#नेत्याचं
Explore tagged Tumblr posts
Text
Narendra Modi : गुजरातमधील डोंगराएवढ्या विजयाचं श्रेय कोणाचं? मोदींनी घेतलं मराठी नेत्याचं नाव
Narendra Modi : गुजरातमधील डोंगराएवढ्या विजयाचं श्रेय कोणाचं? मोदींनी घेतलं मराठी नेत्याचं नाव
Narendra Modi : गुजरातमधील डोंगराएवढ्या विजयाचं श्रेय कोणाचं? मोदींनी घेतलं मराठी नेत्याचं नाव Narendra Modi in BJP Parliamentary Board Meeting : गुजरात विधानसभा निवडणुकीत झालेल्या विक्रमी विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मराठी नेत्याला दिलं आहे. Narendra Modi in BJP Parliamentary Board Meeting : गुजरात विधानसभा निवडणुकीत झालेल्या विक्रमी विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
View On WordPress
#modi:#narendra#अपडेट न्यूज#आजची बातमी#आताची बातमी#ऑनलाईन बातम्या#कोणाचं?#गुजरातमधील#घेतलं#ठळक बातम्या#डोंगराएवढ्या#ताज्या घडामोडी#नाव#नेत्याचं#न्यूज फ्लॅश#बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र#मोदींनी#लेटेस्ट बातमी#विजयाचं#श्रेय
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 11 August 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक ११ ऑगस्ट २०२३ सकाळी ७.१० मि.****
केंद्र सरकारच्या विरोधातला अविश्��ास प्रस्ताव लोकसभेनं आवाजी मतदानानं फेटाळला; मतदानापूर्वी काँग्रेससह विरोधी पक्षांचा सभात्याग
आपल्या सरकारच्या आगामी तिसऱ्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल-अविश्वास प्रस्तावावरच्या उत्तरात पंतप्रधानांची ग्वाही
आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी लोकसभेतून निलंबित
करचोरी रोखून महसूलवाढीवर भर देण्याचे अर्थमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी १५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम
मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत हिंगोली तसंच नांदेड इथं अमृत वाटिका उभारण्यास प्रारंभ
आणि
पश्चिम विभाग आंतरराज्य बॅटमिंटन स्पर्धेत राज्याच्या बॅडमिंटन संघाला तिहेरी मुकूट
****
केंद्र सरकारच्या विरोधातला अविश्वास प्रस्ताव लोकसभेनं काल आवाजी मतदानानं फेटाळून लावला. या प्रस्तावावर गेल्या तीन दिवसांपासून झालेल्या चर्चेला काल सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिल्यानंतर आवाजी मतदान घेण्यात आलं. मात्र मतदानाच्या आधी, पंतप्रधानांचं भाषण सुरू असतानाच विरोधकांनी सभात्याग केला.
****
या अविश्वास प्रस्तावाला उत्तर देताना पंतप्रधानांनी, आपल्या सरकारच्या आगामी तिसऱ्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, अशी ग्वाही दिली. २०१४ नंतर भारतानं अव्वल पाच अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवलं असून, रिफॉर्म, ट्रान्सफॉर्म आणि परफॉर्म यामुळे देशाची स्थिती बळकट झाल्याचं त्यांनी नमूद केलं.
संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये वैयक्तिक माहिती संरक्षण विधेयक यासारख्या लोकोपयोगी विधेयकावर चर्चा होणं अपेक्षित होतं, मात्र विरोधकांनी देशहितापेक्षा राजकारणाला प्राधान्य दिल्याचं पंतप्रधान म्हणाले. काँग्रेसनं कायम घराणेशाही आणि दरबारी राजकारण केल्याचं सांगून, त्यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतमातेवर केलेल्या वक्तव्याचा मोदी यांनी निषेध केला. ते म्हणाले:
पता नही क्यो कुछ लोग भारत माता की मृत्यू की कामना करते नजर आ रहे हैं, इससे बडा दुर्भागय क्या है? ये वो लोग हैं, जो कभी लोकतंत्र की हत्या की बात करते हैं, कभी संविधान की हत्या की बात करते है। दरअसल जो इनके मन मे है वही उनके कृतित्व मे सामने आ जाता है।
मणिपूर संदर्भात बोलतांना पंतप्रधानांनी देश आणि सरकार मणिपूरसोबत असल्याची ग्वाही दिली. महिलांवर झालेले अत्याचार अक्ष्यम्य असून, दोषींना कठोरात कठोर शिक्षा करणार असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं. या अविश्वास प्रस्तावावर बोलणाऱ्यांच्या यादीत विरोधी पक्षाच्या कोणत्याही मोठ्या नेत��याचं नाव नव्हतं, या प्रस्तावाचं कोणीही नेतृत्वच केलं नाही, असं पंतप्रधान म्हणाले.
****
दरम्यान, लोकसभेत काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांचं निलंबन करण्यात आलं आहे. काल अविश्वास प्रस्तावावर बोलताना, चौधरी यांनी पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह विधान केलं. सदनात वारंवार गैरवर्तन केल्याबद्दल चौधरी यांच्या निलंबनाचा ठराव संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मांडला, सदनानं तो मंजूर केला. हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे पाठवण्यात आलं आहे.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विकास आणि सुधारणांचा धडाका लावलेला असून, त्यामुळे विरोधकांच्या छातीत धडकी भरली असल्याचं, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यांनी केंद्र सरकारविरुद्धच्या अविश्वास प्रस्तावावर सामाजिक संपर्क माध्यमांतून आपली प्रतिक्रिया नोंदवली. काँग्रेस पक्षाच्या सुमारे ६० वर्षांच्या कालखंडात जेवढी विकासकामं झाली नाहीत, त्यापेक्षा अधिक विकास गेल्या नऊ वर्षांत झाल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. पंतप्रधान आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांचं स्थान या चर्चेनंतर अधिक बळकट होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
****
दरम्यान, मुख्यमंत्री सातारा जिल्हा दौऱ्यावर असून, ते आज महाबळेश्वर इथल्या दरे या त्यांच्या मूळ गावी जाणार आहेत. काल सातारा इथल्या विश्रामगृहात वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी, सातारा जिल्ह्यात पर्यटनाच्या वाढीसाठी मोठा वाव असून, जिल्ह्यात पर्यावरण पूरक पर्यटनाचा विकास करुन स्थानिकांच्या रोजगार निर्मितीवर भर देणार असल्याचं सांगितलं.
****
राज्यातल्या पायाभूत सुविधा आणि सर्वांगीण विकासाकरता अधिकाऱ्यांनी करचोरी रोखून महसुलवाढीवर भर द्यावा, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे. राज्याच्या आर्थिक स्थितीच्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. राज्याला विकासाच्या वाटेवर अग्रेसर ठेवण्यासाठी महसूलात वाढ होणं आवश्यक आहे. मात्र, याचा बोजा नागरिकांवर न टाकता करचोरी रोखून महसूल वाढीवर भर द्यावा, परिवहन विभागानं ��ाहनचालक परवाना देण्याच्या कार्यप्रणालीतल्या उणीवा दूर कराव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
देशातल्या रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास, सुशोभिकरणाच्या धर्तीवर राज्यातल्या एसटी स्थानकांचा पुनर्विकास व्हावा आणि पहिल्या टप्यात किमान ५० एसटी स्थानकांचं सुशोभिकरण करावं, असे निर्देशही त्यांनी दिले.
****
खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुरु करण्यात आलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी - अमृत साठी यावर्षी दीडशे कोटी रुपये निधी दिला जाणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. मुंबईत या संदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. खुल्या प्रवर्गातल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी शैक्षणिक योजना, स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण, आणि नोकरी इच्छुक युवकांसाठी नागरी सेवा अभ्यासक्रमाचे मार्गदर्शन वर्ग सुरू करण्यासाठी हा निधी देण्यात येणार आहे.
****
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या चौदाव्या हप्त्याचा लाभ न मिळालेल्या पात्र शेतकऱ्यांसाठी १५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी ही माहिती दिली. या योजनेचा १४ वा हप्ता नुकताच वितरित करण्यात आला. यामध्ये राज्यातल्या ९७ लाख पात्र शेतकऱ्यांपैकी, ८५ लाख शेतकऱ्यांनाच प्रत्यक्षात लाभ मिळाला आहे. १२ लाख शेतकरी पात्र असूनही, भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत नसणं, ई-केवायसी नसणं तसंच बँक खात्याशी आधार संलग्न नसणं, या तीन कारणांनी वंचित राहिले आहेत. स्थानिक प्रशासनानं असे शेतकरी शोधून तीनही अटींची पूर्तता करण्याचे निर्देश मुंडे यांनी दिले आहेत.
****
भारतीय रिजर्व्ह बॅंकेनं रेपो दरात कोणताही बदल केला नसून, तो सहा पूर्णांक पाच टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. बँकेच्या द्वैमासिक पतधोरणाचा चालू आर्थिक वर्षाचा तिसरा आढावा काल गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी जाहीर केला. देशातल्या बँकांची आर्थिक स्थिती चांगली असून, भारत ही जगात पाचव्या क्रमाकांची अर्थव्यवस्था असल्याचं ते म्हणाले.
या संबंधीची समिती आर्थिक पतधोरण आणि महागाई वर लक्ष ठेवून आहे. केंद्रानं मुद्रास्थिती चार टक्यांच्या जवळपास स्थिर ठेवायला सांगितलं असल्याची माहिती दास यांनी दिली.
जुलैमधे टोमॅटोचे दर भडकल्यामुळे ग्राहक किंमत निर्देशांकात वाढ झाली होती, ती येत्या काही दिवसात निवळेल असं या आढाव्यात म्हटलं आहे. महागाई दर चार टक्क्यांपर्यंत रोखावा असं सरकारने रिजर्व्ह बँकेला सांगितलं होतं. यंदा मोसमी पावसाची प्रगती चांगली झाल्यानं खरीपाचं पीकही चांगलं येईल, असं दास यांनी सांगितलं.
****
येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर रोज��� विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची बैठक मुंबईत होत आहे. राज्यातील महाविकास आघाडी या बैठकीची संयोजक असून काल महाविकास आघाडीचे प्रमुख घटक पक्ष काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी वाकोला इथल्या ग्रँड हयात हॉटेलला भेट देऊन पाहणी केली. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शिवसेना खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेंद्र वर्मा यांच्यासह तीनही पक्षातील नेते उपस्थित होते.
****
मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त न्यायाधीशपदी अधिवक्ता मंजुषा देशपांडे यांची राष्ट्रपतींनी नियुक्ती केली आहे. त्यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून त्या या पदावर दोन वर्षांच्या कालावधीसाठी कार्यरत राहणार आहेत.
****
पंधरा लाख रुपयांच्या लाच प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कोठडीत असलेले तहसीलदार नरेशकुमार बहिरम याला निलंबित करण्यात आलं आहे. नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी हे निलंबनाचे आदेश काढले आहेत.
****
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख संकल्पनेतून औरंगाबाद इथं येत्या रविवारी आरोग्य शिबिर होत आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांनी या संदर्भात समिती स्थापन केली आहे. विविध प्रमुख अधिकाऱ्यांचा या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. अधिकाऱ्यांनी या संदर्भातली जबाबदारी योग्य रितीनं पार पाडून अहवाल सादर करावेत, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
औरंगाबादचे विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी जलजीवन मिशन योजने अंतर्गत मराठवाडा विभागातल्या कामांचा काल आढावा घेतला. वैयक्तिक नळजोडणी बाबत जिल्ह्यांना देण्यात आलेलं उदीष्ट विहित कालावधीत पूर्ण न केल्यास कारवाई करण्यात येईल, तसंच याबाबत कोणत्याही प्रकारे हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा आर्दड यांनी संबंधित यंत्रणेला दिला आहे.
****
अहमदनगर जिल्ह्यात कोपरगांव तालुक्यातल्या चासनळी इथं प्रसुतीसाठी आलेल्या एका आदिवासी महिलेचा मृत्यू झाला. वेळेत उपचार न मिळाल्यानं, अति रक्तस्रावामुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं. या प्रकरणी एक डॉक्टर आणि रुग्णवाहिकेचा चालक अशा दोघांना सेवेतून बडतर्फ तर वैद्यकीय अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
****
साताऱ्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचं, छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, सातारा, असं नामकरण करण्यात आलं आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल ही माहिती दिली.
****
मेरी माटी मेरा देश अभियानांतर्गत हिंगोली इथल्या जिल्हा परिषदेच्या परिसरात देशी वृक्षांच्या रोपाची लागवड करुन अमृत ��ाटिका तयार करण्यात येत आहे. याचा ��ुभारंभ काल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करुन करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी यासंदर्भात अधिक माहिती दिली. ते म्हणाले:
‘‘‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ हा जो उपक्रम या ठिकाणी जिल्हा परिषद हिंगोली तर्फे राबवण्यात येत आहे. या मध्ये कालच आपण शपथ घेतलेली आहे. सोबत आज शासनाच्या आवाहनाप्रमाणे ७५ झाडे लावण्याचे उद्दिष्ट आपल्या प्रत्येक कार्यालयाला दिले होते. त्या अनुषंगाने आम्ही जिल्हा परिषदेमध्ये ७५ च्या दहा पटीत म्हणजे ७५० झाडे झाडांचं वृक्षारोपण करायचं ठरवलं होतं पण आता जवळ जवळ हजार झाडांची रोपं आपल्याला मिळाली आहे. या वर्षी आपली नर्सरी सुध्दा तयार केलेली होती स्वत:ची, या नर्सरी मध्ये तयार झालेली झाडं सुद्धा या उपक्रमामध्ये आम्ही लावून घेत आहोत.’’
****
मेरी माटी मेरा देश अभियानाअंतर्गत नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातल्या सरसम इथं आयुर्वेदिक वनस्पती उद्यानाचं उद्घाटन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या हस्ते काल झालं. तसंच त्यांनी काल सरसमसह किनवट तालुक्यातल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन आरोग्य विषयक कार्यक्रमांचा आढावा घेतला.
****
मध्यप्रदेशात इंदूर इथं झालेल्या पश्चिम विभाग आंतरराज्य बॅटमिंटन स्पर्धेत राज्याच्या बॅडमिंटन संघानं तिहेरी मुकुट पटकावला आहे. राज्याच्या पुरुष, महिला आणि कनिष्ट गटानं या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. औरंगाबादच्या अजिंठा शिक्षण संस्था संचलित पंडीत जवाहरलाल नेहरू महाविद्यालयातले खेळाडू प्रथमेश कुलकर्णी आणि सोनाली मिलखेलकर यांचा या संघांत समावेश होता. या यशामुळे राज्याच्या संघांची येत्या डिसेंबर महिन्यात गुवाहाटी इथं होणाऱ्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
****
आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारत विरुद्ध जपान तसंच मलेशिया विरुद्ध दक्षिण कोरिया हे सामने होणार आहेत. चेन्नईमध्ये सुरू या स्पर्धेमध्ये भारताचा सामना रात्री साडे आठ वाजता सुरू होईल.
****
आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत देशातल्या ११२ जिल्ह्यांपैकी विविध योजना आणि उपक्रम राबवण्यात उस्मानाबाद जिल्हा दहाव्या क्रमांकावर आहे. उस्मानाबाद जिल्हा कायम प्रगतशील राहावा यासाठी विविध प्रयत्न केले जातील आणि यापुढे आपली कामगिरी अजून जास्त उंचावण्यासाठी कायम कटिबद्ध असल्याचं, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी ��्हटलं आहे.
****
मराठवाडा मुक्तिसंग्रामाची शौर्यगाथा पुढील पिढीला समजावी, यासाठी लातूर जिल्हा परिषदेचा माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा माहिती कार्यालय आणि बाबासाहेब परांजपे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं ‘शौर्यगाथा मराठवाडा मुक्तिसंग्रामाची’ ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. आज ज्ञानेश्वर माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते या व्याख्यानमालेचं उद्घाटन होणार आहे. बाबासाहेब परांजपे फाउंडेशनचे सचिव तथा इतिहासकार भाऊसाहेब उमाटे हे व्याख्यानमालेतलं पहिलं पुष्प गुंफणार आहेत.
****
येत्या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वज संहितेचं पालन करण्याचं आवाहन नांदेड जिल्हा प्रशासनानं केलं आहे. कोणत्याही परिस्थितीत प्लास्टीकचे राष्ट्रध्वज वापरण्यात येऊ नयेत. यासाठी सर्व शासकीय यंत्रणांसह शाळा, महाविद्यालये, संस्था, संघटना आदींसह नागरीकांनी दक्ष रहावं, असं प्रशासनानं सांगितलं आहे.
****
उस्मानाबाद शहरातल्या श्रीपतराव भोसले विद्यालयातले माजी संगीत शिक्षक पंडित दीपक धोंडीराम लिंगे यांना अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाकडून देण्यात येणारा पंडित विष्णु दिगंबर पलुस्कर संगीतरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. येत्या १९ ऑगस्टला वाशी इथं होणाऱ्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
****
कुष्ठरोग निर्मूलनासाठी राज्य सरकारने राबवलेल्या कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र - कुसुम या मोहिमेअंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्यात वीटभट्टी, ऊसतोड, खाण कामगार, स्थलांतरीत नागरीक अशा १४ हजार ६३० जणांची तपासणी करण्यात आली. त्यात २२६ संशयीत रुग्ण आढळले असून, त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
****
0 notes
Text
“…म्हणून शरद पवारांनी अजित पवारांना माघारी बोलवलं”, मनसे नेत्याचं विधान
“…म्हणून शरद पवारांनी अजित पवारांना माघारी बोलवलं
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ साली स्थापन झालेल्या ७२ तासांच्या सरकारबाबत केलेल्या विधानामुळे वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी चर्चा करुनच अजित पवार आणि मी सरकार स्थापन केलं होतं, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. यावरून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. मनसचे नेते प्रकाश महाजन यांनीही याप्रकरणावर भाष्य करत टोलेबाजी केली…
View On WordPress
0 notes
Text
महाराष्ट्र: 'आता खासदारही फुटतील, उद्धव ठाकरेंना याची कल्पना होती', शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचं वक्तव्य
महाराष्ट्र: ‘आता खासदारही फुटतील, उद्धव ठाकरेंना याची कल्पना होती’, शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचं वक्तव्य
आमदारांपाठोपाठ आता खासदारही आपली बाजू सोडणार आहेत, याची उद्धव ठाकरेंना आध���च कल्पना होती. पण ते विशेष काही करताना दिसत नाहीत. कदाचित ते आता सर्वोच्च न्यायालयात 20 जुलै रोजी होणाऱ्या सुनावणीची वाट पाहत असतील. आता काही खासदारही सोडणार आहेत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माहीत होते. शिवसेनेने 55 पैकी 40 आमदार सोडल्यानंतर आता 18 पैकी 12 लोकसभेचे खासदारही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आले आहेत.उद्धव…
View On WordPress
0 notes
Photo
भाजप नेत्याचं कोरोनामुळे निधन, दिल्लीत उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास https://ift.tt/3euPygD
0 notes
Text
Nilesh Rane: काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे; भाजप नेत्याचं 'ते' ट्विट चर्चेत - nilesh rane attacks ajit pawar
Nilesh Rane: काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद मिळालच पाहिजे; भाजप नेत्याचं ‘ते’ ट्विट चर्चेत – nilesh rane attacks ajit pawar
मुंबईः राज्यात काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्याची तयारी सुरु असल्याची चर्चा सध्या सुरु आहेत. सध्या राज्याचे उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे असून अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. यावरुनच भाजपचे नेते निलेश राणे यांनी अजित पवारांवर निशाणा साधला आहे. राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीत पुन्हा एकदा खाते वाटप करण्यात येणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. काँग्रेसला उपमुख्यमंत्री तर…
View On WordPress
0 notes
Photo
तृणमूलच्या कार्यकर्त्यांना स्मशानात पाठवू, भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान http://www.headlinemarathi.com/national-marathi-news/%e0%a4%a4%e0%a5%83%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%95%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/?feed_id=20041&_unique_id=5faa183477cfa
0 notes
Text
संविधान वाचवायचं असेल मोदींच्या हत्येसाठी तयार रहा; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
संविधान वाचवायचं असेल मोदींच्या हत्येसाठी तयार रहा; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
संविधान वाचवायचं असेल मोदींच्या हत्येसाठी तयार रहा; काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य Raja Pateriya On Modi : काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी मंत्री राजा पटेरिया यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यानंतर आता त्यांच्यावर भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. Raja Pateriya On Modi : काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करताना माजी मंत्री राजा पटेरिया यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.…
View On WordPress
#‘काँग्रेस#अपडेट न्यूज#असेल#आजची बातमी#आताची बातमी#ऑनलाईन बातम्या#ठळक बातम्या#तयार#ताज्या घडामोडी#नेत्याचं#न्यूज फ्लॅश#बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र#मोदींच्या#रहा#लेटेस्ट बातमी#वक्तव्य#वाचवायचं#वादग्रस्त#संविधान#हत्येसाठी
0 notes
Text
Sushant Singh Rajput: Sushant singh rajput case : सुशांतप्रकरणातील 'हा' युवा नेता कोण?; भाजपने केला नवा गौप्यस्फोट - bjp leader suresh nakhua tweets a cryptic message regarding sushant singh rajput probe by cbi
Sushant Singh Rajput: Sushant singh rajput case : सुशांतप्रकरणातील ‘हा’ युवा नेता कोण?; भाजपने केला नवा गौप्यस्फोट – bjp leader suresh nakhua tweets a cryptic message regarding sushant singh rajput probe by cbi
[ad_1]
मुंबई: अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात स्वत:ची इमेज चमकवण्यासाठी एक युवा नेता स्वत:हून सीबीआय चौकशीला सामोरे जाणार असल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजपने या नेत्याचं आणि त्याच्या पक्षाचं नाव घेतलं नाही, मात्र संदिग्ध इशारा दिल्याने तर्��वितर्क लढवले जात आहेत.
भाजपचे नेते आणि प्रवक्ते सुरेश नाखुआयांनी एक ट्विट करून हा गौप्यस्फोट केला आहे. एक तरुण नेता आपली इमेज वाचवण्यासाठी स्वत:हून…
View On WordPress
#BJP#cbi#Suresh Nakhua#Sushant Singh Rajput#young politician#भाजप#सीबीआय#सुरेश नाखुआ#सुशांतसिंह राजपूत
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 04 August 2020 Time 7.10 AM to 7.20 AM Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – ०४ ऑगस्ट २०२० सकाळी ७.१० मि. ****
· अयोध्येत उद्या होणाऱ्या राम मंदिर उभारणीच्या भूमीपूजनाची सर्व तयारी पूर्ण.
· फेरीवाले आणि रस्त्यांवर सामान विकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणं शक्य नसल्यानं, त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी देता येणार नसल्याचं, राज्य सरकारचं मुंबई उच्च न्यायालयात शपथपत्र.
· व्यायाम शाळा आणि योग संस्थाकरता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी.
· अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात बिहार पोलिसांना सहकार्य केलं जात असल्याचं, मुंबई पोलीस आयुक्तांचं स्पष्टीकरण.
· राज्यात आणखी आठ हजार ९६८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद, २६६ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू.
· औरंगाबाद आणि लातूरमध्ये प्रत्येकी तीन, नांदेड चार तर उस्मानाबाद आणि परभणीत प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू, बीडमध्ये ५६, जालना ४२ आणि हिंगोलीत सात नवे रुग्ण.
आणि
· राखी पौर्णिमा देशभरात उत्साहात साजरी.
****
अयोध्येत उद्या होणाऱ्या राम मंदिर उभारणीच्या भूमीपूजनाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल अयोध्येत जाऊन तिथल्या तयारीचा आढावा घेतला. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिकाही काल जाहीर करण्यात आली. या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या आज दुसऱ्या दिवशी सहा तासांचा विशेष राम रचा अनुष्ठान आयोजित केलं जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या भूमीपूजन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यावेळी एकशे पस्तीस संत उपस्थित राहणार आहेत. अयोध्येमधे सध्या उत्सवाचं वातावरण असून लोक भूमीपूजनाच्या ऐतिहासिक क्षणाची वाट पाहत आहेत.
दरम्यान, कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत राममंदिराच्या पायाभरणी समारंभाला उपस्थित राहणार नाहीत, असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. या सोहळ्याला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत, हे अधिक महत्त्वाचं आहे, उद्धव ठाकरे नंतर कधीही अयोध्येत जाऊ शकतात, असं सांगत राऊत यांनी या भूमिपूजन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या.
****
कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर, फेरीवाले आणि रस्त्यांवर सामान विकणाऱ्यांवर नियंत्रण ठेवणं शक्य नसल्यानं, त्यांना व्यवसाय करण्यास परवानगी देता येणार नसल्याचं, राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं. कोरोना विषाणू संसर्गामुळे लागू टाळेबंदीत अशा विक्रेत्यांकडे उत्पन्नाचा मार्ग नसल्यामुळे त्यांनी न्यायालयात याचिका दाखल करून, शासनाच्या निर्णयाला आव्हान दिलं आहे. या याचिकेसंदर्भात राज्य सरकारनं शपथपत्र दाखल केलं आहे. पोलिसांसह प्रशासकीय यंत्रणेवर आधीच अतिरिक्त ताण असून, असंघटीत क्षेत्रात अंतर्भाव असलेल्या या व्यावसायिकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम, आवाक्याबाहेरचं असल्याचं शासनानं नमूद केलं.
****
उद्यापासून सुरू होणाऱ्या व्यायाम शाळा आणि योग संस्थाकरता केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. सरकारनं जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार स्पा-साउनासह, बाष्प स्नान आणि जलतरण तलाव बंद ठेवावे लागणार आहेत. प्रवेशद्वाराव��� सॅनिटाइजरसह तापमान मोजण्यासाठी थर्मल स्कॅनर असणं बंधनकारक आहे. कोविड-19 संसर्गाची लक्षणं नसणाऱ्यांनाच प्रवेश देणं, साधनसामग्रीचं निर्जंतुकीकरण करणं, प्रत्येक व्यक्तीसासाठी चार चौरस मीटर जागा असणं, एकमेकांमध्ये सहा फुट अंतर राखणं, मास्क ऐवजी चेहऱ्यावर पारदर्शक आवरण-फेस शिल्ड घालणं बंधनकारक असणार आहे. ऑक्सिजनची पातळी ९५ टक्क्यांपेक्षा कमी असणाऱ्यांना याठिकाणी व्यायाम करता येणार नाही. ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसह गर्भवती महिला आणि दहा वर्षांखालील मुलांना व्यायामशाळेत बंदी असेल. प्रतिबंधीत-कंटेनमेंट क्षेत्रातल्या व्यायामशाळा आणि योग संस्था ३१ ऑगस्टपर्यंत बंदच राहणार असल्याचं या मार्गदर्शक सूचनात स्पष्ट करण्यात आलं आहे.
****
अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांकडून बिहार पोलिसांना सहकार्य केलं जात असल्याचं, मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटलं आहे. या तपासकार्यात कायदेशीर बाबींचं योग्य पालन करण्याच्या सूचना त्यांनी बिहार पोलिसांना केल्या आहेत. सुशांतसिंह यांचा अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद असून, मृत्यू कोणत्या परिस्थितीत झाला, याचा शोध घ्यायचा असल्याचं, परमबीरसिंह म्हणाले. सुशांतच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी त्याच्या घरी कोणतीही पार्टी झाली नाही, तसंच आपल्या तपासात कोणत्याही राजकीय नेत्याचं नाव समोर आलेलं नाही, असंही त्यांनी सांगितलं.
या तपासासाठी बिहारहून आलेल्या तपास पथकाच्या प्रमुख अधिकाऱ्याला मुंबई पोलीस आणि मुंबई महानगरपालिकेनं विलगीकरणात ठेवल्याप्रकरणी काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी टीका केली आहे. या दोन्ही संस्थांची अशी भूमिका असल्यास, या प्रकरणाचा तपास कसा होणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलीस योग्य प्रकारे तपास करत असल्याचं, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गाचं संकट अजून टळलं नसून, अतिहत्वाच्या व्यक्तींनाही या विषाणूचा संसर्ग होत आहे, त्यामुळे लोकांनी गाफील राहू नये आणि अनावश्यक प्रवास टाळावा असं आवाहन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. गणेशोत्सवामध्ये चाकरमान्यांच्या येण्याजाण्याची व्यवस्था राज्य सरकार करत असून, लोकांनी अनावश्यक प्रवास, गर्दी आणि रहदारी कमी करावी असं आवाहनही त्यांनी केलं. गावपातळीवर कोरोना दक्षता समिती स्थापन करण्याची सूचनाही त्यांनी केली.
****
राज्यात काल आणखी आठ हजार ९६८ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातली एकूण रुग्णसंख्या चार लाख ५० हजार १९६ झाली आहे. तर काल २६६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. राज्यात या विषाणू संसर्गानं आतापर्यंत १५ हजार ८४२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल दहा हजार २२१ रुग्ण बरे झाल्यानं ��्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. राज्यात आतापर्यं दोन लाख ८७ हजार ३० रुग्ण बरे झाले असून, सध्या एक लाख ४७ हजार १८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
औरंगाबाद जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणूबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात या आजारामुळं आतापर्यंत ४८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, काल दिवसभरात आणखी ३४१ बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या १४ हजार ८९४ झाली आहे. तर काल ३२८ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ११ हजार २२९ रुग्ण या आजारातून बरे झाले असून, सध्या तीन हजार १७८ बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
लातूर जिल्ह्यात काल तीन कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात एकूण मृतांची संख्या १०३ झाली आहे. तर काल जिल्ह्यात एकूण ७८ नवे रुग्ण आढळले, यात ७२ रुग्ण हे अगोदरच्या रुग्णांच्या संपर्कातले आहेत तर सहा रुग्ण हे नवीन आहेत. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या दोन हजार ५४७ झाली आहे. त्यापैकी चौदाशे रुग्ण बरे झाले असून, लातूर जिल्ह्यात सध्या सध्या एक हजार ४४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
****
नांदेड जिल्ह्यात काल चार कोरोना विषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातल्या एकूण मृतांची संख्या ९४ झाली आहे. तर काल आणखी २०३ रूग्णांची नोंद झाली. यातले १२४ रुग्ण आरटीपीसीआर चाचणीत तर ७९ रुग्ण ॲन्टीजेन चाचणीत बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या दोन हजार ३५९ झाली आहे. तर काल जिल्ह्यात ६६ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार २० रुग्ण बरे झाले असून, सध्या एक हजार २३२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल आणखी नऊ बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातल्या एकूण रुग्णांची संख्या एक हजार ५७५ झाली आहे. त्यापैकी ५२२ रुग्ण बरे झाले असून, सध्या ९९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
परभणी जिल्ह्यात काल एका कोरोना विषाणू बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. जिल्ह्यात या आजारानं आतापर्यंत ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर काल आणखी २७ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ७२० झाली आहे. तर काल तीन रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. जिल्ह्यात आतापर्यंत ३९५ रुग्ण बरे झाले असून, सध्या २८५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
बीड जिल्ह्यात काल आणखी ५६ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ९६० झाली आहे. त्यापैकी ४२८ रुग्ण बरे झाले असून, ३४ जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ५०५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
जालना जिल्ह्यात काल आणखी ४२ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली. यात अँटिजेन चाचणीत ११ जण बाधित आढळले. त्यामुळे जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या दोन हजार ३७७ झाली आहे तर काल १२ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं. जालना जिल्ह्यात आतापर्यंत एक हजार ५६२ रुग्ण बरे झाले असून, सध्या ७४२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
****
हिंगोली जिल्ह्यात काल आणखी सात कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातली एकूण रुग्णसंख्या ७१६ झाली असून, सध्या २०२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, हिंगोली जिल्ह्यात कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परवा सहा ऑगस्टपासून १९ ऑगस्टपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी रूचेश जयंवशी यांनी काल ही माहिती दिली. अनेक मोबाईल संदेशाद्वारे गैरसमज पसरत असल्यामुळे त्यावरही स्वयंस्फूर्तीने प्रतिबंध घालावा असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
****
मुंबईत काल ९७० रुग्ण आढळले. पुणे जिल्ह्यात काल एक हजार ९९८ नवे रुग्ण आणि ४५ मृत्यूंची नोंद झाली. नाशिक जिल्ह्यात काल आणखी एक हजार १८ रुग्ण आढळले, तर अकरा जणांचा मृत्यू झाला. ठाणे जिल्ह्यात एक हजार ३३२, अहमदनगर ४५३, रायगड ३८३, सांगली ३५४, नागपूर २४६, सोलापूर १९३, सातारा १४८, अमरावती ९६, वाशिम ९२, यवतमाळ ८९, गोंदिया २२, तर भंडारा जिल्ह्यात काल आणखी १८ कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळले.
****
औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गातून रुग्ण बरे होण���याचे प्रमाण ८२ टक्के झालं असून, मृत्यूदरही कमी झाला असल्याचा दावा जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केला आहे. लोकप्रतिनिधींसोबत कोविड19 परिस्थितीबाबत बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. नागरिकांमध्ये प्रतिकार शक्ती विकसित होत असल्यानं, रोगप्रतिकारक तपासणीसाठी सर्वेक्षण करुन चार ते पाच हजार निवडक चाचण्या घेण्यात येणार आहेत. या चाचण्यांची तपासणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय- घाटीच्या प्रयोगशाळेत केली जाईल, असं ते म्हणाले. दिल्लीच्या धर्तीवर ही प्रक्रिया राबवण्यात येणार असून, यासाठी वाळूज-बजाज महानगर, महानगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण अशा तीन विभागांत जिल्ह्याची विभागणी करण्यात आली असल्याचं चौधरी यांनी सांगितलं.
****
लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत सलग दुसऱ्यांदा उदगीर इथल्या युवकांनी प्लाझ्मा दान केला आहे. दात्यास कसलाही धोका नसल्यानं उत्स्फुर्तपणे प्लाझ्मा दान करा आणि प्लाझ्मा योद्धा बना असं आवाहन, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेचे नव्याने रुजू झालेले अधिष्ठाता, डॉक्टर मोहन डोईबळे यांनी केलं आहे.
****
लातूर शहरात पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार लागू करण्यात आलेली टाळेबंदी शिथील करावी, अन्यथा पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा, लातूर जिल्हा शहर भारतीय जनता पक्षानं दिला आहे. जिल्ह्यात सततच्या टाळेबंदीमुळे हातावर पोट असणारे कामगार, व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे. टाळेबंदीच्या काळात शहर परिसराअंतर्गतच कडक नियम करण्यात आले असून, जिल्ह्यातल्या इतर ठिकाणी मात्र शिथिलता आहे. त्यामुळे आता शहराअंतर्गतही टाळेबंदी शिथील करण्यात यावी अशी मागणी पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे यांनी केली आहे.
****
कोरोना विषाणू संसर्गमुक्त झाल्यानं, राष्ट्रवादी काँग्रेस परभणी जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी यांना काल संध्याकाळी औरंगाबाद इथल्या खाजगी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. काल त्यांचा दुसरा चाचणी अहवाल नकारात्मक आला होता.
****
राखी पौर्णिमा अर्थात रक्षा बंधनाचा सण काल देशभरात उत्साहात साजरा झाला. कोरोना विषाणू संसर्गामुळे लागू टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर हा सण साजरा करण्यावर मर्यादा आली, मात्र, डिजीटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शुभेच्छांची देवाणघेवाण आणि संपर्कामुळे यात थोडासा दिलासा मिळाल्याचं दिसून आलं. नारळी पौर्णिमा म्हणून विशेषत: राज्याच्या समुद्र किनाऱ्यावरच्या कोळी बांधवांसाठी महत्वाच्या या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करुन पूजन करण्यात आलं.
****
मराठा आरक्षण तसंच अन्य मागण्यांसाठी परवा ६ ऑगस्टपासून राज्य��रात विविध प्रकारची आंदोलनं छेडली जाणार असून, ९ ऑगस्ट रोजी क्रांती दिनापासून आंदोलनं अधिक तीव्र होतील, असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे. नाशिक इथं काल मेटे यांच्या अध्यक्षतेखाली छावा युवा संघटना, छावा श्रमिक सेना, शिव क्रांती सेना, बळीराजा अशा विविध नऊ संघटनांची मराठा आरक्षणासंदर्भात बैठक झाली, त्यानंतर त्यांनी वार्ताहरांशी बोलताना ही माहिती दिली.
****
औरंगाबाद शहरातील हर्सुल तलाव पूर्ण भरल्यानंतर पाणी खामनदी पात्रात न सोडता तलावाची क्षमता वाढवून, साठवलेलं पाणी फिल्टर करुन लगतच्या सर्व वार्डातील नागरीकांना पोहोचवण्यावर भर देण्यात यावा अशी चर्चा औरंगाबादचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त तसंच संबंधित अधिकाऱ्यांसोबत झाल्याची माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. ते काल प्रसारमाध्यमांशी बोलत होते. दरम्यान, काल त्यांनी, तलाव भरल्यानंतर सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे बाधित होणाऱ्या खामनदी पात्रालगतच्या हिलाल आणि जलाल कॉलनी भागाची पाहणी करुन स्थानिक लोकांशी चर्चा केली. यावेळी उपस्थित संबंधित अधिकाऱ्यांना युध्दस्तरावर उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
****
बुलडाणा जिल्ह्यातल्या खडकपूर्णा प्रकल्पातून सुरू असलेल्या पाणी विसर्गात कपात करण्यात आली आहे. सध्या या प्रकल्पातून तीन हजार ८०८ घनफूट प्रतिसेकंद वेगाने पूर्णा नदीपात्रात पाणी सोडलं जात आहे. प्रकल्पात होणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्यानं १४ दरवाजे बंद करण्यात आले असून, आता फक्त पाच दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
****
0 notes
Text
'गांधी राष्ट्रपिता तर होते पण पाकिस्तानचे', वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजप नेत्याचं निलंबन
‘गांधी राष्ट्रपिता तर होते पण पाकिस्तानचे’, वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजप नेत्याचं निलंबन
महात्मा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने भाजप नेते अनिल सौमित्र यांच पक्षातून निलंबन केले आहे. अनिल सौमित्र यांनी फेसबूक पोस्टमध्ये महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त पोस्ट लिहिली होती.
‘गांधी राष्ट्रपिता तर होते पण पाकिस्तानचे. भारतात तर त्यांच्यासारखे करोडो पुत्र जन्माला आले. काही लायक होते तर काही नालायक,’ अशी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केली.
भाजप नेत्यांकडून अनेक वादग्रस्त वक्तव्य केली…
View On WordPress
0 notes
Text
मराठा आरक्षणप्रश्नी आणखी एका नेत्याचं उपोषण; राष्ट्रीय महामार्गावर आमरण उपोषणाचा दिला इशारा
https://bharatlive.news/?p=176105 मराठा आरक्षणप्रश्नी आणखी एका नेत्याचं उपोषण; राष्ट्रीय महामार्गावर आमरण ...
0 notes
Text
Maharashtra Politics: अजित पवार मुख्यमंत्री होणारच.. अमित शहांनीही केलं मान्य!, NCP नेत्याचं मोठं विधान
https://bharatlive.news/?p=93844 Maharashtra Politics: अजित पवार मुख्यमंत्री होणारच.. अमित शहांनीही केलं मान्य!, NCP ...
0 notes
Text
शरद पवार आमच्यासोबत येण्यास तयार असतील तर आम्ही स्वागत करु; भाजप नेत्याचं सूचक वक्तव्य
https://bharatlive.news/?p=93606 शरद पवार आमच्यासोबत येण्यास तयार असतील तर आम्ही स्वागत करु; भाजप नेत्याचं ...
0 notes
Text
Shiv Sena-BJP Alliance : भाजपच्या बड्या नेत्याचं उद्धव ठाकरेंना युतीचं आमंत्रण, म्हणाले...
https://bharatlive.news/?p=82339 Shiv Sena-BJP Alliance : भाजपच्या बड्या नेत्याचं उद्धव ठाकरेंना युतीचं आमंत्रण, ...
0 notes
Text
आता बिहारमधील महागठबंधनही आम्ही फोडू; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य
आता बिहारमधील महागठबंधनही आम्ही फोडू; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य
आता बिहारमधील महागठबंधनही आम्ही फोडू; भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य नवी दिल्ली – आम्ही मणिपूरमधून जेडीयु पक्ष संपवला आहे, आता आम्ही बिहारमधील राजद-जेडीयु महागठबंधन तोडू असे प्रतिप्रादन भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी केले आहे. काल जेडीयु पक्षाचे मणिपूर मधील सहा पैकी पाच आमदार भाजपने फोडले. हे आमदार आता भाजपमध्ये सामील झाले आहेत. जेडीयु पक्षाला राजकीय धक्का देण्यासाठी भाजपकडून ही खेळी केली गेली…
View On WordPress
#आता#आताची बातमी#आम्ही#ट्रेंडिंग बातमी#नेत्याचं#न्यूज अपडेट मराठी#फोडू#फ्रेश बातमी#बातम्या#बिहारमधील#भाजप#भारत देशातील बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी भाषेतील बातम्या#मराठी समाचार#महागठबंधनही#महाराष्ट्राची बातमी#मोठं#रेगुलर अपडेट#वक्तव्य#वायरल बातमी
0 notes