिवर्तन मंचची स्थापना करण्यात आली आहे.
****
रत्नागिरी जिल्ह्यात संवादिनीगंधर्व पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त रत्नागिरी इथं काल झालेल्या ‘शतसंवादिनी’ या कार्यक्रमात शंभरहून अधिक हार्मोनियम वादकांनी एकाच वेळी सादरीकरण करून पटवर्धन यांना अनोखी आदरांजली वाहिली.
****
वाशिम जिल्ह्यात काल विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. वाशिम आणि मालेगाव तालुक्यात सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. दरम्यान, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.
****
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्‍टर प्रमोद येवले यांना फार्मसी टीचर्स असोसिएशनच्या वतीनं जीवनगौरव पुरस्‍कार जाहीर झाला आहे. औषधनिर्माणशास्‍त्र आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल दिला जाणारा हा पुरस्कार २७ सप्टेंबर रोजी ओडिशातील भुवनेश्वर इंथ प्रदान केला जाणार आहे.
****
0 notes
6nikhilum6 · 24 days
Text
Bhosari : भोसरीचे आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देऊ नका; भाजप चिटणीसाची मागणी
एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भोसरीतून (Bhosari) आमदार महेश लांडगे यांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने उमेदवारी देण्यात येवू नये, अशी मागणी भाजपचे शहर चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र पाठविले आहे. त्यामुळे भाजपमधील गटबाजीला पुन्हा उधाण आले आहे. काळभोर यांनी म्हटले आहे की, मोशीत छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या मोजडीला तडा…
0 notes
imranjalna · 2 months
Text
आ. कैलास गोरंटयाल यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींना भेटणार
जालन्यातील बैठकीत शेकडो पदाधि���ारी, कार्यकर्त्यांचा निर्धार Congress will meet party leaders for the candidature of MLA Kailas Gorantyal जालना दि.११(प्रतिनीधी) काँग्रेस  पक्षाशी एकनिष्ठ असलेले विद्यमान आमदार कैलास गोरंटयाल यांना जालना विधानसभा मतदार संघातून पुन्हा उमेदवारी देण्यात यावी अशी आग्रही मागणी करत काँग्रेस पक्षाचे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सोमवार दि.१२ ऑगस्ट रोजी छत्रपती…
0 notes
Video
youtube
महायुती महाविजय रॅली, उमेदवारी अर्ज रॅली व प्रचारसभा..
0 notes
nashikfast · 6 months
Text
काँग्रेस जिल्हाध्यक्षपदी शिरीष कोतवाल
नाशिक (प्रतिनिधी): धुळे लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्यावतीने माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना उमेदवारी देण्यात आली. त्याला विरोध करत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी आणि काही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते मात्र डॉ. शेवाळे यांना राजीनामा देणे महागात पडले असून त्यांच्या जागी प्रभारी जिल्हाध्यक्ष म्हणून चांदवडचे माजी आमदार शिरीष कोतवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gajananjogdand45 · 6 months
Link
https://marmikmaharashtra.com/patals-ramdasi-poem-shamla-election-conundrum/
0 notes
samaya-samachar · 6 months
Text
बझाङ प्रदेशसभाको उपनिर्वाचनमा १२ जनाको उम्मेदवारी दर्ता
बझाङ । बझाङमा प्रदेशसभा सदस्य उपनिर्वाचनका लागि १२ जनाको उम्मेदवारी परेको छ । मुख्य निर्वाचन अधिकृतको कार्यालय बझाङका अनुसार बेलुकी ५ बजेसम्मको समयभित्र १२ जनाको उम्मेदवारी परेको हो ।  उम्मेदवार दर्ता गर्नेमा नेकपा एमालेबाट दमनबहादुर भण्डारी, नेपाली कांग्रेसबाट अभिषेकबहादुर सिंह, नेकपा माओवादी केन्द्रबाट जनक बुढा, नेकपा एकीकृत समाजवादीबाट दिलबहादुर सिंहले उमेदवारी दर्ता गराएका छन् । त्यसैगरी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
news-34 · 9 days
Text
0 notes
airnews-arngbad · 21 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 07 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
ढ��लताशाच्या गजरात आजपासून भाद्रपद शुद्ध चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वास सुरवात झाली आहे. लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी राज्यभर सर्वत्र जय्यत तयारी सुरू असून धार्मिक रितीरिवाज, परंपरेला जपत मंगलमूर्तीचा उत्सव दरवर्षीप्रमाणं यंदाही साजरा करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग पाहायला मिळत आहे. घरच्या बाप्पांसाठी आकर्षक सजावट ते अगदी पंचपक्वांनाच्या नैवेद्याचं नियोजनही महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक करत आहेत, राज्यात ठिकठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना होत असून गणेश मंदिरांवरही रोषणाई करण्यात आली आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशोत्सवानिमित्त आज देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. हा उत्सव देशाच्या अनेक भागांमध्ये सामूहिक आनंद आणि सामाजिक उर्जेचं एक सुंदर उदाहरण असल्याचं राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटलं आहे. “भारतीय परंपरेत गणेशाला शुभ आणि विघ्नहर्ता मानलं जातं. संकटांपासून सर्वांचं रक्षण व्हावं आणि समृद्धी यावी” यासाठी आपण प्रार्थना केली असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
****
गणरायांचं कृपाछत्र सर्व महाराष्ट्रातल्या जनतेवर राहावं आणि सर्वांचं जीवन सुखी, समृद्ध व्हावं अशी प्रार्थना गणरायांकडं केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार भक्कमपणे उभे राहील, राज्यातल्या सर्व नागरिकांसाठी सरकारनं दोन वर्षात विकासाचं पर्व आणलं असून शेतकरी आणि ज्येष्ठांच्या जीवनात बदल होत आहे याचं समाधान असल्याचं ते म्हणाले. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल असून आता महाराष्ट्र उद्योगपूरक बनला असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यात उद्योग येत असल्यानं रोजगारनिर्मितीही होत असून राज्याची भरभराट होत आहे. देशाला पुढं नेण्याचं काम महाराष्ट्र करत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
****
नागपूर इथं श्री गणेश मंदिर टेकडी इथल्या आराध्य गणपतीचं दर्शन घेण्यासाठी आज पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक पौराणिक श्रध्दास्थान अशी या गणेशाची ख्याती आहे. या ठिकाणी भक्तांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं पोलिसांनी ४० सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत तसंच चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
****
जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातल्या उमेदवारी अर्जांच्या छाननीत दोनशे सत्तर उमेदवारी अर्ज वैध आढळले आहेत, तर ६२ अर्ज फेटाळण्यात आले आहेत. सहा जिल्ह्यांतल्या २६ विधानसभेच्या जागांसाठी एकूण ३२९ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. सोमवारपर्यंत नावं मागे घेता येतील. या टप्प्यासाठी २५ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची तारीख जवळ आल्यानं जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्ष प्रचार आणि रॅलीवर भर देत आहेत.
****
मध्यप्रदेशातील जबलपूर इथं आज सकाळी सोमनाथ एक्स्प्रेस या रेल्वेगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले. सुदैवानं या अपघातात कुठल्याही जीवितहानीचं वृत्त नाही. या घटनेनंतर रेल्वेप्रशासन आवश्यक उपाययोजना करत असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
राष्टीय बाल पुरस्कारांसाठी नामांकनं पाठवण्याची मुदत या महिन्याच्या १५ तारखेपर्यंत असून भारत सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालयाकडून हे पुरस्कार दिले जातात. यावर्षी वीर बालदिनी म्हणजेच २६ डिसेंबर रोजी या पुरस्कारांची घोषणा करण्यात येणार आहे. या संदर्भात पाच वर्षांपेक्षा जास्त आणि १८ वर्षांखालील अर्जदारांनी भारत सरकारच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन केंद्र सरकारनं केलं आहे.
****
अमरावती जिल्ह्यात होत असलेल्या सततचा पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्यामुळे पिकांची पाहणी करून विमा भरपाई मिळण्यासाठी पीक विमा कंपनीकडे ४८ हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. यात बाधित पिकांचं सर्वेक्षण करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या अंतर्गत कंपनीनं आतापर्यंत २६ हजार पूर्वसूचनांचं सर्व्हेक्षण पूर्ण केल्याचं याबाबतच्या बातमीत म्हटलं आहे.
****
गणेशोत्सव ते दिवाळी या कालावधीत नागरिकांनी मिठाई, प्रसाद आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हिंगोली जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे. प्रसाद स्वतः तयार करून भाविकांना वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत नोंदणी करावी, तसंच जनतेनं अन्न पदार्थाची खरेदी करताना खबरदारी घ्यावी असंही जिल्हा अन्न प्रशासनानं आवाहन केलं आहे.
****
0 notes
punerichalval · 6 months
Text
भाजपकडून अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणा यांना उमेदवारी; महायुतीमधील मित्रपक्षांचा विरोध डावलून संधी
भाजपकडून अमरावती लोकसभेसाठी नवनीत राणा यांना उमेदवारी; महायुतीमधील मित्रपक्षांचा ...
भाजपकडून बुधवारी महाराष्ट्रातील आणखी एका लोकसभेच्या उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात आले. अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) आणि बच्चू कडू यांच्या नाकावर टिच्चून भाजपने राणा यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. अमरावतीमधील स्थानिक राजकारणाचा विचार करता भाजपची उमेदवारी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
imranjalna · 5 months
Text
जालन्यात महायुतीत बिघाडी..जालन्यात शिवसेना शिंदे गटाच्या भास्कर मगरे यांनी भरला अपक्ष उमेदवारी अर्ज.
शिवसेना भाजपची युती असतानाही उमेदवारी अर्ज दाखल केल्यानं चर्चांना उधाण.. भास्कर मगरे रावसाहेब दानवे यांच्यासमोर नवे आव्हान उभे करणार.. गोरगरीब कष्टकरी व गायरान जमिनीसाठी लढा देणारे ॲड.मगरे लोकसभेच्या रिंगणात.. शिवसेना दलित आघाडीचे जिल्हाप्रमुख ॲड. भास्कर मगरे यांनी भरला उमेदवारी अर्ज.. जालन्यात शिवसेनेच्या दलित आघाडीच्या जिल्हाप्रमुखाने लोकसभेला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून दानवेंच्या अडचणीत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
Video
youtube
हेमंत तुकाराम गोडसेचा उमेदवारी अर्ज रॅली व प्रचारसभा..
0 notes
darshanpolicetime1 · 6 months
Text
निर्भय, निष्पक्ष वातावरणात निवडणुका यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शासकीय यंत्रणांनी समन्वय ठेवावा - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुखांची आदर्श आचारसंहिता बाबत आढावा बैठक संपन्न सोलापूर, दि.17 (जिमाका):- भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चा निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 12 एप्रिल रोजी अधिसूचना निघणार असून 19 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. तर 7 मे रोजी मतदान पार पडणार असून 4 जून रोजी मतमोजणी होणार…
View On WordPress
0 notes
gajananjogdand45 · 6 months
Link
https://marmikmaharashtra.com/48-applications-valid-including-one-third-sect-candidate/
0 notes