#हैदराबाद विरुद्ध दिल्ली
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 17 September 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १७ सप्टेंबर २०२३ सकाळी ७.१० मि.
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज पी एम विश्वकर्मा योजनेला प्रारंभ
हैदराबाद मुक्तिदिनानिमित्त आज मराठवाड्यात ध्वजवंदनासह विविध कार्यक्रमांचं आयोजन
मराठवाड्याच्या कायापालटासाठी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सुमारे ४६ हजार कोटी रुपयांच्या विकास कामांची घोषणा
छत्रपती संभाजीनगर तसंच धाराशिव नामफलकांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
आणि
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज अंतिम सामन्यात भारत श्रीलंका लढत
****
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज नवी दिल्ली इथं पी एम विश्वकर्मा योजनेला प्रारंभ होणार आहेत. स्थानिक उत्पादनं, कला आणि हस्तकलेच्या माध्यमातून परंपरा, संस्कृती आणि वैविध्यपूर्ण वारसा जिवंत ठेवणं, हा या योजनेचा उद्देश आहे. १८ पारंपारिक कारागिर आणि कामगारांचा समावेश असलेल्या या योजनेच्या माध्यमातून उत्पादनं आणि सेवांची उपलब्धता आणि गुणवत्ता सुधारली जाणार आहे.
औरंगाबाद इथं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते विश्वकर्मा योजनेचा शुभारंभ होणार आहे. शहरातल्या संत एकनाथ नाट्य मंदिरात सकाळी साडेनऊ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
****
संगीत नाटक अकादमीचे अमृत पुरस्कार काल प्रदान करण्यात आले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते ८४ कलावंतांना यावेळी गौरवण्यात आल���. यामध्ये प्रभाकर मांडे यांच्यासह महाराष्ट्रातल्या पाच कलावंतांचा समावेश आहे. ताम्रपट, शाल आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे.
****
हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन आज साजरा होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते आज हैदराबाद इथं ध्वजारोहण केलं जाणार आहे. यावेळी ते सशस्त्र दलांकडून मानवंदना स्वीकारतील.
मराठवाड्यात मुक्तिदिनाचा मुख्य ध्वजवंदन समारोह आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं सिद्धार्थ उद्यानात होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यावेळी ध्वजारोहण करण्यात येईल. याच परिसरात मराठवाडा मुक्तिसंग्राम चित्रप्रदर्शनाला मुख्यमंत्री भेट देतील, तसंच दिवंगत स्वातंत्र्य सैनिक लाला लक्ष्मीनारायण जैस्वाल यांच्या तैलचित्राचं अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त मराठवाड्यात राज्य मंत्रिमंडळातल्या मान्यवर सदस्यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे. नांदेड इथं माता गुजरीजी विसावा उद्यानात गिरीश महाजन यांच्या हस्ते, जालना इथं अब्दुल सत्तार, बीड-धनंजय मुंडे, लातूर-संजय बनसोडे, परभणी-अतुल सावे, हिंगोली-संदिपान भुमरे, तर उस्मानाबाद इथं तानाजी सावंत यांच्याहस्ते झेंडावंदन होणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातही मराठवाडा मुक्तिदिनानिमित्त सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता ध्वजारोहण होईल. 
****
राज्यपाल रमेश बैस यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्यातल्या आणि विशेषतः मराठवाड्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. मुक्ती संग्रामात अनेक ज्ञात-अज्ञात देशभक्त नागरिकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं. मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यांमधल्या लोकांचं या लढ्यामध्ये भरीव योगदान होतं असं राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे.
****
हैदराबाद मुक्तीचा लढा सरंजामी व्यवस्थेविरोधात लोकशाही प्रस्थापनेसाठीचा लढा असल्याचं, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विधीज्ञ भगवानराव देशपांडे यांनी म्हटलं आहे. या मुक्तिसंग्रामातल्या सशस्त्र लढ्याला गांधीजींचा पाठिंबा असल्याचं देशपांडे यांनी नमूद केलं. ते म्हणाले....
‘‘हैदराबादचा मुक्तिसंग्राम सर्वसाधारणपणे लोकांचा समज आहे की मुसलमानांच्या विरुद्ध हिंदूचा लढा आहे. पण तसं नाही. तो लढा होता सरंजामी व्यवस्थेच्या विरुद्ध लोकशाही प्रस्थापनेसाठी. जबाबदार राज्यपद्धती आम्हाला पाहिजे, हे आमचं स्लोगन होतं. यासाठी आम्ही विद्यार्थी मोठे मोठे प्रोसेशन काढून म्हणत होतो, ले के रहेंगे जिम्मेदारी हुकूमत ले के रहेंगे. जबाबदार राज्यपद्धती हा गाभा होता हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या सशस्त्र लढ्याला गांधीजींचा पाठिंबा होता. स्वामी रामानंदी तीर्थ गांधीजीं��ा भेटायला गेले, ते म्हणाले की रझाकारांचा हैदोस फार मोठा आहे. गांधीजींनी हे विचारलं की, तुम्ही काय करावं म्हणता.. आम्ही सशस्त्र दलं उभे करणार आहोत. ते म्हणाले, स्वसंरक्षणार्थ जर शस्त्र हाती घ्यायचं असेल, तर माझी काही हरकत नाही.’’
मराठवाड्यात विविध कार्यक्रमांनी मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे.
जालना महापालिकेतर्फे काल शालेय विद्यार्थ्‍यांची प्रभात फेरी काढण्‍यात आली. यावेळी माझी माती, माझा देश अभियानांतर्गत विविध भागातून संकलित केलेली माती विद्यार्थी आणि शिक्षकांच्या हस्ते अमृत कलशामध्ये एकत्र करण्यात आली.
धाराशिव जिल्ह्यात रुईभर, देवळाली, मेडसिंगा, खामसवाडी आणि बरमगाव या गावांतल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकांचं काल आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. नळदुर्ग इथं साडेआठ हेक्टर क्षेत्रावर भव्य स्मृती उद्यान साकारलं जाणार आहे. सुमारे तीस कोटी रुपयांच्या या स्मृती उद्यानाचा प्रस्ताव शासनाकडे सादर केल्याचं पाटील यांनी सांगितलं
लातूर इथं मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष आणि आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षानिमित्त ‘तृणधान्य फेरी’ काढण्यात आली. आठवड्यातून किमान एकदा तृणधान्यांचं सेवन करावं असं आवाहन कृषी अधीक्षक शिवसांब लाडके यांनी यावेळी केलं.
परभणी इथंही काल शालेय विद्यार्थ्यांची प्रभातफेरी काढण्यात आली.
छत्रपती संभाजीनगर इथं काल गर्जा मराठवाडा हा सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मुक्ती संग्रामात सहभागी स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या वारसांचा भाजपच्या वतीनं काल सत्कार करण्यात आला.
****
मराठवाड्याचा कायापालट करण्यासाठी १४ हजार कोटी रुपयांच्या सिंचन प्रकल्पांसह सुमारे ४६ हजार कोटी रुपयांपेक्���ा अधिकच्या विकास कामांचे निर्णय छत्रपती संभाजीनगर इथं काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्या सह राज्य मंत्रिमंडळातले अनेक सदस्य यावेळी उपस्थित होते. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
‘‘सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये बारा हजार नऊशे अडतीस कोटी पंच्याऐंशी लाख रूपये, पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्यव्यवसाय तीन हजार तीनशे अठरा कोटी चोपन लाख, नियोजन एक हजार सहाशे आठ कोटी अठ्‌ठावीस लाख, परिवहन एक हजार एकशे अठ्ठावीस कोटी एकोणसत्तर लाख, ग्राम विकास एक दोनशे अठ्ठ्याण्णव कोटी, कृषी विभाग सातशे नऊ कोटी, क्रीडा विभाग सहाशे शहाण्णव कोटी, गृह विभाग सहाशे चौऱ्याऐंशी कोटी, वैद्यकीय शिक्षण चारशे अठ्ठ्याण्णव कोटी, आणि महिला व बाल विकास तीनशे शहाऐंशी कोटी, शालेय शिक्षण चारशे नव्वद कोटी, सार्वजनिक आरोग्य पस्तीस कोटी, सामान्य प्रशासन दोनशे सत्याऐंशी कोटी, नगरविकास दोनशे एक्याऐंशी कोटी, सांस्कृतिक कार्यविभाग दोनशे त्रेपन्न कोटी, पर्यटन पंच्याण्णव कोटी, मदत पुनर्वसन अठ्ठ्याऐंशी कोटी, वनविभाग पासष्ट कोटी, महसूल विभाग त्रेसष्ट कोटी, उद्योग विभाग अडतीस कोटी, वस्त्रोद्योग पंचवीस कोटी, कौशल्य विभाग दहा कोटी, विधी व न्याय तीन कोटी पंच्याऐंशी लाख एकूण आपले पंचेचाळीस हजार कोटी रूपयांचा निर्णय झालेला आहे.’’
नांदेड, सोयगाव तसंच परळी इथं कृषी महाविद्यालय, हिंगोली इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धाराशिव इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास भूखंड, परळी इथं सोयाबीन संशोधन उपकेंद्र, आष्टी इथं उपजिल्हा रुग्णालयास मंजुरी, अंबाजोगाई इथं लाल कंधारी तसंच देवणी गोवंश पशू पैदास केंद्र, छत्रपती संभाजीनगर इथं फिरती भ्रूण प्रत्यारोपण प्रयोगशाळा, सिल्लोड येथे दिवाणी न्यायालय, पैठण इथल्या संत ज्ञानेश्वर उद्यानाचा विकास, छत्रपती संभाजीनगर इथल्या ३०० वर्षे जुन्या तीन पुलांचं नूतनीकरण, नांदेड शहरात सीसीटीव्ही यंत्रणा, जालना इथं आयटीआय इन्क्युबेशन सेंटर, तुळजापूर-वेरुळसह तीर्थक्षेत्र विकास, गोर बंजारा समाजभवनासाठी नवी मुंबईत भूखंड, समग्र शिक्षामधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनात १० टक्के वाढ, वरिष्ठ निवासी डॉक्टरांना दरमहा ८५ हजार रुपये मानधन, महिला सक्षमीकरणासाठी १ हजार ७६ कोटींची वाढीव तरतूद, सौर ऊर्जा कुंपणासाठी थेट निधी हस्तांतरण, ‘दत्तक शाळा योजना’ यासह अनेक निर्णयांना मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी सुमारे १३ हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. स्वामी रामानंद तीर्थ यांचा दिल्लीत पुतळा उभारण्याचा प्रस्तावही मार्गी लावण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
मराठवाड्यात सुरू असलेल्या कामांची विभागनिहाय माहितीही मुख्यमंत्री सचिवालयायाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, आदर्श नागरी पतसंस्थेच्या ठेवीदारांनी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात मंत्रिमंडळ बैठकीवर मोर्चा काढला. पोलिसांनी मोर्चा अडवल्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मोर्चाला सामोरं जात, तत्काळ कारवाईचं आश्वासन दिलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संबंधितांच्या मालमत्ता जप्त करून ठेवीदारां��्या ठेवी परत करण्याचं आश्वासन दिलं आहे.
विविध पक्ष संघटनांच्या वतीनं काल आपल्या मागण्या��साठी आंदोलन करून शासनाला निवेदन सादर केलं, राज्यात दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्यांसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं, बंजारा समाजाच्या वतीनंही आपल्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला. मराठा क्रांती मोर्चा, वंचित बहुजन आघाडी, कर्णबधीर संघटना, श्रमिक वृत्तपत्र विक्रेता संघटना आदींनीही काल आंदोलन केलं.
दरम्यान मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी छत्रपती संभाजीनगर तालुका-जिल्हा-विभाग नामकरण फलक तसंच धाराशिव तालुका-जिल्हा नामकरण फलकाचं अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विविध प्रकल्प इमारतींचं ऑनलाईन भूमिपूजन तसंच लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी झालं.
****
छत्रपती संभाजीनगर इथं काल मंत्रिमंडळीत बैठकीनंतर जाहीर केलेले निर्णय हा फक्त आकड्यांचा खेळ असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मराठवाडा दुष्काळाच्या सावटाखाली असताना, राज्य सरकारने दुष्काळ जाहीर न करून शेतकऱ्यांची थट्टा केली असल्याची टीका पटोले यांनी केली.
****
अवघ्या ५० मिनिटांच्या मंत्रिमंडळ बैठकीसाठी शेकडो कोटी रुपये खर्च करूनही मराठवाड्यासाठी रचनात्मक निर्णय घेतले नसल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. नदीजोड प्रकल्पाचं सर्वेक्षणच अद्याप प्रलंबित असल्याने कोणत्या कामासाठी सरकारने निधी जाहीर केला, असा प्रश्न दानवे यांनी विचारला. महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मराठवाडा वॉटर ग्रीड योजनेअंतर्गत पैठण, गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील गावांसाठी दीड हजार कोटीच्या आसपास निधी मंजूर करण्यात आला होता, याकडे दानवे यांनी लक्ष वेधलं.
****
मंत्रिमंडळाच्या बैठकीतून लातूर जिल्ह्याची निराशा झाल्याचं मत माजी मंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. मराठवाड्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होऊन अनुशेष दूर होईल ही अपेक्षा होती मात्र ती फोल ठरल्याची टीका देशमुख यांनी केली आहे.
****
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताची लढत आज श्रीलंकेशी होणार आहे. दुपारी तीन वाजता हा सामना सुरू होईल.
****
अमेरिकेतल्या ओरेगॉन इथं डायमंड लिग क्रीडा स्पर्धेत भारताच्या नीरज चोप्रानं रौप्यपदक पटकावलं. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८३ पूर्णांक ८० मीटर अंतरावर भाला फेकला.
****
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय घाटी रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला. अतिविशेषोपचार रुग्णालयातल्या नवीन कॅथलॅबचे मुश्रीफ यांच्या हस्ते यावेळी उद्घाटन करण्यात आलं.
****
जा��ना तालुक्यातल्या सिरसवाडी इथं उभारण्यात आलेल्या रेशीम कोष बाजारपेठेची काल वस्त्रोद्योग विभागाचे सचिव विरेंद्र सिंग यांनी पाहणी केली. जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्ह्यातल्या रेशीम शेतीसह धागा निर्मिती प्रकल्पाबाबत यावेळी माहिती दिली.
****
हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ तालुक्यात जवळा बाजार इथं काल पोषण आहार आणि किशोरवयीन आरोग्यावर जनजागृती कार्यक्रम झाला. पोषण आहार तसंच रानभाज्या आणि त्यापासून बनवलेल्या पदार्थांचं प्रदर्शन यानिमित्त भरवण्यात आलं होतं.
****
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
DC vs SRH: दिल्लीने हैदराबादचा २१ धावांनी पराभव केला, खलील अहमदने ३ बळी घेतले
DC vs SRH: दिल्लीने हैदराबादचा २१ धावांनी पराभव केला, खलील अहमदने ३ बळी घेतले
डेव्हिड वॉर्नर रोव्हमन पॉवेल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादचा २१ धावांनी पराभव केला. आयपीएल 2022 च्या 50 व्या सामन्यात दिल्लीने विजयासाठी 208 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात हैदराबादचा संघ केवळ 186 धावा करू शकला. डेव्हिड वॉर्नर आणि रोव्हमन पॉवेल यांनी दिल्लीकडून दमदार फलंदाजी केली. तर खलील अहमदने गोलंदाजीत अप्रतिम कामगिरी केली.…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
IPL 2022 DC vs SRH रोवमन पॉवेलने ऋषभ पंतला पाचव्या क्रमांकावर विश्वास ठेवण्यास सांगितले-
IPL 2022 DC vs SRH रोवमन पॉवेलने ऋषभ पंतला पाचव्या क्रमांकावर विश्वास ठेवण्यास सांगितले-
आयपीएल-15 मध्ये आतापर्यंत वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या रोव्हमन पॉवेलने कर्णधार ऋषभ पंतला पाचव्या क्रमांकाचा फलंदाज आणि दिल्ली कॅपिटल्स (DC) सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्धच्या सामन्यादरम्यान त्याच्यावर विश्वास दाखवण्यास सांगितले होते. विजय, त्याने त्याच्या आवडत्या स्थानावर उतरून धडाकेबाज खेळी खेळली. पॉवेलने गुरुवारी येथे 35 चेंडूत नाबाद 67 धावा केल्या आणि डेव्हिड वॉर्नर (नाबाद 92) सोबत…
Tumblr media
View On WordPress
0 notes
abhay121996-blog · 4 years ago
Text
IPL 2021: मुंबई इंडियंस कब और कहां खेलेगी अपने मैच, जानिए शेड्यूल और जरूरी बातें Divya Sandesh
#Divyasandesh
IPL 2021: मुंबई इंडियंस कब और कहां खेलेगी अपने मैच, जानिए शेड्यूल और जरूरी बातें
डेस्क। मुंबई इंडियंस 09 अप्रैल को रॉयल चैलेंजर्स बेंगलोर के विरुद्ध अपने अभियान की पहल करेगी, जो टूर्नामेंट का पूर्व मैच भी होगा। यह मैच चेन्नई में शाम 7.30 बजे से खेला जाएगा। 
इंडियन प्रीमियर लीग का 14वां सीजन मतलब आईपीएल 2021 09 अप्रैल, से 30 मई के मध्य खेला जाएगा। आईपीएल के 14वें सीज़न का पूर्व मैच 09 अप्रैल को चेन्नई में मौजूदा चैम्पियन मुंबई इंडियंस एवं रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु के बीच शाम 7.30 बजे खेला जाएगा। वहीं आईपीएल 2021 का फाइनल मैच अहमदाबाद के नरेंद्र मोदी स्टेडियम में 30 मई को होगा। 
बता दें कि आईपीएल 2021 में कुल 11 डबल हेडर्स मुकाबले होंगे, जहां छह टीमें दोपहर में 3 मैच और दो टीमें दोपहर में दो मैच खेलेंगी। दोपहर के मुकाबले साढ़े तीन बजे एवं शाम के मैच साढ़े सात बजे प्रारंभ होंगे। 
यह खबर भी पढ़ें: इस देश की लड़कियां नहीं पहन सकती हैं अंडरगार्मेंट्स, जानिए वजह
मुंबई इंडियंस का पूरा शेड्यूल: 9 अप्रैल, शुक्रवार शाम 7.30 बजे, चेन्नई : मुंबई इंडियंस बनाम रॉयल चैलेंजर्स बेंगलोर 13 अप्रैल, मंगलवार शाम 7.30 बजे चेन्नई : कोलकाता नाइट राइडर्स बनाम मुंबई इंडियंस 17 अप्रैल, शनिवार शाम 7.30 बजे चेन्नई : मुंबई इंडियंस बनाम सनराइजर्स हैदराबाद 20 अप्रैल, मंगलवार शाम 7.30 बजे चेन्नई : दिल्ली कैपिटल्स बनाम मुंबई इंडियंस 23 अप्रैल, शुक्रवार शाम 7.30 बजे चेन्नई : पंजाब किंग्स बनाम मुंबई इंडियंस 29 अप्रैल, गुरुवार 3.30 नई दिल्ली : मुंबई इंडियंस बनाम राजस्थान रॉयल्स 1 मई, शनिवार शाम 7.30 बजे ��ई दिल्ली : मुंबई इंडियंस बनाम चेन्नई सुपर किंग्स 4 मई, मंगलवार शाम 7.30 बजे नई दिल्ली : सनराइजर्स हैदराबाद बनाम मुंबई इंडियंस 8 मई, शनिवार शाम 7.30 बजे नई दिल्ली : राजस्थान रॉयल्स बनाम मुंबई इंडियंस 10 मई, सोमवार शाम 7.30 बजे बेंगलुरु : मुंबई इंडियंस बनाम कोलकाता नाइट राइडर्स 13 मई, गुरुवार 3.30 बजे बेंगलुरु : मुंबई इंडियंस बनाम पंजाब किंग्स 16 मई, रविवार शाम 7.30 बजे बेंगलुरु : चेन्नई सुपर किंग्स बनाम मुंबई इंडियंस 20 मई, गुरुवार 3.30 बजे कोलकाता : रॉयल चैलेंजर्स बैंगलोर बनाम मुंबई इंडियंस 23 मई, रविवार दोपहर 3.30 बजे कोलकाता : मुंबई इंडियंस बनाम दिल्ली कैपिटल्स। 
मुंबई ने नीलामी में खरीदे थे सात खिलाड़ी: उल्लेखनीय है कि मुंबई इंडियंस ने आईपीएल 2021 की नीलामी में कुल 7 खिलाड़ियों को खरीदा था। मुंबई ने एडम मिल्ने (3.20 करोड़ रुपये), नाथन कुल्टर नाइल (पांच करोड़ रुपये), पीयुष चावला (2.20 करोड़ रुपये), युद्धवीर चरक (20 लाख रुपये), मार्को जैनसन (20 लाख रुपये), अर्जुन तेंदुलकर (20 लाख रुपये) और जेम्स नीशम (50 लाख रुपये) को खरीदा था। 
नीलामी के बाद मुंबई की पूरी टीम: मुंबई इंडियंस- रोहित शर्मा (कप्तान), क्विंटन डीकॉक, आदित्‍य तारे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, ट्रेंट बोल्‍ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, कीरन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, क्रिस लिन, राहुल चाहर, हार्दिक पंड्या, अनमोलप्रीत सिंह, मोहसिन खान, अनुकूल रॉय, इशान किशन, नाथन कुल्टर नाइल, पीयूष चावला , युद्धवीर चरक, मार्को जैनसन, अर्जुन तेंदुलकर और जिमी नीशम। 
Download app: अपने शहर की तरो ताज़ा खबरें पढ़ने के लिए डाउनलोड करें संजीवनी टुडे ऐप  
0 notes
digimakacademy · 4 years ago
Photo
Tumblr media
IPL Qualifier 2: आज फायनलसाठी लढत, सनरायजर्सला रोखू शकतील का दिल्लीकर अबुधाबी: आयपीएलच्या १३व्या हंगामात आज क्वालिफायर २ मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात लढत होणार आहे.
0 notes
vsplusonline · 5 years ago
Text
क्रिकेट का 'ग्लैमर ब्वॉय'... 61 साल पहले मचाई थी धूम, लड़की ने लिया था चूम - abbas ali baig birthday first indian to score an overseas test hundred on test debut tspo
New Post has been published on https://apzweb.com/%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%9f-%e0%a4%95%e0%a4%be-%e0%a4%97%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%88%e0%a4%ae%e0%a4%b0-%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%89%e0%a4%af-61/
क्रिकेट का 'ग्लैमर ब्वॉय'... 61 साल पहले मचाई थी धूम, लड़की ने लिया था चूम - abbas ali baig birthday first indian to score an overseas test hundred on test debut tspo
Tumblr media
टेस्ट क्रिकेट में पदार्पण करते ही शतक जड़ने का जिक्र करें, तो अब तक भारत के 15 बल्लेबाजों ने अपने डेब्यू टेस्ट में शतक जमाया है. भारत की ओर से पहला शतक जमाने का कीर्तिमान लाला अमरनाथ के नाम दर्ज है. उन्होंने वो शतक अपने पदार्पण टेस्ट में जमाया था. इंग्लैंड के खिलाफ तत्कालीन बंबई के जिमखाना ग्राउंड पर लाला ने वह उपलब्धि हासिल की थी. डेब्यू में शतक की फेहरिस्त में एक ऐसा नाम भी शामिल है, जिसने ‘ग्लैमर ब्यॉय’ के तौर पर धूम मचाई थी.
विदेशी धरती पर डेब्यू में ही शतक जड़ दिया
… लेकिन विदेशी धरती अपने डेब्यू मैच में ही शतक जड़ने का कारनामा अब्बास अली बेग ने किया था. 1939 में हैदराबाद में जन्मे अब्बास अली बेग आज 81 साल के हो गए. विजय मांजरेकर के चोटिल होने के बाद अब्बास अली बेग को भारतीय टेस्ट टीम में शामिल किया गया था. उन्होंने जुलाई 1959 में इंग्लैंड के खिलाफ मैनचेस्टर टेस्ट के दौरान डेब्यू करते हुए नाबाद 112 रनों की पारी खेली थी.
अब्बास अली बेग के इस शतक की खास बात यह रही कि तब वह भारत की ओर से सबसे कम उम्र में टेस्ट शतक जमाने वाले बल्लेबाज बन गए थे. उन्होंने 20 साल 131 दिन की उम्र में यह शतक जमाया था. अब यह रिकॉर्ड सचिन तेंदुलकर के नाम है, जिन्होंने 17 साल 112 दिन की उम्र में अपना पहला शतक जड़ा था.
भारतीय बैट्समैन- सबसे कम उम्र में पहला टेस्ट शतक
17 साल 112 दिन: सचिन तेंदुलकर Vs इंग्लैंड, मैनचेस्टर, 1990
18 साल 329 दिन: पृथ्वी शॉ Vs वेस्टइंडीज, राजकोट, 2018 (डेब्यू)
20 साल 21दिन: कपिल देव Vs वेस्टइंडीज, दिल्ली, 1979
20 साल 131 दिन: अब्बास अली बेग Vs इंग्लैंड, मैनचेस्टर, 1959 (डेब्यू)
व��से, अब्बास अली बेग भारत के उन दुर्भाग्यशाली खिलाड़ियों में शामिल हैं, जो अपने पहले टेस्ट में शतक जड़ने के बाद दोबारा शतक नहीं बना पाए और करियर समाप्त हो गया. उनमें लाला अमरनाथ का डेब्यू शतक भी शामिल है, जो उनके करियर का एकमात्र शतक साबित हुआ.
अब्बास अली बेग ने पदार्पण करते हुए शतक जड़ने के बाद उसी साल मजबूत ऑस्ट्रेलिया के खिलाफ घरेलू सीरीज में भी अच्छी बल्लेबाजी की. बेग ने 1959-60 की उस पांच टेस्ट मैचों की सीरीज के तीसरे टेस्ट में 50 और 58 रनों की पारी खेलकर ‘बंबई’ टेस्ट ड्रॉ कराने में अहम भूमिका निभाई.
ब्रेबॉर्न स्टेडियम में हुआ ‘अजब-गजब’
उन दिनों अब्बास अली बेग का नाम भारतीय प्रशंसकों में छा गया था. 1960-70 के दशक में भारतीय क्रिकेट के ग्लैमर ब्वॉय के तौर पर उनका नाम लिया जाने लगा था. ऑस्ट्रेलिया के खिलाफ उस सीरीज का तीसरा टेस्ट मैच तत्कालीन बंबई के ब्रेबॉर्न स्टेडियम में खेला गया था, जहां उनकी बल्लेबाजी की फैन बनी एक युवती ने उन्हें मैदान में ही चूम लिया.
वो 6 जनवरी 1960 का दिन था, जब क्रिकेट फैन की इस हरकत से खेल जगत रोमांचित हो उठा था. अब्बास अली बेग इससे हैरान और चिंचित भी थे. उन्होंने एक इंटरव्यू में बताया- ‘हम चाय के लिए वापस आ रहे थे और अचानक एक युवती निकल आई और मुझे चूमने लगी, मैं पीछे हटता गया. मुझे इस बात का डर था कि मेरे माता-पिता क्या सोचेंगे, जो उस वक्त स्टेडियम में मौजूद थे. वे यही कहेंगे न.. हमने अपने लड़के को इंग्लैंड भेज दिया, क्या वह भटक गया है..? ‘
Tumblr media
हैदराबाद के स्टेडियम में अब्बास अली बेग स्टैंड
…लेकिन उसके बाद पाकिस्तान के विरुद्ध टेस्ट सीरीज में वह खराब फॉर्म की वजह से निशाने पर आ गए और उन्हें टीम से बाहर कर दिया गया. रणजी ट्रॉफी और दलीप ट्रॉफी टूर्नामेंट में शानदार बल्लेबाजी के बावजूद उन्हें टेस्ट टीम में मौका नहीं दिया गया. छह साल के बाद वेस्टइंडीज के खिलाफ घरेलू सीरीज में उनकी वापसी हुई, लेकिन इसके बाद वह दो ही टेस्ट खेल पाए.
यानी… अब्बास अली बेग का टेस्ट करियर महज 10 मैचों का रहा और उन्होंने 23.77 की ��सत से 428 रन बनाए. 236 प्रथम श्रेणी मैचों (1954/55 – 1975/76) में उन्होंने 21 शतक और 64 अर्धशतकों के साथ 12367 (औसत 34.16) रन बनाए.
…एक और दृश्य ने सुर्खियां बटोरी थीं
क्रिकेटरों को चूमने की बात करें, तो 1960 में मुंबई के ब्रेबॉर्न स्टेडियम में ऑस्ट्रेलिया के खिलाफ टेस्ट में अब्बास अली बेग से जुड़ा यह वाकया छाया रहा. इसके बाद मुंबई में ही (वानखेड़े स्टेडियम) 1975 में एक और दृश्य ने सुर्खियां बटोरी थीं.
Sorry this #SareeTwitter cannot be beaten pic.twitter.com/MPyHJyLgE3
— Indradeep Khan (@IndradeepKhan) July 18, 2019
…तब वेस्टइंडीज के खिलाफ टेस्ट मैच साड़ी पहनी एक युवती ने बृजेश पटेल को चूमा था, जब उन्होंने अर्धशतक पूरा किया. यह वीडियो ट्विटर पर मौजूद है. ये वही बृजेश पटेल हैं, जो आईपीएल संचालन समिति के मौजूदा अध्यक्ष हैं.
आजतक के नए ऐप से अपने फोन पर पाएं रियल टाइम अलर्ट और सभी खबरें. डाउनलोड करें
Tumblr media Tumblr media
!function(e,t,n,c,o,a,f)(o=e.fbq=function()o.callMethod?o.callMethod.apply(o,arguments):o.queue.push(arguments),e._fbq(window,document,"script"),fbq("init","465285137611514"),fbq("track","PageView"),fbq('track', 'ViewContent'); Source link
0 notes
rohtakmedia-blog · 6 years ago
Text
श्रेयस अय्यर बने भारत के सबसे बड़े T-20 बल्लेबाज
Tumblr media
श्रेयस अय्यर बने भारत के सबसे बड़े T-20 बल्लेबाज : मुंबई के धाकड़ बल्लेबाज श्रेयस अय्यर ने गुरुवार को कमाल की बल्लेबाजी कर बड़ा रिकॉर्ड अपने नाम कर लिया . 24 साल के अय्यर टी-20 में सबसे बड़ी पारी (147 रन) खेलने वाले भारतीय बल्लेबाज बन गए हैं. इसके साथ ही उन्होंने वर्ल्ड कप- 2019 के लिए ��ारतीय दल चुनने के करीब जा पहुंचे चयनकर्ताओं के समक्ष अपना दावा पेश किया है. इंदौर के एमराल्ड हाई स्कूल ग्राउंड पर सैयद मुश्ताक अली टी-20 टूर्नामेंट में मुंबई ने सिक्किम के खिलाफ 258/4 रन बनाए. शुरुआती दो विकेट महज 22 रनों पर गंवाने के बाद अय्यर ने मोर्चा संभाला और तूफानी प्रहार किए. इससे पहले कप्तान अजिंक्य रहाणे (11) और पृथ्वी शॉ (10) सस्ते में लौट चुके थे. इन्हे भी पढ़े :- WhatsApp की खामी या बड़ी चूक? लॉक फीचर में आसानी से सेंध श्रेयस अय्यर ने 55 गेंदों में 15 छक्के और 7 चौके की मदद से 147 रन बनाए. उन्होंने तीसरे विकेट के लिए सूर्यकुमार यादव (33 गेंदों में 63 रन ) के साथ 213 रनों की जोरदार भागीदारी की. इसके साथ ही श्रेयस अय्यर टी-20 की एक पारी में सर्वाधिक रन बनाने वाले बल्लेबाज बन गए. इससे पहले यह रिकॉर्ड ऋषभ पंत के नाम था, जिन्होंने 10 मई 2018 को फिरोजशाह कोटला में दिल्ली डेयरडेविल्स की ओर खेलते हुए सनराइजर्स हैदराबाद के खिलाफ 63 गेंदों में 128 रनों की नाबाद पारी खेली थी. टी-20 की एक पारी में सर्वाधिक रन बनाने वाले भारतीय बल्लेबाज 1. 147 रन, श्रेयस अय्यर (मुंबई) विरुद्ध सिक्किम, इंदौर 2019 2. 128* रन, ऋषभ पंत (दिल्ली डेयरडेविल्स) विरुद्ध सनराइजर्स हैदराबाद, दिल्ली 2018 3. 127 रन, मुरली विजय (चेन्नई सुपर किंग्स) विरुद्ध राजस्थान रॉयल्स, चेन्नई 2010 दूसरी तरफ मुंबई की टीम (258/4) 6 रनों से टी-20 में सर्वाधिक स्कोर का रिकॉर्ड बनाने से चूक गई. दरअसल टी-20 में सबसे बड़ा स्कोर का रिकॉर्ड रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (RCB ) के नाम है, जिसने 2013 में पुणे वॉरियर्स के खिलाफ 263/5 रन बनाए थे. 259 रनों के पहाड़ से लक्ष्य का पीछा करते हुए सिक्किम की टीम 104/7 रन ही बना पाई और मुंबई ने 154 रनों से मैच जीत लिया. यह टी-20 रनों के लिहाज से छठी बड़ी जीत है. इन्हे भी पढ़े :- पॉलिटिक्स में आएंगी दीपिका पादुकोण? बताया कौन सी मंत्री बनना चाहती हैं श्रेयस अय्यर बने भारत के सबसे बड़े T-20 बल्लेबाज स्त्रोत :- aajtak छायाचित्र भिन्न हो सकता है Read the full article
0 notes
darshaknews · 3 years ago
Text
वॉर्नर-पॉवेलच्या झंझावाती कामगिरीमुळे दिल्लीने हैदराबादसमोर ठेवले 208 धावांचे लक्ष्य
वॉर्नर-पॉवेलच्या झंझावाती कामगिरीमुळे दिल्लीने हैदराबादसमोर ठेवले 208 धावांचे लक्ष्य
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद डेव्हिड वॉर्नर रोव्हमन पॉवेल IPL 2022: दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादला विजयासाठी 208 धावांचे लक्ष्य ठेवले होते. डेव्हिड वॉर्नर आणि रोव्हमन पॉवेल यांनी दिल्लीसाठी चमकदार कामगिरी केली. वॉर्नरने 12 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने नाबाद 92 धावा केल्या. तर पॉवेलने नाबाद ६७ धावांची खेळी केली. तर हैदराबादकडून भुवनेश्वर कुमारने चांगली गोलंदाजी केली. त्याने…
View On WordPress
0 notes
loksutra · 3 years ago
Text
IPL 2022 DC vs SRH रोव्हमन पॉवेल गरिबीतून क्रिकेटच्या श्रीमंतीकडे
IPL 2022 DC vs SRH रोव्हमन पॉवेल गरिबीतून क्रिकेटच्या श्रीमंतीकडे
आयपीएल 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी (DC) चमकदार कामगिरी करणारा कॅरेबियन खेळाडू रोव्हमन पॉवेल अत्यंत खडतर जीवन जगला. तिचा जन्मही झाला नव्हता तेव्हा आईचा आधार पिताने मागे सोडला होता. परिस्थिती अशी होती की त्यांना दोन वेळची भाकरही मिळत नव्हती. टिनाचे छत असलेल्या मोडकळीस आलेल्या घरात तो राहत होता. परिस्थिती इतकी बिकट होती की जमैकाच्या या खेळाडूला शेळीही चरावी लागली. जेव्हा रोवमनची आई जोन प्लमरला…
Tumblr media
View On WordPress
0 notes
abhay121996-blog · 4 years ago
Text
IPL 2021: मुंबई इंडियंस कब और कहां खेलेगी अपने मैच, जानिए शेड्यूल और जरूरी बातें Divya Sandesh
#Divyasandesh
IPL 2021: मुंबई इंडियंस कब और कहां खेलेगी अपने मैच, जानिए शेड्यूल और जरूरी बातें
डेस्क। मुंबई इंडियंस 09 अप्रैल को रॉयल चैलेंजर्स बेंगलोर के विरुद्ध अपने अभियान की पहल करेगी, जो टूर्नामेंट का पूर्व मैच भी होगा। यह मैच चेन्नई में शाम 7.30 बजे से खेला जाएगा। 
इंडियन प्रीमियर लीग का 14वां सीजन मतलब आईपीएल 2021 09 अप्रैल, से 30 मई के मध्य खेला जाएगा। आईपीएल के 14वें सीज़न का पूर्व मैच 09 अप्रैल को चेन्नई में मौजूदा चैम्पियन मुंबई इंडियंस एवं रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु के बीच शाम 7.30 बजे खेला जाएगा। वहीं आईपीएल 2021 का फाइनल मैच अहमदाबाद के नरेंद्र मोदी स्टेडियम में 30 मई को होगा। 
बता दें कि आईपीएल 2021 में कुल 11 डबल हेडर्स मुकाबले होंगे, जहां छह टीमें दोपहर में 3 मैच और दो टीमें दोपहर में दो मैच खेलेंगी। दोपहर के मुकाबले साढ़े तीन बजे एवं शाम के मैच साढ़े सात बजे प्रारंभ होंगे। 
यह खबर भी पढ़ें: इस देश की लड़कियां नहीं पहन सकती हैं अंडरगार्मेंट्स, जानिए वजह
मुंबई इंडियंस का पूरा शेड्यूल: 9 अप्रैल, शुक्रवार शाम 7.30 बजे, चेन्नई : मुंबई इंडियंस बनाम रॉयल चैलेंजर्स बेंगलोर 13 अप्रैल, मंगलवार शाम 7.30 बजे चेन्नई : कोलकाता नाइट राइडर्स बनाम मुंबई इंडियंस 17 अप्रैल, शनिवार शाम 7.30 बजे चेन्नई : मुंबई इंडियंस बनाम सनराइजर्स हैदराबाद 20 अप्रैल, मंगलवार शाम 7.30 बजे चेन्नई : दिल्ली कैपिटल्स बनाम मुंबई इंडियंस 23 अप्रैल, शुक्रवार शाम 7.30 बजे चेन्नई : पंजाब किंग्स बनाम मुंबई इंडियंस 29 अप्रैल, गुरुवार 3.30 नई दिल्ली : मुंबई इंडियंस बनाम राजस्थान रॉयल्स 1 मई, शनिवार शाम 7.30 बजे नई दिल्ली : मुंबई इंडियंस बनाम चेन्नई सुपर किंग्स 4 मई, मंगलवार शाम 7.30 बजे नई दिल्ली : सनराइजर्स हैदराबाद बनाम मुंबई इंडियंस 8 मई, शनिवार शाम 7.30 बजे नई दिल्ली : राजस्थान रॉयल्स बनाम मुंबई इंडियंस 10 मई, सोमवार शाम 7.30 बजे बेंगलुरु : मुंबई इंडियंस बनाम कोलकाता नाइट राइडर्स 13 मई, गुरुवार 3.30 बजे बेंगलुरु : मुंबई इंडियंस बनाम पंजाब किंग्स 16 मई, रविवार शाम 7.30 बजे बेंगलुरु : चेन्नई सुपर किंग्स बनाम मुंबई इंडियंस 20 मई, गुरुवार 3.30 बजे कोलकाता : रॉयल चैलेंजर्स बैंगलोर बनाम मुंबई इंडियंस 23 मई, रविवार दोपहर 3.30 बजे कोलकाता : मुंबई इंडियंस बनाम दिल्ली कैपिटल्स। 
मुंबई ने नीलामी में खरीदे थे सात खिलाड़ी: उल्लेखनीय है कि मुंबई इंडियंस ने आईपीएल 2021 की नीलामी में कुल 7 खिलाड़ियों को खरीदा था। मुंबई ने एडम मिल्ने (3.20 करोड़ रुपये), नाथन कुल्टर नाइल (पांच करोड़ रुपये), पीयुष चावला (2.20 करोड़ रुपये), युद्धवीर चरक (20 लाख रुपये), मार्को जैनसन (20 लाख रुपये), अर्जुन तेंदुलकर (20 लाख रुपये) और जेम्स नीशम (50 लाख रुपये) को खरीदा था। 
नीलामी के बाद मुंबई की पूरी टीम: मुंबई इंडियंस- रोहित शर्मा (कप्तान), क्विंटन डीकॉक, आदित्‍य तारे, सौरभ तिवारी, जसप्रीत बुमराह, धवल कुलकर्णी, ट्रेंट बोल्‍ट, जयंत यादव, सूर्यकुमार यादव, कीरन पोलार्ड, क्रुणाल पंड्या, क्रिस लिन, राहुल चाहर, हार्दिक पंड्या, अनमोलप्रीत सिंह, मोहसिन खान, अनुकूल रॉय, इशान किशन, नाथन कुल्टर नाइल, पीयूष चावला , युद्धवीर चरक, मार्को जैनसन, अर्जुन तेंदुलकर और जिमी नीशम। 
Download app: अपने शहर की तरो ताज़ा खबरें पढ़ने के लिए डाउनलोड करें संजीवनी टुडे ऐप  
0 notes
airnews-arngbad · 6 years ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद संक्षिप्त बातमीपत्र ०२ जानेवारी  २०१९ सकाळी ११.०० वाजता.
तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेमध्ये सादर होत आहे. कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद हे विधेयक सदनात मांडतील. मागच्या आठवड्यात लोकसभेत विरोधी पक्षांच्या सभात्यागानंतरही हे विधेयक मंजूर झालं होतं, मात्र राज्यसभेत हे विधेयक, विरोधी पक्षांच्या, या विधेयकाच्या सध्याच्या स्वरूपाला असलेल्या विरोधामुळे, मंजूर होऊ शकलेलं नाही. सरकार या विधेयकाबाबत चर्चेला तयार असल्याचं सांगत, विरोधी पक्षांनी हे विधेयक मंजूर होऊ द्यावं, असं आवाहन संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी केलं आहे. **** लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत कालपासून जम्मूकाश्मीरच्या दोन दिवसीय दौऱ्यावर असून, काल त्यांनी सैनिकांशी संवाद साधला आणि नियंत्रण रेषेवरच्या तसंच अंतर्भागातल्या स्थितीचा आढावा घेतला. नियंत्रण रेषेवरच्या सैनिकांच्या सतर्कतेची आणि नीतिधैर्याची रावत यांनी प्रशंसा केली. **** निवडणूक रोखे विक्रीच्या सातव्या टप्प्याला कालपासून सुरुवात झाली. हा टप्पा या महिन्याच्या १० तारखेपर्यंत सुरु राहणार आहे. भारतीय स्टेट बँकेत हे निवडणूक रोखे उपलब्ध असून, बँकेच्या एकोणतीस प्राधिकृत शाखांमध्ये ते मिळणार आहेत. राजकारणात पारदर्शिता आणण्याच्या दृष्टीनं, राजकीय पक्षांना दिल्या जाणाऱ्या रोख देणग्यांना पर्याय म्हणून हे रोखे जारी करण्यात आले आहेत. **** भारतीय अवकाश संशोधन संस्था, अर्थात इस्त्रोनं, विद्यार्थ्यांशी संवाद, हा उपक्रम सुरू केला आहे. देशभरातल्या विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञानाशी संबंधित कार्यक्रमांशी जोडलं जाण्याची संधी देणं, हा या उपक्रमाचा हेतू आहे. या उपक्रमाच्या काल बंगळुरु इथे झालेल्या उद्घाटन सत्रात निवडक शाळांमधल्या विद्यार्थ्य��ंनी इस्त्रोचे अध्यक्ष डॉक्टर के.सिवन यांच्याशी संवाद साधला. **** उत्तर भारतातल्या थंडीच्या तीव्र लाटेचा परिणाम राज्यातही जाणवत असून, काल राज्यातल्या सतरा जिल्ह्यांमधलं किमान तापमान दहा अंश सेल्शियसहून कमी नोंदलं गेलं. पुढचे दोन दिवस ही लाट कायम राहण्याचा अंदाज वेधशाळेनं वर्तवला आहे. **** पुण्यात सुरू असलेल्या प्रीमियर बॅडमिंटन लीग स्पर्धेत काल पी.व्ही.सिंधूनं सायना नेहवालवर विजय मिळवला. या विजयामुळे सिंधूचा, हैदराबाद हंटरर्स हा संघ तालिकेत सर्वोच्च स्थानी पोहचला आहे. या स्पर्धेत आज संध्याकाळी दिल्ली डॅशर्स विरुद्ध बंगलुरु रॅप्टर्स असा सामना होणार आहे. ***** ***
0 notes
smdave1940 · 6 years ago
Photo
Tumblr media
“दुष्कर्मोंकी जड नहेरुवीयन कोंग्रेस है” भारतीय जनता इससे सावधान रहें, “दुष्कर्मोंकी जड नहेरुवीयन कोंग्रेस है” इससे सावधान रहे भारतीय जनता नहेरुवीयन कोंग्रेसकी यह पूरानी आदत है कि जनताको विभाजित करना और अपना उल्लु सीधा करना. जिसने देशके वर्तमान पत्रोंके हिसाबसे गुजरातमें युपी-बिहार वालोंके विरुद्ध लींचीन्ग चालु किया वह कौन है? अल्पेश ठाकोर नामका एक व्यक्ति है जो वर्तमान पत्रोंने बनाया हुआ टायगर है. वह गुजरात (नहेरुवीयन) कोंग्रेसका प्रमुख भी है. वह गुजरात विधानसभाका सदस्य भी है. उसने गुजरात विधान सभाके गत चूनाव पूर्व अपनी जातिके अंतर्गत एक आंदोलन चलाया था कि ठाकोर जातिको शराबकी लतसे मूक्त करें. यह तो एक दिखावा था. कोंग्रेसने उसको एक निमित्त बनाया था. किसी भी मानव समूह शराबसे मूक्त करना एक अच्छी बात है. लेकिन अभीतक किसीको पता नहीं कितने ठाकोर लोग शराब मूक्त (व्यसन मूक्त) बने. इस संगठनका इस लींचींगमें नहेरुवीयन कोंग्रेसका पूरा लाभ लिया. दो पेपर टायगर है गुजरात में “नहेरुवीयन कोंग्रेस गुजरात”के नेत���ओंने पहेले पाटीदारोंमेंसे एकको पेपर टायगर बनाया था. उसने आंदोलन चलाया और नहेरुवीयन कोंग्रेसकी मददसे करोडों रुपयेकी सरकारी और नीजी संपत्तिका नाश करवाया था. वर्तमान पत्रोंने (पेपरोंने) उनको टायगर बना दिया था. नहेरुवीयन कोंग्रेसको गुजरातके अधिकतर वर्तमान पत्रोंने भरपूर समर्थन दिया है, और इन समाचार पत्रोंने पाटीदारोंके आंदोलनको फूंक फूंक कर जीवित रक्खनेकी कोशिस की है. वर्तमान पत्रोंको और उनके विश्लेषकोंने कभी भी आंदोलनके गुणदोषके बारेमें चर्चा नहीं की है. लेकिन आंदोलन कितना फैल गया है, कितना शक्तिशाली है, सरकार कैसे निस्फल रही है, इन बातोंको बढा चढा कर बताया है. पाटीदार आंदोलनसे प्रेरित होकर नहेरुवीयन कोंग्रेसने अल्पेश ठकोरको आगे किया है. यह एक अति सामान्य कक्षाका व्यक्ति है. जिसका स्वयंका कुछ वजुद न हो और प्रवर्तमान फेशन के प्रवाहमें आके दाढी बढाकर अपनी आईडेन्टीटी (पहेचान) खो सकता है वह व्यक्तिको आप सामान्य कक्षाका या तो उससे भी निम्न कक्षाका नहीं मानोगे तो आप क्या मान मानोगे? “दुष्कर्म” तो एक निमित्त है. ऐसा निमित्त तो आपको कहीं न कहींसे मिलने वाला ही है. यह पेपर टायगर खुल्लेआम हिन्दीभाषीयोंके विरुद्ध बोलने लगा है. और समाचार माध्यम उसको उछाल रहे है. वैसे तो मुख्य मंत्रीने १२०० व्यक्तियोंको हिरासतमें लिया है. और इन सबको पता चल जायेगा कि कानून क्या कर सकता है. लेकिन यदि किसीको अति जिम्मेवार समज़ना है तो वे वर्तमान पत्र है. समाचार पत्रोंको तो लगता है कि उनके मूँहमें तो गुड और सक्कर किसीने रख दिया है. लेकिन अब नहेरुवीयन कोंग्रेसकी और उसके दंभी समाचार पत्रोंकी पोल खूल रही है और उनके कई लोग कारावासमें जाएंगे यह सुनिश्चित है इसलिये उनकी आवाज़के सूर अब बदलने लगे है लेकिन कानूनसे गुजरातमें तो कोई बच नहीं सकता. इसलिये ये सब नहेरुवीयन कोंग्रेसी डर गये हैं. इस विषयमें हमें यह देखना आवश्यक बन जाता है कि आजकी कोंग��रेस (नहेरुवीयन कोंग्रेस) आज के दुष्कर्मोंके उच्च (निम्न) स्तर तक कैसे पहोंची? वैसे तो बीजेपीकी सरकार और नेतागण सतर्क और सक्रिय है. शासन भी सक्रिय है. जो लोग गुजरात छोडकर गये थे उनको वापस बुलारहे है और वे वापस भी आ रहे है. गुजरातकी जनता और खास करके बीजेपी के नेतागण उन सभीका गुलाबका पुष्प देके स्वागत कर रहे है. हिन्दी भाषीयोंने ऐसा प्रेम कभी भी महाराष्ट्रमें नहीं पाया. नहेरुवीयन कोंग्रेसका गुजरातके संदर्भमें ऐतिहासिक विवरण देखा जा सकता है. नहेरुने महात्मा गांधीको ब्लेकमेल करके तत्काल प्रधान मंत्री पद तो ग्रहण कर ��िया, लेकिन उनको तो अपनेको प्रधानमंत्रीके पद पर शाश्वत भी बनाये रखना था. और इसमें तो गांधी मददमें आने वाले नहीं थे. इस बात तो नहेरुको अच्छी तरह ज्ञात थी. गांधी तो मर गये. नहेरुसे भी बडे कदके सरदार पटेल एक मात्र दुश्मन थे. लेकिन नहेरुके सद्‌भाग्यसे वे भी चल बसे. नहेरुका काम ५०% तो आसान हो गया. उन्होने कोंग्रेसके संगठनका पूरा लाभ लिया. जनता को कैसे असमंजसमें डालना और अनिर्णायक बना देना यह एक शस्त्र है. इस शस्त्रका उपयोग अंग्रेज सरकार करती रहेती थी. लेकिन गांधीकी हत्याके बाद हिन्दु विरुद्ध मुस्लिमका शस्त्र इतना धारदार रहा नहीं. “तू नहीं तो तेरा नाम सही” नहेरु बोले लेकिन शस्त्रका जो काम था वह “जनताका विभाजन” करना था. तो ऐसे और शस्त्र भी तो उत्पन्न किये जा सकते है. नहेरुने सोचा, ऐसे शस्त्रको कैसे बनाया जाय और कैसे इस शस्त्रका उपयोग किया जाय. कुछ तो उन्होंने ब्रीटीश शासकोंसे शिखा था और कुछ तो उन्होंने उस समयके रुसकी सरकारी “ओन लाईन” अनुस्नातकका अभ्यास करके शिखा था. यानी कि साम्यवादी लोग जब सत्तामें आ जाते है तो सत्ता बनाये रखने के लिये जनताको असमंजसमें रखना और विभाजित रखना आवश्यक मानते है. १९५२मे नहेरुने काश्मिर और तिबटकी हिमालयन ब्लन्डरके बाद भी चीनपरस्त नीति अपनाई, और जनताका ध्यान हटाने के लिये भाषा पर आधारित राज्योंकी रचना की. लेकिन कोई काम सीधे तरिकेसे करे तो वह नहेरुवीयन कोंग्रेस नहीं. नहेरुने प्रदेशवादको उकसायाः “मुंबई यदि महाराष्ट्रको मिलेगा तो मुज़े खुशी होगी” नहेरुने बोला. ऐसा बोलना नहेरुके लिये आवश्यक ही नहीं था. “भाषाके आधार पर कैसे राज्योंकी रचना करना” उसकी रुपरेखा “कोंग्रेस”में उपलब्ध थी. लेकिन नहेरुका एजन्डा भीन्न था. इस बातका इसी “ब्लोग-साईट”में अन्यत्र विवरण दिया हुआ है. नहेरुका हेतु था कि मराठी भाषी और गुजराती भाषी जनतामें वैमनष्य उत्पन्न हो जाय और वह बढता ही रहे. इस प्रकार नहेरुने मराठी जनताको संदेश दिया कि गुजराती लोग ही “मुंबई” महाराष्ट्रको न मिले ऐसा चाहते है. याद रक्खो, गुजरातके कोई भी नेताने “‘मुंबई’ गुजरातको मिले” ऐसी बात तक नहीं की थी, न तो समाचार पत्रोमें ऐसी चर्चा थी. लेकिन नहेरुने उपरोक्त निवेदन करके मराठी भाषीयोंको गुजरातीयोंके विरुद्ध उकसाया और पचासके दशकमें मुंबईमें गुजरातीयों पर हमले करवाये और कुछ गुजरातीयोंने मुंबईसे हिजरत की. गुजरातीयोंका संस्कार और चरित्र कैसा रहा है? एक बात याद रक्खोः उन्नीसवे शतकके अंतर्गत, गुजरातीयोंने ही मुंबईको विकसित किया था. मुंबईकी ९० प्रतिशत मिल्कत गुजरातीयोंने बनाई थी. ७० प्रतिशत ��द्योगोंके मालिक गुजराती थे. और २० प्रतिशत गुजराती लोगोंका मुंबई मातृभूमि था. “गुजराती” शब्द से मतलब है कच्छी, सोरठी, हालारी, झालावाडी, गोहिलवाडी, काठियावाडी, पारसी, सूरती, चरोतरी, बनासकांठी, साबरकांठी, पन्चमाहाली, आबु, गुजरातसे लगने वाले मारवाडी, मेवाडी आदि प्रदेश. गुजरातीयोंने कभी परप्रांतीयों पर भेद नहीं किया. गुजरातमें ४० प्रतिशत जनसंख्या पछात दलित थे. लेकिन गुजरातीयोंने कभी परप्रांतमें जाकर, गुजरातीयोंको बुलाके, नौकरी पर नहीं रक्खा. उन्होंने तो हमेशा वहांके स्थानिक जनोकों ही व्यवसाय दिया. चाहे वह ताता स्टील हो, या मेघालय शिलोंगका “मोदी कोटेज इन्डस्ट्री” हो. गुजरातकी मानसिकता अन्य राज्योंसे भीन्न रही है. गुजरात और मुंबई रोजगारी का हब है. पहेलेसे ही गुजरात, मुंबई और महाराष्ट्र, व्यवसायीयोंका व्यवसाय हब है. उन्नीसवीं शताब्दीसे प्रथम अर्ध शतकसे ही अहमदाबादमें कपडेकी मिलोंमें हिन्दी-भाषी लोग काम करते है. १९६४-६५में जब मैं जबलपुरमें था तब मेरे हिन्दीभाषी सहाध्यायी लोग बता रहे थे कि हमारे लोग, पढकर गुजरात और महाराष्ट्रमें नौकरी करने चले जाते है. गुजरातमें सेन्ट्रल गवर्नमेंटके कार्यालयोंमे चतूर्थ श्रेणीके कर्मचारीयोंमें हिन्दीभाषी लोगोंका बहुमत रहेता था. सेन्ट्रल गवर्नमेंटके कार्यालयोंमे प्रथम और द्वितीय श्रेणीके कर्मचारीयोंमे आज भी हिन्दीभाषीयोंका बहुमत होता है, वैसे तो अधिकारीयोंके लिये गुजरात एक टेन्योर क्षेत्रमाना जाता है तो भी यह हाल है. नरेन्द्र मोदी और गुजराती गुजराती लोग शांति प्रिय और राष्ट्रवादी है. जब नरेन्द्र मोदी जैसे कदावर नेता गुजरातके मुख्यमंत्री थे तब भी उन्होंने कभी क्षेत्रवादको बढावा देनेका काम नहीं किया. नरेन्द्र मोदी हमेशा कहेते रहेते थे कि गुजरातके विकासमें हिन्दीभाषी और दक्षिणभारतीयोंका महान योगदान रहा है. गुजरातकी जनता उनका ऋणी है. २००२ के चूनावमें और उसके बादके चूनावोंमें भी, नरेन्द्र मोदी, यदि चाहते तो ममता, अखिलेश, मुलायम, माया, लालु, चन्द्रबाबु नायडु की तरह क्षेत्रवाद-भाषावादको हवा देकर उसको उछाल के  गुजराती और बिन-गुजराती जनताको भीडवा सकते थे. लेकिन ऐसी बात गुजराती जनताके डीएनए में नहीं है. और नरेन्द्र मोदीने राष्ट्रवादको गुजरातमें बनाये रक्खा है. याद रक्खो, जब नहेरु-इन्दिराके शासनके सूर्यका मध्यान्ह काल था तब भी नहेरुवीयन कोंग्रेस की (१९७१के एक दो सालके समयको छोड) गुजरातमें दाल नहीं गलती थी. वह १९८० तक कमजोर थी और मोरारजी देसाईकी कोंग्रेस (संस्था) सक्षम थी. मतलब कि, राष्ट्रवाद गुजरातमें कभी मरा नहीं, न तो कभी राष्ट्रवाद गुजरातमें कमजोर बना. १९८०से १९९५ तक गुजरातमें नहेरुवीयन कोंग्रेसका शासन रहा लेकिन उस समय भी राष्ट्रवाद कमज़ोर पडा नहीं क्यों कि गुजरातकी नहेरुवीयन कोंग्रेसके “आका” तो नोन-गुजराती थे इसलिये “आ बैल मुज़े मार” ऐसा कैसे करते? भाषा और क्षेत्रवादके लिये गुजरातमें जगह नहीं है; उद्धव -बाला साहेब थाकरे, राज ठाकरे, ममता, अखिलेश, मुलायम, माया, लालु, चन्द्रबाबु नायडु–वाले क्षेत्रवाद के लिये गुजरातमें जगह नहीं है. नहेरुवीयन कोंग्रेसके शासन कालमें गुजरातमें दंगे, और संचार बंदी तो बहोत होती रही, लेकिन कभी क्षेत्र-भाषा वादके दंगे नहीं हुए. नहेरुवीयन कोंग्रेसकी यह संस्कृति और संस्कार है कि जूठ बार बार बोलो और चाहे वह जूठ, जूठ ही सिद्ध भी हो जाय, अपना असर कायम रखता है. (१) पहेले उन्होंने अखलाक का किस्सा उछाला, और ठेर ठेर हमें गौवध आंदोलनके और लींचींगके किस्से प्रकाशित होते हुए दिखने लगे, (२) फिर हमें भारतके टूकडेवाली गेंग दिखाई देने लगी और उनके और अफज़ल प्रेमी गेंगके काश्मिरसे, दिल्ली, बनारस, कलकत्ता, और हैदराबाद तकके प्रदर्शन दिखनेको मिले, (३) फिर सियासती खूनकी घटनाएं और मान लो कि वे सब खून हिन्दुओंने ही करवायें ऐसा मानके हुए विरोध प्रदर्शन के किस्से समाचार पत्रोंमे छाने लगे, (४) फिर सियासती पटेलोंका आरक्षणके हिंसक प्रदर्शन और मराठाओंका आरक्षण आदि के प्रदर्शनोंकी घटनाएं आपको समाचार माध्यमोंमे प्रचूर मात्रामें देखने को मिलने लगी. (५) फिर आपको कठुआ गेंग रेप की घटनाको, कायदा-व्यवस्थाके स्थान पर, सेना और कश्मिरके मुस्लिमोंकी टकराहट, के प्रदर्शन स्वरुप घटना थी, इस बातको उजागर करती हुए समाचार देखने को मिलने लगे. (६) अब तो समाचार पत्रोंमे हररोज कोई न कोई पन्ने पर या पन्नों पर एक नाबालीग के गेंगरेप या दुष्कर्मकी घटना चाहे उसमें सच्चाई हो या न हो, देखनेको मिलती ही है. नाम तो नहीं लिखना है इसलिये बनावटी घटनाओं का भी प्रसारण किया जा सकता है. नहेरुवीयन कोंग्रेस ऐसा माहोल बनाना चाहती है कि जनताको ऐसा लगता है कि बीजेपीके शासनमें गेंग रेप, दुष्कर्म की आदत उत्पन्न हुई. और नहेरुवीयन कोंग्रेसके ७० सालके जमानेमें तो भारत एक स्वर्ग था. न कोई बेकार था, न कोई गरीब था, न कोई अनपढ था, हर घर बिजली थी, हर कोई के पास पक्का मकान था और दो खड्डेवाला संडास था, पेट्रोल मूफ्तमें मिलता था और महंगाईका नामोनिशान नहीं था. सब आनंदमंगल था. कश्मिरमें हिन्दु सुरक्षित थे और आतंकवादका तो नामोनिशान नहीं था. ये ठाकोर लोग कौन है? ठाकोर (ठाकोर क्षत्रीय होते है. श्री कृष्ण को भी गुजरातमें “ठाकोरजी” कहे जाते है.) वैसे वे लोग एससी/ओसी में आते हैं और कहा जाता है कि वे लोग व्यसन के आदि होते हैं.  “नहेरुवीयन कोंग्रेस गुजरात”की तबियत गुदगुदाई नहेरुवीयन कोंग्रेसकी तबियत गुदगुदायी है कि, अब वह क्षेत्रवादका ��स्त्र जो उन्होंने महाराष्ट्रमें गुजरातीयोंको मराठीयोंसे अलग करनेमें किया था उस शस्त्रको अजमाया जा सकता है. शिवसेना और महाराष्ट्र नवनिर्माण सेना, नहेरुवीयन कोंग्रेसके क्रमानुसार पूत्र और पौत्र है. ये दोनों पार्टीयां तो खूल्ले आम क्षेत्रवादकी आग लगाती है. शिवसेना कैसे बीजेपीका समर्थन करती है वह एक संशोधनका विषय है, लेकिन यदि शरद पवारको प्रधान मंत्री बननेका अवसर आयेगा तो यह शिवसेना और एमएनएस, उसके पल्लेमें बैठ जायेंगे यह बात निश्चित है. जैसे कि उन्होंने नहेरुवीयन कोंग्रेसके प्रत्याषी प्रतिभा पाटिलको समर्थन किया था. महाराष्ट्रमें तो नहेरुवीयन कोंग्रेसने क्षेत्रवादको बहेकानेका काम प्रचूर मात्रामें किया है. पाटीदारोंके आंदोलनके परिणाम स्वरुप, ज्ञातिवादके साथ साथ अन्य कोई शस्त्र है जिससे गुजरातमें कुछ और हिंसक आंदोलन करवा सकें? गुजरात विरुद्ध हिन्दीभाषी गुजरातमें हिन्दीभाषी श्रम जीवी काफी मात्रामें होते है. गुजरातके विकासमें उनका योगदान काफी है. किसीका भी परप्रांतमें नौकरी करनेका शौक नहीं होता है. जब अपने राज्यमें नौकरीके अवसर नहीं होते है तब ही मनुष्य परप्रांतमें जाता है. मैंने १९६४-६५में भी ऐसे लोगो देखे है जो युपी बिहार के थे. उनके मूँहसे सूना था कि हमारे यहां लडका एमएससीमें डीवीझन लाता है तो भी कई सालों तक बेकार रहेता है. नौकरी मिलने पर उसका भाव बढता है. ये सब तो लंबी बाते हैं लेकिन हिन्दी भाषी राज्योंमे बेकारीके कारण उनके कई लोगोंको अन्य राज्योंमें जाना पडता है. कौन पर प्रांती है? अरे भाई, यह तो वास्तवमें घर वापसी है. सुराष्ट्र-गुजरातका असली नाम तो है आनर्त. जिसको गुरुजनराष्ट्र भी कहा जाता था जिसमेंसे अपभ्रंश होकर गुजरात हुआ है प्राचीन इतिहास पर यदि एक दृष्टिपात्‌ करें तो भारतमें सरस्वती नदीकी महान अद्‍भूत सुसंस्कृत सभ्यता थी. उसका बडा हिस्सा गुजरातमें ही था. गुजरातका नाम “गुरुजनराष्ट्र था”. अगत्स्य ऋषिका आश्रम साभ्रमती (साबरमती)के किनारे पर था, वशिष्ठ ऋषि का आश्रम अर्बुद पर्वत पर था, सांदिपनी ऋषिका आश्रम गिरनारमें था, भृगुरुषिका आश्रम भरुचके पास नर्मदा तट पर था, विश्वामित्र का आश्रम विश्वामित्री नदीके मुखके पास पावापुरीमें था, अत्री ऋषिके पूत्र, आदिगुरु दत्तात्रेय गिरनारके थे. चंद्र वंश और सूर्यवंशके महान राजाओंकी पूण्य भूमि सुराष्ट्र-गुरुजनराष्ट्र ही था. सरस्वती नदीका सुखना और जलवायु परिवर्तन जब जलवायुमें परिवर्तन हुआ तो इस संस्कृतिकी, एक शाखा पश्चिममें ईरानसे गुजरकर तूर्क और ग्रीस और जर्मनी गई, एक शाखा समूद्रके किनारे किनारे अरबस्तान और मीश्र गई एक शाखा काराकोरमसे तिबट ��र मोंगोलिया गई, एक शाखा पूर्वमें गंगा जमना और ब्र्ह्म पूत्रके प्रदेशोंमे गई, जो वहांसे ब्रह्मदेश गई, और वहांसे थाईलेन्ड, फिलीपाईन्स, ईन्डोनेशिया, और चीन जापान गई, एक शाखा दक्षिण भारतमें और श्रीलंका गई. जब सुराष्ट्र (गुरुजन राष्ट्र)का जलवायु (वातावरण) सुधरने लगा तो गंगा जमनाके प्रदेशोंमें गये लोग जो अपनी मूल भूमिके साथ संपर्कमें थे वे एक या दुसरे कारणसे घरवापसी भी करने लगे. राम पढाईके लिये विश्वामित्रके आश्रममें आये थे, कृष्ण भी पढाईके लिये सांदिपनी ऋषिके आश्रममें आये थे. फिर जब जरासंघका दबाव बढने लगा तो श्री कृष्ण अपने यादवोंके साथ सुराष्ट्रमें समूद्र तट पर आ गये और पूरे भारतके समूद्र तट पर यादवोंका दबदबा रहा. ईश्वीसन की नवमी शताब्दीमें ईरानसे पारसी लोग गुजरात वापस आये थे. ईश्वीसनकी ग्यारहवी शताब्दीमें कई (कमसे कम दो हजार कुटूंबोंको) विद्वान और चारों वेदोंके ज्ञाता ब्राह्मणोंको मूळराज सोलंकी काशीसे लेकर आया था. वे आज औदिच्य ब्राह्मणके नामसे जाने जाते है. इसके बाद भी जनप्रवाह उत्तर भारतसे आनर्त-सुराष्ट्र में आता ही रहा है. “स्थानांतर” यह एक सामान्य प्राकृतिक प्रक्रिया है. सुराष्ट्र-गुरुजनराष्ट्रमें सबका स्वागत है. आओ यहां आके आपकी मूल भूमिका वंदन करो और भारत वर्षका नाम उज्वल करो. नहेरुवीयन कोंग्रेस तेरा सर्वनाश हो, बीजेपी तेरा जय जयकार हो. शिरीष मोहनलाल दवे चमत्कृतिः डीबीभाई(दिव्यभास्कर की गुजराती प्रकाशन)ने क्या किया? जो हंगामा और मारपीट ठाकोरोंने गुजरातमें की, वे “जनता”के नाम पर चढा दी, और उनको नाम दिया “आक्रोश”. आगे तंत्रीलेखमें लिखा है “नीतीशकुमार हवे गुजरात विरुद्ध बिहार मोडलनी चर्चा तो शरु करी दीधी छे अने तेमनी चर्चाने उठावनारा नोबेलविजेता अर्थ शास्त्र अमर्त्यसेन पण चूप छे” यह कैसी वाक्य रचना है? इस वाक्यका क्या अर्थ है? इसका क्या संदेश है? यदि कोई भाषाशास्त्री बता पाये तो एक लाख ले जावे. यह वाक्य रचना और उसका अर्थ जनताके पल्ले तो पडता नहीं है. डीबीभाई खूद हिन्दीभाषी है. उनको भाषा शुद्धिसे और वाक्यार्थसे कोई मतलब नहीं है. आपको एक भी पेराग्राफ बिना क्षतिवाला मिलना असंभव है. शिर्ष रेखा कैसी भी बना लो. हमें तो बीजेपीके विरुद्ध केवल ऋणात्मक वातावरण तयार करना है. “(नहेरुवीयन) कोंग्रेसके पैसे, हमारे काम कब आयेंग��? यही तो मौका है …!!!” वर्तमान पत्रकी सोच.
0 notes
aapnugujarat1 · 7 years ago
Photo
Tumblr media
श्रीलंका के खिलाफ टेस्ट सीरिज के लिए टीम का ऐलान श्री लंका के खिलाफ पहले दो टेस्ट और न्यू जीलैंड के खिलाफ पहले टी-२० मैच के लिए भारतीय क्रिकेट टीम की घोषणा कर दी गई है । श्रीलंका के खिलाफ टेस्ट सिरीज के लिए ओपनर बल्लेबाज अजिंक्य रहाणे को टेस्ट टीम का उपकप्तान बनाया गया है, जबकि ओपनर बल्लेबाज मुरली विजय की अभिनव मुकुंद की जगह टीम में वापसी हुई है । उल्लेखनीय है कि मुरली को चोट की वजह से श्री लंका टुर से ठीक पहले अपना नाम वापस लेना पड़ा था । उन्हें यह चोट रणजी ट्रोफी में आंध्र प्रदेश के खिलाफ तमिलनाडु की और से खेलते वक्त लगी थी । टीम में दिल्ली के तेज गेंदबाज इशांत शर्मा भी शामिल है । लगातार ३ वनडे सीरीज से बाहर रहने वाले दिग्गज स्पिनर रवींद्र जडेजा और आर अश्विन टेस्ट टीम का हिस्सा है । श्रीलंका टुर पर एक भी टेस्ट नहीं खेखने वाले रोहित शर्मा अपनी जगह बचाने में कामयाब रहे है । होनहार स्पिनर कुलदीप यादव को भी टीम में जगह मिली है । दुसरी ओर न्यू जीलैंड के खिलाफ टी-२० सीरीज के लिए मुंबई के टोप ओर्डर बल्लेबाज श्रेयस अय्यर और हैदराबाद के मीडियम फास्ट बोलर मोहम्मद सिराज को पहली बार टीम इंडिया में मौका मिला है । न्यूजीलैंड-ए के खिलाफ ४ प्रैक्टिस मैच में १ सेंचुरी और २ हाफ सेंचुरी लगाई थी । दुसरी और २४ साल के सिराज लगातार अच्छा परफोर्म कर रहे है । २ दिसम्बर से दिल्ही में तीसरे और अंतिम मैच खेला जाएगा । श्रीलंका की टीम भारत में संपूर्ण यात्रा पर आने वाली है । यह भारत के विरुद्ध तीन ट्‌वेन्टी मैचों और तीन वन डे मैच खेला जाएगा । समग्र आत्रा ३७ दिन तक चलने वाला है । दुसरी तरफ न्यूजीलैन्ड के विरुद्ध ट्‌वेन्टी सिरीज श्रेणी के लिए टीम की घोषणा की गई है । टीम में मुंबई के टोप ओर्डर बेट्‌समेन श्रेयस अय्यर को शामिल किया गया है । हैदराबाद में तेज गेंदबाज मोहम्मद सिराज को पहली बार मौका दिया गया है । व्यापक विचार-विमर्श करने के बाद टीम इन्डिया की घोषणा की गई है । टीम में ज्यादा फेरबदल नहीं किया गया है ।
0 notes
loksutra · 3 years ago
Text
DC vs SRH IPL 2022 खेळताना 11 टीमचा अंदाज- DC vs SRH प्लेइंग 11 ड्रीम 11: दिल्ली आणि हैदराबादमध्ये रोमांचक सामन्यांची अपेक्षा, दोन्ही संघातील संभाव्य 11 वाचा
DC vs SRH IPL 2022 खेळताना 11 टीमचा अंदाज- DC vs SRH प्लेइंग 11 ड्रीम 11: दिल्ली आणि हैदराबादमध्ये रोमांचक सामन्यांची अपेक्षा, दोन्ही संघातील संभाव्य 11 वाचा
इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) मध्ये गुरुवारी दिल्ली कॅपिटल्स (DC) चा सामना सनरायझर्स हैदराबाद (SRH) सोबत होणार आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्लीचा संघ 9 पैकी 4 सामने जिंकून गुणतालिकेत 7 व्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघ 9 पैकी 5 सामने जिंकून गुणतालिकेत 5 व्या क्रमांकावर आहे. त्यांच्या शेवटच्या सामन्यात दिल्लीला लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध सहा धावांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes