#स्पॉट फिक्सिंग प्रकरण
Explore tagged Tumblr posts
Text
झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूने एक दीर्घ लेख लिहिला, भारतीय स्पॉट फिक्सर ब्लॅकमेल कसे करायचे ते सांगितले
झिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूने एक दीर्घ लेख लिहिला, भारतीय स्पॉट फिक्सर ब्लॅकमेल कसे करायचे ते सांगितले
ब्रेंडन टेलर स्पॉट फिक्सिंग प्रकरण: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून नुकतीच निवृत्ती घेतलेला झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू ब्रेंडन टेलर याने स्पॉट फिक्सिंगबाबत मोठे रहस्य उघड केले आहे. त्याने ट्विटरवर एक लांब आणि रुंद पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये एका भारतीय व्यावसायिकाने त्याला 2019 मध्ये स्पॉट-फिक्सिंगसाठी खूप ब्लॅकमेल केले आहे. त्यांनी हे देखील सांगितले की, त्यांनी हे संपूर्ण प्रकरण ICC लाचलुचपत प्रतिबंधक…
View On WordPress
#क��रिकेट अपडेट#क्रिकेट अपडेट्स#क्रिकेट बातम्या#क्रिकेटमध्ये स्पॉट फिक्सिंग#क्रीडा अद्यतन#क्रीडा बातम्या#झिम्बाब्वेचा क्रिकेटपटू ब्रेंडन टेलर#झिम्बाब्वेचा माजी कर्णधार#ताज्या क्रिकेट बातम्या#नवीनतम क्रिकेट अद्यतने#नवीनतम क्रिकेट अपडेट#नवीनतम क्रीडा अद्यतन क्रिकेट बातम्या#नवीनतम क्रीडा अद्यतने#नवीनतम क्रीडा बातम्या#ब्रेंडन टेलर#ब्रेंडन टेलर कोकेन#ब्रेंडन टेलर स्पॉट फिक्सिंग प्रकरण#ब्रेंडन टेलरचा ब्लॅकमेलिंग व्हिडिओ#ब्लॅकमेल व्हिडिओ#भारतात स्पॉट फिक्सिंग#भारतातील स्पॉट फिक्सर#भारतीय उद्योगपती ब्रेंडन टेलरला ब्लॅकमेल करतात#स्पॉट फिक्सिंग प्रकरण#स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आय.सी.सी#स्पॉट फिक्सिंगचे नवीन प्रकरण
0 notes
Text
टेलर ने स्पॉट फिक्सिंग की रिपोर्ट में देरी के लिए साढ़े तीन साल का प्रतिबंध लगाया; असफल डोप परीक्षण के लिए निलंबन का भी मुकाबला | क्रिकेट समाचार - टाइम्स ऑफ इंडिया
टेलर ने स्पॉट फिक्सिंग की रिपोर्ट में देरी के लिए साढ़े तीन साल का प्रतिबंध लगाया; असफल डोप परीक्षण के लिए निलंबन का भी मुकाबला | क्रिकेट समाचार – टाइम्स ऑफ इंडिया
दुबई: जिम्बाब्वे के पूर्व कप्तान ब्रेंडन टेलर द्वारा शुक्रवार को साढ़े तीन साल के लिए प्रतिबंधित कर दिया गया था आईसीसी एक भारतीय व्यवसायी द्वारा 2019 के स्पॉट फिक्सिंग दृष्टिकोण की समय पर रिपोर्ट करने में विफल रहने के लिए और एक डोप परीक्षण में विफल होने के लिए एक महीने का निलंबन भी सौंपा गया था, जो इस प्रकरण के दौरान कोकीन के सेवन से जुड़ा था। आईसीसी ने एक बयान में कहा कि टेलर ने इन प्रावधानों के…
View On WordPress
0 notes
Text
Brendan Taylor banned by ICC for 3 and half years for delay in reporting spot fixing approach
Brendan Taylor banned by ICC for 3 and half years for delay in reporting spot fixing approach
दुबई. अंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने जिम्बाब्वे के पूर्व कप्तान ब्रैंडन टेलर (Brendan Taylor) पर 2019 में भारतीय व्यवसायी द्वारा स्पॉट फिक्सिंग की पेशकश की रिपोर्ट समय पर नहीं करने के लिए साढ़े तीन साल का प्रतिबंध लगाया. आईसीसी ने इसके साथ ही टेलर को इसी प्रकरण के दौरान कोकीन लेने के कारण डोप परीक्षण में विफल रहने के लिये एक महीने के लिये निलंबित किया है. ICC ने अपने बयान में कहा कि टेलर ने…
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/81c0aafc8b308662adb79fa6663c91dc/5b5d6489cefc4c1f-2c/s540x810/886d0672820ca42fdd7ba4cb9623e531d882ca70.jpg)
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date – 12 May 2018 Time 6.50 AM to 7.00 AM.
आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक १२ मे २०१८ सकाळी ६.५० मि. ***** जिल्हा न्यायालयांमध्ये लैंगिक शोषण विरोधी समिती स्थापन करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास आपलं नेहमीच प्राधान्य - मुख्यमंत्री औरंगाबाद इथं रस्ता अपघातात नऊ जण ठार आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या हिंगोली जिल्हा भरतीत घोटाळा; २६ जणांविरूध्द गुन्हा दाखल **** देशभरातल्या सर्व उच्च न्यायालयांनी जिल्हा न्यायालयां��ध्ये लैंगिक शोषण विरोधी समिती स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. नवी दिल्लीतल्या तीस हजारी जिल्हा न्यायालयाच्या आवारात संप करणाऱ्या वकिलांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप एका महिला वकिलानं केला होता, त्या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, न्यायालयानं दोन महिन्यांच्या मुदतीत अशा समिती स्थापन करण्यास सांगितलं आहे. **** राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांनी काल मुंबईत राहत्या घरी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. गेल्या काही काळापासून ते कर्करोगानं ग्रस्त होते. या आजाराला कंटाळूनच आत्महत्या करत असल्याचं, त्यांनी आत्महत्येपूर्वीच्या पत्रात लिहिलं असल्याचं, पीटीआयच्या वृत्तात म्हटलं आहे. हिमांशू रॉय हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. २०१३ मधल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अभिनेता विंदू दारासिंहला त्यांनी अटक केली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण, पत्रकार जे.डे हत्या प्रकरण, विजय पालांडे, लैला खान दुहेरी हत्या प्रकरण अशी महत्त्वाची प्रकरणं सोडवण्यात हिमांशू रॉय यांची मोठी भूमिका होती. दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी समर्थपणे जबाबदारी सांभाळली होती. रॉय यांच्या निधनामुळे एका कार्यक्षम अधिकाऱ्याला आपण मुकलो, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. **** प्रधानमंत्री आवास योजनेला शहरी भागात गती येण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरण - म्हाडा ला नियोजन प्राधिकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत ‘शहरी भागात सर्वांना परवडणारी घरे’ या संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. आवास योजनेतली ही घरं, विविध शहरात असल्यानं, वेळेत आराखडे आणि बांधकामांना मंजुरी मिळण्यास विलंब लागतो. तो टाळून योजनेला गती देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यावर्षी राज्यभरात विविध शहरात दहा लाख घरांच्या बांधणीचं उद्दिंष्ट पूर्ण करण्यासाठी, गृहनिर्माण विभागानं काम करण्याचे निर्देश, मुख्यमंत्र्यांनी दिले. **** शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास आपण नेहमीच प्राधान्य दिल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राजगुरु नगर - खेड मधल्या निमगाव, कणेरसर, दावडी, केंदूर या चार गावांशी निगडीत विशेष आर्थिक क्षेत्र - सेझ रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला, तसंच या जमिनींचे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना हस्तांतरण करण्यासाठीचं शुल्कही माफ केलं. त्यामुळे या चार गावातल्या शेतकऱ्यांनी आभार व्यक्त ��रण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. **** उरण इथल्या जवाहरलाल नेहरू बंदरातल्या सर्वपक्षीय वीस वाहतूकदार संघटनांनी कालपासून बेमुदत असहकार आंदोलन पुकारल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. भाज्यांसह, हापूस आंबे, द्राक्षं आणि डाळिंबं आदी फळांचे चारशे कंटेनर वाहतुकीअभावी उभे आहेत. जेएनपीटीतल्या कंटेनर्सची वाहतूक करण्यासाठी केंद्र सरकारनं डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी धोरण सुरू केलं आहे. यासाठी जेएनपीटीनं काढलेली न���विदा चार मुख्य वाहतूक कंत्राटदारांना मिळाली. यामुळे महामुंबई क्षेत्रातल्या सुमारे १० हजार स्थानिक वाहतूकदांराचा व्यवसाय धोक्यात आल्याचं कारण देत, वाहतुकदारांनी हे आंदोलन पुकारलं आहे. **** रास्तभाव दुकानांमधून तूर डाळीची विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी अधिकृत रास्तभाव दुकानदारांना तूर डाळी विक्रीकरता मिळणाऱ्या वाट्यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता रास्तभाव दुकानदारांना प्रतिकिलो तीन रुपये एवढा वाटा मिळेल. याबाबतचा निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला. **** उच्च माध्यमिक व्यावसायिक अभ्यासक्रम - एमसीव्हीसी बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचं, कौशल्य विकास उद्योजकता विभागानं स्पष्ट केलं आहे. हा अभ्यासक्रम आणि योजनेचा दर्जा वाढवण्याबाबत चाचपणी सुरु असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. **** राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत दिली जाणारी अंदाजे नऊ लाख शैक्षणिक प्रमाणपत्रं, राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीवर डिजिटल पद्धतीनं जतन करुन ठेवण्यात येणार आहेत. यासंदर्भात आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. ***** हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे. आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए. आय. आर. डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे. ***** ऑस्ट्रेलिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू बी साई प्रणित आणि समीर वर्मा पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत पोहोचले आहेत. दुसऱ्या फेरीच्या सामन्यात प्रणितनं इंडोनेशियाच्या अहमद मौलानाचा २१ - १२, २१ - १४ असा, तर समीरनं जपानच्या ताकुमा युडाचा २१ - १६, २१- १२ असा पराभव केला. उपान्त्यपूर्व फेरीत प्रणीतचा सामना इंडोनेशियाच्या ली चेक यियू सोबत, तर समीरचा सामना चीनच्या लू गुआंगझू बरोबर होणार आहे. पुरुष दुहेरीतही मनु अत्री आणि बी सुमीत रेड्डी यांच्या जोडीनंही उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. **** मा��ी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी काल मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली. भुजबळ यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ यावेळी उपस्थित होते. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सुमारे दोन वर्ष तुरुंगात राहिल्यानंतर भुजबळ यांची चार मे रोजी जामीनावर सुटका करण्यात आली आहे. **** औरंगाबाद इथं काल पाण्याचा टँकर आणि ॲपे रिक्षाच्या अपघातात नऊ जण ठार तर दोन जण जखमी झाले, काल सायंकाळच्या सुमारास पैठण रस्त्यावर गेवराई तांड्याजवळ हा अपघात झाला. ब्रेक निकामी झाल्यानं, नियंत्रणाबाहेर गेलेला टँकर ॲपे रिक्षावर धडकून अपघात झाल्याचं, याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. औरंगाबाद जिल्ह्यातै काल झालेल्या अन्य एका अपघातात ३० वऱ्हाडी जखमी झाले. वैजापूर तालुक्यात ट्रक आणि बसची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला. **** राज्य राखीव पोलीस दलाच्या हिंगोली जिल्हा भरतीत घोटाळा झाल्याचं निदर्शनास आलं आहे. भरती प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या उमेदवारांना, आर्थिक व्यवहारानंतर गुणवाढ देवून भरती केल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी सेवानिवृत्त समादेशक जयराम फुफाटे, काही पोलिस कर्मचारी आणि सॉफ्टवेअर कंपनीचे कर्मचारी, अशा एकूण २६ जणांविरूध्द हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. **** जालना जिल्ह्यात मागील खरीप हंगामात पाच लाख २८ हजार ८७३ शेतकऱ्यांच्या तीन लाख ७२ हजार हेक्टरवरील कपाशीचं बोंडअळीमुळे नुकसान झालं होतं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्यशासनानं २६३ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. यापैकी ७३ कोटी ४३ लाख रुपये निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचं जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितलं. **** लातूर जिल्हा स्वावलंबी व्हावा यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून इंद्रप्रस्थ जलभूमी अभियान राबवण्यात येणार आहे. काल या अभियानाची घोषणा करतांना निलंगेकर यांनी अभियानाद्वारे, पावसाच्या पाण्याचं पुनर्भरण, विहिरींचं पुनर्भरण, घर तिथं शोषखड्डा, तसंच घर तिथे झाड, हे उपक्रम राबवणार असल्याचं सांगितलं. या अभियानाबाबत 20 मे पर्यंत जनजागृती करण्यात येणार असून हा दिवस स्वावलंबन दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे. **** परभणी इथं अवैध वाळू उपसा करणारी २१ वाहनं जिल्हाधिकारी पी शिवशंकर यांनी जप्त केली आहेत. गुरुवारी मध्यरात्रीनंतर ही कारवाई करण्यात आली. रहाटी ते भारसावडा दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: ही कारवाई केल्याचं, आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. **** जालना इथं महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला पाच हजार रुपये लाच घेताना काल अटक करण्यात आली. पंडित राठोड असं त्याचं नाव असून, नादुरुस्त विद्युत रोहित्र बदलून देण्यासाठी त्यानं शेतकऱ्याकडे लाच मागितली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं काल त्याला रंगेहाथ अटक केली. **** नांदेड वाघाळा महापालिकेच्या राममनोहर लोहिया वाचनालयाचे माजी ग्रंथपाल तथा शिक्षण अधिकारी गंगाधरराव कल्याणकर यांच काल निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. आज सकाळी अकरा वाजता गोवर्धन घाट स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. **** भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड - बीएसएनएल कंपनीच्या ६६ हजार मोबाईल टॉवरची स्वतंत्र उपकंपनी स्थापन करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात काल औरंगाबाद इथं बीएसएनएल कर्मचारी संघटनेच्या सदस्यांनी रस्त्यावर उतरत निदर्शनं केली. ग्राहकांना स्वस्तात आणि कमी किंमतीत सेवा देणारे बीएसएनल बंद पाडण्याचा हा डाव असल्याचा आरोप, संघटनांनी केला आहे. *****
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/db5b41c604cdf3fd89630f469aa1d71b/tumblr_p8k4we5QYC1w06ma4o1_400.jpg)
हिमांशू रॉय यांची आत्महत्या मुंबईः राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि दहशतवादविरोधी पथकाचे माजी प्रमुख हिमांशू रॉय यांनी आज आत्महत्या केल्यानं पोलीस दलात खळबळ उडाली आहे. गेल्या काही काळापासून त्यांना कॅन्सरनं ग्रासलं होतं. या आजाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. हिमांशू रॉय हे 1988 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. 2013मधील आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात विंदू दारासिंहला त्यांनी अटक केली होती. तसंच, दाऊदचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफ बाईलवरील गोळीबार प्रकरण, पत्रकार जेडे हत्या प्रकरण, विजय पालांडे, लैला खान डबल मर्डर केस अशी महत्त्वाची प्रकरणं सोडविण्यात हिमांशू रॉय यांची मोठी भूमिका होती.
0 notes
Photo
![Tumblr media](https://64.media.tumblr.com/21659abbec37fcdca0088e83b8ec8b85/tumblr_p0tpzo3V7U1w5dxz3o1_540.jpg)
Nasir Jamshed gets one-year ban for fixing scandal लाहौर: पाकिस्तान ने इस साल की शुरुआत में पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) को झकझोरने वाले स्पॉट फिक्सिंग प्रकरण में जांचकर्ताओं से सहयोग नहीं करने पर पूर्व सलामी बल्लेबाज नासिर जमशेद पर एक साल का प्रतिबंध लगाया है. जमशेद ने कथित तौर पर खिलाड़ियों और कथित सट्टेबाज के बीच सहयोगी की भूमिका निभाई थी. इस क्रिकेटर ने सभी आरोपों से इनकार किया था. यह भी पढ़ें : फिक्सिंग के आरोपी नासिर जमशेद ने अपनी सफाई में कही ये बात पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पीसीबी) के कानूनी सलाहकार तफज्जुल रिज्वी ने यह फैसला सुनाते हुए कहा कि फिक्सिंग आरोपों की जांच अब भी चल रही है. रिज्वी ने मीडिया से कहा, तीन सदस्यीय पंचाट ने जांच में सहयोग नहीं करने के लिए जमशेद को एक साल के लिए प्रतिबंधित किया है. VIDEO : मैदान पर की बदसलूकी तो पड़ेगा महंगा उन्होंने कहा, ���ीसीबी ने अब तक जमशेद पर फिक्सिंग का कोई आरोप नहीं लगाया है, क्योंकि उस��े खिलाफ ब्रिटेन में एक अन्य जांच चल रही है. ब्रिटेन की नेशनल क्राइम एजेंसी ने फरवरी में पीएसएल के दूसरे सत्र के दौरान स्पॉट फिक्सिंग के आरोप सामने आने के बाद जमशेद और एक अज्ञात व्यक्ति को गिरफ्तार किया था. Source link
0 notes
Text
स्पॉट फिक्सिंग मामला: 2 माह के लिए निलंबित हुआ ये पाक क्रिकेटर!
स्पॉट फिक्सिंग मामला: 2 माह के लिए निलंबित हुआ ये पाक क्रिकेटर!
टेस्ट ऑलराउंडर मोहम्मद नवाज को पाकिस्तान क्रिकेट बोर्ड ने इस साल पाकिस्तान सुपर लीग में स्पॉट फिक्सिंग प्रकरण को लेकर चल रही मौजूदा जांच के संदर्भ में बुधवार को दो महीनें के लिए निलंबित कर दिया गया। बोर्ड द्वारा एक जारी बयान में बोर्ड नें कहा कि, “नवाज को दो महीनों के लिए निलंबित किया जाता है। यह प्रतिबंध 16 से लागू होगा।” बोर्ड नें साथ ही घोषणा की कि निश्चित हालात में निलंबन को एक महीने तक घटाया…
View On WordPress
0 notes
Text
Regional Marathi Text Bulletin, Aurangabad Date - 11 May 2018 Time - 17.25 to 17.30 Language Marathi आकाशवाणी औरंगाबाद प्रादेशिक बातम्या दिनांक ११ मे २०१८ सायंकाळी ५.२५ मि. ****
देशभरातल्या सर्व उच्च न्यायालयांनी लैंगिक शोषण विरोधी समिती स्थापन करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. न्यायालयानं दिल्ली उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक न्यायाधीश न्यायमूर्ती गी��ा मित्तल यांना, दिल्लीतल्या सर्व जिल्हा न्यायालयांमध्ये एका आठवड्यात अशी समिती स्थापन करण्यास सांगितलं आहे. **** राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक हिमांशू रॉय यांनी आज स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. गेल्या काही काळापासून ते कर्करोगानं ग्रस्त होते. या आजाराला कंटाळूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हिमांशू रॉय हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी होते. २०१३ मधल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अभिनेता विंदू दारासिंहला त्यांनी अटक केली होती. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर याचा ड्रायव्हर अरिफवरील गोळीबार प्रकरण, पत्रकार जे.डे हत्या प्रकरण, विजय पालांडे, लैला खान दुहेरी हत्या प्रकरण अशी महत्त्वाची प्रकरणं सोडवण्यात हिमांशू रॉय यांची मोठी भूमिका होती. दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी समर्थपणे जबाबदारी सांभाळली होती. **** उरण इथल्या जवाहरलाल नेहरू बंदरातल्या सर्वपक्षीय वीस वाहतूकदार संघटनांनी कालपासून बेमुदत असहकार आंदोलन पुकारल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. भाज्यांसह, हापूस आंबे, द्राक्षं आणि डाळिंबं आदी फळांचे चारशे कंटेनर वाहतुकीअभावी उभे आहेत. जेएनपीटीतल्या कंटेनर्सची वाहतूक करण्यासाठी केंद्र सरकारनं डायरेक्ट पोर्ट डिलिव्हरी धोरण सुरू केलं आहे. यासाठी जेएनपीटीनं काढलेली निविदा चार मुख्य वाहतूक कंत्राटदारांना मिळाली. यामुळे महामुंबई क्षेत्रातल्या सुमारे १० हजार स्थानिक वाहतुकदांराचा व्यवसाय धोक्यात आल्याचं कारण देत, वाहतुकदारांनी हे आंदोलन पुकारलं आहे. **** शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास आपण नेहमीच प्राधान्य दिल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राजगुरु नगर - खेड मधल्या निमगाव, कणेरसर, दावडी, केंदूर या चार गावांशी निगडीत विशेष आर्थिक क्षेत्र - सेझ रद्द करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला, तसंच या जमिनींचे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना हस्तांतरण करण्यासाठीचं शुल्कही माफ केलं. त्यामुळे या चार गावातल्या शेतकऱ्यांनी आभार व्यक्त करण्यासाठी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. **** भारतीय दूरसंचार निगम लिमिटेड - बीएसएनएल कंपनीच्या ६६ हजार मोबाईल टॉवरवर स्वतंत्र उपकंपनी स्थापन करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात आज औरंगाबाद इथं विविध ठिकाणी ‘बीएसएनएल बचाओ’च्या घोषणा देत, कर्मचारी आणि युनियनच्या सदस्यांनी रस्त्यावर उतरत निदर्शनं केली. ग्राहकांना स्वस्तात आणि कमी किंमतीत सेवा देणारे बीएसएनल बंद पाडण्याचा हा डाव असल्याचा आरोप, संघटनांनी केला आहे. यासाठी सर्वत्र सभा, बैठका घेण्यात येत असल्याचंही आंदोलनकर्त्यांनी सांगितलं. **** राज्य शासनाच्या सर्व इमारती हरित इमारत करण्याच्या दृष्टीकोनातून या इमारतींचं मानांकन करण्याबाबतचं प्रशिक्षण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात येणार आहे. यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासनांतर्गत ग्रीहा कौन्सील यांच्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत आज मुंबईत सामंजस्य करार करण्यात आला. हरित इमारतींच्या बांधकामामुळे जागतिक तपमानवाढीला कारणीभूत पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या वायूंचं उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल, असं पाटील यावेळी म्हणाले. **** राज्य तंत्र शिक्षण मंडळामार्फत दिली जाणारी अंदाजे नऊ लाख शैक्षणिक प्रमाणपत्रं, राष्ट्रीय शैक्षणिक डिपॉझिटरीवर डिजिटल पद्धतीनं जतन करुन ठेवण्यात येणार आहेत. यासंदर्भात आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. **** रास्तभाव दुकानांमधून तूर डाळीची विक्री मोठ्या प्रमाणात व्हावी, यासाठी अधिकृत रास्तभाव दुकानदारांना तूर डाळी विक्रीकरता मिळणाऱ्या वाट्यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता रास्तभाव दुकानदारांना प्रतिकिलो तीन रुपये एवढा वाटा मिळेल. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला. **** जालना जिल्ह्यात मागील खरीप हंगामात पाच लाख २८ हजार ८७३ शेतकऱ्यांच्या तीन लाख ७२ हजार हेक्टरवरील कपाशीचं बोंडअळीमुळे नुकसान झालं होतं. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य शासनानं २६३ कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. यापैकी ७३ कोटी ४३ लाख रुपये निधी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचं पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितलं. **** औरंगाबाद जिल्ह्यातल्या वैजापूर तालुक्यात ट्रक आणि बसची समोरासमोर धडक होऊन ३० वऱ्हाडी जखमी झाले. आज सकाळी हा अपघात झाला. जखमींना वैजापूर इथल्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ****
0 notes