Tumgik
#उच्चभ्रू
bharatlivenewsmedia · 2 years
Text
मालाडमधील उच्चभ्रू अपार्टमेंटला आग, महिलेने जीव वाचवण्यासाठी...
मालाडमधील उच्चभ्रू अपार्टमेंटला आग, महिलेने जीव वाचवण्यासाठी…
मालाडमधील उच्चभ्रू अपार्टमेंटला आग, महिलेने जीव वाचवण्यासाठी… मुंबईतील मालाडमध्ये २१ मजली इमारतीमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. जनकल्याण नगरमध्ये या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली होती. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत एका तासात आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. आगीच्या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक तरुणी…
View On WordPress
0 notes
6nikhilum6 · 11 days
Text
Hinjawadi : हिंजवडी मध्ये 85 वर्षीय वृद्धेवर बलात्कार; तरुणाला अटक
एमपीसी न्यूज – हिंजवडी परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीमध्ये आपल्या फ्लॅटसमोर(Hinjawadi) चालत असणाऱ्या 85 वर्षीय महिलेवर एका 23 वर्षीय नराधमाने बलात्कार केला. वृद्धेला फ्लॅटसमोरून लिफ्टपर्यंत ओढत नेत तोंड दाबून या नराधमाने वृद्धेवर बलात्कार केला. हिंजवडी पोलिसांनी काही तासांत आरोपीला अटक केली. हिंजवडीतील एका उच्चभ्रू सोसायटीतील पाचव्या मजल्यावरील स्वत:च्या फ्लॅटसमोरील(Hinjawadi) जागेत सोमवारी (दि.…
0 notes
marmikmaharashtra · 5 months
Link
https://marmikmaharashtra.com/within-a-few-months-the-roads-in-ntc-are-cracked-the-cement-road-works-are-poor/
0 notes
Video
youtube
शेअर मार्केटमध्ये पैसे लावण्यासाठी उच्चभ्रू वस्तीत घरफोडी..
0 notes
varunrajkalse · 1 year
Text
Best Careers in Commerce
Best Careers in Commerce  कॉमर्स शाखेतून करिअरच्या वाटा… ©डॉ. आनंद दत्ता मुळे दहावी नंतर पुढे काय? कॉमर्स शाखेतून करिअरच्या संधी कोणत्या आहेत? या प्रश्नांच्या उत्तरासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. मागील काही वर्षापासून आपल्या देशातील जनता बँकिंग, विमा, बचत, गुंतवणूक, शेअर मार्केट या विविध क्षेत्राच्या बाबतीत कमालीची जागरूक झाल्याचे दिसून येत आहे. बचत, गुंतवणूक, शेअर मार्केट हे विषय केवळ उच्चभ्रू…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 07 May 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०७ मे २०२३ सकाळी ७.१० मि.****
आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्याचा राज्यसरकारचा निर्णय
स्थानिकांच्या इच्छेविरोधात बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही-उद्धव ठाकरे यांचा इशारा 
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उद्धव ठाकरे यांच्या कोकणासंदर्भातल्या भूमिकेवर टीका 
देशभरातल्या ४९९ शहरांमध्ये आज वैद्यकीय प्रवेशासाठीच्या 'नीट' परीक्षेचं आयोजन
शिर्डी इथं उच्चभ्रू देहव्यापार चालवणाऱ्या सहा हॉटेल्सवर पोलिसांची कारवाई
रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांच्याकडून जालना रेल्वे स्थानकाची पाहणी
आणि
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सची प्रतिस्पर��ध्यांवर मात
****
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्यात येईल, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. मुंबईच्या कुर्ला इथं डॉन बॉस्को औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये राज्यस्तरीय उपक्रमाचा लोढा यांच्या हस्ते काल शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील सर्व जिल्हे आणि २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये काल पासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअर विषयक विविध संधींची माहिती घरबसल्या घेता यावी, यासाठी लवकरच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार असल्याचं लोढा यांनी सांगितलं.
****
बारसू मधल्या स्थानिकांच्या इच्छेविरोधात तेल शुद्धीकरण प्रकल्प होऊ देणार नाही, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. ते काल महाडमध्ये जाहीर सभेत बोलत होते. हा प्रकल्प कोकणाच्या भरभराटीसाठी आणायचा असेल,तर ती तिथल्या लोकांना विश्वासात का घेतलं जात नाही, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला, ते म्हणाले…
‘‘जर तो प्रकल्प आणायचा असेल कोकणाच्या भरभराटीसाठी तर तिथल्या लोकांना विश्वासात का घेतलं जात नाही, तुम्ही सगळे आमच्या कार्यकर्त्यांना आणी तिथल्या भूमीपुत्रांना तडीपाऱ्या लावताय, जिल्हाबंदी लावताय, आणी उद्या सांगताय रिफायनरी आल्यानंतर नोकरी मिळेल.. आज जिकडे बंदी करताय, तिकडे रिफायनरी आल्यानंतर प्रवेश तुम्ही कसा देणार आहात.. प्रकल्प तर मी होऊ देणार नाहीच, जो पर्यंत माझा तिथला कोकणी बांधव त्याचा मनाविरुद्ध हे सगळं चाललंय.. तो नाही बोलला तर प्रकल्प होणार नाही, संपूर्ण महाराष्ट्र बारसू मध्ये उतरेल.’’
तेल शुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित असलेल्या सोलगावला उद्धव ठाकरे यांनी काल भेट दिली. तसंच बारसू इथल्या कातळशिल्पांची पाहणी केली. त्यानंतर ठाकरे यांनी वार्ताहरांशी बोलताना, बारसूमध्ये तेल शुद्धीकरण प्रकल्प व्हावा यासाठी केंद्र सरकारला गैरसमजातून पत्र लिहिलं होतं, ती अंतिम भूमिका नव्हती असा खुलासा केला. बारसूचा तेलशुद्धीकरण प्रकल्प गुजरातला न्यावा आणि गुजरातला गेलेले वेदांत, एअरबससारखे प्रकल्प परत महाराष्ट्रात आणण्याचं आव्हान त्यांनी राज्य सरकारला दिलं.
कॉग्रेसचे दिवंगत माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या आणि महाडच्या माजी नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी आपल्या समर्थकांसह उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.
****
कोकणवासियांबद्दल लोकप्रतिनिधींना शून्य आपुलकी असल्याची टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. ते काल रत्नागिरीत जाहीर सभेत बोलत होते. गोवा मुंबई महामार्गाचं काम गेल्या सोळा वर्षांपासून रखडलं असून, नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाचं काम चार वर्षांत पूर्ण होऊन जनतेसाठी खुला झाल्याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधलं. बारसू संदर्भात बोलताना राज ठाकरे यांनी, कोकणात जमिनींचा व्यापार होत असल्याची टीका केली. बारसू इथं कातळशिल्पांच्या परिसरात रिफायनरी होणं शक्य आहे का, असा प्रश्नही राज ठाकरे यांनी विचारला.
****
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या प्रत्येक विकास कामाला विरोध केला आहे. यांना कोकणाबद्दल प्रेम आहे की द्वेष, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणे काल पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाकरे यांनी स्वत:च्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कोकणात एकही विकास प्रकल्प आणलेला नाही, अशी टीका राणे यांनी केली. आमदार नितेश राणे आणि निलेश राणे यांनी काल रिफायनरीच्या समर्थनार्थ राजापूर इथं मोर्चा काढला. तेल शुद्धीकरण प्रकल्पाच्या समर्थनात तहसीलदारांना निवेदनही देण्यात आलं.
****
विकासामध्ये अडथळा निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरे बारसूमध्ये गेल्याची टीका शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे. ते काल कोल्हापुरात वार्ताहरांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी रिफायनरी, बारसू इथं व्हावी असं पत्र देऊन सुचवलं होतं. मात्र आता ते या प्रकल्पाला विरोध करत असल्याचं केसरकर म्हणाले.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीट आज देशभरातल्या ४९९ शहरांमध्ये होणार आहे. तसंच देशाबाहेर जगातल्या १४ शहरांमध्ये ही परीक्षा होणार असल्याचं यासंदर्भात जारी पत्रकात म्हटलं आहे.
****
सौदी अरब देशाने आता भारतासह सात देशांतल्या प्रवाशांसाठी विसा स्टिकर ऐवजी ई विसा देण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यापासून हा निर्णय लागू झाला आहे. आता या सात देशातल्या नागरिकांना क्यूआर कोड असलेला ई विसा दिला जाणार आहे.
****
उत्तराखंडातली चारधाम यात्रा पुन्हा सुरळीतपणे सुरू झाली आहे. आतापर्यंत चार लाखापेक्षा अधिक भाविकांनी चार धाम यात्रा पूर्ण केली आहे, यापैकी एक लाख चाळीस हजाराहून अधिक भाविकांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं आहे. केदारनाथ दर्शनासाठीची ऑनलाईन नोंदणी २५ एप्रिलपासून स्थगित करण्यात आली असल्यानं, त्यापूर्वी नोंदणी केलेले भाविकच यंदा केदारनाथाचं दर्शन घेऊ शकणार आहेत.
****
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउली आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पायी पालखी सोहळा यंदा एक महिना लवकर सुरु होणार आहे. दरवर्षी जुलै महिन्यात सुरु होणारा हा पालखी सोहळा यंदा मात्र जून महिन्यातच पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान करणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांना उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता गृहीत धरुन आवश्यक त्या खबरदारीच्या उपाय योजना करण्याचे निर्देश पुणे जिल्हा प्रशासनानं दिले आहेत.
****
राज्यात काल कोरोनाच्या १७६ नव्या रुग्णांचं निदान झालं, यापैकी दोन रुग्णांचा मृत्यू झाला तर ४८७ रुग्ण काल कोरोनामुक्त झाले. सध्या राज्यात एक हजार ८७६ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातले फक्त ११५ रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं उच्चभ्रू देहव्यापार चालवणाऱ्या सहा हॉटेलवर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकाने छापा टाकून १५ पीडित महिलांची सुटका केली. काल ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी ११ आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हॉटेल एक्झिक्युटिव्ह इन, हॉटेल साई कीर्ती पॅलेस, हॉटेल एस पी, हॉटेल साई शितल, हॉटेल गणेश पॅलेस, हॉटेल साई महाराजा अशा सहा ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापे टाकण्यात आल्याची माहिती उपाधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.
****
दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड इथल्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी काल जालना इथं रेल्वे स्थानकात सुरू असलेल्या पीटलाईन आणि इतर कामांचा आढावा घेतला. त्यापूर्वी त्यांनी काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मुकुंदवाडी तसंच करमाड रेल्वे स्थानकालाही भेट देऊन निरीक्षण केलं. करमाड इथं मालधक्का करण्या��ंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली. मालधक्का आणि पायाभूत सुविधांबाबत माहिती घेण्यासाठी परिसरातल्या अनेक उद्योजकांची तसंच जालना इथं पोलाद उद्योग प्रतिनिधींची सरकार यांनी काल भेट घेतली.
****
नाशिक इथं गोदावरी नदीपात्रालगत काल विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सुमारे ४०० किलो कचरा संकलित करण्यात आला. महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत 'स्वच्छ सर्वेक्षण २०२३' अंतर्गत ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नदी पात्रातील पाणवनस्पती काढून जंतुनाशक फवारणी करण्यात आली. नदी पात्रात कचरा न टाकता विलगीकरण करुन घंटागाडीत कचरा देण्याबाबत तसंच प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी न वापरण्याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली.
****
वड, पिंपळ कुळातील चिंच, कडुनिंबासारखी दीर्घायुषी आणि मानवाला सतत लाभ देणारी झाडं मुलांनी लावावीत, असा सल्ला अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी दिला आहे. निसर्गशाळेच्या वतीने आयोजित निसर्ग महोत्सवात त्यांनी काल राज्यभरातील मुलांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सुटीत मुलांनी निसर्गात जाऊन झाडे, पक्षी आणि प्राण्यांची निरीक्षण करणारी डायरी लिहावी असंही चितमपल्ली यांनी सांगितलं.
****
चंद्रपूर जिल्ह्यातल्या ताडोबा वनपरिक्षेत्रात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणीगणना करण्यात आली. या वन्यप्राणीगणनेत ३३ वाघ आणि १६ बिबट्यांसह अस्वलं, रानगवे, विविध प्रकारची हरणं, वानरं, मगरी, सायाळ अशा एकूण तीन हजार २३ प्राण्यांची नोंद करण्यात आली.
****
आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून मतदार यादी पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. गावपातळीवर ग्रामसेवक, तलाठी, बीएलओ, अंगणवाडी सेविका यांचा गट तयार करुन मतदार यादी तपासून घेण्यात यावी. मयत तसंच स्थलांतरीत मतदारांची वगळणी करण्यापूर्वी खात्री करावी, अशा सूचनाही देशपांडे यांनी केल्या.
****
लातूर जिल्ह्याचा पुढील पाच वर्षाचा आराखडा तयार करण्यासाठी काल कृषी, उद्योग, शिक्षण, आरोग्य या क्षेत्रातील तज्ज्ञ, अनुभवी व्यक्तींच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांनी काल अनुभवी व्यक्तींचं म्हणणं ऐकून नोंदी घेतल्या. सोयाबीन हे प्रमुख पीक असलेल्या जिल्ह्यात सोयाबीनचे हब व्हावं, जिल्ह्यात चंदन, अश्वगंधा या सुगंधी औषधी वनस्पतींचं प्रमाण मोठं आहे, त्यासंबंधी युवकांना प्रशिक्षण द्यावं, औसा, उदगीर किल्ला, हत्तीबेट आदी पर्यटन स्थळांकडे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, आदी सूचना यावेळी करण्यात आल्या.
****
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल चेन्नई सुपर किंग्जनं मुंबई इंडियन्सवर सहा गडी राखून विजय मिळवला. मुंबई इंडियन्सनं निर्धारित २० षटकात ८ बाद १३९ धावा केल्या. चेन्नईनं १७ षटकं आणि ४ चेंडूत ४ गड��यांच्या मोबदल्यात हे आव्हान पार केलं.
दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा सात गडी राखून पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघानं प्रथम फलंदाजी करत १८२ धावांचं आव्हान दिलं होतं. दिल्ली संघानं सतराव्या षटकांत तीन गड्यांच्या मोबदल्यात ते साध्य केलं.
या स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना होणार आहे. दुपारी साडे तीन वाजता सामन्याला सुरुवात होईल. तर दुसरा सामना संध्याकाळी साडे सात वाजता राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे.
****
दक्षिण कोरियात सुरू असलेल्या आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या बिंदियारानी ने रौप्यपदक पटकावलं आहे. काल झालेल्या स्पर्धेत बिंदियारानीने ५५ किलो वजन गटात १९४ किलो वजन उचललं.
****
फिडे आणि टेक महिंद्रा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणारी पहिली जागतिक बुद्धिबळ लीग दुबईमध्ये होणार आहे. दुबईतले भारताचे वाणिज्य दूत डॉ. अमन पुरी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जगातली सर्वात मोठी आणि फ्रँचायझी-आधारित ही बुद्धिबळ स्पर्धा २१ जून ते २ जुलै दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत ६ खेळाडूंचा समावेश असलेल्या ६ संघांमध्ये सामने होणार आहेत.
****
महिला कुस्तीपटूंवर झालेल्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात काल दिल्ली पोलिसांनी ७ तक्रारदार कुस्तीपटूंचे जबाब नोंदवून घेतले आहेत. कुस्तीपटूंच्या वकिलांच्या उपस्थितीत त्याचं जबाब नोंदवण्यात आले. जबाब नोंदवताना या तक्रारदारांनी वेगवेगळ्या घटना सांगितल्या. परंतु, शोषण नेमके कधी झाली ती तारीख कुणाच्याही लक्षात नव्हती. लवकरच पोलीस कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांचा देखील जबाब नोंदवून घेणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल तीन वेगवेगळ्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत एका दुचाकीस्वाराचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला, तर चिकलठाणा परिसरात सिलिंडरची वाहतुक करणाऱ्या ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत अहमदनगर इथल्या एका युवकाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघं जन जखमी झाले. माळीवाडा इथं झालेल्या अन्य एका अपघातात भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.
****
0 notes
rahulmarathiblog · 1 year
Text
' कबाब व्यवस्थित नव्हता ' , उच्चभ्रू मद्यधुंद तरुणांकडून आचाऱ्याची हत्या
देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण उत्तर प्रदेशातील बरेली इथे समोर आलेले असून ‘ कबाब व्यवस्थित नव्हता ‘ म्हणून वाद झाल्यानंतर काही मद्यधुंद तरुणांनी चक्क आचारी असलेल्या व्यक्तीची गोळी झाडून हत्या केली आहे . बरेली शहरात ही घटना समोर आलेली असून अद्यापपर्यंत आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. उपलब्ध माहितीनुसार, बरेली शहरातील प्रेमनगर पोलीस ठाणे क्षेत्रातील प्रियदर्शनी नगर इथे बुधवारी रात्री ही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
rajendrasomani · 1 year
Text
' कबाब व्यवस्थित नव्हता ' , उच्चभ्रू मद्यधुंद तरुणांकडून आचाऱ्याची हत्या
देशात एक अत्यंत खळबळजनक असे प्रकरण उत्तर प्रदेशातील बरेली इथे समोर आलेले असून ‘ कबाब व्यवस्थित नव्हता ‘ म्हणून वाद झाल्यानंतर काही मद्यधुंद तरुणांनी चक्क आचारी असलेल्या व्यक्तीची गोळी झाडून हत्या केली आहे . बरेली शहरात ही घटना समोर आलेली असून अद्यापपर्यंत आरोपी पोलिसांच्या ताब्यात आलेले नाहीत. उपलब्ध माहितीनुसार, बरेली शहरातील प्रेमनगर पोलीस ठाणे क्षेत्रातील प्रियदर्शनी नगर इथे बुधवारी रात्री ही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathibatmi11 · 2 years
Text
पुण्यात उच्चभ्रू भागात विवाहितेचा छळ , मिरची पाण्यात टाकायचे अन ..
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक असा प्रकार समोर आलेला असून पैशासाठी एका महिलेचा अतोनात छळ केल्याचे प्रकरण सध्या समोर आलेले आहे. कोथरूडमधील हे प्रकरण असून विवाहित महिलेचा हुंड्यासाठी अमानुषपणे छळ करण्यात आला. तिच्या डोळ्यात तोंडात आणि कानात पाण्यात मिसळून मिरची पावडर टाकली गेली असे महिलेचे म्हणणे आहे. कोथरूड परिसरात राहणाऱ्या बावीस वर्षीय एका विवाहित महिलेने यासंदर��भात पोलिसात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
vaibhavvaidya5233 · 2 years
Text
अहो खरच सांगतो!
भारतीय समाजव्यवस्थेमधील अनेक जाती या अजूनही टोळी समाजाच्या (वंशसमाज) टाकून द्यायच्या 'गुणवैशिष्ट्यांना' त्यांच्या आजच्या जीवनपद्धतीमधून (जातीव्यवस्थाक समाजव्यवस्था) काढून टाकण्यात यशस्वी झालेल्या नाहीत.
उलटपक्षी, त्या टाकून द्यायच्या 'गुणवैशिष्ट्यां'ना आजच्या जातीव्यवस्थाक समाजाच्या काही 'गुणवैशिष्ट्यां'मध्ये बेमालूमपणे मिसळून, विविध जातीचे उच्चभ्रू जातिव्यवस्थेमध्ये आपले शोषणशासनाचे स्थान बळकट करताना दिसतात.
----------------------------
टोळीसमाजामध्ये एक टोळी ही दुसऱ्या टोळी साठी अस्तित्व नष्ट करु शकणारी टोळी वा पक्ष असू शकतो, म्हणून तो शत्रूच. त्या टोळीबरोबर मग कोणतेही सहचार्य नाही, कोणतेही संबंध नाही, तसे करणारा गंभीर शिक्षेस पात्र असे.
जातीव्यवस्थापूर्व विविध समुहांच्या आपसी करारातून गाव-खेडी निर्माण झाली, गावे वसवली गेली, शेती करण्यासाठी. शेतीमाल शहरांना पुरविण्यासाठी.
अशा परिस्थितीमध्ये एक जात दूसऱ्या जातीचा शत्रू असायला नको. कारण विविध जातीमधील सहचार्यच गावखेडयातील, शेतीतील उत्पादन काढू शकते. ते केवळ एका जातीचे काम नाही. करारा सीमित सर्व जातींच्या सहचार्याने करायचे काम आहे.
---------------------------------------
परंतू
१. आजही गावखेड्यात टोळीसमाजाप्रमाणे काही जाती दुसऱ्या जातीला शत्रू मानतात. त्यांचे अस्तित्व स्वत:साठी धोक्याचे मानतात. यातून अनेक शतकापूर्वी पासून असणारे सहचार्य, आपसी करार हे लोप पावले. उरले केवळ शत्रूत्व - काही जातींचे काही जातींबरोबर.
२. जाती उत्तरोत्तर विकसित होत कुशल समुहात रूपांतरित व्हायला हव्या होत्या. टोळी समाजाच्या तुलनेत इथे कुशलतेला वाव होता. टोळी समाजाच्या निरंकुश नियामाप्रमाणे या जातीही आप-आपल्या सदस्यावर बंदिस्तपणा लादत आल्या.
३. जातीव्यवस्थाक समाजातील नवीन डिव्हिजन वर्क हे डिव्हीजन आॅफ लेबर व्हायला नको होते. ते पुढे अधिक बंदिस्तपणाकडे घेऊन गेले. कसब-कौशल्याला तो बंदिस्तपणा मारक ठरणारा होता.
४. श्रौतस्मार्त धर्म या बंदिस्तपणासाठी मोठी भूमिका घेताना दिसतो. कला, कौशल्य, शेती याला हीन लेखताना दिसतो. जाती जातींच्या निर्मितीना ठळक करताना दिसतो. उतरंडीचे नियम बनवताना दिसतो.
-------------------------------
१. काय खेड्याची रचना करणे, हा प्रवाही समाजाला बांधण्याचा प्रयास होता?
२. काय वैशाली सारखी महान शहरे उध्वस्त करुन कृत्रीम समाज रचना निर्माण करणारी खेडी बनवणे एक प्रयोग होता?
३. शहराला रसद पुरविण्यासाठी बनलेली खेडी स्वतः ची भूक न भागवण्याइतकी अनुत्पादकीय कशी बनवली गेली?
कुणबी, कारगिर, कसबी जाती खेड्यात येण्यापूर्वी त्यांचे समूह (पुग, श्रेणी) हे मोठमोठ्या लेणी, विहार, चैत्य, मंदिर, प्रबोधन, सार्वजनिक सुविधा निर्माणासाठी देणग्या देणारे होते, ते खेड्यात येऊन, करारबद्ध होऊन, जगण्यासाठी धडपडणाऱ्या जाती बनल्या, शोषीतपीडित बनले.
खरेच सांगतो!
हा एक प्रयोग होता, यशस्वी प्रयोग होता, विषम समाजरचनेच्या पुन:प्रस्थापनेचा प्रयोग होता.
0 notes
Text
चिंचवडच्या उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅट नं. ६०२; पोलिसांची छापेमारी, काळे धंदे पाहून चक्रावले
https://bharatlive.news/?p=86087 चिंचवडच्या उच्चभ्रू सोसायटीतील फ्लॅट नं. ६०२; पोलिसांची छापेमारी, काळे ...
0 notes
sakshimarathiblog · 2 years
Text
पुण्यातील उच्चभ्रू कुटुंबातील पतीचा पत्नीवर ' काळ्या जादूचा ' आरोप , न्यायालयाचे आदेश अन..
पुण्यातील उच्चभ्रू कुटुंबातील पतीचा पत्नीवर ‘ काळ्या जादूचा ‘ आरोप , न्यायालयाचे आदेश अन..
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक प्रकार समोर आलेला असून पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित तर पती एक सॉफ्टवेअर इंजिनिअर मात्र त्याने आपली पत्नी आपल्यावर काळी जादू करते असा अर्ज चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला होता त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाची कुठलीही दखल घेण्यात आली नाही म्हणून अखेर त्याने न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने फौजदारी कलम दोनशेनुसार तसेच पत्नी, दोन तांत्रिक आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
harishmarathiblog · 2 years
Text
पुण्यातील उच्चभ्रू कुटुंबातील पतीचा पत्नीवर ' काळ्या जादूचा ' आरोप , न्यायालयाचे आदेश अन..
पुण्यातील उच्चभ्रू कुटुंबातील पतीचा पत्नीवर ‘ काळ्या जादूचा ‘ आरोप , न्यायालयाचे आदेश अन..
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक प्रकार समोर आलेला असून पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित तर पती एक सॉफ्टवेअर इंजिनिअर मात्र त्याने आपली पत्नी आपल्यावर काळी जादू करते असा अर्ज चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला होता त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाची कुठलीही दखल घेण्यात आली नाही म्हणून अखेर त्याने न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने फौजदारी कलम दोनशेनुसार तसेच पत्नी, दोन तांत्रिक आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chimnayjoshiblogs · 2 years
Text
पुण्यातील उच्चभ्रू कुटुंबातील पतीचा पत्नीवर ' काळ्या जादूचा ' आरोप , न्यायालयाचे आदेश अन..
पुण्यातील उच्चभ्रू कुटुंबातील पतीचा पत्नीवर ‘ काळ्या जादूचा ‘ आरोप , न्यायालयाचे आदेश अन..
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात एक खळबळजनक प्रकार समोर आलेला असून पती-पत्नी दोघेही उच्चशिक्षित तर पती एक सॉफ्टवेअर इंजिनिअर मात्र त्याने आपली पत्नी आपल्यावर काळी जादू करते असा अर्ज चतुःश्रुंगी पोलीस स्टेशनमध्ये दाखल केला होता त्यानंतर पोलिसांकडून या प्रकरणाची कुठलीही दखल घेण्यात आली नाही म्हणून अखेर त्याने न्यायालयात धाव घेतली आणि न्यायालयाने फौजदारी कलम दोनशेनुसार तसेच पत्नी, दोन तांत्रिक आणि…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nagarchaufer · 2 years
Text
अभिषेक पुन्हा माझ्यावर प्रेम करेल का ? उच्चभ्रू तरुणीने काळ्या जादूचा घेतला सहारा अन..
अभिषेक पुन्हा माझ्यावर प्रेम करेल का ? उच्चभ्रू तरुणीने काळ्या जादूचा घेतला सहारा अन..
प्रेम आंधळं असतं असं अनेकदा आपण ऐकतो मात्र प्रेमात पडलेला व्यक्ती कधी काय करेल याचा काही नेम राहिलेला नाही अर्थात त्याचा गैरफायदा घेण्यासाठी देखील समाजात अनेक लोक टपलेले असतात. अशीच एक घटना मुंबई येथे समोर आली असून आपल्या बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तरुणी त्याला विसरू शकत नव्हती म्हणून तिने चक्क मॅजिक पॉवर असलेला एक बाबा सोशल मीडियावर शोधला आणि आणि त्यानंतर तो आपल्याला आपल्या प्रियकरापर्यंत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 1 year
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 May 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ मे २०२३ सायंकाळी ६.१०
****
आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्याचा राज्य सरकारचा निर्णय.
रिफायनरी प्रकल्प लादण्याचा प्रयत्न केल्यास हुकूमशाही मोडून टाकू - उद्धव ठाकरे यांचा इशारा.
शिर्डी इथं उच्चभ्रू देहव्यापार चालवणाऱ्या सहा हॉटेलवर पोलिसांची कारवाई.
आणि
मतदार यादी पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांचे निर्देश.
****
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था - आयटीआयच्या विद्यार्थ्यांना दरमहा पाचशे रुपये विद्यावेतन देण्यात येईल, अशी घोषणा कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. मुंबईच्या कुर्ला इथं डॉन बॉस्को औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये राज्यस्तरीय उपक्रमाचा लोढा यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. कौशल्य विकास विभागांतर्गत असलेल्या व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालयामार्फत राज्यातील सर्व जिल्हे आणि २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आजपासून छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. राज्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि पालकांना करिअर विषयक विविध संधींची माहिती घरबसल्या घेता यावी, यासाठी लवकरच कायमस्वरूपी हेल्पलाईन नंबर आणि ईमेल आयडी सुरू करण्यात येणार असल्याचं लोढा यांनी सांगितलं.
****
बल्क ड्रग पार्क, वेदांता-फॉक्सकॉन यांच्यासारखे प्रकल्प गुजरातला जातात आणि विनाशकारी प्रकल्प कोकणाच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत आहे. बारसूमध्ये रिफायरनरी - शुद्धीकरण प्रकल्प सरकारने हुकूमशाहीने लादण्याचा प्रयत्न केला तर ती हुकूमशाही मोडून टाकू, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. राजापूरच्या सोलगाव इथं रिफायनरी विरोधक ग्रामस्थांशी ठाकरे यांनी आज भेट घेऊन संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. बारसू इथं रिफायनरी प्रकल्प व्हावा, यासाठी आपण पत्र दिलं होतं, त्याचा अर्थ याच ठिकाणी प्रकल्प करा, असा होत नाही. या ठिकाणी आंबा आणि काजूच्या बागा आहेत, स्थानिकांना ही रिफायनरी नको असेल तर हा प्रकल्प होता कामा नये, असं ठाकरे यांनी सांगितलं.
दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी आज रिफायनरीच्या समर्थनार्थ राजापूर इथं मोर्चा काढला.
****
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी कोकणातल्या प्रत्येक विकास कामाला विरोध केला आहे. यांना कोकणाबद्दल प्रेम आहे की द्वेष, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे यांच्या बारसू दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राणे पत्रकार परिषदेत बोलत होते. ठाकरे यांनी स्वत:च्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात कोकणात एकही विकास प्रकल्प आणलेला नाही, अशी टीका राणे यांनी केली.
****
विद्यार्थ्यांनी कौशल्यावर आधारित शिक्षण आणि प्रशिक्षण घेऊन उद्योजक बनावं, असं आवाहन कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी केलं आहे. छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी आज ते सांगली इथं बोलत होते. नवीन शैक्षणिक वर्ष आता सुरु होईल, त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी उपलब्ध असलेल्या करिअर विषयक विविध संधींची माहिती या शिबिरांमधून घेऊन आत्मनिर्भर बनण्यासाठी पुढं यावं. युवकांनी कष्ट करण्याची तयारी ठेवत, रोजगाराभिमुख चांगले शिक्षण घेऊन रोजगार देणारे बनावं, असं आवाहन खाडे यांनी केलं आहे.
****
लेखक आणि वाचकाला जोडण्यासाठी प्रकाशक हा महत्त्वाचा दुवा असल्याचं, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. नाशिक इथं कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं घेण्यात आलेल्या चौथ्या लेखक प्रकाशक साहित्य संमेलनाचं उद्घाटन भुजबळ यांच्या हस्ते आज झालं, त्यावेळी ते बोलत होते. ऑडिओ बुक या पुस्तकांच्या बदललेल्या या स्वरूपामुळे छापील पुस्तकांच्या अस्तित्वाबद्दल चिंता व्यक्त केली जाते, मात्र छापील पुस्तकं आपलं स्थान कायम ठेवतील असा विश्वास भुजबळ यांनी व्यक्त केला. संमेलनाचे अध्यक्ष अशोक कोठावळे यांच्यासह साहित्यिक, लेखक आणि प्रकाशक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा - नीट उद्या देशातल्या ४९९ शहरांमध्ये होणार आहे. तसंच देशाबाहेर जगातल्या १४ शहरांमध्ये ही परीक्षा होणार असल्याचं यासंदर्भात जारी पत्रकात म्हटलं आहे.
****
सौदी अरब देशाने आता भारतासह सात देशांतल्या प्रवाशांसाठी विसा स्टिकर ऐवजी ई विसा देण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्यापासून हा निर्णय लागू झाला आहे. आता या सात देशातल्या नागरिकांना क्यूआर कोड असलेला ई विसा दिला जाणार आहे.
****
उत्तराखंडातली चारधाम यात्रा पुन्हा सुरळीतपणे सुरू झाली आहे. आतापर्यंत चार लाखापेक्षा अधिक भाविकांनी चार धाम यात्रापूर्ण केली आहे, यापैकी एक लाख चाळीस हजाराहून अधिक भाविकांनी केदारनाथाचं दर्शन घेतलं आहे. केदारनाथ दर्शनासाठीची ऑनलाईन नोंदणी २५ एप्रिलपासून स्थगित करण्यात आली असल्यानं, त्यापूर्वी नोंदणी केलेले भाविकच यंदा केदारनाथाचं दर्शन घेऊ शकणार आहेत.
****
अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी इथं उच्चभ्रू देहव्यापार चालवणाऱ्या सहा हॉटेलवर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या पथकानं छापा टाकून १५ पीडित महिलांची सुटका केली. या प्रकरणी ११ आरोपीनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हॉटेल एक्झिक्युटिव्ह इन, हॉटेल साई कीर्ती पॅलेस, हॉटेल एस पी, हॉटेल साई शितल, हॉटेल गणेश पॅलेस, हॉटेल साई महाराजा अशा सहा ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने छापे टाकण्यात आल्याची माहिती उपाधीक्षक संदीप मिटके यांनी दिली.
****
पोलिस किंवा प्रशासनात प्रसारमाध्यमांची भूमिका एक ‘चेक अँड बॅलन्स’ व्यवस्था म्हणून महत्त्वाची असल्याचं, नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी म्हटलं आहे. ‘जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिना’ निमित्त आज नागपूर इथं एका चर्चासत्रात ते बोलत होते. वृत्तपत्रात अपराधाच्या किंवा पोलीस विभागाच्या बाबतीत येणाऱ्या बातम्यांकडे, आम्ही एक रचनात्मक टीका म्हणून बघतो, या बातम्या आमच्यासाठी एक ‘चेक अँड बॅलन्स’ व्यवस्था ठरतात, असंही ते म्हणाले. केंद्रीय लोकसंपर्क ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय, नागपूर, पत्र सूचना कार्यालय, नागपूर, प्रेस क्लब, नागपूर आणि माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय यांच्या वतीनं हा कार्यक्रम घेण्यात आला.
****
नाशिक इथं गोदावरी नदीपात्रालगत विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत सुमारे ४०० किलो कचरा संकलित करण्यात आला. महापालिकेच्या पंचवटी विभागीय कार्यालयाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ अंतर्गत ही स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. नदी पात्रातील पाणवनस्पती काढून जंतुनाशक फवारणी करण्यात आली. नदी पात्रात कचरा न टाकता विलगीकरण करुन घंटागाडीत कचरा देण्याबाबत तसंच प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी न वापरण्याबाबत यावेळी जनजागृती करण्यात आली.
****
वड, पिंपळ] कुळातील चिंच, कडुनिंबासारखी दीर्घायुषी आणि मानवाला सतत लाभ देणारी झाडं मुलांनी लावावीत, असा सल्ला अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांनी दिला आहे. निसर्गशाळेच्या वतीने आयोजित निसर्ग महोत्सवात त्यांनी आज राज्यभरातील मुलांशी दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. सुटीत मुलांनी निसर्गात जाऊन झाडे, पक्षी आणि प्राण्यांची निरीक्षण करणारी डायरी लिहावी असंही चितमपल्ली यांनी सांगितलं.
****
आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेने सतर्क राहून मतदार यादी पारदर्शक करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. बीड जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. गावपातळीवर ग्रामसेवक, तलाठी, बीएलओ, अंगणवाडी सेविका यांचा गट तयार करुन मतदार यादी तपासून घेण्यात यावी. मयत तसंच स्थलांतरीत मतदारांची वगळणी करण्यापूर्वी खात्री करावी, अशा सूचनाही देशपांडे यांनी केल्या.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज दोन वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. शेंद्रा औद्योगिक वसाहतीत एका दुचाकीस्वाराचा ट्रकने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला, तर माळीवाडा इथं झालेल्या अन्य एका अपघातात भरधाव कारने दिलेल्या धडकेत एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला.
****
0 notes