#आरती सिंग
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 07 September 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०७ सप्टेंबर २०२४ सायंकाळी ६.१०
****
गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाला राज्यभरात प्रारंभ-गणेश स्थापनेसाठी सर्वत्र भाविकांची लगबग
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना तत्काळ पदमुक्त करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
पंजाबातल्या तिहेरी हत्याकांड प्रकारातल्या सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं अटक
आणि
पॅरिस पॅरालिम्पिकच्या समारोप सोहळ्यात तीरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल भारताचे ध्वजवाहक
****
गणेशोत्सवाच्या चैतन्यमय पर्वाला आजपासून प्रारंभ झाला. लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी राज्यभर सर्वत्र जय्यत तयारी सुरू असून धार्मिक रितीरिवाज, परंपरेला जपत मंगलमूर्तीचा उत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा करण्यासाठी गणेशभक्तांची लगबग दिसून येत आहे. राज्यात ठिकठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना झाली असून गणेश मंदिरांवरही रोषणाई करण्यात आली आहे. दहा दिवस चालणाऱ्या या उत्सव काळात राज्यात सुमारे ११ हजार कोटी रुपयांहून अधिक उलाढाल होण्याची शक्यता व्यापारी संघटनांनी व्यक्त केली आहे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गणेशोत्सवानिमित्त आज देशवासियांना शुभेच्छा दिल्या. हा उत्सव देशाच्या अनेक भागांमध्ये सामूहिक आनंद आणि सामाजिक उर्जेचं एक सुंदर उदाहरण असल्याचं राष्ट्रपती मुर्मू यांनी म्हटलं आहे. “भारतीय परंपरेत गणेशाला शुभ आणि विघ्नहर्ता मानलं जातं. संकटांपासून सर्वांचं रक्षण व्हावं आणि समृद्धी यावी” यासाठी आपण प्रार्थना करत असल्याचं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे.
****
मुंबईत राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते राजभवन इथे गणरायाची प्रतिष्ठापना झाली.
गणरायांचं कृपाछत्र सर्व महाराष्ट्रातल्या जनतेवर राहावं आणि सर्वांचं जीवन सुखी, समृद्ध व्हावं अशी प्रार्थना गणरायांकडे केली असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. वर्षा या शासकीय निवासस्थानी आज श्री गणेशाची प्रतिष्ठापना केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकार भक्कमपणे उभे राहील, राज्यातल्या सर्व नागरिकांसाठी सरकारनं दोन वर्षात विकासाचं पर्व आणलं असून शेतकरी आणि ज्येष्ठांच्या जीवनात बदल होत आहे याचं समाधान असल्याचं ते म्हणाले.
****
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गणेश चतुर्थीला मुंबईच्या लालबागचा राजा, गणेश गल्लीतला मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणपतींचं दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे आणि माजी मंत्री आणि आमदार आदित्य ठाकरे उपस्थित होते.
****
पुण्यात कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी गणपती, गुरुजी तालीम गणपती, तुळशीबाग गणपती आणि केसरीवाडा गणपती या पाच मानाच्या गणपतींचं ढोलताशाच्या गजरात आगमन झालं.
कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यांनी लेझीम आणि ढोलपथकासह बाप्पाच्या मूर्ती घरी आणल्या. रत्नागिरी जिल्ह्यात यंदा एक लाख ६६ हजार ८६७ घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना होत असून १२२ सार्वजनिक गणपती विराजमान होत आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर इथं गणरायाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं. सकाळच्या सुमारास घरोघरी गणपती स्थापना झाल्यावर दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींची स्थापना करण्यात आली. शहराचं ग्रामदैवत असलेल्या संस्थान गणपतीची मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. या प्रसंगी खासदार संदिपान भुमरे, माजी मंत्री डॉ भागवत कराड, गृहनिर्माण, तसंच इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक हजार ६६० गणेश मंडळाची नोंदणी झाली असून ५४४ गावांमध्ये एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला जात आहे.
दरम्यान, उमेद स्वयं सहाय्यता समूहातील महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी या उद्देशाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने गणेश मूर्तीं विक्री उपक्रम राबवण्यात आला, गणेश भक्तांनी या उपक्रमाला उदंड प्रतिसाद दिला. या माध्यमातून सुमारे एक कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं वृत्त आहे.
****
जालना शहरासह जिल्ह्यात सकाळपासूनच श्री गणेशाच्या आगमनाचा उत्साह दिसून आला. शहरातल्या वीर सावरकर चौक, फुले मार्केट, गांधी चमन चौक, नूतन वसाहत या भागात भाविकांची गणेश मूर्तीसह पूजेचं साहित्य खरेदीसाठी गर्दी दिसून आली. दरम्यान, यावर्षी जालना गणेश फेस्टिवलच्या वतीनं आठ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. गणेशोत्सवानिमित्त शहरात पोलीस प्रशासनाच्यावतीनं चोख बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
****
गणेशोत्सव ते दिवाळी या कालावधीत नागरिकांनी मिठाई, प्रसाद आणि उघड्यावरील अन्नपदार्थ खरेदी करताना योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन हिंगोली जिल्हा अन्न आणि औषध प्रशासनानं केलं आहे. प्रसाद स्वतः तयार करून भाविकांना वितरीत करणाऱ्या गणेश मंडळांनी अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याअंतर्गत नोंदणी करावी, तसंच जनतेनं अन्न पदार्थाची खरेदी करताना खबरदारी घ्यावी असंही जिल्हा अन्न प्रशासनानं आवाहन केलं आहे.
****
पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार शहरात महापालिकेकडून दरवर्षी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा महापालिकेकडून ५८ ठिकाणी १०५ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. याशिवाय २ बंद दगडखाणींच्या ठिकाणी विसर्जनाची सोय करण्यात आली आहे. तसच यंदा विसर्जनासाठी स्वयंचलित कन्वेअर बेल्टची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
****
जम्मू काश्मिरच्या विधानसभा निवडणुकीनंतर जम्मू काश्मिरला राज्याचा दर्जा बहाल करण्यात येईल, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. जम्मू इथं एका प्रचार सभेत ते बोलत होते. कलम ३७० हटवल्यानंतर होत असलेल्या या विधानसभा निवडणुका ऐतिहासिक असल्याचं शहा यांनी नमूद केलं.
****
वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पूजा खेडकर यांना तत्काळ प्रभावाने पदमुक्त करण्यात आलं आहे. खेडकर यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे प्रशासकीय सेवेत नियुक्ती मिळवल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यावर केंद्र सरकारने त्यांना प्रशासकीय कायदा १९५४ नुसार कारवाई करत प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकारी पदावरून तत्काळ पदमुक्त केल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
पंजाबात फिरोजपूर इथं एकाच कुटुंबातल्या तीन सदस्यांची हत्या करणाऱ्या सात जणांना छत्रपती संभाजीनगर इथं पोलिसांनी अटक केली. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावर पोलिसांनी सापळा रचून या सर्वांना अटक केल्याची मा��िती पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली. या सर्वांना फिरोजपूर पोलिसांकडे हस्तांतरित करण्यात येणार असल्याचं, पवार यांनी सांगितलं.
****
अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील नऊजणांना भिवंडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून साडे ५०० किलोग्रॅमपेक्षा अधिक वजनाचा गांजा, रोख रक्कम, मोबाईल फोन, टेम्पो असा सुमारे पावणे ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्वांवर भिवंडीतल्या कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
****
धुळे शहराजवळच्या मुंबई-आग्रा महामार्गावर पोलिसांनी तिघांकडून विदेशी बनावटीचं पिस्तुल आणि ४ जिवंत काडतूसं हस्तगत केली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
****
नांदेड शहरातल्या वजीराबाद पोलीस ठाणे हद्दीत अफिम बाळगणाऱ्या एकाला पोलिसांनी आज ताब्यात घेतलं. त्याच्याकडून २७ ग्रॅम अफिम जप्त करण्यात आलं. सुखविंदरसिंघ सुरेंद्रसिंघ कालो असं या युवकाचं नाव आहे. अफिम आणि एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण सहा हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
****
गोंदिया जिल्ह्यातल्या पोगझरा गावात नाल्याला आलेल्या पुरात एकाच कुटूंबातील दोन चिमुकल्या भावांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तीन आणि दीड वर्षीय चिमुकल्यांचा समावेश आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या वणी-पिंपळगाव रस्त्यावर आज चारचाकी आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात तिघा दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. मृतांमधे दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. चारचाकीने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
पॅरीस पॅरालिम्पिक स्पर्धेचा उद्या समारोप होत आहे. या स्पर्धेत भारतानं आतापर्यंत २७ पदकं जिंकली आहेत. यात ६ सुवर्ण, ९ रौप्य आणि १२ कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताच्या पॅरालिम्पिकच्या इतिहासातली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. सुवर्ण पदक विजेते तिरंदाज हरविंदर सिंग आणि धावपटू प्रीती पाल यांनी या एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकली आहेत. उद्याच्या समारोप समारोहात हे दोघे भारतीय पथकातले ध्वजवाहक असणार आहेत. दरम्यान, या स्पर्धेत धावपटू सिमरन महिलांच्या दोनशे मीटर टी १२ अंतिम फेरीत, दिलिप गावित पुरुषांच्या चारशे मीटर टी ४७ अंतिम फेरीत आणि नवदीप पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहेत.
****
छत्रपती संभाजीनगर शहरात काही काळ पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे बाजारात खरेदी- विक्री करणाऱ्यांची काही काळ तारांबळ उडाली होती. जालना इथंही पाऊस झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं.
****
0 notes
loksutra · 2 years ago
Text
कृष्णा अभिषेक आणि आरती सिंग त्यांच्या मामा गोविंदाबद्दल बोलतात
कृष्णा अभिषेक आणि आरती सिंग त्यांच्या मामा गोविंदाबद्दल बोलतात
विनोदी कलाकार कृष्णा अभिषेक आपल्या टॅलेंटच्या जोरावर त्यांनी लोकांमध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्याने सर्व कॉमेडी रिअॅलिटी शो आणि द कपिल शर्मामध्ये लोकांना खूप हसवले आहे. तिथे त्याची बहीण आरती सिंग ती एक टीव्ही अभिनेत्री आहे आणि बिग बॉसमध्येही दिसली आहे. कृष्णा अभिषेक आणि आरती सिंग यांचे स्वतःचे मामा आणि अभिनेता गोविंदा त्यांचे एकमेकांशी फारसे चांगले संबंध राहिले नाहीत पण दोघांनीही…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
राणा दाम्पत्याने अमरावती पोलिस आयुक्तांवर गंभीर आरोप केले आहेत आरती सिंह म्हणाल्या, "कायदेशीर कारवाई..." | नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केलेल्या आरोपांवर अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राणा दाम्पत्याने अमरावती पोलिस आयुक्तांवर गंभीर आरोप केले आहेत आरती सिंह म्हणाल्या, “कायदेशीर कारवाई…” | नवनीत राणा आणि रवी राणा यांनी केलेल्या आरोपांवर अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी अमरावती पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप केले. यानंतर आता अमरावती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “या प्रकरणात माजी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असोसिएशनकडून निवेदन देत तक्रार करण्यात आली आहे. यावर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढील कायदेशीर कारवाई करू,” अशी माहिती सिंग यांनी दिली. त्या मंगळवारी (१३ सप्टेंबर) अमरावतीत माध्यमांशी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
“उमेश कोल्हे हत्या प्रकरण दाबण्यामागे अमरावती पोलीस आयुक्तांचा सहभाग”; नवनीत राणांचा गंभीर आरोप
“उमेश कोल्हे हत्या प्रकरण दाबण्यामागे अमरावती पोलीस आयुक्तांचा सहभाग”; नवनीत राणांचा गंभीर आरोप
“उमेश कोल्हे हत्या प्रकरण दाबण्यामागे अमरावती पोलीस आयुक्तांचा सहभाग”; नवनीत राणांचा गंभीर आरोप पोलीस आयुक्तांनी पोलीस अधिकारी आणि काही पत्रकारांना धमक्याही दिल्या असेही नवनीत राणा म्हणाल्या. उमेश कोल्हे हत्या प्रकरण दाबण्यासाठी अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी पोलीस अधिकारी आणि पत्रकारांवर दबाव आणल्याचा धक्कादायक आरोप अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. या प्रकरणी आम्ही…
View On WordPress
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Text
ठाणे वर्षा मॅरेथॉन:विजेता धावपटू ठरला अपात्र
ठाणे वर्षा मॅरेथॉन:विजेता धावपटू ठरला अपात्र
ठाणे महानगरपालिका व ठाणे जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३० व्या ‘ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन’ मध्ये २१ कि.मी. स्पर्धेत झारखंडच्या पिंटू यादव यांने प्रथम क्रमांक पटकावला. मात्र, स्पर्धा संपल्यानंतर त्याला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे करण सिंग याला विजयी घोषीत करण्यात आले.
तर, महिलामध्ये आरती पाटील ही प्रथम आली आहे. वर्षा मॅरेथॉन’ स्पर्धेमध्ये ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यात…
View On WordPress
0 notes
bollywoodpapa · 5 years ago
Text
भारतीय क्रिकेटर की शादी की कुछ अनदेखी तस्वीरे जो आज से पहले अपने नहीं देखी होगी
New Post has been published on https://www.bollywoodpapa.com/famous-indian-crickters-and-their-beautiful-wives/
भारतीय क्रिकेटर की शादी की कुछ अनदेखी तस्वीरे जो आज से पहले अपने नहीं देखी होगी
दोस्तों भारतीय क्रिकेट टीम में कई बड़े बड़े धुरंधर बल्लेबाज़ और गेंदबाज़ है जिन्होंने अपने खेल से लोगो को अपना दीवाना बना लिया है आज इन खिलाड़ियों के चाहने वाले देश विदेश हर जगह लाखो की तादाद में मौजूद है। इन खिलाडियों की लड़किया भी दीवानी है। इस लिए आज आपको इन खिलाडियों की खुबसूरत पत्नियो के बारे में बता रहे है।
विराट कोहली की पत्नी अनुष्का शर्मा
राहुल द्रविड़ की पत्नी विजता पेंढारकर
पार्थिव पटेल की पत्नी अवनी झवेरी
सौरभा गंगोली की पत्नी दोना रॉय 
वी वी एस लक्षमण की पत्नी गी आर सैलजा
रोबिन उथप्पा की पत्नी शीतल गौतम
हरभजन सिंह की पत्नी गीता बसरा
गौतम गंभीर की पत्नी नताशा जैन
वीरेंद्र सहवाग की पत्नी आरती अहलावत
ज़हीर खान की पत्नी सागरिका घटगे
उमेश यादव की पत्नी तान्या वाधवा
महेंद्र सिंह धोनी की पत्नी साक्षी धोनी
 युवराज सिंग पत्नी हेज़ल कीच
सुरेश रैना की पत्नी प्रियंका चौधरी
रोहित शर्मा की पत्नी रितिका सजदेह
ईशांत शर्मा की पत्नी प्रतिमा सिंह 
अजिंक्य रहाणे की पत्नी राधिका धोपावकर
भुवनेश्वर कुमार की पत्नी नुपुर नागर
मोहमद शमी की पत्नी हसीन जहा
सचिन तेंदुलकर की पत्नी अंजलि तेंदुलकर
रविंद्र जडेजा की पत्नी रीवा सोलंकी
मनोज तिवारी की पत्नी सुष्मिता रॉय
विनय कुमार की पत्नी ऋचा सिंह 
यूसुफ पठान की पत्नी आफरीन खान
आशीष नेहरा की शादी रेशमा ओवल नेहरा 
0 notes
pukhrajmewara · 6 years ago
Photo
Tumblr media
भाग तीन,, पांचवी कथा इस प्रकार है, रंतिदेव नामक एक धर्मात्मा राजा थे,रंतिदेव धर्म के कार्य में सदैव आगे रहते थे उन्होंने अपने जीवन काल में कोई भी पाप नहीं किया था जब उनकी मृत्यु का समय निकट आया तो उनके समक्ष यमदूत आ खड़े हुए. यमदूत को सामने देख राजा रंतिदेव अचंभित हो गए और उन्होंने धर्मराज से कहा कि मैंने तो जीवन में कोई भी पाप नहीं किया है फिर आप मुझे लेने क्यों आए हैं जब भी धर्मराज हम किसी को लेने आते हैं तो इसका मतलब उस व्यक्ति को नर्क में जाना पड़ता है , राजा रंतिदेव ने कहा कि आपके यहां आने का मतलब मुझे नर्क में जाना होगा आप बताएं कि मेरे किस अपराध के कारण मुझे यह सजा मिल रही है,यमराज ने राजा रंतिदेव से कहा कि हे राजन एक बार आपके द्वार से एक ब्राह्मण भूखा लौट गया था यह उसी कर्म का फल है इसके बाद राजा ने यमदूत से 1 वर्ष का समय मांगा धर्मराज ने राजा रंतिदेव को 1 वर्ष का समय दिया राजा रंतिदेव अपनी समस्या को लेकर ऋषियों के पास पहुंचे और उन्होंने अपनी सारी व्यथा बताई और अपनी समस्या का समाधान पूछा तब ऋषि ने उन्हें बताया कि कार्तिक मास की कृष्ण पक्ष की चतुर्दशी तिथि के दिन आप व्रत करें और ब्राह्मणों को भोजन करवाकर उनके प्रति अपने द्वारा हुए अनचाहे अपराधों के लिए क्षमा याचना करें ऋषियों द्वारा बताए गए उपाय को राजा ने अक्षरशः पालन किया. इस प्रकार राजा अपने पाप से मुक्त हुए और उन्हें ��र्क की जगह विष्णु लोक में स्थान प्राप्त हुआ ,इसलिए नर्क से मुक्ति हेतु कार्तिक चतुर्दशी या नरक चतुर्दशी के दिन लोग व्रत करते हैं, छठी कथा इस प्रकार है ,हिरण्यगर्भ नामक राजा ने अपना राज पाठ छोड़कर साधना करने का निश्चय किया और कई वर्षों तक तपस्या की ,परंतु तपस्या के दौरान उनके शरीर पर कीड़े लग गए और उनका शरीर सड़ गया था हिरण्यगर्भ इस बात से बहुत दुखी हुए और उन्होंने अपनी इस व्यथा को देव ऋषि नारद के समक्ष व्यक्त किया तब देव ऋषि नारद ने उनसे कहा कि आपने साधना के दौरान शरीर की स्थिति सही नहीं रखी थी इसलिए यह आपके ही कर्मों का फल है. तब हिरण्यगर्भ ने इस समस्या का समाधान पूछा तो देव ऋषि नारद ने उनसे कहा कि कार्तिक मास की कृष्ण पक्ष में त्रयोदशी तिथि के दिन अपने शरीर पर उबटन का लेप लगाकर सूर्योदय के पूर्व स्नान करना. स्नान के पश्चात भगवान सूर्य को अर्ध्य देकर सौंदर्य के देवता श्री कृष्ण की पूजा कर उनके आरती करना. आपको पुनः आपका सौंदर्य प्राप्त हो जाएगा, हिरण्यगभ ने ऐसा ही किया और अपने शरीर को स्वस्थ किया. इसी कारण इस दिन को रूप चतुर्दशी भी कहा जाता है, सातवी कथा इस प्रकार है, (at माँ नाहर सिंग माता जी मंदिर) https://www.instagram.com/p/Bp0hg9ighV8/?utm_source=ig_tumblr_share&igshid=qfep8eg8h4pq
0 notes
vartha24-blog · 6 years ago
Photo
Tumblr media
तीन स्थानों से निकाली गई एक हज़ार महिलाओं ने मतदाता जागरूकता रैली… दुर्ग कलेक्टर उमेश अग्रवाल के निर्देश पर राष्ट्रीय शहरी आजीविका  मिशन एव महिला बाल विकास विभाग के द्वारा संयुक्त मतदाता जागरूकता रैली निकाली गई इस दौरान आयुक्त लोकेश्वर साहू डीपीओ अशोक पाण्डेय, महिला बाल विकास अधिकारी नीरू सिंग,सतीश मिश्रा,चंद्रकांत शर्मा,आरती वेश, अनिता सिंह,विद्या ताम्रकार सहित लगभग एक हज़ार महिलाओं ने रैली ग्रीन चौक,मुक्त नगर पदमनाभपुर एव चंडी मंदिर के पास से निकालकर मानस भवन में समापन किया गया इस दौरान मतदाता जागरूता पर शपथ भी कराया गया ।
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर, दिनांक: 21.08.2024 रोजीचे सकाळी : 07.10 वाजताचे मराठी बातमीपत्र
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 21 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २१ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
ठळक बातम्या 
, खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार
आणि
, पुढील ��ोन दिवसांसाठी हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी
सविस्तर बातम्या
देशभरातले डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली आहे. या शीघ्र कृती दलात १४ सदस्यांचा समावेश असेल. कोलकात्यातल्या महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं स्वत: दखल घेत, काल सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय पीठासमोर सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने सदर कृती दलाला तीन आठवड्यात हंगामी अहवाल आणि दोन महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
पीडित तरुणीचं नाव आणि छ��याचित्र सार्वजनिक झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त करत, या प्रकरणी प्रथम माहिती अहवाल-एफआयआर उशीरानं का दाखल करण्यात आला, असा प्रश्नही उपस्थित केलाआहे. या प्रकरणात सीबीआयनं केलेल्या तपासाचा अहवाल २२ ऑगस्ट पर्यंत सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. तपासात राहिलेल्या त्रुटीबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. हत्येला आत्महत्या ठरवण्याचा प्रयत्न केला गेला, एफआयआरमध्ये हत्येचा उल्लेख केला गेला नाही, याबद्दल न्यायालयाने वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन आणि पोलिसांना जाब विचारला आहे. याबाबतची पुढील सुनावणी उद्या २२ ऑगस्टला होणार आहे.
****
ठाणे जिल्ह्यात बदलापूर मधल्या आदर्श महाविद्यालयात दोन विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संतप्त पालकांनी काल बदलापूर रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी सौम्यबळाचा वापर केला, त्यावेळी आंदोलकांनी दगडफेक केल्यानं आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पालकांनी आदर्श महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळही आंदोलन केलं.
दरम्यान, या प्रकरणी संशयित आरोपीस ताब्यात घेण्यात आलं आहे. शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं असून, मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आलं आहे. तसंच संस्थाचालकांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच याप्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षकांची देखील तत्काळ बदली करण्यात आली आहे.
****
दरम्यान, या प्रकरणी आरोपीला कडक शासन करण्यात येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. अशा प्रकरणात प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असं ते म्हणाले.
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार असून, यात विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगितलं. या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक एसआयटी गठित करण्याचे फडणवीस यांनी आदेश दिले. ते म्हणाले... 
आम्ही तात्काळ सिनियर आय पी एस ऑफिसर आरती सिंह, ज्या आय जी लेवलच्या अधिकारी आहेत, त्यांना नियुक्त क���लेलं आहे. महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या अंतर्गत ही चौकशी व्हावी, अशा प्रकारची भावना याच्या पाठीशी आहे. त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत जी काही कार्यवाही तातडीने केली पाहिजे, ती कार्यवाही देखील केली जाते आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये अशा नराधमांना तात्काळ शिक्षा व्हावी, अशा प्रकारचा प्रयत्न हा राज्य सरकारचा आणि पोलीस विभागाचा असेल.
****
राज्यातल्या सर्व शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन करणं बंधनकारक करण्यात येत असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं आहे. बदलापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर, मंत्रालयात घेण्यात आलेल्या शिक्षण विभागाच्या बैठकीनंतर ते बोलत होते. शाळांमध्ये या समित्या स्थापन झाल्या नसतील तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. मुलींच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी ई बॉक्ससोबतच शाळेत तक्रार पेटीही बंधनकारक केली जाणार असल्याचं केसरकर यांनी सांगितलं.
****
राज्यात शक्ती कायदा आणण्यासाठी आमच्या सरकारच्या काळात मसुदा तयार केल��, तो या सरकारनं मंजूर करून शक्ती कायदा तयार करावा, असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत माध्यमांशी बोलत होते. तर बदलापूर घटनेतल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
****
केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेली विविध पदांवरची थेट भरती, लॅटरल एन्ट्रीची जाहीरात मागे घेतली आहे. ही जाहीरात रद्द करावी अशी सूचना, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष प्रीती सुदन यांना केली होती. २०१४ पूर्वी अनेक पदांवर अशाच प्रकारे भरती करण्यात आली होती. मात्र, अशाप्रकारच्यार पदभरतीत आरक्षणाची तरतूद नाही, त्यामुळे लोकसेवा आयोगानं ही जाहीरात रद्द करावी, असं जितेंद्र सिंह यांनी म्हटलं होतं.
****
राज्यसभेच्या पोटनिवडणूकीसाठी भारतीय जनता पक्षानं राज्य निहाय उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून धैर्यशील पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी याबाबतचं पत्रक काल जारी केलं.
****
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरुन देत आहोत.
****
बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ इथं आजपासून पाच दिवसीय राज्यस्तरीय कृ��ी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन, कृषी विद्यापीठ दालन, परिसंवाद, चर्चासत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री केंद्र, आधुनिक कृषी अवजारं प्रदर्शन, स्वंयसहाय्यता महिला बचत गट निर्मित वस्तू पदार्थांची विक्री तसंच प्रदर्शन असे विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान प्रदर्शनाला उपस्थित राहणार आहेत. 
****
हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काल हिंगोली इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावा, पीक कर्ज वाटप करावं, सोयाबीनला सात हजार तर कापसाला पंधरा हजार रुपये हमीभाव द्यावा यासह इतर मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं.
****
धाराशिव तालुक्यात भिकारसारोळा या गावात आढळलेला रुग्ण हा पोलिओचा रुग्ण नसल्याचं, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हरिदास यांनी स्पष्ट केलं आहे. चालू वर्षी जुलै अखेरपर्यंत असे १३ रुग्ण आढळून आले, परंतु तपासणीअंती त्यापैकी कोणीही पोलिओबाधित आढळलेलं नाही, त्यामुळे नागरिकांनी या रुग्णाबाबत संभ्रम बाळगण्याची आवश्यकता नाही, असं डॉक्टर हरिदास यांनी सांगितलं. पोलिओ संशयित शोधणं हा नियमित सर्वेक्षणाचा भाग असल्यानं नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असं आवाहन सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत करण्यात आलं आहे.
****
मराठवाड्यात गेल्या दोन दिवसात सात जिल्ह्यातल्या २२ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. आतापर्यंत विभागात ७३ पूर्णांक पाच मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्यात काल चांगला पाऊस झाला. दुपारी काही वेळ मुसळधार पाऊस झाल्यानंतर रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. जिल्ह्यातल्या तुर्काबाद, चिकलठाण्यासह जालना, बीड, धाराशिव, नांदेड जिल्ह्यातल्या अनेक भागात काल जोरदार पाऊस झाला.
दरम्यान, येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. याकाळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
****
परभणी जिल्ह्यात मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत काल पाथरी इथल्या महात्मा बसवेश्वर कनिष्ठ महाविद्यालय आणि संस्कार महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मतदार नोंदणी बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्यासह कुटुंबातल्या सदस्यांची नाव नोंदणी नसल्यास ती करुन घेण्याचं आवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी शैलेश लाहोटी यांनी केलं.
****
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्रोत्साहनपर लाभासाठी लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करण्याचं आवाहन, सहकारी संस्थेच्या जिल्हा उपनिबंधकांनी केलं आहे. या योजनेअंतर्गत जे शेतकरी लाभासाठी पात्र ठरले आहेत त्यांना विशिष्ट क्रमांक देण्यात आलेला आहे.
****
ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं, या प्रमुख मागणीसाठी जालना इथल्या गांधीचमन चौकात आमरण उपोषणाला बसलेले दीपक रणनवरे यांची आज माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भेट घेतली. समाजाच्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करू, असं आश्वासन दानवे यांनी यावेळी दिलं. 
****
0 notes
airnews-arngbad · 3 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 20 August 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २० ऑगस्ट २०२४ सायंकाळी ६.१०
****
देशभरातले डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून राष्ट्रीय कृती दलाची स्थापना
बदलापूर इथं आदर्श महाविद्यालयात दोन विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराचा प्रकार उघड- मुख्याध्यापिका निलंबित तर दोन सेविका बडतर्फ-प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हिंगोली इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं आंदोलन
आणि
परळी वैजनाथ इथं उद्यापासून पाचदिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन
****
देशभरातले डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रीय कृती दलाची स्थापना केली आहे. या शीघ्र कृती दलात १४ सदस्यांचा समावेश असणार आहे. कोलकात्यातल्या महिला डॉक्टरवर बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयानं स्वत: दखल घेत, आज त्यावर सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय पीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठाने सदर कृती दलाला तीन आठवड्यात हंगामी अहवाल आणि दोन महिन्यात अंतिम अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
पीडित तरुणीचं नाव आणि छायाचित्र सार्वजनिक झाल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली. या प्रकरणी प्रथम माहिती अहवाल-एफआयआर उशीरानं का दाखल करण्यात आला, असा प्रश्नही न्यायालयानं उपस्थित केला. या प्रकरणात सीबीआयनं केलेल्या तपासाचा अहवाल २२ ऑगस्ट पर्यंत सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. तपासात राहिलेल्या त्रुटीबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. हत्येला आत्महत्या ठरवण्याचा प्रयत्न केला गेला, एफआयआरमध्ये हत्येचा उल्लेख केला गेला नाही, याबद्दल न्यायालयाने वैद्यकीय महाविद्यालय प्रशासन आणि पोलिसांना जाब विचारला आहे. याबाबतची पुढील सुनावणी येत्या २२ ऑगस्टला होणार आहे.
****
दरम्यान, सर्व केंद्र सरकारी रुग्णालयांमध्ये सुरक्षा व्यवस्थेत २५ टक्क्यांनी वाढ करण्यास केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. या घटनेनंतर राज्यातल्या निवासी डॉक्टरांच्या बेमुदत संपाचा आज आठवा दिवस आहे. सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयं आणि रुग्णालयं ‘सुरक्षित झोन’ घोषित करावीत आणि केंद्रीय आरोग्य सेवा संरक्षण कायदा लागू करावा, या मागणीवर निवासी डॉक्टर ठाम आहेत. आरएमएल रुग्णालयाच्या निवासी डॉक्टर असोसिएशन, आरडीएने त्यांचा संप मागे घेतला आहे. इतर वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांच्या निवासी डॉक्टर संघटनेनेही संप मागे घेण्याची अपेक्षा आरडीएनं व्यक्त केली आहे.
****
ठाणे जिल्ह्यात बदलापूर मधील आदर्श महाविद्यालयात दोन विद्यार्थिनीच्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर संतप्त पालकांनी आज सकाळी बदलापूर रेल्वे स्थानकात सकाळी सुरु केलेलं रेल रोको आंदोलन अद्यापही सुरु आहे. या आंदोलना दरम्यान, पोलिसांनी सौम्यबळाचा वापर केला, त्यावेळी आंदोलकांनी दगडफेक केल्यानं आंदोलनाला हिंसक वळण लागलं. यापूर्वी पालकांनी आदर्श महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळही आंदोलन केलं.
दरम्यान, या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं असून मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांना सेवेतून कमी करण्यात आलं आहे. तसंच संस्थाचालकांविरुध्द कडक कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच याप्रकरणी संबंधित पोलीस निरीक्षकांची देखील तत्काळ बदली करण्यात आली आहे.
****
दरम्यान, या प्रकरणी आरोपीला कडक शासन करण्यात येईल, असं सांगत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याचे निर्देश दिले. अशा प्रकरणात प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. सखी शाळां��ध्ये सावित्री समित्या स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथक एसआयटी गठित करण्याचे आदेश दिले आहेत. तसंच सदर खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी प्रस्ताव आजच दाखल करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले आहेत.
****
राज्यातील सर्व शाळांमध्ये विशाखा समिती स्थापन करणं बंधनकारक करण्याचे आदेश आजच जारी करण्यात येणार असल्याचं, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं. बदलापूर इथली अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर, मंत्रालयात शिक्षण विभागाची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्री केसरकर यांनी ही माहिती दिली. शाळांमध्ये सखी सावित्री समितीचे काम सुरू करण्याचे आदेश दिले होते. मात्र, शाळांमध्ये या समित्या स्थापन झाल्या नसतील तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल तसंच मुलींच्या तक्रारींची दखल घेण्यासाठी ई बॉक्ससोबतच तक्रार पेटी बंधनकारक केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
राज्यात शक्ती कायदा आणण्यासाठी आमच्या सरकारच्या काळात मसुदा तयार केला, तो या सरकारनं मंजूर करून शक्ती कायदा तयार करावा असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत माध्यमांशी बोलत होते. या घटनेतील आरोपींना कडक शिक्षा व्हायला हवी तसंच हा खटला जलद चालवून तत्काळ आरोपीवर कारवाई झाली पाहिजे असं ते यावेळी म्हणाले.
****
बदलापूर घटनेतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. राज्यात महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. सरकार लाडक्या बहिणींच्या लेकींच्या सुरक्षेसाठी काय करत आहे असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशाव्दारे विचारला आहे.
****
केंद्रीय लोकसेवा आयोगाने जाहीर केलेली विविध पदांवरची समांतर भरतीची जाहिरात मागे घेतली आहे. ही जाहिरात रद्द करावी अशी सूचना, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष प्रीती सुदन यांना केली आहे. २०१४ पूर्वी अनेक पदांवर अशाच प्रकारे भरती करण्यात आली होती. मात्र, समांतर पदभरतीत आरक्षणाची तरतूद नाही. त्यामुळे लोकसेवा आयोगानं ही जाहिरात रद्द करावी, असं जितेंद्रसिंह यांनी म्हटलं होतं.
****
हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज हिंगोली इथं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात त्वरित जमा करावा, पीक कर्ज वाटप करावं, सोयाबीनला सात हजार तर कापसाला पंधरा हजार रुपये हमीभाव द्यावा या आणि इतर मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना या मागण्यांचे निवेदन देण्यात आलं.
****
बीड जिल्ह्यात परळी वैजनाथ इथं उद्यापासून पाचदिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवात कृषी प्रदर्शन, पशुप्रदर्शन, कृषी विद्यापीठ दालन, परिसंवाद, चर्चासत्र, उत्पादक ते ग्राहक थेट विक्री केंद्र, आधुनिक कृषी अवजारं प्रदर्शन, स्वंयसहाय्यता महिला बचत गट निर्मित वस्तू पदार्थांचे विक्री तसंच प्रदर्शन असे विविध प्रकारचे स्वतंत्र दालन आयोजित करण्यात आली आहेत. नागरिकांनी या प्रदर्शनाचा लाभ घेण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.
****
ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात यावं, या प्रमुख मागणीसाठी जालना इथल्या गांधीचमन चौकात आमरण उपोषणाला बसलेले दीपक रणनवरे यांची आज माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भेट घेतली. समाजाच्या मागण्यांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करू, असं आश्वासन दानवे यांनी रणनवरे यांना यावेळी दिलं. रणनवरे यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. ब्राह्मण समाजबांधव यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने आज मिशन कॉम्पिटेटिव्ह या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी कशा पध्दतीने करावी, या विषयावर या कार्यशाळेत भर देण्यात आला. या उपक्रमात शिक्षणाधिकारी, गटशिक्षणाधिकारी, मुख्याध्यापक तसंच शिक्षक यांनी सहभागी व्हावं, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा ��्रशासक विकास मीना यांनी केलं आहे
****
महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य समिती-एमआरएस या नव्या पक्षाची स्थापना करणार असल्याची घोषणा, भारत राष्ट्र समिती बीआरएसचे महाराष्ट्र प्रमुख शंकर धोंडगे यांनी केली आहे. बीआरएसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज नांदेड इथं घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत नांदेडमध्ये येत्या ५ सप्टेंबरला एमआरएसचे अधिवेशन घेण्याचा ठरावही घेण्यात आला.
****
धाराशिव तालुक्यात भिकारसारोळा या गावात आढळलेला रुग्ण हा पोलिओचा रुग्ण नसल्याचं, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर हरिदास यांनी स्पष्ट केलं आहे. चालू वर्षी जुलै अखेरपर्यंत असे १३ रुग्ण आढळून आले, परंतु तपासणीअंती त्यापैकी कोणीही पोलिओ संसर्गबाधित आढळलं नाही, त्यामुळे नागरिकांनी या रुग्णाबाबत संभ्रम बाळगण्याची आवश्यकता नाही, असं डॉक्टर हरिदास यांनी सांगितलं.
****
0 notes
loksutra · 3 years ago
Text
खतरों के खिलाडी 12 मध्ये बिग बॉस 15 च्या या तगड्या खेळाडूची एन्ट्री, आता शोमध्ये तीन-५-५ची धमाकेदार होणार आहे- मनोरंजन बातम्या
खतरों के खिलाडी 12 मध्ये बिग बॉस 15 च्या या तगड्या खेळाडूची एन्ट्री, आता शोमध्ये तीन-५-५ची धमाकेदार होणार आहे- मनोरंजन बातम्या
कलर्स टीव्हीवर वार्षिक अॅडव्हेंचर्स टीव्ही रिअॅलिटी शो प्रसारित होणार आहे खतरों के खिलाडी १२ सुरुवात लवकरच होणार आहे. यावेळी बॉलीवूड चित्रपट निर्माते धोक्याने भरले आहेत रोहित शेट्टी ‘खतरों के खिलाडी 12’ या शोचे निर्माते दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये आयोजित करणार आहेत. जिथे या गेम शोमध्ये भाग घेण्यासाठी अनेक तगडे स्पर्धक येणार आहेत. समोर येत असलेल्या रिपोर्ट्सनुसार, यावेळी शिवांगी जोशी, मुनव्वर…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
आरती सिंह बिग बॉस 13 ची स्पर्धक उर्वीसोबत ओटीटीवर पदार्पण करणार आहे
आरती सिंह बिग बॉस 13 ची स्पर्धक उर्वीसोबत ओटीटीवर पदार्पण करणार आहे
आरती सिंग OTT वर पदार्पण करणार आहे: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि ‘बिग बॉस 13’ ची प्रसिद्ध स्पर्धक आरती सिंह सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय दिसत आहे. आरती सिंग अलीकडेच तिच्या करिअरची सुरुवात करण्यासाठी काश्मीरला पोहोचली आणि सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. विशेष बाब म्हणजे आरती सिंह यांच्या हातात एक मोठा प्रोजेक्ट आहे. ती ��वकरच छोट्या पडद्यावरून ओटीटीच्या जगात पाऊल ठेवणार आहे. खुद्द आरती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
शिवांगी जोशीला सर्वाधिक मानधन दिले जाते, वाचा ताज्या टीव्ही बातम्या
शिवांगी जोशीला सर्वाधिक मानधन दिले जाते, वाचा ताज्या टीव्ही बातम्या
खतरों के खिलाडी 12 मधील शिवांगी जोशी: सलमान खानचा रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस’ संपल्यानंतर केवळ प्रेक्षक रोहित शेट्टी स्टंट आधारित शो खतरों के खिलाडी आतुरतेने वाट पाहतोय. आता समोर आलेल्या ताज्या बातम्यांनुसार, निर्मात्यांनी शो सुरू करण्याची तयारी पूर्ण केली आहे. या शोमध्ये सहभागी होणाऱ्या अनेक स्पर्धकांची नावेही समोर आली आहेत. या सर्व स्पर्धकांपैकी एक नाव म्हणजे टीव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
प्रश्न लव्ह जिहाद युवतीचा एकटा प्रवास पोलीस आयुक्त आरती सिंग यांची माहिती ysh 95
प्रश्न लव्ह जिहाद युवतीचा एकटा प्रवास पोलीस आयुक्त आरती सिंग यांची माहिती ysh 95
अमरावती : शहरातील हमालपुरा परिसरातून बेपत्‍ता झालेल्‍या १९ वर्षीय युवतीचा शोध लागला असून त्या युवतीला सातारा पोलिसांच्या ��दतीने रेल्वे गाडीतून ताब्यात घेण्‍यात आले आहे. सातारापर्यंतच्‍या प्रवासात ती एकटीच होती, रागाच्‍या भरात ती घरून निघून गेली होती, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिली आहे. हेही वाचा : Maharashtra News Live : महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीचा आढावा, जाणून घ्या एकाच…
Tumblr media
View On WordPress
0 notes
marathinewslive · 2 years ago
Text
नवनीत राणांच्या लव जिहादच्या आरोपांवर अमरावती पोलीस आयुक्तांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, "मुलगी स्वतः..." | Amravati Police Commissioner first reaction on allegations of Love Jihad
नवनीत राणांच्या लव जिहादच्या आरोपांवर अमरावती पोलीस आयुक्तांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मुलगी स्वतः…” | Amravati Police Commissioner first reaction on allegations of Love Jihad
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि भाजपाच्या अनेक नेत्यांनी कथित लव जिहादप्रकरणावरून अमरावती पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. नवनीत राणांनी तर फोन रेकॉर्डिंगवरून पोलीस उपायुक्तांना पोलीस ��्टेशनमध्ये जाऊन जाब विचारला. तसेच पोलीस आरोपींवर कारवाई करत नसल्याचा आरोप केला. यानंतर आता स्वतः अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी या प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच संबंधित मुलगी स्वतः घरातून निघून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 July 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २८ जुलै २०२२ दुपारी १.०० वा. ****
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासंदर्भातवापरलेल्या अपशब्दाबद्दल काँग्रेसनं माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी पक्षानं आज संसदेच्या दोन्ही सभागृहात केली. भाजप सदस्यांच्या घोषणाबाजीमुळे लोकसभेचं कामकाज दुपारी चार वाजेपर्यंत, तर राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेस पक्षानं माफी मागावी, अशी मागणी वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी यांनी केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा या वक्तव्याला पाठिंबा असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्याला वेगळं वळण दिलं जात असल्याचं सांगून, काँग्रेस पक्ष सदस्यांनी मात्र यावर आक्षेप घेत इतर विरोधी पक्ष सदस्यांसोबत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सदनाचं कामकाज दोन वेळा स्थगित करावं लागलं.
राज्यसभेत कामकाजादरम्यान गदारोळ केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे सुशील गुप्ता, संदीप पाठक आणि अपक्ष खासदार अजित कुमार भुयां यांना या आठवड्यातल्या उर्वरित दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.
दरम्यान, संसदेबाहेरही भाजप नेत्यांनी हातात फलक झळकावर अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद इथं भद्रा मारोती आणि वेरुळ इथल्या घृष्णेश्वर मंदीरात श्रावण महिन्यात होणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे, वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून ते मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत, दौलताबाद टी पाँईट पासून ते वेरुळ पर्यंत, आणि फुलंब्री पासून ते खुलताबाद पर्यंत, जड वाहतूक बंद असेल. सर्व प्रकारच्या जड वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन, प्रशासनानं केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीसाठी आरक्षण सोडत आज काढण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या ७० गटांचा, तर पंचायत समितीच्या १४० गणांचा यात समावेश आहे. उद्या आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसंच आरक्षणाबाबात जिल्हाधिकारी, संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती आणि सूचना सादर करण्याचा कालावधी उद्यापासून दोन ऑगस्ट पर्यंत आहे.
****
औरंगाबाद इथल्या ��हात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठातल्या महागामी गुरुकुलात संगीतशास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी नुकतंच एकल संगीत सादरीकरण केलं. डॉ. अनिल ब्योहार, डॉ. आरती राव यांच्या मार्गदर्शनात हे विद्यार्थी अध्ययन करत असल्याचं, महागामी कडून सांगण्यात आलं आहे.
****
नांदेड-तिरुपती आणि औरंगाबाद-तिरुपती दरम्यान विशेष गाडीच्या आठ फेऱ्या होणार आहेत. नांदेड - तिरुपती ही गाडी येत्या ३० जुलैला नांदेडहून तर परतीच्या प्रवासात ३१ जुलैला तिरुपतीहून सुटेल. औरंगाबाद तिरुपती दरम्यान विशेष गाडी सात, १४ आणि २१ ऑगस्टला औरंगाबादहून, तर आठ, १५ आणि २२ ऑगस्टला तिरुपतीहून सुटणार आहे.
****
रेल्वेच्या सोलापूर विभागातल्या दौंड-कुर्डूवाडी सेक्शनमधल्या भिगवण-वाशिंबे रेल्वे ��्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचं काम सुरू असल्यामुळे नांदेड ते पनवेल ही गाडी येत्या चार ते आठ ऑगस्ट या काळात नांदेडपासून कुर्डूवाडीपर्यंतच  धावणार आहे. कुर्डूवाडी ते पनवेल हा टप्पा सध्या रद्द करण्यात आला आहे. तर, पनवेल ते नांदेड ही गाडी येत्या पाच ते नऊ ऑगस्ट या काळात पनवेलऐवजी कुर्डूवाडीपासून नांदेडसाठी सुटणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३१ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ९०वा भाग असेल.
****
राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा आजपासून बर्मिंगहॅम इथं सुरु होत आहेत. या स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री साडेअकरा वाजता सुरू होईल. भारताच्या २१५ खेळाडूंचा संघ या स्पर्धेच्या १६ प्रकारांमध्ये सहभागी होणार आहे.  पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याच्यासह बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत.
४४ व्या बुध्दीबळ ऑलिंपियाड स्पर्धेला देखील आजपासून चेन्नई इथं सुरुवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे.
****
इटली इथं सुरू असलेल्या १७ वर्षाखालील ग्रीक-रोमन कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात भारताच्या सुरज वशिष्टनं सुवर्णपदक पटकावलं आहे. ३२ वर्षानंतर भारताला या स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं आहे.
****
हवामान
मराठवाडा आणि विदर्भात आज आणि उद्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. ३१ जुलैपर्यंत कोकणात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
0 notes