Tumgik
#आळंदी
bharatlivenewsmedia · 2 years
Text
pune gramin : सराईत दुचाकी चोरटा गजाआड; आळंदी पोलिसांची कामगिरी
pune gramin : सराईत दुचाकी चोरटा गजाआड; आळंदी पोलिसांची कामगिरी
pune gramin : सराईत दुचाकी चोरटा गजाआड; आळंदी पोलिसांची कामगिरी आळंदी  -आळंदीसह आसपासच्या परिसरात वाहन चोरी करणाऱ्या सराईताला आळंदी पोलीसांच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आळंदी, दिघी, तळेगाव दाभाडे या पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आळंदी पोलिसांना यश आले आहे. सराईताकडून 2 लाख 55 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नासीर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
acharyaelections · 2 years
Text
आजच्याच दिवशी जवळपास सव्वा सातशे वर्षांपुर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी घेण्याचा निर्णय घेतला होता. जन्माला येणं आणि आपलं संपुर्ण आयुष्य समाजाच्या कार्याला वाहून देणं हे संताचं फार मोठं वैशिष्ठ आहे.
1 note · View note
airnews-arngbad · 2 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 03 October 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०३ ऑक्टोबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
आदिशक्तीच्या साडेतीन शक्तीपीठांसह सर्वत्र घटस्थापनेनं शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ.
अल्पवयीन आरोपींची वयोमर्यादा १८ वरून १४ वर्ष करण्याचा विचार-उपमुख्यमंत्री अजित पवार.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन यांना ईडीचं समन्स जारी.
आणि
महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्वकरंडक स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात.
****
शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ झाला. राज्यात आदिशक्तीच्या साडे तीन शक्तीपीठांसह देवीच्या सर्वच मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली.
धाराशिव जिल्���्यात तुळजापूर इथल्या तुळजाभवानी मातेच्या मंदिरात मंदिर समितीचे अध्यक्ष तथा धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या हस्ते सपत्नीक विधिवत घटस्थापना करण्यात आली. त्यापूर्वी घटाची कल्लोळतीर्थापासून वाजत गाजत मिरवणूक करण्यात आली. यावेळी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नऊ दिवस चालणाऱ्या या शारदीय नवरात्र महोत्सवात देवीच्या विविध अलंकार महापूजा मांडण्यात येतात.
****
नांदेड जिल्ह्यात माहूर इथंही रेणुका देवीच्या नवरात्रोत्‍सवाला आज घटस्थापनेनं प्रारंभ झाला. नागरिकांनी आज पहिल्या माळेला देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज रेणुकामातेचं दर्शन घेतलं. नवरात्रोत्सव कालावधीत भाविकांच्या वाहतुक सेवेसाठी एसटीच्या ११० बस उपलब्ध राहणार आहेत. तसंच ३ आरोग्य पथकंही नियुक्त करण्यात आली आहेत
****
कोल्हापूर इथं करवीर निवासिनी अंबाबाई देवीची पूजा श्रीसूक्तवर्णित श्रीमहालक्ष्मी रुपात बांधण्यात आली. मंदिरात सकाळी अभिषेक पूजा झाल्यानंतर घटस्थापना झाली. यानंतर तोफेची सलामी देण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या हस्ते शासकीय अभिषेक पूजा करण्यात आली.
****
नाशिक जिल्ह्यात वणी इथं सप्तशृंगी देवीची प्रधान आणि जिल्हा सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी यांच्या हस्ते सकाळी महापूजा करण्यात आली. त्यापूर्वी देवीच्या अलंकाराची भव्य मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर गडावर महापूजा करून घटस्थापना करण्यात आली.
****
अंबाजोगाई इथं श्री योगेश्वरी देवीची बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आज सकाळी सपत्निक महापूजा केली. वर्णीपूजेनंतर घटस्थापनेनं देवीच्या नवरात्राला प्रारंभ झाला. १२ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या उत्सवात दररोज भजन, कीर्तन, प्रवचन, आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.
****
खान्देश कुलस्वामिनी असलेल्या धुळ्याच्या एकविरा देवीची आज नवरात्राच्या पहिल्या दिवशी खासदार डॉ. शोभा दिनेश बच्छाव यांच्याहस्ते पूजा आरती करण्यात आली,  भाविकांनी देवीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं कर्णपुरा परिसरातील तुळजाभवनी मंदीरात, सिडको इथल्या रेणुका माता मंदीरात तसच हर्सुल इथल्या हरसिध्दी माता मंदीरासह शहरातील विविध मंदीरात घटस्थापना करण्यात आली आहे. कर्णपुरा मंदीरात विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या हस्ते आज घटस्थापनेनंतर आरती करण्यात आली.
****
नागपूर जिह्यातल्या कोराडी इथल्या श्री महालक्ष्मी जगदंबेच्या आश्विन नवरात्र उत्सवाला आज मोठ्या आनंदात सुरुवात झाली. काँग्रेस पक्षाच्या प्रदेश समितीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज श्री महालक्ष्मी जगदंबेचे दर्शन घेतलं.
****
धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने नागपूर इथं दीक्षाभूमीवर येणाऱ्या लाखो बौद्ध अनुयायांच्या सोयीसाठी आवश्यक सुविधांची तयारी लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश नागपूर महानगर पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगाने दीक्षाभूमीवरील सुविधांचा चौधरी यांनी आज आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
****
बुलढाणा जिल्ह्यात खामगांव तालुक्यातल्या घाटपुरी इथं श्री महर्षी वेद व्यास प्रतिष्ठान, आळंदी अंतर्गत जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नवीन वास्तूचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज भूमिपूजन करण्यात आलं. यावेळी संस्थांनच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांशी संवाद साधला. या भूमिपूजन कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण तथा आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव, अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्राचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज, आमदार आकाश फुंडकर, आमदार संजय गायकवाड, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
****
अल्पवयीन आरोपींची वयोमर्यादा १८ वरून १४ वर्ष करण्याचा विचार असल्याचं, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अधिकारी वर्गाकडूनही अशी मागणी केली जात असल्याचं पवार यांनी सांगितलं.
****
राज्य शासनाने युवकांच्या विकासासाठी कौशल्य विद्यापीठ स्थापन केलं, ही अत्यंत अभिमानाची बाब असून राज्याच्या कौशल्य विकास विभागाने नाविन्यपूर्ण उपक्रमाद्वारे देशात आपली वेगळी ओळख निर्माण केली, असे कौतुकोद्गार केंद्रीय ��ौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री जयंत चौधरी यांनी काढले आहेत. मुंबईच्या एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय इथं आय. टी. आय मुंबईचे नामकरण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुंबई असं करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र हे देशातील एकमेव कौशल्य विद्यापीठ आहे, ज्यामध्ये कौशल्ययुक्त शिक्षण देऊन प्रत्यक्ष रोजगार देण्यावर भर दिला जात आहे, असं चौधरी म्हणाले.
****
हैदराबाद मुक्तीसंग्रामाचे नेते माजी खासदार व्यंकटेश भगवानराव खेडगीकर उर्फ स्वामी रामानंद तीर्थ यांची एकशे एकवीसावी जयंती आज साजरी होत आहे. यानिमित्तानं मराठवाड्यात स्वामीजींना अभिवादन करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वामीजींना ट्विट संदेशातून आदरांजली अर्पण केली. हैद्राबाद मुक्तीसाठी सर्वस्व पणाला लावणारे सेनापती तसंच आध्यात्मिकता आणि राजकारण यांचा विलक्षण संयोग साधणारे लोकप्रिय नेतृत्व, शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांच्या मौलिक जीवनप्रवासास विनम्र अभिवादन, असं मुख्यमंत्र्यांनी या संदेशात म्हटलं आहे.
****
काँग्रेस नेते लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी उद्यापासून दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कसबा बावडा इथल्या भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण गांधी यांच्या हस्ते होणार असून शनिवारी होणाऱ्या संविधान सन्मान संमेलनाला ते उपस्थित राहणार आहेत, विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी ही माहिती दिली.
****
हैदराबाद क्रिकेट असोसिएशनमध्ये अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझहरुद्दीन यांच्या विरोधात समन्स जारी केलं आहे. हैदराबादच्या उप्पल इथल्या राजीव गांधी क्रिकेट मैदानासाठी डिझेल जनरेटर, अग्निशामक यंत्रणा आणि छत यांच्या खरेदीत २० कोटी रुपयांचा कथित गैरव्यवहार केल्याच्या प्रकरणावरुन हे समन्स जारी करण्यात आलं आहे.  
****
महिलांच्या आयसीसी टी-ट्वेंटी विश्व करंडक स्पर्धेला आजपासून शारजा इथं सुरुवात होत आहे. बांग्लादेश आणि प्रथमच खेळणारा स्कॉटलंड यांच्या उद्घाटनाचा सामना होत आहे. भारताचा पहिला सामना उद्या न्यूझीलंडसोबत होणार आहे. येत्या २० तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत दहा संघ उतरले आ��ेत. ऑस्ट्रेलियाच्या महिलांनी या स्पर्धेत मागील तीनही वेळा विजेतेपद मिळवलं असून, भारतीय संघाला अद्याप एकदाही विजेतेपद मिळालेलं नाही. मुख्य स्पर्धेपूर्वी झालेल्या सराव सामन्यांमध्ये भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज यांना पराभूत केलं.
****
धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा इथले शिवसेनेचे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या पार्थिव देहावर आज दुपारी परांडा इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर, माजी खासदार रवींद्र गायकवाड, आमदार विक्रम काळे, धाराशिवचे आमदार कैलास पाटील यांच्यासह सर्वपक्षीय राजकीय लोकप्रतिनिधी तसेच भूम परंडा वाशी परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर इथं लायन्स इंटरनॅशनल क्लबच्या वतीने येत्या ८ ऑक्टोबरपर्यंत शहरात लायन्स सेवा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. आज शहरातल्या उल्लकानगरी इथं स्वच्छता अभियान आणि रक्तदान शिबिर घेण्यात आलं. याप्रसंगी महानगरपालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आलं. यंदाच्या वर्षी १५ समाजोपयोगी उपक्रम राबवून सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे, अशी माहिती लायन्स क्लबचे अध्यक्ष नंदकिशोर मालपाणी यांनी दिली आहे
****
परभणी इथं विविध तपासणी केलेल्या ४ हजार ज्येष्ठ नागरिकांना विविध प्रकारच्या १७ हजार सहाय्यक साधनांचं उद्या मोफत वाटप करण्यात येणार आहे. एकाच मतदार संघात सर्वाधीक लाभार्थी असणारा हा देशातील पहिलाच उपक्रम असल्याची माहिती परभणीचे आमदार डॉ.राहुल पाटील यांनी दिली आहे. काठी, कोपर काठी, अल्युमिनीयम कुबड्या, तीन पायाची काठी, चार पायाची काठी, श्रवणयंत्र, घडीचे वॉकर, नंबरचा चष्मा, चाकांची खुर्ची आदी साहित्याच्या समावेश.
****
0 notes
6nikhilum6 · 7 days
Text
Alandi : आळंदी नगरपरिषदेची ‘माझी वसुंधरा ४.० अभियानात उत्तम कामगिरी; 22 व्या क्रमांकावर झेप
Alandi : आळंदी नगरपरिषदेची ‘माझी वसुंधरा ४.० अभियानात उत्तम कामगिरी; 22 व्या क्रमांकावर झेप – MPC…
0 notes
punerichalval · 3 months
Text
विश्रांतवाडी-आळंदी रोडवरील घटना -भरधाव कारने एकास चिरडले
पुणे : भरधाव वेगाने येणाऱ्या कार चालकाचे नियत्रंण सुटल्याने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी वरील एका युवकाचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान अपघाता नंतर कार चालक पळून गेला. त्यास अटक करावी या मागणीसाठी नातेवाईक मित्र परिवाराने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यासमोर आंदोलन केले. पोलीस अधिकाऱयांनी आश्वासन दिल्या नंतर आंदोलनकर्ते शांत झाले. अपघात प्रकरणी प्रतिक सुरेश चांदारे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
jagdamb · 10 months
Text
केली साहित्य निर्मिती करण्या विश्वकल्याण, समस्थ विश्वाच्या सुखासाठी रचिले पसायदान !!
इंद्रायणी काठी
देवाची आळंदी
लागली समाधी
#ज्ञानेशाची
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज
#संजीवन_समाधी
9049494938 | 8626020202
(CONTENT ©️ COPYRIGHT)
#Jagdamb
#Vyavsaywala
#sant #santdyaneshwar #dyanwshwarmaharaj #alandi #dehu #pandharpur #samadhisohala #samadhi #sanjivansamadhi #vitthal #lagalisamadhidyaneshachi
Tumblr media
0 notes
khandbahale · 2 years
Text
Dnyaneshwar mauli braught knowledge to masses in their mother toung - #sunilkhandbahale #khandbahale
Dnyaneshwar mauli braught knowledge to masses in their mother toung – Sunil Khandbahale talking about his connection with Alandi and Dnyanewhwar Maharaj ज्ञानेश्वर माऊलींनी जनसामान्यांना त्यांच्या मातृभाषेतून ज्ञान दिले – सुनील खांडबहाले आळंदी आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्याशी असलेल्या त्यांच्या संबंधाविषयी बोलत आहेत. #Dnyaneshwar #mauli #knowledge #mothertoung #khandbahale #sunilkhandbahale…
Tumblr media
View On WordPress
0 notes
nashikfast · 2 years
Text
किल्ले शिवनेरीवर विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान
किल्ले शिवनेरीवर विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान
शैक्षणिक सहलीतून दिला स्वच्छतेचा संदेश जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थे���्या गोविंदराव यशवंतराव पाटील कनिष्ठ महाविद्यालयाची तीन दिवसीय शैक्षणिक सहल नुकतीच संपन्न झाली. या अंतर्गत ओझर, लेण्याद्री, शिवनेरी, आळंदी, देहू, वाई, पाचगणी, महाबळेश्वर, पोलादपूर, महाड, मुरुड जंजिरा, काशिद, अलिबाग आदी स्थळांना भेटी देण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी शिवनेरी किल्ल्यावर स्वच्छता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
mhlivenews · 2 years
Text
आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी देणार - पालकमंत्री चंद्रकांत पाटील - महासंवाद
आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
पुणे दि.19 : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सकाळी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराला भेट देऊन माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी 25 कोटींचा निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त विकास ढगे-पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, उप विभागीय अधिकारी…
View On WordPress
0 notes
darshanpolicetime1 · 2 years
Text
आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी देणार - पालकमंत्री चंद्रकांत पाटील - महासंवाद
आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी २५ कोटी देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील – महासंवाद
पुणे दि.19 : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सकाळी आळंदी येथे संत ज्ञानेश्वर समाधी मंदिराला भेट देऊन माऊलींच्या समाधीचे दर्शन घेतले. आळंदी विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यासाठी 25 कोटींचा निधी लवकरच उपलब्ध करून देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे विश्वस्त विकास ढगे-पाटील, लक्ष्मीकांत देशमुख, उप विभागीय अधिकारी…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
सराईत दुचाकी चोराला अटक, 8 वाहने जप्त; आळंदी पोलिसांची कामगिरी
सराईत दुचाकी चोराला अटक, 8 वाहने जप्त; आळंदी पोलिसांची कामगिरी
सराईत दुचाकी चोराला अटक, 8 वाहने जप्त; आळंदी पोलिसांची कामगिरी आळंदी – आळंदीसह आसपासच्या परिसरात वाहन चोरी करणाऱ्या सराईताला आळंदी पोलीसांच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या असून आळंदी, दिघी, तळेगाव दाभाडे, या पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे उघडकीस आणण्यात आळंदी पोलीसांना यश आले आहे. सराईताकडून 2 लाख 55 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नासीर शमशुद्दीन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 26 days
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 09 September 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०९ सप्टेंबर २०२४ सकाळी ७.१० मि.****
केंद्र सरकारची महाराष्ट्रात किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता    
स्थानिक भाषा संवर्धनासाठीच नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून प्राथमिक शिक्षणाचा आग्रह-केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं प्रतिपादन
मुंबईतल्या केंद्रीय जीएसटी अधीक्षकासह तीन जणांना २० लाख रुपये लाच घेताना अटक
पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सुमारे ९८ टक्के-नागरिकांना सतर्कतेचा इशारा
आणि
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा शानदार समारोप-२९ पदकांसह भारत पदकतालिकेत १६ व्या स्थानी
****
केंद्र सरकारने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांमध्ये ९० दिवसांसाठी किमान हमीभावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. यासाठी सोयाबीनची किमान आधारभूत किंमत चार हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल इतकी निश्चित करण्यात आली आहे. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात पाठपुरावा केला होता. या निर्णयामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ मिळणार असून, याचा मनापासून आनंद होत असल्याची भावना मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेलं चार हजार २०० कोटी रुपये अनुदान येत्या दोन-तीन दिवसात शेतकऱ्यांच्या बचत खात्यावर थेट जमा करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातल्या दहा जिल्ह्यात सुमारे आठ लाख ४८ हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिकांचं नुकसान झालं आहे. या नुकसानाचे पंचनामे सुरू असल्याची माहिती राज्याचे कृषी संचालक विनयकुमार आवटे यांनी दिली. कापूस, सोयाबीन आणि ज्वारी आदी पिकांचं आणि कांदा तसंच भाजीपाल्याचंही नुकसान झाल्याचं कृषी विभागाच्या अहवालात म्हटलं आहे.
****
स्थानिक भाषांचं संवर्धन गरजेचं असून, त्यासाठीच मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षणाचा आग्रह करणारं शैक्षणिक धोरण आणल्याचं, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. मुंबई समाचार या गुजराती वृत्तपत्राच्या द्विशताब्दीनिमित्त काल मुंबईत एका लघुपटाचं शहा यांच्या हस्ते प्रकाशन झालं, त्यावेळी ते बोलत होते. कुटुंबीयांनी आपापसात मातृभाषेतच संवाद साधण्याचं आवाहन शाह यांनी केलं. ते म्हणाले...
‘‘नई जो शिक्षा नीती लेकर आए हैं प्राथमिक शिक्षा मातृभाषा मे कंप्लसरी करने का काम हमने किया है. मै आप सभी से अपील करना चाहता हूं, निवेदन करना चाहता हूं कि घर मे कम से कम अपनी भाषा मे बोलना शुरू करो, बच्चे भाषा को आगे ले जाएंगे.’’
दरम्यान, गृहमंत्री शाह आज लालबागचा राजा, त्यानंतर वांद्रे पश्चिमेतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी स्थापन गणपतीचंही ते दर्शन घेणार आहेत.
****
वारकरी पंथाचं ��ध्यात्मिक आणि धार्मिक अधिष्ठान राजकीय अधिष्ठानापेक्षा मोठं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. देवाची आळंदी इथं झालेल्या वारकरी संतपूजन सोहळ्यात ते काल बोलत होते. आपल्या सरकारनं गेल्या दोन वर्षांत घेतलेले ६०० निर्णय सर्व समाजघटकांसाठी होते, याकडे त्यांनी लक्ष वेधलं. घरचं अर्थकारण सांभाळणारी लाडकी बहीण सगळ्यात हुशार असते, असं सांगून या योजनेला विरोध करणाऱ्यांवर त्यांनी टीका केली. या वेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मारुती महाराज कुरेकर यांना शांतिब्रह्म पुरस्कार, तर रामराव महाराज ढोक यांना तुलसीदास पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं.
****
राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभागांतर्गत स्थापन कऱण्यात आलेल्या महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेसाठी शंभर कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामधून एकंदर पाचशे स्टार्टस्अपना एक लाख ते २५ लाख रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. योजनेची अधिक माहिती एम एस आय एन एस डॉट इन या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
****
केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयनं मुंबईतल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर अधीक्षक आणि त्याच्या साथीदारांसह तीन जणांना २० लाख रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडलं. मुंबईतल्या सांताक्रूझ इथल्या केंद्रीय वस्तू आणि सेवा कर कार्यालयातले अधिकारी आणि अन्य आठ जणांनी अटक टाळण्यासाठी ६० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार सीबीआयला प्राप्त झाली होती. त्यानंतर सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. मागणी केलेल्या रकमेपैकी ३० लाख रुपये हवाला मार्फत घेतल्याची माहितीही सीबीआयनं दिली आहे.
****
देशात मंकिपॉक्सचा एक संशयित रुग्ण आढळला आहे. या आजाराचा प्रसार झालेल्या देशातून हा रुग्ण नुकताच परत भारतात आल्याचं आरोग्य मंत्रालयानं काल सांगितलं. या रुग्णाला एका विशेष रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे. या रुग्णाची प्रकृती ठीक असून, अशा प्रकारच्या आजारांचा सामना करण्यासाठी देश पूर्ण तयार असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २९ सप्टेंबरला आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून देशवासियांसोबत संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा ११४ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरिकांनी येत्या २७ तारखेपर्यंत आपल्या सूचना १८०० - ११ - ७८०० हा टोल फ्री, क्रमांकावर, नरेंद्र मोदी ॲप किंवा माय जी ओ व्ही ओपन फोरमवर पाठवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा सुमारे ९८ टक्के झाला आहे. धरणात सध्या १५ हजार १४४ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याची आवक सुरु असून, उजव्या कालव्यातून माजलगाव धरणासाठी ५०० घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी सोडण्यात येत आहे. धरणातून कोणत्याही क्षणी विसर्ग करावा लागू शकतो, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांनी सर्तक राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
गणेशोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होत असून, विविध मंडळांच्या वैशिष्ट्यपूर्ण मूर्ती आणि सामाजिक संदेश देणारे देखावे बघण्यासाठी नागरीकांची झुंबड उडत आहे.
दरम्यान, दीड दिवसाच्या गणपतींच काल विसर्जन झालं. ठिकठिकाणी गणेश विर्सजनासाठी महानगरपालिका आणि इतर स्थानिक प्रशासनानं चोख व्यवस्था केली होती.
नांदेड जिल्ह्यात देगलूर इथं नगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलाव उभारण्यात आला होता. नागरिकांनी या तलावात दीड दिवसांच्या गणपतीचं विसर्जन केलं.
****
श्रोते हो, विविध देशात कशारितीने गणेशोत्सव साजरा केला जातो हे आपण जाणून घेत आहोत. श्रीलंकेत कोलंबो मधल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची माहिती सांगत आहेत, तिथे राहणार्या, मीनल रेणावीकर,
‘‘श्रीलंकेमध्ये यावर्षी आम्ही पहिल्यांदाच सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला. इथेही हा कार्यक्रम साजरा करण्यासाठी आम्हाला सर्वांनी सहाय्य केलं. इथल्यां कारुगराकडून डाव्या सोंडेची सुंदर दोन फुटाची मूर्ती बनवून घेतली. येथील श्रीलंकन मुलांना आपल्या लेझिमचे प्रशिक्षण देऊन आणि सिंहली ढोल पथकांच्या सहाय्याने ढोल, ताशा, लेझिमच्या गजरात बाप्पाचं विसर्जन केलं. हा सोहळा इंडियन हाय कमिशनच्या स्वामी विवेकानंद कल्चरल सेंटर, कोलंबो, येथे दणक्यात साजरा झाला. या गणेशोत्सवाला भारतीय बांधव तर प्रचंड संख्येनी उपस्थित होतेच, पण श्रीलंकन, तमिळ, सिंहलीज आणि काही फ्रेंच नागरीकही उपस्थित होते.’’
****
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेचा काल शानदार सोहळ्यानं समारोप झाला. यावेळी पॅरिस प्रशासनाने पॅरालिम्पिक ध्वज आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक समितीचे अध्यक्ष ॲण्ड्र्यू पार्सन यांच्याकडे सोपवण्यात आला, त्यांनी हा ध्वज लॉस एंजेलिस प्रशासनाकडे सोपवला. २०२८ च्या पॅरालिम्पिक स्पर्धा लॉस एंजेलिस मध्ये होणार आहेत. या समारोह सोहळ्यात सुवर्ण पदक विजेते तीरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल हे भारतीय पथकाचे ध्वजवाहक होते. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी सात सुवर्ण, नऊ रौप्य आणि १३ कांस्यपदकांसह एकूण २९ पदकांची कमाई करुन पदकतालिकेत सोळावं स्थान पटकावलं. या स्पर्धेच्या इतिहासात ही भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे.
****
राज्य शासनाचा उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, एक्वाडाम, सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन, व्हाय वेस्ट आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने युवा सहभाग जलप्रबंधन कार्यक्रम राज्यात राबवला जात आहे. या अभियानांतर्गत धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग इथल्या कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या ग्रीन क्लबला राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय महाराष्ट्र शासनाचं पुरस्कार नामांकन घोषित झालं आहे. या मोहिमेत वेगवेगळ्या पद्धती वापरून अंदाजे ४० दशलक्ष घनमीटर पाणी वाचण्याची संकल्पना आहे.
****
धाराशिव इथं अखिल भारतीय अधिवक्ता परिषदेच्या वतीनं काल भारतीय संविधान अमृत महोत्सवी वर्षानिमित्त व्याख्यान घेण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या जलभूमी व्यवस्थापन संस्थेचे माजी प्रमुख डॉक्टर रमेश पांडव यांचं यावेळी भारतीय संविधान आणि सामाजिक न्याय या विषयावर भाषय झालं. सामाजिक न्याय - संविधानाच्या प्रकाशात बघण्याची गरज, त्यांनी व्यक्त केली.
****
अंबाजोगाई इथल्या नारायणदादा काळदाते स्मृती प्रतिष्ठानचा नारायणदादा काळदाते स्मृती सन्मती पुरस्कार प्राध्यापक डॉ. तसनीम पटेल यांना आज अंबाजोगाई इथं प्रदान केला जाणार आहे. २१ हजार रुपये, सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी सुरु करण्यात आलेल्या योजनादूत उपक्रमासाठी परभणी जिल्ह्यातून एकूण ९७२ योजनादूतांची निवड होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर १३ सप्टेंबर पर्यंत नोंदणी करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे. या योजनादूतांना दरमहा १० हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे.
****
हवामान
येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी, तर विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली.
****
0 notes
6nikhilum6 · 12 days
Text
Pune : आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमण काढून घ्या
Pune : आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमण काढून घ्या – MPC…
0 notes
rahulmarathiblog · 2 years
Text
' संगम ' वेबसाईटवर सुरुवात अन आळंदी कात्रज स्वारगेट अन शिरवळला शेवट
‘ संगम ‘ वेबसाईटवर सुरुवात अन आळंदी कात्रज स्वारगेट अन शिरवळला शेवट
महाराष्ट्रात वेगवेगळ्या घटना समोर येत असताना अशीच एक काहीशी वेगळी घटना पुणे जिल्ह्यातील पिंपरी येथे समोर आलेली आहे. ऑनलाइन मैत्री झाल्यानंतर दोन वेळा खोटे लग्न करून एका व्यक्तीने तरुणीवर बलात्कार केला. सदर प्रकार हा ऑगस्ट 2021 पासून तर मार्च २०२२ या कालावधीत आळंदी कात्रज, स्वारगेट शिरवळ या ठिकाणी घडला असल्याचे फिर्यादी तरुणीचे म्हणणे आहे. उपलब्ध माहितीनुसार, पीडित तरुणीने आळंदी पोलीस ठाण्यात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
punerichalval · 4 months
Text
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरच घाणीचे साम्राज्य; प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष
लोणी काळभोर प्रतिनिधी लोणी काळभोर : पुणे-सासवड महामार्गावरील आळंदी ते पंढरपूर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावरील दिवे घाटात ठिकठिकाणी कचरा टाकला जात आहे. या घाटातील डाव्या बाजूला कचरा टाकल्याने या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. असे असताना प्रशासनाचे मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. दिवेघाटात पसरलेल्या या…
Tumblr media
View On WordPress
0 notes
jagdamb · 3 years
Photo
Tumblr media
#पाऊले_चालती_पंढरीची_वाट !! #पांडुरंग_हरी . . Jagdamb Creative Hub Pvt.Ltd. डिजिटल युगात, नो टिव टिव, ओन्ली CREATIVE !! . #विठ्ठल #माऊली #पंढरपूर #विठुराया #विठुमाऊली #पांडुरंग #सावळ्या_विठ्ठला #विठाई #तुकाराम_महाराज #ज्ञानेश्वर_महाराज #नामदेव_महाराज #मुक्ताबाई #जनाबाई #आळंदी #देहू #त्र्यंबकेश्वर #जळगाव #jagdamb #jagdambcreative #jagdambcreativehubpvtltd #lovekeshrameshkachi #pune #digitalmarathi #marathicalligraphy #hinduvyavasayik #marathivyavsayik #vyavasaywala (at Jagdamb Creative Hub Pvt. Ltd.) https://www.instagram.com/p/CRWwPEZr-lY/?utm_medium=tumblr
0 notes