#हायवे काम
Explore tagged Tumblr posts
airnews-arngbad · 1 year ago
Text
आकाशवाणी औरंगाबाद
संक्षिप्त बातमीपत्र
०६ जून २०२३ सकाळी ११.०० वाजता****
छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार साडे तीनशेवा राज्याभिषेक सोहळा आज साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, नागरीकांनी मोठी गर्दी केली आहे. या गर्दीमुळे होणारा संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी गडाचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. नाराज शिवभक्तांना उद्देशून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी प्रतीक्षा करण्याचं आवाहन केलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट संदेशाच्या माध्यमातून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
पुण्यात लाल महालात संभाजी ब्रिगेडच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कार्यक्रमात उपस्थित आहेत.
****
भारतीय रिझर्व्ह बॅंकेची चलनविषयक धोरण समितीची तीन दिवसीय बैठक आज मुंबईत सुरु होत आहे. या बैठकीनंतर परवा गुरुवारी द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केला जाईल. 
****
अनधिकृत आणि अधिकृत धोकादायक इमारतींचा पुर्नविकास करण्यासाठी आखलेल्या ठाण्यातल्या समूह विकास योजनेच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते काल झाला. सुमारे पंधराशे हेक्टर जमिनीवर वेगवेगळ्या टप्प्यात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात सुमारे दहा हजार घरांची ��िर्मिती होणार आहे.
****
बहुचर्चित चेन्नई सुरत ग्र��नफील्ड हायवे- हरित महामार्गाचं काम अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी काल बंद पाडलं. बाधित शेतीच्या मोबदल्यात अत्यल्प मोबदला जाहीर करून स्थानिकांना कल्पना न देता या प्रकल्पाचे काम सुरू असल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी केली आहे.
****
दलित पँथरच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमीत्त रिपब्लिकन पक्षानं आज नागपुरात, विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. संघटनेत काम केलेल्या जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना या कार्यक्रमात गौरवण्यात येणार आहे.
//*************//
0 notes
kokannow · 5 years ago
Photo
Tumblr media
महामार्ग चौपदीकरण कामाची पालकमंत्र्यांकडून पाहणी सिंधुदुर्गनगरी : महामार्ग चौपदीकरणाच्या कामाची आज पालकमंत्री दीपक केसरकर यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी  अधिकाऱ्यांसमवेत सुरू असलेल्या कामाचा सविस्तर आढावा घेतला.
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
Nitin Gadkari: फीत कापायची तेव्हा कापली जाईल, उद्घाटनाची अडचण, तर गडकरींनी त्यापूर्वीच जनतेसाठी खुला केला हायवे
Nitin Gadkari: फीत कापायची तेव्हा कापली जाईल, उद्घाटनाची अडचण, तर गडकरींनी त्यापूर्वीच जनतेसाठी खुला केला हायवे
Nitin Gadkari: फीत कापायची तेव्हा कापली जाईल, उद्घाटनाची अडचण, तर गडकरींनी त्यापूर्वीच जनतेसाठी खुला केला हायवे ��द्घटानावरुन अनिश्चितता निर्माण झाल्यानंतर गडकरींनी थेट हायवे जनतेसाठी खुला करण्याचे निर्देशच देऊन टाकले. आता गुरुग्रामच्या दक्षिणेपर्यंत पोहण्यासाठी विना सिग्नल प्रवास जनतेला करता येणार आहे. नवी दिल्ली – नितीन गडकरी (Nitin Gadkari)यांची काम करण्याची पद्धत निराळी आहे. ते बोलतातह��…
View On WordPress
0 notes
nitinkandharkar · 5 years ago
Text
श्याम्पल....
     आम्ही आठवी नववीत असतांना प्रवीण औरंगाबादला शिकायला होता. त्याचे अकरावी बारावीचे शिक्षण तिथे स. भु. महाविद्यालयात झाले. त्या दोन्ही वर्षी त्याने कॉलेजच्या स्नेहसम्मेलनात खुप धमाल केली होती. तसे आमच्या कॉलेज जीवनात आम्ही सर्व भावंडांनी स्नेहसम्मेलने आपापल्या परीने गाजवली. त्याचा वृत्तांत नंतर कधीतरी देईन!
     पंचायत समितीच्या मैदानात मोठी माणसे व्हॉलीबॉल खेळत असत. त्यात शमीम, रणजीतसिंग, जाफर असे खेळाडू असत. आम्ही मागे उभे राहुन बॉल मागे आला की अडवुन त्यांना परत करत असु. उमरगा टिमने त्यावेळी राज्यस्तरावर फुटबॉल स्पर्धा जिंकलेली होती. त्यामुळे त्यांचा खेळ पहायचा आम्हाला अभिमान वाटायचा. शमीम क्रिकेटच्या बॉलिंगप्रमाणे हात खांद्यावरुन फिरवत सर्विस करायचे. नेटवरुन तो बॉल झपकन समोरच्या बाजुने खाली यायचा. ते पहायला खुप मजा यायची. हे शमीम राजश्री थिएटरवर तिकीट विक्री करण्याचे काम करायचे. त्यांना आम्ही फुटबॉलमध्ये मदत करत असल्यामुळे एखाद्या पिक्चरला गर्दी असली की त्या ओळखीचा फायदा व्हायचा व आम्हाला तिकीट मिळायचे! मैदानावर या लोकांचे फुटबॉल खेळणे संपले की आम्ही कधी कधी खारा पार्सल आणुन तिथेच मित्रांबरोबर बसुन खायचो व अंधार पडला की घरी जायचो. हॉटेलमधुन आणलेले जिन्नस खायची आमची ती नेहमीची जागा होती.
     प्रत्यक्ष हॉटेलमध्ये बसुन दोसा, इडली इ. आम्ही सोलापुरला दादांबरोबर कधी गेलो की खायचो. गदग हॉटेल हे दादांचे फेवरेट हॉटेल. छोट्या कागदी डब्यात लाकडी चमचाने व्हॅनिला आईसक्रिम याच हॉटेलमध्ये पहिल्यांदा खाल्ला होता! आम्ही सगळी भावंडे कुठल्यातरी कार्यक्रमाला सोलापुरला गेलो होतो, त्यावेळी याच हॉटेलमध्ये खाणे झाल्यानंतर आम्ही ‘कोरा कागज’ हा सिनेमा पाहिला होता हे आठवते! अर्थात आमच्यासाठी तो सिनेमा ‘कोरा’ कागजच राहिला! काहीच कळलं नाही!
उमरग्याला आमचे हॉटेलमध्ये जाऊन तिथल्या टेबलवर बसून खाणे अजून सुरु झाले नव्हते! तो प्रसंग लवकरच आला. प्रवीण सुट्टीत एकदा उमरग्याला आला होता. त्यावेळी एक दिवस तो, मी व बाळू  पहिल्यांदाच हायवेवरच्या उडप्याच्या हॉटेलमध्ये गेलो. प्रवीण यापुर्वी त्याच्या मित्रांबरोबर या हॉटेलमध्ये गेला होता त्यामुळे तिथे बासुंदी फार छान मिळते हे त्याला माहित होते. आम्ही तीन बासुंदीची ऑर्डर दिली. तीन स्टीलच्या छोट्या छोट्या वाटीत बासुंदी ��ली. चमचाने थोडी थोडी करुन आम्ही ती घट्ट बासुंदी चाटुनपुसून खाल्ली. इतकी चविष्ट बासुंदी हॉटेलमध्ये पहिल्यांदाच खात होतो. तोंडाला अजून पाणी सुटले होते. पण पैसे जास्त नसल्यामुळे एका वाटीवरच समाधान मानले.
बासुंदी खाणे संपल्यावर प्रवीणने वेटरला इशारा करुन ‘श्याम्पल’ असा आवाज दिला. आम्हाला आधी कळलेच नाही ही श्याम्पल काय भानगड आहे! काही वेळातच वेटर तीन छोट्या छोट्या प्लेटमध्ये थोडा खारा घेऊन आला. एकमेकांकडे पाहून तो खारा आम्ही खाऊन घेतला आणि काउंटरवर गेलो. वेटरने ‘तीन बासुंदी’ असे जोराने म्हटले. गल्ल्यावरच्या उडप्याने जेवढे पैसे सांगितले ते प्रवीणने दिले आणि आम्ही बाहेर पडलो. आमच्याकडे बासुंदीच्या बिलाएवढेच पैसे होते हे मला माहित होते. मग आता श्याम्पलच्या पैशाचे काय करायचे हा प्रश्न मनात आला होता. त्याने त्याचे पैसे घेतले नाहीत की काय, अशी शंका मनात आली होती!
बाहेर आल्यावर प्रवीणने सांगितले की हॉटेलमध्ये गोड खाल्ल्यावर तोंड चिकट पडू नये म्हणुन थोडा खारा खायला देतात. म्हणजे मागितला तर देतात! त्यालाच सॅम्पल अर्थात श्याम्पल म्हणतात! हॉटेलमध्ये काही लोकांना आम्ही श्याम्पल मागताना पाहिले होते. पण ते असे फुकट असते याचे हे नवीन ज्ञान आम्हाला त्यावेळी मिळाले! हॉटेलबाहेरच्या एका पानटपरीवरुन दोन पैशाची मसाला सुपारी घेऊन ती खात खात आम्ही घरी आलो.
त्या दिवसानंतर उमरग्यात हॉटेलमध्ये जाऊन खाण्याचे दडपण संपले होते! हायवे असल्यामुळे आता हॉटेल्सही भरपुर झाली होती. मग कधी आम्ही आमचे, किंवा मित्रांबरोबर वेगवेगळ्या हॉटेलमध्ये जायचो. खारा सोडुन बाकीच्या डिशेसची चवही घ्यायचो. त्यात शेवटी एखादी तरी गोड डिश हमखास ऑर्डर करायचो आणि ती खाऊन झाली की ऐटीत वेटरला हाक मारुन ‘श्याम्��ल’ मागवायचो...
नितीन कंधारकर
औरंगाबाद.
0 notes
airnews-arngbad · 1 year ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 05 June 2023
Time 18.10 to 18.20
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक – ०५ जून २०२३ सायंकाळी ६.१०
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राज्य शैक्षणिक आराखडा निर्मितीसाठी सुकाणू समितीची नियुक्ती.
ज्येष्ठ अभिनेते गुफी पेंटल यांचं प्रदीर्घ आजाराने निधन.
जागतिक पर्यावरण दिन आज सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा.
आणि
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा खरेदी केंद्राला आग लागून मोठं नुकसान.
****
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२२ नुसार शैक्षणिक घटकांचा आढावा घेऊन राज्य शैक्षणिक आराखडा निर्मितीसाठी सुकाणू समिती नियुक्त करण्यात आली आहे. शालेय शिक्षण विभागाने समिती स्थापनेबाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला असून या समितीत ३२ सदस्यांचा समावेश आहे. येत्या काळात शालेय शिक्षणासाठीचा अंतिम आराखडा, शिक्षक शिक्षण आणि प्रौढ शिक्षण आराखडाही प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त राज्य सरकार विशेष टपाल तिकीट प्रकाशित करणार आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते उद्या मु��बईत राजभवन इथं या तिकिटाचं प्रकाशन होणार आहे.
****
किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान मृत्यू पावलेल्या दोन शिवभक्तांच्या मृत्यूची सखोल चौकशी महाडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत केली जाणार आहे. रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर योगेश म्हसे यांनी हे आदेश दिले. संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी कर��न पंधरा दिवसात अहवाल सादर करण्यास त्यांनी सांगितलं आहे.
****
राज्यातील सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रासाठी विविध उपक्रम राबवण्यासाठी स्वतंत्र सचिव देण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे. केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी ही माहिती दिली. ते आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठक झाली. महाराष्ट्रात अन्य राज्यांच्या तुलनेत सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग क्षेत्रात अधिक उत्पादन व्हावं, देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात राज्याचा हिस्सा वाढावा यासाठी, या बैठकीत धोरणात्मक निर्णय घेण्यात आल्याचं, राणे यांनी सांगितलं.
****
ज्येष्ठ अभिनेते तसंच सहायक दिग्दर्शक गुफी पेंटल यांचं आज मुंबईत प्रदीर्घ आजाराने निधन झालं, ते ७८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून अंधेरी इथल्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. सरबजीतसिंह पेंटल असं मूळ नाव असलेले गुफी पेंटल यांनी १९७५ मध्ये रफू चक्कर या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. ऐंशीच्या दशकात अनेक चित्रपट आणि मालिकांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. दूरदर्शनच्या महाभारत या लोकप्रिय मालिकेत शकुनी मामा ही त्यांनी साकारलेली भूमिका रसिकांच्या आजही स्मरणात आहे.
****
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांच्या पार्थिव देहावर मुंबईत शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. त्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सुलोचना दीदी यांच्या निवासस्थानी त्यांचं अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली अर्पण केली. सुलोचना यांचं काल मुंबईत वृद्धापकाळानं निधन झालं, त्या ९४ वर्षांच्या होत्या.
****
कांद्याचे भाव सावरण्याच्या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यात येवला इथं आज शेतकरी प्रहार संघटनेच्या वतीनं मुंडन आंदोलन करण्यात आलं. संघटनेचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालयासमोर, कार्यकर्त्यांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून घोषणाबाजी केली, त्यानंतर मुंडन कर�� आंदोलन केलं. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, कांदा उत्पादकांना संरक्षण द्यावं, निर्यातमूल्य कमी करावं अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
****
बहुचर्चित चेन्नई सुरत ग्रीनफील्ड हायवे- हरित महामार्गाचं काम अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांनी बंद पाडलं. बाधित शेतीच्या मोबदल्यात अत्यल्प मोबदला जाहीर करून स्थानिकांना कल्पना न देता या प्रकल्पाचे काम सुरू असल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी केली. या महामार्गासाठी बाधित शेतीच्या मोबदल्यात चार लाख रुपयांपासून सात लाख रुपयांपर्यंत भरपाई शासनानं जाहीर केली आहे, मात्र ही भरपाई बाधित शेतकऱ्यांना मंजूर नसल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.
****
प्रसार भारतीच्या वतीनं आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाअंतर्गत, परभणी, नांदेड, लातूर, बीड, मुंबई, रत्नागिरी आणि सांगली या जिल्ह्यांसाठी, कंत्राटी तत्वावर अर्धवेळ वार्ताहर नियुक्तीसाठी अर्ज मागवले आहेत. २४ ते ४५ वयोगटातले पात्र उमेदवार यासाठी आपले अर्ज सादर करू शकतील. यासाठीची पात्रता, अर्जाचा नमुना तसंच इतर माहिती, प्रसार भारती डॉट जीओव्ही डॉट इन स्लॅश पी बी व्हॅकेन्सिंज, या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छुकांना, एअर न्यूज पॅनल ट्वेंटी ट्वेंटी टू अॅट जीमेल डॉट कॉम, या ईमेल आयडीवर आपले अर्ज पाठवता येतील.
****
जागतिक पर्यावरण दिन आज सर्वत्र विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
औरंगाबाद इथं सिडको इथल्या बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन आणि स्मारक परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. सहकार मंत्री अतुल सावे, महापालिका प्रशासक जी.श्रीकांत, वृक्षारोपणासाठी कार्य करणाऱ्या जनसहयोग संस्थेचे पदाधिकारी आणि नागरिक यावेळी उपस्थित होते. पर्यावरण प्रेमी नागरिकांनी पुढे येऊन औरंगाबाद श���र प्रदुषण मुक्त राहण्यासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचं आवाहन, सावे यांनी यावेळी केलं. उपस्थित सर्वांनी यावेळी पर्यावरण संवर्धन आणि वृक्षलागवडीची शपथ घेतली. विटखेडा परिसरात माजी महापौर नंदकुमार घोडेले आणि इतर मान्यवरच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. आज या परिसरात शंभर रोपं लावण्यात आली असून एक हजार झाडे लावण्याचा संकल्प विटखेडा वॉर्डातील नागरिकांच्या वतीने यावेळी करण्यात आला.
****
लातूर जिल्ह्यात ‘हर घर नर्सरी’ उपक्रमाअंतर्गत सर्व नगरपालिकांमध्ये रोपवाटीकांचं नियोजन करण्यात आलं आहे. त्यासाठी आज सलग दुसऱ्यांदा दुर्मिळ वृक्ष असलेल्या पट्ट्यात जाऊन, विविध वृक्षांचं बीज संकलन करण्यात आलं. लातूर जिल्हा प्रशासन, सह्याद्री देवरा, द संस्कृती फाउंडेशन, लातूर वृक्ष चळवळ यांच्या सक्रिय सहभागानं ही मोहिम राबवण्यात आली. यावेळी आपटा, बेहडा, बहावा, अर्जुन, पळस अशा अनेक वृक्षांचं बीज संकलन करण्यात आलं.
****
वातावरणातील बदलामुळे कृषी उत्पादनावर होणाऱ्या विपरित परिणामांवर उपाय शोधण्यासाठी क���षी विद्यापीठांनी पुढाकार घेऊन संशोधन करण्याचं आवाहन, वसंतराव ऩाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातले अधिष्ठाता, डॉ. धर्मराज गोखले यांनी केलं आहे. ते आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष प्रचार कार्यक्रमात बोलत होते. प्लास्टिकच्या वापरावर तसंच उत्पादनावर मर्यादा आणण्याची गरज व्यक्त करुन, कृषी विद्यापीठात होत असलेल्या पर्यावरण अनुकूल कार्यक्रमाची माहिती डॉ. गोखले दिली.
क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी यावेळी बोलताना, निसर्गाच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी मिशन लाईफचा उद्देश आत्मसात करण्याचं आवाहन केलं. शाहीर भारत मुंजे यांनी आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून पर्यावणाविषयी जऩजागृती केली. मान्यवरांच्या हस्ते निबंध आणि पोष्टर स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
****
नाशिक शहराजवळ चुंचाळे इथं पांजरापोळ या संस्थेला दिलेल्या जागेत अडीच हजार वृक्ष लावण्यात आले. या ठिकाणी एकूण दहा हजार वृक्ष लागवडीचं उद्दीष्ट आहे. यासोबतच नंदिनी नदीकाठावर देखील आज सकाळी वृक्षारोपण करण्यात आलं.
****
सोलापूर इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात एकशे एक वृक्षांचे रोपण करण्यात आलं.
****
बुलडाणा इथं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सायकल रॅली काढण्यात आली होती. जिल्ह्यात खामगाव इथं जनुना तलाव उद्यान परिसरात १०१ नारळ वृक्ष लागवडीचा प्रकल्प सुरु करण्यात आला.
****
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राला शार्ट सर्किटने भीषण आग लागून मोठं नुकसान झालं, आज पहाटे ही घटना निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवलं. या आगीमध्ये ५० क्विंटल हरभरा, बारदान्याचे २१ गठ्ठे, फर्निचर, सीसीटीव्ही कॕमेरा, लॕपटॉॕप इत्यादी सामानाचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या शेगावच्या गजानन महाराजांच्या पालखीचं आज मराठवाड्यात हिंगोली जिल्ह्यातल्या वाढोणा गावात आगमन झालं. या पालखीत साडेसातशे वारकऱ्यांचा समावेश आहे. पालखीच्या आगमनामुळे हिंगोली जिल्ह्यातही भक्तिमय वातावरण निर्माण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
****
0 notes
kokannow · 5 years ago
Photo
Tumblr media
खारेपाटण संभाजीनगर मध्ये घरात शिरले पावसाचे पाणी  खारेपाटण : गेले दोन दिवस खारेपाटण पंचक्रोशीमध्ये पडत असलेला जोरदार पाऊस आणि त्या पावसात सुरु असलेली महामार्ग चौपदरीकरणाची कामे, यामुळे लोक हैराण झाले आहेत. 
0 notes
bharatlivenewsmedia · 2 years ago
Text
मुंबई-गोवा हायवेवर कुठे आहेत मृत्यूचे सापळे? आणि गतिरोधकांचा धोका, बघा...
मुंबई-गोवा हायवेवर कुठे आहेत मृत्यूचे सापळे? आणि गतिरोधकांचा धोका, बघा…
मुंबई-गोवा हायवेवर कुठे आहेत मृत्यूचे सापळे? आणि गतिरोधकांचा धोका, बघा… मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. पण अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. या प्रकरणी मुंबई हायकोर्टातही सुनावणी सुरू आहे. पण हा मुंबई गोवा हायवे मृत्यूचा सापळा बनला आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. पण अद्यापही हे काम पूर्ण झालेले नाही. या प्रकरणी मुंबई हायकोर्टातही…
View On WordPress
0 notes
maharashtracitynews-blog · 7 years ago
Text
मुंबई-पुणे एक्स्प्रेस प्रचंड वाहतूक कोंडीचा अडथळा , वेवर वाहनांच्या रांगा.
मुंबई-पुणे एक्स्प्रेस प्रचंड वाहतूक कोंडीचा अडथळा , वेवर वाहनांच्या रांगा., ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय.ठाणे- बेलापूर मार्गावरील कळवा-विटावा रेल्वे ब्रीजखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत. त्यामुळं त्याठिकाणी पेव्हर ब्लॉक बसवण्याचं काम सुरू असल्यानं वाहतूक विभागानं ऐरोलीमार्गे ईस्टर्न एकप्रेस हायवेहुन ठाण्याकडे वाहतूक वळवल्यानं ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतुकीचा ताण पडला. याचा फटका सीएसटीहुन ठाण्याच्या दिशेनं जाणाऱ्या वाहनांना देखील बसलाय. ईस्टर्न एकप्रेस हायवे मुलुंडपासून भांडुपपर्यत तसेच ऐरोली हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय.
नाताळमुळे आलेल्या सलग सुट्ट्यांमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता वर्तवली जातेय.सलग तीन दिवस आलेल्या सुट्यांमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. पुण्याकडे येणा-��ा मार्गिकांवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागलेल्या आहेत. द्रुतगती मार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी महामार्ग पोलीस प्रयत्न करत आहेत. पुण्याकडे येताना घाट क्षेत्रात वाहने बंद पडल्यास तातडीने ती बाजुला करण्याकरिता क्रेन सर्व्हिस उपलब्ध केलेली आहे. मात्र वाहनांची संख्या प्रचंड असल्याने वाहनांच्या लांबवर रांगा गेल्या आहेत. मुंबईकडे जाणार्‍या मार्गावर खंडाळा बाह्य वळण ते खंडाळा बोगदा दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने डोंगरांकडील एक लेन बंद केल्याने दोन लेनवर वाहतुकीचा ताण येत वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या आहेत.
चौथा शनिवार, रविवार आणि ख्रिसमस असे सलग तीन दिवस जोडून सुट्या आल्यामुळे मुंबई, ठाण्यातील अनेक प्रवासी द्रुतगती मार्गावर आल्याने वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. तसेच लोणावळा शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय मार्गावर देखिल वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या आहेत. मुंबई - पुणे एक्स्प्रेस-वेवर प्रचंड ट्राफिक जाम झालं आहे. खंडाळा घाटामध्ये वाहतूक कोंडी झाली असून गाड्या शेडुंग फाट्यावरुन वळवण्यात आल्या आहेत. तसंच अवजड वाहनांची वाहतूक जुन्या हायवेवरुन वळवण्यात आली आहे. खालापूर टोलनाक्यावर जवळपास चार किमी लांब रांगा लागल्या आहेत. टोलनाक्यावर गाड्यांची रांग लागली असल्या कारणाने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. मुंबई - नाशिक हायवेवरील वाहतूकही मंदावली आहे. फक्त मुंबई -पुणे नाही तर मुंबई - गोवा आणि अहमदाबाद हायवेवरही वाहतुकीची कोंडी झाली आहे. मुंबई - गोवा हायवेवर पेणजवळ प्रचंड ट्राफिक जाम झालं आहे. कोकणात जाणा-या रस्त्यांवर गाड्यांच्या चार ते पाच किमी लांब रांगा लागल्या आहेत. मुंबई - अहमदाबाद हायवेवरही हीच परिस्थिती आहे.,,http://www.maharashtracitynews.com/%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%88-%e0%a4%aa%e0%a5%81%e0%a4%a3%e0%a5%87-%e0%a4%8f%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8-%e0%a4%aa%e0%a5%8d/
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad
Date – 14 February 2023
Time 7.10 AM to 7.25 AM
Language Marathi
आकाशवाणी औरंगाबाद
प्रादेशिक बातम्या
दिनांक १४ फेब्रुवारी  २०२३ सकाळी ७.१० मि.****
राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर आजपासून नियमित सुनावणी
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं कामकाज येत्या १३ मार्च पर्यंत स्थगित
पाण्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज - केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत
राज्य विकासासाठी केंद्राचा १३ हजार ७०० कोटी रुपयांचा निधी - केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर
बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण देऊ शकतील, अशा शाळांच्या परीसरात वस्तीगृह सुरू करण्यासाठीच्या सुविधांची पाहणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्याचे निर्देश
जेष्ठ चित्रकार ललिता लाजमी यांचं निधन
आणि
महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा आयर्लंडवर तर दक्षिण आफ्रिकेचा न्यूझीलंडवर विजय
****
राज्यातल्या सत्ता संघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकांवर आजपासून नियमित सुनावणी होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या या याचिका आज सकाळी ��ाडेदहा वाजता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे सुनावणीस येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या १६ सदस्यांना विधानसभेच्या उपाध्यक्षांनी बजावलेली अपात्रतेची नोटीस, राज्यघटनेच्या अनुसूचित दहा मधील तरतुदींची व्याप्ती, राज्यपालांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पाचारण करणं, विधानसभा अध्यक्षांची निवड, शिवसेनेच्या मुख्य प्रतोदाची निवड अशा ठाकरे आणि शिंदे गटानं एकमेकांविरुद्ध दाखल केलेल्या वेगवेगळ्या याचिकांचा यात समावेश आहे.
यापूर्वी झालेल्या सुनावणीत घटनापीठानं दोन्ही पक्षांना, ज्या मुद्द्यांवर युक्तिवाद करायचा आहे, ते मुद्दे एकत्रितपणे सादर करण्याचे निर्देश दिले होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे सोपवण्याची मागणी करण्यात आलेली आहे, यावरही घटनापीठ निर्णय घेण्याची शक्यता आहे.
****
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचं कामकाज काल संपलं. दुसरा टप्पा १३ मार्चपासून सुरू होईल.
राज्यसभेत काल विरोधकांनी मल्लिकार्जून खरगे यांनी अदानी संदर्भात केलेल्या भाषणाचा काही भाग कामकाजातून काढून टाकण्याच्या मुद्द्यावर सदनात गदारोळ केला. यासंदर्भात आम आदमी पक्ष आणि भारत राष्ट्र समितीनं दाखल केलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड यांनी फेटाळून लावला. विरोधी सदस्यांनी हौद्यात येऊन अदानी प्रकरणात संयुक्त संसदीय समितीची मागणी करत जोरदार घोषणा दिल्या. अध्यक्षांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतरही विरोधकांनी घोषणा सुरुचं ठेवल्या. त्यामुळे सदनाचं कामकाज आधी काही वेळासाठी नंतर १३ मार्च पर्यंत स्थगित करण्यात आलं.
लोकसभेत काल आदर्श स्टेशन योजनेंतर्गत रेल्वे स्थानकांच्या सुशोभिकरण आणि आधुनिकीकरणावर खाजगी सदस्य ठरावावर पुढील चर्चा सुरु झाली, मात्र ती अनिर्णित राहिली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पुढील महिन्याच्या १३ तारखेपर्यंत सभागृह तहकूब केलं.
****
राज्यातल्या विकास कामांकरता १३ हजार ७०० कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकार देणार आहे. संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या काळातल्या तरतुदीच्या तुलनेत ही रक्कम ११ पटीने जास्त आहे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं. भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा प्रवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात ठाकूर मुंबई दौऱ्यावर आले असता, ते काल वार्ताहरांशी बोलत होते. राज्यातल्या विकास कामांसाठी केंद्र सरकारनं केलेल्या तरतुदींविषयी त्यांनी माहिती दिली:
 ‘‘कुल मिलाकर मोदी सरकारने चौदासो तीन प्रोजेक्ट सडकों के, नॅशनल हायवे के मंजूर महाराष्ट्र के लिए हुए। इसकी कुल लेंथ 18 हजार किलोमीटर है। और 1 लाख 81 हजार 728 करोड रुपया इसके उपर खर्चा आया है। जो आज तक का रेकॉर्ड है। मोदी जी ने एक नही दो - दो बार सरकार किसी एक राज्य को मिली तो महाराष्ट्र को वो देने का काम मोदी जी ने किया है। पुणे के लिए 1206 करोड रुपया पुणे मेट्रो के लिए, 492 करोड रुपया मुंबई मेट्रो के लिए, नागपूर के लिए 118 करोड, दो हजार करोड बुलेट ट्रेन के लिए। आज भारत भी और दुनिया देख रही है, ये नये भारत, विकसित भारत बनने के और चला है। भारत जो नयी दिशा ले रहा है मोदी जी के नेतृत्व मे, उस और सब इकठ्ठे मिलकर चलिए।’’
****
देशात पिण्याचं पाणी मुबलक असलं तरीही नियोजनाचा अभाव असल्यानं अनेक भागात पाणीटंचाईचा प्रश्न भेडसावतो, या समस्येवर उपाय शोधून पाण्याच्या बाबतीत देशाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज असल्याचं, केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी म्हटलं आहे. जलशक्ती विभाग आणि पुणे महापालिकेच्या वतीनं आयोजित, दोन दिवसीय धारा २०२३, या परिषदेचं उद्धाटन काल शेखावत यांच्या उपस्थितीत झालं, त्यावेळी ते बोलत होते. पुण्यातला मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प मार्च २०२५ पर्यंत पूर्ण करु, असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. या परिषदेत १०७ शहरातले आयुक्त सहभागी झाले आहेत. नदी सुधारणा, जलव्यवस्थापन, भूजल पुनर्भरण, सांडपाणी प्रक्रिया अशा विषयांवर या परिषदेत मंथन होत आहे. नदीची नैसर्गिक परिसंस्था टिकवण्यासाठी काय करता येईल, यावर या परिषदेत चर्चा होईल, असंही शेखावत यांनी सांगितलं.
****
सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन करण्यात आलेली आर्थिक सल्लागार परिषद, ही महाराष्ट्राच्या दृष्टीने क्रांतीकारक पाऊल असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल महाराष्ट्र आर्थिक सल्लागार परिषदेच्या पहिल्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या सर्व विभागांचा समतोल विकास होण्यासाठी या परिषदेत महत्त्वाची चर्चा करण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना, या बैठकीत परिषद सदस्यांनी केलेल्या सूचनांवर आधारित विकासाचा रोड मॅप तयार करण्यात येईल आणि कालबद्ध पद्धतीने त्याची अंमलबजावणी करण्यात येईल, असं सांगितलं.
****
आमचं ���रकार जनतेचं सरकार असून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मनमाड इथं ��ाल मनमाड-करंजवण पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन आणि इतर प्रकल्पांचं लोकार्पण केल्यानंतर, आयोजित सभेत ते बोलत होते. नागरिकांना पाण्याच्या सुविधा देणं सरकारच्या मूलभूत जबाबदाऱ्यांपैकी एक असून, ३११ कोटींच्या या योजनेमुळे इथल्या नागरिकांना दररोज पाणी मिळेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. या पाणीपुरवठा योजनेसाठी लागणारा नगरपालिकेचा निधी देखील राज्य सरकारच भरेल, असं ते म्हणाले...
‘‘याठिकाणी एवढंच सांगतो ज्या योजना जेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते, मी त्यांच्या मंत्रिमंडळात सहकारी मंत्री होतो. योजना सुरु झाल्या. या राज्यांमध्ये जलसिंचन योजना, छोटी - मोठी धरणं असतील, सुरु झाल्यानंतर मधल्या अडीच वर्षामध्ये पूर्णपणे थांबल्या. परंतू जसं गेल्या सहा महिन्यापूर्वी सरकार आपलं आलं, त्यामुळे तुमच्या मनातलं सरकार आल्यानंतर बंद पडलेल्या योजना आम्ही तातडीने सुरु केल्या. त्याला लागणारे जे पैसे आहेत, हे पैसे देण्याचा निर्णय घेतला.’’
****
बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षण देऊ शकतील, अशा शाळांच्या परीसरात वस्तीगृह सुरू करण्यासाठीच्या सुविधांची पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राधाविनोद शर्मा यांनी दिले आहेत. ऊसतोड कामगारांच्या समस्या संदर्भात काल त्यांनी आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांच्या मुलांची संख्या पाहता त्यासाठी सुरू करण्यात येणारी वस्तीगृहांची संख्या मर्यादित आहे.
त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी विविध शाळांमध्ये वस्तीगृह सुरू करता येईल, असं ते म्हणाले.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी, ऊसतोडीसाठी जाणाऱ्या कामगारांना शेतीकडे वळवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असल्याचं सांगितलं. यामध्ये जिल्ह्यात या वर्षी साडेपाच हजार शेततळी, ११ हजार विहिरी तसंच ५ हजार तुती लागवडीच्या योजनांची अंमलबजावणी केली जाईल, जिल्ह्यातल्या काही गावात एकही ऊसतोड कामगार इतर ठिकाणी कामासाठी जाणार नाही असा प्रयत्न आणि प्रयोग केला जाईल असं पवार यांनी सांगितलं.
****
जेष्ठ चित्रकार ललिता लाजमी यांचं काल मुंबईत निधन झालं, त्या ९० वर्षांच्या होत्या. अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक गुरु दत्त यांची त्या बहीण होत. त्यांच्या चित्रांवर गुरु दत्त, सत्यजित रे आणि राज कपूर यांच्या चित्रपटांचा प्रभाव होता. लाजमी यांनी आमिर खानच्या २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या तारे जमीन पर या चित्रपटामध्ये ��ोटी भूमिका साकारली होती. तसंच अमोल पालेकर यांच्या नाटकासाठी वेशभूषा निश्चित केली होती. मुंबई, चेन्नई, दिल्ली, कोलकाता इथं त्यांची चित्र प्रदर्शनं भरवण्यात आली होती. बॉम्बे आर्ट सोसायटी पुरस्कार, राज्य कला प्रदर्शन पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं आहे.
****
उद्योग क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या मराठा समाजात���्या तरुणांसाठी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळानं काल औरंगाबादमध्ये लाभार्थी आणि बँक संवाद मेळावा घेतला. सहकार मंत्री अतुल सावे यांनी या मेळाव्यात मार्गदर्शन केलं. विविध बँकाचे प्रतिनिधी, विविध मराठा संघटनेचे प्रतिनिधी आणि लाभार्थी या संवाद मेळाव्यास उपस्थित होते. यावेळी बोलतांना मंत्री सावे यांनी, आर्थिक मागास विकास महामंडाळाची कर्ज मर्यादा १५ लाखावरुन २५ लाखापर्यंत वाढवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं.
****
सामाजिक सलोखा आणि जातीय शांततेला बाधा पोहोचवणाऱ्या पोस्ट टाकल्याप्रकरणी हिंगोली सायबर पोलिसांनी ११ जणांना नोटीस पाठवली आहे. पोलिसांनी दोन फेसबूक आणि नऊ इन्स्टाग्राम अकाउंट बंद केले आहेत. सहा ते १३ फेब्रुवारी दरम्यान अशा प्रकारच्या पोस्ट टाकण्यात आल्या होत्या.
****
२०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष म्हणून साजरं केलं जात आहे. दररोजच्या एकूण उष्मांकापैकी ७० ते ८० टक्के उष्मांक तृणधान्यापासून मिळतात. या व्यतिरिक्त तृणधान्यांमधून आपल्याला प्रथिने, खनिजे आणि जीवनसत्त्व "अ' आणि "ड' चांगल्या प्रमाणात मिळतात. तृणधान्याचा आहारात उपयोग केल्यास यापासून आपणास बरेच फायदे मिळतात. राजगीरा या तृण धान्यापासून मिळणारे फायदे सांगत आहेत आहारतज्ज्ञ स्नेहा वेद -
****
शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया असून, शिक्षणामुळेच माणसाला स्वतंत्रपणे आणि मुक्तपणे जीवन जगण्याचं धाडस प्राप्त होतं, असं मत, नवी दिल्ली इथल्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातले प्राध्यापक डॉ. नसीम उल हुदा यांनी व्यक्त केलं आहे. औरंगाबादच्या मौलाना आझाद कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात, पदवी प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते काल बोलत होते. जोपर्यंत आपलं ध्येय पूर्ण होत नाही, तोपर्यंत विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहात सातत्यानं तत्पर असलं पाहिजे, तसंच शिक्षण घेण्यासाठी वयाचं कुठलंही बंधन नसतं, असं ते यावेळी म्हणाले.
****
औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदाच्या निवडणुकीत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या नेतृत्वाखालील, शिवशाही शेतकरी विकास पॅनेलनं विजय मिळवला आहे. संपूर्ण २० जागांवर त्यांचे उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी सभासद कामगार पॅनेल उभं होतं.
****
दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल इंग्लंडनं आयर्लंडचा चार खेळाडु राखून पराभव केला, तर अन्य एका सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं न्यूझीलंडचा ६५ धावांनी पराभव केला. या स्पर्धेत भारताचा दुसरा सामना उद्या वेस्ट इंडिज सोबत होणार आहे.
****
पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असं आवाहन, परभणीचे अपर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे यांनी केलं आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात काल कृषि विभागाच्या चित्ररथास हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यानंतर ते बोलत होते. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना या योजनेची माहिती व्हावी, यासाठी तीन चित्ररथ आठवडाभर जिल्ह्यात फिरणार असल्याचं ते म्हणाले. या योजनेअंतर्गत अन्न प्रक्रिया उद्योगांना वैयक्तिक स्वरुपात ५० तर बचत गटांना ३५ टक्के अनुदान दिलं जातं.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं काल नक्षत्रवाडी इथल्या संत कबीर विद्यालयात, कुष्ठरोगासंदर्भात जनजागृतीसाठी स्पर्श अभियानाअंतर्गत, रन फॉर लेप्रसी ही स्पर्धा घेतली. उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर यांनी हिरवा झेंडा दाखवून या मॅरेथॉनला सुरुवात केली. या स्पर्धेत ४५० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
****
औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हवाई सहल आयोजित केली आहे. या वर्गातल्या विद्यार्थ्यांची परिक्षा घेऊन ���िवड झालेल्या विद्यार्थ्यांना श्रीहरिकोटा, थुंबा खगोल संग्रहालय आणि विश्वेश्वरय्या इंडस्ट्रियल ॲण्ड टेक्निकल संग्रहालयाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी ही हवाई सहल आयोजित करण्यात येणार आहे.
****
0 notes
airnews-arngbad · 2 years ago
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 19 October 2022 Time 18.10 to 18.20 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक – १९ ऑक्टोबर २०२२ सायंकाळी ६.१० ****
दहशतवादाशी लढा ही संयुक्त राष्ट्र संघाची प्राथमिकता - सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांची स्पष्टोक्ती.
काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांचा विजय.
एसटीची अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला सरसकट ५ हजार रुपये दिवाळी भेट.
आणि
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचा समारोप.
****
दहशतवादाशी लढा देणं ही संयुक्त राष्ट्र संघाची प्राथमिकता असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस एच.ई. अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटलं आहे. गुटेरेस यांनी आज मुंबईत हाँटेल ताज इथं भेट देऊन २६/११ च्या हल्ल्यातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. या निमित्तानं भरवलेल्या चित्रप्रदर्शनाला भेट दिल्यानंतर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. २६/११ ला देशावर झालेला हा अत्यंत रानटी हल्ला होता. बाहेरच्या देशातून आलेल्या लोकांसह यात १६६ लोकांनी प्राण गमावले. भारताने केलेल्या दहशतवाद विरोधी सहकार्याविषयी गुटेरेस यांनी कृतज्ञता व्यक्त केली. या हल्ल्यात तेव्हा जखमी झालेल्या कुमारी देवीका रोटावन हिची गुटेरेस यांनी आस्थेने विचारपूस केली. कुमारी देवीका रोटावन ही तेव्हा अवघ्या दहा वर्षांची होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रशासनातील अनेक अधिकारी उपस्थित होते.
****
काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी विजय मिळवला आहे. खरगे यांना ७ हजार ८९७ मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी थरुर यांना १ हजार ७२ मतं मिळाली. काँग्रेसचे पक्ष निवडणूक समितीचे अध्यक्ष मधुसुदन मिस्त्री यांनी ही माहिती दिली. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी स��मवारी ९ हजार ३८५ मतदारांनी मतदान केलं, यापैकी ४१६ मतं अवैध ठरली. काँग्रेस पक्षाला २५ वर्षानंतर प्रथमच गांधी कुटुंबातला सदस्य नसलेला अध्यक्ष मिळाला आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी खासदार मल्लिकार्जून खर्गे यांचं अभिनंदन केलं आहे. खरगे यांना केंद्र आणि राज्य पातळीवर काम करण्याचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांच्या निष्ठावान नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळेल आणि काँग्रेस पक्ष समर्थपणे सर्व आव्हानांना सामोरा जाईल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. ते म्हणाले –
आम्ही काँग्रेसजनांनी आपलं मतदान अतिशय लोकशाही मार्गाने ही प्रकीया पूर्णपणे पार पडली. आणि काँग्रेसला एक नवीन अनुभवी अध्यक्ष श्री मल्लिकार्जून खरगे यांची निवड जाहीर करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे मला खात्री आहे, की आलेली आव्हानं हे ते निश्चितच मोठ्या हिमतीने त्याच्यावर मात करतील. काँग्रेस पक्षाला एक नवीन ऊर्जा देऊन, नवीन दीक्षा देण्याचं काम हे निश्चितच मल्लिकार्जून खरगे हे करतील आणि त्यांची ही कारकीर्द यशस्वी ठरो अशा प्रकारची आम्ही सर्वांच्या वतीने याठिकाणी माझी भावना व्यक्त करतो.
****
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ - एसटीने आपल्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला सरसकट ५ हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी ही माहिती दिली. यासाठी राज्य सरकारने ४५ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे. या निर्णयाचा सुमारे ८७ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी वर्गाला फायदा होणार आहे. ही रक्कम लवकरच सर्वांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, असंही चन्ने यांनी सांगितले.
****
सुक्ष्म, लघु आणि मध्यम गटातल्या उद्योगांना करांव्यतिरिक्त मिळणाऱ्या सवलती, त्यांच्यातली प्रकल्प किंवा यंत्रसामुग्रीची गुंतवणूक वाढली तरी नंतरचे तीन महिने उपलब्ध असेल. आत्मनिर्भर भारत अभियानाच्या अनुषंगानं सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय सरकारनं घेतला असून आज त्याची अधिसूचना जारी करण्यात आली. सार्वजनिक खरेदी धोरण आणि थकबाकी संदर्भातल्या विविध सरकारी योजनांचा या सवलतींमधे समावेश होतो.
****
भारतीय अंतराळ संशोधन संस्था - इस्रो, या महिन्याच्या २३ तारखेला ब्रिटनच्या ग्लोबल कम्युनिकेशन नेटवर्क वनवेबचे ३६ उपग्रह प्रक्षेपित करणार आहे. उपग्रहांचं प्रक्षेपण २३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री १२ वाजून ०७ मिनिटांनी होणार आहे.
****
येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत नाशिक-मुंबई राष्ट्र���य महामार्गाची सुधारणा झाली नाही तर १ नोव्हेंबरपासून पथकर बंद करण्याचा इशारा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. छगन भुजबळ यांनी आज नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांबरोबर नाशिक ते वडपे दरम्यान मुंबई महामार्गावरील रस्त्याची पाहणी करत अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका तर ही कामं तातडीनं करा असंही भुजबळ यांनी सांगितलं.
****
राहुरी इथल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाने संकरित कालवडीत सहिवाल जातीच्या देशी गायीचं भ्रूण प्रत्यारोपण उपक्रमाला आजपासून प्रारंभ केला. या तंत्रज्ञानातून विद्यापीठ क्षेत्रात चार गीर आणि दोन सहिवाल कालवडींचा जन्म झाला आहे. कृषी विद्यापीठाने आता परिसरातल्या शेतकऱ्यांच्या गायींवर भ्रुण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. आज राहुरी तालुक्यात खंडाबे इथं सुरसिंग पवार यांच्या संकरित कालवडीमध्ये सहिवाल जातीच्या देशी गायीचं भ्रूण प्रत्यारोपित करण्यात आलं. देशातली शुध्द देशी गोवंशाची घटती संख्या पाहता जलदगतीनं उच्च उत्पादन क्षमता असणाऱ्या गायीची संख्या वाढवण्यासाठी भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत गरजेचा असल्य��चं उपस्थित तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं.
****
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवाचा आज समारोप झाला. अभिनेते भारत गणेशपुरे आणि सुहास शिरसाट यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. मजेत जगा मात्र शिस्तीतच वागा, असा सल्ला गणेशपुरे यांनी सर्वांना दिला. पदवी मिळवल्यानंतर खऱ्या अर्थानं युवकांच्या जीवनाची परीक्षा सुरु होते. यात यशस्वी व्हायचं असेल तर आत्मविश्वासानं सामोरं जा, असं गणेशपुरे म्हणाले. अभिनेते सुहास शिरसाट यांनी यावेळी बोलतांना, बारावी विज्ञान शाखेत नापास झाल्यावर आयुष्याला कलाटणी मिळाल्याचं सांगितलं. आपल्या जडण - घडणीत मित्र परिवार, कुटूंबीय आणि गुरुजनांनी दिलेलं प्रोत्साहन मोलाचं ठरलं, या शब्दांत शिरसाट यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
****
औरंगाबाद शहरात महानगरपालिका आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळानं ३८२ किलो प्रतिबंधित प्लॉस्टिक जप्त केलं आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत संबंधितांना ३२ हजार रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
****
राज्य शासनाकडून दरवर्षी दिला जाणारा उत्कृष्ट गणेश मंडळाचा पुरस्कार हिंगोली इथल्या सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळाला मिळाला आहे. काल मुंबईत सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. सन्मान चिन्ह, प���रशस्तीपत्र आणि रोख बक्षीस असं या पुरस्काराचं स्वरुप आहे.
****
औरंगाबाद - जळगाव महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावं अशी मागणी औरंगाबाद टूरिझम डेव्हजपमेंट फाउंडेशनचे अध्यक्ष जसवंत सिंग यांनी केली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात परतीचा पाऊस सलग आठ दहा दिवसांपासून सतत पडत आहे. अजिंठा गावाजवळ रस्त्याच्या अर्धवट कामांमुळे या मार्गावरून जाणारे प्रवासी तसंच अजिंठा लेणी पाहण्यासाठी जाणाऱ्या पर्यटकांना त्रास सहन करावा लागत असल्याचं जसवंत सिंग यांनी सांगितलं.
****
धुळे तालुका पोलिसांच्या पथकानं मुंबई-आग्रा महामार्गावर आर्वी शिवारात अंमली पदार्थाची तस्करी करणारं एक वाहन पकडून लाखो रुपयांची अफू जप्त केली. या कारवाई विषयी पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी माहिती दिली. या कारवाईत पोलिसांनी ९ लाख ९३ हजार १८० रुपये किंमतीची अफुची बोंडं भरलेल्या १८ गोण्या आणि ८ लाख रूपये किंमतीची कार असा एकूण १७ लाख ९३ हजार १८० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
****
नांदेडच्या शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात उपलब्ध पाणीसाठा विचारात घेता रब्बी हंगाम सन २०२२-२३ मध्ये १५ नोव्हेंबर ते २८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत अटीच्या अधीन राहून पाणी अर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपले पाणी अर्ज जवळच्या शाखा कार्यालयात येत्या ३१ ऑक्टोबर पर्यत आवश्यक त्या कागदपत्रासह भरुन द्यावेत. मुदतीनंतर येणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असं आवाहन नांदेड पाटबंधारे विभाग उत्तरचे कार्यकारी अभियंता यांनी केलं आहे.
****
औरंगाबाद जिल्ह्यात पैठण इथल्या जायकवाडी धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. धरणाचे अठरा दरवाजे तीन फूट उचलून ५६ हजार ५९२ घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
****
0 notes
kokannow · 2 years ago
Text
'कोकण नाऊ' इफेक्ट ! महामार्ग प्रशासनाला अखेर जाग
‘कोकण नाऊ’ इफेक्ट ! महामार्ग प्रशासनाला अखेर जाग
पेव्हर ब्लॉकने खड्डे बुजविण्याचे काम जोरात कुडाळ : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांत पावसाळी डांबर आणि सिमेंट काँक्रिट तग धरत नसल्याने हायवे ठेकेदार कंपनी प्रशासनाने पुन्हा पेव्हरब्लॉकच्या सहाय्याने दुरूस्तीचे काम कालपासून युद्धपातळीवर हाती घेतले आहे. महामार्गावरील खड्ड्यांबाबत ‘कोकण नाऊ’ने बातमी प्रसिद्ध करून प्रकाशझोत टाकताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि हायवे ठेकेदार कंपनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
कणकवलीत हायवे ठेकेदार कंपनीच्या बेपर्वाईचा अजून एक बळी
कणकवलीत हायवे ठेकेदार कंपनीच्या बेपर्वाईचा अजून एक बळी
दोन दिवसापूर्वी बस स्थानकासमोर���ल “त्या” वृद्धाचा मृत्यू शॉक लागून ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल होणार काय? सर्वसामान्य जनतेतून उपस्थित होतोय सवाल कणकवली: महामार्ग ठेकेदार कंपनीच्या चुकीच्या कामामुळे आतापर्यंत महामार्गावर अपघातात अनेक बळी गेले. तरी देखील या चुकांवर प्रशासनाकडून आतापर्यंत केवळ पांघरून घालण्याचे काम केले गेले. तसाच काहीसा प्रकार असा पुन्हा घडला असून, ठेकेदार कंपनीच्या बेपर्वाई व…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 2 years ago
Text
नांदगाव मधील हायवेच्या समस्या तातडीने सोडवा
नांदगाव मधील हायवेच्या समस्या तातडीने सोडवा
प्रत्यक्ष पाहणी अंती आमदार नितेश राणे यांच्या सूचना मागणी नसताना गतिरोधक का बसवले? नांदगाव तिठा येथील सर्व्हिस रोडचे काम अर्धवट ठेवून महामार्ग प्राधिकरणाने केलेल्या हलगर्जीपणा बद्दल आमदार नितेश राणे यांनी नांदगाव येथे भेट देत माहिती घेतली.यावेळी हायवे अधिकारी यांना ज्या काही मागण्या नांदगाव वासियांच्या आहेत त्या तातडीने मार्गी लावा.छोट्या छोट्या समस्या सोडविण्यासाठी दिरंगाई नको त्या तातडीने…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years ago
Text
अखेर नगरसेवक शिशीर परुळेकर यांच्या इशाऱ्यानंतर हायवे ठेकेदार नरमला
अखेर नगरसेवक शिशीर परुळेकर यांच्या इशाऱ्यानंतर हायवे ठेकेदार नरमला
कणकवलीतील हॉटेल मंजुनाथ समोरील गटाराच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात गेली दोन वर्ष प्रलंबित ठेवण्यात आल होतं काम कणकवली: शहरातील हॉटेल मंजुनाथ समोर असलेले अपूर्ण स्थितीतील गटार पूर्ण न केल्यास रास्ता रोकोचा इशारा नगरसेवक शिशीर परुळेकर यांनी दिल्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार दिलीप बिल्डकॉन या एजन्सीने अखेर प्रत्यक्षात हॉटेल मंजुनाथ समोरील गटाराचे बांधकाम आज…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years ago
Text
शिशिर परुळेकर यांच्या इशाऱ्या नंतर हायवे प्रशासन नरमले
शिशिर परुळेकर यांच्या इशाऱ्या नंतर हायवे प्रशासन नरमले
7 दिवसात काम करून देण्याची ग्वाही कणकवली : कणकवलीतील हॉटेल मंजुनाथ ते मुख्य नाल्याकडे जोडणारे महामार्गालगतचे अपुर्ण गटार पुर्ण करण्याबाबातची कार्यवाही करण्यात येत असल्याने 16 मे रोजी चे आंदोलन करू नये असे पत्र महामार्ग प्राधिकरण ने नगरसेवक शिशिर परुळेकर यांना दिले आहे. सदरील काम हे ठेकेदार यां��्याकडून पुढील ७ दिवसात पुर्ण करुन घेण्याचे नियोजन आहे. तसेच पुढील ७ दिवसात अपुर्ण गटरचे काम पूर्ण करून…
Tumblr media
View On WordPress
0 notes
kokannow · 3 years ago
Text
कणकवलीत 16 मे रोजी महामार्ग रोको आंदोलन
कणकवलीत 16 मे रोजी महामार्ग रोको आंदोलन
नगरसेवक शिशीर परुळेकर यांचा हायवे प्राधिकरण ला इशारा कणकवली : कणकवली शहरातील हॉटेल मंजुनाथ ते मुख्य नाल्याला जोडणाऱ्या गटारा चे काम अपूर्ण असल्याबाबत वारंवार लक्ष वेधूनही ते पूर्ण केले जात नसल्याने 16 मे रोजी कणकवली हॉटेल मंजुनाथ समोर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा भाजपाचे नगरसेवक शिशिर परुळेकर यांनी महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता यांना दिला आहे. या निवेदनात त्यांनी…
Tumblr media
View On WordPress
0 notes