Tumgik
#होतं…
bharatlivenewsmedia · 2 years
Text
हेच बाकी राहिलं होतं का? विम लिक्विडची जाहिरात पाहून नेटकरी भडकले
हेच बाकी राहिलं होतं का? विम लिक्विडची जाहिरात पाहून नेटकरी भडकले
हेच बाकी राहिलं होतं का? विम लिक्विडची जाहिरात पाहून नेटकरी भडकले बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मिलिंद नेहमीच त्याचे फिटनेसचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतो. मिलिंदचे व्हिडिओ कित्येकांसाठी प्रेरणादायी ठरतात. बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. मिलिंद नेहमीच त्याचे फिटनेसचे व्हिडिओ आणि फोटो चाहत्यांसोबत शेअर…
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 1 year
Text
Pradip : आज जेवण सासूबाईंनी बनवलं होतं का?
बायको : (खूश होऊन) अरे व्वा, तुम्ही कसं ओळखलंत?
Pradip : तू करतेस तेव्हा काळे केस मिळतात, आज पांढरा केस मिळाला...
बायको विषय बदलून पळ काढतो!
😛😛😛😩😩😩😏😏😏🤗🤗🤗
3 notes · View notes
nandedlive · 1 year
Text
वयाच्या १६ व्या अभिनेत्रीचं लग्न, दोन मुलांच्या जन्मानंतर घटस्फोट; कोण आहे 'कसौटी जिंदगी की' फेम उर्वशी ढोलकियाचा पहिला पती? - urvashi Dholakia divorced husband and in relationship with actor Anuj Sachdev
Tumblr media
वयाच्या १६ वर्षी लग्नझाल्यानंतर १८ व्या वर्षी घटस्फोट... आता २५ वर्षांनंतर अभिनेत्रीचं दुसरं लग्न करण्याच्या प्रयत्नात उर्वशी ढोलकिया हिची मुलं, खुद्द 'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीने सांगितलं...
मुंबई : ‘कसौटी जिंदगी की’ फेम उर्वशी ढोलकिया हिचं वयाच्या १६ व्या वर्षी लग्न झालं. लग्नानंतर उर्वशीने दोन मुलांना जन्म दिला. उर्वशीचं लग्न एका श्रीमंत उद्योगपतीसोबत झालं होतं. पण लग्नाच्या दोन वर्षांनंतर उर्वशीचं पतीसोबत वाद होवू लागले. त्यानंतर २०१८ मध्ये उर्वशीने घटस्फोटाचा निर्णय घेत, दोन मुलांचा सांभाळ ‘सिंगल मदर’ म्हणून केला. आज अभिनेत्री तिच्या दोन मुलांसोबत आनंदाने आयु्ष्य जगत आहे. घटस्फोटानंतर दुसऱ्या लग्नाचा विचार न करता अभिनेत्रीने फक्त आणि फक्त स्वतःच्या करियरकडे लक्ष केंद्रीत केलं. एवढंच नाही तर, उर्वशीच्या मुलांनी अभिनेत्रीला दुसरं लग्न करण्याचा सल्ला देखील दिला. पण अभिनेत्री कधीही दुसऱ्या लग्नाचा विचार केला नाही. एका मुलाखतीत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा करत उर्वशी म्हणाली, ‘दुसरं लग्न किंवा इतर कोणत्या गोष्टीबद्दल विचार करण्याचा मला वेळच मिळाला नाही. माझ्या मुलांना उत्तम शिक्षण आणि आय���ष्य मिळावं… याच प्रयत्नात मी कायम होती. मला असं वाटतं कोणत्याही नात्यामध्ये तुमची उपस्थिती अधिक महत्त्वाची असते.’
Tumblr media
  पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘जर एखाद्या नात्यात तुम्हाला स्वतःला बदलावं लागत असेल तर, ते नातं आयुष्यात फार काळ टिकत नाही. माझ्या मुलांना आणि कुटुंबाला वाटयचं मी पुन्हा लग्न करायला हवं. पण या गोष्टीचा विचार कधी केलाच नाही. माझी मुलं कायम मला डेट करण्याचे सल्ले देत असतात. त्यांचं सल्ले ऐकून मला हसायला यायचं.’ असं देखील अभिनेत्री म्हणाली. महत्त्वाचं म्हणजे उर्वशीने अद्याप तिच्या पहिल्या पतीचं नाव सांगितलेलं नाही. रिपोर्टनुसार, अभिनेत्रीचं नाव अभिनेता अनुज सचदेवा याच्यासोबत जोडण्यात आलं. दोघांनी नच बलिये ९ मध्ये आपल्या दमदार डान्सने चाहत्यांच्या मनात राज्य केलं. अनेक ठिकाणी दोघांना एकत्र देखील स्पॉट करण्यात आलं. पण काही दिवसांनी दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा रंगू लागल्या. रिपोर्टनुसार, उर्वशी ढोलकिया आणि अनुज सचदेवा यांनी एकमेकांना जवळपास ७ वर्ष डेट केलं. सात वर्षांनंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. कारण अभिनेत्याच्या वडिलांना मुलाचं उर्वशी ढोलकिया हिच्यासोबत असलेलं नातं मान्य नव्हतं.. असं सांगितलं जात. आज उर्वशी एकटी ‘सिंगल मदर’ म्हणून मुलांचा सांभाळ करते. शिवाय मुलांसोबत सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ देखील पोस्ट करत असते. सोशल मीडियावर उर्वशी ढोलकिया हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. Read the full article
2 notes · View notes
igamravati · 2 years
Text
#1.
मनी डायनॅमिक्स
जास्त खुलासा न करता पैशाबद्दलच्या दहा गोष्टी सांगतो. मान्य अमान्य आपणंच ठरवावं. सर्वश्रृत असलेला पहिला नियम म्हणजे पैसे कमावणं जितकं अवघड तितकं त्याला सांभाळणही कठिण. सगळी सिस्टीम तुमच्या बचतीवर डोळा ठेऊन असते. पैसे आहेत अशी जरा जरी भनक लागली तरी वेगवेगळे हितचिंतक पॅान्झी स्किमा घेऊन मागे लागतात. बॅंकवाले, विमाएजंट, गुंतवणूक दलाल आणि नातेवाईक भुरळ घालायला, नाहीतर अजीजी करायला तयारच असतात. तुम्ही जर बेसावधपणे जवळच्या मित्रांकडे बोलून बसलात तर त्यातल्या कुणी ना कुणी पुढच्या काही दिवसात तुमच्याकडे शब्द टाकून ��ुम्हाला धर्मसंकटात ढकललंच म्हणून समजा. त्यामुळे वाचवलेले पैसे ही अतिशय वैयक्तिक आणि गोपनीय बाब समजावी.
दोन, पैसा कुणाचा? तर जो वापरेल त्याचा. हे सूत्र जो विसरला त्याचा कार्यक्रम झालाच समजा. आपल्या पैशांवर दुसऱ्याला मजा मारताना हताशपणे पाहात राहणं याच्यासारखी मनाला होणारी दुसरी वेदना नाही. आपले पैसे परत मिळविण्यासाठी बऱ्याचदा आपणंच याचक होतो. मागताना हात पसरणाऱ्याचं परतफेडीच्यावेळी सगळं बेअरिंग चेंज झालेलं असतं. वैतागून एखादा निर्वाणीचा इशारा दिला तर “देतो की कुठं पळून चाललो आहे का?” ऐकवलं जातं. कधीकधी उसणवारी करणारे सराईत स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून क्रेडीटरला उचकवतात. भांडण झालं की त्याचं काम फत्ते. पुढेच काही दिवस तरी पैसे मागितले जात नाहीत.
तीन, मेहनती माणसाच्या आयुष्याभोवती पैसा फिरावा हा निसर्ग नियम असला तरी प्रत्यक्षात पैशाभोवती आयुष्य़ फिरतं ही वस्तुस्थिती आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे पैसे कमावणं हे कम्पल्सिव्ह गॅंबलिंग सारखं होतं. परिणामस्वरूप पैसा हे यशाच्या आणि सुखाच्या मोजमापांचं एकक बनून जातं.
चार, प्रचलित समाजव्यवस्थेत सगळ्या सेवा कॅाईनबॅाक्स पॅटर्नवर डिझाईन केलेल्या असल्याने शिक्षण, आरोग्य, दैनंदिन गरजां इत्यादींमुळे तयार होणाऱ्या समस्यांसुद्धा पैशाशी निगडीत असतात. बचतीच्या पैशामुळं या समस्या सुटल्या नाहीत तरी किमान सुसह्य होतात.
पाचवा मुद्दा, पैसा निष्क्रिय राहिला तर पेपर, फिरत ठेवला तर परिस. इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलीओ वर “निजल्या तान्ह्यावरी माऊली दृष्टी सारखी धरी” प्रमाणे लक्ष ठेवून जागरूक राहायला लागतं. नजर हटी किमत घटी. गुंतवणूकीत एक्झिट पॅालीसी महत्वाची असते. मुदत संपताच रोखीकरण करून इनव्हेस्टमेंट हॅालीडे घ्यावा. झालेला नफा राहणीमानाचा दर्जा उंचावण्यासाठी खर्च करून टाकावा. ॲाटो रिन्युअलला तसा फार अर्थ नसतो. वर म्हटल्याप्रमाणे पैसा कुणाचा तर वापरेल त्याचा.
सहा, कमाईवृद्धीच्या अनुषंगाने खर्च लगेच तयार असतो. एकूण ताळमेळ लावता शिलकीची टक्केवारी कमी उत्पन्नाच्या वेळेइतकीच येते. चांगल्या दिवसांचं आभासी वैशिष्ट्य हे की ते कधी संपणारच नाहीत हा विश्वास. म्हणतात ना की सधनतेकडे जाणारी चढण चढताना माणसं दुखवू नयेत कारण खाली येताना तिच माणसं परत भेटतात. बेंजामिन फ्रॅंक्लीन आपल्या आत्मवृतात क्रेडिटर्सच्या स्वभावाचं फार चांगलं विश्लेषण करतात. जयंताच्या पैशाबाबतच्या कल्पनांची पायाभरणी कॅालेजमध्ये असताना मरीन लाइन्सच्या अमेरिकन लायब्ररीत हे आत्मवृत वाचून झाली.
सात, जगात सर्वांना पुरून उरेल एवढं सगळं आहे. कुणी कुणाशी स्पर्धा करायची गरज नाही. उलट इतरांच्या श्रमाचं योग्य मूल्यमापन करून मोकळ्या हातांनी मोबदला देण्याने आपली प्रगतीच होते. जे मिळतं ते कृतज्ञतेने स्विकारावं असं न्यू थॅाट या तत्वज्ञानात मानलं जातं. या विचारसरणी वर बेतलेली दोन पुस्तके आहेत. वॅलेस डी वॅटल यांचं सायन्स ॲाफ गेटींग रिच (१९१०) आणि अलीकडचं ऱ्होन्डा बायरन यांचं द सिक्रेट.
आठ, गरिबी भूषण म्हणून मिरविण्यात अर्थ नाही. वारसाहक्कानं मिळालेल्या संपत्तीचा सामावेश आपल्या यशाच्या मोजमापात करू नये. पुढच्या पिढीला ती संपत्ती मोडतोड न करता व विल्हेवाट न लावता सुपूर्द करावी. आपल्यापासून सुरूवात होईल अशा वैभवसंपन्न घराण्याची पायाभरणी करण्याची ईर्षा ठेवावी.
नऊ, दौलतीला एस्केप व्हॅलॅासीटी असते. पृथ्वीची कक्षा सोडण्यासाठी अवकाशयानाला जो विशिष्ट वेग घ्यावा लागतो त्याला एस्केप व्हॅलॅासीटी म्हणतात. त्यानंतर गुरूत्वाकर्षण संपते. श्रीमंतीमध्ये वाढ होण्याच्या वेगालासुद्धा एस्केप व्हॅलॅासीटी असते. एकदा का ती गाठली गेली की आणखी कमवायचं आकर्षण संपतं. बऱ्याच गर्भश्रीमंत व्यक्ती एका स्टेजला दानधर्म आणि लोकहिताची कामं करणं सुरू करतात. संपत्ती निर्मितीच्या चक्राचा हा परमोच्च बिंदू असतो. व्यक्तिसापेक्ष असल्याने प्रत्येकासाठी तो वेगवेगळा असतो. लोकोपयोगी कामं आपल्या हातून घडणं हे मानववंशाच्या जनुकीय प्रोग्रॅमचा भाग आहे. अल्ट्रुइझमचं रिसेसिव्ह जीन हेलिक्समध्ये असतंच.
दहा, पैशाचा शोध लागला नव्हता तेंव्हाही आयुष्य चालत होतंच आणि पैसा नष्ट झाला तरीही पुढेही चालूच राहिल. आजकाल फियाट करन्सीच्या पोकळ डोलाऱ्याविरूद्ध चळवळ सुरू झाली आहे. जी. एडवर्ड ग्रिफीन यांचं “द क्रिचर फ्रॅाम जेकील आयलंड” हे पुस्तक अमेरिकन चलनव्यवस्था ही कशी बनवाबनवीची स्कीम आहे हे विशद करतं. ग्रंथालीनं प्रकाशित केलेलं “घातसूत्र” हे दिपक करंजीकर यांचं पुस्तक याच विषयावर आहे. या चळवळीचं काय म्हणणं आहे हे आपण निदान समजून तरी घ्यायला हवं. नोटबंदी वेळी आपण याची झलक अनुभवली आहे.
- जयंत नाईकनवरे, आय.पी.एस.
2 notes · View notes
dipthebond007 · 2 years
Text
मी तुझ्यावर प्रेम करते पण मित्र म्हणून
ती :  “हे तू काय चालवलंय आहेस चिराग?” काय ऐकतेय हे मी सगळं? काय सांगतो आहेस तू सगळ्यांना कि, आपल्यात प्रेम संबंध आहेत? हे सगळं अती होण्या अगोदर मला स्पष्ट करायचे आहे की, "मी तुला कधीही त्या नजरेने पाहिलेलेच नाही" चिराग!  तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे आणि तो दुर होणे खूप गरजेचे आहे. मी तुला नेहमीच म्हणत आलेली आहे की, आपल्यामध्ये मैत्रीपेक्षा काहीतरी जास्त आहे पण ते प्रेम आहे असे मी कधीही म्हटलेली नाही. आता मला समजतंय की तू मात्र त्याचा वेगळा अर्थ घेतलेला आहे. मी कधीही मैत्री आणि प्रेमाच्या मधली मर्यादा रेषा ओलांडलेली नाही. कारण माझा मनामध्ये तुझ्याबद्दल मैत्रीच्या व्यतिरीक्त दुसरी कुठलीच भावना कधीही आलेली नाही. त्याचा अर्थ असा नाही आहे कि, मला तुझ्या बद्दल काहीच वाटत नाही. 
मी मान्य करते की, माझ्याही मनात तुझ्या विषयी एक अनामिक ओढ आहे आणि आपला नातं निश्चितच मैत्री पलीकडचं आहे आणि त्या विषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही. मैत्रीच्या खूप पुढे आपण आलेलो आहोत. तू खूप काही करतोस माझ्यासाठी जे कुणी मित्र पण नाही करू शकणार आणि मी पण तुझ्यासाठी करतेच कि मैत्रीच्याही पुढे जाऊन आणि ह्याची आपल्या दोघांना पण जाणीव आहे. मी कधीही विसरू शकणार नाही कि तुझं माझ्या आयुष्यात काय स्थान आहे आणि हे तुला पण कळतंय कि आपण आपल्या पुढील आयुष्यात देखील एकमेकांना विसरणे निव्वळ अशक्यच आहे.
चिराग, माझं तुझ्यावर प्रेम आहे पण ते मित्र म्हणून, प्रियकर म्हणून मी तुझा कधीच विचार केलेला नाही आणि तुझ्याबद्दल प्रेमाची भावना माझ्या मनात इथून पुढे कधी निर्माण होईल असं मला तरी वाटतं नाही. तुझ्या मनात माझ्या विषयी ज्या भावना आहेत त्यांना वेळीच लगाम लावणे गरजेचे आहे नाहीतर आपल्या दोघांसाठीपण हा विषय खूप त्रासदायक होऊन बसेल. सध्या आपण आपल्या करियर वर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तू तुझ्या चांगल्या भविष्याचा विचार कर, मला विश्वास आहे की, तुला माझ्या पेक्षाही सुंदर आणि तुझावर खूप प्रेम करणारी मुलगी मिळेल. मी तुझ्यासाठी खरच योग्य नाहीये.
मलाही माझे काही ध्येय आहेत आणि ते साध्य करायचे आहेत, प्रेम हे त्यापैकी एक नाहीये. मला फक्त माझे करियर सध्या महत्वाचे आहे. म्हणूनच म्हणतेय की, तू आत्ताच्या आत्ता या विषयाला पूर्णविराम दे म्हणजे आपल्यातील मैत्रीचे नाते तसेच आबादीत राहिल. मला तू मित्र म्हणून माझ्या आयुष्यात हवा आहेस. मी तुझा सारखा इतका छान मित्र गमवू इच्छित नाही. आपण खूप चांगले मित्र आहोत आणि आपण हि मैत्री कायम ठेवूयात एवढंच मला तुला सांगायचंय.
चिराग : (सगळं शांतपणे ऐकत होता, मधेच त्याला रडू आवरणे कठीण झालं आणि त्याच्या डोळ्यातील अश्रूंनी आपली वाट शोधात गालावरून घसरत जमीन गाठली, त्याच्या डोळ्यासमोरून भूतकाळातील एक एक चित्र सरकत होती ज्यामधील एक चित्र जरा जास्त स्पष्ट होतं गेलं त्यात ते दोघे पावसामध्ये एका छत्रीखाली एकमेकांचा हात धरून चालत आहेत आणि तिचे अस्पष्ट शब्द त्याच्या कानावर पडतात, आय लव्ह यु चिराग!) 
त्याक्षणी चिराग भानावर येतो आणि ताडकन उठून चालू लागतो, ती आवाज देते चिराग थांब पण तो तसाच चालत राहतो. आता त्याला फक्त जुबीन नौटियालच्या प्रसिद्ध गाण्यातील ओळी ऐकू येत राहतात...
कत्ल बाजार में हो चुका हू फिर भी तू मेरा कातिल नहीं है बेवफा तेरा मासूम चेहरा भूल जाने के काबिल नहीं है भूल जाने के काबिल नहीं है
Tumblr media
2 notes · View notes
airnews-arngbad · 12 hours
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date: 26 June 2024
Time: 01.00 to 01.05 PM
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक: २६ जून २०२४ दुपारी १.०० वा.
****
अठराव्या लोकसभेच्या अध्यक्षपदी भाजपचे खासदार ओम बिर्ला यांची आवाजी मतदानाने निवड झाली. लोकसभेत आज कामकाज सुरु होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच��यासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या १२ घटक पक्षाच्या नेत्यांनी बिर्ला यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी प्रस्ताव मांडला. तर विरोधी पक्षांकडून समाजवादी पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांनी काँग्रेसचे के सुरेश यांच्या बाजुने प्रस्ताव मांडला.
पुढच्या पाच वर्षात बिर्ला हे सदनाला मार्गदर्शन आणि सहकार्य करतील, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. मागच्या पाच वर्षात १७व्या लोकसभेनं बिर्ला यांच्या अध्यक्षतेखाली अनेक ऐतिहासिक कायदे पारित केल्याचं त्यांनी नमूद केलं.
अध्यक्ष अमो बिर्ला विरोधकांना बोलण्याची, मत मांडण्याची संधी देतील अशी अपेक्षा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केली.
समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे सुदीप बंदोपाध्याय, द्रविड मुनेत्र कळघमचे टी आर बालू, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, शिवसेनेचे श्रीरंग बारणे, लोकजनशक्ती पक्षाचे चिराग पासवान यांच्यासह अनेक सदस्यांनी अध्यक्ष ओम बिर्ला यांचं अभिनंदन केलं.
दरम्यान, राज्यसभेचं अधिवेशन उद्यापासून सुरु होणार असून, दोन्ही सभागृहासमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं अभिभाषण होणार आहे.
****
स्वच्छ इंधन निर्मितीच्या क्षमतेमुळे ऊसाचा भाव नव्या उंचीवर पोहोचला असल्याचं, केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रह्लाद जोशी यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत भारताच्या अध्यक्षतेखाली सुरु असलेल्या ६४ व्या आंतरराष्ट्रीय साखर संघटनेच्या बैठकीत बोलत होते. ऊसापासून साखर तर त्याच्या मळीपासून इथेनॉल मिळत असल्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करून ऊसाचं उत्पादन वाढवण्याबाबत संशोधन करण्याचं आवाहन जोशी यांनी उपस्थित तज्ञांना यावेळी केलं.
****
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसंच नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघांसाठी आज मतदान होत आहे. संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान चालणार असून, मतमोजणी एक जुलै रोजी होणार आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत मुंबई पदवीधर मतदारसंघात २७, मुंबई शिक्षक मतदारसंघात १८ पूर्णांक ३१, कोकण पदवीधर मतदारसंघात २० पूर्णांक १५, तर नाशिक शिक्षक मतदारसंघात २३ पूर्णांक १६ टक्के मतदान झालं.
****
राजर्षी शाहू महाराज यांची १५०वी जयंती आज साजरी होत आहे. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. त्यांचा जन्म दिवस ‘सामाजिक न्याय दिवस’ म्हणून पाळला जातो. यानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं.
कोल्हापूर इथं पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लक्ष्मी विलास पॅलेस इथल्या शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं. यानिमित्त काढण्यात आलेल्या शोभा यात्रा आणि समता दिंडीला कोल्हापूरकरांनी भरघोस प्रतिसाद दिला.
नांदेड शहरात आज समता दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. शहरातल्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन या दिंडीची सुरवात झाली.
लातूर इथंही समाज कल्याण विभागाच्यावतीनं आज समता दिंडी काढण्यात आली. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून राजर्षी छत्रपती शाहू महाराज चौक इथून या दिंडीला सुरुवात झाली. या माध्यमातून सामाजिक न्यायाचा संदेश देत शाहू महाराजांच्या विचारांचा जागर करण्यात आला.
****
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या नीट परीक्षा घोटाळा प्रकरणी केंद्रीय तपासणी पथकानं बीड इथं काही जणांची चौकशी केल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये माजलगाव तालुक्यातल्या काही शिक्षकांचा समावेश असल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
येत्या एक जुलैला कृषीदिनी, माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नांदेड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. शेती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा तसंच राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा गौरव करण्यात येणार आहे. याशिवाय कृषी क्षेत्रातल्या तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
****
टेक्सास इथं सुरु असलेल्या बीडब्ल्यूएफ अमेरिका खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या कृष्ण प्रसाद गरागा आणि साई प्रतीक या जोडीने दुसर्या फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या सामन्यात त्यांनी आलर्यंडच्या जोडीचा पराभव केला.
****
0 notes
vishwasdgaikwad · 2 days
Video
youtube
नांदन नांदण होतं रामाचं नांदण,गायिका धम्मदीक्षा
0 notes
shrikrishna-jug · 3 days
Text
देवाच्या ओठातून झालेली कुजबुज
मी काल प्रो. देसायांना विचारलं“भाऊसाहेब,मला खगोलभौतिकशास्त्रज्ञांच्या एका गटाबद्दलचा एक लेख वाचलेला आठवतो ज्यात अंतराळात खोलवर संशोधनासाठी शास्त्रज्ञानी rocket पाठवलं होतं. त्यांनी ते इतक्या दूरच्या ठिकाणी पाठवलं की तुम्हाला फक्त त्याठिकाणी अथांग शांततेची अपेक्षा करावी लागेली असती.परंतु,त्याऐवजी शास्त्रज्ञांना लहरी सापडल्या – ध्वनी लहरी सापडल्या ज्या शास्त्रज्ञानी बिग बँग झाल्यावर उत्पन्न झाल्या…
View On WordPress
0 notes
Text
आयुष्य
जीवनाची ही नौकासुख दुःखानी भरून ।एकेक दिवस मोजतोतेही जातील सरून । नेहमीच आता वाटतकाय कसा मी जगलो ।अख्या आयुष्यात मीरडत रडतच तर हरलो । मनात हसायचं होतं खूपपण हसताच आलं नाही ।आयुष्यही कितीस उरलंतेही जगताच आलं नाही ।Sanjay R.
Tumblr media
View On WordPress
0 notes
bandya-mama · 16 days
Text
Bandya : काय रे मन्या! एवढा टेंशनमध्ये का दिसतोयस?
मन्या : काही नाही रे! विचार केला होता…
दोन लग्न करीन, म्हणजे एकीने मारलं तर दुसरी वाचवेल.
रात्री स्वप्नात पाहिलं की, एकीनं पकडून ठेवलं होतं
आणि…
दुसरी मारत होती.
😅😅😅😂😂😂😀😀😀🤣🤣🤣
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years
Text
VIDEO: तुझ्याशिवाय आमचं लग्न होणं अशक्य होतं... त्या व्यक्तीबद्दल बोलताना अक्षया भावुक
VIDEO: तुझ्याशिवाय आमचं लग्न होणं अशक्य होतं… त्या व्यक्तीबद्दल बोलताना अक्षया भावुक
VIDEO: तुझ्याशिवाय आमचं लग्न होणं अशक्य होतं… त्या व्यक्तीबद्दल बोलताना अक्षया भावुक Akshaya Deodhar and Hardeek joshi wedding छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी राणादा- पाठकबाई अर्थात हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांनी खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे आयुष्याचं जोडीदार झाले आहेत. या सेलिब्रिटी कपलच्या लग्नाची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा झाली. Akshaya Deodhar and Hardeek joshi wedding छोट्या पडद्यावरील…
View On WordPress
0 notes
pradip-madgaonkar · 16 days
Text
Pradip : काय रे मन्या! एवढा टेंशनमध्ये का दिसतोयस?
मन्या : काही नाही रे! विचार केला होता…
दोन लग्न करीन, म्हणजे एकीने मारलं तर दुसरी वाचवेल.
रात्री स्वप्नात पाहिलं की, एकीनं पकडून ठेवलं होतं
आणि…
दुसरी मारत होती.
😅😅😅😂😂😂😀😀😀🤣🤣🤣
0 notes
Video
youtube
मी म्हटलं होतं हे शेवटी रडणार अजित दादा..
0 notes
mhadalottery2023 · 2 months
Text
Girni Kamgar: गिरणी कामगार ‘संप’ला की संपवला गेला? कुणामुळे देशोधडीला लागला? 82 च्या संपावेळीच्या मागण्या होत्या तरी काय?
Girni Kamgar त्या काळात गिरणी कामगार असणे हे स्टेटस सिम्बॉल होते. मी एक गिरणी कामगार आहे, कर्मचारी कुरवाळत म्हणाला. पण, त्यांची प्रतिष्ठाही संपली आणि गिरणी कामगारांचीही… ती का संपली? आंदोलनाच्या अवास्तव मागण्या की संघटनेत नेत्यांचा वाढता हस्तक्षेप? गिरणी कामगार संपले की संपले? 1982 च्या संपात नेमकं काय झालं होतं? अखेर या आंदोलनाची ठिणगी कुठे पडली? Girni Kamgar मुंबई : मुंबई ही देशाची आर्थिक…
Tumblr media
View On WordPress
0 notes
chaitanyakulkarni98 · 2 months
Text
आत्म्याचा आवाज
Tumblr media
समाजात किंवा वैयक्तीक आयुष्यात कुटुंबामध्ये, एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट, एखादा मुद्दा योग्य आहे, खरा आहे हे माहीत असून सुद्धा त्याबाबतीत गप्प बसणे किंवा जाणून बुजून दुर्लक्ष करणे हे चूक आहे कारण तुम्ही जेव्हा असं करता तेव्हा तुम्ही अप्रत्यक्षपणे त्याच्याविरुद्ध चुकीच्या गोष्टीला, मुद्द्याला मूक समर्थन देत असता.त्यामुळें चुकीच्या गोष्टी करणाऱ्यांचे फावते आणि काळ सोकावतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दुसऱ्या महायुध्दपूर्व काळातले बहुसंख्य जाणते, सुशिक्षित जर्मन लोक ज्यांनी जाणून बुजून हिटलरच्या ज्यू विरोधी धोरणांकडे दुर्लक्ष केलं. जर्मनीमध्ये दुसरं महायुद्ध झाल्यानंतर जर्मनीतल्या न्यायाधीशांवर Nuremberg इथे भरण्यात आलेला खटला. Judgement at Nuremberg या अत्यंत सुंदर चित्रपटामध्ये हा खटला आणि त्या अनुषंगाने हे सर्व दाखवण्यात आलं आहे. ज्यामध्ये हे न्यायाधीश अंतिमतः मान्य करतात की, जे घडत आहे ते आम्हाला ठाउक असूनही आम्ही सत्याच्या बाजूने उभं न राहता चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्यांना मूक समर्थन देत राहिलो. We chose not to look at it. आमचीही यात चूक होती.
आता असं तटस्थ न राहता योग्य, सत्याच्या बाजूने उभं राहण्यात अनेक अडचणी असू शकतात. त्या योग्य गोष्टीला समर्थन देऊन, त्यामागे उभं राहून तुमचं शारीरिक, मानसिक, आर्थिक नुकसान होत असणं शक्य आहे. पण माणूस जेव्हा असा आतला आत्म्याचा आवाज ऐकून कृती करतो, तेव्हा ती केल्यानंतर जे चिरंतन आत्मिक समाधान मिळते, ज्याला आपले अनेक संत, उपनिषदांत - गीतेतले ऋषि सच्चिदानंद म्हणतात तो मात्र ते म्हणतात तसा अवर्णनीय-अनिर्वचनीय असतो. मुक्त आणि स्वतंत्र जीवन जगत कर्म करताना छोटी - मोठी सुखं- दुःख येत राहतात पण तो आनंद मात्र कायम असतो. अनेकदा यावर लोकांचं असं म्हणणं असतं की आम्हाला आयुष्यात काय करायचं आहे तेच ठाउक नाही त्यावर उपनिषदांत नेति - नेति (हे नाही, हे नाही) चा उपाय सांगितलेला आहे. म्हणजे जे अयोग्य, असत्य आहे ते आपल्या पातळीवर यथाशक्ती त्याला नेति, हे नाहीं म्हणत नाकारणे. म्हणजे अंतिमतः जे श्रेयस आहे ते तुम्हाला सापडते. पण यासाठी समर्थ रामदास म्हणतात त्याप्रमाणें अखंड सावधान, अर्थात जागरूक असणे आवश्यक आहे. तुम्ही आत्म्याच्या आवाजावर मनाचा पडदा न ठेवता, तो न दाबता हो म्हणायला हवे आणि त्यावर चालण्याचे धाडस मात्र दाखवायला हवे.
उदा:
१. सोफी स्कोल (Sophie Scholl):
Tumblr media
काळ साधारण १९४० चं दशक.जर्मनी मध्ये हिटलर जे काही करत होता ते चुकीचं आहे हे माहीत असणारे आणि त्याचे काय परिणाम होऊ शकतात याचा अंदाज असणारे अनेक जर्मन लोक होते पण त्यामधले क्वचितच कोणी विरोध करायला पुढे आले. Sophie Scholl नावाची भरपूर वाचन असलेली, कला, संगीत, साहित्य या सगळ्यात गती असलेली जर्मन मुलगी. तिने वयाच्या २०-२१ व्या वर्षी हिटलरच्या अमानवी- ज्यू विरोधी धोरणाविरुद्ध ती चुकीची, असत्य व अन्यायकारक आहेत म्हणून त्याविरुद्ध आवाज उठवला.तिच्या समवयस्क भावंडांसोबत १९४२ मध्ये युनिव्हर्सिटीमध्ये leaflets वाटली होती , त्याबद्दल तिला gillotin वर चढविण्यात आलं. तिचं म्हणणं होतं की असं भ्याडपणें जगण्यापेक्षा जर माझे मरण हे जर इतरांसाठी प्रेरणा बनणार असेल तर ह्या आयुष्याचे मूल्य ते किती?
२. व्हिन्सेंट व्हॅन गॉग (Vincent van Gogh):
Tumblr media
व्हिन्सेंट व्हॅन गॉग या प्रसिद्ध चित्रकाराला आयुष्यात आपल्याला नक्की काय करायचंय हे जवळपास वयाच्या २८ व्या वर्षापर्यंत समजत नव्हतं. पण म्हणून उच्च - मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या या व्यक्तीने पैसे कमावण्यासाठी चारचौघं जो धोपट मार्ग निवडतात तो न निवडता वेळोवेळी त्याच्या मनाचा कौल, आतला आवाज ऐकण्याचा प्रामाणिकपणा आणि धाडस दाखवलं. चांगलं वाचन असणाऱ्या या मनुष्याला आयुष्यात एका टप्प्यावर साधारण विसाव्या वर्षी प्रामाणिकपणे असं वाटलं की आपण ख्रिस्ती धर्मप्रसाराचं काम चांगल्या प्रकारे करू शकतो तेव्हा त्याने मनापासून २-३ वर्षे गरीब खाण-कामगारांमध्ये राहून ते काम केलं. तिथे त्याला असं वाटलं की या माणसांना जिथे दोन वेळच्या खाण्याची भ्रांत आहे तिथे त्यांच्या खऱ्या व्यथा न समजून घेता धर्मप्रसार करणे हे खरं म्हणजे ख्रिस्ताच्या शिकवणीच्या विरुद्ध काम आहे. म्हणून तो सर्व सुखसोयी सोडून बाह्या सरसावून खाणकाम शिकून त्यांच्यात सामील झाला.
साधारण २५-२६ व्या वर्षी त्याला स्वतःमध्ये असलेला चित्रकार सापडला. तेव्हा तिथून पुढे वयाच्या ३५ व्या वर्षी कोणत्याही पैसा - प्रसिद्धीचा सोस न धरता त्याच्या मृत्यूपर्यंत त्याने कित्येक चित्रे काढली ज्यामधील एकही चित्र तो हयात असेपर्यंत विकलं गेलं नाही (काहीसं श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलेल्या निष्काम कर्मयोगाप्रमाणे - योग्य काम करत असाल तर फळाची चिंता राहात नाही). आज मात्र त्याच्या एका चित्राची किंमत किमान काही कोटी डॉलर्स मध्ये जाते.
आता एखाद्याला या दोन्हींचा काय संबंध असं वाटणं शक्य आहे.पण अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचं धाडस तिच व्यक्ती करू शकते जिच्याकडे अंतर्मनाचा आवाज ऐकून त्यानुसार काम करण्याचं साहस, त्यावर अंमल करण्याची हिम्मत आहे. म्हणून ही दोन उदाहरणं एकमेकांशी सलग्न आहेत. काम कोणतंही असो, तुम्ही ते समाजहितासाठी करत आहात किंवा तुमच्या स्वतःसाठी. आत्म्याचा आवाज ऐकून जर ते केलं जात असेल तर ते स्वहिताचं असेल तरी त्यातून नकळत इतरांच, समाजाचं हित साधलं जातं. आणि तुम्ही ते समाजहितासाठी करत असाल तरी त्यातून अप्रत्यक्षरीत्या स्वहित साधलं जातं. मात्र तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असणं आवश्यक आहे.
अशी अनेक उदाहरणं आपल्याला सापडतील.
आता यावर अनेकांचं असं म्हणणं असू शकेल की आम्हाला नाही बनायचं असं महान/असामान्य वगैरे. आम्हाला नाही करायचं सत्याधिष्ठीत काम .नाही ऐकायचा आतला आत्म्याचा आवाज. आम्हाला असं छोटं आणि सामान्यच आयुष्य जगायचं आहे. आम्हाला केवळ आमच्या शरीराला आणि मनाला क्षणिक सुख देणाऱ्या आमच्या वासना, कामना , इच्छा पूर्ण करायच्या आहेत. पण या सर्व वासना-कामना पूर्ण झाल्यावर पण माणसाला एक आंतरिक शून्यता, पोकळी जाणवत राहते जी एवढया सगळया वासनांच्या मागे धावाधाव करून देखील भरून येत नाही/ येऊ शकत नाही.आणि माणूस गरजेपेक्षा जास्त अधिकाधिक संचय करायला बघतो आणि अधिकाधिक असमाधानी, असंतुष्ट बनतो. माणसाचा मूळ आंतरिक स्वभावच अनंत आकाशाला गवसणी घालण्याचा आहे, स्वातंत्र्यात, मुक्ततेमध्ये जगण्याचा आहे. अनेक जण या मूळ आंतरिक स्वभावाकडे, आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करून पैसा - प्रतिष्ठा - स्पर्धा यांच्या मागे लागून ही अंतर्गत बेचैनी भरण्याचा प्रयत्न करतात पण तरीही चिरंतन शांतता, समाधान काही मिळत नाही.
कारण असं करताना आपण एकप्रकारे स्वतःशी खोटं बोलत असतो आणि आपलं स्वतःचं मोठं नुकसान करून घेत असतो. याची छोटीशी परीक्षा अशी की, तुम्ही कोणतीही गोष्ट, कृती का करत आहात असं स्वतःला विचारा. आणि येणाऱ्या प्रत्येक उत्तरावर जर असं का? विचारत राहीलात तर तुम्हाला असं आढळेल की ३-४ वेळा विचारल्यावर मिळालेल्या उत्तरांनंतर, समाधानासाठी - आनंदासाठी असं उत्तर मिळेल. पण ती कृती जर आतला आवाज ऐकून करत नसाल तर मात्र तुम्हाला मिळणारा तो आनंद ,ते समाधान क्षणिक असतं.कोणतीही कृती करताना आपल्याला आपला मूळ स्वभाव, आत्म्याचा आवाज क्षीण का होईना ऐकू येत असतो, मग ते काम म्हणजे आपण मूक राहून चुकीच्या गोष्टीचं समर्थन करण्याचं का असेना, तो सांगत असतो की मी हे जे करतोय ते चूक आहे. तो आपल्याला सांगत असतो योग्य काय आहे, सत्य काय आहे ते. आपल्याला सगळं कळत असतं पण वळत मात्र नसतं. थोडं धाडस दाखवण्याची आवश्यकता असते त्याचं ऐकून त्या आवाजानुसार चालण्यासाठी, त्यानुसार काम करण्यासाठी..
अष्टावक्र गीतेवर बोलताना ओशो म्हणतात तसं "घटना अभी घट सकती है। आत्मा से मन और वासनाओं का पर्दा अभी हट सकता है बस तुम्हारे हां भरने की देरी है।"
~ चैतन्य
1 note · View note
airnews-arngbad · 1 day
Text
Regional Marathi Text Bulletin, Chhatrapati Sambhajinagar
Date – 25 June 2024
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
प्रादेशिक बातम्या
दिनांक – २५ जून २०२४ सायंकाळी ६.१०
****
लोकसभा अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक-एनडीएच्या ओम बिर्लांना काँग्रेसच्या के. सुरेश यांचं आव्हान
विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी आजपासून अर्ज भरण्याची सुरुवात
अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना हात आखडता घेऊ नये-मुख्यमंत्र्यांची बँकांना सूचना
आणि
टी ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतींचं चित्र स्पष्ट-भारताचा इंग्लंडशी तर दक्षिण आफ्रिकेचा अफगाणिस्तानशी सामना
****
लोकसभेच्या अध्यक्षपदासाठी उद्या निवडणूक होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीनं या पदासाठी माजी अध्यक्ष ओम बिर्ला यांना पुन्हा संधी दिली आहे. आज त्यांनी अध्यक्षपदासाठी अर्ज भरला. विरोधी पक्षांकडून काँग्रेस खासदार के. सुरेश यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंत लोकसभेचे अध्यक्ष एकमतानं नियुक्त झाले आहेत. यंदा प्रथमच या पदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. सदनाचा अध्यक्ष एकमतानं निवडला जावा, यासाठी सरकारनं विरोधकांशी चर्चा केली, मात्र विरोधकांनी उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करण्याची मागणी केली. मात्र हे नाव योग्य वेळी जाहीर करू असं सत्ताधारी पक्षानं सांगितल्यामुळे अध्यक्षपदासाठी एकमतानं निवड होऊ शकली नाही, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
१८ व्या लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांना सदस्यत्वाची शपथ देण्याची कार्यवाही आज दुसऱ्या दिवशी पूर्ण झाल्याचं, कार्यवाहक अध्यक्ष भर्तृहरी मेहताब यांनी जाहीर केलं. आज महाराष्ट्रातले काँग्रेस खासदार गोवाल पाडवी, श्यामकुमार बर्वे, बळवंत वानखेडे, शोभा बच्छाव, भाजपाचे खासदार अनुप धोत्रे, स्मिता वाघ, शिवसेनेचे संदिपान भुमरे, श्रीकांत शिंदे, नरेश म्हस्के आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे, डॉ अमोल कोल्हे, धैर्यशील मोहिते पाटील, अमर काळे, भास्कर भगरे, सुरेश म्हात्रे, नीलेश लंके आणि बजरंग सोनवणे यांनी आज शपथ घेतली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी, काल २६६ खासदारांनी शपथ घेतली होती.
दरम्यान, उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आज संसद भवनात राज्यसभेच्या नवनिर्वाचित सदस्य सुनेत्रा अजित पवार यांना सदस्यत्वाची शपथ दिली.
****
विधान परिषदेच्या रिक्त होणाऱ्या ११ जागांसाठी आजपासून अर्ज भरण्याची सुरुवात झाली. या निवडणुकीसाठी २ जुलैला दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करता येणार असून ३ जुलैला अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ५ जुलै पर्यंत आहे. १२ जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळात मतदान होणार आहे.
****
माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश केला. पक्षाचे नेते शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईमध्ये हा प्रवेश सोहळा पार पडला. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बळकटीकरणासाठी आपण शरद पवारांच्या नेतृत्वात काम करणार असल्याचं सूर्यकांता पाटील म्हणाल्या. तर शरद पवार यांनी, यावेळी बोलतांना, पाटील यांनी सामाजिक हिताचा राजकीय निर्णय योग्य वेळी घेतल्याची सांगितले.
****
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्याचा कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयानं आज स्थगित केला. केजरीवाल यांची दिल्ली उच्च न्यायालयाच्या याबाबतच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं स्थगित करत, याप्रकरणी उद्या बुधवारी सुनावणी घेण्याचं ठरवलं आहे.
****
१९७५ मध्ये लागू करण्यात आलेल्या राजकीय आणीबाणीविरोधात लढा देणाऱ्या सर्व नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आदरांजली वाहिली. सर्व भारतीयांसाठी सन्माननीय असणाऱ्या संविधानाला अपमानित करत काँग्रेसनं ��नतेच्या मूलभूत स्वातंत्र्याचं हनन केलं होतं, याची आठवण करून देणारा हा दिवस असल्याचं, पंतप्रधानांनी सामाजिक माध्यमावरच्या एका संदेशात म्हटलं आहे.
****
अल्प आणि अत्यल्पभूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देताना बँकानी हात आखडता घेऊ नये, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्या १६३व्या बैठकीत ते आज मुंबईत बोलत होते. पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना 'सिबील स्कोअर'ची सक्ती केली जाऊ नये आणि राज्यातल्या जिल्हा सहकारी बँका तसंच प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांचं बळकटीकरण करण्याला प्राधान्य दिलं जावं, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी आज खरीप हंगामाची आढावा बैठक घेतली. राज्यातील शेतकरी, नागरिक यांना नैसर्गिक आपत्ती, शेती नुकसान भरपाईसाठीची मदतीचे वाटप ३० जून पर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
****
राज्याच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरलेल्या विविध प्रकल्पांतल्या प्रकल्पग्रस्तांसाठी उभारण्यात आलेली पुनर्वसित गावठाणं ‘आहे त्या स्थितीत’ ग्रामविकास विभागानं तातडीनं ताब्यात घ्यावीत, या पुनर्वसित गावठाणांच्या विकासासाठी आवश्यक असणारा अतिरिक्त निधी ग्रामविकास विभागाला देण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. सह्याद्री अतिथीगृहात आज यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
दरड कोसळून तसंच भूस्खलनामुळे पूर्णपणे गाडल्या गेलेल्या वाड्या, वस्त्या, तांडे, पाडे आणि गावांमधल्या बाधितांनाही प्रकल्पग्रस्तांचा दर्जा देण्याचा निर्णयही आज घेण्यात आला. याशिवाय, बीड जिल्ह्यातल्या गुणवंती पाटबंधारे प्रकल्पातल्या सुकळी इथल्या प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव, खास बाब म्हणून मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्याच्या निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
****
छत्रपती संभाजीनगर विभागाच्या विभागीय आयुक्तपदी दिलीप गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गावडे २००७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. मधुकर राजे आर्दड सेवानिवृत्त झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.
****
टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतींचं चित्र स्पष्ट झालं आहे. परवा गुरुवारी सकाळी पहिला सामना दक्षिण अफ्रिका आणि अफगाणिस्तान या संघात तर याच दिवशी रात्री दुसरा सामना भारत आणि इंग्लंड संघात होणार आहे.
दरम्यान, आज सकाळी सेंट विन्सेंट इथं झालेल्या अटीतटीच्या सामन्यात अफगाणिस्ताननं बांगलादेशला डकवर्थ लुईस नियमाच्याआधारे पराभूत केलं. अफगाणिस्तानच्या या विजयामुळे ऑस्ट्रेलियाचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं आहे.
****
जालना जिल्हा क्रीडा संकुलात सध्या सुरु असलेली विविध क्रीडा प्रकारांच्या पायाभूत सुविधांची कामं जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले आहेत. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जिल्हा क्रीडा संकुलातल्या विविध विकास कामांचा पालकमंत्र्यांनी यावेळी आढावा घेतला.
****
राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि लातूर या चार जिल्ह्यातल्या चौदा वसतिगृहांमध्ये इयत्ता अकरावीपासून पुढच्या शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना नि:शुल्क प्रवेश दिला जाणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन छत्रपती संभाजीनगर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी केलं आहे.
****
लातूर जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींच्या वसतीगृहांची प्रवेश प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशा सूचना लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दिल्या आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित समाज कल्याण विभागाच्या विविध समितींच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. जिल्ह्यातले ऊसतोड कामगार आणि त्यांच्या पाल्यांची माहिती तातडीनं संकलित करून त्यांची नोंदणी करून घ्यावी, असे आदेशही त्यांनी यावेळी दिले.
****
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्‍य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दर महिन्‍याच्‍या २५ तारखेला, जिल्‍हा परिषदेच्या सर्व विभागांमध्ये स्‍वच्‍छता मोहीम राबवण्‍याचा उपक्रम हाती घेतला आहे. आज या मोहिमेचा मुख्यालयातून शुभारंभ करण्यात आला. करनवाल यांनी यावेळी स्वत: परिसराची स्वच्छता केली.
****
आजच्या अंगारकी चतुर्थीनिमित्त जालना जिल्ह्यातल्या राजुरेश्वर गणपतीच्या दर्शनासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली. पोलीस प्रशासनानं मंदिर परिसरात चोख बंदोबस्त ठेवला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
उद्या सव्वीस जूनला छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची दीडशेवी जयंती आहे. या दिनाच्या औचित्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्यापासून येत्या एक जुलैपर्यंत छत्रपती शाहू महाराजांचा जन्मोत्सव साजरा करणार आहे. यामध्ये येत्या तीस तारखेला रायगड जिल्ह्यातल्या माणगाव इथे सामाजिक सलोखा परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.
****
0 notes