#महिन्याला
Explore tagged Tumblr posts
Text
महिन्याला १.६३ कोटी अन् ५ मागण्या, व्हा महागड्या घटस्फोटाचे साक्षी
महिन्याला १.६३ कोटी अन् ५ मागण्या, व्हा महागड्या घटस्फोटाचे साक्षी
महिन्याला १.६३ कोटी अन् ५ मागण्या, व्हा महागड्या घटस्फोटाचे साक्षी Kim Kardashian: किम कार्दशियन आणि कान्ये वेस्ट घटस्फोट घेणार आहेत. दोघांच्या घटस्फोटाचा खटला १४ डिसेंबरपासून कोर्टात सुरू होणार होता, मात्र ते कोर्टाबाहेरच सेटल झालं. कोणत्या अटींवर किम कोर्टाच्या बाहेर घटस्फोट द्यायला तयार झाली आणि कान्ये वेस्टला किती कोटी रुपये द्यावे लागतील ते इथे वाचा Kim Kardashian: किम कार्दशियन आणि कान्ये…
View On WordPress
0 notes
Text
PM Yuva 2.0 Yojana :युवा योजनेतून मिळणार महिन्याला 50,000 रु।असा करा अर्ज १००%
PM Yuva 2.0 Yojana :युवा योजनेतून मिळणार महिन्याला 50,000 रु।असा करा अर्ज १००%
PM Yuva 2.0 Yojana: नमस्कार मित्रानो आम्ही नेहमीच आपल्यासाठी महत्वाच्या योजनांची माहिती घेऊन येत असतो, तर आज च्या योजनेद्वारे लाभार्ध्याला 50,000 रु महिन्याला मिळणार आहेत,ते कशाप्रकारे मिळणार,अर्ज कसा करायचा, योजना नेमकी कशा बद्दल आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण आज जाणून घेणार आहोत,तर माहिती संपूर्ण वाचा म्हणजे या योजनेबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती मिळेल. PM Yuva 2.0 Yojana केंद्र शासनाद्वारे…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 18 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १८ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
महिला विकासाच्या योजना राबवण्यासाठी हात आखडता घेतला जाणार नाही-मुख्यमंत्र्यांची ग्वाही; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्यभरातल्या महिलांकडून आनंद व्यक्त
कोलकाता इथं महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी राज्यभर निदर्शनं
देशविघातक नॅरेटिव्ह एकत्रितपणे हाणून पाडणं आवश्यक-देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे यांची भावना
आणि
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केकत जळगाव इथल्या दोनशेहून जास्त मुलांना बिस्किटं खाल्ल्यानं विषबाधा
****
महिला विकासाच्या योजना राबवण्यासाठी हात आखडता घेतला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते काल पुण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय लाभ प्रदान कार्यक्रमात बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक विजेता स्वप्नील कुसाळे याचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून आपली प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच या योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा आहेर मिळणार असल्याची भावना, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले...
“परवा रक्षाबंधन आ��े. आणि म्हणून बहिण भावाचा हा जो काही सण आहे, हा साजरा करणारा सण जगात कुठल्याही संस्कृतीत नाही. फक्त तो आपल्या हिंदू संस्कृतीत आहे. आम्ही सगळे भाग्यवान आहोत. या लाडक्या बहिणींच्या रूपाने मला लाखो तुमच्या सारख्या बहिणी मिळाल्या. याचा मला आनंद आहे. आणि म्हणून तुम्हा बहिणींची जी काही माया, आशीर्वाद जे आहेत, हे प्रेरणा देणारे आहेत. आणि खऱ्या अर्थाने ऊर्जा देणारे आहेत.”
या योजनेत खोडा घालण्याचे प्रयत्न अनेकांनी केले, मात्र न्यायालयाने आमच्यावर विश्वास दाखवत, बहिणींच्या बाजूने निेकाल दिल्याचं सांगत, अशा अपप्रचाराबाबत जागरूक राहण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. गेल्या चार दिवसांत या योजनेचा एक कोटी आठ लाख महिलांना लाभ दिल्याची माहिती अदिती तटकरे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमासाठी आलेल्या भगिनींनी म्हाळुंगे बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडानगरी फुलून गेली होती. विविध गावांहून आलेल्या महिलांनी या योजनेबद्दल आनंद व्यक्त केला.
****
राज्यात अनेक जिल्ह्यातल्या महिला दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. छत्रपती संभाजीनगर इथं वंदेमातरम सभागृहात या सोहळ्याचं थेट प्रसारण करण्यात आलं. राज्यशासन हे दिलेला शब्द पाळणारं शासन आहे, तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला नक्की मिळणार, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित बहिणींना दिली.
जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं प्रसारण झालं. जिल्हा प्रशासन तसंच जिल्हा परिषदेसह सर्व संबंधित विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यामुळे अगदी कमी कालावधीत आपला जिल्हा ही योजना प्रभावीपणे राबवू शकला, असं सावे यांनी नमूद केलं.
नांदेड जिल्ह्यात भोकर बाजार समितीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यासह या योजनेच्या लाभार्थी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.
हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या उपस्थितीत तर लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
धाराशिव इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या उपस्थितीत या घोषणेचा ��ुभारंभ झाला. या योजनेमुळे महिलांना आत्मनिर्भर होण्यास मदत होवून कु��टूंबाचं दरडोई उत्पन्न वाढण्यास देखील हातभार लागणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.
परभणी जिल्ह्यात या योजनेसाठी दोन लाख ४७ हजार तीनशे बत्तीस अर्ज पात्र ठरले असल्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितलं.
****
दरम्यान, शासनाने महिलांसाठी कल्याणकारी योजना सुरू करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणल्याबद्दल राज्यातल्या ४० हजार गावांतून उमेद अभियानातल्या महिलांकडून मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्या पाठवण्यात येणार आहेत. उद्या राखी पौर्णिमेला मोठ्या भावाला राखी बांधण्यासाठी 'चलो मुंबई' असा नारा गावोगावात महिला देत आहेत.
****
कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय वैद्यकीय संघटनेनं काल एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला होता. राज्याच्या विविध भागात डॉक्टर संघटनेनं संपाला प्रतिसाद दिला. मुंबईत जे.जे. रुग्णालयासह अन्य रुग्णालयांचे डॉक्टर आणि वैद्यकीय संघटना या संपात सहभागी झाल्या होत्या.
छत्रपती संभाजीनगर इथंही क्रांती चौकात निदर्शनं करण्यात आली. शहरातले काही खासगी वैद्यकीय रुग्णालयं, वैद्यकीय व्यावसायिक आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची मार्ड संघटना या संपात सहभागी झाली होती.
जालना ���थं इंडियन मेडीकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह डॉक्टरांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हिंगोलीत डॉक्टर हेडगेवार स्मृती रुग्ण सेवा मंडळ आणि दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तर नांदेड जिल्ह्यात निमा, मार्ड आदी संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.
****
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबत केंद्रीय स्तरावर एक कडक कायदा तयार करण्यात यावा, याअनुषंगाने यावेळी चर्चा झाली.
****
संसदेच्या लोकलेखा समितीवर राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.
****
सध्या पसरवलं जात असलेलं देशविघातक नॅरेटिव्ह सगळ्यांनी एकत्र मिळून हाणून पाडण्याची आवश्यकता, ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे यांनी व्यक्त केली आहे. मुंबईच्या विश्व संवाद केंद्राचे 'देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार' काल मुंबईत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. या पुरस्काराला उत्तर देतांना गोगटे बोलत होते. गोगटे यांच्यासह धीरज वाटेकर, प्रज्ञा पोवळे, अक्षय मांडवकर, सचिन गायकवाड, ग��रव ठाकूर, ओंकार दाभाडकर, वनश्री राड्ये, या आठ जणांना, या वर्षाचे 'देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या केकत जळगाव इथं काल बिस्कीटं खाल्ल्यानं दोनशेहून जास्त मुला-मुलींना विषबाधा झाली. याठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारात काल अर्धवेळ शाळा असल्यानं खिचडी ऐवजी दोन कंपन्यांच्या बिस्कीटांचं सकाळी वाटप झालं. ही बिस्कीटं खाल्ल्यावर अर्ध्या तासाने प्रारंभी ब-याच विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि ताप असा त्रास झाला. या विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. थोड्याच वेळानंतर आणखी काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. सदर बिस्कीटांचे नमुने आरोग्य विभागाकडून तपासणीसाठी देण्यात आले आहेत.
****
ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी जालना इथं दीपक रणनवरे यांनी पुकारलेलं उपोषण मागे घेण्याची विनंती तहसीलदार छाया पवार यांनी केली आहे. पवार यांनी काल रणनवरे यांची भेट घेऊन चर्चा केली, तसंच आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्यात येतील, असं सांगितलं. राज्य सरकारने १४ डिसेंबर २०२३ रोजी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली, त्याची तातडीनं अंमलबजावणी करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी रणनवरे यांनी हे उपोषण पुकारलं आहे.
****
नांदेड पोलीस परिक्षेत्रातल्या नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यात १ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवैध धंदे चालकांविरुद्ध एक हजार १६३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या अंतर्गत हातभट्टीचालक, दारू विक्रेते, गुटखा, जुगार चालक, अवैध वाळू माफिया यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.
****
मराठी साहित्य तसंच अभ्यासक्रमात आमचं चांगलं व्यक्तिचित्रण यावं, अशी अपेक्षा कुरूप या कवितासंग्रहाच्या कवयित्री, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केली आहे. माझे लेखन माझी भूमिका, या विषयावर काल छत्रपती संभाजीनगर इथं देवगिरी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात शेख बोलत होत्या. आमच्या वेदना संवेदना यावर आपण लिखाण केलं असून, तृतीयपंथीयांनी लिहितं व्हावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
****
परभणी इथं काल भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते दिवंगत वसंतराव सबनीस प्रतिष्ठानचं उद्घाटन केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते काल झालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून समाजहिताचं काम करत असतांनाच वसंत सबनीस यांनी गोव्यात भाजपाच्या उभारणीत योगदान दिलं. तसंच कोकणासह परभणीतही जनसंपर्काची जोडणी केली, असं नाईक यांनी यावेळी नमूद केलं.
****
धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने चालू आर्थिक वर्षात जिल्हा प्रशासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या सव्वाशे टक्के पीक कर्ज वाटप केलं आहे. बँकेच्या या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे तसंच सर्व लोकप्रतिनिधींनी बँक व्यवस्थापनाचं अभिनंदन केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात भोकर इथं श्री संत सेवालाल महाराज यांच्या स्मारकाचं काल भूमिपूजन करण्यात आलं. सात कोटी खर्च करून हे स्मारक उभारलं जाणार आहे.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेली बालरंगभूमी परिषदेचा, जल्लोष लोककलेचा हा महोत्सव काल बीड इथं पार पडला. के. एस. के. महाविद्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला.
****
0 notes
Text
बायको : मलाही दर महिन्याला घरकामाचा पगार पाहिजे…
नवरा : मागणी मान्य आहे, पण एका अटीवर…
बायको : कोणती अट?
पती : पगार दिला जाईल… पण कामात काही चूक झाल्यास कामगार बदलण्यात येईल…
😅😅😅😀😀😀😂😂😂😄😄😄
0 notes
Text
बायको : मलाही दर महिन्याला घरकामाचा पगार पाहिजे…
Pradip : मागणी मान्य आहे, पण एका अटीवर…
बायको : कोणती अट?
Pradip : पगार दिला जाईल… पण कामात काही चूक झाल्यास कामगार बदलण्यात येईल…
😅😅😅😀😀😀😂😂😂😄😄😄
1 note
·
View note
Video
youtube
शेअर बाजारातून दर महिन्याला कमाई करायची असेल तर या गोष्टी करू नका, अन्यथ...
0 notes
Text
प्रत्येक वर्षी कापला जातो तुमचा खिसा; बँकेचे हे चार्जेस माहिती आहेत का?
0 notes
Text
Business Ideas: हा व्यवसाय घराच्या छतावर सुरू करा, रोजची बंपर कमाई होईल.
Business Ideas: जर तुम्ही घरी बसून Business Idea शोधत असाल तर तुम्हाला इकडे तिकडे भटकण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या घराच्या छतावर एक मोठा कमाईचा व्यवसाय सुरू करू शकता. हे असे व्यवसाय आहेत जे कमीत कमी गुंतवणुकीत सुरु करता येतात. यामध्ये नुकसान होण्याची शक्यता फारच कमी आहे. तुमची दर महिन्याला बंपर कमाई होईल. वास्तविक, घराच्या छतावर टेरेस फार्मिंग, सोलर पॅनल, मोबाईल टॉवर, होर्डिंग, बॅनर असे अनेक…
View On WordPress
0 notes
Link
0 notes
Text
पुणे : आता पालिका शिक्षकांचीच परीक्षा ; दर महिन्याला द्यावा लागणार प्रगतीचा अहवाल
https://bharatlive.news/?p=117838 पुणे : आता पालिका शिक्षकांचीच परीक्षा ; दर महिन्याला द्यावा लागणार ...
0 notes
Text
गर्भधारणा आणि आयुर्वेद
माणसाच्या अस्तित्वाचा विचार करता प्रजोत्पादन म्हणजेच आपल्या पुढच्या पिढीला जन्माला घालणे हा अत्यंत महत्वाचा टप्पा मानवी जीवनात येतो, आजच्या वेगवान जगात या घटनेचे आयाम जरी बदललेले असले तरी आजही आपल्या आयुष्यात या घटनेचे महत्व अनन्यसाधारण आहे. त्यामुळेच वंध्यत्वासारख्या समस्या आजही आपल्यासाठी कधीही गाठ पडू नये अश्या समस्या आहेत. त्यावर वेळोवेळी आपण लेखांच्या म���ध्यमातून समजून घेतले आहेच, आज समजून घेऊया मातेच्या उदरात गर्भ स्थापित झाल्यानंतर आयुर्वेदात कोणता हिताचा उपदेश केलेला आहे.
गर्भिणी स्त्रियांच्या बाबतीत सर्वात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा येतो तो पोषणाचा ! मुळात गर्भिणीचा आहार- विहार (दिनक्रम) यासंदर्भात गर्भाची नऊ महिन्यात विकसित होण्याच्या क्रमानुसार मांडणी आयुर्वेद करते, त्यामुळे गर्भिणी स्त्रीला तिच्या स्वतःच्या आणि गर्भाच्या पोषणासाठी बाहेरून घेतल्या जाणाऱ्या भाराभर व्हिटामिन आणि तत्सम कोणत्याही द्रव्यांवर अवलंबून राहण्याची गरज भासत नाही. आपल्या स्त्रीरोगतज्ञांनी सांगितलेल��या सूचनांसह आपण या दिनक्रमाचा अवलंब सहज करू शकता, त्याशिवाय गर्भिणीच्या लहान मोठ्या सर्वच आरोग्य समस्या जसे की, पहिल्या तीन महिन्यात असलेली मळमळ, उलटी, अन्नावरची वासना नसणे, आम्लपित्त, क्वचितप्रसंगी जुलाब अश्या समस्या गरोदरपणाच्या सुरुवातीपासूनच शास्त्रोक्त आहाराची योजना पाळली असता दूर ठेवता येतात, त्यातूनही काही समस्या उद्भवल्या असता प्रत्येक महिन्याला भिन्न अश्या काही मातेच्या आरोग्यास आणि गर्भाच्या पोषणास उपकारक औषधींचा उपयोग अत्यंत प्रभावीपणे आपले वैद्य आपल्यासाठी करू शकतात, या औषधींना मासानुमासिक काढे असे म्हटले जाते, कालानुरूप काढा या माध्यमातून औषधी घेणे ज्यांना असुलभ वाटते त्यांना गोळ्यांच्या माध्यमातून तीच औषधी दिली जाते. या औषधांचा उपयोग सर्वच गर्भिणीसाठी आवश्यक आहे, ज्यांना काही समस्या आहेत त्यांनीच त्याचे सेवन करावे असा लक्षणांवर आधारित हा उपक्रम नाही याची कृपया नोंद घेऊया.
चला तर मग, आपण स्वतः किंवा आपल्या परिचितांपैकी जे कुणी आयुष्याच्या या महत्वाच्या टप्प्यातून प्रवास करीत आहेत त्यांना आयुर्वेदाच्या वाटेवर आणूया आणि त्यांच्या आयुष्यात आरोग्यरूपी प्रकाश आणायला मदत करूया!
शुभं भवतु!
वैद्य ज्योती प्रल्हाद कस्तुरे
आयुर्वेद वाचस्पती
संपर्क: 9049603419
छत्रपती संभाजीनगर
0 notes
Text
1 note
·
View note
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 18 August 2024
Time: 7.10 to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: १८ ऑगस्ट २०२४ सकाळी ७.१० मि.
****
महिला विकासाच्या योजना राबवण्यासाठी हात आखडता घेतला जाणार नाही-मुख्यमंत्र्यांची ग्वाही; मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्यभरातल्या महिलांकडून आनंद व्यक्त
कोलकाता इथं महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी राज्यभर निदर्शनं
देशविघातक नॅरेटिव्ह एकत्रितपणे हाणून पाडणं आवश्यक-देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे यांची भावना
आणि
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात केकत जळगाव इथल्या दोनशेहून जास्त मुलांना बिस्किटं खाल्ल्यानं विषबाधा
****
महिला विकासाच्या योजना राबवण्यासाठी हात आखडता घेतला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. ते काल पुण्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या राज्यस्तरीय लाभ प्रदान कार्यक्रमात बोलत होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक विजेता स्वप्नील कुसाळे याचा यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून आपली प्रामाणिक इच्छा आहे आणि म्हणूनच या योजनेद्वारे बहिणींना दर महिन्याला दीड हजार रुपये माहेरचा आहेर मिळणार असल्याची भावना, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले...
“परवा रक्षाबंधन आहे. आणि म्हणून बहिण भावाचा हा जो काही सण आहे, हा साजरा करणारा सण जगात कुठल्याही संस्कृतीत नाही. फक्त तो आपल्या हिंदू संस्कृतीत आहे. आम्ही सगळे भाग्यवान आहोत. या लाडक्या बहिणींच्या रूपाने मला लाखो तुमच्या सारख्या बहिणी मिळाल्या. याचा मला आनंद आहे. आणि म्हणून तुम्हा बहिणींची जी काही माया, आशीर्वाद जे आहेत, हे प्रेरणा देणारे आहेत. आणि खऱ्या अर्थाने ऊर्जा देणारे आहेत.”
या योजनेत खोडा घालण्याचे प्रयत्न अनेकांनी केले, मात्र न्यायालयाने आमच्यावर विश्वास दाखवत, बहिणींच्या बाजूने निेकाल दिल्याचं सांगत, अशा अपप्रचाराबाबत जागरूक राहण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. गेल्या चार दिवसांत या योजनेचा एक कोटी आठ लाख महिलांना लाभ दिल्याची माहिती अदिती तटकरे यांनी यावेळी दिली. या कार्यक्रमासाठी आलेल्या भगिनींनी म्हाळुंगे बालेवाडी इथल्या श्री शिवछत्रपती क्रीडानगरी फुलून गेली होती. विविध गावांहून आलेल्या महिलांनी या योजनेबद्दल आनंद व्यक्त केला.
****
राज्यात अनेक जिल्ह्यातल्या महिला दूरदृश्य संवाद यंत्रणेच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. छत्रपती संभाजीनगर इथं वंदेमातरम सभागृहात या सोहळ्याचं थेट प्रसारण करण्यात आलं. राज्यशासन हे दिलेला शब्द पाळणारं शासन आहे, तुमच्या हक्काचे पैसे तुम्हाला नक्की मिळणार, अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपस्थित बहिणींना दिली.
जालना इथं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल भवनात पालकमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाचं प्रसारण झालं. जिल्हा प्रशासन तसंच जिल्हा परिषदेसह सर्व संबंधित विभागांनी प्रभावीपणे अंमलबजावणी केल्यामुळे अगदी कमी कालावधीत आपला जिल्हा ही योजना प्रभावीपणे राबवू शकला, असं सावे यांनी नमूद केलं.
नांदेड जिल्ह्यात भोकर बाजार समितीच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण यांच्यासह या योजनेच्या लाभार्थी महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.
हिंगोली इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्या उपस्थितीत तर लातूर इथं जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
धाराशिव इथं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या उपस्थितीत या घोषणेचा शुभारंभ झाला. या योजनेमुळे महिलांना आत्मनिर्भर होण्यास मदत होवून कुंटूंबाचं दरडोई उत्पन्न वाढण्यास देखील हातभार लागणार असल्याचं ते यावेळी म्हणाले.
परभणी जिल्ह्यात या योजनेसाठी दोन लाख ४७ हजार तीनशे बत्तीस अर्ज पात्र ठरले असल्याचं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी सांगितलं.
****
दरम्यान, शासनाने महिलांसाठी कल्याणकारी योजना सुरू करून त्यांना विकासाच्या प्रवाहात आणल्याबद्दल राज्यातल्या ४० हजार गावांतून उमेद अभियानातल्या महिलांकडून मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्या पाठवण्यात येणार आहेत. उद्या राखी पौर्णिमेला मोठ्या भावाला राखी बांधण्यासाठी 'चलो मुंबई' असा नारा गावोगावात महिला देत आहेत.
****
कोलकाता इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात महिला डॉक्टरवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतीय वैद्यकीय संघटनेनं काल एक दिवसाचा देशव्यापी संप पुकारला होता. राज्याच्या विविध भागात डॉक्टर संघटनेनं संपाला प्रतिसाद दिला. मुंबईत जे.जे. रुग्णालयासह अन्य रुग्णालयांचे डॉक्टर आणि वैद्यकीय संघटना या संपात सहभागी झाल्या होत्या.
छत्रपती संभाजीनगर इथंही क्रांती चौकात निदर्शनं करण्यात आली. शहरातले काही खासगी वैद्यकीय रुग्णालयं, वैद्यकीय व्यावसायिक आणि प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची मार्ड संघटना या संपात सहभागी झाली होती.
जालना इथं इंडियन मेडीकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह डॉक्टरांनी काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. हिंगोलीत डॉक्टर हेडगेवार स्मृती रुग्ण सेवा मंडळ आणि दंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तर नांदेड जिल्ह्यात निमा, मार्ड आदी संघटनांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.
****
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. डॉक्टरांच्या सुरक्षिततेबाबत केंद्रीय स्तरावर एक कडक कायदा तयार करण्यात यावा, याअनुषंगाने यावेळी चर्चा झाली.
****
संसदेच्या लोकलेखा समितीवर राज्यसभेचे खासदार अशोक चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार प्रफुल्ल पटेल यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे.
****
सध्या पसरवलं जात असलेलं देशविघातक नॅरेटिव्ह सगळ्यांनी एकत्र मिळून हाणून पाडण्याची आवश्यकता, ज्येष्ठ पत्रकार अजित गोगटे यांनी व्यक्त केली आहे. मुंबईच्या विश्व संवाद केंद्राचे 'देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार' काल मुंबईत समारंभपूर्वक प्रदान करण्यात आले. या पुरस्काराला उत्तर देतांना गोगटे बोलत होते. गोगटे यांच्यासह धीरज वाटेकर, प्रज्ञा पोवळे, अक्षय मांडवकर, सचिन गायकवाड, गौरव ठाकूर, ओंकार दाभाडकर, वनश्री राड्ये, या आठ जणांना, या वर्षाचे 'देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण तालुक्यातल्या केकत जळगाव इथं काल बिस्कीटं खाल्ल्यानं दोनशेहून जास्त मुला-मुलींना विषबाधा झाली. याठिकाणच्या जिल्हा परिषद शाळेत शालेय पोषण आहारात काल अर्धवेळ शाळा असल्यानं खिचडी ऐवजी दोन कंपन्यांच्या बिस्कीटांचं सकाळी वाटप झालं. ही बिस्कीटं खाल्ल्यावर अर्ध्या तासाने प्रारंभी ब-याच विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या आणि ताप असा त्रास झाला. या विद्यार्थ्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. थोड्याच वेळानंतर आणखी काही विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. सदर बिस्कीटांचे नमुने आरोग्य विभागाकडून तपासणीसाठी देण्यात आले आहेत.
****
ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यांसाठी जालना इथं दीपक रणनवरे यांनी पुकारलेलं उपोषण मागे घेण्याची विनंती तहसीलदार छाया पवार यांनी केली आहे. पवार यांनी काल रणनवरे यांची भेट घेऊन चर्चा केली, तसंच आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवण्यात येतील, असं सांगितलं. राज्य सरकारने १४ डिसेंबर २०२३ रोजी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची घोषणा केली, त्याची तातडीनं अंमलबजावणी करण्यात यावी, यासह इतर मागण्यांसाठी रणनवरे यांनी हे उपोषण पुकारलं आहे.
****
नांदेड पोलीस परिक्षेत्रातल्या नांदेड, परभणी, हिंगोली आणि लातूर या चार जिल्ह्यात १ ते १५ ऑगस्ट दरम्यान अवैध धंदे चालकांविरुद्ध एक हजार १६३ गुन्हे दाखल करण्यात आले असून, सुमारे सव्वा दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या अंतर्गत हातभट्टीचालक, दारू विक्रेते, गुटखा, जुगार चालक, अवैध वाळू माफिया यांच्याविरुद्ध ही कारवाई करण्यात आली.
****
मराठी साहित्य तसंच अभ्यासक्रमात आमचं चांगलं व्यक्तिचित्रण यावं, अशी अपेक्षा कुरूप या कवितासंग्रहाच्या कवयित्री, तृतीयपंथी सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केली आहे. माझे लेखन माझी भूमिका, या विषयावर काल छत्रपती संभाजीनगर इथं देवगिरी महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात शेख बोलत होत्या. आमच्या वेदना संवेदना यावर आपण लिखाण केलं असून, तृतीयपंथीयांनी लिहितं व्हावं, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
****
परभणी इथं काल भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते दिवंगत वसंतराव सबनीस प्रतिष्ठानचं उद्घाटन केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या हस्ते काल झालं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून समाजहिताचं काम करत असतांनाच वसंत सबनीस यांनी गोव्यात भाजपाच्या उभारणीत योगदान दिलं. तसंच कोकणासह परभणीतही जनसंपर्काची जोडणी केली, असं नाईक यांनी यावेळी नमूद केलं.
****
धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्र ग्रामीण बँकेने चालू आर्थिक वर्षात जिल्हा प्रशासनाने दिलेल्या उद्दिष्टाच्या सव्वाशे टक्के पीक कर्ज वाटप केलं आहे. बँकेच्या या कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे तसंच सर्व लोकप्रतिनिधींनी बँक व्यवस्थापनाचं अभिनंदन केलं आहे.
****
नांदेड जिल्ह्यात भोकर इथं श्री संत सेवालाल महाराज यांच्या स्मारकाचं काल भूमिपूजन करण्यात आलं. सात कोटी खर्च करून हे स्मारक उभारलं जाणार आहे.
****
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेली बालरंगभूमी परिषदेचा, जल्लोष लोककलेचा हा महोत्सव काल बीड इथं पार पडला. के. एस. के. महाविद्यालयात हा कार्यक्रम घेण्यात आला.
****
0 notes
Text
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम रॅकिंगमध्ये गोंदिया राज्यात पहिला
गोंदिया, दि.04 : गतवर्षी जून महिन्याच्या आरोग्य संचालनायाच्या प्रसिद्ध तक्ता मध्ये गोंदिया राज्यात पाचव्यास्थानी होत���.मात्र सन 2022-23 वर्षां मध्ये गोंदिया जिल्ह्याने विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाच्या रँकिंगमध्ये ऑक्टाेबंर 2022 पासुन सातत्य राखत गेल्या 5 महिन्यांपासुन राज्यात प्रथम क्रमांक राखण्यात यश मिळविले आहे. महाराष्ट्र शासन आरोग्य सेवासंचालनाया तर्फे दर महिन्याला जिल्हा आरोग्य अधिकारी,…
View On WordPress
0 notes
Text
अरे वाह! तुमचे केस तुम्हाला महिन्याला 25,000 रुपये कमवून देऊ शकतात
नवी दिल्ली | स्त्रीचं सौंदर्य म्हणजे तिचे सुंदर लांबसडक केस (Hair) होय. केसांमुळं स्त्रीच्या सौंदर्यात भर पडते. अनेक स्त्रींया त्यांच्या केसांची काळजी अगदी प्राणपणाने घेत असतात. काहींना मोठे केस नको वाटतात, काहींना लहान केस आवडतात,मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का? की याच केसाने आपल्याला पैसे देखील मिळू ��कतात. हल्ली अनेक वेगवेगळ्या बिझनेस (business) आयडिया येत आहेत. घरीबसल्या तुम्ही पैसे कमवायचा विचार करत असाल तर तुमचे केस तुम्हाला पैसे मिळवून देऊ शकतात. तुम्ही कधी विचार केलाय का तुम्ही जेव्हा पार्लरला केस कट करण्यासाठी जाता तेव्हा हे पार्लरवाले तुमचे हे केस विकून कसे आणि किती पैसे कमावतात. कट केलेल्या केसांना आपल्याकडं कचरा मानला जातो. हाच केसांचा कचरा तुम्हाला बक्कळ कमाई करुन देऊ शकतो. या केसांपासून अनेक वस्तू तयार होतात. या केसांचा उपयोग कृषी(agriculture), वैद्यकीय आणि बांधकाम क्षेत्रात (Construction sites) देखील केला जातो. पार्लर किंवा न्हावी हे तुमचे केस बाजारात किंवा परदेशात विकतात. या कामाला केसांचा व्यवसाय म्हणतात. या केसांचा उपयोग भारत(India), चीन(Chin) आणि अमेरिकेत(America) खतं बनवण्यासाठी केला जातो. केसांपासून विविध प्रकारच्या दोऱ्या, स्टफिंग खेळणी(Stuffing toys), फर्निचर, गाद्या, काॅस्मेटिक ब्रश या गोष्टी बनवल्या जातात. यांपासून अनेक सुंदर काॅस्मेटिक्स बनवल्या जातात. ��नावट मिशा, बनावट केस, भुवया, दाढी हे या केसांपासून बनवले जातात जे आपण कचरा म्हणून टाकून देतो. या व्यवसायात मिळणारा फायदा प्रंचड आहे. अनेकदा हे तुमच्या केसांच्या प्रमाणावर अवलंबून असतं. कधी कधी खूप जास्त तर कधी खूप कमी कमाई मिळते. तरीदेखील तुमच्याकडं योग्य प्रमाणात केस असले तर तुम्ही महिन्याला आरामात 20,000 ते 25,000 कमवू शकता. महत्त्वाच्या बातम्या Read the full article
0 notes