#��ंग्राम सिंग
Explore tagged Tumblr posts
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना उमेदवारी/काँग्रेसकडून सोनिया गांधी यांचा राजस्थानातून उमेदवारी अर्ज दाखल
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी-प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी सात हजार किलोमीटर रस्ते आणि पूल बांधण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
आणि
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवर उद्या निकाल
****
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, यामध्ये महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे आणि शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर गुजरात मधून जे.पी. नड्डा यांच्यासह चार, मध्य प्रदेशातून डॉ. एल मुरुगन यांच्यासह, चार, तर ओडिसामधून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राजस्थान मधून आज राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. बिहार मधून अखिलेश प्रसाद सिंग, तर हिमाचल प्रदेश मधून अभिषेक मनू सिंघवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भर��्याचा उद्या शेवटचा दिवस असून, गरज भासल्यास, येत्या २७ तारखेला मतदान होईल.
दरम्यान, आपल्याला मिळालेल्या उमेदवारीबद्दल अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत -
भारतीय जनता पक्षाने राज्यसभेची मला उमेदवारी घोषित केल्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानतो. पक्षामध्ये गेल्यानंतर ताबडतोब ही जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली, हा माझ्यावर टाकलेला फार मोठा विश्वास आहे असं माझा व्यक्तिगत मत आहे.
****
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी असं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील यांनी येत्या लोकसभेत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना इथून लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली असं आंबेडकर म्हणाले. ते आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण न देता वेगळे आरक्षण मिळाले पाहिजे अशी आपली भूमिका असल्याचं आंबेडकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.
****
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीनं राज्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. बीड जिल्ह्यात सर्वत्र बंद पाळण्यात आला. परळी, माजलगाव आणि केज इथं दूचाकी रॅली काढण्यात आली तसंच जरुड फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
लातूर जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. अहमदनगर जिल्ह्यातही पारनेर कर्जत, जामखेड, श्रीगोंदा शेवगाव तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. नाशिक इथं मराठा समाजातर्फे लाक्षणिक आंदोलन कण्यात आलं. सातारा जिल्ह्यात कराड, फलटण, खंडाळा इथं बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
****
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी सात हजार किलोमीटर रस्ते आणि पूल बांधण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यातील शासकीय तसंच अनुदानित वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करून ते दरमहा १८ हजार रुपये करण्याच्या निर्णयालाही मंत्रिमंडळाने मान��यता दिली. राज्यात लातूरसह सहा ठिकाणी परिचर्या महाविद्यालयं उभारण्याचा निर्णय आज घेण्यात आला. ही महाविद्यालयं प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेची असणार आहेत. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित एक कोटी २१ लाख रुपये दरवर्षी खर्च करण्यासही राज्य मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत मान्यता दिली.
ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना वाळू पुरवण्यासाठीच्या सर्वंकष सुधारित रेती धोरणाला मंजुरी, मुद्रांक शुल्क माफीमध्ये भाडेपट्ट्याचा समावेश करणं, उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अती विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा देणं, तसंच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा करण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला
****
आज देशभरात वसंत पंचमीचा सण उत्साहात साजरा झाला. या दिवशी विद्येची, बुद्धी आणि ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या. यानिमित्त आज पंढरपूर इथं विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा साजरा झाला.
****
छत्रपती संभाजीनगर इथून आज सकाळी अयोथ्या इथल्या बाळरामाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली. केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी भगवा झेंडा दाखवून रेल्वेला रवाना केले. श्रीराम नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहात सर्व राम भक्त रेल्वेनं अयोध्येकडे रवाना झाले.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवर उद्या, गुरूवारी निकाल दिला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सायंकाळी साडेचार वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात निकाल वाचन करणार आहेत. साक्ष नोंदणी, उलटतपासणी आणि अंतिम युक्तिवादानंतर ३१ जानेवारी रोजी ही सुनावणी पूर्ण झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल देत, पक्षाचं नाव आणि चिन्हं अजित पवार गटाला दिलं आहे.
****
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार नांदेड शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी आज बरखास्त करण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष संघटन आणि प्रशासन नाना गावंडे यांनी दिली. नांदेड शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या समन्वयकपदी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
लातूर इथं सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय १००व्या नाट्य संमेलनात आज 'नाटक माझ्या चष्म्यातून' या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं. या परिसंवादात आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि पत्रकार विलास बडे सहभागी झाले होते. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात हरवत चाललेली भावना आणि संवेदना नाटकामुळे जिवंत असल्याची जाणीव 'नाटक माझ्या चष्म्यातून' या परिसंवादात झाली. नाटक ही कला जिवंत ठेवण्यासाठी ग्रामीण भागात जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने नाट्य स्पर्धांचं आयोजन होणं आवश्यक असल्याचं मत आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केलं. तसंच आज झालेल्या नाट्यगीत महोत्सवात सादर झालेल्या नाट्य गीतांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत अनेक लाभार्थी आपल्याला झालेल्या लाभांची माहिती देत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथंही लाभार्थींनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
****
नांदेड जिल्हा परिषदेतील गट-अ ते गट-ड पदावरील अनुकंपा तत्वावरील पात्र उमेदवारांची तात्पुरती प्रतिक्षासूची संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी त्याच्या हरकती २६ तारखेपर्यंत विहीत पुराव्यासह कार्यालयाकडे समक्ष सादर कराव्या, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज भारतीय योग संस्थेची छत्रपती संभाजीनगर शाखा आणि जिल्हा योगासन स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सूर्यनमस्कार साधना कार्यक्रम घेण्यात आला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यावेळी उपस्थित होते. योगाचं महत्व जगभरात मान्य झालं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जगभरात योग केला जात असल्याचं, कराड यावेळी म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्यात १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आलं. आज कार रॅलीने या अभियानाचा समारोप करण्यात आला.
****
केज तालुक्यातील आडस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाने आडस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात चांगली आरोग्यसेवा मिळणे शक्य होणार आहे.
****
देशाच्या प्रगतीसाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योजकांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. उद्योजक घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रकल्प आधारित ज्ञानावर भर द्यावा आणि त्यासाठी विविध आस्थापनांबरोबर संलग्नित राहून काम करावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केलं आहे. आज विद्यापीठात "उद्योग विद्यापीठ सहयोग" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी कुलगुरू बोलत होते.
****
0 notes
Text
वनरक्षक भर्ती का फिजिकल परीक्षा देने जा रहे युवक को रोककर की पिटाई, तीन के खिलाफ केस दर्ज
NCG NEWS DESK बसना :बसना थाना क्षेत्र के ग्राम तोषगांव के बाजार पड़ाव चौक के पास 30 मई की रात करीब वनरक्षक भर्ती का फिजिकल परीक्षा देने जा रहे युवक के साथ 3 लोगों ने रास्ता रोककर मारपीट की. मारपीट से युवक बेहोश हो गया. मामले की शिकायत थाने में दर्ज करायी गयी है| थाने में दर्ज रिपोर्ट के मुताबिक, ग्राम बाराडोली निवासी मुकेश कुमार जगत पिता जयपाल सिंग जगत उम्र 28 साल हाल में भालुकोना में रहता है. 30…
View On WordPress
#breakingnews#citynews#community#districtnews#districtupdate#local#localnews#neighborhood#regionalnews#statenews#stateupdate#townnews
0 notes
Text
संवाददाता राजा कोष्टा जगदलपुर:- पुलिस अधीक्षक जितेन्द्र सिंह मीणा के नेतृत्व में बस्तर पुलिस के द्वारा आपराधिक तत्वों के विरूद्ध लगातार कार्यवाही किया जा रहा है। इसी तारतम्य में उडीसा राज्य छ0ग0 होते हुये उत्तर प्रदेश की ओर परिवहन कर रहे गांजा तस्कर पर कार्यवाही करने में बस्तर पुलिस को सफलता मिली है। ज्ञात हो कि थाना बोधघाट को सूचना प्राप्त हुआ था कि एक व्यक्ति रेल मार्ग के माध्यम से उडिसा से जगदलपुर रेल्वे स्टेशन की ओर आ रहा है सूचना पर पुलिस अधीक्षक जितेन्द्र सिंह मीणा के मार्गदर्शन एवं अतिरिक्त पुलिस अधीक्षक निवेदिता पाॅल एवं नगर पुलिस अधीक्षक विकास कुमार के पर्यवेक्षण में थाना प्रभारी बोधघाट निरी. दिलबाग सिंह के नेतृत्व में टीम गठित कर कार्यवाही हेतु रेल्वे स्टेशन जगदलपुर की ओर रवाना किया गया था। उक्त टीम के द्वारा रेल्वे स्टेशन जगदलपुर मेन गेट के पास एक संदिग्ध व्यक्ति की पहचान कर घेराबंदी कर पकड़ा गया जिससे पूछताछ पर उसने अपना नाम नौशाद अंसारी पिता हातम अंसारी उम्र 32 वर्ष निवासी ग्राम सिंघौली अहीर, थाना सिंघौली अहीर, जिला बागपत (उत्तर प्रदेश) बताया जिसके कब्जे के एक काले रंग के बड़े पिठ्ठू बैग में भरा मादक पदार्थ गांजा वजनी 10.00 किलोग्राम जिसकी अनुमानित कीमत 70,000/- रूपये गांजा परिवहन करने एवं अपने पास रखने के संबंध में पूछताछ करने पर कोई वैधानिक दस्तावेज प्रस्तुत नहीं किया गया। मामले में नौसाद अंसारी का कृत्य एन0डी0पी0एस0 एक्ट की परिधि में आने पर आरोपी के विरूद्ध धारा 20 (ख) (ii)(ग) एन0डी0पी0एस0 एक्ट के तहत थाना बोधघाट में अपराध पंजीबद्ध कर आरोपी नौसाद अंसारी को गिरफ्तार कर न्यायिक रिमाण्ड पर न्यायालय भेजा जा रहा है। महत्वपूर्ण भूमिका अदा करने वाले अधिकारी:- निरी0 - दिलबाग सिंग थाना प्रभारी बोधघाट उप निरी0 (रेल्वे)- उज्जवल कुमार सउनि - धीरेन्द्र ठाकुर प्र0आर0 - राजेश सिंह आर0 - विजय तिर्की, गायत्री प्रसाद तारम, अजीत सरकार एवं आरपीएफ आरक्षक किरण पण्डा
0 notes
Text
गौ-तस्करी मामले में फरार दो मुख्य आरोपी गिरफ्तार, अर्जुनी पुलिस की कार्यवाही
गौ-तस्करी मामले में फरार दो मुख्य आरोपी गिरफ्तार, अर्जुनी पुलिस की कार्यवाही #news
पवन निषाद धमतरी, 26 अगस्त को ट्रक क० सीजी 15 डी0एफ0 5635 का चालक अपने ट्रक में 40 नग गौ वंश को भरकर बिना चारा, पानी के क्रूरता पूर्वक परिवहन करने की सूचना पर गौ वंश धर्म सेना के जिला संयोजक अपने साथियों के साथ उक्त वाहन को पीछा करते हुए ग्राम लीलर में ��कड़े, गौ वंश के सेवा समितियों के सदस्यों को देखकर ट्रक में मवेशी परिवहन करने वाले राय सिंग लहरे, प्रताप सतनामी, ओंकार कुर्रे एवं ट्रक चालक भी मौके…
View On WordPress
#CG DAILY TIMES#Chhattisgarh#chhattisgarh aaj ka news#chhattisgarh khabr#chhattisgarh news#chhattisgarh news in English#chhattisgarh news live#chhattisgarh news today#current news#dhamtari khabar#Dhamtari news#farar#girftaar#hindi akhbaar#khabar aaj ka#lattest news#morning news#news in hindi#news today#nigh news#web news#अर्जुनी पुलिस#गौ-तस्करी
0 notes
Text
घर में घुसकर दबंगो ने किया जानलेवा हमला…. छोटे-छोटे बच्चों को भी चोट आई….
घर में घुसकर दबंगो ने किया जानलेवा हमला…. छोटे-छोटे बच्चों को भी चोट आई….
मृत समझकर भागे दबंग… मध्य प्रदेश – झाबुआ पेटलावद थाना क्षेत्र के अंतर्गत ग्राम पंथ बोराली में दबंगों ने एक घर में घुसकर परिवार के लोगों पर जानलेवा हमला किया, पीड़ित परिवार ने जानकारी देते हुए बताया कि गोवर्धन गरवाल, माँगू पिता गिदू गरवाल, अजेय बापू गरवाल, भगत सिंग गोवर्धन पिता सोमा गरवाल द्वारा मारपीट कर व जान से मारने की धमकी दी, साथ ही पीड़ित परिवार ने जानकारी देते हुए बताया कि वो जब अपने खेत…
View On WordPress
0 notes
Photo
पेण्डारी गांव में जुआ फड़ पर छापामार कर 6 जुआरियों को पुलिस ने पकड़ा। बिलासपुर/सकरी- रविवार को सकरी पुलिस थाना प्रभारी अभिनव उपाध्याय को मुखबिर से सूचना मिली कि सकरी थाना क्षेत्र के पेण्डारी गांव के एक कोठार में बड़े स्तर पर जुआ खेला जा रहा है। सूचना मिलते ही थाना प्रभारी अभिनव उपाध्याय अपने थाना स्टॉप प्रधान आरक्षक सिद्धार्थ पाण्डेय, आरक्षक गजपाल जांगड़े, तरुण प्रताप सिंग, मुकेश राय, शैलेंद्र साहू के साथ ग्राम पेंडारी के लिये रवाना हुये। सकरी पुलिस ने मुखबिर द्वारा बताए गए स्थान पर घेराबंदी कर छापा मारा। पहले दो जुआरियों ने पुलिस देख कर भागने का प्रयास किया। चारों ओर से घिरा देख भागने में नाकामयाब रहे। पुलिस ने जुआ खेल रहे संजू वल्द मन्नूलाल विश्वकर्मा 26 वर्ष निवासी भरारी, रामनारायण वल्द बंशीलाल यादव 29वर्ष पेण्डारी, श्रवण कुमार वल्द बलदाऊ साहू 29वर्ष पेण्डारी, मनोज वल्द विशाल साहू 28वर्ष पेण्डारी, रामायण वल्द साधराम विश्वकर्मा 30वर्ष पेण्डारी, संदीप बघेल वल्द सेवक राम 24वर्ष पेण्डारी निवासी को जुआ खेलते हुए पकड़ लिया। पुलिस ने फड़ से 2950रू व ताश की गड्डी बरामद की। सभी पकड़े गये जुआरियों की तलाशी भी ली गयी। उनके पास से और कुछ बरामद नही हुआ। गौरतलब हो कि सकरी परिक्षेत्र के गांव में कई दिनों से बड़े स्तर पर जुआ खेले जाने की सूचना मिल रही थी जिस पर सकरी पुलिस की तत्परता, सूझबूझ और मुखबिर की सहायता से सभी 6आरोपियों को सकरी पुलिस ने अपने हिरासत में ले लीया। सभी आरोपियों के खिलाफ अपराध धारा 13 जुआ एक्ट की तहत कार्यवाही की गई हैं।
0 notes
Photo
12 हिरणों का शिकार! सैयद जावेद हुसैन, धमतरी ब्यूरो - धमतरी के ग्राम मोहलाई में शनिवार सुबह उस वक्त सनसनी फैल गई जब एक साथ 12 हिरणों के शव ग्रामीणों ने देखें जिसकी सूचना ग्रामीणों ने तत्काल वन विभाग को दी इस पर वन विभाग ने त्वरित कार्यवाही करते हुए पुलिस विभाग को भी सूचित किया और घटनास्थल पर पहुंचे जहां वन विभाग ने 12 हिरणों के शवों को बरामद किया, वन विभाग ने मामले की गंभीरता को देखते हुए तत्काल अचानकमार से स्नाइपर डॉग और उसकी टीम व सीसीएस रायपुर के साथ आसपास के इलाके का बारीकी से मुआयना किया, जहां मुरूम निकालने से बने गड्ढे पर भरे पानी में जहर मिलाया गया था जिसे पीकर हिरणों की मौत हुई इसके बाद जांच को आगे बढ़ाते हुए स्नाइपर डॉग की सहायता से वन विभाग की टीम आरोपी तक जा पहुंची| डीएफओ अमिताभ वाजपेई ने वार्ता 24 को बताया कि आरोपी रिखी राम ध्रुव को गिरफ्तार कर लिया गया है, आरोपी मोहलाई गांव का ही रहने वाला है और वारदात स्थल से उसका घर करीब ही है| वहीं श्री वाजपेई ने यह भी बताया आरोपी रिखी राम ध्रुव के घर से शिकार करने वाले अन्य सामान जैसे यूरिया कई प्रकार के जाल व हिरणों के सिंग आदि भी मिले जिन्हें जप्त कर लिया गया है, गौरतलब हो कि वाइल्ड लाइफ क्राइम को रोकने के लिए स्नाइपर डॉग्स को विशेष तरह की ट्रेनिंग दी जाती है जिससे वे आरोपियों तक आसानी से पहुंच जाते हैं, फिलहाल आरोपी से वन विभाग की टीम और भी पूछताछ कर रही है आगे और भी बड़े खुलासे हो सकते हैं|
0 notes
Text
लापरवाही : क्वारेंन्टाईन सेंटर से दो फ़रार, 2 आ गए अपने घर.
लक्ष्य रजक,महासमुन्द। खल्लारी थाना अंतर्गत ग्राम पंचायत आंवराडबरी वि.खण्ड बागबाहरा से दो ���्यक्ति के क्वारेंन्टाईन सेंटर से फ़रार होने पर मामला दर्ज किया गया है. ये दोनों व्यक्ति हैदराबाद से आये थे जिन्हें प्राथमिक शासकीय भवन आंवराडबरी में रखा गया था. जिनपर अब मामला दर्ज कर लिया गया है.
जानकारी के अनुसार महेश पिता खोजु राम उम्र 27 वर्ष, सुखदेव पिता धन सिंग उम्र 22 वर्ष, गोविंद पिता लखन नागवंशी…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 14 February 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – १४ फेब्रुवारी २०२४ सायंकाळी ६.१०
****
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना उमेदवारी/काँग्रेसकडून सोनिया गांधी यांचा राजस्थानातून उमेदवारी अर्ज दाखल
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी-प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी सात हजार किलोमीटर रस्ते आणि पूल बांधण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
आणि
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवर उद्या निकाल
****
राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षानं उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली, यामध्ये महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे आणि शिवसेना शिंदे गटाचे मिलिंद देवरा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर गुजरात मधून जे.पी. नड्डा यांच्यासह चार, मध्य प्रदेशातून डॉ. एल मुरुगन यांच्यासह, चार, तर ओडिसामधून केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी राजस्थान मधून आज राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे यांना काँग्रेसनं उमेदवारी दिली आहे. बिहार मधून अखिलेश प्रसाद सिंग, तर हिमाचल प्रदेश मधून अभिषेक मनू सिंघवी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस असून, गरज भासल्यास, येत्या २७ तारखेला मतदान होईल.
दरम्यान, आपल्याला मिळालेल्या उमेदवारीबद्दल अशोक चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत -
भारतीय जनता पक्षाने राज्यसभेची मला उमेदवारी घोषित केल्याबद्दल मी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे मनःपूर्वक आभार मानतो. पक्षामध्ये गेल्यानंतर ताबडतोब ही जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली, हा माझ्यावर टाकलेला फार मोठा विश्वास आहे असं माझा व्यक्तिगत मत आहे.
****
मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यातून निवडणूक लढवावी असं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. आरक्षण मिळवण्यासाठी जरांगे पाटील यांनी येत्या लोकसभेत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना इथून लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली असं आंबेडकर म्हणाले. ते आज मुंबई इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण न देता वेगळे आरक्षण मिळाले पाहिजे अशी आपली भूमिका असल्याचं आंबेडकर यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केलं.
****
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावून आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केलं आहे. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे. त्यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीनं राज्यात ठिकठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. बीड जिल्ह्यात सर्वत्र बंद पाळण्यात आला. परळी, माजलगाव आणि केज इथं दूचाकी रॅली काढण्यात आली तसंच जरुड फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
लातूर जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. अहमदनगर जिल्ह्यातही पारनेर कर्जत, जामखेड, श्रीगोंदा शेवगाव तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. नाशिक इथं मराठा समाजातर्फे लाक्षणिक आंदोलन कण्यात आलं. सातारा जिल्ह्यात कराड, फलटण, खंडाळा इथं बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
****
मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत आणखी सात हजार किलोमीटर रस्ते आणि पूल बांधण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. राज्यातील शासकीय तसंच अनुदानित वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यावेतनात वाढ करून ते दरमहा १८ हजार रुपये करण्याच्या निर्णयालाही मंत्रिमंडळाने मान्यता दिली. राज्यात लातूरसह सहा ठिकाणी परिचर्या महाविद्यालयं उभारण्याचा निर्णय आज घेण्यात आला. ही महाविद्यालयं प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेची असणार आहेत. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित एक कोटी २१ लाख रुपये दरवर्षी खर्च करण्यासही राज्य मंत्रिमंडळाने आजच्या बैठकीत मान्यता दिली.
ऑनलाईन पद्धतीने ग्राहकांना वाळू पुरवण्यासाठीच्या सर्वंकष सुधारित रेती धोरणाला मंजुरी, मुद्रांक शुल्क माफीमध्ये भाडेपट्ट्याचा समावेश करणं, उच्च तंत्रज्ञान वापरणाऱ्या अती विशाल उद्योगांना प्राधान्य क्षेत्राचा दर्जा देणं, तसंच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित सेवांतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा करण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला
****
आज देशभरात वसंत पंचमीचा सण उत्साहात साजरा झाला. या दिवशी विद्येची, बुद्धी आणि ज्ञानाची देवी सरस्वतीची पूजा केली जाते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशवासियांना वसंत पंचमीच्या शुभेच्छा दिल्या. यानिमित्त आज पंढरपूर इथं विठ्ठल आणि रुक्मिणीचा विवाह सोहळा साजरा झाला.
****
छत्रपती संभाजीनगर इथून आज सकाळी अयोथ्या इथल्या बाळरामाच्या दर्शनासाठी विशेष रेल्वे सोडण्यात आली. केंद्रीय अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी भगवा झेंडा दाखवून रेल्वेला रवाना केले. श्रीराम नामाचा जयघोष करत मोठ्या उत्साहात सर्व राम भक्त रेल्वेनं अयोध्येकडे रवाना झाले.
****
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवर उद्या, गुरूवारी निकाल दिला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सायंकाळी साडेचार वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात निकाल वाचन करणार आहेत. साक्ष नोंदणी, उलटतपासणी आणि अंतिम युक्तिवादानंतर ३१ जानेवारी रोजी ही सुनावणी पूर्ण झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने अलीकडेच अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निकाल देत, पक्षाचं नाव आणि चिन्हं अजित पवार गटाला दिलं आहे.
****
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार नांदेड शहर काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी आज बरखास्त करण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष संघटन आणि प्रशासन नाना गावंडे यांनी दिली. नांदेड शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीच्या समन्वयकपदी माजी आमदार ईश्वरराव भोसीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
****
लातूर इ��ं सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सव आणि विभागीय १००व्या नाट्य संमेलनात आज 'नाटक माझ्या चष्म्यातून' या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं. या परिसंवादात आमदार संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे आणि पत्रकार विलास बडे सहभागी झाले होते. आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात हरवत चाललेली भावना आणि संवेदना नाटकामुळे जिवंत असल्याची जाणीव 'नाटक माझ्या चष्म्यातून' या परिसंवादात झाली. नाटक ही कला जिवंत ठेवण्यासाठी ग्रामीण भागात जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या सहाय्याने नाट्य स्पर्धांचं आयोजन होणं आवश्यक असल्याचं मत आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी यावेळी व्यक्त केलं. तसंच आज झालेल्या नाट्यगीत महोत्सवात सादर झालेल्या नाट्य गीतांना रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
****
विकसित भारत संकल्प यात्रेत मेरी कहानी मेरी जुबानी अंतर्गत अनेक लाभार्थी आपल्याला झालेल्या लाभांची माहिती देत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथंही लाभार्थींनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
****
नांदेड जिल्हा परिषदेतील गट-अ ते गट-ड पदावरील अनुकंपा तत्वावरील पात्र उमेदवारांची तात्पुरती प्रतिक्षासूची संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी त्याच्या हरकती २६ तारखेपर्यंत विहीत पुराव्यासह कार्यालयाकडे समक्ष सादर कराव्या, असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी केलं आहे.
****
छत्रपती संभाजीनगर इथं आज भारतीय योग संस्थेची छत्रपती संभाजीनगर शाखा आणि जिल्हा योगासन स्पोर्टस् असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य सूर्यनमस्कार साधना कार्यक्रम घेण्यात आला. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यावेळी उपस्थित होते. योगाचं महत्व जगभरात मान्य झालं असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने जगभरात योग केला जात असल्याचं, कराड यावेळी म्हणाले.
****
हिंगोली जिल्ह्यात १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आलं. आज कार रॅलीने या अभियानाचा समारोप करण्यात आला.
****
केज तालुक्यातील आडस येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाने आडस प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या ग्रामीण भागात चांगली आरोग्यसेवा मिळणे शक्य होणार आहे.
****
देशाच्या प्रगतीसाठी शैक्षणिक संस्था आणि उद्योजकांनी एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. उद्योजक घडविण्यासाठी शिक्षकांनी प्रकल्प आधारित ज्ञानावर भर द्यावा आणि त्यासाठी विविध आस्थापनांबरोबर संलग्नित राहून काम करावे, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी केलं आहे. आज विद्यापीठात "उद्योग विद्यापीठ सहयोग" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी कुलगुरू बोलत होते.
****
0 notes
Photo
ज्वालापुर पुलिस ने पकड़े दो वन्य जीव तस्कर बरामद किये दुर्लब प्रजाति के सिंग हरिद्वार- ज्वालापुर कोतवाली पुलिस को उस समय बड़ी कामयाबी हाथ लगी जब उसने मुखबिर की सूचना पर रेलवे स्टेशन पर चेकिंग के दौरान दो वन्य जीव तस्करों को गिरफ्तार किया। तलाशी में तस्करों के पास से हिरन के 7 किलो 500 ग्राम सींग और 36 ग्राम दुर्लभ कस्तूरी बरामद जिनकी कीमत लाखों रुपए बताई जा रही है। ज्वालापुर कोतवाली प्रभारी अमरजीत सिंह ने बताया कि रेलवे स्टेशन पर चेकिंग के दौरान दो व्यक्तियों की गतिविधि संदिग्ध पाए जाने पर पुलिस ले उनसे पूछताछ की। पूछताछ में आनाकानी करने पर पुलिस ने जब उनकी कार की तलाशी ली तो उनके पास से सात किलो हिरन के सींग और 36 ग्राम कस्तूरी बरामद हुई। पकड़े गए आरोपियों से पुलिस ने पूछताछ की तो पता चला कि दोनों युवक जमालपुर कनखल के रहने वाले हैं। दोनों के खिलाफ वन अधिनियम के तहत मुकदमा दर्ज कर कोर्ट में पेश किया जाएगा। वहीं पकड़े जाने के बाद दोनों आरोपी खुद को बेकसूर बता रहे हैं । आरोपियों का कहना है कि सींग उनके नहीं हैं। वन्य जीव अंगों की तस्करी का ये कोई पहला मामला नहीं है पहले भी कई बार हरिद्वार में वन्य जीव तस्कर पकड़े जा चुके हैं। लेकिन हैरानी की बात ये है कि अधिकतर मामलों में आजतक ये खुलासा नहीं हो पाया कि आखिर इन वन्य जीवों के ये अंग आते कहां से हैं और इन्हें सप्लाई कहां किया जाता है। इस बात से पुलिस अभी भी वंचित है ।
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 November 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ नोव्हेंबर २०२३ सायंकाळी ६.१०
****
तिन्ही संरक्षण दलातील महिला सैनिकांसाठी मातृत्व, बाल संगोपन आणि बाल दत्तक रजेचे नियम समान पातळीवर विस्तारीत करण्यास मंजुरी
बीडमधील हिंसाचाराची एसआयटी मार्फत चौकशी करावी-पालकमंत्री धनंजय मुंडे यांची मागणी
मराठी रंगभूमी दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन
आणि
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचं दक्षिण आफ्रिकेसमोर ३२७ धावांचं आव्हान;विराट कोहलीचं वनडे मधलं ४९ वं शतक
****
तिन्ही संरक्षण दलातील महिला सैनिकांसाठीच्या मातृत्व, बाल संगोपन आणि बाल दत्तक रजेच्या नियमांना समान पातळीवर विस्तारीत करण्याच्या प्रस्तावाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मंजुरी दिली आहे. यामुळे सैन्यातील सर्व दर्जाच्या सर्व महिलांना मातृत्व रजेचे अनुदान समान प्रमाणात लागू होईल. या निर्णयामुळे सैन्यातील महिलांच्या कामाच्या परिस्थितीत सुधारणा होणार असून, त्यांना व्यावसायिक आणि कौटुंबिक जीवनात अधिक चांगल्या पद्धतीनं संतुलन राखण्यास मदत होणार असल्याचं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे.
****
पराष्ट्रपती जगदीप धनखड उद्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. आपल्या एक दिवसीय दौऱ्यात उपराष्ट्रपती मुंबईतील भारतीय तंत्रज्ञान संस्था, आयआयटी मुंबईला भेट देणार आहेत. या भेटीत ते संस्थेतील विद्यार्थी आणि प्राध्यापकांशी संवाद साधतील.
****
मराठवाड्याच्या धर्तीवर कुणबी मराठा असे पुरावे शोधण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय समित्या नियुक्त करण्यात आल्या आहेत. नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधी हे या समितीचे अध्यक्ष तर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ समिती सचिव असतील. या समितीत जिल्हा परिषदेचे ग्राम पंचायत विभागाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसंच माध्यमिक आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा सहआयुक्त, नगरपालिका यांचा सम��वेश आहे.
****
जळगांव जिल्ह्यात कुणबी, मराठा कुणबी आणि कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणीची विशेष मोहीम युद्धपातळीवर सुरू झाली आहे. राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठी 'विशेष कक्ष' कार्यान्वित करण्यात आला. तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक तालुक्यात कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.
****
बीडमधील हिंसाचार हे मोठे षडयंत्र असून याची विशेष तपास पथक-एसआयटी मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. बीड शहरातील संबंधित ठिकाणांची पाहणी केल्यानंतर मुंडे यांनी पंडित कुटुंबाच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी सरकारकडे ही मागणी करणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी माजी आमदार अमरसिंह पंडित, सुभाष राऊत, डॉ. योगेश क्षीरसागर यांच्यासह जिल्ह्यातील नेते उपस्थित होते. या हिंसाचारातील प्रत्येकाला शिक्षा झाली पाहिजे. यासाठी या संपूर्ण प्रकरणाची खोलात जाऊन एसआयटी मार्फत चौकशीची मागणी आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचं मुंडे यावेळी म्हणाले.
****
मराठा आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्यानं, त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा असल्याचं, मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ते आज छत्रपती संभाजीनगर इथं पत्रकारांशी बोलत होते. मराठा समाज २४ डिसेंबरकडे डोळे लावून बसला असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. सरकारने वेळेच्या आत आरक्षण द्यावं, म्हणजे पुढचं आंदोलन करण्याची वेळ येऊ नये, असं जरांगे यांनी नमूद केलं. शांततेच्या आंदोलनात मोठी ताकद असल्याने, यापुढे फक्त शांततेच्या मार्गानेच आंदोलन करण्याचं आवाहन जरांगे पाटील यांनी केलं. आपण ठणठणीत असून, पुन्हा लवकरच राज्य दौरा करणार असा मानस मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. येत्या एक डिसेंबर पासून राज्याच्या प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू करणार असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे
दरम्यान, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. जरांगे पाटील समर्पण भावनेने समाजासाठी कार्य करत असून त्यांनी याच भावनेने जनचळवळ उभी केली आहे अशी भावना दानवे यांनी भेटी दरम्यान व्यक्त केली.
****
इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित सात जणांविरोधात राष्ट्रीय तपास यंत्रणा - एनआयएनं आरोपपत्र दाखल केलं आहे. मुंबईतल्या एनआयए विशेष न्यायालयात हे आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. इसिस साठी प्रशिक्षण शिबीरं भरवणं, निधी जमा करणं, आणि स्फोटकं तयार करण्यात सहभागी असणं, आदी आरोप त्यांच्याविरोधात ��ावण्यात आले आहेत. या सात जणांपैकी दोघे पुण्यातले, तिघं ठाण्यातले तर दोन जण मध्यप्रदेशातले आहेत.
****
राज्यभरातल्या २ हजार ३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज शांततेत मतदान झालं. मराठवाड्यातील २४८ ग्राम पंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली, यामध्ये बीड जिल्ह्यातल्या सर्वाधिक १८६, नांदेड १९, छत्रपती संभाजीनगर १६, लातूर १३, धाराशिव सहा, तर परभणी आणि जालना जिह्यातील प्रत्येकी चार ग्रामपंचायतींचा समावेश आहे. राज्यातल्या २ हजार ९५० सदस्य आणि १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं, या सर्व मतदानाची मतमोजणी उद्या होणार आहे.
****
मराठी रंगभूमी दिनानिमित्त आज विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. छत्रपती संभाजीनगर इथल्या महात्मा गांधी मिशन विद्यापीठात रंगभूमी समोरील आव्हाने आणि उपाय या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. समाजा मध्ये चांगल्या अभिरुची रूजवण्यासाठी नाट्य प्रशिक्षणाची आज अधिक गरज असल्याचं असं मत डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कला सादरीकरण विभागाच्या प्रमुख डॉ स्मिता साबळे यांनी यावेळी व्यक्त केलं. सरस्वती भुवन नाट्य शास्त्र महाविद्यालयचे प्रमुख डॉ किशोर शिरसाट य���ंनी यावेळी बोलताना कलावंत म्हणून आम्ही कमी पडलो नसून आपण प्रेक्षक निर्माण करण्यात कमी पडलो आहोत का, यावर आत्मचिंतन करण्याची आवश्यकता व्यक्त केली. कला क्षेत्रा मध्ये कठोर परिश्रमा शिवाय पर्याय नाही अस मत विद्यापीठाच्या नाट्य शास्त्रविभागाचे माजी विभाग प्रमुख जयंत शेवतेकर यांनी या प्रसंगी मांडलं. शहरातील अनेक मान्यवर रंगकर्मी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
****
एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत कोलकाता इथं सुरू असलेल्या सामन्यात भारतानं ३२६ धावा करत, दक्षिण आफ्रिकेसमोर ३२७ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताची सलामीवीर जोडी कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने तडाखेबंद सुरुवात केली. रोहित ४० तर शुभमन २३ धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने नाबाद १०१ धावा करत, भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या एकदिवसीय क्रिकेटमधल्या सर्वाधिक ४९ शतकांची बरोबरी केली. श्रेयस अय्यर ७७, सूर्यकुमार यादव २२, तर केएल राहुल आठ धावांवर तंबूत परतला. विराटसह रवींद्र जडेजा २९ धावांवर नाबाद राहिला.
****
देशभरात ‘आयुर्वेद फॉर वन हेल्थ' या संदेशाचा प्रसार करण्यासाठी नागपूरसह देशभरात ११ शहरांमध्ये आज देशव्यापी दुचाकी फे��्या काढण्यात आल्या. देशभरातील युवकांना आयुर्वेद दिनाच्या ‘आयुर्वेद फॉर वन हेल्थ' या जागतिक संदेशाशी जोडून घेणं तसंच आयुर्वेदाचा समृध्द वारसा आणि सामान्य जनतेच्या स्वास्थ्यासाठी आयुर्वेदामध्ये असलेला समग्र दृष्टीकोन यांना चालना देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
****
नांदेड इथं पोलीस असल्याची बतावणी करून आणि लॉटरी लागल्याचं आमीष दाखवून दोन वर्षात अनेकांची फसवणूक करणाऱ्या राहुलसिंग मनोजसिंग जोगीया नामक हैद्राबादच्या युवकास नांदेड गुन्हा शाखेनं अटक केलं आहे. त्याच्याकडून ६ लाख ४१ हजार ७१७ रुपयांचे सोन्या - चांदीचे दागीने, मोबाईल आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपीने मागील दोन वर्षात हदगाव, वजिराबाद नांदेड, मुदखेड आणि लिंबगाव ठाणे हद्दीत वृद्धाना लुबाडले होते. फसवणूक करुन लुटलेले सोने आणि चांदीचे दागीने विक्रीकरता नांदेड इथं इतवारा बाजारात नेत असताना गोदावरी नदीवरील नावघाट पुलावर पोलिसांनी त्याला अटक केली.
****
बीड जिल्हयातील एकुण 11 तालुक्यातील संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या लाभार्थ्यांकरिता माहे जुलै 2023 ते सप्टेंबर 2023 अखेरचे प्रती माह प्रती लाभार्थी दीड हजार रुपये प्रमाणे अनुदान वितरीत करण्यात आलं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 19 August 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १९ ऑगस्ट २०२३ सकाळी ७.१० मि.****
गौरी-गणपती तसंच दिवाळीसाठी शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर कृषी तसंच महसूल विभागांना योग्य ते नियोजन करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना
'माझी माती, माझा देश' अभियानाची काल मुंबईत राज्यपालांच्या उपस्थितीत सांगता
उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी शासनाचं सर्वतोपरी सहकार्य-केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉक्टर भागवत कराड यांची ग्वाही
मराठवाड्याला हक्काचं पाणी न दिल्यास जनआंदोलन उभारण्याचा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा इशारा
पहिल्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताचा आयर्लंडवर डकवर्थ लुईस नियमाने विजय
आणि
जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या इशा सिंग आणि शिवा नरवाल यांना मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक
****
गौरी - गणपती तसंच दिवाळी सणांसाठी राज्यातल्या शिधापत्रिकाधारकांना, शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय, काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यात प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि एक लीटर खाद्यतेल यांचा समावेश आहे. अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक, तसंच औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागातल्या, चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातल्या दारिद्र्य रेषेवरील, आणि केशरी शिधापत्रिकाधारकांना, हा आनंदाचा शिधा देण्यात येईल. राज्यातल्या एकूण एक कोटी ६५ लाख ६० हजार २५६ शिधापत्रिकाधारकांना हा शिधा मिळणार असून, यासाठी ८२७ कोटी ३५ लाख रूपये खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
****
राज्यात अपुऱ्या पावसाच्या पार्श्वभूमीवर कृषी तसंच महसूल विभागांनी चारा, वैरण, पिण्याचं पाणी या ��नुषंगाने योग्य ते नियोजन करण्याच्या सूचना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत. काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यांनी हे आदेश दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या ८९ टक्के पाऊस झाला आहे. १५ जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या ५० ते ७५ टक्के, तर १३ जिल्ह्यांमध्ये, सरासरीच्या ७५ ते १०० टक्के पाऊस झाला आहे. १३ तालुक्यात सरासरीच्या ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. राज्यात आतापर्यंत १३९ लाख हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. मोठ्या, मध्यम तसंच लघु पाटबंधारे प्रकल्पात, एकूण सुमारे ६२ टक्के पाणी साठा झाला आहे. सर्वाधिक ८७ टक्के पाणी साठा कोकण विभागातल्या प्रकल्पात झाला असून, मराठवाड्यात सर्वात कमी ३१ टक्के पाणी साठा झाला आहे. सध्या राज्यात ३२९ गावं आणि एक हजार २७३ वाड्यांमधून ३५१ टँकर्स सुरु असल्याची माहिती संबंधित विभागांकडून देण्यात आली.
****
महाराष्ट्र कॅसिनो कायदा रद्द करण्याचा निर्णय देखील काल मंत्रिमंडळानं घेतला. या अधिनियमाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात वरीष्ठ पातळीवर चर्चा करून, राज्यात अशा स्वरुपाचा कायदा अंमलात आणण्यात येऊ नये, अशी भूमिका घेण्यात आली.
****
राज्यातल्या १७ जिल्ह्यांमधल्या सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्याने जोडण्यासाठी, भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना राबवण्याचा निर्णय, कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यासाठी पाच हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
****
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था - आय टी आय मधल्या प्रशिक्षणार्थींच्या विद्यावेतनात, ४० रुपयांवरुन ५०० रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या विद्यावेतनात मागील ४० वर्षात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. पात्र लाभार्थ्यांना २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून, हे विद्यावेतन महाडीबीटी पोर्टलमार्फत दिलं जाणार आहे.
****
राज्यातल्या दुय्यम न्यायालयातल्या निवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन लागू करणं, रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगड इथं ग्राम न्यायालयाऐवजी दिवाणी न्यायालय, कनिष्ठ स्तर आणि न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग न्यायालय स्थापन करणं, केंद्राच्या सूचनेप्रमाणे राज्यात पोषण अभियान कार्यक्रम राबवणं, सहकारी संस्था आणि सभासदांबाबतचा २०२३ चा अध्यादेश मागे घेणं, आदी निर्णयही कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
****
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातल्या प्रथम आणि द्वितीय वर्ष अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना, २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरता पुढील सत्र पूर्ण करण्यासाठी, कॅरीऑनची संधी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय ��ेण्यात आला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी, काल म��ाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ नियामक परिषदेच्या बैठकीत, ही माहिती दिली. या निर्णयामुळे राज्यातल्या २२ हजार विद्यार्थ्यांना द्वितीय वर्षाचं, आणि ३६ हजार विद्यार्थ्यांना तृतीय वर्षाचं सत्र पूर्ण करण्याकरता संधी उपलब्ध होणार आहे.
****
राज्य परिवहन -एसटी महामंडळामार्फत श्रावण महिन्यात सुरू करण्यात आलेल्या, ‘श्रावणात एसटी संगे तीर्थाटन’, या उपक्रमाअंतर्गत, महामंडळानं प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा देण्याचं आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. याअंतर्गत गावातले महिला बचत गट, ज्येष्ठ नागरिक संघ, विविध सेवाभावी संस्था यांच्या पुढाकारानं धार्मिक सहलींचं आयोजन करण्यात येत आहे. चांगली सेवा आणि अभिनव उपक्रमांमुळे एसटीच्या उत्पन्नात भर पडेल अशी कामगिरी करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
****
स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षापर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाने पुढील २५ वर्षांकरिता आपली उद्दिष्टे निर्धारित करण्याची सूचना, राज्यपाल रमेश बैस यांनी केली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोप पर्वानिमित्त आयोजित 'माझी माती, माझा देश' या अभियानाची सांगता काल मुंबईत राज्यपालांच्या उपस्थितीत झाली, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजीत पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यावेळी उपस्थित होते. गरिबी, उपासमारी आणि सामाजिक असमानता दूर करण्यासाठी आगामी काळात विशेषत्वाने प्रयत्न करण्याचं आवाहन राज्यपालांनी यावेळी केलं.
****
माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांची जयंती उद्या २० ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. हा दिवस सद्भावना दिन म्हणूनही पाळला जातो. या पार्श्वभूमीवर सर्वत्र त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल वर्षा शासकीय निवासस्थानी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थितांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली आणि मंत्रालयातले अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
औरंगाबाद इथं निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांनी, परभणी इथं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी, तर बीड जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी राजीव गांधी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सद्भावना दिनाची प्रतिज्ञा दिली.
****
केंद्रीय वस्तू आणि सेवा कर- सीजीएसटीच्या एका अधीक्षकाला पाच लाख रुपये लाच घेताना, काल केंद्रीय अन्वेषण विभागाने सापळा रचून अटक केली. हेमंतकुमार असं या अधीक्षकाचं नाव असून, तो सीजीएसटीच्या भिवंडी आयुक्तालयात कार्यरत आहे. त्या��्या निवासस्थान तसंच कार्यालयातल्या झडतीत सुमारे ४३ लाख रुपये रोकड तसंच काही मालमत्तांची कागदपत्रं हस्तगत करण्यात आली आहेत. न्यायालयाने त्याला २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
****
कर्ज वितरीत करताना लावलेल्या अटी आणि शर्तींचं उल्लंघन झालं, तर बँकांनी संबंधितांकडून फक्त दंडात्मक शुल्क वसुली करावी, या शुल्कावर कुठलंही व्याज आकारु नये, असे निर्देश, रिजर्व्ह बँकेनं सर्व बँका आणि वित्तीय संस्थांना दिले आहेत. येत्या एक जानेवारीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होईल. कर्ज घेतलेल्या व्यक्तींना कर्जफेडीसाठी शिस्त लागावी, हा या शुल्काचा उद्देश असावा. याकडे महसूल जमा करण्याचा मार्ग म्हणून पाहू नये, असंही रिजर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. हे शुल्क निश्चित करण्यासाठी संचालक मंडळाच्या मंजुरीनं एक धोरण आखावं, या शुल्काचा स्पष्ट उल्लेख कर्ज देताना लादलेल्या अटी-शर्तींमध्ये आणि वेबसाइटवर असावा, क्रेडिट कार्ड आणि इतर व्यावसायिक व्यवहारांसाठी हे निर्देश लागू होणार नसल्याचं, रिजर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे.
****
उद्योगांना कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी केंद्र तसंच राज्य शासनाचं सर्वतोपरी सहकार्य असल्याची ग्वाही केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉक्टर भागवत कराड यांनी दिली आहे. काल औरंगाबाद इथं इंडस्ट्रीयल मीट या उद्योजकांच्या बैठकीच्या उद्घाटन सत्रात ते बोलत होते. कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या वतीनं ही बैठक घेण्यात आली. उद्योजकांना आवश्यक असणाऱ्या दळणवळणाच्या साधनांकडे आपलं विशेष लक्ष असल्याचं, कराड यांनी सांगितलं. उद्योजकता आणि रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी या कार्यक्रमाला दृकश्राव्य माध्यमातून शुभेच्छा दिल्या. मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज ॲण्ड ॲग्रीकल्चर -मसिआ संघटनेचे अध्यक्ष अनिल पाटील, लघुभारतीचे अध्यक्ष रवींद्र वैद्य, सीएमआयचे अध्यक्ष दुष्यंत पाटील, यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. या बैठकीत अडीचशे पेक्षा अधिक उद्योजकांनी विविध सामंजस्य करार केले.
****
या महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण राज्यातल्या गोवंशीय पशुधनाचं लसीकरण पूर्ण करण्याच्या सूचना, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिल्या आहेत. लम्पी चर्मरोगाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांसोबत पाटील यांनी काल आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ३९६ जनावरांना ��म्पी आजाराची लागण झाल्याचं आढळून आलं आहे. या आजाराचा संसर्ग जनावरांमध्ये होऊ नये, यासाठी पशुपालकांनी आपल्या जनावरांची काळजी घेऊन सतर्क राहण्याचं आवाहन, जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी केलं आहे.
****
मराठवाड्याला हक्काचं पाणी द्या, अन्यथा जन आंदोलन उभारण्याचा इशारा, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिला आहे. मराठवाडा गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यालयात औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या पाणी प्रश्नांसंदर्भात दानवे यांनी काल आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. पश्चिम वाहिनी नद्यांतून मराठवाड्याला कशाप्रकारे पाणी वळवता याची त्यांनी माहिती घेतली. कामं पूर्ण झालेल्या प्रकल्पांची अवस्था आणि मंजूर झालेल्या कामांची पूर्तता याचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला. मराठवाड्याचा पाणी प्रश्न आगामी काळात शासन दरबारी मांडणार असून, अर्ज आणि विनंत्याद्वारे शासनाने हा विषय गांभीर्याने घेतला नाही, तर येणाऱ्या काळात जन आंदोलन उभं करू असा इशारा दानवे यांनी दिला आहे.
****
डबलिन इथं काल झालेल्या पहिल्या टी - ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारतानं आयर्लंडवर डकवर्थ लुईस नियमानुसार दोन धावांनी विजय मिळवला. आयर्लंडनं प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात सात बाद १३९ धावा केल्या. प्रत्यूत्तरात आलेल्या भारतीय संघानं सातव्या षटकात दोन बाद ४७ धावा केल्यानंतर पावसामुळे खेळ थांबवावा लागला तेव्हा भारत डकवर्थ लुईस नियमानुसार आलर्यंडपेक्षा दोन धावांनी पुढे होता. या विजयाबरोबर भारतानं तीन सामन्यांच्या मालिकेत एक - शून्य अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतला दुसरा सामना उद्या होणार आहे.
****
अझरबैजान इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या इशा सिंग आणि शिवा नरवाल यांनी, मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक पटकावलं आहे. दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात त्यांनी तुर्कीच्या इल्यादा तरहान आणि युसुफ डिकेक या जोडीचा १६-१० असा पराभव केला. पदक तालिकेत चीनच्या पाठोपाठ भारत दुसऱ्या स्थानावर आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावं, असं आवाहन, मनरेगाचे राज्य महासंचालक नंदकुमार यांनी केलं आहे. लातूर इथं बांबू लागवड कार्यशाळेत ते काल बोलत होते. एक हेक्टर बांबू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून, तीन वर्षापर्यंत सात लाख रुपये कुशल, अकुशल मजुरीच्या रूपात दिले जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. बांबू लागवड मिशन अंतर्गत शासनाने जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना मोठी संधी निर्माण करून दिली असून, जिल्ह्याच्या आर्थिक विकासासाठी सूक्ष्म नियोजन करून, अधिकाधिक क्षेत्र बांबू लागवडीखाली आणून आपल्याला यातही लातूर पॅटर्न निर्माण करायचा असल्याचं, नंदकुमार यावेळी म्हणाले.
****
जालना जिल्ह्यातल्या ९४२ शाळांना प्रथमोपचार कीटचं वाटप केलं जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी काल प्रथमोपचार कीट घेऊन जाणाऱ्या वाहनास हिरवा झेंडा दाखवून या ��पक्रमाची सुरुवात केली.
****
उस्मानाबाद जिल्ह्यात अवैधरीत्या गर्भलिंग निदान आणि गर्भपाताला आळा घालण्यासाठी, नागरिकांनी त्यासंबंधीची गोपनीय माहिती शासकीय रुग्णालयात द्यावी, असं आवाहन, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राजाभाऊ गलांडे यांनी केलं आहे. काल यासंदर्भातल्या बैठकीत ते बोलत होते. याबाबत गोपनीय माहिती देणाऱ्याला राज्य खबरी योजनेअंतर्गत एक लाख रुपये बक्षीस देण्यात येणार असल्याचं गलांडे यांनी सांगितलं. संशयित सोनोग्राफी केंद्रावर डिकॉय केस करणं, सोनोग्राफी केंद्र तसंच गर्भपात केंद्राची त्रैमासिक तपासणी करणं, सोनोग्राफी केंद्राचं नूतनीकरण अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.
****
लातूर इथं संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाचं विभागीय कार्यालय लवकरच सुरु होणार असल्याची माहिती, महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक आर.टी. जिभकाटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. मुख्यालयाने याबाबत पाठवलेल्या प्रस्तावाला संचालक मंडळाने २१ जूनला मंजुरी दिली असून, याबाबतची प्रशासकीय कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन इथं महामंडळाचे विभागीय कार्यालय सुरु होणार असल्याचं या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ मार्च २०२३ सायंकाळी ६.१०
****
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 04 March 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०४ मार्च २०२३ सायंकाळी ६.१०
****
भावी पिढ्यांसाठी जलसुरक्षा आणि जलव्यवस्थेसंदर्भात प्रयत्न करण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन.
राज्य सरकारच्या ‘सुविधा संपन्न कुटुंब मिशन आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी’ योजनेला प्रारंभ.
छत्रपती संभाजीनगर नामकरणाविरोधात खासदार इम्तियाज जलील यांचं साखळी उपोषण.
आणि
आकांक्षित जिल्हा कार्यक्रमांतर्गत उस्मानाबाद जिल्हा शैक्षणिक क्षेत्रात अव्वल.
****
भावी पिढ्यांसाठी जलसुरक्षा आणि जलव्यवस्थेसंदर्भात प्रयत्न करण्याचं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. स्वच्छ ��ारत मिशन-ग्रामीण, जल जीवन मिशन आणि राष्ट्रीय जल मिशनच्या स्वच्छ सुजल शक्ती सन्मान २०२३चं वितरण आज राष्ट्रपतींच्या हस्ते झालं, त्यावेळी त्या बोलत होत्या. ग्रामीण भारतात शाळेत जाणाऱ्या मुलींचा वेळ पाणी आणण्यात जात होता आता मात्र हे चित्र बदलत चालल्याचं त्यांनी नमूद केलं. या कार्यक्रमात जलस्रोतांची शाश्वतता या संकल्पनेसह जलशक्ती अभियान - पावसाचे पाणी साठवा या मोहिमेचं उद्घाटनही राष्ट्रपतींनी केलं. जलशक्ती से नारी शक्ती या विषयावरची ध्वनिचित्रफीत आणि एका टपाल तिकीटाचं अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आलं. जलशक्ती मंत्रालयाच्या विविध कार्यक्रमात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा सन्मानही या कार्यक्रमात करण्यात आला.
****
देशाचा विकास, वारसा आणि मूल्य संवर्धनात युवकांनी योगदान देण्याचं आवाहन युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री, अनुराग सिंग ठाकूर यांनी केलं आहे. युवा उत्सव-इंडिया@2047चं पंजाबमधल्या रोपड इथं ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशभरात दीडशे जिल्ह्यातल्या शैक्षणिक संस्थांमध्ये ३१ मार्चपर्यंत युवा उत्सव आयोजित होणार असल्याचं ठाकूर यांनी सांगितलं. राज्यातल्या १६ जिल्ह्यात आजपासून ३१ मार्चपर्यंत या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्याचं आयोजन केलं जाणार आहे.
****
रोजगार हमी योजनेच्या मा��्यमातून अंत्योदय साधण्यासाठी प्रशासनाचा चे��रा मानवी असण्याची आवश्यकता राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत आज राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार, ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्र आणि शासनाच्या १७ विभागांच्या योजनांचं अभिसरण करून तयार करण्यात आलेल्या ‘सुविधा संपन्न कुटुंब मिशन आणि सर्वांगीण ग्रामसमृद्धी’ योजनेचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यात आज ६४ लाख कामगार २७ हजार ग्राम पंचायतींच्या माध्यमातून काम करत असून त्यांच्या माध्यमातून ८ लाखांपेक्षा अधिक शाश्वत संपदा निर्माण होत असल्याचं राज्यपालांनी सांगितलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. मनरेगा सुविधा संपन्न कुटुंब आणि ग्रामसमृद्धी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम प्रशासनाने करावं, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नोकरी करण्यापेक्षा शेती केली तर मोठा लाभ होईल असे सांगून ‘काम मागणाऱ्यांपेक्षा काम देणारे हात तयार करा’ असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं.
****
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या एपीएल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दराने दरमहा दरडोई पाच किलो धान्य देणारी योजना थांबवण्यात आली आहे. आता या शेतकऱ्यांना प्रतिमाह प्रतिलाभार्थी दीडशे रुपये देण्यात येणार आहेत. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत लाभार्थी महिला कुटुंब प्रमुखाच्या बँक खात्यात जमा होणार आहे. राज्यातल्या १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना जानेवारी २०२३ पासून हा निर्णय लागू होणार आहे.
****
औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर नामकरण केल्याच्या निषेधार्थ खासदार इम्तियाज जलील यांनी साखळी उपोषण सुरु केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हे उपोषण करण्यात येत आहे. औरंगाबादचं नामांतर करण्याऐवजी नवीन शहर वसवून त्याला छत्रपती संभाजीनगर नाव द्यावं, असं आवाहन खासदार जलील यांनी केलं. ते म्हणाले –
(खासदार इम्तियाज जलील)
आमचं एकच म्हणणं आहे की औरंगाबादचं नाव होतं ते औरंगाबादच ठेवायला पाहिजे. आणि समजा सरकारला असं वाटत असेल नाही कोणाचं नाव द्यायचं आहे, तर एक नवीन शहर उभारा. आणि त्या शहराला तुम्ही तुम्हाला जे नाव द्यायचं ते द्या, आमचं काही म्हणणं नसणार. तुम्ही एक चांगलं आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर उभारा आणि त्याला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव द्या.
****
कांद्याचे भाव घसरल्यानं पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नगर- पुणे महामार्गावर सुपा चौकात आज सकाळी रस्ता रोको करत आक्रोश आंदोलन केलं. सरकारनं कांद्याच्या निर्यात धोरणामध्ये तातडीनं बदल करावेत तसंच नाफेड मार्फत कांद्याची खरेदी करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतानाही महसूल प्रशासनाचे अधिकारी आंदोलनाकडं आले नाहीत म्हणून लंके यांनी महसूल प्रशासनाचा निषेध केला. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचं सांगत लंके यांनी सरकारनं यावर योग्य निर्णय घेतला नाही तर पुन्हा हे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला.
****
गुजरातमधील बेस्ट बेकरी हत्याकांड प्रकरणी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात १५ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे. वर्ष २००२ मध्ये घडलेल्या या प्रकरणातील दोन आरोपी हर्षद सोलंकी आणि मफत गोहील गेल्या १० वर्षांपासून कारागृहात आहेत. १३ डिसेंबर २०१३ रोजी त्यांना न्यायालयीन कोठडीत सुनावण्यात आली. या दोन आरोपींबाबत निर्णय येण्याची शक्यता होती. मात्र निकालाचं वाचन पूर्ण न झाल्याने आता १५ मार्चला पुढील सुनावणी होणार आहे.
****
सोलापूरच्या पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचा चौथा नामविस्तार दिनाचा सोहळा सोमवार ६ मार्च रोजी साजरा करण्यात येणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलसचिव योगिनी घारे यांनी दिली. सकाळी साडेअकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि अभिवादनाचा कार्यक्रम होईल. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचं उद्घाटनही यावेळी होणार आहे.
****
आकांक्षित जिल्हा कार्यक्रम अंतर्गत उस्मानाबाद जिल्ह्याकडून शैक्षणिक क्षेत्रात करण्यात आलेल्या अभिनंदनीय कामगिरीबाबत जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांना अवर सचिव सुनिल शिंदे आणि अपर मुख्य सचिव तसंच विकास आयुक्त डॉ. राजगोपाल देवरा यांच्याकडून प्रशस्ती पत्र देण्यात आलं आहे. नीति आयोगाचे मिशन संचालकांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात, नोव्हेंबर महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्यानं शैक्षणिक क्षेत्रात अव्वल स्थान मिळवलं असून तीन कोटी रुपये अतिरिक्त निधी मिळण्यास उस्मानाबाद जिल्हा पात्र ठरल्याचं म्हटलं आहे.
****
आज छत्रपती संभाजीनगर इथं स्व मग्न मुलांसाठी काम करणाऱ्या आरंभ या संस्थेच्या वतीनं आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या अनुषंगानं आरंभ सक्षम पुरस्कार देऊन महिलांचा गौरव करण्यात आला. यामध्ये चाळीसगाव इथं दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या स्वयंदीप संस्थेच्या संस्थापक मनिषा निकम, नाशिक इथं प्रबोधिनी दिव्यांग पुनर्वसन केंद्रातील शिक्षकेतर कर्मचारी सुजाता बलकवडे आणि दिव्यांग मुलांचं संगोपन करुन त्यांना सक्षम बनवणाऱ्या स्वाती रेवणकर यांना स्मृती चिन्ह, पाच हजार रुपये रोख आणि पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आलं. यावेळी बोलताना, स्व मग्न मुलांसाठी सहानुभूतीची नाही तर मदतीची गरज असल्याचं मत पोलीस उपायुक्त अपर्णा गित्ते यांनी व्यक्त केलं.
****
आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमि��्त आज जालना जिल्हा कृषी विभा��ाच्या वतीनं शहरातून मिलेट दौड काढण्यात आली. जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय ते गांधी चमन चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीत जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा कृषी अधिकारी भीमराव रणदिवे यांच्यासह जिल्हा प्रशासनातले अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. मानवी आहारात तृणधान्याचा समावेश अत्यंत महत्त्वाचा असून, या पिकांचं कमी होत असलेलं क्षेत्र वाढवणं गरजेचं असल्याचं जिल्हा कृषी अधिकारी रणदिवे यांनी रॅलीच्या समारोप प्रसंगी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितलं.
****
आज ४ मार्च हा दिवस राष्ट्रीय लाईनमन दिवस म्हणून साजरा केला जातो. छत्रपती संभाजीनगर इथं महावितरणतर्फे लाईनमन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. परिमंडल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात जनमित्रांचा गौरव करण्याबरोबरच विद्युत सुरक्षेची शपथ देण्यात आली.
राष्ट्रीय लाईनमन दिना निमित्त आज धुळे जिल्ह्यातल्या निजामपूर इथं आमदार मंजुळा गावित यांच्या हस्ते लाईनमन बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वीज ग्राहकांना तसंच कृषी पंपांचा विज पुरवठा सुरळीत सुरु रहावा यासाठी वेळ प्रसंगी आपला जीव धोक्यात घालून काम करणारे लाईनमन हे खरे वीज योध्दा आहेत असे गौरवोद्गार यावेळी आमदार गावीत यांनी काढले.
****
छत्रपती संभाजीनगर इथल्या वाळूज एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानसिंग रायासिंग घुनावत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं दहा हजार रुपये लाच घेताना रंगेहात पकडलं.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 13 March 2022 Time 1.00 to 1.05pm Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १३ मार्च २०२२ दुपारी १.०० वा. ****
पोलीस खात्यातील बदली प्रकरणावरून मुंबईत सायबर पोलिसांनी विरोधी पक्षनेते देंवेद्र फडवणीस यांची चौकशी सुरू केली आहे. यासाठी पोलिसांचं एक पथक फडणवीस यांच्या बंगल्यावर दाखल झालं आहे.
दरम्यान, फडणवीस यांना बजावलेल्या नोटीसनंतर आज सकाळपासून भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन सुरू केलं आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, सांगली, नागपूर, अकोला, नंदुरबार आदी जिल्ह्यात आंदोलन सुरू आहे.
****
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे दाऊद इब्राहिमचे माणूस असल्याचं वक्तव्य केल्याप्रकरणी माजी खासदार निलेश राणे आणि आमदार नितेश राणे यांच्याविरोधात मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात काल गुन्हा दाखल करण्यात आला. राणे बंधुच्या वक्तव्यामुळे पक्षाच्या अध्यक्षांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगत राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली त्यानंतर त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं १८० कोटी मात्रांचा टप्पा पार केला आहे. काल दिवसभरात २० लाख ३१ हजारांहून अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं.
दरम्यान, देशात काल नव्या तीन हजार ११६ कोरोना विषाणू बाधित रुग्णांची नोंद झाली, तर पाच हजारांहून जास्त रुग्ण या आजारातून बरे झाले. कोविड संसर्गातून बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ७१ शतांश टक्के इतका झाला आहे.
****
राज्यात काल आयोजित करण्यात आलेल्या या वर्षातील पहिल्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून एका दिवसात १५ लाख ५० हजारांहून जास्त प्रकरणे निकाली काढण्यात आली. या माध्यमातून वाहतूक विभागाला ६९ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशा��ुसार काल ३४ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे, तीन उच्च न्यायालय विधी सेवा समित्या आणि उपसमित्या तसंच ३०९ तालुका विधी सेवा समित्यांमध्ये राष्ट्रीय लोकअदालतींचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये एकूण ६९ लाख प्रकरणं ठेवण्यात आली होती. त्यापैकी १५ लाखांपेक्षा जास्त वाद दाखलपूर्व प्रकरणे, ५० लाखांपेक्षा जास्त प्रलंबित प्रकरणे आणि विशेष बैठकीमध्ये ७२ हजार ४८८ प्रकरणे निकाली काढण्यात आली.
****
कोल्हापूरच्या अंबाबाई आणि जोतिबा मंदिरात दर्शनासाठी असलेली ऑनलाईन बुकिंग-ई-पासची सक्ती रद्द करण्यात आली आहे. यामुळे आता भाविकांना नियमानुसार थेट दर्शन घेता येणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं सहा महिन्यापूर्वी कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ई-पासच्या माध्यमातून भाविकांना मंदिरात दर्शन देण्याचा निर्णय घेतला होता. आता कोविड निर्बंध हटवल्यानंतर ही सक्ती रद्द करण्याची मागणी भाविकांकडून केली जात होती.
****
सांगली जिल्ह्यात माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात १७३ आणि दुसऱ्या टप्प्यात १६३ आदर्श शाळा विकसीत करण्यात येणार आहेत. अशी माहिती जलसंपदामंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. इस्लामपूर इथं लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण आणि ई-लर्निंग डिजीटल स्टुडिओचे उद्घाटन पालकमंत्री पाटील आणि ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते काल झालं, त्यावेळी ते बोलत होते.
****
लातूर जिल्ह्यात किल्लारी पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचाऱ्यानं पोलीस ठाण्यातच स्वतःला बंदुकीतून गोळ्या झाडून आत्महत्या केली. काल रात्री ही घटना घडली. साहेब सावंत असं या कर्मचाऱ्याचं नाव आहे. पैशांच्या देवाण-घेवाणीच्या त्रासातून ही आत्महत्या त्यानं केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
****
जॉर्डन इथं सुरू असलेल्या आशियाई युवा आणि ज्युनियर मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय मुष्टियोद्धा वंशज आणि अमन सिंग बिश्त यांनी युवा पुरुषांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर आनंद यादव याने कांस्यपदक पटकावले आहे. या स्पर्धेतील महिला खेळाडूंच्या लढती आज होणार आहेत.
****
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 23 April 2020 Time 1.00 to 1.05pm
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – २३ एप्रिल २०२० दुपारी १.०० वा. **** कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत प्रत्येक कुटुंबाला किमान साडे सात हजार रुपये आणि विस्थापित कामगारांना भोजन निवास आणि आर्थिक सुरक्षा मिळणं आवश्यक असल्याचं, काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे. त्या आज काँग्रेस कार्यकारी समितीच्या दूरदृश्य प्रणाली द्वारे घेण्यात आलेल्या बैठकीत बोलत होत्या. कोरोनो विषाणू संसर्गाचं निदान करण्यासाठी होणाऱ्या चाचण्यांचं प्रमाण कमी असल्याची टीका गांधी यांनी केली. सध्या या चाचणी साहित्य संचाचा तुटवडा भासत असून, प्राप्त होणाऱ्या चाचणी संचांची गुणवत्ताही सुमार दर्जाची असल्याचं गांधी यांनी म्हटलं आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात बारा कोटी रोजगार संपुष्टात आले असून, आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यानं, बेरोजगारी वाढण्याची भीती गांधी यांनी वर्तवली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह पक्षाचे अनेक नेते या बैठकीत सहभागी झाले. कोविड - १९ चा सामना करण्यासाठी करण्यात आलेले लॉकडाउन यशस्वी ठरले आहे का ? याचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करावा असं, मनमोहन सिंग यावेळी म्हणाले. **** पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दूरदृष्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतींशी संवाद साधणार आहेत. एकीकृत ई ग्राम ��्वराज पोर्टल आणि मोबाईल ॲपचाही पंतप्रधान यावेळी प्रारंभ करतील. स्वामित्व योजनेलाही पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी सुरुवात करण्यात येणार आहे. दरम्यान, पंतप्रधान येत्या सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बैठक घेणार आहेत. कोविड - १९ च्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे. लॉकडाऊनच्या काळातली पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांसोबतची ही तिसरी बैठक आहे. **** केंद्रीय महिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकारांवर हल्ल्याच्या घटनांचा निषेध केला आहे. अशी घटना लोकशाहीच्या मुक्त विचारधारेला विरोधक ठरत असल्याचं, जावडेकर यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल रात्री एका खासगी वृत्तवाहिनीच्या मुख्य संपादकावर झालेल्या कथित हल्ला प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली असून, हल्लेखोरांना योग्य शिक्षा होईल, असं जावडेकर यांनी सांगितलं आहे. **** गेल्या चोवीस तासांत देशात कोरोना विषाणू संसर्ग झालेले एक हजार चारशे नऊ नवीन रूग्ण सापडले आहेत. यामुळे देशात एकूण रुग्णांची संख्या एकवीस हजार तीनशे त्र्याण्णव झाली आहे. यापैकी चार हजार दोनशे अठ्ठावन्न रूग्ण उपचारानंतर पूर्णपणे बरे झाले आहेत. तर सहाशे एक्यांऐशी जणांचा मृत्यू झाला आहे. **** आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी केंद्र सरकारनं काढलेल्या साथरोग नियंत्रण कायद्यातल्या सुधारणा अध्यादेशाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. या अध्यादेशात अशा अपराधासाठी आर्थिक दंड तसंच कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, आरोग्य कर्मचऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने घेतलेल्या या निर्णयाचं, भारतीय वैद्यक संघटनेचे अध्यक्ष डॉ राजन शर्मा यांनी स्वागत केलं आहे. **** औरंगाबाद इथे संचारबंदी आदेशाचं उल्लंघन केल्याप्रकरणी विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विनापरवाना दुकान उघडून मनाई आदेशाचं उल्लंघन केल्याबद्दल दोन दुकानदाराविरोधात तर तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याबद्दल एका दुकानदारावर कारवाई करण्यात आली. मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी विनाकारण फिरणाऱ्या पाच जणांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. एका महिलेच्या अंत्यविधीला परवानगीशिवाय वीस पेक्षा अधिक लोक उपस्थित राहिल्याबद्दल सुमारे पन्नास जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. **** परभणी जिल्ह्यात काल रात्री पासून लागू करण्यात आलेल्या संचार बंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. पहाटे पासूनच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्यानं, रस्त्यावर शुकशुकाट जाणवत असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर उपचार आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अनेक नाग��िक तसंच संस्था मदत देत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा तालुक्यातल्या मुरूम इथल्या माऊली सहकारी नागरी पतसंस्थेनं मुख्यमंत्री सहाय्यता निधीला एकवीस हजार रूपयांची मदत दिली. **** पालघर इथं झालेल्या तिहेरी हत्यांकांड प्रकरणाची चौकशी सी आय डी- केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागामार्फत सुरू असुन यांच्या पथकानं घटनास्थळाची आज पाहणी केली. या घटनेतील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला जात आहे. दरम्यान, गडचिंचले गावच्या सरपंच चित्रा चौधरी यांनी पोलीस संरक्षणांची मागणी केली आहे. ****
0 notes
Text
छत्तीसगढ; धमतरी: विधायक रँजना साहू ने ग्राम तरसीवा में सामुदायिक भवन का भूमिपूजन क���या।
सैयद जावेद हुसैन : ग्राम तरसीवा में विधायक रँजना साहू की अनुसंशा से स्वीकृत 6.50 लाख के सामुदायिक भवन आदिवासी पारा में भूमिपूजन कार्यक्रम सम्पन्न हुआ।
जिसमें मुख्य अतिथि विधायक रँजना डीपेंद्र साहू, अध्यक्षता नेमलाल साहू व विशिष्ट अतिथि बहुर सिंग ध्रुव, सरपंच दीपेश्वरी साहू अनिता यादव, राकेश नेताम रहे।
कार्यक्रम का शुभारंभ बूढ़ादेव मंदिर में पूजा अर्चना कर किया तद्पश्चात भूमिपूजन का…
View On WordPress
0 notes