#अमेरिकेचा
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 18 September 2024
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १८ सप्टेंबर २०२४ दुपारी १.०० वा.
****
केंद्र सरकारने तिसऱ्या कार्यकाळातले शंभर दिवस पूर्ण केले आहेत. या काळात पायाभूत सुविधा, मध्यमवर्गीय, शेतकरी, महिला तसंच युवावर्गावर लक्ष केंद्रीत करत, सरकारने १५ लाख कोटी रुपयांच्या विविध योजना सुरू केल्या आहेत. दळणवळणाच्या सोयीसुविधा तसंच विकासाला चालना देण्यासाठी विविध योजनांना मंजुरी देण्यासोबतच देशभरात पायाभूत सोयीसुविधांमध्ये लक्षणीय वृद्धी दिसून आली आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केलेल्या ‘एक पेड मां के नाम‘ अभियानाअंतर्गत माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शहरी आणि ग्रामीण भागात आपल्या प्रादेशिक कार्यालयांच्या मदतीने आतापर्यंत जवळपास सात हजार झाडं लावली आहेत. कालपासून सुरु झालेल्या ‘स्वच्छता ही सेवा’ पंधरवाड्यामध्ये देशभरात वृक्षारोपण अभियान वेगाने सुरु असल्याचं मंत्रालयानं सांगितलं आहे. आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर इथल्या केंद्रातही या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण करण्यात आलं.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २१ ते २३ तारखेदरम्यान अमेरिकेचा दौरा करणार आहेत. २१ तारखेला ते विलमिंग्टनमध्ये आयोजित चौथ्या क्वाड परिषदेत सहभागी होतील. २३ तारखेला अमेरिकेच्या जनरल असेंब्ली भविष्य काळाबाबतच्या शिखर परिषदेत त्यांचं भाषण होणार आहे. या शिखरपरिषदेदरम्यान विविध जागतिक नेत्यांशी त्यांच्या द्विपक्षीय बैठका होणार आहेत.
****
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं मतदान आज सुरु आहे. या टप्प्यात सात जिल्ह्यांतील २४ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत २६ पूर्णांक ७२ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे. यापैकी आठ जागा जम्मू विभागातील तीन जिल्ह्यांमध्ये आहेत आणि १६ जागा काश्मीर खोऱ्यातील ४ जिल्ह्यांमध्ये आहेत. २३ लाखांहून अधिक मतदार ९० अपक्षांसह २१९ उमेदवारांचे भवितव्य ठरवणार आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रशासित प्रदेशात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यासाठी २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यासाठी १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत.
****
केंद्र सरकारनं खाद्यतेल संघटनांना सध्याचा आयात केलेला साठा शून्यावर येईपर्यंत आणि १२ पूर्णांक ५ टक्के मूळ सीमाशुल्क संपेपर्यंत किरकोळ किमती वाढवू नयेत असा सल्ला दिला आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव संजीव चोप्रा यांनी काल नवी दिल्ली इथं तेल उत्पादक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत या सूचना दिल्या.
****
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या अल्पवयीन बालकांसाठीच्या “वात्सल्य” या नव्या पेन्शन योजनेला आजपासून प्रारंभ होत आहे. नवी दिल्ली इथून होणाऱ्या राष्ट्रीय शुभारंभ सोहळ्यात नांदेड जिल्ह्याचा ऑनलाईन सहभाग राहणार आहे. नांदेड इथल्या केंद्रीय विद्यालयात हा कार्यक्रम होणार आहे.
****
दहा दिवसांच्या उत्सवानंतर काल सर्वत्र गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला. राज्यभरात काल विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या, मुंबईच्या लालबाग गणपतीचं आज सकाळी विसर्जन झालं, पुणे आणि मुंबईतील मिरवणुका आज सकाळपर्यंत सुरु होत्या.
दरम्यान, अमरावती जिल्ह्यात शहापूर इथं गणपती विसर्जनासाठी गेलेले तिघं जण पूर्णा नदीमध्ये वाहून गेले. तिघांपैकी एकाचा मृतदेह आज सकाळी बचाव पथकाला सापडला असून अन्य दोघांचा शोध सुरु असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
बुलडाणा इथं उद्या १९ सप्टेंबरला मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळाव्यासंदर्भात प्रत्येक शासकीय यंत्रणेनं दिलेली जबाबदारी काटे��ोरपणे पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिले आहेत.
****
मुंबईत आज एका रुग्णालयात झालेल्या विचित्र अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. समीर खान असं जखमीचं नाव असून, रुग्णालयात नियमित तपासणी करून परतल्यावर ते आपल्या वाहनात बसण्यापूर्वीच चालकाने गाडी सुरू केली. यामुळे समीर खान हे बऱ्याच दूरपर्यंत कारसोबत ओढले गेले. त्यात त्यांच्या चेहऱ्यावर तसंच डोक्यावर गंभीर दुखापत झाली. या कारने परिसरातल्या इतर अनेक वाहनांना धडका दिल्यानं, त्यांचं मोठं नुकसान झालं. या प्रकरणी वाहनचालकाला अटक करण्यात आली असून, समीर खान यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. समीर खान हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार नवाब मलिक यांचे जावई आहेत.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांना अमेरिकेचा सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान
https://bharatlive.news/?p=177442 भारतीय वंशाच्या शास्त्रज्ञांना अमेरिकेचा सर्वोच्च वै��्ञानिक ...
0 notes
inshortsmarathi · 5 years ago
Photo
Tumblr media
वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला मिळाला अमेरिकेचा व्हिसा अमेरीकेने भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला व्हिसा देण्यास नकार दिला होता. मात्र बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी हस्तक्षेप केल्यानंतर त्याला व्हिसा मिळाला.
0 notes
nandedlive · 2 years ago
Text
जगातील भारतीय वंशाच्या ४ शक्तीशाली व्यक्ती
Tumblr media
लंडन : लंडनचे नवे पंतप्रधान म्हणून भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांची सोमवार, दि. २४ ऑक्टोबर रोजी निवड झाली. भारतीय वंशाच्या व्यक्ती जगात भारी असून, आज जगातील शक्तीशाली देशांतील ४ व्यक्ती उत्तम नेतृत्व करीत आहेत. त्यामध्ये ऋषी सुनक यांच्यासह कमला हॅरिस, प्रविंद जगन्नाथ आणि अ‍ँटोनियो कोस्टा यांचा समावेश आहे. ऋषी सुनक भारतीय वंशाचे ऋषी सुनक हे ब्रिटनच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले आहेत. १९० खासदारांचे समर्थन सुनक यांना मिळाले आहे. माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी काल पंतप्रधानपदाच्या रेसमधून माघार घेतल्यानंतर ऋषी सुनक यांचे नाव आघाडीवर होते. ऋषी सुनक हे ब्रिटनचे अर्थमंत्री राहिलेले आहेत. २०१५ मध्ये सुनक यांनी राजकारणात प्रवेश केला. यॉर्कशरच्या रिचमंड येथून त्यांनी विजय मिळवला होता. ब्रेक्झिटचे समर्थक म्हणून त्यांना ओळखलेजाते. त्यामुळेच त्यांना मोठी संधी मिळत गेल्याचे बोलले जाते. जॉन्सन यांच्या सरकारमध्ये ते अर्थमंत्री होते, त्यांनीच जॉन्सन यांच्या विरोधात राजीनामासत्र सुरू केले होते. आज ते पंतप्रधान पदावर विराजमान झाले आहेत. अवघ्या ७ वर्षांत त्यांनी फार मोठी झेप घेतली. कमला हॅरिस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडेन अध्यक्ष झाले. त्यानंतर पहिल्यांदाच अमेरिकेच्या उपराष्ट्रपती महिला विराजमान झाली, त्या कमला हॅरिस आहेत. भारतीय वंशाची व्यक्ती अमेरिकेचा उपराष्ट्रपती होण्याचीही ही पहिलीच वेळ आहे. कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षाने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत उपाध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली होती. त्या भारतीय वंशाच्या आहेत. चेन्नईत राहणा-या त्यांच्या आजोबांचा त्यांच्यावर प्रभाव आहे. प्रविंद जगन्नाथ आणखी एक भारतीय प्रविंद जगन्नाथ हे जगातील महान नेत्यांपैकी एक आहेत. प्रविंद सध्या मॉरिशसचे पंतप्रधान आहेत. मंत्रिमंडळात अनेक महत्त्वाची पदे भूषविल्यानंतर प्रविंदकुमार जगन्नाथ यांची मॉरिशसच्या पंतप्रधानपदी एकमताने निवड करण्यात आली होती. त्यांचा जन्म ला कॅव्हर्न येथे एका भारतीय कुटुंबात झाला. अँटोनियो कोस्टा गोवा येथे मोझांबिक आणि अंगोला या पोर्तुगीजांच्या महत्त्वाच्या आणि दीर्घकाळ टिकलेल्या वसाहती होत्या. त्यामुळे तेथील मोझांबिक आणि अंगोलाशी गोवन लोकांचा संबंध येत असे. गोव्यातील लोक मोठ्या संख्येने आफ्रिकेत स्थलांतरित झाले आहेत. अँटोनियो यांचे आजोबा लुईस अफोन्सो मोझांबिकमध्ये होते. ४५१ वर्षाच्या पोर्तुगाल-गोवा संबंधांमुळे हजारो गोवन नागरिक पोर्तुगालमध्येही स्थायिक झाले. Read the full article
0 notes
kokannow · 2 years ago
Text
आई परमेश्वरापेक्षा महान असते.: पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
आई परमेश्वरापेक्षा महान असते.: पद्मश्री मधु मंगेश कर्णिक
आईची महती अनादिकालापासून सर्वांना ज्ञात आहे. अमेरिकेचा अंतराळवीर निल आर्मस्ट्रॉन्ग याने देखील चंद्रावर पहिले पाहुल ठेवल्यानंतर अमेरिकेचा राष्ट्रध्वज फडकवण्याअगोदर आपल्या आईची प्रार्थना केली आणि तिचे स्मरण करून आपणांस जन्म दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. असे उद्गार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी कै. मायादेवी विश्राम रावराणे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात काढले.कै.…
Tumblr media
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
फिफा विश्वचषक : आखाती देशात प्रथमच; मनोरंजक ड्रॉ, अमेरिका आणि इराण फुटबॉलच्या मैदानावर भिडतील - फिफा विश्वचषक
फिफा विश्वचषक : आखाती देशात प्रथमच; मनोरंजक ड्रॉ, अमेरिका आणि इराण फुटबॉलच्या मैदानावर भिडतील – फिफा विश्वचषक
फुटबॉल विश्वचषक 2022 चा ड्रॉ शुक्रवारी म्हणजेच 1 एप्रिल रोजी जाहीर करण्यात आला. ड्रॉ मनोरंजक होता. यामध्ये ब गटात अमेरिकेचा सामना इराणशी होणार आहे. आता फुटबॉलच्या मैदानावर अमेरिका आणि इराणची भिडणे मनोरंजक आहे कारण दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंध अद्याप पूर्ववत झालेले नाहीत. आपणास सांगूया की कतारमध्ये या वर्षी 21 नोव्हेंबर ते 18 डिसेंबर दरम्यान वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. फिफा विश्वचषक आखाती देशात…
Tumblr media
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
'रशियाशी लढण्यासाठी युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याचा कोणताही हेतू नाही', असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे
‘रशियाशी लढण्यासाठी युक्रेनमध्ये सैन्य पाठवण्याचा कोणताही हेतू नाही’, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे
व्हाईट हाऊसचे प्रेस सेक्रेटरी जेन साकी यांनी सांगितले की, “रशियाविरुद्ध युद्ध लढण्यासाठी युक्रेनमध्ये आपले सैन्य पाठवण्याचा अमेरिकेचा कोणताही हेतू नाही… आमचे मूल्यांकन जागतिक युद्ध कसे रोखायचे यावर आधारित आहे.” जेन साकी म्हणाले, “युनायटेड स्टेट्सच्या अध्यक्षांचा असा विश्वास आहे की तेल कंपन्यांकडे युनायटेड स्टेट्समध्ये अधिक तेल आणण्यासाठी आवश्यक उपकरणे आणि क्षमता आहे … तेल आयातीबद्दल व्हेनेझुएलाशी…
View On WordPress
0 notes
mahampsc · 3 years ago
Text
Editorial page Afghanistan America Officially Taliban National interest Investment Military commander akp 94 | अफगाणी आवतण!
Editorial page Afghanistan America Officially Taliban National interest Investment Military commander akp 94 | अफगाणी आवतण!
अफगाणिस्तानबद्दल अमेरिकेवर विसंबून राहता येणार नाही, हे ओळखून वेळीच भारताने अधिकृतरीत्या तालिबानला साद घालणे राष्ट्रहिताचे ठरते…  तालिबानी राजवटीशी १९९६ ते २००१ मध्ये चर्चा न करणे ठीक, पण त्यानंतरच्या काळात अफगाणिस्तानातील आपली गुंतवणूक वाढली आहे, तालिबान्यांचा सूर बदलण्याची चिन्हे आहेत आणि हा मुद्दा काही उत्तर प्रदेश निवडणुकीचा नव्हे… ३१ ऑगस्टच्या रात्री अमेरिकेचा अखेरचा लष्करी कमांडर मायदेशी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years ago
Text
कांदा निर्यातबंदीबाबत जपान, अमेरिकेचा आक्षेप
कांदा निर्यातबंदीबाबत जपान, अमेरिकेचा आक्षेप
नाशिक : कुठलीही पूर्वसूचना न देता अनेकदा भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या विदेश व्यापार महासंचालनालयाकडून निर्यातबंदीचे निर्णय घेतले जात आहेत. याबाबत जागतिक व्यापार संघटनेने आयोजित केलेल्या कृषी समितीच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा करण्यात आली. कांदा निर्यातबंदीमुळे शेतकरी व आयातदार देशांना मोठ्या अडचणी येतात. याबाबत नुकत्याच झालेल्या कृषी बैठकीत अमेरिका आणि जपानने आक्षेप नोंदवल्याची माहिती…
Tumblr media
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 2 months ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date 13 September 2024
Time 11.00 to 11.05 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १३ सप्टेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
****
संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थयी सदस्यत्व द्यायला तसंच याबाबतीत प्रस्तावात संशोधन आणि सुधारणा करायला अमेरिकेनं आपला पाठिंबा दर्शवला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेतल्या अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी लिंडा थॉमस ग्रीन फील्ड यांनी, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मतदानासाठी प्रस्ताव तयार करयाला अमेरिकेचा पाठिंबा असल्याचं सांगितलं. भारत, जपान, आणि जर्मनी या देशांना सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळावं म्हणून अमेरिका प्रयत्नशील आहे, मात्र काही देशांचा या नवीन संशोधन परिषदेला विरोध आहे.
****
कोलकाता आर जी कार रुग्णालयाच्या घटनेच्या निषेधार्थ सुरु पश्चिम बंगालमध्ये सुरु असलेलं आंदोलन आणि जनक्षोभाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जनतेची माफी मागत, राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. या प्रकरणी आंदोलकांसोबत काल प्रस्तावित असलेली बैठक झाली नाही. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यानं बैठकीचं थेट प्रसारण दाखवणं शक्य नसल्याचं सरकारनं सांगितल्यानंतर आंदोलक प्रतिनिधीनी बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला. आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान ठेवत, कामावर रुजू व्हावं, अशी विनंती ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
****
काँग्रसचे नेते राहुल गांधी यांनी परदेशात संविधान आणि आरक्षणाबाबत केलेल्या वक्तव्याविरोधात भाजपानं तीव्र भूमिका घेतली आहे. राज्यात भाजपा पक्ष आज याविरोधात आंदोलन करणार आहे, ‘काँग्रेस हटाओ आरक्षण बचाओ‘चा अशी हाक भाजपानं दिली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली अकोल्यात तर आशिष शेलार, पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात मुंबईत आंदोलन होणार आहे.
****
शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी  मुख्यमंत्री योजनादूत उपक्रम सुरु करण्यात आला आहे.  या उपक्रमासाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या  उपक्रमासाठी  आतापर्यंत एक लाख २० हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली आहे. प्रत्येक ग्रामपंचायत पातळीवर एक तर शहरी भागात प्रत्येक पाच हजार लोकसंख्येमागे एक अशा पद्धतीने राज्यात एकूण ५० हजार योजनादूतांची सहा महिन्यांसाठी निवड केली जाणार असून,  या योजनादूतांना दरमहा १० हजार रूपये मानधन दिलं जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
****
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातल्या जैवविज्ञान संकुलाने जैवविज्ञानामधील संशोधन आणि प्रशिक्षणासाठी, कोल्हापूरच्या सीमा बायोटेक, आणि भारत सरकारच्या इंडियन कौन्सिल फॉर ॲग्रीकल्चर रिसर्च सेंटर, या दोन संस्थांशी सामंजस्य करार केला. कुलगुरू प्रकाश महानवर यां��्या प्रमुख उपस्थितीत काल या करारावर दोन्ही संस्थांच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या. नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना अधिकाधिक संशोधन आणि प्रशिक्षण मिळावं, या हेतूने या दोन संस्थांशी करार करण्यात आले आहेत.
****
रायगड जिल्ह्यात धाटाव एमआयडीसीमध्ये असलेल्या एका रासायनिक कंपनीमध्ये काल झालेल्या स्फोटात तीन कामगारांचा मृत्यू झाला. स्फोट इतका शक्तिशाली होता की या परिसरात जवळपास एक किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज पोहोचला, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं.
****
बुलडाणा जिल्ह्यात काल वेगवेगळ्या घटनेत तिघांचा बुडून मृत्यू झाला. खामगाव तालुक्यातली एक महीला घरून शेताकडे निघाली असतांना विहिरीत पडून तिचा मूत्यू झाला. अन्य एका घटनेत खामगाव तालुक्यातलाच आठ वर्षीय यश बोदडे हा मुलगा आपल्या घराजवळ खेळताना पुलावरून नदीपात्रात पडला, वाहत्या पाण्य्याच्या प्रवाहाने वाहत जाऊन त्याचा मूत्यू झाला. तर तीसऱ्या घटनेत मोताळा तालुक्यातल्या जहागीरपूर इथल्या एका १४ वर्षीय मुलाचा नदीपात्रात पोहत असताना बुडून मृत्यू झाला.
****
चेन्नई इथं सुरु असलेल्या दक्षिण आशियाई कनिष्ठ गट ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाने शानदार प्रदर्शन करत नऊ सुवर्ण पदकं पटकावली. भारताच्या अनिशाने थाळ���फेक प्रकारात पहिलं सुवर्ण पदक जिंकलं, तर ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत निरु पाठकनं देखील सुवर्ण पदकाची कमाई केली.
****
ब्रुसेल्स इथं आजपासून सुरु होणार्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत भारताचं प्रतिनिधित्व भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे करणार आहे. सध्या १४व्या क्रमांकावर असलेला अविनाश आज अंतिम फेरीत पदार्पण करेल.
****
पैठण इथल्या जायकवाडी धरणाचे आणखी दोन दरवाजे आज बंद करण्यात आले असून, विसर्ग आणखी कमी करण्यात आला आहे. सध्या धरणाच्या चार दरवाजातून पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे.
****
0 notes
bharatlivenewsmedia · 1 year ago
Text
अमेरिकेचा 'डबल गेम'! : निज्‍जर हत्‍येची 'गुप्‍त' माहिती दिली कॅनडाला
https://bharatlive.news/?p=147961 अमेरिकेचा 'डबल गेम'! : निज्‍जर हत्‍येची 'गुप्‍त' माहिती दिली ...
0 notes
mhlivenews · 4 years ago
Text
सौदीच्या राजकुमारांच्या मंजुरीनेच पत्रकार खशोग्गींची हत्या, अमेरिकेचा गौप्यस्फोट
सौदीच्या राजकुमारांच्या मंजुरीनेच पत्रकार खशोग्गींची हत्या, अमेरिकेचा गौप्यस्फोट
  वॉशिंग्टन अमेरिकेतील वर्तमानपत्र ‘वॉशिंग्टन पोस्ट’चे स्तंभलेखक आणि पत्रकार जमाल खशोग्गी यांची हत्या सौदी अरेबियाचे राजकुमार प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्या मंजुरीनेच झाल्याचा गौप्यस्फोट अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने केला आहे. जा बायडेन यांच्या प्रशासनातील गुप्तचर पथकाने पत्रकार खशोग्गी यांच्या हत्येबाबत मोठा खुलासा अहवालातून केला आहे. खशोग्गी यांना पकडणे अथवा मारण्यासाठी तुर्कस्तानची राजधानी…
View On WordPress
0 notes
jagdisht68 · 4 years ago
Photo
Tumblr media
PM Modi पंतप्रधान मोदी यांना अमेरिकेचा मोठ��� सन्मान; 'लीजन ऑफ मेरिट' पुरस्काराने गौरव PM Modi get US legion of merit award : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिकेतील प्रतिष्ठेचा असलेल्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. अमेरिकेतील 'लीजन ऑफ मेरिट' या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. December 22, 2020 by Shrikant Bhosale वॉशिंग्टन: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिकेतील प्रतिष्ठेचा समजला जाणार लीजन ऑफ मेरिट या पुरस्काराने सन्मानितक करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावतीने हा पुरस्कार भारतीय राजदूत तरणजीत सिंग संधू यांनी स्वीकारला. या पुरस्कारासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: पंतप्रधान ��ोदी यांचे सुचवले असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याआधी रशिया, सौदी अरेबिया, बहरीन, संयुक्त अरब अमिरात, मालदीव आदी देशांनीदेखील सन्मानित केले आहे. अमेरिकेतील प्रतिष्ठीत पुरस्कार लीजन ऑफ मेरिट पुरस्कार अमेरिकेतील प्रतिष्ठीत पुरस्कार समजला जातो. अतुलनीय आणि असामान्य कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार इतर देशांच्या प्रमुखांसह अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना प्रदान केला जातो. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात भारत-अमेरिका संबंध आणखी मजबूत झाले. या आधारेच ट्रम्प यांनी मोदींना हा पुरस्कार प्रदान केला. PM Modi awarded Prestigious Military Award 'Legion Of Merit' For Elevating India-US Strategic Ties !! by the US President !! Congrats PM @narendramodi Ji 💐 #LegionOfMerit Congrats PM @narendramodi Ji 💐 PM मोदी को अमेरिका से मिला बेहद खास सम्मान, ट्रंप ने किया सम्मानित💘💓😍💯बधाई हो😍💃💯 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को अमेरिका के प्रतिष्ठित लीजन ऑफ मेरिट अवॉर्ड से सम्मानित किया गया है. (at Pune, Maharashtra) https://www.instagram.com/p/CJGVxGUL6Ka/?igshid=11stxtpixdtgw
0 notes
pinkhandspandathing · 4 years ago
Text
आज दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी
▪️ सोनिया गांधी यांची वरिष्ठ नेत्यांशी चर्चा; पुन्हा राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसचे नेतृत्व जाण्याचे संकेत ? ▪️ ममता दीदी, ही तर सुरूवात, निवडणुकीपर्यंत एकट्याच रहाल; गृहमंत्री अमित शहांचा ममता बॅनर्जींवर घणाघात ▪️ कोरोनावर लस आल्यानंतरही तोंडाला मास्क लावणं बंधनकारक; आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांची माहिती ▪️ रशियाकडून मोठी शस्त्रास्त्र खरेदी थांबवा; अमेरिकेचा मित्र देशांना इशारा ▪️…
View On WordPress
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
रशिया-युक्रेन बातम्या: रशिया युक्रेनवर रासायनिक हल्ला करू शकतो, अमेरिकेचा इशारा
रशिया-युक्रेन बातम्या: रशिया युक्रेनवर रासायनिक हल्ला करू शकतो, अमेरिकेचा इशारा
दरम्यान, ब्रिटनने बुधवारी सांगितले की ते युक्रेनला आणखी शस्त्रे, विशेषतः टँकविरोधी क्षेपणास्त्रे पाठवतील. , जेणेकरून हा पूर्व युरोपीय देश रशियन हल्ल्यांना तोंड देऊ शकेल. संरक्षण सचिव बेन वॉलेस यांनी ब्रिटीश संसदेचे कनिष्ठ सभागृह हाऊस ऑफ कॉमन्सला सांगितले की, ब्रिटन आधीच पाठवलेल्या 2,000 हलक्या टाकी क्षेपणास्त्रांव्यतिरिक्त आणखी 1,615 क्षेपणास्त्रे पाठवेल. शस्त्रास्त्रांच्या नवीन पुरवठ्यामध्ये…
View On WordPress
0 notes
amhikastkar · 3 years ago
Text
‘स्मार्ट’मधून प्रमुख पिकांची मूल्यसाखळी विकसित होणार ः कृषिमंत्री भुसे
‘स्मार्ट’मधून प्रमुख पिकांची मूल्यसाखळी विकसित होणार ः कृषिमंत्री भुसे
मुंबई : अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेऊन राज्यात बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविण्यात येत असून त्या माध्यमातून प्रमुख पिकांच्या स्पर्धाक्षम आणि सर्व समावेशक मूल्यसाखळी विकसित करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाचा कृषी विभाग आणि अमेरिकेचा कृषी विभाग यांच्यात राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम…
Tumblr media
View On WordPress
0 notes