#आशियाचा
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 7 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date: 03 April 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०३ एप्रिल २०२४ दुपारी १.०० वा.
****
२०२४ मध्ये भारताचा आर्थिक विकासदर सात पूर्णांक पाच टक्के दरानं वाढेल, असा अंदाज जागतिक बँकेनं व्यक्त केला आहे. याआधीच्या अंदाजात सुधारणा करून, जागतिक बँकेनं यात एक पूर्णांक दोन टक्क्यांनी वाढ केली आहे. दक्षिण आशियाचा या वर्षीचा विकास दर सहा टक्के इतका अपेक्षित आहे. पुढील दोन वर्षांसाठी दक्षिण आशिया हा जगातला सर्वात वेगवान आर्थिक विकास दर असलेला प्रदेश राहणार असल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे.
****
काँग्रेस नेते आणि केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार राहुल गांधी आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राहूल गांधी यांची कल्पेट्टा बसस्थानक परिसरातून रॅली निघाली असून त्यांच्यासोबत पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी, के. सी. वेणुगोपाल आणि इतर नेते उपस्थित आहेत. या मतदार संघात दुसऱ्या टप्प्यात २६ तारखेला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे. ५ तारखेला अर्जांची छाननी होणार असून या ८ तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.
****
तैवानच्या पूर्व किनाऱ्यावर आज सकाळी झालेल्या तीव्र भुकंपाच्या धक्क्यात चार जणांचा मृत्यू झाला. या भूकंपाची तीव्रता ७ पूर्णांक ४ रिश्टर स्केल इतकी नोंदवली गेली. यामुळं या प्रदेशात त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. गेल्या पंचवीस वर्षांतला हा सर्वात तीव्र भूकंपाचा धक्का असल्याचं तैपेईच्या भूकंपविज्ञान केंद्रानं सांगितलं आहे. या भूकंपामुळं दक्षिण जपानमध्येही त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, भुकंपाच्या पार्श्वभुमीवर तैपेई इथंल्या भारतीय नागरिकांना मदत करण्यासाठी भारत तैपैई संघटनेकडून हेल्पलाईन क्रमांक आणि इ-मेल आयडी जारी करण्यात आला आहे.
****
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या संकेतस्थळ चालकांना त्यांच्या संकेत स्थळावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांचं योग्य वर्गीकरण करण्यास सांगितलं आहे. दुध, तृणधान्य आणि माल्टोजपासून बनवलेली पेय ही हेल्थ ड्रिंक्स आणि एनर्जी ड्रिंक्सच्या श्रेणीत विकली जात असल्याचं निदर्शनास आलं आहे. प्राधिकरणानं कुठेही आरोग्य पेयांची व्याख्या केली नसून संकेतस्थळावरून हे चुकीचं वर्गीकरण त्वरित दुरुस्त करण्यास सांगितलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात छावणी परिसरातल्या एका कापड दुकानाला भीषण आग लागून एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू झाला. आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली. कपड्याच्या दुकानात चार्जिंगला लावलेल्या इलेक्ट्रिक बाईकच्या चार्जरचा स्फोट झाल्यानं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज अग्नीशमन दलानं वर्तवला आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. दुकानाला आग लागली तेव्हा हे सर्व वरच्या मजल्यावर झोपलेले होते. त्यामुळं त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे.
****
सोलापूर इथं अक्कलकोट रस्त्यावरील एमआयडीसीतल्या अन्नपूर्णा टॉवेल कारखान्याला आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेत कोणतीही प्राणहानी झाली नसून लाखो रुपयांचा माल जळाला आहे. आगीचं नेमकं कारण अजून कळालं नसून आग आटोक्यात आणण्यासाठी काही तास लागतील, असं महानगर पालिकेच्या अग्निशामक दलाकडून सांगण्यात आलं आहे आहे.
****
राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषद -एनसीईआरटीच्या सर्व शालेय अभ्यासक्रमांची पुस्तकं विद्यार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचं परिषदेनं सांगितलं. सर्व विद्यार्थी आणि पालकांना पुस्तकं वेळेवर मिळण्याचं आश्वासन देत, अनेक राज्यांमध्ये शालेय पुस्तकं उपलब्ध नसल्याच्या या सामाजिक माध्यमांवरील वृत्तानंतर परिषदेनं हे स्पष्ट केलं.
****
रायगड लोकसभा मतदारसंघात ११ हजार २८२ दिव्यांग मतदार असून त्यांना मतदान करणं सोयीचं व्हावं म्हणून सर्व मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. मदतानाला जाण्यासाठी १ हजार ७७ व्हीलचेअर उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यामुळं यावर्षी दिव्यांगांचं मतदान वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन आग्रही असून गाभिर्यानं सुधारणा केल्या जात आहेत.
****
धर्माबाद -मनमाड मराठवाडा एक्सप्रेस तीन, सात आणि दहा एप्रिल रोजी ��र्माबाद ते नांदेड दरम्यान अंशतः रद्द करण्यात आली आहे. या तिनही दिवशी ही गाडी मनमाडला जाण्यासाठी धर्माबाद ऐवजी नांदेड इथून सुटेल, असं दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागानं कळवलं आहे. आदिलाबाद ते मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस ही गाडी एक एप्रिल ते २८ एप्रिल दरम्यान दादरपर्यंतच धावणार आहे. या कालावधीत दादर ते मुंबई दरम्यान ही गाडी धावणार नाही. तसंच औरंगाबाद-हैदराबाद एक्स्प्रेस नऊ एप्रिल रोजी औरंगाबाद येथून वेळेवर सुटणार आहे.
****
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आकाश ढगाळ राहील. तर राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. पाच एप्रिलपासून राज्याच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Rohit Sharma: रोहित शर्मा आशियाचा नवा किंग! सचिन-आफ्रिदीचा मोठा विक्रम मोडला

Rohit Sharma: रोहित शर्मा आशियाचा नवा किंग! सचिन-आफ्रिदीचा मोठा विक्रम मोडला Rohit Sharma Breaks Sachin Tendulkar record: रोहित आशिया कपच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा भारतीय क्रिकेटपटूही ठरला आहे. या बाबतीत त्याने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. सचिनने आशिया कपमध्ये ९७० धावा केल्या होत्या. आशिया कपमध्ये १ हजार धावा करणारा रोहित पहिला भारतीय आणि आशियातला तिसरा फलंदाज ठरला. Rohit Sharma Breaks…
View On WordPress
0 notes
rahulmarathiblog · 2 years ago
Text
आयसिसच्या निशान्यावरील भारतातील ' तो ' बडा नेता कोण ? , रशियाकडून अटक
आयसिसच्या निशान्यावरील भारतातील ‘ तो ‘ बडा नेता कोण ? , रशियाकडून अटक
भारतातील सत्ताधारी पक्षातील एका बड्या नेत्यांची आत्मघाती हल्लाद्वारे हत्या करण्याचा कट आखणाऱ्या आयसिस संघटनेच्या एका दहशतवाद्याला पकडल्याचा दावा रशियाकडून करण्यात आलेला आहे. सदर दहशतवादी हा मध्य आशियाचा रहिवासी असून त्याच्या निशाण्यावर असलेला हा बडा नेता कोण याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे तर रशियाने मात्र याबद्दल काही माहिती दिलेली नाही. रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्विस या गुप्तचर संघटनेने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
sakshimarathiblog · 2 years ago

harishmarathiblog · 2 years ago

chimnayjoshiblogs · 2 years ago

rajendrasomani · 2 years ago

marathibatmi11 · 2 years ago

Rohit Sharma: रोहित शर्मा आशियाचा नवा किंग! जयवर्धनेला मागे टाकत मोठ्या विक्रमाला गवसणी, पाहा

Rohit Sharma: रोहित शर्मा आशियाचा नवा किंग! जयवर्धनेला मागे टाकत मोठ्या विक्रमाला गवसणी, पाहा IND Vs HKG Asia Cup Rohit Sharma: हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने मैदानात पाऊल टाकताच एक नवा मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहित आशिया कपमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू ठरला आहे. IND Vs HKG Asia Cup Rohit Sharma: हाँगकाँग विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने मैदानात पाऊल टाकताच एक…
View On WordPress
0 notes