#विजयाचं
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 04 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएची २९० जागांसह बहुमताकडे वाटचाल-२३४ जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार पुढे.
महाराष्ट्रातून अनिल देसाई, नारायण राणे, सुनील तटकरे, अनूप धोत्रे, श्रीरंग बारणे, स्मिता वाघ, हेमंत सावरा, तसंच गोवाल पाडवी विजयी.
औरंगाबादहून संदिपान भुमरे यांना एक लाखावर तर बीडमधून पंकजा मुंडेंना २२ हजार मतांची आघाडी-जालन्यातून रावसाहेब दानवे पिछाडीवर.
आणि
देशात परिवर्तनाची लाट आल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीकडून व्यक्त.
****
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार राष्ट्रीय लोकशाही आघाडी-एनडीएची बहुमताकडे वाटचाल दिसून येत आहे. त्यांना जवळपास २९० जागांवर आघाडी मिळाली आहे. तर २३४ जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार आघाडीवर दिसून येत आहेत.
एकूण ५४३ जागांपैकी भारतीय जनता पक्षानं १७, काँग्रेसनं चार, जनता दलानं दोन, तर शिवसेना ठाकरे गट, आम आदमी पक्ष आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चानं प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
भाजपनं २२७ जागांवर आघाडी मिळवली असून, सर्वात मोठा पक्ष ठरण्याकडे भाजपची वाटचाल सुरू आहे. काँग्रेस ९४ जगांवर आघाडीवर असून, इतर पक्षांचे उमेदवार १८ जागांवर आघाडीवर आहेत.
****
महाराष्ट्रातल्या ४८ जागांपैकी काँग्रेस सर्वाधिक १२ जागांवर आघाडीवर आहे. भाजप ११, शिवसेना ठाकरे गट दहा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट सात, शिवसेना सहा, तर राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.
****
दक्षिण मध्य मुंबईतून ��हाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनिल देसाई ५३ हजार ३८४ मतांनी विजयी झाले.
****
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपच्या स्मिता वाघ विजयी झाल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून स्मिता वाघ यांच्या विजयाची औपचारिक घोषणा होणं बाकी आहे.
****
रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपचे नारायण राणे विजयी झाले आहेत. मतमोजणीच्या एकूण २४ फेऱ्या झाल्यानंतर राणे यांच्याकडे जवळपास ४० हजार मतांची आघाडी आहे.
****
पालघर मध्ये भाजपचे हेमंत सावरा एक लाख ८३ हजार ३८६ मतांनी विजयी झाले. मतमोजणीच्या एकूण २९ फेऱ्याअंती सावरा यांना सहा लाख २०८ मतं मिळाली.
****
नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे गोवाल पाडवी एक लाख ५९ हजार १२० मतांनी विजयी झाले. पाडवी यांना सात लाख ४५ हजार ९९८, तर भाजपच्या हिना गावित यांना पाच लाख ८६ हजार ८७८ मतं मिळाली.
****
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे संदीपान भुमरे एक लाखांहून अधिक मताधिक्यानं आघाडीवर आहेत. भुमरे यांना आतापर्यंत तीन लाख ४४ हजार ६२३, एमआयएमचे सय्यद इम्तियाज जलिल यांना दोन लाख ६२ हजार ९०६, तर महाविकास आघाडीचे चंद्रकांत खैरे यांना दोन लाख १४ हजार १९७ मतं मिळाली आहेत.
****
बीड लोकसभा मतदारसंघात २५व्या फेरीअंती महायुतीच्या पंकजा मुंडे २२ हजार ५२१ मतांनी आघाडीवर आहेत. आतापर्यंत मुंडे यांना पाच लाख ९७ हजार ७९३, तर महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे यांना पाच लाख ६७ हजार ३२२ मतं मिळाली.
****
जालना लोकसभा मतदार संघात आतापर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार महायुतीचे उमेदवार डॉ. कल्याण काळे यांनी ६० हजारांहून अधिक मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे. काळे यांना आतापर्यंत चार लाख ३२ हजार ३३२, तर भाजपाचे रावसाहेब दानवे यांना तीन लाख ७१ हजार ७७६ मतं मिळाली.
****
उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात मतमोजणीच्या २० व्या फेरीनंतर महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजे निंबाळकर यांना दोन लाख ५७ हजार मतांची आघाडी मिळवली आहे.
****
परभणी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे संजय जाधव ६२ हजार ४४४ मतांनी आघाडीवर आहेत. जाधव यांना आतापर्यंत दोन लाख १९ हजार ९०, तर महायुतीचे महादेव जानकर यांना एक लाख ५६ हजार ६४६ मतं मिळाली आहेत.
परभणीच्या मतदारांनी जातीवाद करणाऱ्यांना नाकारल्याची प्रतिक्रिया संजय जाधव यांनी दिली आहे -
ह्या विजयाचं श्रेय माझ्या मतदारसंघातील सर्व मतदारांना. ज्यांनी ज्यांनी जातीयवाद केला, त्यांना जनतेनं नाकारलं. त्यामुळे जातीयवादावर आणि धर्माच्या नावावर एखादेवेळेस ठीक होतं, पूर्वीच्या काळात. पण आता जातीपातीच्या नावावर राजकारण करून मतं मिळवत नसतात. सर्वसमावेशक असंच राजकारण करावं लागतं ज्यांना निवडणुका लढायच्या आहेत, जिंकायच्या आहेत, त्यांनी सगळ्यांना घेऊनच चालायची भूमिका ठेवली पाहिजे. जातीच्या नावावर मतं मागितल्यानंतर जसं आज पराभवाला सामोरं जावं लागलं, त्यांना तशाच पद्धतीची भूमिका मतदार हा ठरवत असतो.
****
हिंगोली लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. आष्टीकर यांनी आकाशवाणी बोलतांना ही प्रतिक्रिया दिली.
हा विजय माझा नसून हा सर्वसामान्य माणसाचा विजय आहे. महाविकास आघाडीचा विजय आहे. या महाराष्ट्रामध्ये अतिशय संवेदनशील आणि आमचे कुटुंबप्रमुख उद्धवसाहेब, माननीय शरद पवार साहेब, काँग्रेसचे नेते सर्व मंडळीचा हा विजय आहे असं मी मानतो. हा शिवसेनेचा बालेकिल्लाच आहे. जनतेने खूप मनाभावतून मतदान केलेलं आहे. खूप विचारपूर्वक मतदान केलेलं आहे. आणि मी सर्व जनतेच्या समोर नतमस्तक होतो.
****
नागपूर लोकसभा मतदार संघात बाराव्या फेरीनंतर महायुतीचे नितीन गडकरी ७७ हजार ९५९ मतांनी आघाडीवर आहेत.
अकोला लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे अनुप धोत्रे ४० हजार १२ मतांनी विजयी झाले. त्यांनी काँग्रेसचे अभय पाटील, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचा पराभव केला.
****
मावळ लोकसभा मतदारसंघात २२व्या फेरीअंती महायुतीचे श्रीरंग बारणे यांनी एक लाख ३१२ मतांची निर्णायक आघाडी घेतली आहे.
****
चंद्रपूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे प्रतिभा धानोरकर यांनी एक लाख ६९ हजार ६४० मतांची आघाडी घेतली आहे. आतापर्यंत धानोरकर यांना चार लाख ५८ हजार ७०, तर भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांना दोन लाख ८८ हजार ४३० मतं मिळाली आहेत.
****
रायगड लोकसभा मतदार संघातून महायुतीचे सुनील तटकरे दुसऱ्यांदा विजयी झाले. त्यांनी महाविकास आघाडीचे अनंत गिते यांचा ८२ हजार ७८४ मतांनी पराभव केला. तटकरे यांना पाच लाख आठ हजार ३५२, तर गीते यांना चार लाख २५ हजार ५६८ मतं मिळाली.
****
मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे तिसर्यांदा विजयी झाले. बारणे यांना सहा लाख ९२ हजार १०१, तर महाविकास आघाडीचे संजोग वाघेरे यांना पाच लाख ९५ हजार ५४२ मतं मिळाली.
****
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे शाहू महाराज छत्रपती यांनी विजयी आघाडी घेतली आहे. आतापर्यंत शाहू महाराजांना चार लाख २४ हजार २४९, तर महायुतीचे संजय मंडलिक यांना तीन लाख ३१ हजार ६५५ मतं मिळाली आहेत.
****
हातकणंगले मतदारसंघातही महाविकास आघाडीचे सत्यजित पाटील आघाडीवर आहेत.
****
उत्तर मुंबईतून महायुतीचे पियुष गोयल, ईशान्य मुंबईतून महायुतीचे संजय दिना पाटील, वायव्य मुंबईतून महायुतीचे रविंद्र वायकर, दक्षिण मुंबईतून महाविकास आघाडीचे अरविंद सावंत आघाडीवर आहेत.
****
देशातल्या जनतेने विकासाला मतदान केलं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यादा पंतप्रधान होत आहेत, त्यामुळे त्यांचं अभिनंदन करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. काही जागा आमच्या कमी फरकाने गेल्या, काही ठिकाणी आम्ही उमेदवारी देण्यात उशीर केला, त्या सर्व बाबींची आम्ही कारणमीमांसा करू, असं मुख्यमंत्री म्हणाले.
ठाण्यात नरेश म्हस्के यांनी शिवसेनेचा गड राखला असून, महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांचं अभिनंदन करत असल्याचंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
****
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचा पराभव झालेला असून, मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
मै दावे के साथ कहता हूं, मोदीजी की सरकार नही बनेगी। मोदीजी ने सबसे पहले इस्तिफा देना चाहिये। मोदी हार गये है। भारतीय जनता पार्टी हार गई है। आगे तोडफोड करके सरकार बनाने की कोशिश की तो जनता सडक पर उतरेगी। बीजेपी को बहुमत नही है, बीजेपी हार गई है।
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशभरात काढलेल्या भारत जोडो यात्रांमुळे देशात परिवर्तनाची लाट आल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. ते म्हणाले…
तानाशाह व्यवस्था को सत्ता से बाहर निकालने का जो मार्ग बनाया था, और उसका नेतृत्व हमारे नेता राहुल गांधीजी ने कन्याकुमारी से कश्मीर जो भारत जोडो यात्रा की थी, मणिपूर से मुंबई जो न्याय यात्रा की थी, और राहुल गांधीजी के नेतृत्व मे जो देश की जनता उनके साथ खडी हुई। और उसीका नतीजा है, की आज देश मे परिवर्तन की लहर आप देख रहे हो।
****
महाराष्ट्रात आणि देशात लागलेल्या निकालावरून परिवर्तनाची प्रक्रिया सुरु झाली असून, देश पातळीवरचं चित्र आशादायक असल्याचं, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. इंडिया आघाडीची बैठक उद्या दिल्लीमध्ये होणार असून, या बैठकीला आपण उपस्थित राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
****
0 notes
Text
पराभव मोठ्या मनानं मान्य,आम्ही आत्मचिंतन करु; विजयाचं गणित कुठं चुकलं, सतेज पाटील तीन मुद्दे सांगत म्हणाले...
https://bharatlive.news/?p=93027 पराभव मोठ्या मनानं मान्य,आम्ही आत्मचिंतन करु; विजयाचं गणित कुठं चुकलं, ...
0 notes
Text
कारगील विजय दिवस आज साजरा होत आहे. 1999 मध्ये 60 दिवसांपेक्षा अधिक चाललेल्या कारगील युद्धात भारतीय सैन्यानं मिळवलेल्या विजयाचं स्मरण म्हणून आजचा दिवस साजरा केला जातो.
0 notes
Photo
Shiv Sena taunts BJP Leaders: बिहारच्या विजयाचे श्रेय फडणवीसांना देणाऱ्या भाजपला शिवसेनेचा ‘हा’ सल्ला – shiv sena taunts maharashtra bjp leaders over bihar election results in saamana editorial मुंबई: 'बिहारच्या विजयाचं श्रेय महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेत्याला दिलं जात आहे याचा आम्हाला आनंद आहे. हा आनंद भाजपनं पुढची चार वर्षे साजरा करावा आणि बिहारला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी महाराष्ट्रातील अनुभवी भाजप नेत्यांची मदत घ्यावी.
0 notes
Text
शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त
शिवसेनेच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त
मुंबई : दिल्लीत आम आदमी पार्टीनं मिळवलेल्या विजयाचं शिवसेनेनं तोंडभरून कौतुक केलं तर भाजपवर मनसोक्त टीका केली. पण या निवडणुकीत शिवसेनेच्या सगळ्याच उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं याचं किंचितही दुख: सेनेला झालेलं दिसत नाही.
केजरीवाल यांच्या झाडूने सगळ्यांना साफ केले. ‘आपमतलब्यां’चा पराभव झाला., अशा शब्दांत शिवसेनेनं अरविंद केजरीवाल यांच्या विजयाचं ‘सामना’मधून कौतुक केलं आहे. याच शिवसेनेचे पाच…
View On WordPress
0 notes
Text
'इंदिरा गांधींना श्रेय देण्यात आलं, मग मोदींना श्रेय का देऊ नये'
‘इंदिरा गांधींना श्रेय देण्यात आलं, मग मोदींना श्रेय का देऊ नये’
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना 1971 च्या युद्धातल्या विजयाचं श्रेय दिलं जातं, मग पंतप्रधान नरेंद्र मोदींना बालाकोटचं श्रेय का देऊ नये, असा सवाल केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी विरोधकांना विचारला.
स्वातंत्र्योत्तर काळात जेव्हा जेव्हा शेजारी देशांसोबत युद्धं झाली, तेव्हा त्यातील विजयाचा किंवा पराभवाचा संबंध थेट तत्कालीन सरकारच्या, तेव्हाच्या पंतप्रधानांच्या कामगिरीशी जोडण्यात आला, असं सिंह…
View On WordPress
#breaking news marathi#Indira gandhi#jitendra singh#latest news marathi#pm modi#इंदिरा गांधी#जितेंद्र सिंह#नरेंद्र मोदी
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date : 14 January 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ जानेवारी २०२४ दुपारी १.०० वा.
****
आज भोगी सण. मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी हा सण सर्व देशभरात विविध पद्धतीनं साजरा केला जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व नागरिकांना या सणानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आसाम मध्ये बिहू, तामिळनाडूत पोंगल, पंजाबमध्ये लोहडी तर उत्तर भारतात मकर संक्रांत या नावानं हा सण साजरा करण्यात येतो. या सणानिमित्त गुजरात सह काही राज्यात पतंग उडवण्यात येतात.
****
भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस.जयशंकर आजपासून दोन दिवसांच्या इराण दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात इराणचे परराष्ट्र मंत्री डॉ. हुसेन अमीन अब्दुल्लाहीन यांच्यासोबत ते अनेक द्विपक्षीय, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा करणार आहेत.
****
नामांतर हा सामाजिक समतेच्या विजयाचं प्रतिक असल्याचं प्रतिपादन महात्मा गांधी विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ.सुधीर गव्हाणे यांनी केलं. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ३० व्या नामविस्तार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘नामांतर लढा व नामविस्ताराची तीन दशके’ या विषयावर बोलत होते. प्रकांडपंडित म्हणून जागतिक स्तरावर गौरविल्या गेलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यासाठी १७ वर्ष संघर्ष करावा लागल्याचेही त्यांनी यावेळी सांगितलं. अध्यक्षीय समारोपात कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी नामविस्तारावेळी विद्यापीठातील विभागांची संख्या ३० होती, ती आज ४५ पर्यंत पोहचली असल्याचं सांगितलं.
****
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शंकराचार्य यांच्याविषयी काल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ कॉग्रेस पक्षाच्या वतीन छत्रपती संभाजीनगर इथल्या क्रांतीचौकात आज दुपारी निदर्शने करण्यात आली. कॉंग्रेस पक्ष शंकराचार्यांचा अपमान सहन करणार नसल्याचं निदर्शनस्थळी सांगण्यात आलं.
****
विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत आतापर्यंत १२ कोटींहून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये केंद्र श��सनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती नागरीकांना देण्यात येते.
दरम्यान, ही यात्रा काल पालघर जिल्ह्यात वसई तालूक्यात सकवार गावात दाखल झाली. गावात यानिमित्त आयोजित कार्यक्रमाचं उद्धाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी नागरिकांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली तसंच मंत्री राणे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध लाभांचं वाटप करण्यात आलं.
****
उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळं महाराष्ट्रातील तापमान कमी होऊन थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. त्यामुळं राज्यात येत्या १९ ते २५ जानेवारी दरम्यान थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागानं अंदाज आहे.
****
हिट ॲण्ड रन संदर्भात केंद्र सरकारच्या नव्या वाहन कायद्याविरोधात छत्रपती संभाजीनगर इथं मालवाहू रिक्षा चालक मालक सेनेच्या वतीने बंद पाळून आंदोलन करण्यात आलं. हा कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी संघटनेचे अध्यक्ष सलीम पटेल वाहेगावकर यांच्यावतीनं विभागीय आयुक्तांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे.
****
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खारेपाटण तपासणीनाक्या जवळ अवैधरित्या वाहतूक केली जाणारी १४ लाख ७४ हजार रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी राजस्थान मधील लक्ष्मण रेबारी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एका वाहनासह एकूण २४ लाख ७४ हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल कणकवली पोलिसांनी जप्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
वाहनचोरी आणि दरोड्याचे ३३ गुन्हे दाखल असलेल्या पिता पुत्राच्या जोडीला काल छत्रपती संभाजीनगर शहरातून गुन्हे शाखेच्या पथकानं जेरबंद केलं. या जोडीनं गेल्या वर्षभरात शहरातून नऊ महागडी चारचाकी वाहनं तसंच जळगाव, अहमदनगर, आणि जालना जिल्ह्यातूनही काही चारचाकी वाहनं चोरली असल्याची कबूली दिली आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या विवेकानंद महाविद्यालयात उद्या, सोमवारपासून तीन दिवसीय विवेकानंद व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या व्याख्यानमालेत प्रसिद्ध पर्यावरणवादी लेखिका डॉक्टर वंदना शिवा, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत डॉ. सुदर्शन अय्यंगार आणि बालशिक्षण तज्ज्ञ प्रा. रमेश पानसे हे पुष्प गुंफणार आहेत.
****
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातल्या तीन टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्��ांच्या मालिकेतला दुसरा सामना आज इंदूर इथं होळकर क्रीडासंकूलात खेळवला जाणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत भारतानं पहिला सामना जिंकत १-० अशी आघाडी घेतली आहे.
****
0 notes
Text
IND Vs ENG: मालिका विजयाचं जंगी सेलिब्रेशन, रोहित शर्मावर शॅम्पेनचा वर्षाव, पाहा व्हिडिओ
IND Vs ENG: मालिका विजयाचं जंगी सेलिब्रेशन, रोहित शर्मावर शॅम्पेनचा वर्षाव, पाहा व्हिडिओ
IND Vs ENG: मालिका विजयाचं जंगी सेलिब्रेशन, रोहित शर्मावर शॅम्पेनचा वर्षाव, पाहा व्हिडिओ Rohit Sharma Team India : टीम इंडियानं तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दोन सामन्यामध्ये विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यातील विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी जल्लोष केला. Rohit Sharma Team India : टीम इंडियानं तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत दोन सामन्यामध्ये विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यातील विजयानंतर टीम…
View On WordPress
#eng#ind:#sports news#क्रीडा#खेळ बातम्या#खेळ विषयक बातम्या#जंगी#पाहा#भारत लाईव्ह मीडिया#मालिका#रोहित#वर्षाव!#विजयाचं#व्हिडिओ#शर्मावर#शॅम्पेनचा#सेलिब्रेशन#स्पोर्ट्स न्यूज#स्पोर्ट्स बातम्या
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 24 October 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २४ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
विजयादशमीचा सण सर्वत्र उत्साहात साजरा;सीमोल्लंघन, शस्त्रपूजनासह मुहूर्ताच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी.
दुसऱ्या पक्षात जाण्याइतकी आपली निष्ठा कम���ुवत नाही-माजी मंत्री पंकजा मुंडे यांचं दसरा मेळाव्यात प्रतिपादन.
माजी खासदार नीलेश राणे यांची सक्रीय राजकारणातून निवृत्तीची घोषणा.
आणि
पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेमध्ये भारताची दहा सुवर्ण, बारा रजत आणि तेरा कांस्य पदकांसह पस्तीस पदकांची कमाई.
****
साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असणारा दसरा अर्थात विजयादशमी हा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्ता संध्याकाळी राजधानी दिल्लीतल्या दसरा उत्सवात भाग घेत आहेत. या उत्सवात रावण, कुंभकर्ण आणि मेघनाद यांच्या पुतळ्यांचं दहन केलं जातं, हे दहन म्हणजे दुर्गुणांवर सदगुणांच्या विजयाचं प्रतीक आहे. सरस्वती पूजनासोबतच शस्त्रपूजन हे आजच्या सणाचं ठळक वैशिष्ट्यं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी अरुणाचल प्रदेशात भारत चीन सीमेवर जाऊन शस्त्रपूजन करून सैनिकांसोबत विजयादशमीचा सण साजरा केला. सीमेच्या पलीकडे असलेल्या चिनी सीमेवरील चौक्यांचं संरक्षणमंत्र्यांनी निरीक्षण केलं, तसंच सीमेवर तैनात सैनिकांशी संवाद साधला.
राज्यातही दसरा सण अत्यंत उत्साहात साजरा होत आहे. घरोघरी पारंपरिक पद्धतीनं पाटी पूजन, ग्रंथपूजन आणि आयुधांचं पूजन करून एकमेकांना सोनं अर्थात आपट्याची पानं देऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. दसऱ्यानिमित्त वाहनं, आभुषणं, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य खरेदीसाठी नागरिकांनी बाजारपेठांमधून गर्दी केली आहे.
तुळजापूर इथे आज सकाळी श्री तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघनाचा सोहळा उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. मंदिरात पहाटे विधीवत पूजा आणि आरती करुन देवीचं माहेर असणाऱ्या अहमदनगरहून आलेल्या मानाच्या पलंग पालखीत देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. श्री.तुळजाभवानी देवीची मूर्ती ही चल मूर्ती असल्याने ती आपलं सिंहासन सोडून सीमोल्लंघन करण्यासाठी भाविकांच्या बरोबर मंदिराच्या बाहेर येते आणि सीमोल्लंघनानंतर देवी पौर्णिमेपर्यंत श्रमनिद्रा करते. देवीच्या याच श्रमनिेद्रेला आजपासून प्रारंभ झाला.
अंबाजोगाई इथं योगेश्वरी देवीचा सीमोल्लंघन सोहळा आज पारंपरिक पद्धतीने साजरा झाला. पालखी मार्गावर दुतर्फा उभ्या असलेल्या भाविकांनी आई राजा उदोचा जयघोष करत पालखीवर पुष्पवृष्टी केली.
मुंबईत आज दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं १०२ ��िकाणी संचालनाचं आयोजन केलं. याशिवाय, दादरच्या शिवतीर्थावर उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आझाद मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दोन दसरा मेळावे संध्याकाळी होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातल्या जनतेला दसऱ्याच्या तसंच धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या भूमीवर सामाजिक क्रांतीचा पाया रचला, त्या दीक्षाभूमीचा कायापालट करण्याची ग्वाही देत, दीक्षाभूमी विकासाच्या सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या आराखड्याला नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं मान्यता दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
****
भाजपच्या राष्ट्रीय सचिव नेत्या पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्यातल्या सावरगाव इथे आज दसरा मेळावा घेतला, दुसऱ्या पक्षात जाण्याइतकी आपली निष्ठा कमकुवत नसल्याचं प्रतिपादन पंकजा मुंडे यांनी केलं. राज्याच्या सरकारकडून लोकांच्या खूप अपेक्षा असून, मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणाचा प्रश्न गंभीर आहे, या प्रश्नांबाबत अपेक्षाभंग सहन करणार नाही, असा इशारा मुंडे यांनी यावेळी बोलताना दिला. मुंडे यांच्या या मेळाव्याला कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
****
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर पार पडला. संघाचं दिमाखदार पथसंचलन यावेळी करण्यात आलं. प्रसिद्ध गायक शंकर महादेवन या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी बोलताना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी, आपली संस्कृती सर्वसमावेशक असून, ती कोणालाही वेगळं मानत नाही, आपलेपणामुळे समाज संघटित आणि बलसंपन्न होतो, आणि देशाची अखंडता अबाधित राहते असं सांगतानाच, कोणत्याही परिस्थितीत आपण एकत्र राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
****
६७चा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आज नागपूरच्या दीक्षाभूमी इथं डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती आणि समता सैनिक दलातर्फे सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी हजारो बौद्ध अनुयायी उपस्थित होते. यावेळी २२ प्रतिज्ञांचं वाचन करुन, समता सैनिक दल आणि शाक्य संघातर्फे सलामी देऊन, बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली. दीक्षाभूमीवर आज संध्याकाळी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य कार्यक्रम श्रीलंकेचे धम्मरत्न थेरो यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
नाशिकच्या इथं बुद्ध स्मारक त्रिरश्मी बुद्ध लेण्यात अन्न, नागरी प���रवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते महाबोधी वृक्षरोपण करण्यात आलं. आज मिळालेला बोधीवृक्ष, ही नाशिक आणि महाराष्ट्राला मिळालेली अमूल्य अशी भेट असून यामुळे नाशिकला जागतिक महत्व प्राप्त होईल, असा विश्वास भुजबळ यांनी यावेळी व्यक्त केला.
छत्रपती संभाजी नगर इथल्या बुद्ध लेणीत झालेल्या कार्यक्रमाला जपानचे धर्म गुरू इको काचो यांच्यासह भदंत विशुद्धानंद बोधी, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, खासदार इम्तियाज जलील उपस्थित होते. बौध्द धर्म समजून घेण्याचं आवाहन इको काचो यांनी यावेळी केलं. बुध्द लेणीवर आज सकाळपासून अनुयायांची मोठी गर्दी आहे.
****
शिर्डी इथं श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवानिमित्त समाधी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांच्या हस्ते श्रींची पाद्यपूजा करण्यात आली. या उत्सवानिमित्त अखंड पारायण समाप्तीनंतर आज श्रींची प्रतिमा, पोथी आणि विणाची मिरवणूक काढण्यात आली.
****
हिंगोली इथल्या ऐतिहासिक दसरा महोत्सवात आज ५१ फूट उंचीच्या रावण दहनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातही पाच ठिकाणी रावणदहन होणार आहे.
****
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे पुत्र आणि माजी खासदार नीलेश राणे यांनी आज अचानक राजकारणातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली. आपल्याला आता राजकारणात काही रस राहिला नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भाजपसारख्या महान संघटनेत काम करण्याची संधी मिळाल्यानं आपण स्वत:ला भाग्यवान समजतो, असं नीलेश राणे यांनी आपल्या या ट्विट संदेशात म्हटलं आहे. दरम्यान, राणे यांच्या या घोषणेमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
****
चीनमध्ये सुरू असलेल्या पॅरा आशियायी क्रीडा स्पर्धेमध्ये भारतानं आतापर्यंत दहा सुवर्ण, बारा रजत आणि तेरा कांस्य पदकांसह पस्तीस पदकांची कमाई केली आहे. आजच्या दिवसात भारतीय खेळाडूंनी सतरा पदकं जिंकली. आज पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी तिन्ही पदकं जिंकली.
पुरुषांच्या भारोत्तोलन स्पर्धेच्या पासष्ट किलो वजनगटात भारताला कांस्य पदक मिळालं. महिलांच्या दहा मीटर पिस्तुल नेमबाजी स्पर्धेत रुबिना फ्रान्सिसनं कांस्य पदक जिंकलं.
पुरुष पंधराशे मीटर टी फॉर्टीसिक्स स्पर्धेत प्रमोद बिजार्नियानं रौप्य आणि राकेश भाईरानं कांस्य पदक जिंकलं.
पुरुषांच्या पाच हजार मीटर टी एलेवन स्पर्धेत अंकुर धामानं तर पुरुषांच्या पाच हजार मीटर टी थर्टीन स्पर्धेत शरथ मकनहल्ली शंकरप्पानं सुवर्ण पदकं जिंकली. रवि रंगोलीनं पुरुषांच्या एफ फॉर्टी गोळाफेक स्पर्धेत रजत पदक जिंकलं. दहा मीटर एअर पिस्तुल एसएच वन स्पर्धेत १६ वर्षीय रुद्रांश खंडेलवालनं रौप्य आणि मनीष नरवालनं कांस्य पदक जिंकलं.
****
आज जागतिक पोलिओ दिवस आहे. पोलिओ या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी आणि लसीकरणाचं महत्व बिंबवण्यासाठी हा दिवस जगभरात पाळला जातो. भारतानं आपली पोलिओविरुद्धची लढाई अतिशय जागरूकतेनं लढली असून, नियमित लसीकरण अभियानं राबवून बालकांना सुरक्षा दिली आहे. २०१४ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं भारत पोलिओमुक्त झाल्याची घोषणा केलेली आहे. शेजारी देश अफगाणिस्तान आणि पाकिस्तानांतून पोलिओ व्हायरसचा देशात पुन्हा प्रवेश होऊ नये, यासाठी आता भारत दक्ष आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date: 22 October 2023
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २२ ऑक्टोबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी दुर्गापूजे निमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. ��ुर्गापूजा म्हणजे न्यायाचा ��न्यायावरील विजयाचं प्रतिक असून, हा उत्सव मातृशक्तीबद्दल अधिक आदर निर्माण करणारा आहे, असं मुर्मू यांनी म्हटलं आहे. तर दुर्गापूजा म्हणजे मातेच्या अदम्य भावनांचं प्रतिक आहे, असं उपराष्ट्रपती धनखड म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सर्व नागरिकांना दुर्गापूजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
****
एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत यजमान भारतीय संघ आपले विजयी अभियान सुरू ठेवण्याच्या निर्धाराने तुल्यबळ अशा न्यूझीलंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. हिमाचल प्रदेशमधील धर्मशाला इथं हा सामना होत आहे. दोन्ही संघांचा हा पाचवा सामना असून भारत आणि न्यूझीलंड या दोघांनीही आपले पहिले चारही सामने जिंकून प्रत्येकी आठ गुण घेतलेले आहेत. दुपारी दोन वाजता सुरू होणाऱ्या या सामन्यात दोन्हीही संघ तुल्यबळ आहेत. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तीनही विभागात भारतीय खेळाडूंनी आतापर्यंत अत्यंत चांगली कामगिरी केली असून या सामन्यातही चांगली कामगिरी करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त असून त्याच्या जागी आज सूर्यकुमार यादव किंवा मोहम्मद शमीला संधी मिळण्याची शक्यता आहे. धर्मशालाची खेळपट्टी फिरकीपटूंना साथ देऊ शकते, त्यामुळे भारत तीन फिरकीपटूंना घेऊन मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
****
मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकार आणि मनोज जरांगे यांच्यात चर्चा झाली असण्याची शक्यता आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटलं आहे. ते बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. मराठा समाजाला आरक्षण दिल्यास आम्हाला आनंदच होईल, असंही ते म्हणाले. तर भाजप नेते निलेश राणे यांनी आपले सरकार मराठा आरक्षण देणार आहे. मराठा आरक्षणा संदर्भात बैठका सुरू आहेत, असं पत्रकार परिषदेत सांगितलं. दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आज जालना जिल्ह्यातल्या अंतरवाली सराटी इथं पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मराठा आरक्षण देण्यासंदर्भात जरांगे पाटील यांनी शासनाला दिलेली मुदत येत्या २४ तारखेला संपणार आहे, त्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील आज पत्रकार परिषद घेत आहेत.
****
ललित अधाने यांच्या कवितासंग्रहाचे आज छत्रपती संभाजीनगरमधील तापडिया नाट्यमंदीरमध्ये प्रकाशन करण्यात आले. मही गोधडी छप्पन भोकी असं या कविता संग्रहाचे नाव असून प्रसिद्धी अभिनेते, कवी किशोर कदम यांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा झाला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
****
बारामती येथील खाजगी कंपनीचे विमान रविवारी सकाळी सातच्या सुमारास जुना सह्याद्री काऊ फार्मनजि�� लोखंडे वस्तीच्या वरील बाजूस अपघातग्रस्त झाले व्हीटी आरव्हीटी टेक्नम या जातीचे दोन सीटर विमान होते. विमान एका शेतात अचानक कोसळले. दोनच दिवसांपूर्वी याच रेड बर्ड कंपनीचे विमान बारामती विमानतळानजिक अपघातग्रस्त झाले होते.
****
भावी पिढ्यांसाठी पाण्याचं संवर्धन करण्याबरोबरच अन्नाची नासाडी रोखणं ही आजच्या युवा पिढीची जबाबदारी आहे, असं मत कोल्हापूर इथल्या शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केलं आहे. जागतिक अन्न दिनाच्या निमित्ताने आज अन्नशास्त्र आणि तंत्रज्ञान विभागाच्या वतीने वॉक फॉर वॉटर ही विशेष जनजागरण फेरी काढण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते.
****
ज्यांच्यावर सक्तवसुली संचालनालय, इडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांचे गुन्हे आहेत, असेच भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत आहेत, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
****
शेतमालाला हमीभाव हा फक्त कागदी खेळ असून, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना हमीभावाचा फायदा नाही, असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. ते मुंबई इथं वार्ताहारांशी बोलत होते.
****
कोविड काळात मुंबई महानगरपालिकेत रेमडेसिविर इंजेक्शन खरेदीत ५ कोटी ९६ लाख रुपयांच्या आर्थिक अनियमितता प्रकरणी माईलान लॅबोरेट्रीज आणि मुंबई महानगरपालिकेच्या अज्ञात अधिकाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे.
****
0 notes
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
१२ मार्च २०२३ सकाळी ११.०० वाजता
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज कर्नाटकात जवळपास १६ हजार कोटी रुपयांच्या परियोजनांचं लोकार्पण तसंच काही विकासकामांचं कोनशिला अनावरण करणार आहेत. बहुप्रतिक्षित बंगळुरु मैसुर एक्सप्रेसचं उद्घाटन, चारपदरी मैसुर-कुशलनगर मार्गाच्या कामाचं कोनशिला अनावरण, धारवाड इथल्या भारतीय प्रौद्योगिकी संस्थान -आय आय टीच्या नव्या परिसराचं उद्घाटन, जगातला सर्वात मोठ्या लांबीचा असलेल्या हुबळी रेल्वेस्थानकाच्या फलाटाचं लोकार्पण आदी कामांचा यात समावेश आहे.
***
संसदेच्या अधिवेशनाच्या सत्राचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरु होत आहे. हे सत्र ६ एप्रिल पर्यंत चालेल. या दुसऱ्या टप्प्यात एकूण १७ बैठका होतील. संसदीय अधिवेशनाचं पहिलं सत्र गेल्या ३१ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान झालं होतं. आणि या पहिल्या टप्प्यात १० बैठका झाल्या.
***
दिल्लीतला मद्यघोटाळा- अबकारी निती प्रकरणी सक्तवसुली संचालनालय ईडीनं काल तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखेर राव यांच्या कन्या, के कविता राव यांची चौकशी केली. आम आदमी पक्षाचे संपर्क प्रमुख विजय नायर यांनी पक्षाच्या नेत्यांच्या सूचनेवरुन या प्रकरणी एका समुहाकडून एक कोटी रुपयांची लाच घेतल्याचं ईडी नं म्हटलं आहे. आणि कविता राव या समुहाच्या प्रमुख सदस्य आहेत. त्यामुळे ही चौकशी सुरु असल्याचं सांगण्यात आल���.
***
बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातल्या राजेगाव परीक्षा केंदारावरील बारावी गणित प्रश्नपत्रिका फूट प्रकरणात लोणार इथल्या झाकिर हुसेन उच्च माध्यमिक विद्यालयाचा मुख्याध्यापक असलेला अब्दुल अकिल, या प्रश्नपत्रिका फुटीचा सूत्रधार असल्याचं साखरखेर्डा पोलीस आणि विशेष तपास पथकाच्या तपासात स्पष्ट झालं आहे. या प्रकरणातल्या एकूण आरोपींची संख्या ८ च्या वर पोहचली असून या प्रकरणातल्या ४ शिक्षकांना आतापर्यंत निलंबित करण्यात आलं आहे.
***
महिला प्रीमियर लीगच्या स्पर्धेत काल दिल्ली कॅपिटल्स नं सलामीची फलंदाज शेफाली वर्माच्या २८ चेंडूत ७६ धावांच्या बळावर गुजरात जायंट्सवर दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरात जायंट्सनं ९ बाद १०५ धावा केल्या, या धावसंख्येचा पाठलग करताना दिल्ली कॅपिटल्सनं एकही बळी न गमावता ७ पूर्णांक १ षटकातच विजयाचं लक्ष्य गाठलं.
//************//
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 06 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
Date – 06 March 2023
Time 18.10 to 18.20
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०६ मार्च २०२३ सायंकाळी ६.१०
****
वलयांकित व्यक्तींनी वस्तू किंवा सेवांच्या जाहिराती करण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी
प्रसुतीसंदर्भातल्या तीन प्रकरणात संबंधित वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची राज्य महिला आयोगाची सूचना
आणि
वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक असलेल्या होळी सणासाठी बाजारपेठा सजल्या;पर्यावरणपूरक पद्धतीनं सण साजरे करण्याचं आवाहन
****
वलयांकित व्यक्तींनी वस्तू किंवा सेवांच्या जाहिराती करण्याबाबत केंद्र सरकारनं मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या जाहिराती प्रेक्षकांची दिशाभूल करणाऱ्या असू नयेत, तसंच या जाहिराती ग्राहक संरक्षण कायद्याचं अनुपालन करणाऱ्या असाव्यात, असं या सूचनांमध्ये म्हटलं आहे. याशिवाय, या जाहिराती अगदी सोप्या, साध्या भाषेत असाव्यात, तसंच त्यामध्ये जाहिरात, प्रायोजित, सहकार्य, सशुल्क प्रचार असे शब्दसुद्धा वापरले जाऊ शकतील, असं यात म्हटलं आहे. याशिवाय जी उत्पादनं किंवा सेवा संबंधित व्यक्तींनी स्वत: वापरलेल्या नसतील, त्याची जाहिरात या व्यक्तींनी करू नये, अशी स्पष्ट सूचना सरकारने केली आहे. जाहिरातीत केलेले दावे पूर्ण होण्यासारखे आहेत का, याची खात्री या व्यक्तींनी करून घ्यावी, असं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं जारी केलेल्या या सूचनांमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, धोकादायक पदार्थांच्या वाहतुकीसंदर्भात केंद्र सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. धोकादायक पदार्थांमध्ये स्फोटकं, ज्वालाग्रही पदार्थ, विषारी पदार्थ, संसर्गजन्य तसंच क्षारक पदार्थांचा समावेश आहे.
****
कोल्हापूर, नाशिक आणि नागपूर इथं गर्भवतीच्या प्रसुतीसंदर्भातल्या प्रकरणांची गंभीर दखल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली आहे. या तिन्ही घटनांची संपूर्ण चौकशी होईपर्यंत आणि दोषींना शिक्षा होईपर्यंत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची सूचना चाकणकर यांनी आरोग्य संचालकांना दिल्या आहेत. कोल्हापूर इथे रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे एक महिला रस्त्यातच प्रसूत झाली, मात्र आशा सेविका आणि डॉक्टरांनी तत्परता दाखवल्यामुळे आई आणि नवजात बालकाचा जीव वाचला. नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर गैरहजर असल्यामुळे एका महिलेची तिच्या आईनंच प्रसूती केली, या घटनेतही आई आणि नवजात बालक सुखरूप आहेत. नागपूरमध्ये मात्र एका अल्पवयीन गर्भवतीनं यूट्युबवर व्हिडिओ पाहून स्वत:ची प्रसूती केली, त्यात नवजाताचा जीव गमावला. या तीनही घटनांची दखल घेत राज्य महिला आयोगानं ही कारवाई केली आहे.
****
आयुष मंत्रालयानं ‘पंतप्रधान योग पुरस्कार 2023‘ साठी अर्ज किंवा नामांकनं मागवली आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर योग या विषयाच्या विकास आणि प्रोत्साहनासाठी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाकरता हे पुरस्कार दिले जातात. दोन राष्ट्रीय पुरस्कार भारतीय संस्थांना आणि दोन आंतरराष्ट्रीय पुरस्कार भारतीय किंवा विदेशी संस्थांना दिले जाणार आहेत. या पुरस्कारांच्या अर्ज किंवा मानांकनाची प्रक्रिया सध्या माय जीओव्ही या मंचावर सुरू असून, येत्या एकतीस तारखेपर्यंत यासाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. नवव्या आंतरराष्ट्रीय योग दिनी, म्हणजेच येत्या एकवीस जूनला विजेत्यांची घोषणा केली जाणार आहे.
****
दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांना दिल्लीच्या एका विशेष न्यायालयानं येत्या वीस तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मद्य धोरण आणि त्यातल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी सिसोदिया गेल्या सव्वीस फेब्रुवारीपासून अटकेत आहेत.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो, उद्या, मंगळवारी एक अत्यंत आव्हानात्मक प्रयोग करणार आहे. मेघा-ट्रॉपिक्स-वन हा कालबाह्य उपग्रह इस्रो उद्या नष्ट करणार आहे. यासाठी हा उपग्रह नियंत्रित पद्धतीनं पुन्हा वातावरणात आणून त्यानंतर तो प्रशांत महासागरातल्या एका निर्जन ठिकाणी पाडला जाईल. उष्णकटिबंधीय हवामान आणि वातावरणाच्या अभ्यासासाठी एक ह��ार किलो वजनाचा हा उपग्रह भारत आणि फ्रान्सच्या अंतराळ संस्थांनी संयुक्तपणे २०११ साली प्रक्षेपित केला होता. या उपग्रहाचं अपेक्षित आयुष्य तीन वर्षांचं होतं मात्र त्यानं एका दशकाहून जास्त काळ मौल्यवान माहिती पुरवली, असं इस्रोनं म्हटलं आहे.
****
नाशिक जिल्ह्यातल्या येवला तालुक्यात मातुलठाण इथल्या कृष्णा डोंगरे या शेतकऱ्यानं आज आपल्या शेतातल्या दीड एकर शेतातील कांद्याची होळी केली. दीड लाख रुपये खर्च करूनही पदरात काहीच पडणार नसल्यानं निराश होऊन त्यांनी कांद्याची होळी करण्याचा निर्णय घेतल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. कांदाप्रश्नी शासनानं ठोस आणि कायमस्वरूपी भूमिका घेण्याची मागणी संबंधित शेतकऱ्यानं केली आहे.
****
वाईटावर चांगल्याच्या विजयाचं प्रतीक असलेला होळीचा सण आज साजरा होत असून, सर्वत्र पारंपरिक पद्धतीनं होलिका दहन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर बाजार���ेठांमध्ये विविध प्रकारचे रंग, पिचकाऱ्या, साखरगाठ्या आणि इतर साहित्याची दुकानं सजली आहेत.
होळी हा सण पर्यावरणपूरक पद्धतीनं आणि धुलिवंदन सण नैसर्गिक रंगांच्या वापरानं साजरा करावा असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं असून, नागरिकांना या सणांच्या शुभेच्छाही दिल्या आहेत.
"यंदाची होळी समस्त महाराष्ट्रवासियांच्या जीवनात रंगांची उधळण, आनंदाची बहार घेऊन येवो आणि समाजातल्या द्वेषभावना, वाईट विचारांचं होळीत दहन होऊन परस्परातला बंधुभाव वाढीस लागो" अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जनतेला होळी आणि धुलिवंदनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नागरिकांनी वृक्षतोड न करता, प्रतिकात्मक रुपात होलिका दहन करून सण साजरा करावा, असं आवाहन निसर्गप्रेमी संघटनांकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, होळी पेटवताना नागरिकांनी विद्युत सुरक्षेबाबत खबरदारी घ्यावी, असं आवाहन महावितरणतर्फे करण्यात आलं आहे. होळी पेटवताना सभोवताली वीजवाहिन्या किंवा वितरण रोहित्रं नाहीत याची खातरजमा करावी, भूमिगत वीजवाहिन्यांना होळीच्या उष्णतेपासून सुरक्षित ठेवण्यासाठी अशा वाहिन्यांपासून लांब अंतरावरच होळी पेटवावी, असं आवाहनही औरंगाबाद महावितरणनं केलं आहे.
होळीचा सण सहकुटुंब आणि मित्रांसोबत शांततेत आनंदात आणि कुठलीही नशा न करता साजरा करण्याचं आवाहन छत्रपती संभाजी नगरचे पोलीस आयुक्त डॉक्टर निखील गुप्ता यांनी केलं आहे. शहरात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला आहे. ते म्हणाले…
अनेक लोकं मोटरसायकलवर कर्कश हॉर्न वाजवत शहरात फिरतात किंवा दुसऱ्या लोकांना त्रास देण्याचं काम करतात. हे सर्व प्रकार टाळले पाहिजे. जेणेकरुन उत्साहात, आनंदात हा होळीचा उत्सव साजरा होईल. मात्र समाजात कुठल्याही प्रकारची अशांतता होणार नाही, कुठल्याही प्रकारचे वाद विवाद होणार नाहीत. शहरात ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त राहील, नाकाबंदी राहील, पेट्रोलिंग राहील. आणि कोणीही व्यक्ती जर हुल्लडबाजी करण्याचा किंवा गडबड करण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर तातडीने गुन्हे दाखल होतील आणि त्याच्यावर कारवाई करण्यात येईल.
धुळे महापालिकेच्या वतीनं आज सर्व पक्षीय पर्यावरणपूरक आणि अंमली पदार्थ विरोधी होळी आणि रंगोत्सव साजरा करण्यात आला. महापालिका आवारात स्वच्छता मोहिम राबवून कचऱ्याची तसंच अंमली पदार्थांची होळी करण्यात आली. या उत्सवात धुळे शहरातली महिला मंडळं तसंच भाजपाच्या महिला पदाधिकारी आणि शिवसेनेच्या ��मदार मंजुळा गावित सहभागी झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगर या नामांतराला विरोध करण्यासाठी एमआयएम पक्षातर्फे सुरू असलेल्या आंदोलनाचा निषेध करत, भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आज शहरातल्या टीव्ही सेंटर चौकात निदर्शनं करण्यात आली. एमआयएम ही जातीयवादी संघटना असून, ही संघटना औरंगजेब आणि निजामाचा वारसा चालवत शहराचं वातावरण दूषित करत असल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला.
****
येत्या तेरा तारखेला छत्रपती संभाजीनगर इथे विभागीय स्तरावरच्या लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात आलं आहे. विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात होणार असलेल्या या उपक्रमानंतर विभागीय महिला लोकशाही दिनाचं आयोजनही करण्यात आलं आहे. इच्छुक अर्जदारांनी विहित नमुन्यातले अर्ज विभागीय आयुक्त कार्यालयात सादर करायचे आहेत. जिल्हास्तरावरच्या लोकशाही दिन कार्यक्रमात जे अर्ज निकाली निघाले नाहीत, ते सगळे विभागीय स्तरावरच्या लोकशाही दिनामध्ये घेण्यात येणार आहेत, असं विभागीय आयुक्त कार्यालयानं प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळवलं आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात आज झालेल्या लोकशाही दिनात आठ तक्रारी दाखल झाल्या.
****
0 notes
Text
“…तर २०२४ मध्ये भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही”; शिवसेनेनं सांगितलं भाजपाच्या विजयाचं सूत्र
“…तर २०२४ मध्ये भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही”; शिवसेनेनं सांगितलं भाजपाच्या विजयाचं सूत्र
“…तर २०२४ मध्ये भाजपला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही”; शिवसेनेनं सांगितलं भाजपाच्या विजयाचं सूत्र नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांपैकी चार राज्यांमध्ये भाजपाला घवघवीत यश मिळालं आहे. पंजाबमधील आपची सत्��ा वगळता उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूरमध्ये कमळ फुललं आहे. भाजपाच्या याच विजयाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं पुन्हा एकदा केंद्रातील सत्ताधारी पक्षावर निशाणा साधलाय. पाच…
View On WordPress
#“…तर#२०२४#घाम#नाही#फुटल्याशिवाय#बातम्या#भाजपला#भाजपाच्या#मध्ये#राहणार#विजयाचं#शिवसेनेनं#सांगितलं#सूत्र
0 notes
Text
Narendra Modi : गुजरातमधील डोंगराएवढ्या विजयाचं श्रेय कोणाचं? मोदींनी घेतलं मराठी नेत्याचं नाव
Narendra Modi : गुजरातमधील डोंगराएवढ्या विजयाचं श्रेय कोणाचं? मोदींनी घेतलं मराठी नेत्याचं नाव
Narendra Modi : गुजरातमधील डोंगराएवढ्या विजयाचं श्रेय कोणाचं? मोदींनी घेतलं मराठी नेत्याचं नाव Narendra Modi in BJP Parliamentary Board Meeting : गुजरात विधानसभा निवडणुकीत झालेल्या विक्रमी विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मराठी नेत्याला दिलं आहे. Narendra Modi in BJP Parliamentary Board Meeting : गुजरात विधानसभा निवडणुकीत झालेल्या विक्रमी विजयाचं श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी…
View On WordPress
#modi:#narendra#अपडेट न्यूज#आजची बातमी#आताची बातमी#ऑनलाईन बातम्या#कोणाचं?#गुजरातमधील#घेतलं#ठळक बातम्या#डोंगराएवढ्या#ताज्या घडामोडी#नाव#नेत्याचं#न्यूज फ्लॅश#बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र#मोदींनी#लेटेस्ट बातमी#विजयाचं#श्रेय
0 notes
Text
Rivaba Jadeja: मोदी जेव्हा जडेजाला म्हणाले, अशी फिल्डिंग तू आधी कधीच केली नसशील!
Rivaba Jadeja: मोदी जेव्हा जडेजाला म्हणाले, अशी फिल्डिंग तू आधी कधीच केली नसशील!
Rivaba Jadeja: मोदी जेव्हा जडेजाला म्हणाले, अशी फिल्डिंग तू आधी कधीच केली नसशील! Rivaba Jadeja after Victory: गुजरातच्या जामनगर उत्तर मतदारसंघातून विजयी झालेल्या रीवाबा जडेजा हिनं आपल्या विजयाचं श्रेय पती रवींद्र जडेजा यास दिलं आहे. Rivaba Jadeja after Victory: गुजरातच्या जामनगर उत्तर मतदारसंघातून विजयी झालेल्या रीवाबा जडेजा हिनं आपल्या विजयाचं श्रेय पती रवींद्र जडेजा यास दिलं आहे. Go to Source
View On WordPress
#&8216;अशी&8217;#jadeja:#rivaba#आधी#कधीच#केली#क्रीडा#क्रीडा बातम्या#खेळ बातम्या#खेळ समाचार#जडेजाला#जेव्हा#तू#नसशील!#फिल्डिंग#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी खेळ बातमी#मोदी#म्हणाले#विश्व#स्पोर्ट्स बातम्या
0 notes
Text
PM Narendra Modi : गुजरात ऐतिहासिक विजयाचं श्रेय फक्त मोदींचं; ‘सामना’तून शिवसेनेने पंतप्रधानांवर उधळली स्तुतीसुमने
PM Narendra Modi : गुजरात ऐतिहासिक विजयाचं श्रेय फक्त मोदींचं; ‘सामना’तून शिवसेनेने पंतप्रधानांवर उधळली स्तुतीसुमने
PM Narendra Modi : गुजरात ऐतिहासिक विजयाचं श्रेय फक्त मोदींचं; ‘सामना’तून शिवसेनेने पंतप्रधानांवर उधळली स्तुतीसुमने PM Narendra Modi : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला आहे. या विजयाचे शिल्पकार पंतप्रधान नरेंद्र मोदी असून ते गौरवपुरुष आहेत, असे सामानाच्या अग्रलेखातून लिहीत मोदी यांच्यावर आज स्तुतीसुमने उधळण्यात आली आहे. PM Narendra Modi : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला…
View On WordPress
#modi:#narendra#अपडेट न्यूज#आजची बातमी#आताची बातमी#उधळली#ऐतिहासिक#ऑनलाईन बातम्या#गुजरात#ठळक बातम्या#ताज्या घडामोडी#न्यूज फ्लॅश#पंतप्रधानांवर#फक्त#बातम्या#भारत लाईव्ह न्यूज मीडिया#मराठी बातम्या#मराठी समाचार#महाराष्ट्र#मोदींचं#लेटेस्ट बातमी#विजयाचं#शिवसेनेने#श्रेय#सामनातून#स्तुतीसुमने
0 notes