#अनिल कुमार सिंग
Explore tagged Tumblr posts
Text
'दुल्हनिया लंडन से लाएंगे'च्या ट्रेलरमध्ये खेसारी लाल यादव यांनी ब्रिटीश अभिनेत्रीचे केले चुंबन, पाहा व्हिडिओ
‘दुल्हनिया लंडन से लाएंगे’च्या ट्रेलरमध्ये खेसारी लाल यादव यांनी ब्रिटीश अभिनेत्रीचे केले चुंबन, पाहा व्हिडिओ
दुल्हनिया लंडन से लेंगे ट्रेलर आऊट: भोजपुरी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता खेसरीलाल यादव त्याचा आगामी चित्रपट ‘दुल्हनिया लंडन से लेएंगे’ ट्रेलर रिलीज झाला आहे. यूट्यूबवर प्रदर्शित होताच ट्रेलरने प्रेक्षकांमध्ये घबराट निर्माण केली आहे. ट्रेलरमध्ये खेसारी लाल यादवची मस्त स्ट��इल चाहत्यांना खूप आवडते. या ट्रेलरमध्ये खेसारी लाल यादवशिवाय भोजपुरी इंडस्ट्रीची लोकप्रिय अभिनेत्री आहे. मधु शर्मा आणि ब्रिटिश…
View On WordPress
#अंजय रघुराज#अनंजय रघुराज#अनिल कुमार सिंग#अनु मोरया#आदित्य चौधरी#उल्हास शिवराय कुडवा#खेसरीलाल यादव#ग्रेस रस्ते#ग्रेस रोड्स#दीपक सिन्हा#दुल्हनिया लंडन से लाएंगे#दुल्हनिया लंडन से लेंगे ट्रेलर आऊट#दुल्हनिया लंडनहून आणणार आहेत#दुल्हनिया हा ट्रेलर लंडनमधून घेऊन येणार आहे#भोजपुरी गप्पा#भोजपुरी ट्रेंडिंग बातम्या#भोजपुरी बातम्या#मधु शर्मा#मनोरंजन बातम्या#महंत जी#श्रद्धा नवल#संजय महानंद
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 28 July 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २८ जुलै २०२२ दुपारी १.०० वा. ****
काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासंदर्भातवापरलेल्या अपशब्दाबद्दल काँग्रेसनं माफी मागावी अशी मागणी सत्ताधारी पक्षानं आज संसदेच्या दोन्ही सभागृहात केली. भाजप सदस्यांच्या घोषणाबाजीमुळे लोकसभेचं कामकाज दुपारी चार वाजेपर्यंत, तर राज्यसभेचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.
लोकसभेत कामकाज सुरु होताच काँग्रेस पक्षानं माफी मागावी, अशी मागणी वस्त्रोद्योग मंत्री स्मृति इराणी यांनी केली. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचा या वक्तव्याला पाठिंबा असल्याचा आरोप त्यांनी केला. या मुद्याला वेगळं वळण दिलं जात असल्याचं सांगून, काँग्रेस पक्ष सदस्यांनी मात्र यावर आक्षेप घेत इतर विरोधी पक्ष सदस्यांसोबत घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सदनाचं कामकाज दोन वेळा स्थगित करावं लागलं.
राज्यसभेत कामकाजादरम्यान गदारोळ केल्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे सुशील गुप्ता, संदीप पाठक आणि अपक्ष खासदार अजित कुमार भुयां यांना या आठवड्यातल्या उर्वरित दिवसांसाठी निलंबित करण्यात आलं आहे.
दरम्यान, संसदेबाहे��ही भाजप नेत्यांनी हातात फलक झळकावर अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्याचा निषेध केला.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या खुलताबाद इथं भद्रा मारोती आणि वेरुळ इथल्या घृष्णेश्वर मंदीरात श्रावण महिन्यात होणाऱ्या भाविकांच्या गर्दीमुळे, वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून ते मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत, दौलताबाद टी पाँईट पासून ते वेरुळ पर्यंत, आणि फुलंब्री पासून ते खुलताबाद पर्यंत, जड वाहतूक बंद असेल. सर्व प्रकारच्या जड वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन, प्रशासनानं केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीसाठी आरक्षण सोडत आज काढण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या ७० गटांचा, तर पंचायत समितीच्या १४० गणांचा यात समावेश आहे. उद्या आरक्षणाचे प्रारुप प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तसंच आरक्षणाबाबात जिल्हाधिकारी, संबंधित तहसिलदार यांच्याकडे हरकती आणि सूचना सादर करण्याचा कालावधी उद्यापासून दोन ऑगस्ट पर्यंत आहे.
****
औरंगाबाद इथल्या महात्मा गांधी मिशन अभिमत विद्यापीठातल्या महागामी गुरुकुलात संगीतशास्त्रात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी नुकतंच एकल संगीत सादरीकरण केलं. डॉ. अनिल ब्योहार, डॉ. आरती राव यांच्या मार्गदर्शनात हे विद्यार्थी अध्ययन करत असल्याचं, महागामी कडून सांगण्यात आलं आहे.
****
नांदेड-तिरुपती आणि औरंगाबाद-तिरुपती दरम्यान विशेष गाडीच्या आठ फेऱ्या होणार आहेत. नांदेड - तिरुपती ही गाडी येत्या ३० जुलैला नांदेडहून तर परतीच्या प्रवासात ३१ जुलैला तिरुपतीहून सुटेल. औरंगाबाद तिरुपती दरम्यान विशेष गाडी सात, १४ आणि २१ ऑगस्टला औरंगाबादहून, तर आठ, १५ आणि २२ ऑगस्टला तिरुपतीहून सुटणार आहे.
****
रेल्वेच्या सोलापूर विभागातल्या दौंड-कुर्डूवाडी सेक्शनमधल्या भिगवण-वाशिंबे रेल्वे स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचं काम सुरू असल्यामुळे नांदेड ते पनवेल ही गाडी येत्या चार ते आठ ऑगस्ट या काळात नांदेडपासून कुर्डूवाडीपर्यंतच धावणार आहे. कुर्डूवाडी ते पनवेल हा टप्पा सध्या रद्द करण्यात आला आहे. तर, पनवेल ते नांदेड ही गाडी येत्या पाच ते नऊ ऑगस्ट या काळात पनवेलऐवजी कुर्डूवाडीपासून नांदेडसाठी सुटणार आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ३१ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा ९०वा भाग असेल.
****
राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा आजपासून बर्मिंगहॅम इथं सुरु होत आहेत. या स्पर्धेचा शानदार उद्घाटन सोहळा भारतीय प्रमाणवेळेनुसार आज रात्री साडेअकरा वाजता सुरू होईल. भारताच्या २१५ खेळाडूंचा संघ या स्पर्धेच्या १६ प्रकारांमध्ये सहभागी होणार आहे. पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग याच्यासह बॅडमिंटनपटू पी.व्ही.सिंधू भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहेत.
४४ व्या बुध्दीबळ ऑलिंपियाड स्पर्धेला देखील आजपासून चेन्नई इथं सुरुवात होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन होणार आहे.
****
इटली इथं सुरू असलेल्या १७ वर्षाखालील ग्रीक-रोमन कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ५५ किलो वजनी गटात भारताच्या सुरज वशिष्टनं सुवर्णपदक पटकावलं आहे. ३२ वर्षानंतर भारताला या स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं आहे.
****
हवामान
मराठवाडा आणि विदर्भात आज आणि उद्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडेल. ३१ जुलैपर्यंत कोकणात बहुतांश ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्रात काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
****
0 notes
Text
पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धा पडली पार; पुरुषांमध्ये कालिदास हिरवे, तर महिलांमध्ये ज्योती गावते प्रथम
पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धा पडली पार; पुरुषांमध्ये कालिदास हिरवे, तर महिलांमध्ये ज्योती गावते प्रथम
पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धा पडली पार; पुरुषांमध्ये कालिदास हिरवे, तर महिलांमध्ये ज्योती गावते प्रथम ३५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेला आज मध्यरात्री रात्री बारा वाजण्याच्या सुमारास मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सुरुवात झाली. या स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतील फुल मॅराथॉन पुरुषांमध्ये प्रथम क्रमांक कालिदास हिरवे, द्वितीय राहुल कुमार पाल आणि तृतीय अनिल कुमार सिंग…
View On WordPress
#“…तर#आंतरराष्ट्रीय#कालिदास#गावते#ज्योती’#पडली#पार#पुणे:#पुरुषांमध्ये#प्रथम’#बातम्या#महिलांमध्ये#मॅराथॉन#स्पर्धा#हिरवे
0 notes
Text
अंतिम व्यक्ति की लड़ाई के लिए जॉर्ज याद किए जाएंगे-; सांसद अरुण कुमार
अंतिम व्यक्ति की लड़ाई के लिए जॉर्ज याद किए जाएंगे-; सांसद अरुण कुमार नई दिल्ली- 04 जून 20l8 महात्मा गांधी, राजेंद्र प्रसाद, डॉ राम मनोहर लोहिया, राजनारायण, मधु लिमिए और रविराय जैसे समाजवादियों की सून्यता को भरने के लिएजॉर्ज फ़र्नांडिस याद किए जाते हैं l देश के अंतिम व्यक्तियों की लड़ाई के लिए और उस चुनौतियों को अपने कंधे पे लेने के लिए जॉर्ज हमेशा याद किए जाएंगे l कारगिल के योद्धावों और सेनाओ के लिए जॉर्ज का रक्षा मंत्री के रूप मे किया गया फैसला आज़ादी के बाद देश मे एक इतिहास की तरह है l रविवार को नई दिल्ली के एनडीएमसी सभागार मे समाजवादी आंदोलन के महानायक किसानो, मजदूरो और ट्रेड यूनियन के मसीहा जॉर्ज फ़र्नांडिस के 88वें जन्मदिवस समारोह की अध्यक्षता करते हुए जहानाबाद के सांसद डॉ अरुण कुमार ने यह बात कही l इस मौके पर 88 किलो का केक काटकरजॉर्ज का जन्मदिन याद किया गया l कार्यक्र्म मे सेनाधिकारी की पत्नी और वीररस की कवित्री मंजूसा रंजन ने जॉर्ज को समर्पित कई कवितायें सुनाई lइस मौके पर पूर्व विधायक रामाशीष राय, किसान नेता अनिल ��लान, बेंग��ूर से आए जय कृष्ण शेठी, केरल से आए मो॰ आसिफ, हरियाणा से आए समशेर सिंग दहिया, गांधीवादी सुरेन्द्र कुमार, खुर्शीद अनवर, विज्ञान सावरूप सिंह, मेजर अमर सिंह चौहान, उत्तम गढ़े, युवा नेता रामपुकार सिन्हा,अजय राय, सुधीर त्यागी, सचितानन्द राय, पूर्व मंत्री केदारनाथ सिंह, चाँद धूलिया, राष्ट्रवादी जनता पार्टी के अधयक्ष अनिल भारती सहित अन्य लोग मौजूद थे l कार्यक्र्म का संचालन समाजवादी नेता सादात अनवर ने की l वक्ताओ ने कहा की आज के माहौल को देखते हुए सांसद डॉ अरुण कुमारको जॉर्ज का मानसपुत्र घोसीट करने मे हमे गर्व हो रहा है l सांसद डॉ अरुण कुमार ने कहा की जॉर्ज समाजवाद के जनक और देश के उन लोगो के लिए प्रेरणा स्रोत है जो देश मे चल रहे अवसरवादी राजनीति को दर किनार कर अपना रास्ता तलास रहे हैं l किसान आंदोलन राजनीति की भेंट चढ़ गई है और इसे पटरी पर लाने की चुनौती हमारे सामने मुह बाए खड़ी है l उन्होने कहा की समाजवाद पूंजीवाद का शिकार हो गया है, पूंजी लोगो को भोगवादी संस्कृति की ओर ले जा रही है l तब जॉर्जफ़र्नांडिस जैसे व्यक्ति इसलिए याद आते हैं चुकी संसद से लेकर सड़क तक और खेत-खिलिहानों से लेकर मज़दूरों के बीच वे एक जैसे थे l उन्होने कहा की अंतिम व्यक्ति की लड़ाई पूंजी से नही हो सकती श्रम से ही लड़ी जा सकती है l जॉर्ज फ़र्नांडिस हमारे लिए उस धरोहर के समान हैं जिसके बिना हम जैसे लोगों की कल्पना नही की जा सकती l Read the full article
#bureaucrats#drarunkumar#george#georgefernandes#india#indianews#mpdrarunkumar#nation#national#nationalnews
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 11 June 2022 Time 7.10 AM to 7.25 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ११ जून २०२२ सकाळी ७.१० मि. ****
· राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक तर शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल विजयी
· वस्तू आणि सेवांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारकडून नव्या मार्गदर्शक सूचना जारी
· राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे तीन हजार ८१ रुग्ण
· मराठवाडा साहित्य परिषदेचे ग्रंथ पुरस्कार जाहीर; तीन जुलैला समारंभपूर्वक वितरण
· भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात मुस्लिम समाजाची निदर्शनं
· नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल
आणि
· खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या मल्लखांब खेळाडूंना सांघिक सुवर्णपदक
****
राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून भाजपचे तीन, तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या महाविकास आघाडीतल्या तीनही पक्षाचे प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाले आहेत. आज पहाटेच्या सुमारास हा निकाल स्पष्ट झाला. काल सायंकाळी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यानं, तसंच मंत्री नवाब मलिक आणि आमदार अनिल देशमुख हे तुरूंगात असल्यानं, २८८ पैकी २८५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
मात्र भाजप��ं यशोमती ठाकूर, जीतेंद्र आव्हाड आणि सुहास कांदे यांच्या मतदानावर आक्षेप नोंदवला. काँग्रेसनेही भाजपचे सुधीर मुनगंटीवार तसंच अपक्ष रवी राणा यांच्या मतदानावर आक्षेप नोंदवला. त्यावर निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेची चित्रफीत मागवून तपासली आणि शिवसेनेचे सुहास कांदे यांचं मत बाद ठरवत, बाकीचे आक्षेप फेटाळून लावले.
त्यानंतर मतमोजणीला सुरवात झाली. त्यात भाजपचे पियुष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक तर शिवसेनेचे संजय राऊत, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रफुल्ल पटेल विजयी झाले. सहाव्या जागेसाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत भाजपचे धनंजय महाडिक यांना ४१ तर शिवसेनेचे संजय पवार यांना ३३ मतं मिळाली.
****
महाराष्ट्रासह, राजस्थान, कर्नाटक आणि हरियाणातून राज्यसभेसाठी काल मतदान झालं.
काँग्रेसच्या दोन आमदारांनी नियमभंग केल्याच्या आक्षेपावरुन हरियाणातही निवडणूक आयोगानं राज्यसभेची मतमोजणी थांबवून ठेवली. भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांनी याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली. हरियाणात ९० आमदारांपैकी ८९ जणांनी राज्यसभेसाठी मतदान केलं. अपक्ष आमदार बलराज सिंग कुंडू यांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतला. याठिकाणी भाजपाचे कृष्णनलाल पवार आणि भाजपा पुरस्कृत कार्तिकेय शर्मा विजयी झाले. काँग्रेसचे अजय माकन यांचा पराभव झाला.
राजस्थानात राज्यसभेच्या चार पैकी तीन जागेवर काँग्रेसचे रणदीप सिंग सुरजेवाला, मुकूल वासनिक आणि प्रमोद तिवारी विजयी झाले. तर चौथ्या जागेवर भाजपा उमेदवार धनश्याम तिवारी यांचा विजय झाला. कर्नाटकातल्या राज्यसभेच्या चार जागांपैकी तीन जागांवर भाजपच्या केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अभिनेते जग्गेश आणि लेहरसिंग तर चौथ्या जागेवरून काँग्रेसचे जयराम रम���श विजयी झाले.
****
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला. परवा सत्र न्यायालयाने मतदानाची परवानगी नाकारल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात या निर्णयाला तातडीनं आव्हान देण्यात आलं होतं, त्यावर काल झालेल्या सुनावणीत ही याचिका सुनावणीसाठी योग्यच नसल्याचा दावा सरकारी पक्षाकडून करण्यात आला तर आपण घटनात्मक अधिकार मागत असून मलिक हे कोठडीत नसून रुग्णालयात असल्यानं त्यांना काही वेळ दिल्यास त्यांना हा अधिकार वापरता येईल असा युक्तीवाद मलिक यांच्या वकिलांनी केला होता.
दरम्यान, या निवडणुकीसाठी भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी रुग्णवाहिकेतून येऊन मतदानाचा हक्क बजावला.
****
वस्तू आणि सेवांच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींपासून ग्राहकांचं संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारनं, जाहिरातींसाठीच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नव्या सूचनांमुळे फसव्या जाहिरातबाजीला आळा बसेल, तसंच आमिष दाखवणाऱ्या जाहिराती आणि मुलांना केंद्रस्थानी ठेवून केलेल्या जाहिरातींना, या अटी लागू ��ोतील. सर्व माध्यमातल्या सर्व जाहिरातींसाठी या मार्गदर्शक सूचना लागू होतील, असं ग्राहक व्यवहार मंत्रालयालाचे सचिव रोहित कुमार यांनी, काल नवी दिल्ली इथं सांगितलं. या मार्गदर्शक सूचनांचं उल्लंघन केल्यास, CCPA- केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण त्याविरोधात कडक कारवाई करेल, अशी माहिती रोहितकुमार यांनी दिली.
****
केंद्रीय राखीव पोलीस दल -सीआरपीएफ देशाची अखंडता कायम राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचं, सीआरपीएफच्या पश्चिम क्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रणदीप दत्ता यांनी म्हटलं आहे. सीआरपीएफ मधल्या जनरल ड्युटीचे ४०१ पोलीस काल नागपूर इथल्या हिंगणा ग्रुप सेंटरमधून उत्तीर्ण झाले, या तुकडीचा दीक्षांत समारंभ आणि शपथविधी काल महानिरीक्षक दत्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. तब्बल ४४ आठवड्यांच्या बहुस्तरीय शिस्तबद्ध आणि कठोर प्रशिक्षणानंतर हे पोलीस या सेवेसाठी पात्र ठरतात.
****
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवादी युवक-युवतींना औद्योगिक प्रशिक्षण संस्था - आयटीआयमधून, व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार असून, त्यांच्यासाठी जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री, राजेश टोपे यांनी सांगितलं. ते काल मुंबईत यासंबंधित बैठकीत बोलत होते. गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यात दोन नवीन आयटीआय कॉलेज सुरु करण्यात येत असून, यात प्रवेशासाठी गुणांकनाची कोणतीही अट नसेल, असं टोपे यांनी यावेळी सांगितलं.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक आणि संस्कार भारतीचे संरक्षक पद्मश्री बाबा योगेंद्र यांचं काल उत्तरप्रदेशात लखनऊ इथं निधन झालं, ते ९८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर लखनऊ इथल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. संस्कार भारती या संस्थेच्या माध्यमातून बाबा योगेंद्र यांनी, कलासाधकांच्या मनात राष्ट्रभावना जागृत केली. बाबा योगेंद्र यांच्या निधनाबद्दल उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला आहे.
****
पवित्र प्रणालीद्वारे करण्यात आलेल्या किंवा करण्यात येत असलेल्या शिक्षक तसंच शिक्षकेतर पदांच्या नियुक्त्यांबाबत, संबंधित उमेदवाराचं नाव शालार्थ प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यासाठी, यापुढे वैयक्तिक मान्यता प्रदान करण्याची आवश्यकता नाही. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली. याबाबतचा शासन निर्णय काल जारी करण्यात आला.
****
यंदाच्या आषाढी ��ारीसाठी एसटी महामंडळातर्फे राज्यभरातून चार हजार गाड्या सोडण्याची तयारी आहे. याबाबत १४ जूनला होणाऱ्या सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या बैठकीनंतर निर्णय होणार असल्याची माहिती, एसटीचे सोलापूर विभागीय अधिकारी सुरेश लोणकर यांनी दिली. येणारी आषाढी वारी एसटी महामंडळाच्या दृष्टिकोनातून, सेवा देण्यासाठी सर्वात मोठी असावी, असा प्रयत्न केला जाणार असल्याचं, लोणकर यांनी सांगितलं.
पंढरपूर आषाढी यात्रा कालावधीत ड्रोन कॅमेऱ्याद्वारे छायाचित्रणास बंदी घालण्यात आली आहे. अप्पर जिल्हाधिकारी शमा पवार यांनी यासंबंधीचे आदेश काल जारी केले. ३० जून ते १३ जुलै पर्यंत हे आदेश लागू असतील.
****
राज्यात काल कोविड संसर्ग झालेले नवे तीन हजार ८१ रुग्ण आढळले. त्यामुळे राज्यभरातल्या कोविड बाधितांची एकूण संख्या, ७९ लाख चार हजार ७०९ झाली आहे. काल या संसर्गानं एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. राज्यात आतापर्यंत या संसर्गानं दगावलेल्या रुग्णांची एकूण संख्या, एक लाख ४७ हजार ८६६ झाली असून, मृत्यूदर एक पूर्णांक ८७ शतांश टक्के आहे. काल एक हजार ३२३ रुग्ण बरे झाले. राज्यात आतापर्यंत, ७७ लाख ४३ हजार ५१३ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले असून, कोविड मुक्तीचा दर ९७ पूर्णांक ९८ शतांश टक्के झाला आहे. राज्यात सध्या १३ हजार ३२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
मराठवाड्यात काल ११ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. यामध्ये लातूर जिल्ह्यातल्या आठ, तर नांदेड जिल्ह्यातल्या तीन रुग्णांचा समावेश आहे.
****
मराठवाडा साहित्य परिषदेचे २०२२ चे ग्रंथ पुरस्कार काल जाहीर झाले. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. लातूरचे प्राध्यापक अनिरुध्द पवार यांच्या 'मनासी संवाद' या आत्मचरित्राला, नरहर कुरुंदकर वाङ्गमय पुरस्कार, उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब इथले डॉ.केदार काळवणे यांच्या 'कल आणि कस' या समीक्षाग्रथांसाठी, प्राचार्य म.भि.चिटणीस वाङ्गमय पुरस्कार, सोलापूरच्या कविता मुरुमकर यांच्या 'उसवायचाय तुझा पाषाण' या कवितासंग्रहाला, कुसुमताई देशमुख काव्यपुरस्कार, औरंगाबादचे रमेश रावळकर यांच्या 'टिश्यू पेपर' या कादंबरीला, बी.रघुनाथ कथा -कादंबरी पुरस्कार, बीडचे डॉ.सतीश साळुंके यांच्या 'मराठवाड्यातील नाट्यपरंपरा' या बृहद संशोधनग्रंथाला, कुमार देशमुख नाट्यपुरस्कार, नारायणगावचे प्राध्यापक मिलिंद कसबे यांच्या 'साहित्य आणि लोककला: मार्क्स -आंबेडकरी दिशा' या ग्रंथाला, नरेंद्र मोहरीर वाङ्गमय पुरस्कार, विनायक रानडे यांना 'ग्रंथ तुमच्या दारी' ही चळवळ जगभर रुजवल्याबद्दल रा.ज. देशमुख स्मृतीपुरस्कार जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असं या पुरस्कारांचं स्वरुप आहे. औरंगाबाद इथं तीन जुलैला हे पुरस्कार समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याचं, ठाले पाटील यांनी सांगितलं.
****
केंद्र सरकारनं गेल्या आठ वर्षात ईशान्य भारताच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. ईशान्य भारत विकास इंजिन या संकल्पनेनुसार ईशान्य भारतात शांती करार तसंच अफस्पा कायद्यात कपात करण्यात आली आहे. या बाबत रुईया महाविद्यालयाच्या प्राध्यापक गायत्री लेले यांनी अधिक माहिती दिली...
बाईट - गायत्री लेले
****
जालना जिल्हा बालविवाहमुक्त होण्यासाठी सर्व विभागांनी समन्वय ठेवून, बालविवाहमुक्त गाव ही संकल्पना राबवावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात काल झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्ह्यात वर्षभरात ५२ बालविवाह रोखण्यात बालकल्याण समितीला यश आलं आहे.
****
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी खासगी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल कथित आक्षेपार्ह विधान केल्याच्या निषेधार्थ, मुस्लिम समाजातल्या संतप्त नागरिकांनी काल ठिकठिकाणी निदर्शनं केली. परभणी इथं काल जोरदार निषेध मोर्चा काढला. शाही मस्जिद, स्टेशनरोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो तरुण सहभागी झाले होते. शर्मा यांना तत्काळ अटक करावी, त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
औरंगाबाद इथं एमआयएमचे नेते खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात मुस्लीम समाजानं मोर्चा काढून नुपूर शर्मा यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध केला. औरंगाबाद जिल्ह्यात आडुळ, बिडकीन, दौलताबाद इथं मुस्लीम व्यावसायिकांनी काल बंद पाळला.
बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथं मुस्लिम समाजाच्या वतीनं नुपूर शर्मा विरोधात निदर्शनं करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं.
****
नैऋत्य मोसमी पाऊस दक्षिण कोकणात दाखल झाला आहे. पावसाच्या पुढच्या वाटचालीला हवामान अनुकूल असल्याचं, हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजात म्हटलं आहे. त्यामुळे मोसमी पावसाची आगेकूच सुरू राहील, आणि पुढच्या दोन ते तीन दिवसांत राज्याच्या अनेक भागात मोसमी पाऊस सक्रीय होईल, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
****
परभणी जिल्ह्यातल्या सेलू शहर परिसरात काल दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसानं वातावरणातला उष्मा काहिसा कमी झाला मात्र वीज पुरवठा काही काळ खंडीत झाला होता. सेलू तालुक्यातल्या राव्हा इथं बिस्मिल्ला नादेखाँ पठाण या महिलेचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला, तर रवळगाव इथं एक बैल वीज कोसळून दगावल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राच्या मल्लखांबच्या खेळाडूंनी सांघिक सुवर्णपदक पटकावलं आहे. ���ध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या संघांचं कडवं आव्हान मोडून काढत महाराष्ट्राचा संघ अवघ्या अर्ध्या गुणाने सर्वोत्तम ठरला. महाराष्ट्राच्या संघाने रोप, पोल आणि हँगिंग या प्रकारात कसरती केल्या. दोन दिवसांपूर्वी मुलींच्या संघाने मल्लखांब प्रकारात रौप्यपदक पटकावलं आहे. काल दुसरं सुवर्ण पदक ज्युदोमध्ये मिळालं. ४० किलो वजनी गटात मिथिला भोसले हिने ही सुवर्ण कामगिरी केली.
****
इंग्लंड इथं होणाऱ्या विम्बल्डन स्पर्धेसाठी कोल्हापूरची टेनिसपटू ऐश्वर्या जाधव हिची आशियाई संघात निवड झाली आहे. दिल्ली इथं झालेल्या वर्ल्ड ज्युनिअर टेनिस स्पर्धेतून या संघाची निवड करण्यात आली. यात १४ वर्षांखालील गटातील दोन मुले आणि दोन मुलींची निवड करण्यात आली. यात भारताच्या ऐश्वर्या जाधवसह जपानच्या अझुना इचीओका, कझाकिस्तानच्या झांगर नुरलानुली आणि कोरियाच्या सी हँयुक चो या चौघांचा समावेश आहे.
****
जागतिक दृष्टी दान दिवस काल पाळण्यात आला. सुप्रसिद्ध नेत्रविशारद डॉ. आर. ए. भालचंद्र यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हा दिवस 'दृष्टिदान दिन' म्हणून साजरा केला जातो. दृष्टीदानानं आपण एका व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण करू शकतो, त्यामुळे सर्वांनी नेत्रदानाचा संकल्प करूया, असं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
****
उस्मानाबाद इथं जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत येत्या १६ जून पर्यंत दृष्टीदान दिन सप्ताह साजरा होत आहे. या सप्ताहाला काल प्रारंभ झाला. या कार्यक्रमात २०२१ पासून आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान आणि अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींचं मरणोत्तर नेत्रदान करण्याऱ्या नातेवाईकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 August 2020 Time 18.00 to 18.10
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०४ ऑगस्ट २०२० सायंकाळी ६.०० **** ** अयोध्येत आज सायंकाळी शरयू घाटावर दीपोत्सव; राम मंदिराच्या भूमिपूजनाची सर्व तयारी पूर्ण ** कोविड प्रतिबंधासाठी तयार होत असलेल्या सिरम कंपनीच्या लसीची चाचणी दुसऱ्या टप्प्यात ** औरंगाबाद इथं आज दोन कोविडग्रस्तांचा मृत्यू; एकूण रुग्णसंख्या १५ हजाराच्या जवळ ** ज्येष्ठ रंगकर्मी इब्राहिम अल्काझी यांचं हृदय विकाराच्या धक्क्यानं निधन आणि ** जिल्हा दूध उत्पादक संघांनी नफेखोरी कमी करुन दुधाला वाढीव दर द्यावा - माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांची मागणी **** अयोध्येत उद्या होत असलेल्या राम मंदिराच्या भूमिपूजनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या अनुष्ठानाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सहा तासांचं विशेष अनुष्ठान केलं जात आहे. आज सायंकाळी दीपोत्सव साजरा केला जाणार असून शरयू नदीचे घाट सुशोभित करण्यात आले आहेत. संपूर्ण अयोध्येत भक्तीचं आणि श्रद्धेचं वातावरण असून ठिकठिकाणी भाविक भजनं गात आहेत. १३५ विशेष संतांना या सोहळ्यात निमंत्रित करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दुपारी अभिजीत मुहूर्तावर राम मांदिराचं विधिवत भूमिपूजन होणार आहे. यासाठी १७५ जणांना निमंत्रित करण्यात आलं आहे. **** कोविड प्रतिबंधासाठी तयार होत असलेल्या सिरम कंपनीच्या लसीची चाचणी दुसऱ्या टप्प्यात पोहोचली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय तसंच भारतीय आयुर्विज्ञान स��शोधन संस्था आयसीएमआर कडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आज ही माहिती देण्यात आली. जगभरात कोविड प्रतिबंधासाठी १४१ लसींची चाचणी सुरू आहे, त्यापैकी २६ लसींची मानवावर चाचणी केली जात असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. देशात या संसर्गाने होणारा मृत्यू दर दोन पूर्णांक दहा दशांश टक्के झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मरण पावणारे ५० टक्के रुग्ण हे ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे तर ३७ टक्के रुग्ण ४५ ते ६० वर्ष वयादरम्यानचे असल्याची माहिती या अधिकाऱ्यांनी दिली. **** औरंगाबाद इथं आज दोन कोविडग्रस्तांचा मृत्यू झाला, यापैकी एक शिऊर इथल्या ६५ वर्षीय पुरुष तर दुसरा जाधववाडी इथल्या ६० वर्षीय पुरुष आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४८९ जणांचा कोरोना विषाणू मुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, आज दिवसभरात १०० नव्या रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये ग्रामीण भागातल्या ६३ आणि महापालिका हद्दीतल्या ३७ रुग्णांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत १४ हजार ९९४ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ११ हजार २२९ रुग्ण बरे झाल्यानं सध्या तीन हजार २७६ जणांवर उपचार सुरु असल्याचं प्रशासनानं कळवलं आहे. **** सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत आहे सोलापूर महानगरपालिकेतल्या अनेक कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. या प्रार्श्वभूमीवर आता ई ऑफीस प्रणाली राबवण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे. **** जम्मू काश्मीरमध्ये शंभर टक्के घरांना विद्युत जोडणीचं लक्ष्य निर्धारित वेळेपूर्वी साध्य झालं आहे. या केंद्रशासित प्रदेशातल्या ३ कोटी ५७ लाख ४०५ घरांना विद्युत जोडणी देण्यात आली आहे. या उद्दीष्टपूर्ती साठी जम्मू काश्मीर ऊर्जाविकास विभागातल्या कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचं बक्षीसही देण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरमध्ये सुशासन प्रस्थापित करण्यासाठी अनेक प्रलंबित सुधारणा करण्यात आल्या आहेत. जमिनीच्या नोंदींची प्रक्रिया कार्यपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचं पुनर्गठन करण्यात आलं आहे, त्यासोबतच आर्थिक व्यवहार प्रक्रियेतही सुधारणा करण्यात आल्या आहेत. जम्मू काश्मीरचं दोन केंद्रशासित राज्यात विभाजन आणि कलम ३७० रद्द करण्याच्या निर्णयाला उद्या एक वर्ष पूर्ण होत आहे. **** न्यायालयांत चालणाऱ्या दीर्घकाळ आणि प्रलंबित असलेल्या खटल्यांसंदर्भात उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी चिंता व्यक्त केली आहे. न्यायप्रक्रिया जलद आणि सुलभ होण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला आहे. आंध्र विद्यापीठाच्या डॉक्टर बी. आर. आंबेडकर विधी महाविद्यालयाच्या ७६ व्या स्थापना दिवसाच्या अनुषंगानं आज एका ऑनलाईन कार्यक्रमात त्यांनी ही बाब नमूद केली. लोकांन कमी वेळेत आणि कमी खर्चात न्याय मिळायला हवा असं ते म्हणाले. लोकांनी कायद्याचे वेगवेगळे अर्थ काढू नयेत यासाठी कायदे हे नेहमीच सरळ आणि सोपे असावेत असंही त्यांनी सांगितलं. **** ज्येष्ठ रंगकर्मी इब्राहिम अल्काझी यांचं आज नवी दिल्लीत निधन झालं. ते ९४ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानं, त्यांचा मृत्यू झाला. राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे सर्वाधिक काळ संचालक राहिलेल्या अल्काझी यांनी प्रसिद्ध नाटककार गिरीश कर्नाड यांच्या तुघलक, धर्मवीर भारती यांच्या अंधा युग या सह अनेक नाटकांची निर्मिती केली. नसीरुद्दीन शहा, ओम पुरी या सारख्या कलाकारांच्या अनेक पिढ्या अल्काझींच्या मार्गदर्शनात तयार झाल्या आहेत. **** केंद्रीय लोकसेवा आयोगानं, नागरी सेवा परीक्षा २०१९ चे अंतिम निकाल आज जाहीर केले. या निकालात मुलांमधे प्रदीप सिंग यानं, तर मुलींमधे प्रतिभा वर्मा हीनं पहिला क्रमांक पटकावला आहे. नांदेड जिल्ह्याच्या नायगांव तालुक्याच्या शेळगांव गौरी इथले योगेश अशोक बावणे यांनी या परीक्षेत ६३ वा रँक मिळवला आहे. तर अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातल्या मोहरी इथले महेश बाळासाहेब गीते यांनी इतर मागास प्रवर्गामधून ३९९ वा रँक मिळवला आहे. नागरी सेवांच्या एकूण ९२७ पदांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती. निकालानंतर भारतीय प्रशासकीय, परराष्ट्र व्यवहार, आणि भारतीय पोलीस सेवेतल्या विविध पदांसाठी एकूण ८२९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. **** पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात बदली करण्यात आली आहे. चार वर्षांसाठी त्यांची पंतप्रधान कार्यालयात नियुक्ती झाल्याचा आदेश आज जारी करण्यात आला आहे. **** अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी केला आहे. ते आज पत्रकारांशी बोलत होते. सुशांतच्या मृत्यूपूर्वी त्याच्या घरी झालेल्या पार्ट्यांना कोण कोण हजर होतं, त्याचा तपास करावा, गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता असलेल्या रिया चक्रवर्तीचा तपास करून चौकशी करावी, असं आवाहन राणे यांनी केलं. दरम्यान, बिहार सरकारने सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग - सीबीआयमार्फत तपासणीची शिफारस केली आहे. या प्रकरणाच्या तपासात महाराष्ट्र पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी केला आहे. बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी, या मागणीचं स्वागत केलं आहे. या प्रकरणात आता सत्य समोर येईल, असा विश्वा�� यादव यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप महाराष्ट्राचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. आरोप करून प्रतिमा खंडन करण्याचं तंत्र नवीन नाही, हेच तंत्र वापरून युवा नेते आदित्य ठाकरे यांची प्रतिमा मलीन केली जात असल्याचा आरोप, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला. या संदर्भात ज्यांच्याकडे पुरावे आहेत, त्यांनी ते समोर घेऊन यावं, असं आवाहन परब यांनी केलं. दरम्यान, गौरी गणपतींसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटीचे दर नियमितच असतील, कोकणात जाणाऱ्या सर्वांना केंद्र सरकारच्या नियमानुसार दहा दिवस विलगीकरणात राहावं लागेल, असं परब यांनी सांगितलं. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं थकलेलं वेतन लवकरच दिलं जाईल अ��ी माहिती परिवहन मंत्री परब यांनी ट्विटरवरून दिली. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना मे महिन्यात फक्त पन्नास टक्के वेतन दिलं होतं, तसंच जून महिन्याचं वेतन अजूनही मिळालेलं नाही. यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी ५५० कोटी रुपये निधीला मान्यता मिळाल्याची माहिती परब यांनी दिली आहे. **** जिल्हा दूध उत्पादक संघांनी नफेखोरी कमी करुन दुधाला वाढीव भाव देण्याची मागणी काँग्रेस पक्षाचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ. कल्याण काळे यांनी केली आहे. ते आज या संदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. जिल्हा दूध उत्पादक संघ शेतकऱ्यांच्या दुधाला २० रुपये प्रतिलिटर भाव देतो आणि तेच दूध ४० रुपये प्रतीलिटर दराने विकण्यात येतं. औरंगाबाद जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दूध दरवाढीसाठी आंदोलन न करता भाव वाढवून द्यावा, असं काळे यांनी म्हटलं. देशात पाच वर्ष पुरेल एवढी दूध भुकटी असतांनाही केंद्र सरकारनं दुधाचे भाव पाडण्यासाठी न्यूझीलंडहून १० हजार मेट्रीक टन दूधभुकटी खरेदी केल्याचा आरोप काळे यांनी केला. **** जालना जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आजपर्यंत एक लाख चार हजार १३७ शेतकऱ्यांना ५३२ कोटी २१ लाख रुपयांच्या पीक कर्जाचं वाटप करण्यात आलं आहे. जिल्ह्याचं खरीप पीककर्ज वाटपाचं एकूण उद्दिष्ट १ हजार ११५ कोटी ३१ लाख ९० हजार रुपये असून, उद्दिष्टाच्या ४८ टक्के पीककर्जाचे वाटप पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिली आहे. **** कोविड १९ प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लागू असलेल्���ा टाळेबंदी काळात लातूर शहरातल्या निवृत्ती वेतन धारकांना तसंच शासकीय योजनेच्या लाभार्थ्यांना आता बँकेकडून घरपोहोच सेवा मिळणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख यांच्या सूचनेनुसार निवृत्ती वेतनधारक आणि संजय गांधी निराधार योजना तसंच इतर शासकीय योजनेतल्या लाभधारकांना घरपोच सेवा देण्याचं राष्ट्रीयकृत ��ँकांनी मान्य केलं आहे. त्यासाठी बँकांकडून शहराच्या निरनिराळ्या भागात विविध संस्थांच्या प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली आहे. लाभधारकांनी या प्रतिनिधींशी संपर्क केल्यास त्यांना हवी ती रक्कम घरपोच मिळणार आहे. **** सोलापूर इथले जुन्या पिढीतले ज्येष्ठ संगीततज्ञ, संगीत शिक्षक भालचंद्र पंचवाडकर यांचं आज पुण्यात वार्धक्यानं निधन झालं. ते ९१ वर्षांचे होते. एक तळमळीचे संगीत शिक्षक म्हणून ते परिचित होते. ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 29 August 2019 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २९ ऑगस्ट २०१९ सायंकाळी ६.०० **** राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनात, राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा ॲथलिट दिपा मलीक यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. अष्टपैलू क्रिकेटपटू ��विंद्र जडेजा, फुटबॉलर गुरुप्रीत सिंग सिंधु, हॉकीपटू चिंगलेनसना कांगुजम, धावपटू मोहम्मद अनस, ॲथलीट स्वपना बर्मन आणि नेमबाज अंजूम मुदगील यांना अर्जून पुरस्कार, तर क्रिकेटपटू संजय भारद्वाज यांना द्रोणाचार्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. हॉकीपटू मेन्युअल फेड्रीक, टेनिसपटू अरुप बसक, कुस्तीपटू मनोज कुमार, तीरंदाज सी लालरेमसंगा आणि टेनिसपटू नीतीन कीर्तने यांना ध्यानचंद पुरस्कार प्रदान करण्यात आला. साहसी क्रीडा प्रकारासाठीचा तेनसिंग नोर्गे क्रीडा पुरस्कार पोलिस अधिकारी अपर्णा कुमार, मणिकंदन के, प्रभात राजू कोळी, रामेश्वर जांगडा, सुभेदार मेजर वांगचुक शेर्पा यांना प्रदान करण्यात आला. दीपांकर घोष यांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आला. **** राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्यासाठी शासनानं नियोजनबद्ध पाऊले टाकण्यास सुरुवात केली असून मार्च २०२० पर्यंत यासाठीचा परिपूर्ण आराखडा तयार होईल असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाच्या वतीनं मुंबईत घेण्यात आलेल्या व्याख्यानमालेत "महाराष्ट्र: एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल" याविषयावर ते आज बोलत होते. उद्योग क्षेत्रातलं महिलांचं ९ टक्के योगदान २० टक्क्यांवर नेण्याचा संकल्प राज्याच्या औद्योगिक धोरणात जाहीर करण्यात आला असल्याचंही त्यांनी सांगितलं. **** राष्ट्रवादी काँग्रेसचे रायगड जिल्ह्यातल्या श्रीवर्धनचे आमदार अवधूत तटकरे यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत शिवसेना प्रमुखांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानी भेट घेतली. अवधूत तटकरे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना अवधूत यांनी, राजकारणाच्या मुख्य प्रवाहात राहण्याची इच्छा असल्यानं ठाकरे यांची भेट घेतली असून, येत्या दोन दिवसांत निर्णय जाहीर करणार असल्याचं सांगितलं. अवधूत हे रायगडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत. **** धुळे जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू झाली आहे. त्यामुळे क्षेत्रीय अधिकार्यांनी प्रत्येक मतदान केंद्रातील सुविधांची पाहणी करावी, तसेच तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश धुळे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डी.गंगाथरन यांनी दिले आहेत. आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रात आवश्यक बाबींची खात्री करावी, संवेदनशील, अतिसंवेदनशील केंद्र, निवडणुकीसाठी लागणारे मनुष्यबळ, आवश्यक साहित्य, पोलिस ��ंदोबस्त आदींची यादी तयार करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळेस दिल्या. **** लातुर जिल्ह्यातल्या आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी असलेल्या महिला बचत गटाच्या कुटुंबांना गोल्डन कार्ड तयार करून देण्यासाठी महानगरपालिका विशेष मोहीम राबवित आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत शहरी भागातील लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये त्यासाठी विशेष शिबीराचं आयोजन करण्यात येणार असुन सर्व लाभार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, असं आवाहन जिल्हा समन्वयक डॉ कुलदीप शिरपूरकर यांनी केलं आहे **** अमरावती इथं उत्तम पायाभूत सुविधांसाठी निधी आणि वेळेत काम पूर्ण करण्यावर शासनानं भर दिल्यानं जिल्ह्यातील शहरांची आदर्श नगरपालिकेकडे वाटचाल होत असल्याचं प्रतिपादन कृषी मंत्री तथा पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केलं. ते आज वरुड इथं एका कार्यक्रमात बोलत होते. जिल्ह्यात. प्रशासकीय इमारती, जलतरण तलाव, पाणी पुरवठा आदी कामांसह भूमिगत वीजवाहिनीसारखे उपक्रम प्रस्तावीत आहेत. असं ते यावेळी म्हणाले. ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 June 2019 Time 18.00 to 18.05
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १७ जून २०१९ सायंकाळी ६.०० **** राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला आज सुरुवात झाली. अधिवेशाच्या सुरुवातीलाच विधानभवन परिसरात विरोधक आणि सत्ताधारी आमने–सामने आले आणि कालच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत आणि दुष्काळावर त्यांनी जोरदार घोषणा बाजी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रथम नवीन मंत्र्यांच्या परिचय करुन दिला. तसंच अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी काल राजीनामा दिलेल्या सहा मंत्र्यांचे राजीनामे स्वीकारले. त्याशिवाय गिरीश बापट, अनिल गोटे, राधाकृष्ण विखे पाटील, प्रतापराव चिखलीकर, उन्मेश पाटील, हेमंत पाटील तसंच सय्यद इमतियाज जलील यांचे राजीनामेही स्वीकारले. विधान परिषदेत आज पहिल्याच दिवशी अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी २०१८-१९ चा राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला अहवालातील आकडेवारीची वस्तुस्थिती पडताळून पाहण्यासाठी समिती नेमावी अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली. देशाच्या विकासदाराचा आकडा फुगवून सांगितलेला असून त्यात राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आक्षेप मुंडे यांनी यावेळी घेतला. याला उत्तर देताना अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी स्थिर किंमतीवर आधारित असल्यामुळं त्यात कोणताही बदल करण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हटलं. **** राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज विधीमंडळात सादर झाला. २०१८-१९ च्या अंदाजानुसार राज्याच्या अर्थव्यवस्थेत सात पूर्णांक पाच दशांश टक्के वाढ अपेक्षित आहे. गेल्या वेळी देखील इतकाच म्हणजे सात पूर्णांक पाच दशांश टक्क्यांनी अर्थव्यवस्था वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. कृषीच्या दरात दोन पूर्णांक आठ दशांश टक्क्यांची घट अपेक्षित असून कृषी दर चार टक्के असण्याचं पुर्वानुमान आहे. उद्योग क्षेत्रातही सात टक्क्यांनी घट अपेक्षित आहे. सेवा क्षेत्राच्या दरात नऊ पूर्णांक दोन दशांश टक्के इतकी वाढ होण्याचं पुर्वानुमान आहे. **** सतराव्या लोकसभेच्या पहिल्या सत्राला आज सुरुवात झाली. हंगामी सभापती डॉ. विरेंद्र कुमार यांनी सभासदांना शपथ दिली. सर्वप्रथम पंतप्रधान आणि सभागृह नेते नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली आणि सभासदांचं स्वागत केलं. त्यानंतर राजनाथ सिंग, अमित शहा, नितीन गडकरी, डी.व्ही. सदानंद गौडा, हरसिम्रत कौर बादल, रवी शंकर प्रसाद, संतोष गंगवार तसंच राहुल गांधी यांच्यास�� इतरांनी खासदारपदाची शपथ घेतली. **** दक्षिण काश्मीरमध्ये अनंतनाग जिल्ह्यातल्या अच्छाबल परिसरात दहशतवाद्यांशी चकमकीत एक मेजर शहीद झाले असून अन्य एक मेजर आणि दोन सैनिक आज जखमी झाले आहेत. जखमींना लष्कराच्या श्रीनगर रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. अनंतनाग जिल्ह्यातील या भागात दहशतवादी लपून बसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर शोध मोहीम हाती घेण्यात आली असता ही चकमक उडाल्याचं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. **** कोलकत्ता इथं डॉक्टरांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भारतीय वैद्यक संघटनेनं पुकारलेल्या आजच्या बंदमध्ये औरंगाबाद, परभणी, हिंगोली तसंच नाशिक पालघर, कोल्हापूर, वाशीम जिल्ह्यांत बहुतांश खाजगी दवाखाने बंद आहेत. औरंगाबाद जिल्हयात सुमारे पंधराशे डॉक्टर आंदोलनात सहभागी झाले. परभणीत डॉक्टरांनी या आंदोलनानिमित्त काढलेल्या फेरीत सर्व वैद्यकीय संघटनांनी सहभाग घेतला. **** भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी मतदान यंत्र- `ईव्हीएम` हटवून मतपत्रिकेद्वारे मतदान असावं, या मागणीसाठी औरंगाबाद, परभणी, हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज घंटानाद आंदोलन केलं. आगामी विधानसभा, जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेची निवडणूक मतपत्रिकेद्वारे घेण्यात यावी या प्रमुख मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं. **** येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तसंच दक्षिण कोकणात बहुतांश ठिकाणी, उत्तर कोकणात अनेक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. **** औरंगाबाद महानगरपालिकेचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी पदाचा दुरूपयोग करून भष्ट्राचार केल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम पक्षानं महानगरपालिकेसमोर आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं. आंदोलकांनी यावेळी घोषणाबाजी करत महापौरांच्या प्रतिमेला काळं फासलं. **** बुलडाणा जिल्ह्यातील खामगांव तालुक्यात सुटाळा इथं आज महसूल विभाग आणि पोलिसांच्या कारवाईत स्वस्त धान्य दुकानदारांकडून काळ्याबाजारात जाणारा ५० किंटल गहू जप्त करण्यात आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 20 November 2017 Time 6.50 AM to 7.00 AM
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक २० नोव्हेंबर २०१७ सकाळी ६.५० मि. ******* • साखर कारखानदारांशी चर्चा करुन दोन दिवसात ऊस दरावर तोडगा काढला जाईल-सहकार मंत्री सुभाष देशमुख • ४८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून गोव्यात सुरुवात • आधार कार्डशी संलग्न नसलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं जूनपासूनचं थकित मानधन रोखीनं देण्याचा निर्णय • इंदिरा गांधी शांतता, पुरस्कार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जाहीर आणि • कोलकाता क्रिकेट कसोटी सामन्यात दुसऱ्या डावात भारताच्या एक बाद १७१ धावा **** राज्यातल्या साखर कारखानदारांशी चर्चा करुन दोन दिवसात ऊसाच्या दरावर तोडगा काढला काईल असं आश्वासन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलं आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या पंढरपूर तालुक्यात वाखरी इथं गेल्या आठ दिवसांपासून तीन शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत. या शेतकऱ्यांची देशमुख यांनी भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. या शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घ्यावं अस आवाहन त्यांनी यावेळी केलं. आपण या ठिकाणी कारखानदार म्हणून नाही तर सरकारचा प्रतिनिधी म्हणून आल्याचं देशमुख म्हणाले. ऊस दर आंदोलनात आपणास जाणीवपूर्वक लक्ष केलं जात असल्याचा आरोपही देशमुख यांनी यावेळी केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यावेळी उप��्थित होते. दरम्यान, काल सोलापूर जिल्ह्यात ऊस दरवाढीसाठी वेगवेगळ्या भागात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं. **** राज्यातल्या साखर कारखान्यांनी ऊसाचा दर लवकरात लवकर जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली आहे. ते काल अहमदनगर ���थं वार्ताहरांशी बोलत होते. यामुळे शेतकरी त्यांना परवडेल त्या कारखान्यांना ऊस देऊ शकतील. शेवटच्या हप्त्यात शेतकऱ्यांना ऊसाचा पाहिजे तो भाव मिळाला नाही तर त्यांनी आंदोलनाचा मार्ग निवडावा, असं ते म्हणाले. **** अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी दूरध्वनीवरुन जातीवाचक वक्तव्य करणं हा गुन्हा असून, त्यासाठी पाच वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे. न्यायालयानं एका व्यक्ती विरोधात अपराधाबाबत कारवाई रोखण्यास तसंच प्रथम माहिती अहवाल रद्द करण्यास नकार दिला आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतल्या एका महिलेला सार्वजनिक ठिकाणी दूरध्वनीवरुन जातीवाचक टिपण्णी केल्याच्या विरोधात दाखल याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला. **** गोव्यातल्या पणजी इथं आजपासून ४८ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात होत आहे. प्रसिद्ध अभिनेते शाहरूख खान यांच्या हस्ते या महोत्सवाचं उदघाटन होईल. माहिती आणि प्रसारण मंत्री स्मृती इराणी यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्यास उपस्थित असणार आहेत. या महोत्सवात ४२ भारतीय चित्रपटांसह एकूण २०० चित्रपट दाखवले जाणार आहेत. **** बँक खाती आधार कार्डशी संलग्न न केल्यामुळे ज्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं जून २०१७ पासूनचं मानधन बाकी आहे, त्यांना ते रोखीनं देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांची बँक खाती आधार कार्डशी संलग्न करण्यात यावीत, असे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालयास दिले आहेत. **** माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना काल त्यांच्या शंभराव्या जयंती दिनानिमित्त देशभर आदरांजली वाहण्यात आली. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी यांचं समाधीस्थळ शक्तीस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून इंदिरा गांधी यांचं स्मरण करुन आदरांजली वाहीली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यावेळी राष्ट्रीय एकात्मता दिनामिमित्त मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. दरम्यान, यंदाचा इंदिरा गांधी शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जाहीर झाला आहे. इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टनं ही माहिती दिली. मनमोहन सिंग यांनी २००४ ते २०१४ या काळात देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. **** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन एआयआर डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. **** भारतीय राज्य घटनेचा मुलभूत आधार महाभारत असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेचा मसुदा तयार करताना राज्य घटना, सर्वोच्च न्यायालय आणि स्त्री या तिनही क्षेत्राच्या समतोल अधिकाराचा समन्वय साधला असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती विकास सिरपुरकर यांनी म्हटलं आहे. लातूर इथल्या श्रीमती गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेच्या वतीनं देण्यात येणारा राष्ट्रीय न्याय गौरव पुरस्कार सिरपुरकर यांना काल प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु पंडित विद्यासागर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. **** जालना जिल्हा पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी अधिकाधिक लोकसहभागाची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केलं. आष्टी इथं विविध कामांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या शेतीला शाश्वत आणि मुबलक पाणी पुरवठ्यासाठी जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून विकेंद्रीत पाणीसाठे निर्मितीवर भर देण्यात येत असल्याचं ते म्हणाले. **** मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं मराठवाड्यातल्या गोरगरिब जनतेला न्याय देण्याचं महत्वाचं काम केलं आहे असं मुख्य न्यायमूर्ती डॉ.मंजुला चेल्लूर यांनी म्हटलं आहे. खंडपीठातल्या वकिल कक्षाच्या इमारत बांधकामाचं भूमीपूजन डॉ. चेल्लूर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. शहरातल्या वकिलांच्या उत्कृष्ट कार्यामुळे खंडपीठाचा दर्जा उंचावला असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. **** कोपर्डी इथल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार आणि हत्येच्या घटनेतल्या दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी रिपब्लिकन सेनेचे संस्थापक आनंदराज आंबेडकर यांनी केली आहे. ते आज जालना इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. अत्याचारासारखं कृत्य करणाऱ्यांना कठोर शिक्षा करणं गरजेचे असल्याचं ते म्हणाले. **** बीड जिल्ह्यातल्या परळी शहराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी येत्या तीन महिन्यात नविन पाणी पुरवठा योजना पूर्ण करणार असल्याचं आश्वासन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिलं. ते काल शहरातल्या रस्त्यांच्या कामांच्या शुभारंभ तसंच लोकार्पण करतांना बोलत होते. नगरोत्थान योजनेअंतर्गत १०० कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची कामं पूर्ण केली जाणार असल्याचं मुंडे यांनी यावेळी सांगितलं. **** कोलकाता इथं सुरु असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्यात काल दिवसअखेर भारतानं दुसऱ्या डावात ��क गडी बाद १७१ धावा करत श्रीलंकेवर ४९ धावांची आघाडी घेतली. यात शिखर धवनच्या ९४ धावांचा समावेश आहे. कालचा खेळ संपला तेव्हा लोकशे राहुल ७३ आणि चेतेश्वर पुजारा दोन धावांवर खेळत होते. तत्पूर्वी, श्रीलंकेचा संपूर्ण संघ २९४ धावा करून बाद झाला. श्रीलंकेला पहिल्या डावात १२२ धावांची आघाडी मिळाली. भारताकडून भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी चार तर उमेश यादवनं दोन बळी घेतले. आज सामन्याचा अंतिम दिवस आहे. **** सोलापूर जिल्ह्यातल्या तळे हिप्परगावजवळ रस्ता ओलांडणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना भरधाव ट्रकनं धडक दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. काल पहाटे हा अपघात झाला. मृत तिघेही सोलापूरचे रहीवाशी होते. **** जळगाव जिल्ह्याच्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या चिखली गावाजवळ टँकरनं धडक दिल्यानं एका महिलेसह तिच्या तीन मुलांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. काल सकाळी हे कुटुंब चिखली गावाकडे जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर टँकरचा चालक फरार झाला आहे. *******
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 November 2017 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १९ नोव्हेंबर २०१७ दुपारी १.०० वा. ******* व्यापारी आणि उत्पादकांनी वस्तू आणि सेवा कराच्या दरात केलेल्या कपातीचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचवावा असं आवाहन केंद्रीय महसूल सचिव हसमुख अढिया यांनी व्यापारी आणि उत्पादकांना केलं आहे. दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. प्रत्येक किरकोळ विक्रेत्यानं कमी किंमतीत सगळे कर समाविष्ट होतील, याची खात्री करुन घ्यावी, असं ते म्हणाले. जीएसटी रेट फाईंडर ॲपवर ग्राहक जीएसटीच्या नवीन दरांबाबत माहिती बघू शकतात, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याच्या जीएसटी विवरणपत्रात बदल करण्याची सुविधा उद्यापासून उपलब्ध होणार असल्याचं जीएसटी मंत्रीगटाचे अध्यक्ष सुशील कुमार मोदी यांनी सांगितलं. इन्फोसिसच्या मदतीनं हे काम केलं जाईल असं ते म्हणाले. वस्तू आणि सेवा कराच्या दरात २०० वस्तूंमागे कपात करण्यात आली असून, या कपातीचा गैर फायदा घेणाऱ्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. **** देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज शंभरावी जयंती. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी इंदिरा गांधी यांचं समाधीस्थळ शक्तीस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विटरच्या माध्यमातून इंदिरा गांधी यांचं स्मरण करुन आदरांजली वाहीली. दरम्यान, यंदाचा इंदिरा गांधी शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जाहीर झाला आहे. इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्टनं ही माहिती दिली. मनमोहन सिंग यांनी २००४ ते २०१४ या काळात देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. **** काँग्रेस पक्षाच्या नव्या अध्यक्षाच्या निवडणूकीच्या कार्यक्रमाच्या मंजुरीसाठी उद्या दिल्लीत बैठक होणार आहे. समितीनं निवडणूक कार्यक्रमाला मंजुरी दिल्यानंतर पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीकडून याबाबतची अधिसूचना काढली जाणार आहे. निवडणूक प्रक्रिया नऊ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी पूर्ण केली जाण्याची शक्यता असल्याचं पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. निवडणूक आयोगानं पक्षांतर्गत निवडणूक पूर्ण करण्यासाठी पक्षाला या वर्षअखेर पर्यंतची मुदत दिली असल्यामुळे ही निवडणूक ३१ डिसेंबरपूर्वी करणं आवश्यक आहे. **** भारतातल्या कारागृहात शिक्षेचा कालावधी पूर्ण केल्यानंतरही शिक्षा भोगत असलेल्या पाकिस्तानी आणि अन्य देशांच्या कैद्यांबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. शिक्षा पूर्ण केलेल्या कैद्यांना मायदेशी परत पाठवण्याची मागणी करणाऱ्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयानं हे निर्देश दिले. **** एक्क्याण्णवं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन १६ ते १८ फेब्रुवारी २०१८ दरम्यान बडोदा इथं होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बडोदा इथं झालेल्या बैठकीत महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी ही घोषणा केली. बडोद्यातल्या सयाजीराव विद्यापीठाच्या परिसरात हे संमेलन होणार असून, स्वागताध्यक्षपदी शुभा��गिनी गायकवाड असतील. या संमेलनात परिसंवाद, विसंमेलन, कवितावाचन, कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रम होणार आहेत. **** राज्यातल्या साखर कारखान्यांनी आपला ऊसाचा दर लवकरात लवकर जाहीर करावा ज्यामुळे शेतकरी ज्यांना परवडेल त्यांना ऊस देऊ शकेल, अशी मागणी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी केली आहे. ते आज अहमदनगर इथं वार्ताहरांशी बोलत होते. शेवटच्या हप्त्यात शेतकऱ्यांना ऊसाचा पाहिजे तो भाव मिळाला नाही तर आंदोलनाचा मार्ग निवडावा, असं ते म्हणाले. **** सोलापूर जिल्ह्यातल्या तळे हिप्परगावजवळ रस्ता ओलांडणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना भरधाव ट्रकनं धडक दिल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. आज पहाटे हा अपघात झाला. मृत तिघेही सोलापूरचे रहीवाशी होते. **** हैदराबाद रेल्वे विभागात घेण्यात आलेल्या ब्लॉक मुळे नांदेड ते मेडचल पेसेंजर गाडी आजपासून ते २५ नोव्हेंबर पर्यंत न निझामबाद पर्यंतच धावणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड जनसंपर्क कार्यालयानं ही माहिती दिली आहे. **** शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा या मागणीसाठी आणि स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू न केल्याबद्दल जाब विचारण्याकरता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं उद्या नवी दिल्लीत आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुणे इथं ही माहिती दिली. **** उस्मानाबाद जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर करावा आणि नंतरच ऊस तोडावेत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं काल तुळजापूर तालुक्यातल्या हंगरगा पाटीजवळ ऊस गाड्या अडवून आंदोलन केलं. या मागणीवर सकारात्मक विचार न झाल्यास यापुढे हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. *******
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 03 SEP. 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ०३ सप्टेंबर २०१७ दुपारी १.००वा.
**** केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला असून, चार कॅबिनेट आणि नऊ राज्यमंत्र्यांना आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. पीयूष गोयल, निर्मला सीतारामन, धर्मेंद्र प्रधान, मुख्तार अब्बास नक्वी या राज्यमंत्र्यांना बढती देण्यात आली असून, त्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. उत्तर प्रदेशमधले राज्यसभा सदस्य शिव प्रताप शुक्ल, बिहारचे अश्विनी कुमार चौबे, राजकुमार सिंग, मध्य प्रदेशचे डॉ. विरेंद्र कुमार, कर्नाटकचे अनंत कुमार हेगडे, सत्यपाल सिंह, राजस्थानचे गजेंद्र शेखावत, के अल्फोन्स आणि हरदीप पुरी यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह सर्व केंद्रीय मंत्री आणि खासदार यावेळी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन मंत्र्यांचं अभिनंदन केलं. या मंत्र्यांचा अनुभव मंत्रिमंडळाला होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. या मंत्र्यांना खातेवाटप लवकरच होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. दरम्यान, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभु यांनी मंत्रालय सोडण्याचे संकेत दिले असून, त्यांनी ट्विटरवरुन रेल्वे कर्मचाऱ्यांचे आभार मानले. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन आणि म्यानमार या दोन देशांच्या दौऱ्यावर रवाना झाले. चीनमधल्या झीयान शहरात होणाऱ्या ९ व्या ब्रीक्स शिखर परिषदेला ते उपस्थित राहणार आहेत. प्रबळ ब्रिक्स भागीदारीसाठी आपण चीनसह पाचही सदस्य देशांशी एकत्रित विकासासंदर्भात सकारात्मक चर्चा करणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले. **** जम्मू काश्मीरमधल्या पूंछ जिल्ह्यात पाकिस्ताननं आज पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत, मोठ्या प्रमाणावर गोळीबार केला. पाकिस्तानी सैन्यानं लष्कराच्या चौक्या आणि रहीवाशी भागांना लक्ष्य केलं. सीमेवर तैनात भारतीय जवानांनीही या गोळीबाराला चोख प्रत्यूत्तर दिलं. **** वैद्यकीय प्रवेशासाठीच्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परिक्षा - नीट मध्ये उत्तीर्ण न झाल्यानं तामिळनाडूमधल्या एका विद्यार्थीनीनं आत्महत्या केल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात हजारो विद्यार्थी आंदोलन करत आहेत. चे��्नईत विद्यार्थ्यांनी व्यापक आंदोलनाचा इशारा दिला आहे. अनेक जागांवर नाकेबंदी करण्यात आली असून, आंदोलनकर्त्यांना अटक करण्यात आली. अनिता असं या विद्यार्थीनीचं नाव असून, तीनं नीट परिक्षेसंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. मात्र तिच्या बाजूनं निकाल न लागल्यानं तीनं गेल्या शुक्रवारी आत्महत्या केली. **** विमुद्रीकरणानंतर ज्या व्यक्ती आणि व्यापारी संस्थांनी दोन लाख कोटींपेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली आहे, त्यांनी कधीही प्राप्तीकर विवरणपत्र सादर केलं नव्हतं, अशी धक्कादायक माहिती केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अहवालातून समोर आली आहे. ��पलब्ध आकडेवारीनुसार अशा व्यक्ती आणि संस्थांची संख्या २२ लाख २२ हजार इतकी आहे. रोख रक्कम जमा करणार्या व्यक्तींपैकी एक तृतीयांश जणांनी त्यांचा उत्पन्नाचा तपशील सादर केला नसल्याचंही याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** हिंगोली जिल्ह्यात तूर खरेदी गैरप्रकाराची संपूर्ण चौकशी करून दोषींविरूध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, तसंच निकषात बसूनही ज्यांची तूर खरेदी झाली नाही त्यांची खरेदी होण्यासाठीही प्रयत्न करू असं आश्वासन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिलं आहे. खासदार राजीव सातव यांच्यासह शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. ज्या शेतक-यांची नावं संबंधीत यादीत नव्हती, त्यांनी घोषणापत्र दाखल केलं नाही, तरीही त्यांची तूर खरेदी झाली, मात्र घोषणापत्र देऊनही अनेक शेतकरी तूर खरेदीपासून वंचित आहेत. त्यांना शासनानं न्याय द्यावा, अशी मागणी सातव यांनी केली. जालना इथंही तूर खरेदी घोटाळा प्रकरणात ७८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. **** औरंगाबादच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीनं उत्कृष्ट संशोधनासाठी देण्यात येणाऱ्या नॅशनल रिसर्च प्रोफेसर पुरस्काराचं वितरण उद्या नवी दिल्लीच्या राष्ट्रीय भौतिकशास्त्र प्रयोगशाळेचे संचालक ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर पी.के.अस्वाल यांच्या हस्ते केलं जाणार आहे. प्राणीशास्त्र विभागाचे डॉक्टर महेंद्र सिरसाठ, डॉक्टर के.एम.जाधव, डॉक्टर रामफल शर्मा, रसायनशास्त्र विभागाचे डॉक्टर सी.एच.गील, डॉक्टर बापू शिंगटे, संगणकशास्त्र विभागाचे डॉक्टर के.व्ही.काळे, ग्रंथालयशास्त्र विभागाच्या डॉक्टर वैशाली खापर्डे आणि रसायनतंत्रज्ञान विभागाचे डॉक्टर अनिकेत सरकटे यांना हा पुरस्कार जाहिर झाला आहे. **** भारत आणि श्रीलंकेदरम्यान सुरु असलेल्या पाच एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला शेवटचा सामना आज कोलंबो इथं होणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजता सामन्याला सुरुवात होईल. याआधीचे चारही सामने जिंकून भारतानं मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. ****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 17 July 2017 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १७ जुलै २०१७ दुपारी १.००वा.
**** संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झालं. लोकसभेत दिवंगत सदस्यांना श्रद्घांजली अर्पण करण्यात आली. यात लोकसभेचे दिवंगत खासदार विनोद खन्ना, पर्यावरण मंत्री अनिल माधव दवे यांच्यासह सहा आजी माजी सदस्यांना, तसंच जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्यांना यावेळी श्रद्घांजली अर्पण करण्यात आली. लोकसभेत फारुख अब्दुल्ला आणि पी के कुन्हालिकुट्टी या नवीन सदस्यांना शपथ देण्यात आली. राज्यसभेत सभापती मोहम्मद हमीद अन्सारी यांनी आठ दिवंगत सदस्यांना श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला. दिवंगत सदस्यांना, तसंच दहशतवादी हल्ल्यात आणि काल झालेल्या अपघातात ठार झालेल्या अमरनाथ यात्रेकरुंना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अनेक राज्यात आलेल्या पुरात मरण पावलेल्या नागरिकांप्र��ी राज्यसभेनं शोक व्यक्त केला. यानंतर दोन्ही सदनांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं. दरम्यान, विद्यमान राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा कार्यकाळ येत्या २४ जुलैला संपत असून, त्यांना येत्या २३ जुलैला एका विशेष समारंभात संसदेकडून निरोप दिला जाणार आहे. यावेळी सर्व संसद सदस्यांची स्वाक्षरी असलेली पुस्तिका राष्ट्रपतींना भेट दिली जाणार असल्याचं लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सांगितलं. **** राष्ट्रपती पदाच्या निवडीसाठी आज संसदेत आणि सर्व राज्य विधिमंडळात मतदान सुरु आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार रामनाथ कोविंद आणि विरोधी पक्ष आघाडीच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात ही निवडणूक होत आहे. सातशे शहॅत्तर खासदार तसंच चार हजार १२० आमदारांसह एकूण चार हजार ८९६ मतदार या निवडणूकीत मतदान करत आहेत. संसद भवनात पंतप्���धान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी, तर मुंबईत विधान भवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व आमदार आणि काही खासदारांनी मतदान केलं. मतमोजणी २० जुलैला होणार आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्ष आज संसदीय मंडळाच्या बैठकीनंतर उपराष्ट्रपतिपदासाठी आपल्या उमेदवाराची घोषणा करणार आहे. विरोधी आघाडीकडून उपराष्ट्रपतिपदासाठी पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची उद्या शेवटची तारीख आहे. येत्या पाच ऑगस्टला ही निवडणूक होणार आहे. **** जम्मू काश्मीर मधल्या बालाकोट इथं पाकिस्तान कडून आज गोळीबार करण्यात आला. यात एका लहान मुलीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. **** वस्तू आणि सेवा कर - जीएसटी प्रणाली लागू झाल्यानंतर आज पहिल्यांदाच जीएसटी परिषदेची बैठक नवी दिल्ली इथं होणार आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत जीएसटीच्या अंमलबजावणीविषयी देशभरातून मिळालेली माहिती, अडचणी आणि परिस्थिती याचा आढावा घेतला जाणार आहे. **** येत्या काही वर्षात भारत कडधान्य आणि तेलबियांच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनेल असा विश्वास केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांनी व्यक्त केला आहे. ते नवी दिल्ली इथं भारतीय कृषी संशोधन संस्थेतर्फे दिल्या जाणार्या राष्ट्रीय स्तरावरच्या कृषी पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते. देशभरातल्या ११ संस्थांना यावेळी गौरवण्यात आलं. **** पाणी आणि उर्जेची बचत करुन रेल्वेला पर्यावरणपुरक बनवण्याचे प्रयत्न सुरु असून, पुढच्या दहा वर्षात सौर ऊर्जेचा वापर वाढवून सुमारे ४१ हजार कोटी रुपयांच्या उर्जेची बचत करण्यात येईल, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी दिली आहे. पुणे इथं महाराष्ट्र विकास केंद्र संस्थेच्या वतीनं सरदार सरोवर निर्मला निगमचे माजी अध्यक्ष डॉ. जयनारायण व्यास यांना प्रभू यांच्या हस्ते जलमित्र पुरस्कार देण्यात आला, त्यावेळी ते ��ोलत होते. प्रसिद्ध गायिका बकुल पंडित यांनाही यावेळी बालगंधर्व गुणगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. **** राज्यात आज काही भागात पाऊस सुरु आहे. मुंबईत सकाळपासून पावसाची संततधार सुरु आहे. मराठवाड्यातही आज काही ठिकाणी हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरु आहे. परभणी, लातूर, उस्मानबाद, औरंगाबाद याठिकाणी काल तुरळक पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३० पूर्णांक ७२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज आणि उद्या कोकण तसंच मध्य महाराष्ट्रातल्या काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात उद्या पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात मात्र तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. **** येत्या २४ जुलै पासून सुरु होणाऱ्या श्रावण महिन्यात वेरुळच्या श्री घृष्णेश्वर मंदिरात गावकऱ्यांसाठी सकाळी चार ते सात वाजेपर्यंत आधार कार्ड दाखवून थेट दर्शन घेण्याची सुविधा मंदिर प्रशासनानं उपलब्ध करुन दिली आहे. देवस्थान मंडळ आणि तहसिलदार अरुण जऱ्हाड यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी श्रावण महिन्यातल्या यात्रा महोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. ****
0 notes