#अखेरची
Explore tagged Tumblr posts
Text
#BANvsIND | प्रतिष्ठा राखण्याची भारताला अखेरची संधी; उद्या अखेरचा एकदिवसीय सामना
#BANvsIND | प्रतिष्ठा राखण्याची भारताला अखेरची संधी; उद्या अखेरचा एकदिवसीय सामना
#BANvsIND | प्रतिष्ठा राखण्याची भारताला अखेरची संधी; उद्या अखेरचा एकदिवसीय सामना चितगाव – रोहित शर्मा अंगठ्याला झालेल्या दुखापतीवर उपचार करुन घेण्यासाठी मायदेशी परतल्यानंतर लोकेश राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघ उद्या यजमान बांगलादेशविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या ( BAN vs IND ) लढतीत मैदानात उतरणार आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून बांगलादेशने मालिका यापूर्वी…
View On WordPress
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 14 November 2023
Time: 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १४ नोव्हेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
दिवाळीनिमित्त भारतीय बाजारपेठेत तब्बल पावणे चार लाख कोटी रुपयांची उलाढाल
राज्यशासनाकडून धान आणि भरडधान्याच्या किमान आधारभूत किंमती जाहीर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून विविध महाविद्यालयांना, चर्चासत्रं, परिषदा तसंच कार्यशाळा घेण्यासाठी अनुदान मंजूर
आणि
कार्तिकी यात्रेसाठी मध्य रेल्वेची लातूर ते पंढरपूर दरम्यान आठवडाभर विशेष गाडी
****
यंदा दिवाळीनिमित्त भारतीय बाजारपेठेत तब्बल पावणे चार लाख कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचं निदर्शनास आलं आहे. कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स-सी ए आय टी चे अध्यक्ष बाळकृष्ण भरतिया आणि सचिव प्रवीण खंडेलवाल यांनी संयुक्त निवेदनात ही माहिती दिली. यामध्ये फक्त लक्ष्मीपूजनापर्यंतच्या उलाढालीच्या नोंदी असून, पाडवा तसंच भाऊबीजेनिमित्त होणाऱ्या उलाढालीच्या नोंदींचा यात समावेश नाही. चिनी बाजारपेठेतून वस्तू आयात करण्याचं प्रमाण यंदा शून्य असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्होकल फॉर लोकल आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेचा हा स्पष्ट परिणाम असल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. ‘सीएआयटी’ने या दिवाळीत देशभरात राबवलेल्या “भारतीय उत्पाद-स���का उस्ताद” या मोहिमेला ग्राहकांचा मोठा पाठिंबा मिळाल्याचं, वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे.
****
विकसित भारत संकल्प यात्रेला उद्या १५ नोव्हेंबरपासून सुरवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून या यात्रेला प्रारंभ होईल. राज्यात या यात्रेचा शुभारंभ नंदूरबार इथं राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी राज्यपाल राज्यस्तरीय आदिवासी गौरव दिन सोहळ्यातही उपस्थित राहणार आहेत. भगवान बिरसा मुंडा यांची जयंती उद्या देशभरात आदिवासी गौरव दिवस म्हणूण साजरी करण्यात येणार आहे. आदिवासी समाजाची कला, संस्कृति, राष्ट्र निर्माणात त्यांनी दिलेलं योगदान यांचं स्मरण ठेऊन हा दिवस आदर, सन्मान आणि उत्साह���त साजरा करण्याचं आवाहन केंद्रीय आदिवासी विकास मंत्री अर्जुन मुंडा यांनी केलं आहे.
****
राज्यशासनानं धान आणि भरडधान्याच्या किमान आधारभूत किंमती जाहीर केल्या आहेत. राज्यात खरेदी केंद्र सुरू करून किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान्याची खरेदी करण्यात येणार आहे. यात धान दोन हजार १८३ रुपये प्रतिक्विंटल, अ दर्जाचं धान दोन हजार २०३ रुपये, संकरित ज्वारी तीन हजार १८० रुपये, मालदंडी ज्वारी तीन हजार २२५ रुपये, बाजरी दोन हजार ५०० रुपये, मका दोन हजार ९० रुपये, तर नाचणी तीन हजार ८४६ रुपये प्रतिक्विंटल याप्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे. नऊ नोव्हेंबर ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत धान, तर एक डिसेंबर ते ३१ जानेवारी २०२४ पर्यंत भरडधान्य खरेदी करण्यात येणार आहे.
****
पीएम कुसुम योजनेत महाराष्ट्राने देशात पहिलं स्थान पटकावून शेतकरी हिताच्या योजनांच्या अंमलबजावणीत आपल्या बांधिलकीचा प्रत्यय आणून दिला असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. पारेषण विरहित सौर कृषी पंप उपलब्ध करून देण्यासाठी पीएम कुसुम योजना राबवली जात आहे. केंद्र शासनाच्या ‘किसान ऊर्जा सुरक्षा आणि उत्थान महाभियान’ आणि ‘कुसुम’ योजनेअंतर्गत, राज्यांना नऊ लाख ४६ हजार ४७१ सौरपंप बसवण्यासाठी मान्यता दिली आहे. महाराष्ट्राने ७१ हजार ९५८ सौर पंप स्थापित करून देशात पहिलं स्थान पटकावलं आहे. या यशाबद्दल मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्वीट संदेशात ऊर्जा विभागाचं कौतुक केलं आहे.
****
येत्या २० ते ३० नोव्हेंबर दरम्यान राज्य कला प्रदर्शनाचं आयोजन करण्यात येत आहे, प्रभारी कला संचालक राजीव मिश्रा यांनी ही माहिती दिली. रेषा, रंगकला, शिल्पकला, उपयोजित कला, मुद्राचित्रण आणि दिव्यांग या विभागासाठी, डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट डी ओ ए डॉट महाराष्ट्र, या संकेतस्थळावर, ऑनलाईन स्वरूपात कलाकृती मागवण्यात येत आहे. प्रदर्शनातल्या उत्कृष्ट कलाकृतींना प्रत्येकी पन्नास हजार रूपयां��ी पंधरा पारितोषिकं प्रदान करण्यात येणार आहे.
****
शालेय शिक्षण विभागाच्या इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यावर्षी इयत्ता पाचवी आणि आठवीच्या परीक्षा एकाचवेळी १८ फेब्रुवारी रोजी होणार आहे. अर्ज भरण्याची अखेरची मुदत ३० नोव्हेंबरपर्यंत तर विलंब शुल्कासह १५ डिसेंबरपर्यंत मुदत आहे.
****
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती आज देशभरात बालदिन म्हणून साजरी होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पंडित नेहरुंना अभिवादन करण्यात येत आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २६ नोव्हेंबर ला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. नागरिकांना आपल्या कल्पना आणि सूचना, माय जीओव्ही ओपन फोरम किंवा नमो या भ्रमणध्वनी ॲपद्वारे, अथवा एक-आठ-शून्य-शून्य एक-एक-सात-आठ शू्न्य-शून्य या नि:शुल्क क्रमांकावरही पाठवता येणार आहेत.
****
बलिप्रतिपदा अर्थात दिवाळीचा पाडवा आज तर भाऊबीज उद्या साजरी होत आहे. या निमित्त परगावी जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीने बस तसंच रेल्वे स्थानकांचा परिसर फुलून गेला आहे. या सणांसाठी भेटवस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठांमधून नागरिकांची गर्दी झाल्याचं काल दिसून आलं.
****
छत्रपती संभाजीनगर इथंल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातल्या संशोधन आणि विकास कक्षेच्या वतीनं, विविध महाविद्यालयांना, चर्चासत्र, परिषद आणि कार्यशाळा घेण्यासाठी अनुदान मंजूर करण्यात आलं आहे. एकूण ३३ महाविद्यालयांना प्रत्येकी पाच लाख रूपये आणि विद्यापीठाच्या मुख्य परिसर आणि धाराशिव उपपरिसरातल्या सात विभागांना, दोन लाख ४० हजार रुपयांच्या अनुदानाला, विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता तथा माहिती कक्षाचे संचालक डॉ. भालचंद्र वायकर यांनी काल मंजुरी दिली.
दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी येत्या २९ नोव्हेंबरला मुलाखती घेण्यात येणार आहेत.
****
कार्तिकी यात्रेसाठी मध्य रेल्वने लातूर ते पंढरपूर दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. २० ते २७ नोव्हेंबर दरम्यान आठवडाभर चालणारी ही गाडी लातूर इथून सकाळी साडे सात वाजता सुटेल आणि पंढरपूर इथं त्याच दिवशी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी पंढरपूर इथून दुपारी अडीच वाजता सुटेल आणि लातूर इथं त्याच दिवशी संध्याकाळी सात वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. ही गाडी हरंगुळ, औसा रोड, कळंब, धाराशिव, बार्शी मार्गे धावणार आहे.
****
संत नामदेव महाराजांच्या ७५३ व्या जयंती महोत्सवाला येत्या १७ तारखेपासून हिंगोली जिल्ह्यात नरसी इथं प्रारंभ होत आहे. या निमित्ता��ं गाथा पारायण सोहळ्यासह ���िविध कार्यक्रमांचं आयोजन संत नामदेव मंदिर संस्थानच्या वतीनं करण्यात आलं आहे.
****
पाणी वाटपासंदर्भात न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही मराठवाड्यावर पाणी वाटपात अन्याय होत असल्याचं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. जायकवाडी धरणासाठी पाणी सोडण्याला विरोध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ते काल नांदेड इथं एका कार्यक्रमात बोलत होते. याबाबत सरकारला विचारणा करायला हवी, मात्र सरकार हा प्रश्न गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या इतर राज्यातल्या शिधापत्रिकाधारक नागरिकांनी, एक देश एक शिधापत्रिका या योजनेअंतर्गत आपल्या परिसरातल्या रास्त भाव दुकानातून बायोमेट्रिक प्रणालीद्वारे धान्य प्राप्त करुन घ्यावं, असं जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षाराणी भोसले यांनी म्हटलं आहे. संबंधितांनी आधार प्रमाणीकरण करून धान्य वितरण योजनेचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
****
नांदेड इथल्या श्री सचखंड गुरुद्वारा बोर्डाचे माजी सचिव तसंच कामठा बुद्रुकचे माजी सरपंच सरदार रणजितसिंघ कामठेकर यांचं काल हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झालं, ते ६५ वर्षांचे होते. कामठेकर यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी १० वाजता नांदेड इथं नगीनाघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
****
बीड इथं काल अखिल भारतीय किसान सभेचे जिल्हाध्यक्ष अजय बुरांडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी बैलगाडी मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर कीर्तन आंदोलन केलं. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचं संपूर्ण पीक कर्ज माफ करावं, पीक विमा देण्यात यावा, यासारख्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
परभणी इथं काल राष्ट्रीय आरोग्य अभियानातल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. वयाची अट शिथील करून नियमित सेवेत समावेश करून घेण्याच्या मागणीसाठी गेल्या २५ तारखेपासून या कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे.
****
बीड जिल्हा क्रिकेट संघटनेच्या बीड प्रीमियर लीगला कालपासून प्रारंभ झाला. जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. या स्पर्धेत जिल्ह्यातले १२ संघ सहभागी झाले आहेत, येत्या २८ नोव्हेंबर���र्यंत या स्पर्धेतले साखळी सामने खेळवण्यात येणार आहेत, त्यानंतर उपांत्य तसंच अंतिम सामने होणार आहेत. या स्पर्धेचं यंदा हे सहावं वर्ष आहे.
****
0 notes
Text
मसुरे येथील बीएसएनएल टॉवर मृता अवस्थेत…
मसुरे येथील बीएसएनएल टॉवर मृता अवस्थेत…
गेले कित्येक महिने 3g 4g सेवा गायब…. कार्यवाही न केल्यास आंदोलन छेडण्याचा लक्ष्मी पेडणेकर यांचा इशारा… मसुरे येथील बी एस एन एल टॉवर अखेरची घटका मोजत असून अवघ्या १०० मीटर अंतरावर नीट रेंज मिळत नाही आहे . याबाबत सर्व संबंधित अधिकारी वर्गाचे वारवार लक्ष वेधून ही अद्याप पर्यंत या प्रश्न संबंधी कोणीही अधिकारी कार्य तत्परता दाखवत नसून फक्त बघण्याचे काम करत असल्यामुळे येत्या आठ दिवसात या टॉवर संदर्भात…
View On WordPress
0 notes
Text
चेतेश्वर पुजारा "डुज इट अगेन", ससेक्ससाठी काउंटी चॅम्पियनशिपमध्ये तिसरे द्विशतक ठोकले. पहा | क्रिकेट बातम्या
चेतेश्वर पुजारा “डुज इट अगेन”, ससेक्ससाठी काउंटी चॅम्पियनशिपमध्ये तिसरे द्विशतक ठोकले. पहा | क्रिकेट बातम्या
चेतेश्वर पुजाराची फाइल इमेज© एएफपी चेतेश्वर पुजारा ससेक्ससाठी त्याचा चांगला फॉर्म सुरू ठेवला आहे. काउंटी चॅम्पियनशिप डिव्हिजन टू मधील मिडलसेक्स विरुद्धच्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी, पुजाराने या मोसमातील तिसरे द्विशतक झळकावले. पुजाराच्या द्विशतकाच्या बळावर ससेक्सने पहिल्या डावात ५०० धावांचा टप्पा ओलांडला. बुधवारी ससेक्ससाठी पुजाराची अखेरची विकेट पडली. त्याने 403 चेंडूत 231 धावा केल्या. यापूर्वी,…
View On WordPress
0 notes
Text
बर्ड मॅन ऑफ इंडिया - डॉ. सलीम अली; स्मृतीदिन विशेष
बर्ड मॅन ऑफ इंडिया – डॉ. सलीम अली; स्मृतीदिन विशेष
तळ्याकाठी गाती लाटा, लाटांमध्ये उभे झाड.झाडावर धीवराची, हाले चोच लाल जाड.शुभ्र छाती, पिंगे पोट, जसा चाफ़ा यावा फ़ुली.पंख जणू थंडीमध्ये, बंडी घाली आमसुली.जांभळाचे तुझे डोळे, तुझी बोटे जास्वंदीची.आणि छोटी अखेरची पिसे जवस फुलांची.गड्या पाखरा, तू असा सारा देखणा रे कसा?पाण्यावर उडताना, नको मारू मात्र मासा. कवी श्रीधर शनवरे यांची कविता वाचताना तुम्हांला नक्कीच चौथीच्या बालभारतीचे पुस्तक (१९८८-८९) आठवले…
View On WordPress
0 notes
Text
शेन वॉर्नचे अंत्यसंस्कार कौटुंबिक मित्र माजी क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या दिग्गज दिग्गजांना अखेरची श्रद्धांजली अनेक दिग्गजांनी हजेरी लावली
शेन वॉर्नचे अंत्यसंस्कार कौटुंबिक मित्र माजी क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या दिग्गज दिग्गजांना अखेरची श्रद्धांजली अनेक दिग्गजांनी हजेरी लावली
शेन वॉर्न : शेन वॉर्नच्या पार्थिवावर रविवारी मेलबर्नमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याला निरोप देण्यासाठी त्याचे मित्र, नातेवाईक आणि माजी सहकारी क्रिकेटपटूही पोहोचले. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनही आपल्या मित्राला अखेरचा निरोप देण्यासाठी पोहोचला. त्यांच्याशिवाय मार्क टेलर, अॅलन बॉर्डर, मायकेल क्लार्क, मार्क वॉ आणि ग्लेन मॅकग्रा यांचाही यात सहभाग होता. जगातील महान लेग-स्पिनर आणि ऑस्ट्रेलियन…
View On WordPress
#अंत्यसंस्कार#शेन वॉर्न#शेन वॉर्न कौटुंबिक मित्रांचे अंत्यसंस्कार#शेन वॉर्नचे अंतिम संस्कार#शेन वॉर्नचे फोटो लीक#शेन वॉर्नचे शेवटचे फोटो#शेन वॉर्नच्या अंत्यसंस्काराचे फोटो#शेन वॉर्नवर अंत्यसंस्कार#शेवटचा निरोप
0 notes
Text
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांवर भरती
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांवर भरती
UPSC Latest Recruitment 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (Union Public Service Commission)प्रशासकीय अधिकारी आणि सहाय्यक प्रोफेसर (यूनानी) पदांवरील भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. इच्छुक उमेदवार १७ मार्च २०२२ पर्यंत या त्यापूर्वी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करू शकतात. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज करू इच्छितात, ते अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर या भरतीसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अखेरची मुदत १८…
View On WordPress
0 notes
Text
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन, भारताने 'रत्न' गमावले!
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन, भारताने ‘रत्न’ गमावले!
मुंबई- गेल्या आठ दशकांहून अधिक काळ जगभरातील अगणित संगीतप्रेमींचं भावविश्व समृद्ध करणारा दैवी स्वर आज अखेर शांत झाला. जगतविख्यात पार्श्वगायिका, गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर यांचं आज वृद्धापकाळानं निधन झालं. जातपात, धर्म, भाषा, प्रांत, देश अशी सर्व बंधने तोडून प्रत्येकाच्या आयुष्यात अखंड आनंद भरणार्या स्वरमैफलीने ��खेरची भैरवी घेतली. नक्षत्रांचे हे देणे दिगंताच्या प्रवासाला निघून गेले.…
View On WordPress
#Ajit Pawar#beed news#cmomaharashtra#dhananjay munde#dio beed#JALANA#Latur#marathi batmya#Mumbai#narendramodi#Pankaja munde#Sad
0 notes
Text
IND vs NZ: तिसऱ्या वनडेसाठी झोप मोड होणार; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार लाइव्ह स्ट्रीमिंग
IND vs NZ: तिसऱ्या वनडेसाठी झोप मोड होणार; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार लाइव्ह स्ट्रीमिंग
IND vs NZ: तिसऱ्या वनडेसाठी झोप मोड होणार; जाणून घ्या कधी आणि कुठे होणार लाइव्ह स्ट्रीमिंग IND Vs NZ 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरी आणि अखेरची मॅच उद्या बुधवारी होणार आहे. न्यूझीलंडने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला उद्याची मॅच जिंकावीच लागले. IND Vs NZ 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंंड यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरी आणि अखेरची मॅच…
View On WordPress
#ind#nz:#आणि#कधी#कुठे?#क्रीडा#क्रीडा बातम्या#खेळ बातम्या#खेळ समाचार#घ्या#जाणून#झोप#तिसऱ्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी खेळ बातमी#मोड#लाइव्ह#वनडेसाठी#विश्व#स्ट्रीमिंग#स्पोर्ट्स बातम्या#होणार
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 22 March 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २२ मार्च २०२२ सायंकाळी ६.१०
****
कोविड पासून सुरक्षित राहण्यासाठी कृपया चार साध्या उपायांचं पालन करण्याचं आवाहन आम्ही श्रोत्यांना करत आहोत. कोविड लसीकरण पूर्ण करा, मास्क वापरा, दोन मीटर अंतर राखा आणि हात तसंच चेहरा स्वच्छ ठेवा. कोविड -१९ शी संबंधित अधिक माहिती आणि मदतीसाठी आपण ०११- २३ ९७ ८० ४६ आणि १०७५ या राष्ट्रीय मदत वाहिनीशी किंवा ०२०- २६ १२ ७३ ९४ या राज्यस्तरावरच्या मदत वाहिनीशी संपर्क करू शकता.
****
· राज्य परीवहन महामंडळ कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणासंदर्भातील शिफारशींवर निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला १५ दिवसांची मुदतवाढ.
· २०२४ पर्यंत भारतातले रस्ते अमेरिकेसारखे होतील- केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत ग्वाही.
· हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा गडचिरोलीपर्यंत विस्तार करणार.
· पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या दरवाढीवरुन काँग्रेसची भारतीय जनता पक्षावर टीका.
आणि
· महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा बांगलादेशवर ११० धावांनी विजय.
****
राज्य परीवहन महामंडळ- एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणासंदर्भात त्रिसदस्यीय समितीच्या शिफारशींवर निर्णय घेण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियुक्त समितीनं अलिकडेच आपला अहवाल राज्य सरकारला दिला होता. या अहवालावर राज्य सरकारनं अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारनं न्यायालयाकडे १५ दिवसांची मुदतवाढ मागितली होती. त्यानुसार न्यायालयानं आज राज्य सरकारला मुदतवाढ दिली. यावेळी न्यायालयानं सरकारला समितीच्या शिफारशींवर निर्णय घेण्यासाठी ही अखेरची संधी देत असल्याचं स्पष्ट केलं आहे. त्याचवेळी न्यायालयानं संपकरी संघटनेलाही प्रकरण न्यायप्रविष्ट असताना कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यास काय हरकत आहे? अशी विचारणा केली.
दरम्यान, या अहवाला�� आर्थिक तरतुदी असल्यामुळं आज किंवा उद्या मंत्रिमंडळाची बैठक घेऊन या अहवालाला मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी आज विधानपरिषदेत दिली. एसटी कर्मचारी आणि ग्रामीण जनतेसाठी हा संप मिटणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात विधानपरिषदेत आज विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली त्यामुळं सदनाचं कामकाज दोनदा तहकूब करावं लागलं. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत सदनाचं कामकाज चालू देणार नाही असा इशारा यावेळी दिला.
****
२०२४ पर्यंत भारतातले रस्ते अमेरिकेसारखे होतील, अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत दिली. रस्ते, परिवहन आणि महामार्गांच्या अनुदानावरील चर्चेला ते उत्तर देत होते. देशात दरदिवशी ३८ किलोमीटर रस्त्यांची बांधणी केली जात आहे. सुंदर रस्त्यांमुळे पर्यटनालाही चालना मिळत आहे. अटल आणि जोजिला या बोगद्यांमुळे लडाखचं अंतर कमी झालं आहे. सरकार रस्ते निर्मिती करताना पर्यावरणाचाही समतोल साधत आहे. रस्त्यांवरील दुर्घटना कमी करण्यासाठी सर्वांचं सहकार्य महत्त्वपूर्ण असल्याचं त्यांनी सांगितलं. हरित महामार्गांमुळे वाहनांची वाहतूक ठप्प होणार न���ही, असंही ते म्हणाले. भविष्यात हायड्रोजनवर आधारित वाहन निर्मितीला चालना दिली जाईल तसंच इलेक्ट्रीक वाहनांमुळे खर्चात मोठी बचत होईल, असंही ते म्हणाले.
****
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा नागपूरपासून गोंदिया आणि गडचिरोलीपर्यंत विस्तार करण्यात येणार असल्याचं राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत सांगितलं. या विस्तारीकरणाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत, असं ते म्हणाले. विधानसभा सदस्य धर्मरावबाबा आत्राम यांनी विचारलेल्या लक्षवेधी सूचनेला शिंदे उत्तर देत होते. नागपूर ते मुंबई दरम्यान ७०१ किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाचं १६ बांधकाम पॅकेज अंतर्गत काम प्रगतीपथावर असून निविदा कालावधीनुसार हा महामार्ग येत्या सप्टेंबर पर्यंत जनतेसाठी खुला करण्याचं नियोजन असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
चार राज्यातील विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भारतीय जनता पक्षानं पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या महागाईची जनतेला भेट दिल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. आधीच महागाईनं त्रस्त असलेल्या जनतेला पुन्हा एकदा भाजपनं महागाईच्या गर्तेत लोटलं असल्याचं ते म्हणाले. डिझेलची ठोक खरेदी करणारे रेल्वे, एसटी महामंडळ, उर्जा प्रकल्प, सिमेंट उत्पादक आणि मॉल्स यांच्यासाठीचं डिझेल २५ रुपये प्रति लिटरनं ��हाग केलं आहे. यामुळं महागाई वाढून त्याचा फटका शेवटी सामान्य माणसांनाच बसणार असल्याचं ते म्हणाले.
****
जागतिक जलदिनानिमित्त उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी जल स्रोत स्वच्छ ठेऊन त्यांच संवर्धन करण्याचं आवाहन केलं आहे. जीवनदायी नैसर्गिक स्त्रोतांचा उपयोग काळजीपूर्वक करावा, पाण्याचा अपव्यय टाळावा. तसंच जल हा जीवनाचा पर्याय असल्यानं त्याचा योग्य वापर करण्याचं आवाहन नायडू यांनी आपल्या ट्विटर संदेशात केलं आहे.
****
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील ‘अधीश’ बंगल्यामधील बांधकाम नियमित करण्यासाठी केलेल्या अर्जावर सुनावणी घेऊन महापालिकेनं निकाल द्यावा, तो पर्यंत बंगल्यावर कोणतीही कारवाई करण्यास उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला मनाई केली आहे. महापालिकेनं राणे यांना अनधिकृत बांधकाम पाडण्यासंदर्भात नोटीस पाठवली होती. या नोटीशीला राणे यांनी न्यायालयात आव्हान दिलं आहे. पालिकेचा निकाल राणे यांच्याविरोधात गेल्यास त्यांना तीन आठवडे न्यायालयाकडे दाद मागण्यासाठी वेळ देण्याचा आदेशही न्यायालयानं यावेळी दिला.
****
महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं बांग्लादेशचा ११० धावांनी पराभव केला. भारतानं प्रथम फलंदाजी करत निर्धारीत ५० षटकांत सात बाद २२९ धावा केल्या. उत्तरादाखल बांगलादेशचा संघ ४० षटकं आणि तीन चेंडूत ११९ धावांत बाद झाला.
****
पुणे विभागातील नऊ हजार २०० स्वस्त धान्य दुकानं डिजिटल होणार आहेत. आता या दुकानांमध्ये बँक व्यवहार, तिकीट बुकिंग, मोबाईल रिचार्जसह विविध सेवा मिळणार आहेत. धान्य वितरणातील कमिशन पुरेसं नसल्याची तक्रार दुकानदारांकडून केली जात होती. याची दखल घेत शासनाकडून ई-सेवा केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे.
राज्याचा अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि सीएससी ई-गव्हर्नन्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमानं राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या सबलीकरणासाठी ई-सेवा केंद्राबाबतच्या समझोता करारनाम्यावर मुंबईत स्वाक्षरी करण्यात आली.
****
भारतीय रिझर्व्ह बँकेनं, बँकेच्या सहाय्यक पदासाठीच्या भरती परीक्षेसाठी प्रवेशपत्र जारी केली आहेत. ज्या उमेदवारांनी भरती परीक्षेसाठी नोंदणी केली आहे ते बँकेच्या अधिकृत संकेतस्थळ - rbi.org.in वरून पूर्व परीक्षेचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी ��ुख्य परीक्षेसाठी पात्र ठरतील ��सं आरबीआयनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
****
0 notes
Text
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक
कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर कारखाने गतीने बंद होत असले तरी राज्यातील शेवटचा कारखाना बंद होण्यास मे महिन्याची अखेरची तारीख उजाडेल, असा अंदाज आहे. राज्यात अद्यापही अंदाजे वीस लाख टन ऊसतोडणी अभावी शिवारात शिल्लक आहे. ऊसतोडणी मजूरांसह ऊसतोडणी यंत्राच्या अनुपलब्धतेमुळे अनेक जिल्ह्यांतील कारखान्यांना अद्यापही आपला गाळप हंगाम पूर्ण करता आलेला नाही. सध्याच्या गाळपावर नजर टाकल्यास…
View On WordPress
#Agriculture Marathi News#Agriculture News#Agriculture News Marathi#Farming News Marathi#Farming News Update Marathi#Marathi Agri News#Marathi Agri News Update
0 notes
Text
कणकवली तालुक्यातील प्रभाग निहाय आरक्षणावर तीन हरकती
कणकवली तालुक्यातील प्रभाग निहाय आरक्षणावर तीन हरकती
लवकरच सुनावणी घेऊन निर्णय देणार निवासी नायब तहसीलदार शिवाजी राठोड यांची माहिती दिगंबर वालावलकर । कणकवली : कणकवली तालुक्यातील 58 ग्रामपंचायतीच्या प्रभाग निहाय ना.मा. प्र हे आरक्षण टाकण्यासाठी नुकत्याच खास ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील 58 ग्रामपंचायतींमध्ये हे आरक्षण टाकल्यानंतर त्यावर हरकती घेण्याकरिता आज 3 ऑगस्ट ही अखेरची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार कणकवली तालुक्यात तीन…
View On WordPress
0 notes
Text
दिवाळीची खरेदी ठरली त्यांच्यासाठी अखेरची ...
दिवाळीची खरेदी ठरली त्यांच्यासाठी अखेरची …
घोटी जवळ अपघातात ३ बालिका आणि एका युवकावर काळाचा घाला घोटी मुंबई-नाशिक मार्गावर मुंढेगाव शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेने दुचाकीवर असलेल्या सोमवार ( ता. ८ ) सायंकाळी पाच वाजता झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील चार जणांवर काळाने अचानक घाला घातला आहे. मुंढेगावकडे येत असताना युवकाच्या दुचाकीला ट्रकने कट मारल्याने अपघात झाला. या अपघातामध्ये ३ बालिका आणि १ युवक…
View On WordPress
0 notes
Text
#Ahmednagar #Maharashtra-Navnirman-Sena #Covid19 #AMC रुग्णांच्या खात्यात पैसे जमा न केल्यास रुग्णालयांची नोंदणी रद्द करण्यात येणार ; महापालिका आयुक्तांनी आश्वासन दिल्यानंतर मनसेचे 'झोपा मारो' आंदोलन मागे
#Ahmednagar #Maharashtra-Navnirman-Sena #Covid19 #AMC रुग्णांच्या खात्यात पैसे जमा न केल्यास रुग्णालयांची नोंदणी रद्द करण्यात येणार ; महापालिका आयुक्तांनी आश्वासन दिल्यानंतर मनसेचे ‘झोपा मारो’ आंदोलन मागे
अहमदनगर (दि २४ डिसेंबर २०२०) : कोरोना रोगावरील उपचारा दरम्यान रुग्णांना देण्यात आलेल्या वाढीव बिलाचा फरक परत देण्यासाठी संबंधित रुग्णालयांना अखेरची नोटीस काढण्यात आली आहे. यावरही संबंधितांनी रुग्णांच्या खात्यात पैसे जमा न केल्यास रुग्णालयांची नोंदणी रद्द करण्यात येणार आहे. ��हापालिका आयुक्तांनी हे आश्वासन दिल्यानंतर मनसेने आपले आंदोलन मागे घेतले आहे. कोरोना रुग्णांकडून जास्त घेतलेले पैसे…
View On WordPress
0 notes
Text
भारतीय संघाला मोठा झटका; मोहम्मद शमीला हाताला फॅक्चर, मालिकेतून बाहेर
भारतीय संघाला मोठा झटका; मोहम्मद शमीला हाताला फॅक्चर, मालिकेतून बाहेर
एडिलेड: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताचा ८ विकेटनी पराभव झाला. दुसऱ्या डावात भारताने फक्त ३६ धावा करून भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात निचांकी धावसंख्येची नोंद केली. यजमान ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला एडिलेड कसोटीत पराभव पाठोपाठ आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दुसऱ्या डावात भारताची अखेरची जोडी मैदानावर असताना…
View On WordPress
#india tour of australia 2020#Mohammed Shami#Mohammed Siraj#shami miss remainder of test series#shami suffers wrist fracture#ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत#मोहम्मद शमी#मोहम्मद सिराज
0 notes
Photo
आज तिसरा वनडे! व्हाईटवॉश टाळण्यासाठी कोहली अँड कंपनीला अखेरची संधी http://www.headlinemarathi.com/national-marathi-news/%e0%a4%86%e0%a4%9c-%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%a1%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%88%e0%a4%9f%e0%a4%b5%e0%a5%89%e0%a4%b6-%e0%a4%9f/?feed_id=27615&_unique_id=5fc72a51cbc7c
0 notes