#‘भाऊ
Explore tagged Tumblr posts
Text
0 notes
Text
मेघे ढाका तारा(মেঘে ঢাকা তারা) - A cloud clapped star.(१९६० )
सत्यजित रे, मृणाल सेन आणि ऋत्विक घटक या साधारण समकालीन असणाऱ्या महान बंगाली दिग्दर्शक त्रयीमधल्या ऋत्विक घटक या प्रतिभावान बंगाली दिग्दर्शकाचा "मेघे ढाका तारा" (१९६०) हा अत्यंत वास्तवदर्शी, मनाला चटका लावून जाणारा,अनेक कौटुंबिक, सामाजिक विषयांना हात घालणारा Partition Trilogy(मेघे ढाका तारा, कोमल गंधार, सुवर्णरेखा) मधला पहिला चित्रपट. ऋत्विक घटक यांनी स्वतः १९४३ सालचा दुष्काळ आणि फाळणी अनुभवल्यामुळे साहजिकच त्याचा प्रभाव या चित्रपटावर आहे. किंबहुना त्याच पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक घडते.
चित्रपटाची सुरुवात कलकत्त्या जवळच्या गावात नदीकाठच्या रस्त्यावरून पायी चालत जाणाऱ्या निता (सुप्रिया देवी) नावाच्या नायिकेच्या दृश्याने होते. निता कामावरून घरी जाताना नदीकाठी बसलेल्या तरुणाचं मन प्रसन्न करणारं शास्त्रीय गाणं ऐकते.
पुढे गावातून किराणा मालाच्या दुकानासमोरून चालत जात असताना दुकानदार तिला हाक मारून उधार चुकता करण्याची आठवण करून देतो. त्यानंतर चालत घराकडे जात असता, रस्त्याच्या पुढच्या वळणावर तिची जीर्ण झालेली चप्पल तुटते, त्यामुळे ती क्षणभर थांबते पण परत त्याकडे दुर्लक्ष करून चालू लागते. या आणि पुढील काही दृश्यांवरून तिची आणि एकूणच तिच्या कुटुंबाच्या बेतास बात आर्थिक परिस्थितीची जाणीव होते.
पुढे ती घरी पोहोचायच्या आधी,तिच्या घरात घडणाऱ्या दृश्यामध्ये तिचे वडील तिच्या आईकडे तिच्या भविष्याची, लग्नाची चिंता व्यक्त करतात. पण आई मात्र त्याकडे दुर्लक्ष करते कारण निता ही त्या घरातली एकटीच कमावती व्यक्ती आहे. तिचं जर लग्न लावून दिलं तर खाणार काय? असा खरंतर स्वार्थी प्रश्न तिच्या मनात असतो.(आई वडील सुद्धा परिस्थितीमुळे किंवा अन्य कारणांनी स्वार्थीपणाने वागू शकतात. चित्रपट बघताना अकबर- बिरबलाची गोष्ट आठवते.गरज पडल्यास, तलावात पाण्याची पातळी वाढू लागली की माकड तिच्या पिल्लाचा स्वतःच्या जीवाचे रक्षण करण्यासाठी, त्याला पायाखाली ठेवून कसा उपयोग करते)
साधारण कनिष्ठ मध्यमवर्गीय बंगाली कुटुंब जे फाळणीमुळे पूर्व बंगाल मधून विस्थापित होऊन पश्चिम बंगाल मध्ये कलकत्त्याजवळच्या स्थलांतरितांच्या गावात राहत आहे. वडील शिक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. घराला हातभार म्हणून गावात गरीब मुलांच्या शिकवण्या घेतात ज्यातून फार काही मिळत नाही आणि पुढे अपघातामुळे तेही बंद होतं. दोन धाकटी भावंडं मंटु (द्विजू भवाल), गीता (गीता घटक जी ऋत्विक यांची पु��णी देखील आहे) आणि एक थोरला भाऊ शंकर(अनिल चॅटर्जी ) म्हणजे तो नदीकाठी गाणं गाणारा तरुण ज्याचं गाणं ऐकण्यासाठी ती क्षणभर थांबली होती.
ती घरी आल्यावर लक्षात येतं की महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तिचा पगार झाला आहे. त्यामुळे घरातले सगळे जण तिच्याभोवती तिची खुशामत करत अपेक्षेने घुटमळत असतात. ती देखील धाकट्या भावंडांवरच्या ममतेपोटी काही ना काही प्रत्येकाच्या हातावर ठेवते. गाणं शिकणारा थोरला भाऊ शंकर हा देखील काही कमावत नाही. त्याचं म्हणणं आहे की गाणं पक्क झाल्याशिवाय मी कमावणार नाही. त्यामुळे घरात त्याला काही किंमत नाही. त्याला मात्र तिच्याबद्दल खरंच आपुलकी,प्रेम वाटतं, तो प्रेमाने तिला खुकी म्हणून हाक मारतो. तिचं देखील त्याच्यावर विशेष प्रेम आहे हे त्यांच्यात घडणाऱ्या प्रसंगातून दिसून येतं,ज्यात तिला आलेल्या प्रेमपत्रावरून चेष्टा मस्करी होताना दिसते. पण त्याचं प्रेम असून सुद्धा तो तिची अगतिकता, होणारी ओढाताण समजू शकत नाही. गाणं पक्क शिकून झाल्याशिवाय त्याला पैसे कमवायचे नाहीत.त्यांच्या बोलण्यातून असं देखील समजतं की आर्थिक तंगीमुळे तिला गाणं सोडावं लागलं.आई मात्र तिच्या या वागण्याबद्दल सारखी कुरबुर करत असते की असे पैसे वाटल्यामुळे घर खर्चाला पैसे कमी राहतात. त्यावर राहिलेला जवळपास सगळा पगार ती घरात खर्चासाठी म्हणून आईला देते. थोरला भाऊ शंकरकडे न्हाव्याकडे जाऊन दाढी करण्यासाठी सुद्धा पैसे नसतात, मग उरलेसुरले पैसे देखील ती त्याला देते.
थोड्या वेळाने दुपारी तिचा प्रियकर सनत (निरंजन रे) जो तिच्या वडिलांचा पूर्वीचा विद्यार्थी देखील आहे, तिला घरी भेटायला येतो. तेव्हा लक्षात येतं की ती नोकरी करता करता पीएचडी चा अभ्यास देखील करत आहे. तो देखील तिच्याबरोबर पीएचडी करत असला तरी शक्य असून कमावत नाही. त्यामुळे तो सुद्धा असतील तर काही पैसे दे म्हणून मागणी करतो. आणि लग्नाच्या विषयावर चर्चा करू पाहतो. पण घरातल्या सर्व जबाबदाऱ्यांमुळे तिचा कल साधारण ते लांबणीवर टाकण्याचा असतो. या दोघांचं आत काय बोलणं चालू आहे याकडे आईचं बारीक लक्ष असतं, त्यातून हीने लग्न केलं तर आपलं काय, ही भीती तिच्या चेहऱ्यावर जाणवते. निता जेव्हा त्याच्यासोबत बोलत असते तेव्हा आईने सांगितल्यानंतर गीता त्याला चहा आणून देते.दिसायला थोडी उजवी असलेली, पण शिक्षणाचे फारसे गम्य नसलेली गीता त्याच्यासमोर उगाचच तारुण्यसुलभ चंचलता दाखवते आणि त्याच्याशी उगाच काहीतरी बोलायचं म्हणून बोलते,त्याच्याशी Flirt करते. तो सुद्धा तिच्याकडे वळून, जरा जास्तच बारकाईने आणि उत्सुकतेने पाहत राहतो. तिला लग्न करण्याची घाई झालेली आहे हे ती नंतर एकदा आईला बोलून देखील दाखवते आणि आईचा सुद्धा या गोष्टीला पाठिंबा असतो. गीता निताला एकदा असं सुचवते देखील की लवकर लग्न कर,नाहीतर पुरुषांचं काही खरं नाही, कधी कोण आवडेल आणि कोणाबरोबर निघून जातील सांगता येत नाही! नंतरच्या एका प्रसंगात निता कामामुळे बाहेर गेलेली असताना सनत घरी येतो, त्यावेळी गीता त्याच्याशी गप्पा मारते आणि तिथून त्यांचंच लफडं सुरू होतं!
महाविद्यालयात शिकणारा धाकटा भाऊ मंटूला खेळामध्ये रस आहे म्हणून त्याला देखील ती आर्थिक मदत करते. त्याला पारितोषिक मिळतं, घरात सर्वजण त्याचं कौतुक करतात. त्यामुळे त्याला जवळच्या कारखान्यात नोकरी लागते, पैसे मिळून आपल्या मनासारखं जगता येईल म्हणून तो वडिलांच्या इच्छेविरुद्ध शिक्षण अर्धवट सोडून नोकरी पकडतो आणि हळूहळू घरातला त्याचा वावर कमी होतो. वडील खरंतर Shelly आणि Keats च्या कविता उद्धृत करून स्वतःला आधुनिक म्हणवत असले तरी मुलाने कारखान्यात काम करणं हे काही त्यांना रुचलेलं नाही यातून त्यांची Bourgeoise मानसिकता दिसून येते. मंटू बाहेर मित्रांसोबत, नवीन प्रेयसी सोबत मुक्त राहता फिरता यावं यासाठी कारखान्या जवळ खोली घेऊन राहातो आणि घरी खर्चाला पैसे देण्यास मात्र नकार देतो.या सगळ्यात घरात होणाऱ्या अपमानांस कंटाळून शंकर गाणं शिकून,त्यात करीअर करण्यासाठी घर सोडून निघून जातो. त्यामुळे निता अजूनच एकटी पडते.
या सगळ्या जबाबदाऱ्या पेलताना निता स्वतःसाठी जगायचं जणू विसरून गेली आहे. सर्वांचं करता करता, तिच्याकडे तिच्यासाठी कधी काही शिल्लकच राहत नाही.शंकर आणि तिचं लहानपणापासून शिलाँग जवळच्या सुंदर टेकडीवर सहलीला जायचं स्वप्न होतं ते देखील अनेकदा ठरवून तिला पूर्ण करायला जमत नाही.
वडिलांचं आजारपण, घरखर्च हे सगळं निभावताना तिची पीएचडी तिला मधूनच अर्धवट सोडावी लागते. पण निता कधीही तक्रारीचा सूर लावत नाही. सनत देखील हल्ली फारसा भेटायला येत नाही असं तिच्या लक्षात येतं म्हणून ती त्याच्या खोलीवर जाते तर तिला तिथे समजतं की पीएचडी पूर्ण करून मगच नोकरी करणार असं म्हणणाऱ्या त्याने चक्क नोकरी पकडली आहे आणि खोलीसुद्धा बदलली आहे. नवीन खोलीवर गेल्यावर तिला लक्षात येतं की आपल्या बहिणीबरोबरच आता त्याचं प्रेमप्रकरण चालू आहे. आणि ते दोघं लवकरच लग्न करणार आहेत. त्यानुसार गीताचं लग्न होतं. त्यात देखील ��ई तिच्यासाठी ठेवलेले दागिने गीताला देते. निता हे सगळं मूकपणे सहन करते.
एक दिवस कारखान्यात मंटूचा अपघात झाल्याची तार येते. मग त्यासाठी तिची धावपळ होते.पैशाची मदत मागावी म्हणून ती सनतकडे जाते तिथे बाहेर गेलेली गीता परत घरी आल्यावर दोघांना एकत्र बघून तिच्यावरच व्यभिचाराचा आळ घेते .अशा एकामागोमाग एक बसणाऱ्या धक्क्यामुळे ती आतून तुटत जाते पण तरीही आपल्या जबाबदाऱ्या पार पाडत, सोसत राहते. यासगळ्या घटनांत तिचं स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होतं. तिचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य ढासळतं. तिला क्षयरोग झाल्याचं समजतं पण गीताच्या बाळंतपणामुळे आणि एकूणच आलेलं नैराश्य यामुळे ती त्याकडे दुर्लक्ष करते आणि स्वतःच घराच्या कोपऱ्यात एका बारक्या खोलीत राहू लागते किंवा तिला तिथे ठेवलं जातं.
अशात शंकर मुंबईला जाऊन एक यशस्वी गायक बनून परत येतो. परत आल्यावर घरात, गावात जिथे पदोपदी जिथे त्याचा अपमान केला जात होता तिथे सगळेजण त्याला मान देऊ लागतात, त्याची स्तुति करू लागतात. एकप्रकारे तो स्वतःचं म्हणणं "माझ्या हुशारीची सध्या कोणाला कदर नसली तरी वर्षा दोन वर्षात भरपूर पैसे आणि नाव कमाविन" हे खरं करून दाखवतो. घरी आल्यावर तो तिची स्थिति बघून तिला लगेच उपचारासाठी घेऊन जातो. तिला शिलाँगच्या निसर्गरम्य टेकड्यांवरील चांगल्या इस्पितळात उपचारासाठी ठेवतो.अशा तऱ्हेने तिचं स्वप्न पूर्ण व्हावं हा एक दैवदुर्विलास! तो तिला तिथे भेटायला गेल्यावर तिच्या दुःखाचा बांध फुटतो, तिचा आक्रोश आपल्यालाही प्रेक्षक म्हणून असह्य होतो. तिथेच त्याच्या मिठीत तिचा मृत्यू होतो.
संपूर्ण चित्रपटात एक गोष्ट जाणवत राहते ती म्हणजे प्रेम म्हणजे नक्की काय ? कुटुंबासाठी ,मित्रांसाठी त्यातून आपल्याला समाधान मिळत नसेल किंबहुना त्रासच होत असेल तरी देखील त्याग करणे किंवा त्याग करत राहणे याला प्रेम म्हणावे का? आणि निताने त्या सर्वाना मदत करून काय साधलं? खरं म्हणजे त्या सर्वाना वेळीच चार खडे बोल सुनावून तुम्ही सगळे सज्ञान आहात, तुम्हाला पोसण्याची जबाबदारी आता माझी नाही. तुमचे तुम्ही स्वतंत्र व्हा हे सांगण्यात तिचं स्वतःचं आणि तिच्या कुटुंबियांचंही हित नव्हतं का? म्हणजे केवळ वासनेच्या आहारी जाऊन बहीण, आईच्या संमतीने तिच्या प्रियकरासोबत भानगडी करत असताना यात स्वतःचं, बहिणीचं आणि सनतचं अंतिमतः नुक���ान होणार हे दिसत असून ती विरोध का करत नाही?आणि याची प्रचिती लगेचच येते. बहीण जेव्हा तिच्यावर आळ घेते तेव्हा सनतच्या चेहऱ्यावर ज्या भावना दिसतात ते पाहता तो त्या लग्नात समाधानी नाही हे लगेच समजून येतं. नंतर जेव्हा सनत लग्न झाल्यावर एकदा तिच्याशी नदीकाठी बसून बोलतो आणि तिला पुन्हा प्रेमाबद्दल, नवीन सुरुवात करण्याबद्दल विचारतो तेव्हा ती त्याला नाही म्हणते आणि स्वतः हे मान्य करते की योग्य वेळी मी चुकीच्या व अन्यायकारक गोष्टींना विरोध केला नाही त्याचं फळ म्हणजे माझी आजची स्थिति आहे आणि निघून जाते. पण या सगळ्यात ती, सनत आणि तिची बहीण तिघेही असमाधानीच राहतात.
निता तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध का करत नाही? घरातला उत्पन्नाचा प्रमुख स्रोत तीच आहे. तिला हे सहज शक्य होतं की सगळ्यांना धुडकावून लावून बुद्धीला जे योग्य वाटेल ते करणे.
खरं तर प्रेमाच्या आणि वागण्या-बोलण्याच्या रीतींबद्दल अशा काही विचित्र कल्पना आपल्या समाजाने आपल्या मनात, विशेषतः स्त्रियांच्या मनांत भरून ठेवलेल्या आहेत की याहून वेगळं काही आयुष्य असू शकतं असा विचारच बऱ्याचदा आपल्याकडून केला जात नाही. बऱ्याचदा आपण एखादया बद्दल वाटणाऱ्या आकर्षणाला,घरातल्यांबद्दल वाटणाऱ्या ममतेला किंवा प्रेमापेक्षा प्रेमाच्या प्रतिकांनाच प्रेम समजून बसतो.प्रेम म्हणजे प्रत्येकाला स्वतंत्रपणे, मुक्तपणे स्वतःच्या सद्सद्विवेक बुद्धीला जे पटेल त्यानुसार वागून आपलं आणि पर्यायाने इतरांचं, समाजाचं हित साधता येण्याचं स्वातंत्र्य.आपल्या उच्चतम संभावनेला गवसणी घालण्याचं स्वातंत्र्य,ज्यामध्ये आपलं हित आहे.मग त्यासाठी पडतील ते कष्ट करून त्या दिशेने काम करणं, त्यासाठी लागणारं वातावरण दुसऱ्यालाही देणं म्हणजेच प्रेमपूर्ण असणं.जेव्हा इतर कोणी तुम्हाला किंवा तुम्ही इतर कोणाला, त्या उच्चतम संभावनेला गवसणी घालावी म्हणून निःस्पृह पणे मदत करता, तेव्हा ते प्रेम उच्चतम, उन्नत,अध्यात्मिक पातळी गाठतं किंबहुना तेव्हाच त्याला प्रेम म्हणतात.
निता जेव्हा घरातल्यांची विशेषतः भावंडांची, स्वतः काम करून कमावण्याची क्षमता असताना देखील त्यांना मदत करत राहते तेव्हा ती एक प्रकारे त्यांना त्यांच्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचण्यापासून रोखत असते, परावलंबी बनवत असते. आणि असं करताना ती स्वतःवर सुद्धा अन्याय करते कारण त्यांना मदत करण्यात अडकून राहील्या मुळे ती स्वतः सुद्धा त्या उच्चतम संभावनेपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा त्या दृष्टीने वाटचाल करू शकत नाही.एखाद्या ताऱ्या प्रमाणे चमकण्याची क्षमता असून सुद्धा जणू ढगांनी वेढून, आच्छादून राहिल्यामुळे ती चमक कोणालाच दिसू शकली नाही.तिने जर योग्य वेळीच चार खडे बोल तिच्या भावंडांना आणि आईला सुनावले असते तर या सर्व अन्यायकारक घटना ती रोखू शकली असती.
असा हा प्रेम,कुटुंबव्यवस्था,स्त्रीचे समाजातील स्थान, स्त्रीवाद,नातेसंबंध,फाळणी आणि तिचे परिणाम,गरिबी, त्यातून निर्माण होणारे ताण-तणाव, त्याचे नात्यांवर होणारे परिणाम अशा विविध मुद्द्यांचा धांडोळा घेणारा, जीवनाकडे अधिक सजगपणे आणि सखोलपणे बघायला शिकवणारा अत्यंत सुंदर चित्रपट.
चित्रपटातील फ्रेम्स (विशेषतः नदीकाठच्या क्षितिजाच्या पार्श्व भूमीवर धूर सोडत, आवाज करत निघालेली रेल्वे, किंवा शिलोंगच्या निसर्गरम्य टेकड्यांच्या पार्श्वभूमीवर घडणारे शेवटचे दृश्य) मधून ऋत्विक घटक यांचं दिग्दर्शक, कथाकार म्हणून वेगळेपण जाणवत राहतं. चित्रपटाचे पार्श्व-संगीत (ज्योतींद्र मोईत्रा) फारच प्रभावी ठरलं आहे.त्यात केलेला शास्त्रीय संगीताचा वापर विशेष लक्षात राहतो. सुप्रिया देवी या अभिनेत्रीने निताचे काम फारच सुरेख केलं आहे. तिच्यावर होणाऱ्या मानसिक आघातांच्या पार्श्व-भूमीवर येणारा चाबकाचा आवाज यामुळे त्या फ्रेम्स विशेष लक्षात राहतात. एकूणच बराच वेळ हा चित्रपट आपल्या मनात घर करून रेंगाळत राहतो.
अनेक चित्रपट समीक्षकांनी या चित्रपटाला शतकातल्या सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक असं म्हटलं आहे. मार्टिन स्कॉर्सीसी सारख्या विख्यात दिग्दर्शकाने सुद्धा घटक यांच्या चित्रपटांना नावाजलं आहे. तेव्हा नक्की पाहावा असा Must Watch Category मधला हा चित्रपट.
~ चैतन्य कुलकर्णी
2 notes
·
View notes
Text
#मुहर्रमपर_अल्लाहकबीर_कासंदेश
पापांची क्षमा होईल का?
मुसलमान कुरआन
अधिक माहितीसाठी वाचा "मुसलमानांना नाही समजले ज्ञान कुराण..!
मुसलमानांना नाही समजलं ज्ञान कुराण पुस्तक मोफत
कुरआन
मागविण्यासाठी तुमच नाव, मोबाईल नं. पत्ता पाठवा +91 9812238507 +91 9992600852
सूचनाः हे पवित्र पुस्तक केवळ हिंदी भा��ेत उपलब्ध आहे आणि हे पवित्र पुस्तक केवळ मुसलमान भाऊ आणि बहिणीसाठी आहे.
Baakhabar Sant Rampal Ji
2 notes
·
View notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date - 13 January 2025
Time 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक १३ जानेवारी २०२५ दुपारी १.०० वा.
****
महाकुंभमेळ्याला आजपासून उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं सुरुवात झाली. आजपासून म्हणजे पौष पौर्णिमेपासून सुरु झालेला कुंभमेळा पुढचे ४५ दिवस म्हणजे महाशिवरात्रीपर्यंत सुरु राहणार आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती नदीच्या पवित्र त्रिवेणी संगमात आज पहिलं स्नान झालं. महाकुंभमेळ्याची सुरुवात झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय मुल्ये आणि संस्कृतिची जोपासना करणार्या करोडो भारतीयांसाठी हा एक विशेष दिवस असल्याचं, त्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
****
दरम्यान, पंतप्रधान मोदी येत्या १९ तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाचा हा ११८ वा भाग असेल. या कार्यक्रमासाठी नागरीकांनी आपल्या सूचना आणि विचार १७ तारखेपर्यंत एक आठ शून्य शून्य एक एक सात आठ शून्य शून्य या नि:शुल्क क्रमांकावर, मायजीओव्ही ओपन फोरमवर किंवा नमो ॲप वर नोंदवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. या महिन्याच्या शेवटच्या रविवारी २६ तारखेला प्रजासत्ताक दिन असल्यामुळे हा कार्यक्रम १९ तारखेला होत आहे.
****
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी जनतेला आज साजऱ्या होणाऱ्या लोहरी आणि उद्या साजऱ्या होणाऱ्या मकर संक्रांत, पोंगल आणि माघ बिहू या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
हे सण देशाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं प्रतिक आहे, प्रत्येकाच्या जीवनात ते उत्साह आणि आनंद घेऊन येतात, असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. देशाचं प��षण करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दलही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
****
नाशिक शहरात मुंबई- आग्रा महामार्गावर काल झालेल्या अपघातात सहा जण ठार तर दहा जण गंभीर जखमी झाले. काल संध्याकाळी साडेसात वाजता द्वारका परिसरातल्या उड्डाणपुलावरून जाणारा टेम्पो पुढे लोखंडी सळया घेऊन जाणाऱ्या मालट्रकवर आदळल्यामुळे हा अपघात झाला. निफाड तालुक्यातल्या धारणगावहून धार्मिक कार्यक्रमावरून नाशिकला परतणाऱ्या या टेंपोमधल्या भाविकांच्या शरीरात सळ्या घुसल्या असून, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ठार झालेले सर्वजण नाशिक शहरातले रहिवासी होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. अपघातातल्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये आर्थिक सहाय्य देण्यात येईल आणि जखमींचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल, असंही मुख्यमंत्र्यांनी सामाजिक संपर्क माध्यमावरच्या संदेशात सांगितलं.
मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक मध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली.
****
नागपूर इथं आजपासून तीन दिवसीय राज्यस्तरीय मराठी भाषाप्रेमी शैक्षणिक साहित्य संमेलनाचं उद्घाटन झालं. यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेते अंकुश चौधरी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, यांच्यासह अनेक साहित्यिक, लेखक यवेळी उपस्थित होते. या संमेलनात विविध सत्रांमध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
****
बीड जिल्ह्यातल्या मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या वाल्मिक कराड विरोधात मकोका अंतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी, संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आज पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरु केलं आहे. या आंदोलनात गावकरी सहभागी झाले आहेत. या प्रकरणाला ३३ दिवस झाले तरी देखील दोषींना अजुनही शिक्षा झाली नसल्यामुळे गावकऱ्यांनी तपास यंत्रणेवर संशय व्यक्त केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
नांदेडमध्ये बावरीनगर इथं अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेला आज धम्म ध्वजारोहणाने प्रारंभ झाला. या परिषदेत आज दुपारी महात्मा ज्योतिबा फुले पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत धम्मयान संचलन करण्यात येणार आहे. उद्यापर्यंत चालणाऱ्या या परिषदेत धम्म देसना, सामुहिक विवाह सोहळा, व्यसन मुक्ती प्रतिज्ञा, धम्म ज्ञान परीक्षा प्रमाणपत्र वितरण आदी कार्यक्रम होणार आहेत.
****
लातूर इथं आज विवेकानंद संस्कार संस्थेच्यावतीनं वि��्यार्थी - पालक स्नेह मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातले विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थी विकास योजना आणि सेवा सहयोग फाउंडेशन यांच्यावतीने गेल्या वर्षात २३ राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशातल्या ८९७ विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करण्यात आली, या योजनेचा लाभ मिळालेल्या विद्यार्थी आणि पालकांसाठी हा मेळावा घेण्यात आला.
****
नवी दिल्लीत आजपासून पहिल्या खो-खो विश्वचषक क्रीडा स्पर्धा रंगणार आहेत. १९ जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत २३ देशांचे ३९ संघ सहभागी होत आहेत. भारताच्या पुरुष संघाचं नेतृत्व प्रतीक वायकर तर महिला संघाचं नेतृत्व बीड जिल्ह्यातली प्रियंका इंगळे करत आहे.
****
0 notes
Text
आणि अखेर ‘ ते ‘ पालवे बंधू दोन वर्षांसाठी चार जिल्ह्यातून तडीपार
आणि अखेर ‘ ते ‘ पालवे बंधू दोन वर्षांसाठी चार जिल्ह्यातून तडीपार
पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी किसन पालवे आणि त्यांचे चुलत भाऊ शहादेव भानुदास पालवे ( दोघेही राहणार कोल्हार तालुका पाथर्डी ) यांना दोन वर्षांसाठी तब्बल चार जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर , नाशिक, पुणे आणि बीड जिल्ह्यातून त्यांना हद्दपार करण्यात आलेले असून पाथर्डीचे उपविभागीय दंडाधिकारी प्रसाद मते यांनी हा आदेश काढलेला आहे. सह्याद्री छावा संघटनेचे प्रदेश…
0 notes
Text
सामना ने मुख्यमंत्री देवेन्द्र फड़णवीस की प्रशंसा की, पवार आपस में मतभेद दूर करेंगे; महाराष्ट्र में क्या हो रहा है? - महाराष्ट्र समाचार
महाराष्ट्र के राजनीतिक माहौल में उथल-पुथल के एक महीने बाद, तनाव कम होता दिख रहा है और पिघलने के स्पष्ट संकेत दिख रहे हैं। एनसीपी में कई दिनों से चल रही सुलह की मांग के बाद, शिवसेना (यूबीटी) के मुखपत्र सामना ने महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेन्द्र फड़णवीस की प्रशंसा की और राज्य में नक्सलियों को खत्म करने की कोशिश के लिए हार्दिक “बधाई देवा भाऊ” की पेशकश की। क्या महाराष्ट्र में कुछ बदल रहा है…
0 notes
Text
मातोश्री में मीटिंग में संजय राउत के साथ हुई बदसलूकी, धकियाते हुए कमरे में किया बंद; सोशल मीडिया पर वायरल हुए दावे
Maharashtra News: सोशल मीडिया में शिवसेना (यूबीटी) के राज्यसभा सांसद और वरिष्ठ नेता संजय राउत से कथित बदसलूकी की खबरें चल रही हैं। रिपोर्टस के अनुसार, 26 दिसंबर को उद्धव ठाकरे के निवास मातोश्री में यूबीटी कार्यकर्ताओं की मीटिंग में गुस्साए कार्यकर्ताओं ने न सिर्फ राउत पर हमला किया, बल्कि धकियाते हुए एक कमरे में ले गए और उन्हें बंद भी कर दिया। वरिष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर के पर्सनल ब्लॉग में यह…
0 notes
Text
आज मैं महाराष्ट्र कांग्रेस के माननीय अध्यक्ष श्री नाना भाऊ पटोले जी के साकोली, नागपुर स्थित निवास पर गया। हाल ही में उनकी पूजनीय माता जी का स्वर्गवास हो गया था। उनके प्रति अपनी श्रद्धांजलि अर्पित की और इस कठिन समय में संवेदनाएं व्यक्त की।
| #SureshShyamlalGupta | #NanaPatole |
@bollywood @hollywood @aicwaofficial
0 notes
Text
Day✍️1521
+91/CG10☛In Home ☛26/12/24 (Thu)☛20:03
लम्बा समय बाद आज ऑफिस गया था ,ऐसा लगा मानो अब ऑफिस में मेरी जरूरत नहीं है या ऑफिस की मुझे जरूरत नहीं है ,समय की मांग है कि मै वहां से कुच कर जाऊ और अपना स्वयं का बिज़नेस स्टार्ट करू | मन में टिस उठता है ,खुद का पहचान हो ,जैसे कि पुष्पा भाऊ ने अपने दम पर बनाई थी 😂🥰
आज छोटी बेटू ने पहली बार नहाई है ........😘
कुछ फोटो 22 तारिख की जब ख़मदाई मदिर माता जी की दर्शन करने गए थे
ओके गुड
नाईट
0 notes
Text
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दिवंगत संतोष देशमुख यांच्या परिवाराचे सांत्वन - महासंवाद
बीड दि. २१ (जिमाका) : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा होईल या दृष्टिकोनातून शासन काम करीत आहे. याप्रकरणी दोषी व्यक्तींना फाशी दिली जाईल यासाठी मी स्वतः या प्रकरणात पूर्ण लक्ष देणार आहे, अशी ग्वाही देतो असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. मस्साजोग येथे देशमुख कुटुंबियांच्या सांत्वन भेटप्रसंगी ते बोलत होते. दिवंगत देशमुख यांची पत्नी, मुलगी तसेच भाऊ धनंजय…
View On WordPress
0 notes
Text
ll वानप्रस्थ ll : १५
संध्याकाळच्या पायीं फेरफटक्यासाठी अनंतसोबत जा��्याचं शुभदानं मुद्दाम यासाठी टाळलं होतं की तो फिरुन परत येईपर्यंत मधल्या तासा-दीड तासांत, तिला उद्यां तांतडीने आणायच्या किराणामालाची यादी हातावेगळी करायची होती! विशेषत: दिवाळीचा फराळ बनविण्यासाठी ते आवश्यक होतं! घरांत काय चीज-वस्तु आहेत त्याचा धांडोळा घेतल्यावर ती कागद आणि पेन घेऊन यादी लिहूं लागणार, एवढ्यांत डोअरबेल वाजली! 'आतां कोण बरं आलं असावं?' असा विचार करीत तिनं दार उघडलं तर पावसांत नखशिखांत चिंब भिजून, निथळत असलेला अनंत दाराबाहेर उभा! "अहो, एवढे कसे भिजलात? छत्री घेऊन गेला नव्हता कां?" या तिच्या प्रश्नावर जोरदार पावसांत दुर्दशा होऊन मान टाकलेली छत्री तिच्यासमोर नाचवीत अनंत सस्मित म्हणाला, "इंदिराबाईंनी पावसाला 'घर माझं चंद्रमौळी' म्हणून अवेळी धिंगाणा न घालण्यासाठी विनवलं होतं! पण इथं तर साक्षात् माझी छत्रीच चंद्रमौळी निघाली! ती कसली या एवढ्या जोरदार पावसाच्या धिंगाण्यापुढे टिकाव धरणार!"
"काय बाई तरी या पावसानं छळ मांडलाय् यंदा! दिवाळी आठवड्यावर आली तरी दारी बसलेल्या लोचट कुत्र्यासारखा किती हाकलला तरी जातां जात नाहींये!" लगबगीने मोठा टाॅवेल कपाटातून काढीत शुभदा म्हणाली, "आधी अंग कोरडं करून कपडे बदला! डोक्यावरचं ते केसांचं जंगल नीट पुसा! ऐन दिवाळीत उगीच सर्दी व्हायला नको!" "या पावसानं छत्री मोडून टाकल्यामुळे अर्ध्या रस्त्यातून परत फिरावं लागल्याने, तूं सांगितलेली भाजी मात्र आणतां आली नाहीं!" "त्याचं कांही अडलेलं नाहीं! तुम्ही अंग आणि केस कोरडे करुन कपडे बदलेपर्यंत मी भरपूर आलं घालून चहा करते!" पुढील १५ मिनिटांत अनंत तयार होऊन डायनिंग टेबलापाशी येऊन बसला तेव्हां शुभदा चहा गाळीत होती! वाफाळत्या गरमागरम चहाचा कप हाती घेत अनंत मिस्कीलपणे म्हणाला,"सारखा-सारखा कितींदा चहा हवा असतो हो तुम्हांला?' असं नाराज होत बोलण्याऐवजी तूं प्रेमाने असा गरमागरम चहा देणार असशील तर पावसांत रोजच भिजायला मी तय्यार आहे!"
"थट्टा पुरे!" त्याला दटावीत शुभदा म्हणाली, "पमाताईंचा मेसेज आला आहे की त्या रात्री आपल्याला सोयीस्कर असेल अशा वेळीं फोन करणार आहेत;-- भाऊबीजेचा एकुण सगळा बेत ठरविण्याविषयीं!" "अरे हो;-यंदा भाऊबीज तिच्याकडे ठरली आहे ना! मग तिच्या उत्साहाला कसं उधाण येईल बघ!" अनंत आठवण होऊन पुढे म्हणाला, " यंदा पावसाचा धुमाकूळ पाहून किती बरं वाटतंय् की भाऊबीजेला पावसा-पाण्यांतून मीनाताईकडे पनवेलला किंवा अंजूकडे ठाण्याला जायचं नाहींये! उलट सगळ्यांची पमाताईकडे येतांना कशी तारांबळ उडते ते बघायला जाम मजा वाटेल!" "काय हो तुम्हांला चेष्टा सुचतेय्! सगळे बिचारे हौसेनं येतील, तर तुम्हांला त्यांची गंमत बघायची आहे!" शुभदा कौतुकानं म्हणाली, त्यांत कांही खोटं नव्हतं! अनंतला सख्खी बहीण नव्हती. पमाताई त्याची एकुलती एक चुलत बहीण तर मीनाताई आणि अंजू दोन्ही मावसबहीणी! पण सगळ्यांचे लागेबांधे इतके घट्ट जुळलेले की आप-पर भाव नव्हता! पमाताई आणि अनंतच्या वयाचा मान राखून त्यांनी ठरवल्यानुसार सर्वांची भाऊबीज एकाच घरी होत असे! मग शुभदाचा धाकटा भाऊ असो वा मीनाताई आणि अंजू यांचे सख्खे भाऊ, सगळे तिथेच येत! दिवसभर गप्पांची कौटुंबिक मैफिल आणि विविध खाद्यपदार्थांची नुसती रेलचेल! "शुभदा, यंदा ३ वर्षांनंतर एकत्र भाऊबीज होणार आहे. त्यातच माझा साठावा वाढदिवस आपण साजरा केलेला नाहीं! त्यामुळे भाऊबीजेसाठी तिन्ही बहिणींना आणि सोबत हजर असलेल्या इतर सगळ्यांनाही कांंही ना कांही छानशा भेटवस्तु द्याव्या असं माझ्या मनांत आहे! तुझी संमती असेल तर त्या दृष्टीने विचार करून तुला काय सुचतंय् बघ!कारण आतां मधे फार दिवस उरलेले नाहींत!!
२० ऑक्टोबर २०२२
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar Date 27 December 2024 Time 11.00 to 11.05 AM Language Marathi आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक बातम्या दिनांक: २७ डिसेंबर २०२४ सकाळी ११.०० वाजता.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवंगत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या पार्थिव देहाचं दर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. डॉ सिंग यांचं काल रात्री निधन झालं, त्यांचा पार्थिव देह नवी दिल्लीतल्या त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आला आहे. पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी डॉ सिंग यांच्या पार्थिव देहावर पुष्पचक्र अर्पण केलं, तसंच डॉ सिंग यांच्या पत्नी गुरुशरण कौर यांची भेट घेऊन सांत्वन केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष केंद्रीय मंत्री जे पी नड्डा यांनीही डॉ सिंग यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
डॉ सिंग यांच्या पार्थिव देहावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. केंद्र सरकारने सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला असून, आजचे सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेऊन माजी पंतप्रधान डॉ सिंग यांना सरकारकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
डॉ मनमोहनसिंग यांना जगभरातून श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. अफगाणिस्ताने माजी राष्ट्रपती हमीद करझई, मालदीवचे माजी राष्ट्रपती मोम्मद नशीद, रशियाचे राजदूत डेनिस अलिपोव्ह, यांच्यासह अनेक नेत्यांनी डॉ सिंग यांच्या आठवणींना उजाळा देत, शोक व्यक्त केला आहे.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे अत्यंत शांत विनम्र मितभाषी व्यक्तिमत्व होते. त्यांची अर्थतज्ज्ञ म्हणून कामगिरी जागतिक दर्जाची होती. त्यांच्या निधनाने देशाची मोठी हानी झाली, या शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी डॉ. सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मकर संक्रांतीच्या सणादरम्यान होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेत दक्षिण मध्य रेल्वेनं पूर्णा तिरूपती पूर्णा, नांदेड इरोड नांदेड, आणि तिरूपती अकोला तिरूपती या गाड्यांना मुदतवाढ दिली आहे. दरम्यान, गुंटूर- औरंगाबाद गाडी उद्या २८ तारखेला रद्द करण्यात आली आहे, त्यामुळे परवा २९ तारखेला सुटणारी औरंगाबाद गुंटूर गाडीही धावणार नसल्याचं, दक्षिण मध्य रेल्वेनं कळवलं आहे.
छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात आज पहाटे पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या, राज्यात अनेक जिल्ह्यात आजपासून तीन दिवस गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, अकोल, वाशीम जिल्ह्यात तुरळक पाऊस होत असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
लातूर इथं उद्या २८ डिसेंबर पासून अखिल महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळ पुणे यांच्यावतीने दोन दिवशीय मुख्याध्यापकांचं ६१ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलन होत आहे. दोन दिवस असणआऱ्या या संमेलनाचं उद्घाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते होणार असून, संमेलनाध्यक्ष म्हणून प्राचार्य बाबुराव जाधव तर स्वागताध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख हे असणार आहेत, अशी माहिती लातूर जिल्हा माध्यमिक व आणि उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रकाश देशमुख यांनी दिली आहे.
महिला क्रिकेटमध्ये, भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या आयसीसी चॅम्पियनशिप मालिकेतील तिसरा आणि शेवटचा एकदिवशीय सामना आज वडोदरा इथं सुरू आहे. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिज संघाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त आलं तेव्हा वेस्ट इंडिज संघाने १९ षटकात ३ खेळाडू बाद ८० धावा केल्या आहेत. तीन सामन्यांच्या या मालिकेतले दोन सामने भारताने जिंकले आहेत.
भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात सुरू असलेल्या बॉर्डर गावसकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या चौथ्या सामन्याच्या पहिल्या डावावर यजमान संघानं पकड मजबुत केली आहे. मेलबर्न इथं होत असलेल्या या सामन्यात, ऑस्ट्रेलिया संघानं आपल्या पहिल्या डावात ४७४ धावा केल्या आहेत. शेवटचं वृत्त हाती आली तेंव्हा भारतीय संघानं पहिल्या डावात २ बाद ८२ धावा केल्या आहेत. या मालिकेत दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीत आहेत.
अग्नीवीर योजनेअंतर्गत सैन्यदलात कारकून तसंच सामान्य श्रे��ीत विविध पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी बेळगावी इथल्या मराठा लाईट इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर इथं दोन जानेवारी २०२५ पासून नऊ जानेवारीपर्यंत भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. वीरपत्नी, हुतात्मा सैनिकाचे भाऊ, माजी सैनिक, तसंच विशेष प्रावीण्यप्राप्त क्रीडापटूंसाठी हा मेळावा आहे. सर्व निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची या मेळाव्यात शारीरिक चाचणी तसंच लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. साडे सतरा ते २१ वर्ष वयोगटातले युवक यासाठी पात्र असतील. सामान्य श्रेणीसाठीचा उमेदवार ४५ टक्के गुणांसह दहावी उत्तीर्ण तर कारकून श्रेणीसाठी ६० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्याचं आवाहन छत्रपती संभाजीनगर इथल्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयानं केलं आहे.
परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर तालुक्यात हवामान बदलामुळे भुईमुग पिकावर टीका रोगाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसून येत आहे. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत बाधा येत असल्याने रब्बीच्या भुईमूग पिकाच्या उत्पादनात घट होण्याचा अंदाज जिंतूर कृषी विभागाचे तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण शिंदे यांनी व्यक्त केला आहे.
0 notes
Text
वाल्मिकची तब्बल ‘ इतकी ‘ बँक खाती सील, लवकरच हाती येण्याची शक्यता कारण..
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघालेले आहे. बीड येथे सर्वपक्षीय सर्वधर्मीय सर्वजातीय मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले होते.संतोष देशमुख यांची मोठी मुलगी वैभवी , भाऊ धनंजय यांच्यासोबत मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील , खासदार बजरंग सोनवणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड…
0 notes