#अमिताभ बच्चन कुटुंब
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 08 July 2021 Time 7.10AM to 7.20AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०८ जुलै २०२१ सकाळी ७.१० मि. ****
देशात १८ वर्षांवरील सर्वांना कोविड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तरूणांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी ही लस अवश्य घ्यावी आणि इतरांना लसीकरणासाठी मदत करावी. कोरोना विषाणू संसर्गाचा धोका अद्याप संपलेला नाही. त्यामुळे सर्वांनी संपूर्ण काळजी घेणं आवश्यक आहे. महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असं आवाहन श्रोत्यांना करण्यात येत आहे. सुरक्षित राहण्यासाठी नाका-तोंडावर मास्क लावावा, एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखावं, हात आणि चेहरा स्वच्छ ठेवावा. कोविड-19 शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदतवाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार; नारायण राणे सुक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग मंत्री तर डॉ भागवत कराड - अर्थ राज्यमंत्री; रावसाहेब दानवे यांच्याकडे रेल्वे, कोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्रिपदाची जबाबदारी.
· राज्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या उद्योजकांना कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्यासंदर्भात मार्गदर्शन करावं - मुख्यमंत्र्यांची सूचना.
· राज्यात नऊ हजार ५५८ नवे कोविडग्रस्त; मराठवाड्यात काल सहा जणांचा मृत्यू तर नवे ३६० बाधित.
· ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं काल मुंबईत निधन; शासकीय इतमामात दफनविधी.
· भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक.
· नांदेड जिल्ह्यात एका शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू.
आणि
· उस्मानाबाद इथल्या नियोजित वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भात परिपूर्ण प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचे निर्देश.
****
केंद्रीय मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला. राष्ट्रपती भवनातल्या दरबार हॉल इथं झालेल्या शपथग्रहण कार्यक्रमात, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंत्रिमंडळातल्या ४३ नव्या सदस्यांना, पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची, तर भिवंडीचे खासदार कपिल पाटील, नाशिकच्या खासदार भारती पवार आणि औरंगाबाद इथले खासदार डॉ भागवत कराड यांना, केंद्रीय राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली.
मै डॉक्टर भागवत किशनराव कराड ईश्वर की शपथ लेता हूँ की, मै विधीद्वारा स्थापित भारत के संविधान के प्रती सच्ची श्रध्दा और निष्ठा रखुंगा। मै भारत की प्रभुता और अखंडता अक्षुण्ण रखुंगा। मै संघ के राज्यमंत्री के रूप में अपने कर्तव्य को श्रध्दापूर्वक और शुन्य अंतःकरण से निर्वहन करूंगा। तथा भय या पक्षपात, अनुराग या द्वेश के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधी के अनुसार न्याय करूंगा।
काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले मध्य प्रदेशातले नेते ज्योतिरादित्य शिंदे, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, लोकजनशक्ती पक्षाचे नेते पशुपतीकुमार पारस, भाजप नेत्या मीनाक्षी लेखी यांच्यासह अनेक नव्या चेहऱ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला असून, हरदीपसिंग पुरी, मनसुख मांडवीय, अनुराग ठाकूर यांच्यासह काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बढती देण्यात आली आहे.
दरम्यान, नव्या मंत्रिमंडळाचं खातेवाटपही काल करण्यात आलं. यामध्ये मनसुख मांडवीय यांना आरोग्य, अनुराग ठाकूर यांना माहिती आणि प्रसारण, धमेंद्र प्रधान यांना शिक्षण, ज्योतिरादित्य शिंदे यांना नागरी उड्डयन, अश्विनी वैष्णव यांना रेल्वे, तर पशुपतीकुमार पारस यांना ग्राहक संरक्षण मंत्रालय देण्यात आलं आहे. नारायण राणे हे सुक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योग मंत्री, डॉ भागवत कराड - अर्थ राज्यमंत्री, कपिल पाटील - पंचायत राज्यमंत्री तर डॉ. भारती पवार - आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या खात्यात बदल करण्यात आला असून त्यांच्याकडे रेल्वे, कोळसा आणि खनिकर्म राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे
दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर डॉ हर्षवर्धन, रमेश पोखरियल निशंक, प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, यांच्यासह १२ मंत्र्यांनी काल सकाळी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
****
सहकारातून समृद्धी या उद्दि��्टाच्या पूर्तीसाठी केंद्र सरकारनं, सहकार मंत्रालयाची निर्मिती केली आहे. केंद्र सरकारने प्रसिद्धी पत्रकातून याबाबतची माहिती दिली. गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. या मंत्रालयामुळे देशातल्या सहकार चळवळीला बळ मिळेल, सहकारी संस्थांना स्थानिक पातळीवर मदत मिळेल, तसंच सहकारी संस्थांबद्दल नागरिकांमध्ये विश्वास वाढून त्यांचं नातं अधिक घट्ट होऊ शकेल, असा विश्वास केंद्रानं व्यक्त केला आहे.
****
काँग्रेस नेते आणि मुंबई प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंग यांनी काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. काँग्रेससोबत मतभेद झाल्यानं गेल्या काही काळापासून ते पक्ष कार्यापासून दूरच होते. काल त्यांनी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत, भाजपत अधिकृत प्रवेश केला.
****
राज्यातल्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी मोठ्या उद्योजकांना कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्यासंदर्भात मार्गदर्शन करावं, अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. राज्यातल्या सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांची, मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून काल बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. ज्या उद्योजकांना कंपनीच्या आवारात कामगारांची राहण्याची व्यवस्था करणं शक्य आहे, त्यांनी त्याबाबत नियोजन करावं, ज्या उद्योजकांना ते शक्य नाही, त्यांनी कंपनीच्या जवळपासच्या परिसरात अशी जागा शोधून, कामगारांची निवासाची व्यवस्था करावी, जिल्हाधिकाऱ्यांनी यासाठी आवश्यक सहकार्य करावं, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केल्या.
****
दमणगंगा-एकदरे-गोदावरी राज्यस्तरीय नदीजोड योजनेची कामं त्वरित सुरु करावीत, असे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत, या योजनेचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष झिरवळ यांनी या योजनेसंदर्भात क्षेत्रीय स्तरावरील तांत्रिक बाबींबद्दल, काही महत्त्वाच्या उपाययोजना सुचवल्या, त्यासंदर्भात ��िभागानं प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव त्वरीत सादर करावे, असे निर्देश मंत्री जयंत पाटील यांनी दिले.
****
राज्यात काल नऊ हजार ५५८ नवे कोविड रुग्ण आढळले, त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या ६१ लाख २२ हजार ८९३ झाली आहे. काल १४७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, राज्यात या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख २३ हजार ८५७ झाली असून, मृत्यूदर दोन पूर्णांक दोन दशांश टक्के झाला आहे. काल आठ हजार ८९९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत ५८ लाख ८१ हजार १६७ रुग्ण, कोरोना विषाणू संसर्गातून मुक्त झाले असून, कोविडमुक्तीचा दर ९६ पूर्णांक पाच दशांश टक्के झाला आहे. सध्या राज्यभरात एक लाख १४ हजार ६२५ रुग्ण���ंवर उपचार सुरू आहेत.
****
मराठवाड्यात काल ३६० कोविड बाधितांची नोंद झाली, तर सहा जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांमध्ये बीड जिल्ह्यातल्या तीन, औरंगाबाद दोन, परभणी जिल्ह्यातल्या एका रुग्णाचा समावेश आहे.
बीड जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे १८८ रुग्ण आढळले. उस्मानाबाद ६४, औरंगाबाद ४८, परभणी २०, लातूर १८, नांदेड ११ जालना आठ, तर हिंगोली जिल्ह्यात काल कोविड संसर्ग झालेला नवा एक रुग्ण आढळला.
****
हिंदी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते मोहम्मद युसूफ खान उर्फ दिलीप कुमार यांचं काल सकाळी मुंबईत निधन झालं, ते ९८ वर्षांचे होते. १९४४ साली ‘ज्वार भाटा’ या चित्रपटातून, चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेले दिलीपकुमार यांनी, १९९८ पर्यंतच्या सुमारे साडे पाच दशकांच्या कारकिर्दीत अवघ्या ६२ चित्रपटातून बदलत्��ा प्रवाहानुसार भूमिका साकारल्या. जुगनू, शहीद, दाग, देवदास, नया दौर, मधुमती, कोहीनूर, मुगल-ए-आजम, गंगा जमुना, लीडर, राम और श्याम, गोपी, क्रांती, शक्ती, कर्मा, सौदागर, आदी चित्रपटातून त्यांनी साकारलेल्या भूमिका, रसिकांच्या आजही स्मरणात आहेत. १९९८ साली आलेला ‘किला’ हा त्यांचा अखेरचा चित्रपट होता. औरंगाबाद इथले ज्येष्ठ सिनेपत्रकार अशोक उजळंबकर यांनी दिलीपकुमार यांच्या कारकिर्दीचा संक्षिप्त वेध घेतला. ते म्हणाले –
दिलीप कुमार म्हणजे अभिनयाचा नटसम्राट. एकूणच १९५० ते ७० च्या दशकामध्ये यांनी तो काळ गाजवला. पण दिलीपकुमार असे होते की त्यांनी कधी कोणाशी स्पर्धा केली नाही. मोजक्या चित्रपटांवर लक्ष ठेवून त्याच्यामधून आपला अभिनय दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, आणि त्यात ते यशस्वी झाले. आणि हिंदी चित्रपटसृष्टीतला माईलस्टोन चित्रपट ज्याला आपण म्हणतो मुगल - ए- आझम. मुगल - ए- आझमची छाप आणि मुगल - ए - आझमचा रोप काही वेगळाच होता. मुगल - ए- आझम आजही लागला तरी रसिक त्याला पाहू शकतील. त्यांना ट्रजेडी किंग म्हणून मिळालेला जो सन्मान होता तो त्यांच्या बऱ्याच चित्रपटांतून दिसला. औरंगाबादला आले तेंव्हा प्रत्यक्ष आमची भेट झाली. आम्ही त्यांना जवळून पाहून जे प्रश्न विचारले त्या प्रश्नांची त्यांनी उत्तरे अगदी सहज रितीनं उत्तरे दिली. हा नट सम्राट काळाच्या पडद्याआड झालेला आहे आणि चित्रपट सृष्टीचं एक मोठं युग संपलेलं आहे.
वर्ष २००० ते २००६ पर्यंत दिलीपकुमार राज्यसभेचे सदस्य होते. आठ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळालेले दिलीपकुमार यांना, केंद्र सरकारच्या पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांसह, दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं.
��िलीपकुमार यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्यासह, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी दु:ख व्यक्त करत, त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलीपकुमार यांच्या पार्थिव देहाचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. दिलीप कुमार यांचं चित्रपटप्रेमी, चाहत्यांच्या हृदयातलं स्थानही अजरामर राहील, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
दिलीप कुमार यांच्या पार्थिव देहाचं काल संध्याकाळी सांताक्रूझ इथल्या कब्रस्तानात शासकीत इतमामात दफन करण्यात आलं.
****
पुणे जिल्ह्यात भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालय - ईडीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना अटक केली ��हे. चौधरी यांना ईडीकडून मंगळवारी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं, रात्री उशिरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. यावेळी त्यांनी सोबत आणलेल्या कागदपत्रांची ईडीकडून तपासणी करण्यात आली. या प्रकरणी ईडीने जानेवारी महिन्यात खडसे यांची चौकशी केली होती.
****
नांदेड जिल्ह्यात मुदखेड तालुक्यातल्या मुगट शिवारात काल एका शेतकऱ्याचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. दत्ता ढेपाळे असं या शेतकऱ्याचं नाव आहे. जिल्ह्यात काल अनेक ठिकाणी पाऊस झाला. कंधार तालुक्यात बारूळ परिसरात तासभर जोरदार पाऊस झाला, या पावसामुळे परिसरातील नाल्यांना पूर आला तर अनेकांच्या शेतातली पिकं खरडून गेली. जिल्ह्यात पिकांसाठी चांगल्या पावसाची गरज असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. बीड जिल्ह्यात अंबाजोगाई शहर आणि परिसरात काल सायंकाळी जोरदार पाऊस झाला.
****
उस्मानाबाद इथं नव्याने उभारण्यात येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्न रुग्णालयासंदर्भात, परिपूर्ण प्रस्ताव तातडीनं सादर करण्याचे निर्देश, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. या संदर्भात काल मंत्रालयात देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेनं दिलेल्या निर्देशानुसार वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी जागा निश्चित केल्यानंतर आवश्यक जमीन ताब्यात घेणं, ती वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्या नावावर करुन घेणं याबाबतच्या कामाला गती देण्याचे निर्देश देशमुख यांनी दिले.
****
औरंगाबाद इथले खासदार डॉ.भागवत कराड यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्याबद्दल औरंगाबाद इथं भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. या वेळी ढोलताशांचा गजर करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात राज्यातल्या चौघा खासदारांचा मंत्री म्हणून समावेश केल्याबद्दल, परभणी इथंही भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसह, कार्यकर्त्यांनी काल सायंकाळी फटाक्यांची आतिषबाजी केली.
****
परभणी शहर महानगरपालिकेच्या वतीनं शहरातल्या १४ केंद्रांवर आज दुपारी दोन ते सायंकाळी सहा या��ेळेत कोविड लसीकरण होणार आहे, महापालिका आयुक्त देविदास पवार यांनी ही माहिती दिली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यातल्या राजुरी इथं लोक सहभागातून, जिल्ह्यातलं पहिलं अत्याधुनिक सामाजिक विलगीकरण केंद्र उभारण्यात आलं आहे. क्लायमेट फंड मॅनेजर या संस्थेच्या मदतीनं, राजुरी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत १० खाटांचं हे विलगीकरण केंद्र उभारण्यात आलं असून, स्वयंशिक्षण प्रयोग या सामाजिक संस्थेच्या सहकार्यानं आणि जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली, हे केंद्र चालवण्यात येणार आहे.
****
नवीन वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं सुरु केलेल्या हालचालींच्या निषेधार्थ, परभणी इथल्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांनी, काल काळ्या फिती लावून काम केलं. मोटर वाहनविषयक कायद्यास संसदेतून मंजूरी मिळाल्यानंतर, केंद्र सरकारनं नवीन गाड्यांच्या नोंदणीचं काम वितरकांमार्फतच करायचा निर्णय घेतला, कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.
****
0 notes
Text
जेव्हा सलीम खान स्वतः जया बच्चन यांच्या फ्लॅटवर 'जंजीर'ची कथा सांगण्यासाठी गेला होता.
जेव्हा सलीम खान स्वतः जया बच्चन यांच्या फ्लॅटवर ‘��ंजीर’ची कथा सांगण्यासाठी गेला होता.
जेव्हा सलीम खान जया बच्चन यांच्या फ्लॅटवर गेला होता. अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांचा सुपरहिट चित्रपट ‘जंजीर’ 1973 साली रिलीज झाला होता. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सुमारे 1 महिन्यानंतर अमिताभ बच्चन यांनी जयासोबत लग्न केले. या चित्रपटापासून अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले. अमिताभ बच्चन यांचे भविष्य घडवण्यात प्रसिद्ध लेखक सलीम-जावेद जोडीचा मोठा हात होता, असे म्हटले…
View On WordPress
#अमिताभ बच्चन#अमिताभ बच्चन इंस्टाग्राम#अमिताभ बच्चन कालिया#अमिताभ बच्चन कुटुंब#अमिताभ बच्चन घरातील चित्र#अमिताभ बच्चन चित्रपट#अमिताभ बच्चन यांचा फोटो#अमिताभ बच्चन यांची गाणी#अमिताभ बच्चन यांची संपत्ती#अमिताभ बच्चन वय#अमिताभ बच्चन-इन्स्टाग्राम#अमिताभ बच्चनची उंची पायात#अमिताभ बच्चनची मालमत्ता#अमिताभ बच्चनचे आगामी चित्रपट#जंजीरमध्ये जया बच्चन#जया बच्चन#जया बच्चन आणि अमिताभ बच्चन#जया बच्चन आणि सलीम खान#जया बच्चन इन्स्टाग्राम#जया बच्चन गाणे#जया बच्चन चित्रपटांची यादी#जया बच्चन पती#जया बच्चन यांचा पहिला चित्रपट#जया बच्चन यांची निव्वळ संपत्ती#जया बच्चन वय#जया बच्चनची मुलगी#बॉलीवूड#मनोरंजन#सलीम खान#सलीम खान चित्रपट
0 notes
Text
जेव्हा रेखाने जया बच्चन यांना अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी फसवले
जेव्हा रेखाने जया बच्चन यांना अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी फसवले
जेव्हा रेखाने जया बच्चन यांना अमिताभ बच्चन यांना भेटण्यासाठी फसवलेहिंदी चित्रपटसृष्टीत अनेक प्रसिद्ध जोडपी झाली आहेत, त्यापैकी एक म्हणजे अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी. या जोडीने केवळ रुपेरी पडद्यावरच नव्हे तर खऱ्या आयुष्यातही धुमाकूळ घातला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेखा आणि अमिताभ बच्चन यांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. अमिताभ बच्चन यांनी रेखासोबतच्या नात्याबद्दल कधीच मीडियासमोर बोलले नसले तरी…
View On WordPress
#अमिताभ बच्चन#अमिताभ बच्चन कालिया#अमिताभ बच्चन कुटुंब#अमिताभ बच्चन घरातील चित्र#अमिताभ बच्चन चित्रपट#अमिताभ बच्चन चित्रपटांची यादी#अमिताभ बच्चन यांचा फोटो#अमिताभ बच्चन यांची गाणी#अमिताभ बच्चन यांची पत्नी#अमिताभ बच्चन यांची संपत्ती#अमिताभ बच्चन वय#अमिताभ बच्चन-इन्स्टाग्राम#अमिताभ बच्चनची उंची पायात#अमिताभ बच्चनची मालमत्ता#अमिताभ बच्चनचे आगामी चित्रपट#जया बच्चन#जया बच्चन चित्रपट#जया बच्चन चित्रपटांची यादी#जया बच्चन ताज्या बातम्या#जया बच्चन नेट वर्थ#जया बच्चन बहिण#जया बच्चन बातम्या#जया बच्चन मैनेता#जया बच्चन वय#जया बच्चनची उंची#जया बच्चनची उंची फूट#बॉलीवूड#मनोरंजन#रेखा#रेखा आणि अमिताभ बच्चन
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 16 September 2018 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १६ सप्टेंबर २०१८ सकाळी ६.५० मि. **** स्वच्छता ही सेवा अभियानाला पंतप्रधानांच्या हस्ते आरंभ आगामी निवडणुकीसाठी एमआयएम - भारतीय रिपब्लिकन पक्ष - बहुजन महासंघाची आघाडी नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा प्रकरणी माजी खासदार आमदारांसह २७ जणांविरूद्ध गुन्हे दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण. **** स्वच्छता ही सेवा या देशव्यापी पंधरा दिवसीय अभियानाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत दूरदृश्यसंवाद प्रणालीच्या माध्यमातून उदघाटन केलं, देशभरात स्वच्छता क्षेत्रात कार्यरत अनेक व्यक्तींशी पंतप्रधानांनी यावेळी संवाद साधला. यामध्ये ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा, ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, आध्यात्मिक गुरु जग्गी वासुदेव, श्री श्री रविशंकर, लडाख इथं तैनात भारत तिबेट सीमा पोलिस दलाचे जवान, यांच्यासह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा समावेश होता. प्रत्येकानं आपल्या आजूबाजूचा फक्त दहा फूट परिसर जरी स्वच्छ ठेवला, तरी देखील संपूर्ण देश स्वच्छ होईल, असं मत अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केलं, तर टाटा विश्वस्त मंडळ गेल्या चार वर्षांपासून स्वच्छता अभियानात आपलं योगदान देत असून, यापुढेही योगदान देत राहिल, असं रतन टाटा म्हणाले. संपूर्ण देशभरात या अभिनायांतर्गत काल शालेय विद्यार्थी, विविध सहकारी संघांचे सदस्य, स्थानिक प्रशासनातले अधिकारी-कर्मचारी, स्वयं-सहायता गट, तसंच सामाजिक संघटनांनी एकत्र येत स्वच्छता मोहीम राबवली. दरम्यान, मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्येही या अभियानानिमित्त अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. लातूर इथं, या अभियानाला काल स्वच्छतेची शपथ घेऊन सुरवात करण्यात आली. जिल्ह्यातले अधिकारी कर्मचारी तसंच नागरिकांनी सक्रीय सहभाग घेवून आपलं गाव, शाळा-अंगणवाडी तसंच एकूण परिसर स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपीन इटन��र यांनी केलं. येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान शौचालय निर्मिती, सांडपाणी तसंच घनकचरा व्यवस्थापन, श्रमदान तसंच समग्र स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे. खासदार डॉक्टर सुनिल गायकवाड यांनीही काल प्रकाशनगरमधल्या सरस्वती महाविद्यालय परीसरात स्वच्छता अभियानाला प्रारंभ केला. परभणी इथं राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ झाला. प्रत्येकानं प्रामाणिकपणे प्रयत्न करून गाव स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. उस्मानाबाद इथं या अभियानिमित्त परिसर स्वच्छता, शौचालयांसाठी खड्डे खोदणे, सार्वजनिक स्वच्छता, यां��्या स्वच्छतेसाठी सर्वांनी सहकार्य करून सहभागी होण्याचं आवाहन उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कोलते यांनी केलं आहे. दरम्यान, २०१७-१८ या वर्षीचे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता पुरस्कार काल वितरित करण्यात आले. जिल्हास्तरीय पाच लाख रूपयांचा प्रथम पुरस्कार तुळजापूर तालुक्यातल्या अलियाबाद ग्रामपंचायतीला, तर कुटुंब कल्याण व्यवस्थापन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या तीन ग्रामपंचायतींना प्रत्येकी २५ हजार रूपयांचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. **** आगामी निवडणुका ऑल इंडिया मजलिस इ इत्तेहादुल मुस्लिमीन - एमआयएम पक्ष, भारतीय रिपब्लिकन पक्ष - बहुजन महासंघाच्या वंचित बहुजन आघाडीसोबत युती करून लढवणार आहे. यासंबंधी प्राथमिक निर्णय झाला असल्याची माहिती औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी दिली. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. अंतिम निर्णय प्रकाश आंबेडकर आणि एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या ७० वर्षात दलित, ओबीसी, वंचित आणि मुस्लिम समाजाचा, फक्त मतं मिळवण्यासाठी वापर केल्याचं त्यांनी म्हटलं. येत्या दोन आक्टोबरला औरंगाबाद इथं दोन्ही पक्षांची संयुक्त सभा होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. वंचित बहुजन आघाडीचे माजी आमदार हरिभाऊ भदे यावेळी उपस्थित होते. **** नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत झालेल्या वेगवेगळ्या घोटाळ्या प्रकरणी बँकेच्या २७ आजी माजी संचालकांविरुध्द गुन्हे दाखल करुन दोन महिन्यात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन.एल.गायकवाड यांनी दिले आहेत. २००२ ते २००७ या काळात हे घोटाळे झाले असल्याचा आरोप करत क्रांतिकारी जयहिंद सेनेचे संभाजी पाटील यांनी नांदेड न्यायालयात याचिका दाखल केली आहे. माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, बँकेचे माजी अध्यक्ष मोहन पाटील टाकळीकर, हरि��रराव भोसीकर, माजी खासदार गंगाधरराव देशमुख कुंटूरकर, माजी राज्यमंत्री दिगंबर बापूजी पवार, माजी आमदार सुभाष वानखेडे, माजी आमदार रोहिदास चव्हाण, माजी आमदार श्रीनिवास गोरठेकर, माजी नगरसेवक गफार खान महेमूद खान, माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष नामदेवराव केशवे अशा २७ माजी संचालकांचा आरोपींमध्ये समावेश आहे. १०५ कोटी रूपयांहून अधिक रकमेचा हा घोटाळा असल्याचं याचिकेत म्हटलं आहे. ***** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उद्या साजरा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचं मुख्य ध्वजारोहण औरंगाबाद इथं सिद्धार्थ उद्यानात सकाळी नऊ वाजता होणार आहे. मराठवाड्यात या निमित्तानं सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये पालकमंत्र्याच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी नऊ वाजता होणार आहे. **** राज्यपाल सी. विद्यासागर राव उद्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. सकाळी सव्वा दहा वाजता विश्रामगृहावर ते मराठवाडा मुक्ती संग्राम चळवळीत सहभागी स्वातंत्र्यसैनिकांशी संवाद साधणार आहेत. त्यांनतर राज्यपाल गणपती नेत्र रुग्णालयाच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी होतील. दुपारनंतर भोकरदन तालुक्यातल्या जवखेडा इथल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामाची पाहणी करतील. **** पाऊस नसल्यामुळे वाळत असलेल्या पिकांचे पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी एका निवेदनाद्वारे आमदार त्र्यंबक भिसे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. चालू वर्षाच्या खरीप हंगामात सुरुवातीत चांगला पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी नगदी पीक म्हणून मूग, गहू, उडीद, तुर, सोयाबीन अश्या पिकांचा मोठ्या प्रमाणात पेरणी केली होती. मात्र नंतर पावसानं उघडीप दिल्यानं ही सर्व पिके वाळून गेली आहेत, या पार्श्वभूमीवर या पिकांचे पंचनामे करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. **** बुलडाणा जिल्ह्यात पंतप्रधान जनऔषधी सेवेच्या सात केंद्रांमधून २० हजाराच्यावर रुग्णांना औषधींचा पुरवठा केला जात आहे. खामगाव तालुक्यातल्या विविध आजाराच्या आठ ते नऊ हजार रुग्णांना जनऔषधी सेवेद्वारे उत्कृष्ट दर्जाची औषधी कमी दरात उपलब्ध झाली आहेत. या जनऔषधी सेवेचा लाभ घेणारे सुखानंद निकाळजे यांनी केंद्र सरकारचे आभार व्यक्त करत आपला अनुभव सांगितला.. माझे नाव सुखानंद निकाळजे. मी बुलडाणा जिल्ह्यातून खामगाव शहरात राहतो. मी हद्याचा, रक्तदाबाचा, मधूमेहाचा रूग्ण आहे. शिवाय माझ्या घरात माझे वडील, माझी आई देखील रूग्ण आहे. परंतू जेव्हा मी मार्केट मध्ये औषधी घ्यायला जायचो, तेव्हा ती मला परवडणारी नसायची. कारण, ती खूप महागडी होती. परंतू जेव्हा पासून केद्र सरकारने खामगाव शहरामध्ये पंतप्रधान योजनेच्या द्वारे जनऔषधी सेवा सूरू केल्या पासून मी आपली औषधी त्यामधून घेत आहे. येथिल औषधाची गूणवत्ता चांगली आहे. शिवाय, किंमत सुध्दा कमी असल्यामुळे माझा खूप आर्थिक फायदा होत आहे. **** दुबई इथं सुरू झालेल्या आशियाई करंडक क्रिकेट स्पर्धेत काल बांग्लादेश आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सलामीच्या सामन्यात बांग्लादेशनं श्रीलंकेचा १३७ धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करत बांग्लादेशनं विजयासाठी श्रीलंकेसमोर २६२ धावाचं लक्ष ठेवलं होतं. मात्र श्रीलंकेचा संघ ३६ षटकांत केवळ १२४ धावाचं करू शकला. *****
0 notes