Tumgik
#४२५
airnews-arngbad · 6 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Chatrapati Sambhajinagar
Date – 02 April 2024
Time 7.10 AM to 7.20 AM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक ०२ एप्रिल २०२४ सकाळी ७.१० मि.
****
बँकांशी निगडित आर्थिक व्यवहारांमध्ये सुलभता आणण्यासाठी धोरण निश्चितीची गरज-रिजर्व्ह बँकेच्या ९० व्या वर्धापनदिन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग
व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात तर राज्यात वीजेचे दहा टक्के वाढीव दर लागू
आणि
लातूर जिल्ह्यात मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडणी तोडण्याची मोहिम
****
देशातल्या सर्व नागरिकांना बँकेतले आर्थिक व्यवहार सोप्या पद्धतीनं करता यावे यासाठी धोरण निश्चित करण्याची गरज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. भारतीय रिझर्व्ह बँक - आरबीआयच्या स्थापनेला ९० ‍‍‍वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं, काल मुंबईत झालेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, गव्हर्नर शक्तिकांत दास, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. भारताची बँक व्यवस्था जगात आदर्श मानली जात असल्याचं सांगत, आरबीआयमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं. शाश्वत आणि गतिमान आर्थिक प्रगतीसाठी आरबीआयला सतत प्रयत्नरत राहावं लागणार असल्याचं ते म्हणाले. यावेळी नव्वद रुपयांच्या विशेष नाण्याचं लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं.
****
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. परवा चार तारखेपर्यंत या टप्प्यासाठी अर्ज भरता येणार आहेत.
परभणी लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आणि महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी काल शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी घेण्यात आलेल्या सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री पंकजा मुंडे, बबनराव लोणीकर, सदाभाऊ खोत, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अपक्ष उमेदवार गोविंद देशमुख यांनी चार, तर अपक्ष उमेदवार आप्पासाहेब कदम यांनी देखील काल दोन उमेदवारी अर्ज दाखल केले. यापूर्वी दोन अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.
****
हिंगोली लोकसभा मतदारसंघात काल अभिनव भारत जनसेवा पक्षाचे रवि जाधव यांचा एक उमेदवारी अर्ज दाखल झाला. हिंगोली मतदारसंघात आतापर्यंत दोन अर्ज दाखल झाले आहेत.
नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी काल दोन अर्ज दाखल झाले. काँग्रेस पक्षातर्फे वसंतराव चव्हाण तर अपक्ष म्हणून महारुद्र पोपळाईतकर यांनी अर्ज दाखल केले. या मतदार संघात आतापर्यंत एकूण पाच अर्ज दाखल झाले आहेत. यवतमाळ-वाशिम तसंच बुलडाणा मतदार संघात काल प्रत्येकी एक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचं, आमच्या बातमीदारांनी कळवलं आहे.
****
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनं काल दोन उमेदवारांची यादी जाहीर केली. अकोला इथून डॉ. अभय पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
****
आगामी दोन ते अडीच महिन्याच्या काळात देशात उष्मा वाढणार आहे. सध्या देशात लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेता सर्व यंत्रणांनी योग्य ती काळजी घेतल्याची माहिती, केंद्रीय भूविज्ञान मंत्री किरेन रिजीजू यांनी दिली. ते काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. एप्रिल ते जून दरम्यान देशाच्या मध्य, उत्तर आणि दक्षिण भागात तापमान सरासरीपेक्षा जास्त राहणार आहे. मध्य महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, ओडिशा, आंध्र प्रदेश या भागाला उष्णतेच्या लाटेला सामोरं जावं लागणार असल्याचं, भूविज्ञान खात्याचे महासंचालक डॉ मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितलं.
****
तेल विपणन कंपन्यांनी १९ किलो व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३० ते ३२ रुपयांनी कपात केली आहे. आता मुंबईत एका व्यावसायिक सिलिंडरची किंमत एक हजार ७१७ रुपये इतकी झाली आहे.
****
राज्यात कालपासून नवीन वीज दर लागू झाले. इंधन अधिभार जोडल्यावर सुमारे १० टक्के दरवाढीचा बोजा महावितरणच्या ग्राहकांवर पडणार आहे. महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या मार्च २०२३ च्या आदेशानुसार ही दरवाढ करण्यात आली. दोन वर्षांसाठी दोन टप्प्यांत वीज दरवाढ होईल. घरगुती संवर्गातल्या सिंगल फेजसाठी पूर्वीच्या ११६ रुपयांऐवजी आता १२८ रुपये आकारले जातील, थ्री फेजसाठी पूर्वीच्या ३८५ रुपयांऐवजी ४२५ रुपये लागणार आहेत. वाणिज्यिक ग्राहकांना पूर्वीच्या ४७० रुपयांऐवजी ५१७ रुपये द्यावे लागतील.
दरम्यान, महाराष्ट्र विद्युत नियामक मंडळ - एमएआरसीने ठरवलेल्या दरानुसार वीजदर ठरवले असून, त्याचा बोजा छोट्या विद्युत ग्राहकांवर पडणार नाही, अशी त्या दराची रचना केली असल्याचं स्पष्टीकरण राज्याचे ऊर्जामंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना दिलं.
****
सेवानिवृत्त वेतनधारकांचं निवृत्ती वेतन आता शासनाच्या ई- कुबेर प्रणालीद्वारे रिझर्व बॅंकेमार्फत पेन्शनधारकांच्या थेट बॅंक खात्यात जमा होणार आहे. त्यासाठी पेन्शनधारकांनी आपलं बॅंक खातं परस्पर न बदलता ते मुळ बॅंकेतच सुरु ठेवावं, असं आवाहन वरिष्ठ कोषागार कार्यालयाच्या सहाय्यक संचालक सुषमा बुरकुले यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यात मुख्य जलवाहिनीवरील अनधिकृत नळजोडणी तोडण्याची मोहिम महापालिकेतर्फे सुरू करण्यात येत आहे. यामुळे आज धनेगांव धरणातून शहराला होणारा पाणी पुरवठा बंद राहणार असून, नागरीकांनी सहकार्य करण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे. या जलवाहिनीवरील वॉल्वमध्ये अनेक ठिकाणी छेडछाड करून पाण्याची चोरी केली जात असल्याचं निदर्शनास आल्यानं, ही कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, संभाव्य पाणी टंचाईचं संकट लक्षात घेऊन नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा, असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी याबाबत काल झालेल्या आढावा बैठकीत केलं.
****
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण इथल्या नाथषष्ठी सोहळ्याची आज सांगता होणार आहे. नाथषष्ठी यात्रेनिमित्त काल आणि परवाही पैठण इथं अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले. नाथवंशजांच्या हस्ते काल्याच्या प्र���ादाची हंडी फोडून आज या यात्रेची सांगता होईल.
****
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा आजपासून सुरु होत आहेत. आजपासून पदवी अभ्यासक्रमाच्या, १६ एप्रिलपासून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या तर २९ एप्रिलपासून विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. तीन मे पासून शिक्षण आणि शारीरिक शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमाच्या तर १३ मे पासून औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या परीक्षांना सुरुवात होणार आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातल्या सर्व संलग्नित महाविद्यालयात एकूण १०५ केंद्रावर या परीक्षा घेण्यात येतील. या परीक्षेचे निकाल ३० दिवसांत जाहीर करण्यासाठी विद्यापीठानं चार संलग्नित महाविद्यालयांमध्ये एकूण १४ मूल्यांकन केंद्र तयार केले आहेत.
****
टपाली मतदानाची प्रक्रिया राबवण्यासाठी सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत. काल यासंदर्भात झालेल्या प्रशिक्षण वर्गात ते बोलत होते. अन्य एका बैठकीत बोलताना स्वामी यांनी, ग्रामीण तसंच शहरी भागातल्या महिला बचत गटांच्या सदस्यांना मतदान जनजागृती उपक्रम- स्वीप मध्ये सहभागी करुन घेण्याचे निर्देश दिले.
****
हिंगोली लोकसभा मतदार संघात मतदान जनजागृती रथाला सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांनी काल हिरवा झेंडा दाखवून सुरूवात केली. 'मी मतदान करणारच' या स्वाक्षरी फलकावर स्वाक्षरी करुन पारधी यांनी या उपक्रमाचंही उद्घाटन केलं. या मतदान जनजागृती रथाद्वारे शहरातल्या प्रत्येक वार्ड आणि ग्रामीण भागात जाऊन मतदानाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.
****
नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या विष्णुपुरी इथंल्या जिल्हा परिषद हायस्कूल या पर्यावरण पूरक मतदार केंद्राला मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी काल भेट दिली. यावेळी त्यांनी या मतदान केंद्राची कल्पना आणि कार्यपद्धती, तसंच मतदान केंद्राच्या वैशिष्ट्यांची आणि तंत्रज्ञानाची माहिती घेतली, अशा मतदान केंद्रामुळे निवडणूक प्रक्रियेला अधिक पर्यावरणपूरक बनवण्यात मदत होईल, असा विश्वास निर्माण झाल्याचं त्या म्हणाल्या.
****
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विक्रमी कर वसुलीबद्दल आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी सर्व अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांचं अभिनंदन केलं आहे. नव्या आर्थिक वर्षात ५०० कोटी कर वसुलीचं उद्दीष्ट निर्धारित करून काम करण्याचं आवाहन त्यांनी केलं. महापालिकेनं गेल्या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कर तसंच पाणी पट्टीचं एकूण ४८० कोटी रुपये कर संकलनाचं उद्दिष्ट ठेवलं आहे, त्यापैकी १८२ कोटी ७८ लाख रुपये महसूल वसूल करण्यात मनपाला यश आलं आहे.
****
हवामान
राज्यात काल सर्वाधिक ४१ अंश सेल्सियस तापमान सोलापूर इथं नोंदवलं गेलं. त्या खालोखाल बीड, अकोला आणि जळगाव इथं ४० अंश, छत्रपती संभाजीनगर तसंच बुलडाणा इथं ३८ पूर्णांक चार, परभणी ३६ पूर्णांक पाच, तर नांदेड इथं ३६ पूर्णांक दोन अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली.
****
0 notes
darshanpolicetime1 · 8 months
Text
पंचगंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी ३४० कोटी रुपयांचा निधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कोल्हापूरकरांना ४२५ कोटी रुपयांच्या काळम्‍मावाडी थेट पाईपलाईन योजनेतून मिळणार कायमस्वरुपी शुध्द व मुबलक पाणी कोल्हापूर, दि. १७ (जिमाका) : कोल्हापूर महापालिकेसाठी मंजूर केलेल्या ६३४ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. पंचगंगेच्या प्रदुषणमुक्तीसाठी नदीत जाणाऱ्या उर्वरीत सांडपाण्यावरील प्रक्रियेसाठी ३४० कोटी रूपयांची मंजूरी देणार असल्याचे…
Tumblr media
View On WordPress
0 notes
samaya-samachar · 1 year
Text
युनिक नेपाल लघुवित्तको एफपीओ बाँडफाँट मिति तय
काठमाडौ,  २३ जेठ ।  युनिक नेपाल लघुवित्तको एफपीओ बाँडफाँट मिति तय भएको छ ।  बिक्रि प्रबन्धक मुक्तिनाथ क्यापिटल लिमिटेडका अनुसार लघुवित्तको एफपीओ बिहीबार बिहान ९ बजे बिक्री प्रबन्धकै कार्यालयमा बाँडफाँट हुनेछ । लघुवित्तले जेठ ११ गतेदेखि जेठ १७ गतेसम्म एफपिओ निष्कासन गरेको थियो । कम्पनीले ३ करोड ७९ लाख ४२ हजार ५ सय रुपैयाँ बराबरको ३ लाख ७९ हजार ४२५ कित्ता शेयर निष्काशन गरेको हो । अन्तिम दिनसम्म…
View On WordPress
0 notes
nepsebajarofficial · 2 years
Text
मोलुङ्ग हाइड्रोपावरको आईपीओ बाँडफाँट , यस्तो छ नतिजा हेर्ने तरिका।
मोलुङ्ग हाइड्रोपावर कम्पनी लिमिटेडले आयोजना प्रभावित स्थानीय बासिन्दाका लागि निष्कासन गरेको आईपीओ बाँडफाँट गरेको छ । कम्पनीले जारी पूँजी रू. ८० करोड २५ लाखको १० प्रतिशत अर्थात  रू.  ८ करोड २ लाख ५० हजार बराबरको ८ लाख २ हजार ५०० कित्ता शेयर आयोजना प्रभावित क्षेत्रका बासिन्दाहरूका लागि निष्कासन गर्ने छ भने २ लाख ७२ हजार ८५० कित्ता वैदेशिक रोजगारीमा गएका नेपालीका लागि र १ लाख ३६ हजार ४२५ कित्ता…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gothalokhabar · 2 years
Text
रोल्पा प्रदेशसभा १ मा माओवादीका महरा विजयी
रोल्पा प्रदेशसभा १ मा माओवादीका महरा विजयी
रोल्पा, ७ मंसिर । रोल्पाको प्रदेशसभाको निर्वाचन क्षेत्र नम्बर १ (१) बाट गठबन्धनका उम्मेदार नेकपा माओवादी केन्द्रका जोखबहादुर महरा निर्वाचित हुनु भएको छ । महराले १९ हजार ४२५ मत ल्याई विजयी हुनु भएको छ । महराका निकटतम प्रतिस्पर्धी नेकपा एमालेका उम्मेदवार कमलबहादुर वुढाथोकीले पाँच हजार चार सय पाँच मत प्राप्त गर्नु भएको छ । महराले १४ हजार २० मतको अन्तरले बुढाथोकीलाई पराजित गर्नुभएको हो । यो प्रदेशसभा…
Tumblr media
View On WordPress
0 notes
churenews · 2 years
Text
यस्तो छ फलफूल तथा तरकारी भाउ
यस्तो छ फलफूल तथा तरकारी भाउ
काठमाडौं, १७ कात्तिक कालीमाटी फलफूल तथा तरकारी बजार विकास समितिकाअनुसार आज बिहीबार अदुवाको औसत मूल्य प्रतिकेजी अदुवा, पाकेको फर्सी, रातो मूला र चिचिण्डो ३५ रुपैयाँ रहेको छ । अनार ४२५ रुपैयाँ, अनार ४२५ रुपैयाँ, अमला, हरियो डल्लो फर्सी र चुकुन्दर ७५ रुपैयाँ, अम्बा १६५ रुपैयाँ, आभोकाडो २२५ रुपैयाँ, रातो आलु ८२ रुपैयाँ ५० पैसा, भारतीय रातो आलु ५१ रुपैयाँ, सेतो आलु ६२ रुपैयाँ ५० पैसा, इमली १४६ रुपैयाँ…
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
BMWची ही इलेक्ट्रिक SUV भारतात लॉंच, सिंगल चार्जमध्ये देईल ४२५ किमीची रेंज, जाणून घ्या किंमत
BMWची ही इलेक्ट्रिक SUV भारतात लॉंच, सिंगल चार्जमध्ये देईल ४२५ किमीची रेंज, जाणून घ्या किंमत
BMWची ही इलेक्ट्रिक SUV भारतात लॉंच, सिंगल चार्जमध्ये देईल ४२५ किमीची रेंज, जाणून घ्या किंमत BMW India ने भारतात आपली सर्व-इलेक्ट्रिक SUV IX सादर केली आहे. कंपनीचा दावा आहे की BMW iX Pure Electric SUV मध्ये ड्युअल लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे, जी एकावेळी ४२५ किमीची रेंज देते. म्हणजेच एका चार्जवर ते ४२५ किमी अंतर कापेल. या कारची किंमत १.१६ कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे. BMW iX ला AC आणि…
View On WordPress
0 notes
newsindiaguru · 3 years
Text
Samsung Galaxy M42 5G Is Rebranded Galaxy A42 5G: Report
Samsung Galaxy M42 5G Is Rebranded Galaxy A42 5G: Report
स्मार्टफोन के Google Play कंसोल लिस्टिंग का हवाला देते हुए एक रिपोर्ट के अनुसार, गैलेक्सी M42 5G स्मार्टफोन सैमसंग गैलेक्सी A42 5G का रीब्रांडेड संस्करण है। रिपोर्ट में कहा गया है कि दोनों स्मार्टफोन में Google Play कंसोल पर एक ही डिवाइस कोड था। यह सैमसंग एम सीरीज स्मार्टफोन के भारत लॉन्च से एक दिन पहले आता है, जो अमेज़ॅन पर खुदरा होगा। सैमसंग गैलेक्सी M42 क्वालकॉम स्नैपड्रैगन 750G SoC के साथ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
24daynews · 3 years
Text
सैमसंग गैलेक्सी M42 5G वीडियो टीमें लीक लॉन्च के आस-पास
सैमसंग गैलेक्सी M42 5G वीडियो टीमें लीक लॉन्च के आस-पास
Samsung Galaxy M42 5G टीज़र स्मार्टफोन के आस-पास लॉन्च पर ऑनलाइन हिंटिंग लीक हो गए हैं। टीज़र हैंडसेट को नहीं दिखाते हैं लेकिन दावा करते हैं कि यह गैलेक्सी एम रेंज में पहला 5G स्मार्टफोन होगा। सैमसंग गैलेक्सी M42 5G सपोर्ट पेज भी हाल ही में आधिकारिक भारत साइट पर लाइव हुआ, और फोन को NFC, वाई-फाई एलायंस और ब्लूटूथ SIG सर्टिफिकेशन साइट्स पर देखा गया है। फोन को सैमसंग गैलेक्सी A42 5G के रीब्रांड के…
View On WordPress
0 notes
airnews-arngbad · 10 months
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date : 27 November 2023
Time : 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक : २७ नोव्हेंबर २०२३ दुपारी १.०० वा.
****
अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून सोडण्यात आलेलं पाणी आज पैठणच्या जायकवाडी धरणात पोहोचण्याची शक्यता आहे. नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यामार्फत १५ हजार ६५ घनफूट तर भंडारदरा धरणातून नऊ हजार ५३६ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. सध्या धरणात ३९ टक्के पाणी साठा असल्याचं छत्रपती संभाजीनगर इथल्या गोदावरी पाटबंधारे मराठवाडा विकास महामंडळाच्यावतीनं कळवण्यात आलं आहे.
                                    ****
सोलापूर जिल्ह्यातल्या हत्तूर गावात मडीवस्तीत घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्यानं बोळूरे कुटुंबातील चौघेजण जखमी झाले. आज सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास स्वयंपाक करत असताना ही दुर्घटना घडली. जखमींना तातडीनं सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.                                       **** नाशिक जिल्ह्यात काल झालेल्या पावसादरम्यान, वीज कोसळल्यामुळं दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. निफाड तालुक्यात कसबे सुकेणे परिसरात गारपीटीमुळं द्राक्षबागांचंही मोठं नुकसान झालं आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी काल या ठिकाणची पाहणी करत तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे.
                                    ****  शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेव यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विनम्र अभिवादन केलं आहे. 'गुरू नानकदेव यांनी गुरुभक्तीला सर्वश्रेष्ठ स्थान दिलं. त्यांनी दिलेली प्रेम, सद्भावना आणि बंधुभाव ही श��कवण तसंच शांती आणि मानवतेचा संदेश आजही प्रेरणादायी आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी शीख बांधवांना शुभेच्छा दिल्या आहे.                                     **** यंदाचा आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार आध्यात्मिक गुरू श्री. श्री. रविशंकर यांना प्रदान करण्यात आला. काल झालेल्या दिव्याज् फाऊंडेशनच्यावतीनं आयोजित 'ग्लोबल पीस ऑनर' या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.  २६/११ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या पोलिस अधिकारी, कर्मचारी तसंच सैन्यातील कुटुंबियांचा योवळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.                                      ****
प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक, लेखक, प्राध्यापक डॉ. शंकर किसन बोऱ्हाडे यांचं काल नाशिक इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६२ वर्षांचे होते. मरणगाथा कवितासंग्रह, कडा आणि कंगोरे, उजेडा आधीचा काळोख, देशभक्त शेषराव घाटगे, विडीची गोष्ट, शोध डॉ. वसंतराव पवारांचा, लोकपरंपरेचे सिन्नर ही त्यांची काही पुस्तकं प्रसिद्ध आहेत.                                     **** छत्रपती संभाजीनगर इथल्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या नवीन बोधचिन्हाचं अनावरण आणि संकेतस्थळाच्या पुनर्प्रदर्शन कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलं आहे. एमजीएम स्कुल ऑफ फिल्म आर्ट्स इथं संध्याकाळी साडे पाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
                                    **** शांतिब्रह्म संत एकनाथ महाराजांचं ४२५ वं समाधी वर्ष तसंच एकनाथी भागवत ग्रंथाच्या साडे चारशेव्या जयंती निमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण इथं अखंड हरिनाम सप्ताह आणि एकनाथी भागवत पारायण सोहळा सुरू आहे. या सोहळ्यात आज गजारूढ ग्रंथदिंडी प्रदक्षिणा काढण्यात आली. भागवत ग्रंथ डोक्यावर घेत शेकडो महिला, पुरुष भाविक या प्रदक्षिणेत भक्तिभावाने सहभागी झाले.                                     ****
बीड जिल्ह्यातल्या श्री श्रेत्र कपिलधार इथं कार्तिक पोर्णिमेनिमित्त शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते काल शासकीय महापूजा संपन्न झाली. संत मन्मथ स्वामी महान संत होते, श्री क्षेत्र कपिलधार हे एक महत्त्वपूर्ण तीर्थस्थान असल्याचं केसरकर यांनी यावेळी आयोजित मेळाव्यात म्हटलं. अधिकाधिक तरुणांनी कौशल्य प्रशिक्षण घेण्याचं आवाहन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी केलं. शैक्षणिक अभ्यासक्रमामध्ये तिसऱ्या वर्गापासून कृषी हा विषय शिकवला जाईल असंही मुंडे यांनी यावेळी सांगितलं.   
                                    **** छत्रपती संभाजीनगर शहरात आज दुपारी पावसाला सुरुवात झाली असून हिंगोली जिल्ह्यात काल रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. औंढा तालुक्यातल्या गोजेगाव शिवारात वीज कोसळल्यानं राजू जायभाये या तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. तर सेनगाव, कळमनुरी, वसमत, औंढा तालुक्यांमध्ये पावसामुळं ज्वारी, तूर, हरभरा, गहू या पिकांचं मोठं नुकसान झालं. 
दरम्यान, परभणी जिल्ह्यात मध्यरात्रीपासून विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला. यामुळं ऊस, ज्वारी, हळद पिकांना दिलासा मिळाला, मात्र हरभरा, तूर पिकांसह वेचानीला आलेला कापूस भिजल्यानं मोठं नुकसान झालं आहे.
                                    **** जालना जिल्ह्यातल्या अंबड इथल्या मत्स्योदरी देवी मंदिरात काल त्रिपुरारी पोर्णिमेनिमित्त दीपोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भाविकांनी पेटवलेल्या दिव्यांमुळं मंदिर परिसर लख्ख प्रकाशानं उजाळून निघाला होता.
                                    ****
0 notes
snehalshelote · 2 years
Link
0 notes
samaya-samachar · 1 year
Text
युनिक नेपाल लघुवित्तको एफपीओमा आवेदन दिने आज अन्तिम दिन
काठमाडौ,  १७ जेठ । युनिक नेपाल लघुवित्तको थप सार्वजनिक निष्कासन (एफपीओ) मा आवेदन दिने बुधबार अन्तिम दिन हो । लगानीकर्ताले बुधबार कार्यालय समयभित्र यसमा आवेदन दिन सक्नेछन् । यस कम्पनीले जेठ ११ गतेदेखि एफपीओ बिक्री खुला गरेको हो । यस लघुवित्तले ३ करोड ७९ लाख ४२ हजार ५ सय रुपैयाँ बराबरको एफपीओ बिक्रीमा ल्याएको हो ।    यसआधारमा १ सय अंकित मूल्यमा ३ लाख ७९ हजार ४२५ कित्ता एफपीओ निष्कासन खुला गरिएको छ…
View On WordPress
0 notes
nepsebajarofficial · 2 years
Text
२ वटा कम्पनीको १३ लाख १६ हजार कित्ता संस्थापक सेयर लिलामीमा खुला
२ वटा कम्पनीको १३ लाख १६ हजार कित्ता संस्थापक सेयर लिलामीमा खुला
नेपाल लाइफ इन्स्योरेन्स कम्पनी र एनआईसी एसिया बैंकले असार २० गते देखि १३ लाख १६ हजार कित्ता संस्थापक सेयर लिलामीमा ल्याएका छन् । जसमध्ये नेपाल लाइफ इन्स्योरेन्सको ५ लाख ९६ हजार ९२१ र एनआईसी एसिया बैंकको ७ लाख १९ हजार ९५०  कित्ता संस्थापक सेयर लिलामीमा ल्याएका हुन् । नेपाल लाइफ इन्स्योरेन्स कम्पनीले प्रतिकित्ता सेयरको न्यूनतम मूल्य ७०० रुपैयाँ तोकेको छ भने एनआईसी एसिया बैंकले ४२५ रुपैयाँ तोकेको छ…
Tumblr media
View On WordPress
0 notes
gothalokhabar · 2 years
Text
ललितपुर- १ मा स्वतन्त्र उम्मेदवार तण्डुकार विजयी
ललितपुर- १ मा स्वतन्त्र उम्मेदवार तण्डुकार विजयी
ललितपुर, १ जेठ । ललितपुर महानगरपालिका वडा नं१ को वडाध्यक्ष पदमा स्वतन्त्र उम्मेदवार निर्मल तण्डुकारले ६६१ मत प्राप्त गरी विजयी हुनुभएको छ । उहाँका निकटतम प्रतिस्पर्धी नेपाली काँग्रेसका ध्रुव तण्डुकारले ४२५ मत प्राप्त गर्नुभएको छ । नगर प्रमुखमा  काँग्रेसका चिरीबाबु महर्जन र उपप्रमुखमा नेकपा (एमाले)की उम्मेदवार मञ्जली शाक्यको अग्रता कायम छ । काँग्रेसका उम्मेदवार महर्जनले ८७७ र एमालेका हरिकृष्ण…
Tumblr media
View On WordPress
0 notes
aarthikhub · 2 years
Text
एफपीओ निष्कासन गर्ने अनुमति  माग्दै युनिक नेपाल लघुवित्त पुग्याे धितोपत्र बोर्ड।
एफपीओ निष्कासन गर्ने अनुमति  माग्दै युनिक नेपाल लघुवित्त पुग्याे धितोपत्र बोर्ड।
युनिक नेपाल लघुवित्त वित्तीय संस्था लिमिटेडले नेपाल धितोपत्र बोर्डसँग एफपीओ निष्कासनका लागि अनुमति  माग गर्दै निवेदन दिएको छ । कम्पनीले गत चैत १७ गते नेपाल धितोपत्र बोर्ड (सेबोन) मा एफपीओ निष्कासनको अनुमति माग्दै आवेदन दिएको हो। बोर्डले अनुमति दिएमा कम्पनीले ३ करोड ७९ लाख ४२ हजार ५०० रुपैयाँ बराबरको एफपीओ जारी गर्नेछ। कम्पनीले १०० रुपैयाँ अंकित मूल्यमा  कुल ३ लाख ७९ हजार ४२५ कित्ता एफपीओ निष्कासन…
Tumblr media
View On WordPress
0 notes
bharatlivenewsmedia · 3 years
Text
BMWची ही इलेक्ट्रिक SUV भारतात लॉंच, सिंगल चार्जमध्ये देईल ४२५ किमीची रेंज, जाणून घ्या किंमत
BMWची ही इलेक्ट्रिक SUV भारतात लॉंच, सिंगल चार्जमध्ये देईल ४२५ किमीची रेंज, जाणून घ्या किंमत
BMWची ही इलेक्ट्रिक SUV भारतात लॉंच, सिंगल चार्जमध्ये देईल ४२५ किमीची रेंज, जाणून घ्या किंमत BMW India ने भारतात आपली सर्व-इलेक्ट्रिक SUV IX सादर केली आहे. कंपनीचा दावा आहे की BMW iX Pure Electric SUV मध्ये ड्युअल लिथियम-आयन बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे, जी एकावेळी ४२५ किमीची रेंज देते. म्हणजेच एका चार्जवर ते ४२५ किमी अंतर कापेल. या कारची किंमत १.१६ कोटी रुपये (एक्स-शोरूम) आहे. BMW iX ला AC आणि…
View On WordPress
0 notes